धर्म व राजकारण—दीर्घकाळची भागीदारी?
रशियन सत्ताधीश व्हलाडीमीर ने त्याची ख्रिश्चनेत्तर प्रजा “ख्रिश्चन” झाली पाहिजे असा निश्चय केला. तो स्वतः ग्रीक कर्मठ राजकुमारी सोबतच्या विवाहानंतर इ.स. ९८७ मध्ये धर्मांतरीत झाला होता व त्यामुळे आता त्याने त्याच्या प्रजाजनाच्या समूह बाप्तिस्माविधिचा जाहीरनामा काढला—जरूरी भासल्यास तरवारीच्या धारेच्या धाकाने तो करावा असाहि त्याचा निश्चय होता. हळूवारपणे रशियन चर्चने त्याच्या ग्रीक चर्च “माते” पासून मुक्ती प्राप्त केली व ते सरतेशेवटी राज्याचा भाग बनले. आता सोविएत सत्ताधीश अधिकृतपणे देवाचे अस्तित्व अवमानीत असले तरी चर्च व रशियन सत्ता अजुनही अवखळ भागीदारी राखून आहे.
कांही शतकानंतर इग्लंडचा राजा हेन्री आठवा याने सुद्धा चर्चसोबत वेगळ्या पद्धतीने का असेना पण सत्तेसोबत निकटवर्तिय भागिदारी स्थापण्यात यश प्राप्त केले. १५३२ मध्ये राज्य गादीसाठी त्याची आरगॉनची पत्नी कॅथरिन पुसंतान निपजविण्यात अपयशी ठरली होती म्हणून तो चिंतातुर होता. ही समस्या निवारण्यासाठी हेन्रीने गुप्तपणे त्याची प्रेयसी ॲन बोलाईन सोबत विवाह बन्ध जोडले. हे कॅन्टरबरीच्या आर्चबिशपच्या डोळेझाक करण्याने झाले. त्यानेच हेन्रीचा पहीला विवाह रद्द झाल्याचे जाहीर केले. १५३४ मध्ये या व्यभिचारी व जुलमी राजाने स्वतःस चर्च ऑफ इंग्लंडचे मुख्य असल्याचे घोषित केले व आजपर्यंत त्या किताबाचा आनंद इंग्लंडची राजेशाही लुटत आहे. चर्च धर्म संघटनेचे निर्णय प्राथमिकतेत सरकारी संमतीसाठी येतात व बिशप्स, हाऊस ऑफ लॉर्डस्चा सभासद यानाते ब्रिटनवरच्या राज्याधिकारात भाग घेतात. चर्च व सत्ता अशाप्रकारे इंग्लंड यामध्ये गत ४५० वर्षे विवाहीत आहे.
आधुनिक चर्च—सत्ता विवाह
१९३६च्या स्पेन मधील रिपब्लीकन सरकारविरूद्धच्या बंडाने मुलकी यादवीकडे निरविले व जनरल फ्रॅन्कोस यांना सत्तेवर आणले. फ्रॅन्कोने धर्मनेत्यांना त्याच्या भरघोस पाठींब्याच्या मोबदल्यात भरपूर अधिकार दिल्यामुळे डाव्या आघाडीला मोठाच विस्मय वाटला.
१९८३ मध्ये डब्ल्यू. सी. सी. (वर्ल्ड कौन्सील ऑफ चर्च) व्हॅनकोव्हर कॅनडा येथे जमले. तिचे जनरल सेक्रेटरी, फिलीप पोटर यांनी त्यांना “राजकारणी राहा” असे सांगितले, डब्ल्यू. सी. सी. ने पुष्कळ देशातील झुंजार राजकारणींना दिलेले अनुदान हे अनेक चर्च सदस्यांच्या गंभिर चिंतेचा विषय बनले.
यास्तव धर्म राजकारणात लुडबुडतो याबद्दल तिळमात्र शंका राहत नाही. निर्णायक प्रश्न हा राहतो की त्याने तसे करावे का? ते चांगले की वाईट आहे? राजकारणात धर्माची ढवळाढवळ राजकारणाचे नैतिक मुल्य वाढविते की धर्माचा दुरुपयोग करते? भवितव्याबाबत काय? धर्म व राजकारण त्यांच्या ‘प्रेमी भानगडी’चा आनंद सात्यत्याने लुटतील किंवा ती विरून व गुप्तकट रचण्याच्या मार्गावर ठेवील?
[३ पानांवरील चित्र]
चर्च ऑफ इंग्लंडचा पहिला मस्तक