आपत्तीने भरलेले जग
इतिहासात यापूर्वी कधीही मानवजात एवढे क्लेश, खिन्नता व त्रासातून गेली नव्हती. अरिष्ट हे जवळ जवळ आम्ही श्वासोच्छ्वास करतो त्या हवेसमान बनले आहे. १९१४ पासूनच्या काळाचे वर्णन करताना एका नियतकालिकाने अभिप्राय मांडला: “हा समय राष्ट्रीय सीमाभाग व त्यांच्या मध्ये अलौकिक अराजकता व हिंसाचार असा राहिला आहे.”
आजच्या दिवसातील युद्धामधील असंयमी क्रुरतेची प्रवृत्ति खास करून व्यथा देणारी आहे. आफ्रिकेच्या एका लहान देशात सात वर्षाच्या झगडयाने २०,००० जीवांचे बळी घेतले. तेथे अपहरण, बलात्कार व यासारखी कृत्ये होती. वृद्ध लोक व लहान लेकरे जमिनीतील सुरुंग, रॉकेट फायर व केवळ साध्या क्रूरतेचे भक्ष्य बनले.
व्यक्तिगत दृष्टीने आम्ही आपत्तिकडे पाहतो तेव्हा परिस्थितीचे दुःख अधिकच सुस्पष्ट होते. उदाहरणार्थ, एका स्त्रीला तिच्या लेकरासोबत गोळीबाराच्या ठिकाणी एक टोळी तिच्या पतीस मृत्युसाठी हळूवारपणे टांगत असताना गाण्यास व तिच्या हातांनी टाळया वाजविण्यास जबरदस्तीने आणले होते. अशा स्त्रीच्या परिस्थितीत स्वतःस ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमची प्रतिक्रिया कशी असेल? होय, खरेच “राष्ट्रे क्रोधाविष्ट” आहेत व वैयक्तिकांना संकटे सहन करावी लागतात.—लूक २१:२५.
ख्रिश्चन कटाक्षाने तटस्थता राखण्यामुळे व हिंसाचार होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणाहून स्वतःस दूर ठेवतात आणि बहुदा दुःखद घटना टाळतात. (योहान १७:१६) तथापि, त्यांना सर्वच दुःखद घटना टाळता येत नाही, काही वेळेस या जगात राहाणाऱ्या लोकांप्रमाणेच त्रास सहन करावा लागतो. हिंसाचार व लबाडीद्वारे दियाबल सैतान अकाली मृत्यु लादू शकतो. यहोवाच्या साक्षीदारांमार्फत जगभर गाजविल्या जाणाऱ्या संदेशात सैतानाची कृत्ये उघड होत आहेत तर या संदेश वाहकांना बाजूस करण्याचा एक पवित्रा म्हणून सैतानाने “मृत्युमुखी पाडण्याचे कारण” बनण्याचे आम्ही अपेक्षू नये का? शास्त्रवचने तसा निर्देश करतात.—इब्रीकर २:१४, १५; प्रकटीकरण २:१०; १२:१२, १७.
ख्रिश्चन आणखी त्रासाला तोंड देतात
सर्वसाधारण लोक ज्या आपत्तींना सामोरे जातात त्याहून अधिक, येशू ख्रिस्ताच्या विश्वासू अनुयायांनी यहोवा देवाचे सार्वभौमत्व व त्याचे राज्य याबद्दल जी खंबीर भूमिका घेतली त्यामुळे छळ सहन केला पाहिजे. सैतानाच्या वर्चस्वाखालील मानवी राजवटीच्या व्यवस्थीकरणाच्या समाप्तीची चिन्हे ठरणाऱ्या पिडादायक घटनांचे वर्णन केल्यानंतर येशू म्हणाला: “ते तुम्हास [येशूच्या शिष्यांना] धरून देतील व तुम्हास जिवे मारतील; व माझ्या नामामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील.” मार्क, “तुम्हास पिटाळून लावतील” या येशूच्या शब्दांची आणखी भर देतो.—मत्तय २४:३, ७–९; मार्क १३:९.
होय, “राज्याची सुवार्ता” कोणत्याही परिस्थितीत प्रचार करण्याच्या त्यांच्या मनसुब्यामुळे यहोवाच्या लोकांना मारपीट, बंदी, तुरुंगवास व इतर प्रकारच्या गैरवर्तणूकीस या छळाच्या अधिक कसोटीस सहन करणे आहे. (मत्तय २४:१४) छळकर्त्यांनी काही ख्रिश्चनांना देवाचे राज्य हेच मानवजातीसाठी एकमेव आशा आहे असे शिक्षण दिले होते या केवळ “गुन्हया”स्तव ठार मारले! येशूने म्हटले होते: “जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल.” (मार्क १३:१३) तर आम्ही हार न खाता सहन करू का? भयानक आपत्तीमध्ये सांत्वन लाभण्याचा काही मार्ग आहे का? ज्यांनी सहन केले अशांची उदाहरणे आम्हापाशी आहेत का?