सर्व मानव समान आहेत—कसे?
सर्व राष्ट्रातील स्त्री व पुरूषांना एक दुसऱ्यांना समानतेने पाहणे—व त्याप्रमाणे वागणे शक्य आहे का? सध्याची जागतिक व्यवस्था अशीच राहिल्यास ते जमणार नाही. तरीपण, आम्ही अंतःकरणापासून ते शक्य आहे असे समजू शकतो. का? कारण लाखो असे ख्रिश्चन आहेत ज्यांनी ते तसे असल्याचे शाबीत केले आहे.
खऱ्या ख्रिश्चनत्वाची गाठ समानतेसोबत जोडली आहे हे सर्व परिचित आहे. उदाहरणार्थ प्रेषित पौलाने लिहीलेः “आम्हामध्ये यहुदी व हेल्लेणी, दास व स्वतंत्र किंवा पुरुष व स्त्री असे भेद नाहीत तर आम्ही सर्व समान आहोत—आम्ही ख्रिश्चन आहोत.” (गलतीकर ३:२८ द लिव्हींग बायबल) परंतु हे केवळ काल्पनिक भाष्य होते का? असमानतेने बरबटलेल्या जगात राहणाऱ्या पूर्वीच्या ख्रिश्चनांच्या जिवनात हे कसे उतरले होते?
ख्रिश्चनांनी येशू ख्रिस्ताने शिकविलेले बंधुत्व वाढवताना त्यांच्या दिवसातील जगावर जो भयंकर प्रभाव पाडला त्या विषयी बरेच लिखाण झाले आहे. इबेरहार्ड अरनॉल्ड त्याच्या द अर्ली ख्रिश्चन आफ्टर द डेथ ऑफ द अपोस्टल या पुस्तकात म्हणतात:
“खिश्चन त्यांच्या सर्व सोबतीदारांना बांधव म्हणून समानतेच्या भावनेने पहात, ते सारख्याच न्यायाची भागीदारी करून स्वतःप्रमाणे इतरांना समजत, याचा परिणाम समानता व सर्व गोष्टीतील संगत असा झाला. या समान भावनेचा परिणाम सर्वांना सारखाच दर्जा, समान कार्य करण्याची जबाबदारी व जीवनात सर्वांना समान संधी असा झाला. . . . त्या काळात एक दुसऱ्यामध्ये ज्या सम भावनेने ख्रिश्चन राहिले त्याचा परिणाम दृढ ऐक्यात झाला, जे प्रिती व समग्र समानतेच्या तत्वाच्या उगमावर आधारलेले होते.”
देव–प्रणीत ऐक्याची ही केवढी भव्य साक्ष होय!
ऐक्यपूर्ण संघटनेत समानत्व
पूर्वीच्या ख्रिश्चन मंडळीतील प्रत्येकांकडे विविध स्वाभाविक चातुर्य व योग्यता होत्या. कांही संगीतामध्ये प्रवीण होते तर इतरांना चांगली स्मरणशक्ती तर इतरात सुदृढता होती. या सर्व विविधता होत्या तरी पवित्रआत्म्याने वेगवेगळया देणग्या व चातुर्य प्रदान केले होते, जे सर्व एक दुसऱ्यांना पूरक होते. अशाप्रकारे पौल लिहू शकला: “जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरिराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहुदी असू किंवा हेल्लेणी असू, दास असू अगर स्वतंत्र असू, आपणा सर्वांना एका आत्म्यात एक शरीर होण्यासाठी बाप्तिस्मा मिळाला.” (१ करिंथकर १२:११–१३) ज्यांनी मंडळीचे पालन केले त्याचे वर्णन “मनुष्यातील दाने” असे भविष्यमय रितीने केले होते त्यामध्ये विविधता व समृद्धता होती तरी ते सर्व सुवार्तिक होते.—इफिसकर ४:८; स्तोत्रसंहिता ६८:१८.
देखरेखे आध्यात्मिकतेत प्रौढ होते व त्यांना ग्रीक मध्ये ए–पि–स्को–पीया म्हणत. यासोबत असलेल्या ए–पि–स्को–पी’यो क्रियापदाचे लिखाण (देखरेख करणे), याबद्दल डब्ल्यू.ई.वाईन. म्हणतात: “हा शब्द जबाबदारीवर स्थानापन्न होणे नव्हे तर ती पूर्ण करणे सुचवितो. हे कांही स्थान भूषविणे असे प्रकरण नाही परंतु कर्तव्य पूर्ण करणे होय.” या नियुक्त देखरेख्यासोबत काम करणारे डा–या’को–नोय होते या ग्रीक शब्दाचे भाषांतर “उपाध्याय” “उपाध्यसेवक” अगर “मंडळीचा व्यवस्थापक” केले आहे. डब्ल्यु.ई.वाईन म्हणतात हा शब्द “प्राथमिकतेत सेवक, तो क्षुद्र दर्जाचे काम करणारा किंवा कोणत्याही विशिष्ठ प्रकारच्या जबाबदाऱ्या विरहीत मोफत सेवा करणारा सेवक असे दर्शवितो.” कार्य किंवा सेवेचा हक्क ही मुख्य गोष्ट आहे. देवाचे भक्तजन समान होते व ते सर्व त्याचे सेवक होते तेथे पदावर जोर दिला नव्हता.
येशूने १२ पुरूषांना त्याचे प्रेषित म्हणून निवडले होते तरी स्त्रियांनी सुद्धा त्याच्या सोबतीचा आनंद लुटला. त्या अति क्रियाशील होत्या. मरिया मग्दाली, योहान्ना व सुसान्ना यांचा येशूची सेवा करीत असा विशिष्ट उल्लेख केला आहे. स्त्रियांना सुद्धा इ.स. ३३ मध्ये पवित्र आत्मा प्राप्त झाला. त्यांना परकीय भाषेत जाहीरपणे बोलणे व ख्रिश्चन विश्वासाबाबत साक्ष देण्यास अशाप्रकारे शक्य झाले. तथापि ख्रिश्चन बहिणी मंडळीत शिकवण्यात पुढाकार घेत नव्हत्या परंतु त्या बांधवासोबत देव वचनाच्या जाहीर प्रचारकार्यात भाग घेत.—लूक ८:१–३; प्रेषितांची कृत्ये १:१४; २:१७, १८; १८:२६.
अधिकतर वैयक्तिक स्थरावर सुद्धा ख्रिश्चनांनी एक दुसऱ्यांना मदत करण्याचे ध्येय ठेवले होते. उदाहरणार्थ, यरूशलेमास भेट देणाऱ्या पाहुण्यांचा प्रेषित करीत असलेल्या चमत्कारासोबत संपर्क आला तेव्हा ते अगोदर अपेक्षित होते त्यापेक्षा अधिक काळ राहिले तेव्हा त्यांना अन्न व पैशाची उणीव भासली. तथापि शास्त्रवचनीय अहवाल दर्शवितो: “त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते, कारण जमीनीचे किंवा घरांचे जितके मालक होते तितक्यांनी ती विकून टाकलेल्या विकलेल्या वस्तुंचे मोल” प्रेषितांच्या मार्गदर्शनाखाली मोफत रितीने वाटण्यास आणून दिले. पहिल्या ख्रिश्चनांची प्रिती व समानता ही व्यावहारिक वास्तविकता दाखविणारा केवढा उत्कृष्ट आत्मा होय! “त्यांच्या सर्व गोष्टी समाईक होत्या” असे म्हटले जाऊ शकत होते.—प्रे. कृत्ये ४:३२, ३४, ३५.
सध्याची व्यवहारी समानता
आजच्या विभक्त व सामाजीक रचनेच्या जगामध्ये त्या पूर्वीच्या ख्रिश्चनांना अनुसरण्याचा पवित्रा घेणे सोपे नाही. परंतु तसे करणे हे नेहमीच यहोवाच्या साक्षीदारांचे ध्येय बनले आहे. यामध्ये त्यांना योग्य यशप्राप्ती झाली हे उघड आहे. द एन्सायक्लोपिडीया कॅनेडीआना ने निरक्षिले:
“यहोवाच्या साक्षीदारांचे कार्य म्हणजे येशू व त्याचे शिष्य यांनी पहिल्या व दुसऱ्या शतकात अनुसरलेल्या प्रारंभीच्या ख्रिश्चनत्वाचे पुनरूज्जीवन व पुनःस्थापना आहे. . . . सर्व भाऊ भाऊ आहेत.”
जसे त्याने १९०० वर्षापूर्वी केले होते तसे हे ख्रिश्चन बंधुत्व आजही संकटसमयी फायदेशीर मदत देत आहे. १९८०च्या नोव्हेंबर मध्ये इटलीला भयंकर भूकंपाने ग्रासले तेव्हा त्याच सायंकाळी साक्षीदारांद्वारे मदतीने भरलेला ट्रक तडाखा बसलेल्या भागात सर्व प्रथम पोहचला. अधिकृत अहवाल असा वाचला जातो:
“आवश्यक असणारी मदत इतक्या सत्वरतेने कशी पोहंचली म्हणून बांधव आश्चर्यचकीत झाले. आम्ही झटकन आमचे स्वयंपाक गृह मांडले ज्यात भगिणीवर्गाने शिजविलेले अन्न बांधवाना प्रत्येक दिवशी वाटप केले गेले. गावातील इतर रहीवाश्यांना अजून मदत मिळणे होतेच व ते त्यांच्या भल्यासाठी शक्य ते करीत होते. अर्थात बांधव स्वार्थी नव्हते. अन्नाची भागिदारी इतर साक्षीदार नसणाऱ्या पुष्कळांसोबत करण्यात आली होती.”
ऑगस्ट १९८२ मध्ये स्वाझिलँडचा राजा सोभूजा दुसरा याच्या मृत्युनंतर यहोवाच्या साक्षीदारांनी सांप्रदायीक शोकाकुलतेत भाग घेतला नाही म्हणून त्यांच्यावर छळ लादला. ब्रिटन मध्ये दोन साक्षीदार, एक गोरा व दुसरा काळा त्यांनी एकत्र मिळून परिस्थिती निवळण्यासाठी स्थानिक स्वाझिलँडच्या उच्च कमिशनकडे दाद मागीतली. थोडा वेळ त्यांना ऐकल्यानंतर स्विझी अधिकाऱ्याने काळ्या साक्षीदारांकडे, जो चांगला सुशिक्षीत होता, त्यास विचारले: “परंतु तू येथे का आलास?” उत्तर मिळाले की : “तुमच्या देशातील माझ्या ख्रिश्चन बांधवांच्या सुस्थितीबाबत चिंताकूल असल्यामुळे मी येथे आहे.” असा मोठा मनुष्य त्याने कधीही भेट दिली नाही त्या या देशातील माणसासोबत स्वतःस समानतेत ठेवतो हे अधिकाऱ्यांना समजणे कठीण वाटले.
तुम्ही स्वतः हे पाहण्यासाठी स्थानिक राज्यसभागृहास किंवा मोठ्या अधिवेशनास का उपस्थीत राहू नये? तुम्ही असा समाज पहाल ज्यात युवक किंवा वृद्ध, श्रीमंत अगर गरीब, तुम्हास महाविद्यालयीन शिक्षण असो किंवा तुम्ही अशिक्षित असाल, त्यांचे हार्दिक स्वागत केले जाते. प्रत्येकास बंधू किंवा भगिणी म्हणून बोलावले जाते व व्यक्तीची गणना जात, पार्श्वभूमी अगर ऐहीक कामाचा दर्जा यावर केले जात नाही. प्रत्येकाच्या ख्रिश्चन व्यक्तीमत्वाची व गुणांची कदर केली जाते.
नियुक्त वडील व उपाध्य सेवक यांचे शिक्षण पहिल्या ख्रिश्चन मंडळीच्या नमुन्यावर आधारलेले आहे. सभा, समानता किंवा सुसंगत पणा जगभरात प्रदर्शित करतात. चर्च ऑफ इंग्लंडच्या पाळकांनी हा अभिप्राय व्यक्त केला:
“प्रत्येक सभा, मग ती औपचारिक असो वा नसो परंतु प्रबळ महितीच्या आहेत. सभासदांकडून टेहळणी बुरुज मासिकातील लेख वाचून पवित्रशास्त्र संदर्भ पडताळणे, प्रश्नांची उत्तरे अगोदरच शोधण्याद्वारे रविवारच्या सभेची तयारी करण्याचे अपेक्षिले जाते. सभांच्यामध्ये मंडळीची चांगली सहभागिता असते. त्यांना ज्ञानाने जे जगभरात एकाच वेळी सारखेच शिक्षण देण्याकडून पाठींबा दिला जातो.”
तुम्ही हा टेहळणी बुरुजचा अंक तुम्हासोबत स्थानिक मंडळीत पृष्ठ २ वर निदर्शित तारखांना घेऊन गेल्यास तुम्हास अशाप्रकारच्या चर्चेचे अवलंबन करता येईल.
या चर्चा बहुदा मंडळीत आहेत त्यांचा विश्वास दृढ करतात: नंदनवन बनलेल्या पृथ्वीवर जीवन, जेथे लढाया नसतील व लोक त्यांची बुध्दीमत्ता उभारणीकारक कार्यात खर्ची घालतील व खरेपणाने “त्यांच्या हाताच्या श्रमाचे फळ उपभोगतील.” सर्व आज्ञाधारक मानवजात देवराज्याच्या अधिपत्याखाली राहील. समृद्ध पृथ्वीवरून, सर्वांना भरपूर अन्न दिल्यामुळे क्षुधितपणा निघून जाईल. आजारांची आपत्ती गत काळातील असेल, पृथ्वीवरील सर्व रहिवाशी अव्यंग शारीरिकतेचा समानतेत लाभ घेतील.—यशया २:४; ३३:२४; ६५:२२, २३; जखऱ्या ८:११, १२.
होय, ही ख्रिश्चन आशा खरी आहे, जशी माहिती आहे त्यानुसार ख्रिश्चन मंडळीची सध्याची रचना पृथ्वीवरील नंदनवनात अशीच जाईल. सर्व प्रकारची वर्गवारी व राष्ट्रीय अडथळे पूर्णपणे दूर करण्याचा भक्कम पाया अगोदरच रोवला गेला आहे व तो विकसीतही केला जाईल. आम्ही कसे खात्रीदायक असू शकतो? कारण पवित्रशास्त्र भाकीत करते की ख्रिश्चन जे “सर्व राष्ट्रातील वंश व भाषेतील लोक” आहेत जे पुढेही यहोवा देवाची त्यांची खरी भक्ती करतील. त्यांना त्यांच्यासमोर समानस्थान असेल. तुम्ही व तुमचे कुटुंबीय त्यातील एक असू शकता.—प्रकटीकरण ७:९, १०.
[७ पानांवरील चित्र]
यहोवाच्या साक्षीदारांच्या सभेत तुम्ही समानता न्याहाळाल