वाचकांचे प्रश्न
हव्वा आणि मग आदामाने, बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे जे फळ खाल्ले ते सफरचंद होते का?
ते आपल्याला माहीत नाही. अनेक लोकांनी असा विचार केला की, ‘मना केलेले फळ’ सफरचंद होते. अनेक शतकांपासून चित्रकारांनी देखील त्याचप्रकारे चित्रे रेखाटली आहेत. परंतु बायबल त्या झाडाचे किंवा फळाचे नाव सांगत नाही. हव्वेने त्या झाडाला ‘बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाचे फळ’ असेच केवळ संबोधले.—उत्पत्ती ३:३.
शास्त्रवचनांवर सूक्ष्म दृष्टी (इंग्रजी) यातील “सफरचंद” यावर आलेला लेख याबाबतीत अधिक आस्थेचा आहे:
“झाड आणि फळाला सूचित करणारा इब्री शब्द ता·पुʹआख याबद्दल अनेक तर्क आहेत. सुगंध किंवा सुवास याने ओळखला जाणारा, असे त्या शब्दावरुनच सूचित होते. ते ना·फाखʹ या मूळ शब्दातून येते ज्याचा अर्थ ‘फुंकणे; धाप टाकणे; श्वास घेण्यासाठी झटणे,’ असा होता. (उत्प २:७; ईयो ३१:३९, NW; यिर्म १५:९, NW) याबाबतीत एम. सी. फिशर यांनी लिहिले: ‘सुरूवातीला [ना·फाखʹ] शी असलेल्या संबंधाची शब्दार्थाने ओढाताण केली आहे असे वाटते, पण “श्वास घेणे” आणि “श्वास सोडणे” या कल्पना संबंधित आहेत. त्याचाच समानार्थी शब्द पुआह म्हणजे, “वाहणे” (वाऱ्याचे) आणि “सुखावह सुवास, किंवा सुगंध घेणे.”’—आर. एल. हॅरीस यांनी १९८० मध्ये संपादलेले थिओलॉजिकल वर्डबुक ऑफ द ओल्ड टेस्टमेंट, खंड २, पृ. ५८६.
“सफरचंदाच्या जागी अनेक फळे सूचित करण्यात आली होती, ज्यामध्ये संत्री, महाळुंग, क्विन्स नावाचे एक पिवळे फळ व ॲप्रिकॉट ही फळे देखील होती. . . . परंतु, संबंधित अरेबिक शब्द तुफाक याचा मुख्य अर्थ ‘सफरचंद’ असा होतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे व ती म्हणजे, या शब्दाचा वापर करून, तापुआ व बेथ-तापुआ (हे फळ त्यांच्या आसपासच्या भागांमध्ये आढळत असल्यामुळे कदाचित त्यांची अशी नावे असावीत) ही इब्री ठिकाणांची नावे त्यांच्या अरेबिक समांतरात जतन करून ठेवली आहेत. (यहो १२:१७; १५:३४, ५३; १६:८; १७:८) ही ठिकाणे सखल प्रदेशांमध्ये नव्हे तर डोंगराळ प्रदेशांमध्ये होती व तेथील हवामान सर्वसामान्यपणे काहीसे समशीतोष्ण आहे. यासोबतच, गतकाळात हवामानातील बदल या शक्यतेला वगळता येत नाही. आजही, इज्राएलमध्ये सफरचंदाची झाडे वाढतात आणि म्हणूनच बायबलच्या वर्णनाला समाधानकारकतेत जुळतात. गत शतकात सिरीया आणि पॅलेस्टाईनमध्ये अनेक वर्षे वास्तव्य केलेल्या विल्यम थॉम्सन यांना, फिलिस्टीयाच्या पठारावरील अश्कलोनच्या क्षेत्रांमध्ये सफरचंदाच्या बागा सापडल्याचे कळवले आहे.—जे. ग्रॅन्डे यांनी १९१० मध्ये पुनर्मुद्रण केलेले, द लँड ॲण्ड द बुक, पृ. ५४५, ५४६.
“सफरचंदाच्या झाडाचा (पायरस मलस) उल्लेख विशेषकरून गीतरत्नात केलेला आहे. येथे शुनेमकरीणच्या मेंढपाळ साथीदाराने व्यक्त केलेल्या प्रेमाची तुलना सफरचंदाच्या झाडाच्या छायेशी व त्याच्या फळाच्या गोडीशी करण्यात आली आहे. (गीत २:३, ५) याचप्रमाणे, तो देखील तिच्या श्वासाची तुलना सफरचंदाच्या सुवासासोबत करतो. (गीत ७:८; तसेच ८:५ देखील पहा.) नीतीसूत्रात (२५:११, NW) योग्य व समयोचित शब्दांची तुलना ‘रूपेरी करंड्यात सोन्याची सफरचंदे’ याजशी करण्यात आली आहे. सफरचंदाचा आणखी एक संदर्भ केवळ योएल १:१२ येथे सापडतो. सफरचंद हे एदेनमधील मना केलेले फळ होते या सर्वसाधारण सांप्रदायाला शास्त्रवचनांचा कसलाच आधार नाही. त्याचप्रमाणे, किंग जेम्स व्हर्शन यात (स्तोत्र १७:८; नीती ७:२; व इतर ठिकाणी) ‘डोळ्यातील बुबूळ, [सफरचंद]’ अशी संज्ञा आढळते, पण ही काही इब्री संज्ञा नव्हे; त्याचा शब्दशः अनुवाद [एखाद्याच्या] ‘डोळ्याची बाहुली’ असा आहे.”—शास्त्रवचनांवर सूक्ष्म दृष्टी (इंग्रजी) खंड १, पृष्ठे १३१-२, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क इंका. तर्फे १९८८ मध्ये प्रकाशित.