दयाळू कृत्यांमुळे आनंद मिळतो
दी वॉचटॉवर च्या प्रकाशकांना अलिकडेच खाली नमूद असणारे पत्र मिळाले:
“महाशय,
“मागील महिन्यात फिलडेल्फिया येथे शाळेत जाणाऱ्या माझ्या मुलीच्या दप्तरातून पैशांचे पाकीट कोणीतरी चोरले. मागच्या महिन्यात टपालाद्वारे तिला एक पार्सल मिळाले ज्यात तिचे ते पैशांचे पाकीट, परवाना आणि आणखी काही महत्वाची कागदपत्रे होती. हे पार्सल अशा व्यक्तिने पाठविले ज्याला आपले नाव जाहीर करण्याची इच्छा नव्हती, पण त्या टपालासोबत तुमचे प्रकाशन दी वॉचटावर याची एक प्रतसुद्धा होती. ज्याला कोणाला ते पैशाचे पाकीट सापडले ते बहुधा चोराने टाकून दिलेले असावे, पाकीट सापडलेल्या व्यक्तिने स्वतःचे श्रम व पैसा खर्ची घालून माझ्या मुलीकडे ते परतविले आणि बंधुप्रेमाचा नमुना व्यक्त केला. त्या दयाळू व्यक्तिचे मी व माझे कुटुंब आभार मानीत आहोत . . . यामुळे माझ्या तिन्ही मुलींना फार मोठी ‘साक्ष’ मिळाली.”
दी वॉचटॉवर च्या वाचनाने लाखोंच्या जीवनात खूप मोठा लाभदायक परिणाम घडवला जाऊन त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा, दयाळूपणा व विचारशीलता या गुणांची वाढ झाली. आता १ कोटी १० लक्ष प्रतीपेक्षा अधिक अंक १०० पेक्षा अधिक भाषांत छापले जातात. महिन्याला दोन अंक या प्रमाणे वर्षभरासाठी दी वॉचटॉवर हे मासिक तुम्हाला मिळू शकेल. त्यासाठी खालील कूपन भरा व सोबत ३५ रुपये पाठवा.