‘बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नका’
जोरदार वादळानंतर एका नाजूक फुलाने त्याचे डोके टाकलेले तुम्ही कधी पाहिले आहे का? एका दृष्टीने ते हृदयस्पर्शी दृश्य असू शकते. त्या अनुषंगाने, मुसळधार पावसाने अगणित प्राण्यांना व लोकांना—कोणत्याही फुलापेक्षा कितीतरी पटीने कणखर सृष्टीला—आसरा घेण्यास भाग पाडले. तरीही, ते फूल वादळी हवामानाचा सामना करत तेथेच मुळावलेले राहिले. आता, येथे शाबूत, वाकलेले, पण न तुटलेले आहे व अशी शक्ती दाखवते जी त्याच्या नाजूक स्वरुपाच्या विरोधात आहे. तुम्ही त्याची प्रसंशा करत असताना कदाचित असा विचार कराल की, त्याला पुन्हा ताकद मिळेल व आकाशाकडे त्याचे सुंदर डोके परत उंचावेल.
लोकांच्या बाबतीत देखील असेच आहे. अशा या खडतर काळात, आपल्याला अनेक प्रकारच्या वादळांचा सामना करावा लागतो. आर्थिक हालअपेष्टा, नैराश्य, ढासळते आरोग्य, प्रियजनांना मृत्यूत गमावणे—अशा प्रचंड वादळी हल्ल्यांचा आपल्या सर्वांना कोणत्या ना कोणत्या प्रसंगी सामना करावा लागतो. फुल ज्याप्रमाणे स्वतः संरक्षण मिळवू शकत नाही अशाचरीतीने कधी कधी ते प्रसंग आपण टाळू शकत नाही. कमकुवत वाटणाऱ्या व्यक्ती अशी आश्चर्यकारक शक्ती दाखवतात व भीषण हल्ल्यांमध्ये टिकून राहतात तेव्हा त्यांना पाहून चालना मिळते. ते कशाप्रकारे हे करतात? याची गुरूकिल्ली अनेकदा विश्वास ही असते. येशूचा चुलत भाऊ याकोब याने लिहिले: “तुम्हास ठाऊक आहे की, तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो.”—याकोब १:३.
आशा ही दुसरी गुरुकिल्ली आहे. उदाहरणार्थ, मृत्यू प्रियजनांवर आघात करतो, तेव्हा बचावणाऱ्या लोकांवर, आशा मोठा फरक आणू शकते. प्रेषित पौलाने थेस्सलनीकाकरातील ख्रिश्चनांना लिहिले: “झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, ह्यासाठी की, ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये.” (१ थेस्सलनीकाकर ४:१३) ख्रिस्ती लोक मृत्युमूळे दुःख करीत असले तरी, यात फरक आहे. मृतांच्या स्थितीबद्दल व पुनरुत्थानाच्या आशेबद्दल त्यांना अचूक ज्ञान आहे.—योहान ५:२८, २९; प्रेषितांची कृत्ये २४:१५.
हे ज्ञान त्यांना आशा देते. याच्या परिणामात आशा त्यांचे दुःख हळुवारपणे कमी करते. ही गोष्ट त्यांना सहन करण्यास मदत करते. कालांतराने वादळानंतरच्या त्या फुलाप्रमाणे ते त्यांची डोकी दुःखातून वर करतील व जीवनामध्ये पुन्हा एकदा आनंद आणि समाधान प्राप्त करतील.