वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 ९/१ पृ. २२-२६
  • तुम्हाला छळासाठी आता काही तयारी करता येईल का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला छळासाठी आता काही तयारी करता येईल का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपले मन व अंतःकरणाची तयारी करा
  • तुम्ही लोकांशी कसे दळवळण ठेवता?
  • क्षेत्रकार्याविषयी तुमचा दृष्टिकोन काय आहे?
  • तुम्ही भरवसापात्र आहात का?
  • तुम्ही लोकांबरोबर कसे वागता?
  • तुम्ही चौकसबुद्धीचे आहात का?
  • तुम्ही पवित्र शास्त्र विद्यार्थी आहात का?
  • तुम्ही प्रार्थना करता का?
  • तुम्ही अधिकारावर विश्‍वस्त राहता का?
  • तुम्ही विजयी होऊ शकाल
  • छळ झाला तरी धीर सोडू नका!
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • नीतिमत्त्वाकरता छळ झालेले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • बंदी असतानाही यहोवाची उपासना करत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • धीराने छळ सोसल्यामुळे यहोवाचे गौरव होते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 ९/१ पृ. २२-२६

तुम्हाला छळासाठी आता काही तयारी करता येईल का?

“ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याहि पाठीस लागतील.”—योहान १५:२०.

१, २. काही सरकारांनी यहोवाच्या साक्षीदारांविरूद्ध कोणती अनपेक्षित हालचाल केली?

आपल्या अंथरूणावर तुम्हाला एके दिवशी लवकर जाग येते अशी कल्पना करा. आता लागलेच उठावे की थोडा वेळ अंथरूणावर तसेच पडून राहावे याचा विचार तुम्ही करता. पण प्रथमतः रेडिओत प्रथम कोणती बातमी लागते ते ऐकण्यासाठी तुम्ही रेडिओ लावता. बातम्या देणारा तुमची पुरी झोपच उडवतो. तो सांगतो: “सरकारने अनुज्ञा दिल्याप्रमाणे यहोवाचे साक्षीदार या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या पंथावर संपूर्ण देशभर बंदी आणण्यात आली आहे.” तुम्हाला आता चैन पडत नाही!

२ असा हा किंवा यासारखाच अनुभव काही देशात ख्रिश्‍चनांना आजच्या काळात अनुभवण्यास मिळाला. काय घडणार याचा अगाऊ इशारा कधी कधी मिळतो. पण केव्हा केव्हा बंदी अगदी अनपेक्षितरित्या येते. यामुळे आपण गोंधळून जावे का?

३. इ.स. ३३ मध्ये येशू ख्रिस्ताला कोणते विरोधक अनुभव आले?

३ बहुधा नाही. अशाच गोष्टी पहिल्या शतकातसुद्धा घडल्या. इ.स.३३ मधील वसंत ॠतुच्या सुरूवातीला येशूने एका पाठाळावर बसून यरूशलेमात कसा प्रवेश केला ते आठवा. लोकांनी त्याचा आनंदाने जयजयकार केला आणि आपली वस्त्रे त्याच्यापुढे रस्त्यावर टाकली. पण काही दिवसानंतर लगेच काय घडले? येशूला पंतय पिलातासमोर चौकशीकरता उभे राहावे लागले व यावेळी त्याच शहरातील रक्‍तपिपासू जमावाने ओरडून सांगितले: “त्याला वधस्तंभावर खिळवावे! . . . त्याला वधस्तंभावर खिळवावे!” (मत्तय २१:६–९; २७:२२, २३) परिस्थिती एकाएकी बदलली होती.

४. येशूचे अनुयायी या अर्थी आम्ही कशाची अपेक्षा करावी?

४ तद्वत, आज काही देशात परिस्थिती बदलते आणि एकाएकी छळ उद्‌भवतो तेव्हा आम्ही अचंबित होऊ नये. आपण येशूचे खरे अनुयायी आहोत तर छळ येईल अशी अपेक्षा करावी हे ध्यानात ठेवा. (योहान १५:२०) यामुळेच येशूच्या त्या शब्दांचा ठळकपणा लक्षात येतो की: “जागृत राहा.”—मत्तय २४:४२.

५. कोणत्या प्रश्‍नांचा आता आम्ही विचार करण्यास हवा?

५ हे आम्हाला कसे जमेल? काही अघटित घडलेच तर त्याकरता तयारीत राहण्याचा काही मार्ग आहे का?

आपले मन व अंतःकरणाची तयारी करा

६, ७. (अ) छळाकरता शारिरीक तयारी करणे प्रयासाचे का आहे? (ब) तरीपण छळाकरता कोणती महत्वाची तयारी करता येऊ शकेल?

६ खरे पहाता, परिस्थिती कशी उद्‌भवेल हे आपल्याला ठाऊक नसल्यामुळे शारिरीकदृष्टया तयारी ठेवणे प्रयासाचे आहे. जोपर्यंत प्रत्यक्षात घडत नाही तोपर्यंत बंदी ही काटेकोर असेल वा अंशतः असेल किंवा कोणत्या गोष्टींवर बंदी राहील हे आपल्याला कळणार नाही. कदाचित घरोघरच्या प्रचार कार्यावर व कदाचित धार्मिक सभा घेण्यावर बंदी आणली जाईल. कधी कधी यहोवाच्या साक्षीदारांची कायदेशीर संस्था समाप्त केली जाते किंवा काही विशिष्ठांना लागलेच तुरुंगात टाकले जाते. गरजेच्या वेळी प्रकाशने कोठे लपविता येतील त्याची विविध ठिकाणे लक्षात असू द्यावीत. यापेक्षा अधिक आम्हाला शरिरीक तयारीच्या बाबतीत जास्त काही करता येणार नाही.

७ तथापि, तुम्हाला मनाची व अंतःकरणाची तयारी करता येईल आणि हे अधिक महत्वाचे आहे. छळास का अनुज्ञा मिळते व तुम्हाला अधिकाऱ्‍यांपुढे का उभे राहावयाचे आहे यावर आपले मन लावा. “साक्षीसाठी,” असे येशू म्हणाला. (मत्तय १०:१६–१९) विश्‍वासू राहण्यासाठी तुम्ही तुमचे अंतःकरण तयार केले आहे तर काहीही झाले तरी, गरज उद्‌भवेल त्यावेळी कोणती हालचाल करावी ते यहोवा सूज्ञ मार्गाने तुम्हाला कळवील. तर मग आध्यात्मिक दृष्टया छळासाठी आम्ही कोणती व कशी तयारी करू शकतो?

तुम्ही लोकांशी कसे दळवळण ठेवता?

८. आपल्याला ‘अपमानात संतोष वाटला’ असे पौल का म्हणू शकला?

८ प्रेषित पौलाने म्हटले: “ख्रिस्तासाठी दुर्बळता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे सोसणे यात मी संतुष्ट आहे.” (२ करिंथकर १२:१०) पौलाला अपमानात आनंद वाटत होता का? मुळीच नाही. तरी पण छळात अपमान हा नेहमीच होतो. पण हे जे काही घडले ते देवाच्या नामाची स्तुति होण्यासाठी घडले आहे तर त्यात टिकून राहण्यात पौलाला संतुष्टता वाटत होती.

९. “ख्रिस्तासाठी . . . अपमान” सहन करण्यासाठी आपल्याला आता कोणती तयारी करता येईल?

९ आपणालाही “ख्रिस्तासाठी . . . अपमान” सहन करावा लागेल याची निश्‍चिती बाळगता येईल. आम्हाला शाब्दिक किंवा शारिरीक सुद्धा मार खावा लागेल. आम्ही यात टिकू का? बरे तर, आता आपल्याला स्वतःसंबंधीचा कोणता दृष्टिकोन आहे? एखादा खरा वा काल्पनिक अपमान आमच्या बाबतीत घडला तर आम्ही लगेच गंभीर होऊन त्वरेने प्रतिक्रिया व्यक्‍त करतो का? तर मग, आत्ताच “सहनशीलता . . . सौम्यता, इंद्रियदमन” या गुणात वाढ करण्यासाठी का काम करू नये? (गलतीकर ५:२२, २३) ही ख्रिश्‍चनांना आता उत्तम तालीम आहे. ती छळाच्या काळात तुमचे जीवन वाचवू शकेल.

क्षेत्रकार्याविषयी तुमचा दृष्टिकोन काय आहे?

१०. आमच्या प्रचार कार्यावर बंदी येते त्यावेळी कोणती शास्त्र वचनीय प्रतिक्रिया योग्य आहे?

१० बंदिसत्रात सहसा ज्या गोष्टीवर प्रतिबंध येत असतो ती आहे “सुवार्ते”चा जाहीर प्रचार. तरीपण या शेवटल्या दिवसात प्रचार व शिष्य बनविण्याचे कार्य महत्वाचे आहे. त्याशिवाय लोकांना देवाच्या राज्याबद्दल कसे शिकायला मिळेल? यास्तव अशा या बंदीविषयीची योग्य प्रतिक्रिया, यहुदी धर्मपुढाऱ्‍यांनी प्रेषितांच्या प्रचाराच्या हालचालीवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी जी व्यक्‍त केली त्यासारखी सदृश्‍य असली पाहिजे. (प्रे. कृत्ये ५:२८, २९) बंदीमध्ये, प्रचाराचे काही मार्ग बंद राहतील. पण कार्य हे कोणत्या ना कोणत्या तऱ्‍हेने केले गेले पाहिजे. छळाचा दबाव असता प्रचार चालू ठेवण्याचे बळ तुम्हाठायी असेल का?

११, १२. छळ आला असता प्रचार चालू ठेवण्याएवढे बळ तुम्हाठायी असेल की नाही हे तुम्हाला कसे निश्‍चित ठरविता येईल?

११ खरे म्हणजे, सध्या तुम्हाला प्रचार कार्याबद्दल काय वाटते? छोट्या छोट्या कारणांना अडथळा बनू देऊन तुम्हाला क्षेत्र कार्यात अनियमित बनविता का? तसे झाल्यास बंदी आल्यावर तुम्ही काय कराल? आता लोकांची तुम्हाला भीति वाटते का? तुम्ही राहता त्या रस्त्यावर घारोघरचा प्रचार करण्याची तुमची इच्छा आहे का? एकटे काम करायला तुम्हाला भीति वाटते का? काही देशात दोघाजणांनी एकत्र मिळून काम करणे लोकांचे लक्ष वेधवून घेते. त्यामुळेच जेथे सुरक्षित आहे अशा ठिकाणी वेळोवेळी एकट्यानेच काम का करू नये? ही चांगली तालीम असेल.

१२ रस्त्यावरील मासिकाच्या साक्षीकार्यात तुम्ही सहभागी होता का? अनौपचारिक साक्षीकार्याकरता संधि निर्माण करण्यासाठी तुम्हाठायी धैर्य व पुढाकार आहे का? व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही कार्य करता का? धनाढ्य वा प्रतिष्ठित लोकांकडे जाऊन बोलण्याचे भय तुम्हाला वाटते का? तुम्ही प्रचाराच्या काही विशिष्ठ माध्यमात सहभाग घेत असाल आणि जेव्हा बंदी येते त्यावेळी त्या माध्यमाद्वारे कार्य करणे शक्य होत नाही अशावेळी तुम्ही काय कराल?

१३. तुम्हाला आता तुमच्या उपाध्यपणाबद्दल काय करता येणे शक्य आहे की जेणेकडून छळाच्या काळात प्रचाराच्या तयारीत राहता येईल?

१३ काही प्रकारात तुमची कमतरता आहे हे तुम्ही ओळखून आहात का? तर त्याबद्दल काही करण्याची वेळ आत्ताच आहे. यहोवावर विसंबून राहण्यास शिका व एक लायक उपाध्याय बना. याकरवी तुम्हाला सध्या प्रचारासाठी अधिक समर्थ बनविले जाईल व छळाच्या काळात टिकून राहण्यासाठी तुमची तयारी होईल.

तुम्ही भरवसापात्र आहात का?

१४, १५. (अ) छळ उद्‌भवला त्यावेळी बळकट आधार देणारे पहिल्या शतकातील ख्रिश्‍चन कोणत्या प्रकारातील असावेत? (ब) त्या आरंभीच्या मजबूत ख्रिश्‍चनांप्रमाणे यहोवाच्या आधुनिक सेवकाला कसे बनता येईल?

१४ ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात अशा काही विशिष्ठांचा उल्लेख आहे जे मंडळीला आधारस्तंभ ठरले. उदाहरणार्थ, पौल रोममध्ये तुरूंगात होता त्यावेळी अनेसिफरने त्याला धैर्याने मदत दिली होती. (२ तिमथ्यी १:१६) किंख्रिया येथील मंडळीत परिश्रमाचे काम केल्यामुळे फीबी या बहिणीची प्रशंसा करण्यात आली. (रोमकर १६:१, २) छळ आला तेव्हा असे स्त्री पुरुष बळकट आधार देणारे ठरले असावेत. ते ‘सावध राहिले, विश्‍वासात स्थिर राहिले व मर्दासारखे खंबीर वागले.’—१ करिंथकर १६:१३.

१५ सर्व ख्रिश्‍चनांनी, पण खासपणे वडिलांनी प्रगति करत राहून आरंभाच्या ख्रिश्‍चनांप्रमाणे मजबूत होण्यास हवे. (१ तिमथ्यी ४:१५) गुप्त गोष्टींचे खाजगीपण राखण्यास शिका व शास्त्रीय तत्वावर आधारीत असे निर्णय घ्या. इतरांमधील ख्रिस्ती गुण न्याहाळण्याची स्वतःला तालीम द्या कारण यामुळेच कोण दबावाखाली विश्‍वस्तपणे टिकू शकेल ते तुम्हाला समजेल. आपल्या मंडळीत आधारस्तंभ बनण्यासाठी यहोवाच्या सहाय्याने कार्य करा. असे केल्यामुळे ज्याला नेहमीच मदतीची गरज असते ती व्यक्‍ति बनण्याऐवजी तुम्ही इतरांना मदत देणारी व्यक्‍ति बनू शकाल.—गलतीकर ६:५.

तुम्ही लोकांबरोबर कसे वागता?

१६, १७. कलस्सैकर ३:१२, १३चा अवलंब आता केल्यास तो तुमची छळविषयीची कोणती तयारी करून देतो?

१६ प्रेषित पौलाने आम्हाला प्रोत्साहन दिले: “करूणायुक्‍त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकांचे सहन करा, आणि . . . आपसात क्षमा करा.” (कलस्सैकर ३:१२, १३) असे करणे सोपे आहे का? किंवा लोकांच्या अपूर्णता तुम्हाला अवास्तविकरित्या चिडीस आणतात? तुम्ही लगेच मनाला लावून घेऊन निराश होता का? तसे आहे तर हे तयारीचे आणखी एक क्षेत्र आहे.

१७ ज्या देशात सभांना बंदी आहे तेथे छोट्या संख्येने ख्रिस्ती बांधव एकत्रित येतात. अशा परिस्थितीत त्यांच्या उणीवा लगेच दिसून येतात. तर मग आत्ताच आपण दुसऱ्‍यांच अशक्‍तपणा सहन करण्याची तालीम का लावून घेत नाही; कारण इतरही निसंशये तुमच्या अशक्‍तपणाला वागवून घेत असतात. इतरांबद्दल टीका झोडत राहून त्यांना निराश करू नका. याप्रमाणेच मंडळीच्या पुस्तक अभ्यासासाठी जेव्हा आम्ही कोणाच्या घरी जातो तेथे त्यांच्या मालकी हक्काच्या गोष्टीसंबंधाने स्वतः व आपल्या मुलांना आदर दाखविण्याची तालीम द्यावयाची आहे. मग छळामध्ये अशा प्रकारचा आदर शांतीप्रिय नातेसंबंध उभारण्यात होईल.

तुम्ही चौकसबुद्धीचे आहात का?

१८. आपणाला गरजेपुरतीच माहिती असणे का संरक्षणदायक आहे?

१८ स्वभावतः काही जण खूपच चौकसबुद्धीचे असतात. काही गोष्टींचा परिचय वा माहिती करून घेतल्याविना त्यांना राहावत नाही. तुम्ही यापैकीचे आहात का? तर मग याचा विचार करा: ज्यावेळी यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी असते तेव्हा अधिकारीवर्ग त्यांची संघटनात्मक व्यवस्था आणि जबाबदार देखरेख्यांची नावे जाणू इच्छितात. तुम्हाला या गोष्टी माहित असल्या तर त्या काढून घेण्यासाठी तुम्हाला ते मारहाणही करतील. आणि ती माहिती तुम्ही सांगितली तर त्यामुळे तुमच्या बांधवांच्या कामावर फार मोठा आघात होईल. याकारणास्तव, कधी कधी आपली गरजेपुरतीच माहिती असणे व त्या पेक्षा अधिक न जाणणे संरक्षण देणारे ठरते.

१९. छळ होताना गुप्त गोष्टी प्रदर्शित करण्याचे टाळता येऊ शकेल म्हणून सध्या कोणती गोष्ट सहाय्यक ठरेल?

१९ याविषयीची तालीम तुम्हाला आता घेता येईल का? होय. उदाहरणार्थ, मंडळीत एखादे न्यायदानाचे प्रकरण घडले असल्यास मंडळीतील वडील जे म्हणतात तेवढेच एकून समाधानी राहणे बरे आणि याबद्दल आणखी माहिती उकरण्याचे टाळावे. वडीलांची बायको व मुले यांनी त्या गुप्त गोष्टी त्यांना प्रकटविण्याची गळ घालू नये. आम्ही प्रत्येक बाबतीत ‘लुडबूड न करण्याचे’ शिकून घेतले पाहिजे. —२ थेस्सलनीकाकर ३:११.

तुम्ही पवित्र शास्त्र विद्यार्थी आहात का?

२०, २१. सध्याचा परिश्रमी पवित्र शास्त्र अभ्यास कार्यावर बंदी येते त्यावेळी कसा साहाय्यक ठरेल?

२० ख्रिश्‍चनांच्या आध्यात्मिक बळाचा आधार पवित्र शास्त्र आहे. त्याच्या सर्व महत्वाच्या प्रश्‍नांची ते त्याला उत्तरे देते व त्याला देवाच्या सूज्ञानाचा परिचय घडविते. (२ तिमथ्यी ३:१४–१६) तात्विकदृष्टया सर्व ख्रिस्ती याची कबूली देतील पण तुमच्या जीवनात पवित्र शास्त्र खरे पाहता कोणती भूमिका घेते? तुम्ही त्याचा नियमित अभ्यास करता का आणि जे काही करता त्यामध्ये त्याला मार्गदर्शन देऊ करण्यास मुभा देता का?—स्तोत्रसंहिता ११९:१०५.

२१ कार्यास बंदी असते अशावेळी आम्हाला पवित्र शास्त्र आधारित प्रकाशने प्राप्त करण्यात प्रतिबंध होत असतो. कधी कधी तर पवित्र शास्त्रही मिळणे मुष्कीलीचे होते. अशावेळी पवित्र आत्मा गतकाळात तुम्ही ज्या गोष्टी शिकला त्या तुम्हाला आठवून देईल. पण ज्याचे तुम्ही शिक्षणच घेतले नाही त्या तो तुम्हाला आठवून देऊ शकणार नाही! याकारणास्तव तुम्ही आता जितके शिकाल तितक्या अधिकपणे तुमची मने व अंतःकरणे भरविली जातील व मग गरजेच्यावेळी पवित्र आत्मा त्या तुम्हाला काढून देईल.—मार्क १३:११.

तुम्ही प्रार्थना करता का?

२२. “प्रार्थनेत तत्पर” असणे छळाकरिताच्या तयारीसाठी कसे मदतगार ठरू शकते?

२२ छळाविषयीचा विचार करतो तेव्हा वरील प्रश्‍न अत्यंत महत्वाचा वाटतो. पवित्र शास्त्र सूचना देते: “प्रार्थनेत तत्पर” राहा. (रोमकर १२:१२) प्रार्थना ही यहोवा देवाबरोबरचे थेट दळणवळण आहे. याद्वारे आम्हाला देवाकडे अडचणीच्या काळी सहनशीलतेचे बळ, योग्य निर्णय घेण्याचे सूज्ञान मागता येते व त्याच्या बरोबर व्यक्‍तिगत नाते उभारता येते. विरोधक आमच्या कडून प्रकाशने, पवित्र शास्त्र हिसकावून घेऊ शकतील, ते इतर ख्रिश्‍चनांसोबतचा आमचा सहवास मोडू शकतील पण त्यांना प्रार्थनेचा आमचा हक्क हिसकावून घेता येणार नाही. तुरुंग कितीही मजबूतीचा असला तरी ख्रिश्‍चनाला देवाशी संपर्क साधता येऊ शकतो. तद्वत प्रार्थनेच्या हक्काचा पूर्ण फायदा घेणे भावी काळात जे काही घडू शकेल त्याच्या तयारीचा उत्तम मार्ग आहे.

तुम्ही अधिकारावर विश्‍वस्त राहता का?

२३. नियुक्‍त वडील आणि “विश्‍वासू व बुद्धीमान दास” यांजवरील आपला विश्‍वस्तपणा का उभारावा?

२३ विश्‍वस्तपणा उभारणे ही आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट आहे. देवाने संरक्षणाकरता जी योजना आखली आहे तिचा मंडळीतील वडील एक भाग आहेत. वडिलांनी अशा पद्धतीने हालचाल करावी की त्यामुळे ते विश्‍वस्त ठरतील आणि मंडळीत इतरांनी त्यांना विश्‍वस्तपणा दाखवण्याचे शिकले पाहिजे. (यशया ३२:१, २; इब्रीयांस १३:७, १७) शिवाय अधिकपणे, आम्ही “विश्‍वासू व बुद्धीमान दास” यावर विश्‍वस्त राहण्यास शिकले पाहिजे.—मत्तय २४:४५–४७.

२४. यहोवाच्या लोकांच्या शत्रूंकरवी जे लबाडीचे हल्ले होतात त्याच्या प्रतिकाराच्या तयारीसाठी काय करता येऊ शकते?

२४ शत्रू देवाच्या संस्थेबद्दल लबाड्या पसरवितील. (१ तिमथ्यी ४:१, २) एका देशात ख्रिश्‍चनांना असे मानण्यास फसविले गेले की यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाने ख्रिस्ती धर्म त्यागला, पण ते खरे पाहता अद्याप विश्‍वासू होते. अशा प्रकारच्या हल्लयाचा प्रतिकार करण्याचा उत्तम मार्ग तुमच्या बांधवाविषयी मजबूत प्रीती उभारणे आणि यहोवावरच्या व्यवस्थेवर विश्‍वस्त राहण्यास शिकणे.—१ योहान ३:११.

तुम्ही विजयी होऊ शकाल

२५. छळ झाल्यावर त्यातून विजयाने बाहेर पडण्यासाठी आम्हास काय साहाय्यक ठरेल?

२५ छळ सहन केल्यावर वृद्ध प्रेषित योहान आम्हाला सांगतो: “जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळविते. आणि ज्याने जगावर जय मिळविला तो म्हणजे आपला विश्‍वास.” (१ योहान ५:४) तुम्हाला आपल्या बळावर हा जय मिळू शकणार नाही. तुमच्यापेक्षा सैतान व त्याचे जग बळकट आहेत. पण ते यहोवा देवापेक्षा शक्‍तीमान नाहीत. यास्तव आम्ही देवाच्या आज्ञा पाळल्या, आम्हास टिकवून धरण्यासाठी त्याच्या आत्म्याची याचना केली आणि सहनशीलतेसाठी बळ मिळावे म्हणून देवावर पूर्णपणे विसंबून राहिलो तर आम्ही विजयी ठरू.—हबक्कुक ३:१३, १८; प्रकटीकरण १५:२; १ करिंथकर १५:५७.

२६. आपण सध्या छळग्रस्त नसलो तरी काय केले पाहिजे?

२६ काही असे देश आहेत की जेथे ख्रिश्‍चनांना एक तर त्यांच्या वैवाहिक सोबत्याकडून वा कोणा अन्य मार्गाने छळ मिळतो. इतर काही देशात स्थानिक सरकारच्या शासकीय हालचाली मुळे देवाच्या सेवकांना त्रास संभवतो. तरीपण, आता, सध्या तुम्हाला छळ अथवा त्रास होत नसला तरी तो कोणत्याहि वेळी होऊ शकतो हे लक्षात ठेवा. ख्रिश्‍चनांचा छळ हा अंतसमयाच्या चिन्हाचा एक भाग असेल असे येशूने म्हटले होते त्यामुळे आम्ही नेहमी त्याची अपेक्षा करावी. (मत्तय २४:९) तर मग त्याविषयीची आत्ताच तयारी का करू नये? पुढे काहीही येवो, तुमची वागणूक, तुमचा स्वर्गीय पिता यहोवा याला नेहमी गौरव देत राहील याचा आत्मविश्‍वास असू द्या.—नीतीसूत्रे २७:११.

तुमची उत्तरे काय आहेत?

◻ छळाकरता आता कोणत्या स्वरूपाची तयारी तुम्हाला करता येणे शक्य आहे?

◻ छळ होताना प्रचार कार्य जारी ठेवण्यासाठी आवश्‍यक असणारे बळ वाढविण्यासाठी तुम्हाला आता काय करता येईल?

◻ छळ घडतो तेव्हा कलस्सैकर ३:१२, १३चे आता केलेले अवलंबन कसे उपयुक्‍त ठरू शकते?

◻ नियुक्‍त वडील आणि “विश्‍वासू व बुद्धीमान दास” याविषयीचा आपला विश्‍वस्तपणा का वाढविण्यास हवा?

◻ छळ होतो तेव्हा तुम्ही कसे विजयी ठरू शकाल?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा