राज्य घोषकांचा वृत्तांत
‘ते आमच्या देवाच्या शिक्षणाला शोभा आणतात’
राज्य सत्याच्या घोषकांद्वारे या सत्याच्या साधेपणाला व सुस्पष्टतेला ‘शोभा’ आणली जाऊ शकते. ती कशी? आपल्या चांगल्या वर्तणुकीद्वारे. प्रेषित पौलाने हे कसे दाखविले त्याकडे लक्ष द्या. ख्रिस्ती दासांना “इमानेइतबारे वागावे [आणि] त्यांनी सर्व गोष्टीत आपला तारणारा देव ह्याच्या शिक्षणास शोभा आणावी” असा सल्ला दिला गेला. (तीत २:१०) या सूचनेची व्यवहार्यता अर्जेंटिनाच्या पुढील अनुभवांद्वारे व्यक्त होते.
◻ सहा यहोवाचे साक्षीदार एका मोठ्या दुकानात कामाला होते. दुकानाचा मालक खूप कडक अशी ख्याति होती. ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधिला उपस्थित राहण्यासाठी त्यानी रजा मागितल्यावर त्यांना सांगितले गेले: “तुमचे काम व तुमच्या सभा यापैकी तुम्हाला जे पाहिजे ते निवडा.” काम मिळणे दुर्मिळ होते तरी त्यांनी स्मारकविधी सभेला जाण्याचे पसंद केले. दुसऱ्या दिवशी ते कामावर गेले तेव्हा कामावर येऊ नका अशी तंबी मिळेल असे त्यांना वाटले. पण आश्चर्य हे की त्यांना कामावर ठेवले तर गेलेच पण त्यापैकीचे जे चौघे तात्पुरत्या कामावर होते त्यांना कायम केले गेले! शिवाय त्या सहाजणांनाही वेतनवाढ मिळाली! यानंतर त्यांच्यापैकी दोघांना नियमित पायनियर व्हावयाचे होते तेव्हा मालकाने ह्यांच्या सोयीनुरूपच्या पाळ्या त्यांना दिल्या. मालकाने एवढे विचारशील होण्याचे काय कारण घडले बरे? आपल्या प्रामाणिक व उद्योगी कामकऱ्यांनी काम सोडून दुसरीकडे जावे असे त्याला वाटत नव्हते.
अशाप्रकारे या सहा साक्षीदारांचा प्रामाणिकपणा व कामाच्या चांगल्या सवया यांनी यहोवाचा सन्मान होण्याकरता त्याच्या शिक्षणास ‘शोभा आणली.’
◻ एक भगिनी एका औषधाच्या दुकानात कामाला होती पण कामाची वेळ दीर्घ असल्यामुळे तिला सर्व सभांना उपस्थित राहणे जमत नव्हते, आणि तिची इच्छा होती तरी पायनियर होऊ शकत नव्हती. आपल्याला हव्या असणाऱ्या वेळेप्रमाणे कामाचे तास ठरविण्याची मालकाची इच्छा नसल्यामुळै तिने का सोडले. तिने नंतर परिचारिकेचे काम धरले व यामुळे तिला साहाय्यक पायनियरींग करता आली. काही महिन्यांनी औषधी दुकानाचा मालक तिच्या घरी आला व “तिला हव्या असणाऱ्या वेळेनुसार” काम देऊ केले. ते का बरे? “कारण तिची उत्तम वागणूक होती” असे अहवाल म्हणतो.
◻ आणखी एका साक्षीदाराच्या चांगल्या वागणूकीने तिच्या शिक्षणाला वेगळयाच प्रकाराने ‘शोभा आणली.” अर्जेंटिनाकडून आलेला अहवाल कळवितो की एका सुंदर व अलिशान बंगल्यात, जेथे एक मोठी अत्याधुनिक मोटारगाडीही होती तेथे प्रवेश केल्यानंतर भौतिकतेचा एकंदर थाटमाट पाहून दोघा साक्षीदारांना थोडेसे घाबरल्यासारखे झाले. पण त्यांचे अगदी उबदारपणे स्वागत करण्यात आले तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले. दोन तासांच्या बैठकीत प्रश्नोत्तराची चर्चा झाली. साक्षीदार म्हणाले: “आम्ही नंतरच्या आठवडी भेट देण्याचे अभिवचन दिले. आम्ही आनंदात बाहेर पडलो खरे, पण आमचे एवढे चांगले स्वागत करण्यामागील काय कारण असावे त्याचा आम्हाला विस्मय वाटत राहिला. पण नंतरच्याच आठवडी ते आम्हाला समजले.”
घरमालकिणीने म्हटले: “मी मार.डेल.प्लाटा येथे राहत होते त्यावेळी एका युवतीचा परिचय होता जी अत्यंत बेताल जीवन जगत होती. काही काळातच तिने यहोवाच्या साक्षीदारांशी पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरु केला तेव्हा लगेच तिच्या व्यक्तिमत्वात बदल दिसला. तिच्यात झालेल्या बदलावर माझा व आमच्या शेजाऱ्यांचा विश्वासच बसेना कारण तिच्या पूर्वीच्या बेताल जीवनाचे कोणतेही गुण आता दिसत नव्हते. ती आता सभ्य स्त्री बनली असून एका माणसाची पत्नीही आहे, ज्याला तुम्ही वडील म्हणतात. शिवाय त्यांचा छोटा परिवारही आहे जो सर्वांना अनुकरणीय असा आहे.”
यहोवाचे साक्षीदार झाल्यामुळे या युवतीचे बदललेले जीवन पाहून त्या स्त्रीला यहोवाच्या साक्षीदारांच्या शिक्षणाविषयीचा गंभीर विचार करण्याची चालना मिळाली. अगदी तेथेच त्या जोडप्यासोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरु करण्यात आला व ते राज्य सभागृहातील सभांना उपस्थित राहू लागले. साक्षीदाराने या अनुभवाचा समारोप असे बोलून केला: “यावरून असे दिसते की आमची वागणूकही प्रभावी साक्ष देते व त्याकरवी यहोवाच्या नामाचा सन्मान व गौरव होतो.”