राज्य घोषकांचा वृत्तांत
यहोवा इश्वरी आवेशाला आशीर्वादित करतो
येशूठायी इश्वरी आवेश होता. त्याचा इश्वरी आवेश बघून शिष्यांना त्याच्या विषयीच्या भविष्यवादाचे स्मरण झाले: “तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील.” (योहान २:१७) त्याच्या उपाध्यपणात हा आवेश दिसला: “तो नगरोनगरी व गावोगावी प्रचार करीत शिक्षण देत” होता. त्याने त्याच्या शिष्यांना ‘नेटाने यत्न करा’ असे म्हटले. (लूक १३:२२–२४) येशूच्या शिष्यांना यहोवाने इश्वरी आवेशाबद्दल आशीर्वादित केले त्याप्रमाणे तो आजही करीत आहे. युरूग्वेचे पुढील अनुभव ते दाखवितात:
◻ यहोवाच्या साक्षीदार असणाऱ्या दोन स्त्रिया जवळच्या मंडळीपासून सुमारे ४५ मैल (७० कि.मी.) दूर राहात होत्या. त्या एकाकी पडल्यामुळे त्यांनी स्वतःच्या घरीच साप्ताहिक सभा घेण्याचे व त्यांना आस्थेवाईकांनी यावे असे आमंत्रण देण्याचे ठरविले. एकाकीपणा असला तरी त्या खूप आवेशी होत्या. एकीने सहा तर दुसरीने सात पवित्र शास्त्र अभ्यास चालविले. विभागिय देखरेख्यांच्या भेटीसमयी ३६ लोक त्यांच्या भाषणाला आले. भगिनीपैकी एकीने सत्यात पाच मुलांना वाढविले, ते सर्वच आज यहोवाच्या संघटनेत आवेशाने कार्य करीत आहेत. खरेच यहोवाने या दोन्ही भगिनींच्या इश्वरी आवेशास आशीर्वादित केले.
◻ आणखी एका भगिनीने सभांना आपल्या मुलांसहित उपस्थित राहण्यासाठी ७ मैल (११ कि.मी) चा प्रवास नित्याने करून इश्वरी आवेश प्रदर्शित केला. ती बहुधा तासभर आधी येई. पुस्तक अभ्यास हा एक तासाचा असतो तर त्याच्यासाठी एवढा लांब प्रवास कशाला करायचा; आपल्या घरीच पुस्तकाचे वाचन करता येणार नाही का असे कधीही तिने स्वतःला वाटू दिले नाही. आज तिला या श्रमाचा आशीर्वाद मिळत आहे. तिच्या स्वार्थत्यागी, सहनशील आणि पत्नी तसेच माता या अर्थी असण्याचा तिचा निश्चय या सर्व उदाहरणाने तिच्या मुलांवर खूप मोठा प्रभाव केला. आज ती सहाही मुले सत्यात आहेत. सध्या पायनियर असणारा तिचा एक मुलगा सायकलवर ३६ मैल (५८ कि.मी.)चा प्रवास करून एका गटाची काळजी वाहतो व तसाच आवेश प्रदर्शित करतो. आपल्या प्रवासात त्याला सायकल उचलून नदी पार करून जावे लागते. यहोवा त्याच्याही इश्वरी आवेशाला आशीर्वादित करीत आहे.
◻ १९८२ मध्ये बांधवांच्या एका गटाने एका एकाकी स्थळी कार्य केले व पुष्कळ पुस्तकांचे वाटप केले. पुढल्या वर्षी हेच क्षेत्र उरकण्यासाठी ते आले. एका घरी तर अपूर्व आक्षेप त्यांना ऐकायला मिळाला. पवित्र शास्त्रीय सादरता ऐकल्यावर घरमालकाने म्हटले की त्याला आपला धर्म बदलण्याची इच्छा नाही. त्याचा धर्म खरा असल्याचे त्याला वाटत होते. तो म्हणाला: “मी यहोवाचा साक्षीदार आहे.” त्याला भेट देणाऱ्यांनी जेव्हा त्याला म्हटले की तेही यहोवाचे साक्षीदार आहेत तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
घरमालकाने विवेचीत केले की मागील वर्षी बंधू त्याच्या घरी आले त्या वेळी तो कोठे तरी बाहेर गेला होता पण त्याच्या कुटुंबाने प्रकाशने स्विकारली होती. त्याने ती वाचली व त्याला समजले की यात पवित्र शास्त्रीय सत्याचे शिक्षण आहे. आपल्या वाचनानंतर त्याने ते इतरांना सांगायला सुरूवात केली. या नव्या ‘मेंढरास’ प्रौढतेप्रत प्रगमन करण्यासाठी व त्याने यहोवाच्या लोकांपैकी एक व्हावे याकरता व्यवस्था केली गेली.
होय, यहोवा, खऱ्या उपासनेसाठी आवेश व्यक्त करणाऱ्यांना आशीर्वादित करतो. जागतिक बंधुवर्गाच्या यहोवाच्या संघटनेचा भाग आहोत म्हणून आम्हाला आनंद होत आहे. त्यामुळे उपाध्यपणाच्या कार्यात इश्वरी आवेश प्रदर्शित करण्याची आमची इच्छा आहे. सैतानाच्या दुष्ट व्यवस्थीकरणापासून आमची सुटका झाल्यामुळे व पवित्र शास्त्रीय सत्यामुळे आमची शुद्धता झाल्यामुळे “चांगल्या कामासाठी आवेशी” असण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन लाभण्यास हवे.—तीतास २:१४.