या स्मारकविधीच्या काळादरम्यान तुम्ही यहोवा आणि येशू यांच्यासारखा आवेश दाखवाल का?
१. खासकरून स्मारकविधीच्या काळादरम्यान यहोवाचे साक्षीदार आपला आवेश कसा दाखवतात?
१ यहोवा त्याचा उद्देश आवेशानं पूर्ण करतो. त्याच्या राज्याच्या काही आशीर्वादांबद्दल यशया ९:७ मध्ये म्हटलं आहे: “सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.” तसंच, पृथ्वीवरील आपल्या सेवाकार्यादरम्यान देवाच्या पुत्रानंदेखील खऱ्या उपासनेकरता जबरदस्त आवेश दाखवला. (योहा. २:१३-१७; ४:३४) प्रत्येक वर्षी खासकरून स्मारकविधीच्या काळादरम्यान, जगभरातील लाखो प्रचारक आपली सेवा वाढवण्याद्वारे यहोवा आणि येशू यांच्यासारखा आवेश दाखवतात. तुम्ही त्या प्रचारकांपैकी एक असाल का?
२. आवेश असल्यामुळं ७ मार्च पासून आपण काय करण्यास प्रवृत होऊ?
२ स्मारकविधीची मोहीम: या वर्षी स्मारकविधीच्या आमंत्रण पत्रिकेच्या वाटपाची मोहीम शनिवार, ७ मार्च पासून सुरू होईल. क्षेत्र सेवेत आवेशानं भाग कसा घेता येईल त्याची आत्तापासूनच तयारी करा. दिलेलं क्षेत्र पूर्ण करण्यासाठी सर्वजण सेवेत मोठ्या उत्साहानं कार्य करत असल्यामुळं सर्व मंडळ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असेल. तुमच्या बायबल विद्यार्थ्यांना, पुनर्भेट घेत असलेल्यांना, तुमच्यासोबत काम करणाऱ्यांना, नातेवाईकांना आणि शाळासोबत्यांना या समारोहाला उपस्थित राहण्याचं खास आमंत्रण द्या किंवा jw.org ही आपली वेबसाईट पाहायला सांगा.
३. मार्च आणि एप्रिल या महिन्यांदरम्यान आपण आपली सेवा कशी वाढवू शकतो?
३ साहाय्यक पायनियर: आवेश असल्यामुळं आपण आपली सेवादेखील वाढवू. मार्च आणि एप्रिल महिन्यांदरम्यान ३० तास भरून पायनियरींग करण्याची संधी असल्यामुळं बरेचजण साहाय्यक पायनियरींग करतील. तुमच्या कौटुंबिक उपासनेच्या वेळी किंवा वैयक्तिक अभ्यासाच्या वेळी यावर विचार करा. (नीति. १५:२२) तुमचा आवेश पाहून इतरांनाही सेवेत अधिक सहभाग घेण्याची प्रेरणा मिळेल. सेवा वाढवण्याकरता तुम्ही वैयक्तिक फेरबदल करता तेव्हा येशूच्या आवेशाचं अनुकरण करत आहात हे दाखवता.—मार्क ६:३१-३४.
४. यहोवा आणि येशू यांच्या आवेशाचं अनुकरण केल्यानं आपल्याला कोणतं प्रतिफळ मिळेल?
४ या स्मारकविधीच्या काळादरम्यान यहोवा आणि येशू यांच्या आवेशाचं अनुकरण केल्यामुळं आपल्याला भरपूर आशीर्वाद मिळतील. आपल्या क्षेत्रातील जास्तीतजास्त लोकांना साक्ष दिली जाईल. यहोवाची सेवा केल्यानं आणि इतरांना साक्ष दिल्यानं आपल्याला आनंद आणि समाधान मिळेल. (प्रे. कृत्ये २०:३५) आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपला आवेशी देव यहोवा आणि त्याचा पुत्र येशू यांचं मन आनंदित करू.