धैर्याने देवाची उपासना करत राहा! साठी संदर्भ—भाग ३
अध्याय ४१
“ते दोघं यहोवाच्या नजरेत नीतिमान होते”
एखादी व्यक्ती “नीतिमान” आहे असे बायबल म्हणते तेव्हा ती व्यक्ती पापरहित अथवा परिपूर्ण आहे असा त्याचा अर्थ होत नाही. तर देवाच्या आणि मनुष्यांच्या प्रती असलेली कर्तव्ये पूर्ण करणारी व्यक्ती असा त्याचा अर्थ होतो. उदाहरणार्थ, नोहाला “आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य” म्हणण्यात आले कारण “नोहाने तसे केले; देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले.” (उत्पत्ति ६:९, २२; मलाखी ३:१८) बाप्तिस्मा देणारा योहान याचे आईवडील जखऱ्या व अलीशिबा यांच्याविषयी असे म्हणण्यात आले की “ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधि पाळण्यात निर्दोष होती.” (लूक १:६) आणि इस्राएली नसणाऱ्या कर्नेल्य नावाच्या एका इटॅलियन सेनाधीशाविषयी तो “नीतिमान मनुष्य असून देवाचे भय बाळगणारा आहे” असे वर्णन करण्यात आले.—प्रेषितांची कृत्ये १०:२२.
इन्साइट “गब्रीएल” ¶२-३
गब्रीएल
मीखाएलनंतर फक्त याच स्वर्गदूताचं नाव बायबलमध्ये देण्यात आलंय. मानवी रूप धारण करून पृथ्वीवर आलेल्या स्वर्गदूतांपैकी फक्त यानेच स्वतःचं नाव सांगितलंय. गब्रीएल स्वर्गदूत दोनदा दानीएलसमोर प्रकट झाला. पहिल्यांदा, तो “बेलशस्सर राजाच्या शासनकाळाच्या तिसऱ्या वर्षी” उलई नदीजवळ प्रकट झाला. त्या वेळी त्याने दानीएलला बकऱ्याच्या आणि एडक्याच्या दृष्टान्ताचं स्पष्टीकरण दिलं (दान ८:१, १५-२६); आणि दुसऱ्यांदा, मेदचा राजा ‘दारयावेश याच्या शासनकाळाच्या पहिल्या वर्षी’ तो दानीएलसमोर प्रकट झाला. या वेळी, त्याने दानीएलला ‘७० आठवड्यांच्या’ भविष्यवाणीबद्दल सांगितलं. (दान ९:१, २०-२७) तसंच, जखऱ्या याजकालासुद्धा गब्रीएल स्वर्गदूतानेच अशी आनंदाची बातमी दिली, की त्याला आणि त्याच्या वयस्कर बायकोला, म्हणजे अलीशिबाला एक मुलगा होईल, आणि त्याचं नाव (बाप्तिस्मा देणारा) योहान असेल. (लूक १:११-२०) इतकंच नाही, तर योसेफशी जिचं लग्न ठरलं होतं, त्या कुमारी मरीयेलासुद्धा गब्रीएलनेच असं म्हटलं: “हे आशीर्वादित कुमारी! तुला शांती असो. यहोवा तुझ्यासोबत आहे.” मग त्याने तिला सांगितलं, की ती एका मुलाला, येशूला जन्म देईल आणि “त्याला सर्वोच्च देवाचा मुलगा म्हणतील. यहोवा त्याला त्याच्या पित्याचं म्हणजे दावीदचं राजासन देईल. . . . आणि त्याच्या राज्याचा कधीच अंत होणार नाही.”—लूक १:२६-३८.
बायबलच्या अहवालावरून कळतं, की गब्रीएल हा “देवाजवळ उभा राहणारा” स्वर्गातल्या न्यायसभेतला एक उच्च श्रेणीचा स्वर्गदूत आहे. पृथ्वीवरच्या देवाच्या सेवकांना खास संदेश सांगण्यासाठी त्याला ‘पाठवण्यात आलं’ होतं. (लूक १:१९, २६) त्याच्या नावाचा अर्थ “तंदुरुस्त आणि बलवान माणूस” असा होतो. त्याच्या या नावाच्या अर्थाप्रमाणेच तो दृष्टान्तात आणि मानवी रूपात दिसला.—दान ८:१५.
इन्साइट “योहान” ¶१
योहान
[योहान हे यहोहानान या नावाचं इंग्रजीतलं रूप (जॉन) आहे. त्याचा अर्थ, “यहोवाने कृपा केली आहे; यहोवा उदारता दाखवत आला आहे” असा होतो].
लूक पुस्तकातील ठळक मुद्दे
१:६२—जखऱ्या मुका व बहिराही झाला होता का? नाही, तो फक्त मुका झाला होता. लोकांनी त्याला बाळाचे काय नाव ठेवायचे याविषयी “खुणावून विचारिले” पण हे तो बहिरा झाल्यामुळे नव्हते. त्याच्या पत्नीने बाळाच्या नावाविषयी काय म्हटले हे त्याने ऐकले. कदाचित इतरांनी खुणेने याविषयी त्याचे मत विचारले असेल. नंतर फक्त त्याची बोलण्याची शक्तीच पुन्हा त्याला परत देण्यात आली असे सांगितले आहे, यावरूनही दिसून येते की जखऱ्याची श्रवणशक्ती गेली नव्हती.—लूक १:१३, १८-२०, ६०-६४.
टेहळणी बुरूज२३.१० १४-१५ ¶१०-१४
‘तो तुम्हाला बळ देईल’—कसं?
१० यहोवा आपल्या भाऊबहिणींचा उपयोग करून, आपल्याला बळ देऊ शकतो. आपण जेव्हा एखाद्या परीक्षेतून जात असतो किंवा एखादी नेमणूक पूर्ण करणं आपल्याला कठीण वाटतं, तेव्हा भाऊबहिणींकडून आपल्याला “खूप सांत्वन” मिळू शकतं. (कलस्सै. ४:१०, ११) खासकरून, “दुःखाच्या प्रसंगी” आपल्याला त्यांची गरज असते. (नीति. १७:१७) जेव्हा आपण कमजोर असतो, तेव्हा हे भाऊबहीण आपल्याला गरजेच्या गोष्टी पुरवू शकतात. तसंच ते आपल्याला भावनिक आणि आध्यात्मिक रितीनेसुद्धा मदत करू शकतात. येशूची आई मरीया हिला इतरांकडून मदत कशी मिळाली हे आता आपण पाहू या.
११ मरीयालासुद्धा धैर्याची गरज होती. जेव्हा गब्रीएल स्वर्गदूताने तिच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली तेव्हा तिला कसं वाटलं असेल याचा विचार करा. तिचं लग्न झालं नव्हतं तरीही ती गरोदर राहणार होती. तिला मुलं वाढवण्याचा काहीच अनुभव नव्हता. पण तरी तिला अशा एका बाळाला वाढवायचं होतं, जे पुढे जाऊन मसीहा बनणार होतं. तिने कुठल्याही पुरुषाशी संबंध ठेवले नव्हते, पण तरी ती आई बनणार होती. आणि आता ज्याच्यासोबत तिचं लग्न ठरलं होतं, त्या योसेफला हे सगळं कसं समजावून सांगायचं, हा प्रश्नसुद्धा तिच्यासमोर होता.—लूक १:२६-३३.
१२ ही अनोखी आणि कठीण जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मरीयाला कुठून बळ मिळालं? यासाठी तिने इतरांची मदत घेतली. उदाहरणार्थ, तिने गब्रीएल स्वर्गदूताला तिच्यावर असलेल्या या जबाबदारीबद्दल आणखी माहिती विचारली. (लूक १:३४) याच्या काही काळानंतर ती तिची नातेवाईक अलीशिबा हिला “डोंगराळ प्रदेशातल्या यहूदाच्या एका शहरात” भेटायला गेली. आणि यामुळे मरीयाला फायदा झाला. कारण अलीशिबाने मरीयाचं कौतुक केलं आणि मरीयाच्या होणाऱ्या बाळाबद्दल भविष्यवाणी करण्यासाठी यहोवाने तिला प्रेरित केलं. (लूक १:३९-४५ वाचा.) यामुळे मरीयाला आनंद झाला आणि तिने म्हटलं, की यहोवाने “आपल्या हाताने आपला पराक्रम दाखवलाय.” (लूक १:४६-५१) अशा प्रकारे गब्रीएल स्वर्गदूताद्वारे आणि अलीशिबाद्वारे यहोवाने मरीयाला बळ दिलं.
१३ मरीयाप्रमाणेच तुम्हालाही भाऊबहिणींकडून बळ मिळू शकतं. बोलिव्हियामध्ये दसूरी नावाच्या बहिणीलाही मदतीची गरज होती. तिच्या वडिलांना एक गंभीर आजार झाला होता आणि त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं. त्या वेळी दसूरीला तिच्या वडिलांची होताहोईल तितकी काळजी घ्यायची होती. (१ तीम. ५:४) पण हे नक्कीच तिच्यासाठी सोपं नव्हतं. याबद्दल ती म्हणते: “बऱ्याच वेळा मला असं वाटत होतं की आता आपल्याला हे जमणार नाही.” पण मग तिने कोणाची मदत घेतली का? सुरुवातीला तर तिने मदत घेतली नाही. ती म्हणते: “मला भाऊबहिणींना त्रास द्यायचा नव्हता. मी असा विचार करत होते, की मला ज्या मदतीची गरज आहे ती यहोवाच मला पुरवू शकतो. पण नंतर मला हे जाणवलं, की स्वतःला इतरांपासून वेगळं करून मी माझी समस्या एकटीनेच सोडवायचा प्रयत्न करत होते.” (नीति. १८:१) मग पुढे तिने काय केलं? तिने काही भाऊबहिणींना पत्रं लिहिली. आणि त्यांना तिच्या परिस्थितीबद्दल सांगितलं. ती म्हणते: “भाऊबहिणींमुळे मला किती बळ मिळालं ते मला शब्दांत सांगता येणार नाही. ते मला हॉस्पिटलमध्ये जेवण आणून द्यायचे आणि मला सांत्वन मिळेल अशी वचनं दाखवायचे. आपण एकटे नाही, ही भावनाच ताकद देणारी आहे. खरंच, आपण यहोवाच्या एका मोठ्या कुटुंबाचा भाग आहोत. एक असं कुटुंब जे गरजेच्या वेळी मदतीचा हात द्यायला, सोबत मिळून अश्रू गाळायला आणि समस्येचा सामना करायला नेहमी तयार असतं.”
१४ यहोवा आपल्याला आणखी एका मार्गाने बळ देतो. तो म्हणजे मंडळीतल्या वडिलांद्वारे. ते यहोवाकडून मिळालेली एक भेटच आहेत. त्यांच्यामुळे आपल्याला बळ मिळतं आणि आपण ताजेतवाने होतो. (यश. ३२:१, २) म्हणून जेव्हा तुम्ही चिंतेत असता, तेव्हा तुमच्या समस्यांबद्दल वडिलांशी बोला. आणि जेव्हा ते तुम्हाला मदत करतात तेव्हा आनंदाने ती मदत स्वीकारा. कारण त्यांच्याद्वारेच यहोवा आपल्याला मजबूत करतो.
अध्याय ४२
तिने ‘हो’ म्हणायचं धैर्य दाखवलं
सावध राहा! ४/११ ११ ¶४-५
एक भरवशालायक पुस्तक—भाग ६
बायबलच्या अहवालांमध्ये रोमी काळातल्या काही महत्त्वाच्या घटनांचासुद्धा उल्लेख आढळतो. जसं की, येशूच्या जन्माच्या वेळेबद्दल सांगताना बायबल म्हणतं: “त्या दिवसांत, कैसर औगुस्त याने असा हुकूम काढला, की त्याच्या संपूर्ण साम्राज्यातल्या लोकांच्या नावाची नोंदणी केली जावी. (क्विरीनिय हा सीरियाचा राज्यपाल होता, तेव्हा पहिली नावनोंदणी करण्यात आली.) त्यामुळे सगळे लोक नावनोंदणी करायला आपापल्या मूळ गावी गेले.”—लूक २:१-३.
रोमी इतिहासकार टॅसिटस आणि यहुदी इतिहासकार जोसिफस हे दोघंही आपल्या लिखाणांमध्ये क्विरीनियचा उल्लेख करतात. याशिवाय, रोमी शासक नावनोंदणी करायचा हुकूम द्यायचे याचा एक पुरावा आजही ब्रिटिश लायब्ररीमध्ये सापडतो. तिथे असलेल्या एका प्राचीन दस्तऐवजात असं म्हटलंय: “जनगणना करायची वेळ आली आहे. त्यामुळे, कोणत्याही कारणामुळे आपल्या मूळ गावाबाहेर राहणाऱ्या सगळ्या लोकांनी नावनोंदणी करण्यासाठी आपल्या मूळ गावी परत येणं आवश्यक आहे.”
अनुकरण करा! अध्या. १८ ¶४-७
तिनं या सर्व गोष्टी आपल्या “अंतःकरणात ठेवल्या”
४ फक्त योसेफ आणि मरीयाच प्रवासाला निघाले होते, असं नाही. कैसर औगुस्त यानं नुकतंच असं फर्मान काढलं होतं, की सबंध साम्राज्यातल्या लोकांची नोंदणी केली जावी. आणि यासाठी प्रत्येकानं आपापल्या जन्मगावी जाऊन नाव नोंदवावं अशी आज्ञा त्यानं दिली. मग, योसेफानं काय केलं? अहवालात असं म्हटलं आहे: “योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालीलातील नासरेथ गावाहून वर यहूदीयातील दाविदाच्या बेथलेहेम गावी गेला.”—लूक २:१-४.
५ नेमक्या याच वेळी कैसरानं असं फर्मान काढलं होतं, हा काही योगायोग नव्हता. कारण, जवळजवळ सातशे वर्षांआधीच लिहून ठेवण्यात आलेल्या एका भविष्यवाणीत, मसीहाचा जन्म बेथलेहेममध्ये होईल असं सांगण्यात आलं होतं. तसं तर, नासरेथपासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावरही बेथलेहेम नावाचं एक गाव होतं. पण, भविष्यवाणीनुसार मसीहाचा जन्म ज्या गावी होईल त्याचं नाव फक्त बेथलेहेम नव्हे, तर “बेथलेहेम एफ्राथा” असेल, असं सांगण्यात आलं होतं. (मीखा ५:२ वाचा.) आणि या विशिष्ट गावी जाण्यासाठी, नासरेथहून शोमरोनाच्या वाटेनं डोंगराळ प्रदेशातून जवळजवळ १३० किलोमीटरचा प्रवास करावा लागायचा. योसेफाला याच बेथलेहेमला जावं लागणार होतं. कारण ते दावीद राजाच्या घराण्याचं मूळ गाव होतं आणि योसेफ आणि त्याची बायको मरीया हे दोघंही दाविदाच्या कुळातले होते.
६ योसेफानं बेथलेहेमला जायचा निर्णय घेतला. पण, मरीयेविषयी काय? तिच्यासाठी हा प्रवास नक्कीच सोपा असणार नव्हता. कदाचित तो ऑक्टोबर महिना असावा. उन्हाळा संपण्याचा काळ. त्यामुळं, पावसाचीही शक्यता होती. शिवाय, बेथलेहेम हे २,५०० फूट उंचावर वसलेलं होतं; त्यामुळं योसेफ “वर यहूदीयातील . . . बेथलेहेम गावी गेला” असं जे अहवालात म्हटलं आहे ते योग्यच आहे. तिथं पोहोचण्यासाठी बऱ्याच दिवसांचा खडतर प्रवास करून आणि बरंच चढण पार करून जावं लागायचं. त्यात मरीया गरोदर असल्यामुळं रस्त्यात त्यांना अनेक ठिकाणी विश्रांतीसाठी थांबणं भाग होतं. त्यामुळं बेथलेहेमला पोहोचायला त्यांना नेहमीपेक्षा जास्त वेळ लागणार होता. बाळंतपण जवळ आलेल्या कोणत्याही स्त्रीला साहजिकच आपल्या घरी, आपल्या माणसांजवळ राहावंसं वाटतं, जेणेकरून प्रसूतीच्या वेदना सुरू होताच ते आवश्यक मदत देऊ शकतील. त्यामुळं, मरीयेनं अशा अवस्थेत बेथलेहेमच्या प्रवासाला निघणं हे खरोखरच धाडसाचं काम होतं.
७ पण तरीसुद्धा लूकच्या अहवालात आपण असं वाचतो, की नाव नोंदवण्यासाठी मरीयाही योसेफासोबत गेली. तसंच, ती योसेफाची “लग्नाची बायको” असल्याचंही अहवालात सांगण्यात आलं आहे. (लूक २:४, ५, पं.र.भा.) योसेफाशी लग्न झाल्यानंतर निर्णय घेण्याच्या बाबतीत मरीयेच्या जीवनात एक मोठा बदल घडून आला. देवाच्या दृष्टीनं योसेफ आपल्या कुटुंबाचा प्रमुख आहे ही गोष्ट तिनं ओळखली. तसंच, त्याच्या निर्णयांना सहकार्य करून त्याची साहाय्यक या नात्यानं आपली भूमिका पार पाडण्यास ती तयार होती. अशा रीतीनं, सोपं किंवा सोयीस्कर नसूनही, आपल्या पतीच्या निर्णयानुसार बेथलेहेमला जाण्याद्वारे मरीयेनं विश्वासाच्या बाबतीत एक उल्लेखनीय उदाहरण मांडलं.
लूक पुस्तकातील ठळक मुद्दे
२:३५—मरीयेच्या जिवातून “तरवार भोसकून जाईल” असे का भाकीत करण्यात आले? येशू मशीहा आहे हे बहुतेक लोक मान्य करणार नाही तेव्हा मरीयेला जे दुःख होईल आणि त्याचा यातनामय मृत्यू पाहून तिला ज्या वेदना होतील त्यांच्या संदर्भात असे भाकीत करण्यात आले होते.—योहा. १९:२५.
तुम्हाला कोणाची स्वीकृती मिळवायची आहे?
१४ मरीयाने येशूचं विश्वासूपणे संगोपन केलं आणि त्याची काळजी घेतली, यासाठी यहोवा मरीयाला स्वीकृती देत राहिला का? हो. मरीयाने जे म्हटलं आणि जी कार्यं केली त्यातल्या काही गोष्टी बायबलमध्ये नमूद केल्या जातील याकडे यहोवाने लक्ष दिलं. असं दिसून येतं की येशूच्या साडेतीन वर्षांच्या सेवाकार्यादरम्यान ती त्याच्यासोबत ठिकठिकाणी प्रवास करू शकली नसावी. विधवा असल्यामुळे तिला कदाचित नासरेथमध्ये राहावं लागलं असेल. यामुळे इतरांसारखं सेवाकार्यातले कितीतरी सुंदर अनुभव तिला अनुभवता आले नाहीत. पण येशूच्या मृत्यूच्या वेळी मात्र ती त्याच्यासोबत होती. (योहा. १९:२६) त्यानंतर, येशूच्या शिष्यांना पेन्टेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा मिळायच्या आधी मरीया शिष्यांसोबत यरुशलेममध्ये होती. (प्रे. कार्ये १:१३, १४) इतर शिष्यांसोबत तीही अभिषिक्त झाली. म्हणजे याचा अर्थ स्वर्गात सर्वकाळासाठी येशूसोबत राहण्याची तिला संधी मिळाली. विश्वासूपणे केलेल्या तिच्या सेवेसाठी खरंच हा किती मोठा आशीर्वाद होता!
टेहळणी बुरूज०९ १/१ ५ ¶५–६ ¶२
आपण मरीयाकडून काय शिकू शकतो?
येशूचा जन्म आणि त्याच्या बालपणाच्या अहवालांशिवाय शुभवर्तमानांच्या पुस्तकांमध्ये मरीयाचा फारसा उल्लेख दिसत नाही. असं असलं, तरी आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की मरीया आणि योसेफला, येशूला सोडून पाच-सहा मुलं होती. हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. पण याबद्दल शुभवर्तमानांच्या पुस्तकांमध्ये काय म्हटलंय ते पाहा.
योसेफला माहीत होतं, की मरीया देवाच्या मुलाला जन्म देणार आहे. त्यामुळे येशूच्या जन्माआधी त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत. मत्तय १:२५ मध्ये सांगितलंय की “तिने मुलाला जन्म देईपर्यंत त्याने तिच्याशी संबंध ठेवले नाहीत.” इथे “देईपर्यंत” या शब्दावरून कळतं, की येशूचा जन्म झाल्यानंतर मात्र योसेफ आणि मरीयाने पती-पत्नीसारखे शारीरिक संबंध ठेवले. यामुळे जसं शुभवर्तमानांच्या पुस्तकांत म्हटलंय तसं योसेफ आणि मरीयाला नंतर आणखी मुलं झाली. याकोब, योसेफ, शिमोन आणि यहूदा अशी त्यांच्या मुलांची नावं होती. ते येशूचे भाऊ होते. तसंच, मरीया आणि योसेफला एकदोन मुलीही झाल्या.—मत्तय १३:५५, ५६.
मरीयाचं देवासोबत एक मजबूत नातं होतं. नियमशास्त्राप्रमाणे स्त्रियांनी वल्हांडणाचा सण साजरा करण्यासाठी यरुशलेमला जायची गरज नव्हती. पण तरी मरीया योसेफसोबत दरवर्षी तिथे हा सण साजरा करायला जायची. (लूक २:४१) यासाठी त्यांना दरवर्षी त्यांच्या लहान मुलांसोबत येऊन-जाऊन जवळपास ३०० किलोमीटरचा प्रवास करावा लागायचा. हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नसला, तरी पूर्ण कुटुंबासाठी तो एक आनंदाचा प्रसंग असायचा.
आज बऱ्याच स्त्रिया मरीयाच्या चांगल्या उदाहरणाचं अनुकरण करतात. एक चांगली आई आणि पत्नी बनण्यासाठी त्या बायबलची तत्त्वं लागू करण्यासाठी खूप मेहनत घेतात. या स्त्रिया खूप मोठ्या प्रमाणात सहनशीलता, धीर आणि नम्रता दाखवतात. मरीयाच्या उदाहरणावर विचार केल्यामुळे त्यांना देवाच्या सेवेला पहिली जागा द्यायला मदत होते. यासाठी त्या स्वतःच्या सुखसोयींचा आणि आरामाचा आनंदाने त्याग करतात. तसंच, त्या आपल्या पती आणि मुलांसोबत मिळून देवाची उपासना करतात. कारण मरीयासारखंच त्यांना माहीत आहे, की असं केल्यामुळे कुटुंबातली नाती मजबूत राहतात आणि एकता टिकून राहते.
अध्याय ४३
त्याने एक अतिशय मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली
वाचकांचे प्रश्न
त्याचप्रमाणे, या दोन्ही अहवालांत येशूच्या वंशावळीबद्दल वेगवेगळ्या याद्या दिल्या आहेत. मत्तयच्या यादीमध्ये, योसेफच्या वंशावळीबद्दल सांगितलं आहे. त्या यादीवरून दिसून येतं, की येशू हा योसेफचा दत्तक पुत्र होता आणि त्याला दावीदच्या राज्यावर कायदेशीर हक्क होता. असं आपण का म्हणू शकतो? कारण, योसेफ हा दावीद राजाचा पुत्र, शलमोन याच्या वंशावळीतला होता. (मत्त. १:६, १६) दुसरीकडे पाहता, लूकच्या अहवालात मरीयाच्या वशांवळीची यादी दिली आहे. आणि ती वशांवळी दाखवून देते, की येशू “शरीराने एक मनुष्य” असल्यामुळे त्याला दावीदच्या राज्यावर स्वाभाविक हक्क होता. (रोम. १:३) कारण, मरीया ही राजा दावीदचा पुत्र, नाथान याच्या वंशातली होती. (लूक ३:३१) मग लूकने दिलेल्या वंशावळीच्या यादीत, मरीया ही एलीची मुलगी आहे अशी माहिती का दिलेली नाही? कारण, सहसा जेव्हा वंशावळीची नोंद केली जायची तेव्हा फक्त कुंटुबातल्या पुरुषांच्या नावांचाच समावेश केला जायचा. त्यामुळे लूकने वंशावळीच्या यादीमध्ये, योसेफचा उल्लेख ‘एलीचा पुत्र’ असा केला तेव्हा त्याचा अर्थ योसेफ एलीचा जावई आहे हे लोकांनी समजून घेतलं.—लूक ३:२३.
येशूच्या मानवी कुटुंबाबद्दल शिकणे
मरीयेने आपल्या मुलाला जन्म दिला नाही तोपर्यंत त्याने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवला नाही. (मत्तय १:२५) या नवविवाहित जोडप्याला लैंगिक संबंध न ठेवणे कठीण गेले असेल, परंतु त्या बाळाचा पिता कोण होता यासंबंधी त्यांना कसलाही गैरसमज नको होता. आत्म-संयमाचे केवढे उत्तम उदाहरण! योसेफाने नैसर्गिक इच्छांपेक्षा आध्यात्मिक मूल्यांना महत्त्व दिले.
अनुकरण करा! अध्या. १९ ¶१५-१८
विश्वासूपणे पालनपोषण करणारा आदर्श कुटुंबप्रमुख
१५ नासरेथमधील त्यांचं जीवन साधं असलं, तरी सोपं मुळीच नव्हतं. योसेफ व्यवसायानं सुतार होता असं बायबल आपल्याला सांगतं. सुतार या नात्यानं, रानात जाऊन लाकडं तोडणं आणि ती ओढून आणणं; तसंच ही लाकडं वाळवून त्यांपैसून घरं, नावा, छोटे पूल, गाड्या, चाकं, जू आणि शेतीची अवजारं बनवणं अशी बरीच कामं योसेफानं केली असतील. (मत्त. १३:५५) ते खरोखर खूप कष्टाचं काम होतं. बायबलच्या काळात, सुतार सहसा आपल्या घरासमोर किंवा घराला लागून असलेल्या खोलीत काम करायचा.
१६ हे काम करत असताना योसेफानं वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं वापरली असतील. त्यांपैकी काही हत्यारं त्याला कदाचित त्याच्या वडिलांकडून मिळाली असतील. काटकोन पाहण्याचं उपकरण, ओळंबा, हातोडी, छिन्नी, करवत, लाकडी हातोडा, तासणी, छिद्र पाडण्याचं हत्यार, वेगवेगळ्या प्रकारचे डिंक आणि काही खिळ्यांचाही त्यानं उपयोग केला असेल. अर्थात, त्या काळी खिळे खूप महाग असायचे.
१७ आपले वडील काम करत असताना चिमुकला येशू किती कौतुकानं त्यांना पाहत असेल! डोळे विस्फारून तो योसेफाची प्रत्येक हालचाल निरखून पाहत असेल. आपल्या वडिलांचे मजबूत खांदे, त्यांचे पिळदार स्नायू, त्यांच्या हातातलं कौशल्य, त्यांचा एकाग्रपणा या सगळ्या गोष्टींचा त्याला खरंच किती अभिमान वाटत असेल! योसेफानं कदाचित लहानग्या येशूला छोटीमोठी कामं शिकवली असतील. जसं की, माशाच्या वाळलेल्या कातडीनं लाकूड गुळगुळीत कसं करावं हे योसेफानं त्याला शिकवलं असेल. तसंच सिकामोर जातीच्या अंजीराचं लाकूड, ओक झाडाचं लाकूड किंवा मग जैतुनाचं लाकूड यांतला फरक कसा ओळखायचा हेसुद्धा योसेफानं त्याला शिकवलं असेल.
१८ अंगमेहनतीचं काम अगदी सहजतेनं करणारे आपले वडील, मनानं किती कोमल आहेत हे येशूच्या लक्षात आल्याशिवाय राहिलं नसेल. आपल्याबद्दल, आपल्या आईबद्दल आणि भावंडांबद्दल त्यांच्या मनात अपार प्रेम आणि आपुलकी आहे हे त्यानं नक्कीच पाहिलं असेल. आतापर्यंत योसेफ आणि मरीया यांचं कुटुंब वाढलं होतं. येशूला सोडून त्यांना कमीतकमी आणखी सहा मुलं झाली होती. (मत्त. १३:५५, ५६) साहजिकच, त्या सगळ्यांचं संगोपन करण्यासाठी योसेफाला खूप कष्ट करावे लागले असतील.
टेहळणी बुरूज१७.०७ १३ ¶८, तळटीप
शोक करणाऱ्यांसोबत शोक करा
८ येशू तरुण असताना त्याचे असे काही जवळचे मित्र किंवा नातेवाईक असतील, ज्यांना त्याने मृत्यूमध्ये गमावलं असेल. उदाहरणार्थ, असं दिसतं की येशू तरुण असतानाच त्याच्या वडिलांचा, योसेफचा मृत्यू झाला असावा. कल्पना करा येशूसारख्या एका प्रेमळ व्यक्तीला स्वतःचं, आपल्या आईचं आणि भाऊ-बहिणींचं दुःख सहन करणं किती कठीण गेलं असेल!
[तळटीप]
बायबलमधून आपल्याला कळतं, की येशू १२ वर्षांचा असताना योसेफ जिवंत होता. पण पुढे जेव्हा येशूने पाण्याचा द्राक्षारस करण्याचा पहिला चमत्कार केला, तेव्हा मात्र योसेफचा कोणताही उल्लेख आढळून येत नाही; किंवा त्यानंतरही नाही. याचा अर्थ, कदाचित या घटनेच्या आधीच योसेफचा मृत्यू झाला असावा. शिवाय, जेव्हा येशू वधस्तंभावर मरणयातना सोसत होता, तेव्हा त्याने योहानला त्याची आई, मरीया हिची काळजी घेण्यास सांगितलं. योसेफ जर जिवंत असता, तर येशूने नक्कीच योहानला तिची काळजी घेण्यास सांगितलं नसतं.—योहा. १९:२६, २७.
तुम्ही “आज्ञाधारक” राहायला तयार असता का?
९ बरेच लोक हे मान्य करतात, की त्यांना सरकारची गरज आहे आणि त्यांनी ‘वरिष्ठ अधिकाऱ्यांनी’ घालून दिलेले काही नियम तरी पाळले पाहिजेत. (रोम. १३:१) पण याच लोकांना जेव्हा काही नियम आवडत नाहीत किंवा त्यांना ते चुकीचे वाटतात, तेव्हा ते हे नियम पाळत नाहीत. आता कर भरण्याच्या बाबतीतच विचार करा. युरोपमधल्या एका देशात बऱ्याच लोकांना असं वाटतं, की सरकार गरजेपेक्षा जास्त कर उकळत असेल तर तो न भरलेलाच बरा. म्हणूनच त्या देशातले नागरिक सरकारला पूर्ण कर देत नाहीत.
१० बायबल सांगतं की मानवी सरकारं सैतानाच्या नियंत्रणात आहेत. त्यांच्यामुळे बऱ्याचदा आपल्याला समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणून लवकरच त्यांचा नाश करण्यात येणार आहे. (स्तो. ११०:५, ६; उप. ८:९; लूक ४:५, ६) पण बायबल असंही सांगतं की “जो अधिकाराचा विरोध करतो तो देवाने घालून दिलेल्या व्यवस्थेचा विरोध करतो.” म्हणून सर्वकाही सुव्यवस्थित राहण्यासाठी यहोवाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्पुरत्या काळासाठी जो अधिकार दिलाय, त्याच्या आपण अधीन असलं पाहिजे. तसंच, आपल्याला त्यांना ‘जे द्यायचं आहे ते दिलं पाहिजे.’ म्हणजेच आपण कर भरला पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्या आज्ञेत राहिलं पाहिजे. (रोम. १३:१-७) कदाचित त्यांनी घालून दिलेला एखादा नियम आपल्या सोयीचा नसेल किंवा आपल्याला तो चुकीचा वाटत असेल, किंवा त्याच्यामुळे आपल्याला आर्थिक फटका बसत असेल. पण जोपर्यंत ते आपल्याला यहोवाच्या आज्ञेविरोधात काही करायला सांगत नाहीत, तोपर्यंत यहोवाच्या सांगण्याप्रमाणे आपण त्यांच्या आज्ञेत राहिलं पाहिजे.—प्रे. कार्यं ५:२९.
११ आपण योसेफ आणि मरीयाच्या उदाहरणातून बरंच काही शिकू शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं, तरीसुद्धा त्यांनी तसं केलं. (लूक २:१-६ वाचा.) मरीया जेव्हा नऊ महिन्यांची गरोदर होती तेव्हा आज्ञाधारक राहण्याच्या बाबतीत त्यांची खूप मोठी परीक्षा झाली. त्या वेळी रोमी सम्राट औगुस्तने जनगणना करण्याचं फर्मान काढलं होतं. त्यासाठी योसेफ आणि मरीयाला डोंगराळ प्रदेशातून १५० कि.मी. प्रवास करून बेथलेहेमला जावं लागणार होतं. हा प्रवास मरीयासाठी खूप कठीण असणार होता. कदाचित त्यांना मरीयाच्या पोटातल्या बाळाची काळजी वाटत असेल. त्यांच्या मनात कदाचित विचार आला असेल, की तिला जर रस्त्यातच प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या तर? कारण तिच्या पोटात देवाने वचन दिलेला मसीहा होता. मग हे कारण देऊन ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज्ञा मोडू शकत होते का?
१२ योसेफ आणि मरीयापुढे बऱ्याच अडचणी होत्या. पण तरीसुद्धा त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज्ञा पाळली. त्यांनी आज्ञा पाळल्यामुळे यहोवाने त्यांना सांभाळलं. मरीया सुरक्षितपणे बेथलेहेमला पोहोचली, तिने एका सुदृढ बाळाला जन्म दिला आणि यामुळे बायबलमधली एक भविष्यवाणी पूर्ण झाली.—मीखा ५:२.
१३ जेव्हा आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहतो तेव्हा आपल्याला आणि इतरांनाही त्याचा फायदा होतो. ते कसं? एक गोष्ट म्हणजे, जे लोक नियम मोडतात त्यांना मिळणारी शिक्षा आपल्याला होत नाही. (रोम. १३:४) आपण जेव्हा स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहतो तेव्हा अधिकाऱ्यांना कळतं, की यहोवाचे साक्षीदार चांगले लोक आहेत. उदाहरणार्थ, काही दशकांआधी नायजेरियामध्ये कर भरावा लागू नये म्हणून लोक दंगली करत होते. अशा लोकांना शोधण्यासाठी काही सैनिक सभा चालू असताना आपल्या राज्य सभागृहात घुसले. पण नंतर त्यांच्या अधिकाऱ्याने त्यांना तिथून जायला सांगितलं. तो म्हणाला: “यहोवाचे साक्षीदार नेहमीच कर भरतात.” यावरून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट कळते, की आपण जेव्हा नियमांचं पालन करतो तेव्हा आपण यहोवाच्या साक्षीदारांचं चांगलं नाव टिकवून ठेवतो. आणि या चांगल्या नावामुळे पुढे भाऊबहिणींचं संरक्षण होऊ शकतं.—मत्त. ५:१६.
१४ असं असलं तरी आपल्याला नेहमीच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहावंसं कदाचित वाटणार नाही. अमेरिकेत राहणारी जोॲना नावाची एक बहीण म्हणते, “वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहणं मला खूप कठीण जायचं, कारण त्यांच्यामुळे माझ्या कुटुंबातल्या काही लोकांना अन्याय सोसावा लागला.” पण हे विचार बदलण्यासाठी जोॲनाने खूप मेहनत घेतली. सगळ्यात आधी तिने सोशल मिडीयावरचे पोस्ट वाचणं बंद केलं. कारण त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल तिच्या मनात नकारात्मक विचार येत होते. (नीति. २०:३) दुसरी गोष्ट म्हणजे, तिने सरकार बदलावं यासाठी नाही, तर यहोवावरचा भरवसा वाढावा अशी प्रार्थना केली. (स्तो. ९:९, १०) तिसरी गोष्ट म्हणजे, निष्पक्षतेबद्दल आपल्या प्रकाशनांत असलेले लेख तिने वाचले. (योहा. १७:१६) जोॲना आता म्हणते, की वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदर केल्यामुळे आणि त्यांच्या आज्ञा पाळल्यामुळे तिला आता “मनाची शांती मिळाली आहे.”
अध्याय ४४
त्याच्यापेक्षा “श्रेष्ठ कोणी नाही”
टेहळणी बुरूज१० ९/१ १५ ¶४-६
तुम्हाला माहीत होतं का?
येशू आणि बाप्तिस्मा देणारा योहान यांचं काय नातं होतं?
▪ काहींचं असं म्हणणं आहे, की या दोघांचे पणजोबा एकच असल्यामुळे ते नात्याने भाऊच होते. त्यांचं हे म्हणणं लूक १:३६ या वचनाच्या चुकीच्या भाषांतरावर आधारित आहे. उदाहणार्थ, किंग जेम्स व्हर्शन या बायबल भाषांतरात असं म्हटलंय, की योहानची आई अलीशिबा आणि येशूची आई मरीया चुलत किंवा मावस बहिणी होत्या.
पण प्रत्यक्षात या वचनात मूळ ग्रीक भाषेत जो शब्द वापरलाय त्यातून त्या दोघींचं नेमकं नातं काय होतं हे कळत नाही. त्यातून फक्त इतकंच कळतं, की त्या नातेवाईक होत्या. पण त्या चुलत किंवा मावस बहिणी होत्या असं नक्की म्हणता येत नाही. बायबलच्या एका शब्दकोशात सांगितल्याप्रमाणे “हा शब्द इतका व्यापक आहे की त्यातून त्यांचं नेमकं नातं सांगता येत नाही.” मग येशू आणि योहान मावस भाऊ होते ही कल्पना कुठून आली? कॅथलिक विश्वकोशात याबद्दल म्हटलंय: ‘मरीयाच्या पालकांबद्दल आमच्याकडे असलेली सगळी माहिती प्रेरित नसलेल्या (ॲपोक्रायफल) साहित्यातून घेतली आहे.’
त्यामुळे, येशू आणि योहान मावस भाऊ असण्याची शक्यता कमी आहे. तरी ते लांबचे नातेवाईक नक्कीच होते.
जागे राहा! लेख १४
बाप्तिस्मा देणारा योहान खरंच होऊन गेला होता का?
शुभवर्तमानाच्या पुस्तकांत, यहूदीयामध्ये देवाच्या राज्याबद्दल प्रचार करणाऱ्या एका माणसाचा, बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचा उल्लेख करण्यात आलाय. बायबलमध्ये त्याच्याबद्दल दिलेली माहिती बरोबर आहे का? पुढे दिलेल्या गोष्टी लक्षात घ्या:
● बायबल म्हणतं: “बाप्तिस्मा देणारा योहान यहूदीयाच्या ओसाड रानात आला आणि अशी घोषणा करू लागला: ‘पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलंय.’” (मत्तय ३:१, २) या गोष्टीचा पुरावा बायबलशिवाय इतर लिखाणांमध्येही सापडतो का? नक्कीच.
पहिल्या शतकातला इतिहासकार फ्लेवियस जोसिफस याने आपल्या लिखाणांत “बाप्तिस्मा देणारा योहान” नावाच्या एका माणसाचा उल्लेख केला आहे. त्याच्याबद्दल त्याने म्हटलं, की तो “यहुद्यांना नीतीने वागायचं, भक्तिभावाने देवाची उपासना करायचं आणि बाप्तिस्मा घ्यायचं प्रोत्साहन देत होता.”—ज्यूईश अँटिक्विटीज, पुस्तक XVIII.
● बायबलमध्ये असं सांगितलंय, की योहानने गालील आणि पेरिया प्रांताचा राज्यपाल हेरोद अंतिपाची कडक शब्दांत चूक दाखवून दिली. कारण हेरोद हा फक्त नावापुरता यहुदी होता. तो नियमशास्त्राचं पालन करायचा फक्त दावा करायचा. पण त्याने आपल्या सावत्र भावाच्या बायकोशी, हेरोदियाशी लग्न केलं होतं. आणि त्यामुळे योहानने त्याची कानउघाडणी केली होती. (मार्क ६:१८) आणि ही माहिती बायबलशिवाय इतर लिखाणांमध्येसुद्धा सापडते.
इतिहासकार जोसिफस याने आपल्या लिखाणांत म्हटलं, की अंतिपा “हेरोदियाच्या प्रेमात [पडला]” आणि “अगदी निर्लज्जपणे त्याने तिला लग्नाची मागणी घातली.” हेरोदियानेसुद्धा आपल्या नवऱ्याला सोडून अंतिपाशी लग्न केलं.
● बायबलमध्ये असं म्हटलंय, की “यरुशलेमचे, तसंच यहूदीया आणि यार्देन नदीच्या आसपासच्या सगळ्या प्रदेशांतले लोक [योहानकडे] येऊ लागले. त्यांनी आपल्या पापांची उघडपणे कबुली देऊन त्याच्याकडून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला.”—मत्तय ३:५, ६.
या माहितीला जोसिफसनेही दुजोरा दिला आहे. त्याने असं लिहिलं, की लोकांचा “मोठा जमाव” योहानला भेटण्यासाठी यायचा आणि “त्याची प्रवचनं ऐकून अक्षरशः भारावून जायचा.”
यावरून स्पष्ट होतं, की पहिल्या शतकातल्या जोसिफसच्या मते बाप्तिस्मा देणारा योहान हा खरंच होऊन गेला होता. त्यामुळे आपणही तेच मानू शकतो.
इन्साइट “आवेश” ¶६०
“आवेश”
याचा सर्वसामान्य अर्थ, एखाद्याला कृती करायला किंवा बोलायला प्रवृत्त करणारी मनोवृत्ती. यहोशवाच्या बाबतीत बायबल म्हणतं: “त्याची मनोवृत्ती इतरांपेक्षा वेगळी” होती. (गण २७:१८) तसंच, दहा हेरांनी आणलेली बातमी ऐकून जेव्हा बहुतेक इस्राएली लोक खचले तेव्हा कालेबने मात्र “इतरांपेक्षा वेगळी मनोवृत्ती दाखवली” असं बायबल म्हणतं. (गण १४:२४) एलीयानेसुद्धा अशाच आवेशी मनोवृत्तीने यहोवाची सेवा केली. तसंच, अलीशानेसुद्धा एलीयानंतर आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी याच मनोवृत्तीचा किंवा आवेशाचा दुप्पट वाटा मागितला. (२रा २:९, १५) पुढे बाप्तिस्मा देणाऱ्या योहाननेसुद्धा एलीयासारखाच आवेश आणि मनोवृत्ती दाखवली. म्हणूनच ऐकणाऱ्यांवर योहानच्या बोलण्याचा जबरदस्त प्रभाव पडला. आणि त्यामुळेच त्याच्याबद्दल असं म्हटलंय, की “तो एलीयाप्रमाणे आवेशाने आणि सामर्थ्याने देवापुढे” चालला.—लूक १:१७, तळटीप.
बायबलमधून प्रश्नांची उत्तरं लेख १७८ ¶४
बाप्तिस्मा देणारा योहान कोण होता?
वारसा: येशूने म्हटलं “स्त्रियांपासून जन्मलेल्यांमध्ये बाप्तिस्मा देणारा योहान याच्यापेक्षा श्रेष्ठ, अजूनपर्यंत कोणी आलेला नाही. पण स्वर्गाच्या राज्यात जो अगदी लहान तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे.” (मत्तय ११:११) योहान फक्त एक संदेष्टा नव्हता, तर आधीच भविष्यवाणी केलेला एक ‘दूतसुद्धा’ होता. त्यामुळे त्याच्याआधी होऊन गेलेल्या कोणत्याही देवाच्या सेवकापेक्षा तो श्रेष्ठ होता असं म्हटलं जाऊ शकतं. येशूच्या शब्दांवरून हेसुद्धा दिसून येतं, की योहान स्वर्गात येशूसोबत राज्य करणार नाही. कारण येशूने स्वर्गाच्या जीवनाचा मार्ग खुला करण्याआधीच या विश्वासू संदेष्ट्याचा मृत्यू झाला होता. (इब्री लोकांना १०:१९, २०) पण असं असलं, तरी योहान हा देवाच्या राज्याच्या पृथ्वीवरच्या प्रजेचा भाग असेल आणि त्याला नंदनवनात सर्वकाळचं जीवन मिळण्याची आशा असेल.—स्तोत्र ३७:२९; लूक २३:४३.
बाप्तिस्मा देणारा योहान—आनंद टिकून ठेवण्याबाबतीत एक चांगलं उदाहरण
तुमच्या मंडळीत असं काही काम आहे का जे तुम्हाला करायची इच्छा आहे, पण सध्या तुम्ही ते करू शकत नाही? कदाचित ते काम किंवा ती जबाबदारी इतर कोणीतरी हाताळत असेल किंवा तुम्ही एके काळी ती नेमणूक हाताळत असाल. पण वय, खालावत चाललेली तब्येत, पैशांची चणचण किंवा कुटुंबाची जबाबदारी यांमुळे कदाचित तुम्हाला आधीसारखी सेवा करता येत नसेल. किंवा संघटनेत होत असलेल्या बदलांमुळे बऱ्याच वर्षांपासून असलेली तुमची नेमणूक तुम्हाला सोडून द्यावी लागली असेल. यांपैकी कोणतंही कारण असो, तुम्हाला वाटत असेल की देवाच्या सेवेत तुम्हाला खूप काही करायची इच्छा आहे पण ते सगळं तुम्हाला आता करता येत नाही. मग अशा परिस्थितीत तुम्ही कधीकधी निराश व्हाल हे समजण्यासारखं आहे. पण असं असलं तरी तुम्ही नकारात्मक भावना जसं की नैराश्य, कटुता किंवा नाराजी यांना आपल्या मनात मूळ धरू देण्यापासून कसं टाळू शकता? तसंच, तुम्ही आपला आनंद कसा टिकवून ठेवू शकता?
बाप्तिस्मा देणारा योहान याच्या उदाहरणावरून आपण आनंद टिकवू ठेवण्याबद्दल महत्त्वपूर्ण धडा शिकू शकतो. योहानला उल्लेखनीय नेमणुकी मिळाल्या तरी त्याच्या जीवनात ज्या गोष्टी घडल्या त्यांची अपेक्षा त्याने कदाचित केली नव्हती. योहानने जवळजवळ एक वर्ष लोकांना येशूबद्दल प्रचार केला. पण त्याला त्यापेक्षा जास्त वेळ तुरुंगात काढावा लागेल असा त्याने विचारही केला नसेल. असं असलं तरी योहानने त्याचा आनंद टिकवून ठेवला आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याने तशीच मनोवृत्ती दाखवली. असं करण्यासाठी त्याला कशामुळे मदत झाली? आपल्याही अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा आपण आपला आनंद कसा टिकवून ठेवू शकतो?
एक आनंददायी नेमणूक
जवळपास इ.स. २९ च्या एप्रिल महिन्यात, योहान मसीहासाठी मार्ग तयार करण्याचं काम करू लागला. त्याने म्हटलं: “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे.” (मत्त. ३:२; लूक १:१२-१७) अनेक लोकांनी त्याला प्रतिसाद दिला. खरंतर, बरेच लोक दूरचा प्रवास करून त्याचा संदेश ऐकण्यासाठी यायचे. त्याचा संदेश ऐकल्यामुळे त्यांनी पश्चात्ताप केला आणि बाप्तिस्मा घेतला. योहानने नीतिमान समजणाऱ्या धार्मिक पुढाऱ्यांनाही ताकीद दिली की त्यांनी स्वतःत बदल केले नाहीत तर त्यांचा न्याय केला जाईल. (मत्त. ३:५-१२) जवळपास इ.स. २९ च्या ऑक्टोबर महिन्यात योहानने त्याच्या सेवाकार्याच्या शेवटी एक महत्त्वाची गोष्ट केली, ती म्हणजे त्याने येशूला बाप्तिस्मा दिला. तेव्हापासून योहानने लोकांना येशूचे, म्हणजेच वचन दिलेल्या मसीहाचे शिष्य बनण्यासाठी सांगितलं.—योहा. १:३२-३७.
योहानची अनोखी भूमिका लक्षात घेता येशूने त्याच्याविषयी म्हटलं: “स्त्रियांपासून जन्मलेल्यांमध्ये बाप्तिस्मा देणारा योहान याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी आलेला नाही.” (मत्त. ११:११) योहानला मिळालेल्या आशीर्वादांबद्दल त्याला नक्कीच आनंद झाला असेल यात काहीच शंका नाही. योहानप्रमाणेच आजही बऱ्याच जणांना देवाकडून भरभरून आशीर्वाद मिळाले आहेत. टेरी नावाच्या बांधवाचं उदाहरण घ्या. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने, सॅन्ड्राने ५० पेक्षा जास्त वर्षं पूर्ण वेळेची सेवा केली आहे. टेरी म्हणतात: “मला बऱ्याचशा नेमणुकी मिळाल्या. मी पायनियर, बेथेल सेवा, खास पायनियर, विभागीय पर्यवेक्षक, प्रांतीय पर्यवेक्षक म्हणून सेवा केली आणि आता मी पुन्हा एक खास पायनियर म्हणून सेवा करत आहे.” आपल्याला यहोवाच्या सेवेत नेमणुकी मिळतात तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो. पण आपली परिस्थिती बदलते तेव्हा तो आनंद टिकवून ठेवण्यासाठी आपण कशी मेहनत घेऊ शकतो, याबद्दल आपण योहानच्या उदाहरणावरून शिकू या.
कदर बाळगत राहा
बाप्तिस्मा देणाऱ्या योहानला मिळालेल्या नेमणुकींमुळे त्याला आपला आनंद टिकवून ठेवता आला. एका उदाहरणाचा विचार करा. येशूच्या बाप्तिस्म्यानंतर योहानचं सेवाकार्य कमी होत गेलं आणि येशूचं सेवाकार्य वाढत गेलं. यामुळे योहानचे शिष्य चिंतित झाले आणि ते त्याच्याकडे जाऊन म्हणाले: “तो बाप्तिस्मा देत आहे आणि सर्व लोक त्याच्याकडे जात आहेत.” (योहा. ३:२६) यावर योहानने त्यांना उत्तर दिलं: “ज्याची वधू असते तोच वर असतो. पण वराचा मित्र उभा राहून त्याचं बोलणं ऐकतो, तेव्हा वराचा आवाज ऐकून त्याला खूप आनंद होतो. त्याच प्रकारे माझा आनंद परिपूर्ण झाला आहे.” (योहा. ३:२९) योहानने आपल्या कामाची तुलना येशू करत असलेल्या कामासोबत केली नाही किंवा येशूचं काम जास्त महत्त्वाचं होतं म्हणून आपल्या कामाची काहीच किंमत नाही, असा त्याने विचार केला नाही. याउलट, योहानने “वराचा मित्र” या त्याच्या भूमिकेला मौल्यवान लेखलं आणि यामुळे त्याला आपला आनंद टिकवून ठेवता आला.
योहानची नेमणूक सोपी नव्हती तरी त्याला आपल्या योग्य मनोवृत्तीमुळे आनंदी राहता आलं. उदाहरणार्थ, योहान हा जन्मापासून नाजीर होता आणि त्यामुळे त्याला द्राक्षारस पिण्याची मनाई होती. (लूक १:१५) योहानच्या साध्या राहणीमानामुळे येशूने त्याच्याबद्दल म्हटलं: “योहान खातपीत आला नाही.” याउलट, येशू आणि त्याच्या शिष्यांवर कोणतंच बंधन नव्हतं आणि ते इतर लोकांसारखं सर्वसामान्य जीवन जगायचे. (मत्त. ११:१८, १९) योहानने चमत्कारही केले नाहीत. पण त्याला माहीत होतं की येशूच्या शिष्यांना, ज्यांपैकी काही आधी त्याचे शिष्य होते त्यांना चमत्कार करण्याची शक्ती देण्यात आली होती. (मत्त. १०:१; योहा. १०:४१) आपल्या आणि येशूच्या शिष्यांमध्ये बऱ्याचशा गोष्टी खूप वेगळ्या आहेत यावर विचार करण्यापेक्षा योहान आपल्या नेमणुकीत व्यस्त राहिला.
आपण जर यहोवाच्या सेवेत सध्या मिळालेल्या नेमणुकीची कदर बाळगली तर आपल्यालाही आपला आनंद टिकवून ठेवता येऊ शकतो. आधी उल्लेख केलेले टेरी म्हणतात: “मला मिळालेल्या प्रत्येक नेमणुकीवर मी त्या-त्या वेळी पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं.” आपल्या जीवनातल्या पूर्ण वेळेच्या सेवेबद्दल ते म्हणतात: “त्यांबद्दल माझ्या मनात खूप सुंदर आठवणी आहेत आणि मला जरादेखील पस्तावा होत नाही.”
यहोवाच्या सेवेत मिळालेली प्रत्येक नेमणूक किंवा जबाबदारी खरंतर कोणत्या गोष्टीमुळे मौल्यवान ठरते याबद्दल विचार केल्याने आपण आणखी आनंदी होऊ शकतो. आणि ती गोष्ट म्हणजे, आपल्याला “देवाचे सहकारी” असण्याचा मिळालेला बहुमान! (१ करिंथ. ३:९) वाडवडिलांकडून मिळालेल्या एखाद्या मौल्यवान वस्तूला पॉलीश केल्यामुळे जशी तिची चमक टिकून राहते, तसंच देवाची सेवा करण्याच्या बहुमानावर मनन केल्यामुळे आपला आनंद टिकून राहील. आपण केलेल्या त्यागांची तुलना आपण इतरांनी केलेल्या त्यागांशी करणार नाही. आपल्याला यहोवाच्या सेवेत जे काम मिळालं आहे ते इतरांना मिळालेल्या कामापेक्षा कमी मोलाचं आहे, असा आपण कधीच विचार करणार नाही.—गलती. ६:४.
यहोवासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा
आपल्याला जास्त काळासाठी सेवा करता येणार नाही हे योहानला कदाचित माहीत होतं, पण आपल्या सेवेचा अचानक असा शेवट होईल असा त्याने विचारही केला नसेल. (योहा. ३:३०) येशूला बाप्तिस्मा दिल्याच्या सहा महिन्यांनी म्हणजे इ.स. ३० मध्ये हेरोद राजाने योहानला तुरुंगात टाकलं. असं असलं तरी योहान योग्य तेच सांगत राहिला. (मार्क ६:१७-२०) या बदलत्या परिस्थितींत त्याला आपला आनंद टिकवून ठेवायला कशामुळे मदत होणार होती? त्याने यहोवासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित केलं.
योहान तुरुंगात असताना त्याच्या शिष्यांनी त्याला येशूच्या वाढत्या सेवाकार्याबद्दल सांगितलं. (मत्त. ११:२; लूक ७:१८) येशू हाच मसीहा आहे याची योहानला पक्की खातरी होती. पण मसीहाबद्दल शास्त्रवचनांत सांगितलेल्या सर्व भविष्यवाण्या तो कशा पूर्ण करेल, याबद्दल त्याला कदाचित शंका वाटत होती. मसीहा राजा बनणार असं शास्त्रवचनांत सांगितलं होतं, मग ‘येशू लगेच राज्य करायला सुरुवात करेल का? आणि यामुळे आपली तुरुंगातून सुटका होईल का?’ असे प्रश्नं त्याच्या मनात आले असावेत. येशू पुढे काय करणार याबद्दल योहानला आणखी माहिती हवी होती, म्हणून त्याने आपल्या दोन शिष्यांना येशूकडे असं विचारायला पाठवलं: “जो येणार होता तो तूच आहेस का, की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?” (लूक ७:१९) मग येशूने त्यांना योहानला असा संदेश द्यायला सांगितलं: “आंधळे आपल्या डोळ्यांनी पाहत आहेत, लंगडे चालत आहेत, कुष्ठरोगी शुद्ध केले जात आहेत, बहिऱ्यांना ऐकू येत आहे, मेलेल्यांना जिवंत केलं जात आहे आणि गोरगरिबांना आनंदाचा संदेश सांगितला जात आहे.” (लूक ७:२०-२२) शिष्य योहानकडे परत आले आणि त्यांनी त्याला येशूने केलेल्या चमत्कारांबद्दल सांगितलं, तेव्हा योहानने नक्कीच खूप उत्सुकतेने त्यांचं ऐकलं असेल.
योहानच्या शिष्यांनी त्याला जे काही सांगितलं त्यामुळे त्याला नक्कीच प्रोत्साहन मिळालं असेल. यामुळे त्याला खातरी पटली की मसीहाबद्दल असलेल्या भविष्यवाण्या येशू पूर्ण करत आहे. येशू मसीहा म्हणून प्रकट झाल्यामुळे योहानची सुटका झाली नाही. असं असलं तरी आपली सेवा व्यर्थ ठरली आहे, असा योहानने विचार केला नाही. कठीण परिस्थितीतही तो आनंदी राहिला.
योहानसारखं आपणही आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं तर आपण आनंदाने आणि धीराने यहोवाची सेवा करत राहू शकतो. (कलस्सै. १:९-११) हे आपण बायबलचं वाचन आणि त्यावर मनन करण्याद्वारे करू शकतो. यामुळे आपल्याला नेहमी आठवण होत राहील की यहोवाच्या सेवेत आपण करत असलेलं काम कधीच व्यर्थ ठरणार नाही. (१ करिंथ. १५:५८) सॅन्ड्रा म्हणतात: “दररोज बायबलमधला एक अध्याय वाचल्याने मला यहोवासोबत एक घनिष्ठ नातं जोडायला मदत झाली आहे. यामुळे मला स्वतःवर नाही तर यहोवावर लक्ष केंद्रित करायला मदत झाली आहे.” आपण जगभरात चाललेल्या राज्याच्या कामांसंबंधित अहवालांवरही लक्ष केंद्रित करू शकतो. असं केल्यामुळे आपण फक्त स्वतःचाच नाही तर यहोवा साध्य करत असलेल्या गोष्टींचाही विचार करू. सॅन्ड्रा पुढे म्हणतात: “JW ब्रॉडकास्टिंगवर दाखवल्या जाणाऱ्या दर महिन्याच्या कार्यक्रमांमुळे मला संघटनेच्या जवळ असल्यासारखं वाटतं आणि यामुळे मला आपली नेमणूक आनंदाने करत राहायला मदत होते.”
बाप्तिस्मा देणाऱ्या योहानने थोड्या कालावधीसाठी असलेलं आपलं सेवाकार्य हे एलीयासारखा आवेश व सामर्थ्य दाखवून पूर्ण केलं आणि तोही एलीयाप्रमाणे “आपल्यासारख्याच भावना असलेला मनुष्य होता.” (लूक १:१७; याको. ५:१७) आपण कदर बाळगण्याच्या बाबतीत आणि यहोवाच्या सेवेवर लक्ष केंद्रित करण्याच्या बाबतीत योहानचं अनुकरण केलं, तर परिस्थिती कशीही असली तरी सेवाकार्यातला आपला आनंद आपण टिकवून ठेवू शकू.
अध्याय ४५
“मी पापी माणूस आहे”
इन्साइट “शिकार करणं आणि मासेमारी” ¶६-७
शिकार करणं आणि मासेमारी
मासेमारी: यहुदी लोकांमध्ये मासेमारी करणं हा एक व्यवसाय होता. तो फक्त एक छंद म्हणून केला जात असल्याचा कोणताही उल्लेख नाही. मासे धरण्यासाठी कोळी सहसा जाळी, बरच्या, भाले, तसंच गळ आणि दोरी वापरायचे. (ईयो ४१:१, ७; यहे २६:५, १४; हब १:१५, १७; मत्त १७:२७) मासेमारी सहसा रात्रीच्या वेळी केली जायची. नावांमधून जाळी पाण्यात टाकली जायची. मग एकतर जाळी ओढून समुद्रकिनाऱ्याला आणली जायची किंवा जाळी नावेत मोकळी केली जायची. त्यानंतर मासे वेचले जायचे. नियमशास्त्रानुसार खायला योग्य असलेले मासे वेगळे ठेवले जायचे आणि योग्य नसलेले फेकून दिले जायचे. (मत्त १३:४७, ४८; लूक ५:५-७; योह २१:६, ८, ११) मासेमारी काही वेळा कोळी नावेतून मोठी जाळी टाकण्याऐवजी स्वतः पाण्यात उतरून किंवा किनाऱ्याला उभं राहून छोटी जाळी टाकायचे.
मासेमारी खूप मेहनीचं काम होतं. खासकरून माश्यांनी भरलेली जाळी ओढताना किंवा वारा विरुद्ध दिशेने वाहत असताना कोळ्यांना नाव चालवण्यासाठी खूप कष्ट करावे लागायचे. (योह २१:६, ११; मार्क ६:४७, ४८) काही वेळा रात्रभर मासेमारी करूनसुद्धा हाती काहीच लागायचं नाही. (लूक ५:५; योह २१:३) शिवाय, मासेमारी केल्यावर कोळ्यांना जाळी सुकवावी लागायची आणि दुरुस्त करावी लागायची.—यहे ४७:१०; मत्त ४:२१.
यहोवाला खडक का म्हटलंय ते आपण पाहिलं. आता आपण त्याला ज्या गुणांमुळे खडक म्हटलंय त्या गुणांचं अनुकरण कसं करू शकतो ते पाहू या. आपण हे जितकं चांगल्या प्रकारे करू, तितकंच मंडळीला आणखी भक्कम करण्यासाठी आपण तयार असू. उदाहरणार्थ, येशूने शिमोनला केफा (ग्रीकमध्ये “पेत्र”) नाव दिलं. याचा अर्थ “खडकाचा तुकडा” असा होतो. (योहा. १:४२) यावरून हे सूचित होणार होतं, की तो पुढे मंडळीतल्या भाऊबहिणींना सांत्वन देऊन त्यांचा विश्वास भक्कम करणार होता. मंडळीतल्या वडिलांचं वर्णनसुद्धा “मोठ्या खडकाची सावली” असं करण्यात आलंय. यावरून ते भाऊबहिणींना कसं संरक्षण देतात हे स्पष्ट होतं. (यश. ३२:२) साहजिकच जेव्हा भाऊबहीण यहोवाच्या गुणांचं अनुकरण करतात, तेव्हा मंडळीला नक्कीच फायदा होतो.—इफिस. ५:१.
“जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा”
३ लोकांनी आपल्याकडे यावं आणि मग आपण त्यांना प्रचार करावा, असं येशूला आपल्या शिष्यांना सांगायचं होतं का? मुळीच नाही. कारण, पुनरुत्थान झाल्यानंतर त्यानं आपल्या शेकडो शिष्यांना सांगितलं: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस . . . बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” (मत्त. २८:१९, २०) म्हणून येशूचे अनुयायी या नात्यानं, आपण चार गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण शिष्य बनवले पाहिजेत, त्यांना बाप्तिस्मा दिला पाहिजे आणि त्यांना शिकवलं पाहिजे. पण, सर्वात आधी आपण काय केलं पाहिजे असं येशूनं म्हटलं? त्यानं म्हटलं की “तुम्ही जाऊन” सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा. यावरून कळतं की सर्वात आधी आपण लोकांकडे गेलं पाहिजे. एका बायबल तज्ञानं म्हटलं की, “इतरांपर्यंत ‘जाणं’ ही प्रत्येक सेवकाची जबाबदारी आहे, मग ते जवळच्या ठिकाणी जाणं असो किंवा सातासमुद्रापलीकडे जाणं असो.”—मत्त. १०:७; लूक १०:३.
४ येशूची आपल्या शिष्यांकडून काय अपेक्षा होती? प्रत्येकानं व्यक्तिगत रीत्या प्रचार करावा अशी त्याची इच्छा होती, की एक गट या नात्यानं संघटित होऊन त्यांनी प्रचार करावा अशी त्याची इच्छा होती? केवळ एका व्यक्तीनं “सर्व राष्ट्रांतील” लोकांपर्यंत जाऊन प्रचार करणं अशक्य असल्यामुळे, येशूच्या शिष्यांनी एक गट या नात्यानं संघटितपणे प्रचार करावा अशी त्याची इच्छा होती. आणि येशूनं जेव्हा त्याच्या शिष्यांना “माणसे धरणारे” होण्यासाठी बोलावलं तेव्हा त्याला हीच गोष्ट सांगायची होती. (मत्तय ४:१८-२२ वाचा.) या ठिकाणी येशूला असं म्हणायचं नव्हतं, की केवळ एका व्यक्तीनं गळ वापरून मासा गळाला लागण्याची वाट पाहत बसावी. तर, जाळ्याचा वापर करून मासे पकडण्याबद्दल येशू बोलत होता. अशा प्रकारे करण्यात येणाऱ्या मासेमारीत पुष्कळ श्रम घेण्याची गरज पडते. शिवाय, यासाठी अनेक लोकांना एकत्र मिळून संघटित रीत्या काम करावं लागतं.—लूक ५:१-११.
आपल्या शिष्यांना नाश्ता दिल्यावर येशूने शिमोन पेत्रकडे वळून त्याला विचारलं: “योहानच्या मुला शिमोन, तू यांच्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतोस का?” पेत्रला त्याचा मासेमारीचा व्यवसाय किती आवडायचा हे येशूला माहीत होतं. पण इथं येशू कदाचित हे विचारात असावा, की पेत्रचं मासेमारीच्या व्यवसायापेक्षा त्याच्यावर आणि त्याने शिकवलेल्या गोष्टींवर जास्त प्रेम आहे का. पेत्र येशूला म्हणाला: “प्रभू, माझं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला माहीत आहे.” (योहा. २१:१५) त्या दिवसापासून, पेत्र आयुष्यभर आपल्या या शब्दांना जागला. स्वतःला प्रचाराच्या कार्यात झोकून देऊन त्याने ख्रिस्तावरील आपलं प्रेम दाखवून दिलं; आणि तो ख्रिस्ती मंडळीचा एक जबाबदार सदस्यही बनला.
अनुकरण करा! अध्या. २२
परीक्षाप्रसंगांतही त्यानं एकनिष्ठा सोडली नाही
अध्याय बावीस
कफर्णहूमातील सभास्थानातलं दृश्य. येशूचं बोलणं ऐकणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यांकडे पेत्र मोठ्या उत्सुकतेनं पाहत होता. कफर्णहूम हे खरंतर पेत्राचंच गाव. तिथंच, म्हणजे गालील समुद्राच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर त्याचा मासेमारीचा व्यवसाय होता; पेत्राचे बरेच मित्र, नातेवाईक आणि त्याच्या व्यवसायातील ओळखीचे लोक इथंच राहत होते. आपल्याप्रमाणेच आपल्या गावातले लोकसुद्धा, येशू हाच मसीहा असल्याचं ओळखतील आणि या सर्वात महान शिक्षकाकडून देवाच्या राज्याबद्दल शिकण्यास उत्सुक असतील, असं पेत्राला नक्कीच वाटत असेल. पण, तसं काही घडण्याची चिन्ह दिसत नव्हती.
२ काही वेळापूर्वी मोठ्या उत्सुकतेनं ऐकणारे बरेच लोक आता येशूच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हते. त्याचं बोलणं न पटल्यामुळं काही जण उघडपणे आपली नापसंती व्यक्त करत होते. पण, ज्या गोष्टीचं पेत्राला सगळ्यात जास्त वाईट वाटलं ती म्हणजे खुद्द येशूच्या शिष्यांची प्रतिक्रिया. नवीन सत्ये शिकून घेतल्याचा आनंद, रोमांच किंवा उत्सुकता आता त्यांच्या चेहऱ्यांवर दिसत नव्हती. उलट, ते नाराज झाले होते, त्यांना रागसुद्धा आला होता. काहींनी तर येशूचं बोलणं अतिशय धक्कादायक आहे असं म्हटलं. आणखी काहीच ऐकायची त्यांची तयारी नव्हती. त्यामुळे ते सभास्थानातून बाहेर पडले आणि त्याचं अनुसरण करण्याचं त्यांनी सोडून दिलं.—योहान ६:६०, ६६ वाचा.
३ तो प्रसंग, पेत्रासाठी आणि इतर प्रेषितांसाठी अतिशय कठीण होता. त्या दिवशी येशू जे काही बोलला ते पेत्राला पूर्णपणे समजलं नव्हतं. त्याच्या बोलण्याचा शब्दशः अर्थ घेतल्यास ते नक्कीच धक्कादायक वाटू शकतं याची त्याला जाणीव होती. मग, पेत्राची काय प्रतिक्रिया होती? अर्थात, येशूप्रती असलेल्या पेत्राच्या एकनिष्ठेची ही काही पहिलीच परीक्षा नव्हती आणि ती शेवटचीही असणार नव्हती. पण, अशा परीक्षाप्रसंगांतही पेत्राच्या विश्वासानं त्याला एकनिष्ठ राहण्यास कशी मदत केली ते आता आपण पाहू या.
इतर जण सोडून गेले, पण पेत्र एकनिष्ठ राहिला
४ येशू जे काही बोलायचा, जे काही करायचा त्यामुळे पेत्र अनेकदा चकित व्हायचा. काही वेळा, येशूचं वागणं-बोलणं लोकांच्या अपेक्षेच्या अगदी उलट असायचं. उदाहरणार्थ, आदल्याच दिवशी येशूनं चमत्कार करून हजारो लोकांना जेवू घातलं होतं. त्यामुळं, त्यांनी त्याला आपला राजा बनवण्याचा प्रयत्न केला. पण, त्या प्रसंगी येशूनं जे केलं ते पाहून अनेक जण चकित झाले. तो तिथून निघून गेला आणि त्यानं शिष्यांना नावेत बसून कफर्णहूमाच्या दिशेनं जायला सांगितलं. रात्रीच्या वेळी, शिष्य समुद्रातून प्रवास करत असताना पुन्हा एकदा येशूनं असं काहीतरी केलं जे अगदीच अनपेक्षित होतं. तो चक्क त्या खवळलेल्या गालील समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. त्या प्रसंगी, त्यानं पेत्राला विश्वासाच्या बाबतीत एक अतिशय महत्त्वाचा धडा दिला.
५ दिवस उजाडला तेव्हा शिष्यांच्या लक्षात आलं की लोक येशूला शोधत नावांमधून कफर्णहूमापर्यंत आले होते. अर्थात, ते येशूकडून शिकण्यासाठी नव्हे, तर त्यानं चमत्कार करून आपल्याला जेवू घालावं म्हणून त्याच्या मागेमागे आले होते. फक्त शारीरिक गोष्टींची चिंता करण्याच्या त्यांच्या या मनोवृत्तीबद्दल येशूनं त्यांना खडसावलं. (योहा. ६:२५-२७) पुढं याच विषयावर तो कफर्णहूमातील सभास्थानात बोलला. त्या वेळी, लोकांना एक अतिशय महत्त्वाचं, पण समजायला कठीण असलेलं सत्य शिकवताना तो जे काही बोलला ते अगदीच अनपेक्षित होतं.
६ लोकांनी आपल्याकडे केवळ एक अन्नदाता म्हणून पाहावं अशी येशूची इच्छा नव्हती. तर, त्यांना सार्वकालिक जीवन मिळवून देण्यासाठी देवानं त्याला पाठवलं होतं हे त्यांनी ओळखावं अशी त्याची इच्छा होती. त्यामुळं त्यानं स्वतःची तुलना मोशेच्या काळात स्वर्गातून उतरलेल्या भाकरीशी, अर्थात मान्ना याच्याशी केली. यावर काहींनी आक्षेप घेतला, तेव्हा येशूनं त्यांना स्पष्ट शब्दांत एक उदाहरण देऊन ही गोष्ट समजावून सांगितली. त्यानं म्हटलं, की सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी त्याचा देह खाणे आणि त्याचं रक्त पिणे आवश्यक आहे. येशूनं असं म्हटलं तेव्हा लोक आणखीनच संतापले. काही जण म्हणाले: “हे वचन कठीण [“धक्कादायक,” NW] आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो?” अगदी येशूच्या शिष्यांपैकीसुद्धा काहींनी त्याला सोडून देण्याचं ठरवलं.—योहा. ६:४८-६०, ६६.
७ पण, पेत्राबद्दल काय? त्यानं काय केलं? अर्थात, येशूचं बोलणं ऐकून तोही गोंधळून गेला असेल. देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी येशूचा मृत्यू होणं आवश्यक आहे ही गोष्ट त्याला अद्याप समजली नव्हती. पण यामुळं, येशूला सोडून जाणाऱ्या चंचल मनाच्या शिष्यांप्रमाणे तोही त्या दिवशी येशूला सोडून गेला का? नाही. कारण त्याच्यामध्ये असा एक गुण होता ज्यामुळं तो इतरांपेक्षा वेगळा ठरला. तो कोणता गुण होता?
८ येशू आपल्या प्रेषितांकडे वळून म्हणाला: “तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय?” (योहा. ६:६७) येशूनं खरंतर हा प्रश्न १२ जणांना विचारला होता, पण उत्तर मात्र पेत्रानं दिलं. आणि सहसा असंच व्हायचं. कदाचित पेत्र त्या सर्वांमध्ये सगळ्यात मोठा असल्यामुळे सहसा तोच बोलण्यात पुढाकार घेत असावा. आपले विचार स्पष्टपणे व्यक्त करण्याचा त्याचा स्वभावच होता. मनात त्याला जे काही वाटायचं ते तो अगदी मनमोकळेपणे बोलून टाकायचा. आणि या वेळी, त्यानं एक अतिशय सुरेख आणि लक्षात राहील असं विधान केलं. तो म्हणाला: “प्रभुजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.”—योहा. ६:६८.
९ पेत्राचे ते शब्द तुमच्या मनाला भिडत नाहीत का? येशूवर असलेल्या विश्वासामुळे पेत्रानं एक अतिशय मौल्यवान गुण विकसित केला होता. तो म्हणजे एकनिष्ठा. येशू हाच यहोवानं नेमलेला तारणकर्ता आहे आणि त्याच्या शिकवणींवर विश्वास ठेवल्यानेच तारण मिळणं शक्य आहे हे पेत्रानं अचूक ओळखलं होतं. त्यामुळं, काही गोष्टी समजायला अवघड असल्या, तरी येशूला सोडून आणखी कोणत्याही मार्गानं देवाची कृपा आणि सार्वकालिक जीवन मिळवणं शक्य नाही हे पेत्राला माहीत होतं.
१० तुम्हालाही असंच वाटतं का? दुःखाची गोष्ट म्हणजे आज अनेक जण येशूवर आपलं प्रेम असल्याचा दावा करतात, पण त्याला एकनिष्ठ राहण्यात मात्र ते कमी पडतात. खऱ्या अर्थानं ख्रिस्ताला एकनिष्ठ राहण्यासाठी त्याच्या शिकवणींबद्दल पेत्राचा जसा दृष्टिकोन होता तसाच आपलाही असला पाहिजे. त्याच्या शिकवणी आपण शिकून घेतल्या पाहिजेत, त्यांचा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि त्यांनुसार जीवन जगलं पाहिजे; मग, त्या शिकवणी आपल्याला समजल्या नाहीत किंवा त्या आपल्या अपेक्षेप्रमाणे नसल्या तरीही. एकनिष्ठ राहिल्यानेच आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त करता येईल. आपल्याला हे जीवन मिळावं हीच येशूची इच्छा आहे.—स्तोत्र ९७:१० वाचा.
चूक दाखवण्यात आली तेव्हाही एकनिष्ठ
११ कफर्णहूमातील त्या घटनांनतर येशू आपल्या प्रेषितांना आणि काही शिष्यांना घेऊन उत्तरेकडे एका लांबच्या प्रवासाला निघाला. प्रतिज्ञात देशाच्या अगदी उत्तरेकडे बर्फानं झाकलेला हर्मोन पर्वत होता; काही वेळा, निळ्याशार पाण्याच्या गालील समुद्राजवळून या पर्वताचं शिखर दिसायचं. जसजसे येशू आणि त्याचे अनुयायी फिलिप्पाच्या कैसरीयाकडील गावांजवळ येऊ लागले तसतसा तो पर्वत आणखीनच उंच वाटू लागला. दक्षिणेकडे असलेल्या प्रतिज्ञात देशाचा बराचसा भाग इथून दिसायचा. अशा या नयनरम्य परिसरात आल्यावर येशूनं आपल्या अनुयायांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला.
१२ येशूनं त्यांना विचारलं: “लोक मला कोण म्हणून म्हणतात?” त्याच्या उत्सुक डोळ्यांकडे पाहणाऱ्या पेत्राची तुम्ही कल्पना करू शकता का? येशूच्या या प्रश्नावरून पेत्राला त्याचा दयाळूपणा आणि बुद्धिमत्ता याची जाणीव झाल्याशिवाय राहिली नसेल. आपण केलेल्या अद्भुत गोष्टी पाहून व ऐकून लोकांना आपल्याबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्यास येशू उत्सुक होता. शिष्यांनी येशूच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्यांनी लोकांच्या मनात त्याच्याबद्दल किती गैरसमज आहेत हे त्याला सांगितलं. पण, येशूचं समाधान झालं नाही. इतर लोकांप्रमाणेच आपल्या शिष्यांच्याही मनात गैरसमज आहेत का हे त्याला जाणून घ्यायचं होतं. त्यामुळं येशूने त्यांना विचारलं: “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?”—लूक ९:१८-२०.
१३ या वेळीसुद्धा पेत्रानंच उत्तर दिलं. तिथं उपस्थित असलेल्या अनेकांना येशूबद्दल जे काही वाटत होतं ते पेत्रानं अगदी स्पष्टपणे आणि धैर्याने बोलून दाखवलं. त्यानं म्हटलं: “आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा.” ते ऐकून येशूला किती आनंद झाला असेल! त्यानं पेत्राची प्रशंसा केली आणि त्याला याची आठवण करून दिली, की हे महत्त्वाचं सत्य कोणा मानवानं नव्हे, तर खुद्द यहोवा देवानं प्रकट केलं होतं. खरंच, यहोवानं मानवांना प्रकट केलेलं सगळ्यात महत्त्वाचं सत्य, अर्थात भाकीत केलेला मसीहा किंवा ख्रिस्त कोण आहे, हे पेत्रानं ओळखलं होतं.—मत्तय १६:१६, १७ वाचा.
१४ पेत्रानं नुकतंच ख्रिस्त म्हणून ज्याला ओळखलं होतं त्याला प्राचीन भविष्यवाण्यांमध्ये “बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड,” असं म्हणण्यात आलं होतं. (स्तो. ११८:२२; लूक २०:१७) याच भविष्यवाण्यांचा संदर्भ घेऊन येशूनं म्हटलं, की या दगडावर किंवा खडकावर यहोवा एका मंडळीची स्थापना करेल. मग, त्यानं पेत्राला या मंडळीत काही महत्त्वाचे विशेषाधिकार दिले. पण, काहींना वाटतं त्याप्रमाणे येशूनं पेत्राला इतर प्रेषितांपेक्षा श्रेष्ठ पद दिलं नाही; तर त्याच्यावर जबाबदाऱ्या सोपवल्या. त्यानं त्याला “राज्याच्या किल्ल्या” दिल्या. (मत्त. १६:१८, १९) या किल्ल्यांचा उपयोग करून मानवजातीच्या तीन वेगवेगळ्या गटांना देवाच्या राज्यात प्रवेश करण्याची आशा देण्याचा सुहक्क पेत्राला मिळाला होता. सगळ्यात आधी यहुद्यांसाठी, त्यानंतर शोमरोन्यांसाठी आणि शेवटी यहूदी नसलेल्या विदेश्यांसाठी तो या किल्ल्यांचा उपयोग करणार होता.
१५ पण, येशूनं पुढं असंही म्हटलं, की ज्यांना जास्त दिलं जातं त्यांच्याकडून जास्त अपेक्षा केली जाईल. हे किती खरं आहे हे पेत्राच्या उदाहरणावरून दिसून येतं. (लूक १२:४८) मसीहाबद्दल आणखी बरीच महत्त्वाची सत्ये येशू पुढंही प्रकट करत राहिला. जेरूसलेममध्ये कशा प्रकारे त्याचा छळ केला जाईल आणि त्याचा कशा प्रकारे मृत्यू होईल याबद्दलही येशूनं सांगितलं. हे ऐकून पेत्र अतिशय दुःखी झाला. तो येशूला बाजूला घेऊन म्हणाला: “प्रभुजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही.”—मत्त. १६:२१, २२.
१६ पेत्राचे हेतू नक्कीच चांगले होते. त्यामुळे येशूनं त्याला जे उत्तर दिलं ते ऐकून तो चकित झाला असेल. पेत्राकडे पाठ फिरवून येशूनं इतर शिष्यांकडे पाहिलं; कारण तेसुद्धा कदाचित पेत्रासारखाच विचार करत असावेत. मग, येशू म्हणाला: “अरे सैताना, माझ्यामागे हो; तू मला अडखळण आहेस, कारण तू देवाच्या गोष्टींकडे लक्ष लावत नाहीस तर माणसांच्या गोष्टींकडे लक्ष लावतोस.” (मत्त. १६:२३; मार्क ८:३२, ३३, पं.र.भा.) येशूच्या या शब्दांतून आपल्या सगळ्यांनाच पुष्कळ काही शिकण्यासारखं आहे. एखाद्या गोष्टीकडे देवाच्या दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी मानवी दृष्टिकोनातून पाहण्याचा आपला कल असू शकतो. पण, तसं जर आपण केलं, तर नकळतपणे आपण देवाला नव्हे, तर सैतानाला संतुष्ट करणाऱ्या गोष्टी करण्यास एखाद्याला प्रवृत्त करत असू; मग आपले हेतू कितीही चांगले असले तरीही. पण, येशूनं पेत्राला जे म्हटलं त्यावर त्याची काय प्रतिक्रिया होती?
१७ पेत्राच्या हे नक्कीच लक्षात आलं असेल, की येशू त्याला खरोखर सैतान म्हणत नव्हता. कारण येशूनं सैतानासाठी जे शब्द वापरले होते ते त्यानं पेत्राशी बोलताना वापरले नाहीत. मूळ भाषेतील वृत्तान्तानुसार, सैतानाशी बोलताना येशूनं म्हटलं होतं: “अरे सैताना, चालता हो.” पण पेत्राला मात्र, “अरे सैताना, माझ्यामागे हो,” असं त्यानं म्हटलं. (मत्त. ४:१०) पेत्रामध्ये बरेच चांगले गुण आहेत हे येशूनं ओळखलं होतं आणि म्हणूनच त्यानं त्याला कायमचं नाकारलं नाही. याउलट, त्यानं केवळ या बाबतीत असलेली पेत्राची चुकीची विचारसरणी सुधारली. पेत्रानं आपल्या मार्गात अडखळण बनण्याऐवजी ‘आपल्यामागे’ उभं राहून आपल्याला पाठिंबा द्यावा अशी येशूची इच्छा होती.
१८ मग, पेत्रानं येशूशी वाद घातला का? येशूचं बोलणं त्यानं मनाला लावून घेतलं का, किंवा तो नाराज झाला का? नाही. उलट, त्यानं नम्रपणे आपली चूक मान्य केली. असं करण्याद्वारे त्यानं पुन्हा एकदा एकनिष्ठेचा गुण दाखवला. येशूचं अनुसरण करणाऱ्या सर्वांनाच कधी ना कधी सुधारणुकीची गरज असते. आपल्याला ताडन दिलं जातं तेव्हा आपण नम्रपणे ते स्वीकारलं आणि स्वतःमध्ये सुधारणा केली तरच आपण येशू ख्रिस्त आणि आपला पिता, यहोवा देव यांच्यासोबतचा आपला नातेसंबंध टिकवून ठेवू शकतो.—नीतिसूत्रे ४:१३ वाचा.
एकनिष्ठ राहिल्यामुळे मिळालेले आशीर्वाद
१९ याच्या काही काळानंतरच येशूनं आणखी एक धक्कादायक विधान केलं. त्यानं म्हटलं: “मी तुम्हास खचित सांगतो, येथे उभे असलेल्यांमध्ये काही असे आहेत की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.” (मत्त. १६:२८) येशूचे हे शब्द ऐकून पेत्राची उत्सुकता नक्कीच वाढली असेल. येशूला नेमकं काय म्हणायचं आहे? त्यानं नुकतीच आपली कानउघाडणी केली, त्यामुळं आता आपल्याला कोणतेच खास विशेषाधिकार मिळणार नाहीत, असा कदाचित त्यानं विचार केला असेल.
२० पण, जवळजवळ एका आठवड्यानंतर याकोब, योहान आणि पेत्र यांना घेऊन येशू जवळच असलेल्या “एका उंच डोंगरावर,” कदाचित हर्मोन पर्वतावर गेला. बहुधा ती रात्रीची वेळ असावी कारण शिष्य पेंगत होते. पण, येशू प्रार्थना करत असताना असं काहीतरी घडलं की त्यांची झोप कुठल्या कुठं पळून गेली.—मत्त. १७:१; लूक ९:२८, २९, ३२.
२१ त्यांच्या डोळ्यांदेखत येशूचं रूप बदलू लागलं. हळूहळू त्याचा चेहरा उजळू लागला आणि शेवटी सूर्यासारखा तेजस्वी झाला. त्याचे कपडे पांढरेशुभ्र व चकचकीत झाले. मग, येशूसोबत आणखी दोघे जण दिसले. त्यांपैकी एक मोशेला, तर दुसरा एलीयाला सूचित करत होता. जेरूसलेममध्ये येशूच्या बाबतीत ज्या भविष्यवाण्या पूर्ण होणार होत्या त्यांविषयी, म्हणजेच त्याचा मृत्यू आणि पुनरुत्थान याविषयी ते त्याच्याशी बोलत होते. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली. ती म्हणजे, येशूला यातनामय मरण सोसावं लागणार नाही असं जे पेत्राला वाटत होतं ते अगदीच चुकीचं होतं.—लूक ९:३०, ३१.
२२ पेत्राला त्या दृष्टान्तात सहभागी होण्याचा मोह आवरला नाही. कदाचित तो दृष्टान्त आणखी काही काळ लांबवण्याची त्याची इच्छा असेल. त्यामुळे मोशे आणि एलीया येशूपासून निघून जात असल्याचं दिसलं तेव्हा पेत्र पटकन म्हणाला: “गुरूजी, आपण येथेच असावे हे बरे; तर आम्ही तीन मंडप करू; आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलीयासाठी एक.” अर्थात, दृष्टान्तात दिसलेल्या देवाच्या त्या प्राचीन सेवकांचा मृत्यू होऊन बराच काळ लोटला होता; ते केवळ त्या दृष्टान्तातील पात्र होते. त्यामुळं साहजिकच त्यांना तंबूंची गरज नव्हती. खरंतर पेत्राला आपण काय बोलत आहोत याचं भान नव्हतं. पण, त्यानं दाखवलेली प्रेमळ व उत्साही वृत्ती पाहून आपल्याला त्याच्याबद्दल आपुलकी वाटत नाही का?—लूक ९:३३.
२३ त्या रात्री पेत्र, याकोब आणि योहान यांना आणखी एक आशीर्वाद मिळाला. ते डोंगरावर असताना अचानक एका ढगानं त्यांच्यावर छाया केली आणि त्यांना एक वाणी ऐकू आली. खुद्द यहोवा देवाची ती वाणी होती! देवानं म्हटलं: “हा माझा पुत्र, माझा निवडलेला आहे; याचे तुम्ही ऐका.” दृष्टान्त संपला तेव्हा ते तिघंच येशूसोबत डोंगरावर होते.—लूक ९:३४-३६.
२४ पेत्रासाठी आणि एकंदर आपल्या सर्वांसाठीच रूपांतराचा तो दृष्टान्त एक मोठा आशीर्वाद आहे. त्या दृष्टान्तात, पेत्राला वैभवशाली स्वर्गीय राजाच्या रूपात येणाऱ्या येशूची पूर्वझलक आणि “त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष” पाहण्याचा मोठा बहुमान मिळाला. पुढं अनेक दशकांनंतर पेत्रानं याबद्दल लिहिलं. त्या दृष्टान्तामुळे देवाच्या वचनातील अनेक भविष्यवाण्या पूर्ण होण्याची खातरी मिळाली; तसंच, पुढं पेत्रासमोर येणाऱ्या अनेक परीक्षांसाठी त्या दृष्टान्तानं त्याचा विश्वास मजबूत केला. (२ पेत्र १:१६-१९ वाचा.) पेत्राप्रमाणेच आपल्याही मनावर त्या दृष्टान्ताचा खोलवर प्रभाव पडू शकतो. त्यासाठी, यहोवानं आपल्यावर नेमलेल्या धन्याला आपण एकनिष्ठ राहू या. दुसऱ्या शब्दांत, त्याच्याकडून आपण शिकू या, तो देत असलेलं ताडन आणि सुधारणूक स्वीकारू या आणि निरंतर त्याचं अनुसरण करू या.
अध्याय ४६
“मी प्रभूला पाहिलंय!”
त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा लेख ६ ¶५-६
“मी प्रभूला पाहिलंय!”
येशूने मग्दालीया मरीयाला दुष्ट स्वर्गदूतांपासून मुक्त केल्यानंतर तिला किती हायसं वाटलं असेल! येशूचे आभार कसे मानू असं तिला झालं असेल. मग त्यासाठी तिने काय केलं? ती येशूची एकनिष्ठ शिष्या बनली. तसंच येशू आणि त्याच्या प्रेषितांची गरज ओळखून तिने त्यांना अन्न, वस्त्र, निवारा या त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी मदत केली. ते काही श्रीमंत नव्हते किंवा कोणतंही काम किंवा व्यवसाय करणारे नव्हते. त्यांना त्यांचं पूर्ण लक्ष प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कामावर देता यावं म्हणून त्यांना या मदतीची खूप गरज होती.
मरीया आणि इतर बऱ्याच स्त्रियांनी येशू आणि त्याच्या प्रेषितांच्या गरजा पूर्ण करायला मदत केली. बायबल म्हणतं: “त्या स्वतःच्या संपत्तीतून येशूची आणि त्याच्या शिष्यांची सेवा करायच्या.” (लूक ८:१, ३) त्यांतल्या काही स्त्रिया कदाचित श्रीमंत असाव्यात. एका गावातून दुसऱ्या गावात जाताना त्यांनी त्यांच्यासाठी जेवण बनवलं असेल का? त्यांचे कपडे धुतले असतील का? किंवा त्यांच्या राहण्याची सोय केली असेल का? याबद्दल बायबल काहीच सांगत नाही. पण ठिकठिकाणी प्रवास करणाऱ्या या जवळपास २० भावांना त्यांनी स्वेच्छेने पाठिंबा दिला. या स्त्रियांच्या मदतीमुळेच येशूला आणि त्याच्या प्रेषितांना प्रचाराच्या कामावर पूर्ण लक्ष देता आलं. हे खरंय, की येशूने मरीयासाठी जे केलं त्याची आपण कधीच भरपाई करू शकणार नाही हे तिला माहीत होतं. पण तिला जे काही करता आलं, ते तिने केलं. आणि त्यामुळे तिला नक्कीच खूप आनंद आणि समाधान मिळालं असेल!
त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा लेख ६ ¶१६
“मी प्रभूला पाहिलंय!”
मरीयाच्या समोर उभा असलेला माणूस बागेत काम करणारा माळी नव्हता, तर तो येशू ख्रिस्त होता. एकेकाळी तो एक सुतार होता. मग तो शिक्षक झाला आणि आता मरीयासाठी प्रभूसुद्धा होता. पण तिने त्याला ओळखलं नाही आणि ती मागे फिरून जाऊ लागली. मरीयाला कदाचित हे कळलंच नसेल, की येशूचं आता एका शक्तिशाली अदृश्य स्वरूपात पुनरुत्थान झालं आहे. तो मानवी रूपात तिच्यासमोर प्रकट झाला होता. पण ज्या मानवी शरीरात तो तिच्यासमोर प्रकट झाला, ते शरीर त्याने बलिदान दिलेल्या शरीरापेक्षा वेगळं होतं. आणि त्यामुळेच त्याच्या पुनरुत्थानानंतरच्या रोमांचक काळात, जे लोक त्याला चांगल्या प्रकारे ओळखत होते तेही त्याला ओळखू शकले नाहीत.—लूक २४:१३-१६; योहान २१:४.
योहान पुस्तकातील ठळक मुद्दे
२०:१७—येशूने मरीया मग्दालीया हिला “मला बिलगून बसू नको,” असे का सांगितले? कारण, मरीयेला वाटले, की तो आता लगेचच स्वर्गात जाणार आहे व ती त्याला पुन्हा पाहू शकणार नाही. आपण इतक्यात जाणार नाही, असे आश्वासन देऊन येशूने तिला, त्याला बिलगून न बसता जाऊन त्याच्या शिष्यांना त्याच्या पुनरुत्थानाची बातमी देण्यास सांगितले.
टेहळणी बुरूज१२ ९/१ १० ¶४-५
देवाच्या आश्रयाखाली आल्यावर मिळणारा आदर आणि सन्मान
▪ येशूने स्त्रियांवर भरवसा असल्याचं दाखवलं. यहुदी न्यायालयांमध्ये स्त्रियांनी दिलेली साक्ष गुलामांनी दिलेल्या साक्षीइतकीच क्षुल्लक मानली जायची. पहिल्या शतकातल्या जोसिफसने असा सल्ला दिला होता: “स्त्रियांची कोणतीही साक्ष स्वीकारली जाऊ नये. कारण स्त्रिया मुळात मूर्ख असतात आणि त्यांच्यावर भरवसा ठेवला जाऊ शकत नाही.”
याच्या अगदी उलट येशूने आपलं पुनरुत्थान झालंय याची साक्ष देण्यासाठी स्त्रियांनाच निवडलं. (मत्तय २८:१, ८-१०) येशूच्या प्रेषितांनी या स्त्रियांच्या साक्षीवर विश्वास ठेवायला पाहिजे होता. कारण याच स्त्रियांनी येशूचा वधस्तंभावर मृत्यू होत असताना आणि त्याला दफन केलं जात असताना पाहिलं होतं. पण शिष्यांना त्यांच्यावर विश्वास ठेवायला खूप कठीण गेलं. (मत्तय २७:५५, ५६, ६१; लूक २४:१०, ११) पण आपल्या पुनरुत्थानानंतर स्त्रियांसमोर प्रकट होऊन येशूने दाखवून दिलं, की साक्ष देण्याच्या बाबतीत त्यासुद्धा इतर शिष्यांइतक्याच भरवशालायक आहेत.—प्रेषितांची कार्यं १:८, १४.
बायबलमधून प्रश्नांची उत्तरं लेख १७२
मग्दालीया मरीया कोण होती?
बायबलचं उत्तर
मग्दालीया मरीया ही येशू ख्रिस्ताची विश्वासू शिष्या होती. मरीयाला मग्दालीया हे नाव गालील समुद्राच्या जवळ असलेल्या मगदाला या शहरावरून (कदाचित त्याला मगदान असं म्हटलं जायचं) मिळालं असेल. कदाचित मरीया तिथे राहिली असावी.
येशू आणि त्याच्या शिष्यांसोबत प्रवास करणाऱ्या स्त्रियांमध्ये मग्दालीया मरीयासुद्धा होती. तिने येशूच्या आणि त्याच्या शिष्यांच्या गरजा पुरवण्यासाठी उदारतेने मदत केली. (लूक ८:१-३) येशूला मारण्यात आलं हे तिने प्रत्यक्ष पाहिलं आणि ज्यांनी येशूला पुनरुत्थानानंतर पाहिलं त्यांच्यामध्ये ती पहिली होती.—मार्क १५:४०; योहान २०:११-१८.
मग्दालीया मरीया वेश्या होती का?
मग्दालीया मरीया वेश्या होती असं बायबलमध्ये कुठेही सांगण्यात आलेलं नाही. पण येशूने तिच्यातून सात दुष्ट स्वर्गदूतांना बाहेर काढलं होतं हे बायबल सांगतं.—लूक ८:२.
मग मरीया वेश्या होती असं लोक का म्हणतात? कारण तिच्या मृत्यूच्या बऱ्याच काळानंतर काही लोकांनी असा दावा केला, की ज्या स्त्रीने (कदाचित ती वेश्या असावी) येशूचे पाय तिच्या अश्रूंनी धुतले आणि केसांनी पुसले ती स्त्री मरीया मग्दालीयाच आहे. त्या स्त्रीचं नाव बायबलमध्ये देण्यात आलेलं नाही. (लूक ७:३६-३८) पण बायबलमध्ये आपल्याला याचा कोणताही पुरावा मिळत नाही.
मग्दालीया मरीया “प्रेषितांची प्रेषित” होती का?
ती “प्रेषितांची प्रेषित” नव्हती. कॅथोलिक चर्चमध्ये तिला “संत मग्दालीया मरीया” आणि “प्रेषितांची प्रेषित” असं म्हणतात. कारण ज्यांनी येशूच्या पुनरुत्थानाची बातमी त्याच्या प्रेषितांना कळवली त्यांच्यामध्ये मरीया पहिली होती. (योहान २०:१८) पण यामुळे आपण तिला प्रेषित म्हणू शकत नाही. शिवाय, ती प्रेषित असल्याचं बायबलमध्ये आपल्याला कुठेही वाचायला मिळत नाही.—लूक ६:१२-१६.
बायबलचं लिखाण पहिल्या शतकाच्या शेवटी-शेवटी पूर्ण झालं. याच्या बऱ्याच काळानंतर चर्चच्या अधिकाऱ्यांनी मग्दालीया मरीयाला “संत” ही पदवी द्यायचं ठरवलं. दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकात जी लिखाणं लिहिण्यात आली, त्यात असं सांगण्यात आलं की येशूचे काही शिष्य मग्दालीया मरीयावर जळायचे. पण ही लिखाणं बायबलचा भाग नाहीत. त्यामुळे या कहाण्या देवाच्या प्रेरित वचनांचा भाग असू शकत नाहीत.
मग्दालीया मरीया येशूची पत्नी होती का?
ती येशूची पत्नी नव्हती. खरंतर बायबल स्पष्टपणे सांगतं की येशूने कधीच लग्न केलं नाही.
[चौकट]
बायबलमध्ये मरीया नावाच्या किती स्त्रियांचा उल्लेख आहे?
बायबलमध्ये मरीया नावाच्या सहा स्त्रियांचा उल्लेख आहे.
१. येशूची आई मरीया.—मत्तय १:१८.
२. मार्था आणि लाजरची बहीण.—योहान ११:१, २.
३. मग्दालीया मरीया.—लूक ८:२.
४. याकोब आणि योसेची आई.—मत्तय २७:५६.
५. योहान मार्कची आई.—प्रेषितांची कार्यं १२:१२.
६. रोममधल्या भाऊबहिणींसाठी मेहनत घेतलेली स्त्री.—रोमकर १६:६.
टेहळणी बुरूज९५ ७/१५ १५-१८ ¶३-८
ख्रिस्ती स्त्रिया सन्मान व आदर यास पात्र आहेत
३ येशू स्त्रियांशी जो व्यवहार करत होता त्यावरून लोकांबद्दलचा त्याचा कनवाळू गुण दिसून आला. एके प्रसंगी, १२ वर्षांपासून रक्तस्रावाचा त्रास असणाऱ्या एका स्त्रीने त्याला लोकसमुहात गाठले. तिच्या अवस्थेमुळे ती विधीनुसार अशुद्ध होती, म्हणून ती तेथे यायला नको होती. (लेवीय १५:२५-२७) परंतु, बरे होण्याची अत्यंत गरज असल्यामुळे ती येशूच्या नकळत मागे गेली. तिने त्याच्या वस्त्राला स्पर्श केल्यावर ती तत्काळ बरी झाली! ज्याची कन्या अत्यंत आजारी होती त्या याइराच्या घरी येशू जात होता तरी देखील तो थांबला. त्याच्यातून शक्ती गेल्याचे कळाल्यावर, त्याला स्पर्श केलेल्या व्यक्तीला तो शोधू लागला. शेवटी, ती स्त्री थरथर कापत त्याच्यासमोर येऊन त्याच्या पाया पडली. लोकसमुदायात असल्याबद्दल किंवा त्याच्या वस्त्रांना परवानगीशिवाय स्पर्श केल्याबद्दल येशूने तिला रागावले का? याच्या उलट, तिला तो फारच प्रेमळ व चांगला असा वाटला. तो म्हणाला: “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” येशूने एखाद्या स्त्रीला “मुली” असे थेट उद्देशून बोलण्याची ही पहिलीच वेळ होती. त्या शब्दामुळे तिच्या अंतःकरणाला किती समाधान मिळाले असेल!—मत्तय ९:१८-२२; मार्क ५:२१-३४.
४ येशूने नियमशास्त्राच्या अक्षरशः अर्थाच्या पलीकडे पाहिले. त्यामागील सार आणि कृपा व कनवाळुपणाची गरज त्याने ओळखली. (पडताळा मत्तय २३:२३.) येशूने त्या आजारी स्त्रीच्या निराशजनक परिस्थितीला पाहिले व ती विश्वासाने प्रवृत्त झालेली होती हे विचारात घेतले. अशा प्रकारे, त्याने ख्रिस्ती पुरुषांकरता विशेषतः पर्यवेक्षकांकरता एक चांगले उदाहरण मांडले. एखादी ख्रिस्ती बहीण वैयक्तिक समस्या किंवा विशेषतः एखाद्या अडचणीच्या किंवा परीक्षेच्या परिस्थितीला तोंड देत असेल, तर तिने तत्काळ उच्चारलेले शब्द किंवा कृती यांच्या पलीकडे वडिलांनी पाहावे व परिस्थिती तसेच हेतू विचारात घ्यावेत. सल्ला किंवा सुधारणुकीऐवजी, धीर, समजूतदारपणा व कनवाळुपणा आवश्यक आहे हे अशा प्रकारच्या ज्ञानावरून दाखवले जाईल.—नीतिसूत्रे १०:१९; १६:२३; १९:११.
५ येशू पृथ्वीवर होता त्या काळातील स्त्रिया, रब्बींच्या सांप्रदायांनी जखडलेल्या असून त्यांना कायदेशीर साक्षीदार होण्यास निर्बंध होता. सा. यु. ३३ च्या निसान १६ ला सकाळी, येशूला मृतातून पुनरुत्थित केल्यावर लगेचच काय झाले त्याचा विचार करा. पुनरुत्थित येशूला प्रथम पाहण्यास व इतर शिष्यांना त्यांचा प्रभू उठवला गेला आहे याची साक्ष प्रथम देणारे कोण असेल बरे? तो मरेपर्यंत खिळण्याच्या ठिकाणी राहिलेल्या स्त्रियाच होत्या.—मत्तय २७:५५, ५६, ६१.
६ आठवड्याच्या पहिल्या दिवशी, भल्या पहाटे, मरीया मग्दालीया व इतर स्त्रिया येशूच्या शरीराला सुगंधद्रव्ये लावण्यासाठी कबरेजवळ गेल्या. रिकामी कबर पाहून, मरीया, पेत्र व योहानाला सांगण्यास पळत गेली. इतर स्त्रिया तेथेच थांबल्या. लवकरच, त्यांना एक देवदूत दिसला व येशूला उठवण्यात आले आहे असे त्याने त्यांना सांगितले. “लवकर जाऊन त्याच्या शिष्यांस सांगा,” अशी देवदूताने सूचना दिली. या स्त्रिया ही बातमी देण्यास घाईघाईने जात असताना, येशू स्वतः त्यांच्यासमोर आला. “जा माझ्या भावास सांगा,” असे त्याने त्यांना म्हटले. (मत्तय २८:१-१०; मार्क १६:१, २; योहान २०:१, २) देवदूताच्या भेटीची जाणीव नसलेली दुःखित झालेली मरीया मग्दालीया रिकाम्या कबरेजवळ पुन्हा आली. येशू तेथे तिच्यासमोर येतो, व तिने शेवटी त्याला ओळखल्यावर तो म्हणतो: “माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की, जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो.”—योहान २०:११-१८; पडताळा मत्तय २८:९, १०.
७ येशू प्रथम पेत्र, योहान किंवा इतर पुरुष शिष्यांपैकी कोणालाही दिसू शकला असता. त्याऐवजी, या स्त्रियांना त्याच्या पुनरुत्थानाचे पहिले साक्षीदार करून आणि त्याबद्दल त्याच्या पुरुष शिष्यांना जाऊन सांगण्याकरता नेमून त्याने त्यांना कृपा दाखवण्याचे ठरवले. सुरवातीला पुरुषांनी कशी प्रतिक्रिया दाखवली? अहवाल म्हणतो: “परंतु हे वर्तमान त्यांना वायफळ बडबड वाटली; व ते त्यांनी खरे मानले नाही.” (लूक २४:११) ही साक्ष स्त्रियांनी दिल्यामुळे ती स्वीकारण्यास त्यांना कठीण वाटले असे होऊ शकते का? तसे असल्यास, येशूला मृतातून उठवण्यात आले होते याचा विपुल पुरावा त्यांना कालांतराने प्राप्त झाला. (लूक २४:१३-४६; १ करिंथकर १५:३-८) आज ख्रिस्ती पुरुष त्यांच्या आध्यात्मिक बहिणींची निरीक्षणे विचारात घेतात तेव्हा सुज्ञतेने कार्य करतात.—पडताळा उत्पत्ति २१:१२.
८ येशूने स्त्रियांशी कसा व्यवहार केला हे जाणणे खरोखर आनंदविणारे आहे. स्त्रियांशी व्यवहार करताना तो नेहमी कनवाळू व पूर्णपणे संतुलित होता व त्याने त्यांना कधीही उंचावले किंवा कमी लेखले नाही. (योहान २:३-५) त्यांची प्रतिष्ठा काढून घेणारे व देवाचे वचन रद्द करणारे रब्बींचे सांप्रदाय त्याने नाकारले. (पडताळा मत्तय १५:३-९.) स्त्रियांशी सन्मान व आदरासह व्यवहार करून, त्यांना कशी वागणूक द्यावी याबद्दल यहोवाला कसे वाटते हे येशूने प्रत्यक्ष प्रकट केले. (योहान ५:१९) ख्रिस्ती पुरुषांनी अनुकरण करावे म्हणून येशूने एक उत्तम उदाहरण देखील मांडले.—१ पेत्र २:२१.
अध्याय ४७
“तिला जे करता आलं ते तिने केलं”
अनुकरण करा अध्या. २० ¶५-६; ¶१७
“मी विश्वास धरला आहे”
५ मार्था खूप मेहनती होती. घरकाम आणि पाहुण्यांचं करण्यात ती सहसा खूप व्यस्त असायची. आता तर तिच्या घरी येशू येणार म्हटल्यावर ती स्वस्थ कशी बसू शकणार होती? ती लगेच तयारीला लागली. आपल्या या खास पाहुण्यासाठी आणि कदाचित त्याच्यासोबत येणाऱ्या लोकांसाठी ती अनेक पदार्थांची मेजवानी तयार करू लागली. त्या काळी, पाहुणचाराला खूप महत्त्व दिलं जायचं. घरी आलेल्या पाहुण्याचा मुका घेऊन त्याचं स्वागत केलं जायचं, त्याच्या पायातले जोडे काढून पाय धुतले जायचे आणि त्याला ताजंतवानं वाटावं म्हणून डोक्याला सुगंधी तेल लावलं जायचं. (लूक ७:४४-४७ वाचा.) तसंच, त्याच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची चांगली काळजी घेतली जायची.
६ येशू घरी येणार होता त्या दिवशी मार्था आणि मरीया या दोघी बहिणी अतिशय व्यस्त होत्या. त्या दोघींपैकी मरीया ही आध्यात्मिक गोष्टी शिकण्यास अधिक उत्सुक होती असं सहसा मानलं जात असलं, तरी घरातली कामं करण्यात तिनं आपल्या बहिणीला नक्कीच मदत केली असावी. पण, येशू आल्यानंतर काय झालं? येशूनं त्या संधीचा फायदा घेतला आणि तो शिकवू लागला. त्या काळातल्या धर्मगुरूंसारखा येशू नव्हता. तो स्त्रियांचा आदर करायचा आणि त्यांना देवाच्या राज्याविषयी शिकवण्यास नेहमी तयार असायचा. येशूकडून शिकण्याची ही संधी मिळाल्याबद्दल मरीयेला इतका आनंद झाला, की ती त्याच्या पायांजवळ बसून त्याचा शब्द न् शब्द लक्षपूर्वक ऐकू लागली.
१७ मार्था आणि मरीया या दोघींनी आपल्या भावासाठी खूप शोक केला. मनात दुःखाचं ओझं घेऊनच त्या त्याच्या अंत्यविधीची तयारी करू लागल्या. तसंच, बेथानी व जवळपासच्या गावांतून सांत्वन करायला येणाऱ्या पाहुण्यांचं करण्यात त्या व्यस्त झाल्या. पण, अजूनही येशू आला नव्हता. एकेक दिवस सरत गेला तसे मार्थेला अनेक प्रश्न पडले असतील. शेवटी, लाजराला जाऊन चार दिवस झाल्यानंतर तिला कळलं की येशू बेथानीजवळ आला आहे. प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेणारी मार्था या वेळीसुद्धा वेगळी कशी वागणार होती? त्या दुःखाच्या प्रसंगीदेखील ती मरीयेला काही न सांगता धावतच येशूला भेटायला गेली.—योहान ११:१८-२० वाचा.
मरीया “चांगला वाटा” निवडते
येशूच्या दिवसांत यहुदी स्त्रियांवर रब्बी परंपरेची बंधने होती. यामुळे नियमशास्त्राचा अभ्यास त्यांना करू दिले जात नसे. मिशनात तर म्हटले आहे: “एखाद्या बापाने आपल्या लेकीला नियमशास्त्राचे ज्ञान दिले म्हणजे त्याने तिला बाहेरख्यालीपणा शिकवला आहे.”—सोताह ३:४.
यामुळेच पहिल्या शतकात यहुदीयातील बहुतेक स्त्रिया इतक्या शिकलेल्या नव्हत्या. “येशूच्या सेवेच्याआधी यहुदी स्त्रियांना एखाद्या महान शिक्षकाच्या शिष्या होण्याची, त्या शिक्षकाबरोबर प्रवास करण्याची किंवा मुलांव्यतिरिक्त इतरांना शिकवण्याची परवानगी होती असा कोणताही पुरावा नाही,” असे द अँकर बायबल डिक्शनरी म्हणते. स्त्रियांना कमी लेखणे एवढ्यावरच थांबले नाही; काही धार्मिक नेत्यांना तर, पुरुषाने लोकांमध्ये कोणत्याही स्त्रीबरोबर बोलायचे नाही असा नियमच काढला!
अशा अभक्त मनोवृत्तींचा येशूने धिक्कार केला. त्याने स्त्रियांना आणि पुरुषांना शिकवले; त्याच्या शिष्यगणात स्त्रियाही होत्या आणि पुरुषही होते. (लूक ८:१-३) एके प्रसंगी येशूला मार्था आणि मरीयेच्या घरी आमंत्रण मिळाले होते. (लूक १०:३८) या दोघी जणी लाजरच्या बहिणी होत्या; लाजर, मार्था आणि मरीया येशूच्या शिष्यगणातील होते आणि येशूबरोबर त्यांची चांगली मैत्री होती. (योहान ११:५) या तिघा बहिणभावाचे घराणे मोठे असावे, कारण लाजरचा मृत्यू झाला तेव्हा पुष्कळ लोक मार्था आणि मरीयेचे सांत्वन करायला आले होते. प्रसंग काहीही असो, येशू त्यांच्या घरी पाहुणा म्हणून गेला होता तेव्हा तेथे जे घडले त्यावरून फक्त त्यांनाच नव्हे तर आपल्यालाही धडा शिकायला मिळतो.
येशूच्या पायांजवळ बसून शिकणे
यात काही शंका नाही, की येशूसाठी पंचपक्वान्न करायचा मार्था आणि मरीयेचा बेत असावा; आणि कदाचित त्यांची तितकी ऐपत देखील होती. (पडताळा योहान १२:१-३.) पण, त्यांचा पाहुणा आला तेव्हा मरीया “प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली.” (लूक १०:३९) शिकण्यासाठी उत्सुक असलेल्या स्त्रीला शिकवण्यापासून कोणतीही मानवी परंपरा येशूला रोखू शकत नव्हती! आपण कल्पना करू शकतो, धनी शिकवत असलेल्या शिकवणी ऐकण्यात पूर्णपणे लवलीन झालेल्या विद्यार्थ्याप्रमाणे मरीया येशूच्या पायांजवळ बसली आहे.—पडताळा अनुवाद ३३:३; प्रेषितांची कृत्ये २२:३.
मत्त. २६:७ वरची “महागडं सुगंधी तेल” इंग्रजी स्टडी नोट
महागडं सुगंधी तेल: मार्क आणि योहानच्या अहवालात स्पष्टपणे सांगितलंय, की हे ३०० ग्रॅम तेल “शुद्ध जटामांसीचं” तेल होतं. आणि त्याची किंमत ३०० दिनारांपेक्षा जास्त होती. ही किंमत इतकी जास्त होती की तेवढे पैसे मिळवण्यासाठी एका सर्वसामान्य मजुराला वर्षभर काम करावं लागायचं. (मार्क १४:३-५; योह १२:३-५) असं म्हटलं जातं, की हिमालयात आढळणाऱ्या एका सुगंधी वनस्पतीपासून (नार्डोस्टॅकिस जटामांसी) हे तेल तयार केलं जायचं. ते खूप महाग असल्यामुळे सहसा त्यात हलक्या दर्जाचं तेल मिसळून भेसळ केली जायची आणि कधीकधी बनावट तेलसुद्धा जटामांसी म्हणून विकलं जायचं. पण मार्क आणि योहान दोघंही असा खास उल्लेख करतात, की येशूसाठी वापरण्यात आलेलं तेल हे ‘शुद्ध जटामांसीचं’ तेल होतं.
टेहळणी बुरूज११ ४/१ ६ ¶४, तळटीप
उपकारी मनोवृत्ती बाळगा
इतरांनी तुमच्यासाठी जे काही केले आहे त्यावर विचार करा आणि त्यांच्या प्रयत्नांबद्दल त्यांचे आभार माना. येशूने याबाबतीत एक सुरेख उदाहरण मांडले. एकदा, मरीया नावाच्या त्याच्या एका स्नेहीने त्याच्या डोक्यावर व पायांवर महागडे तेल ओतले तेव्हा काहींनी त्याला असे विचारले: “ह्या सुगंधी तेलाची अशी नासाडी कशासाठी केली?” ज्यांनी हा आक्षेप घेतला होता त्यांना असे वाटत होते, की हे महागडे तेल विकून आलेले पैसे गोरगरिबांमध्ये वाटता आले असते. पण येशूने या लोकांना उत्तर दिले: “हिच्या वाटेस जाऊ नका, हिला त्रास का देता? हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे.” (मार्क १४:३-८; योहान १२:३) मरीयेने जे केले नाही त्यावर लक्ष केंद्रित न करता, तिने जे केले त्याची त्याने प्रशंसा केली.
[तळटीप]
पहिल्या शतकात, घरी आलेल्या पाहुण्याच्या डोक्यावर तेल ओतून आदरातिथ्य दाखवण्याची एक प्रथा होती; आणि पायांवर तेल ओतणे हे नम्रता दर्शवणारे कार्य होते.
तुम्ही कृतज्ञता दाखवता का?
आपल्या स्वर्गीय पित्याच्या गुणांची हुबेहूब नक्कल करणाऱ्या येशू ख्रिस्ताने, इतरांनी विश्वासामध्ये केलेल्या गोष्टींबद्दल कदर दाखवली. जेरुसलेमच्या मंदिरात एकदा काय घडले त्याचा विचार करा: “मग [येशूने] दृष्टि वर करून धनवानांना आपली दाने मंदिराच्या भांडारांत टाकतांना पाहिले. त्याने एका दरिद्री विधवेलाहि तेथे दोन टोल्या टाकतांना पाहिले; तेव्हा तो म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, ह्या दरिद्री विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दानांत टाकले; हिने तर आपल्या कमताईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे.”—लूक २१:१-४.
पैशांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, खासकरून धनिकांच्या देणगीशी तुलना केल्यास ती देणगी अल्प होती. तेथे उपस्थित असलेल्या बहुतेकांचे लक्ष कदाचित तिच्याकडे गेलेही नसावे. मात्र येशूचे लक्ष तिच्याकडे गेले. त्याने तिची परिस्थिती समजून घेतली. येशूने तिला पाहिले आणि तिची प्रशंसा केली.
दुसरे उदाहरण आहे एका श्रीमंत स्त्रीचे, मरियेचे. एके भोजनप्रसंगी, या स्त्रीने त्याच्या पायांवर आणि डोक्यावर खूप महागडे सुवासिक तेल ओतले. हे तेल विकून मिळालेला पैसा गोरगरिबांमध्ये वाटता आला असता अशी काहींनी टीका केली. येशूने कशी प्रतिक्रिया दाखवली? तो म्हणाला: “हिच्या वाटेस जाऊ नका, हिला त्रास का देता? हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की, सर्व जगात जेथे जेथे सुवार्तेची घोषणा करण्यात येईल तेथे तेथे हिने जे केले आहे तेहि हिच्या स्मरणार्थ सांगण्यात येईल.”—मार्क १४:३-६, ९; योहान १२:३.
या महागड्या तेलाचा दुसरीकडे चांगला वापर झाला असता असे म्हणून त्याने दुःख व्यक्त करत टीका केली नाही. त्याने मरियेच्या प्रेमाच्या व विश्वासाच्या उदार प्रदर्शनाची कदर केली. ही घटना, तिच्या उत्तम कार्याची आठवण म्हणून बायबलमध्ये लिहून ठेवण्यात आली आहे. हे आणि इतर अहवाल दाखवतात, की येशू खोल कदर दाखवणारा मनुष्य होता.
तुम्ही देवाचे सेवक आहात तर, शुद्ध उपासनेला बढावा देण्याकरता तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांची यहोवा देव आणि येशू ख्रिस्त फार कदर बाळगतात याची तुम्ही खात्री बाळगू शकता. हे माहीत असल्यामुळे आपण त्यांच्या अधिक निकट जातो व स्वतःही कृतज्ञ असण्याद्वारे त्यांचे अनुकरण करण्यास प्रवृत्त होतो.
अध्याय ४८
तो “विश्वासाने आणि पवित्र शक्तीने परिपूर्ण” होता
‘आम्ही देवाला शासक मानून त्याची आज्ञा पाळली पाहिजे’
१७ या नवीन मंडळीपुढे आता एक समस्या उभी राहिली. या समस्येमुळे निर्माण होणारा धोका जरी स्पष्टपणे दिसून येत नसला, तरी त्यामुळे मंडळीत फूट पडण्याची शक्यता होती. हा धोका काय होता? बाप्तिस्मा घेत असलेले बरेच शिष्य इतर ठिकाणांहून यरुशलेमला आलेल्या लोकांपैकी होते. आणखी ज्ञान घेण्याची इच्छा असल्यामुळे हे लोक यरुशलेममध्येच थांबले होते. त्यांच्या जेवणासाठी आणि इतर गरजांसाठी यरुशलेममध्ये राहणाऱ्या शिष्यांनी स्वेच्छेने दान दिलं. (प्रे. कार्यं २:४४-४६; ४:३४-३७) पण आता एक नाजूक परिस्थिती निर्माण झाली. जेवणाच्या “दररोजच्या अन्नाच्या वाटपात” ग्रीक विधवांकडे “दुर्लक्ष केलं जात होतं.” (प्रे. कार्यं ६:१) पण हिब्रू बोलणाऱ्या विधवांची मात्र चांगली काळजी घेतली जात होती. म्हणजेच खरी समस्या भेदभावाची होती. आणि भेदभाव ही एक अशी समस्या आहे जिच्यामुळे मंडळीत मोठी फूट पडू शकते.
१८ पहिल्या शतकात प्रेषित, नियमन मंडळ म्हणून काम पाहायचे. त्यांनी ओळखलं की आपण देवाचं वचन शिकवायचं सोडून “जेवणाचं वाटप करणं योग्य ठरणार नाही.” (प्रे. कार्यं ६:२) ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी शिष्यांना अशा सात पुरुषांना निवडायला सांगितलं जे “बुद्धीने आणि पवित्र शक्तीने भरलेले आहेत.” प्रेषित त्यांना या “आवश्यक कामासाठी” नेमणार होते. (प्रे. कार्यं ६:३) या कामासाठी योग्य पुरुषांची गरज होती कारण प्रश्न फक्त जेवणाच्या वाटपाचा नव्हता; तर त्यांना पैशांचे व्यवहार करणं, सामानाची खरेदी करणं आणि काळजीपूर्वक हिशोब ठेवणं या सर्व गोष्टी कराव्या लागणार होत्या. ज्या पुरुषांना निवडण्यात आलं त्या सर्वांची ग्रीक नावं होती. कदाचित यामुळे ग्रीक विधवांना या बांधवांकडून मदत स्वीकारणं जास्त सोपं गेलं असेल. सुचवलेल्या नावांवर प्रार्थनापूर्वक विचार केल्यानंतर प्रेषितांनी त्या सात पुरुषांना या “आवश्यक कामासाठी” नेमलं.
साक्ष द्या अध्या. ६ ¶१३, तळटीप
स्तेफन—“देवाची कृपा आणि सामर्थ्य यांनी परिपूर्ण”
१३ मोशेचा काळ. (प्रे. कार्यं ७:१७-४३) स्तेफन मोशेबद्दल बरंच काही बोलला आणि हे योग्यच होतं, कारण न्यायसभेतले बरेच जण सदूकी लोकांपैकी होते. हे लोक मोशेने लिहिलेली पुस्तकं सोडून बायबलची इतर कोणतीही पुस्तकं मानत नव्हते. तसंच, स्तेफनवर मोशेची निंदा केल्याचा आरोप होता, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे, स्तेफन मोशेबद्दल जे बोलला त्यावरून त्या आरोपाचं सरळसरळ उत्तर मिळालं. कारण, स्तेफनच्या शब्दांतून दिसून आलं की त्याला मोशेबद्दल आणि नियमशास्त्राबद्दल मनापासून आदर होता. (प्रे. कार्यं ७:३८) तसंच, स्तेफनने आणखी एका गोष्टीकडे त्यांचं लक्ष वेधलं. त्याने सांगितलं की योसेफप्रमाणेच मोशेही ज्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होता, त्या लोकांनी त्याला नाकारलं होतं. त्यांनी त्याला नाकारलं तेव्हा तो ४० वर्षांचा होता. याच्या आणखी ४० वर्षांनंतर जेव्हा तो इस्राएलचं नेतृत्व करू लागला, तेव्हाही त्यांनी कित्येक वेळा त्याचा अनादर केला. अशा रितीने स्तेफनने एका महत्त्वाच्या मुद्द्यावर पुन्हापुन्हा भर दिला; तो म्हणजे, देवाने आपल्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी ज्या-ज्या व्यक्तींना नेमलं होतं, त्या-त्या व्यक्तींना इस्राएली लोकांनी वारंवार नाकारलं.
[तळटीप]
स्तेफनच्या भाषणात आपल्याला अशी माहिती मिळते जी बायबलच्या इतर कोणत्याही पुस्तकात वाचायला मिळत नाही; जसं की, मोशेला इजिप्तमध्ये मिळालेलं शिक्षण, तो पहिल्यांदा इजिप्तमधून पळून जातो तेव्हाचं त्याचं वय आणि मिद्यानात तो किती काळ राहिला, याबद्दलची माहिती.
तुम्हाला माहीत होतं का?
छळ होत असतानाही स्तेफन इतका शांत कसा राहू शकला?
स्तेफन क्रूर लोकांच्या एका गटासमोर उभा होता. इस्राएलचं उच्च न्यायालय, म्हणजे यहुदी न्यायसभा ७१ न्यायाधीशांनी मिळून बनलेली. यहुदी समाजात या न्यायाधीशांचा बराच दबदबा होता. ही सभा महायाजक कैफा याने भरवली होती. काही महिन्यांआधी जेव्हा न्यायसभेने येशूला मृत्युदंड सुनावला होता, तेव्हाही हाच कैफा न्यायसभेचा अध्यक्ष होता. (मत्त. २६:५७, ५९; प्रे. कार्ये ६:८-१२) जेव्हा न्यायाधीशांनी एका नंतर एक खोट्या साक्षीदारांना बोलवलं तेव्हा स्तेफनच्या चेहऱ्यावर त्यांना एक वेगळाच भाव दिसला. त्याचा चेहरा त्यांना “एखाद्या देवदूताच्या चेहऱ्यासारखा” दिसत होता.—प्रे. कार्ये ६:१३-१५.
अशा भयानक परिस्थितीत स्तेफन इतका शांत कसा राहू शकला? यहुदी न्यायसभेत स्तेफनला आणण्यापूर्वी पवित्र आत्म्याच्या जबरदस्त प्रभावामुळे तो देवाच्या सेवेत पूर्णपणे व्यस्त होता. (प्रे. कार्ये ६:३-७) जेव्हा त्याच्यावर खटला चालला होता तेव्हा हाच पवित्र आत्मा त्याच्यावर कार्य करत होता. हा आत्मा सांत्वन करणारा व आठवण देणारा म्हणून कार्य करत होता. (योहा. १४:१६, तळटीप.) स्तेफनने निर्भयपणे साक्ष दिली तेव्हा पवित्र आत्म्याने त्याला हिब्रू शास्त्रवचनांतल्या जवळजवळ २० किंवा त्यापेक्षा जास्त अहवालांची आठवण करून दिली. याबद्दल प्रेषितांची कार्ये पुस्तकाच्या ७व्या अध्यायात सांगितलं आहे. (योहा. १४:२६) पण नंतर जेव्हा येशू देवाच्या उजव्या हाताला उभा असल्याचा दृष्टान्त स्तेफनला दिसला तेव्हा त्याचा विश्वास आणखीन मजबूत झाला.—प्रे. कार्ये ७:५४-५६, ५९, ६०.
एक दिवस कदाचित आपल्यालाही छळाचा सामना करावा लागेल. (योहा. १५:२०) देवाच्या वचनाचा नियमितपणे अभ्यास करण्याद्वारे आणि सेवाकार्यात पूर्णपणे सहभाग घेण्याद्वारे आपण यहोवाच्या आत्म्याला आपल्यावर कार्य करू देत असतो. यामुळे विरोधाचा सामना करण्यासाठी लागणाऱ्या शक्तीसोबत, मनाची शांती टिकवून ठेवायलाही आपल्याला मदत होईल.—१ पेत्र ४:१२-१४.
वाचकांचे प्रश्न
प्रेषितांची कृत्ये ७:५९ मध्ये स्तेफनाने काढलेल्या उद्गारांवरून, आपण येशूला उद्देशून प्रार्थना केली पाहिजे असे सूचित होते का?
प्रेषितांची कृत्ये ७:५९ म्हणते: “ते दगडमार करीत असता स्तेफन प्रभूचा धावा करीत म्हणाला, हे प्रभु येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” या शब्दांमुळे काहींच्या मनात प्रश्न उभे राहिले आहेत कारण बायबल तर म्हणते, की ‘प्रार्थना ऐकणारा’ यहोवा आहे. (स्तोत्र ६५:२) स्तेफनाने खरोखर येशूला प्रार्थना केली होती का? असल्यास, येशू आणि यहोवा सारखेच आहेत असे यावरून सूचित होते का?
किंग जेम्स व्हर्शन म्हणते की स्तेफन “देवाला धावा” करीत होता. त्यामुळे अनेक जण बायबल भाष्यकार मॅथ्यू हेन्री यांच्याप्रमाणे निष्कर्ष काढतात; त्यांनी म्हटले: “स्तेफन येथे ख्रिस्ताला प्रार्थना करतो, त्यामुळे आपणही ख्रिस्ताला प्रार्थना केली पाहिजे.” परंतु हा दृष्टिकोन चुकीचा आहे. का?
नव्या करारावरील बार्न्स यांच्या नोंदी (इंग्रजी) यात अशी प्रामाणिक कबूली दिली आहे: “देव हा शब्द मूळ लिखाणात नाही व भाषांतरांतही नसायला हवा होता. कोणत्याही प्राचीन [हस्तलिपींमध्ये] किंवा अनुवादांमध्ये तो आढळत नाही.” मग “देव” हा शब्द या वचनात कसा काय घालण्यात आला? विद्वान एबियल ॲबट लिव्हरमोर यांनी याला, “विशिष्ट पंथांच्या भाषांतरकारांच्या धार्मिक विचारांचा परिणाम” असे म्हटले. यास्तव, बहुतेक आधुनिक भाषांतरे, देवाचा उल्लेख करत नाहीत कारण तो चुकीचा होता.
तरीसुद्धा पुष्कळ भाषांतरांमध्ये, स्तेफनाने येशूला “प्रार्थना” केली असे म्हटले आहे. आणि नवीन जग भाषांतर (इंग्रजी) यातील तळटीपेत दाखवण्यात आले आहे, की “धावा करणे” याचा अर्थ “आवाहन; प्रार्थना” असाही होऊ शकतो. मग यावरून येशू सर्वसमर्थ देव आहे हे सूचित होत नाही का? नाही. व्हाईन्स एक्सपोझिटरी डिक्शनरी ऑफ ओल्ड ॲण्ड न्यू टेस्टमेंट वड्र्स असे स्पष्टीकरण देते, की या संदर्भात, एपीकालिओ या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ, “धावा करणे, आवाहन; . . . अधिकारपदी असलेल्या व्यक्तीकडे मागणी करणे” असा होतो. पौलाने याच अर्थाचा शब्द वापरला जेव्हा तो म्हणाला: “मी कैसराजवळ न्याय मागतो.” (प्रेषितांची कृत्ये २५:११) त्यामुळे द न्यू इंग्लिश बायबल उचितपणे म्हणते, की स्तेफनाने येशूचा “धावा” केला.
स्तेफन अशी विनंती करायला का प्रवृत्त झाला? प्रेषितांची कृत्ये ७:५५, ५६ नुसार स्तेफनाने “पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन . . . आकाशाकडे निरखून पाहिले तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला.” इतर वेळेला, स्तेफनाने आपल्या विनंत्या यहोवाला येशूच्या नावाने केल्या असत्या. पण दृष्टांतात त्याने पुनरुत्थित येशूला पाहिल्यावर त्याला थेट येशूला विनंती करायला कसलाही संकोच वाटला नाही; तो येशूला म्हणाला: “माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” मृतांना जिवंत करण्याचा येशूला अधिकार देण्यात आला होता हे स्तेफनाला माहीत होते. (योहान ५:२७-२९) त्यामुळे त्याने येशूला, स्वर्गात अमर जीवनासाठी येशू त्याला जिवंत करेपर्यंत त्याच्या आत्म्याचे अर्थात जीवनी शक्तीचे रक्षण करायची विनंती केली.
स्तेफनाची ही लहानशी प्रार्थना, येशूला प्रार्थना करण्यासाठी एक नमुना आहे का? नाही, मुळीच नाही. एक गोष्ट, स्तेफनाने येशू व यहोवा यांच्यामध्ये स्पष्टपणे फरक केला कारण अहवाल म्हणतो, की त्याने येशूला “देवाच्या उजवीकडे . . . उभा असलेला” पाहिला. दुसरी गोष्ट म्हणजे, हा केवळ एक अपवाद आहे. अशी प्रार्थना केल्याचे केवळ दुसरे एकच उदाहरण प्रेषित योहानाचे आहे ज्याने येशूला उद्देशून प्रार्थना केली; त्यानेही येशूला दृष्टांतात पाहिल्यावरच त्याला प्रार्थना केली.—प्रकटीकरण २२:१६, २०.
आज ख्रिस्ती आपल्या सर्व प्रार्थना उचितरीत्या यहोवा देवाला करत असले तरी त्यांचा हा अढळ विश्वास आहे, की येशू “पुनरुत्थान व जीवन” आहे. (योहान ११:२५) आपल्या अनुयायांचे मृतांमधून पुनरुत्थान करण्याची येशूला शक्ती आहे या विश्वासाने जशी स्तेफनाला मदत केली तशीच आपल्यालाही हा विश्वास मदत करू शकतो आणि संकटकाळात टिकून राहण्याची शक्ती देऊ शकतो.
स्तेफन—“देवाची कृपा आणि सामर्थ्य यांनी परिपूर्ण”
९ आता, स्तेफनला त्याच्याविरुद्ध असलेले आरोप सांगितले जातात. आपण अध्यायाच्या सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे, हे आरोप ऐकताना स्तेफनचा चेहरा एखाद्या स्वर्गदूतासारखा, अगदी शांत होता. मग, कयफाने त्याच्याकडे वळून त्याला विचारलं: “या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत का?” (प्रे. कार्यं ७:१) आता स्तेफनला बोलण्याची संधी होती आणि तो खरोखरच प्रभावीपणे बोलला!
१० स्तेफनने या प्रसंगी दिलेल्या भाषणाची काहींनी टीका केली आहे. ते म्हणतात की स्तेफनचं भाषण खूप लांबलचक होतं आणि त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना त्याने या भाषणात उत्तरही दिलं नाही. पण खरं पाहिलं, तर आनंदाच्या संदेशाबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तर कसं द्यायचं, याविषयी स्तेफनचं भाषण एक अप्रतिम उदाहरण आहे. (१ पेत्र ३:१५) या भाषणाचं परीक्षण करताना स्तेफनवर कोणते दोन आरोप लावण्यात आले होते, हे आपण आठवणीत ठेवलं पाहिजे. त्याच्यावर मंदिराच्या विरोधात बोलून देवाची निंदा केल्याचा आणि नियमशास्त्राच्या विरोधात बोलून मोशेचीही निंदा केल्याचा आरोप लावण्यात आला होता. स्तेफनने त्याच्या उत्तरात इस्राएलच्या इतिहासातल्या तीन काळांचं वर्णन केलं आणि काही मुद्द्यांवर जाणूनबुजून जोर दिला. आता आपण त्या तीन काळांपैकी एकेका काळाकडे लक्ष देऊ या.
११ कुलप्रमुखांचा काळ. (प्रे. कार्यं ७:१-१६) स्तेफनने अब्राहामपासून सुरुवात केली. अब्राहामच्या उल्लेखनीय विश्वासामुळे यहुद्यांच्या मनात त्याच्याबद्दल खूप आदर होता. या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल यहुद्यांशी एकमत असल्यामुळे स्तेफनने याच मुद्द्यापासून सुरुवात केली; पण, “गौरवशाली देवाने” स्वतःला अब्राहामसमोर सर्वात आधी मेसोपटेम्यामध्ये प्रकट केलं होतं यावर स्तेफनने जोर दिला. (प्रे. कार्यं ७:२) खरंतर, वचन दिलेल्या देशातही अब्राहाम विदेश्यासारखा राहत होता. उपासनेसाठी अब्राहामकडे मंदिर किंवा मोशेचं नियमशास्त्र नव्हतं. तर मग, देवाची विश्वासूपणे सेवा करण्यासाठी या गोष्टींची गरज आहे असा हट्ट धरणं योग्य होतं का?
१२ स्तेफनचं भाषण ऐकणाऱ्यांच्या मनात, अब्राहामचा वंशज योसेफ याच्याबद्दलही खूप आदर होता. पण, स्तेफनने त्यांना याची आठवण करून दिली, की योसेफच्या स्वतःच्या भावांनी, म्हणजेच इस्राएलच्या वंशांच्या वाडवडिलांनीच त्या नीतिमान माणसाचा छळ करून त्याला इजिप्तमध्ये गुलाम म्हणून विकलं होतं. तरीसुद्धा देवाने इस्राएली लोकांना दुष्काळापासून वाचवण्यासाठी योसेफचा उपयोग केला. योसेफ आणि येशू यांच्यामध्ये किती साम्य आहे याची स्तेफनला नक्कीच जाणीव होती; पण, आपलं भाषण ऐकणाऱ्यांचं लक्ष जास्तीत जास्त वेळ खिळवून ठेवण्यासाठी त्याने मुद्दामहून त्या गोष्टीचा उल्लेख करण्याचं टाळलं.
१३ मोशेचा काळ. (प्रे. कार्यं ७:१७-४३) स्तेफन मोशेबद्दल बरंच काही बोलला आणि हे योग्यच होतं, कारण न्यायसभेतले बरेच जण सदूकी लोकांपैकी होते. हे लोक मोशेने लिहिलेली पुस्तकं सोडून बायबलची इतर कोणतीही पुस्तकं मानत नव्हते. तसंच, स्तेफनवर मोशेची निंदा केल्याचा आरोप होता, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे, स्तेफन मोशेबद्दल जे बोलला त्यावरून त्या आरोपाचं सरळसरळ उत्तर मिळालं. कारण, स्तेफनच्या शब्दांतून दिसून आलं की त्याला मोशेबद्दल आणि नियमशास्त्राबद्दल मनापासून आदर होता. (प्रे. कार्यं ७:३८) तसंच, स्तेफनने आणखी एका गोष्टीकडे त्यांचं लक्ष वेधलं. त्याने सांगितलं की योसेफप्रमाणेच मोशेही ज्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होता, त्या लोकांनी त्याला नाकारलं होतं. त्यांनी त्याला नाकारलं तेव्हा तो ४० वर्षांचा होता. याच्या आणखी ४० वर्षांनंतर जेव्हा तो इस्राएलचं नेतृत्व करू लागला, तेव्हाही त्यांनी कित्येक वेळा त्याचा अनादर केला. अशा रितीने स्तेफनने एका महत्त्वाच्या मुद्द्यावर पुन्हापुन्हा भर दिला; तो म्हणजे, देवाने आपल्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी ज्या-ज्या व्यक्तींना नेमलं होतं, त्या-त्या व्यक्तींना इस्राएली लोकांनी वारंवार नाकारलं.
१४ स्तेफनने आपलं भाषण ऐकणाऱ्यांना आठवण करून दिली, की मोशेने इस्राएलमधून आपल्यासारखा संदेष्टा येईल असं पूर्वीच सांगितलं होतं. तो संदेष्टा कोण होता आणि लोकांनी त्याच्याशी कसा व्यवहार केला? स्तेफनने लगेच या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत, तर ती भाषणाच्या शेवटी सांगण्यासाठी राखून ठेवली. त्याने मग आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. तो म्हणजे, जळणाऱ्या झुडपातून जेव्हा यहोवा मोशेशी बोलला तेव्हा त्या घटनेवरून मोशेला हे शिकायला मिळालं होतं, की यहोवा कोणत्याही जागेला पवित्र करू शकतो. मग, प्रश्न हा होता, की यहोवाची उपासना विशिष्ट ठिकाणी किंवा विशिष्ट इमारतीत, म्हणजे यरुशलेमच्या मंदिरातच केली पाहिजे का? पाहू या.
१५ उपासना मंडप आणि मंदिर. (प्रे. कार्यं ७:४४-५०) स्तेफनने न्यायसभेला याची आठवण करून दिली, की जेव्हा यरुशलेममध्ये कोणतंही मंदिर नव्हतं, तेव्हा देवाने मोशेला एक उपासना मंडप तयार करायला सांगितलं होतं. तंबूसारखा असलेला हा मंडप उपासनेसाठी वापरायचा होता आणि तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेला जाऊ शकत होता. स्वतः मोशेनेही या मंडपात उपासना केली होती; तर मग, तो उपासना मंडप मंदिरापेक्षा कमी दर्जाचा होता असं म्हणण्याचं खरंच कोणी धाडस करू शकत होतं का?
१६ नंतर शलमोनने यरुशलेममध्ये मंदिर बांधलं, तेव्हा देवाच्या प्रेरणेने त्याने त्याच्या प्रार्थनेतून एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली. स्तेफनच्या शब्दांत सांगायचं तर ती गोष्ट म्हणजे, “सर्वसमर्थ देव हातांनी बनवलेल्या घरांत राहत नाही.” (प्रे. कार्यं ७:४८; २ इति. ६:१८) आपले संकल्प पूर्ण करण्यासाठी जरी यहोवाने मंदिराचा वापर केला असला, तरीही तो त्या मंदिरात राहतो असं म्हणता येणार नाही. मग, माणसांनी बांधलेल्या एखाद्या इमारतीतच खरी उपासना केली जाऊ शकते, असा विचार देवाच्या उपासकांनी का करावा? यशयाच्या पुस्तकातून घेतलेल्या या शब्दांनी स्तेफनने आपल्या तर्काचा दमदार शेवट केला: “यहोवा म्हणतो, स्वर्ग माझं राजासन आणि पृथ्वी माझ्या पायांसाठी आसन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचं घर बांधाल? माझ्यासाठी कोणत्या प्रकारचं विश्रांतीचं स्थान बांधाल? मी स्वतः या सगळ्या गोष्टी बनवल्या नाहीत का?”—प्रे. कार्यं ७:४९, ५०; यश. ६६:१, २.
१७ न्यायसभेपुढे दिलेल्या भाषणात आतापर्यंत स्तेफनने ज्या गोष्टी सांगितल्या, त्यांचं परीक्षण केलं तर काय दिसून येतं? हेच, की त्याच्यावर आरोप लावणाऱ्या लोकांचे चुकीचे दृष्टिकोन त्याने अगदी कुशलतेने उजेडात आणले. कारण स्तेफनने हे स्पष्ट केलं, की यहोवा कट्टर किंवा रूढी-परंपरांमध्ये अडकून पडणारा नाही; तर त्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी तो बदलत्या परिस्थितीनुसार जुळवून घ्यायला तयार असतो. याउलट, यहुद्यांना यरुशलेममध्ये असलेल्या सुंदर मंदिराबद्दल आणि मोशेच्या नियमशास्त्राशी संबंधित प्रथांबद्दल मनापासून आदर होता. पण ते त्यापलीकडे जाऊन विचार करायला तयार नव्हते. यावरून दिसून आलं, की त्या लोकांना नियमशास्त्राचा आणि मंदिराचा खरा अर्थच कळला नव्हता! एका अर्थाने स्तेफनने आपल्या भाषणातून हा महत्त्वाचा प्रश्न उभा केला: यहोवाच्या आज्ञांचं पालन करणं हाच खरंतर नियमशास्त्राचा आणि मंदिराचा आदर करण्याचा सर्वात चांगला मार्ग नाही का? खरोखर, स्तेफन जे काही बोलला त्यातून त्याने स्वतःच्या कार्यांचं खूप प्रभावीपणे समर्थन केलं, कारण त्याने यहोवाच्या आज्ञांचं पूर्णपणे पालन केलं होतं.
१८ स्तेफनच्या भाषणावरून आपण काय शिकू शकतो? त्याला शास्त्रवचनांचं चांगलं ज्ञान होतं. त्याचप्रमाणे, “सत्याच्या वचनाचा चांगल्या प्रकारे उपयोग” करायचा असेल, तर आपणही देवाच्या वचनाचा काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे. (२ तीम. २:१५) इतरांच्या भावना विचारात घेऊन त्यांच्याशी आदराने बोलण्याबद्दलही आपण स्तेफनकडून बरंच काही शिकू शकतो. खरंतर त्याचं भाषण ऐकणारे लोक त्याच्याविरुद्ध द्वेषाने पेटले होते. असं असूनही, शक्य तितका वेळ तो त्यांना पटणाऱ्या आणि त्यांना आदर वाटत असलेल्या गोष्टींबद्दल व व्यक्तींबद्दल त्यांच्याशी बोलला. तसंच, आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना “वडीलजनांनो” असं म्हणून, त्याने त्यांना आदर दाखवला. (प्रे. कार्यं ७:२) आपणही देवाच्या वचनताल्या सत्याबद्दल इतरांशी बोलताना, “सौम्यतेने आणि मनापासून आदर दाखवून” बोललं पाहिजे.—१ पेत्र ३:१५.
१९ पण लोकांच्या भावना दुखावतील या भीतीने आपण कधीही देवाच्या वचनातलं सत्य त्यांना सांगण्याचं टाळत नाही. तसंच, यहोवाच्या न्यायाचा संदेश स्पष्टपणे सांगायलाही आपण घाबरत नाही. स्तेफनच्या उदाहरणावरून आपल्याला हेच पाहायला मिळतं. न्यायसभेसमोर इतके पुरावे मांडूनही, त्या कठोर मनाच्या न्यायाधीशांवर कसलाच परिणाम होणार नाही हे स्तेफनने ओळखलं. म्हणून, पवित्र शक्तीच्या प्रेरणेने त्याने आपल्या भाषणाच्या शेवटी अगदी न घाबरता त्यांना हे सांगितलं की तेही योसेफ, मोशे आणि इतर सर्व संदेष्ट्यांना नाकारणाऱ्या त्यांच्या पूर्वजांसारखेच होते. (प्रे. कार्यं ७:५१-५३) इतकंच काय, तर मोशेने आणि सर्व संदेष्ट्यांनी ज्या मसीहाच्या येण्याबद्दल सांगितलं होतं, त्या मसीहाची या न्यायसभेच्या सदस्यांनी हत्या केली होती. आणि असं करून त्यांनी मोशेच्या नियमशास्त्राविरुद्ध सर्वात मोठा अपराध केला होता!
अध्याय ४९
तो खडकासारखा मजबूत झाला
साक्ष द्या अध्या. ७, चौकट
पेत्र “राज्याच्या किल्ल्या” वापरतो
येशूने पेत्रला सांगितलं, “मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन.” (मत्त. १६:१९) येशूच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? “किल्ल्या” या शब्दावरून असं सूचित होतं, की पेत्र वेगवेगळ्यायेशूने पेत्रला सांगितलं, “मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन.” (मत्त. १६:१९) येशूच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? “किल्ल्या” या शब्दावरून असं सूचित होतं, की पेत्र वेगवेगळ्या गटाच्या लोकांना मसीहाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी ज्ञान आणि संधी देईल. पेत्रने या किल्ल्यांचा वापर कोणकोणत्या वेळी केला? गटाच्या लोकांना मसीहाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी ज्ञान आणि संधी देईल. पेत्रने या किल्ल्यांचा वापर कोणकोणत्या वेळी केला?
● पेत्रने इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी यहुदी आणि यहुदी धर्म स्वीकारलेल्या लोकांना ‘पश्चात्ताप करा आणि बाप्तिस्मा घ्या’ असं सांगितलं. तेव्हा त्याने राज्याची पहिली किल्ली वापरली. जवळजवळ ३,००० लोकांनी त्याच्या सांगण्याप्रमाणे केलं आणि भविष्यात त्यांना स्वर्गात राज्य करण्याची आशा मिळाली.—प्रे. कार्यं २:१-४१.
● दुसरी किल्ली स्तेफनच्या हत्येनंतर काही काळाने वापरण्यात आली. या वेळी पेत्र आणि योहान यांनी नुकताच बाप्तिस्मा घेतलेल्या शोमरोनी लोकांवर हात ठेवले, ज्यामुळे त्या नवीन शिष्यांना पवित्र शक्ती मिळाली.—प्रे. कार्यं ८:१४-१७.
● पेत्रने इ.स. ३६ मध्ये कर्नेल्य याला साक्ष दिली, तेव्हा त्याने राज्याची तिसरी किल्ली वापरली. प्रेषित पेत्रने साक्ष दिल्यामुळे, कर्नेल्य हा सुंता न झालेल्या विदेश्यांपैकी पहिला ख्रिस्ती शिष्य बनला. अशा रितीने, सुंता न झालेल्या विदेश्यांनाही स्वर्गाच्या राज्याचे वारस होण्याची आशा मिळाली.—प्रे. कार्यं १०:१-४८.
साक्ष द्या अध्या. ९ ¶१, तळटीप
“देव लोकांमध्ये भेदभाव करत नाही”
इ.स. ३६ चं वर्ष. यापो या बंदर शहरात, समुद्राजवळ असलेल्या एका घराच्या गच्चीवर, पेत्र दुपारच्या उन्हात प्रार्थना करत आहे. काही दिवसांपासून तो याच घरी पाहुणा म्हणून राहत आहे. हे घर शिमोनचं आहे. शिमोन चामड्याचा व्यवसाय करतो आणि त्यामुळे सहसा कोणताच यहुदी त्याच्या घरी राहणं पसंत करणार नाही. पण पेत्र तिथे राहायला तयार झाला, यावरून त्याच्या मनात अशा चुकीच्या भावना नसाव्यात असं दिसतं. तरीही, यहोवा कोणताच भेदभाव करत नाही याविषयी एक महत्त्वाचा धडा पेत्रला लवकरच शिकायला मिळणार आहे.
[तळटीप]
चामड्याचं काम करणाऱ्यांना काही यहुदी तुच्छ समजायचे. कारण हे काम करणाऱ्यांना मेलेल्या प्राण्यांच्या कातडीला स्पर्श करावा लागायचा. तसंच, काही किळसवाण्या गोष्टींचाही वापर करावा लागायचा. चामड्याचं काम करणाऱ्यांनी मंदिरात येऊ नये असं समजलं जायचं. त्यांनी त्यांचा व्यवसाय शहराच्या कमीत कमी ७० फूट दूर राहून करावा, असा नियम करण्यात आला होता. म्हणूनच कदाचित शिमोनचं घर “समुद्राजवळ” होतं.—प्रे. कार्यं १०:६.
टेहळणी बुरूज१७.०४ २६-२७ ¶१५-१७
न्यायाबद्दल तुमचाही दृष्टिकोन यहोवासारखाच आहे का?
१५ यरुशलेममध्ये झालेल्या सभेनंतर, काही काळातच पेत्रने सिरीयातील अंत्युखिया या शहराला भेट दिली. तिथे त्याने यहुदी नसलेल्या बांधवांसोबत वेळ घालवला. पेत्रच्या अनुभवातून आणि ज्ञानातून या बांधवांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे त्यांना किती आनंद झाला असेल याचा विचार करा. पण, नंतर असं काहीतरी घडलं ज्यामुळे त्या बांधवांना खूप आश्चर्य वाटलं असावं आणि दुःखही झालं असावं. असं काय घडलं? पेत्रने अचानक यहुदी नसलेल्या बांधवांसोबत खाण्यापिण्याचं सोडून दिलं. त्याने बर्णबा आणि इतर यहुदी ख्रिश्चनांनाही तसं करण्यास प्रेरित केलं. आध्यात्मिक रीत्या प्रौढ असलेल्या या ख्रिस्ती वडिलाने मंडळीत फूट निर्माण होईल अशी गंभीर चूक का केली असावी? आणि, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जर मंडळीतील वडिलांच्या वागण्या-बोलण्यामुळे आपलं मन दुःखावलं गेलं, तर पेत्रचं उदाहरण लक्षात ठेवल्यास आपल्याला कशी मदत होईल?
१६ गलतीकर २:११-१४ वाचा. पेत्रला मनुष्यांची भीती वाटत असल्यामुळे त्याने ही गंभीर चूक केली होती. (नीति. २९:२५) परराष्ट्रीयांबद्दल यहोवाला कसं वाटतं हे पेत्रला चांगलं माहीत होतं. तरी, त्यांच्यासोबत संगती केली तर सुंता झालेले जे यहूदी ख्रिस्ती यरुशलेममधून आले होते, ते आपल्याबद्दल काय विचार करतील या गोष्टीची त्याला भीती वाटत होती. त्यानंतर, प्रेषित पौल पेत्रला भेटला आणि त्याला सांगितलं की तो ढोंगीपणा करत आहे. कारण पौलने स्वतः पाहिलं होतं, की पेत्रने इ.स. ४९ साली यरुशलेममध्ये झालेल्या सभेत कशा प्रकारे परराष्ट्रीयांचं समर्थन केलं होतं. (प्रे. कार्ये १५:१२; गलती. २:१३) पेत्रने यहूदी नसलेल्या ज्या ख्रिश्चनांसोबत संगती करण्याचं थांबवलं होतं त्यांना पेत्रच्या वागणुकीबद्दल कसं वाटलं असावं? या गोष्टीला ते स्वतःच्या अडखळण्याचं कारण ठरू देणार होते का? पेत्रने जी चूक केली त्यामुळे तो त्याच्या जबाबदाऱ्या गमावणार होता का?
क्षमा करण्यास तयार राहा
१७ पेत्रने नम्रपणे पौलकडून मिळालेलं ताडन स्वीकारलं. झालेल्या चुकीमुळे पेत्रला त्याच्या जबाबदाऱ्या गमवाव्या लागल्या असं शास्त्रात कुठंही सांगितलेलं नाही. खरंतर, नंतर त्याने देवाच्या प्रेरणेने मंडळ्यांना दोन पत्रं लिहिली आणि त्यांचा समावेश बायबलमध्ये करण्यात आला. पेत्रने आपल्या दुसऱ्या पत्रात पौलला “प्रिय बंधू पौल” असं म्हटलं. (२ पेत्र ३:१५) पेत्रने केलेल्या चुकीमुळे यहूदी नसलेल्या ख्रिश्चनांना खूप दुःख झालं असेल. पण, मंडळीचे मस्तक असलेल्या येशूने पेत्रचा मंडळीत उपयोग करण्याचं थांबवलं नाही. (इफिस. १:२२) खरंतर, मंडळीतील बांधवांना आणि बहिणींना यहोवा आणि येशूचं अनुकरण करण्याद्वारे पेत्रला माफ करण्याची संधी होती. या अपरिपूर्ण मानवाच्या चुकीला इतरांनी स्वतःच्या अडखळण्याचं कारण बनू दिलं नसेल अशी आपण आशा ठेवू शकतो.
अनिष्ट दिवस येण्याआधी यहोवाची सेवा करा
९ प्रेषित पेत्र जेव्हा जास्त गरज असलेल्या ठिकाणी सेवा करायला गेला तेव्हा कदाचित त्याने पन्नाशी ओलांडलेली असावी. असे आपण का म्हणू शकतो? जर तो येशूच्याच वयाचा किंवा त्याच्यापेक्षा थोडा मोठा असेल, तर इ.स. ४९ मध्ये जेरूसलेममध्ये पेत्र व इतर प्रेषितांची सभा झाली त्या वेळी त्याचे वय ५० च्या आसपास असावे. (प्रे. कृत्ये १५:७) त्या सभेच्या काही काळानंतर, पेत्र बॅबिलोनला राहायला गेला. त्या भागात बरेच यहुदी राहत होते आणि त्यांना प्रचार करता यावा म्हणूनच पेत्र तेथे गेला असावा. (गलती. २:९) इ.स. ६२ च्या सुमारास त्याने त्याचे पहिले प्रेरित पत्र लिहिले तेव्हा तो बॅबिलोनमध्येच राहत होता. (१ पेत्र ५:१३) परक्या देशात जाऊन राहताना साहजिकच अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. पण, पेत्राने केवळ वय वाढले आहे म्हणून यहोवाच्या सेवेत पुरेपूर योगदान देण्याची सुसंधी दवडली नाही.
वेब सिरीझ “बायबल अभ्यासाचा उपक्रम”
देव भेदभाव करत नाही
तरुणांसाठी
सूचना: एखाद्या शांत ठिकाणी बसून हा अभ्यास करा. वचनं वाचत असताना ती घटना आपल्या डोळ्यांसमोर उभी करा. तुम्ही तिथे आहात अशी कल्पना करा. तिथल्या लोकांचे आवाज ऐकायचा प्रयत्न करा. तसंच त्यांच्या मनात काय चाललंय हे समजून घ्यायचाही प्रयत्न करा.
मुख्य व्यक्ती: कर्नेल्य, पेत्र
सारांश: पेत्र भेदभाव न करता विदेशी असलेल्या कर्नेल्यला प्रचार करतो. असं करून तो देवासारखा वागतो.
१ घटनेचा विचार करा. —प्रेषितांची कार्यं १०:१-३५, ४४-४८.
कर्नेल्य कसा दिसत असेल?
.....
स्वर्गदूताशी बोलताना कर्नेल्यला कसं वाटलं असेल? (वचनं ३-६)
.....
कर्नेल्य आणि त्याच्या सेवकांमध्ये काय बोलणं झालं असेल? (वचनं ७ आणि ८)
.....
२ आणखी खोलवर अभ्यास करा.
१०-१६ वचनांमध्ये सांगितलेल्या दृष्टान्ताचा पेत्रवर चांगला प्रभाव पडला असं का म्हणता येईल? (उत्तरासाठी वचन १४ मध्ये सांगितलेल्या पेत्रच्या यहुदी पार्श्वभूमीचा विचार करा.)
.....
वचन २५ मधून कर्नेल्यचा कोणता गुण दिसून येतो? कर्नेल्यच्या पदाचा विचार केला, तर त्याने हा गुण दाखवणं विशेष आहे असं का म्हणता येईल? (उत्तरासाठी वचन १ पाहा.)
.....
संशोधनाच्या साधनांचा वापर करून, कर्नेल्यला ज्या इटालियन सैन्याच्या तुकडीवर अधिकार होता त्यात किती सैनिक होते हे शोधा.
.....
कर्नेल्य ख्रिस्ती बनला ही गोष्ट इतकी विशेष का होती?
.....
३ शिकलेल्या गोष्टी लागू करा. खाली दिलेल्या गोष्टींबद्दल तुम्ही काय शिकलात ते लिहून काढा.
दृष्टान्तांचा किंवा उदाहरणांचा योग्य वापर.
.....
देव भेदभाव करत नाही.
.....
तुम्ही भेदभाव करत नाही हे कसं दाखवू शकता?
.....
४ या घटनेतल्या कोणत्या भागातून तुम्हाला सगळ्यात जास्त शिकायला मिळालं, आणि का?
. . . . .
अध्याय ५०
त्याने स्वतःला पूर्णपणे बदललं!
शौल—प्रभूचे निवडलेले पात्र
किलिकिया (सध्या दक्षिण तुर्कस्थानात असलेल्या) या रोमन प्रांतातील प्रमुख शहर आणि राजधानी असणाऱ्या तार्स नगरातून शौल आला होता एवढे आपल्याला माहीत आहे. या प्रदेशात यहुदी समाजाचे लोक मोठ्या संख्येने वास्तव्यास होते; तरीसुद्धा येथे राहताना शौलावर यहुदेतर संस्कृतीचाही प्रभाव पडला असेल. शिवाय, तार्स हे एक मोठे, सुसंपन्न शहर होते आणि ते हेल्लेणी, अर्थात ग्रीक विद्येचे माहेरघर मानले जायचे. पहिल्या शतकात या शहराची लोकसंख्या अंदाजे ३,००,००० ते ५,००,००० होती. आशिया मायनर, सिरिया आणि मेसोपोटेमिया यांच्या प्रमुख हमरस्त्यावर असलेले हे एक व्यापारी केन्द्र होते. तार्सच्या सुबत्तेची मुख्य कारणे म्हणजे व्यापार आणि या शहरासभोवतीचा सुपीक प्रदेश; धान्ये, द्राक्षारस आणि तागाचे कापड ही येथील प्रमुख उत्पादने होती. शेळीच्या लोकरीपासून कापड तयार करण्याच्या उद्योगाला या शहरात भरभराट होती; या कापडापासून तंबू तयार केले जात.
साक्ष द्या अध्या. ८, चौकट ¶१-३
“मंडळीत शांतीचा काळ आला”
प्रेषितांची कार्यं या पुस्तकात, स्तेफनला दगडमार करण्याबद्दलच्या अहवालात ज्या “शौल नावाच्या एका [तरुणाचा]” उल्लेख करण्यात आला आहे, तो तार्सचा राहणारा होता. हे आजच्या टर्की देशाच्या दक्षिणेकडे असलेल्या किलिकिया या रोमन प्रांताचं राजधानी शहर होतं. (प्रे. कार्यं ७:५८) या शहरात बरेच यहुदी राहत होते. शौलने स्वतः असं लिहिलं: मी “आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएल राष्ट्रातला आणि बन्यामीन वंशातला आहे. मी इब्री आईवडिलांपासून जन्मलेला एक इब्री आहे. नियमशास्त्राच्या बाबतीत म्हणाल, तर मी एक परूशी आहे.” म्हणूनच तो यहुद्यांमध्ये नावाजलेला होता.—फिलिप्पै. ३:५.
शौल एका मोठ्या आणि श्रीमंत व्यापारी शहरात राहत होता. हे शहर ग्रीक संस्कृतीचं केंद्र होतं. तार्समध्ये लहानाचा मोठा झालेल्या शौलला ग्रीक भाषा येत होती. कदाचित त्याचं प्राथमिक शिक्षण यहुदी शाळेत झालं असावं. शौल ज्या भागात राहत होता, तिथले लोक तंबू बनवण्याचं काम करायचे आणि शौलनेही हे काम शिकून घेतलं होतं. कदाचित शौल लहान वयातच आपल्या वडिलांकडून हे काम शिकला असावा.—प्रे. कार्यं १८:२, ३.
शौल हा जन्मापासूनच रोमन नागरिक होता हेही आपल्याला प्रेषितांची कार्यं या पुस्तकातून समजतं. (प्रे. कार्यं २२:२५-२८) कदाचित, त्याच्या पूर्वजांपैकी एखाद्याने आधीच हे नागरिकत्व मिळवलं असेल. शौलच्या कुटुंबाला रोमचं नागरिकत्व नेमकं कसं मिळालं होतं, हे सांगण्यात आलेलं नाही. काहीही असो, यामुळे ते त्यांच्या प्रांतातल्या प्रतिष्ठित लोकांपैकी होते. या सर्व गोष्टींसोबतच पौलने घेतलेल्या शिक्षणामुळेही त्याला यहुदी, ग्रीक आणि रोमन अशा तिन्ही संस्कृतींचं चांगलं ज्ञान होतं.
वाचकांचे प्रश्न
प्रेषित पौलने स्वतःला “अकाली जन्मलेल्यासारखा” म्हटलं तेव्हा त्याला नेमकं काय म्हणायचं होतं? (१ करिंथकर १५:८)
१ करिंथकर १५:८ या वचनात पौलने म्हटलं: “सर्वात शेवटी, अकाली जन्मलेल्यासारखा जो मी, त्या मलासुद्धा तो दिसला.” पौलला एका दृष्टान्तात येशू त्याच्या स्वर्गीय गौरवात दिसला होता, त्या अनुभवाबद्दल या ठिकाणी पौल सांगत होता. पण त्याने स्वतःला “अकाली जन्मलेल्यासारखा” असं का म्हटलं? आधी आपला असा समज होता, की जेव्हा पौलने येशूला स्वर्गीय गौरवात पाहिलं तेव्हा एका अर्थाने स्वर्गीय जीवनासाठी पौलचा जन्म किंवा पुनरुत्थान वेळेआधीच झालं. स्वर्गीय पुनरुत्थान होण्यासाठी अजून बरीच शतकं बाकी असूनही त्याला हा बहुमान मिळाला होता. आणि या अर्थाने त्याने स्वतःला “अकाली जन्मलेल्यासारखा” म्हटलं असावं. या वचनाचा आणखी खोलवर अभ्यास केल्यानंतर असं दिसून आलंय, की या वचनाबद्दलच्या आपल्या समजुतीत फेरबदल करायची गरज आहे.
तर मग स्वतःला “अकाली जन्मलेल्यासारखा” असं पौलने म्हटलं तेव्हा त्याला नेमकं काय म्हणायचं होतं? याची वेगवेगळी स्पष्टीकरणं असू शकतात.
पौलच्या परिवर्तनाची घटना अचानक घडलेली आणि धक्कादायक होती. जेव्हा बाळाचा अकाली जन्म होतो तेव्हा ती घटना अनपेक्षित असते. त्याच प्रकारे जेव्हा शौल (ज्याला नंतर पौल म्हणण्यात आलं) दिमिष्क इथल्या ख्रिश्चनांचा छळ करण्यासाठी तिथे जात होता, तेव्हा वाटेत आपल्याला पुनरुत्थान झालेल्या येशूचा एक दृष्टान्त दिसेल अशी त्याने अपेक्षा केली नव्हती. पौलचं परिवर्तन झालं तेव्हा ही गोष्ट फक्त त्याच्या स्वतःसाठीच नाही, तर ज्या ख्रिश्चनांचा तो दिमिष्कमध्ये जाऊन छळ करणार होता त्यांच्यासाठीसुद्धा अनपेक्षित होती. शिवाय, हा अनुभव त्याच्यासाठी इतका धक्कादायक होता की काही काळासाठी त्याची दृष्टीसुद्धा गेली.—प्रे. कार्यं ९:१-९, १७-१९.
त्याचं परिवर्तन चुकीच्या वेळी झालं. ‘अकाली जन्मलेला’ यासाठी असलेल्या मूळ ग्रीक शब्दाचं भाषांतर ‘चुकीच्या वेळी जन्मलेला’ असंसुद्धा केलं जाऊ शकतं. द जेरूसलेम बायबल यात या वचनाचं असं भाषांतर केलंय: “जणू कोणी अपेक्षा केली नव्हती अशा वेळी माझा जन्म झाला.” पौलचं परिवर्तन झालं, त्या वेळेपर्यंत येशू आधीच स्वर्गात परत गेला होता. आधीच्या वचनांमध्ये पौलने अशा काही लोकांचा उल्लेख केला होता ज्यांनी पुनरुत्थान झालेल्या येशूला स्वर्गात परत जाण्याआधी पाहिलं होतं. पण पौलने स्वतः त्याला पाहिलं नव्हतं. (१ करिंथ. १५:४-८) पण जेव्हा येशूने अनपेक्षितपणे पौलला दर्शन दिलं, त्या वेळी त्याला पुनरुत्थान झालेल्या येशूला संधी मिळाली. पण जणू काही त्याला ती ‘चुकीच्या वेळी’ मिळाली होती. आणि म्हणून त्याने स्वतःला “अकाली जन्मलेल्यासारखा” असं म्हटलं असावं.
तो स्वतःकडे कमीपणा घेत बोलत होता. काही तज्ञांचं असं मत आहे, की पौल या ठिकाणी स्वतःला “अकाली जन्मलेल्यासारखा” असं म्हणत होता, तेव्हा तो स्वतःचीच टीका करत, स्वतःला खूप कमी असल्याचं दाखवत होता. पौलला जर खरंच असं म्हणायचं असेल, तर प्रेषित म्हणून सेवा करायचा जो बहुमान त्याला मिळाला होता, त्याच्या लायकीचे आपण नाही असं तो या ठिकाणी मान्य करत होता. कारण तो म्हणतो: “प्रेषितांमध्ये माझी योग्यता सगळ्यात कमी आहे. इतकंच काय, तर प्रेषित म्हणवून घ्यायचीसुद्धा माझी लायकी नाही, कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला. पण आज मी जो काही आहे, तो देवाच्या अपार कृपेमुळेच आहे.”—१ करिंथ. १५:९, १०.
पौलच्या या शब्दांवरून दिसून येतं, की कदाचित तो अचानक आणि अनपेक्षित रीतीने येशूने त्याला जे दर्शन दिलं होतं त्याबद्दल; अपेक्षा केली नव्हती अशा वेळी त्याचं जे परिवर्तन झालं होतं त्याबद्दल; किंवा तो लायक नसतानाही येशूने त्याला जे दर्शन दिलं होतं त्याबद्दल बोलत असावा. काहीही असो, पण एक गोष्ट मात्र खरी आहे, की पौलसाठी हा अनुभव नक्कीच अविस्मरणीय होता. या अनुभवामुळेच पौलला या गोष्टीची पक्की खातरी झाली होती, की येशूचं पुनरुत्थान झालं आहे. त्यामुळे येशूच्या पुनरुत्थानाबद्दल इतरांना सांगत असताना तो आपल्याला आलेल्या या अनपेक्षित अनुभवाबद्दल बऱ्याच वेळा का बोलला असेल हे समजण्यासारखं आहे.—प्रे. कार्यं २२:६-११; २६:१३-१८.
सावध राहा!०३ २/८ २४-२६
प्राचीन काळात सीरिया कसं होतं?
अब्राहामने दिमिष्क शहरातून प्रवास केल्याचे आणि दावीदने या शहरावर कब्जा मिळवल्याचे कोणतेही पुरावे आजच्या दिमिष्क शहरात सापडत नाहीत. पण तिथे जुन्या काळातल्या या रोमी शहराचे अवशेष आजही पाहायला मिळतात. याशिवाय, एक मुख्य रस्तासुद्धा तिथे पाहायला मिळतो. या रस्त्याचा मार्ग आणि विया रेक्टा (सरळ) म्हटलेल्या प्राचीन रोमी काळातल्या रस्त्याचा मार्ग सारखाच आहे. शौल ख्रिस्ती बनल्यानंतर हनन्याने याच रस्त्यावर असलेल्या एका घरात शौलला भेट दिली होती. (प्रेषितांची कार्यं ९:१०-१९) आजचा हा रस्ता रोमी काळातल्या त्या रस्त्यापेक्षा खूप वेगळा असला, तरी एक गोष्ट मात्र खरी आहे. ती म्हणजे, प्रेषित पौलने इथूनच आपल्या सेवाकार्याची सुरुवात केली होती. हा ‘सरळ’ रस्ता बाब-शर्की या रोमी फाटकाजवळ संपतो. शहराच्या भिंती आणि त्यांवर असलेली घरं पाहून, पौलला एका टोपलीत बसवून शहरातच्या भिंतीतल्या एका खिडकीतून खाली कसं उतरवलं असेल याची आपण कल्पना करू शकतो.—प्रेषितांची कार्यं ९:२३-२५; २ करिंथकर ११:३२, ३३.
पौलाचा कित्ता गिरवून आध्यात्मिक प्रगती करा
“जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपविली आहे, विश्वास राखिला आहे.”—२ तीम. ४:७.
तार्ससचा शौल बुद्धिमान व निश्चयी होता. तरीही, ‘मी पूर्वी दैहिक वासनांनुरुप वागलो,’ असे तो म्हणतो. (इफिस. २:३) मी “पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो,” असे तो स्वतःविषयी नंतर म्हणाला.—१ तीम. १:१३.
२ कालांतराने मात्र शौलाने आपल्या जीवनात बरेच बदल केले. त्याने पूर्वीची जीवनशैली सोडून दिली आणि ‘स्वतःचे हित न पाहता पुष्कळ जणांचे हित पाहण्याकरता’ अर्थात निःस्वार्थ मनोवृत्ती उत्पन्न करण्यासाठी बरेच श्रम घेतले. (१ करिंथ. १०:३३) तो सौम्य मनोवृत्तीचा बनला आणि पूर्वी ज्यांचा तो द्वेष करायचा त्या बांधवांना त्याने कोमल दया दाखवली. (१ थेस्सलनीकाकर २:७, ८, वाचा.) त्याने असे लिहिले: “मी . . . सुवार्तेचा सेवक झालो आहे. मी जो सर्व पवित्र जनातील लहानाहून लहान त्या माझ्यावर ही कृपा अशी झाली की, मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी.”—इफिस. ३:७, ८.
३ याच शौलाला नंतर पौल म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याने सत्यात वाखाणण्याजोगी प्रगती केली. (प्रे. कृत्ये १३:९) आपणही पौलाने लिहिलेली पत्रे, त्याच्या सेवेचा अहवाल यांबद्दलचा अभ्यास करण्याद्वारे व त्याच्या विश्वासाचे अनुकरण करण्याद्वारे सत्यात प्रगती करू शकतो. (१ करिंथकर ११:१ आणि इब्री लोकांस १३:७ वाचा.) वरील गोष्टी केल्याने आपल्याला व्यक्तिगत बायबल अभ्यासाचा एक चांगला परिपाठ घालण्यास, लोकांबद्दल खरे प्रेम विकसित करण्यास व स्वतःविषयी उचित दृष्टिकोन बाळगण्यास प्रेरणा कशी मिळते त्याविषयी आपण पाहू या.
बायबल अभ्यासाचा पौलाचा परिपाठ
४ पौल एक परूशी होता. त्याला “गमलिएलाच्या चरणांजवळ” बसून “वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले” होते. त्यामुळे त्याला शास्त्रवचनांचे बऱ्यापैकी ज्ञान होते. (प्रे. कृत्ये २२:१-३; फिलिप्पै. ३:४-६) त्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर लगचेच तो “अरबस्तानांत”—सिरियाच्या वाळवंटात किंवा कदाचित मनन करण्यास शांत असलेल्या अरेबियन द्वीपकल्पांवरील एखाद्या ठिकाणी गेला असावा. (गलती. १:१७) येशू मशीहा आहे हे सिद्ध करणाऱ्या बायबलमधील काही भागांवर पौलाला मनन करायचे होते. शिवाय, जे काम पौलासाठी वाढून ठेवण्यात आले होते त्या कामासाठी त्याला सज्ज व्हायचे होते. (प्रेषितांची कृत्ये ९:१५, १६, २०, २२) आध्यात्मिक गोष्टींवर मनन करण्याचा पौलाने प्रयत्न केला.
५ व्यक्तिगत बायबल अभ्यासाद्वारे पौलाने जे ज्ञान व जी सूक्ष्मदृष्टी मिळवली होती त्यामुळे तो इतरांना सत्य अगदी प्रभावीपणे शिकवू शकला. जसे की, पिसिदीयातल्या अंत्युखिया येथील एका सभास्थानात शिकवताना पौलाने, येशू मशीहा आहे हे सिद्ध करणाऱ्या इब्री शास्त्रवचनांतील निदान पाच थेट अवतरणांचा उल्लेख केला. पौलाने इब्री शास्त्रवचने थेट उद्धृत न करताही अनेकवेळा त्यांचा उल्लेख केला. बायबलमधून त्याने मांडलेले वाद इतके मन वळावू होते, की देवाची उपासना करणारे ‘पुष्कळ भक्तिमान जण पौल व बर्णबा ह्यांच्यामागे’ आणखी शिकून घेण्याकरता गेले. (प्रे. कृत्ये १३:१४-४४) अनेक वर्षांनंतर, पौल राहत असलेल्या ठिकाणी रोममधील यहुद्यांचा एक गट त्याच्याकडे आला तेव्हा त्याने त्यांना ‘देवाच्या राज्याविषयी साक्ष देण्याकरिता आणि येशूविषयी मोशेच्या नियमशास्त्रावरून व संदेष्ट्यांच्या लेखांवरून त्यांची खातरी करण्याकरिता सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या विषयाची फोड करून’ सांगितली.—प्रे. कृत्ये २८:१७, २२, २३.
६ पौलाला जेव्हा परीक्षांना तोंड द्यावे लागत होते तेव्हासुद्धा तो शास्त्रवचनांचे परीक्षण करीत राहिला व त्यातील ईश्वरप्रेरित सल्ल्यातून शक्ती मिळवत राहिला. (इब्री ४:१२) पौलाचा वध होण्याआधी तो रोममध्ये बंदिवासात असताना त्याने तीमथ्याला “पुस्तके” आणि ‘चर्मपत्रे’ आणायला सांगितली. (२ तीम. ४:१३) हे हस्तलेख, कदाचित इब्री शास्त्रवचनांतील काही भाग होते ज्यांचा उपयोग पौलाने गहन अभ्यास करण्यासाठी केला. विश्वासात स्थिर राहण्याकरता पौलाला शास्त्रवचनांचे ज्ञान असणे महत्त्वाचे होते व बायबल अभ्यासाचा त्याचा परिपाठ असल्यामुळेच त्याला हे ज्ञान मिळवता आले.
७ बायबलचा नियमित अभ्यास आणि अभ्यासलेल्या गोष्टींवर अर्थपूर्ण मनन केल्यास आपण आध्यात्मिक प्रगती करू शकतो. (इब्री ५:१२-१४) देवाच्या वचनाच्या महत्त्वाविषयी स्तोत्रकर्त्याने असे गायिले: “सोन्यारुप्याच्या लक्षावधि नाण्यांपेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मोलवान आहे. तुझ्या आज्ञा मला आपल्या वैऱ्यांपेक्षा अधिक सूज्ञ करितात; कारण त्या सदोदित माझ्या जवळच आहेत. तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून आवरितो.” (स्तो. ११९:७२, ९८, १०१) तुमचा देखील व्यक्तिगत बायबल अभ्यासाचा परिपाठ आहे का? बायबलचे दररोज वाचन करून व वाचलेल्या गोष्टींवर मनन करून तुम्ही देवाची सेवा करताना भवितव्यात मंडळीत तुम्हाला मिळणाऱ्या नेमणुकींसाठी स्वतःला तयार करत आहात का?
शौल लोकांवर प्रेम करायला शिकला
८ ख्रिस्ती बनण्याआधी शौल यहुदी धर्माचा कट्टर अनुयायी होता. यहुदी नसणाऱ्या लोकांबद्दल त्याला कसलीच काळजी नव्हती. (प्रे. कृत्ये २६:४, ५) काही यहुदी लोक स्तेफनास दगडमार करत होते तेव्हा तो त्यांच्याकडे संमतीकारक नजरेने पाहत उभा होता. स्तेफनास दगडमार करून ठार मारताना ख्रिश्चनांचा छळ करून आपण काही वावगे करत नाही, असे कदाचित त्याला या प्रसंगी वाटत असावे. (प्रे. कृत्ये ६:८-१४; ७:५४–८:१) याविषयीच्या ईश्वरप्रेरित अहवालात असे म्हटले आहे: “शौल मंडळीस हैराण करू लागला. तो घरोघर जाऊन पुरुषांना व स्त्रियांनाहि धरून आणून तुरुंगात टाकीत असे.” (प्रे. कृत्ये ८:३) “बाहेरच्या नगरापर्यंत देखील [तो] त्यांचा पाठलाग करीत” असे.—प्रे. कृत्ये २६:११.
९ दिमिष्कातल्या ख्रिस्ताच्या शिष्यांचा छळ करण्यासाठी जात असताना प्रभू येशू शौलाशी बोलला. देवाच्या पुत्राच्या दैवी प्रकाशामुळे शौलाची दृष्टी गेली आणि त्याला दुसऱ्यांची मदत घ्यावी लागली. यहोवाने हनन्याद्वारे शौलाला त्याची दृष्टी पुन्हा मिळवून देईपर्यंत लोकांकडे बघण्याचा शौलाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला होता. (प्रे. कृत्ये ९:१-३०) ख्रिस्ताचा अनुयायी झाल्यानंतर तो सर्व लोकांशी येशूप्रमाणेच समभावनेने वागला. मात्र यासाठी त्याला खूप प्रयत्न करावे लागले. त्याला त्याचा हिंसक स्वभाव बदलावा लागला आणि “सर्व माणसांबरोबर . . . शांतीने” राहावे लागले.—रोम. १२:१७-२१ वाचा.
१० पौल लोकांबरोबर फक्त शांतीनेच राहू इच्छित नव्हता तर तो त्यांच्यावर खरे प्रेम करू इच्छित होता आणि ख्रिस्ती सेवेमुळे त्याला ही संधी मिळाली. त्याच्या पहिल्या मिशनरी दौऱ्यादरम्यान त्याने आशिया मायनरमध्ये सुवार्तेचा प्रचार केला. पौलाचा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा जहाल विरोध होत असूनही त्यांनी नम्र लोकांना ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करण्यास मदत केली. लुस्र व इकुन्या या शहरातल्या लोकांनी एके प्रसंगी पौलाला ठार मारायचा प्रयत्न केला होता तरीसुद्धा पौल व त्याचे सहकारी पुन्हा त्या शहरात गेले.—प्रे. कृत्ये १३:१-३; १४:१-७, १९-२३.
११ नंतर, पौलाने व त्याच्या सोबत असलेल्यांनी फिलिप्पै येथील मासेदोनिया शहरात देवाबरोबर नातेसंबंध जोडू इच्छिणाऱ्या लोकांना शोधले. लुदिया नावाच्या एका यहुदी मतानुसारी स्त्रीने सुवार्ता ऐकली आणि ती ख्रिस्ती बनली. त्या नगरातील अधिकाऱ्यांनी पौल व सीला यांना गजांनी मारले व त्यांना तुरुंगात टाकले. पौलाने तुरुंगाधिकाऱ्यालाही प्रचार केला. परिणाम? तुरुंग अधिकारी आणि त्याच्या कुटुंबाने बाप्तिस्मा घेतला व ते यहोवाचे उपासक बनले.—प्रे. कृत्ये १६:११-३४.
१२ शौल एकेकाळी ज्या लोकांचा छळ करत होता त्याच लोकांचा धार्मिक विश्वास त्याने का स्वीकारला? कोणत्या गोष्टीमुळे एकेकाळी ख्रिश्चनांच्या जीवावर उठलेला हा मनुष्य नंतर देव आणि ख्रिस्त यांच्याबद्दलचे सत्य लोकांनी शिकावे म्हणून आपला जीव धोक्यात घालण्यास तयार असलेला दयाळू व प्रेमळ प्रेषित बनला? पौलच स्वतः याचे उत्तर देतो: “ज्या देवाने मला . . . आपल्या कृपेने बोलाविले, त्याला आपल्या पुत्राला माझ्या ठायी प्रगट करणे बरे वाटले.” (गलती. १:१५, १६) पौलाने तीमथ्याला असे लिहिले: “जे युगानुयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झाली.” (१ तीम. १:१६) यहोवाने पौलाला क्षमा केली. देवाची ही अपात्र कृपा व दया मिळाल्याने पौल इतरांना सुवार्तेचा प्रचार करून त्यांच्यावर प्रेम दाखवण्यास प्रवृत्त झाला.
१३ यहोवा आपल्याही पापांची व चुकांची क्षमा करतो. (स्तो. १०३:८-१४) स्तोत्रकर्त्याने असे विचारले: “हे परमेशा, तू अधर्म लक्षात आणिशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील?” (स्तो. १३०:३) देवाने आपल्यावर दया दाखवली नसती तर आपल्यापैकी कोणालाही पवित्र सेवेचा आनंद लुटता आला नसता किंवा सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याची आशा बाळगता आली नसती. देवाने अपात्र कृपा दाखवून आपल्या सर्वांवर खूप मेहरबानी केली आहे. त्यामुळे, पौलाप्रमाणे आपणही लोकांना प्रचार करण्याद्वारे व बायबलमधील सत्य त्यांना शिकवण्याद्वारे आपले प्रेम दाखवू शकतो. तसेच आपल्या सहविश्वासू बंधूभगिनींचा विश्वास मजबूत करून देखील आपण प्रेम व्यक्त करू शकतो.—प्रेषितांची कृत्ये १४:२१-२३ वाचा.
१४ पौलाला प्रचारकार्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्च करण्याची आणि उत्तम प्रचारक बनण्याची इच्छा होती आणि येशूच्या उदाहरणाची त्याच्या मनावर खोल छाप पडली होती. देवाचा पुत्र येशू याने प्रचार कार्याद्वारे, लोकांना अप्रतिम प्रेम दाखवले. येशूने म्हटले: “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत; ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.” (मत्त. ९:३५-३८) अधिक कामकरी पाठवण्याची पौलाने देवाला विनंती केली असेल आणि त्याने स्वतः एक आवेशी कामकरी बनून या विनंतीच्या सुसंगतेत कार्य केले. तुमच्याविषयी काय? तुम्हीही आपल्या प्रचार कार्याच्या पद्धतीत सुधारणा करू शकता का? किंवा, प्रचार कार्यात कदाचित पायनियरींग करण्याद्वारे तुम्ही तुमचा सहभाग वाढवू शकता का? इतरांना ‘जीवनाचे वचन [घट्ट] धरण्यास’ मदत करण्याद्वारे आपण त्यांना खरे प्रेम दाखवू शकतो.—फिलिप्पै. २:१६.
पौलाचा स्वतःविषयीचा दृष्टिकोन
१५ ख्रिस्ती सेवक या नात्याने पौलाने आपल्यासाठी आणखी एका बाबतीत उल्लेखनीय उदाहरण मांडले. ख्रिस्ती मंडळीत त्याला अनेक नेमणुका मिळत होत्या. तरीपण, त्याला ही पूर्ण जाणीव होती, की त्याने स्वतःच्या बळावर हे आशीर्वाद मिळवले नव्हते किंवा त्याच्या अंगी असलेल्या विशिष्ट गुणांमुळे त्याला हे आशीर्वाद मिळाले नव्हते. तर, देवाच्या अपात्र कृपेमुळे त्याला हे आशीर्वाद मिळाले होते. इतर ख्रिश्चनही सुवार्तेचे प्रभावी सेवक होते, हे पौलाने मान्य केले. देवाच्या लोकांमध्ये त्याला मोठी जबाबदारी मिळाली होती तरीपण तो नम्र होता.—१ करिंथकर १५:९-११, वाचा.
१६ अंत्युखियाच्या एका सिरियन शहरात एका वादाला तोंड फुटले तेव्हा पौलाने तो कसा सोडवला ते पाहा. सुंतेवरून उठलेल्या या वादामुळे ख्रिस्ती मंडळीत दुमत झाले होते. (प्रे. कृत्ये १४:२६–१५:२) सुंता न झालेल्या विदेशी लोकांना प्रचार करण्याच्या कामात पुढाकार घेण्याकरता पौलाची नेमणूक करण्यात आली असल्यामुळे, गैर यहुदी लोकांशी व्यवहार करण्यात आपण पटाईत आहोत व त्याअर्थी, उभा राहिलेला वाद आपण चुटकीसरशी सोडवू शकतो, असे कदाचित त्याला वाटले असेल. (गलतीकर २:८, ९ वाचा.) परंतु, हा वाद सोडवण्यासाठी त्याच्या प्रयत्नांना यश मिळत नसल्याचे त्याला जाणवले तेव्हा, ही बाब जेरुसलेममधील नियमन मंडळाकडे नेण्याच्या योजनेला पाठिंबा देऊन त्याने नम्रता व लीनता दाखवली. नियमन मंडळाने हा वाद ऐकून घेतला मग त्यावर निर्णय दिला आणि हा निर्णय इतर सर्व मंडळ्यांना कळवण्यासाठी काही बांधवांना नेमले, ज्यात पौलाचा देखील समावेश होता तेव्हा पौलाने याला पूर्ण सहकार्य दिले. (प्रे. कृत्ये १५:२२-३१) अशाप्रकारे पौलाने आपल्या सहविश्वासू सेवकांना ‘आदराने आपणापेक्षा थोर मानण्यात’ पुढाकार घेतला.—रोम. १२:१०ख.
१७ हा नम्र प्रेषित पौल, मंडळ्यांतील आपल्या बंधू भगिनींपासून तुटक राहिला नाही. उलट त्याने त्यांच्याशी आणखी जवळीक साधली. रोमकरांना त्याने लिहिलेल्या पत्राच्या शेवटी त्याने २० पेक्षा अधिक बंधू भगिनींची नावे घेऊन त्यांना नमस्कार पाठवला. यांपैकी बहुतेकांची नावे बायबलमधील इतर पुस्तकात आढळत नाहीत व फार कमी जणांना मंडळ्यांत जबाबदाऱ्या होत्या. पण ते यहोवाचे एकनिष्ठ सेवक होते आणि पौलाचे त्यांच्यावर खूप प्रेम होते.—रोम. १६:१-१६.
१८ पौलाच्या नम्र व मैत्रीपूर्ण स्वभावामुळे मंडळ्यांतील बंधूभगिनी विश्वासात मजबूत झाले. इफिससमधील वडिलांना भेटण्याची शेवटची वेळ आली तेव्हा “त्यांनी पौलाच्या गळ्यात गळा घालून त्याचे पुष्कळ मुके घेतले. माझे तोंड तुमच्या दृष्टीस ह्यापुढे पडणार नाही, असे जे त्याने म्हटले होते त्यावरून त्यांना विशेष दुःख झाले.” पण पौल जर घमंडी किंवा तुटक स्वभावाचा असता तर त्याला निरोप देताना त्यांना इतके दुःख झाले असते का?—प्रे. कृत्ये २०:३७, ३८.
१९ आध्यात्मिक प्रगती करू इच्छिणाऱ्या सर्वांनी पौलासारखी नम्र वृत्ती दाखवली पाहिजे. त्याने सहख्रिश्चनांना अशी विनंती केली: “तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरविण्याच्या बुद्धीने काहीहि करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना.” (फिलिप्पै. २:३) या सल्ल्याचे पालन आपण कसे करू शकतो? एक मार्ग म्हणजे, मंडळीतल्या वडिलांना सहकार्य देऊन, त्यांचे मार्गदर्शन स्वीकारून व त्यांनी घेतलेल्या न्यायिक निर्णयांनुसार चालून आपण या सल्ल्याचे पालन करू शकतो. (इब्री लोकांस १३:१७ वाचा.) दुसरा मार्ग म्हणजे, आपल्या मंडळीतल्या सर्व बंधूभगिनींबद्दल मनात गाढ आदर बाळगण्याद्वारे आपण या सल्ल्याचे पालन करू शकतो. यहोवाच्या लोकांच्या मंडळ्यांत, विविध राष्ट्राचे, संस्कृतीचे, वंशाचे व जातीचे लोक आहेत. पौलाप्रमाणे आपणही या सर्वांना निःपक्षपणे व प्रेमाने वागवले पाहिजे, नाही का? (प्रे. कृत्ये १७:२६; रोम. १२:१०क) “देवाच्या गौरवाकरिता ख्रिस्ताने तुमचाआमचा स्वीकार केला तसा तुम्हीहि एकमेकांचा स्वीकार करा,” असे आपल्याला उत्तेजन देण्यात आले आहे.—रोम. १५:७.
जीवनाच्या शर्यतीत ‘धीराने धावा’
२० ख्रिश्चन व्यक्तीच्या जीवनाची तुलना दीर्घ-पल्ल्याच्या शर्यतीशी करता येऊ शकते. पौलाने असे लिहिले: “मी . . . धाव संपविली आहे, विश्वास राखिला आहे; आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेविला आहे; प्रभु जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल; आणि तो केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाहि देईल.”—२ तीम. ४:७, ८.
२१ पौलाच्या उदाहरणाचे अनुकरण केल्यास आपणही सार्वकालिक जीवनासाठी असलेल्या शर्यतीत यशस्वीरीत्या धावू शकू. (इब्री १२:१) तेव्हा, व्यक्तिगत बायबल अभ्यासाचा एक चांगला परिपाठ घालून, लोकांबद्दल गाढ प्रेम विकसित करून व स्वतःविषयी नम्र वृत्ती बाळगून आपण आध्यात्मिक प्रगती करीत राहू या.
अध्याय ५१
“सांत्वनाचा मुलगा”
टेहळणी बुरूज९८ ४/१५ २० ¶४, तळटीप
बर्णबा—‘सांत्वनाचा पुत्र’
सा.यु. पेन्टेकॉस्ट ३३ च्या काही काळानंतर, कुप्र [सायप्रस] येथील लेवी असलेल्या बर्णबाने स्वेच्छेने काही जमीन विकली आणि मिळालेले पैसे प्रेषितांना आणून दिले. त्याने असे का केले? जेरुसलेममधील त्या काळच्या ख्रिस्ती जनांमध्ये, “ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून” देण्याची रीत होती, असे प्रेषितांच्या कृत्यांतील अहवाल आपल्याला सांगतो. स्पष्टच आहे, की बर्णबाने गरज ओळखून एक प्रेमळ कार्य केले. (प्रेषितांची कृत्ये ४:३४-३७) तो कदाचित एक धनी मनुष्य असावा, परंतु राज्य आस्थांच्या वाढीसाठी आपली भौतिक मालमत्ता आणि स्वतःलाही वाहून देण्याकरता त्याने मागेपुढे पाहिले नाही. “लोकांना प्रोत्साहनाची आवश्यकता आहे हे बर्णबाला दिसून आल्याबरोबर तो त्यांना त्याला होईल तसे उत्तेजन देत असे,” असे एफ. एफ. ब्रूस हे विद्वान म्हणतात. दुसऱ्या एका घटनेत जे झाले त्यावरून हे स्पष्ट दिसते.
[तळटीप]
मोशेच्या नियमशास्त्राने जे ठरवले होते त्याचा आपण विचार केल्यास, बर्णबा एक लेवी होता तर त्याच्या नावावर जमीन कशी काय होती. (गणना १८:२०) परंतु ती जमीन पॅलेस्टाईनमध्ये होती की सायप्रसमध्ये हे अजूनही स्पष्ट नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पुढे, कदाचित बर्णबाने जेरुसलेममध्ये प्राप्त केलेली ही जमीन एक कबरस्थानाची जमीन असू शकते. असो, बर्णबाने इतरांना मदत करण्याकरता ती विकून टाकली.
बर्णबा
आता एक असामान्य घटना घडली. “ते प्रभूची सेवा व उपास करीत असता पवित्र आत्मा म्हणाला की, बर्णबा व शौल ह्यांना ज्या कार्यासाठी मी बोलाविले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा.” विचार करा! या दोघांना एक खास नेमणूक देण्यात यावी अशी यहोवाचा आत्मा आज्ञा करतो. “ह्याप्रमाणे पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकीयात येऊन तारवातून कुप्रास गेले.” आता बर्णबालासुद्धा एक प्रेषित, किंवा पाठवलेला असे म्हणायला काही हरकत नव्हती.—प्रेषितांची कृत्ये १३:२, ४; १४:१४.
इन्साइट “कुप्र” ¶७
कुप्र
इतिहासकार लूकने कुप्र बेटावरच्या अधिकाऱ्याला राज्यपाल म्हटलं ते अगदी अचूक आहे. कारण, इ.स.पू. २२ मध्ये कुप्र हे रोमच्या वरिष्ठ सभेच्या अधिकाराखाली आलं. त्यामुळे तिथल्या राज्यपालाला थेट सम्राटाकडून नाही, तर रोमच्या वरिष्ठ सभेकडून राज्यपाल म्हणून नियुक्त केलं जायचं. आणि या अधिकाराने तो रोमच्या वरिष्ठ सभेचा प्रतिनिधी म्हणून काम पाहायचा.
साक्ष द्या अध्या. १२, चौकट
“यहोवाने दिलेल्या अधिकारामुळे धैर्याने” संदेश सांगा
लुस्त्र शहर आणि झ्यूस व हर्मेस देवतांची उपासना
लुस्त्र हे शहर मुख्य रस्त्यांपासून बऱ्याच अंतरावर, डोंगरांमधल्या एकांत ठिकाणी दरीत वसलेलं होतं. कैसर औगुस्त याने या शहराला एक रोमन वसाहत म्हणून घोषित केलं आणि त्याला यूल्या फेलिक्स जेमिना लुस्ट्रा हे नाव दिलं. या शहरात असलेल्या सैन्यावर, डोंगरांत राहणाऱ्या जमातींपासून गलतीया प्रांताचं संरक्षण करण्याची जबाबदारी होती. या शहराचा कारभार पारंपरिक रोमन नागरी व्यवस्थेनुसार चालवला जायचा आणि इथल्या अधिकाऱ्यांनाही रोमन पदव्या दिल्या जायच्या. असं असलं, तरी लुस्त्र शहराची स्वतःची अशी एक ओळख होती. या शहरावर रोमन संस्कृतीपेक्षा लुकवनियाच्या संस्कृतीचाच प्रभाव टिकून राहिला. प्रेषितांची कार्यं पुस्तकातल्या अहवालातही लुस्त्रचे लोक लुकवनियाची भाषा बोलत होते, असं सांगितलेलं आहे.
जुन्या काळातल्या लुस्त्र शहराच्या आसपास खोदकाम करताना ज्या पुरातन वस्तू सापडल्या आहेत, त्यांत “झ्यूसचे पुजारी” असा उल्लेख असलेले लेख आणि हर्मेस देवाचा एक पुतळाही आहे. याच भागात झ्यूस आणि हर्मेस या देवांसाठी बांधलेली एक वेदीही सापडली आहे.
ओव्हिड या रोमन कवीने लिहिलेल्या एका दंतकथेतल्या माहितीमुळे, प्रेषितांची कार्यं यात दिलेला अहवाल आणखी चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत होते. ओव्हिडने असं सांगितलं आहे, की ग्रीक लोक झ्यूस आणि हर्मेस या देवतांची उपासना करायचे. तर, त्याच देवतांना रोमन लोकांमध्ये ज्युपिटर आणि मर्क्युरी ही नावं होती. तो पुढे सांगतो, की या दोन देवतांनी माणसांचं रूप घेऊन डोंगराळ भागात वसलेल्या फ्रुगियाच्या प्रदेशाला भेट दिली. त्यांनी एक हजार घरांची दारं ठोठावून, आपल्याला आश्रय द्यावा अशी विनंती केली, पण कुणीही त्यांना घरात घेतलं नाही. मग, फिलेमोन आणि बॉसिस नावाच्या एका म्हाताऱ्या जोडप्याने आपल्या झोपडीत त्यांचं स्वागत केलं. यामुळे झ्यूस आणि हर्मेस देवतांनी त्यांच्या झोपडीचं, सोन्याने मढलेल्या संगमरवरी मंदिरात रूपांतर केलं. शिवाय, त्यांनी या जोडप्याला मंदिराचा पुजारी आणि पुजारीण म्हणून नेमलं. तसंच, ज्यांनी त्यांना आश्रय द्यायला नकार दिला होता त्या सर्वांची घरं त्यांनी नष्ट केली. प्रेषितांची कार्यं या पुस्तकाविषयी ऐतिहासिक माहिती देणाऱ्या एका पुस्तकानुसार, “लुस्त्रच्या लोकांना पौल आणि बर्णबा यांना पाहून कदाचित याच दंतकथेची आठवण झाली असावी. तेव्हा ते बलिदानं अर्पण करून त्यांचं स्वागत करायला इतके उत्सुक होते यात आश्चर्याची गोष्ट नाही.”
मतभेद मिटवून तुम्ही शांती प्रस्थापित कराल का?
आपल्या सेवकांनी शांतीचा आनंद घ्यावा अशी यहोवा देवाची इच्छा आहे. तसंच, त्यांनी एकमेकांसोबत शांतीने राहावं अशीही तो अपेक्षा करतो. यहोवाचे सेवक जेव्हा असं करतात, तेव्हा ख्रिस्ती मंडळीत शांती टिकून राहण्यासाठी मदत होते. तसंच, यामुळे अनेक जण मंडळीकडे आकर्षित होतात.
उदाहरणार्थ, मादागास्करमध्ये राहणाऱ्या आणि मंत्रातंत्राच्या साहाय्याने लोकांना बरं करणाऱ्या एका मनुष्याने यहोवाच्या लोकांमध्ये असलेली शांती पाहिली. त्याने विचार केला, ‘मी जर कधी कोणत्या धर्माचा अनुयायी झालो, तर तो हाच धर्म असेल.’ कालांतराने त्याने दुरात्म्यांची उपासना करण्याचं थांबवलं, स्वतःच्या वैवाहिक जीवनात आवश्यक ते बदल केले आणि शांतीचा देव यहोवा, याची तो उपासना करू लागला.
या मनुष्याप्रमाणेच दर वर्षी हजारो लोक ख्रिस्ती मंडळीचा भाग बनत आहेत, आणि त्यांना मनापासून हवी असलेली शांती अनुभवत आहेत. असं असलं, तरी बायबलमध्ये आपण वाचतो, की “तीव्र ईर्ष्या आणि द्वेष” यांमुळे मंडळीमध्ये एकमेकांसोबत असलेले आपले मैत्रिपूर्ण संबंध तुटू शकतात आणि समस्या निर्माण होऊ शकतात. (याको. ३:१४-१६) पण, या गोष्टी आपण कशा टाळू शकतो आणि आपल्या बंधुभगिनींसोबत असलेले आपले शांतीपूर्ण नातेसंबंध कसे मजबूत करू शकतो, याविषयी बायबलमध्ये काही चांगले सल्लेही दिले आहेत. हे सल्ले जीवनात उद्भवणाऱ्या काही परिस्थितींमध्ये कसे उपयोगी ठरले, याबद्दल आता आपण पाहू.
समस्या आणि त्यांवर उपाय
“माझ्याबरोबर काम करणाऱ्या एका बांधवासोबत माझं जमत नव्हतं. एकदा जेव्हा आम्ही एकमेकांवर ओरडत होतो, तेव्हा दोन जणांनी आम्हाला पाहिलं.”—क्रिस.
“ज्या बहिणीसोबत सहसा मी प्रचाराला जायचे, तिने अचानक माझ्यासोबत प्रचाराला येणं थांबवलं; तिने माझ्याशी बोलणंही थांबवलं. मला कळलंच नाही तिने असं का केलं?”—जेनेट.
“मी आणि आणखी दोघे जण कॉन्फरंस-कॉलद्वारे फोनवर बोलत होतो. त्यातल्या एकाने गुडबाय म्हटलं. मला वाटलं तो आता लाईनवर नाहीये. म्हणून मग मी त्याच्याविषयी दुसऱ्या व्यक्तीला बरंवाईट सांगू लागलो. पण खरंतर त्या पहिल्या व्यक्तीने फोन कट केलाच नव्हता; त्याने आमचं सगळं बोलणं ऐकलं.”—मायकल.
“आमच्या मंडळीतल्या दोन पायनियर बहिणींचे एकमेकींसोबत मतभेद झाले आणि त्या भांडायला लागल्या. ही गोष्ट मंडळीतल्या इतरांसाठी खूप निराशाजनक होती.”—गॅरी.
वर सांगितलेल्या परिस्थिती कदाचित इतक्या गंभीर वाटणार नाहीत. पण, यांमुळे त्यांत सामील असलेल्या लोकांना कदाचित भावनिक रीत्या फार मोठा त्रास सहन करावा लागला असता. तसंच, त्यांमुळे मंडळीतली शांतीही धोक्यात आली असती. पण आनंदाची गोष्ट म्हणजे, या बंधुभगिनींनी बायबलमध्ये दिलेल्या सल्ल्यांचं पालन केलं आणि गमावलेली शांती पुन्हा मिळवली. त्यांना बायबलमधील कोणत्या काही तत्त्वांमुळे मदत मिळाली?
“सांभाळा, वाटेने भांडू नका.” (उत्प. ४५:२४) योसेफचे भाऊ आपल्या वडिलांकडे परत जात होते, तेव्हा त्याने त्याच्या भांवांना हा सुज्ञ सल्ला दिला. एखादी व्यक्ती स्वतःच्या भावनांवर ताबा मिळवत नाही आणि लगेच नाराज होते, तेव्हा परिस्थिती आणखीनच चिघळू शकते. तसंच, इतरांनाही राग येऊ शकतो. क्रिसला जाणवलं की नम्रता दाखवणं आणि दिलेल्या सूचनांचं पालन करणं कधीकधी त्याला फार अवघड जातं. त्याला स्वतःमध्ये बदल करायची इच्छा होती. त्यामुळे ज्या बांधवासोबत त्याचं भांडण झालं होतं त्याची त्याने माफी मागितली. त्यानंतरही क्रिस त्याच्या भावनांवर ताबा मिळवण्यासाठी मेहनत करत राहिला. तो घेत असलेली मेहनत जेव्हा त्या दुसऱ्या बांधवाने पाहिली, तेव्हा तोही तसंच करण्यास प्रवृत्त झाला. आता ते दोघं आनंदाने मिळून यहोवाची सेवा करतात.
“मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात.” (नीति. १५:२२) जेनेटच्या मैत्रिणीने तिच्याशी बोलणं थांबवलं, तेव्हा जेनेटने वर दिलेल्या वचनातील तत्त्व लागू करण्याचं ठरवलं. मसलत मिळवण्यासाठी, म्हणजेच त्या बहिणीशी बोलण्यासाठी ती तिच्याकडे गेली. जेनेटने तिला विचारलं, ‘माझं काही चुकलं का?’ एकमेकींशी बोलताना सुरुवातीला त्या दोघींनाही थोडं अवघडल्यासारखं वाटलं. पण त्या शांतपणे बोलत राहिल्यामुळे त्यांना अधिक मोकळं वाटू लागलं. दुखावल्या गेलेल्या बहिणीला समजलं, की काही काळापूर्वी झालेल्या घटनेबद्दल तिचा थोडा गैरसमज झाला होता आणि जेनेटने खरंतर तिला दुखावण्यासारखं काहीही केलं नव्हतं. त्या बहिणीने जेनेटची माफी मागितली. आता त्या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत आणि मिळून यहोवाची सेवा करत आहेत.
“तू आपलं अर्पण वेदीजवळ आणत असताना, तुझ्या भावाला तुझ्याविरुद्ध काही तक्रार आहे हे तुला आठवलं, तर तुझं ते अर्पण तिथेच वेदीसमोर ठेवून निघून जा. आधी आपल्या भावाशी समेट कर.” (मत्त. ५:२३, २४) डोंगरावरील उपदेशात येशूने हा सल्ला दिला होता. फोनवर बोलताना मायकल ज्या बांधवाबद्दल वाईट गोष्टी बोलला होता, त्याबद्दल त्याला नंतर पस्तावा झाला. ही परिस्थिती सुधारण्यासाठी जे काही करणं शक्य आहे, ते करण्याचं त्याने ठरवलं. मायकल त्या बांधवाकडे गेला आणि आपण जे बोललो त्याबद्दल आपल्याला वाईट वाटत असल्याचं त्याने त्याला सांगितलं. मग याचा परिणाम काय झाला? मायकल म्हणतो: “माझ्या बांधवाने मला मनापासून माफ केलं.” मायकल आणि तो बांधव पुन्हा चांगले मित्र बनले.
“कोणाविरुद्ध काही तक्रार असली, तरी एकमेकांचे सहन करत राहा आणि एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा.” (कलस्सै. ३:१२-१४) ज्या दोन पायनियर बहिणी मंडळीमध्ये एकमेकींशी भांडल्या होत्या त्यांच्याबाबतीत काय झालं? मंडळीतल्या एका वडिलांनी प्रेमळपणे त्या दोघींना हे समजण्यास मदत केली, की त्यांच्या भांडणाचा इतरांवर वाईट परिणाम होत आहे. त्यांनी एकमेकींशी धीरानं वागलं पाहिजे याची त्या वडिलांनी त्यांना आठवण करून दिली. तसंच, त्यांनी मंडळीत शांती टिकवून ठेवण्यासाठी हातभार लावावा, असंही वडिलांनी सांगितलं. वडिलांनी दिलेला सल्ला त्या बहिणींनी स्वीकारला आणि त्याचं पालन केलं. आता त्या सोबत प्रचार कार्याला जातात आणि एकमेकींसोबत चांगल्या प्रकारे वागतात.
कलस्सैकर ३:१२-१४ या वचनांमध्ये दिलेला सल्ला आपल्यालाही नम्र राहण्यास मदत करतो. तसंच, ज्या व्यक्तीने आपल्याला दुखावलं आहे तिला क्षमा करण्यास व झालेल्या गोष्टींवर विचार न करत राहण्यासही ही वचनं आपल्याला मदत करतात. पण समजा, बरेच प्रयत्न करूनही आपण त्या व्यक्तीला क्षमा करू शकत नसलो, तर काय? अशा वेळी, मत्तय १८:१५ मध्ये सांगितलेल्या तत्त्वामुळे आपल्याला मदत होऊ शकते. या वचनात येशू जरी प्रामुख्याने गंभीर स्वरूपाच्या पापाबद्दल बोलत असला, तरी यात जे तत्त्व सांगितलं आहे त्याचं पालन आपण मतभेद होतात तेव्हा करू शकतो. ज्या व्यक्तीसोबत आपले मतभेद झाले आहेत तिच्याशी आपण नम्रपणे आणि प्रेमळपणे बोलून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू शकतो.
बायबलमध्ये आपल्याला आणखीनही बरेच व्यावहारिक सल्ले मिळतात. त्यांचा आपल्याला फायदा व्हावा यासाठी आपण स्वतःमध्ये पवित्र आत्म्याचं फळ विकसित करण्याची गरज आहे. “आत्म्याचे फळ म्हणजे प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वास, सौम्यता, आत्मसंयम.” (गलती. ५:२२, २३) पुढील गोष्टीवर विचार करा. एखाद्या मशीनमध्ये जेव्हा ऑइल घातलं जातं, तेव्हा ती चांगल्या रीतीने काम करते. अगदी त्याच प्रकारे, जेव्हा आपण हे गुण दाखवतो, तेव्हा मतभेद सोडवण्यासाठी आणि इतरांसोबत चांगले नातेसंबंध ठेवण्यासाठी आपल्याला मदत होते.
वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांमुळे मंडळीची सुंदरता वाढते
प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व वेगळं असतं. प्रत्येकाचे गुण, एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि भावना व्यक्त करण्याची पद्धतही वेगळी असते. यांमुळे एकमेकांसोबत असलेले आपले नातेसंबंध अधिक आनंददायी आणि रोचक होतात. पण यासोबतच, वेगवेगळी व्यक्तिमत्त्वं असल्यामुळे आपल्यामध्ये मतभेद, गैरसमज आणि भांडणंदेखील होऊ शकतात. हे कसं घडू शकतं, याबद्दल एक उदाहरण देताना मंडळीतील एक अनुभवी वडील सांगतात: “लाजाळू स्वभाव असलेल्या व्यक्तीला दिलखुलास आणि अतिउत्साही व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तीसोबत जुळवून घेणं थोडं कठीण जाऊ शकतं. दोघांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये असलेला हा फरक स्वाभाविक वाटू शकतो. पण, त्यामुळे त्या दोघांमध्ये मोठ्या समस्याही निर्माण होऊ शकतात.” मग, दोन भिन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्ती कधीही एकमेकांचे चांगले मित्र बनू शकत नाहीत, असं तुम्हाला वाटतं का? या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी, दोन प्रेषितांच्या उदाहरणांवर विचार करा. प्रेषित पेत्र हे नाव जेव्हा आपल्या समोर येतं, तेव्हा कदाचित आपल्या डोळ्यांसमोर एक अशी व्यक्ती येते, जी नेहमी तिच्या मनात काय आहे हे पटकन बोलून दाखवते. याउलट, जेव्हा आपण प्रेषित योहानचा विचार करतो तेव्हा आपल्यासमोर अशा एका व्यक्तीचं चित्र येतं, जी प्रेमळ आहे आणि कोणतीही गोष्ट बोलण्याआधी किंवा करण्याआधी सहसा त्यावर विचार करते. पण बायबल आपल्याला सांगतं, की त्या दोघांनी सोबत मिळून यहोवाची सेवा केली. (प्रे. कार्ये ८:१४; गलती. २:९) आज आपल्याबाबतीतही ही गोष्ट खरी ठरू शकते. अगदी भिन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या दोन ख्रिस्ती व्यक्तींनाही सोबत मिळून काम करणं शक्य आहे.
पण समजा, एखाद्या बांधवाने किंवा बहिणीने तुम्हाला राग किंवा चीड येईल अशी एखादी गोष्ट केली, तर काय? अशा वेळी एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, ती म्हणजे ज्या प्रकारे ख्रिस्ताने तुमच्यासाठी बलिदान दिलं आहे, त्याच प्रकारे त्याने त्या बांधवासाठी किंवा बहिणीसाठीही बलिदान दिलं आहे. आणि त्या बांधवाला किंवा बहिणीला आपण ख्रिस्ती प्रेम दाखवावं अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो. (योहा. १३:३४, ३५; रोम. ५:६-८) त्या व्यक्तीसोबत असलेली मैत्री तोडण्याऐवजी आणि तिला टाळण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, स्वतःला पुढील प्रश्न विचारा: ‘त्या बांधवाने किंवा बहिणीने यहोवाच्या नियमांविरुद्ध काही केलं आहे का? त्याने किंवा तिने मुद्दामहून मला दुखावण्याचा प्रयत्न केला आहे का, की ही गोष्ट फक्त आमच्या भिन्न व्यक्तिमत्त्वांमुळे निर्माण झाली आहे? आणि त्या व्यक्तीमध्ये असे काही चांगले गुण आहेत का, जे माझ्यामध्येही असावेत असं मला वाटतं?’
उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला खूप बोलायला आवडत असेल, पण तुम्हाला मात्र शांत बसायला आवडत असेल. मग अशा व्यक्तीसोबत प्रचाराला जाऊन तिच्याकडून काय शिकता येईल, हे तुम्ही पाहू शकता का? किंवा जर ती व्यक्ती तुमच्यापेक्षा अधिक उदार मनाची असेल, तर वयस्कर लोकांना, आजाऱ्यांना किंवा गरजू लोकांना मदत केल्यामुळे मिळणारा आनंद तुम्ही तिच्या चेहऱ्यावर पाहिला आहे का? उदार मनोवृत्ती दाखवण्याच्या बाबतीत तुम्ही त्या व्यक्तीकडून काही शिकू शकता का? ही उदाहरणं देण्यामागचा मुद्दा हा आहे, की तुमचं आणि इतर बंधुभगिनींचं व्यक्तिमत्त्व जरी वेगवेगळं असलं, तरी तुम्ही त्यांच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करू शकता. ते कदाचित तुमचे सर्वांत चांगले मित्र बनणार नाहीत, पण त्यांच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित केल्याने तुमच्यातले नातेसंबंध अधिक जवळचे होतील यात शंका नाही. आणि यामुळे तुम्हाला आणि मंडळीलाही शांती मिळेल.
पहिल्या शतकातील युवदीया आणि सुंतुखे या दोन बहिणींचं उदाहरण घ्या. त्या दोघींचीही व्यक्तिमत्त्वं फार वेगळी होती असं दिसतं. पण प्रेषित पौलने त्यांना उत्तेजन दिलं, की “प्रभूमध्ये एक मनाचे असा.” (फिलिप्पै. ४:२) बंधुभगिनींसोबत मिळून यहोवाची सेवा करण्याची आणि मंडळीत शांती प्रस्थापित करण्याची आपलीही इच्छा असली पाहिजे.
मतभेद लवकरात लवकर मिटवा
इतरांबद्दल असलेले नकारात्मक विचार मनातून लवकरात लवकर काढून टाकणं का गरजेचं आहे? नकारात्मक विचारांची तुलना आपण सुंदर फुलांच्या बागेतल्या जंगली गवताशी करू शकतो. गवत उपटून टाकलं नाही, तर लवकरच ते संपूर्ण बागेमध्ये पसरून जाईल व बागेला खराब करेल. त्याचप्रमाणे, इतरांबद्दल असलेले नकारात्मक विचार आपल्या मनात मुळावले, तर संपूर्ण मंडळीच्या शांतीवर त्यांचा परिणाम होऊ शकतो. पण, यहोवा देवावर आणि आपल्या बंधुभगिनींवर जर आपलं प्रेम असेल, तर मंडळीतली शांती टिकवून ठेवण्यासाठी आपण होताहोईल तितके प्रयत्न करू.
आपण जेव्हा इतरांसोबत शांती राखण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे किती उत्तम परिणाम घडून येतात, हे पाहून कदाचित आपल्यालाच आश्चर्य वाटेल. एका साक्षीदार बहिणीला जो अनुभव आला, त्याकडे लक्ष द्या. ती म्हणते: “मंडळीतली एक बहीण माझ्याशी अशी वागत होती जशी काय मी लहान मूलच आहे. मला ते बिलकूल आवडत नव्हतं आणि मला त्या गोष्टीची चीडही यायची. माझी चीड वाढत गेली, तसं माझं तिच्याशी बोलणंही कमी होत गेलं. मी तिच्याशी फक्त गरजेपुरतंच बोलायचे. मी विचार केला, ‘ती माझा आदर करत नाही, म्हणून मीही तिचा आदर करणार नाही.’”
पण नंतर या बहिणीने स्वतःच्या वागण्याचं परीक्षण केलं. ती म्हणते: “मला स्वतःमध्ये असलेल्या अनेक चुका दिसू लागल्या आणि त्यामुळे मी निराश झाले. मला जाणवलं की मला स्वतःच्या विचारांमध्ये बदल करण्याची गरज आहे. मग मी यहोवाकडे प्रार्थना केली. तसंच मी त्या बहिणीसाठी एक लहानसं गिफ्ट आणलं आणि तिची क्षमा मागण्यासाठी मी तिला एक कार्डही दिलं. आम्ही एकमेकींना मिठी मारली आणि झालेला प्रकार विसरण्याचं ठरवलं. त्यानंतर आजवर आमच्यामध्ये कधीही मतभेद झाले नाहीत.”
जीवनात सर्वांनाच शांती हवी असते. पण, असुरक्षिततेच्या भावनेमुळे किंवा गर्विष्टपणामुळे लोक अशा रीतीने वागतात ज्यामुळे शांतता भंग होते. जगामध्ये अशा प्रकारची मनोवृत्ती सर्रास पाहायला मिळते. पण यहोवा त्याच्या सेवकांकडून एका वेगळ्या मनोवृत्तीची अपेक्षा करतो. आपल्या सेवकांनी शांतीने आणि ऐक्याने राहावं अशी तो अपेक्षा करतो. यहोवाने पौलला असं लिहिण्यास प्रेरीत केलं, की “तुम्हाला बोलावण्यात आले असल्यामुळे, देवाने बोलावलेल्या लोकांना शोभेल असे चाला.” ख्रिश्चनांना प्रोत्साहन देताना पौल पुढे म्हणाला: “नेहमी नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून प्रेमाने एकमेकांचे सहन करा. तुम्हाला एकमेकांशी बांधून ठेवणाऱ्या शांतीच्या बंधनात, पवित्र आत्म्यामुळे उत्पन्न होणारी एकता टिकवून ठेवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा.” (इफिस. ४:१-३) आज यहोवाच्या लोकांमध्ये जी “एकता” पाहायला मिळते ती खूप मौल्यवान आहे. म्हणूनच, आपसातील मतभेद मिटवून आपली एकता वाढवण्यासाठी आपण प्रत्येक जण होता होईल ते प्रयत्न करू या.
[पान १८, १९ वरची चौकट]
पौल आणि बर्णबा—भिन्न व्यक्तिमत्त्वं असूनही एकमेकांचे भाऊ
पौल हा ठामपणे व उघडपणे आपल्या भावना व्यक्त करणारा मनुष्य होता. ख्रिश्चन बनण्याआधी तो “प्रभूच्या शिष्यांना धमकावत होता आणि त्यांची हत्या करण्याच्या ईर्ष्येने पेटला होता.” (प्रे. कार्ये ९:१) ख्रिश्चनांबद्दल त्याला कसं वाटायचं त्याविषयी त्याने नंतर लिहिलं: मी “त्यांच्याविरुद्ध रागाने वेडापिसा” झालो होतो.—प्रे. कार्ये २६:११.
पौलचा बाप्तिस्मा झाल्यानंतर त्याने आपल्या जीवनात परिवर्तन केलं. पण त्याने ख्रिश्चनांचा केलेला छळ लोक विसरू शकले नव्हते. तो ख्रिश्चन बनल्यावरही काही काळापर्यंत बांधवांना त्याची “भीती वाटत होती आणि तोही एक शिष्य आहे यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता.”—प्रे. कार्ये ९:२६.
पौल यरुशलेमला गेल्यावर, तिकडच्या बांधवांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. पण, कुप्र इथला रहिवासी असलेला एक बांधव, योसेफ याने पौलची मदत केली. योसेफ एक प्रेमळ बांधव होता आणि मंडळीतल्या सर्वांना त्याच्याबद्दल प्रेम व आदर होता. इतकंच नाही, तर बांधवांनी त्याला बर्णबा असं नावही दिलं होतं. या नावाचा अर्थ “सांत्वनाचा पुत्र” असा होतो. (प्रे. कार्ये ४:३६, ३७) बर्णबाने कशा प्रकारे पौलची मदत केली? वृत्तान्तात आपण वाचतो: “बर्णबा त्याला मदत करण्यासाठी पुढे आला. त्याने त्याला प्रेषितांकडे नेले व कशा प्रकारे रस्त्याने जाताना शौलने प्रभूला पाहिले होते आणि प्रभू कसा त्याच्याशी बोलला, तसेच, दिमिष्कात त्याने किती धैर्याने येशूच्या नावाबद्दल घोषणा केली, हे सर्व बर्णबाने प्रेषितांना सविस्तरपणे सांगितले.” (प्रे. कार्ये ९:२६-२८) या सर्व गोष्टी यरुशलेमच्या बांधवांनी बर्णबाकडून ऐकल्या, तेव्हा त्यांनी पौलवर विश्वास ठेवला आणि एक बांधव म्हणून त्याचा स्वीकार केला. त्यानंतर लगेच, पौल आणि बर्णबा मिशनरी या नात्याने सोबत मिळून प्रचार करू लागले. —प्रे. कार्ये १३:२, ३.
पौलचा आवेश आणि प्रामाणिकपणा पाहून बर्णबाने त्याची कदर केली असावी. कारण, पौल कधीही थेटपणे बोलायला किंवा योग्य ते करायला घाबरत नव्हता. बर्णबासारख्या व्यक्तीसोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे पौलनेही कृतज्ञ मनोवृत्ती बाळगली असावी. कारण, बर्णबा हा प्रेमळ आणि इतरांशी कनवाळूपणे वागणारा होता.
पण, बायबल सांगतं की पौल आणि बर्णबा यांच्यात “कडाक्याचे भांडण झाले” होते. त्यांच्यामध्ये कशामुळे मतभेद निर्माण झाला होता? पौल आणि बर्णबा यांच्यात झालेला मतभेद त्यांच्या भिन्न व्यक्तिमत्त्वांमुळे नाही, तर मार्क म्हटलेल्या योहानला मिशनरी या नात्याने आपल्यासोबत घेऊन जायचं की नाही यावरून झाला होता.—प्रे. कार्ये १५:३६-४०.
पौल आणि बर्णबा यांची व्यक्तिमत्त्वं वेगळी असूनही त्यांनी सोबत मिळून आनंदाने यहोवाची सेवा केली. त्यांनी त्यांच्यातला मतभेद नक्कीच मिटवला असेल, कारण नंतर पौलने परत एकदा मार्क म्हटलेल्या योहानसोबत सेवा केली. (कलस्सै. ४:१०) पौल आणि बर्णबाप्रमाणे मंडळीतील ख्रिश्चनांचीही व्यक्तिमत्त्वं वेगवेगळी आहेत. तरीसुद्धा, आपण सगळे सोबत मिळून यहोवाची आनंदाने सेवा करू शकतो.
अध्याय ५२
“मला त्याची खूप मदत होईल”
मार्क ‘सेवेसाठी उपयोगी’
मार्क हा एका श्रीमंत यहुदी कुटुंबाचा होता असे दिसते. त्याचे बालपण जेरूसलेममध्ये गेले. त्याचा पहिल्यांदा उल्लेख येतो, तो सुरुवातीच्या ख्रिस्ती मंडळीच्या इतिहासाच्या संदर्भात. सा.यु. ४४ च्या सुमारास हेरोद अग्रिप्पा पहिला याने प्रेषित पेत्राला तुरुंगात डांबले होते. यहोवाच्या दूताने चमत्कारिकपणे पेत्राची तुरुंगातून सुटका केल्यानंतर, तो “योहान, ज्याला मार्कहि म्हणत, त्याची आई मरीया हिच्या घरी गेला; तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करीत होते.”—प्रे. कृत्ये १२:१-१२.
यावरून असे दिसते, की जेरूसलेम येथील मंडळीच्या सभा मार्कच्या आईच्या घरात होत असाव्यात. तेथे “बरेच लोक” एकत्र जमले होते, यावरून घर मोठे होते असे दिसते. पेत्राने “अंगणाच्या दरवाजाची दिंडी” ठोठावली तेव्हा मरीयेची दासी रुदा हिने दरवाजा उघडला. या माहितीवरून मरीया ही श्रीमंत होती असा अंदाज आपण बांधू शकतो. शिवाय, हे तिच्या पतीचे नव्हे तर तिचे घर होते असे म्हटले आहे. यावरून, ती कदाचित विधवा असावी आणि मार्क अद्याप वयाने लहान असावा असे दिसते.—प्रे. कृत्ये १२:१३, सुबोध भाषांतर.
मार्क ‘सेवेसाठी उपयोगी’
साधारण एका वर्षानंतर पवित्र आत्म्याने पौल व बर्णबा यांना मिशनरी दौऱ्यावर जाण्यास मार्गदर्शित केले. त्यानुसार, ते अंत्युखियाहून कुप्रास गेले. योहान मार्क हाही त्यांच्यासोबत या दौऱ्यावर “सहाय्यक” म्हणून गेला. (प्रे. कृत्ये १३:२-५) प्रेषितांना आध्यात्मिक गोष्टींत पूर्णपणे लक्ष घालता यावे म्हणून, प्रवासाशी संबंधित इतर लहानमोठी कामे कदाचित मार्कने सांभाळली असावीत.
मार्क ‘सेवेसाठी उपयोगी’
मार्कने निरनिराळ्या ठिकाणी दिलेल्या भेटींविषयी वाचताना, त्याने बराच प्रवास केल्याचे दिसून येते. मूळचा तो जेरूसलेमचा होता, पण नंतर अंत्युखियाला राहायला गेला. तेथून तो समुद्रावाटे कुप्र व पिर्गा येथे गेला. मग तो रोमला गेला. तेथून पौल त्याला कलस्सैला पाठवण्याच्या विचारात होता असे आपण वाचतो. पण एवढ्यावरच त्याचा प्रवास संपत नाही!
प्रेषित पेत्राने आपले पहिले पत्र सा.यु. ६२-६४ च्या सुमारास लिहिले होते. त्याने या पत्रात लिहिले: ‘बाबेलातील मंडळी तुम्हाला सलाम सांगते; आणि माझा मुलगा मार्क हाहि सलाम सांगतो.’ (१ पेत्र ५:१३) त्याअर्थी, पेत्र जो अनेक वर्षांपूर्वी मार्कच्या आईच्या घरात ख्रिस्ती सभांना उपस्थित राहायचा, तो बॅबिलोनला गेला तेव्हा मार्कही त्याच्यासोबत सेवा करण्यास बॅबिलोनला गेला होता.
सा.यु. ६५ च्या सुमारास जेव्हा पौल दुसऱ्यांदा रोममध्ये बंदिवान होता तेव्हा त्याने तीमथ्याला इफिसाहून बोलावून घेण्यासाठी पत्र लिहिले. पत्रात पौलाने असेही लिहिले: “मार्काला आपल्याबरोबर घेऊन ये.” (२ तीम. ४:११) याचा अर्थ मार्क त्या वेळी इफिसात होता. आणि पौलाच्या आदेशानुसार तो तीमथ्यासोबत रोमला गेला असेल याची आपण खातरी बाळगू शकतो. त्या काळात प्रवास करणे सोपे नव्हते. तरीसुद्धा, ख्रिस्ती सेवेकरता मार्कने निरनिराळ्या ठिकाणी स्वखुषीने प्रवास केला.
टेहळणी बुरूज०८ २/१ २६ ¶१
मार्कने हार मानली नाही
यावरून मार्कचं आणि पेत्रचं नातं किती घट्ट होतं हे कळतं. कारण त्यांचं देवासोबत चांगलं नातं होतं. हिच गोष्ट आपल्याला मार्कच्या आनंदाच्या संदेशाच्या पुस्तकातही वाचायला मिळते. तिथे पेत्रने स्वतः पाहिलेल्या गोष्टींचं मार्कने खूप चांगल्या प्रकारे वर्णन केलं. जसं की, गालील समुद्रात उठलेल्या वादळाच्या अहवालांचा विचार कर. येशू नावेत कुठे आणि कशावर झोपला होता ही बारीकसारीक माहिती मार्कने त्याच्या पुस्तकात दिली. या गोष्टी पेत्रसारख्या मासेमारी करणाऱ्याच्याच लक्षात येऊ शकतात. आपण मत्तय ८:२४; मार्क ४:३७, ३८ आणि लूक ८:२३ यातल्या अहवालांची तुलना करून बघू शकतो.
टेहळणी बुरूज०८ २/१ २४-२६
मार्कने हार मानली नाही
आपल्या मुलांना शिकवा
बायबलमध्ये येशूच्या जीवनावर चार पुस्तकं आहेत. त्यांपैकी एक पुस्तक मार्कने लिहिलंय. त्या चार पुस्तकांपैकी हे सगळ्यात छोटं आणि वाचायला सोपं पुस्तक आहे. पण मार्क कोण होता? तो येशूला ओळखायचा का? तुला काय वाटतं?—चल मग पाहू या, की मार्कला कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं आणि देवाच्या सेवेत त्याने कधीच हार का मानली नाही.
जेव्हा राजा हेरोद अग्रिप्पाने प्रेषित पेत्रला तुरुंगात टाकलं, तेव्हा पहिल्यांदा बायबलमध्ये मार्कचा उल्लेख येतो. पेत्र तुरुंगात असताना एका रात्री स्वर्गदूताने त्याची सुटका केली. तेव्हा तो थेट मार्कच्या आईच्या घरी गेला. तिचं नाव मरीया होतं. ती यरुशलेममध्ये राहायची. इ.स. ३३ च्या वल्हांडणाच्या वेळी येशूला मारण्यात आलं त्याच्या दहा वर्षांनंतर पेत्रची तुरुंगातून सुटका झाली.—प्रेषितांची कार्यं १२:१-५, ११-१७.
तुला माहीत आहे, पेत्र मरीयाच्या घरी का गेला?—कदाचित तो तिच्या घरच्यांना ओळखत असावा आणि येशूचे शिष्य तिच्या घरी सभेसाठी एकत्र येतात हे त्याला माहीत असावं. मार्कचा एक नातेवाईक होता. त्याचं नाव बर्णबा होतं आणि तो किमान इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या सणापासून येशूचा शिष्य असावा. त्या वेळी येशूच्या नवीन शिष्यांना त्याने मोठ्या मनाने मदत केली होती. त्याबद्दल आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतं. त्यामुळे येशू बर्णबाला, मार्कला आणि त्याच्या आईला ओळखत असावा.—प्रेषितांची कार्यं ४:३६, ३७; कलस्सैकर ४:१०.
मार्कने त्याच्या आनंदाच्या संदेशाच्या पुस्तकात लिहिलं, की ज्या रात्री येशूला पकडण्यात आलं तिथे एक तरुणसुद्धा होता. त्याने “अंगावर फक्त एक उत्तम प्रतीचं मलमलीचं वस्त्र” घातलं होतं. मार्कने लिहिलं, की जेव्हा शत्रूंनी त्या तरुणाला पकडायचा प्रयत्न केला, तेव्हा तो तरुण तिथून पळून गेला. तुला काय वाटतं? तो तरुण कोण होता?—तो कदाचित मार्क असावा. त्यामुळे जेव्हा येशू आणि त्याचे प्रेषित त्या रात्री उशीरा निघाले, तेव्हा मार्कने घाईघाईत एक वस्त्र घातलं आणि तो त्यांच्या मागे गेला.—मार्क १४:५१, ५२.
मार्कचं कुटुंब देवाच्या सेवेत आवेशी होतं. इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टला देवाची पवित्र शक्ती शिष्यांवर ओतण्यात आली तेव्हा तो कदाचित तिथे असावा. तसंच, पेत्रसारख्या देवाच्या विश्वासू सेवकांसोबतही त्याचं चांगलं नातं होतं. तो त्याचा नातेवाईक बर्णबा याच्यासोबतसुद्धा असायचा. येशूने शौलला दर्शन दिलं त्याच्या जवळजवळ तीन वर्षांनी बर्णबाने शौलची पेत्रसोबत ओळख करून दिली आणि त्याला मदत केली. याच्या बऱ्याच वर्षांनंतर बर्णबा शौलला शोधायला तार्सला गेला.—प्रेषितांची कार्यं ९:१-१५, २७; ११:२२-२६; १२:२५; गलतीकर १:१८, १९.
इ.स. ४७ मध्ये बर्णबा आणि शौलला मिशनरी कामासाठी निवडण्यात आलं होतं. त्यांनी मार्कलाही आपल्यासोबत नेलं. पण मार्क काही कारणामुळे त्यांना सोडून यरुशलेमला त्याच्या घरी परत आला. याचा शौलला (याला नंतर पौल या त्याच्या रोमन नावाने ओळखलं जाऊ लागलं.) खूप राग आला. त्याला वाटलं, की मार्कने खूप मोठी चूक केली आहे. ती चूक त्याने खपवून घेतली नाही.—प्रेषितांची कार्यं १३:१-३, ९, १३.
जेव्हा पौल आणि बर्णबा मिशनरी दौरा करून परत आले, तेव्हा त्यांनी त्यांना आलेले चांगले अनुभव भाऊबहिणींना सांगितले. (प्रेषितांची कार्यं १४:२४-२८) याच्या बऱ्याच महिन्यानंतर त्यांनी ज्या ठिकाणी आधी प्रचार केला होता, त्या ठिकाणी परत जायचं आणि नवीनच सत्यात आलेल्यांना भेटायचं ठरवलं. बर्णबाला मार्कला आपल्यासोबत घेऊन जायची इच्छा होती. पण तुला माहीत आहे? याबद्दल पौलला कसं वाटलं?—त्याला मार्कला आपल्यासोबत घेऊन जायची मुळीच इच्छा नव्हती. कारण मार्क याआधी त्यांना सोडून गेला होता. त्यानंतर जे घडलं, त्यामुळे मार्कला नक्कीच खूप वाईट वाटलं असेल.
पुढे पौल आणि बर्णबामध्ये “कडाक्याचं भांडण” झालं आणि ते एकमेकांपासून वेगळे झाले. बर्णबाने मार्कला आपल्यासोबत घेतलं आणि ते कुप्रला प्रचारासाठी गेले. आणि दुसरीकडे पौलने आपल्यासोबत सीलाला घेतलं आणि आधी ठरल्याप्रमाणे ते नवीन शिष्यांना भेटायला गेले. कल्पना कर, मार्कला किती वाईट वाटलं असेल! कारण त्याच्यामुळे पौल आणि बर्णबामध्ये भांडण झालं होतं.—प्रेषितांची कार्यं १५:३६-४१.
मार्क घरी परत का गेला होता याचं कारण आपल्याला माहीत नाही. पण मार्कला कदाचित ते कारण योग्य वाटलं असेल. असं असलं तरी, बर्णबाला या गोष्टीची खातरी होती, की मार्ककडून पुन्हा ती चूक होणार नाही. आणि तसंच झालं. मार्कने हार मानली नाही! नंतर त्याने पेत्रसोबत दूरच्या ठिकाणी जाऊन, म्हणजेच बाबेलमध्ये मिशनरी काम केलं. तिथून पेत्रने भाऊबहिणींना पत्र लिहून नमस्कार कळवला. त्याने म्हटलं: “माझा मुलगा, मार्क हाही तुम्हाला नमस्कार सांगतो.”—१ पेत्र ५:१३.
यावरून मार्कचं आणि पेत्रचं नातं किती घट्ट होतं हे कळतं. कारण त्यांचं देवासोबत चांगलं नातं होतं. हिच गोष्ट आपल्याला मार्कच्या आनंदाच्या संदेशाच्या पुस्तकातही वाचायला मिळते. तिथे पेत्रने स्वतः पाहिलेल्या गोष्टींचं मार्कने खूप चांगल्या प्रकारे वर्णन केलं. जसं की, गालील समुद्रात उठलेल्या वादळाच्या अहवालांचा विचार कर. येशू नावेत कुठे आणि कशावर झोपला होता ही बारीकसारीक माहिती मार्कने त्याच्या पुस्तकात दिली. या गोष्टी पेत्रसारख्या मासेमारी करणाऱ्याच्याच लक्षात येऊ शकतात. आपण मत्तय ८:२४; मार्क ४:३७, ३८ आणि लूक ८:२३ यातल्या अहवालांची तुलना करून बघू शकतो.
नंतर, जेव्हा पौल रोममध्ये तुरुंगात होता, तेव्हा मार्कने त्याला विश्वासूपणे साथ दिल्याबद्दल त्याने त्याचं कौतुक केलं. (कलस्सैकर ४:१०, ११) आणि जेव्हा पौलला पुन्हा तिथेच तुरुंगात टाकण्यात आलं, तेव्हा त्याने तीमथ्यला पत्र लिहून मार्कला त्याच्यासोबत आणायला सांगितलं. तो म्हणाला: “सेवाकार्यात मला त्याची खूप मदत होईल.” (२ तीमथ्य ४:११) खरंच, मार्कने हार न मानल्यामुळे त्याला यहोवाच्या सेवेत मोठे बहुमान मिळाले!
अध्याय ५३
“आतासुद्धा मी तुम्हाला विनंती करतो, की हिंमत धरा”
साक्ष द्या अध्या. ११ ¶७, तळटीप
“आनंदाने आणि पवित्र शक्तीने भरून गेले”
बर्येशू हा राज्याच्या संदेशाचा विरोधक होता. याचं कारण म्हणजे, तो राज्यपाल सिर्ग्य पौल याचा सल्लागार होता आणि त्याचा हा मोठा हुद्दा टिकवून ठेवण्याचा फक्त एकच मार्ग होता. तो म्हणजे, सिर्ग्य पौल याला “प्रभूवर विश्वास” ठेवण्यापासून रोखणं. (प्रे. कार्यं १३:८) म्हणून तो सिर्ग्य पौल याचं राज्याच्या संदेशावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत होता. पण शौलही शांत बसणार नव्हता. मग त्याने काय केलं? अहवालात म्हटलं आहे, “शौल ज्याला पौल असंही म्हटलं जातं, तो पवित्र शक्तीने भरून गेला. त्याने अलीम जादूगाराकडे रोखून पाहिलं आणि तो म्हणाला: ‘अरे सर्व प्रकारच्या कपटाने आणि सर्व प्रकारच्या लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या मुला, सर्व नीतिमत्त्वाच्या वैऱ्या, तू यहोवाच्या सरळ मार्गांचा विरोध करायचं सोडून देणार नाहीस का? पाहा! यहोवाचा हात तुझ्याविरुद्ध उठलाय. तू आंधळा होशील आणि काही काळापर्यंत तुला सूर्यप्रकाश दिसणार नाही.’ इतक्यात त्याच्या डोळ्यांसमोर दाट धुकं आणि अंधार पसरला आणि कोणीतरी आपल्याला हात धरून न्यावं म्हणून तो चाचपडत फिरू लागला.” या चमत्काराचा परिणाम काय झाला? “जे काही घडलं होतं ते पाहून राज्यपालाने प्रभूवर विश्वास ठेवला. कारण यहोवाबद्दलच्या शिकवणीने तो थक्क झाला होता.”—प्रे. कार्यं १३:९-१२.
[तळटीप]
यापुढे शौल याचा पौल असा उल्लेख करण्यात आला आहे. काहींचं असं म्हणणं आहे, की त्याने सिर्ग्य पौल याचा सन्मान म्हणून पौल हे नाव स्वीकारलं. पण त्याने कुप्र सोडल्यावरही पौल हेच नाव वापरलं, यावरून असं दिसतं की यामागे वेगळं कारण असावं. आपल्याला “प्रेषित म्हणून विदेशी लोकांकडे पाठवण्यात” आलं आहे हे माहीत असल्यामुळे, त्याने पुढेही पौल हे रोमन नाव वापरण्याचं ठरवलं असेल. त्याने पौल हे नाव वापरण्यामागे आणखी एक कारण असावं. त्याच्या शौल या हिब्रू नावाचा ग्रीक उच्चार, वाईट अर्थ असलेल्या एका ग्रीक शब्दासारखा आहे.—रोम. ११:१३.
टेहळणी बुरूज०० ७/१५ २६-२७, चौकट ¶३-४
छळामुळे अंत्युखियात वाढ
काही विद्वानांचे असे म्हणणे आहे की, शौलाच्या जीवनकाळात घडलेल्या घटना देखील त्याच काळातल्या असाव्यात. नाहीतर, ‘ख्रिस्ताचा सेवक’ या नात्याने मिशनरी कार्य करत असताना त्याने सोसलेली हालअपेष्टा कधीची असावी? (२ करिंथकर ११:२३-२७) त्याने पाच वेळा यहुद्यांच्या हातून ३९ फटके कधी खाल्ले असावेत? तीन वेळा छड्यांचा मार कधी खाल्ला असावा? तो ‘पुष्कळ वेळा’ बंदिशाळेत केव्हा राहिला असावा? रोममध्ये तर त्याला नंतर कैद केले होते. पण एकदा त्याला छड्या मारून कैद केल्याचे एक वृत्त आहे; हे फिलिप्पैमध्ये घडले होते. मग इतर घटनांविषयी काय? (प्रेषितांची कृत्ये १६:२२, २३) एका लेखकानुसार, या काळादरम्यान शौल “पॅलेस्टाईनच्या बाहेरील यहुदी वसाहतींमधील सभास्थानांमध्ये अशा तऱ्हेने सुवार्तेची साक्ष देत होता की धार्मिक आणि मुलकी अधिकारी त्याचा विरोध करू लागले.”
करिंथकराच्या पुस्तकात तीन वेळा शौलाने त्याचे जहाज फुटले असे म्हटले आहे. परंतु एकाचेच सविस्तर वर्णन आपल्याला बायबलमध्ये आढळते; खरे तर ही घटना करिंथकरांना शौलाने आपल्या हालअपेष्टेविषयी लिहिल्यानंतर घडली होती. (प्रेषितांची कृत्ये २७:२७-४४) त्यामुळे इतर तीन वेळा जहाज फुटल्याच्या घटना त्याच्या इतर प्रवासांमध्ये घडल्या असाव्यात ज्याविषयी आपल्याला काही माहीत नाही. यांतील एक किंवा सगळ्याच घटना त्या “अज्ञात वर्षांमध्ये” घडल्या असल्यास यहुदीयात त्याची खबर पोचली यात नवल काय!
टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१७.५ ९ ¶३-४
तुम्हाला माहीत होतं का?
पौलने पुढचा समुद्रप्रवास काही दिवसांसाठी थांबवायचा जो सल्ला दिला तो योग्य होता का?
पौलला इटलीला घेऊन जाणारं जहाज उलट्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्याविरुद्ध झुंजत होतं. प्रवासात एका ठिकाणी थांबल्यावर पौलने पुढचा प्रवास काही दिवसांसाठी थांबवायचा सल्ला दिला. (प्रेषितांची कार्यं २७:९-१२) त्याने दिलेला हा सल्ला योग्य होता का?
प्राचीन काळातल्या खलाश्यांना हे चांगलं माहीत होतं, की हिवाळ्याच्या महिन्यांत भूमध्य समुद्रातून प्रवास करणं खूप धोकादायक आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत समुद्र प्रवास करायला मनाई असायची. पण पौल ज्या प्रवासाबद्दल बोलत होता तो सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये केला जाणार होता. वेजिटियस नावाच्या एक रोमी लेखकाने (इ.स. चौथ्या शतकातला) त्या काळात केल्या जाणाऱ्या समुद्र प्रवासाबद्दल बरंच स्पष्टीकरण दिलं आहे. तो म्हणतो: “भूमध्य समुद्रात प्रवास करण्यासाठी काही महिने अगदी योग्य असतात, तर काही महिन्यांमध्ये प्रवास करणं योग्य आहे की नाही हे सांगता येत नाही. आणि असेही काही महिने असतात जेव्हा प्रवास करणं अगदीच अशक्य असतं.” वेजिटियस म्हणतात, की २७ मे ते १४ सप्टेंबरपर्यंत जहाजाने प्रवास करणं सुरक्षित असायचं. पण १५ सप्टेंबर ते ११ नोव्हेंबर आणि ११ मार्च ते २६ मे या कालावधीत प्रवास करणं शंकास्पद किंवा अतिशय धोकायदायक असायचं. समुद्र प्रवासाचा बराच अनुभव असलेल्या पौलला या गोष्टींची चांगली जाणीव होती. शिवाय, जहाजाच्या चालकाला आणि मालकालाही या गोष्टींची माहिती असावी. पण तरीसुद्धा त्यांनी पौलने दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं. आणि त्यामुळे शेवटी जहाज फुटलं.—प्रेषितांची कार्यं २७:१३-४४.
टेहळणी बुरूज१५ १०/१ ९ ¶५-६
तुम्हाला माहीत होतं का?
प्रेषित पौल एक खुनी माणूस असावा असं मिलिता बेटावरच्या लोकांना का वाटलं?
मिलिता बेटावरच्या काही लोकांवर ग्रीक धार्मिक शिकवणींचा प्रभाव असावा. प्रेषितांची कार्यं पुस्तकात सांगितल्याप्रमाणे मिलिता इथे पौलचं जहाज फुटल्यानंतर काय घडलं त्याचा विचार करा. किनाऱ्याला आल्यानंतर पौलने आपल्यासोबत जहाजात प्रवास करणाऱ्या लोकांना ऊब मिळावी म्हणून शेकोटी पेटवली. आणि काही काटक्या गोळा करून विस्तवात टाकल्या तेव्हा एक विषारी साप त्यातून बाहेर निघाला आणि त्याने पौलच्या हाताला विळखा घातला. ते पाहून बेटावरचे लोक म्हणाले: “हा माणूस नक्कीच खुनी असावा. म्हणून समुद्रातून सुखरूप वाचल्यावरही न्याय त्याला जिवंत राहू देत नाही.”—प्रेषितांची कार्यं २८:४.
ग्रीक लोकांची “डीकी” नावाची एक न्यायदेवता होती. डीकी या शब्दाचा अर्थ न्याय असा होतो. ग्रीक लोकांची अशी समज होती, की ही न्यायदेवता सगळ्या मानवांवर लक्ष ठेवते. आणि जर कोणी वाईट काम केलं आणि त्याबद्दल त्याला शिक्षा द्यायची गरज असेल, तर ती झ्यूस देवाला सांगते. त्यामुळे बायबलचा एक विद्वान म्हणतो, की बेटावरचे लोक कदाचित असा विचार करत असावेत: जहाज फुटलं तेव्हा पौल जरी वाचला, तरी डीकी देवतेने विषारी सापाचा उपयोग करून त्याला शिक्षा दिली. पण मग नंतर पौलला काहीच झालं नाही हे पाहून लोकांचे विचार बदलले.
“समुद्रावरची संकटे”
रात्रीच्या गर्द काळोखात, २७६ प्रवाशांना वाहून नेणारे एक जहाज भूमध्य सागरात एका बेटाजवळ येते. जहाजातले खलाशी आणि प्रवासी वादळी समुद्रात तब्बल १४ दिवसांपासून हेलकावे खात खात अगदी जर्जर झालेले असतात. पहाटे एक खाडी दिसताच ते जहाज किनाऱ्यावर लावण्याचा प्रयत्न करू लागतात. पण, जहाजाची नाळ वाळूत इतकी गच्च रुतून बसते की जहाज हलेनासे होते आणि लाटांच्या जोराने वराम फुटून जातो. जहाजावर असलेले सर्व लोक समुद्रात उड्या टाकतात आणि कोणी पोहून तर कोणी फळ्यांवर किंवा दुसऱ्या कशावर बसून मिलिताच्या किनाऱ्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतात. थंडीने गारठून गेलेले आणि शिणलेले ते प्रवासी खवळलेल्या समुद्रातून कसेबसे स्वतःला किनाऱ्यापर्यंत ओढतात. या प्रवाशांमध्ये ख्रिस्ती प्रेषित पौल देखील आहे. त्याला रोममध्ये न्यायचौकशीकरता नेले जात आहे.—प्रेषितांची कृत्ये २७:२७-४४.
मिलिताच्या बेटावर जहाज फुटण्याचा अनुभव हा काही पौलाच्या समुद्रप्रवासातला पहिला मरणप्राय अनुभव नव्हता. काही वर्षांआधी त्याने लिहिले होते: “तीन वेळा माझे गलबत फुटले व एक दिवस व एक रात्र मी समुद्रात घालविली.” “समुद्रावरची संकटे” सोसल्याचाही त्याने उल्लेख केला. (२ करिंथकर ११:२५-२७) “परराष्ट्रीयांचा प्रेषित” म्हणून देवाने दिलेली नियुक्ती पूर्ण करणे पौलाला समुद्रप्रवासामुळे शक्य झाले.—रोमकर ११:१३.
पहिल्या शतकात समुद्र प्रवास कोठपर्यंत व्यापलेला होता? ख्रिस्ती धर्माच्या प्रसारात त्याने कितपत हातभार लावला? तो कितपत सुरक्षित होता? कोणत्या प्रकारची जहाजे त्याकाळी असायची? आणि प्रवाशांची कशी सोय केली जायची?
रोमला आवश्यक असणारा जलमार्ग व्यापार
रोमी लोक भूमध्य सागराला मॅरे नॉस्ट्रम—आमचा समुद्र म्हणत. समुद्र मार्गांवर आपले नियंत्रण ठेवणे हे रोमसाठी केवळ लष्करी नव्हे तर इतर कारणांमुळेही अपरिहार्य होते. रोमी साम्राज्यातील कितीतरी शहरांत बंदरे होती आणि काही शहरे इतर शहरांची बंदरे वापरायची. उदाहरणार्थ, रोमचे बंदर हे जवळच असलेल्या ऑस्टिया शहरात होते, तर करिंथ शहर लिचियम आणि किंख्रिया येथील आणि सिरियन अँटिऑक सलुकिया येथील बंदर वापरायचे. या बंदरांमध्ये सुचलित जलसंपर्क असल्यामुळे प्रमुख शहरांमध्ये जलद दळणवळण करणे शक्य होते आणि रोमी प्रांतांचे प्रशासन सुरळीतपणे चालण्यासही मदत होत असे.
अन्न पुरवठ्यासाठीही रोम समुद्री उद्योगांवरच अवलंबून होते. जवळजवळ दहा लाखाची लोकसंख्या असलेल्या रोम शहराला अर्थातच धान्याचा मोठा साठा लागायचा—वर्षाला अंदाजे २,५०,००० ते ४,००,००० टन. एवढा धान्य पुरवठा कोठून यायचा? फ्लेव्हियस जोसीफस याने एकदा हेरोद अग्रिप्पाने केलेले असे विधान उद्धृत केले होते की वर्षाचे आठ महिने रोमला उत्तर आफ्रिकेकडून अन्नपुरवठा होतो, तर उरलेल्या चार महिन्यांकरता आवश्यक असणारा धान्यपुरवठा इजिप्तमधून येतो. रोम शहराला अन्नधान्य पुरवण्यासाठी हजारो जहाजांचा उपयोग होत असे.
रोमी लोक जात्याच ऐषआरामाचे शौकीन. तेव्हा त्यांचे विविध शौक पुरे करण्यासाठी सर्व प्रकारचा विक्रीचा माल, जोराने वाढत चाललेल्या जलमार्ग व्यापाराद्वारे पुरवला जात असे. खनिजे, शिला, आणि संगमरवर सायप्रस, ग्रीस आणि इजिप्तवरून तर लाकूड लेबनॉनवरून आणले जात असे. द्राक्षरस स्मरनाहून, कवचफले दमास्कस आणि खजूर पॅलेस्टाईनहून येत असे. तसेच सलिशिया येथून मलम, उटणे वगैरे आणि रबर; मायलीटस आणि लेऑडिशिया येथून लोकर; सिरिया आणि लेबनॉन येथून कापड; आणि टायर व सायडन येथून खास जांभळी वस्त्रे जहाजांवर लादून रोमला आणली जायची. थायतायरा येथून डाय आणि ॲलेक्झांड्रिया व सायडन येथून काचेच्या वस्तू पाठवल्या जात असत. रेशीम, कापूस, हस्तिदंत आणि मसाले चीन आणि भारतातून आयात केले जायचे.
पौलासहित इतर प्रवाशांना वाहून नेणारे जे जहाज मिलिता येथे फुटले त्याविषयी काय? ते धान्य वाहून नेणारे जहाज होते; “इटालीस जाणारे एक आलेक्सांद्रियाचे तारू.” (प्रेषितांची कृत्ये २७:६, तळटीप, NW) धान्य वाहून नेणाऱ्या या जहाजांचे ताफे ग्रीक, फिनिशियन आणि सिरियन लोकांच्या खासगी मालकीचे होते; या जहाजांवर त्यांचेच नियंत्रण होते आणि तेच जहाजावर आवश्यक वस्तूंचा पुरवठाही करायचे. पण रोमी सरकार ही जहाजे भाड्याने घेऊन वापरत असे. इतिहासकार विल्यम एम. रॅमसे सांगतात त्याप्रमाणे, “करवसुलीच्या बाबतीत होते तसेच, या मोठ्या सरकारी कामासाठी आवश्यक असणारी यंत्रणा, ज्यात माणसे आणि साधने दोन्ही समाविष्ट होते, उभी करण्यापेक्षा हे काम संघटित करण्याचे कंत्राट सोपवणे सरकारला अधिक सोपे जायचे.”
शेवटी, “दयस्कुरै” या निशाणीच्या एका जहाजात पौलाने आपला रोमचा प्रवास पूर्ण केला. हे देखील आलेक्सांद्रियाचे जहाज होते. नेपल्सच्या आखातात पुत्युला बंदरावर हे जहाज येऊन थांबले, या बंदरावर सहसा धान्य वाहून नेणारी जहाजे थांबत असत. (प्रेषितांची कृत्ये २८:११-१३) पुत्युलापासून—म्हणजे आज ज्याला पॉट्स्वॉली म्हणतात त्या बंदरापासून—वाहून आणलेला माल एकतर जमिनीवर वाहून आणला जायचा किंवा मग लहान बोटींवर चढवून समुद्रकिनाऱ्यावरून उत्तर दिशेने टायबर नदीवाटे थेट रोममध्ये आणला जायचा.
पौल आणि त्याच्यासोबतचे शिपाई मालवाहू जहाजावरून का बरे प्रवास करत होते? या प्रश्नाच्या उत्तरासाठी, त्याकाळात समुद्रप्रवास कसा असायचा हे आधी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
मालवाहू जहाजांवर प्रवासी?
सा.यु. पहिल्या शतकात प्रवाशांना वाहून नेणारे जहाज, असा काही प्रकारच नव्हता. व्यापारी लोक व्यापारी जहाजांतून ये जा करीत. आणि या जहाजांतूनच सर्व प्रकारचे लोक प्रवास करीत असावेत—सरकारी अधिकारी, ज्ञानवान लोक, धर्मप्रसारक, जादूगार, कलाकार, खेळाडू, व्यापारी, पर्यटक आणि तीर्थयात्री.
अर्थात, किनाऱ्यालगतच्या प्रदेशांत प्रवाशांसाठी आणि माल नेण्याआणण्यासाठी लहान बोटी होत्या. त्रोवस येथून ‘मासेदोनियात येण्यासाठी’ पौल कदाचित अशाच लहान जहाजाने गेला असावा. तसेच अथेन्स येथूनही येण्याजाण्यासाठी अनेकदा त्याने या बोटींवर प्रवास केला असावा. तसेच नंतर, एशिया मायनरच्या समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या बेटांवरून त्रोवस येथून पातरापर्यंतचा प्रवास करतानाही पौल याच लहान बोटीतून गेला असावा. (प्रेषितांची कृत्ये १६:८-११; १७:१४, १५; २०:१-६, १३-१५; २१:१) अशा लहान जहाजातून जलद प्रवास करणे शक्य होते, पण ही जहाजे जमिनीपासून फार दूर जाऊ शकत नव्हती. त्यामुळे, कुप्रास जाताना, व नंतर पंफुल्याला जाताना, तसेच इफिसाहून कैसरियास आणि पातऱ्यापासून सोर येथे जाण्यासाठी पौलाने ज्या जहाजांतून प्रवास केला ती बरीच मोठी असावीत. (प्रेषितांची कृत्ये १३:४, १३; १८:२१, २२; २१:१-३) मिलिता येथे पौलाचे जे जहाज फुटले होते ते देखील चांगलेच मोठे म्हणता येईल. ही मोठी जहाजे किती मोठी असायची?
वाङ्मयीन माहितीच्या आधारावर एका विद्वानाने म्हटले: “पुरातन काळातील सुसंस्कृत लोकांकडून वापरली जाणारी सर्वात लहान जहाजे जवळजवळ ७० ते ८० टनांच्या क्षमतेची होती. निदान हेल्लेणी युगात अतिशय प्रचलित असणारे जहाज १३० टन क्षमतेचे होते. २५० टन क्षमतेची जहाजेही सहसा आढळायची पण हा आकार सर्वसाधारण जहाजांपेक्षा निश्चितच मोठा होता. रोमी साम्राज्याच्या काळात सरकारी वाहतूक सेवेकरता वापरली जाणारी जहाजे आणखीन मोठी होती, सहसा ३४० टन क्षमतेची जहाजे वापरली जायची. समुद्रप्रवास करणारी सर्वात मोठी जहाजे जवळजवळ १३०० टन क्षमतेची आणि कदाचित त्यापेक्षा थोडी मोठीही असायची.” सा.यु. दुसऱ्या शतकात अभिलिखित केलेल्या एका वर्णनानुसार, आयसिस हे आलेक्सांद्रियाचे धान्यवाहू जहाज ५५ मीटरपेक्षा लांब आणि जवळजवळ १५ मीटर रुंद होते, या जहाजाच्या डेकखाली माल ठेवण्याची जागा जवळजवळ १४ मीटर खोल होती आणि जहाजात एक हजार टनापेक्षा जास्त धान्य आणि कदाचित दोनतीनशे प्रवासी वाहून नेणेही शक्य होते.
या धान्य वाहून नेणाऱ्या जहाजांवर प्रवाशांची सोय कशी केली जात असे? ही जहाजे मुख्यतः मालवाहू असल्यामुळे प्रवाशांच्या सोयीचा प्रश्न दुय्यम होता. पाण्याव्यतिरिक्त, जेवण किंवा इतर कोणत्याही सोयी उपलब्ध नव्हत्या. प्रवासी रात्रीचे डेकवरच तंबूत झोपायचे; हे तंबू रात्री टाकून सकाळी काढावे लागायचे. जहाजावर असलेले स्वयंपाकगृह वापरण्याची कदाचित प्रवाशांना परवानगी असावी, पण स्वयंपाकासाठी, तसेच जेवण, आंघोळ आणि झोपण्यासाठी लागणारे सर्व—भांडीकुंडी, ताटवाट्यांपासून बिछान्यापर्यंत सर्व सामान प्रवाशांना सोबत आणावे लागत.
समुद्रप्रवास—किती सुरक्षित?
आवश्यक साधने,—फार काय, कंपासही उपलब्ध नसल्यामुळे पहिल्या शतकातल्या खलाशांना केवळ आपल्या दृष्टीच्या आधारावर दिशा शोधाव्या लागायच्या. त्यामुळे सहसा मे महिन्याच्या उत्तरार्धापासून ते सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत, जेव्हा दूरपर्यंतचे दृष्य अगदी स्पष्ट दिसत असे, तेव्हाच प्रवास सुरक्षित असायचा. त्याच्याआधीच्या आणि नंतरच्या दोन महिन्यांत व्यापारी क्वचित समुद्रप्रवास करत. पण हिवाळ्यात, धुके आणि ढग असल्यामुळे दुरून सहज दिसणाऱ्या व ओळखू येणाऱ्या खुणा दिसणे कठीण व्हायचे, तसेच दिवसा सूर्य आणि रात्री तारेही दिसायचे नाहीत. त्यामुळे नोव्हेंबर ११ पासून मार्च १० पर्यंत, अगदीच टाळता न येण्यासारखे किंवा अत्यंत तातडीचे अपवाद वगळता, समुद्रप्रवास बंद असायचा (लॅटिन भाषेत, मॅरे क्लॉसम). या काळात प्रवास करणाऱ्यांवर कधीकधी परदेशातल्या एखाद्या बंदरावर हिवाळा घालवण्याची पाळी यायची.—प्रेषितांची कृत्ये २७:१२; २८:११.
धोकेदायक असला आणि सर्वस्वी हवामानावर अवलंबून असला तरीसुद्धा, समुद्रप्रवासाचे भूमार्ग प्रवासाच्या तुलनेत काही खास फायदे होते का? हो, निश्चितच होते. समुद्रप्रवास कमी थकवणारा, स्वस्त आणि जलद होता. वारे अनुकूल असल्यास जहाज दिवसाकाठी जवळजवळ १५० किलोमीटरचे अंतर सहज कापायचे. पण पायी प्रवास करणारा प्रवासी सर्वसाधारण गतीमानाप्रमाणे जास्तीतजास्त २५ ते ३० किलोमीटरच गाठू शकत होता.
जहाजाची गती पूर्णपणे वाऱ्यावर अवलंबून असे. इजिप्त ते इटलीचा प्रवास करताना सतत उलट दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांशी सामना करावा लागत असे, सर्वात अनुकूल हवामानातही. सहसा रुद किंवा मुर्या, किंवा मग एशिया मायनरमध्ये लुक्याच्या समुद्रतटावर असलेल्या दुसऱ्या कोणत्या बंदरामार्गे इटलीस जाता येत असे; हा सर्वात कमी अंतराचा मार्ग होता. एकदा, आलेक्सांद्रियाहून निघालेल्या आयसिस या धान्यवाहू जहाजाला वादळाचे फटके खावे लागले, शिवाय दिशाही चुकल्यामुळे आलेक्सांद्रियाहून निघाल्यानंतर ७० दिवसांनी या जहाजाने पायरियस येथे नांगर टाकले. इटलीहून परतताना मात्र वायव्येकडील वारे जहाजाच्या दिशेनेच वाहत असल्यामुळे, कोठेही न थांबता केवळ २० ते २५ दिवसांत पोचता येत होते. पण भूमार्गे गेल्यास, अनुकूल हवामानांतही याच प्रवासाला, जाण्यासाठी आणि येण्यासाठी प्रत्येकी १५० दिवासांपेक्षा जास्त हमखास लागले असते.
साता समुद्रांपलीकडे सुवार्ताप्रसार
प्रतिकूल हवामानांत समुद्र प्रवास किती धोकेदायक असू शकतो याची पौलाला नक्कीच कल्पना होती. सप्टेंबरच्या उत्तरार्धात किंवा ऑक्टोबरच्या सुरवातीला प्रवासाला निघणे चांगले नाही असे त्याने बोलूनही दाखवले होते: “अहो गृहस्थांनो, ह्या जलप्रवासात केवळ मालाचे आणि तारवांचे नुकसान नव्हे, तर आपल्या जिवांचेहि हाल होऊन मोठी हानि होईल असे मला दिसते.” (प्रेषितांची कृत्ये २७:९, १०) पण पौलाला आणि इतर बंदिवानांना ज्याच्या स्वाधीन करण्यात आले होते, त्या शताधिपतीने पौलाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि शेवटी मिलिताच्या बेटाजवळ आले असताना त्यांचे जहाज फुटले.
पौलाने आपली मिशनरी कारकीर्द संपवली तोपर्यंत त्याला कमीतकमी चार वेळा जहाज फुटण्याचा अनुभव आलेला होता. (प्रेषितांची कृत्ये २७:४१-४४; २ करिंथकर ११:२५) पण अशा दुर्घटनांची अवाजवी भीती बाळगून सुरवातीच्या प्रचारकांनी समुद्रावाटे सुवार्तेचा प्रसार करण्याचे थांबवले नाही. देवाच्या राज्याचा संदेश चहूकडे पसरविण्यासाठी प्रवासाच्या उपलब्ध असलेल्या सर्व माध्यमांचा त्यांनी उपयोग केला. आणि येशूच्या आज्ञेनुसार त्यांनी दूरदूरपर्यंत साक्ष दिली. (मत्तय २८:१९, २०; प्रेषितांची कृत्ये १:८) त्यांनी दाखवलेल्या आवेशामुळे, त्यांच्या उदाहरणाचे ज्यांनी अनुकरण केले त्यांच्या विश्वासामुळे, आणि यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामुळे आज सुवार्ता पृथ्वीच्या अगदी कानाकोपऱ्यापर्यंत पोचली आहे.
अध्याय ५४
त्याने अंधाऱ्या काळात धैर्य दाखवलं
साक्ष द्या अध्या. ४, चौकट ¶३-४
“अशिक्षित आणि सर्वसाधारण” माणसं
आनंदाच्या संदेशाच्या पुस्तकांमधल्या अहवालांत पेत्रचा जितक्या वेळा उल्लेख येतो तितक्या वेळा योहानचा येत नाही. असं असलं तरी योहानही उत्साही व्यक्तिमत्त्वाचा होता. म्हणूनच कदाचित येशूने त्याला आणि त्याचा भाऊ याकोब याला बोआनेर्गेस असं नाव दिलं होतं, ज्याचा अर्थ “गर्जनेची मुलं” असा होतो. (मार्क ३:१७) योहानला आणि त्याच्या भावाला देवाच्या राज्यात मोठा अधिकार मिळावा अशी मागणी करण्यासाठी, त्यांनी त्यांच्या आईला येशूकडे पाठवलं. यावरून हे दिसतं की सुरुवातीला योहान पद मिळवण्यासाठी महत्त्वाकांक्षी होता. त्याच्या या इच्छेमागे जरी स्वार्थी भावना असली, तरी त्यावरून हे दिसतं की त्याचा देवाच्या राज्यावर पक्का विश्वास होता. योहान आणि याकोब यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे येशूने सर्वच प्रेषितांना नम्र होण्याचा धडा दिला.—मत्त. २०:२०-२८.
येशूचा शिष्य नसलेला एक माणूस जेव्हा त्याच्या नावाने दुष्ट स्वर्गदूत काढायला लागला, तेव्हा योहानने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. यावरून हे दिसतं की तो कडक स्वभावाचा होता. तसंच, एकदा येशूने शोमरोनमधल्या एका गावात काही तयारी करण्यासाठी आपल्या शिष्यांना पाठवलं होतं. पण त्या गावातले लोक मदत करायला तयार झाले नाहीत, तेव्हा योहानने लगेच त्या गावावर ‘स्वर्गातून आगीचा वर्षाव करावा का?’ असं येशूला विचारलं. या दोन्ही वेळी येशू त्याच्यावर रागावला. पण पुढे योहानचा स्वभाव शांत झाला आणि तो दयाळूपणे वागू लागला. (लूक ९:४९-५६) योहानमध्ये जरी असे दोष असले, तरी त्याच्यावर “येशूचं प्रेम होतं.” म्हणूनच, येशूने मरण्याआधी त्याच्या आईला सांभाळण्याची जबाबदारी योहानवर सोपवली.—योहा. १९:२६, २७; २१:७, २०, २४.
टेहळणी बुरूज०८ ५/१५ ३० ¶६
प्रेषितांची कृत्ये पुस्तकातील ठळक मुद्दे
४:१३—पेत्र व योहान निरक्षर व अज्ञानी होते असे लोकांनी का म्हटले? कारण धार्मिक शिक्षण मिळण्याकरता पेत्राने व योहानाने रब्बींच्या शाळेत शिक्षण घेतले नव्हते.
१४ आपल्या पुनरुत्थानानंतर येशू गालील समुद्राकाठी शिष्यांसमोर प्रकट होतो. तेथे तो पेत्राला सांगतो: “मी येईपर्यंत त्याने [योहानाने] राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय?” (योहान २१:१, २०-२२, २४) प्रेषित योहान इतर प्रेषितांपेक्षा जास्त काळ जगेल असे या शब्दांवरून सूचित होते का? अशी शक्यता नाकारता येत नाही, कारण तो यानंतर आणखी जवळजवळ ७० वर्षे यहोवाची विश्वासूपणे सेवा करतो. पण येशूच्या बोलण्याचा अर्थ केवळ इतकाच नव्हता.
१५ “मी येईपर्यंत” हे शब्द आपल्याला ‘मनुष्याचा पुत्र त्याच्या राज्यात येण्याविषयी’ येशूने जे सांगितले होते त्याची आठवण करून देतात. (मत्तय १६:२८) येशू येईपर्यंत योहान राहतो, तो या अर्थाने की कालांतराने त्याला, राज्य शासन मिळालेल्या येशूच्या आगमनाचा एक भविष्यसूचक दृष्टान्त दिला जातो. योहानाच्या जीवनाच्या शेवटल्या काळात, पात्म बेटावर हद्दपारीत असताना त्याला प्रकटीकरण व ‘प्रभूच्या दिवसादरम्यान’ घडणार असलेल्या घटनांची अद्भूत भविष्यसूचक चिन्हे दिली जातात. या चमत्कारिक दृष्टान्तांमुळे योहान इतका भारावून जातो की “होय; मी लवकर येतो,” असे येशू म्हणतो तेव्हा योहान उद्गारतो: “आमेन! ये, प्रभू येशू ये.”—प्रकटीकरण १:१, १०; २२:२०.
इन्साइट “योहान, शुभवर्तमान” ¶२-८
योहान याने सांगितलेला आनंदाचा संदेश
लेखक. लेखाचा नाव जरी पुस्तकात दिलेलं नसलं, तरी प्रेषित योहानेने स्वतः हे पुस्तक लिहिलंय असं जवळजवळ सगळ्यांचंच मत आहे. सुरुवातीच्या काळात या पुस्तकाचा लेखक योहान आहे याबद्दल कोणीही आक्षेप घेतला नाही. पण दुसऱ्या शतकातल्या एका छोट्याशा गटाने आक्षेप घेतला. पण त्यांचा हा आक्षेप पुस्तकाच्या लेखकाबद्दल नाही, तर त्यातल्या शिकवणी आपल्या शिकवणींपेक्षा वेगळ्या आहेत असं वाटल्यामुळे होता. पण अलीकडच्या काळात या पुस्तकाचं बारकाईने परीक्षण करणाऱ्या काही आधुनिक टिकाकारांनी या पुस्तकाच्या लेखकाबद्दल शंखा घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या लेखकाबद्दल आता नव्याने प्रश्न उभा राहिला आहे.
जब्दीचा मुलगा, प्रेषित योहान या पुस्तकाचा लेखक आहे याचे बरेच पुरावे या पुस्तकातच सापडतात. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून असलेले हे पुरावे इतके खातरीलायक आहेत, की कुठल्याही प्रकारे आक्षेप घ्यायला जागाच उरत नाही. या पुराव्यांपैकी फक्त काही पुरावेच पुढे दिले आहेत. पण हे पुरावे लक्षात घेऊन एका जागरूक वाचकाला आणखी कितीतरी पुरावे सापडतील. यांपैकी काही पुरावे लक्षात घ्या:
(१) पुस्तकाच्या लेखकाला यहुदी मतांची चांगली समज होती. त्यावरून तो यहुदी असल्याचं दिसतं.—योह १:२१; ६:१४; ७:४०; १२:३४.
(२) लेखक पॅलेस्टाईन देशाचा रहिवासी होता. कारण त्याला त्या देशाची चांगली माहिती होती. तिथल्या ठिकाणांबद्दल त्याने दिलेल्या बारीकसारीक माहितीवरून दिसतं, की ती ठिकाणं त्याच्या खूप ओळखीची होती. उदाहरणार्थ, त्याने आपल्या पुस्तकात ‘यार्देन नदीच्या पलीकडे असलेल्या बेथानीचा’ (योह १:२८) आणि ‘यरुशलेमजवळच्या बेथानीचा’ (११:१८) उल्लेख केला. तसंच, त्याने असंही लिहिलं की येशूला वधस्तंभावर खिळलेल्या ठिकाणी एक बाग होती आणि त्या बागेत एक नवीन कबर होती (१९:४१). याशिवाय, येशू ‘मंदिरात जिथे दानपात्रं ठेवली होती, तिथे शिकवत होता’ (८:२०) आणि “त्या वेळी हिवाळा होता आणि येशू मंदिरात शलमोनच्या वऱ्हांड्यात फिरत होता” असंही त्याने म्हटलं (१०:२२, २३).
(३) लेखकाने स्वतः दिलेली साक्ष आणि वास्तविक पुरावा दाखवतो की त्याने लिहिलेल्या गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्या होत्या. त्याने या पुस्तकात अशा काही व्यक्तींचा नावाने उल्लेख केला आहे ज्यांनी काही गोष्टी म्हटल्या किंवा केल्या (योह १:४०; ६:५, ७; १२:२१; १४:५, ८, २२; १८:१०); उल्लेख केलेल्या घटनांच्या वेळेबद्दलसुद्धा बारीकसारीक माहिती दिली आहे (४:६, ५२; ६:१६; १३:३०; १८:२८; १९:१४; २०:१; २१:४); घटनांचं वर्णन करताना त्याने सख्यांचासुद्धा अगदी सहजपणे उपयोग केला आहे.—१:३५; २:६; ४:१८; ५:५; ६:९, १९; १९:२३; २१:८, ११.
(४) लेखक एक प्रेषित होता. आणि येशूच्या सेवाकार्याशी संबंधित घटनांचा प्रत्यक्ष साक्षीदार एका प्रेषिताशिवाय आणखी कोण असू शकतो? शिवाय, त्याला येशूचे विचार, भावना आणि त्याने केलेल्या गोष्टींमागची कारणं चांगली माहीत होती. यावरूनसुद्धा कळतं, की येशूच्या संपूर्ण सेवाकार्यात त्याच्यासोबत असलेल्या १२ प्रेषितांपैकी तो एक होता. उदाहरणार्थ, तो आपल्याला सांगतो, की येशूने फिलिप्पला त्याची परीक्षा घेण्यासाठी एक प्रश्न विचारला, “कारण थोड्याच वेळात आपण काय करणार आहोत हे त्याला माहीत होतं.” (योह ६:५, ६) तसंच, त्याने असंही लिहिलं, की येशूने ‘शिष्य कुरकुर करत आहेत हे ओळखलं.’ (६:६१) इतकंच नाही, तर “आपल्यासोबत कायकाय घडणार आहे” हे येशूला माहीत होतं असंही त्याने लिहिलं. (१८:४) आणि येशूबद्दल बोलताना तो असंही म्हणाला, की “तो दुःखाने व्याकूळ झाला आणि त्याला गहिवरून आलं.” (११:३३; १३:२१; २:२४; ४:१, २; ६:१५; ७:१ सोबत तुलना करा.) लेखकाला प्रेषितांच्या विचारसरणीची आणि त्यांच्यावर कोणत्या गोष्टींचा प्रभाव होत आहे याचीसुद्धा जाणीव होती. यांपैकी काही गोष्टी चुकीच्या होत्या आणि नंतर त्या सुधारण्यात आल्या.—२:२१, २२; ११:१३; १२:१६; १३:२८; २०:९; २१:४.
(५) याशिवाय, “ज्याच्यावर येशूचं प्रेम होतं तो शिष्य” असं या लेखकाचा उल्लेख करण्यात आलाय. (योह २१:२०, २४) येशूच्या तीन सगळ्यात जवळच्या शिष्यांपैकी असल्यामुळे बऱ्याच खास प्रसंगात येशूने त्याला आपल्यासोबतच ठेवलं होतं. जसं की, येशूचं रूपांतर झालं त्या वेळी (मार्क ९:२) आणि गेथशेमाने बागेत येशू दुःखाने व्याकूळ झाला त्या वेळी. (मत्त २६:३६, ३७) या तीन प्रेषितांपैकी याकोब या पुस्तकाचा लेखक असूच शकत नाही, कारण इ.स. ४४ च्या आसपास हेरोद अग्रीपा पाहिला याने त्याला मृत्युदंड दिला होता. आणि हे पुस्तक इतक्या लवकर लिहिलं गेल्याचा कोणताही पुरावा दिसत नाही. तसंच, पेत्रसुद्धा लेखक असू शकत नाही, कारण ‘ज्याच्यावर येशूचं प्रेम होतं’ त्या शिष्यासोबत पेत्रचा नावाने उल्लेख करण्यात आलाय.—योह २१:२०, २१.
अभ्यास लेख २
“ज्याच्यावर येशूचं प्रेम होतं” त्या शिष्याकडून काय शिकायला मिळतं?
“आपण एकमेकांवर प्रेम करत राहू या, कारण प्रेम देवापासून आहे.”—१ योहा. ४:७.
सारांश
“ज्याच्यावर येशूचं प्रेम होतं तो शिष्य” बहुतेक प्रेषित योहानच असावा. (योहा. २१:७) त्याच्यामध्ये नक्कीच अनेक चांगले गुण असतील आणि म्हणूनच येशूचं त्याच्यावर जास्त प्रेम असावं. पुढे जेव्हा तो वयोवृद्ध झाला तेव्हा यहोवाने त्याला प्रेमाबद्दल बरंच काही लिहिण्याची प्रेरणा दिली. या लेखात आपण योहानने लिहिलेल्या काही गोष्टींबद्दल चर्चा करू. तसंच, त्याच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो हेसुद्धा पाहू.
प्रेषित योहानने आपल्या पत्रात लिहिलं, की “देव प्रेम आहे.” (१ योहा. ४: ८) या छोट्याशा वाक्यातून एक महत्त्वाचं सत्य आपल्या लक्षात येतं. ते म्हणजे, यहोवा जीवनाचा उगम तर आहेच, पण त्यासोबतच तो प्रेमाचाही उगम आहे. यहोवा आपल्यावर खूप प्रेम करतो! आणि त्याच्या प्रेमामुळेच आपल्याला आनंदी, समाधानी आणि सुरक्षित वाटतं.
२ ख्रिश्चनांना एकमेकांवर प्रेम करायची आज्ञा देण्यात आली आहे. त्यामुळे एकमेकांवर प्रेम करायचं की नाही, याची निवड आपण करू शकत नाही. आपण ते केलंच पाहिजे. (मत्तय २२:३७-४० वाचा.) यहोवाची ओळख झाल्यानंतर, येशूने दिलेली पहिली आज्ञा पाळणं आपल्याला कदाचित कठीण वाटणार नाही. कारण यहोवा परिपूर्ण आहे. तो आपल्याशी प्रेमाने वागतो आणि आपल्याला समजून घेतो. पण येशूने दिलेली दुसरी आज्ञा पाळणं आपल्याला कदाचित कठीण वाटू शकतं. कारण आपले सगळ्यात जवळचे शेजारी, म्हणजे आपले भाऊबहीण अपरिपूर्ण आहेत. आणि काही वेळा ते अशा काही गोष्टी बोलतील किंवा करतील ज्यांमुळे आपल्याला वाटेल की ते आपल्याला समजून घेत नाहीत आणि आपल्याशी प्रेमाने वागत नाहीत. अपरिपूर्ण माणसांच्या बाबतीत असं होऊ शकतं हे यहोवाला माहीत होतं. आणि म्हणून, आपण एकमेकांवर प्रेम का केलं पाहिजे आणि आपल्याला ते कसं करता येईल, हे लिहायची प्रेरणा यहोवाने बायबलच्या काही लेखकांना दिली. त्यांपैकीच एक लेखक होता योहान.—१ योहा. ३:११, १२.
३ योहानने जी पुस्तकं लिहिली त्यांत त्याने वारंवार या गोष्टीवर भर दिला, की ख्रिश्चनांनी एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे. आपल्या शुभवर्तमानाच्या पुस्तकात त्याने अनेकदा प्रेमाचा उल्लेख केला. शुभवर्तमान लिहिणारे मत्तय, मार्क आणि लूक या तिघांनी मिळूनसुद्धा केला नाही, इतक्या वेळा त्याने प्रेमाचा उल्लेख केला. योहानने जेव्हा शुभवर्तमानाचं पुस्तक आणि तीन पत्रं लिहिली तेव्हा तो जवळजवळ १०० वर्षांचा होता. या पुस्तकांतून आपल्याला हे शिकायला मिळतं, की आपण जे काही करतो ते प्रेमापोटी केलं पाहिजे. (१ योहा. ४:१०, ११) ही गोष्ट शिकायला मात्र योहानला वेळ लागला. असं का म्हणता येईल ते आपण पुढे पाहू या.
४ तरुण असताना योहान नेहमीच इतरांशी प्रेमाने वागला असं नाही. काही उदाहरणं पाहू या. एकदा येशू आणि त्याचे शिष्य शोमरोनमधून यरुशलेमला चालले होते. पण तिथल्या एका गावातल्या लोकांनी त्यांचं स्वागत केलं नाही. त्या वेळी योहान कसा वागला? त्याला त्यांचा इतका राग आला, की स्वर्गातून आग बोलावून त्यांचा नाश करून टाकायच्या गोष्टी त्याने केल्या. (लूक ९:५२-५६) आणखी एका प्रसंगी योहान प्रेमाने वागायला चुकला. ही तेव्हाची घटना आहे, जेव्हा योहान आणि याकोबच्या आईने आपल्या मुलांना देवाच्या राज्यात मानाचं स्थान द्यायची विनंती येशूकडे केली. असं दिसतं की योहान आणि योकोबच्या सांगण्यावरूनच तिने ती विनंती केली होती. ही गोष्ट जेव्हा इतर प्रेषितांना कळली तेव्हा ते त्या दोघांवर खूप चिडले. (मत्त. २०:२०, २१, २४) अशा प्रकारे योहान अनेकदा चुकला, पण तरीसुद्धा येशूचं त्याच्यावरचं प्रेम कमी झालं नाही.—योहा. २१:७.
५ या लेखात आपण योहानबद्दल आणि त्याने प्रेमाविषयी लिहिलेल्या काही गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत. त्यामुळे आपल्या भाऊबहिणींशी प्रेमाने कसं वागायचं, हे आपल्याला शिकायला मिळेल. तसंच, कुटुंबप्रमुखाचं आपल्या कुटुंबावर प्रेम आहे हे तो कोणत्या एका खास मार्गाने दाखवू शकतो, हेसुद्धा आपल्याला शिकायला मिळेल.
इतरांवर आपलं प्रेम आहे हे कसं दिसून येईल?
६ आपल्याला कदाचित असं वाटेल, की इतरांवर प्रेम करणं म्हणजे त्यांच्याबद्दल मनात आपुलकीची भावना बाळगणं किंवा त्यांच्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलणं. पण खरं प्रेम तितकंच नसतं; ते कृतीतूनही दाखवायची गरज असते. (याकोब २:१७, २६ पडताळून पाहा.) उदाहरणार्थ, यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे. (१ योहा. ४:१९) आणि आपलं हे प्रेम त्याने बायबलमध्ये सुंदर शब्दांतून व्यक्त केलं आहे. (स्तो. २५:१०; रोम. ८:३८, ३९) पण यहोवाचं आपल्यावर खरंच प्रेम आहे, याची खातरी फक्त त्याच्या शब्दांतून नाही तर त्याने आपल्यासाठी जे काही केलं त्यावरूनही मिळते. त्याबद्दल योहानने लिहिलं: “देवाने आपल्या एकुलत्या एका मुलाला जगात पाठवलं. हे यासाठी, की त्याच्याद्वारे आपल्याला जीवन मिळावं. यावरूनच देवाचं आपल्यावर असलेलं प्रेम दिसून आलं.” (१ योहा. ४:९) यहोवाने आपल्यासाठी त्याचा एकुलता एक मुलगा दिला. (योहा. ३:१६) त्यामुळे त्याचं आपल्यावर प्रेम आहे याबद्दल मनात कोणतीही शंका उरत नाही.
७ येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं, की त्याचं त्यांच्यावर प्रेम आहे. (योहा. १३:१; १५:१५) पण येशूचं त्यांच्यावर आणि आपल्यावर किती प्रेम आहे हे त्याने फक्त बोलून दाखवलं नाही; तर त्याने ते आपल्या कृतीतूनही दाखवलं. तो म्हणाला: “कोणी आपल्या मित्रांसाठी आपला प्राण द्यावा यापेक्षा मोठं प्रेम कोणतंच असू शकत नाही.” (योहा. १५:१३) तर मग, यहोवा आणि येशू या दोघांनी आपल्यासाठी जे काही केलं त्याचा आपण विचार करतो, तेव्हा आपल्याला काय करायची प्रेरणा मिळते?
८ यहोवा आणि येशूने आपल्यासाठी जे काही केलं आहे, त्याच्या बदल्यात त्यांच्यावर प्रेम करायची प्रेरणा आपल्याला मिळते. हे प्रेम आपण त्यांच्या आज्ञा पाळून दाखवू शकतो. (योहा. १४:१५; १ योहा. ५:३) येशूने आपल्याला अशी आज्ञा दिली आहे, की आपण एकमेकांवर प्रेम करावं. (योहा. १३:३४, ३५) पण आपल्या भाऊबहिणींवर आपलं प्रेम आहे, हे आपण फक्त शब्दांतून नाही तर कृतीतूनही दाखवलं पाहिजे. (१ योहान ३:१८ वाचा.) मग, आपल्याला हे कसं करता येईल?
आपल्या भाऊबहिणींवर प्रेम करा
९ प्रेम कृतीतून कसं दाखवायचं हे योहानच्या उदाहरणातून शिकायला मिळतं. तो खरंतर आपल्या वडिलांसोबत राहून कुटुंबाचा मासेमारीचा व्यवसाय करू शकला असता आणि भरपूर पैसा कमवू शकला असता. पण त्याने तसं केलं नाही. उलट, त्याने आपलं उरलेलं संपूर्ण आयुष्य इतरांना यहोवाबद्दल आणि येशूबद्दल शिकवण्यासाठी खर्च केलं. त्याने निवडलेला हा मार्ग सोपा नव्हता. येशूबद्दल प्रचार करत असल्यामुळे त्याला छळ सोसावा लागला आणि वयोवृद्ध असताना त्याला पात्म बेटावर कैद करण्यात आलं. (प्रे. कार्यं ३:१; ४:१-३; ५:१८; प्रकटी. १:९) पण कैदेत असतानासुद्धा त्याने इतरांचा विचार केला. उदाहरणार्थ, जेव्हा तो पात्म बेटावर होता तेव्हा त्याने प्रकटीकरणाचं पुस्तक लिहीलं. आणि “लवकरच घडणार असलेल्या गोष्टी” भाऊबहिणींना कळाव्यात म्हणून ते पुस्तक मंडळ्यांना पाठवलं. (प्रकटी. १:१) आणि कदाचित कैदेतून सुटल्यानंतर त्याने शुभवर्तमानाचं पुस्तक लिहिलं. याशिवाय, भाऊबहिणींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांची हिंमत वाढवण्यासाठी त्याने तीन पत्रंही लिहिली. अशा प्रकारे योहानने स्वतःचा नाही, तर इतरांचा विचार केला. त्याच्या उदाहरणाचं आपण कसं अनुकरण करू शकतो?
१० आपण आपला वेळ आणि शक्ती ज्या प्रकारे खर्च करू त्यावरून दिसून येईल, की इतरांवर आपलं किती प्रेम आहे. सैतानाचं हे जग आपल्याला सतत हे सांगतं असतं, की आपण आपला सगळा वेळ आणि शक्ती भरपूर पैसा आणि मोठं नाव कमवण्यात खर्च करावी. पण जगभरातले आपले भाऊबहीण आपला जास्तीत जास्त वेळ इतरांना आनंदाचा संदेश सांगण्यासाठी आणि त्यांना यहोवाबद्दल शिकवण्यासाठी खर्च करतात. आणि काही जण तर हे काम पूर्णवेळसुद्धा करतात.
११ कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी आपल्या अनेक भाऊबहिणींना पूर्ण वेळेची नोकरी करावी लागते. पण असं असलं तरी ते जमेल त्या मार्गाने देवाच्या संघटनेला मदत करतात. जसं की, एखादी विपत्ती कोसळते तेव्हा काही जण मदतकार्यात हातभार लावतात. तर इतर काही जण बांधकाम प्रकल्पांवर काम करतात. आणि जगभरात चाललेल्या कामासाठी तर सगळेच जण आनंदाने दान देतात. देवावर आणि इतरांवर प्रेम असल्यामुळेच ते हे करतात. याशिवाय, आपण सर्व दर आठवडी सभांना उपस्थित राहून आणि त्यांत सहभाग घेऊन भाऊबहिणींवर प्रेम असल्याचं दाखवतो. आपण थकलेलो असलो, तरी संभाना जातो. आपल्याला भीती वाटत असली, तरी आपण उत्तरं देतो. आणि आपल्या सगळ्यांनाच काही ना काही समस्या असली, तरी सभेच्या आधी किंवा नंतर आपण एकमेकांना प्रोत्साहन देतो. (इब्री १०:२४, २५) खरंच, आपले भाऊबहीण जे काही करतात त्याची आपण मनापासून कदर करतो.
१२ योहानचं आपल्या भाऊबहिणींवर प्रेम होतं, हे त्याने आणखी एका मार्गाने दाखवलं. तो म्हणजे, त्याने फक्त त्यांची प्रशंसाच केली नाही, तर गरज पडली तेव्हा त्यांना सल्लाही दिला. उदाहरणार्थ, त्याने आपल्या पत्रांत त्यांच्या मजबूत विश्वासाची आणि चांगल्या कामांची प्रशंसा केली. पण त्याच वेळी त्यांनी केलेल्या गंभीर चुकांबद्दल त्याने त्यांना सडेतोड सल्लाही दिला. (१ योहा. १:८–२:१, १३, १४) अगदी तसंच आपणसुद्धा, भाऊबहीण करत असलेल्या चांगल्या कामांबद्दल त्यांची प्रशंसा केली पाहिजे. पण जर एखादी व्यक्ती चुकीची प्रवृत्ती दाखवू लागली किंवा वाईट काम करू लागली, तर आपण प्रेमाने ती गोष्ट तिच्या लक्षात आणून दिली पाहिजे. असं करून आपण हेच दाखवू, की आपलं तिच्यावर प्रेम आहे. हे खरं आहे, की एखाद्याला सल्ला देणं सोपं नाही. त्यासाठी धाडस लागतं. पण बायबल असं म्हणतं, की जे खरे मित्र असतात ते एकमेकांना सुधारण्यासाठी सल्ला देतात.—नीति. २७:१७.
१३ भाऊबहिणींवर आपलं प्रेम असेल, तर काही गोष्टी आपण करणार नाही. उदाहरणार्थ, कोणी काही बोललं तर ती गोष्ट आपण लगेच मनाला लावून घेणार नाही. येशूच्या जीवनातली एक गोष्ट लक्षात घ्या. एकदा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, की सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी त्यांना त्याचं मांस खावं लागेल आणि त्याचं रक्त प्यावं लागेल. (योहा. ६:५३-५७) हे ऐकून त्याच्या शिष्यांपैकी अनेकांना इतका धक्का बसला की ते त्याला सोडून गेले. पण त्याचे प्रेषित मात्र त्याला एकनिष्ठ राहिले. त्यांच्यामध्ये योहानसुद्धा होता. खरंतर, येशूने जे म्हटलं होतं ते प्रेषितांनाही कळलं नव्हतं, आणि कदाचित त्यांनासुद्धा त्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं असेल. पण तो जे काही म्हणाला ते चुकीचं आहे असा विचार करून त्यांनी त्याचं वाईट मानून घेतलं नाही, तर त्यांनी त्याच्यावर भरवसा ठेवला. कारण त्यांना माहीत होतं, की येशू कधीच काही चुकीचं बोलू शकत नाही. (योहा. ६:६०, ६६-६९) यावरून आपण एक महत्त्वाची गोष्ट शिकतो. ती म्हणजे, आपले भाऊबहीण आपल्याला काही बोलले, तर आपण त्यांचं बोलणं लगेच मनाला लावून घेऊ नये; तर त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे समजावून सांगायची संधी त्यांना दिली पाहिजे.—नीति. १८:१३; उप. ७:९.
१४ आपण आपल्या भाऊबहिणींचा कधीही द्वेष करू नये असाही सल्ला योहानने आपल्याला दिला. आपण हा सल्ला पाळला नाही, तर सैतान सहज आपल्याला चुकीचं वागायला लावू शकतो. (१ योहा. २:११; ३:१५) हीच गोष्ट पहिल्या शतकाच्या शेवटी घडली. त्या वेळी, सैतान देवाच्या लोकांमध्ये द्वेष उत्पन्न करायचा आणि फूट पाडायचा खूप प्रयत्न करत होता. याचा परिणाम असा झाला, की योहानने आपली पत्रं लिहिली तोपर्यंत सैतानासारखी मनोवृत्ती दाखवणारी माणसं ख्रिस्ती मंडळीत शिरली होती. उदाहरणार्थ, दियत्रफेस हा एका मंडळीमध्ये फूट पाडत होता. (३ योहा. ९, १०) नियमन मंडळाने पाठवलेल्या वडिलांशी तो आदराने वागत नव्हता. इतकंच नाही, तर त्याला न आवडणाऱ्या लोकांना जर कोणी पाहुणचार दाखवला तर त्याला तो मंडळीतून काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा. त्याचं हे वागणं खरंच किती दुष्ट होतं! आजसुद्धा सैतान देवाच्या लोकांमध्ये द्वेष निर्माण करायचा आणि त्यांच्यामध्ये फूट पाडायचा आटोकाट प्रयत्न करत आहे. त्यामुळे सैतानाला आपण कधीच ती संधी देऊ नये.
आपल्या कुटुंबावर प्रेम करा
१५ एक कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबाच्या रोजच्या गरजा पूर्ण करून हेच दाखवतो, की त्याचं त्याच्या कुटुंबावर प्रेम आहे. (१ तीम. ५:८) पण त्याने हे लक्षात ठेवलं पाहिजे, की कुटुंबाच्या फक्त रोजच्या गरजा पूर्ण करणं पुरेसं नाही, तर त्यांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करणंही महत्त्वाचं आहे. (मत्त. ५:३) या बाबतीत येशूने कुटुंबप्रमुखांसाठी किती चांगलं उदाहरण मांडलं त्याकडे लक्ष द्या. योहानच्या शुभवर्तमानात असं सांगितलं आहे, की वधस्तंभावर शेवटचा श्वास घेत असतानासुद्धा येशू आपल्या कुटुंबाचा विचार करत होता. त्याला वधस्तंभावर जिथे खिळण्यात आलं होतं तिथे त्याची आई, मरीया हिच्यासोबत योहानसुद्धा उभा होता. भयंकर वेदना होत असतानाही येशूने योहानला आपल्या आईची काळजी घ्यायला सांगितलं. (योहा. १९:२६, २७) हे खरं आहे, की येशूच्या भावंडांनी मरीयाच्या रोजच्या गरजा भागवल्या असत्या. पण तिच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण झाल्या नसत्या. कारण असं दिसतं, की तोपर्यंत येशूच्या भावंडांपैकी कोणीही त्याचा शिष्य बनला नव्हता. म्हणून त्याने योहानला आपल्या आईची काळजी घ्यायला सांगितली. अशा प्रकारे मरीयाच्या रोजच्या आणि आध्यात्मिक, अशा दोन्ही गरजा पूर्ण होतील याची येशूने खातरी केली.
१६ योहानवर अनेक जबाबदाऱ्या होत्या. प्रेषित असल्यामुळे त्याने नक्कीच प्रचारकार्यात पुढाकार घेतला असेल. तसंच, त्याचं कदाचित लग्नही झालं असेल आणि त्यामुळे त्याच्यावर कुटुंबाच्या जबाबदाऱ्यासुद्धा असतील. कुटुंबाच्या रोजच्या गरजा भागवण्यासोबतच त्याला त्यांच्या आध्यात्मिक गरजाही पूर्ण कराव्या लागत असतील. (१ करिंथ. ९:५) यावरून आज कुटुंबप्रमुख काय शिकू शकतात?
१७ एका कुटुंबप्रमुखावर अनेक जबाबदाऱ्या असू शकतात. जसं की, कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी त्याला नोकरी करावी लागत असेल. आणि यहोवाच्या नावाची बदनामी होऊ नये म्हणून नोकरीच्या ठिकाणी त्याला प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम करावं लागत असेल. (इफिस. ६:५, ६; तीत २:९, १०) तसंच, तो जर एक वडील किंवा सहायक सेवक असेल, तर मंडळीत त्याला काही जबाबदाऱ्याही असू शकतात. जसं की, भाऊबहिणींना प्रोत्साहन देणं आणि प्रचारकार्यात पुढाकार घेणं. पण हे सगळं करत असताना त्याने आपल्या कुटुंबासोबत नियमितपणे बायबलचा अभ्यास करणंही खूप महत्त्वाचं आहे. आपल्या कुटुंबाला शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक रितीने सुदृढ ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. आणि त्यासाठी तो जे काही करतो त्याबद्दल त्याच्या कुटुंबातले सदस्य त्याची मनापासून कदर करतात.—इफिस. ५:२८, २९; ६:४.
“माझ्या प्रेमात टिकून राहा”
१८ योहान खूप मोठं आयुष्य जगला. आणि त्याच्या संपूर्ण आयुष्यात त्याला अनेक चांगले अनुभव आले. पण त्यासोबतच, त्याला अनेक समस्यांनाही तोंड द्यावं लागलं. या समस्यांमुळे त्याचा विश्वास कमजोर होऊ शकला असता. पण येशूच्या आज्ञा पाळायचा त्याने होता होईल तितका प्रयत्न केला. भाऊबहिणींवर प्रेम करायची जी आज्ञा येशूने दिली होती तीसुद्धा त्याने पाळली. त्यामुळे त्याला याची पूर्ण खातरी होती, की यहोवा आणि येशूचं त्याच्यावर प्रेम आहे, आणि कोणत्याही परीक्षेचा सामना करायचं बळ ते आपल्याला देतील. (योहा. १४:१५-१७; १५:९, १०; १ योहा. ४:१६) योहान शेवटपर्यंत आपल्या शब्दांतून आणि कृतीतून भाऊबहिणींवर प्रेम करत राहिला. सैतान किंवा सैतानाच्या जगातली कुठलीच गोष्ट त्याला असं करण्यापासून रोखू शकली नाही.
१९ योहानप्रमाणेच आज आपण सैतानाच्या जगात राहत आहोत. आपल्याला माहीत आहे, की सैतान अतिश्य दुष्ट असून त्याला कोणाबद्दलही प्रेम नाही. (१ योहा. ३:१, १०) त्याची अशी इच्छा आहे की आपण आपल्या भाऊबहिणींवर प्रेम करू नये. पण आपण त्याला संधी दिली तरच तो तसं करू शकेल. त्यामुळे, आपण भाऊबहिणींवर प्रेम करायचा, ते प्रेम शब्दांतून व्यक्त करायचा आणि कृतीतून दाखवायचा ठाम निश्चय करू या. मग, यहोवाच्या कुटुंबाचा भाग असल्याचं समाधान आणि आनंद आपल्याला मिळेल.—१ योहान ४:७ वाचा.