वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 ८/१ पृ. ८-९
  • जुलमी राजापासून सुटका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जुलमी राजापासून सुटका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • मिळती जुळती माहिती
  • जुलमी राजापासून सुटका
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • विश्‍वासूपणे पालनपोषण करणारा आदर्श कुटुंबप्रमुख
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • यहोवाने येशूचं रक्षण केलं
    बायबलमधून शिकू या!
  • त्याने ईश्‍वरी मार्गदर्शन स्वीकारले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 ८/१ पृ. ८-९

येशूचे जीवन व उपाध्यपण

जुलमी राजापासून सुटका

मध्यरात्रीच्या वेळी योसेफ मरियेला का उठवीत आहे? ‘यहोवाच्या दूताने मला नुकतेच दर्शन दिले,’ योसेफ म्हणतो, ‘आणि असे सांगितले की तुला व बाळकास घेऊन मिसर देशात जा. कारण हेरोद येशूचा घात करावयास त्याचा शोध करणार आहे.’

ते तिघे त्याच्यापासून आपली सुटका करून घेतात. हे त्यांनी लगेच केले, कारण हेरोदाला समजले की त्या ज्योतिष्यांनी त्याला फसविले व ते आता शहर सोडून गेलेत. त्या ज्योतिष्यांनी परत येऊन येशूला त्यांनी कोठे पाहिले याची माहिती हेरोदाला द्यायची होती ते आठवते ना. हेरोद आता एकदम क्रोधिष्ठ झाला आहे आणि त्यामुळे येशूला मारण्याच्या प्रयत्नास्वत बेथलहेमातील दोन वर्षाचे व त्याहून कमी वयाचे बालक मारून टाकावेत अशी तो आज्ञा करतो. ज्योतिष्यांनी आधी त्याला बातमी सांगितली त्याच्या आधारावर तो या वयाची गणना करतो.

सर्व लहान मुलांची कत्तल हे किती भितीदायक दृश्‍य आहे! हेरोदाचे शिपाई एकामागोमाग एका घरात जातात आणि तेथे लहान मुलगा पाहताच ते त्याला त्याच्या आईकडून हिसकावून घेतात. त्यांनी अशाप्रकारे किती बाळकांची हत्या केली असेल याची आपणास कल्पना करता येणार नाही. पण मातांच्या रडण्याचा व आकांताचा आवाज, देवाचा संदेष्टा यिर्मया याने सांगितलेला पवित्र शास्त्राचा भविष्यवाद येथे पूर्ण करतो.

याच्या दरम्यान, योसेफ आणि त्याचे कुटुंब मिसरात सुखरूप येऊन पोहोचते व ते तेथेच राहते. पण एका रात्री यहोवाचा दूत त्याला परत स्वप्नात प्रगट होतो. ‘उठ, येशूला व त्याच्या आईस घेऊन इस्राएलाच्या देशात परत जा.’ हा देवदूत आणखी असे सांगतो: ‘बाळकाचा जीव घ्यावयास जे पाहत होते ते सर्व मरून गेले आहेत.’ देवाच्या पुत्राला मिसर देशातून बोलाविले हा पवित्र शास्त्राचा आणखीन एक भविष्यवाद पूर्ण होतो. यानंतर ते कुटुंब आपल्या मायदेशी परत जावयास लागते.

मिसरामध्ये निघून जाण्याआगोदर ते ज्या यहुदियात राहात होते तेथेच परतण्याचा योसेफ विचार करतो. पण तो ऐकतो की हेरोदाचा दुष्ट मुलगा अर्खेलाव यहुदियांवर राज्य करीत आहे, तेव्हा दुसऱ्‍या एका स्वप्नात यहोवा, तेथे राहण्याचा धोका असल्याची सूचना त्याला देतो. यामुळे योसेफ व त्याचे कुटुंब उत्तरेकडे प्रवास करून नासरेथ नावाच्या गावी जाऊन राहतात. यहुदी धार्मिक जीवनापासून अलिप्त असणाऱ्‍या या वसाहतीत येशूची वाढ होते. मत्तय २:१३–२३; यिर्मया ३१:१५; होशेय ११:१.

◆ ज्योतिषी जेव्हा परतले नाहीत तेव्हा कोणते भयंकर कृत्य हेरोद राजाने केले, पण येशू कसा सुरक्षित राहिला?

◆ मिसरातून परत येताना योसेफ पुनः बेथलहेमात का राहिला नाही?

◆ या कालावधीत पवित्र शास्त्राचे कोणते भविष्यवाद पूर्ण झाले?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा