धैर्याने देवाची उपासना करत राहा! साठी संदर्भ—भाग २
अध्याय २२
एकनिष्ठ राहण्यासाठी त्याला धैर्य दाखवावं लागलं
वाचकांचे प्रश्न
बायबलमधील उल्लेखित फिलिस्टाईन लोक कोण होते?
देवाच्या प्राचीन लोकांनी वाग्दत्त देश ताब्यात घेतला तेव्हा केननमध्ये राहत असणाऱ्या फिलिस्टाईन नामक लोकांविषयी बायबल वारंवार सांगते. पुष्कळ काळापासून या फिलिस्टीयन लोकांनी देवाच्या लोकांना विरोध केला होता आणि त्याचे वर्णन गल्याथ नामक फिलिस्टाईन महावीर आणि दावीद यांच्यातील सामन्याच्या अहवालामध्ये करण्यात आले आहे.—१ शमुवेल १७:१-३, २३-५३.
बायबल दाखविते, की प्राचीन फिलिस्टीईन लोकांनी कॅफतोरपासून केननच्या नैऋत्येकडील प्रदेशात स्थानांतर केले. (यिर्मया ४७:४) कॅफतोर कुठे होते? इंटरनॅशनल स्टॅडर्ड बायबल एन्सायक्लोपिडीया टिप्पणी करतो, “निश्चित उत्तर देण्यासाठी पुरेसे सबळ पुरावे नसले तरी; वर्तमान ज्ञान क्रीट बेटाकडे (किंवा क्रीट बरोबर ॲगियन बेटांवर जो प्राकृतिकरीत्या एकमेकांशी संबंधित आहे) निश्चितपणे संभाव्य स्थानाकडे अंगुली दर्शविते.”—खंड १, पृष्ठ ६१०.
याच्या एकवाक्यतेत न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स यातील आमोस ९:७ म्हणते: “‘इस्राएल वंशजहो, तुम्ही मला कुशाचा वंशजांसारखे नाही काय?’ असे यहोवा म्हणतो. ‘मी इस्राएल लोकांना इजिप्त देशातून, फिलिस्टाईन लोकास क्रीटमधून आणि अरामी लोकास कीरातून आणिले नाही काय?’”
हे समुद्र किनाऱ्याजवळील प्राचीन लोक क्रीटपासून केननच्या भागामध्ये केव्हा स्थानांतरीत झाले हे ठाऊक नाही आणि नंतर त्या प्रदेशाला फिलिष्टिया असे म्हणण्यात येऊ लागले आणि हा प्रदेश नैऋत्येकडील जोपा आणि गेझा यातील किनाऱ्यामध्ये आहे. तथापि असे दिसून येते की, अब्राहाम आणि इसहाक या दोघांच्या दिवसामध्ये समुद्रकिनाऱ्याजवळील सखल प्रदेशामध्ये ते सुरवातीपासून होते.—उत्पत्ती २०:१, २; २१:३२-३४; २६:१-१८.
देवाने अभिवचन दिलेल्या वाग्दत्त देशात इस्राएल लोकांनी प्रवेश केल्यानंतरही पुष्कळ काळापर्यंत फिलिस्टाईन लोकांचा शक्तिशाली प्रभाव कायम होता. (निर्गम १३:१७; यहोशवा १३:२; शास्ते १:१८, १९; ३:३, ४; १५:९, १०; १ शमुवेल ४:१-११; ७:७-१४; १३:१९-२३; १ राजे १६:१५) दिर्घकाळापर्यंत म्हणजेच उज्जीया राजाच्या अधिपत्याच्या काळात देखील फिलिस्टाईन लोक गथ, यन्नो व अश्दोद या त्यांच्या नगरामध्ये राहीले. (२ इतिहास २६:६) एक्रोन, अश्केलोन आणि गेजा ही बायबल वृत्तांतातील त्यांची इतर प्रमुख शहरे होती.
जगविजेता ॲलेक्झॅडर याने फिलिस्टाईन लोकांच्या गेजा या नगरावर विजय मिळविला, परंतु तेव्हा फिलिस्टाईन लोकांची ओळख स्पष्टपणे राहिली नाही. प्राध्यापक लॉरेंस ई स्टेजर यांनी बिब्लिकल आर्किलॉजी रीव्हीयू (मे/जून १९९१) यामध्ये लिहिले, “फिलिस्टाईन लोकांना देखील बॅबेलॉनमधून हद्दपार करण्यात आले. . . . परंतु हद्दपार फिलिस्टाईन लोकांचे काय झाले याबद्दल कोणताही अहवाल उपलब्ध नाही. नबुखद्नेस्सरच्या विजयानंतर अश्केलोन येथे जे राहिले असतील त्यांची जातीय ओळख संपुष्टात आली. ते इतिहासातून केवळ नाहीसे झाले.”
आधुनिक दिवसातील पॅलेस्टाईन हे नाव लॅटीन आणि ग्रीक शब्दांमधून घेतले आहे आणि ते “फिलिस्टीया” या इब्री शब्दापर्यंत घेऊन जाते. काही अरबी भाषांमधील बायबल भाषांतरे “फिलिस्टाईन्स्” यासाठी आधुनिक पॅलेस्टाईन्स् याकरिता असणाऱ्या शब्दाबरोबर जुळणारा शब्द वापरतात. तथापि, टुडेज अरॅबिक व्हर्शन एका वेगळ्याच शब्दाचा वापर करते आणि अशाप्रकारे प्राचीन फिलिस्टाईन्स् आणि आधुनिक पॅलेस्टाईन लोक यामधील भेद स्पष्ट करते.
टेहळणी बुरूज०५ ३/१५ २९
“पिम” या शब्दावरून बायबलचा इतिहास खरा असल्याचा पुरावा मिळतो
बायबलमध्ये “पिम” हा शब्द फक्त एकदाच आलाय. शौल राजाच्या काळात इस्राएली लोकांना पलिष्टी लोहारांकडून आपल्या धातूच्या अवजारांना धार लावून घ्यावी लागायची. त्याबद्दल बोलताना बायबल म्हणतं: “फाळ, कुदळ, तीन टोकांचं अवजार, कुऱ्हाड यांना धार लावायची किंमत आणि पराणी बसवायची किंमत एक पिम असायची.”—१ शमुवेल १३:२१.
पण पिम नेमकं काय आहे हे बऱ्याच काळापर्यंत, म्हणजे १९०७ पर्यंत कोणालाही माहीत नव्हतं. कारण त्याच वर्षी गेजेर नावाच्या एका प्राचीन शहरात केलेल्या उत्खननात पहिल्यांदा पिम हा वजन करायचा दगड सापडला. त्यामुळे आधीच्या बायबल भाषांतरकारांना “पिम” या शब्दाचं भाषांतर करणं कठीण गेलं. उदाहरणार्थ, पंडिता रमाबाई भाषांतर यात १ शमुवेल १३:२१ या वचनाचं भाषांतर असं केलंय: “तथापि फाळ व कुदळी व कऱ्हाडी व दांताळी यांसाठी व अरीला धार देण्यासाठी कानस होती.” पण खरंतर कानस हे धातू घासण्याचं एक लोखंडी हत्यार आहे.
आता मात्र विद्वानांना माहीत झालंय, की पिम हा वजन करायचा एक दगड होता आणि प्राचीन काळात हिब्रू लोक वजन करायसाठी तो वापराचे. त्याचं वजन सरासरी ७.८२ ग्राम किंवा सुमारे दोन तृतीयांश शेकेल इतकं होतं. पलिष्टी लोक अवजारांना धार लावायची किंमत म्हणून इस्राएली लोकांकडून पिम दगडाच्या वजनाइतके चांदीचे छोटेमोठे तुकडे घ्यायचे. इ.स.पू. ६०७ मध्ये यहूदा राज्याचा आणि त्याची राजधानी असलेल्या यरुशलेम शहराचा नाश झाला, त्यानंतर वजनासाठी शेकेलचा वापर करणं बंद झालं. पण इब्री शास्त्रवचनांत “पिम” याचा जो उल्लेख आलाय त्यावरून ती शास्त्रवचनं खरी असल्याचा पुरावा कसा मिळतो?
काही विद्वान असा दावा करतात, की इब्री शास्त्रवचनं (यात पहिले शमुवेलचं पुस्तकसुद्धा येतं) अशा काळात लिहिण्यात आली होती, जेव्हा राष्ट्रांवर ग्रीक संस्कृतीचा जबरदस्त प्रभाव होता. हा काळ इ.स.पू. दुसऱ्या शतकापासून ते पहिल्या शतकापर्यंतचा होता. त्यामुळे ते असं म्हणतात, की “या लिखाणांत . . . ‘दिलेला इतिहास खरा नाही,’ आणि म्हणून ‘बायबलमधल्या’ इस्राएलची किंवा ‘प्राचीन इस्राएलची’ त्यांत दिलेली माहिती खरी नाही. याबद्दल आज आपल्याला ज्या गोष्टी माहीत आहेत, त्या आजच्या काळातल्या यहुदी आणि ख्रिस्ती साहित्यकारांनी रचलेल्या फक्त काल्पनिक गोष्टी आहेत.”
पण १ शमुवेल १३:२१ यात उल्लेख केलेल्या पिमबद्दल बोलताना, नियर इस्टर्न पुरातत्त्वशास्त्र आणि मानववंशशास्त्राचे प्राध्यापक विल्यम जी. डेवर म्हणतात: “ज्या काळात राष्ट्रांवर ग्रीक संस्कृतीचा प्रभाव होता त्या काळात राहणाऱ्या लेखकांनी याचा ‘शोध’ लावणं शक्यच नाही. कारण तोपर्यंत वजनासाठी पिम दगडाचा वापर बंद होऊन बरीच शतकं उलटली होती आणि लोकांना त्याचा पार विसर पडला होता. खरंतर ‘पिम’ या शब्दाचा नेमका काय अर्थ आहे हे १९०७ पर्यंत कोणालाही माहीत नव्हतं. उत्खनन करणाऱ्यांना त्या वर्षी ‘पिम’ असा हिब्रू शब्द लिहिलेला दगड पहिल्यांदा सापडला होता. साहित्यकारांनी जर बऱ्याच काळानंतर या गोष्टी रचल्या असतील, तर मग हिब्रू बायबलमध्ये या वजनाचा खास उल्लेख करण्यात आलाच नसता. आणि काहींना तर असंही वाटतं, की ही माहिती खरी आहे की नाही याच्याने काहीच फरक पडत नाही. कारण ती अगदी किरकोळ माहिती आहे. पण खरंतर ‘अशी बारीकसारीक माहितीच इतिहासातली एखादी गोष्ट खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी गरजेची असते.’”
इन्साइट “मिखमाश” ¶४
मिखमाश
योनाथान पलिष्ट्यांचा पराभव करतो. पलिष्टी लोकांच्या लुटामार करणाऱ्या तीन टोळ्या मिशमाश इथल्या त्यांच्या छावणीतून निघायच्या आणि त्यांची एक तुकडी ‘मिखमाशच्या खिंडीकडे’ जायची. त्यांच्यापासून धोका असल्यामुळे योनाथानने त्यांच्याविरुद्ध पाऊल उचलायचं ठरवलं. (१शमु १३:१६-२३) त्यासाठी त्याने मिखमाशची खिंड ओलांडली. ही खिंड गेबाच्या पूर्वेपर्यंत असणारी उभ्या कडांची एक दरी होती. या खिंडीतच दोन मुख्य निमुळती शिखरं असलेले डोंगर, म्हणजेच “सुळके” होते. पण त्यांच्या तीक्ष्ण कडा जवळजवळ ३०० वर्षांच्या कालावधीत वातावरणाचा परिणाम होऊन बोथट बनल्या होत्या. या सुळक्यांची नावं बोसेस आणि सेने अशी होती. या दोन सुळक्यांमुळेच दरीला एक नागमोडी वळण होतं. (१शमु १४:१-७) एका अनोळखी व्यक्तीला अशा डोंगरदऱ्या आणि कड्याकपारीतून मार्ग काढत जाणं जवळजवळ अशक्य होतं. पण योनाथान या बन्यामिनी प्रदेशात लहानाचा मोठा झाल्यामुळे त्याला तो प्रदेश चांगल्या प्रकारे माहीत होता. योनाथानच्या वडिलांची म्हणजे शौलची छावणी मिखमाश इथे आणि योनाथनची छावणी गेबा इथे असल्यामुळे त्याला हा प्रदेश चांगल्या प्रकारे जाणून घ्यायच्या अनेक संधी नक्कीच मिळाल्या असतील.
इन्साइट “मफीबोशेथ” क्र. २ ¶१
मफीबोशेथ
२. योनाथानचा मुलगा; शौल राजाचा नातू. शौल आणि योनाथानच्या मृत्यूची बातमी इज्रेलहून आली तेव्हा मफीबोशेथची काळजी घेणारी दाई घाबरून पाच वर्षांच्या मफीबोशेथला घेऊन पळू जाऊ लागली. तेव्हा तो “तिच्या हातातून पडला” आणि दोन्ही पायांनी “अधू झाला.” (२शमु ४:४) पुढे काही वर्षांपर्यंत मफीबोशेथ माखीर याच्या घरी राहिला. माखीर हा लो-दबार इथल्या अम्मीएलचा मुलगा होता. दावीदला ही गोष्ट पूर्वी शौलचा सेवक असलेला सीबा याच्याकडून कळली. त्या वेळी दावीदला योनाथानसोबत केलेल्या कराराची आठवण झाली. (१शमु २०:१२-१७, ४२) ‘शौलच्या घराण्यातलं कोणी अजून जिवंत असेल’ तर त्याला दया आणि प्रेम दाखवायची दावीदची इच्छा होती. म्हणून मफीबोशेथला जेव्हा दावीदसमोर आणण्यात आलं तेव्हा दावीदने त्याला आपल्या इच्छेबद्दल सांगितलं आणि म्हटलं: “तुझे आजोबा, शौल यांची सगळी जमीन मी तुला परत करीन, आणि तू नेहमी माझ्यासोबत माझ्या मेजावर जेवशील.” तेव्हा मफीबोशेथ अगदी नम्रपणे त्याला म्हणाला: “माझ्यासारख्या मेलेल्या कुत्र्याकडे तुम्ही लक्ष द्यावं, अशी तुमच्या या सेवकाची लायकी तरी काय?” यानंतर मफीबोशेथबद्दल दावीदची इच्छा लक्षात घेऊन सीबा आणि त्याच्या घरातले सगळे (त्याची १५ मुलं आणि २० सेवक) मफीबोशेथचे सेवक बनले. त्यानंतर मफीबोशेथ यरुशलेमध्येच राहून नेहमी राजाच्या मेजावर खातपीत राहिला.—२शमु ९.
अभ्यास लेख ४
एकमेकांना आपुलकी दाखवत राहा
“भावाभावांसारखं प्रेम करून एकमेकांबद्दल आपुलकी बाळगा.”—रोम. १२:१०.
सारांश
येशूने म्हटलं होतं, की त्याचे शिष्य आपसातल्या प्रेमामुळे ओळखले जातील. आणि म्हणूनच आपण एकमेकांसोबत प्रेमाने राहण्याचा प्रयत्न करतो. पण आपसातलं हे प्रेम वाढवण्यासाठी आपण एकमेकांना आपुलकी दाखवली पाहिजे. म्हणजे, आपल्या कुटुंबातल्या लोकांवर आपण जितकं प्रेम करतो, तितकंच प्रेम आपण आपल्या भाऊबहिणींवर केलं पाहिजे. आपण हे कसं करत राहू शकतो, तेच या लेखात सांगितलं आहे.
बायबलमध्ये आधीच सांगितलं होतं, की शेवटल्या दिवसांत लोकांमध्ये “माया-ममता” राहणार नाही. (२ तीम. ३:१, ३) ही गोष्ट आज आपल्या डोळ्यांसमोर घडताना आपण पाहत आहोत. आज घटस्फोटामुळे लाखो कुटुंबं विस्कटली आहेत. आईवडिलांमधलं प्रेम आटल्यामुळे मुलांना असं वाटतं, की आपल्यावर कोणाचंही प्रेम नाही. एका घरात राहणारी माणसंसुद्धा एकमेकांशी परक्यांसारखी वागतात. याबद्दल एका कुटुंब-सल्लागाराने असं म्हटलं: “कुटुंबातला प्रत्येक जण एकमेकांशी बोलण्याऐवजी कंप्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये डोकं खुपसून असतो; किंवा मग, व्हिडिओ गेम्स खेळण्यात गुंतलेला असतो. त्यामुळे एका छताखाली राहूनसुद्धा ते एकमेकांना नीट ओळखत नाहीत.”
२ एकमेकांवर प्रेम न करणाऱ्या जगातल्या लोकांसारखं आपल्याला व्हायचं नाही. (रोम. १२:२) याउलट, आपल्या कुटुंबातल्या लोकांबद्दल आणि मंडळीतल्या भाऊबहिणींबद्दल आपल्याला आपुलकी असली पाहिजे. (रोमकर १२:१० वाचा.) आपुलकी म्हणजे, कुटुंबातल्या लोकांबद्दल वाटणारा जिव्हाळा आणि आपलेपणा. असाच जिव्हाळा आणि आपलेपणा मंडळीतल्या भाऊबहिणींबद्दलही आपल्याला वाटला पाहिजे. आपण अशी आपुलकी दाखवतो तेव्हा मंडळीतली एकता टिकवून राहते.—मीखा २:१२.
३ भाऊबहिणींना आपुलकी दाखवण्यासाठी बायबलची काही उदाहरणं आपल्याला कशी मदत करू शकतात ते आता आपण पाहू या.
यहोवा “एकनिष्ठ प्रेमाने भरलेला देव आहे”
४ बायबलमध्ये यहोवाच्या अनेक सुंदर गुणांबद्दल सांगितलं आहे. जसं की, “देव प्रेम आहे” असं बायबल म्हणतं. (१ योहा. ४:८) प्रेमाच्या या गुणामुळेच आपण त्याच्याकडे आकर्षित होतो. पण बायबल असंही म्हणतं, की यहोवा “एकनिष्ठ प्रेमाने भरलेला देव आहे.” (स्तोत्र १०३:८ वाचा.) यावरून यहोवाचं आपल्यावर किती प्रेम आहे हेच दिसून येत नाही का?
५ स्तोत्र १०३:८ या वचनामध्ये यहोवाच्या आणखी एका गुणाबद्दल सांगितलं आहे. तो म्हणजे दया. या गुणामुळेसुद्धा आपण यहोवाकडे आकर्षित होतो. (निर्ग. ३४:६) यहोवा आपल्या चुका माफ करून आपल्याला दया दाखवतो. (स्तो. ५१:१) पण दया दाखवणं म्हणजे फक्त माफ करणं इतकंच नाही. एखाद्या व्यक्तीला आपण दुःखात पाहतो तेव्हा आपल्याला तिची दया येते. आणि त्यामुळे आपण लगेच तिला मदत करायला पुढे येतो. एका आईलासुद्धा आपल्या बाळाबद्दल असंच वाटतं. त्याला त्रासात पाहून तिचा जीव कळवळतो आणि ती लगेच त्याच्या मदतीला धावून जाते. पण आपल्याला त्रासात पाहून यहोवाचा जीव एका आईपेक्षा जास्त कळवळतो. (यश. ४९:१५) त्याला आपली दया येते आणि म्हणून तो आपल्याला मदतही करतो. (स्तो. ३७:३९; १ करिंथ. १०:१३) यहोवाप्रमाणेच, आपणसुद्धा दया दाखवली पाहिजे. भाऊबहिणींनी आपलं मन दुखावलं तर त्याबद्दल राग न बाळगता, आपण मोठ्या मनाने त्यांना क्षमा केली पाहिजे. (इफिस. ४:३२) पण याशिवाय आणखी एका महत्त्वाच्या मार्गाने आपण दया दाखवू शकतो. तो म्हणजे, जेव्हा आपले भाऊबहीण संकटात असतात तेव्हा आपण त्यांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. आपण प्रेमापोटी इतरांना दया दाखवतो तेव्हा आपण त्यांना आपुलकी दाखवत असतो, आणि यहोवाचंच अनुकरण करत असतो.—इफिस. ५:१.
“योनाथान व दावीद यांच्यात घट्ट मैत्री जुळली”
६ आपुलकी दाखवणाऱ्या कितीतरी लोकांची उदाहरणं बायबलमध्ये दिली आहेत. त्यातलंच एक उदाहरण योनाथान आणि दावीद यांचं आहे. त्यांच्या मैत्रीबद्दल बायबल म्हणतं: “योनाथान व दावीद यांच्यात घट्ट मैत्री जुळली. योनाथान दावीदवर जिवापाड प्रेम करू लागला.” (१ शमु. १८:१) शौलच्या जागी राजा म्हणून दावीदचा अभिषेक करण्यात आला होता. त्यामुळे शौल दावीदची ईर्ष्या करू लागला आणि त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न करू लागला. पण शौलच्या मुलाने, म्हणजे योनाथानने दावीदला मारून टाकण्यासाठी आपल्या वडिलांना मुळीच साथ दिली नाही. उलट, योनाथान आणि दावीद यांनी आपली मैत्री टिकवून ठेवायची आणि एकमेकांना साथ द्यायची शपथ घेतली.—१ शमु. २०:४२.
७ योनाथान आणि दावीद यांच्या मैत्रीच्या आड खरंतर बऱ्याच गोष्टी येऊ शकल्या असत्या. जसं की, त्या दोघांमध्ये वयाचं खूप अंतर होतं. योनाथान दावीदपेक्षा जवळजवळ तीस वर्षांनी मोठा होता. त्यामुळे तो असा विचार करू शकला असता, की ‘आपल्यात आणि दावीदमध्ये काहीच सारखं नाही. दावीद आपल्यापेक्षा कितीतरी लहान आहे. शिवाय त्याला अनुभवही कमी आहे. अशा व्यक्तीशी आपण कशी काय मैत्री करू शकतो?’ पण योनाथानने तसा विचार केला नाही. उलट, दावीदबद्दल त्याला खूप आदर होता.
८ योनाथान दावीदची ईर्ष्या करू शकला असता. कारण शौल राजाचा मुलाग असल्यामुळे पुढचा राजा होण्याचा हक्क त्याचाच होता. (१ शमु. २०:३१) पण योनाथान नम्र आणि यहोवाला एकनिष्ठ होता. त्यामुळे यहोवाने दावीदला राजा म्हणून निवडलं तेव्हा त्याने ती गोष्ट आनंदाने स्वीकारली. तसंच, तो दावीदलाही एकनिष्ठ राहिला. या गोष्टीला शौलचा भयंकर विरोध असतानाही योनाथानने शेवटपर्यंत दावीदला साथ दिली.—१ शमु. २०:३२-३४.
९ दावीदबद्दल आपुलकी असल्यामुळे योनाथानने कधीच त्याचा हेवा केला नाही. योनाथान स्वतः एक कुशल तिरंदाज आणि एक शूर योद्धा होता. त्याच्याबद्दल आणि त्याच्या वडिलांबद्दल लोक असं म्हणायचे, की “ते गरुडांपेक्षा वेगवान, आणि सिंहांपेक्षा बलवान होते.” (२ शमु. १:२२, २३) त्यामुळे आपण केलेल्या पराक्रमांची योनाथान सहज शेखी मारू शकला असता. पण त्याने तसं केलं नाही. दावीदने केलेल्या मोठमोठ्या कामांमुळे त्याने त्याचा कधीच हेवा केला नाही किंवा त्याच्याशी चढाओढ करायचाही प्रयत्नही केला नाही. उलट दावीद किती धैर्यवान आहे आणि यहोवावर त्याचा किती भरवसा आहे, या गोष्टीचं त्याला नेहमीच कौतुक वाटलं. खरंतर, दावीदने गल्याथला ठार मारलं त्यानंतरच योनाथानला तो आवडू लागला, आणि पुढे त्यांच्यात आपुलकीची मैत्री निर्माण झाली. अशा प्रकारची आपुलकी आपण आपल्या भाऊबहिणींना कशी दाखवू शकतो?
आपण भाऊबहिणींना आपुलकी कशी दाखवू शकतो?
१० बायबल आपल्याला असं सांगतं, की “एकमेकांवर शुद्ध मनाने जिवापाड प्रेम करत राहा.” (१ पेत्र १:२२) या बाबतीत यहोवाचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. तो आपल्यावर जिवापाड प्रेम करतो. आणि आपण जर त्याला एकनिष्ठ राहिलो तर आपल्यावरचं त्याचं हे प्रेम कधीही कमी होणार नाही. (रोम. ८:३८, ३९) “जिवापाड” या शब्दासाठी ग्रीक भाषेत जो शब्द वापरण्यात आला आहे त्याचा अर्थ असा होतो, की एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जीव ओतून प्रयत्न करणं. काही वेळा भाऊबहिणींना आपुलकी दाखवण्यासाठी आपल्यालासुद्धा खूप प्रयत्न करावे लागतील. जसं की, कोणी आपलं मन दुखावलं तर आपण प्रेमाने त्यांचं सहन करत राहिलं पाहिजे. आणि आपल्यातली शांती आणि एकता टिकवून ठेवायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिलं पाहिजे. (इफिस. ४:१-३) आपण जर आपल्यातलं शांतीचं बंधन टिकवून ठेवायचा आटोकाट प्रयत्न केला, तर आपण त्यांच्या चुकांकडे लक्ष देणार नाही. उलट, आपण त्यांच्याकडे यहोवाच्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करू.—१ शमु. १६:७; स्तो. १३०:३.
११ भाऊबहिणींना आपुलकी दाखवणं नेहमीच सोपं नसतं. खासकरून आपल्याला त्यांच्या चुका दिसतात तेव्हा. असं दिसतं, की पहिल्या शतकातल्या काही ख्रिश्चनांचीसुद्धा हीच समस्या होती. उदाहरणार्थ, युवदीया आणि सुंतुखे या दोन बहिणींनी आनंदाचा संदेश सांगण्यासाठी पौलसोबत “खांद्याला खांदा लावून” खूप मेहनत केली होती. पण काही कारणामुळे त्या दोघींचं एकमेकींशी पटत नव्हतं. त्यामुळे पौलने त्यांना असा सल्ला दिला: “प्रभूमध्ये एक मनाच्या असा.”—फिलिप्पै. ४:२, ३.
१२ भाऊबहिणींना आपुलकी दाखवण्यासाठी आपण काय करू शकतो? आपण त्यांना चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतो. त्यामुळे त्यांना समजून घ्यायला आणि त्यांच्याशी मैत्री करायला आपल्याला सोपं जाईल. कोणाशी मैत्री करण्यासाठी वयाचं आणि संस्कृतीचं बंधन नसावं. योनाथान आणि दावीदचंच उदाहरण आठवा. त्यांच्यात जवळजवळ ३० वर्षांचं अंतर होतं, पण तरी ते जिवलग मित्र बनले. तुम्हीसुद्धा मंडळीत अशा एखाद्या व्यक्तीशी मैत्री करू शकता का जी वयाने तुमच्यापेक्षा मोठी किंवा लहान आहे? अशी मैत्री करून तुम्ही दाखवून द्याल, की तुमचं “संपूर्ण बंधुसमाजावर प्रेम” आहे.—१ पेत्र २:१७.
१३ भाऊबहिणींना आपुलकी दाखवण्याचा अर्थ असा होतो का, की मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीशी आपली एकसारखी मैत्री असेल? नाही. ते शक्यही नाही. सहसा आपल्यासारख्या आवडीनिवडी असलेल्या लोकांशी आपली जवळची मैत्री होते. आणि त्यात चुकीचं असं काहीच नाही. येशूचाच विचार करा. त्याचे सगळे प्रेषित त्याचे “मित्र” होते. पण योहानशी त्याची खास मैत्री होती. (योहा. १३:२३; १५:१५; २०:२) पण म्हणून त्याने योहानला इतरांपेक्षा खास वागणूक दिली का? नाही. उदाहरणार्थ, देवाच्या राज्यात आपल्याला मानाचं पद मिळावं अशी योहानने आणि त्याच्या भावाने, याकोबने येशूकडे विनंती केली, तेव्हा तो त्यांना म्हणाला: “माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे बसायचा अधिकार देणं माझ्या हातात नाही.” (मार्क १०:३५-४०) आपणसुद्धा आपल्या जवळच्या मित्रांना इतरांपेक्षा खास वागणूक देऊ नये. (याको. २:३, ४) नाहीतर मंडळीत शांती आणि एकता राहणार नाही.—यहू. १७-१९.
१४ आपल्या भाऊबहिणींबद्दल आपल्याला आपुलकी असेल, तर आपण त्यांच्याशी चढाओढ करण्याचा प्रयत्न करणार नाही. योनाथान दावीदशी कसं वागला ते आठवा. दावीदऐवजी स्वतः राजा बनण्यासाठी त्याने त्याच्याशी चढाओढ केली नाही. आपण सगळेच योनाथानचं अनुकरण करू शकतो. भाऊबहिणींच्या कौशल्यांमुळे किंवा क्षमतांमुळे आपण त्यांची ईर्ष्या करू नये. उलट आपण ‘नम्रतेने त्यांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजलं पाहिजे.’ (फिलिप्पैकर २:३ वाचा.) हे नेहमी लक्षात असू द्या, की मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही चांगलं असतं आणि त्यामुळे मंडळीला मदतच होते. आपण जर नम्र असलो, तर भाऊबहिणींमधल्या या चांगल्या गोष्टी आपल्याला दिसतील आणि त्यांच्याकडून आपल्याला बरंच काही शिकता येईल.—१ करिंथ. १२:२१-२५.
१५ आपल्यावर अचानक संकट कोसळतं तेव्हा यहोवा आपलं सांत्वन करतो. तो हे कसं करतो? भाऊबहिणींद्वारे तो आपल्याला आपुलकी दाखवतो आणि व्यावहारिक मार्गांनी मदत करतो. हे एका कुटुंबाने कसं अनुभवलं त्याकडे लक्ष द्या. २०१९ सालच्या “प्रेम कधीही नाहीसे होत नाही” या आंतरराष्ट्रीय अधिवेशनासाठी तानिया आणि तिची तीन मुलं अमेरिकेला गेली होती. शनिवारचा कार्यक्रम संपल्यानंतर ते गाडीने परत आपल्या हॉटेलवर चालले होते. तानिया म्हणते: “जात असताना दुसऱ्या एका गाडीचा ताबा अचानक सुटला आणि ती आमच्या गाडीला येऊन धडकली. कुणालाही दुखावपत झाली नव्हती, पण आम्ही खूप घाबरलो होतो. आणि गाडीतून उतरून रस्त्यावर उभे होतो. त्यानंतर आम्ही पाहिलं, की रस्त्याच्या कडेला असलेलं कोणीतरी आम्हाला हात दाखवून त्याच्या गाडीत यायला सांगत होतं. तो आपला एक बांधवच होता आणि अधिवेशन संपल्यावर तोही घरी चालला होता. पण तो एकटाच आमच्यासाठी थांबला नव्हता, तर अधिवेशनासाठी स्वीडनहून आलेले आणखी पाच भाऊबहीणसुद्धा आमच्यासाठी थांबले होते. त्या बहिणींनी आम्हाला घट्ट मिठी मारली. त्या क्षणी त्याचीच तर आम्हाला सगळयात जास्त गरज होती! ‘आम्ही ठीक आहोत’ असं आम्ही त्यांना सांगितलं. पण ते आम्हाला एकटं सोडायला तयार नव्हते. ॲम्ब्यूलेन्स येईपर्यंत आणि आम्हाला प्रथमोपचार मिळेपर्यंत ते आमच्यासोबतच थांबले. या कठीण प्रसंगात पावलोपावली आम्ही यहोवाचं प्रेम अनुभवलं. यामुळे भाऊबहिणींवरचं आमचं प्रेम आणखी वाढलं. आणि यहोवाबद्दलसुद्धा मनात प्रेम आणि कृतज्ञता दाटून आली.” तुम्हाला असा एखादा प्रसंग आठवतो का जेव्हा तुम्हाला मदतीची खूप गरज होती आणि भाऊबहिणींनी आपुलकीने ती केली?
१६ आपण एकमेकांना आपुलकी दाखवतो तेव्हा किती चांगले परिणाम घडून येतात याचा विचार करा. संकटाच्या काळात आपण आपल्या भाऊबहिणींचं सांत्वन करतो. मंडळीतली एकता वाढते आणि सगळे आनंदाने यहोवाची सेवा करू शकतात. आपण खरोखर येशूचे शिष्य आहोत हे दिसून येतं. आणि हीच गोष्ट चांगल्या मनाच्या लोकांना खऱ्या उपासनेकडे आकर्षित करते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, “जो खूप करुणामय असा पिता आहे, आणि सगळ्या प्रकारच्या सांत्वनाचा देव आहे” त्याची आपण स्तुती करतो. (२ करिंथ. १:३) त्यामुळे भाऊबहिणींनो, आपण सगळे एकमेकांना आपुलकी दाखवून आपल्यातलं प्रेम वाढवत राहू या!
बायबलमधल्या व्यक्तींचं वेबसाईटवरचं कार्ड
योनाथान
बायबल कार्ड २३
जमा करा आणि शिका
योनाथान
तो कोण होता? योनाथान शौलचा मुलगा आणि राजपदाचा वारस होता. दावीदपेक्षा जवळपास ३० वर्षांनी मोठा असूनही त्याने देवाच्या निवडलेल्या राजाला, दावीदला पाठिंबा दिला. (१ शमुवेल २३:१५-१८) योनाथानचे वडील शौल यांना दावीदचा खूप हेवा वाटायचा. पण असं असूनही आपला जीव धोक्यात घालून योनाथानने दावीदचं संरक्षण केलं. (१ शमुवेल २०:१-४२) योनाथानच्या उदाहरणातून आपल्याला नम्रता शिकायला मिळते. एखाद्याला जेव्हा देवाकडून चांगल्या गोष्टी मिळतात तेव्हा आपल्याला त्यांच्याबद्दल आनंद वाटला पाहिजे.
प्रश्न
१. योनाथान ․․․․․. याचा सगळ्यात मोठा मुलगा होता
२. खरं की खोटं ते सांगा. योनाथाच्या वडिलांनी त्याच्यावर भाला फेकून मारला.
३. योनाथानचं खासकरून कोणावर प्रेम होतं आणि का?
उत्तरं
१. शौल राजा.—१ शमुवेल १४:४७, ४९.
२. खरं.—१ शमुवेल २०:३३.
३. दावीद. दावीद गल्याथशी लढला तेव्हा योनाथानने त्याचं धैर्य आणि यहोवाबद्दल असलेलं त्याचं प्रेम पाहिलं.—१ शमुवेल १७:१–१८:४.
[समयरेषा]
इ.स.पू. ४०२६ मध्ये आदामला बनवण्यात आलं
इ.स.पू. ११३८ च्या आसपास जन्म
इ.स. १
इ.स. ९८ मध्ये बायबलचं शेवटचं पुस्तक लिहिण्यात आलं
[नकाशा]
त्याने गेबा आणि मिखमाश इथे पलिष्टी लोकांना हरवलं
यरुशलेम
गेबा
मिखमाश
अध्याय २३
तो एका महाकाय योद्ध्याशी लढला
“सद्गुणी स्त्री”
बवाज रूथशी लग्न करतो. त्यानंतर बायबल सांगतं, की “परमेश्वराच्या दयेने तिच्या पोटी गर्भ राहून तिला पुत्र झाला.” नातू झाल्याबद्दल बेथलेहमच्या स्त्रिया नामीचं अभिनंदन करतात. तसंच, रूथ नामीला सात पुत्रांहून अधिक आहे असं म्हणून त्या रूथची प्रशंसा करतात. पुढं, रूथच्या याच मुलाच्या वंशात इस्राएलचा थोर राजा दावीद याचा जन्म होतो. (रूथ ४:११-२२) आणि दाविदाच्या वंशात पुढं येशू ख्रिस्ताचा जन्म होतो.—मत्त. १:१.
[तळटीप]
येशूच्या वंशावळीत ज्या पाच स्त्रियांचा उल्लेख आहे, त्यांपैकी रूथही एक आहे. त्या वंशावळीत उल्लेख केलेली आणखी एक स्त्री म्हणजे राहाब, जी बवाजाची आई होती. (मत्त. १:३, ५, ६, १६) रूथप्रमाणेच तीसुद्धा इस्राएली नव्हती.
टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६.४ १३
दावीद विरुद्ध गल्याथ—हे खरोखर घडलं होतं का?
काही लोक विचार करतील की, बायबलमधील दावीद आणि गल्याथाचा अहवाल, खरोखरचा आहे की फक्त एक कथा. या आधीचा लेख वाचताना तुमच्या मनातही अशी शंका आली का? जर आली असेल तर पुढील तीन प्रश्नांवर विचार करा.
१ | एका माणसाची उंची साधारण साडे नऊ फूट असू शकते का?
बायबलमध्ये म्हटलं आहे की गल्याथाची उंची “नऊ फुटापेक्षा जास्त होती.” (१ शमुवेल १७:४, ईझी-टू-रिड-व्हर्शन) आणखी एका बायबलच्या भाषांतरात म्हटलं आहे की, त्याची उंची ९ फूट ६ इंच होती. काही लोक म्हणतात गल्याथ इतका उंच असूच शकत नाही. पण विचार करा आधुनिक काळात सर्वात उंच माणसाची उंची ८ फूट, ११ इंच असल्याची नोंद आहे. मग गल्याथ त्याच्यापेक्षा ६ इंच (१५ सेंटीमिटर) उंच असू शकत नव्हता का? तो रेफाईम वंशातला होता आणि या वंशाचे लोक त्यांच्या मोठ्या उंचीसाठी प्रसिद्ध होते. इजिप्तमध्ये सापडलेल्या, १३ व्या शतकातील एका दस्तऐवजात, कनान क्षेत्रातील काही योद्धे आठ फुटाहून उंच असल्याचा उल्लेख आढळतो. तेव्हा गल्याथ इतका उंच असणं असामान्य वाटत असलं तरी ते अशक्य नव्हतं.
२ | दावीद खराखुरा व्यक्ती होता का?
एके काळी जाणकारांच्या मते, राजा दावीद फक्त एक काल्पनिक पात्र होतं. पण ते आज असा दावा करू शकत नाहीत. पुरातत्व शास्त्रज्ञांना जुन्या काळातील काही लिखाणं सापडली आहेत ज्यावर “दाविदाचं घराणं” असा उल्लेख आहे. इतकंच नव्हे तर येशू ख्रिस्ताने देखील दावीद खरा व्यक्ती असल्याचं म्हटलं. (मत्तय १२:३; २२:४३-४५) येशू हाच मसीहा आहे याच्या ओळखीचा पुरावा दोन वंशावळीतून मिळतो. दोन्ही वंशावळीत तो दाविदाचा वंशज असल्याचं स्पष्ट होतं. (मत्तय १:६-१६; लूक ३:२३-३१) नक्कीच दावीद हा खराखुरा व्यक्ती होता.
३ | दावीद आणि गल्याथाची लढाई जिथं घडली ती जागा अस्तित्वात आहे का?
बायबलमध्ये म्हटलं आहे की ही लढाई एलाच्या खोऱ्यात झाली. पण बायबलमध्ये या जागेविषयी अजून स्पष्ट माहिती दिली आहे. तिथं असंही म्हटलं आहे की, पलिष्टी लोकांनी सोखो आणि अजेका या शहरांच्या मध्ये असलेल्या जागी तळ ठोकला होता. इस्राएली सैन्याने खोऱ्याच्या विरुद्ध दिशेला डोंगराच्या उतारावर तळ ठोकला होता. या जागा खऱ्या आहेत का?
या परिसराला भेट देणाऱ्या एका पर्यटकाने काय म्हटलं त्याकडे लक्ष द्या: “आमचा टूर गाईड धार्मिक व्यक्ती नव्हता. तो आम्हाला एलाच्या खोऱ्यात घेऊन गेला. आम्ही एका डोंगराच्या माथ्यावर गेलो जिथून आम्हाला संपूर्ण खोरे किंवा दरी दिसत होती. आम्ही त्या दरीकडे पाहात असताना, त्या टूर गाईडने आम्हाला १ शमुवेल १७:१-३ ही वचनं वाचायला सांगितली. त्यानंतर त्या दरीकडे बोट दाखवत तो म्हणाला, ‘तुमच्या डावीकडे सोखो शहराचे अवशेष आहेत,’ मग तो वळून म्हणाला, ‘त्या तिकडे, उजवीकडे, अजेका शहराचे अवशेष आहेत. पलिष्टी लोकांनी या दोन शहरांच्या मध्ये येऊन तळ ठोकला, म्हणजे समोरच्या डोंगराच्या पायथ्याशी. याचा अर्थ, आपण जिथं उभे आहोत तिथं इस्राएली सैन्याचा तळ होता.’ मी जिथं उभा होतो तिथंच शौल आणि दावीद असतील असा विचार त्या वेळी माझ्या मनात आला. मग आम्ही त्या दरीत उतरलो आणि तिथं आम्हाला एक दगडांनी, भरलेली सुकलेली नदी पार करावी लागली. लगेच माझ्या डोळ्यासमोर, दावीद पाच गुळगुळीत दगड उचलण्यासाठी खाली वाकत असल्याचं चित्र उभं राहिलं. त्यातील एका दगडानेच गल्याथ मारला गेला होता.” या पर्यटकासारखेच अनेक पर्यटक, बायबलमधील दिलेल्या अचूक आणि खऱ्या अहवालाने थक्क होतात.
हा ऐतिहासिक अहवाल खरा आहे यावर संशय घेण्याचं कोणतंच कारण उरत नाही. त्यात खऱ्या लोकांचा आणि खऱ्या ठिकाणांचा समावेश आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा अहवाल देवाच्या प्रेरित वचनाचा भाग आहे. म्हणजेच, तो अशा देवाकडून आहे जो “कधीही असत्य बोलत नाही.”—तीत १:२, सुबोधभाषांतर; २ तीमथ्य ३:१६.
टेहळणी बुरूज११ ९/१ २७ ¶१–२८ ¶१
यहोवाच्या मनासारखा असलेला एक माणूस
आपल्या वडिलांच्या कळपाची जबाबदारीने काळजी घेणारा एक तरुण मेंढपाळ, अशा प्रकारे आपल्याला दावीदची पहिल्यांदा ओळख होते. कळपाची काळजी घेताना तो रात्रंदिवस एकटाच रानात असायचा. त्याचं ते जीवन कसं असेल याची कल्पना करा.
दावीदचं कुटुंब बेथलेहेममध्ये राहायचं. यहूदाच्या डोंगराळ भागात वसलेलं हे छोटंसं गाव होतं. बेथलेहेमच्या आसपासची जमीन सुपीक असल्यामुळे तिथे भरघोस पीक उगायचं. तिथल्या उतारांवर आणि खोऱ्यांमध्ये द्राक्षमळे तसंच फळांच्या आणि जैतुनांच्या बागा असायच्या. दावीदच्या दिवसांत, ज्या शेतांमध्ये काही उगवलं जायचं नाही तिथे सहसा कळपांना चरायला नेलं जायचं. तिथूनच थोडं पुढे यहूदाचं ओसाड रान होतं.
मेंढपाळाचं काम करणं काही सोपं नव्हतं. त्यात बरेच धोके असायचे. या डोंगराळ भागातच एकदा एका सिंहाने आणि एकदा एका अस्वालाने दावीदच्या कळपावर हल्ला करून त्यातल्या एका मेंढराला पळवून न्यायचा प्रयत्न केला. पण हा धाडसी तरुण त्या हिंस्र प्राण्यांच्या मागे धावला, त्याने त्यांना ठार मारलं आणि त्यांच्या तोंडांतून आपल्या मेंढराला सोडवलं. (१ शमुवेल १७:३४-३६) कदाचित त्याच्या आयुष्यातल्या याच काळात तो गोफण चालवायला शिकला असेल. दावीद राहत होता तिथून जवळच बन्यामीन वंशाच्या लोकांचा प्रदेश होता. या वंशातल्या प्रत्येक माणसाच्या “गोफणीचा नेम इतका अचूक होता, की तो केसभरही चुकायचा नाही.” दावीदचा नेमसुद्धा तितकाच अचूक लागायचा.—शास्ते २०:१४-१६; १ शमुवेल १७:४९.
एकटा असला तरी वेळेचा चांगला उपयोग
तसं पाहिलं तर मेंढपाळाचं काम खूप कंटाळवाणं असू शकतं. कारण मेंढपाळ सहसा एखाद्या शांत ठिकाणी एकटाच आपल्या मेंढरांची राखण करत बसायचा. पण असं असलं, तरी दावीद कंटाळला नाही, कारण त्याने नेहमी काही ना काही करण्यात स्वतःला व्यस्त ठेवलं. त्या शांत वातावरणात यहोवाबद्दल आणि त्याने निर्माण केलेल्या गोष्टींबद्दल मनन करायच्या बऱ्याच संधी त्याच्याकडे होत्या. असं दिसतं, की पुढे त्याने आपल्या स्तोत्रांत ज्या गहन गोष्टींचा उल्लेख केला, त्यांवर त्याने याच काळात मनन केलं असावं. त्याने कदाचित बऱ्याच गोष्टींवर विचार केला असेल. यहोवाने ‘आपल्या हातांनी निर्माण केलेल्या’ गोष्टी, म्हणजे मानव, सूर्य, चंद्र आणि तारे का बनवले यावर त्याने विचार केला असेल. बेथलेहेमच्या आसपासच्या रानात असतानाच त्याने तिथली सुपीक जमीन, मेंढरं, गुरं, पक्षी आणि “सर्व जंगली पशू” यांवर खोलवर विचार केला असेल?”—स्तोत्र ८:३-९; १९:१-६.
दावीदने मेंढपाळ म्हणून जे काम केलं त्यामुळे त्याला एक गोष्ट खूप चांगल्या प्रकारे समजली. ती म्हणजे यहोवा आपल्या विश्वासू सेवकांची खूप कोमलतेने काळजी घेतो. म्हणूनच त्याने आपल्या स्तोत्रात असं म्हटलं: “यहोवा माझा मेंढपाळ आहे. मला कशाचीच कमी नाही. तो मला हिरव्यागार कुरणांत विसावा घेऊ देतो; भरपूर पाणी असलेल्या ठिकाणी, तो मला विश्रांतीसाठी नेतो. मी काळोख्या दरीतून चालत असलो, तरी मला कशाचीही भीती वाटत नाही, कारण तू माझ्यासोबत असतोस; तुझ्या काठीने आणि आकड्याने मला सुरक्षित वाटतं.”—स्तोत्र २३:१, २, ४.
तरुण भावांनो, तुम्ही इतरांचा भरवसा कसा मिळवू शकता?
६ दावीदबद्दल काही लोकांना असं वाटत होतं, की तो लहान आहे आणि खूप बेजबाबदार आहे. उदाहरणार्थ, दावीद गल्याथशी लढायला स्वतःहून पुढे आला तेव्हा शौल राजाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. आणि असं म्हटलं: “तू अजून लहान आहेस.” (१ शमु. १७:३१-३३) याआधी दावीदच्या स्वतःच्या भावानेसुद्धा त्याच्यावर बेजबाबदारपणे वागण्याचा आरोप लावला होता. (१ शमु. १७:२६-३०) पण यहोवाला माहीत होतं, की दावीद पोरकट किंवा बेजबाबदार नाही. आणि दावीद यहोवाच्या मदतीनेच गल्याथला ठार मारू शकला.—१ शमु. १७:४५, ४८-५१.
इन्साइट “अलीयाब” क्र. ४ ¶१
अलीयाब
४. दावीद राजाचे वडील इशाय यांचा सगळ्यात मोठा मुलगा. (१शमु १७:१३; १इत २:१३) त्याचं एकंदर स्वरूप आणि त्याची उंची बघून शमुवेल इतका प्रभावित झाला, की तोच देवाने निवडलेला राजा आहे असं त्याला वाटलं. पण यहोवाने अलीयाबच्या ऐवजी दावीदला राजा म्हणून निवडलं होतं.—१शमु १६:६-१२.
तरुण भावांनो, तुम्ही इतरांचा भरवसा कसा मिळवू शकता?
तरुण भावांनो तुमच्याकडे शक्ती आहे, स्फूर्ती आहे. (नीति. २०:२९) त्यामुळे तुम्ही मंडळीसाठी खूप काही करू शकता. तुम्ही कदाचित विचार कराल, की ‘सहायक सेवक बनून मी भाऊबहिणींना मदत करू शकतो.’ पण ही जबाबदारी पेलण्यासाठी तुम्ही अजून लहान आहात, तुमच्याकडे अनुभव नाही असं कदाचित काहींना वाटत असेल. असं असलं, तरी तुम्ही मंडळीत इतरांचा भरवसा आणि आदर मिळवण्यासाठी आत्ताही बरंच काही करू शकता.
२ या लेखात आपण दावीद राजाच्या जीवनात घडलेल्या काही घटनांबद्दल पाहणार आहोत. तसंच, यहूदाचे दोन राजे, म्हणजे राजा आसा आणि राजा यहोशाफाट यांच्या जीवनात घडलेल्या काही घटनांबद्दलही पाहणार आहोत. याशिवाय, त्या तिघांसमोर कोणत्या समस्या आल्या, त्यांचा त्यांनी कसा सामना केला आणि त्यांच्या उदाहरणांतून आज तरुण भाऊ काय शिकू शकतात हेसुद्धा या लेखात आपण पाहणार आहोत.
दावीद राजाकडून काय शिकता येईल?
३ तरुण असताना दावीद अशी काही कौशल्यं शिकला ज्यांमुळे इतरांना त्याचा फायदा झाला. यहोवासोबत त्याची चांगली मैत्री तर होतीच, पण एक चांगला संगीतकार बनण्यासाठीसुद्धा त्याने खूप मेहनत घेतली. आणि नंतर त्याने या कौशल्याचा वापर देवाचा नियुक्त राजा शौल याचं मन शांत करण्यासाठी केला. (१ शमु. १६:१६, २३) तरुण भावांनो तुमच्याकडेही असं काही कौशल्य आहे का, ज्याचा मंडळीतल्या भाऊबहिणींना उपयोग होऊ शकतो? आम्हाला माहीत आहे, तुमच्यापैकी अनेकांकडे अशी कौशल्यं आहेत. जसं की, मोबाईल आणि कंप्यूटर कसा वापरायचा याचं तुम्हाला चांगलं ज्ञान आहे. या कौशल्यांचा वापर तुम्ही मंडळीतल्या काही वयस्कर भाऊबहिणींना मदत करण्यासाठी करू शकता. वैयक्तिक अभ्यास किंवा सभांची तयारी करण्यासाठी ते मोबाईल किंवा टॅबचा चांगल्या प्रकारे वापर कसा करू शकतात हे तुम्ही त्यांना शिकवू शकता.
४ दावीदने आपल्या कामातून दाखवलं, की तो एक जबाबदार आणि भरवशालायक व्यक्ती आहे. उदाहरणार्थ, तरुण असताना आपल्या वडिलांच्या मेंढरांची काळजी घेण्यासाठी तो खूप मेहनत घ्यायचा. हे काम सोपं नव्हतं. त्यात धोकेसुद्धा होते. याबद्दल शौल राजाला त्याने एकदा असं सांगतिलं: “तुमचा हा सेवक आपल्या वडिलांची मेंढरं चारायचा, तेव्हा एकदा एक सिंह कळपातलं मेंढरू घेऊन गेला; आणि आणखी एकदा एक अस्वल कळपातलं मेंढरू घेऊन गेलं. तेव्हा मी त्यांच्या मागे जाऊन त्यांना मारलं आणि त्यांच्या तोंडातून मेंढरांना सोडवलं.” (१ शमु. १७:३४, ३५) दावीदला माहीत होतं, की मेंढरांची काळजी घेण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. आणि म्हणून त्यांचं रक्षण करण्यासाठी तो खूप धैर्याने लढला. दावीदप्रमाणेच तरुण भाऊसुद्धा दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मेहनत घेऊ शकतात.
५ दावीदने तरुणपणापासूनच यहोवासोबत जवळची मैत्री केली होती. दावीदसाठी देवासोबतची ही मैत्री त्याच्या धैर्यापेक्षा आणि वीणा वाजवण्याच्या कौशल्यापेक्षा खूप जास्त महत्त्वाची होती. त्याच्यासाठी यहोवा फक्त एक देव नव्हता, तर सगळ्यात जवळचा मित्रही होता. (स्तोत्र २५:१४ वाचा.) तरुण भावांनो, तुम्हीसुद्धा यहोवासोबत आपली मैत्री घट्ट करू शकता. आणि ही तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असली पाहिजे. यामुळे मंडळीत तुम्हाला आणखी जबाबदाऱ्या मिळू शकतात.
६ दावीदबद्दल काही लोकांना असं वाटत होतं, की तो लहान आहे आणि खूप बेजबाबदार आहे. उदाहरणार्थ, दावीद गल्याथशी लढायला स्वतःहून पुढे आला तेव्हा शौल राजाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. आणि असं म्हटलं: “तू अजून लहान आहेस.” (१ शमु. १७:३१-३३) याआधी दावीदच्या स्वतःच्या भावानेसुद्धा त्याच्यावर बेजबाबदारपणे वागण्याचा आरोप लावला होता. (१ शमु. १७:२६-३०) पण यहोवाला माहीत होतं, की दावीद पोरकट किंवा बेजबाबदार नाही. आणि दावीद यहोवाच्या मदतीनेच गल्याथला ठार मारू शकला.—१ शमु. १७:४५, ४८-५१.
७ तरुण भावांनो दावीदच्या उदाहरणातून तुम्ही काय शिकू शकता? तुम्ही धीर दाखवायला शिकू शकता. कारण ज्यांनी तुम्हाला लहानपणापासून पाहिलं आहे त्यांना कदाचित ही गोष्ट स्वीकारायला थोडा वेळ लागू शकतो, की तुम्ही आता मोठे झाला आहात. पण तुम्ही याची खातरी बाळगू शकता की यहोवा तुमचं फक्त बाहेरचं रूप पाहत नाही तर आतून तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती आहात आणि तुम्ही काय करू शकता हे तो पाहतो. (१ शमु. १६:७) दावीदच्या उदाहरणातून तुम्ही आणखी एक गोष्ट शिकू शकता. ती म्हणजे, यहोवासोबतची आपली मैत्री आणखी घट्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. दावीदने यहोवासोबतची आपली मैत्री घट्ट करण्यासाठी त्याने निर्माण केलेल्या सृष्टीचं जवळून निरीक्षण केलं. सृष्टीतून निर्माणकर्त्याबद्दल काय शिकायला मिळतं यावर त्याने मनन केलं. (स्तो. ८:३, ४; १३९:१४; रोम. १:२०) याशिवाय दावीदप्रमाणेच तुम्ही मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करू शकता. उदाहरणार्थ, यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे शाळेत कुणी तुमची थट्टा करत असेल तर तुम्ही काय करू शकता? या समस्यांचा सामना करण्यासाठी प्रार्थनेत तुम्ही यहोवाला मदत मागू शकता. तसंच बायबलमध्ये, आपल्या प्रकाशमनांध्ये आणि वेगवेगळ्या व्हिडिओंमध्ये याबद्दल जे व्यावहारिक सल्ले दिले आहेत ते तुम्ही लागू करू शकता. समोर येणारी प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी यहोवा तुम्हाला कशी मदत करतो हे जेव्हा तुम्ही स्वतः पाहाल तेव्हा त्याच्यावरचा तुमचा भरवसा आणखी वाढेल. इतकंच नाही, तर तुम्ही यहोवावर भरवसा ठेवता हे जेव्हा इतर लोक पाहतील तेव्हा तेही तुमच्यावर भरवसा ठेवतील.
८ दावीदला आणखी एका समस्येचा सामना करावा लागला. यहूदाचा राजा म्हणून त्याचा अभिषेक करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात राज्य करायला सुरुवात करण्यासाठी त्याला बरीच वर्षं थांबावं लागलं. (१ शमु. १६:१३; २ शमु. २:३, ४) या काळादरम्यान त्याला धीर धरायला कोणत्या गोष्टीने मदत केली? अशा वेळी निराश होण्याऐवजी दावीदला जे काही करणं शक्य होतं ते त्याने केलं. उदाहरणार्थ, शौल राजापासून आपला जीव वाचवण्यासाठी दावीद पलिष्ट्यांच्या प्रदेशात राहत होता, तेव्हा त्याने त्या वेळेचा खूप चांगला उपयोग केला. इस्राएलच्या शत्रूंशी लढण्यासाठी त्याने त्या वेळेचा उपयोग केला. असं करून त्याने यहूदाच्या सीमांचं रक्षण केलं.—१ शमु. २७:१-१२.
९ तरुण भावांनो, दावीदप्रमाणे तुम्ही काय करू शकता? यहोवाची सेवा करण्यासाठी आणि भाऊबहिणींना मदत करण्यासाठी मिळेल त्या संधीचा उपयोग करा. रिकार्डो नावाच्या एका भावाने हेच केलं. तो दहा-बारा वर्षांचा होता तेव्हापासूनच नियमित पायनियर बनण्याचं स्वप्न पाहत होता. पण त्याने थोडं थांबावं असं मंडळीतल्या वडिलांनी म्हटलं. पण त्यामुळे तो निराश झाला नाही किंवा चिडला नाही. उलट त्याने आपलं सेवाकार्य वाढवलं. तो म्हणतो: “आज मी त्या गोष्टीचा विचार करतो तेव्हा मला जाणवतं, की मला खरंच प्रगती करायची गरज होती आणि मी ती करू शकत होतो. संदेशात आवड दाखवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची मी परत भेट घ्यायचो आणि त्यासाठी मी चांगली तयारी करून जायचो. त्यामुळे पहिल्यांदाच मला एक बायबल अभ्यास मिळाला. सेवाकार्यात जास्तीत जास्त सहभाग घेतल्यामुळे मी आणखी धैर्याने प्रचार करू लागलो.” आज रिकार्डो मंडळीत एक चांगला पायनियर आणि सहायक सेवक म्हणून काम करत आहे.
१० दावीदच्या जीवनातल्या आणखी एका घटनेचा विचार करा. शौलपासून आपला जीव वाचवण्यासाठी दावीद आणि त्याची माणसं पलिष्ट्यांच्या प्रदेशात राहत होती. त्या वेळी ते आपल्या बायका-मुलांना मागे सोडून एका युद्धावर गेले होते. तेव्हा काही शत्रूंनी त्यांची घरंदारं लुटली आणि त्यांच्या बायका-मुलांना बंदी बनवून नेलं. दावीदला हे समजलं तेव्हा तो असा विचार करू शकला असता, की ‘मी अनेक युद्धं लढली आहेत आणि मी एक शूर योद्धा आहे. त्यामुळे मी सहज त्यांना शत्रूंच्या हातून सोडवू शकतो.’ पण दावीदने तसं केलं नाही. त्याने यहोवाकडे मदत मागितली. अब्याथार नावाच्या याजकाच्या मदतीने त्याने यहोवाला विचारलं, की “मी लुटारूंच्या टोळीचा पाठलाग करू का?” यहोवाने त्याला तसं करायची परवानगी दिली आणि आपल्या लोकांना सोडवून आणण्यात तो यशस्वी होईल अशी शाश्वतीही दिली. (१ शमु. ३०:७-१०) तरुण भावांनो, या घटनेतून तुम्ही काय शिकू शकता?
११ निर्णय घेण्याआधी इतरांचा सल्ला घ्या. आपल्या आईवडिलांशी बोला. तुम्ही मंडळीतल्या वडिलांचाही सल्ला घेऊ शकता. यहोवाला या वडिलांवर भरवसा आहे. त्यामुळे तुम्हीही त्यांच्यावर भरवसा ठेवू शकता. यहोवाच्या नजरेत ते मंडळीसाठी “भेटी” आहेत. (इफिस. ४:८) त्यांच्या विश्वासाचं अनुकरण केल्यामुळे आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्यांचं पालन केल्यामुळे तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकाल. आता आपण आणखी एका राजाबद्दल पाहू या. तो म्हणजे राजा आसा.
अध्याय २४
रागाने भडकलेल्या दोन माणसांचा तिला सामना करावा लागला
ती समंजसपणे वागली
६ पण काहींना कदाचित प्रश्न पडेल, की अशा बुद्धिमान व समंजस तरुणीनं नाबालासारख्या वाईट माणसाशी लग्न का केलं असावं? आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की बायबलच्या काळातही सहसा आईवडीलच आपल्या मुलांची लग्नं ठरवायचे. निदान, लग्नाला त्यांची संमती असणं खूप महत्त्वाचं मानलं जायचं. अबीगईलच्या आईवडिलांनी नाबालाची श्रीमंती, त्याचा दबदबा पाहून या लग्नाला संमती दिली असावी का, की त्यांनी स्वतः आपल्या मुलीचं त्याच्याशी लग्न लावून दिलं असावं? किंवा मग, त्यांच्या गरिबीनं त्यांना असं करण्यास भाग पाडलं असावं? कारण कोणतंही असो; नाबालाच्या श्रीमंतीनं त्याला एक चांगला पती बनवलं नाही, हे मात्र खरं.
एक बुद्धिमान स्त्री अरिष्ट टाळते
तोपर्यंत, कर्मेलात लोकर कातरण्याचे काम सुरू झाले होते. कापणीचा हंगाम जसा शेतकऱ्यांसाठी सणासारखा होता तसा हाही प्रसंग सणासारखाच होता. शिवाय अशावेळी मेंढपाळ, त्यांच्याकरता काम केलेल्यांना सढळ हाताने मदत करीत असत. म्हणून दाविदाने, नाबालाच्या कळपासाठी त्याने केलेल्या सेवेच्या मोबदल्यात अन्नासाठी आपल्या दहा माणसांना अकारणच त्याच्याकडे कर्मेल शहरी पाठवले नव्हते.—१ शमुवेल २५:४-९.
ती समंजसपणे वागली
९ नाबाल हा मावोन नगरात राहत होता; पण, जवळच असलेल्या कर्मेल या ठिकाणी तो आपला व्यवसाय चालवायचा. त्याच्या मालकीची ३,००० मेंढरं होती आणि तिथं त्याची स्वतःची जमीनसुद्धा असावी. ही नगरं हिरव्यागार पठारांवर वसलेली असल्यामुळं मेंढरांचं पालन करण्यासाठी अगदी योग्य होती. पण, नगरांच्या चहूबाजूला ओसाड प्रदेश होता. दक्षिणेकडे पारानाचं दूरवर पसरलेलं मोठं अरण्य होतं; तर पूर्वेकडे, क्षार समुद्राच्या (मृत समुद्राच्या) आसपास ओसाड जमीन असून दऱ्याखोऱ्या व गुहा होत्या. अशा या खडतर परिस्थितीत दावीद आणि त्याची माणसं राहत होती; पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना नक्कीच शिकार करावी लागत असेल आणि बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागत असेल. श्रीमंत नाबालाच्या तरुण मेंढपाळांशी त्यांची अनेकदा गाठ पडायची.
१० मग, हे योद्धे नाबालाच्या मेढपाळांशी कसे वागायचे? खरंतर, जगण्यासाठी धडपड करणारे हे योद्धे अधूनमधून कळपातल्या एखाद्या मेंढरावर सहज हात मारू शकले असते. पण, या मेहनती योद्ध्यांनी कधीच असं केलं नाही. उलट, त्यांनी नाबालाच्या कळपाचं आणि त्याच्या चाकरांचं संरक्षण केलं. (१ शमुवेल २५:१५, १६ वाचा.) त्या काळी, मेंढरांच्या आणि मेंढपाळांच्या जिवाला खूप धोका असायचा. कारण त्या प्रदेशात भरपूर हिंस्र प्राणी होते; शिवाय, इस्राएलची दक्षिण सरहद्द अगदी जवळ असल्यामुळं बाहेरून येणाऱ्या लुटारूंच्या टोळ्यांकडून नेहमीच हल्ले व्हायचे.
इन्साइट “जीव” ¶४५
जीव
“जीव सांभाळून ठेवेल.” दावीद नाबालचा बदला घ्यायला निघाला तेव्हा अबीगईलने त्याला रोखण्यासाठी त्याच्यापुढे गयावया केली आणि त्याला रक्तदोषी होण्यापासून वाचवलं. ती त्याला म्हणाली: “माझ्या प्रभू! तुमचा जीव घेण्यासाठी कोणी तुमच्या मागे लागला, तर तुमचा देव यहोवा तुमच्या जिवाचं रक्षण करेल; मौल्यवान वस्तू जशा थैलीत सांभाळून ठेवल्या जातात, तसा तो तुमचा जीव सांभाळून ठेवेल. पण तुमच्या शत्रूंचे जीव मात्र तो गोफणीतून भिरकावलेल्या दगडांप्रमाणे फेकून देईल.” (१शमु २५:२९-३३) एखादी मौल्यवान वस्तू खराब होऊ नये म्हणून ती कशात तरी गुंडाळून जपून ठेवली जाते. अगदी तसाच दावीदचा जीवसुद्दा जिवंत देवाच्या हातात अगदी सुरक्षित होता. यहोवा दावीदच्या शत्रूंचा नाश करणार होता, पण त्याला मात्र वाचवणार होता. यासाठी दावीदला स्वतःवर नाही तर यहोवावर भरवसा ठेवावा लागणार होता.
टेहळणी बुरूज९२ ५/१ ११ ¶३
यहोवाने शिकवल्याप्रमाणे चालत राहा
३ देवावर आपले अवलंबत्व आहे हे ओळखणाऱ्या दावीद राजाचा देवाकडून शिक्षण मिळवण्याचा व त्याच्या ‘सत्य मार्गाने चालण्याचा’ निश्चय होता. (स्तोत्रसंहिता ८६:११) दाविदाला एकदा सूचना मिळाली की, त्याने देवाच्या दृष्टीने रक्तदोषी होण्याचे टाळले तर त्याचा ‘जीव . . . परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] याजपाशी जिवंतांच्या समूहात बांधलेला राहील.’ (१ शमुवेल २५:२१, २२, २५, २९) एखादी मूल्यवान वस्तु सुरक्षित तसेच राखून ठेवण्यासाठी जसे लोक गुंडाळून ठेवतात, तसे दाविदाचे जीवन देव सुरक्षित व राखून ठेवणार होता. या सूज्ञ सल्ल्याचा स्वीकार करून दाविद आपल्या व्यक्तीगत प्रयत्नाद्वारे स्वतःचे जीवन वाचविण्याचा प्रयत्न केला नाही, तर जीवन ज्याच्या मालकीचे आहे त्याच्यावर पूर्ण भिस्त दाखवली. “जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील; तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत.”—स्तोत्रसंहिता १६:११.
टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१५ १/१ १२-१३
समजबुद्धी दाखवल्याने राग शांत होतो
कॉलेजच्या एका बास्केटबॉल कोचला त्याच्या तापट स्वभावामुळे कामावरून काढण्यात येते.
हट्ट पुरवला नाही म्हणून मूल रागाने हात-पाय आपटू लागते.
मुलाच्या रूममध्ये पसारा पाहून आईचा पारा चढतो आणि दोघांमध्ये आरडाओरड सुरू होते.
आपण अनेकांना रागात असल्याचे पाहिले असेल. आपल्याला स्वतःलाही कधी ना कधी राग आलाच असेल. राग येणे ही चुकीची गोष्ट आहे हे आपल्याला माहीत असते; तरीसुद्धा, बऱ्याचदा अशा काही गोष्टी घडतात ज्यांमुळे राग येतो. खासकरून, एखादी व्यक्ती आपल्याशी चुकीचे वागते तेव्हा आपल्याला लगेच राग येतो. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या एका लेखात तर असेही म्हटले आहे की, “राग येणे ही एक स्वाभाविक आणि चांगली गोष्ट आहे.”
हे खरे आहे असे आपल्याला वाटू शकते; खासकरून, ख्रिस्ती प्रेषित पौल याने देवाच्या सांगण्यावरून जे लिहिले त्याचा आपण विचार करतो तेव्हा. पौलाने म्हटले: “तुम्ही रागावा, परंतु पाप करू नका.” (इफिसकर ४:२६) त्याला हेच म्हणायचे होते, की काही वेळा लोकांना राग येऊ शकतो. तर मग प्रश्न आहे, की आपण राग व्यक्त केला पाहिजे, की तो शांत केला पाहिजे?
राग व्यक्त करावा का?
पौलाने वरील सल्ला दिला तेव्हा त्याच्या मनात कदाचित स्तोत्रकर्त्याचे शब्द असावेत: “जर तुम्हाला कसला त्रास होत असेल तर तुम्ही रागवा. पण पाप करू नका.” (स्तोत्र ४:४, ईझी-टू-रीड व्हर्शन) पण, पौलाने तो सल्ला का दिला? त्याचे स्पष्टीकरण तो पुढे देतो: “सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही, अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवोत.” (इफिसकर ४:३१) पौल मुळात ख्रिश्चनांना असा सल्ला देत होता, की त्यांनी राग व्यक्त करू नये. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या लेखात पुढे जे म्हटले आहे ते लक्षात घेण्याजोगे आहे: “राग व्यक्त केल्यामुळे खरंतर व्यक्ती आणखी रागिष्ट व हिंसक बनते आणि त्यामुळे काहीच साध्य होत नाही.”
तर मग प्रश्न आहे, की आपण राग आणि रागामुळे होणारे वाईट परिणाम “दूर” कसे करू शकतो? प्राचीन इस्राएलच्या बुद्धिमान शलमोन राजाने लिहिले: “विवेकाने [“समजबुद्धीने,” NW] मनुष्य मंदक्रोध होतो; अपराधाची गय करणे त्याला भूषण आहे.” (नीतिसूत्रे १९:११) समजबुद्धी दाखवल्याने राग शांत कसा होऊ शकतो?
समजबुद्धी दाखवल्याने राग शांत कसा होतो?
समजबुद्धी म्हणजे परिस्थिती समजून घेणे किंवा एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जाणे. कोणी आपले मन दुखावते किंवा आपल्याला चीड आणते तेव्हा समजबुद्धी कशी मदत करू शकते?
अन्याय होत असल्याचे आपण पाहतो तेव्हा आपल्याला लगेच राग येऊ शकतो. पण, रागाच्या भरात आपण हिंसकपणे वागलो तर आपले स्वतःचे आणि इतरांचेही नुकसान होऊ शकते. ज्याप्रमाणे, आगीमुळे एखादे घर भस्म होऊ शकते, त्याचप्रमाणे रागाच्या भडक्यामुळे आपले नाव खराब होऊ शकते आणि इतरांसोबत व देवासोबत असलेला आपला नातेसंबंध बिघडू शकतो. म्हणूनच, आपल्याला राग येत असल्याचे जाणवते तेव्हा परिस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. परिस्थितीचा सर्व बाजूंनी विचार केल्यास भावनांवर नियंत्रण ठेवणे आपल्याला शक्य होईल.
शलमोनाचा पिता, दावीद राजा याने परिस्थिती समजून घेतली नसती, तर नाबाल नावाच्या एका मनुष्याच्या बाबतीत त्याने रक्तदोष ओढवून घेतला असता. दाविदाने आणि त्याच्या माणसांनी यहुदीयाच्या अरण्यात नाबालाच्या मेंढरांचे रक्षण केले होते. लोकर कातरण्याची वेळ आली तेव्हा दाविदाने नाबालाला काही अन्नसामग्री मागितली. त्यावर नाबाल म्हणाला: “माझे अन्न, माझे पाणी आणि माझ्या कातरणाऱ्यांसाठी मारलेल्या पशूंचे मांस जे कोण, कोठले, हे मला ठाऊक नाही असल्या लोकांस मी देऊ काय?” किती मोठा अपमान होता हा! दाविदाने हे ऐकले तेव्हा तो आणि त्याची ४०० माणसे नाबालाचा व त्याच्या घराण्याचा नाश करण्यास निघाली.—१ शमुवेल २५:४-१३.
नाबालाची पत्नी अबीगईलला ही गोष्ट कळली तेव्हा ती दाविदाला भेटायला गेली. दावीद व त्याची माणसे भेटल्यावर तिने त्याला वाकून नमस्कार केला आणि म्हटले: “या आपल्या दासीला बोलू द्या. आपल्या दासीचं म्हणणं ऐका!” मग, तिने दाविदाला हे समजावून सांगितले की नाबाल हा किती मूर्ख माणूस आहे; तसेच, दाविदाने जर बदला घेतला व रक्तपात केला तर पुढे त्याला पस्तावा होईल हेही तिने त्याला सांगितले.—१ शमुवेल २५:२४-३१, मराठी कॉमन लँग्वेज.
अबीगईलच्या बोलण्यातून दाविदाने असे काय समजून घेतले ज्यामुळे तणावपूर्ण प्रसंग टळला. पहिली गोष्ट म्हणजे, त्याने हे लक्षात घेतले की नाबाल मूर्ख आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, आपण जर बदला घेतला तर रक्तपात केल्याचा दोष आपल्यावर येईल हे दाविदाने ओळखले. दाविदाप्रमाणे तुम्हालासुद्धा एखाद्या गोष्टीमुळे भयंकर राग येऊ शकतो. अशा वेळी तुम्ही काय करावे? “एक दीर्घ श्वास घ्या आणि १ ते १० आकडे मोजा,” असे मेयो क्लिनिकच्या एका लेखात सुचवण्यात आले आहे. होय, समस्येचे मूळ कारण काय आहे आणि तुम्ही जे पाऊल उचलणार आहात त्याचे काय परिणाम होतील याचा थोडा थांबून विचार करा. समजबुद्धी दाखवल्यामुळे राग शांत होऊ शकतो किंवा नाहीसाही होऊ शकतो.—१ शमुवेल २५:३२-३५.
समजबुद्धी दाखवल्यामुळे अनेकांना रागावर नियंत्रण करणे शक्य झाले आहे. सेबास्टान नावाचा एक मनुष्य २३ वर्षांचा असताना पोलंडमधील एका तुरुंगात होता; त्या वेळी बायबलच्या अभ्यासामुळे त्याला रागावर आणि त्याच्या मनात ठासून भरलेल्या चुकीच्या भावनांवर मात करायला कशी मदत मिळाली हे तो सांगतो. तो म्हणतो: “आधी मी समस्या काय आहे याचा विचार करतो; मग बायबलचा सल्ला लागू करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या लक्षात आलं, की बायबल हे सगळ्यात उत्तम मार्गदर्शक आहे.”
असेच काहीसे सेट्सूओ नावाच्या मनुष्याने केले. तो म्हणतो: “पूर्वी कामाच्या ठिकाणी मला कोणी चीड आणली तर मी त्यांच्यावर खेकसायचो. पण, बायबलचा अभ्यास केल्यामुळं कोणावरही खेकसण्याआधी मी स्वतःला असं विचारतो: ‘मुळात चूक कुणाची आहे? समस्येचं कारण मीच तर नाही ना?’” सेट्सूओने स्वतःला असे प्रश्न विचारल्यामुळे, त्याला त्याच्या रागावर आणि भावनांवर नियंत्रण करणे शक्य झाले.
रागाची भावना खूप प्रबळ असू शकते, पण देवाच्या वचनातील सल्ला त्याहून प्रबळ आहे. बायबलचा सुज्ञ सल्ला लागू केल्याने आणि मदतीसाठी देवाला प्रार्थना केल्याने तुम्हीसुद्धा समजबुद्धी दाखवून आपला राग शांत करू शकता अथवा त्यावर नियंत्रण करू शकता.
अध्याय २५
त्याने आपल्या विवेकाचं ऐकून धैर्य दाखवलं
इन्साइट “अबीशय” ¶३-५
अबीशय
अबीशय हा दावीदच्या सैन्यातल्या तीस शूर योद्ध्यांचा प्रमुख होता आणि तो या सगळ्यांपेक्षा तो जास्त पराक्रमी होता. दावीदच्या सर्वात शूर तीन योद्ध्यांसारखंच अबीशयचंही मोठं नाव होतं. कारण एकदा त्याने एकट्याने ३०० लोकांना ठार मारलं होतं. त्या तिघांपेक्षा अबीशय सगळ्यात जास्त नावाजलेला होता. पण “तरीसुद्धा तो पहिल्या तिघांच्या बरोबरीला पोहोचला नाही.”—२शमु २३:१८, १९.
दावीदच्या युद्धांच्या मोहिमांमध्ये अबीशयने आपल्या काकांना, दावीदला नेहमीच साथ दिली. पण तो फार उतावीळ होता आणि कठोरपणे वागायचा. इतका, की एकदा तर दावीदला त्याला आवर घालावा लागला. उदाहरणार्थ, एकदा तो आणि दावीद रात्रीच्या वेळी शौलच्या छावणीत लपून घुसले तेव्हा त्याने गाढ झोपलेल्या शौलला, ‘यहोवाच्या अभिषिक्ताला’ त्याचाच भाला घेऊन जमिनीत खिळून टाकलंच असतं. पण दावीदने त्याला आवरलं. (१शमु २६:६-९) आणखी एक प्रसंग विचारात घ्या. अबशालोमने जेव्हा दावीदविरुद्ध बंड केलं तेव्हा शिमी दावीद राजाला शिव्याशाप देत होता. याचा अबीशयला इतका राग आला, की तो शिमीला मारून टाकायला उठला आणि तेही दोनदा. तेव्हासुद्धा दावीदने त्याला रोखलं. पण अबीशयने आपल्या भावासोबत मिळून अबनेरला ठार मारलं तेव्हा मात्र दावीदला त्याला रोखता आलं नाही.—२शमु ३:३०; १६:९-११; १९:२१-२३.
अबीशयने १८,००० अदोमी लोकांना ठार मारण्यात आणि अम्मोनी लोकांनाही पळवून लावण्यात पुढाकार घेतला. शबा नावाच्या एका दुष्ट माणसाने दावीदविरुद्ध बंड पुकारलं तेव्हासुद्धा अबीशने ते बंड मोडून काढलं. बायबलमध्ये नमूद केलेल्या दावीदच्या शेवटच्या युद्धात एका अतिशय उंच आणि धिप्पाड पलिष्टी माणसाच्या हातून दावीदचा जीव गेलाच असता. पण अबीशयने त्याला वाचवलं.—१इत १८:१२; १९:११-१५; २शमु २०:१, ६; २१:१५-१७.
इन्साइट “तितर पक्षी” ¶४
तितर पक्षी
तितर पक्ष्याचं मांस खूप नाजूक असतं आणि प्राचीन काळापासून अन्नासाठी त्याची शिकार केली जाते. त्याची शिकार करण्यासाठी शिकारी आधी त्याला झाडाझुडपांतून अचानक हुसकावून लावायचे आणि तो घाबरून उडू लागला, की मग काठ्या फेकून त्याला खाली पाडायचे. तितर पक्षी सहसा जीव वाचवण्यासाठी लगेच पळ काढतात. ते खडकांच्या किंवा आणखी कशाच्या तरी मागे जाऊन शिकाऱ्याचा नेम हुकवतात. तसंच खडकांच्या कपारींमध्ये किंवा अशाच इतर ठिकाणी लपून बसतात. दावीदसुद्धा शौल राजापासून जीव वाचवण्यासाठी असाच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पळत होता आणि लपत होता. त्यामुळेच त्याने स्वतःची तुलना ‘डोंगरांवरच्या तितर पक्ष्याशी’ केली.—१शमु २६:२०; विल ३:५२ सोबत तुलना करा.
तुम्ही धीराने वाट पाहण्यास तयार आहात का?
१४ दावीद राजानेही अनेक अन्यायांना तोंड दिलं. दावीद तरुण होता तेव्हा यहोवाने त्याला इस्राएलचा राजा म्हणून निवडलं होतं. पण, स्वतःच्या कुळाचा राजा बनण्यासाठीसुद्धा त्याला १५ वर्षं थांबावं लागलं. (२ शमु. २:३, ४) यादरम्यान काही काळ, शौल राजापासून आपला प्राण वाचवण्यासाठी त्याला पळून जावं लागलं आणि लपावं लागलं. यामुळे या काळात त्याचं स्वतःचं असं घर नव्हतं. त्याला परक्या देशात किंवा ओसाड प्रदेशातल्या गुहांमध्ये राहावं लागलं. कालांतराने शौलचा एका युद्धात मृत्यू झाला. पण त्यानंतरही दावीदला संपूर्ण इस्राएल राष्ट्राचा राजा बनण्यासाठी जवळजवळ सात वर्षं थांबावं लागलं.—२ शमु. ५:४, ५.
१५ दावीद धीराने वाट पाहण्यास का तयार होता? याचं उत्तर तो आपल्याला त्याच स्तोत्रामध्ये देतो, ज्यामध्ये त्याने चार वेळा “कोठवर?” असा प्रश्न विचारला. या स्तोत्रात दावीद म्हणतो: “मी तर तुझ्या दयेवर भरवसा ठेवला आहे; माझे हृदय तू सिद्ध केलेल्या तारणाने उल्लासेल. परमेश्वराने माझ्यावर फार उपकार केले आहेत, म्हणून मी त्याची स्तुतिस्तोत्रे गाईन.” (स्तो. १३:५, ६) दावीदला माहीत होतं, की यहोवाचं त्याच्यावर प्रेम आहे आणि तो नेहमी त्याला एकनिष्ठ राहील. यहोवाने गतकाळात आपल्याला कशा प्रकारे मदत केली यावर दावीदने मनन केलं. तसंच, यहोवा त्याच्या समस्यांचा अंत करेल त्या काळाची त्याने आतुरतेनं वाट पाहिली. दावीदला माहीत होतं, की यहोवाकडून मिळणाऱ्या आशीर्वादांसाठी वाट पाहणं योग्यच आहे.
जे वयाने लहान आहेत त्यांची मनापासून कदर करा
८ दावीद राजालासुद्धा आपल्या मर्यादांची जाणीव होती. यहोवासाठी मंदिर बांधायची त्याची मनापासून इच्छा होती. पण यहोवाने त्याला सांगितलं, की हे मंदिर तो नाही, तर त्याचा मुलगा शलमोन बांधेल. त्या वेळी दावीदने असा विचार केला नाही, की शलमोन तर “वयाने लहान आहे व त्याला अनुभवसुद्धा नाही;” त्यामुळे मंदिर बांधण्याचं काम आपणच चांगलं करू शकतो. (१ इति. २९:१) उलट, त्याने देवाचं म्हणणं ऐकलं आणि मंदिर बांधायच्या कामाला आपला पूर्ण पाठिंबा दिला. (१ इति. १७:४; २२:५) कारण दावीदला हे माहीत होतं, की मंदिराचं बांधकाम हे त्याच्या वयामुळे किंवा अनुभवामुळे नाही, तर फक्त यहोवाच्या आशीर्वादामुळे आणि मदतीमुळेच शक्य होऊ शकतं. आज वयस्कर बांधवांच्या जबाबदाऱ्या जरी बदलल्या, तरी दावीदप्रमाणेच ते आवेशाने सेवा करत राहतात. आणि जे काम पूर्वी ते स्वतः करायचे ते आता तरुण बांधव करत असले, तरी ते आपलं काम चांगल्या प्रकारे पूर्ण करतील याची त्यांना खातरी आहे. कारण यहोवा त्यांना मदत करेल आणि त्यांच्या कामावर आशीर्वाद देईल हे ते ओळखतात.
बायबलमधल्या व्यक्तींचं वेबसाईटवरचं कार्ड
शौल राजा
बायबल कार्ड ४१
जमा करा आणि शिका | बायबलमधल्या व्यक्तींचं कार्ड
शौल राजा
तो कोण होता? इस्राएलचा पहिला राजा. सुरुवातीला शौल खूप नम्र होता. पण नतंर तो घमेंडी बनला आणि म्हणून यहोवाने त्याला राजा म्हणून नाकारलं. शौल शूर योद्धा बनलेल्या दावीदला मारून टाकायचा प्रयत्न करत होता. पण यहोवाने दावीदचं संरक्षण केलं, आणि शौल नंतर पलिष्टी लोकांशी युद्ध करताना मेला.—१ शमुवेल ३१:१-४.
प्रश्न
१. शौलचा कोणता मुलगा दावीचा जवळचा मित्र बनला?—१ शमुवेल १८:१.
२. शमुवेल संदेष्टा शौलला म्हणाला: “बलिदानापेक्षा ________ चांगलं.”—१ शमुवेल १५:२२.
३. खरं की खोटं ते सांगा. शौल राजा आळशी आणि कमजोर माणूस होता.—२ शमुवेल १:२३.
उत्तरं
१. योनाथान.
२. आज्ञा पाळणं.
३. खोटं. शौल हा गरुडांसारखा वेगवान आणि सिंहांसारखा बलवान होता.
[समयरेषा]
इ.स.पू. ४०२६ आदामला निर्माण करण्यात आलं
इ.स.पू. ११०० च्या आसपास जगत होता
इ.स. १
इ.स. ९८ च्या आसपास बायबलचं शेवटचं पुस्तक लिहिण्यात आलं
[नकाशा]
रामा, कईला, जीफचं ओसाड रान, मावोनचं ओसाड रान आणि एन-गेदी इथे दावीदचा पाठलाग करण्यात आला
रामा
यरुशलेम
कईला
जीफ
मावोन
एन-गेदी
अध्याय २६
त्याने धैर्याने राजाला त्याची चूक दाखवून दिली
नाथान—शुद्ध उपासनेचा निष्ठावान समर्थक
१ शमुवेल अध्याय २५ ते ३१ आणि २ शमुवेल याचे लेखक नाथान व गाद असल्याचे मानले जाते. या अध्यायांत लिहिण्यात आलेल्या देवप्रेरित इतिहासाविषयी असे म्हटले आहे: “दावीद राजाचे साद्यत वृत्त अथपासून इतिपर्यंत शमुवेल द्रष्टा याच्या ग्रंथात, नाथान संदेष्टा याच्या ग्रंथात आणि गाद द्रष्टा याच्या ग्रंथात लिहिले आहे.” (१ इति. २९:२९) ‘शलमोनाची सर्व कृत्ये’ याविषयीच्या अहवालाचाही लेखक नाथान असल्याचे समजले जाते. (२ इति. ९:२९) यावरून असे दिसून येते की दावीद राजाच्या मृत्यूनंतरही नाथान राजदरबारातील कार्यांत भाग घेत होता.
नाथानाविषयी जी काही माहिती आपल्याजवळ आहे ती जवळजवळ सर्व नाथानानेच लिहिली असावी. त्याने ज्या गोष्टी लिहिल्या नाहीत त्यातूनही आपण त्याच्याविषयी बरेच काही शिकू शकतो. नाथान एक नम्र इतिहासकार होता. तो महत्त्वाकांक्षी नव्हता आणि त्याने स्वतःच्या नावाला महत्त्व देण्याचा प्रयत्न केला नाही. एका बायबलच्या शब्दकोशात म्हटल्यानुसार प्रेरित अहवालात त्याचा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा त्याच्याबद्दल “कोणतीही मागची पुढची माहिती आणि वंशावळ दिलेली नाही.” नाथानाच्या वैयक्तिक जीवनाबद्दल तसेच त्याच्या वंशावळीबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही.
तुम्हाला माहीत होतं का?
दावीद राजाच्या सैन्यात विदेशी सैनिक का होते?
दावीद राजाच्या सैन्यात काही विदेशी सैनिक होते. जसं की, सेलक अम्मोनी, उरीया हित्ती आणि इथ्मा मवाबी. (१ इति. ११:३९, ४१, ४६) याशिवाय त्याच्या सैन्यात ‘करेथी, पलेथी आणि गित्ती माणसंही’ होती. (२ शमु. १५:१८) असं मानलं जायचं की करेथी आणि पलेथी हे पलिष्टी लोकांचे जवळचे नातेवाईक होते. (यहे. २५:१६) आणि गित्ती माणसं गथ या पलिष्टी शहरातली होती.—यहो. १३:२, ३; १ शमु. ६:१७, १८.
दावीदने आपल्या सैन्यात विदेशी माणसांची भरती का केली? कारण त्याला पूर्ण भरवसा होता, की ते त्याला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यहोवाला एकनिष्ठ होते. उदाहरणार्थ, बायबलच्या एका शब्दकोशात (द न्यू इंटरप्रिटर्स डिक्शनरी ऑफ द बायबल) करेथी आणि पलेथी माणसांबद्दल असं म्हटलंय, की “दावीदच्या शासनकाळात सगळ्यात वाईट परिस्थितीत ते त्याला एकनिष्ठ राहिले.” ते कसं? जेव्हा “इस्राएलच्या सगळ्या माणसांनी दावीदच्या मागे जाण्याचं सोडून दिलं” आणि ते शबा नावाच्या दुष्ट माणसाच्या मागे जाऊ लागले, तेव्हा करेथी आणि पलेथी माणसं दावीदला विश्वासू राहिली. आणि शबाने सुरू केलेला बंड मोडून काढायला त्यांनी त्याला मदत केली. (२ शमु. २०:१, २, ७) तसंच, पुढे एकदा दावीदच्या मुलाने, अदोनीयाने दावीदचं राजासन बळकवण्याचा प्रयत्न केला तेव्हासुद्धा करेथी आणि पलेथी माणसं दावीदला विश्वासू राहिली. शिवाय त्यांनी दावीदच्या मुलाला, शलमोनला पुढचा राजा बनायला मदत केली. कारण यहोवाने राजा म्हणून शलमोनला निवडलं होतं.—१ राजे १:२४-२७, ३८, ३९.
आणखी एक विदेशी माणूस दावीदला खूप विश्वासू राहिला. तो म्हणजे, गथचा राहणारा इत्तय. दावीदच्या मुलाने, अबशालोमने जेव्हा दावीदविरुद्ध बंड केलं आणि इस्राएलच्या सगळ्या लोकांची मनं जिंकायचा प्रयत्न केला, तेव्हा इत्तय आणि त्याचे ६०० योद्धे दावीदच्या बाजूने उभे राहिले. दावीदने सुरुवातीला इत्तयला म्हटलं, की तो विदेशी असल्यामुळे तो त्याच्यासाठी लढला नाही तरी चालेल. पण इत्तयने म्हटलं: “जिवंत देव यहोवाची शपथ, आणि माझे प्रभू, माझे राजे तुमच्या जिवाची शपथ! माझे प्रभू, माझे राजे तुम्ही जिथे कुठे जाल तिथे मी तुमच्यासोबत येईन; मग त्यासाठी मला मरावं लागलं तरी चालेल!”—२ शमु. १५:६, १८-२१.
करेथी, पलेथी आणि गित्ती माणसं जरी विदेशी असली, तरी त्यांनी ओळखलं होतं की यहोवा हाच खरा देव आहे. आणि दावीद हा यहोवाने अभिषिक्त केलेला राजा आहे. इतकी एकनिष्ठ माणसं आपल्या बाजूने उभी आहेत, या गोष्टीची दावीदने खरंच मनापासून कदर केली असेल!
[तळटीप]
अनुवाद २३:३-६ यात सांगितलंय, की देवाच्या नियमाप्रमाणे अम्मोनी आणि मवाबी यांच्यापैकी कोणीही यहोवाच्या मंडळीत येऊ शकत नव्हते. या नियमानुसार असं दिसतं, की ते कायदेशीररीत्या इस्राएल राष्ट्राचे सदस्य होऊ शकत नव्हते. पण हे विदेशी लोक, देवाच्या लोकांसोबत संगती करू शकत होते किंवा त्यांच्यामध्ये राहू शकत होते. इन्साइट ऑन द स्क्रिप्चर्स खंड १, पान ९५ पाहा.
इन्साइट “दावीद” ¶२९
दावीद
नाथान संदेष्ट्याने सांगितलं होतं अगदी तसंच घडलं. बथशेबासोबतच्या अनैतिक संबंधातून दावीदला जे मूल झालं, ते आजारी पडलं तेव्हा दावीदने सात दिवस त्याच्यासाठी उपवास आणि शोक केला. पण तरीसुद्धा ते बाळ जिवंत राहिलं नाही. (२शमु १२:१५-२३) नंतर दावीदच्या मोठ्या मुलाने, अम्नोनने आपल्या सावत्र बहिणीवर, म्हणजे तामारवर बलात्कार केला. त्यासाठी पुढे तिच्या भावाने अम्नोनचा खून केला आणि यामुळे दावीदला खूप दुःख झालं. (२शमु १३:१-३३) पुढे दावीदचा तिसरा आणि लाडका मुलगा अबशालोम याने आपल्या वडिलांचं राजपद बळकावण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही, तर त्याने दावीदच्या उपपत्नींसोबत संबंध ठेवून दावीदचा अगदी उघडपणे द्वेष आणि अपमान केला. (२शमु १५:१–१६:२२) शेवटी अबशालोम इतक्या थराला गेला, की त्याने आपल्याच वडिलांविरुद्ध युद्धाची घोषणा केली. युद्धात अबशालोमचं काही वाईट होऊ नये अशी दावीदची इच्छा होती. पण अबशालोम युद्धात मारला गेला. याचंही दावीदला खूप दुःख झालं. (२शमु १७:१–१८:३३) अबशालोमपासून पळून जात असताना दावीदने तिसरं स्तोत्र रचलं. त्यात त्याने म्हटलं: “हे यहोवा, तारण करणारा तूच आहेस!”—स्तो ३:८.
नाथान—शुद्ध उपासनेचा निष्ठावान समर्थक
वृद्ध झालेल्या दावीद राजानंतर शलमोन राजा होईल हे नाथानाला माहीत होते. त्यामुळे जेव्हा अदोनीयाने राजपद बळकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा नाथानाने हा कट विफल करण्यासाठी पाऊल उचलले. त्याच्या कृतींतून त्याची कुशलता व देवाप्रती असलेली निष्ठा पुन्हा एकदा दिसून आली. पहिले, शलमोनाला राजा बनवण्याच्या दावीद राजाने घेतलेल्या शपथेविषयी त्याला आठवण करून देण्यास नाथानाने बथशेबाला सांगितले. त्यानंतर नाथानाने स्वतः दाविदासमोर जाऊन अदोनीयाला दाविदाने राजा नेमले आहे का? असे विचारले. परिस्थितीचे गांभीर्य समजल्यावर दाविदाने नाथान व राजाच्या विश्वासू सेवकांना शलमोनाचा अभिषेक करून त्याला राजा घोषित करण्याची आज्ञा दिली. अदोनीयाचा राजपद बळकावण्याचा कट विफल ठरला.—१ राजे १:५-५३.
वेब सिरीझ “बायबल अभ्यासाचा उपक्रम”
चूक दाखवली जाते तेव्हा ती लगेच मान्य करा
तरुणांसाठी
चूक दाखवली जाते तेव्हा ती लगेच मान्य करा दावीद आणि बथशेबा—भाग २
सूचना: एखाद्या शांत ठिकाणी हा अभ्यास करा. वचनं वाचत असताना ती घटना आपल्या डोळ्यांसमोर उभी करा. तुम्ही तिथे आहात अशी कल्पना करा. तिथल्या लोकांचे आवाज ऐकायचा प्रयत्न करा. तसंच त्यांच्या मनात काय चाललंय हे समजून घ्यायचाही प्रयत्न करा.
मुख्य व्यक्ती: दावीद आणि नाथान
सारांश: दावीदने केलेलं गंभीर पाप माफ करण्यात आलं असलं, तरी त्याचे भयंकर परिणाम त्याला भोगावेच लागले.
१ घटनेचा विचार करा.—२ शमुवेल १२:१-२४ वाचा.
तुम्हाला काय वाटतं, नाथानचा स्वभाव कसा असावा?
नाथानने जेव्हा गरीब माणसाची आणि त्याच्या लहानशा मेंढीची गोष्ट सांगितली तेव्हा त्याच्या भावना काय असतील?
नाथानने जेव्हा गोष्टीतला मुद्दा समजावला तेव्हा मात्र त्याच्या भावना कशा बदलल्या असतील? (वचनं ७-९ पाहा.)
२ आणखी खोलवर अभ्यास करा.
दावीदची चूक लक्षात आणून देण्याबद्दल नाथानला आधीच विचार का करावा लागला असेल?
दावीदसोबत तर्क करण्यासाठी नाथानने वापरलेलं उदाहरण अगदी योग्य होतं असं का म्हणता येईल?
दावीदला त्याची चूक लक्षात आणून द्यायला नाथानने त्याला कशी मदत केली? दावीद दोषी आहे असं सरळ म्हणण्याऐवजी ही पद्धत योग्य होती असं का म्हणता येईल?
काही लोकांना कदाचित वाटेल, की यहोवाने दावीदला इतक्या लवकर माफ करायला नको होतं. (वचन १३ पुन्हा वाचा.) पण यहोवा लोकांमध्ये असं काय पाहतो जे आपण पाहू शकत नाही?
दावीदला भोगावे लागणारे परिणाम योग्य होते असं का म्हणता येईल? (वचनं १०-१२, १४ पुन्हा वाचा.)
३ शिकलेल्या गोष्टी लागू करा.
खाली दिलेल्या गोष्टींबद्दल तुला काय शिकायला मिळालं?
नम्र राहण्याबद्दल:
पापांच्या परिणामांबद्दल:
यहोवाच्या दयेबद्दल:
४ स्वतःला विचारा.
मला सल्ला किंवा ताडन कधी देण्यात आलं?
मला सुधारण्यात आल्यावर मी आधीपेक्षा आता चांगली प्रतिक्रिया कशी देऊ शकतो?
मला सुधारलं जातं तेव्हा त्यातून यहोवाचं माझ्यावर प्रेम आहे हे कसं दिसतं? (उत्तरासाठी इब्री लोकांना १२:५, ६ वाचा.)
या घटनेतून मला शिकायला मिळालेली सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आणि का?
असाही विचार करा: दावीदने आपली चूक कबूलच केली नसती आणि नाथानलाच शिक्षा केली असती तर काय झालं असतं? यहोवाने तरीही त्याला माफ केलं असतं का? तुला काय वाटतं ते लिहून काढ.
अध्याय २७
अन्याय झाला तरी त्याने मनात राग बाळगला नाही
इन्साइट “माखीर” क्र. २
माखीर
२. लो-दबार इथे राहणारा अम्मीएलचा मुलगा. दावीदने योनाथानचा मुलगा मफीबोशेथ याला आपल्याकडे बोलावून घेतलं आणि त्याच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था केली. पण तोपर्यंत मफीबोशेथ माखीरच्या घरी राहत होता. (२शमु ९:४-७, १३) पुढे जेव्हा अबशालोमने बंड केलं त्या काळात काही लोकांनी दावीद राजाला आणि त्याच्यासोबतच्या लोकांना खाण्यापिण्याच्या वस्तू आणि इतर गरजेच्या गोष्टी पुरवल्या. त्या लोकांमध्ये माखीरसुद्धा होता.—२शमु १७:२७-२९.
इन्साइट “कुत्रा” ¶५
कुत्रा
प्राचीन इस्राएलमध्ये भटके कुत्रे सहसा केरकचऱ्यामधलं कुजलेलं अन्न खाताना दिसायचे. त्यांना खूप तुच्छ नजरेने पाहिलं जायचं. याची काही उदाहरणं पुढे दिली आहेत. दावीद जेव्हा हातात काठी घेऊन गल्याथसमोर गेला तेव्हा “तू मला कुत्रा समजलास की काय?” असं गल्याथ दावीदला म्हणाला. (१शमु १७:४३) शौल राजा जेव्हा दावीदच्या जिवावर उठला होता तेव्हा दावीद त्याला म्हणाला, ‘तुम्ही कोणाच्या मागे लागला आहात? माझ्यासारख्या मेलेल्या कुत्र्याच्या?’ दावीदला असं म्हणायचं होतं, की तो खूप क्षुल्लक आहे आणि जसं मेलेल्या कुत्र्यापासून कोणाला धोका नसतो तसं शौललासुद्धा दावीदपासून कोणताही धोका नाही. (१शमु २४:१४) तसंच, योनाथानचा मुलगा मफीबोशेथ याने दावीदशी बोलताना स्वतःला ‘मेलेला कुत्रा’ असं म्हटलं. हे शब्द एखाद्याच्या सगळ्यात वाईट स्थितीला सूचित करतात. (२शमु ९:८; २शमु ३:८; १६:९; २रा ८:१३ हेसुद्धा पाहा.) यशयाच्या काळात काही धार्मिक पुढारी असा दावा करत होते, की देवाने त्यांना आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्याच्या लोकांचे पहारेकरी म्हणून नेमलंय. पण यशयाने त्यांची तुलना न भुंकणाऱ्या, झोपून राहणाऱ्या आणि खादाड कुत्र्यांशी केली. कारण धोका येतो तेव्हा अशा कुत्र्यांचा काहीच उपयोग नसतो. (यश ५६:१०, ११) बायबलमध्ये यहोवाच्या शत्रूंची आणि विदेश्यांची तुलनाही कुत्र्यांशी केली आहे. (स्तो २२:१६, २०; ५९:६, १४; मत्त १५:२६, २७) तसंच, येशूनेसुद्धा देवाच्या ज्ञानाची कदर नसलेल्या लोकांची तुलना कुत्र्यांशी केली आणि तो म्हणाला: “पवित्र गोष्टी कुत्र्यांना देऊ नका.”—मत्त ७:६.
टेहळणी बुरूज०२ २/१५ १४ ¶११, तळटीप
ते त्यांच्या शरीरातल्या काट्यांशी लढले
११ कालांतराने मफीबोशेथला शरीरातल्या आणखी एका काट्याला तोंड द्यावे लागले. त्याचा सेवक सीबा याने राजा दाविदाजवळ मफीबोशेथविषयी कुटाळकी केली. त्या वेळी दावीद आपल्या पुत्राच्या, अबशालोमच्या बंडाळीमुळे जेरूसलेमधून पलायन करत होता. सीबाने दाविदाला सांगितले की दाविदाचे राज्यत्व स्वतः बळकावण्याच्या इराद्यानेच मफीबोशेथ पलायन न करता जेरूसलेममध्येच राहिला होता व अशारितीने त्याने राजा दाविदाचा विश्वासघात केला होता. दाविदाने सीबाच्या या कुटाळकीवर विश्वास ठेवला आणि मफीबोशेथची सर्व मालमत्ता सीबाच्या हवाली केली!—२ शमुवेल १६:१-४.
[तळटीप]
मफीबोशेथसारख्या उपकारांची जाणीव राखणाऱ्या, नम्र मनुष्याने असे महत्त्वाकांक्षी कारस्थान रचणे त्याच्या स्वभावाच्या विरोधात ठरले असते. आपले वडील योनाथान यांच्या विश्वासूपणाबद्दलही त्याला माहीतच असेल. राजा शौलाचा पुत्र असूनही, योनाथानने हे ओळखले होते की दाविदाला इस्राएलचा राजा होण्याकरता खुद्द यहोवाने निवडले होते. (१ शमुवेल २०:१२-१७) देवाला भिणारा आणि दाविदाचा निष्ठावान सेवक या नात्याने योनाथानने आपला मुलगा मफीबोशेथ याला राज्यसत्तेचे स्वप्न पाहण्याचे धडे निश्चितच दिले नसते.
इन्साइट “मफीबोशेथ” क्र. २ ¶३
मफीबोशेथ
शौल राजाने गिबोनी लोकांचा पूर्णपणे नाश करायचा प्रयत्न केला होता. याचा बदला म्हणून गिबोनी लोकांनी शौलच्या वंशजांना मारायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी दावीदकडे मदत मागितली. पण त्या वेळी दावीदला योनाथानसोबत यहोवाच्या नावाने घेतलेल्या शपथेची आठवण झाली. म्हणून त्याने मफीबोशेथवर दया केली आणि त्याला वाचवलं. (२शमु २१:७, ८) शास्त्रवचनांमध्ये मफीबोशेथबद्दल जास्त माहिती दिलेली नाही. पण शौलचं कुटुंब मफीबोशेथचा मुलगा मीखा याच्या नंतरच्या पिढीपर्यंतसुद्धा अस्तित्वात होतं. (२शमु ९:१२; १इत ९:३९-४४) १ इतिहास ८:३४ आणि ९:४० मधून समजतं की मफिबोशेथला मरीब्बालसुद्धा म्हटलं जायचं.
तुला कधी तिऱ्हाईतासारखे वाटले आहे का?
तुमच्या मुलांना शिकवा
इतर जण एखाद्या व्यक्तीला टाळतात तेव्हा तिला तिऱ्हाईतासारखे वाटू शकते. त्या व्यक्तीचा कदाचित त्वचारंग वेगळा असेल, ती कदाचित वेगळ्या राष्ट्राची असेल किंवा तिची बोलण्याची अथवा काम करण्याची पद्धत वेगळी असेल. तुला कधी असे तिऱ्हाईतासारखे वाटले आहे का?—
एका मनुष्याला असेच वाटले होते. त्याच्याबद्दल आपण बोलू यात. त्याचे नाव होते मफीबोशेथ. मफीबोशेथ कोण होता आणि त्याला असे का वाटत होते ते आपण पाहू या. तुला जर तिऱ्हाईतासारखे वाटत असेल तर, तू मफीबोशेथाकडून पुष्कळ काही शिकू शकतोस.
मफीबोशेथ हा दावीदाचा जिवलग मित्र योनाथान याचा मुलगा होता. योनाथान एका युद्धात जखमी झाला. मरायच्या आधी तो दाविदाला म्हणाला: ‘माझ्या मुलांची काळजी घे.’ त्यानंतर दावीद राजा झाला. खूप वर्षांनंतर त्याला योनाथानाचे शब्द आठवले. आणि मफीबोशेथ अजूनही जिवंत होता. पण लहानपणी झालेल्या एका अपघातामुळे तो कायमचा लंगडा झाला होता. आता तुला समजले का, मफीबोशेथला तिऱ्हाईतासारखे का वाटत होते ते?—
दाविदाला योनाथानच्या या मुलाची काळजी घ्यायची होती. म्हणून त्याने त्याची, जेरूसलेमेतील आपल्या घराशेजारी राहायची आणि आपल्या बरोबर जेवण करायची व्यवस्था केली. त्याने सीबा नावाच्या एका माणसाला त्याचे कुटुंब आणि त्याचे सेवक यांच्यासहित मफीबोशेथची काळजी घेण्यासाठी नेमले. अशा प्रकारे दाविदाने योनाथानच्या पुत्राचा सन्मान केला. पण मग पुढे काय झाले माहीत आहे?—
दावीदाच्या घरातले लोक दाविदाला त्रास देऊ लागले. अबशालोम नावाचा त्याचा मुलगा त्याच्या जिवावर उठला कारण त्याला राजा व्हायचे होते. त्यामुळे मग दाविदाला आपला जीव वाचवण्यासाठी तेथून पळून जावे लागले. दाविदाबरोबर इतरही पुष्कळ लोक गेले. आणि मफीबोशेथलाही जायचे होते. कारण दावीदाच्या या मित्रांना माहीत होते, की दावीदच खरा राजा आहे. पण, मफीबोशेथला जाता आले नाही कारण तो धड चालूसुद्धा शकत नव्हता.
पण मग सीबाने दाविदाचे कान भरले. त्याने त्याला म्हटले, की मफीबोशेथ तुझ्याबरोबर मुद्दामहून आला नाही कारण खरे तर त्याला राजा व्हायचे आहे. आणि दाविदाने सीबाने सांगितलेल्या या लबाडीवर विश्वास ठेवला. त्याने, मफीबोशेथची सर्व संपत्ती सीबाला देऊन टाकली. त्यानंतर अबशालोमबरोबर झालेल्या युद्धात दावीद जिंकला व तो पुन्हा जेरुसलेमेत आला. इथे आल्यावर त्याला मफीबोशेथची बाजू ऐकायची होती. ती त्याने ऐकली. ऐकल्यानंतर त्याने ठरवले, की मफीबोशेथ आणि सीबा या दोघांमध्ये संपत्तीची वाटणी झाली पाहिजे. अशा वेळी मफीबोशेथने काय केले असावे असे तुला वाटते?—
दावीदाने चुकीचा निर्णय दिला, अशी बिलकूल कुरकूर त्याने केली नाही. दाविदाकडे पुष्कळ काम आहे, तेव्हा हे काम त्याला शांतीने करता यावे म्हणून तो गप्प राहिला. उलट, सीबानेच सर्व संपत्ती घ्यावी, असेही तो म्हणाला. यहोवाचा सेवक दावीद जेरुसलेमेत पुन्हा आला होता, हीच मफीबोशेथसाठी मोठी गोष्ट होती.
मफीबोशेथला खूप त्रास सहन करावा लागला होता. सर्व लोक आपल्याला टाळतात, आपण तिऱ्हाईत आहोत, असे त्याला वाटायचे. पण यहोवाचे त्याच्यावर प्रेम होते आणि म्हणून यहोवाने त्याची काळजी घेतली. मफीबोशेथच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो बरे?— कधीकधी आपण बरोबर असलो तरीसुद्धा काही लोक आपल्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवतील. येशूने म्हटले होते: “जग जर तुमचा द्वेष करिते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाहि केला आहे हे तुम्हाला माहीत आहे.” लोकांनी तर येशूला ठारही मारले. पण आपल्याला माहीत आहे, की आपण जर जे बरोबर आहे ते करत राहिलो तर खरा देव यहोवा आणि त्याचा पुत्र येशू आपल्यावर प्रेम करतील.
तुमचे बायबल उघडून वाचा
२ शमुवेल ४:४; ९:१-१०; १९:२४-३०
अध्याय २८
तो “आयुष्यभर” यहोवाला विश्वासू राहिला
टेहळणी बुरूज०८ ६/१ १० ¶१-५
आपण देवाची कशी उपासना करतो याने काही फरक पडतो का?
इस्राएली लोक “उच्च स्थानांवर” दोन देवांची, म्हणजे यहोवाची आणि खोट्या दैवतांची उपासना करायचा दावा करायचे. या उच्च स्थानांवर वेद्या, धूप जाळण्याची ठिकाणं आणि दगडी स्तंभ असायचे. तसंच कनानी लोकांच्या प्रजनन देवीला, म्हणजे अशेरा देवीला सूचित करणारे लाकडी खांबसुद्धा असायचे. यहूदामध्ये उपासनेची अशी बरीच ठिकाणं होती. २ राजे २३:५, ८ या वचनांमध्ये, “यहूदाच्या शहरांमध्ये आणि यरुशलेमच्या आसपासच्या प्रदेशांत” तसंच, “गेबापासून [उत्तर सीमेपासून] बैर-शेबापर्यंत [दक्षिण सीमेपर्यंत]” उच्च स्थानं असल्याचा उल्लेख करण्यात आलाय.
या उच्च स्थानांवर इस्राएली लोक “बआल दैवतासाठी आणि सूर्य, चंद्र, राशीचक्रातली नक्षत्रं व आकाशातलं सर्व सैन्य यांच्यासाठी बलिदानांचं हवन करत होते.” तसंच, त्यांनी ‘यहोवाच्या मंदिरात पुरुष-वेश्यांसाठी’ घरं बनवली होती. शिवाय, ते आपल्या मुलांचा “मोलख दैवताला आगीत होम” करायचे.—२ राजे २३:४-१०.
पुरातत्वशास्त्रज्ञांना यरुशलेम आणि यहूदामध्ये, खासकरून लोकांच्या उद्धवस्त झालेल्या घरांमध्ये मातीपासून बनवलेल्या (टेरा-कोट्टा) मूर्ती सापडल्या आहेत. यांपैकी बऱ्याचशा मूर्ती अतिशय मोठे स्तन असणाऱ्या नग्न स्त्रियांच्या होत्या. विद्वानांचं असं म्हणणं आहे, की या मूर्ती अष्टारोथ आणि अशेरा या प्रजनन देवींना सूचित करायच्या. लोक असं मानायचे की या मूर्ती “गर्भधारणेसाठी आणि बाळंतपणासाठी शुभ आहेत.”
या केंद्रांमध्ये उपासनेची जी भेसळ केली जायची त्याकडे इस्राएली लोक कसं पाहायचे? हिब्रू युनिर्व्हसिटीचे प्राध्यापक एफ्राईम स्टर्न यांच्या लक्षात आलं, की बरीचशी उच्च स्थानं कदाचित “याव्हेला [यहोवाला] समर्पित होती.” दगडांवर कोरलेल्या काही लिखाणांवरून ही गोष्ट सिद्ध होते. उदाहरणार्थ, एका शीलालेखावर असं म्हटलंय, “मी तुम्हाला शोमरोनच्या याव्हेच्या आणि त्याच्या अशेराच्या नावाने आशीर्वाद देतो!” तर दुसऱ्या एका शीलालेखावर असं म्हटलंय, “मी तुम्हाला तेमानच्या याव्हेच्या आणि त्याच्या अशेराच्या नावाने आशीर्वाद देतो!”
ही उदाहरणं दाखवून देतात, की इस्राएली लोकांनी यहोवाची उपासना करण्यासोबतच खोट्या दैवतांची उपासना केली आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या घृणास्पद गोष्टी केल्या. याचा परिणाम असा झाला, की त्यांची नैतिकता अतिशय खालच्या थराला गेली आणि लोक खऱ्या देवापासून फार दूर गेले. आपल्या उपासनेत केलेली ही भेसळ पाहून यहोवाला कसं वाटलं?
इन्साइट “हनानी” क्र. २
हनानी
२. एक द्रष्टा किंवा दृष्टान्त पाहणारा. यहूदाचा राजा आसा याने यहोवावर विसंबून राहण्याऐवजी सीरियाच्या राजाशी मैत्रीचा करार केला तेव्हा हनानी द्रष्ट्याने त्याला फटकारलं. पण राजा त्याच्या बोलण्यामुळे खूप चिडला आणि त्याने त्याला तुरुंगात टाकलं. (२इत १६:१-३, ७-१०) असं दिसतं की हनानी हा येहू संदेष्ट्याचा वडील होता. येहूनेसुद्धा इस्राएलचा राजा बाशा आणि यहूदाचा राजा यहोशाफाट यांना फटकारलं होतं.—१रा १६:१-४, ७; २इत १९:२, ३; २०:३४.
“पूर्ण हृदयाने” यहोवाची सेवा करा
५ इस्राएल राष्ट्राची, इस्राएलचं राज्य आणि यहूदाचं राज्य अशा दोन भागांत विभागणी झाली. त्यानंतर यहूदावर राज्य करणारा तिसरा राजा म्हणजे आसा. जेव्हा आसा यहूदाचा राजा बनला तेव्हा त्याने निर्धार केला, की तो त्याच्या राज्यात चाललेली खोटी उपासना आणि अगदी घृणास्पद लैंगिक अनैतिकता यांचा नायनाट करेल. लोक ज्या मूर्तींची उपासना करायचे त्या त्याने मोडून टाकल्या आणि मंदिरातील वेश्या कृत्यं करणाऱ्यांना देशाबाहेर घालवून दिलं. इतकंच नाही तर आसाने आपल्या आजीला “राजमातेच्या पदावरून दूर केले, कारण तिने अशेराप्रीत्यर्थ एक अमंगळ मूर्ती केली होती.” (१ राजे १५:११-१३) आसाने लोकांना यहोवाचा शोध करण्याचं, तसंच त्याच्या नियमशास्त्राचं व आज्ञांचं पालन करण्याचंही प्रोत्साहन दिलं. लोकांना यहोवाची उपासना करण्यास मदत व्हावी, यासाठी आसाला जे काही करणं शक्य होतं ते त्याने केलं.—२ इति. १४:४.
६ आसाच्या शासनात पहिली दहा वर्षं यहूदा राज्याला एकही युद्ध लढावं लागलं नाही. पण, त्यानंतर कूशी लोक यहूदाविरुद्ध लढण्यासाठी आले. त्यांच्या सैन्यात दहा लाख पुरुष व तीनशे रथ होते. (२ इति. १४:१, ६, ९, १०) मग अशा वेळी आसाने काय केलं? यहोवा आपल्या लोकांना मदत करेल याबद्दल त्याच्या मनात जराही शंका नव्हती. त्यामुळे त्याने यहोवाला प्रार्थना केली आणि लढाईत विजय मिळावा म्हणून त्याच्याजवळ विनंती केली. (२ इतिहास १४:११ वाचा.) बऱ्याच वेळा इस्राएलचे राजे यहोवाला विश्वासू राहिले नव्हते. पण, तेव्हाही यहोवाने स्वतःच्या नावासाठी, व तोच खरा देव आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्या लोकांना शत्रूंविरुद्ध विजय मिळवण्यास मदत केली होती. (१ राजे २०:१३, २६-३०) पण, या वेळी यहोवाने आपल्या लोकांना यासाठी मदत केली, कारण आसा हा पूर्णपणे त्याच्यावर निर्भर राहिला होता. यहोवाने आसाच्या प्रार्थनेचं त्याला उत्तर दिलं आणि तो लढाई जिंकला. (२ इति. १४:१२, १३) पण, पुढे जाऊन आसाच्या हातून एक गंभीर चूक घडली. त्याने यहोवावर निर्भर राहण्याऐवजी अराम देशाच्या राजाकडे मदत मागितली. (१ राजे १५:१६-२२) पण, यहोवाने त्याच्या हातून घडलेल्या केवळ या चुकीकडेच लक्ष दिलं नाही. तर आसाने संपूर्ण आयुष्य आपल्यावर पूर्ण मनाने प्रेम केलं आहे याकडे लक्ष दिलं. बायबल म्हणतं की आसाचे “मन साऱ्या हयातीत परमेश्वराकडे पूर्णपणे लागलेले होते.” (१ राजे १५:१४) आसाच्या या चांगल्या उदाहरणाचं आपण कशा प्रकारे अनुकरण करू शकतो?
दुसरा इतिहास पुस्तकातील ठळक मुद्दे
आसाने सर्व “उच्च स्थाने” काढून टाकली का? नाही, त्याने सर्व उच्च स्थाने काढली नाहीत असे दिसते. कदाचित त्याने केवळ जेथे खोट्या दैवतांची उपासना केली जात होती तीच स्थाने नष्ट केली असावीत व जेथे लोक यहोवाची उपासना करीत होते, ती स्थाने त्याने नष्ट केली नाहीत. आसाच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात पुन्हा एकदा उच्च स्थाने बांधली गेली अशीही शक्यता नाकारता येत नाही. ही उच्च स्थाने त्याचा पुत्र यहोशाफाट याने नष्ट केली. खरे पाहता, यहोशाफाटाच्या राज्यातही ही उच्च स्थाने पूर्णपणे नाहीशी झाली नाहीत.—२ इतिहास १७:५, ६; २०:३१-३३.
अभ्यास लेख ३८
शांतीच्या काळाचा विचारपूर्वक उपयोग करा
“त्याने यहूदात तटबंदीची नगरे बांधली. देशात स्वास्थ्य होते आणि त्या काळी काही लढाई झाली नाही, कारण परमेश्वराने त्याला आराम दिला होता.”—२ इति. १४:६.
सारांश
तुम्ही अशा देशात राहत आहात का, जिथे यहोवाची उपासना करण्यावर कोणतीही बंदी नाही? असाल, तर तुम्ही शांतीच्या या काळाचा कसा उपयोग करत आहात? यहूदाचा राजा आसा आणि पहिल्या शतकातले ख्रिस्ती यांनी शांतीच्या काळाचा, म्हणजे उपासना करायची मोकळीक होती त्या काळाचा विचारपूर्वक उपयोग केला. त्यांच्या या उदाहरणाचं आपण अनुकरण कसं करू शकतो ते या लेखात आपण पाहणार आहोत.
तुम्हाला काय वाटतं, यहोवाची सेवा करणं जास्त अवघड कधी जाऊ शकतं? तुमच्या जीवनात अनेक समस्या असतात तेव्हा, की समस्या नसतात तेव्हा? सहसा जीवनात समस्या येतात तेव्हा आपण यहोवाच्या सेवेत होता होईल तितकं करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यावर विसंबून राहतो. पण सगळंकाही अगदी सुरळीत असतं, काही समस्या नसतात तेव्हा काय? तेव्हासुद्धा या गोष्टी करण्याचा तुम्ही तितकाच प्रयत्न करता का? त्यांना तितकंच महत्त्व देता का? वचन दिलेल्या देशात गेल्यानंतर इस्राएली लोकांचं यहोवाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता होती. आणि म्हणून यहोवाने त्यांना अशी ताकीद दिली, की त्यांनी त्याला विसरू नये.—अनु. ६:१०-१२.
२ आसा राजाचं खूप चांगलं उदाहरण आपल्यासमोर आहे. कारण त्याने वेळेचा विचारपूर्वक उपयोग केला आणि तो पूर्णपणे यहोवावर विसंबून राहिला. त्याने फक्त कठीण काळातच नाही, तर शांतीच्या काळातही यहोवाची सेवा केली. लहानपणापासूनच “आसाचे मन . . . परमेश्वराकडे पूर्णपणे लागलेले होते.” (१ राजे १५:१४) यहूदातल्या खोट्या उपासनेला पूर्णपणे थांबवून त्याने दाखवून दिलं, की तो यहोवाची अगदी मनापासून सेवा करत आहे. त्याच्याबद्दल बायबल म्हणतं, की “त्याने अन्य देवांच्या वेद्या व उच्च स्थाने काढून टाकली, मूर्तिस्तंभ मोडले व अशेरा मूर्ती” नष्ट केल्या. (२ इति. १४:३, ५) तसंच, त्याने आपल्या आजीला, माका हिला राजमातेच्या पदावरून काढून टाकलं. कारण, ती लोकांना एका विशिष्ट मूर्तीची उपासना करायचं प्रोत्साहन देत होती.—१ राजे १५:११-१३.
३ आसाने मूर्ती तर नष्ट केल्याच, पण त्यासोबतच त्याने यहूदाच्या लोकांना पुन्हा यहोवाची उपासना करायला मदत केली. म्हणून यहोवाने आसाला आणि यहूदाच्या लोकांना भरपूर आशीर्वाद दिले. बायबल म्हणतं, की आसा राज्य करत होता त्या वेळी दहा वर्षं “देशात स्वास्थ्य होते,” म्हणजे देशात शांतीचा काळ होता. (२ इति. १४:१, ४, ६) आसाने या शांतीच्या काळाचा कसा उपयोग केला त्याची या लेखात आपण चर्चा करू. तसंच, आसासारखंच पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांनी शांतीच्या काळाचा कसा उपयोग केला त्याचीही आपण चर्चा करू. आणि शेवटी, आपण या प्रश्नाचं उत्तर पाहू, की तुम्ही राहत असलेल्या देशात जर सरकार तुम्हाला उपासना करायची मोकळीक देत असेल, तर तुम्ही त्या शांतीच्या काळाचा विचारपूर्वक उपयोग कसा करू शकता?
आसाने शांतीच्या काळाचा उपयोग कसा केला?
४ दुसरे इतिहास १४:२, ६, ७ वाचा. आसा लोकांना म्हणाला, की यहोवाने “आपल्याला चोहोकडून स्वास्थ्य दिले आहे.” पण, शांतीचा हा काळ मौजमजा करण्याचा किंवा निवांत राहण्याचा काळ आहे असा त्याने विचार केला नाही. याउलट, त्याने देशात शहरं, शहराच्या भिंती, बुरूज आणि शहराचे दरवाजे बांधायला सुरुवात केली. तो यहूदाच्या लोकांना म्हणाला: “देश आपल्या हाती आहे.” आसाला काय म्हणायचं होतं? हेच, की देवाने दिलेल्या या देशात शत्रूंची भीती नसल्यामुळे त्यांना कुठेही येण्या-जाण्याची आणि बांधकाम करण्याची मोकळीक आहे. त्याने लोकांना या शांतीच्या काळाचा चांगला वापर करण्याचं प्रोत्साहन दिलं.
५ आसाने या शांतीच्या काळाचा उपयोग आपलं सैन्य मजबूत करण्यासाठीही केला. (२ इति. १४:८) याचा अर्थ असा होतो का, की त्याचा यहोवावर भरवसा नव्हता? नाही. भविष्यात शत्रूंचा हल्ला होऊ शकतो याची त्याला जाणीव होती. म्हणून राजा या नात्याने त्याने आपल्या राज्यातल्या लोकांना स्वतःचं संरक्षण करायचं प्रशिक्षण दिलं. तसंच, देशातला हा शांतीचा काळ कदाचित नेहमीच टिकून राहणार नाही, हेही त्याला माहीत होतं. आणि पुढे तसंच झालं.
पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांनी शांतीच्या काळाचा उपयोग कसा केला?
६ पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांना अनेकदा छळाचा सामना करावा लागला. पण अधूनमधून त्यांनी शांतीचा काळही अनुभवला. त्या काळाचा ख्रिश्चनांनी कसा वापर केला? ते विश्वासू ख्रिस्ती आवेशाने आनंदाचा संदेश सांगत राहिले. प्रेषितांची कार्ये या पुस्तकात त्यांच्याबद्दल असं म्हटलं आहे, की “ते यहोवाचं भय मानून चालत होते.” म्हणजेच, ते प्रचाराचं काम करत राहिले आणि त्यामुळे “त्यांची संख्या वाढत गेली.” यावरून दिसून येतं, की शांतीच्या काळात त्यांनी जो आवेश दाखवला त्यासाठी यहोवाने त्यांना आशीर्वाद दिले.—प्रे. कार्ये ९:२६-३१.
७ पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांनी आनंदाचा संदेश सांगण्यासाठी मिळेल त्या संधीचा वापर केला. उदाहरणार्थ, इफिसमध्ये असताना प्रेषित पौलला या गोष्टीची जाणीव झाली, की त्याच्यासाठी “संधीचे एक मोठे दार” उघडण्यात आले आहे. त्यामुळे इफिसमध्येच थांबून त्याने प्रचाराचं आणि शिष्य बनवण्याचं काम केलं.—१ करिंथ. १६:८, ९.
८ इ.स. ४९ मध्येही पौलला आणि इतर ख्रिश्चनांना बऱ्याच लोकांना प्रचार करायची संधी मिळाली. त्या वर्षी सुंतेविषयीचा वाद मिटला, आणि त्या बाबतीत जो काही निर्णय घेतला गेला तो सगळ्या मंडळ्यांना कळवण्यात आला. (प्रे. कार्ये १५:२३-२९) त्यानंतर पौल आणि इतर ख्रिश्चनांनी “यहोवाच्या वचनाविषयीचा आनंदाचा संदेश घोषित” करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली. (प्रे. कार्ये १५:३०-३५) याचा काय परिणाम झाला? बायबल म्हणतं, की “मंडळ्या विश्वासात मजबूत होत गेल्या आणि दिवसेंदिवस त्यांची संख्याही वाढू लागली.”—प्रे.कार्ये १६:४, ५.
आज आपण शांतीच्या काळाचा उपयोग कसा करू शकतो?
९ आज अनेक देशांमध्ये आपल्या कामावर कोणतीही बंदी नाही. तुम्हीही अशाच एखाद्या देशात राहत आहात का? असाल, तर स्वतःला विचारा: ‘मला मिळालेल्या या संधीचा मी कसा वापर करत आहे?’ हे शेवटले दिवस यहोवाच्या लोकांसाठी खूप रोमांचक आहेत. कारण कधी नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर ते संपूर्ण जगात प्रचाराचं आणि शिकवण्याचं काम करत आहेत. (मार्क १३:१०) आणि या कामात करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत!
१० तुम्ही शांतीच्या काळाचा चांगला वापर कसा करू शकता? (२ तीमथ्य ४:२ वाचा.) आपल्या परिस्थितीचं परीक्षण करा. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातली एखादी व्यक्ती जास्त प्रचारकार्य करण्यासाठी किंवा पायनियरिंग करण्यासाठी काही फेरबदल करू शकते का? ही वेळ, भरपूर पैसा किंवा धनसंपत्ती मिळवायची नाही. कारण मोठ्या संकटाच्या वेळी या गोष्टींचा आपल्याला काहीच फायदा होणार नाही.—नीति. ११:४; मत्त. ६:३१-३३; १ योहा. २:१५-१७.
११ लोकांना आनंदाचा संदेश सांगता यावा आणि यहोवाबद्दल शिकवता यावं म्हणून बऱ्याच प्रचारकांनी एक नवीन भाषा शिकून घेतली आहे. आणि त्यांना हे काम करता यावं म्हणून यहोवाच्या संघटनेने आज अनेक भाषांमध्ये प्रकाशनं पुरवली आहेत. उदाहरणार्थ, २०१० मध्ये जवळजवळ ५०० भाषांमध्ये आपली प्रकाशनं उपलब्ध होती. पण आज, ही प्रकाशनं १,००० पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत!
१२ लोकांना जेव्हा स्वतःच्या भाषेत यहोवाबद्दल शिकायला मिळतं तेव्हा त्यांना कसं वाटतं? एका बहिणीचा अनुभव विचारात घ्या. ती अमेरिकेच्या टेनिसी राज्यातल्या मेंफिस शहरात झालेल्या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित होती. ते अधिवेशन किन्यारवान्डा भाषेत होतं. ही भाषा रवान्डा, काँगो (किन्शासा) आणि युगान्डा या देशांमध्ये बोलली जाते. अधिवेशन झाल्यानंतर किन्यारवान्डा भाषा बोलणारी ती बहीण म्हणाली: “मी १७ वर्षांपासून अमेरिकत राहते. इथे आल्यानंतर, हे पहिलंच अधिवेशन आहे जे मला पूर्णपणे समजलंय.” यावरून हे स्पष्ट होतं, की बहिणीने तिच्या स्वतःच्या भाषेत अधिवेशन ऐकल्यामुळे ते तिच्या मनापर्यंत पोचलं होतं. तुमच्या क्षेत्रात दुसरी एखादी भाषा बोलली जाते का? असेल, तर ती भाषा बोलणाऱ्या लोकांना प्रचार करता यावा म्हणून तुम्ही ती भाषा शिकू शकता का? त्यांनी जर स्वतःच्या भाषेत संदेश ऐकला तर त्यांना आवडणार नाही का? म्हणून दुसरी भाषा शिकण्यासाठी तुम्ही जी काही मेहनत घ्याल ती कधीच व्यर्थ जाणार नाही, याची खातरी बाळगा.
१३ आपल्यापैकी सगळ्याच बांधवांना प्रचार करायची मोकळीक नाही. कारण काही देशांमध्ये सरकारने आपल्या प्रचाराच्या कामावर बंदी घातली आहे. उदाहरणार्थ, रशियातल्या आपल्या भाऊबहिणींचा विचार करा. त्यांना आपल्या विश्वासासाठी बरीच वर्षं छळाचा सामना करावा लागला. शेवटी, मार्च १९९१ मध्ये सरकारने त्यांना उपासना करायचं स्वातंत्र्य दिलं. त्या वेळी रशियामध्ये प्रचारकांची संख्य १६,००० होती. पण वीस वर्षांनंतर ही संख्या १,६०,००० पेक्षा जास्त झाली! यावरून हे स्पष्ट होतं, की आपल्या भाऊबहिणींनी प्रचार करण्याच्या स्वातंत्र्याचा विचारपूर्वक वापर केला. मात्र शांतीचा हा काळ तसाच राहिला नाही. आज जरी रशियातली परिस्थिती बदलली असली, तरी तिथल्या भाऊबहिणींचा यहोवाच्या सेवेतला आवेश कमी झालेला नाही. यहोवाची सेवा करण्यासाठी ते मिळेल त्या संधीचा फायदा घेत आहेत.
सध्याचा शांतीचा काळ कायम राहणार नाही
१४ आसा राजाच्या दिवसांत जो शांतीचा काळ होता तो शेवटी संपला. कारण कूशमधून, म्हणजे इथियोपिया इथून जेरह नावाचा एक अधिकारी दहा लाख सैनिकांचं भलं मोठं सैन्य घेऊन यहूदावर हल्ला करायला आला. त्याला आणि त्याच्या सैन्याला असं वाटत होतं, की ते यहूदाला सहज हरवून टाकतील. हे खरं आहे, की आसा राजानेसुद्धा आपलं सैन्य मजबूत केलं होतं. पण त्याचा भरवसा आपल्या सैन्यावर नाही, तर यहोवावर होता. त्याने देवाला अशी प्रार्थना केली: “हे आमच्या देवा, परमेश्वरा, आमचं साहाय्य कर; आमची भिस्त तुझ्यावर आहे; आम्ही तुझ्या नामावर भरवसा ठेवून या समूहाशी सामना करण्यास आलो आहोत.”—२ इति. १४:११.
१५ आसाच्या सैन्याच्या तुलनेत इथियोपियाचं सैन्य दुप्पट होतं. पण आसाला पूर्ण भरवसा होता, की यहोवा शक्तिशाली आहे आणि तो आपल्या लोकांचा बचाव करेल. आणि तसंच झालं. यहोवाच्या मदतीमुळे इथियोपियाचं सैन्य हरलं.—२ इति. १४:८-१३.
१६ भविष्यात आपल्या प्रत्येकासोबत नेमकं काय होईल हे आपल्याला माहीत नाही; पण यहोवाचे लोक जो शांतीचा काळ अनुभवत आहेत तो कायम राहणार नाही हे मात्र आपल्याला नक्की माहीत आहे. कारण येशूने आधीच सांगितलं होतं, की शेवटल्या दिवसांत सर्व राष्ट्रं त्याच्या शिष्यांचा “द्वेष करतील.” (मत्त. २४:९) तसंच, प्रेषित पौलनेसुद्धा म्हटलं होतं, की “ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने जीवन जगू इच्छिणाऱ्या सर्वांचा छळ केला जाईल.” (२ तीम. ३:१२) शिवाय, सैतान आज “अतिशय क्रोधित” झाला आहे. त्यामुळे आपण जर असा विचार केला, की ‘सैतानाच्या या क्रोधाचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही,’ तर आपण स्वतःचीच फसवणूक करत असू.—प्रकटी. १२:१२.
१७ लवकरच, आपल्या सगळ्यांच्या विश्वासाची परीक्षा होणार आहे. कारण, “जगाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत आलं नाही आणि पुन्हा कधीही येणार नाही असं मोठं संकट” येणार आहे. (मत्त. २४:२१) त्या वेळी कदाचित आपल्या घरचेच लोक आपला विरोध करतील. तसंच, आपल्या प्रचाराच्या कामावर बंदीही येऊ शकते. (मत्त. १०:३५, ३६) अशा वेळी तुम्ही काय कराल? आसासारखंच तुम्हीसुद्धा मदतीसाठी आणि संरक्षणासाठी यहोवावर भरवसा ठेवाल का?
१८ पुढे येणाऱ्या परीक्षांचा सामना करण्यासाठी यहोवा आज आपल्याला तयार करत आहे. तो आपला विश्वास मजबूत करत आहे. त्यासाठी तो विश्वासू आणि बुद्धिमान दासाचा उपयोग करून आपल्याला “योग्य वेळी” आध्यात्मिक अन्न पुरवत आहे. (मत्त. २४:४५) पण यहोवावरचा आपला विश्वास मजबूत करण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतः मेहनत घेतली पाहिजे.—इब्री लोकांना १०:३८, ३९ वाचा.
१९ आसा राजाप्रमाणेच आपणसुद्धा यहोवाच्या “चरणी” लागलं पाहिजे, म्हणजेच यहोवाचा शोध घेतला पाहिजे. (२ इति. १४:४; १५:१, २) आपल्याला हे कसं करता येईल? यहोवाबद्दल शिकून आणि बाप्तिस्मा घेऊन. यहोवावरचं आपलं प्रेम वाढवण्यासाठी आपण होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. आपण हे करत आहोत की नाही, याचं परीक्षण करण्यासाठी स्वतःला विचारा: ‘मी सभांना नियमित उपस्थित राहतो का?’ आपण सभांना जातो तेव्हा आपल्याला यहोवाची सेवा करत राहण्याचं प्रोत्साहन मिळतं आणि भाऊबहिणींकडून उत्तेजन मिळतं. (मत्त. ११:२८) तसंच, आपण स्वतःला असंही विचारू शकतो: ‘मी प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या कामात पुरेपूर भाग घेण्याचा प्रयत्न करतो का? मी नियमितपणे बायबलचा अभ्यास करतो का? मी दर आठवडी माझ्या कुटुंबासोबत न चुकता कौटुंबिक उपासना करतो का?’ तुम्ही जर एकटे राहत असाल, तर स्वतःला विचारा: ‘कुटुंबासोबत मिळून उपासना करण्यासाठी जशी विशिष्ट वेळ ठरवली जाते, तशी मीसुद्धा उपासना करण्यासाठी एक विशिष्ट वेळ ठरवली आहे का?’
२० आपण स्वतःला हे प्रश्न का विचारले पाहिजेत? कारण बायबल म्हणतं, की माणूस कसा विचार करतो आणि त्याच्या मनात काय चाललं आहे याचं यहोवा परीक्षण करतो. आणि तेच आपण स्वतःही केलं पाहिजे. (१ इतिहास २८:९ वाचा.) आपल्याला जर असं जाणवलं, की आपली ध्येयं, मनोवृत्ती किंवा विचारसरणी यांत काही बदल करण्याची गरज आहे, तर ते बदल करण्यासाठी आपण यहोवाकडे मदत मागितली पाहिजे. पुढे येणाऱ्या परीक्षांसाठी स्वतःला तयार करण्याची हीच वेळ आहे. म्हणून शांतीच्या या काळाचा विचारपूर्वक वापर करण्यापासून कोणत्याही गोष्टीला आड येऊ देऊ नका!
“तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हास फळ मिळेल”
राजा आसा आपले सैन्य घेऊन यहूदीयातील डोंगरांच्या खोऱ्यातून समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने लगबगीने निघाला आहे. दरी जेथे रुंद होते तेथे आसा थांबतो व समोरचे दृश्य पाहून त्याला धक्काच बसतो. खोऱ्यात शत्रूंची छावणी आहे जी प्रचंड मोठी आहे! इथियोपियाच्या (कूशी) सैन्याची संख्या अक्षरशः दहा लाख आहे. तर, आसाच्या सैन्याची संख्या फक्त याच्या अर्धी आहे.
युद्ध अटळ आहे. पण असे असताना, आसा सर्वप्रथम काय करतो? त्याच्या सेनापतींना हुकूम देतो? सैन्याला प्रोत्साहन देतो? की त्याच्या कुटुंबाला पत्र लिहितो? तो यांपैकी काहीही करत नाही. तर हे संकट पुढ्यात असताना सर्वप्रथम तो प्रार्थना करतो.
त्याच्या प्रार्थनेविषयी पाहण्याआधी आणि त्या प्रसंगी काय घडले याचे परीक्षण करण्याआधी, आसा कशा प्रकारचा मनुष्य होता हे पाहू या. तो असा का वागला? त्याचे देवाकडे मदत मागणे योग्य होते का? यहोवा त्याच्या सेवकांच्या कार्यांना कसे आशीर्वादित करतो हे आसाच्या अहवालावरून आपल्याला कसे कळते?
आसाचा पूर्वेतिहास
इस्राएल राष्ट्राची दोन राज्यांत विभागणी झाल्यानंतरच्या २० वर्षांदरम्यान यहूदा पूर्णपणे मूर्तिपूजक बनले होते. इ.स.पू. ९७७ मध्ये आसा राजा बनला. एव्हाना राजदरबारातसुद्धा कनानच्या सुपीकतेच्या देवतांची उपासना केली जात होती. पण, आसाच्या कारकीर्दीविषयी देवाच्या प्रेरणेने लिहिलेला इतिहास सांगतो की त्याने “आपला देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे चांगले व नीट ते केले.” आसाने “अन्य देवींच्या वेद्या व उच्च स्थाने काढून टाकिली. मूर्तिस्तंभ मोडिले व अशेरा मूर्ती भंगिल्या.” (२ इति. १४:२, ३) त्याने यहूदा राज्यातून “पुरुषगमन करणाऱ्यांस” काढून टाकले जे धर्माच्या नावाखाली अनैतिक कृत्ये करत होते. पण आसा एवढ्यावरच थांबला नाही. त्याने लोकांना: “आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या चरणी लागावे आणि नियमशास्त्र व आज्ञा यांचे पालन” करावे असा आग्रह केला.—१ राजे १५:१२, १३; २ इति. १४:४.
खऱ्या उपासनेविषयी आसाचा आवेश पाहून यहोवा आनंदित झाला आणि त्याच्या आशीर्वादामुळे राजाने कितीतरी वर्षे शांती अनुभवली. म्हणून राजा म्हणू शकला: “आपण आपला देव परमेश्वर याची कास धरली आहे; आपण त्याची कास धरली आहे व त्याने आपल्याला चोहोकडून स्वास्थ्य दिले आहे.” लोकांनी या परिस्थितीचा फायदा घेऊन यहूदा राज्यातील शहरांना बळकट केले. अहवाल सांगतो: “लोक नगरे वसवून समृद्ध झाले.”—२ इति. १४:१, ६, ७.
युद्धक्षेत्रात
शास्त्रात उल्लेख केलेल्या सर्वात मोठ्या मानवी सैन्याला तोंड देण्याची वेळ आली तेव्हा आसाने प्रार्थना केली, याचे आपल्याला आश्चर्य वाटू नये. कारण, विश्वासाने केलेल्या कार्यांवर देव आशीर्वाद देतो हे आसाला माहीत होते. त्याने प्रार्थनेत यहोवाला मदतीची याचना केली. त्याला याची जाणीव होती की जर तो यहोवावर विसंबून राहिला व त्याला यहोवाची मदत मिळाली तर शत्रूंची संख्या कितीही असली व ते कितीही शक्तिशाली असले तरी काही फरक पडणार नाही. या युद्धात यहोवाचे नाव गोवलेले होते, आणि म्हणून आसाने देवाला या आधारावर अशी विनंती केली: “हे आमच्या देवा, परमेश्वरा, आमचे साहाय्य कर; आमची भिस्त तुजवर आहे; आम्ही तुझ्या नामावर भरवसा ठेवून या समूहाशी सामना करण्यास आलो आहो. हे परमेश्वरा, तू आमचा देव आहेस; मानवांचे तुजवर वर्चस्व होऊ देऊ नको.” (२ इति. १४:११) आसा जणू असे म्हणत होता: ‘यहोवा देवा, इथियोपियन सैन्याने आम्हाला नव्हे तर तुलाच ललकारले आहे. ज्यांनी तुझे नाव धारण केले आहे त्यांचा पाडाव करण्यास अशक्त मानवांना परवानगी देऊ नको.’ तेव्हा, “परमेश्वराने आसा व यहूदी यांच्यापुढे कूशी लोकांस असा मार दिला की ते पळून गेले.”—२ इति. १४:१२.
आज यहोवाच्या लोकांना बऱ्याच शक्तिशाली शत्रूंचा सामना करावा लागतो. आपण खरोखरच्या युद्धात शस्त्रांचा वापर करून त्यांच्याशी लढणार नाही. तरीही, आपण याची खातरी बाळगू शकतो की जे विश्वासू जन यहोवाच्या नावाकरता आध्यात्मिक युद्ध लढतात अशांना तो विजयी ठरवेल. व्यक्तिशः आपल्याला पुढील गोष्टींशी संघर्ष करावा लागू शकतो: सर्वत्र पसरत चाललेली नैतिक बेपर्वाईची वृत्ती, स्वतःचे दोष, किंवा आपल्या कुटुंबावर वाईट प्रभाव पाडणाऱ्या गोष्टी. आपल्यासमोर यांपैकी कोणतीही परिस्थिती असली, तरी आपण आसाच्या प्रार्थनेतून प्रोत्साहन मिळवू शकतो. त्याचा विजय हा यहोवाचा विजय होता. जे कोणी देवावर विसंबून राहतात त्यांचा नेहमी विजय होतो. कोणतीही मानवी शक्ती यहोवाला टक्कर देऊ शकत नाही.
प्रोत्साहन व एक इशारा
आसा युद्धानंतर परतला तेव्हा अजऱ्या संदेष्टा त्याला भेटायला गेला. अजऱ्याने प्रोत्साहन देण्यासोबतच एक इशाराही दिला: “हे आसा, अहो यहूदी व बन्यामिनी लोकहो, मी म्हणतो ते श्रवण करा; तुम्ही परमेश्वराच्या बरोबर राहाल तोवर तो तुमच्याबरोबर राहील; तुम्ही त्यास शरण जाल तर तो तुम्हास पावेल, पण तुम्ही त्यास सोडाल तर तो तुम्हास सोडील. . . . हिंमत धरा, तुमचे हात गळू देऊ नका, कारण तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हास फळ मिळेल.”—२ इति. १५:१, २, ७.
या शब्दांमुळे आपला विश्वास आणखी मजबूत होतो. या शब्दांवरून दिसून येते की आपण यहोवाची सेवा विश्वासूपणे केल्यास तो आपल्याला कधीच सोडणार नाही. आपण त्याच्याजवळ मदतीची याचना करतो तेव्हा तो आपले नक्की ऐकेल अशी खातरी आपण बाळगू शकतो. अजऱ्या म्हणाला “हिंमत धरा.” योग्य ते करण्यासाठी सहसा खूप धैर्याची गरज असते, पण आपल्याला हे माहीत आहे की यहोवाच्या मदतीने आपण योग्य ते करू शकतो.
आसाची आजी माका हिने “अशेराप्रीत्यर्थ एक मूर्ती घडविली होती.” त्यामुळे, तिला “राजमाता” या पदावरून काढून टाकण्याचे कठीण काम आसाला करायचे होते. त्याने हे काम पूर्ण केले आणि तिची मूर्तीही जाळून टाकली. (१ राजे १५:१३, सुबोधभाषांतर) आसाच्या निश्चयामुळे व धैर्यामुळे देवाने त्याला आशीर्वादित केले. तर मग, आपले नातेवाईक देवाला एकनिष्ठ असोत अथवा नसोत, आपण यहोवाला व त्याच्या धार्मिक तत्त्वांना कायम जडून राहिले पाहिजे. असे केल्यास, यहोवा आपल्या विश्वासू आचरणासाठी आपल्याला आशीर्वाद देईल.
उत्तरेकडे असलेल्या धर्मत्यागी इस्राएल राज्यातील लोकांनी जेव्हा पाहिले की यहोवा आसासोबत आहे तेव्हा त्यांचे थवेच्या थवे यहूदात आले. हे पाहणे आसाला मिळालेल्या आशीर्वादांपैकी एक होते. त्या लोकांना खऱ्या उपासनेबद्दल इतकी कदर होती की यहोवाच्या सेवकांमध्ये राहता यावे म्हणून त्यांनी आपली घरेदारे सोडण्याचा निर्णय घेतला. मग आसा आणि सर्व यहूदी लोकांनी आनंदाने “असा करार केला की आम्ही जिवेभावे आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर यास शरण जाऊ.” याचा परिणाम? देव “त्यांस पावला, परमेश्वराने त्यांस चोहोकडून स्वास्थ्य दिले.” (२ इति. १५:९-१५) धार्मिकतेवर प्रेम करणारे जेव्हा यहोवाची खरी उपासना स्वीकारतात तेव्हा आपल्याला किती आनंद होतो!
पण अजऱ्या संदेष्ट्याच्या शब्दांतून एक ताकीदही मिळते. त्याने म्हटले: “तुम्ही [परमेश्वरास] सोडाल तर तो तुम्हास सोडील.” आपल्यासोबत असे कधीही घडू नये, कारण याचे दुःखद परिणाम होऊ शकतात! (२ पेत्र २:२०-२२) यहोवाने आसाला ही ताकीद का दिली हे बायबलमध्ये सांगितलेले नाही, पण राजा ती पाळण्यास चुकला.
“तू मूर्खपणा केला”
आसाच्या राज्याच्या ३६ व्या वर्षी इस्राएलचा राजा बाशा यहूदाच्या विरुद्ध उठला. त्याने जेरुसलेमच्या ८ किमी उत्तरेस असलेल्या रामा शहराला बळकट करण्यास सुरुवात केली. आपल्या प्रजेने आसाला व खऱ्या उपासनेला एकनिष्ठ राहू नये या उद्देशाने कदाचित बाशाने असे केले असावे. आसाने इथियोपियन सैन्याचा सामना करताना जशी देवाची मदत घेतली होती, तशी या वेळी न घेता त्याने मानवांची मदत घेतली. त्याने सिरियाच्या (अराम) राजाला एक भेट पाठवली, व त्याला उत्तरेकडील इस्राएल राज्यावर हल्ला करण्यास सांगितले. सिरियाच्या सैन्याने काही हल्ले केल्यानंतर, बाशाने रामा शहरातून माघार घेतली.—२ इति. १६:१-५.
आसाने जे केले त्यामुळे यहोवा त्याच्यावर नाराज झाला आणि आसाला हे सांगण्यास त्याने संदेष्टा हनानी याला पाठवले. इथियोपियन सैन्याशी देवाने कशा प्रकारे व्यवहार केला होता हे आसाला माहीत असल्यामुळे, “परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करितो,” ही गोष्ट त्याने ओळखायला हवी होती. कदाचित, आसाला चुकीचा सल्ला मिळाला असावा किंवा बाशा व त्याच्या सैन्याकडून मोठा धोका नाही व त्यांना तो स्वतःहून हाताळू शकतो असा विचार त्याने केला असावा. काहीही असो, आसाने मानवी तर्काचा आधार घेतला आणि तो देवावर विसंबून राहण्यास चुकला. हनानी त्याला म्हणाला: “तू मूर्खपणा केला म्हणून यापुढे तुझ्यामागे लढाया लागणार.”—२ इति. १६:७-९.
आसाने चुकीची प्रतिक्रिया दाखवली. रागाच्या भरात, त्याने हनानी संदेष्ट्याला तुरुंगात टाकले. (२ इति. १६:१०) आसाने विचार केला असावा, ‘इतकी वर्षं विश्वासूपणे सेवा केल्यानंतर मला ताडनाची गरज आहे का?’ वाढत्या वयामुळे त्याची तर्क करण्याची शक्ती कमी झाली होती का? बायबल याविषयी काहीही सांगत नाही.
आसाच्या कारकीर्दीच्या ३९ व्या वर्षी पायाच्या व्याधीमुळे तो गंभीर रीत्या आजारी झाला. अहवाल सांगतो की “त्या रोगात तो परमेश्वरास शरण न जाता वैद्यांस शरण गेला.” त्या वेळी कदाचित आसा त्याच्या आध्यात्मिक आरोग्याकडे दुर्लक्ष करत असावा. त्याच परिस्थितीत तो त्याच्या कारकीर्दीच्या ४१ व्या वर्षी मरण पावला. शेवटपर्यंत त्याची मनोवृत्ती बदलली नव्हती.—२ इति. १६:१२-१४.
आसाच्या हातून चुका झाल्या, पण त्यांच्या तुलनेत त्याचे चांगले गुण व खऱ्या उपासनेबद्दल असलेला त्याचा आवेश वरचढ ठरला असे दिसते. त्याने यहोवाची सेवा करण्याचे कधीही सोडले नाही. (१ राजे १५:१४) हे लक्षात घेता, या जीवन कथेवरून आपण काय शिकू शकतो? गतकाळात यहोवाने आपल्याला कशा प्रकारे मदत केली यावर आपण मनन केले पाहिजे. या आठवणी आपल्याला नव्या समस्यांचा सामना करताना देवाच्या साहाय्यासाठी प्रार्थना करण्यास प्रवृत्त करतील. कित्येक वर्षांपासून देवाची सेवा विश्वासूपणे केली असल्यामुळे आपल्याला ताडनाची गरज नाही असा आपण विचार करू नये. आपला पूर्वेतिहास काहीही असो, आपण चुकल्यास यहोवा आपल्याला ताडन देईल. सुधारणा करण्यास सांगितले जाते तेव्हा आपण नम्रपणे त्याचा स्वीकार केला पाहिजे जेणेकरून आपल्याला फायदा होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण जर आपल्या स्वर्गीय पित्याची सेवा करत राहिलो, तर तो आपल्याला कधीही सोडणार नाही. यहोवाचे नेत्र सबंध पृथ्वीवर विश्वासू लोकांचा शोध घेत असतात. अशा लोकांच्या साहाय्यासाठी आपल्या शक्तीचा वापर करण्याद्वारे तो त्यांना आशीर्वाद देतो. यहोवाने आसाच्या बाबतीत हे केले आणि आपल्याही बाबतीत तो हेच करेल.
अध्याय २९
“माझा देव यहोवा आहे”
इन्साइट “कावळा, डोमकावळा किंवा रानकावळा” ¶५
कावळा, डोमकावळा किंवा रानकावळा
डोमकावळा किंवा रानकावळा हा सहसा पाहायला मिळणारा कावळा नसून डोंगराळ प्रदेशात किंवा वाळवंटी भागात सापडणारा एक रानटी पक्षी आहे. रिकाम्या आणि ओसाड पडलेल्या एदोमच्या स्थितीची कल्पना करत असताना यशयाने या पक्षाचासुद्धा उल्लेख केला आहे. (यश ३४:११) सहसा हे पक्षी खडकांच्या भेगांमध्ये आणि पानांखाली अन्नाचा साठा करत असतात. देवाने जेव्हा एलीयाला करीथच्या खोऱ्यात लपून राहायला सांगितलं होतं, तेव्हा देवाने चमत्कारिकपणे या पक्षांचा वापर करून दिवसांतून दोनदा त्याला भाकरी आणि मांस पुरवलं होतं.—१रा १७:२-६.
इन्साइट “एलीया” क्र. १ ¶११
एलीया
चमत्कार. एलीयाने आठ चमत्कार केले हे बायबलमधल्या अहवालांमधून आपल्याला कळतं. ते म्हणजे, (१) त्याने पाऊस थांबवला, (२) त्याने सारफथच्या विधवेचं पीठ आणि तेल संपू दिलं नाही, (३) त्याने विधवेच्या मुलाचं पुनरुत्थान केलं, (४) त्याने प्रार्थना करून आकाशातून अग्नी आणला, (५) त्याच्या प्रार्थनेमुळे पाऊस पडून दुष्काळ संपला, (६) त्याने अहज्या राजाचा अधिकारी आणि त्याच्या ५० सैनिकांवर अग्नी आणून त्यांना भस्म केलं, (७) त्याने राजाने पाठवलेल्या दुसऱ्या अधिकाऱ्यावर आणि त्याच्या ५० सैनिकांवर अग्नी आणून त्यांना भस्म केलं, आणि (८) त्याने आपला झगा यार्देन नदीच्या पाण्यावर मारला आणि पाण्याचे दोन भाग केले. याशिवाय एलीया चमत्कारिकपणे वर आकाशातसुद्धा गेला होता. पण ही गोष्ट त्याने प्रार्थना केल्यामुळे किंवा बोलल्यामुळे झाली नव्हती तर ती स्वतः देवाने घडवून आणली होती.
सर्व लोकांसाठी पुस्तक १७ ¶३
हे पुस्तक भरवसालायक आहे का?
काही ठिकाणी विशिष्ट तपशील वगळल्यामुळे त्या त्या बायबल लेखकाच्या विश्वासार्हतेत उलट भरच पडते. उदाहरणार्थ, १ राजे या पुस्तकाचा लेखक इस्राएलातील भयंकर दुष्काळाविषयी सांगतो. दुष्काळ एवढा भयंकर होता की पुरेसे पाणी आणि गवत न मिळाल्यामुळे राजाच्या घोड्यांवर आणि खेचरांवर शेवटी मरण्याची पाळी आली. (१ राजे १७:७; १८:५) पण, त्याच अहवालात पुढे संदेष्टा एलिया अंदाजे १,००० चौरस मीटरचे क्षेत्रफळ असलेली खळगी भरू शकेल इतके पाणी कर्मेल पर्वतावर (एका यज्ञाच्या संबंधाने उपयोगात आणण्याकरता) त्याच्यासमोर आणावे अशी मागणी करतो असेही वृत्त आहे. (१ राजे १८:३३-३५) ऐन दुष्काळात, एवढे पाणी आले तरी कोठून? १ राजे पुस्तकाच्या लेखकाने याविषयी खुलासा करण्याची तसदी घेतली नाही. तथापि, इस्राएलात राहणाऱ्या प्रत्येकाला याविषयी माहिती होती की कर्मेल हे भूमध्य समुद्राच्या तटाशी आहे, शिवाय याच वृत्तात नंतर आलेल्या एका विधानातूनही याविषयी अनायासे संकेत मिळतो. (१ राजे १८:४३) अर्थातच, समुद्रातील पाणी सहज उपलब्ध झाले असावे. अन्य ठिकाणी तपशीलवार माहिती पुरवणारे हे पुस्तक वस्तुस्थितीच्या नावाखाली निव्वळ काल्पनिक साहित्य असल्यास याचा लेखक नक्कीच थापा मारण्यात चांगलाच तरबेज असावा; पण असे असल्यास त्याने आपल्या लेखनात इतक्या सहज लक्षात येण्यासारखी तफावत कशी काय राहू दिली असती बरे?
टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१४ २/१ १२ ¶३
अन्याय होत असतानाही तो विश्वासात टिकून राहिला
एलीयाला आपली जबाबदारी दुसऱ्याला सोपवण्याबद्दल किंवा आपल्याला मिळालेला बहुमान दुसऱ्याला देण्याबद्दल संकोच वाटत होता का? किंवा पुढे आपली जागा दुसरं कोणीतरी घेईल, अशी भीती त्याला होती का? हे आपल्याला नक्की सांगता येणार नाही. कदाचित आलेही असतील. कारण तोसुद्धा “आपल्यासारख्याच भावना असलेला माणूस होता.” (याकोब ५:१७) काहीही असो, पण बायबलमध्ये म्हटलंय: “एलीया त्याच्याजवळ गेला आणि त्याने आपला झगा त्याच्यावर टाकला.” (१ राजे १९:१९) एलीयाचा झगा (कादाचित मेंढीच्या किंवा बकरीच्या कातडीपासून बनवलेला) यहोवाकडून त्याला मिळालेल्या खास जबाबदारीला सूचित करत होता. एलीयाने तो झगा अलीशाच्या खांद्यावर टाकला तेव्हा त्याचा खास अर्थ होता. असं करून त्याने यहोवाच्या आज्ञेप्रमाणे अलीशाला आपल्या जागी नियुक्त केलं होतं. अशा प्रकारे एलीयाने यहोवावर भरवसा ठेवला आणि त्याची आज्ञा पाळली.
वेब सिरीझ “बायबल अभ्यासाचा उपक्रम”
खऱ्या उपासनेची बाजू घ्या!
तरुणांसाठी
सूचना: एखाद्या शांत ठिकाणी हा अभ्यास करा. वचनं वाचत असताना ती घटना आपल्या डोळ्यांसमोर उभी करा. तुम्ही तिथे आहात अशी कल्पना करा. तिथल्या लोकांचे आवाज ऐकायचा प्रयत्न करा. तसंच त्यांच्या मनात काय चाललंय हे समजून घ्यायचाही प्रयत्न करा.
मुख्य व्यक्ती: एलीया, अहाब आणि जवळपास ४५० बआल संदेष्टे
सारांश: यहोवा बआलपेक्षा श्रेष्ठ आहे, हे एलीया सिद्ध करतो.
१ घटनेचा विचार करा. —१ राजे १८:१७-४० वाचा.
एका कागदावर एलीयाचं, बआल संदेष्ट्यांचं आणि वेदींचं चित्र काढा.
२६ ते २९ वचनांत दिलेल्या घटनांची कल्पना करताना तुम्हाला कोणकोणते आवाज ऐकू येत आहेत?
. . . . .
एलीया बआल संदेष्ट्यांशी कशा प्रकारे बोलला असावा, त्याच्या काय भावना असतील?
. . . . .
२ आणखी खोलवर अभ्यास करा.
अहाब राजाशी बोलायला आणि बआलच्या शेकडो संदेष्ट्यांना खोटं ठरवायला एलीयाला हिमतीची गरज का होती? (उत्तरासाठी १ राजे १८:४, १३, १४ वाचा.)
. . . . .
आपल्या प्रकाशनांचा वापर करून बआल उपासनेबद्दल थोडीफार माहिती शोधा. जसं की, बआल उपासनेत कायकाय केलं जायचं? बआलची उपासना केल्यामुळे इस्राएली लोकांवर कोणते वाईट परिणाम झाले?
. . . . .
एलीयाने यहोवाच्या वेदीभोवती एक मोठा खड्डा खोदून त्यात पाणी का टाकलं असेल?
. . . . .
३ शिकलेल्या गोष्टी लागू करा. खाली दिलेल्या गोष्टींबद्दल तुम्ही काय शिकलात ते लिहून काढा.
खऱ्या उपासनेची बाजू घ्यायला लागणारं धाडस.
. . . . .
अशा प्रकारचं धाडस दाखवणाऱ्यांना मिळणारे फायदे.
. . . . .
मला एलीयासारखं धाडस कसं दाखवता येईल?
मला कोणकोणत्या वेळी खऱ्या उपासनेची बाजू घ्यायची गरज पडू शकते?
. . . . .
४ या घटनेतल्या कोणत्या भागातून तुम्हाला जास्त शिकायला मिळालं आणि का?
. . . . .
अध्याय ३०
मृत्यू समोर असतानाही तिने धैर्य दाखवलं
इन्साइट “सीदोन” ¶६
सीदोन
सीदोनचा धर्म आणि त्याचे परिणाम. सीदोनी लोकांच्या धार्मिक चालिरीती पाहिल्या तर कळतं, की ते लोक खूप भ्रष्ट होते. अष्टरोथ देवीशी संबंधित अश्लील लैंगिक कृत्यं त्यांच्या उपासनेचा प्रमुख भाग होता. इस्राएली लोकांनी सीदोनी लोकांना त्यांच्यात राहू दिलं आणि त्यामुळे त्यांनी इस्राएली लोकांना खोट्या दैवतांची उपासना करायला भाग पाडलं. (शास १०:६, ७, ११-१३) शलमोनने ज्या विदेशी स्त्रियांशी लग्न केलं होतं त्यांच्यापैकी काही सीदोनच्या होत्या. त्यामुळे शलमोन राजासुद्धा अष्टरोथ या घृणास्पद प्रजनन देवीची उपासना करू लागला. (१रा ११:१, ४-६; २रा २३:१३) अहाब राजानेसुद्धा सीदोनच्या राजाची मुलगी ईजबेल हिच्याशी लग्न करून यहोवाच्या नजरेत वाईट ते केलं. ईजबेलनेसुद्धा इस्राएलमध्ये खोट्या उपासनेला प्रोत्साहन दिलं.—१रा १६:२९-३३; १८:१८, १९.
इन्साइट “एथबाल”
एथबाल
(एथ·बआल) [बआलसोबत].
सीदोनी लोकांचा राजा आणि अहाब राजाची बायको ईजबेल हिचे वडील. (१रा १६:३१) एथबालने आपल्या मुलीचं लग्न अहाब राजाशी लावून त्याच्यासोबत राजकीय संबंध जोडले. असं दिसतं, की एथबाल हे इथोबालचं दुसरं नाव आहे. इथोबाल कोण होता याबद्दल इतिहासकार मीनॅन्डरने सांगितलं आहे आणि त्याचाच संदर्भ जोसिफसने आपल्या लिखाणात दिला आहे. या संदर्भानुसार इथोबाल हा अष्टरोथ (अस्तार्ते) देवीचा पुजारी होता. या पुजाऱ्याने सोरचा राजा हीराम याचा वंशजाची, फेलेसची हत्या करून राज्यपद बळकावलं होतं. देवाचं मंदिर बांधताना शलमोन राजाने याच हीराम राजासोबत व्यवहार केला होता. असं म्हटलं जातं, की एथबालने त्याच्या ४८ वर्षांच्या आयुष्यात ३२ वर्षं राज्य केलं. त्याच्या शासनकाळात खूप व्यावसायिक विस्तार झाल्याचं मीनॅन्डरच्या लिखाणातून समजतं. त्यात लिब्यामधलं ऑझा शहर उभं केल्याचं सांगितलं आहे. त्याच्या शासनकाळात एक वर्ष दुष्काळ पडल्याचा उल्लेखही मीनॅन्डरच्या लिखाणात मिळतो.—जुइश ॲन्टीक्वीटीज, VIII, ३२४ (xiii, २).
सावध राहा९३ ११/२२ १३ ¶१-४
ख्रिसमस, ईस्टर आणि हॅलोवीन यांचा खरा उगम
ईस्टर या सणाची सुरुवात अगदी सूर्योदयापासून होते. संपूर्ण कुटुंब भक्तिभावाने सकाळीच उठतं. मुलं नवीन कपडे आणि हॅट घालून तयार होतात. या सणात सशांची प्रतिकं, रंगीत अंड्यांनी भरलेल्या टोपल्या आणि खास तयार केलेले बन वापरले जातात. पण या सणाची सुरुवात झाली कशी?
फोनिशियामध्ये (फेनिकेमध्ये) राहणाऱ्या लोकांसाठी वसंत ऋतूचा काळ खूप खास असायचा. त्या काळात, लोक लिंगपूजा (सेक्स उपासना) करायचे. अंडी आणि ससे ही त्यांच्या अस्तार्ते किंवा इश्तार (ग्रीक लोकांची ॲफ्रोडाइट देवी) या प्रजनन देवीची प्रतिकं होती. असं मानलं जायचं, की तिची रक्ताची तहान आणि लैंगिक वासनेची भूक कधीच संपत नव्हती. तिचं चित्रण अतिशय भडक लैंगिक अवयव असललेल्या मूर्तींनी केलं जायचं. तिच्या हातात एक अंडे आणि बाजूला ससा दाखवला जायचा. वेश्याव्यवसाय तिच्या उपासनेचा भाग होता आणि ते पवित्र मानलं जायचं. याच प्रजनन देवीला कनान देशात बआल दैवताची पत्नी मानलं जायचं. तिची उपासना करणारे बेसुमार दारू पिऊन रंगेलपणे वागायचे आणि एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवायचे. त्यांचं असं मानणं होतं, की हे पाहून बआल दैवताला या देवीसोबत लैंगिक संबंधाचा पुरेपूर आनंद घेता येईल. रिसेन्ट डिस्कव्हरीज इन बायबल लँड्स या पुस्तकात असं म्हटलंय, की “दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी सापडल्या नसतील इतक्या मोठ्या प्रमाणात इथे प्रजनन देवीच्या नग्न मूर्ती सापडल्या आहेत. त्यांपैकी काही तर खूपच अश्लील स्वरूपाच्या आहेत.”
कारथेज नावाच्या एका ठिकाणी तिच्या स्मारकांखाली भडक रंगांचे कलश सापडले आहेत. त्यांत लहान मुलांची जळालेली हाडं होती. या मुलांचे पालक सहसा श्रीमंत आणि नवाजलेले असायचे आणि आपली भरभराट व्हावी आणि समाजात आपलं मोठं नाव टिकून राहावं म्हणून ते आपल्या मुलांचा बळी द्यायचे. काही कलशांमध्ये तर एकाच कुटुंबातल्या वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांच्या अस्थी सापडल्या आहेत.
या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर लक्षात येतं, की प्राचीन रितीरिवाजांमध्ये आणि आजच्या रूढीपरंपरांमध्ये फारसा फरक नाही. ईस्टर हे नावसुद्धा प्राचीन मूर्तिपूजक नावापेक्षा वेगळं नाही. तर मग, देवाच्या पवित्र मुलाचा सन्मान करायचा हा एक मार्ग कसा असू शकतो?
सारफथच्या विधवेला तिच्या विश्वासाचे प्रतिफळ मिळाले
विधवेच्या विश्वासाची आणखी एक परीक्षा होणार होती. अहवालात पुढे असे म्हटले आहे: “यानंतर घरधनिणीचा मुलगा आजारी पडला, त्याचा रोग इतका वाढला की त्याचा श्वास बंद झाला.” आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे दुःखी असलेली ती स्त्री एलीयाला म्हणाली, “अहो देवाचे माणूस, आपला माझा काय संबंध? माझ्या पातकांचे मला स्मरण द्यावे व माझ्या मुलास मारून टाकावे म्हणून आपण माझ्या घरी आला आहा का?” (१ राजे १७:१७, १८) तिच्या या कटू शब्दांचा काय अर्थ होतो?
त्या स्त्रीला तिने केलेले एखादे पाप आठवले होते का जे तिच्या विवेकाला बोचत होते? तिने असा विचार केला का, की तिच्या मुलाचा मृत्यू ही देवाकडून शिक्षा आहे आणि त्यासाठीच देवाने एलीयाला पाठवले आहे? बायबल याबद्दल आपल्याला काहीच सांगत नाही. पण, एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, की देव अनीतीने वागला आहे असा आरोप त्या विधवेने केला नाही.
देवाची कृपापसंती प्राप्त केल्याने सार्वकालिक जीवन मिळते
“तूच नीतिमानाला आशीर्वाद देतोस; हे परमेश्वरा, तू त्याच्याभोवती कवचाप्रमाणे कृपेचे वेष्टन घालितोस.”—स्तो. ५:१२.
सारफथ येथील एक स्त्री आणि तिचा मुलगा भुकेले होते; देवाचा संदेष्टा एलीयादेखील भुकेला होता. ती विधवा स्त्री जेवण बनवण्यासाठी लाकडे गोळा करत असताना, एलीया संदेष्ट्याने तिला प्यायला पाणी व खायला अन्न मागितले. तिने त्याला पाणी देण्याची तयारी दाखवली. पण खाण्यासाठी तिच्याकडे केवळ “मडक्यात मूठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल” होते. संदेष्ट्याला खाण्यासाठी आपण काहीच देऊ शकत नाही असे तिला वाटले, आणि तिने त्याला तसे सांगितलेदेखील.—१ राजे १७:८-१२.
२ असे असले, तरी त्याने तिला म्हटले, “तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. इस्राएलांचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टि करील त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही.”—१ राजे १७:१३, १४.
३ आपल्याजवळ असलेले थोडेसे अन्न त्या संदेष्ट्यासोबत वाटून खावे की नाही याहीपेक्षा अधिक महत्त्वाचा निर्णय त्या विधवा स्त्रीला घ्यायचा होता. यहोवा, आपला व आपल्या मुलाचा बचाव करेल यावर ती भरवसा ठेवणार होती का, की देवाची कृपापसंती मिळवणे व त्याच्यासोबत घनिष्ठ नातेसंबंध जोडणे यापेक्षा तिला आपल्या भौतिक गरजा पूर्ण करणे जास्त महत्त्वाचे वाटणार होते? आज आपल्या सर्वांसमोर असाच प्रश्न आहे. भौतिक किंवा आर्थिक सुरक्षा मिळवण्यास झटण्यापेक्षा यहोवाची कृपापसंती मिळवण्यास आपण जास्त महत्त्व देऊ का? देवावर भरवसा ठेवण्याची व त्याची सेवा करण्याची अनेक कारणे आपल्याजवळ आहेत. आणि त्याची कृपापसंती मिळवण्यास झटण्यासाठी व त्याची कृपापसंती मिळण्यासाठी आपण पावले उचलू शकतो.
उपासना “स्वीकार करावयास तू योग्य आहेस”
४ मानवांनी स्वीकारयोग्य पद्धतीने आपली उपासना करावी अशी अपेक्षा करण्याचा यहोवाला अधिकार आहे. या गोष्टीला स्वर्गातील त्याच्या सेवकांच्या एका गटाने एकमताने दुजोरा दिला. त्यांनी म्हटले: “हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले; तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.” (प्रकटी. ४:११) यहोवा सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता असल्याकारणाने आपली उपासना स्वीकार करावयास योग्य आहे.
५ यहोवाची उपासना करण्याचे आणखी एक कारण आपल्याजवळ आहे. ते म्हणजे त्याचे आपल्यावरील अपार प्रेम. बायबल म्हणते, की “देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली.” (उत्प. १:२७) देवाची सेवा करायची की नाही हे ठरवण्याचा विशेषाधिकार आणि जबाबदारी देवाने मानवांना दिली आहे. आणि हा निर्णय घेण्याची क्षमतादेखील त्याने त्यांना दिली आहे. आपल्याला जीवन देण्याद्वारे, यहोवा मानवजातीचा पिता बनला. (लूक ३:३८) आपल्या मुलामुलींना जीवनाचा आनंद लुटता यावा म्हणून त्याने एका प्रेमळ पित्याप्रमाणे, त्यांना हव्या असलेल्या सर्व गोष्टींची तरतूद केली आहे. आपल्या पृथ्वी ग्रहाने सुंदर वातावरणात आपल्याकरता भरपूर अन्न उत्पन्न करावे म्हणून तो पृथ्वीवर “आपला सूर्य उगवितो” आणि “पाऊस पाडितो.”—मत्त. ५:४५.
६ यहोवाने पापाच्या भयंकर परिणामांपासूनही आपली सुटका केली आहे. पाप करण्याद्वारे आदाम अशा एका जुगाऱ्याप्रमाणे बनला जो जुगार खेळण्यात आपली सर्व संपत्ती उधळून टाकतो. आदामाने यहोवाविरुद्ध बंड करून आपल्या मुलांचे भवितव्य अर्थात अनंतकाळचा आनंद हिरावून घेतला. त्याच्या स्वार्थामुळे मानव एका क्रूर धन्याचे म्हणजे अपरिपूर्णतेचे गुलाम बनले. त्यामुळे, सर्व मानव आजारी पडतात, दुःख अनुभवतात आणि कालांतराने मरतात. गुलामाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्याचा मोबदला द्यावा लागतो. त्याचप्रमाणे यहोवानेसुद्धा मोबदला दिला आहे जेणेकरून अपरिपूर्णतेच्या त्या भयंकर परिणामांपासून आपली सुटका होऊ शकते. (रोमकर ५:२१ वाचा.) येशू ख्रिस्ताने आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी “पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण” केला. (मत्त. २०:२८) लवकरच, या खंडणीचे पूर्ण फायदे, देवाची कृपापसंती प्राप्त करणाऱ्यांना मिळतील.
७ आपल्याला आनंदी व उद्देशपूर्ण जीवन देण्यासाठी आपल्या निर्माणकर्त्याने म्हणजे यहोवाने इतर कोणाहीपेक्षा जास्त केले आहे. आपल्यावर त्याची कृपापसंती असल्यामुळे, आतापर्यंत मानवजातीला झालेले नुकसान भरून काढण्यासाठी तो कशा प्रकारे कार्य करतो हे पाहण्याची संधी आपल्याला मिळेल. यहोवाचा “शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा” कसा बनतो हे तो आपल्यापैकी प्रत्येकाला पुढेही दाखवत राहील.—इब्री ११:६.
“तुझे लोक संतोषाने पुढे होतात”
८ देवाची कृपापसंती प्राप्त करण्यासाठी आपण आपल्या इच्छास्वातंत्र्याचा उचितपणे वापर केला पाहिजे. कारण, यहोवा कोणालाही त्याची सेवा करण्याची जबरदस्ती करत नाही. यशयाच्या दिवसांत त्याने असे विचारले: “मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?” यशयाला निर्णय घेण्याचा हक्क आहे याची जाणीव बाळगून यहोवाने त्याचा आदर केला. “हा मी आहे, मला पाठीव,” असे म्हणण्यात यशयाला किती आनंद झाला असेल याचा विचार करा.—यश. ६:८.
९ देवाची सेवा करावी की नाही हे ठरवण्याचे स्वातंत्र्य मानवांना आहे. आपण स्वखुशीने यहोवाची सेवा करावी अशी त्याची इच्छा आहे. (यहोशवा २४:१५ वाचा.) जे रडतखडत देवाची उपासना करतात अशा लोकांची उपासना तो स्वीकारत नाही. तसेच, ज्यांचा मुख्य हेतू इतरांना खूश करणे हा असतो अशा लोकांची भक्तीदेखील तो स्वीकारत नाही. (कलस्सै. ३:२२) सांसारिक गोष्टींना आपल्या उपासनेच्या आड येऊ देऊन पवित्र सेवा करण्याच्या बाबतीत आपण “हयगय” केल्यास, आपल्यावर देवाची कृपापसंती होणार नाही. (निर्ग. २२:२९) पूर्ण मनाने यहोवाची सेवा करणे आपल्याच भल्यासाठी आहे हे त्याला माहीत आहे. मोशेने इस्राएलांना आर्जवले, की त्यांनी ‘आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीति करण्याद्वारे, त्याची वाणी ऐकण्याद्वारे व त्याला धरून राहण्याद्वारे’ जीवनाची निवड करावी.—अनु. ३०:१९, २०.
१० प्राचीन इस्राएलचा राजा दावीद याने एका स्तोत्रात असे गायिले: “तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात, पावित्र्याने मंडित झालेले तुझे तरुण तुला पहाटेच्या दहिवरासारखे आहेत.” (स्तो. ११०:३) आज पुष्कळ लोक आर्थिक सुरक्षा व ऐशआराम यांना जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व देतात. पण, जे यहोवावर प्रेम करतात ते आपल्या जीवनात त्याच्या सेवेला सगळ्यात जास्त महत्त्व देतात. ते ज्या आवेशाने सुवार्तेचा प्रचार करतात त्यावरून हे स्पष्टपणे दिसून येते. यहोवा आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करेल यावर त्यांचा पूर्ण भरवसा आहे.—मत्त. ६:३३, ३४.
देवाला स्वीकारयोग्य अशी अर्पणे
११ नियमशास्त्राच्या कराराधीन असल्यामुळे देवाची कृपापसंती प्राप्त करण्यासाठी देवाचे लोक त्याला स्वीकारयोग्य अशी बलिदाने अर्पण करायचे. लेवीय १९:५ मध्ये असे म्हटले आहे: “तुम्ही परमेश्वराप्रीत्यर्थ शांत्यर्पणाचा यज्ञ कराल तेव्हा तुम्ही मला मान्य व्हाल असा तो करा.” याच पुस्तकात आपल्याला असे वाचायला मिळते: “तुम्ही परमेश्वराप्रीत्यर्थ उपकारस्तुतीच्या बलीचा यज्ञ कराल तेव्हा तुमचा स्वीकार होईल अशा प्रकारे तो करा.” (लेवी. २२:२९) इस्राएली लोकांनी यहोवाच्या वेदीवर पशूंची योग्य बलिदाने अर्पण केली, तेव्हा हळूहळू वर जाणारा धूर खऱ्या देवाकरता “सुवासिक हव्य” असा होता. (लेवी. १:९, १३) देवाच्या लोकांनी त्याच्याबद्दल दाखवलेल्या अशा प्रेमळ अभिव्यक्तींमुळे त्याचे मन प्रसन्न व प्रफुल्लित व्हायचे. (उत्प. ८:२१) नियमशास्त्राच्या या पैलूंत आपल्याला एक तत्त्व सापडते, जे आजदेखील लागू होते. ते हेच, की जे लोक यहोवाला स्वीकारयोग्य बलिदाने अर्पण करतात, त्यांना त्याची कृपापसंती प्राप्त होते. तर मग, तो कोणत्या प्रकारची बलिदाने स्वीकार करतो? जीवनातील दोन पैलू विचारात घ्या: आपले आचरण व आपले बोलणे.
१२ प्रेषित पौलाने रोमकरांना लिहिलेल्या आपल्या पत्रात असे म्हटले: “तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी.” (रोम. १२:१) देवाची कृपापसंती प्राप्त करण्यासाठी एका व्यक्तीने आपले शरीर देवाला स्वीकारयोग्य असे ठेवले पाहिजे. जर तिने तंबाखू, सुपारी, अंमली पदार्थ सेवन केले किंवा दारूची नशा केली, तर तिच्या अर्पणाला काहीही किंमत राहणार नाही. (२ करिंथ. ७:१) शिवाय, “जो जारकर्म करितो तो आपल्या शरीराबाबत पाप करितो;” त्यामुळे, कोणत्याही प्रकारचे अनैतिक कृत्य करणाऱ्या व्यक्तीचे बलिदान यहोवाला घृणास्पद वाटते. (१ करिंथ. ६:१८) देवाचे मन आनंदित करण्यासाठी, एका व्यक्तीने ‘सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र असले’ पाहिजे.—१ पेत्र १:१४-१६.
१३ आपण करत असलेल्या आणखी एका अर्पणामुळे यहोवाला आनंद होतो. ते म्हणजे, आपले बोलणे. यहोवावर प्रेम करणाऱ्यांनी आपल्या बोलण्याद्वारे सार्वजनिक रीत्या व एकांतात नेहमीच त्याची प्रशंसा केली आहे. (स्तोत्र ३४:१-३ वाचा.) स्तोत्रे १४८-१५० वाचा आणि या तीन स्तोत्रांत यहोवाची स्तुती करण्याचे उत्तेजन किती वेळा दिले आहे ते पाहा. खरेच, “सरळ माणसांना स्तुतिगान शोभते.” (स्तो. ३३:१) आणि आपला आदर्श, येशू ख्रिस्त याने सुवार्तेचा प्रचार करण्याद्वारे देवाची स्तुती करण्याच्या महत्त्वावर भर दिला आहे.—लूक ४:१८, ४३, ४४.
१४ आपण आवेशाने प्रचार करतो तेव्हा यहोवावर आपले किती प्रेम आहे आणि त्याची कृपापसंती प्राप्त करण्याची आपल्याला किती इच्छा आहे हे दिसून येते. उदाहरणार्थ, खोट्या उपासनेच्या मागे लागून देवाची कृपापसंती गमावलेल्या इस्राएली लोकांना होशेय संदेष्ट्याने कसे प्रोत्साहन दिले होते ते पाहा. (होशे. १३:१-३) होशेयने त्यांना अशी विनवणी करण्यास सांगितले: “तू [यहोवा] सर्व अन्याय दूर कर आणि जे चांगले आहे त्याचा स्वीकार कर; म्हणजे आम्ही आपले ओठ वासरे असे अर्पू.”—होशे. १४:१, २, पं.र.भा.
१५ इस्राएली लोक यहोवाला अर्पण करत असलेल्या पशूंपैकी वासरे सगळ्यात महाग होते. म्हणून, “आपले ओठ वासरे असे अर्पू” हा वाक्यांश, खऱ्या देवाची स्तुती करण्यासाठी मनापासून व विचारपूर्वक उच्चारलेल्या शब्दांना सूचित करतो. अशा प्रकारचे अर्पण करणाऱ्यांबद्दल यहोवाला कसे वाटले? त्याने म्हटले: ‘मी त्यांजवर मोकळ्या मनाने प्रीति करीन.’ (होशे. १४:४) अशी स्तुतीची बलिदाने अर्पण करणाऱ्यांना यहोवाने क्षमा केली, त्यांच्याबद्दल आपली कृपापसंती व्यक्त केली आणि तो त्यांचा मित्र बनला.
१६ सार्वजनिक रीत्या यहोवाची स्तुती करणे हे नेहमीच खऱ्या उपासनेचे महत्त्वाचे अंग राहिले आहे. खऱ्या देवाची महिमा करणे स्तोत्रकर्त्याला इतके महत्त्वाचे वाटले की त्याने देवाला अशी विनवणी केली: “हे परमेश्वरा, माझ्या तोंडची वचने ही स्वखुशीची अर्पणे समजून मान्य कर.” (स्तो. ११९:१०८) आजच्याबद्दल काय? आज आपल्या काळातील एका मोठ्या लोकसमुदायाबद्दल बोलताना, यशयाने अशी भविष्यवाणी केली: ‘ते परमेश्वराचा आनंदभराने गुणानुवाद करितील. ते [त्यांच्या भेटवस्तू] मला पसंत पडून माझ्या [देवाच्या] वेदीवर चढतील.’ (यश. ६०:६, ७) या भविष्यवाणीच्या पूर्ततेत, आज लाखो लोक ‘देवाचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ त्याला नित्य अर्पण करत’ आहेत.—इब्री १३:१५.
१७ तुमच्याबद्दल काय? तुम्ही देवाला स्वीकारयोग्य अशी बलिदाने अर्पण करत आहात का? नसाल, तर तुम्ही आवश्यक ते बदल करून यहोवाची सार्वजनिक रीत्या स्तुती करण्यास सुरुवात कराल का? देवावरील विश्वासामुळे प्रेरित होऊन तुम्ही सुवार्तेचा प्रचार करण्यास सुरुवात करता, तेव्हा तुमचे अर्पण बैलांच्या अर्पणापेक्षा जास्त “परमेश्वराला आवडेल.” (स्तोत्र ६९:३०, ३१ वाचा.) तुम्ही याची खातरी बाळगू शकता की तुमच्या स्तुतीच्या अर्पणांचा ‘सुगंध’ यहोवापर्यंत पोहचेल आणि तो तुमच्या अर्पणांचा स्वीकार करेल. (यहे. २०:४१) तुमच्या आनंदाला तेव्हा पारावार उरणार नाही.
यहोवा स्वतः ‘नीतिमानाला आशीर्वाद देईल’
१८ मलाखीच्या दिवसांतील काही लोकांनी काढला तसाच निष्कर्ष आज पुष्कळ लोक काढतात, की “देवाची सेवा करणे व्यर्थ आहे; त्याने आज्ञापिल्याप्रमाणे आम्ही केले व सेनाधीश परमेश्वरापुढे आम्ही शोकवस्त्रे धारण करून चाललो यापासून लाभ काय?” (मला. ३:१४) भौतिकवादाच्या मागे लागल्यामुळे, त्यांना असे वाटते की देवाचा उद्देश कधीही पूर्ण होणार नाही आणि त्याचे नियम आपल्या काळाला लागू होत नाहीत. त्यांच्या मते, सुवार्तेचा प्रचार करणे म्हणजे निव्वळ वेळ वाया घालवणे आणि डोकेदुखी आहे.
१९ अशा प्रवृत्तीची सुरुवात एदेन बागेत झाली होती. सैतानाने हव्वेला यहोवाने दिलेल्या अद्भुत जीवनाच्या खऱ्या किंमतीचा अनादर करण्यास आणि देवाच्या कृपापसंतीला तुच्छ लेखण्यास प्रवृत्त केले होते. आजही, सैतान लोकांना असे मानण्यास प्रवृत्त करतो की देवाच्या इच्छेप्रमाणे केल्याने काहीही प्राप्त होणार नाही. पण, हव्वा आणि तिचा पती आदाम यांना कळून चुकले की देवाची कृपापसंती गमावणे म्हणजे आपला जीव गमावणे. आज जे लोक त्यांच्या वाईट उदाहरणाचे अनुकरण करतात, त्यांनादेखील लवकरच त्याच कटू सत्याचा अनुभव येईल.—उत्प. ३:१-७, १७-१९.
२० आदाम व हव्वा यांचा दुःखद अंत आणि एलीया व सारफथची विधवा यांच्याविषयी याआधी उल्लेख केलेल्या घटनांच्या शेवटी जे घडले याची तुलना करा. एलीयाचे प्रोत्साहनदायक शब्द ऐकल्यानंतर त्या विधवा स्त्रीने तिच्याजवळ जे काही अन्न होते ते शिजवून आधी एलीयाला खायला दिले. मग, यहोवाने एलीयाद्वारे दिलेले आपले वचन पूर्ण केले. बायबलमधील अहवाल म्हणतो: “तो, ती व तिचे कुटुंब यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला. परमेश्वर एलीयाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपीहि आटली नाही.”—१ राजे १७:१५, १६.
२१ सारफथच्या विधवेने असे काहीतरी केले जे आज हयात असलेल्या अब्जावधी लोकांपैकी केवळ मोजकेच लोक करायला तयार होतील. तिने तारण करणाऱ्या देवावर पूर्ण भरवसा ठेवला, आणि देवाने तिचा भरवसा तोडला नाही. या व बायबलमधील अशा इतर अहवालांवरून सिद्ध होते की यहोवावर आपण पूर्णपणे भरवसा ठेवू शकतो. (यहोशवा २१:४३-४५; २३:१४ वाचा.) यहोवाची कृपापसंती असलेल्यांना तो कधीही त्यागणार नाही याचा आणखी पुरावा आधुनिक काळातील त्याच्या साक्षीदारांच्या जीवनावरून आपल्याला मिळतो.—स्तो. ३४:६, ७, १७-१९.
२२ देवाच्या न्यायदंडाचा दिवस “अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर” येऊन ठेपलेला आहे. (लूक २१:३४, ३५) त्यातून कोणीही सुटणार नाही. धनसंपत्ती किंवा ऐशआरामाच्या गोष्टी त्या दिवशी कवडीमोलाच्या ठरतील. त्या वेळी, देवाचा नियुक्त न्यायाधीश म्हणेल: “अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या.” (मत्त. २५:३४) होय, यहोवा ‘नीतिमानाला आशीर्वाद देतो; तो त्याच्याभोवती कवचाप्रमाणे कृपेचे वेष्टन घालितो.’ (स्तो. ५:१२) तर मग, आपण देवाची कृपापसंती प्राप्त करण्याचा प्रयत्न करू नये का?
यहोवा तुमच्या कार्यांची दखल घेतो का?
या प्रश्नाचे उत्तर तुम्ही काय द्याल? पुष्कळ लोक म्हणतील: ‘मोशे, गिदोन, दावीद यासारख्या लोकांच्या कार्यांची देवाने दखल घेतली होती असा माझा विश्वास आहे खरा, पण माझ्या प्रत्येक कार्याची तो दखल घेतो की नाही याविषयी मला शंका वाटते. कारण मी काही मोशे, गिदोन किंवा दावीद नाही.’
बायबल काळातील काही विश्वासू लोकांनी विश्वासाची असाधारण कार्ये केली, हे खरे आहे. त्यांनी “विश्वासाच्या द्वारे राज्ये जिंकली, . . . सिंहांची तोंडे बंद केली, अग्नीची शक्ति नाहीशी केली; ते तरवारीच्या धारेपासून बचावले.” (इब्री लोकांस ११:३३, ३४) परंतु इतरांनी साध्यासुध्या कार्यांनी आपला विश्वास प्रदर्शित केला; आणि बायबल आपल्याला आश्वासन देते, की देवाने त्यांच्याही कार्यांची दखल घेतली. उदाहरणार्थ, आपण शास्त्रवचनांतील, एक मेंढपाळ, एक संदेष्टा आणि एक विधवा यांच्या उदाहरणांचा विचार करू या.
एक मेंढपाळ बलिदान अर्पण करतो
आदाम आणि हव्वेचा दुसरा पुत्र हाबेल याच्याविषयी तुम्हाला काय आठवते? तुम्हाला आठवत असेल की त्याचा वध करण्यात आला होता; आपल्यापैकी फार कमी लोकांना असा कदाचित अनुभव येईल. पण देवाने हाबेलाची दखल एका वेगळ्या कारणासाठी घेतली होती.
एके दिवशी, हाबेलाने त्याच्या कळपातील सर्वात उत्तम प्राणी निवडून तो देवाला अर्पिला. आज कदाचित त्याची ही देणगी अगदी क्षुल्लक लेखली जाईल परंतु यहोवाने त्याच्या देणगीची दखल घेतली आणि आपली स्वीकृती व्यक्त केली. इतकेच नव्हे तर, सुमारे चार हजार वर्षांनंतर यहोवाने प्रेषित पौलाला इब्री लोकांस या पुस्तकात त्या देणगीविषयी लिहिण्यास प्रेरित केले. इतक्या वर्षांनंतरही देव ते साधेसे अर्पण विसरला नव्हता!—इब्री लोकांस ६:१०; ११:४.
कोणत्या प्रकारचे बलिदान अर्पण करायचे हे हाबेलने कसे ठरवले? बायबल याविषयी काही सांगत नाही पण हाबेलने कदाचित या गोष्टीचा गंभीर विचार केला असेल. तो एक मेंढपाळ असल्यामुळे त्याने निश्चित्तच आपल्या कळपातील एखाद्या प्राण्याचे अर्पण दिले असेल. परंतु त्याने जे अर्पिले ते सर्वात उत्तम—“पुष्टांतून” पुष्ट जे होते ते त्याने दिले. (उत्पत्ति ४:४) शिवाय, “तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडिशील,” असे जे यहोवाने एदेन बागेत सर्पाला म्हटले, त्यावरही कदाचित त्याने मनन केले असण्याची शक्यता आहे. (उत्पत्ति ३:१५; प्रकटीकरण १२:९) ही “स्त्री” आणि तिची “संतति” कोण आहे हे हाबेलला तेव्हा माहीत नसले तरीसुद्धा, स्त्रीच्या संततीची ‘टाच फोडण्यात’ रक्त सांडणे समाविष्ट होते हे कदाचित त्याने ताडले असावे. यासाठी, जिवंत प्राण्यापेक्षा मौल्यवान आणखी दुसरे काही असू शकत नाही हे त्याने निश्चित्तच ओळखले. परंतु, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने अर्पिलेले बलिदान खरोखरच उचित होते
हाबेलप्रमाणेच आजही ख्रिस्ती लोक देवाला बलिदाने अर्पण करतात. ते कळपातील प्रथम जन्मलेले नव्हे तर “ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ . . . त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण” करतात. (इब्री लोकांस १३:१५) आपण इतरांना आपल्या विश्वासाविषयी सांगतो तेव्हा आपले ओठ जाहीर घोषणा करतात.
तुम्हाला तुमच्या अर्पणाचा दर्जा सुधारण्याची इच्छा आहे का? असल्यास, आपल्या क्षेत्रातील लोकांच्या गरजांचा काळजीपूर्वक विचार करा. त्यांना कोणकोणत्या गोष्टींची चिंता आहे? त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत? बायबलच्या संदेशांतील कोणते पैलू त्यांना आकर्षक वाटू शकतात? साक्ष दिलेल्या प्रत्येक संधींचा नंतर विचार करा, की तुम्ही तुमच्या प्रभावीपणात आणखी सुधारणा कशी करू शकता. तुम्ही यहोवाविषयी बोलता तेव्हा पूर्ण खात्रीने आणि अगदी मनापासून बोला. आपले अर्पण खरोखरचा “स्तुतीचा यज्ञ” बनवा.
अग्रहणशील लोकांना एक संदेष्टा प्रचार करतो
आता, संदेष्टा हनोखचे उदाहरण घ्या. यहोवा देवाचा साक्षीदार म्हणून तो अगदी एकटा असला असावा. तुम्ही देखील हनोखप्रमाणे, तुमच्या कुटुंबातून एकटेच यहोवाची विश्वासूपणे सेवा करणारे आहात का? बायबल तत्त्वांचे पालन करणारे तुमच्या वर्गातील तुम्ही एकटेच विद्यार्थी किंवा कामाच्या ठिकाणी एकटेच कामगार आहात का? असल्यास, तुम्हाला कदाचित विरोधाचा सामना करावा लागेल. मित्रजन, नातेवाईक, वर्गसोबती किंवा सहकर्मचारी तुम्हाला देवाच्या नियमांचे उल्लंघन करण्याची जबरदस्ती करतील. ते म्हणतील: “तुम्ही काय केलं आहे ते कुणालाच कळणार नाही. आम्ही पण मूठ झाकूनच ठेवू.” बायबलच्या नैतिक दर्जांची काळजी करत बसणे निव्वळ वेडेपणा आहे कारण तुम्ही काय करता याची देवाला मुळीच काळजी नसते, असा आग्रह ते करतील. मग, तुम्ही त्यांच्याप्रमाणे विचार करत नाही, वागत नाही म्हणून चिडून कदाचित ते तुमची चिकाटी तोडण्याचा सर्वंकष प्रयत्न करतील.
अशा दबावाचा सामना करणे सोपे नसले तरी, ते अशक्यही नाही. आदामापासून सातवा पुरुष, हनोख याचा विचार करा. (यहूदा १४, १५) हनोखचा जन्म होईपर्यंत बहुतेक लोक आपली नैतिक शुद्ध गमावून बसले होते. त्यांचे बोलणे गलिच्छ होते, त्यांचे वर्तन “भक्तिहीन” अर्थात धक्कादायक होते. (यहूदा १४, १५) त्यांचे वर्तन जवळपास आजच्या लोकांप्रमाणेच होते.
हनोखने या सर्वाला कशाप्रकारे तोंड दिले? या प्रश्नाचे उत्तर आज आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हनोख हा तेव्हाच्या काळात एकटाच यहोवाचा उपासक असला तरी तो खरोखरच एकटा नव्हता. हनोख देवाबरोबर चालला.—उत्पत्ति ५:२२.
देवाला संतुष्ट करण्यावर हनोखचे जीवन केंद्रित होते. त्याला माहीत होते, की देवाबरोबर चालण्याचा अर्थ, केवळ एक शुद्ध नैतिक जीवन जगणे इतकेच पुरेसे नव्हते. त्याने प्रचार करावा असे यहोवा त्याच्याकडून अपेक्षा करत होता. (यहूदा १४, १५) यहोवाने लोकांच्या भक्तिहीन कार्याकडे दुर्लक्ष केले नाही याबद्दल त्यांना इशारा देण्याची गरज होती. हनोख देवाबरोबर ३०० पेक्षा अधिक वर्षे चालत राहिला—आपल्यापैकी कोणी इतक्या काळपर्यंत सहन केले नसते. त्याच्या मृत्यूपर्यंत तो देवाबरोबर चालत राहिला.—उत्पत्ति ५:२३, २४.
हनोखप्रमाणे आपल्यावर देखील प्रचार करण्याची कामगिरी सोपवली आहे. (मत्तय २४:१४) घरोघरी जाऊन साक्ष देण्याव्यतिरिक्त आपण नातेवाईकांना, व्यापार क्षेत्रातील ओळखीच्या लोकांना आणि वर्गसोबत्यांना सुवार्ता सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु कधीकधी आपल्याला बोलायला लाज वाटू शकते. तुम्हाला कधी असे वाटले आहे का? निराश होऊ नका. आरंभीच्या ख्रिश्चनांचे अनुकरण करा आणि धैर्यासाठी यहोवाला प्रार्थना करा. (प्रेषितांची कृत्ये ४:२९) तुम्ही जोपर्यंत देवाबरोबर चालत आहात तोपर्यंत तुम्ही एकटे नाही.
एक विधवा भोजन तयार करते
कल्पना करा, एक साधेसे भोजन तयार केल्याबद्दल एका अनामिक विधवेला दोन आशीर्वाद मिळाले! ती इस्राएली नव्हती; ती सारफथ नावाच्या नगरात सा.यु.पू. दहाव्या शतकात राहणारी विदेशी होती. एका दीर्घकाळच्या दुष्काळाच्या शेवटी शेवटी तिचा अन्नसाठा संपत आला होता. स्वतःसाठी आणि आपल्या मुलासाठी एक शेवटचे भोजन करता येईल तितकेच, मूठभर पीठ आणि थोडेसे तेल तिच्याकडे उरले होते.
आणि अशातच, तिच्या घरी एक पाहुणा येतो. तो देवाचा संदेष्टा एलीया होता. तिच्याकडे जे तुटपुंजे उरले होते त्यातच तो तिला आपल्यासाठी देखील भोजन करण्यास सांगतो. तिच्याजवळ, तिच्या स्वतःचे आणि आपल्या मुलाचे पोट जेमतेम भरेल एवढेच अन्न होते तर ती आता या पाहुण्याला कशी देणार? पण एलीयाने तिला यहोवाच्या वचनाद्वारे हे आश्वासन दिले, की तिने जर त्याच्याबरोबर अन्न वाटून खाल्ले तर ती आणि तिचा मुलगा उपाशी राहणार नाहीत. तिच्यासारख्या विदेशी विधवेची दखल इस्राएलचा देव घेईल हे मानण्यास तिला विश्वासाची गरज होती. पण तिने एलीयावर विश्वास ठेवला आणि यहोवाने तिला प्रतिफळ दिले. “परमेश्वर एलीयाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपीहि आटली नाही.” दुष्काळ संपेपर्यंत या स्त्रीला आणि तिच्या मुलाला दररोजची भाकर मिळत राहिली.—१ राजे १७:८-१६.
पण या विधवेला आणखी एक आशीर्वाद मिळणार होता. या चमत्कारानंतर काही काळ उलटून गेल्यावर, तिचा लाडका मुलगा आजारी पडून मरून गेला. एलीयाला तिच्यावर खूप दया आली आणि त्याने, तिच्या मुलाला जिवंत करावे म्हणून यहोवाकडे याचना केली. (१ राजे १७:१७-२४) या मुलाला मृतातून जिवंत करण्यासाठी एक अभूतपूर्व चमत्कार करावा लागणार होता. याआधी कोणाचे पुनरुत्थान झाल्याचा कोणताही अहवाल नव्हता! यहोवा पुन्हा एकदा या विदेशी विधवेला दया दाखवेल का? होय, त्याने दाखवली. मृत मुलाला पुन्हा जिवंत करण्यासाठी यहोवाने एलीयाला शक्ती दिली. या आशीर्वादित स्त्रीचा नंतर उल्लेख करून येशूने म्हटले: “इस्राएलात पुष्कळ विधवा होत्या; तरी . . . सीदोन प्रदेशातील सारफथ येथील एका विधवेकडे मात्र [एलीयाला] पाठविले होते.”—लूक ४:२५, २६.
आजची आर्थिक स्थिती, औद्योगिक देशांमध्येही डळमळीत आहे. काही मोठमोठ्या कंपन्यांनी, अनेक दशकांपासून एकनिष्ठपणे काम करणाऱ्या आपल्या कामगारांना नोकरीवरून काढले आहे. आपल्यावर बेकारीची पाळी येईल की काय, या भीतीमुळे एखादा ख्रिश्चन, आपली कंपनी आपल्याला नोकरीवर ठेवेल ही आशा बाळगून, होता होईल तितका कामात व्यस्त राहण्यास मोहीत होऊ शकतो. यामुळे, त्याला ख्रिस्ती सभांना उपस्थित राहायला, क्षेत्र सेवेत भाग घ्यायला किंवा आपल्या कुटुंबाच्या भावनिक व आध्यात्मिक गरजा पूर्ण करायला कमी वेळ मिळेल. त्याला असे वाटत असेल की काहीही झाले तरी आपण ही नोकरी गमवायची नाही.
अशा आर्थिकरीत्या अस्थिर परिस्थितीत एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीला चिंता लागणे साहजिक आहे. या दिवसांत नोकरी मिळणे कठीण आहे. आपल्यातील बहुतेक लोक श्रीमंत होण्यासाठी झटत नसले तरी, आपण सारफथच्या विधवेप्रमाणे निदान दोन वेळची भाकरी मिळावी म्हणून खटपट करतो. परंतु, “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही” या देवाने दिलेल्या आश्वासनाची प्रेषित पौल आपल्याला आठवण करून देतो. त्यामुळे आपण पूर्ण भरवशाने म्हणू शकतो: “प्रभु मला साहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?” (इब्री लोकांस १३:५, ६) पौलाचा या अभिवचनावर संपूर्ण भरवसा होता आणि यहोवाने नेहमी त्याची काळजी घेतली. आपणही जर देवाला त्यागले नाही तर तोही आपल्याला त्यागणार नाही.
आपल्याला कदाचित असे वाटेल, की मोशे, गिदोन, दावीद यांसारख्या आध्यात्मिक लोकांची आपण स्वतःबरोबर तुलना करू शकत नाही, पण आपण निदान त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करू शकतो. शिवाय, हाबेल, हनोख आणि सारफथच्या विधवेने केलेली अगदी साधीसुधी विश्वासाची कार्ये आपण लक्षात ठेवू शकतो. यहोवा सर्वप्रकारच्या विश्वासाच्या कार्यांची—मग ती लहानसहान असली तरीसुद्धा दखल घेतो. देवाला भिऊन वागणारा विद्यार्थी आपल्याच वयाच्या मित्राकडून ड्रग्ज घ्यायला नकार देतो, एक ख्रिस्ती व्यक्ती आपल्या कामाच्या ठिकाणी अनैतिक लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला नकार देते, किंवा एक वृद्ध साक्षीदार थकून गेलेला आणि आजारी असतानाही विश्वासूपणे मंडळीच्या सभांना उपस्थित राहतो, तेव्हा यहोवा या सर्वांना पाहतो. आणि त्याला हे पाहून आनंद वाटतो!—नीतिसूत्रे २७:११.
तुम्ही इतरांची दखल घेता का?
आपण काय करतो त्याची यहोवा दखल घेतो. आपण देवाचे अनुकरण करणारे असल्यामुळे आपणही इतरांच्या प्रयत्नांची दखल घेतली पाहिजे. (इफिसकर ५:१) तुमच्या सहख्रिस्ती बंधूभगिनींना मंडळीच्या सभांना उपस्थित राहायला, क्षेत्र सेवेत भाग घ्यायला किंवा आपली दररोजची कामे देखील करायला किती कठीण जाते याची तुम्ही दखल का घेऊ नये?
तुमच्याबरोबर यहोवाची उपासना करणाऱ्या तुमच्या सहउपासकांना याची जाणीव करून द्या की तुम्ही त्यांच्या प्रयत्नांची कदर करता. तुम्ही त्यांच्या कार्यांची दखल घेतल्याबद्दल त्यांना आनंद वाटेल आणि यामुळे त्यांना ही खात्री मिळेल की यहोवाने देखील त्यांच्या कार्यांची दखल घेतली आहे.
अध्याय ३१
बंदिवासात असतानाही ती धाडसाने बोलली
धाडसाने बोलणारी एक लहान मुलगी
अशाच एका छाप्यादरम्यान, ‘एका लहान मुलीला’ तिच्या देवभिरू कुटुंबापासून दूर करण्यात आले होते. (२ राजे ५:२) सीरियामध्ये नेल्यावर तिला कदाचित भीतिदायक वाटणाऱ्या व अनोळखी वाटणाऱ्या लोकांमध्ये—सूर्य, चंद्र, तारे, वृक्ष, रोपटे, व पाषाणाचीही उपासना करणाऱ्यांमध्ये राहणे भाग होते. एकच सत्य देव यहोवा याची उपासना करणाऱ्या तिच्या कुटुंबापेक्षा व स्नेह्यांपेक्षा ते लोक किती भिन्न होते! तथापि, अशा या अपरिचित स्थितीतही ह्या मुलीने यहोवाच्या उपासनेसंबंधी लक्षणीय धाडस प्रदर्शित केले. परिणामतः, तिने सीरियाच्या राजाच्या हाताखाली सेवा करणाऱ्या एका प्रमुख अधिकाऱ्याच्या जीवनाचे परिवर्तन केले. हे कसे, ते आपण पाहू या.
इन्साइट “कुष्ठरोग” ¶३-५
कुष्ठरोग
वेगवेगळे प्रकार आणि त्याचे परिणाम. आज थोड्याफार प्रमाणात संसर्गजन्य असलेल्या कुष्ठरोगाचे किंवा हॅन्सन रोगाचे तीन मुख्य प्रकार आहेत. एक प्रकार आहे गाठींचा. या प्रकारात त्वचा जाडसर होऊन तिथे गाठी तयार होतात. सगळ्यात आधी चेहऱ्यावरच्या त्वचेवर आणि नंतर शरीराच्या इतर भागांवर गाठी तयार होतात. यामुळे व्यक्तीच्या नाकात आणि घशात असलेली ओलसर, चिकट त्वचा खराब होत जाते. या कुष्ठरोगाला ब्लॅक लेप्रसी किंवा लेप्रोमॅटस असं म्हणतात. दुसऱ्या प्रकाराला व्हाईट किंवा ॲनेस्थेटिक लेप्रसी किंवा ट्युबरक्युलॉइड असंही म्हणतात. हा कुष्ठरोग ब्लॅक लेप्रसीइतका घातक नसतो, पण त्यामुळे मेंदूतून निघालेल्या बाह्य मज्जातंतूवर परिणाम होतो. यामुळे व्यक्तीच्या त्वचेवर परिणाम होतो. आणि त्याला स्पर्श जरी केला तरी खूप वेदना होतात. काही वेळा तर त्वचा बधीरही होते. आणि तिसऱ्या प्रकारात, पहिले दोन्ही प्रकार आणि त्यांची लक्षणं पाहायला मिळतात.
कुष्ठरोग जेव्हा वाढत जातो तेव्हा सुरुवातीला तयार झालेल्या गाठींमध्ये पू तयार होतो. यात सहसा व्यक्तीच्या डोक्यावरचे आणि भुवयांवरचे केस गळून पडतात. तसंच, नखं सैल होतात आणि खराब होऊन गळून पडतात. मग व्यक्तीची बोटं, हातपाय, नाक किंवा डोळे हळूहळू झडू लागतात. आणि शेवटी काही गंभीर परिस्थितींमध्ये व्यक्तीचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. बायबलमध्ये उल्लेख केलेल्या ‘कुष्ठरोगामध्ये’ या गंभीर प्रकाराचासुद्धा समावेश होतो. कारण या रोगाबद्दल बोलताना अहरोनने “शरीर अर्धं कुजलंय,” असं म्हटलं.—गण १२:१२.
या सगळ्या माहितीवरून बायबलमध्ये या रोगाला भयंकर रोग का म्हटलंय ते कळतं. तसंच, उज्जीयाने अधिकार नसताना गर्विष्ठपणे मंदिरात धूप जाळायचा प्रयत्न केला तेव्हा त्याचे किती भयंकर परिणाम झाले तेही कळतं.—२रा १५:५; २इत २६:१६-२३.
दुसरे राजे पुस्तकातील ठळक मुद्दे
५:१५, १६—अलीशाने नामानाच्या नजराण्याचा स्वीकार का केला नाही? अलीशाने नामानाच्या नजराण्याचा स्वीकार केला नाही कारण नामानाला बरे करण्याचा चमत्कार, अलीशाच्या शक्तीने नव्हे तर यहोवाच्या शक्तीने करण्यात आला होता, हे त्याला माहीत होते. देवाने दिलेल्या अधिकारातून स्वतःचा फायदा करून घेण्याचा विचारही अलीशाच्या मनाला कधी शिवला नाही. आज यहोवाचे खरे उपासक त्याच्या सेवेतून कधीही स्वतःचा फायदा करून घेत नाहीत. ते येशूच्या या सल्ल्याचे पालन करतात: “तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या.”—मत्तय १०:८.
दुसरे राजे पुस्तकातील ठळक मुद्दे
५:१८, १९—एका धार्मिक कृत्यात भाग घ्यावा लागत असल्यामुळे नामान क्षमा मागत होता का? अरामाचा राजा म्हातारा व अशक्त होता आणि आधारासाठी त्याला नामानाला टेकून उभे राहावे लागायचे. राजा जेव्हा रिम्मोन दैवताला नमन करायचा तेव्हा नामानही खाली वाकायचा. नामान, राजाला आधार देण्याकरता म्हणून खाली वाकायचा, उपासनेसाठी म्हणून नव्हे. हे कर्तव्य पार पाडावे लागत असल्यामुळे नामान यहोवाकडे क्षमा मागत होता. नामानावर विश्वास ठेवून अलीशा त्याला म्हणाला: “आता सुखाने मार्गस्थ हो.”
टेहळणी बुरूज१३ ८/१ १०
बायबलमध्ये काही लोकांची नावं का देण्यात आली नाहीत?
बायबलमधल्या रूथ नावाच्या पुस्तकात एका माणसाबद्दल सांगितलंय. त्याने मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे आपली जबाबदारी पार पाडायला नकार दिला. या अहवालात त्याचं नाव देण्यात आलं नाही. (रूथ ४:१-१२) मग याचा अर्थ असा होतो का, की बायबलमध्ये ज्या लोकांची नावं देण्यात आली नाहीत ते वाईट होते किंवा ते जास्त महत्त्वाचे नव्हते?
नाही. एका दुसऱ्या उदाहरणाकडे लक्ष द्या. येशूने शेवटच्या वल्हांडणाच्या भोजनासाठी आपल्या शिष्यांना “शहरात अमुक अमुक माणसाकडे जाऊन” त्याच्या घरी तयारी करायला सांगितलं. (मत्तय २६:१८) मग याचा अर्थ असा होतो का, की या वचनात सांगितलेला “अमुक अमुक” माणूस वाईट होता किंवा त्याचं नाव देण्याइतका तो महत्त्वाचा नव्हता? मुळीच नाही. यात काहीच शंका नाही की तो माणूस येशूचा शिष्य होता. या अहवालासाठी त्याचं नाव गरजेचं नव्हतं, म्हणून ते देण्यात आलं नाही.
तसंच बायबलमध्ये अनेक दुष्ट लोकांची नावं देण्यात आली आहेत. जसं की, पहिली स्त्री हव्वा. तिचं नाव बहुतेकांना माहीत आहे. पण ती स्वार्थीपणे वागली आणि तिने देवाची आज्ञा मोडण्यात आदामला साथ दिली. यामुळे आपल्या सगळ्यांना याचे भयंकर परिणाम सोसावे लागले. (रोमकर ५:१२) पण बायबलमध्ये नावाने उल्लेख नसलेल्या बऱ्याच विश्वासू लोकांबद्दलही सांगितलंय. जसं की, नोहाची बायको. ती निःस्वार्थी होती. तिने आपल्या पतीला एका महत्त्वाच्या कामात साथ देऊन देवाची आज्ञा पाळली. पण बायबलमध्ये आपल्याला तिचं नाव कुठेच वाचायला मिळत नाही. याचा अर्थ असा मुळीच होत नाही, की ती महत्त्वाची नव्हती किंवा यहोवा तिच्यावर खूश नव्हता.
यहोवाने आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी काही धाडसी लोकांचा वापर केला. त्यांचीही नावं बायबलमध्ये देण्यात आली नाहीत. सीरियाचा सेनापती नामान याच्या घरी दासी म्हणून काम करणाऱ्या इस्राएली मुलीचाच विचार करा. तिने खूप धाडसाने आपल्या मालकिणीला, म्हणजे नामानच्या बायकोला इस्राएलमधल्या यहोवाच्या संदेष्ट्याबद्दल सांगितलं. यामुळे एक मोठा चमत्कार घडून आला. (२ राजे ५:१-१४) तसंच, इस्राएलचा न्यायाधीश इफ्ताह याच्या मुलीनेसुद्धा विश्वासाच्या बाबतीत एक चांगलं उदाहरण मांडलं. तिच्या वडिलांनी केलेला नवस फेडण्यासाठी तिने लग्न करण्याच्या आणि आई बनण्याच्या संधीचा स्वतःहून त्याग केला. (शास्ते ११:३०-४०) त्यासोबतच ४० पेक्षा जास्त स्तोत्रं लिहिणाऱ्यांची नावंही आपल्याला माहीत नाही. शिवाय, यहोवाचा संदेश पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम करणाऱ्या बऱ्याच विश्वासू संदेष्ट्यांचीही नावं बायबलमध्ये देण्यात आली नाहीत.—१ राजे २०:३७-४३.
याबाबतीत विश्वासू स्वर्गदूतांचं आणखी उल्लेखनीय उदाहरण आहे. तसं पाहायला गेलं, तर स्वर्गात कोट्यवधी स्वर्गदूत आहेत. पण बायबलमध्ये फक्त दोन स्वर्गदूतांची नावं देण्यात आली आहेत; गब्रीएल आणि मीखाएल. (दानीएल ७:१०; लूक १:१९; यहूदा ९) उदाहरणार्थ, शमशोनच्या वडिलांनी, मानोहाने एका स्वर्गदूताला विचारलं, “तुमचं नाव काय ते आम्हाला सांगा. म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं घडल्यावर आम्ही तुमचा आदर-सन्मान करू.” पण स्वर्गदूताने त्याला काय उत्तर दिलं? तो म्हणाला, “माझं नाव विचारू नकोस.” तो स्वर्गदूत नम्र होता. त्याने स्वतःचा गौरव करून घेतला नाही, कारण त्याला माहीत होतं की फक्त देवाचाच गौरव झाला पाहिजे.—शास्ते १३:१७, १८.
काही माणसांची आणि स्वर्गदूतांची नावं का देण्यात आली आहेत आणि काहींची का नाही, याचं बायबल नेहमीच स्पष्टीकरण देत नाही. पण बायबलमधल्या विश्वासू सेवकांकडून आपण बरंच काही शिकू शकतो, कारण ते जरी नावाजलेले नसले आणि बायबलमध्ये त्यांचं नाव नसलं तरी त्यांनी आनंदाने देवाची सेवा केली.
अध्याय ३२
“हे यहोवा! कृपा करून याचे डोळे उघड”
इन्साइट “अलीशा” ¶२
अलीशा
शाफाटचा मुलगा आणि इ.स.पू. दहाव्या आणि नवव्या शतकातला यहोवाचा एक संदेष्टा. एलीया संदेष्ट्यानंतर तो संदेष्टा झाला होता. यहोवाने एलीयाला आबेल-महोला इथल्या अलीशाला अभिषिक्त करायला सांगितलं होतं. अलीशाला नांगरणी करताना पाहून एलीयाने आपला झगा त्याच्यावर टाकला. यावरून कळतं की त्याने त्याला संदेष्टा म्हणून नियुक्त केलं होतं. (१रा १९:१६) अलीशा “बैलांच्या १२ जोड्या घेऊन नांगरणी” करत होता. आणि तो “बैलांच्या १२ व्या जोडीमागे होता.” याबद्दल १९ व्या शतकातल्या विल्यम थॉमसने द लॅन्ड ॲण्ड द बुक (१८८७, पान १४४) यात जे म्हटलं ते लक्ष देण्यासारखं आहे. त्या काळात अरबी लोक त्यांचे लहान नांगर घेऊन एकत्र मिळून काम करायचे. आणि सगळ्यांनी जितकी नांगरणी केली आहे तितकी एक जण सहज एका दिवसात पेरणी करू शकत होता. अलीशा नांगरणी करताना सगळ्यांच्या शेवटी होता. त्यामुळे पुढच्यांच्या कामात अडथळा न आणता तो आपलं काम थांबवू शकत होता. एलीयाने जेव्हा त्याला बोलवलं तेव्हा त्याने बैलांची एक जोडी घेऊन बलिदान दिलं. तसंच, नंतर त्याने नांगरणी करायची लाकडी अवजारं जळण म्हणून वापरली. त्यानंतर जेवण तयार करून तो लगेच एलीयाच्या मागे गेला. यावरून त्याने किती पटकन पाऊन उचललं, किती ठामपणे निर्णय घेतला आणि यहोवाच्या कामाबद्दल त्याला किती कदर होती हे दिसून आलं.—१रा १९:१९-२१.
वाचकांचे प्रश्न
अलीशाने एलीयाच्या आत्म्याचा “दुप्पट वाटा” का मागितला?
इस्राएलातील संदेष्टा या नात्याने एलीया आपली नेमणूक संपवण्याच्या बेतात असताना त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेला संदेष्टा अलीशा याने त्याला अशी विनंती केली: “आपल्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठायी यावा.” (२ राजे २:९) आध्यात्मिक अर्थाने अलीशा, ज्येष्ठ पुत्राला मिळणारा दुप्पट वाटा मिळण्याची अपेक्षा करत होता. (अनुवाद २१:१७) हा अहवाल थोडक्यात विचारात घेतल्यास ही गोष्ट स्पष्ट होईल आणि त्या घटनेतून आपल्यालाही बरेच शिकता येईल.
यहोवाच्या निर्देशनानुसार संदेष्टा एलीया याने अलीशाला आपला उत्तराधिकारी होण्याकरता अभिषिक्त केले होते. (१ राजे १९:१९-२१) जवळजवळ सहा वर्षे अलीशाने एलीयाचा विश्वासू सेवक म्हणून काम केले आणि हे तो शेवटपर्यंत करू इच्छित होता. इस्राएलचा संदेष्टा या नात्याने सेवा करण्याच्या एलीयाच्या शेवटल्या दिवशी देखील अलीशा आपल्या अनुभवी उपदेशकाला सोडायला तयार नव्हता. एलीयाने त्याला जाण्यास सांगितले तेव्हा देखील वयाने एलीयापेक्षा लहान असलेल्या या संदेष्ट्याने म्हटले: “मी आपल्याला सोडावयाचा नाही.” (२ राजे २:२, ४, ६; ३:११) खरोखर अलीशा, वयाने मोठ्या एलीयाला आपला आध्यात्मिक पिता मानत होता.—२ राजे २:१२.
पण अलीशा हा एलीयाचा एकुलता एक आध्यात्मिक पुत्र नव्हता. एलीया व अलीशा यांचा संबंध एका गटाशी होता ज्यातील सदस्यांना “भविष्यवाद्यांचे मुलगे” म्हणण्यात आले आहे. (२ राजे २:३, पं.र.भा.) दुसरे राजे यातील अहवाल असे सूचित करतो की ज्यांना “मुलगे” म्हणण्यात आले आहे, त्यांना देखील आपला आध्यात्मिक पिता एलीया याच्याबद्दल आपुलकी वाटत होती. (२ राजे २:३, ५, ७, १५-१७) तरीपण, अभिषिक्त उत्तराधिकारी असल्यामुळे अलीशा हा एलीयाच्या आध्यात्मिक पुत्रांपैकी प्रमुख होता—जणू तो त्याचा ज्येष्ठ पुत्र होता. प्राचीन इस्राएलातील कुटुंबांत खरोखरच्या ज्येष्ठ पुत्राला त्याच्या पित्याच्या वतनातील दुप्पट वाटा मिळत असे; पण इतर मुलांना केवळ एकेकच वाटा मिळे. म्हणूनच अलीशाने एलीयाच्या आध्यात्मिक वतनातून दुप्पट वाटा मागितला.
त्या विशिष्ट वेळी अलीशाने ही विनंती का केली? कारण लवकरच तो एक महत्त्वाची जबाबदारी हाती घेणार होता, अर्थात इस्राएलचा संदेष्टा या नात्याने एलीयाची भूमिका यापुढे तो स्वतः पार पाडणार होता. या आव्हानात्मक कार्याशी संबंधित असलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याकरता आपल्याला स्वतःच्या क्षमतेवर अवलंबून राहता येणार नाही, तर यहोवाकडून मिळू शकणाऱ्या आध्यात्मिक सामर्थ्याची आपल्याला गरज पडणार आहे याची अलीशाला जाणीव होती. त्याला देखील एलीयाप्रमाणेच निर्भयतेने कार्य करावे लागणार होते. (२ राजे १:३, ४, १५, १६) म्हणूनच, त्याने एलीयाच्या आत्म्याचे दोन भाग, अर्थात देवाच्या आत्म्याकरवी उत्पन्न होणारे दोन उत्कृष्ट गुण आपल्याला मिळावे अशी विनंती केली; एकतर धैर्यवान असण्याचा आणि दुसरे म्हणजे ‘यहोवाविषयी फार ईर्ष्यायुक्त’ असण्याचा आत्मा. (१ राजे १९:१०, १४) एलीयाने अलीशाला काय उत्तर दिले?
अलीशाने जे मागितले ते आपण नव्हे तर केवळ देव देऊ शकतो हे एलीयाला माहीत होते. त्यामुळे एलीयाने विनयशीलपणे उत्तर दिले: “तू दुर्घट गोष्ट मागतोस, पण मला तुजपासून घेऊन जातील त्या समयी मी तुला दिसलो तर तू मागतोस ते तुला प्राप्त होईल.” (२ राजे २:१०) आणि खरोखरच, यहोवाने अलीशाला वावटळीतून एलीया स्वर्गास जात असतानाचे दृश्य पाहू दिले. (२ राजे २:११, १२) अलीशाची विनंती मान्य करण्यात आली. यहोवाने त्याला त्याचे नवे कार्य हाती घेण्यास आणि येणाऱ्या परीक्षांना तोंड देण्यास आवश्यक असणारा आत्मा पुरवला.
आज अभिषिक्त ख्रिस्ती (ज्यांना कधीकधी अलीशा वर्ग असे संबोधले जाते) आणि इतर देवाचे सेवक देखील या बायबल अहवालापासून बरेच प्रोत्साहन मिळवू शकतात. काही वेळा एखादी नवी नेमणूक मिळते तेव्हा आपल्याला ती खूपच आव्हानात्मक किंवा आपल्या सामर्थ्यापलीकडील आहे असे वाटू शकते. किंवा आपल्या क्षेत्रात लोकांना राज्याच्या संदेशात स्वारस्य नसल्यामुळे अथवा विरोध वाढत असल्यामुळे प्रचाराचे कार्य सुरू ठेवण्याचे धैर्य पूर्वीसारखे आता आपल्याला होत नसेल. पण जर आपण यहोवाकडे त्याच्या पाठबळाकरता याचना केली तर तो आपल्यासमोर असलेल्या आव्हानांना आणि बदलत्या परिस्थितीला तोंड देण्याकरता आवश्यकतेप्रमाणे पवित्र आत्मा जरूर देईल. (लूक ११:१३; २ करिंथकर ४:७; फिलिप्पैकर ४:१३) होय, अलीशाला त्याच्या आव्हानात्मक जबाबदाऱ्या पार पाडण्याकरता यहोवाने ज्याप्रमाणे बळ दिले त्याचप्रमाणे, आपण तरुण असो वा वृद्ध, आपल्यालाही तो आपले सेवाकार्य पार पाडण्याकरता नक्कीच मदत करेल.—२ तीमथ्य ४:५.
इन्साइट “अंधत्व” ¶६
अंधत्व
अलीशाच्या आज्ञेमुळे सीरियाचे सैनिक आंधळे झाले होते. पण आपण असं म्हणू शकतो, की ते खरोखर नाही तर मानसिक रितीने आंधळे झाले होते. कारण जर ते खरोखर आंधळे झाले असते तर त्या सगळ्यांना हात धरून न्यावं लागलं असतं. पण अहवालात सांगितल्याप्रमाणे अलीशाने त्यांना इतकंच म्हटलं: “तुम्ही रस्ता चुकलात; हे ते शहर नाही. माझ्यामागे या.” अशा अंधत्वाबद्दल विल्यम जेम्स प्रिन्सिपल्स ऑफ सायकॉलॉजी (१९८१, खंड १, पान ५९) यात असं म्हणतात: “मानसिक अंधत्व किंवा आंधळेपणा हा एक मेंदूचा विकार आहे. यात डोळ्यांना काही झालेलं नसतं. डोळ्यांना व्यवस्थित दिसतं असतं. पण जे काही दिसतं ते मेंदूला समजत नसतं. डोळ्यांना जे चित्र दिसतं ते मेंदूपर्यंत पोहचतं खरं, पण मेंदूला त्याचा अर्थ लावता येत नाही.” सीरियाचं सैन्य शोमरोनमध्ये पोहोचलं तेव्हा यहोवाने दूर केलेलं त्यांचं अंधत्व कदाचित हेच असावं. (२रा ६:१८-२०) सदोमच्या माणसांना जे अंधत्व आलं होतं तेसुद्धा कदाचित याच प्रकारचं असावं. कारण जर खरोखर त्यांची दृष्टी गेली असती तर त्याबद्दल त्यांनी दुःख केलं असतं. पण तसं काहीही न करता अहवाल सांगतो, की ते लोटच्या घराचं दार शोधत राहिले.—उत्प १९:११.
इन्साइट “अलीशा” ¶२७-२८
अलीशा
आपलं काम पूर्ण केलं. या वेळेपर्यंत अलीशाने यहोवाच्या पवित्र शक्तीच्या मदतीने १५ चमत्कार केले होते. पण त्याचा मृत्यू झाल्यानंतरही यहोवाने १६ वा चमत्कार करण्यासाठी त्याचा उपयोग केला. अलीशाने मृत्यूपर्यंत विश्वासू राहून देवाचं मन आनंदित केलं होतं. बायबलमधला अहवाल म्हणतो की एकदा, अलीशाला दफन केल्यानंतर, काही लोक एका मेलेल्या माणसाला दफन करत असताना त्यांना लूटमार करणारी एक टोळी दिसली. टोळी पाहताच त्यांनी त्याला अलीशाच्या कबरेत फेकलं आणि ते तिथून पळून गेले. अलीशाच्या हाडांचा स्पर्श होताच, तो मेलेला माणूस जिवंत झाला आणि उठून उभा राहिला.—२रा १३:२०, २१.
लूक ४:२७ मध्ये येशूने अलीशाचा उल्लेख एक संदेष्टा म्हणून केला. तसंच, इब्री लोकांना ११:३५ मध्ये असं म्हटलंय, की “स्त्रियांना आपले मेलेले प्रियजन पुनरुत्थानाद्वारे परत मिळाले.” पुनरुत्थानाचा हा चमत्कार एलीयाने तर केलाच, पण अलीशासुद्धा केला असं आपण खातरीने म्हणू शकतो. इस्राएली लोक जेव्हा बआल दैवताची उपासना करण्यात पार बुडून गेले होते, त्या काळात एलीयाने संदेष्टा म्हणून आपलं काम सुरू केलं होतं. आणि हे काम करायला खऱ्या उपासनेबद्दल आवेश असणं फार गरजेचं होतं. एलीयाने बऱ्याच लोकांना यहोवाकडे परत आणायचं खूप मोठं काम केलं होतं. एलीयाने आपलं काम जिथे सोडलं तिथून अलीशाने ते पुढे नेलं. अलीशाने संदेष्टा म्हणून काम केलं त्या काळात बऱ्यापैकी शांती होती. एलीयाने जे काम सुरू केलं होतं ते चांगल्या प्रकारे पूर्ण होईल याची त्याने खातरी केली. आणि ते काम पूर्ण झाल्याचं त्याने आपल्या आयुष्यात पाहिलं. एलीयाने ८ चमत्कार केले, तर आलीशाने १६ केले. एलीयासारखंच अलीशानेही यहोवाच्या नावासाठी आणि खऱ्या उपासनेसाठी जबरदस्त आवेश दाखवला. त्याने धीर, प्रेम, दयाळूपणा यांसारखे चांगले गुण दाखवले. तसंच, जिथे यहोवाच्या नावाचा प्रश्न होता तिथे त्याने ठाम भूमिका घेतली. दुष्ट लोकांना यहोवाच्या न्यायदंडाबद्दल सांगायला त्याने मागेपुढे पाहिलं नाही. आणि या सगळ्या गोष्टींमुळेच, इब्री लोकांना १२:१ मध्ये ‘साक्षीदारांच्या ज्या मोठ्या ढगाबद्दल’ सांगितलंय त्यात अलीशाचंही नाव दिलंय.
अलीशाने अग्निमय रथ पाहिले तुम्हीही पाहू शकता का?
अरामाचा राजा, देवाचा संदेष्टा अलीशा याच्या मागावर असतो. तो दोथान या तटबंदी असलेल्या शहरात आहे हे कळताच अरामाचा राजा त्या रात्री घोडे, रथ आणि सैन्य पाठवतो. त्याचे सैन्य रातोरात त्या शहराला वेढा घालते.—२ राजे ६:१३, १४.
अलीशाचा सेवक सकाळी उठून बाहेर येतो आणि सैन्याला पाहून घाबरतो. तो ओरडून म्हणतो: “स्वामी, हाय! हाय! आता आपण काय करावे?” अलीशा त्याला म्हणतो: “भिऊ नको; त्याच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत.” नंतर, अलीशा प्रार्थना करतो: “हे परमेश्वरा, याचे डोळे उघड, याला दृष्टी दे.” अहवाल पुढे सांगतो: “परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले, तो पाहा, अलीशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्यास दिसले.” (२ राजे ६:१५-१७) अलीशाच्या जीवनात घडलेल्या या आणि इतर घटनांवरून आपल्याला काय शिकायला मिळते?
अरामाच्या सैन्याने वेढा घातला तेव्हा अलीशा घाबरला नाही कारण यहोवावर त्याचा पूर्ण भरवसा होता आणि यहोवा त्याचे रक्षण कसे करत आहे हेही त्याने पाहिले. आज आपण चमत्कारिक कृत्यांची अपेक्षा करत नाही, पण एक समूह या नात्याने यहोवा त्याच्या लोकांचे संरक्षण करत आहे याची आपल्याला खातरी आहे; एका अर्थाने आपल्या सभोवतीही अग्निमय रथ आणि घोडे आहेत. आपण जर त्यांना आपल्या विश्वासाच्या डोळ्यांनी पाहिले आणि नेहमी यहोवावर विसंबून राहिलो तर आपण “निर्भय” राहू शकू आणि यहोवाचे आशीर्वाद अनुभवू शकू. (स्तो. ४:८) अलीशाच्या जीवनात घडलेल्या इतर घटनांवर विचार केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो हे आता आपण पाहू या.
अलीशा एलीयाची सेवा करण्यास सुरुवात करतो
एका प्रसंगी, अलीशा शेतात काम करत असताना एलीया संदेष्टा तेथे येतो आणि स्वतःचा झगा काढून अलीशावर टाकतो. असे करण्याद्वारे एलीया अलीशाला त्याचा सेवक बनण्याचे आमंत्रण देतो. तेव्हा, अलीशा एक मोठी मेजवानी ठेवतो, आई-वडिलांचा आनंदाने निरोप घेतो आणि एलीयाची सेवा करण्यासाठी घराबाहेर पडतो. (१ राजे १९:१६, १९-२१) अलीशा यहोवाच्या सेवेत होता होईल तितके करण्यासाठी स्वतःला झोकून देतो म्हणूनच यहोवा त्याचा उपयोग करतो आणि पुढे तो एलीयाच्या जागी संदेष्टा या नात्याने सेवा करू लागतो.
अलीशाने जवळजवळ एलीयाची सहा वर्षे सेवा केली. त्यादरम्यान, अलीशा एलीयाच्या “हातावर पाणी” घालत असे. (२ राजे ३:११) पूर्वीच्या काळी, घरातील सेवक जी कामे करायचा त्यांपैकी एक काम म्हणजे, जेवण झाल्यावर हात धुताना धन्याच्या हातावर पाणी घालणे. अलीशा जे काम करायचा ते क्षुल्लक होते असे वाटेल, पण एलीयाचा सेवक या नात्याने हे काम करणे हा एक बहुमानच आहे असे त्याने मानले.
आज बरेच ख्रिस्ती वेगवेगळ्या प्रकारचे पूर्णवेळचे सेवाकार्य करतात. यहोवावर विश्वास असल्यामुळे आणि त्याच्या सेवेत होता होईल तितके करण्याची इच्छा असल्यामुळे ते असे करण्यास प्रवृत्त होतात. काही जण बेथेलमध्ये सेवा करण्यासाठी, बांधकाम प्रकल्पांवर काम करण्यासाठी आणि अशा प्रकारचे इतर पूर्णवेळचे सेवाकार्य करण्यासाठी घराबाहेर पडतात. बऱ्याच लोकांना अशा प्रकारची कामे क्षुल्लक वाटतील. पण ख्रिस्ती या नात्याने आपण या कामांना क्षुल्लक किंवा खालच्या दर्जाचे समजू नये कारण यहोवाच्या नजरेत ही कामे खूप मौल्यवान आहेत.—इब्री ६:१०.
अलीशा त्याच्या नेमणुकीशी जडून राहतो
एलीयाला वावटळीद्वारे स्वर्गात घेऊन जाण्याआधी देव त्याला गिलगालहून बेथेल येथे जाण्यास सांगतो. अलीशा जेव्हा एलीयासोबत जाण्याची इच्छा दर्शवतो तेव्हा एलीया त्याला तिथेच थांबण्यास सांगतो. पण अलीशा त्याला म्हणतो: “मी आपल्याला कधी सोडावयाचा नाही.” दोघे चालत असताना एलीया आणखी दोन वेळा अलीशाला माघारी जाण्यास सांगतो, पण अलीशा त्याचे काहीएक ऐकायला तयार नसतो. (२ राजे २:१-६) ज्याप्रमाणे रूथ नामीशी जडून राहिली होती त्याच प्रकारे अलीशा, एलीयाशी जडून राहतो. (रूथ १:८, १६, १७) का? कारण, एलीयाची सेवा करण्याचा त्याला जो बहुमान मिळाला होता त्याची तो मनापासून कदर करायचा.
अलीशाने खरोखरच आपल्यासमोर एक उत्तम उदाहरण मांडले. आपण यहोवाची सेवा करत आहोत ही गोष्ट जर नेहमी लक्षात ठेवली, तर यहोवाच्या संघटनेद्वारे आपल्याला कोणतीही नेमणूक देण्यात आल्यास ती खूप मौल्यवान आहे असे आपण समजू. खरेच, यहोवाची सेवा करण्यापेक्षा मोठा बहुमान असूच शकत नाही!—स्तो. ६५:४; ८४:१०.
“मी तुजसाठी काय करू ते मला सांग”
दोघे चालत असता एलीया अलीशाला म्हणतो: “मला तुजपासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुजसाठी काय करू ते मला सांग.” ज्या प्रकारे शलमोनाने बऱ्याच वर्षांआधी केले होते त्याच प्रकारे अलीशादेखील देवाची सेवा आणखी चांगल्या प्रकारे करण्यासाठी देवाकडे मागणे मागतो. तो एलीयाच्या “आत्म्याचा दुप्पट वाटा” मागतो. (१ राजे ३:५, ९; २ राजे २:९) इस्राएलमध्ये, घरातल्या ज्येष्ठ पुत्राला मालमत्तेतून दुप्पट वाटा दिला जायचा. (अनु. २१:१५-१७) त्याअर्थी, अलीशा एलीयाचा वारस बनण्याची किंवा एलीयाच्या जागी संदेष्टा म्हणून नेमले जाण्याची विनंती करत होता. तसेच, खऱ्या उपासनेप्रती एलीयाची जी मनोवृत्ती होती, जो आवेश होता त्याच प्रकारची मनोवृत्ती आणि आवेश दाखवण्याची अलीशाची इच्छा असल्यामुळे तो एलीयाचा आत्मा मिळण्याची विनंती करतो.—१ राजे १९:१३, १४.
एलीयाने त्याच्या सेवकाच्या विनंतीला कसा प्रतिसाद दिला? एलीया म्हणतो: “तू दुर्घट गोष्ट मागतोस, पण मला तुजपासून घेऊन जातील त्या समयी मी तुला दिसलो तर तू मागतोस ते तुला प्राप्त होईल, न दिसलो तर प्राप्त होणार नाही.” (२ राजे २:१०) एलीयाने जे म्हटले त्यावरून दोन गोष्टी सूचित झाल्या. एक म्हणजे, अलीशाने जे मागितले आहे ते द्यायचे की नाही हे फक्त यहोवाच ठरवू शकत होता. दुसरी म्हणजे, अलीशाला जर वारसाहक्क हवा असेल तर काहीही झाले तरी एलीयासोबत राहण्याचा त्याने जो निश्चय केला होता त्या निश्चयाला त्याला जडून राहावे लागेल.
अलीशाने काय पाहिले?
अलीशाने एलीयाच्या आत्म्याचा दुप्पट वाटा मागितला त्याप्रती देवाचा काय दृष्टिकोन होता? अहवाल पुढे सांगतो: “ते बोलत चालले असता, पाहा, एकाएकी एक अग्निरथ व एक अग्निवारु दृष्टीस पडले व त्यांनी त्या दोघांस अलग केले; एलीया वावटळीतून स्वर्गास गेला.” अशा रीतीने, देवाने अलीशाची विनंती मान्य केली. म्हणजेच, एलीया आपल्यापासून विलग होत आहे हे अलीशाने पाहिले, त्याला एलीयाच्या आत्म्याचा दुप्पट वाटा मिळाला आणि त्याचबरोबर एलीयाच्या जागी संदेष्टा म्हणून त्याला नेमण्यात आले.—२ राजे २:११-१४.
एलीयाच्या अंगावरून जो झगा पडतो तो अलीशा उचलतो आणि घालतो. या झग्यावरून अलीशा देवाचा संदेष्टा आहे हे लोक ओळखणार होते. पुढे यार्देन नदीचे दोन भाग करण्याद्वारे अलीशा जो चमत्कार करतो यावरूनही पुरावा मिळतो की त्याला देवाचा संदेष्टा म्हणून नेमण्यात आले आहे.
एलीया वावटळीतून स्वर्गात जात आहे हे अलीशा पाहतो तेव्हा त्याच्या मनावर अतिशय खोलवर प्रभाव पडला असेल यात शंका नाही. खरेतर, अग्निमय घोडे आणि रथ पाहून कोणालाही आश्चर्यच वाटेल! अलीशाने जे पाहिले त्यावरून, यहोवाने त्याची मागणी पूर्ण केली होती हे दिसते. यहोवा जेव्हा आपल्या प्रार्थनांचे उत्तर देतो तेव्हा आपल्याला अग्निमय घोडे आणि रथ पाहायला मिळत नाहीत. पण, यहोवा त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या अफाट शक्तीचा उपयोग करतो हे आपण ओळखू शकतो. तसेच, यहोवा त्याच्या संघटनेच्या पृथ्वीवरील भागावर कसा आशीर्वाद देत आहे हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा जणू त्याचे स्वर्गीय रथ वाटचाल करत असल्याचे आपल्याला दिसते.—यहे. १०:९-१३.
अलीशाला बऱ्याचदा यहोवाच्या अद्भुत शक्तीचा अनुभव आला. खरे पाहता, यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या साहाय्याने अलीशा, एलीयाने केलेल्या चमत्कारांच्या दुप्पट, म्हणजे १६ चमत्कार करू शकला. अलीशाने आणखी एकदा अग्निमय रथ आणि घोडे पाहिले. ही घटना दोथान या ठिकाणी अरामी सैन्याने वेढा घातला होता त्या वेळी घडली, जिचे वर्णन या लेखाच्या सुरुवातीला करण्यात आले आहे.
अलीशा यहोवावर विश्वास ठेवतो
दोथान नगराच्या भोवती शत्रूंनी वेढा घातला होता तरी अलीशा शांत होता. का? कारण, यहोवावर त्याचा दृढ विश्वास होता. आपणही असाच दृढ विश्वास उत्पन्न केला पाहिजे. तेव्हा, आपण यहोवाजवळ त्याच्या पवित्र आत्म्याची मागणी करू या जेणेकरून आपण विश्वास दाखवू शकू आणि आत्म्याच्या फळाचे इतर पैलू विकसित करू शकू.—लूक ११:१३; गलती. ५:२२, २३.
दोथान या ठिकाणी जे घडले त्यावरून अलीशाचा यहोवावरील आणि त्याच्या अदृश्य देवदूतांवरील विश्वास आणखी वाढला. यहोवाने आपले रक्षण करण्यासाठी देवदूत पाठवले असल्याचे त्याने पाहिले. यहोवाने चमत्कारिक रीत्या शत्रूंना आंधळे करून अलीशाचे आणि त्याच्या सेवकाचे रक्षण केले. (२ राजे ६:१७-२३) अशा खडतर प्रसंगी, आणि इतर परिस्थितीतही अलीशाने यहोवावर पूर्ण भरवसा व विश्वास दाखवला.
अलीशाप्रमाणे आपणही यहोवावर पूर्ण भरवसा दाखवू या. (नीति. ३:५, ६) असे केल्यास, यहोवा आपल्यावर दया करेल आणि आपल्याला आशीर्वाद देईल. (स्तो. ६७:१) आपल्या सभोवती काही खरोखरचे अग्निमय रथ आणि घोडे नाहीत. पण, यहोवा येणाऱ्या मोठ्या संकटादरम्यान जगभरातील आपल्या बंधुसमाजाचे रक्षण करेल. (मत्त. २४:२१; प्रकटी. ७:९, १४) तोपर्यंत, आपण हे नेहमी लक्षात ठेवू या की यहोवा देव आपला “आश्रय आहे.”—स्तो. ६२:८.
[३० पानांवरील चौकट]
अलीकडील काही न्यायालयीन विजय
२४३—जगभरात आतापर्यंत यहोवाच्या साक्षीदारांना उच्च न्यायालयांमध्ये मिळालेले विजय
फ्रांस—८२ लाख डॉलर्सची भरपाई
११ डिसेंबर २०१२ रोजी यहोवाच्या साक्षीदारांना, तब्बल १५ वर्षांच्या न्यायालयीन संघर्षानंतर फ्रान्स सरकारने (अमेरिकन डॉलर्समध्ये) दिलेला मोबदला
ग्रीस—सरकारी प्रतिनिधीमंडळ
सरकारी प्रतिनिधीमंडळाने २ नोव्हेंबर २०१२ रोजी हे मान्य केले, की यहोवाचे साक्षीदार हा एक नावाजलेला ख्रिस्ती धर्म असून, त्यांना स्वतःच्या मालकीची उपासनास्थळे बाळगण्याचा हक्क आहे
२०—मानवी हक्कांच्या युरोपियन न्यायालयात एप्रिल २००० पासून यहोवाच्या साक्षीदारांनी जिंकलेले खटले
दक्षिण कोरिया—संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क समितीचा निर्णय
२५ ऑक्टोबर २०१२ - सैन्यात भरती होण्यास नकार देणाऱ्या ३८८ यहोवाच्या साक्षीदारांचे हक्क भंग केल्याबद्दल दक्षिण कोरियाला त्यांची नुकसान भरपाई करण्याचा आदेश देण्यात आला
अध्याय ३३
त्याने राजघराण्याच्या वारसदाराचं संरक्षण केलं
इन्साइट “कारी अंगरक्षक”
“कारी अंगरक्षक”
(कॅरियन).
सैनिकांची एक तुकडी. या तुकडीने यहोयादा महायाजकाला अथल्या राणीला राज्यपदावरून काढून टाकायला आणि यहोआशला यहूदाचा राजा बनवायला मदत केली.—२रा ११:४, १३-१६, १९.
दावीद आणि शलमोन राजांच्या सैन्यांत करेथी लोक काम करायचे. बऱ्याच विद्वानांचं असं म्हणणं आहे, की करेथी यांचंच दुसरं नाव कारी अंगरक्षक आहे. काही विद्वानांच्या मते, करेथी लोक या राजांचे खास अंगरक्षक म्हणूनसुद्धा काम करायचे. (२शमु ८:१८; १रा १:३८; १इत १८:१७) कारी अंगरक्षक हे खरंतर करेथी अंगरक्षकच होते याचा आणखी एक पुरावा आपल्याला मिळतो. तो म्हणजे, हिब्रू शास्त्रवचनांच्या हस्तलिखित प्रतींमध्ये (मॅसोरेटीक लिखाणांमध्ये) २ शमुवेल २०:२३ या वचनात “कारी अंगरक्षक” असं म्हटलंय, तर त्याच्या समासात (मार्जिनमध्ये) आणि बऱ्याच हिब्रू हस्तलिखितांमध्ये “करेथी” असं म्हटलंय.
आशिया मायनरच्या दक्षिण-पश्चिम भागात कॅरिया नावाचा एक प्राचीन जिल्हा आहे. यहेज्केल २५:१६ आणि सफन्या २:५ या वचनांमध्ये करेथी लोकांचा संबंध पलिष्टी लोकांशी जोडलाय. तसंच, या वचनांच्या ग्रीक सेप्ट्युअजिंट भाषांतरात ‘करेथी लोक’ याऐवजी “क्रेतचे लोक” असं म्हटलंय. या दोन कारणांमुळे काहींना असं वाटतं, की कारी अंगरक्षक म्हणून काम करणारे लोक मुळात कॅरिया जिल्यातून क्रेतच्या मार्गाने आले असतील.
टेहळणी बुरूज९१ २/१ ३१ ¶५-६
“मुकुट आणि साक्षपट”
महायाजकाने वयाने लहान असलेल्या यहोआश राजाच्या डोक्यावर साक्षपट का आणि कसा ठेवला? ओटो थेनिस या जर्मन विद्वानाने काय म्हटलं याकडे लक्ष द्या. त्याने म्हटलं: “नियमशास्त्र हे मोशेद्वारे दिलेल्या आज्ञांचं पुस्तक होतं. राजाला मुकुट घातल्यानंतर त्याच्या डोक्यावर हे नियमशास्त्र धरलं जायचं. आणि याचा एक लाक्षणिक अर्थ होता.” तसंच, प्राध्यापक अर्नस्ट् बरथ्यूसुद्धा म्हणतात: “[राजावर] नियमशास्त्र ठेवण्याचा लाक्षणिक अर्थ असा होता, की राजाला त्यात दिलेल्या नियमांप्रमाणे राज्य करायचं होतं.”
देवाने अशी आज्ञा दिली होती, की राजाने आपल्या राजासनावर बसल्यावर नियमशास्त्राची एक प्रत स्वतःसाठी लिहून काढावी, आयुष्यभर त्याचा अभ्यास करावा आणि त्यात सांगितलेल्या गोष्टी लागू कराव्यात. (अनुवाद १७:१८-२०) नवीन राजाच्या डोक्यावर काही वेळ “साक्षपट” ठेवून कदाचित हे दाखवलं जायचं, की तो आता राजा जरी बनला असला तरी त्याला यहोवाच्या नियमशास्त्राचं पालन करणं गरजेचं आहे. पण दुःखाची गोष्ट म्हणजे यहोयादा महायाजकाच्या मृत्यूनंतर यहोआश हा महत्त्वाचा धडा विसरून गेला. हळूहळू त्याने यहोवाची उपासना करायचं सोडून दिलं आणि शेवटी त्याला मारून टाकण्यात आलं.—२ इतिहास २४:१७-२५.
इन्साइट “यहोआश” क्र. १ ¶५
यहोआश
यहोवाच्या मंदिराची दुरुस्ती करायची खूप गरज होती. कारण ते बांधून १५० पेक्षा जास्त वर्षं झाली होती. शिवाय, अथल्या राणीच्या शासनकाळात मंदिराकडे दुर्लक्ष झालं होतं आणि त्यातल्या बऱ्याच वस्तू लुटण्यात आल्या होत्या. त्यामुळे मंदिराच्या दुरुस्तीसाठी यहोआश राजाने लेव्यांना अशी आज्ञा दिली, की त्यांनी यहूदाच्या सर्व शहरांमध्ये जाऊन सगळ्या इस्राएली लोकांकडून पैसा गोळा करावा. पण लेव्यांनी या कामाला मनापासून प्रतिसाद दिला नाही आणि त्यामुळे मंदिराचं काम होत नव्हतं. (२रा १२:४-८; २इत २४:४-७) त्यामुळे पैसे गोळा करण्याच्या आणि ते वापरण्याच्या व्यवस्थेत बदल करण्यात आला. या गोष्टीला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि मंदिराच्या दुरुस्तीचं काम सुरू होऊन पूर्ण झालं.—२रा १२:९-१६; २इत २४:८-१४.
टेहळणी बुरूज२३.०६ १९ ¶१७, तळटीप
आपण यहोवाची भीती का बाळगली पाहिजे? यहोआशने यहोवाची भीती बाळगायचं सोडून दिलं. आणि यामुळे त्याला पुढे खूप वाईट परिणाम भोगावे लागले. यहोवाने म्हटलं होतं: “जे माझा अपमान करतात त्यांचा मी तिरस्कार करीन.” (१ शमु. २:३०) सीरियाच्या एका छोट्याशा सैन्याने योआशच्या ‘मोठ्या सैन्याला’ हरवलं आणि त्याला “जबर जखमी” केलं. सीरियाचं सैन्य परत गेल्यानंतर यहोआशच्या सेवकांनीच जखऱ्याला मारल्याबद्दल त्याचा खून केला. लोकांनी त्या दुष्ट राजाला “राजांच्या कबरेत” दफन करायच्या लायकीचंसुद्धा समजलं नाही.—२ इति. २४:२३-२५.
[तळटीप]
मत्तय २३:३५ सांगतं की, जखऱ्या बरख्याचा मुलगा होता. असं दिसतं की, बायबलमधल्या बऱ्याच लोकांप्रमाणे यहोयादाचीसुद्धा दोन नावं असावीत. (मत्त ९:९ सोबत मार्क २:१४ ची तुलना करा) किंवा बरख्या जखऱ्याचा आजोबा किंवा त्याचा पूर्वज असावा.
वाईट संगतीमुळे यहोआशने यहोवाला सोडले
आपल्या मुलांना शिकवा
देवाचे मंदिर असलेल्या शहरात अर्थात जेरूसलेमेत तो भयंकर काळ होता. राजा अहज्या याची नुकतीच हत्या झाली होती. यानंतर, त्याची आई अथल्या हिने एक अतिशय वाईट काम केले. तिने तिच्या स्वतःच्या नातवांची म्हणजे अहज्याच्या पुत्रांची हत्या करवली! कशासाठी माहीत आहे?— त्यांच्याऐवजी तिला राणी होता यावे म्हणून.
पण अथल्याचा एक नातू, बाळ यहोआश मात्र त्याच्या दुष्ट आजीच्या तावडीतून सुटतो. त्याच्या आजीला हे माहीतही होत नाही. कसे काय माहीत आहे?— त्याचे असे होते, की त्या बाळाची एक आत्या असते जिचे नाव यहोशेबा होते. ती बाळ यहोआशला देवाच्या मंदिरात लपवून ठेवते. ती त्याला मंदिरात लपवून ठेवू शकली कारण तिचा नवरा यहोयादा तिथे महायाजक होता. अशा प्रकारे ते दोघं नवरा-बायको यहोआशला तिथे सुरक्षित ठेवतात.
सहा वर्षांपर्यंत यहोआश मंदिरातच लहानाचा मोठा होतो; कोणालाच त्याचा थांगपत्ता लागत नाही. तेथे त्याला यहोवा देवाविषयी आणि त्याच्या नियमांचे शिक्षण दिले जाते. शेवटी, सात वर्षांचा झाल्यावर यहोयादा, यहोआशला राजा बनवण्याचे ठरवतो. तो हे कसे करतो आणि यहोआशची दुष्ट आजी राणी अथल्या हिचे काय होते याविषयी तुम्हाला आणखी ऐकायचे आहे का?—
बरं, यहोयादा, त्या काळी जेरुसलेमच्या राजांच्या खास अंगरक्षकांची एक गुप्त सभा भरवतो. आपण राजा अहज्या याच्या एका पुत्राला कसे वाचवले ते तो त्यांना सांगतो. आणि मग, यहोआशला त्यांच्यासमोर आणतो. हाच जेरूसलेमच्या राजगादीचा खरा वारस आहे हे अंगरक्षक लगेच ओळखतात. आणि मग ते सर्व मिळून एक योजना आखतात.
यहोयादा एके दिवशी यहोआशला लोकांसमोर आणतो आणि त्याच्या डोक्यावर राजमुकूट घालतो. तेव्हा सर्व लोकांनी, “टाळ्यांचा गजर करून म्हटले, राजा चिरायु होवो.” अंगरक्षक लगेच यहोआशभोवती सुरक्षा कडे उभारतात. काय गोंधळ चालला आहे हे पाहण्यासाठी राणी अथल्या पळतच बाहेर येते. तिला वाटते, की कोणीतरी तिच्याविरुद्ध फितुरी करत आहे म्हणून ती फितुरी रे फितुरी असे ओरडू लागते. तेव्हाच यहोयादाच्या हुकूमावरून अंगरक्षक, राणी अथल्या हिचा वध करतात.—२ राजे ११:१-१६.
पण, यहोआश नेहमीच यहोयादाच्या आज्ञेत राहून जे बरोबर आहे ते करत राहिला का?— यहोयादा जिवंत होता तोपर्यंतच तो चांगला राहिला. यहोआशचे वडील राजा अहज्या आणि त्याचे आजोबा यहोराम यांनी, देवाच्या मंदिराच्या दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष केले होते. पण यहोआशाने मंदिराच्या दुरुस्तीसाठी लोकांकडून वर्गणी गोळा केली. पण मग, महायाजक यहोयादा मरण पावल्यावर काय झाले ते आपण पाहू या.—२ राजे १२:१-१६.
आतापर्यंत यहोआश ४० वर्षांचा झाला होता. यहोवाची सेवा करणाऱ्या लोकांबरोबरच आपली मैत्री टिकवून ठेवण्याऐवजी त्याने खोट्या दैवतांची उपासना करणाऱ्यांबरोबर मैत्री केली. तेव्हा यहोयादाचा पुत्र जखऱ्या हा यहोवाचा याजक म्हणून सेवा करत होता. वाईट लोकांबरोबर मैत्री केल्यामुळे यहोआशसुद्धा वाईट कामे करू लागला. तेव्हा जखऱ्याने काय केले असावे, असे तुम्हाला वाटते?—
जखऱ्याने यहोआश व लोकांना असे म्हटले: “तुम्ही परमेश्वरास सोडिले म्हणून त्यानेहि तुम्हास सोडिले आहे.” हे शब्द ऐकून यहोआशला इतका राग आला की त्याने जखऱ्याला दगडमार करून ठार मारण्याची आज्ञा दिली. विचार करा—यहोयादाने म्हणजे जखऱ्याच्या वडिलांनीच यहोआशला त्याच्या मारेकऱ्यापासून वाचवले होते आणि आता तो स्वतःच जखऱ्याचा मारेकरी बनला!—२ इतिहास २४:१-३, १५-२२.
आपण या वृत्तांतातून काही धडा शिकू शकतो का?— आपल्याला अथल्यासारखे व्हायला आवडणार नाही. तिच्या मनात खूप द्वेष होता व ती क्रूर होती. उलट आपण आपल्या भाऊबहिणींवर तसेच आपल्या शत्रूंवरही प्रेम केले पाहिजे. येशूने आपल्याला असेच करण्यास शिकवले. (मत्तय ५:४४; योहान १३:३४, ३५) यहोआशप्रमाणे फक्त सुरुवातीलाच चांगले असणे पुरेसे नाही तर आपण शेवटपर्यंत चांगले राहिले पाहिजे. यहोवावर प्रेम करणाऱ्यांबरोबर आणि त्याची सेवा करण्याचे उत्तेजन देणाऱ्यांबरोबरच आपण मैत्री केली पाहिजे.
यहोवाला प्रसन्न करणाऱ्या देणग्या
ही कहाणी इतकी रोचक नाही. राणी अथल्याने कावेबाजपणे व हत्या करून सिंहासन बळकावले होते. सिंहासनाच्या सर्व वारशांची हत्या झाली आहे अशी चुकीची समजूत करून घेऊन ती स्वतःला राणी बनवते. पण दुसरी एक स्त्री अर्थात यहोशेबा हिचे यहोवा आणि त्याच्या नियमशास्त्रावर अफाट प्रेम होते. ती निर्भीडपणे एका राजपुत्राला म्हणजे यहोआशला लपवून ठेवते. यहोशेबा आणि तिचा पती महायाजक यहोयादा, यहोआशला सहा वर्षांपर्यंत मंदिरातील कोठडीत लपवून ठेवतात.—२ राजे ११:१-३.
यहोआश सात वर्षांचा होतो तेव्हा महायाजक यहोयादा, कावेबाजपणे सिंहासनावर विराजमान झालेल्या राणी अथल्याची सिंहासनावरून उचलबांगडी करण्याकरता त्याने आखलेल्या योजनेची सुरुवात करण्यास तयार होतो. लपवून ठेवलेल्या यहोआशला तो सर्वांसमक्ष आणतो आणि राज्याचा खरा राजा म्हणून त्याच्या डोक्यावर मुकूट घालतो. त्यानंतर राजदरबारातील रक्षक, दुष्ट राणी अथल्या हिला मंदिराच्या बाहेर नेऊन ठार मारतात. तेव्हा लोकांना किती हायसे वाटते व आनंद होतो! यहोयादा व यहोशेबा यांचा, त्यांच्या कार्यांद्वारे यहुदा राज्यात खऱ्या उपासनेची पुनःस्थापना करण्याकरता सिंहाचा वाटा होता. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी, मशीहा ज्या वंशातून येणार होता त्या दावीदाचा राजसी वंश चालू ठेवण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती.—२ राजे ११:४-२१.
नव्याने राजा बनलेल्या यहोआशला देखील देव संतुष्ट होईल अशाप्रकारे कार्य करायचे होते. यहोवाच्या मंदिराची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. यहुदावर फक्त मीच राज्य करणार अशी फाजील महत्त्वकांक्षा अथल्याने बाळगल्यामुळे, मंदिराकडे फक्त दुर्लक्षच झाले नव्हते तर त्याची लूटालूटही झाली होती. त्यामुळे, यहोआशने मंदिराची पुनःबांधणी करून तेथे शुद्ध उपासनेची पुन्हा सुरुवात करण्याचा निर्धार केला. यहोवाच्या मंदिराच्या पुनर्वसनासाठी लागणारा खर्च गोळा करण्याकरता त्याने विनाविलंब एक हुकूम काढला. तो म्हणाला: “समर्पण केलेला जेवढा पैसा परमेश्वराच्या मंदिरी येतो, म्हणजे गणती करिताना प्रत्येक माणसाकडून घेतलेला पैसा. प्रत्येक मनुष्याचे नवसाच्या संबंधाने याजक मोल ठरवील तो पैसा आणि लोक परमेश्वराच्या मंदिरात खुशीने आणीत तो सर्व पैसा, याजकांनी आपल्या ओळखीच्या लोकांपासून घ्यावा आणि मंदिरात जी काय मोडतोड झाली असेल तिची दुरुस्ती करावी.”—२ राजे १२:४, ५.
लोकांनी पण सढळ हाताने देणगी दिली. परंतु याजक मंदिराची डागडूजी करण्याची आपली जबाबदारी पूर्ण मनाने पार पाडत नव्हते. त्यामुळे, राजाने यात जातीने लक्ष घालण्याचे ठरवले आणि सर्व देणग्या एका खास पेटीत गेल्या पाहिजेत, अशी आज्ञा दिली. त्याने यहोयादाला या कामावर नेमले. याविषयीचा अहवाल असे म्हणतो: “यहोयादा याजकाने एक पेटी घेऊन तिच्या झाकणास एक भोक पाडिले आणि ती यहोवाच्या मंदिरात येणाऱ्याच्या उजव्या हाताकडे वेदीजवळ ठेविली. यहोवाच्या मंदिरात जेवढा पैसा येत असे तेवढा द्वाररक्षक याजक त्या पेटीत टाकीत. नंतर पेटीत पुष्कळ पैसा झाला आहे असे पाहून राजाचा चिटणीस व मुख्य याजक येऊन तो यहोवाच्या मंदिरात मिळालेला पैसा थैल्यात बांधून तोलत असत. तो पैसा तोलून जे यहोवाच्या मंदिराच्या दुरुस्तीचे काम पाहण्यासाठी नेमिलेले होते त्यांच्या हवाली तो करत; ते तो यहोवाच्या मंदिराचे काम करणारे सुतार व बांधकाम करणारे, गवंडी व पाथरवट यास देत, तसेच इमारती लाकूड व घडलेले चिरे विकत घेण्यास व मंदिरात मोडतोड झाली होती तिची दुरुस्ती करण्यात खर्चित.”—२ राजे १२:९-१२, NW.
लोकांनी पूर्ण मनाने प्रतिसाद दिला. यहोवाच्या उपासना मंदिराची पुनःस्थापना झाली आणि परिणामस्वरूप त्याची उपासना प्रतिष्ठित पद्धतीने सुरु झाली. अशाप्रकारे गोळा केलेली पै न पै नेक कामासाठी उपयोगात आणण्यात आली होती. स्वतः राजा यहोआशने जातीने या कामाची दखल घेतली होती.
आज, यहोवाची दृश्य संस्था, सर्व देणगीरुपी पैसा यहोवाच्या उपासनेची वृद्धी होण्याकरता उपयोगात आणला जात आहे यावर जातीने लक्ष देते. आणि सर्व खरे ख्रिश्चन प्राचीन इस्राएलांप्रमाणे पूर्ण मनाने या व्यवस्थेला प्रतिसाद देतात. कदाचित तुम्ही देखील, गेल्या सेवा वर्षात राज्याच्या वाढीसाठी वापरण्यात आलेल्या पैशात आपली देणगी टाकली असावी. तुम्ही दिलेल्या पैशाचा कोणकोणत्या गोष्टींसाठी उपयोग करण्यात आला हे आपण पाहू या.
अध्याय ३४
तो “यहोवाला एकनिष्ठ राहिला”
टेहळणी बुरूज११ ५/१ १५ ¶१-३
तुम्हाला माहीत होतं का?
प्राचीन काळातल्या मातीच्या शिक्क्यांवरची नावं आणि बायबलमध्ये उल्लेख केलेल्या व्यक्तींच्या नावांबद्दल काय म्हणता येईल?
▪ प्राचीन काळात कार्यालयीन किंवा दरबारी कागदपत्रं हाताळणारे लोक एखादं महत्त्वाचं कागदपत्र गुंडाळून त्याला दोरीने बांधायचे. आणि गाठ बांधलेल्या ठिकाणी ओल्या मातीचा गोळा लावून त्यावर शिक्का मारायचे. ठसा उमटवलेल्या शिक्क्यांचा वापर सहसा सही म्हणून, साक्ष म्हणून किंवा एखादं कागदपत्र अधिकृत आहे हे दाखवण्यासाठी केला जायचा.
काही वेळा शिक्का मारण्यासाठी मुद्रेच्या आंगठीचासुद्धा वापर केला जायचा आणि त्या खूप मौल्यवान समजल्या जायच्या. (उत्पत्ती ३८:१८; एस्तेर ८:८; यिर्मया ३२:४४) बऱ्याचदा शिक्क्यावर मालकाचं नावं, त्याची पदवी आणि त्याच्या वडिलांचं नाव कोरलेलं असायचं.
संशोधकांना ठसे असलेले प्राचीन काळातले शेकडो शिक्के सापडले आहेत. त्यांना बुले म्हटलं जातं. यांपैकी काहींवर बायबलमधल्या व्यक्तींची नावं कोरलेली आहेत. उदाहरणार्थ, पुरात्त्वशास्त्रज्ञांना दोन शिक्के किंवा मुद्रा सापडल्या आहेत. आणि असं मानलं जातं की त्या यहुदी राजांच्या असाव्यात. एकावर असं लिहिलंय: “यहूदाचा राजा, यहोतामचा [योथामचा मुलगा] आहाज याचं.” तर दुसऱ्यावर असं लिहिलंय: “यहूदाचा राजा, आहाजचा [मुलगा] हिज्कीया याचं.” (२ राजे १६:१, २०) आहाज आणि हिज्कीया राजांनी इ.स.पू. ८ व्या शतकादरम्यान राज्य केलं.
आयझयाज प्रॉफसी-१ अध्या. १५ ¶४-६
यहोवा त्याच्या लोकांच्या शत्रूंवर न्यायदंड बजावतो
४ सगळ्यात आधी पलिष्टी लोकांवर न्यायदंड घोषित केला जातो. “आहाज राजाचा मृत्यू झाला त्या वर्षी देवाने असा न्यायसंदेश दिला: ‘हे पलेशेथ! तुला मारणारी काठी मोडण्यात आली म्हणून खूश होऊ नकोस. कारण सापाच्या वंशातून एक विषारी साप निघेल, आणि त्याचा वंशज एक चपळ व जहरी साप असेल.’”—यशया १४:२८, २९, तळटीप.
५ पलिष्टी लोकांनी येऊन यहूदाचं राज्य काबीज करू नये म्हणून त्यांना रोखण्याची ताकद उज्जीया राजामध्ये होती. (२ इतिहास २६:६-८) पलिष्ट्यांसाठी तो एका सापासारखा होता आणि तो आपल्या काठीने आपल्या या विरोधकांना मारत राहिला. पण ‘ही काठी मोडल्यावर,’ म्हणजे त्याचा मृत्यू झाल्यावर योथाम हा विश्वासू राजा राज्य करू लागला. पण “लोक मात्र अजूनही दुष्टपणे वागत होते.” त्यानंतर आहाज राजा बनला. तेव्हा परिस्थिती बदलली. पलिष्टी लोकांनी यहूदावर हल्ले केले आणि त्यांत त्यांना यश मिळत गेलं. (२ इतिहास २७:२; २८:१७, १८) पण मग परिस्थिती पुन्हा बदलू लागली. इ.स.पू. ७४६ मध्ये आहाज राजाचा मृत्यू झाला आणि वयाने लहान असलेला हिज्कीया राजा बनला. आता जर पलिष्टी लोकांना वाटलं असेल, की परिस्थिती अजूनही आपल्याच हातात आहे तर ही त्यांची खूप मोठी चूक होती. कारण हिज्कीया पलिष्ट्यांना हरवू लागला. उज्जीया राजाचा वंशज असलेला हिज्कीया राजा त्यांच्यासाठी एका “उडत्या आग्या सापासारखा” होता. या सापाप्रमाणेच, त्याने पलिष्ट्यांवर वीजेच्या वेगाने हल्ला केला. आणि साप जसा दंश करून शरीरात विष सोडतो आणि त्यामुळे संपूर्ण शरीराची आगआग होते, तशी अवस्था हिज्कीयाने पलिष्ट्यांची केली.
६ या नवीन राजाचं हे किती योग्य वर्णन आहे! “हिज्कीयाने थेट गाझा आणि त्याचे प्रदेश इथपर्यंत पलिष्टी लोकांना हरवलं.” (२ राजे १८:८) अश्शूरचा राजा सन्हेरीब याच्याबद्दल लिहिलेल्या ऐतिहासिक अहवालातून दिसून येतं, की पलिष्टी लोक हिज्कीयाच्या अधीन झाले. त्यामुळे पलिष्टी लोकांवर गरिबी आली. पण “गोरगरीबांची मुलं” असलेल्या यहूदाच्या राज्यात मात्र सुरक्षितता आणि खाण्यापिण्याच्या गोष्टींची रेलचेल होती.—यशया १४:३०, ३१ वाचा.
सावध राहा! १२/१० २७ ¶३-५
एक भरवशालायक पुस्तक—भाग २
इ.स.पू. ७४० मध्ये अश्शूरी लोकांनी इस्राएलच्या उत्तरेकडच्या राज्याची राजधानी असलेल्या शोमरोनवर विजय मिळवला आणि तिथल्या लोकांना बंदी बनवून नेलं. पुढे आठ वर्षांनी अश्शूरी लोकांनी यहूदाच्या राज्यावर हल्ला करून विजय मिळवला. (२ राजे १८:१३) अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहूदाचा राजा हिज्कीया याला ३० तालान्त सोनं आणि ३०० तालान्त चांदी इतका दंड भरायला लावला. बायबलचा अहवाल सांगतो, की हिज्कीयाने हा दंड भरला. पण एवढ्यावरच सन्हेरीबचं समाधान झालं नाही. त्याला यहूदाची राजधानी असलेलं यरुशलेम शहरसुद्धा काबीज करायचं होतं.—२ राजे १८:९-१७, २८-३१.
पुरात्त्वशास्त्रज्ञांना निनवे शहरात सापडलेल्या सन्हेरीबबद्दलच्या ऐतिहासिक लिखाणांमध्ये याच घटनांचा उल्लेख पाहायला मिळतो. मातीच्या एका षटकोणी ठोकळ्यावर कोरलेल्या मजकुरात अश्शूरच्या राजाने अशी बढाई मारली आहे: “यहुदी असलेला हिज्कीया मला शरण आला नाही, मी त्याच्या ४६ भक्कम शहरांना, तटबंदी असलेल्या बुरुजांना आणि आसपासच्या असंख्य छोट्या गावांना वेढा घालून (त्यांना) काबीज केलं. . . . मी त्याला [हिज्कीयाला] त्याच्या स्वतःच्या राजमहालात पिंजऱ्यातल्या पक्ष्यासारखं कैद केलं.” सन्हेरीबने असाही दावा केला, की हिज्कीयाने त्याला “३० तालान्त सोनं आणि ८०० तालान्त चांदी, मौल्यवान रत्नं, . . . (आणि) सर्व प्रकारचा मौल्यवान खजिना पाठवला.” पण मुळात हिज्कीयाने पाठवलेले चांदीचे तालान्त खूप कमी होते.
पण एक गोष्ट लक्षात घेण्यासाखी आहे. ती म्हणजे, सन्हेरीबने यरुशलेम काबीज केल्याचा दावा केला नाही. कारण त्याचं सैन्य यरुशलेमवर हल्ला करणार होतं तेव्हा देवाने त्यांना हरवलं. पण याबद्दल तो एक अक्षरही बोलत नाही. बायबलचा अहवाल सांगतो, की देवाच्या एका स्वर्गदूताने एका रात्रीत १,८५,००० अश्शूरी सैनिकांना मारून टाकलं. (२ राजे १९:३५, ३६) जॅक फिनगन हे विद्वान असं म्हणतात: “अश्शूरचे राजे फक्त त्यांच्या यशाबद्दल आणि पराक्रमांबद्दल लिहायचे. त्यामुळे सन्हेरीबने आपल्या या अपमानकारक पराभवाबद्दल लिहिलेलं नाही याचं आपल्याला आश्चर्य वाटत नाही.”
टेहळणी बुरूज०९ ५/१ २७ ¶३-५
तुम्हाला माही होतं का?
हिज्कीया राजाने यरुशलेममध्ये पाणी आणण्यासाठी खरोखरच एक बोगदा तयार केला होता का?
हिज्कीयाने इ.स.पू. ७४५ पासून इ.स.पू. ७१७ पर्यंत यहूदावर राज्य केलं. त्या काळात अश्शूरी लोक आसपासच्या बऱ्याच शहरांवर हल्ला करत होते. बायबल म्हणतं, की हिज्कीया राजाने यरुशलेम शहर सुरक्षित ठेवण्यासाठी आणि युद्धाच्या काळात शहरात पाणीपुवरठा असावा म्हणून बरंच काही केलं. यापैकीच एक म्हणजे, शहरात पाणी आणण्यासाठी त्याने १,७४९ फूट लांबीचा एक बोगदा किंवा पाट बांधला.—२ राजे २०:२०; २ इतिहास ३२:१-७, ३०.
इ.स. १८८० मध्ये अशाच एका बोगद्याचा शोध लागला. त्याला हेजकायाज टनेल (हिज्कीयाजा बोगदा) किंवा सिलोम टनेल (शिलोहचा बोगदा) म्हटलं गेलं. बोगद्याच्या भिंतीवर एक कोरलेलं लिखाण सापडलं. बोगद्याचं खोदकाम शेवटच्या टप्प्यांमध्ये कसं झालं याचं वर्णन करणारं ते लिखाण होतं. लिखाणातल्या अक्षरांवरून बऱ्याच विद्वानांनी असं म्हटलंय, की तो बोगदा हिज्कीयाच्या काळातला आहे. पण अलीकडच्या वर्षांत काही विद्वानांनी असं म्हटलं की तो बोगदा हिज्कीयाच्या काळाच्या ५०० वर्षांनंतर बांधण्यात आला. मग २००३ मध्ये इस्राएली शास्त्रज्ञांच्या एक टीमने, हा बोगदा नेमका कधी बांधण्यात आला होता हे सिद्ध करायच्या उद्देशाने यावर संसोधन केलं. आणि त्यातून त्यांना जे समजलं ते त्यांनी प्रकाशित केलं. त्यांना नेमकं काय कळलं?
जरुसलेमच्या हिब्रू युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉक्टर आमोस फ्रमकीन असं म्हणतात: “बोगद्याच्या भिंतीची तसंच त्याच्या छतावरून लटकणाऱ्या खडकांची आणि खनिजांची चाचणी केल्यावर हे दिसून आलं, की हा बोगदा हिज्कीयाच्या काळातला आहे.” नेचर या वैज्ञानिक मासिकाच्या एका लेखात असं म्हटलंय: “वैज्ञानिक चाचण्या, प्राचीन लिखाणांचा अभ्यास आणि ऐतिहासिक अहवाल या तिन्ही गोष्टी दाखवून देतात, की हा बोगदा इ.स.पू. ७०० च्या सुमारास बांधण्यात आला होता. या काळातल्या दुसऱ्या कोणत्याही बांधकामापेक्षा बायबलमध्ये उल्लेख केलेल्या सिलोम टनेलची तारीख सगळ्यात अचूक आहे.”
टेहळणी बुरूज१३ ११/१५ १८-२० ¶९-१८
सात मेंढपाळ, आठ लोकनायक—आज आपल्याकरता कोणता अर्थ राखून आहेत?
९ यशयाने केलेली भविष्यवाणी खरी ठरली. अश्शूरी लोकांनी उत्तरेकडील इस्राएल राज्यावर विजय मिळवला आणि त्यातील रहिवाशांना कैदी बनवून नेले. अशा रीतीने दाविदाच्या वंशातून नसलेल्या राजाला यहूदाच्या सिंहासनावर बसवण्याचा इस्राएल राज्याचा बेत धुळीस मिळाला. पण अश्शूऱ्यांच्या योजनांचे काय झाले? अश्शूरी लोकांनी आता यहूदाकडे मोर्चा वळवला. अहवाल सांगतो: “हिज्कीया राजाच्या कारकीर्दीच्या चौदाव्या वर्षी अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांवर चढाई करून ती घेतली.” सन्हेरीबाने यहूदातील एकूण ४६ शहरे काबीज केली असे सांगितले जाते. अश्शूरचे शक्तिशाली सैन्य एकापाठोपाठ एक शहरावर ताबा मिळवत जेरूसलेमच्या जवळ जवळ येत होते. तुम्ही त्या वेळी जेरूसलेममध्ये राहत असता, तर तुम्हाला कसे वाटले असते याची कल्पना करा!—२ राजे १८:१३.
१० अश्शूरी लोक लवकरच जेरूसलेमवरही हल्ला करतील हे साहजिकच हिज्कीयाला माहीत होते. पण, त्याने घाबरून जाऊन आपला अविश्वासू पिता आहाज याच्याप्रमाणे एका मूर्तिपूजक राष्ट्राची मदत घेतली नाही. उलट, त्याने यहोवावर भरवसा ठेवला. (२ इति. २८:२०, २१) संदेष्टा मीखा याने अश्शूऱ्यांसंबंधी जे सांगितले होते ते हिज्कीयाला माहीत असावे: “[अश्शूरविरुद्ध] आम्ही सात मेंढपाळ व आठ लोकनायक उभे करू. ते अश्शूर देश, . . . तरवारीने उद्ध्वस्त करतील.” (मीखा ५:५, ६) या देवप्रेरित शब्दांमुळे हिज्कीयाला नक्कीच प्रोत्साहन मिळाले असेल. कारण, अश्शूऱ्यांचा सामना करण्यासाठी यहोवा एक अगदीच असामान्य सैन्य उभे करून अश्शूऱ्यांचा पराभव करेल हे या शब्दांवरून दिसून आले.
११ सात मेंढपाळ व आठ लोकनायक (“सरदार,” द न्यू इंग्लिश बायबल) यांच्याविषयीच्या भविष्यवाणीची सर्वात महत्त्वाची पूर्णता येशूच्या जन्माच्या बऱ्याच काळानंतर होणार होती. मीखाच्या भविष्यवाणीत येशूला “इस्राएलचा शास्ता” म्हणण्यात आले होते, ज्याचा “उद्भव प्राचीन काळापासून . . . आहे.” (मीखा ५:१, २ वाचा.) सात मेंढपाळ व आठ लोकनायक यांच्याविषयीच्या भविष्यवाणीची पूर्णता भविष्यात होईल, जेव्हा आधुनिक काळातील एक “अश्शूरी” यहोवाच्या लोकांवर हल्ला करून त्यांचा पूर्णपणे नाश करण्याचा प्रयत्न करेल. या शक्तिशाली शत्रूचा सामना करण्यासाठी यहोवा, सध्या स्वर्गात राज्य करत असलेल्या त्याच्या पुत्राद्वारे कोणते सैन्य उभे करेल? ते आपण नंतर पाहणारच आहोत. पण प्रथम, हिज्कीयाने अश्शूरी सैन्यापासून आपल्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी जी पावले उचलली त्यांपासून आपण कोणता धडा घेऊ शकतो हे पाहू या.
हिज्कीया सुज्ञतेने पावले उचलतो
१२ आपण एखादी गोष्ट स्वतःच्या बळावर करू शकत नाही तेव्हा यहोवा आपली मदत करण्यास नेहमीच तयार असतो; पण ज्या गोष्टी करणे आपल्या हातात आहे त्या आपण कराव्यात अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो. हिज्कीयाने “आपले सरदार व योद्धे” यांच्यासोबत चर्चा केली आणि त्या सर्वांनी मिळून “नगराबाहेरील पाण्याचे झरे बंद” करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, “कोट मोडून पडला होता तो हिज्कीयाने हिंमत धरून पुनः बांधून काढला व त्यावरील बुरूज उंच केले आणि त्याच्या बाहेरचा दुसरा कोट त्याने मजबूत केला, . . . आणि शस्त्रे व ढाली मुबलक बनवल्या.” (२ इति. ३२:३-५) अशा रीतीने त्या काळी आपल्या लोकांचे संरक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी यहोवाने हिज्कीया, त्याचे सरदार आणि विश्वासू संदेष्टे यांसारख्या अनेक धैर्यवान मनुष्यांचा उपयोग केला.
१३ यानंतर हिज्कीयाने जे केले, ते पाण्याचे झरे बंद करण्यापेक्षा व शहराची तटबंदी मजबूत करण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे होते. एका चांगल्या मेंढपाळाप्रमाणे हिज्कीयाला आपल्या राज्यातील लोकांची काळजी होती. त्यामुळे त्याने लोकांना एकत्रित करून त्यांना या शब्दांत प्रोत्साहन दिले: “अश्शूरचा राजा व त्याजबरोबरचा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका; त्याच्यापेक्षा आमच्या पक्षाचा जो आहे तो मोठा आहे. मांसमय भुजांचा त्यांस आधार आहे, पण आम्हास मदत करावयास व आमच्या लढाया लढावयास आमचा देव परमेश्वर [“यहोवा,” NW] आम्हाबरोबर आहे.” हे शब्द ऐकून लोकांचा विश्वास किती दृढ झाला असेल! राजाने त्यांना आठवण करून दिली की खुद्द यहोवा त्यांच्या बाजूने लढणार होता. “यहूदाचा राजा हिज्कीया याच्या या बोलण्यावर सर्व प्रजेने भरवसा ठेवला.” हिज्कीयाने बोललेल्या शब्दांमुळे लोकांचे धैर्य वाढले याकडे लक्ष द्या. यहोवाने भाकीत केल्याप्रमाणे हिज्कीया, त्याचे सरदार व योद्धे, तसेच मीखा व यशया यांच्यासारखे संदेष्टे, यांनी चांगले मेंढपाळ बनून लोकांचे मार्गदर्शन केले.—२ इति. ३२:७, ८; मीखा ५:५, ६ वाचा.
१४ अश्शूरच्या राजाने आपल्या सैन्यासोबत जेरूसलेमजवळील लाखीश येथे तळ ठोकला. तेथून त्याने तीन राजदूतांना पाठवून जेरूसलेमच्या रहिवाशांना शरणागती पत्करण्याचे आवाहन केले. राजाने पाठवलेला प्रतिनिधी, ज्याला रब-शाके म्हटले जायचे त्याने जेरूसलेमच्या लोकांशी त्यांच्या स्वतःच्या भाषेत अर्थात हिब्रू भाषेत बोलण्यास सुरुवात केली. त्याने लोकांना असे पटवून देण्याचा प्रयत्न केला की त्यांनी आपल्या राजाला सोडून द्यावे आणि अश्शूऱ्यांना जाऊन मिळावे. तसेच, त्यांना एका दुसऱ्या देशात वतन दिले जाईल आणि तेथे ते अगदी आरामशीर जीवन जगू शकतील या प्रकारची खोटी आश्वासनेही त्याने लोकांना दिली. (२ राजे १८:३१, ३२ वाचा.) त्यानंतर रब-शाके याने असा दावा केला की ज्या प्रकारे इतर राष्ट्रांचे देव त्यांच्या उपासकांना वाचवू शकले नाहीत, त्याच प्रकारे यहोवादेखील यहुद्यांना अश्शूऱ्यांच्या तावडीतून सोडवू शकणार नाही. पण, लोकांनी सुज्ञपणा दाखवून या खोट्या दाव्यांना कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही. आजही यहोवाच्या लोकांवर खोटे आरोप लावले जातात तेव्हा बरेचदा ते सुज्ञपणे कोणतेही प्रत्युत्तर देत नाहीत.—२ राजे १८:३५, ३६ वाचा.
१५ हिज्कीया साहजिकच काळजीत पडला होता. पण दुसऱ्या एखाद्या राष्ट्राकडून मदत मागण्याऐवजी त्याने यशया संदेष्ट्याला आपल्याकडे बोलावून घेतले. यशयाने हिज्कीयाला सांगितले: “[सन्हेरीब] या नगरात प्रवेश करणार नाही, त्यावर एकही बाण सोडणार नाही.” (२ राजे १९:३२) जेरूसलेमच्या रहिवाशांनी हिंमत न हारता यहोवावर भरवसा ठेवायचा होता. कारण यहोवा स्वतः यहूदाच्या वतीने लढणार होता. आणि तो खरोखरच त्यांच्या वतीने लढला! “त्या रात्री असे झाले की परमेश्वराच्या देवदूताने जाऊन अश्शूरी गोटातले एक लक्ष पंचाऐंशी हजार लोक मारले!” (२ राजे १९:३५) अशा प्रकारे, जेरूसलेमचा बचाव झाला. पण, हा बचाव हिज्कीयाने नगराबाहेरील झरे बंद केल्यामुळे किंवा तटबंदी मजबूत केल्यामुळे झाला नव्हता; तर, यहोवा त्यांच्या बाजूने लढल्यामुळेच शहराचा बचाव झाला होता!
आपण काय शिकतो?
१६ सात मेंढपाळ व आठ लोकनायक यांच्याविषयीच्या भविष्यवाणीची सर्वात महत्त्वाची पूर्णता आपल्या काळात होईल. प्राचीन जेरूसलेमवर अश्शूऱ्यांनी हल्ला केला होता. पण लवकरच, आधुनिक काळातील “अश्शूरी” यहोवाच्या असहाय भासणाऱ्या लोकांवर हल्ला करेल. त्यांचे अस्तित्व पूर्णपणे मिटवून टाकण्याचा त्याचा इरादा असेल. बायबलमध्ये या हल्ल्याप्रमाणेच, “मागोग देशातील गोग” याचा हल्ला, ‘उत्तरेच्या राजाचा’ हल्ला, व ‘पृथ्वीवरील राजांचा’ हल्ला यांचादेखील उल्लेख करण्यात आला आहे. (यहे. ३८:२, १०-१३; दानी. ११:४०, ४४, ४५; प्रकटी. १७:१४; १९:१९) हे सर्व वेगवेगळे हल्ले आहेत का? हे आपण नक्की सांगू शकत नाही. बायबल कदाचित या वेगवेगळ्या नावांनी एकाच हल्ल्याविषयी सांगत असावे. मग, मीखाच्या भविष्यवाणीनुसार त्या शक्तिशाली शत्रूविरुद्ध, म्हणजेच “अश्शूरी” याच्याविरुद्ध यहोवा कोणते सैन्य उभे करेल? एक अतिशय असामान्य सैन्य—“सात मेंढपाळ व आठ लोकनायक!” (मीखा ५:५) या विलक्षण सैन्यातील मेंढपाळ व लोकनायक (किंवा “सरदार,” द न्यू इंग्लिश बायबल) हे मंडळ्यांतील वडील आहेत. (१ पेत्र ५:२) यहोवाने आपल्या मौल्यवान मेंढरांचे मार्गदर्शन व संरक्षण करण्यासाठी; तसेच, त्यांना आधुनिक काळातील “अश्शूरी” याच्या भविष्यातील हल्ल्यास तोंड द्यायला साहाय्य करण्यासाठी आज नक्कीच विपुल प्रमाणात आध्यात्मिक मेंढपाळांची तरतूद केली आहे. मीखाच्या भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे, ते “अश्शूर देश . . . तरवारीने उद्ध्वस्त करतील.” (मीखा ५:६) त्यांच्या युद्धाच्या शस्त्रांपैकी सर्वात महत्त्वाचे शस्त्र “आत्म्याची तरवार” म्हणजेच देवाचे वचन, बायबल हे आहे.—२ करिंथ. १०:४; इफिस. ६:१७.
१७ मंडळीतील वडिलांनो, आपण आताच चर्चा केलेल्या माहितीवरून तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी शिकू शकता: (१) भविष्यातील “अश्शूरी” याच्या हल्ल्यास तोंड देण्याकरता सज्ज होण्यासाठी आपण जी सर्वात महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे देवावरील विश्वास मजबूत करणे आणि आपल्या बांधवांनाही तसेच करण्यास मदत करणे. (२) “अश्शूरी” हल्ला करेल तेव्हा यहोवा आपला बचाव करेल याची वडिलांना अगदी पूर्ण खात्री असली पाहिजे. (३) त्या वेळी, यहोवाच्या संघटनेकडून आपल्याला ज्या जीवनदायक सूचना मिळतील त्या मानवी दृष्टिकोनातून कदाचित योग्य किंवा व्यावहारिक वाटणार नाहीत. पण, या सूचना मानवी दृष्टिकोनातून योग्य वाटत नसल्या, तरीसुद्धा आपल्याला जे काही सांगितले जाते त्याचे पालन करण्यास आपण सर्वांनी तयार असले पाहिजे. (४) जगातील शिक्षण, धनसंपत्ती किंवा मानवी संस्था यांवर भरवसा ठेवणाऱ्यांनी आपल्या विचारसरणीत बदल करण्याची हीच वेळ आहे. जे कोणी विश्वासात डळमळत आहेत त्यांना वडिलांनी लवकरात लवकर मदत केली पाहिजे.
१८ भविष्यात अशी वेळ येणार आहे जेव्हा देवाचे आधुनिक काळातील सेवक, हिज्कीयाच्या काळात जेरूसलेममध्ये अडकलेल्या यहुद्यांइतकेच असहाय भासतील. ती वेळ येईल तेव्हा आपण सर्व जण हिज्कीयाच्या शब्दांतून प्रोत्साहन मिळवू या. आपण हे आठवणीत ठेवू या, की आपल्या शत्रूंना “मांसमय भुजांचा . . . आधार आहे, पण आम्हास मदत करावयास व आमच्या लढाया लढावयास आमचा देव परमेश्वर [यहोवा] आम्हाबरोबर आहे.”—२ इति. ३२:८.
अध्याय ३५
त्याने पश्चात्ताप करायचं धैर्य दाखवलं
देवाचे राज्य काय साध्य करील
५ आताची परिस्थिती सुमारे ३,५०० वर्षांआधीच्या कनानमधील परिस्थितीसारखीच आहे. बायबल सांगते: “ज्या गोष्टींचा परमेश्वराला वीट येतो व तिरस्कार वाटतो त्या सर्व गोष्टी ते लोक आपल्या देवांच्या बाबतीत करीत आले आहेत; ते देवांप्रीत्यर्थ आपल्या मुलांमुलींचा देखील होम करीत असतात.” (अनुवाद १२:३१) यहोवाने इस्राएल राष्ट्राला असे सांगितले: “त्या राष्ट्रांच्या दुष्टाईमुळे . . . तुझा देव परमेश्वर त्या राष्ट्रांना तुझ्यापुढून घालवून देत आहे.” (अनुवाद ९:५) बायबल इतिहासकार हेन्री एच. हॅली यांनी लिहिले: “बआल, अश्तोरथ आणि इतर कनानी दैवतांचे उपासना विधी फार थाटामाटात पार पाडले जात; त्यांच्या मंदिरांमध्ये हरतऱ्हेची वाईट कामे चालत होती.”
६ त्यांची दुष्टता किती टोकाला पोहंचली होती याचे वर्णन हॅली यांनी केले कारण, बऱ्याच ठिकाणी पुरातनवस्तूशास्त्रज्ञांना “बआलला अर्पण केलेल्या लहान मुलांचे अवशेष असलेली अनेक मडकी सापडली.” ते म्हणाले: “ती सगळी जागाच जणू काही नवजात मुलांचे कबरस्थान बनली होती. . . . कनानी लोक त्यांच्या दैवतांसमोर धार्मिक विधी म्हणून लैंगिक अनैतिकता आचरत आणि नंतर त्याच दैवतांना ते आपल्या ज्येष्ठ संततीचे अर्पण देऊन उपासना करत. असे दिसून येते की, कनानचा संपूर्ण देशच मोठ्या प्रमाणात सदोम आणि गमोराच्या देशांसारखा बनला होता. . . . अशा घृणित आणि क्रूरतेच्या चालीरीती असलेल्या संस्कृतीला आणखी काही काळ टिकण्याचा हक्क होता का? . . . कनानी शहरांच्या अवशेषांचे उत्खनन करणाऱ्या शास्त्रज्ञांना याचेच नवल वाटते की देवाने त्यांचा नाश इतक्या उशिरा का केला.”
उत्तम देश १० ¶५, तळटीप
इस्राएल आणि त्याच्या आसपासची राष्ट्रं
इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर पडले तेव्हा कनान देशात अमोरी लोक कदाचित सगळ्यात शक्तिशाली लोक असावेत. (अनु १:१९-२१; यहो २४:१५) त्यांनी अर्णोनच्या खोऱ्यापर्यंत मवाबी लोकांचा देश काबीज केला होता. पण यरीहोपासून यार्देन नदीपलीकडच्या प्रदेशाला अजूनही ‘मवाबचं मैदान’ म्हटलं जायचं. अमोरी राजांनी बाशान आणि गिलादवरसुद्धा राज्य केलं.—गण २१:२१-२३, ३३-३५; २२:१; ३३:४६-५१.
[तळटीप]
“कनानी” या शब्दाप्रमाणेच “अमोरी” हा शब्दसुद्धा अमोरी वंशाच्या लोकांच्या बाबतीत, तसंच त्या प्रदेशात राहणाऱ्या इतर वंशांच्या बाबतीतही वापरला जात होता.—उत्प १५:१६; ४८:२२.
इन्साइट “मनश्शे” क्र. ४ ¶२
मनश्शे
मनश्शेने यहोवाच्या संदेशाकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे यहोवाने त्याला शिक्षा केली. अश्शूरच्या राजाने त्याला बंदी बनवून बाबेलला नेलं. बाबेल हे अश्शूरच्या सम्राटाच्या राजेशाही शहरांपैकी एक होतं. (२इत ३३:१०, ११) अश्शूराचा राजा एसर-हद्दोन हा २२ राजांकडून कर वसूल करायचा. ते “हत्ती प्रदेशाले, तसंच समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या प्रदेशांतले आणि जवळपासच्या बेटांवरचे राजे होते.” या कर भरणाऱ्या राजांच्या यादीत ‘यहूदाचा मनश्शे’ असाही उल्लेख आढळतो. याशिवाय, जे राजे अश्शूर-बनीपल या राजाला कर भरायचे त्या राजांच्या यादीतसुद्धा मनश्शेचं नाव आहे.—एन्शिएंट नियर इसर्टन टेक्स्ट्, एडीटेड बाय जे. पिटर्चड, १९७४, पान २९१, २९४.
इन्साइट “आकडा” ¶४
आकडा
काही वेळा बंदिवानांच्या ओठांना, नाकाला किंवा जिभेला आकडा लावून त्यांना नेलं जायचं. अश्शूरी लोकांच्या एका चित्रात, तीन बंदिवानांच्या ओठांना आकडा लावला आहे आणि त्यात दोरी बांधून राजा त्यांना नेत आहे असं दाखवलंय. तसंच, तो आपल्या भाल्याने त्यांच्यापैकी एकाचे डोळे फोडत असल्याचंही दाखवलंय. त्यामुळे यहोवाने यशया संदेष्ट्याद्वारे अश्शूरचा राजा सन्हेरीब याला लाक्षणिक अर्थाने जे म्हटलं ते त्याला लगेच कळलं असेल. यहोवाने म्हटलं: “मी तुझ्या नाकात माझी वेसण, आणि तुझ्या तोंडात माझा लगाम घालीन. आणि ज्या रस्त्याने तू आलास, त्याच रस्त्याने मी तुला परत मागे घेऊन जाईन.”—२रा १९:२०, २१, २८; यश ३७:२९.
इन्साइट “ओळंबा” ¶२
ओळंबा
एखादी इमारत नीट बांधली आहे की नाही आणि ती टिकून राहील की नाही हे तपासण्यासाठी सहसा ओळंबा वापरला जातो. यहोवाने त्याच्यापासून भरकटलेल्या यरुशलेम शहराबद्दल आधीच म्हटलं होतं, की “मोजमाप करण्याच्या ज्या दोरीने मी शोमरोनाला मोजलं, त्याच दोरीने मी यरुशलेमलाही मोजेन. आणि अहाबच्या घराण्याला लावलेला ओळंबा मी यरुशलेमला लावीन.” यहोवाने शमोरोनचं आणि अहाबच्या घराण्याचं मोजमाप केलं होतं आणि ते नैतिक रितीने दुष्ट असल्याचं किंवा सरळ नसल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे त्याने त्यांचा नाश केला. त्याचप्रमाणे यहोवा यरुशलेमचा आणि त्याच्या राज्यकर्त्यांचा न्याय करणार होता. तो त्यांचा दुष्टपणा उघड करून त्या शहराचा नाश करणार होता. या घटना प्रत्यक्षात इ.स.पू. ६०७ मध्ये घडल्या. (२रा २१:१०-१३; १०:११) यहोवाने यशयाद्वारे यरुशलेमच्या बढाई मारणाऱ्या दुष्ट शासनकर्त्यांना येणाऱ्या संकटाबद्दल इशारा दिला आणि म्हटलं: “मी न्यायाला मोजमापाची दोरी, आणि नीतिमत्त्वाला ओळंबा म्हणून वापरीन.” खऱ्या न्यायाच्या आणि नीतिमत्त्वाच्या स्तरांवरून दिसून येणार होतं, की कोण खरोखर देवाचे सेवक आहेत आणि कोण नाहीत. यामुळे एकतर ते टिकून राहणार होते किंवा त्यांचा नाश केला जाणार होता.—यश २८:१४-१९.
“तो आपला देव परमेश्वर यास शरण गेला”
देवाच्या जवळ या
लहानपणापासून देवाच्या मार्गावर चालत असलेला एक मनुष्य जेव्हा या मार्गावरून भरकटला तेव्हा त्याने म्हटले, “मी किती कुचकामी आहे.” जेव्हा त्याने पुन्हा देवाच्या मार्गावर चालण्याकरता पावले उचलली तेव्हा देव त्याला कधीच माफ करणार नाही अशी त्याला भीती वाटत होती. पण या पश्चात्तापी मनुष्याने जेव्हा बायबलमधील २ इतिहास ३३:१-१७ वचनांतील मनश्शेचा अहवाल वाचला तेव्हा त्याला आशा मिळाली. आधी केलेल्या पापांमुळे तुम्हाला कधी कुचकामी असल्यासारखे वाटत असेल तर मनश्शेच्या उदाहरणावरून तुम्हालाही सांत्वन मिळू शकते.
मनश्शेचे संगोपन देवाची भक्ती करणाऱ्या घरात झाले होते. मनश्शेचे वडील यहूदाच्या अनेक प्रख्यात राजांपैकी एक होते. देवाने चमत्कारीकरित्या त्याच्या वडिलांचे आयुष्य वाढवल्यानंतर तीन वर्षांनी मनश्शेचा जन्म झाला होता. (२ राजे २०:१-११) त्यामुळे मनश्शे हा देवाच्या कृपेमुळेच झाला होता असे समजून त्याने त्याच्या मनात खऱ्या उपासनेबद्दल आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पण, खऱ्या देवाची उपासना करणाऱ्या पालकांच्या उदाहरणानुसार त्यांची मुलेदेखील चालतीलच असे नाही. मनश्शेच्या बाबतीत असेच झाले होते.
मनश्शेच्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा तो कदाचित बारा वर्षांचा असावा. दुःखाची गोष्ट म्हणजे “परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते मनश्शेने केले.” (वचन १, २) ज्यांना खऱ्या देवाच्या उपासनेप्रती कदर नव्हती अशा सल्लागारांचा प्रभाव या तरुण राजावर पडला असावा का? बायबल तसे काही सांगत नाही. बायबल आपल्याला एवढेच सांगते की मनश्शे हा मूर्तिपूजा व क्रूर कामे करण्यात खूपच सरसावला. त्याने खोट्या दैवतांसाठी वेद्या उभ्या केल्या, स्वतःच्या मुलांचा बळी दिला, भूतविद्या करू लागला, जेरुसलेम येथील यहोवाच्या मंदिरात एक कोरीव मूर्ती उभी केली. चमत्कारीकरित्या त्याचा जन्म घडवून आणणाऱ्या देवाने त्याला त्याच्या वाईट कृत्यांबद्दल वारंवार इशारा दिला, पण मनश्शे इतका हट्टी झाला होता की त्याने या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले.—वचन ३-१०
शेवटी, यहोवाने मनश्शेला बेड्या घालून बॅबिलोनला नेऊ दिले. या बंदिवासात असताना मनश्शेला त्याच्या वागण्यावर विचार करण्याची संधी मिळाली. आता त्याला कळाले का, की त्याच्या दुर्बळ व निर्जीव मूर्त्यांमध्ये त्याचे संरक्षण करण्याचे सामर्थ्य नाही? लहानपणी त्याच्या वडिलांनी शिकवलेल्या देवाच्या मार्गांबद्दल तो विचार करू लागला का? याविषयी आपल्याला काही माहीत नाही पण मनश्शेने त्याचा दृष्टिकोन मात्र बदलला. अहवाल सांगतो: “तो आपला देव परमेश्वर यास शरण गेला . . . [तो] देवासमोर फार दीन झाला, त्याने त्याची प्रार्थना केली.” (वचन १२, १३) पण, इतकी वाईट पातके करणाऱ्या व्यक्तीला देव खरोखरच क्षमा करेल का?
मनश्शेने मनापासून केलेला पश्चात्ताप पाहून यहोवाला फार आनंद झाला. देवाने त्याच्या दयेची भीक ऐकली आणि त्याला “पुनः यरुशलेमेत आणून त्याचे राज्य त्यास दिले.” (वचन १३) त्याने खरा पश्चात्ताप केला आहे हे दाखवण्यासाठी त्याने त्याच्या वागण्यात सुधारणा केली. त्याच्या राज्यातून त्याने मूर्तिपूजा काढून टाकली. आणि त्याच्या लोकांना यहोवाची “उपासना” करण्याचा आर्जव केला.—वचन १५-१७.
आधी केलेल्या पापांबद्दल देवाची क्षमा मिळण्यास मी पात्र नाही, मी कुचकामी आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर मनश्शेचे उदाहरण लक्षात ठेवा. हा अहवाल देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलेल्या पुस्तकात आहे. (रोमकर १५:४) यहोवा आपल्याला सांगू इच्छितो की तो “क्षमाशील” आहे. (स्तो. ८६:५) पातक्याने कोणते पाप केले होते ते नव्हे तर त्याने पश्चात्ताप केला होता की नाही हे यहोवाला महत्त्वाचे वाटते. पाप करणारा जेव्हा पश्चात्तापी अंतःकरणाने प्रार्थना करतो, चुकीचा मार्ग सोडून देतो आणि जे बरोबर आहे ते करण्याचा निश्चयपूर्वक प्रयत्न करतो तेव्हा मनश्शेप्रमाणे तोही ‘यहोवाला शरण’ जाऊ शकतो.—यशया १:१८; ५५:६, ७.
अध्याय ३६
त्याने लोकांना यहोवाकडे परत आणलं
शाफान व त्याच्या कुटुंबाशी तुमचा परिचय आहे का?
बायबलमध्ये शाफानची ओळख, “शाफान बिन असल्या बिन मशुल्लम” या शब्दांत सा.यु.पू. ६४२ सालादरम्यान योशियाने केलेल्या खऱ्या उपासनेच्या पुनर्स्थापनेच्या संदर्भात आपल्याला करून देण्यात आली आहे. (२ राजे २२:३) पुढच्या ३६ वर्षांदरम्यान, सा.यु.पू. ६०७ साली जेरूसलेमचा नाश होईपर्यंत आपल्याला शाफानच्या चार मुलांची अर्थात, अहीकाम, एलासा, गमऱ्या आणि याजना तसेच त्याचे दोन नातू मीखाया आणि गदल्या यांची देखील ओळख करून देण्यात येते. (तक्ता पाहा.) एन्सायक्लोपेडिया जुडायका स्पष्टीकरण देते की “शाफानच्या घराण्याची [यहुदाच्या राज्यात] मक्तेदारी होती आणि योशीयाच्या काळापासून बंदिवासात जाईपर्यंत राजाच्या शास्त्र्याचे पद त्यांनी भूषवले.” बायबलमध्ये शाफान व त्याच्या कुटुंबाविषयी दिलेली माहिती आपल्याला हे समजून घेण्यास मदत करेल की त्यांनी कशाप्रकारे यिर्मया संदेष्ट्याला आणि यहोवाच्या खऱ्या उपासनेला पाठबळ दिले.
शाफान खऱ्या उपासनेला पाठबळ देतो
सा.यु.पू. ६४२ साली राजा योशीया २५ वर्षांचा असताना शाफान हा राजाचा चिटणीस आणि लेखक म्हणून सेवा करत असल्याचा उल्लेख आहे. (यिर्मया ३६:१०, पं.र.भा.) या कार्यात काय अंतर्भूत होते? वर उल्लेख केलेल्या संदर्भ ग्रंथात असे म्हटले आहे की राजाच्या सेवेतील लेखक व चिटणीस हा राजाचा खासगी सल्लागार असे; आर्थिक व्यवहारांचा त्याच्यावर जिम्मा असे आणि तो राजदूतकामात कुशल तसेच परराष्ट्रीय कारभार, आंतरराष्ट्रीय कायदा आणि व्यापारविषयक करार यांसारख्या क्षेत्रांत वाकबगार असे. त्याअर्थी, राजाचा चिटणीस या नात्याने शाफान यहुदातील सर्वात वजनदार पुरुषांत गणला जात असे.
दहा वर्षांआधी, अद्याप वयाने लहान असतानाच योशीया, “आपला पूर्वज दावीद याच्या देवाच्या भजनी लागला.” शाफान अर्थातच योशीयापेक्षा वयाने मोठा होता आणि त्यामुळे तो त्याला उत्तम आध्यात्मिक सल्ला आणि खऱ्या उपासनेच्या पुनर्स्थापनेकरता योशीयाने हाती घेतलेल्या पहिल्या मोहिमेत पूर्ण पाठिंबा देण्याच्या स्थितीत होता.—२ इतिहास ३४:१-८.
मंदिराच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना, तेथे “नियमशास्त्राचा ग्रंथ” गवसला आणि “शाफानाने तो राजास वाचून दाखविला.” राजाने त्यातील शब्द ऐकले तेव्हा त्याला धक्का बसला आणि त्याने त्या मजकुराविषयी विचारण्याकरता लगेच आपल्या विश्वासू माणसांचे एक शिष्टमंडळ हुल्दा संदेष्ट्रीकडे पाठवले. शाफान व त्याचा पुत्र अहीकाम यांनाही त्या शिष्टमंडळात सामील करण्याद्वारे राजाने त्यांच्यावर विश्वास प्रकट केला.—२ राजे २२:८-१४; २ इतिहास ३४:१४-२२.
स्वतः शाफानने काय केले यासंबंधी हा शास्त्रवचनांतील एकुलता एक अहवाल आहे. बायबलच्या इतर वचनांत त्याचा केवळ अमुक व्यक्तीचा पिता किंवा आजोबा म्हणून उल्लेख आढळतो. शाफानच्या वंशजांचा यिर्मया संदेष्ट्याशी जवळून संपर्क आला.
तुम्हाला माहीत होते का?
बायबलच्या काळात जेव्हा एक मनुष्य मुद्दाम आपली वस्त्रे फाडायचा तेव्हा याचा काय अर्थ असायचा?
बायबलच्या वचनांमध्ये अशा बऱ्याच घटनांबद्दल सांगण्यात आले आहे ज्यांमध्ये एखाद्या मनुष्याने मुद्दामहून आपली वस्त्रे फाडली. आजच्या काळातील लोकांना हे कृत्य करणे कदाचित आश्चर्याची बाब वाटेल. पण यहुद्यांमध्ये निराशा, दुःख, अपमान, संताप, किंवा शोक यांमुळे मनात येणाऱ्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी हे कृत्य केले जायचे.
उदाहरणार्थ, जेव्हा रऊबेनाला कळले की योसेफाला त्याच्याच भावांनी विकून टाकले आहे आणि योसेफाला वाचवण्याची त्याची योजना फसली आहे तेव्हा त्याने “आपली वस्त्रे फाडली.” त्यांचे वडील याकोब यांनी जेव्हा असे गृहीत धरले की त्यांचा मुलगा योसेफ याला एका जंगली प्राण्याने खाऊन टाकले आहे तेव्हा त्यांनीदेखील “आपली वस्त्रे फाडली.” (उत्प. ३७:१८-३५) ईयोबाला जेव्हा सांगण्यात आले की त्याची सर्व मुले मरून गेली आहेत तेव्हा त्याने “आपला झगा फाडला.” (ईयो. १:१८-२०) एक निरोप्या ज्याने “आपली वस्त्रे फाडली” होती, तो महायाजक एलीकडे येतो व त्याला सांगतो, की इस्राएल लोकांचा पराजय करण्यात आला आहे, त्याची दोन्ही मुले ठार झाली आहेत आणि त्यासोबतच कराराचा कोश हस्तगत करण्यात आला आहे. (१ शमु. ४:१२-१७) जेव्हा योशियाने त्याला वाचून दाखवलेले नियमशास्त्रामधील शब्द ऐकले आणि त्याला त्याच्या लोकांच्या चुकांची जाणीव झाली तेव्हा “त्याने आपली वस्त्रे फाडली.”—२ राजे २२:८-१३.
येशूच्या चौकशीच्या वेळेस जेव्हा कयफाने असा चुकीचा निष्कर्ष काढला की येशूने देवाची निंदा केली आहे, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली. (मत्त. २६:५९-६६) रब्बींच्या परंपरेनुसार असा नियम होता, की जर कोणी देवाची निंदा होत असताना ऐकली तर त्याने आपली वस्त्रे फाडावीत. जेरूसलेमच्या मंदिराच्या नाशानंतर रब्बींनी याविषयी एक वेगळे मत मांडले. त्यांनी म्हटले की “जर यापुढे कोणी देवाची निंदा होत असताना ऐकली तर त्याला आपली वस्त्रे फाडण्याची गरज नाही, नाहीतर त्याच्या वस्त्रांच्या चिंध्या होतील.”
अर्थात, मनुष्याचे दुःख यहोवाच्या नजरेत खरे नसल्यास, वस्त्रे फाडण्याच्या या कृत्याला त्याच्या नजरेत काहीच मोल नसायचे. म्हणून यहोवाने आपल्या लोकांना सांगितले, “आपली वस्त्रे नव्हे, तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याजकडे वळा.”—योए. २:१३.
इन्साइट “नखो” ¶२
नखो
यहूदाचा राजा योशीया याच्या काळातला इजिप्तचा एक फारो. ग्रीक इतिहासकार हेरोडोटस याच्या मते (II, १५८, १५९; IV, ४२) नखोस (नखो) हा साम्मेटिकसचा (साम्मेटिकोस, साम्मेटिक I) मुलगा होता. आणि आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर तो इजिप्तचा राजा बनला होता. नाईल नदीला तांबड्या समुद्राशी जोडण्यासाठी त्याने एक कालवा बांधायला सुरुवात केली खरी, पण त्याला ते काम पूर्ण करता आलं नाही. मात्र आफ्रिकेभोवती त्याने फेनिकेच्या जहाजांचा एक ताफा पाठवला आणि तीन वर्षांमध्ये हा प्रवास यशस्वीपणे पूर्ण झाला.
नम्र योशीयावर यहोवाची कृपा होते
योशीयाचे सेवक जेरूसलेममध्ये संदेष्ट्री हुल्दा हिच्याकडे जातात आणि एक बातमी घेऊन येतात. हुल्दा त्यांना यहोवाचा संदेश कळवते की, अलीकडेच सापडलेल्या पुस्तकात दिल्यानुसार त्या धर्मत्यागी राष्ट्रावर अरिष्ट येईल. परंतु, यहोवा देवासमोर योशीयाने स्वतःला नम्र केल्यामुळे त्याला हे अरिष्ट पाहावे लागणार नाही. त्याला त्याच्या पितरांशी मिळवले जाईल व त्याच्या कबरेत सुरक्षितपणे पोचवले जाईल.—२ राजे २२:१४-२०; २ इतिहास ३४:२२-२८.
परंतु योशीया तर युद्धात मरण पावला; मग हुल्दाची भविष्यवाणी खरी ठरली का? (२ राजे २३:२८-३०) होय, कारण योशीयाला त्याच्या कबरेत “शांतीने” पोहंचवण्यात आले. पण यहुदावर आलेला “गहजब” अर्थात अरिष्ट एकदम वेगळे होते. (२ इतिहास ३४:२८; २ राजे २२:२०) सा.यु.पू. ६०९-६०७ मध्ये आलेल्या अरिष्टाआधीच योशीया मरण पावला. बॅबिलोनी लोकांनी जेरूसलेमला घेरा घालून त्याचा नाश केल्याचे त्याने आपल्या डोळ्यांनी पाहिले नाही. शिवाय, ‘पितरांना मिळणे’ याचा अर्थ हिंसक पद्धतीने मृत्यू न येणे असा होत नाही. अशीच एक संज्ञा हिंसकरितीने आलेल्या मरणासाठी तसेच शांत मरणासाठीही वापरली गेली आहे.—अनुवाद ३१:१६; १ राजे २:१०; २२:३४, ४०.
अभ्यास लेख ३८
तरुणांनो, तुम्हाला कशा प्रकारचं आयुष्य जगायला आवडेल?
“समंजसपणा तुझं रक्षण करेल.”—नीति. २:११.
सारांश
तरुणांनो, यहोवाला माहीत आहे की त्याच्यासोबतची तुमची मैत्री धोक्यात येईल अशा समस्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागतं. मग तुमच्या स्वर्गातल्या पित्याचं मन आनंदित होईल असे सुज्ञ निर्णय तुम्ही कसे घेऊ शकता? यासाठी आपण अशा तीन तरुणांचं उदाहरण पाहू या जे यहूदाचे राजे बनले. त्यांनी घेतलेल्या निर्णयांमधून तुम्हाला काय शिकायला मिळतं ते पाहा.
विचार करा, अतिशय लहान वयात किंवा अगदी तरुण असताना तुम्हाला जर राजा म्हणून निवडलं असतं तर कसं वाटलं असतं? राजा म्हणून तुम्ही तुमच्या ताकदीचा आणि अधिकाराचा वापर कसा केला असता? बायबलमध्ये अशा बऱ्याच तरुणांचा उल्लेख करण्यात आलाय जे यहूदाचे राजे बनले. उदाहरणार्थ, यहोआश ७ वर्षांचा असताना, उज्जीया १६ वर्षांचा असताना आणि योशीया ८ वर्षांचा असताना राजा बनला. विचार करा, इतक्या लहान वयात राजा म्हणून जबाबदारी पार पाडणं त्यांना किती कठीण गेलं असेल! पण त्यांची जबाबदारी जरी कठीण असली, तरी यहोवाने आणि इतर लोकांनी त्यांना बऱ्याच चांगल्या गोष्टी करण्यासाठी मदत केली.
२ आज जरी आपण कुठल्या देशाचे राजे किंवा राणी नसलो तरी बायबलमध्ये दिलेल्या या तिघांच्या अहवालातून आपण बरेच महत्त्वाचे धडे शिकू शकतो. त्यांनी काही चांगले निर्णय घेतले, पण त्यासोबत काही चुकीचे निर्णयसुद्धा घेतले. पण त्यांच्या उदाहरणातून आपण चांगले मित्र का निवडले पाहिजेत, नम्र का असलं पाहिजे आणि नेहमी यहोवाचं मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न का केला पाहिजे ते आपल्याला शिकता येईल.
चांगले मित्र निवडा
३ यहोआशसारखं चांगले निर्णय घ्या. लहान असताना यहोआश राजाने सुज्ञ निर्णय घेतले. त्याचं मार्गदर्शन करायला त्याचे वडील नव्हते. पण त्याने विश्वासू महायाजक यहोयादा याने दिलेलं मार्गदर्शन स्वीकारलं आणि त्याप्रमाणे तो चालला. यहोयादा महायाजकाने यहोआशला आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवलं. त्याचा परिणाम असा झाला, की यहोआशने जीवनात सुज्ञ निर्णय घेतले. त्याने यहोवाची सेवा केली आणि शुद्ध उपासनेत पुढाकार घेतला. इतकंच नाही तर यहोआशने यहोवाच्या मंदिराची दुरुस्ती करण्याची व्यवस्था केली.—२ इति. २४:१, २, ४, १३, १४.
४ जर तुम्हालाही यहोवावर प्रेम करायला आणि त्याच्या स्तरांनुसार जीवन जगायला शिकवण्यात आलं असेल, तर ती तुमच्यासाठी एक मौल्यवान भेटच आहे. (नीतिवचनं २:१, १०-१२ वाचा.) आईवडील आपल्या मुलांना चांगले निर्णय घ्यायला प्रशिक्षण देऊ शकतात. कात्या नावाच्या एका बहिणीला तिच्या वडिलांनी चांगले निर्णय घ्यायला कशी मदत केली त्याचंच एक उदाहरण घ्या. तिचे वडील जेव्हा दररोज तिला शाळेत सोडवायला जायचे तेव्हा ते तिच्यासोबत दैनिक वचनावर चर्चा करायचे. ती म्हणते: “या चर्चांमुळे मला खूप मदत झाली. त्या दिवशी येणाऱ्या समस्यांचा किंवा परिस्थितींचा सामना करायला त्यांमुळे मला मदत व्हायची.” पण पालक बायबलच्या आधारावर तुम्हाला जे मार्गदर्शन देतात त्यामुळे तुम्हाला जर बांधून ठेवल्यासारखं वाटत असेल तर काय? कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन स्वीकारायला मदत होईल? ॲनेस्टेशिया नावाची बहीण आठवून सांगते, की तिचे आईवडील जेव्हा तिच्यावर काही गोष्टी करायची मनाई करायचे तेव्हा ते वेळ काढून त्यामागची कारणंही तिला सांगायचे. ती म्हणते: “यामुळे मला हे समजायला मदत झाली, की त्यांना मला कोणत्याही गोष्टीत बांधून ठेवायचं नव्हतं, तर त्यांचं माझ्यावर प्रेम होतं. आणि माझं संरक्षण करण्यासाठी ते मला काही गोष्टी करण्यापासून आडवायचे. किंवा ‘काही गोष्टी करू नको’ असं सांगायचे.”
५ तुमचे आईवडील जेव्हा तुम्हाला बायबलमधून काही सल्ला देतात आणि तुम्ही तो लागू करता किंवा पाळता, तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. आणि फक्त त्यांनाच नाही तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाला आनंद होतो. आणि तुमची त्याच्यासोबतची मैत्री आणखी मजबूत होते. (नीतिवचनं २२:६; २३:१५, २४, २५ वाचा.) या गोष्टींमुळे लहान वयात यहोआशने जे चांगलं उदाहरण मांडलं त्याचं अनुकरण करायचं प्रोत्साहन तुम्हाला मिळत नाही का?
६ यहोआशने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांतून धडा घ्या. यहोयादाचा मृत्यू झाल्यानंतर यहोआशने काही चुकीच्या लोकांसोबत मैत्री केली. (२ इतिहास २४:१७, १८ वाचा.) त्याने यहोवावर प्रेम नसलेल्या यहूदाच्या प्रमुखांचं ऐकलं. त्याने अशा वाईट लोकांपासून दूर राहायला हवं होतं, असं तुम्हाला नक्कीच वाटत असेल. (नीति. १:१०) पण दुःखाची गोष्ट म्हणजे त्याने या चुकीच्या लोकांचा सल्ला ऐकला. एवढंच काय तर जेव्हा त्याच्या जवळच्या नातेवाइकाने, जखऱ्याने त्याची चूक सुधारायचा प्रयत्न केला तेव्हा यहोआशने त्याला ठार मारलं. (२ इति. २४:२०, २१; मत्त. २३:३५) असं करणं किती चुकीचं आणि मूर्खपणाचं होतं! यहोआशने आपल्या आयुष्याची सुरुवात तर चांगली केली होती. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, नंतर तो धर्मत्यागी आणि एक खूनी बनला. शेवटी त्याच्या स्वतःच्याच सेवकांनी त्याला ठार मारलं. (२ इति. २४:२२-२५) खरंच, यहोआश जर यहोवाचं आणि ज्यांचं यहोवावर प्रेम आहे त्या लोकांचं ऐकत राहिला असता आणि त्यांच्यावर प्रेम करत राहिला असता, तर किती बरं झालं असतं! त्याच्या आयुष्याचा शेवट चांगला झाला असता. मग त्याच्या उदाहरणातून तुम्हाला काय शिकायला मिळतं?
७ यहोआशने घेतलेल्या चुकीच्या निर्णयातून आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. तो म्हणजे, आपण नेहमी चांगले मित्र निवडले पाहिजेत; असे मित्र ज्यांचं यहोवावर प्रेम आहे आणि ज्यांना यहोवाला आनंदित करायचं आहे. कारण त्यांचा आपल्यावर चांगला प्रभाव पडतो. पण चांगले मित्र निवडण्यासाठी मित्र तुमच्याच वयाचे असावेत असं काही नाही. लक्षात घ्या, यहोआश हासुद्धा यहोयादापेक्षा खूप लहान होता. मित्रांच्या बाबतीत तुम्ही स्वतःला काही प्रश्न विचारू शकता: ‘माझे मित्र यहोवावरचा माझा विश्वास मजबूत करायला मला मदत करतात का? ते मला देवाच्या स्तरांनुसार चालायचं प्रोत्साहन देतात का? ते नेहमी यहोवाबद्दल किंवा सत्याबद्दल बोलतात का? त्यांच्या मनातही देवाच्या स्तरांबद्दल आदर आहे का? मला ज्या गोष्टी ऐकाव्याश्या वाटतात अशाच गोष्टी ते माझ्याशी बोलतात का, की जेव्हा मी चुकतो तेव्हा मला सुधारण्याचाही प्रयत्न करतात?’ (नीति. २७:५, ६, १७) स्पष्ट सांगायचं झालं, जर तुमच्या मित्रांचं यहोवावर प्रेम नसेल तर असे मित्र नसलेलेच बरे. पण जर तुमच्या मित्रांचं यहोवावर प्रेम असेल तर त्यांना कधीही सोडू नका. कारण त्यांच्यामुळे तुमचं नक्कीच भलं होईल.—नीति. १३:२०.
८ सोशल मिडीया हे आपल्या नातेवाइकांच्या आणि मित्रांच्या संपर्कात राहण्याचं एक चांगलं माध्यम आहे. पण अनेक जण, आपण काय-काय खरेदी केलंय, आपण कोणकोणत्या गोष्टी केल्या याच्याबदद्लचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून इतरांवर छाप पाडायचा प्रयत्न करतात. जर तुम्हीही सोशल मिडीयाचा वापर करत असाल, तर स्वतःला हे प्रश्न विचारा: ‘सोशल मिडीयाचा वापर करून मी इतरांवर छाप पाडायचा प्रयत्न करतोय का? स्वतःची प्रशंसा करवून घ्यायचा आणि स्वतःचा मोठेपणा मिरवायचा माझा हेतू आहे का, की इतरांना प्रोत्साहन देण्याचा माझा हेतू आहे? सोशल मिडीयाचा वापर करणाऱ्यांच्या विचारांचा, वागण्या-बोलण्याचा चुकीचा प्रभाव मी माझ्यावर होऊ देतोय का?’ नियमन मंडळाचे सदस्य म्हणून सेवा केलेल्या भाऊ नेथन नॉर यांनी एकदा असा सल्ला दिला होता: “माणसांना खूश करायचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही असं कराल तर तुम्हाला कोणालाही खूश करता येणार नाही. याउलट, यहोवाला खूश करायचा प्रयत्न करा. म्हणजे मग, ज्यांचं यहोवावर प्रेम आहे तेही खूश होतील.”
नम्र राहा
९ उज्जीयासारखे चांगले निर्णय घ्या. उज्जीया राजा जेव्हा अगदी तरुण होता, तेव्हा तो नम्र होता. तो “खऱ्या देवाचं भय बाळगायला” शिकला. आणि ६८ वर्षांच्या त्याच्या आयुष्यात यहोवाने बरीच वर्षं त्याला आशीर्वादित केलं. (२ इतिहास २६:१-५ वाचा.) उज्जीयाने अनेक शत्रू राष्ट्रांचा पराभव केला आणि यरुशलेमचं संरक्षण करण्यासाठीही त्याने बऱ्याच गोष्टी केल्या. (२ इति. २६:६-१५) नक्कीच, या गोष्टी करण्यासाठी यहोवाने उज्जीयाला जी मदत केली त्यामुळे तो खूप आनंदी होता.—उप. ३:१२, १३.
१० उज्जीयाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयातून धडा घ्या. उज्जीया राजा असल्यामुळे, तो सगळ्यांना काय करायचं आणि काय नाही ते सांगायचा आणि सूचना द्यायचा. आणि त्यामुळेच आपण हवं ते करू शकतो असं त्याला वाटलं असेल का? कदाचित. एक दिवस उज्जीयाने यहोवाच्या मंदिराच्या आत जायचं ठरवलं. आणि गर्वाने फुगून त्याने धूपवेदीवर धूप जाळायचा प्रयत्न केला. खरंतर मंदिरातलं हे काम राजांनी मुळीच करायचं नव्हतं. (२ इति. २६:१६-१८) त्यामुळे महायाजक अजऱ्याने त्याला सुधारण्याचा प्रयत्न केला. पण उज्जीया त्याच्यावर खूप भडकला आणि दुःखाची गोष्ट म्हणजे, आत्तापर्यंत उज्जीयाने विश्वासूपणे सेवा करून जे चांगलं नाव कमावलं होतं ते त्याने गमावलं. त्याने केलेल्या चुकीच्या गोष्टीसाठी यहोवाने त्याला शिक्षा केली आणि तो कुष्ठरोगी बनला. (२ इति. २६:१९-२१) उज्जीया जर शेवटपर्यंत नम्र राहिला असता तर त्याच्या आयुष्याचा शेवट नक्कीच वेगळा झाला असता.
११ उज्जीया राजा जेव्हा शक्तिशाली बनला तेव्हा यहोवानेच आपल्याला समृद्ध केलंय आणि शक्तिशाली बनवलंय हे तो विसरून गेला. यावरून आपल्याला कोणता धडा शिकायला मिळतो? आपण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, की आपल्याला जे आशीर्वाद आणि बहुमान मिळाले आहेत ते यहोवाकडून आहेत. आपल्याला ज्या गोष्टी करता आल्या त्यांबद्दल बढाई मारण्यापेक्षा आपण त्याचं श्रेय यहोवाला दिलं पाहिजे. (१ करिंथ. ४:७) आपण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, की आपण अपरिपूर्ण आहोत आणि आपल्यालाही कोणीतरी सुधारण्याची गरज पडते. साठीतला एक भाऊ म्हणतो: “मी हे शिकलो की जेव्हा कोणी मला माझ्या चुका दाखवतं, तेव्हा मी ते जास्त मनाला लावून नाही घेतलं पाहिजे. माझ्याकडून जेव्हा काही छोट्या-मोठ्या चुका होतात आणि त्यासाठी जेव्हा मला सुधारलं जातं, तेव्हा मी त्याचं वाईट वाटून घेत नाही. उलट मी त्यातून शिकतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो.” खरंच, जेव्हा आपण यहोवाचं भय बाळगतो आणि स्वतःबद्दल नम्र दृष्टिकोन ठेवतो तेव्हा आपलं जीवन आनंदी होतं!—नीति. २२:४.
नेहमी यहोवाचं मार्गदर्शन घेत राहा
१२ योशीयासारखे चांगले निर्णय घ्या. योशीया किशोरवयात होता तेव्हापासूनच तो यहोवाचं मार्गदर्शन मिळवायचा प्रयत्न करू लागला. कारण त्याला यहोवाबद्दल शिकायचं होतं आणि यहोवाची इच्छा पूर्ण करायची होती. पण लहान वयातच राजा बनलेल्या योशीयाचं आयुष्य सोपं नव्हतं. कारण त्या काळात बहुतेक लोक मूर्तिपूजा करत होते. आणि खरी उपासना पुन्हा सुरू करण्यासाठी योशीयाला मोठं धैर्य दाखवावं लागणार होतं. आणि त्याने तसंच केलं. तो २० वर्षांचाही झाली नव्हता तेव्हापासूनच त्याने संपूर्ण देशातून मूर्तिपूजा काढून टाकायला सुरुवात केली.—२ इतिहास ३४:१-३ वाचा.
१३ तुम्हीसुद्धा जरी वयाने लहान असला तरी योशीयासारखंच यहोवाची सेवा करायचा निर्णय घेऊ शकता. आणि यहोवाच्या अद्भुत गुणांबद्दल शिकू शकता. असं केल्यामुळे तुम्हालाही तुमचं जीवन यहोवाला समर्पित करायची प्रेरणा मिळेल. पण तुम्ही केलेल्या समर्पणाचा तुमच्या रोजच्या जीवनावर कसा प्रभाव पडला पाहिजे? लूक नावाच्या भावाने १४ व्या वर्षी बाप्तिस्मा घेतला. तो असं म्हणतो, “मी यहोवाच्या सेवेला माझ्या जीवनात सर्वात जास्त महत्त्व देईन आणि त्याला खूश करण्याचा प्रयत्न करेन.” (मार्क १२:३०) तुम्हीही जर असंच करायचा निर्णय घेतला तर यहोवा तुम्हाला भरपूर आशीर्वाद देईल.
१४ तरुणांनो, यहोवाची सेवा करत असताना तुम्हाला कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो? जोहॅनचा बाप्तिस्मा १२ व्या वर्षी झाला. त्याच्या शाळेत असलेल्या मुलांकडून त्याला ई-सिगरेट ओढण्याचा, म्हणजे वेपिंग करण्याचा खूप दबाव येत होता. मग त्याने या गोष्टीचा सामना कसा केला? त्याने नेहमी स्वतःला या गोष्टीची आठवण करून दिली, की जर तो दबावाला बळी पडला आणि त्याने ई-सिगरेट ओढली तर त्याचा त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल. आणि यहोवासोबतची त्याची मैत्रीही तुटेल. तसंच रेचल नावाची एक बहीण १४ वर्षांची होती तेव्हा तिचा बाप्तिस्मा झाला. शाळेत येणाऱ्या दबावांचा सामना करायला तिला कशामुळे मदत झाली याबद्दल ती म्हणते: “ज्या गोष्टी माझ्यासमोर येतात, त्यांना मी आध्यात्मिक गोष्टींशी जोडायचा नेहमी प्रयत्न करते. उदाहरणार्थ, इतिहासाच्या एखाद्या धड्यावरून मला बायबलमधली एखादी भविष्यवाणी किंवा अहवाल आठवेल. किंवा मग शाळेत मी एखाद्याशी बोलत असते तेव्हा मी असं एखादं वचन आठवायचा प्रयत्न करते जे मी समोरच्या व्यक्तीला दाखवू शकेन.” योशीया राजाने ज्या समस्यांचा सामना केला त्यापेक्षा तुमच्या समस्या कदाचित खूप वेगळ्या असतील. पण तरी तुम्ही त्याच्यासारखं सुज्ञ बनू शकता आणि त्याच्या इतकंच यहोवाला एकनिष्ठ राहू शकता. आज तरुण असताना तुम्हाला ज्या समस्यांचा सामना करावा लागत आहे, त्या तुम्हाला आयुष्यात पुढे येणाऱ्या समस्यांचा सामना करायला तयार करतील.
१५ योशीया राजा जेव्हा २६ वर्षांचा झाला तेव्हा त्याने यहोवाच्या मंदिराच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं. हे काम करत असताना त्याला “यहोवाने मोशेद्वारे दिलेलं नियमशास्त्राचं पुस्तक सापडलं.” या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी ऐकल्यानंतर तो त्यांप्रमाणे बदल करायला लगेच तयार झाला. आणि त्याने ते करण्यासाठी पावलंही उचलली. (२ इतिहास ३४:१४, १८-२१ वाचा.) तुम्हीही कदाचित रोज बायबल वाचत असाल आणि ते वाचायला तुम्हाला नक्कीच आवडत असेल. तुम्हाला ज्या वचनांमुळे मदत होऊ शकते अशी वचनं तुम्ही कुठेतरी लिहून ठेवता का? आधी उल्लेख केलेला लूक म्हणतो, की त्याला जी वचनं किंवा मुद्दे आवडतात ते तो एका वहीमध्ये लिहून ठेवतो. तुम्हीही त्याच्यासारखंच केलं तर तुम्हालाही आवडलेली वचनं किंवा मुद्दे आठवायला नक्कीच मदत होईल. तुम्ही जितकं जास्त बायबल वाचाल आणि बायबलवर आपलं प्रेम वाढवाल, तितकंच जास्त तुम्हाला यहोवाची सेवा करावीशी वाटेल. आणि योशीया राजासारखं तुम्हीसुद्धा देवाच्या वचनात लिहिलेल्या गोष्टींप्रमाणे चालायला प्रवृत्त व्हाल.
१६ योशीयाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयातून धडा घ्या. योशीया जेव्हा जवळपास ३९ वर्षांचा होता तेव्हा त्याच्या हातून खूप मोठी चूक झाली. आणि त्यामुळे त्याला त्याचा जीवही गमवावा लागला. यहोवाकडून मार्गदर्शन घेण्याऐवजी तो स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहिला. (२ इति. ३५:२०-२५) यातून आपल्याला एक खूप महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. तो म्हणजे, आपलं वय कितीही झालं असलं किंवा आपण कितीही वर्षांपासून बायबलचा अभ्यास करत असलो, तरीही आपण यहोवाकडून मार्गदर्शन मिळवलं पाहिजे. यहोवाकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपण नियमितपणे त्याला प्रार्थना केली पाहिजे, त्याच्या वचनांचा अभ्यास केला पाहिजे आणि इतर प्रौढ ख्रिश्चनांकडून जो सल्ला मिळतो तो ऐकला पाहिजे. असं केलं तर कदाचित आपण मोठमोठ्या चुका करण्यापासून दूर राहू आणि आपला आनंदही वाढेल.—याको. १:२५.
तरुणांनो—तुम्ही एक आनंदी आणि समाधानी आयुष्य जगू शकता!
१७ तरुण असताना आपल्याकडे नवनवीन गोष्टी करण्याच्या बऱ्याच संधी असतात. यहोआश, उज्जीया आणि योशीयाच्या उदाहरणावरून दिसून येतं, की तरुण आपल्या जीवनात सुज्ञ निर्णय घेऊ शकतात आणि यहोवाला आनंद होईल असं जीवन जगू शकतात. हे खरंय की या तीन राजांनी काही चुका केल्या आणि त्याचे वाईट परिणाम त्यांना भोगावे लागले. पण त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टींचं जर आपण अनुकरण केलं आणि त्यांच्याकडून ज्या चुका झाल्या त्या चुका करायचं जर आपण टाळलं, तर आपण एक चांगलं आणि आनंदी जीवन जगू शकतो.
१८ बायबलमध्ये यहोवाला विश्वासू असलेल्या इतरही तरुणांचे अहवाल दिले आहेत. त्यांनी यहोवाशी एक चांगलं नातं जोडलं, त्याची मरजी मिळवली आणि त्यामुळे ते एक चांगलं आणि समाधानी आयुष्य जगले. दावीद हा अशाच तरुणांपैकी एक होता. फार लहान वयात त्याने देवाची सेवा करण्याची निवड केली. आणि नंतर तो यहोवाला एकनिष्ठ असलेला एक राजा बनला. हे खरंय की त्याच्या हातून काही चुका झाल्या. पण दावीदचं एकंदर आयुष्य जर बघितलं तर यहोवाने त्याच्याकडे एक विश्वासू सेवक म्हणून पाहिलं. (१ राजे ३:६; ९:४, ५; १४:८) तुम्ही बायबलमधून जर दावीदच्या उदाहरणाचा अभ्यास केला, तर त्याच्या चांगल्या उदाहरणामुळे तुम्हालाही यहोवाची विश्वासूपणे सेवा करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. किंवा तुम्ही बायबलमधल्या मार्क आणि तीमथ्य यांच्या उदाहरणांचा अभ्यास करू शकता किंवा याबद्दल एक स्टडी प्रोजेक्ट हातात घेऊ शकता. या अभ्यासातून तुम्हाला दिसून येईल, की फार कमी वयातच त्यांनी यहोवाची सेवा करायचं निवडलं आणि देवाच्या नजरेत एक चांगलं नाव कमवलं. त्यामुळे त्यांचं भलं झालं आणि ते एक आनंदी आयुष्य जगू शकले.
१९ तरुणांनो, तुम्ही आज ज्या प्रकारचं आयुष्य जगता त्यावरून ठरेल की तुमचं पुढचं आयुष्य कसं असेल. तुम्ही जर स्वतःच्या बुद्धीवर भरवसा ठेवण्याऐवजी यहोवावर भरवसा ठेवलात आणि त्याच्यावर अवलंबून राहिलात, तर तो तुम्हाला सुज्ञ निर्णय घ्यायला मदत करेल. (नीति. २०:२४) त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल आणि तुम्हाला भरपूर आशीर्वाद मिळतील. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही यहोवाच्या सेवेत जे करता त्याची यहोवा खूप कदर करतो. आणि खरंच, आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याच्या सेवेसाठी आपलं आयुष्य वाहून घेणं यापेक्षा आणखी कोणती चांगली गोष्ट असू शकते?
अध्याय ३७
त्याने स्वतःला अशुद्ध होऊ दिलं नाही
डॅनिएल्स प्रॉफसी अध्या. २ ¶१४-१५
दानीएल—टीकाकारांच्या विळख्यात अडकलेलं पुस्तक
१४ दानीएल १:१ मध्ये म्हटलंय, की “यहूदाचा राजा यहोयाकीम याच्या शासनकाळाच्या तिसऱ्या वर्षी” नबुखद्नेस्सर “बाबेलचा राजा” होता. पण यिर्मया म्हणतो, की नबुखद्नेस्सर राजाच्या राजवटीचं पहिलं वर्षं हे यहोयाकीम राजाच्या शासनकाळाचं चौथं वर्षं होतं. (यिर्मया २५:१; ४६:२) त्यामुळे टीकाकारांचं असं म्हणणं आहे, की दानीएलचा अहवाल आणि यिर्मयाचा अहवाल एकमेकांशी मेळ खात नाही. कारण यहोयाकीम राजाच्या शासनकाळाच्या तिसऱ्या वर्षी नबुखद्नेस्सर अजूनही राजा बनला नव्हता. मग दानीएल यिर्मयापेक्षा वेगळं काहीतरी सांगत होता का? याबद्दल जास्त माहिती घेतली, तर आपल्या लक्षात येतं की या दोघांच्या अहवालात खरंतर काहीच तफावत नाही. इ.स.पू. ६२८ मध्ये जेव्हा नबुखद्नेस्सरने फारो नखोला युद्धात हरवलं तेव्हा यहोयाकीम राजा बनला. याच्या काही काळानंतरच, म्हणजे इ.स.पू. ६२० मध्ये नबुखद्नेस्सरने यहूदावर हल्ला केला आणि यहोयाकीमला आपल्या अधीन असलेला राजा बनवलं. (२ राजे २३:३४; २४:१) दानीएल त्याचा अहवाल बाबेलमधून लिहीत होता. त्यामुळे त्याने बाबेलमध्ये राहणाऱ्या यहुदी लोकांच्या दृष्टिकोनातून हा अहवाल लिहिला. दुसरीकडे पाहता, फारो नखोने यहोयाकीमला इजिप्तच्या अधीन असलेला राजा बनवलं तेव्हापासून वर्षं मोजत यिर्मयाने आपला अहवाल लिहिला. याच्या तीन वर्षांनंतर, म्हणजे इ.स.पू. ६२४ मध्ये नबुखद्नेस्सर आपल्या वडिलांच्या जागी बाबेलचा राजा बनला. यरुशलेममध्ये राहणाऱ्या यहुदी लोकांच्या दृष्टिकोनातून हे यहोयाकीम राजाचं चौथं वर्षं होतं. त्यामुळे, यहोयाकीम बाबेलच्या अधीन असलेला राजा बनला तेव्हापासून दानीएलने त्याचा शासनकाळ मोजला. तर फारो नखोने यहोयाकीमला राजा बनवलं तेव्हापासून यिर्मयाने यहोयाकीमचा शासनकाळ मोजला.
१५ टीकाकारांना वाटणाऱ्या या फरकामुळे दानीएलने आपलं पुस्तक बाबेलच्या बंदिवासात असताना लिहिलं होतं या गोष्टीला खरंतर आणखी दुजोरा मिळतो. आणि टीकाकारांनी दानीएलच्या पुस्तकावर केलेला आरोप आणखी एका गोष्टीमुळे कमकुवत ठरतो. हे लक्षात घ्या, की दानीएलजवळ यिर्मयाचं पुस्तक होतं आणि त्याने आपल्या लिखाणात त्याचा संदर्भसुद्धा घेतला. टीकाकार दावा करतात त्याप्रमाणे दानीएल खरंच फसवणूक करणारा एक चलाख माणूस असता तर त्याने यिर्मयासारख्या भरवशालायक व्यक्तीच्या लिखाणाविरुद्ध लिहायचं धाडस केलं असतं का? आणि तेही आपल्या पुस्तकाच्या पहिल्या वचनात? मुळीच नाही!
इन्साइट “भांडार” ¶३
भांडार
बाबेलच्या भांडाराबद्दल दानीएल १:२ मध्ये असं म्हटलंय, की नबुखद्नेस्सर राजाने यहोवाच्या मंदिरातली मौल्यवान भांडी आणून “त्याच्या देवाच्या मंदिराच्या भांडारात ठेवली.” बाबेलच्या एका शिलालेखामध्ये नबुखद्नेस्सर राजाने मरोदख दैवताच्या मंदिराबद्दल असं म्हटल्याचं सांगितलंय: “मी इथे सोनं, चांदी आणि मौल्यवान रत्नं जमा केली . . . आणि माझ्या साम्राज्याचा खजिनाही इथेच ठेवलाय.” (एज १:८ सोबत तुलना करा.) तसंच बाबेलच्या साम्राज्यात वेगवेगळ्या ठिकाणीसुद्धा त्यांची इतर भांडारं होती. (दान ३:२) पर्शियाच्या लोकांमध्येसुद्धा अशीच व्यवस्था होती. त्यांच्या सुभेदारांनी गोळा केलेला कर स्थानिक भांडारात ठेवला जायचा. (एज ७:२०, २१) पर्शियाच्या साम्राज्यात जी मुख्य भांडारं होती, ती शाही संग्रहालय म्हणूनही वापरली जायची. तिथे सोनं आणि इतर मौल्यवान वस्तूंसोबतच महत्त्वाची कागदपत्रंही ठेवली जायची.—एज ६:१, २; एस्ते ३:९.
इन्साइट “जादूगार आणि भूतविद्या करणारे” ¶२-६
जादूटोणा आणि भूतविद्या
असं मानलं जातं, की “काळी” जादू यामध्ये शत्रूचं वाईट करण्याच्या हेतूने वशीकरण करणं, शाप देणं आणि “नजर लावणं” यांसारख्या गोष्टी येतात. याउलट, “पांढरी” जादू (कल्याणकारी जादू) ही वशीकरणाचा प्रभाव नष्ट करून किंवा शाप निष्फळ करून चांगले परिणाम घडवून आणते असं ही जादू करणाऱ्यांचं म्हणणं आहे. प्राचीन काळातल्या काही देशांमध्ये “काळी” जादू करण्यावर बंदी होती आणि ती करणाऱ्यांना मृत्युदंड दिला जायचा. पण बायबल याच्याही पुढे जाऊन कुठल्याही प्रकारचा जादूटोणा करायला मनाई करतं. (लेवी १९:२६; अनु १८:९-१४) असं म्हटलं जातं, की अलौकीक ज्ञान आणि बुद्धीमुळे मिळवलेल्या मंत्र-तंत्रांचा वापर करून जादूटोणा करणारा लोकांवर प्रभाव टाकू शकतो किंवा भविष्यातल्या घटना बदलू शकतो. या दृष्टिकोनातून जादूटोणा आणि शकून पाहणं यात फरक आहे. शकून पाहणारा पुढे घडणाऱ्या घटनांचा फक्त अंदाज लावू शकतो. पण त्या घटनांना तो वळण देऊ शकत नाही किंवा बदलू शकत नाही.
जादूटोणा आणि भूतविद्या करणाऱ्या बहुतेकांची अशी समज आहे, की एखाद्याच्या अंगातून दुष्ट आत्मे बाहेर काढले जाऊ शकतात किंवा त्यांना एखाद्याच्या अंगात प्रवेश करायला लावलं जाऊ शकतं. तसंच त्यांची दिशाभूल केली जाऊ शकते किंवा त्यांना फसवलं जाऊ शकतं. शिवाय त्यांना लाकडाच्या वस्तूमध्ये किंवा मातीच्या मूर्तीमध्ये कैद किंवा बंदिस्त केलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ, त्यांचा असा दावा आहे, की जोदूटोणा करणारा मधाने किंवा इतर मोहात पाडणाऱ्या गोष्टींनी मंतरलेला मार्ग तयार करून दुष्ट आत्म्यांवर पाहिजे तसं नियंत्रण करू शकतो.
अशा समजुतींमुळे जादूटोणा करणाऱ्यांचा एक कावेबाज वर्गच तयार झाला. त्यांचा लोकांच्या जीवनावर जबरदस्त प्रभाव असायचा. आपल्याजवळ दुष्ट आत्म्यांवर ताबा ठेवायची शक्ती आहे आणि त्यांच्यापेक्षाही जास्त अलौकीक शक्ती आहे असं दाखवून ते लोकांना मोठ्या प्रमाणात लुबाडायचे. लोक असं मानायचे, की भूतविद्या करणारे पेशेवाईक लोक दुष्ट आत्म्यांना आपली आज्ञा पाळायला भाग पाडू शकतात, पण दुष्ट आत्म्यांचं त्यांच्यासमोर काहीही चालू शकत नाही.
अशा प्रकारच्या जादूटोण्याचे आणि भूतविद्येचे प्रकार, ज्याला त्या वेळी विज्ञान म्हटलं जायचं, प्राचीन बाबेलमधल्या खास्दी लोकांनी तयार केले होते आणि ते त्यांचा वापर करायचे. यशया आपल्याला सांगतो, की त्याच्या काळात म्हणजे इ.स.पू. ८ व्या शतकात बाबेल सगळ्या प्रकारच्या जादूटोण्याने आणि भूतविद्येने भरलं होतं. (यश ४७:१२-१५) याच्या शंभरपेक्षा जास्त वर्षांनंतरसुद्धा, म्हणजे दानीएलच्या दिवसांतसुद्धा जादूटोणा आणि भूतविद्या करणारे लोक बाबेलच्या राजदरबारात कायम असायचे.—दान १:२०; २:२, १०, २७; ४:७; ५:११.
बाबेलमधले लोक विद्रूप दिसणाऱ्या व्यक्तींना खूप घाबराचे. त्यांनाच चेटूक करणारे स्त्री किंवा पुरुष म्हटलं जायचं. असं मानलं जायचं की ते काळी जादू करणारे आहेत. याउलट पुजाऱ्यांना मात्र “पांढऱ्या” जादूचे (कल्याणकारी जादूचे) तज्ज्ञ समजलं जायचं. लोकांची अशी समजूत होती, की ज्या मंत्र-तंत्रांचा वापर करून पुजारी एका आजारी माणसाला बरं करू शकतो त्याच मंत्र-तंत्रांचा वापर जर चेटूक करणाऱ्या स्त्री-पुरुषांनी केला, तर त्या व्यक्तीला ठार मारलं जाऊ शकतं.
डॅनिएल्स प्रॉफसी अध्या. ३ ¶२५
परीक्षेतही ते यहोवाला विश्वासू राहिले!
२५ दहा दिवस फक्त शाकाहारी अन्न आणि पाणी घेतल्यानंतर ते तरुण इतरांपेक्षा “अशक्त” दिसणार होते का? ज्या हिब्रू शब्दाचं भाषांतर “शाकाहारी” करण्यात आलंय त्याचा अर्थ “कडधान्य” असा होतो. काही बायबल भाषांतरांमध्ये या शब्दाचं भाषांतर “डाळी” असं करण्यात आलंय. यात खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शेंगा आणि वेगवेगळी कडधान्य येतात. (जसं की, वटाणे, चवळीच्या शेंगा आणि वेगवेगळ्या डाळी.) काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की संदर्भ लक्षात घेतला तर या तरुणांना दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये फक्त कडधान्यांचाच नाही तर इतर गोष्टींचाही समावेश होता. एका पुस्तकात असं म्हटलंय: “दानीएल आणि त्याचे साथीदार मांसाहार असलेल्या शाही मेजवानीऐवजी सर्वसाधारण लोकांचं जेवण मागत होते.” त्यामुळे त्यांना दिल्या जाणाऱ्या शाकाहारी जेवणात बऱ्याच पौष्टिक पदार्थांचा जसं की, शेंगा, काकड्या, कांदा-लसूण, पालेभाज्या, डाळी, कलिंगड आणि वेगवेगळ्या धान्यांपासून बनवलेल्या ब्रेडचा समावेश असावा. त्यामुळे साहजिकच याला कोणी उपासमारीचं अन्न म्हणणार नाही. हीच गोष्ट त्यांची देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्याच्या लक्षात आली असेल. म्हणूनच वचनात म्हटलंय, की “कारभाऱ्याने त्यांची विनंती मान्य केली आणि दहा दिवस त्यांची पारख केली.” (दानीएल १:१४) मग याचा काय परिणाम झाला?
अभ्यास लेख ३३
दानीएलच्या उदाहरणातून शिका
“तू देवाला खूप प्रिय आहेस.”—दानी. ९:२३.
सारांश
यहोवाच्या तरुण सेवकांना आज वेगवेगळ्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं. अशा वेळी त्यांना धैर्य दाखवावं लागतं आणि त्यांच्या एकनिष्ठेची परीक्षासुद्धा होते. ‘सगळं काही देवाने बनवलंय,’ असं ते मानत असल्यामुळे, कदाचित त्यांचे शाळासोबती त्यांची टिंगल करतील. किंवा ते देवाची सेवा करत असल्यामुळे आणि त्याच्या स्तरांप्रमाणे जगत असल्यामुळे कदाचित त्यांचे शाळासोबती त्यांची चेष्टा करतील. दानीएलनेसुद्धा त्याच्या तरुण वयात धैर्याने आणि एकनिष्ठ राहून यहोवाची सेवा केली. या लेखात सांगितल्याप्रमाणे, आज जेव्हा यहोवाचे सेवक दानीएलचं अनुकरण करतात तेव्हा ते खऱ्या अर्थाने बुद्धिमान ठरतात.
दानीएल संदेष्टा तरुण होता तेव्हा बाबेलचे लोक त्याला यरुशलेमपासून खूप लांब बाबेलला आणतात. पण दानीएलची त्याला बंदी बनवणाऱ्या अधिकाऱ्यांवर खूप चांगली छाप पडते. ते फक्त त्याचं “बाहेरचं रूप” पाहतात आणि त्यांना असं दिसतं की तो ‘खूप देखणा आहे आणि त्याच्यात कोणताही दोष नाही.’ तसंच, तो एका उच्च घराण्यातून आहे, हेही त्यांना समजतं. (१ शमु. १६:७) या कारणामुळेच दानीएल राजमहालात काम करायला योग्य ठरावा म्हणून बाबेलचे अधिकारी त्याला प्रशिक्षण देतात.—दानी. १:३, ४, ६.
२ पण दानीएल दिसायला देखणा होता आणि राजमहालात त्याला मोठा अधिकार देण्यात आला होता म्हणूनच यहोवाचं त्याच्यावर प्रेम नव्हतं. तर तो आतून कसा आहे हे यहोवाने पाहिलं होतं. यहोवाने म्हटलं, की तो नोहा आणि ईयोबप्रमाणेच नीतिमान आहे. या दोन्ही विश्वासू सेवकांनी यहोवाच्या नजरेत एक चांगलं नाव कमवण्यासाठी बरीच दशकं घालवली होती. (उत्प. ५:३२; ६:९, १०; ईयो. ४२:१६, १७; यहेज्केल १४:१४ वाचा.) पण दानीएलबद्दल जेव्हा यहोवाने हे म्हटलं, तेव्हा तो जेमतेम २० वर्षांचा होता. पुढेसुद्धा जेव्हा दानीएल खूप मोठं आयुष्य जगला आणि त्याच्या आयुष्यात बऱ्याच मोठ्या घटना घडल्या, तेव्हासुद्धा यहोवाने त्याला सोडलं नाही, तर तो नेहमी त्याच्यावर प्रेम करत राहिला.—दानी. १०:११, १९.
३ या लेखात आपण दानीएलच्या दोन गुणांबद्दल पाहणार आहोत. या गुणांमुळेच तो यहोवाच्या नजरेत अतिशय मौल्यवान होता. सगळ्यात आधी आपण या गुणांवर चर्चा करू या आणि दानीएलने हे गुण कधी दाखवले, ते पाहू या. मग दानीएलला हे गुण विकसित करायला कशी मदत झाली, ते पाहू या. आणि शेवटी आपल्याला दानीएलचं अनुकरण कसं करता येईल, यावर चर्चा करू या. हा लेख जरी तरुणांना लक्षात घेऊन लिहिण्यात आला असला, तरी दानीएलच्या उदाहरणातून आपण सगळेच जण शिकू शकतो.
दानीएलसारखं धैर्य दाखवा
४ धैर्यवान लोकांनाही भीती वाटू शकते. पण असं असलं तरी ते योग्य ते करायला कचरत नाहीत. दानीएल वयाने लहान असला तरी तो खूप धैर्यवान होता. त्याच्या आयुष्यातल्या दोन घटनांचाच विचार करा. यांपैकी पहिली घटना बाबेलने यरुशलेमचा नाश केला, त्याच्या दोन वर्षांनंतर घडली असावी. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, याला एक स्वप्न पडलं आणि तो खूप अस्वस्थ झाला. स्वप्नात त्याने एक अतिशय मोठा पुतळा पाहिला होता. ते स्वप्न काय होतं आणि त्याचा अर्थ काय होता, हे त्याला समजत नव्हतं. म्हणून राजाने त्याच्या महालातल्या सगळ्या ज्ञानी माणसांना धमकावलं, की जर कोणीही ते स्वप्न आणि त्याचा अर्थ काय आहे, हे त्याला सांगितलं नाही, तर तो सगळ्यांना मारून टाकेल. (दानी. २:३-५) त्यांच्यामध्ये दानीएलसुद्धा होता आणि त्यामुळे त्याला लगेच पाऊल उचलणं गरजेचं होतं, नाहीतर अनेकांना आपल्या जीव गमवावा लागणार होता. “म्हणून दानीएल राजाकडे गेला आणि राजाला स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी त्याने त्याच्याकडून थोडा वेळ मागून घेतला.” (दानी. २:१६) हे करण्यासाठी दानीएलला नक्कीच खूप धैर्याची आणि विश्वासाची गरज होती. शिवाय याआधी दानीएलने कधीच कुठल्या स्वप्नाचा अर्थ सांगितला नव्हता. म्हणून त्याने आपल्या तीन सोबत्यांनाही, म्हणजे शद्रख, मेशख आणि अबेद्नगो यांना “स्वर्गाच्या देवाने आपल्यावर दया करावी आणि हे रहस्य आपल्याला उलगडून सांगावं,” अशी प्रार्थना करायला सांगितली. (दानी. २:१८) यहोवाने त्यांच्या प्रार्थनांचं उत्तर दिलं आणि मग देवाच्या मदतीने दानीएलने नबुखद्नेस्सरला त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला. त्यामुळे, दानीएल आणि त्याच्या तीन सोबत्यांचा जीव वाचला.
५ या घटनेच्या काही काळानंतर पुन्हा एकदा अशी एक वेळ आली, जेव्हा दानीएलला धैर्य दाखवावं लागणार होतं. या वेळी नबुखद्नेस्सर राजाला पुन्हा एकदा स्वप्न पडलं आणि तो खूप अस्वस्थ झाला. त्याने स्वप्नामध्ये एक अतिशय उंच वृक्ष पाहिला होता. या वेळीसुद्धा त्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी दानीएलला खूप धैर्य दाखवावं लागणार होतं. कारण त्या स्वप्नाचा अर्थ असा होता, की राजा वेडा होणार होता आणि काही काळ त्याच्याकडून राज्यपद काढून घेतलं जाणार होतं. (दानी. ४:२५) दानीएलने सांगितलेला अर्थ ऐकून राजाला असं वाटलं असतं की तो त्याच्याविरुद्ध बंड करत आहे, आणि त्यामुळे राजा त्याला ठारही मारू शकला असता. पण हे माहीत असतानासुद्धा दानीएलने धैर्य दाखवलं, आणि त्या स्वप्नाचा अर्थ राजाला सांगितला.
६ दानीएलने आपल्या संपूर्ण आयुष्यात धैर्य दाखवलं. पण त्यासाठी त्याला कशामुळे मदत झाली? तो लहान होता तेव्हा त्याच्या आईवडिलांनी नक्कीच त्याच्यासमोर एक चांगलं उदाहरण ठेवलं असेल. त्याचे आईवडील इस्राएली होते आणि देवाने इस्राएली लोकांना जे नियम दिले होते आणि ज्या सूचना दिल्या होत्या, त्या नक्कीच त्यांनी पाळल्या असतील. तसंच आपल्या मुलांनाही देवाच्या नियमशास्त्राबद्दल शिकवलं असेल. (अनु. ६:६-९) दानीएलला नियमशास्त्रामधल्या दहा आज्ञांसारख्या फक्त मोठमोठ्या गोष्टीचं माहीत नव्हत्या, तर लहानसहान गोष्टीसुद्धा माहीत होत्या. जसं की, नियमशास्त्रानुसार इस्राएली लोकांनी काय खायचं नव्हतं हेसुद्धा त्याला माहीत होतं. (लेवी. ११:४-८; दानी. १:८, ११-१३) यासोबतच, दानीएलला देवाच्या लोकांचा इतिहाससुद्धा माहीत होता. देवाच्या स्तरांना न पाळल्यामुळे त्यांना काय परिणाम भोगावे लागले, हे त्याला माहीत होतं. (दानी. ९:१०, ११) दानीएलच्या आयुष्यात जे काही घडलं आणि त्याला जो काही अनुभव आला, त्यावरून त्याला या गोष्टीची खातरी पटली होती, की यहोवा आणि त्याचे शक्तिशाली स्वर्गदूत नेहमी त्याच्यासोबत असतील.—दानी. २:१९-२४; १०:१२, १८, १९.
७ दानीएलने देवाच्या संदेष्ट्यांनी लिहिलेल्या गोष्टींचा अभ्यास केला. यांमध्ये यिर्मयाच्या भविष्यवाणीचासुद्धा समावेश होतो. या अभ्यासातून दानीएलला हे कळलं, की बऱ्याच काळापासून बाबेलच्या बंदिवासात असलेल्या यहुद्यांची लवकरच सुटका होणार आहे. (दानी. ९:२) बायबलची भविष्यवाणी कशी पूर्ण होत आहे हे पाहिल्यामुळे त्याचा यहोवावरचा भरवसा नक्कीच वाढला असेल. आणि ज्यांचा यहोवावर भरवसा असतो, ते सहसा जबरदस्त धैर्य दाखवतात. (रोमकर ८:३१, ३२, ३७-३९ सोबत तुलना करा.) आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तो आपल्या स्वर्गातल्या पित्याला नेहमी प्रार्थना करायचा. (दानी. ६:१०) त्याने यहोवासमोर आपल्या चुका कबूल केल्या आणि आपलं मन त्याच्यासमोर मोकळं केलं. तसंच त्याने देवाकडे मदतसुद्धा मागितली. (दानी. ९:४, ५, १९) तो आपल्यासारखाच एक माणूस होता, त्यामुळे त्यालाही धैर्य दाखवायला शिकावं लागलं. त्याने अभ्यास करून, प्रार्थना करून आणि यहोवावर भरवसा ठेवून हा गुण स्वतःमध्ये वाढवला.
८ धैर्य हा गुण जर आपल्यामध्ये वाढवायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे? आपण धैर्य दाखवायला कचरू नये म्हणून कदाचित आपले आईवडील आपल्याला प्रोत्साहन देतील. पण हा गुण ते आपल्याला वारशाने देऊ शकत नाहीत. म्हणून धैर्य हा गुण दाखवायला आपण स्वतःच शिकलं पाहिजे. हे एखादं नवीन कौशल्य शिकण्यासारखं आहे. आपल्याला जर एखादं कौशल्य चांगल्या प्रकारे शिकायचं असेल, तर त्याचा एक मार्ग म्हणजे आपल्याला शिकवणारी व्यक्ती काय करते याचं अगदी जवळून निरीक्षण करून तिचं अनुकरण आपण केलं पाहिजे. त्याचप्रमाणे इतर जण धैर्य कसं दाखवत आहेत याचं जवळून निरीक्षण करून आणि त्यांच्या उदाहरणाचं अनुकरण करून आपण धैर्य दाखवू शकतो. म्हणून दानीएलसारखं आपणसुद्धा देवाच्या वचनाचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे, त्याच्याशी मनमोकळेपणाने आणि वारंवार बोलत राहिलं पाहिजे आणि त्याच्याशी एक चांगलं नातं जोडलं पाहिजे. तसंच, तो आपल्याला कधीच सोडणार नाही असा भरवसा आपण बाळगला पाहिजे. मग जेव्हा आपल्या विश्वासाची परीक्षा होईल, तेव्हा आपल्यालासुद्धा धैर्य दाखवता येईल.
९ आपण धैर्य दाखवतो तेव्हा बऱ्याच मार्गांनी आपल्याला फायदा होत असतो. बेनचंच उदाहरण घ्या. तो जर्मनीतल्या एका शाळेत शिकत होता. तिथे सगळे जण उत्क्रांतीला मानत होते आणि बायबलमधला निर्मितीचा अहवाल एक दंतकथा आहे असं त्यांना वाटत होतं. एके दिवशी बेनला त्याच्या वर्गात असं विचारण्यात आलं, की तो ‘सगळं काही निर्माण करण्यात आलंय,’ असं का मानतो आणि त्याबद्दल बोलायची संधी त्याला देण्यात आली. बेननेसुद्धा अगदी धैर्याने आपल्या विश्वासाबद्दल सांगितलं. याचा काय परिणाम झाला? बेन म्हणतो: “माझ्या शिक्षकांनी मी जे काही सांगत होतो ते अगदी चांगल्या प्रकारे ऐकून घेतलं. आणि माझे मुद्दे मांडण्यासाठी मी जी माहिती वापरली होती त्याच्या बऱ्याच प्रती तयार करून त्यांनी वर्गातल्या सगळ्या मुलांना दिल्या.” यावर बेनच्या वर्गातल्या मुलांची काय प्रतिक्रिया होती? बेन म्हणतो: “बरीच मुलं माझं म्हणणं ऐकून घ्यायला तयार होती आणि त्यांनी माझं कौतुकही केलं.” बेनच्या उदाहरणातून दिसून येतं, की जे लोक धैर्य दाखवतात, त्यांचा इतर जण सहसा आदर करतात. शिवाय, त्यामुळे नम्र मनाचे लोक यहोवाकडे आकर्षित होतात. तर मग, धैर्य हा गुण स्वतःमध्ये वाढवण्यासाठी आपल्याकडे नक्कीच खूप चांगली कारणं आहेत.
दानीएलसारखी एकनिष्ठा दाखवा
१० बायबलमध्ये ज्या इब्री शब्दाचं भाषांतर “एकनिष्ठा” किंवा “एकनिष्ठ प्रेम” असं करण्यात आलंय, तो शब्द सहसा देवाचं त्याच्या सेवकांवर किती गाढ प्रेम आहे, हे दाखवण्यासाठी वापरण्यात आलाय. तसंच, देवाच्या सेवकांमध्ये एकमेकांबद्दल असलेल्या प्रेमासाठीसुद्धा हा शब्द वापरण्यात आलाय. (२ शमु. ९:६, ७) एकनिष्ठा ही एक अशी गोष्ट आहे, जी काळाच्या ओघात आणखी मजबूत होत जाते. दानीएलच्या बाबतीत हे कसं झालं ते आता आपण पाहू या.
११ दानीएलच्या आयुष्यात अशा बऱ्याच घटना घडल्या ज्यांमुळे त्याच्या एकनिष्ठेची परीक्षा झाली. पण जेव्हा तो त्याच्या वयाच्या नव्वदीत होता, तेव्हा त्याच्या एकनिष्ठेची सर्वात मोठी परीक्षा झाली. तेव्हा मेद पारसच्या सत्तेने बाबेलवर कब्जा केला होता आणि दारयावेश राजा राज्य करत होता. त्याच्या दरबारातल्या अधिकाऱ्यांना दानीएल आवडत नव्हता. आणि तो ज्या देवाची उपासना करायचा त्यांचाही ते आदर करत नव्हते. म्हणून त्यांनी दानीएलला ठार मारायचा कट रचला. त्यांनी असं फर्मान काढायला लावलं, ज्यामुळे दानीएल राजाला एकनिष्ठ आहे की त्याच्या देवाला हे दिसणार होतं. इतर लोकांप्रमाणेच आपणही राजाला एकनिष्ठ आहोत, हे दाखवण्यासाठी दानीएलला फक्त ३० दिवसांसाठी यहोवाला प्रार्थना करायचं थांबवावं लागणार होतं. पण दानीएलने याबाबतीत कोणतीही तडजोड केली नाही. याचा परिणाम म्हणजे त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं. पण यहोवाने त्याला त्याच्या एकनिष्ठेचं प्रतिफळ दिलं आणि त्याला सिंहांपासून वाचवलं. (दानी. ६:१२-१५, २०-२२) आपणही दानीएलसारखंच यहोवाला एकनिष्ठ कसं राहू शकतो?
१२ आधी सांगितल्याप्रमाणे, आपल्याला जर यहोवाला एकनिष्ठ राहायचं असेल तर त्याच्याबद्दल आपल्या मनात गाढ प्रेम असलं पाहिजे. दानीएल यहोवाला कायम एकनिष्ठ होता कारण आपल्या स्वर्गातल्या पित्याबद्दल त्याच्या मनात गाढ प्रेम होतं. आणि यहोवाच्या गुणांवर आणि त्याने ते कसे दाखवले यावर मनन केल्यामुळेच त्याला हे प्रेम वाढवता आलं. (दानी. ९:४) तसंच यहोवाने त्याच्यासाठी आणि त्याच्या लोकांसाठी केलेल्या चांगल्या गोष्टींवरसुद्धा त्याने मनन केलं.—दानी. २:२०-२३; ९:१५, १६.
१३ दानीएलसारखंच, आज आपल्या तरुण मुलांनासुद्धा अशा लोकांमध्ये वावरावं लागतं ज्यांना यहोवाबद्दल आणि त्याच्या स्तरांबद्दल बिलकुल आदर नाही. तसंच देवावर प्रेम करणारे लोकही त्यांना आवडत नाहीत. इतकंच नाही तर आपल्या तरुण मुलांची एकनिष्ठा तोडण्यासाठी ते त्यांना त्राससुद्धा देतात. उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या ग्रेअम नावाच्या आपल्या एका तरुण भावाच्या बाबतीत काय झालं त्याचाच विचार करा. त्याला त्याच्या शाळेत एका परिस्थितीचा सामना करावा लागला. त्याच्या वर्गातल्या शिक्षिकेने एकदा सगळ्यांना विचारलं, की ‘त्यांच्या एखाद्या मित्राने किंवा मैत्रिणीने जर त्यांना असं सांगितलं, की तो किंवा ती समलिंगी आहे, तर ते काय करतील?’ त्या शिक्षिकेने वर्गातल्या सगळ्यांना असं सांगितलं, की जे त्यांना साथ देतील त्यांनी वर्गाच्या एका बाजूला उभं राहावं आणि जे त्यांना साथ देणार नाहीत त्यांनी दुसऱ्या बाजूला उभं राहावं. ग्रेअम म्हणतो: “मला आणि माझ्यासोबत असलेल्या एका साक्षीदार मुलाला सोडून बाकी सगळी मुलं समलिंगी व्यक्तींना साथ देण्यासाठी वर्गाच्या एका बाजूला उभी होती.” पण परिस्थिती पुढे आणखी खराब झाली. ग्रेअमला आता तो यहोवाला एकनिष्ठ आहे की नाही हे दाखवून द्यावं लागणार होतं. तो म्हणतो: “तो तास संपेपर्यंत मुलांनी आणि शिक्षिकेनेसुद्धा आमचा खूप अपमान केला आणि आम्हाला टोमणे मारले. पण मी शांत राहून माझ्या विश्वासाबद्दल त्यांना सांगण्यासाठी माझ्याकडून होताहोईल तितका प्रयत्न केला. पण त्यांनी माझं जराही ऐकून घेतलं नाही.” या गोष्टीचा ग्रेअमवर काय परिणाम झाला? तो म्हणतो: “माझा असा अपमान झालेला मला आवडला नाही. पण कोणतीही तडजोड न करता मी माझ्या विश्वासाबद्दल ठाम होतो या गोष्टीचा मला खूप आनंदा होतो.”
१४ दानीएलसारखंच आपणसुद्धा आपल्या मनात देवाबद्दल गाढ प्रेम निर्माण केलं तर आपल्यालाही त्याला कायम एकनिष्ठ राहता येईल. आपण जर त्याच्या गुणांबद्दल शिकत राहिलो तर आपल्या मनात त्याच्याबद्दल असलेलं प्रेम वाढत राहील. उदाहरणार्थ, आपण त्याने निर्माण केलेल्या गोष्टींचा अभ्यास करू शकतो. (रोम. १:२०) जर तुम्हाला यहोवाबद्दल आपल्या मनात प्रेम आणि आदर वाढवायचा असेल तर तुम्ही “उत्क्रांती की निर्मिती?” या लेखमालिकेतले लेख किंवा व्हिडिओ पाहू शकता. किंवा मग तुम्ही वॉज लाईफ क्रियेटेड? आणि जीवसृष्टीची सुरुवात—विचार करण्यासारखे पाच प्रश्न, ही माहितीपत्रकं वाचू शकता. डेन्मार्कमध्ये राहणारी एस्तेर नावाची एक बहीण या प्रकाशनांबद्दल काय म्हणते, त्याचा विचार करा. ती म्हणते: “त्यात जो तर्क मांडलाय तो खूप जबरदस्त आहे. ही माहिती तुम्ही काय मानलं पाहिजे हे सांगत नाही, तर फक्त तुमच्यासमोर पुरावे ठेवते आणि निर्णय तुमच्यावर सोडून देते.” आधी उल्लेख केलेला बेन म्हणतो: “या माहितीमुळे माझा विश्वास खूप मजबूत झालाय. आणि देवानेच जीवन बनवलंय या गोष्टीची मला पक्की खातरी पटली आहे.” या प्रकाशनांचा अभ्यास केल्यानंतर बायबलमध्ये जे म्हटलंय त्याच्याशी तुम्ही सहमत व्हाल: “यहोवा आमच्या देवा, गौरव, सन्मान आणि सामर्थ्य मिळण्यासाठी तूच योग्य आहेस. कारण तू सर्व गोष्टी निर्माण केल्या.”—प्रकटी. ४:११.
१५ यहोवाबद्दल आपल्या मनात असलेलं प्रेम वाढवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे त्याच्या मुलाचं म्हणजे येशूचं जीवन कसं होतं हे समजून घेणं आणि त्याचा अभ्यास करणं. जर्मनीत राहणाऱ्या समीरा नावाच्या एक बहिणीने असंच केलं. ती म्हणते: “येशूच्या जीवनाचा अभ्यास करून मला यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखता आलं.” ती लहान होती तेव्हा यहोवा देवालासुद्धा भावना आहेत, ही गोष्ट समजून घ्यायला तिला कठीण जात होतं. पण येशू पृथ्वीवर होता तेव्हा काही परिस्थितींबद्दल त्याला कसं वाटलं असेल, हे ती समजू शकत होती. ती म्हणते: “मला येशूचा स्वभाव आवडतो, कारण तो खूप मनमिळाऊ होता आणि त्याला लहान मुलं आवडायची.” तिने येशूबद्दल जितकं जास्त जाणून घेतलं, तितकं यहोवा कसा आहे, हे ती आणखी चांगल्या प्रकारे समजू शकली. आणि यहोवासोबतचं तिचं नातं आणखी मजबूत झालं. असं का? ती म्हणते: “मला हळूहळू हे समजलं, की येशू आपल्या पित्याचं अगदी हुबेहूब अनुकरण करतो. ते दोघेही एकसारखेच आहेत. मला समजलं की येशूला पृथ्वीवर पाठवायचं हेसुद्धा एक कारण होतं. कारण येशूला पाहून लोकांना यहोवा कसा आहे, हे आणखी चांगल्या प्रकारे समजून घेता येणार होतं.” (योहा. १४:९) तुम्हालासुद्धा यहोवासोबतचं तुमचं नातं आणखी मजबूत करायचं असेल तर येशूबद्दल शिकून घेण्यासाठी वेळ काढावा लागेल. तुम्ही जर असं केलं तर यहोवावरचं तुमचं प्रेम आणखी वाढेल आणि त्याला एकनिष्ठ राहायचा तुमचा निश्चय आणखी पक्का होईल.
१६ आपण इतरांशी एकनिष्ठ असतो तेव्हा आपली त्यांच्यासोबत चांगली मैत्री होते आणि तेही आपल्याला एकनिष्ठ राहतात. (रूथ १:१४-१७) पण यहोवाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे आपल्याला आणखी एक फायदा होतो. तो फायदा म्हणजे आपल्याला मनाची शांती आणि समाधान मिळतं. का बरं? कारण यहोवा आपल्याला असं अभिवचन देतो, की जे त्याच्याशी एकनिष्ठ राहतात त्यांच्याशी तोही एकनिष्ठ राहतो. (स्तोत्र १८:२५; मीखा ६:८ वाचा.) विचार करा, स्वतः सर्वशक्तिमान निर्माणकर्त्याची आपल्यासोबत एक जवळचं नातं जोडायची इच्छा आहे! आणि जेव्हा तो हे नातं जोडतो तेव्हा कोणतीही परीक्षा, विरोधक, इतकंच काय तर मृत्यूसुद्धा हे नातं तोडू शकत नाही. (दानी. १२:१३; लूक २०:३७, ३८; रोम. ८:३८, ३९) खरंच दानीएलचं अनुकरण करणं आणि यहोवाला एकनिष्ठ राहणं किती महत्त्वाचं आहे!
दानीएलकडून आपण आणखी बरंच काही शिकू शकतो
१७ या लेखात आपण दानीएलच्या फक्त दोन गुणांबद्दलच चर्चा केली. पण त्याच्या जीवनातून आपण आणखी बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. उदाहरणार्थ, यहोवाने दानीएलला बरीच स्वप्नं आणि दृष्टान्त दाखवले आणि भविष्यवाण्यांचा अर्थ सांगण्याची क्षमताही दिली. त्याने सांगितलेल्या बऱ्याच भविष्यवाण्या आज पूर्ण झालेल्या आहेत. आणि इतर काही भविष्यवाण्या लवकरच पूर्ण होतील. आणि पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर त्यांचा परिणाम होईल.
१८ पुढच्या लेखात आपण दानीएलने लिहिलेल्या अशाच दोन भविष्यवाण्यांवर चर्चा करू या. या भविष्यवाण्यांचा अर्थ समजून घेतल्यामुळे तरुण आणि वृद्ध अशा सगळ्यांनाच फायदा होईल आणि योग्य निर्णय घेता येतील. शिवाय, या भविष्यवाण्यांमुळे धैर्य दाखवण्याचा आणि यहोवाला एकनिष्ठ राहायचा आपला निश्चय आणखी पक्का होईल. आणि पुढे येणाऱ्या परीक्षांचा सामना करण्यासाठी आपल्याला तयार राहता येईल.
अध्याय ३८
ते धगधगत्या आगीलाही घाबरले नाहीत
तुम्हाला माहीत होतं का?
प्राचीन बॅबिलोनच्या अवशेषांमध्ये सापडलेल्या लाखो विटांवरून आणि या विटा बनवण्याच्या पद्धतीवरून, बायबलमधली माहिती खरी असल्याचं कसं कळतं?
प्राचीन गोष्टींचं संशोधन करणाऱ्यांना बॅबिलोनच्या अवशेषांमध्ये भाजलेल्या लाखो विटा सापडल्या. या विटांचा वापर हे शहर बांधण्यासाठी करण्यात आला होता. रॉबर्ट कोल्डवे नावाच्या एका संशोधकाच्या म्हणण्यानुसार त्या काळी अशा प्रकारच्या विटा भट्ट्यांमध्ये बनवल्या जायच्या. आणि “या भट्ट्या गावाच्या बाहेर असायच्या. कारण तिथे चांगल्या प्रतीची माती आणि विटा भाजण्यासाठी मुबलक प्रमाणात वाळलेली झुडपं असायची.”
प्राचीन अहवालांमधून असं दिसून येतं, की बॅबिलोनचे अधिकारी या भट्ट्यांचा वापर अतिशय क्रूर गोष्टींसाठीसुद्धा करायचे. टोरोंटो विश्वविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करणारे पॉल-ॲलन ब्युली हे अश्शूरी लोकांच्या इतिहासाचे जाणकार आहेत. ते म्हणतात: “बॅबिलोनच्या बऱ्याच लिखाणांमध्ये अशी नोंद करण्यात आली आहे, की जे लोक राजाच्या आज्ञेच्या विरोधात जायचे आणि पवित्र गोष्टींचा अनादर करायचे त्यांना राजाच्या आदेशावरून या भट्ट्यांमध्ये टाकलं जायचं.” नबुखद्नेस्सर राजाच्या काळातल्या एका लिखाणात असं म्हटलं आहे: “त्यांना संपवून टाका. त्यांना भाजून, जाळून, मारून टाका. . . . त्यांना भट्टीत टाकून द्या. . . . त्यांना धगधगत्या आगीत भस्म करून टाका आणि त्यांचा धूर हवेत उठू द्या.”
या शब्दांवरून आपल्याला बायबलमधल्या दानीएल पुस्तकाच्या तिसऱ्या अध्यायात लिहिलेल्या घटनांची आठवण होते. त्यात सांगितल्याप्रमाणे नबुखद्नेस्सर राजा एक सोन्याची भलीमोठी मूर्ती बॅबिलोन शहराच्या बाहेर असलेल्या दूरा नावाच्या मैदानात उभी करतो. जेव्हा शद्रख, मेशख आणि अबेद्नगो त्या मूर्तीला दंडवत घालायला नकार देतात, तेव्हा नबुखद्नेस्सरला राग येतो. आणि तो “भट्टी नेहमीपेक्षा सात पटीने जास्त तापवण्याचा” हुकूम देतो. आणि त्या तिघांना “धगधगत्या आगीच्या भट्टीत फेकण्याचा” आदेश देतो. पण एक शक्तिशाली स्वर्गदूत त्या तिघांना वाचवतो.—दानी. ३:१-६, १९-२८.
बायबलचा अहवाल खरा असल्याचं बॅबिलोनमध्ये सापडलेल्या विटांवरूनसुद्धा दिसून येतं. या विटांमध्ये अशा बऱ्याच विटा सापडल्या ज्यांवर राजाच्या स्तुतीसाठी काही शब्द कोरले होते. त्यांपैकी काही शब्द असे होते: “बॅबिलोनचा राजा नबुखद्नेस्सर, . . . माझ्या ऐश्वर्याचं प्रतीक म्हणून मी, महान राजा नबुखद्नेस्सर याने बांधलेला हा भव्य महाल. . . . माझा वंश या शहरावर कायम राज्य करत राहो.” हे शब्द दानीएल ४:३० मध्ये जे म्हटलंय त्याच्याशी अगदी जुळणारे आहेत. तिथे नबुखद्नेस्सर राजा स्वतःबद्दल अशी बढाई मारतो: “पाहा, हे महान बाबेल शहर! मी ते माझ्या शाही निवासासाठी आणि माझ्या ऐश्वर्याच्या गौरवासाठी स्वतःच्या शक्तीने आणि सामर्थ्याने बांधलंय!”
डॅनिएल्स प्रॉफसी अध्या. ३ ¶१४
परीक्षेतही ते यहोवाला विश्वासू राहिले!
१४ दानीएलचं नाव बदलून त्याला बेल्टशस्सर असं नाव देण्यात आलं. या नावाचा अर्थ, “राजाच्या जिवाचं रक्षण होवो” असा व्हायचा. असं दिसतं, की हे नाव बाबेलचा प्रमुख देव बेल किंवा मार्दूक याला केल्या जाणाऱ्या विनंतीचं एक संक्षिप्त रूप होतं. दानीएलसाठी हे नाव निवडण्यात नबुखद्नेस्सरचा हात होता की नाही हे आपल्याला माहीत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे. दानीएलला “[आपल्या] देवाच्या नावावरून” नाव देण्यात आलंय याचा नबुखद्नेस्सरला अभिमान होता. (दानीएल ४:८) हनन्याचं नाव बदलून त्याला शद्रक हे नाव देण्यात आलं. काही लोकांचं असं म्हणणं होतं, की हे नाव दोन किंवा त्याहून जास्त शब्द जोडून तयार केलेलं होतं. आणि त्याचा अर्थ “अकूची आज्ञा” असा होतो. विशेष म्हणजे ‘अकू’ हे बाबेलमध्ये राहणाऱ्या सुमेरी लोकांच्या देवाचं नाव होतं. मीशाएलचं नाव बदलून मेशख (कदाचित, मी-शा-अकू) ठेवण्यात आलं. मीशाएल या नावाचा अर्थ “देवासारखा कोण आहे?” असा होतो. पण त्यांनी चतुरपणे यात बदल करून “अकूसारखा कोण आहे?” असा अर्थ असलेलं मेशख हे नाव त्याला दिलं. अजऱ्याचं नाव बदलून त्याला अबेद्नगो असं नाव देण्यात आलं. त्याचा अर्थ “नगोचा सेवक” असा होतो. आणि “नगो” हे “नबो” या नावाचंच एक रूप आहे. “नबो” हे खरंतर एका दैवताचं नाव होतं. आणि या नावावरूनच बाबेलच्या बऱ्याच शासकांना नावं देण्यात आली होती.
डॅनिएल्स प्रॉफसी अध्या. ५ ¶३
अतिशय कठीण परीक्षेतही त्यांचा विश्वास टिकून राहिला
३ नबुखद्नेस्सर राजाचाच विचार करा. त्याच्या नावाचा अर्थ “हे नबो, वारसदाराचं रक्षण कर!” असा होतो. नबो हा बाबेलमधला विद्येचा देव तसंच कृषीदेव होता. नबुखद्नेस्सर खूपच धार्मिक वृत्तीचा माणूस होता. आधी सांगितल्याप्रमाणे, त्याने बाबेलमधल्या बऱ्याच दैवतांसाठी सुंदर मंदिरं बांधली होती. तो खासकरून मार्दूक देवाचा भक्त होता. या देवामुळेच आपल्याला युद्धांत यश मिळतं असं तो मानायचा. असं दिसतं, की युद्धाचे डावपेच रचण्यासाठी शकुन-मुहूर्त पाहण्यावर त्याचा खूप जोर होता.—यहेज्केल २१:१८-२३.
डॅनिएल्स प्रॉफसी अध्या. ५ ¶१०
अतिशय कठीण परीक्षेतही त्यांचा विश्वास टिकून राहिला
१० नबुखद्नेस्सर राजाच्या आज्ञेवरून जमलेले बहुतेक लोक आपापल्या देवांची उपासना करायचे. पण तरीसुद्धा नबुखद्नेस्सर राजाने उभ्या केलेल्या मूर्तीची उपासना करायला त्यांना काहीच वाटत नव्हतं. कारण एका बायबल विद्वानाने म्हटल्याप्रमाणे, “मूर्तींची उपासना करणं ही त्यांच्यासाठी काही नवीन गोष्ट नव्हती. ते आधीपासूनच ती करत आले होते. शिवाय त्यांचं स्वतःचं एक दैवत असलं, तरी दुसऱ्या एखाद्या दैवताची उपासना करायला त्यांची काहीच हरकत नव्हती.” या विद्वानाने पुढे असंही म्हटलं: “लोकांचं मत होतं की जगात बरेच देव आहेत . . . त्यामुळे दुसऱ्या देशाच्या किंवा लोकांच्या दैवतांची उपासना करण्यात काहीच चुकीचं नाही.”
वेब सिरीझ “बायबल अभ्यासाचा उपक्रम”
“धगधगत्या आगीच्या भट्टीतून वाचवण्यात आलं”
तरुणांसाठी
सूचना: एखाद्या शांत ठिकाणी हा अभ्यास करा. वचनं वाचत असताना ती घटना आपल्या डोळ्यांसमोर उभी करा. तुम्ही तिथे आहात अशी कल्पना करा. तिथल्या लोकांचे आवाज ऐकायचा प्रयत्न करा. तसंच त्यांच्या मनात काय चाललंय हे समजून घ्यायचाही प्रयत्न करा.
मुख्य व्यक्ती: शद्रख, मेशख, अबेद्नगो आणि नबुखद्नेस्सर
सारांश: तीन इब्री तरुणांच्या विश्वासाची परीक्षा होते.
१ घटनेचा विचार करा. —दानीएल ३:१-३० वाचा.
वचनं ३-७ वाचताना तुम्हाला कोणते आवाज ऐकू येत आहेत ते लिहा.
.....
धगधगत्या आगीची भट्टी कशी दिसत असेल ते लिहा.
.....
जेव्हा नबुखद्नेस्सर राजाने आगीची भट्टी नेहमीपेक्षा सात पटीने जास्त तापवण्याचा हुकूम दिला, तेव्हा त्याच्या भावना काय असतील? (वचनं १९ आणि २० पुन्हा वाचा.)
.....
आगीच्या भट्टीत दिसणाऱ्या चौथ्या माणसाचं वर्णन करा. (वचनं २४ आणि २५ पुन्हा वाचा.)
.....
नबुखद्नेस्सर राजाशी बोलताना शद्रख, मेशख आणि अबेद्नगोने कोणते गुण दाखवले असतील? (वचनं १६-१८)
.....
२ आणखी खोलवर अभ्यास करा.
संशोधनाच्या साधनांचा वापर करून एक “हात” म्हणजे किती माप हे शोधायचा प्रयत्न करा. त्यानंतर नबुखद्नेस्सरने बनवलेली मूर्ती किती मोठी असेल ते शोधा. (वचन १ पुन्हा वाचा.)
.....
वचनं १९, २० ची तुलना वचनं २८, २९ सोबत केल्यावर, तुम्हाला काय वाटतं नबुखद्नेस्सर राजाचा स्वभाव कसा असावा?
.....
३ शिकलेल्या गोष्टी लागू करा. खाली दिलेल्या गोष्टींबद्दल तुम्ही काय शिकलात ते लिहून काढा.
अधिकारपदावर असलेल्यांचा आदर करणं.
.....
तुमच्या विश्वासाची बाजू घेण्याचं महत्त्व.
.....
कठीण परिस्थितीच्या वेळी मिळणारी यहोवाची मदत.
.....
आणखी धडे.
कदाचित कोणत्या परिस्थितीत तुमच्या विश्वासाची परीक्षा होऊ शकते?
.....
शद्रख, मेशख आणि अबेद्नगो यांच्या गोष्टीमुळे तुम्हाला विश्वासू राहायला कशी मदत होईल?
.....
४ या घटनेतल्या कोणत्या भागातून तुम्हाला सगळ्यात जास्त शिकायला मिळालं आणि का?
.....
अध्याय ३९
“मला मरावं लागलं तरी चालेल”
अनुकरण अध्या. १६, चौकट
ती सुज्ञ, धैर्यवान आणि निःस्वार्थी होती
एस्तेरचं पुस्तक ऐतिहासिक दृष्ट्या अचूक नाही, हा दावा खरा आहे का?
काही टीकाकारांनी हे पुस्तक अचूक नसल्याचा दावा केला आहे. पण, अनेक विद्वान मात्र मान्य करतात, की एस्तेर हे पुस्तक लिहिणाऱ्याला पर्शियन राजघराणं, तिथलं बांधकाम आणि रीतिरिवाज यांबद्दल खूप बारीकसारीक गोष्टी माहीत असल्याचं दिसून येतं. बायबलव्यतिरिक्त, इतर कोणत्याही उपलब्ध ऐतिहासिक लिखाणांत एस्तेर राणीचा उल्लेख आढळत नाही हे खरं आहे; पण, ऐतिहासिक अहवालांतून तशी कितीतरी राजांची व राणींची नावं नाहीशी झाली असतील. लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे, ऐतिहासिक अहवालांत मार्डुका नावाच्या एका मनुष्याचा उल्लेख आढळतो. मार्डुका हे मर्दखय या नावाचं पर्शियन भाषेतलं रूप आहे. विशेष म्हणजे, हा मनुष्य एस्तेर पुस्तकात वर्णन केलेल्या काळातच शूशनच्या राजदरबारात कामाला होता, असं या अहवालांत सांगण्यात आलं आहे.
देवाच्या लोकांसाठी तिनं जिवाची पर्वा केली नाही
१८ पुढं काही काळानं, हामान नावाच्या एका माणसाला अहश्वेरोशच्या दरबारात एक उच्च पद देण्यात आलं. राजानं त्याला प्रधानमंत्री केलं आणि अशा रीतीनं तो राजाचा प्रमुख सल्लागार बनला. पर्शियन साम्राज्यात राजाच्या खालोखाल त्याचंच स्थान होतं. राजानं तर असा हुकूमही काढला की हामान समोर येताच प्रत्येकानं त्याला वाकून मुजरा करावा. (एस्ते. ३:१-४) पण, या कायद्यामुळं मर्दखयसमोर एक मोठी समस्या निर्माण झाली. त्याला राजाची आज्ञा तर मानायची होती, पण त्यासाठी आपल्या देवाचा अनादर करणं त्याला मान्य नव्हतं. हामानाला मुजरा केल्यामुळं देवाचा अनादर कसा होणार होता? हामान हा अगागी, म्हणजेच अगाग राजाचा वंशज होता. या अमालेकी राजाचा, शमुवेल संदेष्ट्यानं वध केला होता. (१ शमु. १५:३३) मुळात, अमालेकी लोक अतिशय दुष्ट होते. ते यहोवाचे आणि इस्राएल राष्ट्राचे कट्टर शत्रू होते. देवानं सर्व अमालेकी लोकांना नाशास पात्र ठरवलं होतं. (अनु. २५:१९) मग, एका विश्वासू यहुद्यानं अमालेकी व्यक्तीला मुजरा करणं योग्य ठरलं असतं का? मर्दखय तर असं करण्याचा विचारही करू शकत नव्हता. त्यानं हामानाला मुजरा करण्यास स्पष्ट नकार दिला. “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे,” या तत्त्वाचं पालन करण्यासाठी आजसुद्धा कितीतरी विश्वासू स्त्रीपुरुष आपला जीव धोक्यात घालतात!—प्रे. कृत्ये ५:२९.
सावध राहा०२ ९/८ ७ ¶३–८ ¶२
भविष्य पाहण्यासाठी अंकशास्त्राची मदत घेणं योग्य आहे का?
अंकांच्या मदतीने व्यक्तीचं भविष्य पाहण्यासाठी अंकशास्त्राचा वापर केल्याचा बायबलमध्ये थेट उल्लेख केलेला नाही. पण याबद्दलचा संदर्भ एका अहवालात मिळतो. इ.स.पू. पाचव्या शतकात हामान नावाच्या एक आमालेकी माणसाने पर्शियामध्ये असलेल्या सगळ्या यहुदी लोकांचं नामोनिशाण मिटवण्यासाठी एक कट रचला होता. आणि त्यासाठी त्याने अंकशास्त्राचा वापर केला. त्याबद्दल अहवालात म्हटलंय: “एक विशिष्ट महिना आणि दिवस ठरवण्यासाठी हामानसमोर पूर, म्हणजे चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. . . . तेव्हा १२ व्या महिन्याची, म्हणजे अदार महिन्याची चिठ्ठी निघाली.“—एस्ते. ३:७.
प्राचीन काळात लोक सहसा चिठ्ठ्या टाकून (दगडाचे किंवा लाकडाचे लहान तुकडे वापरून) वादविवाद सोडवायचे. (नीतिवचनं १८:१८) पण हामानने शकुन पाहण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या होत्या. आणि बायबलमध्ये शकुन पाहायला साफ मनाई केली आहे. अनुवाद १८:१०-१२ मध्ये म्हटलंय, की ‘शकुन पाहणारा, चेटूक करणारा, वशीकरण करणारा, भूतविद्या करणारा, ज्योतिषी किंवा मांत्रिक यांची देवाला घृणा वाटते.’
बायबल शकुन पाहण्याचा आणि अलौकिक शक्तीचा संबंध भूतविद्येशी जोडतं. दुष्ट स्वर्गदूत आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी घटनांना वळण देऊ शकतात. या विशिष्ट घटनेत असं घडलं होतं की नाही हे आपल्या माहीत नाही. पण एक गोष्ट मात्र आपल्याला माहीत आहे: भूतविद्या करणं देवाला अजिबात आवडत नाही. आणि भूतविद्येमुळे एक व्यक्ती दुष्ट स्वर्गदूतांच्या प्रभावाखाली येऊ शकते.—१ शमुवेल १५:२३; इफिसकर ६:१२.
अनुकरण अध्या. १६, चौकट
ती सुज्ञ, धैर्यवान आणि निःस्वार्थी होती
भविष्यवाणी पूर्ण झाली
लढाई करून यहोवाच्या लोकांचं रक्षण करण्याद्वारे एस्तेर व मर्दखय यांनी प्राचीन काळात करण्यात आलेली बायबलमधली एक भविष्यवाणी पूर्ण केली. एस्तेरच्या काळाच्या १,२०० वर्षांपेक्षा जास्त काळाआधी कुलप्रमुख याकोब यानं यहोवाच्या प्रेरणेनं आपल्या एका पुत्राबद्दल अशी भविष्यवाणी केली होती: “बन्यामीन हा फाडून टाकणारा लांडगा आहे, सकाळी तो शिकार खाऊन टाकेल, सायंकाळी लुटीचे वाटे करेल.” (उत्प. ४९:२७) “सकाळी” म्हणजेच इस्राएली राजांच्या इतिहासाच्या सुरुवातीच्या काळात, बन्यामीनाच्या वंशजांपैकी राजा शौल व इतर शूर योद्ध्यांनी यहोवाच्या लोकांच्या वतीनं अनेक लढाया लढल्या. तसंच, “सायंकाळी” म्हणजेच इस्राएली राजांचा काळ संपून विदेशी राजे राज्य करू लागले, तेव्हा बन्यामीन वंशातल्या एस्तेर व मर्दखय यांनी यहोवाच्या शत्रूंविरुद्ध लढाई करून त्यांच्यावर विजय मिळवला. हामानाच्या मालकीची भरपूर मालमत्ता त्यांना मिळाली यावरून एका अर्थानं त्यांनी “लुटीचे वाटे” केले असंही म्हणता येईल.
अध्याय ४०
त्याने शहराच्या भिंती पुन्हा उभ्या केल्या
टेहळणी बुरूज१० ७/१ ९ ¶५-७
तुम्हाला माहीत होतं का?
नहेम्या राजाचा प्यालेबरदार होता. याचा अर्थ तो फक्त राजाचा एक साधारण सेवक होता का?
नहेम्या हा पर्शियाचा राजा अर्तहशश्त याचा प्यालेबरदार होता. (नहेम्या १:११) प्राचीन मध्य-पूर्व भागांमधल्या राजदरबारांमध्ये काम करणारा राजाचा प्यालेबरदार हा काही साधासुधा सेवक नव्हता. उलट तो एक उच्च पदवारचा अधिकारी होता. त्या काळातल्या बऱ्याच साहित्यांमध्ये आणि कलाकृतींवर प्यालेबरदारांची चित्रं रेखाटली आहेत. त्यांवरून पर्शियाच्या राजदरबारात प्यालेबरदार म्हणून नहेम्याची जी भूमिका होती त्याबद्दल आपल्याला बरंच काही कळतं.
राजाला कोणी मद्यातून विष देऊ नये म्हणून प्यालेबरदार आधी स्वतः ते चाखून पाहायचा. त्यामुळे प्यालेबरदार हा राजाचा खास विश्वासातला माणूस असायचा. एड्विन एम. यामाऊची हे इतिहासकार म्हणतात: “त्या काळात पर्शियामध्ये जे राज्य करायचे त्यांच्या जिवाला नेहमी धोका असायचा. त्यामुळे त्यांना भरवशालायक सेवकांची खूप गरज असायची.” यासोबतच, प्यालेबरदार म्हणून काम करणारी व्यक्ती राजाच्या खास मर्जीतली असायची. दररोज राजाच्या आजूबाजूला असल्यामुळे राजाला कोण भेटू शकतं हे शक्यतो तोच ठरवायचा.
नहेम्या अशा भरवशाच्या पदावर असल्यामुळेच राजाने त्याची विनंती मान्य केली. राजाने त्याला यरुशलेमच्या भिंती बांधण्यासाठी यरुशलेमला जायची परवानगी दिली. नहेम्या नक्कीच राजाचा खूप खास सेवक असावा. दी अँकर बायबल डिक्शनरी यात असं म्हटलंय: “नहेम्याला उत्तर देताना राजाने त्याला फक्त इतकंच विचारलं ‘तू कधी परत येशील?’”—नहेम्या २:१-६.
यहोवा तुम्हाला काय बनायला मदत करू शकतो?
११ याच्या बऱ्याच शतकांनतर, यरुशलेमची भिंत दुरुस्त करण्यात आली तेव्हा यहोवाने त्या कामात इतर लोकांसोबत शल्लूमच्या मुलींचाही उपयोग केला. (नहे. २:२०; ३:१२) त्यांचे वडील अधिकाराच्या पदावर असले, तरी त्या मुली हे कठीण आणि धोक्याचं काम करायला तयार होत्या. (नहे. ४:१५-१८) त्या मुली तकोवाच्या प्रतिष्ठित पुरुषांसारख्या नव्हत्या जे “आपल्या मानेवर . . . कामाचे जू” घ्यायला तयार नव्हते. (नहे. ३:५) यरुशलेमच्या भिंतीचं बांधकाम फक्त ५२ दिवसांत पूर्ण झाल्यामुळे शल्लूमच्या मुली किती आनंदित झाल्या असतील याचा जरा विचार करा! (नहे. ६:१५) आज आपल्या काळातही बऱ्याच बहिणींना स्वेच्छेने एका खास प्रकारची पवित्र सेवा करण्यात आनंद मिळतो. ती सेवा म्हणजे, यहोवाच्या कामासाठी समर्पित केलेल्या इमारतींचं बांधकाम आणि दुरुस्तीचं काम. या बहिणींचं कौशल्य, उत्साह आणि विश्वासूपणा या गोष्टींमुळेच हे काम यशस्वी होऊ शकतं.
नहेम्या पुस्तकातील ठळक मुद्दे
४:१७, १८—एक मनुष्य केवळ एकाच हाताने पुनःबांधकाम करणे कसे शक्य आहे? भार वाहणाऱ्यांसाठी असे करणे सोपे असावे. भार एकदा त्यांच्या डोक्यावर किंवा खांद्यावर ठेवल्यावर ते तो आपल्या एका हाताने सांभाळून “दुसऱ्या हातात शस्त्रे धारण करीत.” ज्या लोकांना दोन्ही हातांनी काम करावे लागत होते ते “आपल्या कमरेस तरवार लावून [काम] करीत.” शत्रूने जर त्यांच्यावर हल्ला केला तर त्यांना त्यांच्याविरुद्ध लढावे लागत होते.
परकीय भाषेतील क्षेत्रात सेवा करताना आपली आध्यात्मिकता टिकवून ठेवा
४ दुसऱ्या भाषेत शिकवल्या जाणाऱ्या बायबलच्या शिकवणी समजून घेणं आपल्याला कठीण जातं, तेव्हा यहोवासोबत असलेला आपला नातेसंबंध धोक्यात येऊ शकतो. नहेम्याच्या काळात हीच गोष्ट घडली. तो जेव्हा यरुशलेममध्ये आला, तेव्हा त्याने पाहिलं की काही मुलांना इब्री भाषा बोलता येत नाही. (नहेम्या १३:२३, २४ वाचा.) आणि इब्री भाषेत असलेलं देवाचं वचन त्या मुलांना समजत नसल्यामुळे, यहोवासोबत असलेला त्यांचा नातेसंबंध कमजोर झाला आहे.—नहे. ८:२, ८.
वेब सिरीझ “बायबल अभ्यासाचा उपक्रम”
देवाने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं
तरुणांसाठी
सूचना: एखाद्या शांत ठिकाणी हा अभ्यास करा. वचनं वाचत असताना ती घटना आपल्या डोळ्यांसमोर उभी करा. तुम्ही तिथे आहात अशी कल्पना करा. तिथल्या लोकांचे आवाज ऐकायचा प्रयत्न करा. तसंच त्यांच्या मनात काय चाललंय हे समजून घ्यायचाही प्रयत्न करा.
मुख्य व्यक्ती: नहेम्या, अर्तहशश्त राजा, सनबल्लट आणि तोबीया
सारांश: नहेम्या देवाला प्रार्थना करतो, राजाकडे यरुशलेमला जायची परवानगी मागतो आणि अडथळ्यांवर मात करतो.
१ घटनेचा विचार करा.—नहेम्या २:१-२० वाचा.
या अहवालातली माणसं कशी दिसत असतील ते लिहा.
नहेम्या: ․․․․․
अर्तहशश्त राजा: ․․․․․
सनबल्लट आणि तोबीया: ․․․․․
नहेम्याने एवढी छोटी प्रार्थना का केली असेल?
․․․․․
नहेम्या जेव्हा यरुशलेमला पोहोचला असेल, तेव्हा तिथली अवस्था कशी असेल? (वचनं १३ आणि १४ पुन्हा वाचा.)
․․․․․
वचन १७ मध्ये नहेम्या जे बोलला ते तो कशा प्रकारे बोलला असेल?
․․․․․
२ आणखी खोलवर अभ्यास करा.
नहेम्याने कशाबद्दल प्रार्थना केली असेल? (नहेम्या १:४-११ वाचा.)
․․․․․
अर्तहशश्त राजा आपल्याला यरुशलेमला जाऊ देईल असं नहेम्याला का वाटलं असेल? (एज्रा ७:१-६ आणि नीतिवचनं २१:१ वाचा.)
․․․․․
यहुद्यांनी “चांगल्या कामासाठी एकमेकांना प्रोत्साहन” कसं दिलं? (नहेम्या २:१८ आणि यशया ३५:३ वाचा.)
․․․․․
नहेम्याने सनबल्लट आणि तोबीया यांना ज्या प्रकारे उत्तर दिलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? (नहेम्या २:२० वाचा.)
․․․․․
३ शिकलेल्या गोष्टी लागू करा.
खाली दिलेल्या गोष्टींबद्दल तुम्ही काय शिकलात ते लिहून काढा.
प्रार्थनेचं महत्त्व.
․․․․․
यहोवाचे सेवक धैर्याने आपल्या विश्वासाची बाजू घेतात तेव्हा तो त्यांना कशी मदत करतो?
․․․․․
४ स्वतःला विचारा:
मी उदास असतो तेव्हा मी नहेम्यासारखं कसं वागू शकतो?
․․․․․
मी मानत असलेल्या गोष्टी चुकीच्या आहेत असं एखाद्याने म्हटल्यावर मी यहोवावर भरवसा असल्याचं कसं दाखवू शकतो?
․․․․․
या घटनेतून मला शिकायला मिळालेली सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आणि का?
․․․․․
हे करून पाहा: तुमच्याकडे असलेल्या संशोधनाच्या साधनांचा वापर करून जुन्या काळातली शूशन आणि यरुशलेम ही शहरं नकाशावर कुठे होती ते शोधा. (नहेम्या १:१) तसंच या दोन शहरांमधलं अंदाजे अंतर किती असेल ते बघा. मग विचार करा, की नहेम्यासारखं तुम्हालाही आजच्या काळातल्या वाहनांशिवाय तितकं अंतर गाठणं किती कठीण गेलं असतं.