‘माझा धर्म माझ्या साठी चांगला आहे!’
तुमच्या घरी यहोवाच्या साक्षीदारातील कोणा एकाने भेट दिली तेव्हा तुम्ही अशा शब्दांनी त्यांना कधी प्रतिसाद दिला होता का? किंवा ‘तो माझ्या पालकासाठी व आजोबा–आजी साठी चांगला होता, तर मग इतर धर्माविषयी मी चिंता का करावी’ असे आणखी तुम्ही म्हणाला होता?
अर्थात आमच्या पालकांचा अनुभव व सुज्ञपणाकडून आम्हास भरपूर फायदा होता. परंतु धर्म अनुसरण्यासाठी हाच अति सुज्ञ आधार असेल का? खात्रीने, आम्ही जे सर्व कांही करतो त्यात आमचे पालक व आजोबा–आजीचे अनुकरण करतोच असे कांही नाही. का नाही? कारण आता ज्ञान व समज यात वृद्धी झाली आहे.
याचे उदाहरण: ४० वर्षापूर्वी लोक आजारी होत तेव्हा ते केवळ उपलब्ध उपचार अपुरा होता म्हणून मृत्युमुखी पडत. १९४३ पासून जंतुनाशके उपलब्ध झाली आहेत व त्यामुळे अनेकांचे प्राण बचावले. ती जंतुनाशके आमच्या आजोबा–आजीला परिचीत नव्हती म्हणून ती वापरण्यास आम्ही नकार देऊ का? नाही, आमची मनोवृती खुली राखू व नविन विकासाच्या चांगलेपणाचे मुल्यमापन करू. धर्माबाबत अशीच मनोवृती सुज्ञपणाची आहे.
प्रेषित पौलाचे प्रकरण स्पष्ट करते की आमच्या पुर्वजांचा धर्म हा देवास संतोषविणारी खरी भक्ती असतोच असे काही नाही. पौलाची ख्रिस्ती धर्मात परीवर्तित होण्याआधी ख्रिश्चन “मार्गा” विषयीची प्रतिक्रीया उग्र व हिंसक होती व तो “देवाच्या मंडळीचा छळ व नाश करीत असे.” परंतु का? कारण तो ‘पुर्वजांच्या सांप्रदायाविषयी आवेशी’ होता. पूर्वीच्या धर्मास प्रांजळपणे बिलगून राहण्याने त्याला येशू ख्रिस्ताविषयीचे सत्य ओळखण्यापासून दूर राखले गेले; पण त्यामुळे देवास संतोष झाला नसता.—प्रेषितांची कृत्ये ९:१, २; गलतीकर १:१३, १४.
तुमचा धर्म—निवड की योगायोग?
बहुतेक प्रकरणात व्यक्तीचा धर्म हा खरोखरी योगायोगाचा भाग आहे. कोणत्या दृष्टीने? तुम्ही कॅथोलीक, प्रॉटेस्टंट, हिंदू टोयीस्ट किंवा बुद्ध हा तुमच्या पालकांचा धर्म म्हणून त्यात जन्मला असाल. परंतु गृहीत धरा की तुम्ही दुसऱ्या देशात किंवा घराण्यात जन्मास आला असता तर काय? कदाचित आता तुम्ही मनापासून वेगळ्याच धर्माचे पुरस्कर्ते म्हणून सांगितले असते. यास्तव, तुमचा जन्मतः असणारा धर्म आपोआपच खरा धर्म आहे असा वाद मांडणे तर्कशुद्धतेचे आहे का?
तुम्ही तुमच्या धर्मात जन्मला होता किंवा नाही, तरिही तुम्हास तो तुम्हासाठी चांगला वाटत असेल, परंतु अचूक धर्म हा केवळ व्यक्तीगत कल्पना व आवडीची गोष्ट आहे का? ती विश्वसनीय मार्गदर्शिका आहे का?
कदाचित आम्ही हे भोजनाच्या उदाहरणाने स्पष्ट करू. मुलास तुम्हास सांगण्यास लावा की त्यास केकचा तुकडा किंवा पालेभाजीचा पदार्थ आवडेल. बहुतांशी तो केकची निवड करील. परंतु ती निवड अत्यंत पौष्टीक असेल का? त्याचप्रमाणे, धर्म तुमच्या व्यक्तीगत आवडीस अपील करणारा असला तरी तो तुमच्या आध्यात्मीकतेस चांगला असेलच असे काही नाही.—रोमकर १०:२, ३ची तुलना करा.
धर्म हा कांही वस्तुनिष्ठ विचारांची बाब नाही; त्यात देवाची भक्ती समाविष्ट आहे त्यामुळे तो देवास संतुष्ट करणारा असला पाहिजे. यास्तव, माझा धर्म माझ्यासाठी चांगला आहे का हा प्रश्न महत्वाचा नसून, माझा धर्म खरोखरी देवास संतोषवितो का हा आहे.