आपत्तींना तुम्ही कसे सहन करू शकाल?
“तुम्ही आपल्या धीराने आपले जीवन मिळवाल.” हे शब्द येशू ख्रिस्ताने “शेवटल्या काळाच्या” संबंधाने भविष्यवाद देताना काढले. (लूक २१:१९; दानीएल १२:४) त्याच्या या निवेदनात दोन मुद्दे सामोरे येतात: (१) आमचा जीव वाचविण्यासाठी धीर आत्यावश्यक आहे व (२) ते सहन करणे शक्य आहे.
परंतु तुम्ही ते कसे सहन करू शकाल? या प्रश्नाचे उत्तर यहोवा त्याच्या सेवकावर छळ व त्रास येण्याची मुभा का देतो हे ज्ञात करू घेण्याची गरज आहे.
त्रास व छळ का?
सर्वप्रमुख कारण सैतानाने यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या नीतीमत्वतेस आव्हान केले हे आहे. (उत्पत्ती ३:१–१९) यहोवाने त्याच्या स्वतःच्या नामास्तव व इतरांसाठी या आव्हानाचा सामना करण्याची योजना केली आहे.
आम्ही या त्रासाकडे योग्य मार्गाने पाहू तर आम्हासाठी फायदेकारक शाबीत होऊ शकणाऱ्या उद्देशासाठी त्रास सहन करण्याची देवाने त्याच्या लोकांना मुभा दिली. उदाहरणार्थ, आम्हावर येणाऱ्या संकटांना कोणत्याही संतापाविना सहन करू तर आम्ही आमचा विश्वास अस्सल, देवास संतोषविणार आहे हे सिद्ध करु. (१ पेत्र १:६, ७; इब्रीकर ११:६) परंतु क्लेश, व्यक्तिगत वैगुण्य जसे गर्व, अधीरपणा व सुखावरचे प्रेम हे ही दाखवील. देवाच्या आत्म्याच्या मदतीने आम्ही अशा गुणावर मात करण्याचा प्रयत्न करू शकतो व “नवे व्यक्तिमत्व धारण” करू शकतो.—कलस्सैकरांस ३:९–१४.
दावीदाने हा मुद्दा आम्हासाठी असे म्हणून चांगला व्यक्त केला: “मी पिडीत झाल्यामुळे माझे बरे झाले, कारण तेणेकरून मी तुझे नियम शिकलो.” (स्तोत्रसंहिता ११९:७१) त्रासाकडे पाहण्याची केवढी उदात्त दृष्टी! तक्रार वा कुरकुर नाही. त्रासामुळे कोणतीहि व्यक्तिगत हानी झाली असेल त्याकडे स्वार्थीपणे पाहणे नाही. याऐवजी केवढी सूज्ञ समज की स्तोत्रकर्त्यावर यहोवाने जे काही गुदरण्यास परवानगी दिली तिने त्यास यहोवाचे नियमांची अधिक रसिकता जाणण्यास मदत केली. आम्ही त्रासांना आम्हावर तसाच परिणाम करावा म्हणून मुभा देतो का?
प्रेषित पौलास आशिया विभागात अनुभवण्यास आलेल्या संकटाकडून फायदा झाला. अशा संकटांनी त्यास यहोवावर अधिक विसंबून राहण्यास लावले ही त्यातील एक गोष्ट आहे. ती प्रेषिताच्या पुनरुत्थानावर असलेल्या विश्वासावर जोर देते. त्याने त्याच्यावरील कठीण संकटे “जो मृतांना उठवितो त्या देवा” वरील पूर्ण भरवशांने सहन केली. (२ करिंथकर १:८–१०) होय, पौलाने त्याच्या संकटातील धीरामुळे फायद्यांचा अनुभव घेतला.
जे ख्रिश्चन सध्याच्या संकटाकडे योग्य दृष्टीने पाहतात त्यांच्याबाबतही हेच सत्य आहे. झिम्बाब्वे, ज्यास गनिमी युद्धाने पिडीले होते त्यातील यहोवाच्या लोकांची मंडळी सुरक्षित खेडयात स्थलांतरील झाली होती. युद्धाच्या स्थितीमुळे मंडळीतील तीनही वडिलांनी त्यांचे प्रत्येकी एक लेकरू गमावले होते. याहून अधिक स्थानिक लोक मुलांच्या पालकावर, त्यांनी रागीष्ट झालेल्या दुरात्म्यांना संतुष्ट करण्याची कृति करून आपल्या विश्वासाची हातमिळवणी करावी याकरता दबाव आणीत होते. वडीलांना याबाबत काय वाटले होते? तिघांचे प्रतिनिधित्व करणारा त्यांच्यातील एकजण म्हणाला: “राष्ट्र युद्धात गुंतले असता, आम्ही दुरात्म्यांसोबतच्या युद्धात आहोत. शत्रूवर [दुरात्म्यांची सेना] सरशी करण्यासाठी आम्हापाशी मदत आहे, त्यात आम्हाजवळ शाश्वत आशा आहे. यास्तव आम्ही युद्धात कामी आलो, यहोवास एकनिष्ठ राहून मरतो तर आम्हास पुनरुत्थित केले जाईल. आम्ही शत्रूस जिंकलेले असणार.” या तीन विश्वासू पुरषांनी यहोवाच्या सुटका करण्याच्या सामर्थ्यावरची दृष्टी कधीही गमावली नाही. त्यांच्या स्थिर भूमिकेची दखल घेता आम्हास पटले पाहिजे की आम्ही सुद्धा तोंड देऊ शकतो.
छळ क्रुर आहे तेव्हा
तुम्ही म्हणाल: ‘वेदनाप्राय क्रूर पद्धतीचा उपयोग करून छळ अधिक क्रूर असतो त्यावेळी काय?’ ‘आम्ही त्यावेळीही विश्वासास तडा न देता सहन करू शकू का?’ होय, पूर्वीचे ख्रिश्चन हातमिळवणी करण्याविना भेसूर वागणूक सहन करू शकले.
त्याप्रमाणेच सध्याच्या काळात झिम्बाब्वेच्या तुरळक लोकवस्ती असणाऱ्या विभागात राहणाऱ्या ख्रिश्चनांनी यहोवावरील पूर्ण विश्वास प्रदर्शित केला. तो मनुष्य एके प्रसंगी त्याची पत्नी त्यांच्या विवाहीत मुलीस भेट देण्यास गेली म्हणून एकटाच होता. अचानकपणे, त्याला काही शस्त्रास्त्र धारकांनी हाक मारली व त्यांनी त्यांच्या ख्रिस्ती भूमिकेवर खोटे आरोप केले. त्यास बेदम मारल्यावर, त्यांनी तापून लाल झालेल्या विटा त्याच्या पायामध्ये बांधल्या व त्याला अशा विटावर चालण्यास भाग पाडले. त्याला ते मरण्यासाठी एकटेच सोडून गेले. अचानकपणे परिस्थिती बदलल्यामुळे प्रवास करणे कठीण बनल्यामुळे पत्नीस तिच्या पतीच्या अशा दैन्यावस्थेची माहिती मिळू शकली नाही. त्यास मदत केल्यास शेजाऱ्यांना देहांताची शिक्षा ठोठावण्याची धमकी दिली गेली. यास्तव या स्थितीमध्ये तो प्रत्येक दिवशी मरण्याची अपेक्षा करीत पूर्ण तीन महिने जगला.
हा पिडीत ख्रिश्चन मनुष्य त्याच्या घरात तयार असणारे मक्याचे अन्न व पाणी यावर स्वत:स जगवू शकला. त्यास दिलेल्या भयानक वागणुकीमुळे तो चलू शकत नव्हता. यास्तव जळण संपले तेव्हा त्याला जेवण शिजविण्याकरता घरातील लाकूड सामान तोडावे लागले. पाणी दूषित बनून त्यात किडे पडले. त्याच्या जखमा चिघळत होत्या.
सरतेशेवटी तीन महिन्यांनी त्याची पत्नी घरी परतली त्यावेळी अशी ही बांधवाची स्थिती होती. त्याला पाहिल्यावर तिला काय वाटले असावे याचा विचार करा! ताबडतोब तिने त्यास रूग्णालयात घेऊन जाण्याची तयारी केली. जवळच्या शहरातील रूग्णालयात नेण्यास तिला त्यास जवळच्या बस थांब्यापर्यंत ढकलगाडी व तेथून पुढे जाणे होते. तीन सप्ताहानंतर त्याला रूग्णालयातून सुटका मिळाली व तो त्याच्या मुलीच्या घरी गेला तेथे त्याला त्या विभागात असणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीच्या सदस्याकडून आत्मिक मदत व उत्तेजन मिळाले.
देवराज्याच्या या निष्ठावंत पाठीराख्यास कोणत्या गोष्टीने क्रूर छळ सहन करण्यास मदत केली? पूर्ण तीन महिने तो स्वतःवर होता. त्याने पूर्णपणे मरणाची अपेक्षा केली होती. तरीसुद्धा त्याला त्याच्या सत्वपरिक्षणात काय वाटते याची पृच्छा केली गेली तेव्हा त्याचे उत्तर होते: “यहोवा सर्व प्रसंगी मजसोबत होता असे मला वाटले.” तेथे त्याच्या छळकर्त्याविरूद्ध कोणतीही तक्रार नव्हती की जो त्याच्याबाबत घडले त्याविषयी विलाप नव्हता—केवळ यहोवा त्याच्या निष्ठावान सेवकांना सोडत नाही याची अंतरीक खात्री होती.—स्तोत्र संहिता ३७:२८.
होय, ख्रिश्चन सहन करू शकतात. यहोवा संकटांना मुभा देतो ते चांगला उद्देश राखून व सहन करणे शक्य आहे हे त्यांना ठाऊक आहे. देवाचे वचन व इतरांचे अनुभव या वास्तविकतेची प्रचिती देतात. (मत्तय २४:१३) तथापि, परिक्षांना तोंड देताना आम्हास बहुधा सांत्वनाची गरज असते, होय की नाही? परंतु अशा सांत्वनासाठी आम्ही कोठे वळावे?