वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 ६/१ पृ. ४-७
  • धर्म व राजकारण चकमकीच्या मार्गावर?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • धर्म व राजकारण चकमकीच्या मार्गावर?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • खरे ख्रिश्‍चनत्व—मोठी तफावत
  • जगाचा मित्र बनणे
  • धर्म आणि युद्ध
  • वादळाची कापणी
  • पाळकांनी राजकारणाचा प्रचार करावा का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्‍या दुष्ट कृत्यांचा कधी अंत होईल का?
    धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्‍या दुष्ट कृत्यांचा कधी अंत होईल का?
  • मोठी बाबेल तिची हत्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • कुविख्यात कलावंतीणीचा न्याय करणे
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 ६/१ पृ. ४-७

धर्म व राजकारण चकमकीच्या मार्गावर?

राजकारण व धार्मिक सत्ता एका मनुष्याजवळ ठेवणे ही कल्पना आठव्या हेन्री पासूनची नव्हती. त्याच्या दिवसांत ते राष्ट्रीय ऐैक्य वाढविण्यास योजलेला चांगला प्रयत्न केलेले राजकारणी कार्य होते.

उदाहरणार्थ, पुरातन मिसरी साम्राज्यात पुष्कळ दैवते होती. “फारो स्वतःच त्या दैवतामधील एक होता व त्याच्या प्रजाजनांच्या जीवनातील एकमेव वास्तु होता.” असे न्यू बायबल डिक्शनरी म्हणते. त्याचप्रमाणे रोमी साम्राज्यातील सर्व दैवतांचे संयुक्‍तीक मंदीरात सम्राटांचा समावेश होता. एक इतिहासकार सम्राटांच्या भक्‍तीचे वर्णन “रोमी जगतातील धर्माची महत्वपूर्ण प्रेरणा” असे करतो.

चर्च व राज्याचे ऐक्य अनेक शतकापासून आहे तरीसुद्धा ख्रिस्तीराष्ट्रसमुहाच्या आधुनिक राजकारणी सफरींनी त्याला ज्याची कृपादृष्टी मिळविण्यास लाडागोडी तो लावत होता त्याजसोबत परस्परविरोधी मार्गावर ठेवले आहे. असे का? या प्रश्‍नाचे उत्तर देताना सर्व प्रथमता ख्रिस्तीराष्ट्रसमुह राजकारणात कसा समाविष्ट झाला त्याकडे आता दृष्टीक्षेप टाकू या.

खरे ख्रिश्‍चनत्व—मोठी तफावत

ख्रिस्ती धर्म संस्थापक येशू ख्रिस्ताने सर्व राजकीय सत्तांचा अव्हेर केला. एके प्रसंगी त्याच्या चमत्कारामुळे लोक भारावून गेले व त्यांनी त्यास जबरदस्तीने राजा बनविण्याचा प्रयत्न केला पण तो “त्यांच्यातून निघून डोंगराकडे एकटाच गेला.” (योहान ६:१५) रोमी सुभेदाराने त्यास राजा आहेस का असे विचारले तेव्हा येशूने उत्तर दिले की: “माझे राज्य या जगाचा भाग नाही, माझे राज्य या जगाचा भाग असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जावू नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती.”—योहान १८:३६.

ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना पुढे म्हटले की: “तुम्ही या जगाचे भाग नाहीत म्हणून मी जगातून तुम्हास निवडले व यास्वत जग तुमचा द्वेष करते.” (योहान १५:१९) यास्तव सुरवातीचे ख्रिश्‍चन सामाजीक किंवा राजकारणी समस्यांनी विचलीत बनले नाहीत. उदाहरणार्थ, गुलामगिरी त्या काळाची मोठी समस्या होती ती नष्ट करण्यास ख्रिश्‍चनांनी कोणतीही मोहीम उभारली नाही. त्या ऐवजी ख्रिश्‍चन गुलामांना त्यांच्या धन्यांना आज्ञाधारक राहण्यास बजावले.—कलस्सैकर ३:२२.

राजकारणात डोकावण्यापेक्षा या सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांनी “देव राज्या”चे प्रचारकार्य स्थापित करण्यात स्वतःला मग्न केले होते. (प्रेषितांची कृत्ये २८:२३) कांही दशकातच त्यांचा संदेश त्या काळच्या ज्ञात जगाच्या शेवटापर्यंत पोहचला. (कलस्सैकर १:२३) कोणत्या परिणामाने? हजारोंनी प्रतिसाद दिला व “बंधू आणि बहीणी” बनले. (मत्तय २३:८, ९) यहुदी व विदेशी जे ख्रिश्‍चन बनले त्यांनी शत्रुत्व सोडले. यहुदी व शमरोनी यांच्यातील कटूत्व हे ख्रिश्‍चनापाशी होते त्या “एकनिष्ठ प्रीतीने” नष्ट झाले.—१ पेत्र ४:८.

ख्रिस्ती प्रेम हे त्यांच्या शत्रु पर्यंतही विस्तीर्ण होते. (मत्तय ५:४४) त्यामुळे त्यांनी कैसराच्या लष्करात जाण्याचे नाकारले. ‘परंतु’ कांहीजण आक्षेप घेतील की ‘येशूनेच, “कैसराचे ते कैसराल द्या” असे म्हटले नव्हते का’? ते बरोबर आहे. तथापि येशू त्यावेळी लष्करी सेवेबद्दल बोलत होता का? नाही, तो केवळ ‘कैसरास कर द्यावा की नाही’ या प्रकरणाची चर्चा करीत होता. (मत्तय २२:१५–२१) यास्तव ख्रिश्‍चनांनी त्यांचे कर भरले. परंतु आपले जीवन देवास समर्पित आहे असा दृष्टीकोन धरल्यामुळे त्यांनी सोबतच्या मानवास इजा करण्याचे नाकारले.

जगाचा मित्र बनणे

पण ‘आजच्या ख्रिस्तीराष्ट्रसमुहाकडे तर पाहा,’ असे कांही म्हणतील, ‘तो आशाहीनपणे छिन्‍नविछीन्‍न झाला आहे, त्याचे सदस्य बहुदा एकमेकांना वधितात, त्याचे धर्मगुरू राजकारणात ओढले गेले आहेत. मग, ख्रिश्‍चनत्वास काय झाले आहे?’ बरे तर, येशूने खोटे ख्रिश्‍चन खऱ्‍या ख्रिश्‍चनात ‘पेरले जातील’ असा इशारा दिला. (मत्तय १३:२४–३०) पौलाने त्याचप्रमाणे भाकित केले की: “मला ठाऊक आहे की . . . क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील . . . तुम्ही पैकी कांही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरित गोष्टी बोलतील.”—प्रे. कृत्ये २०:२९, ३०.

पहिल्या शतकात सुद्धा हा कल सुरु झाला होता. शिष्य याकोबास हे वर्णनात्मक शब्द लिहीणे जरुरीचे असे आढळून आले की: “तुम्ही व्यभिचारी पत्नी प्रमाणेच आहात; जगास तुमचा मित्र बनविणे हे देवास तुमचा बैरी बनविण्याप्रमाणे आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय?” (याकोब ४:४; द जरूसलेम बायबल; तिरप्या वळणाचे अवतरण आमचे आहे.) पुष्कळांनी या इश्‍वरी सुचनेस अनादर दाखविण्याचे निवडले—इतके की चौथ्या शतकात मेंढराच्या वेषातील लांडगा, सम्राट काँन्स्टंटाईन ज्याने त्यास रोमन साम्राज्याचा आधिकृत धर्म बनविण्याने दुषिततेने “ख्रिश्‍चनत्वाची” हातमिळवणी करण्यात समर्थ झाला. परंतु “जगाचा मित्र बनण्या”ने ख्रिस्तीराष्ट्रसमुह देवाचा बैरी बनला. त्या मुळेच अखेरीस चकमक ही अपरिहार्य आहे.

१३व्या शतकात “पोप” किंवा “फादर” ने चर्चवर सत्ता केली, ते चर्च “त्याच्या अधिकाराच्या शिखरावर” पोहंचले व त्याकरवी राज्य व चर्चच्या विवाह बंधनाचा निकटचा टप्पा गाठला. तिसरा पोप इनोसेन्टची खात्री पटली की “प्रभूने पेत्रास सार्वत्रिक चर्चवरच केवळ नव्हे तर संपूर्ण जगावर ही स्वामित्व गाजविण्याचा हक्क दिला.” (तिरप्या वळणाचे अवतरण आमचे आहे.) इतिहासकार व प्राध्यापक टी. एफ. टाऊट द एम्पायर ॲन्ड द पॅपेसी मध्ये पुढे म्हणतात: “इनोसेन्टसचे काम धर्मोपदेशक मुत्सद्या प्रमाणे होते, . . . त्याच्या इच्छेनुरूप राजा व सम्राट बनविणे व काढणे होते.” परंतु हाच लेखक पुढे पुस्ती जोडतो: “पोपचे अधिकार अधीक राजकारणी बनले तेवढे धर्म, नैतिक मुल्ये, कायद्याचा स्रोत अशी गुणवत्ता उंचावणे कठीण बनले.”

धर्म आणि युद्ध

राजकरणी युद्ध अधिक हिंसक स्थरावर आहे. पोप इनोसेन्ट ३रे यांनी व्यक्‍तीगतपणे दक्षिण फ्रान्सच्या अली बिगेन्स विरूद्ध लष्करी मोहीम आयोजीत केली. यामुळे १२०९ मध्ये हजारो ब्रिझीयर्सची भयानक कत्तल झाली व पवित्र चौकशीमुळे बळींचा ढीग पडला. धर्मयुद्ध मुळतः पॅलेस्टाईन साठी लढली परंतु ती राजकारणी कारस्थानाने कॉन्स्टॅन्टीनोपॉलला समाविष्ठ करण्याकडे वळली. तेथे “ख्रिश्‍चन” वरिष्ठ “किळस आणणाऱ्‍या तीन दिवसाची लूट, खून, मोह, व पवित्रवस्तु दुषणात” गढले. हे कोणासोबत? सोबतीचे “ख्रिश्‍चना सोबत”! एक इतिहासकार म्हणतो: “चर्चेस निर्दयी लुबाडणुकीत होती.”

ख्रिस्तेत्तर असणाऱ्‍या पद्धतींनी सरतेशेवटी कॅस्टल चर्च विटेनबर्गच्या दरवाज्यावर १५१७ मध्ये यास आव्हान देणाऱ्‍या मार्टीन लुथरच्या प्रबंधास डकविले—व धर्मसुधारणा सुरू झाली. परंतु एच. ए. एल. फिशर त्यांच्या हिस्ट्री ऑफ युरोप या लिखाणात म्हणतात: “नवीन कबुली जबाब—हा राजकीय व सत्तेच्या कृपेवरच अवलंबून होता.” जर्मनी राजकारण—धर्म या सोबत विभागले. फ्रान्स मध्ये कॅलव्हीनीस्ट ही या प्रमाणेच राजकीय नेत्याबरोबर संमिश्रीत झाले. परिणामतः धर्माची युद्धे केवळ धार्मिक स्वातंत्र्यासाठीच नव्हे तर “प्रॉटेस्टंट व रोमन कॅथोलीक नेत्यांच्या राजपद टिकविण्याच्या स्पर्धे खातरही लढली गेली.” अशाप्रकारे, युरोपातील धर्माचा इतिहास रक्‍ताने लिहीला गेला!

२०वे शतक हे ब्रिटन व बोअर दक्षिण आफ्रिकेत द्वंद्वयुद्धात जखडण्याने उजाडले. दोन्ही बाजुच्या धार्मिक नेत्यांनी “व्यासपिठावरून दिलेल्या उपदेशाने” भडका पसरला. इतिहासकार आर. क्रुगर म्हणतात: “दोन्ही बाजुने युद्धा संबधी केलेल्या आकाशाकडील प्रार्थनांची वर्गवारी केवळ सत्तेच्या प्रेरणेचा प्रकार अशी करता येईल.” श्‍वेत “ख्रिश्‍चनांनी” एक दुसऱ्‍यांचा वध केला व तसे त्यांनी करण्यासाठी देवाकडे मदत मागितली!

ह्‍याच नमुन्याची पुनरावृती १९१४ मध्ये जर्मन सेना दलाने बेल्जीयम कडे “गॉट मीट अन्स” (देव आम्हा सोबत) असे लिहीलेले कमरबंद घालून कूच केली तेव्हा व्याप्त स्वरूपात केली. दोन्ही बाजुचे चर्च, विजय व शत्रुस झोंबणारा अपशब्द करण्यात व प्रार्थना करण्यात गढून गेले होते.

पहील्या महायुद्धातील धर्माच्या भूमिकेने पुष्कळांचा भ्रमनिरस केला. अनईश्‍वरवादी व नास्तीकांनी धर्मास “अफुची गोळी” म्हणून टाकले. तरीपण धर्मपुढाऱ्‍यांनी राजकारणातील आपला सहभाग फॅसिस्ट हुकूमशहा जसे की मुसोलोनी व फ्रॅन्को यांना पांठीबा देवून चालू ठेवला. १९३३ मध्ये रोमन कॅथोलीक चर्चने तर नाझी बरोबर करार केला. कार्डीनल फाऊल्हाबर ने हिटलरला लिहीले: “राजकारणाबरोबरचे हे हस्तांदोलन . . . हे अमाप आशिर्वादांचे अचाट कृत्य आहे . . . देव रिच चॅन्सलर (हिटलर)ला आयुष्य मान करो.”

अजूनही एका महायुद्धाची शक्यता धर्मपुढाऱ्‍यांना राजकारणापासून परावृत्त करू शकली नाही. अलीकडेच कांही चर्चना आपली मते झटकन बदलवून डावीकडील पक्षात जाण्याचा कल सापडला. एक लेखक म्हणतो: “लॅटीन अमेरिकेतील नविन वेदांतीय पिढी . . . दावा करते की माक्सीझम ख्रिश्‍चनत्वातील अटळ राजकीय उव्वाच आहे.” परंतु पवित्रशास्त्र म्हणते: “ते वाऱ्‍याची पेरणी करून वादळाची कापणी करतील.”—होशेय ८:७, जे. बी.

वादळाची कापणी

होय, पवित्रशास्त्र गंभीर इशारा देते: धर्म व राजकारण यामध्ये भयंकर मोठी टक्कर येत आहे. प्रकटीकरण अध्याय १७ मध्ये पवित्रशास्त्र वर्णन करते की खोटया धर्माची जागतिक सत्ता ही “जलावर बसलेल्या मोठ्या कलवंतणी” प्रमाणे रक्‍ताने कलंकीत झालेली आहे. हे “जल” “लोक व राष्ट्राना” प्रतिबिंबीत करते. (१ व १५वे वचन) कळवंतीणीचे नांव “मोठी बाबेल, कलावंतीणीची व पृथ्वीवरील अमंगळपणाची माता” आहे व ती “पवित्रजनांचे रक्‍त प्राशिली आहे.” (५ व ६वे वचन) “बाबेल” हे खोट्या धर्माच्या संस्थेस साजेसे नाव आहे कारण तीची पुष्कळशी तत्वे पुरातन शहर बाबेल पासूनची आहेत.a तिने तिचा खूनी नावलैकीक शतकोनुशतके खऱ्‍या ख्रिश्‍चनांना छळून प्राप्त केला आहे.

खोट्या धर्माची जगव्याप्त सत्ता पुढे “सात डोकी व दहा शिंगे . . . (जी) म्हणजेच दहा राजे” असे श्‍वापदवर आरूढ असल्याचे वर्णिले आहे. (३, १२ वे वचन) या नियतकालीकाच्या अगोदरच्या लेखांनी “श्‍वापदाची” ओळख जागतिक शांती प्रस्थापण्यास भाव ठेवलेले उपकरण सयुंक्‍त राष्ट्रसंघ अशी दिलेली आहे. या संस्थेस पाठींबा देणारे असा चर्चचा अहवाल झाला आहे. ऑक्टोबर १९६५ मध्ये पोप पॉल ६वे यांनी युनोचे वर्णन “ऐक्य व शांतीची अखेरची आशा” असे केले. १९७९ मध्ये पोप जॉन २रे यांनी युनोच्या सर्वसाधारण सभेत भाषण दिले. ख्रिस्त व त्याचे राज्य यांचे बाबत कांहीच न उच्चारता त्यांनी युनो बाबत ती “शांती व न्यायाचे सर्वोच्य स्थान” असल्याचे म्हटले.

परंतु धर्म व युनोचे मिलन एवढे घातक का आहे? कारण “दहा शिंगे . . . व श्‍वापद कलावंतिणीचा द्वेष करतील व तिला ओसाड व नग्न करीतील . . . तिला अग्नीत जाळून टाकतील.” (१६वे वचन) खोटा धर्म राजकारणासोबत गुप्तकटाच्या महासंकटासाठी सरळ पुढे होईल. नग्न व तिची भूमिका अशुद्ध मार्ग उघड झाल्यामुळे ती निखालस नष्ट केली जाईल.

ही, येशू म्हणाला त्या “मोठ्या संकटाची ठिणगी असू शकेल व त्यात आर्मगिद्दोन युद्धाच्या कळसास पोहोचेल. ख्रिस्तास अजिंक्य स्वर्गिय सेनेचा पाठींबा असणार, ते सैतानाच्या जगव्याप्त व्यवस्थीकरणाचा “चुराडा व नष्ट” करील व केवळ ‘लीन ज्यांना पृथ्वीचे वतन मिळेल’ त्यांना बचावून ठेवील. हे खरे ख्रिश्‍चन जे इतर गोष्टी समवेत घातक राजकारणापासून मुक्‍त झालेले असणार.—मत्तय २४:२१; दानिएल २:४४; स्तोत्रसंहिता ३७:१०, ११; मत्तय ५:५; प्रकटीकरण ६:२; १६:१४–१६.

तुम्ही, खोट्या धर्माने देवाच्या नांवावर जो कलंक व व्यथा आणल्या त्यावर शोक करणारे असाल तर, तुम्ही आता काय करावे? पवित्रशास्त्राची आज्ञा “माझ्या लोकांनो, तिच्या पापाचे वाटेकरी होऊ नये म्हणून तिच्यातून (खोट्या धर्मातून) निद्या” (प्रकटीकरण १८:४) केवळ यहोवाचे साक्षीदारच लोकांना ही आज्ञा अनुसरण्यास आर्जवितात. सुरुवातीच्या ख्रिश्‍चनाप्रमाणे, ते युद्ध व राजकारणापासून दूर ठेवतात व त्यामुळे धर्म राजकारणासोबत टक्कर घेईल त्यावेळेस नाशाच्या पथावर नसणार. यास्तव त्यांच्याबरोबर संपर्क साधा. तुम्हास अरुंद मार्ग जो नाशाकडे जातो तो नव्हे परंतु चिरकाल जिवनाकडे निरवितो तो मिळविण्यास ते आनंदाने मदत करतील.—मत्तय ७:१३, १४; योहान १७:३. (w85 8/1)

[तळटीपा]

a तपशीलवार माहीतीसाठी “बाबीलोन द गेट हॅज फॉलन!” गॉडस्‌ किंगडम रूल्स! हे वॉचटॉवर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्युयार्कने प्रसिद्ध केलेले पुस्तक पहा.

[६ पानांवरील चित्र]

१९१४ मध्ये सेन्ट पॉल्सच्या पायऱ्‍यावर ड्रम आल्टरवर लंडनचे बिशपनी ब्रिटीश सैन्य दलास देशभक्‍तीस चेतावले.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा