धैर्याने देवाची उपासना करत राहा! साठी संदर्भ—भाग १
© 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
अध्याय १
तो देवासोबत चालत राहिला
हनोख अधर्मी जगात देवाबरोबर चालला
हनोखच्या काळाच्या जवळजवळ चार शतकांआधी, अनोशच्या काळात “लोक परमेश्वराचे नाव घेऊ लागले.” (उत्पत्ति ४:२६, NW) देवाच्या नावाचा उपयोग मनुष्याच्या इतिहासाच्या अगदी सुरवातीपासूनच होता. त्याअर्थी, अनोशच्या काळापासून लोक विश्वासाने, खऱ्या उपासनेकरता यहोवाचे नाव घेऊ लागले असे म्हणता येणार नाही. काही इब्री विद्वानांचे असे म्हणणे आहे की उत्पत्ति ४:२६ येथे खरे तर, अनोशच्या काळात लोक “परमेश्वराच्या नावाची विटंबना करू लागले” किंवा तेव्हापासून देवाच्या नावाची “विटंबना सुरू झाली” असे असले पाहिजे. कदाचित त्या काळात लोकांनी स्वतःला किंवा ज्यांच्याद्वारे ते देवाची उपासना करण्याचा दावा करत होते अशा इतर मानवांना यहोवाचे नाव देण्यास सुरवात केली असावी. किंवा त्यांनी आपल्या मूर्तींना त्याचे नाव दिले असावे.
हनोख अधर्मी जगात देवाबरोबर चालला
देवाची सेवा करणाऱ्यांच्या विश्वासाचे आपण अनुकरण केले पाहिजे. (इब्री लोकांस १३:७) हनोख त्याच्या विश्वासामुळेच देवाचा पहिला विश्वासू संदेष्टा म्हणून सेवा करू शकला. आपल्या या जगासारखेच हनोखच्या काळातील जग हिंसक, भ्रष्ट आणि अधार्मिक होते. हनोख मात्र वेगळा होता. त्याचा विश्वास खरा होता आणि देवाच्या उपासनेत त्याने आपल्याकरता कित्ता घालून दिला. होय, यहोवाने त्याला एक महत्त्वाचा न्यायदंड घोषित करण्याचे काम सोपवले होते, पण हे कार्य करण्यासाठी लागणारी शक्तीही त्याने पुरवली. देवाने नेमलेले कार्य हनोखने निर्भयपणे पार पाडले आणि देवाने त्याच्या शत्रूंपासून त्याचे संरक्षण केले.
टेहळणी बुरूज०६ १०/१ १९ १३-१४
विश्वास आणि देवाचे भय बाळगून धैर्यवान व्हा
१३ हनोख, या आणखी एका ख्रिस्तपूर्व साक्षीदाराने मांडलेल्या उदाहरणावर मनन करून आपण विश्वास आणि धैर्याविषयी आणखी शिकू शकतो. हनोखला त्याच्या विश्वासाची आणि धैर्याची परीक्षा होईल हे भविष्यवाद सुरू करायच्या आधीपासूनच माहीत होते. ते कसे? जे देवाची सेवा करतात आणि जे दियाबल सैतानाची सेवा करतात यांच्यात वैर किंवा शत्रूत्व उत्पन्न होईल, असे यहोवाने एदेन बागेत सांगितले होते. (उत्पत्ति ३:१५) काईनाने आपला भाऊ हाबेल याचा वध केला तेव्हाच म्हणजे मानव इतिहासाच्या सुरुवातीलाच या वैरभावाची सुरुवात झाली होती, हेही हनोखास माहीत होते. काईन आणि हाबेलाचा बाप आदाम, हनोखचा जन्म झाल्यावर जवळजवळ ३१० वर्षांपर्यंत हयात होता.—उत्पत्ति ५:३-१८.
१४ हे सर्व माहीत असूनही हनोख धैर्याने खऱ्या “देवाबरोबर चालला” आणि लोक यहोवाविरुद्ध ज्या “कठोर गोष्टी” बोलत होते त्यांचा त्याने निषेध केला. (उत्पत्ति ५:२२; यहुदा १४, १५) खऱ्या उपासनेकरता हनोखने घेतलेल्या या धैर्यवान भूमिकेमुळे पुष्कळ लोक त्याचे शत्रू बनले व यामुळे त्याच्या जिवाला धोका होता. या प्रसंगी यहोवाने हनोखला वेदनामय मृत्यूपासून वाचवले. ‘तू मला संतोषविले आहेस’ असे हनोखला प्रकट केल्यानंतर यहोवाने त्याला “लोकांतरी नेले” अर्थात तो एक भविष्यसूचक दृष्टान्त पाहत असतानाच त्याचे जीवन संपुष्टात आणले.—इब्री लोकांस ११:५, १३; उत्पत्ति ५:२४.
या वादळी काळात देवासोबत चाला
“हनोख देवाबरोबर चालला त्यानंतर तो नव्हता; कारण देवाने त्याला नेले.”—उत्पत्ति ५:२४.
वादळी काळ! हे शब्द, १९१४ साली मशीही राज्याचा उदय झाल्यानंतरच्या वर्षांत मानवजात ज्या उलथापालथीच्या व हिंसाचाराच्या परिस्थितीत जगत आहे त्यांचे अगदी अचूक वर्णन करतात. तेव्हापासून मानव ‘शेवटल्या काळात’ जगत आहेत. दुष्काळ, रोगराई, भूकंप व युद्धे यांसारख्या समस्यांनी त्यांना अभूतपूर्व प्रमाणावर पीडित केले आहे. (२ तीमथ्य ३:१; प्रकटीकरण ६:१-८) यहोवाची उपासना करणारेही यातून सुटलेले नाहीत. कमी जास्त प्रमाणात आपल्या सर्वांनाच सध्याच्या काळाच्या समस्यांना व अनिश्चिततेला तोंड द्यावेच लागते. आर्थिक दबाव, राजकीय उलथापालथ, गुन्हेगारी व रोग या अशा गोष्टी आहेत की ज्यांमुळे जगणे अतिशय कठीण होऊन बसते.
२ शिवाय, “देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे” यांच्याशी सैतान सतत लढाई करत असल्यामुळे, यहोवाच्या सेवकांपैकी अनेकांना तीव्र छळाला निरंतर तोंड द्यावे लागते. (प्रकटीकरण १२:१७) सर्वांनाच थेटपणे छळाला तोंड द्यावे लागत नाही तरीसुद्धा सर्वच खऱ्या ख्रिश्चनांना दियाबल सैतानाविरुद्ध आणि त्याने मानवजातीमध्ये पसरवलेल्या आत्म्याविरुद्ध लढा द्यावाच लागतो. (इफिसकर २:२; ६:१२) या आत्म्याचा आपल्यावर प्रभाव पडू नये म्हणून सतत सतर्क राहणे अगत्याचे आहे कारण त्याचा प्रभाव आपल्याला कामाच्या ठिकाणी, शाळेत आणि अशा प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतो की जेथे खऱ्या उपासनेबद्दल आस्था नसलेल्या लोकांशी आपल्याला व्यवहार करावा लागतो.
राष्ट्रांसोबत नव्हे तर देवासोबत चाला
३ पहिल्या शतकातही ख्रिश्चनांनी या जगाच्या आत्म्याचा प्रयासपूर्वक प्रतिकार केला. आणि यामुळे ख्रिस्ती मंडळीच्या बाहेर असलेल्यांपेक्षा ते फारच वेगळे ठरले. पौलाने हा फरक स्पष्ट केला. त्याने लिहिले: “म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चितार्थाने सांगतो की, परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये, त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत, ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्वप्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वत:ला कामातुरपणास वाहून घेतले आहे.”—इफिसकर ४:१७-१९.
४ हे शब्द, पौलाच्या व आपल्याही काळात या जगात जो आध्यात्मिक व नैतिक काळोख पसरला आहे त्याचे किती स्पष्ट वर्णन करतात! पहिल्या शतकाप्रमाणे आजही ख्रिस्ती ‘परराष्ट्रीयांप्रमाणे चालत नाहीत.’ उलट, त्यांना देवासोबत चालण्याचा अद्भूत सुहक्क मिळाला आहे. हीन व अपरिपूर्ण मानव यहोवासोबत चालतात असे म्हणणे खरोखर योग्य आहे का अशी काहीजण शंका व्यक्त करू शकतात. पण बायबल सांगते की हे शक्य आहे. शिवाय, यहोवा स्वतः अशी अपेक्षा करतो की मानवांनी त्याच्यासोबत चालावे. सामान्य युगापूर्वी आठव्या शतकात संदेष्टा मीखा याने पुढील प्रेरित शब्द लिहिले: “नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे यांवाचून परमेश्वर तुजजवळ काय मागतो?”—मीखा ६:८.
देवासोबत कसे व का चालावे?
५ सर्वसमर्थ, अदृश्य देवासोबत आपण कसे चालू शकतो? अर्थातच, देवासोबत चालणे हे एखाद्या मनुष्यासोबत चालण्यासारखे नाही. बायबलमध्ये “चालणे” या संज्ञेचा एक अर्थ “विशिष्ट मार्गाचा अवलंब करणे” असा होतो. तेव्हा, एखादी व्यक्ती देवासोबत चालते याचा अर्थ ती देवाने सांगितलेल्या व त्याला संतुष्ट करणाऱ्या मार्गाचा अवलंब करते. असे केल्याने आपण आपल्या अवतीभोवती असलेल्या बहुतेक लोकांपेक्षा वेगळे दिसून येतो. होय, कोणत्याही ख्रिस्ती व्यक्तीकरता हाच योग्य मार्ग आहे. का? याची अनेक कारणे आहेत.
६ सर्वप्रथम यहोवा आपला निर्माणकर्ता, आपल्या जीवनाचा उगम आणि आपल्या जीवनाकरता आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पुरवणारा आहे. (प्रकटीकरण ४:११) त्याअर्थी, आपण कसे चालावे हे आपल्याला सांगण्याचा केवळ त्यालाच अधिकार आहे. शिवाय, देवासोबत चालणे हा जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. जे यहोवासोबत चालतात त्यांच्या पापांची क्षमा करण्याची त्याने तरतूद केली आहे आणि तो त्यांना सार्वकालिक जीवनाची निश्चित आशा देतो. आपल्यावर प्रेम करणारा आपला स्वर्गीय पिता, जे त्याच्यासोबत चालतात त्यांना मार्गदर्शन देखील पुरवतो की जेणेकरून ते अपरिपूर्ण असताना व सैतानाच्या वर्चस्वाखाली असलेल्या जगात राहात असतानाही जीवनात यशस्वी होऊ शकतात. (योहान ३:१६; २ तीमथ्य ३:१५, १६; १ योहान १:८; २:२५; ५:१९) देवासोबत चालण्याचे आणखी एक कारण म्हणजे आपण स्वेच्छेने देवासोबत चालतो तेव्हा मंडळीत शांती व एकता वाढण्यास हातभार लागतो.—कलस्सैकर ३:१५, १६.
७ शेवटले व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण देवासोबत चालतो तेव्हा, अगदी सुरुवातीला एदेन बागेत जो सार्वभौमत्वाचा वादविषय उभा करण्यात आला होता, त्यात आपली काय भूमिका आहे हे आपण दाखवतो. (उत्पत्ति ३:१-६) आपल्या जीवनाद्वारे आपण दाखवतो की आपण अगदी पूर्णपणे यहोवाच्या बाजूने उभे आहोत आणि सार्वभौम प्रभू असण्याचा केवळ त्यालाच अधिकार आहे हे आपण निर्भयपणे घोषित करतो. (स्तोत्र ८३:१८) अशारितीने, देवाचे नाव पवित्र व्हावे व त्याची इच्छा पूर्ण व्हावी अशी जी आपण प्रार्थना करतो त्याच्या अनुषंगाने कार्यही करतो हे आपण दाखवतो. (मत्तय ६:९, १०) तेव्हा, जे देवासोबत चालण्याचे निवडतात ते खरोखरच सूज्ञ नाहीत का? ते पूर्ण खात्री बाळगू शकतात की ते अगदी योग्य दिशेने चालत आहेत कारण यहोवा हा “एकच ज्ञानी” देव आहे. तो कधीही चूक करत नाही.—रोमकर १६:२७.
८ पण सध्याच्या या वादळी काळात आणि बहुतेक लोकांना यहोवाची सेवा करण्याची तीळमात्र इच्छा नसताना ख्रिस्ती लोकांनी जसे जगले पाहिजे तसे जगणे कसे शक्य आहे? पुरातन काळात ज्यांनी अतिशय कठीण काळातही आपली सात्विकता कायम ठेवली अशा विश्वासू पुरुषांच्या उदाहरणांवर विचार केल्याने आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते. यांपैकी दोघे हनोख व नोहा हे होते. ते दोघेही आपल्यासारख्याच काळात राहात होते. त्याकाळी दुष्टाईला उधाण आले होते. नोहाच्या काळात तर ही पृथ्वी अत्याचार व अनैतिकता यांनी भरून गेली होती. तरीपण हनोख व नोहा यांनी त्यांच्या काळातल्या त्या जगाच्या आत्म्याचा प्रतिकार केला आणि ते यहोवासोबत चालत राहिले. ते असे का करू शकले? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्याकरता आपण या लेखात हनोखच्या उदाहरणावर विचार करू या. पुढील लेखात आपण नोहाच्या उदाहरणावर विचार करू.
हनोख वादळी काळात देवासोबत चालला
९ हनोख पहिला होता की ज्याच्याविषयी शास्त्रवचनांत असे म्हणण्यात आले की तो देवासोबत चालला. बायबलमधील अहवालात असे म्हटले आहे: “मथुशलह झाल्यावर हनोख . . . देवाबरोबर चालला.” (उत्पत्ति ५:२२) मग, आपल्या सर्वसाधारण आयुर्मानापेक्षा बरीच जास्त असलेल्या हनोखच्या आयुष्याची एकूण वर्षे सांगितल्यावर अहवाल पुढे म्हणतो की “हनोख देवाबरोबर चालला. त्यानंतर तो नव्हता; कारण देवाने त्याला नेले.” (उत्पत्ति ५:२४) यावरून असे दिसून येते की हनोखचा विरोध करणाऱ्यांनी त्याचा घात करण्याआधीच यहोवाने हनोखला जिवितांच्या जगातून मृतावस्थेत नेले. (इब्री लोकांस ११:५, १३) या दोनचार संक्षिप्त वचनांखेरीज हनोखचा बायबलमध्ये इतरत्र उल्लेख करण्यात आलेला नाही. तरीपण जी काही माहिती आपल्याजवळ आहे व इतर संकेतांवरून आपण खात्रीने म्हणू शकतो की हनोख ज्या काळात राहात होता तो अतिशय वादळी काळ होता.
१० उदाहरणार्थ, आदामाने पाप केल्यानंतर मानव वंश किती झपाट्याने भ्रष्ट झाला याचा विचार करा. बायबल आपल्याला सांगते की आदामाचा ज्येष्ठ पुत्र काईन हा मनुष्याचा घात करणारा पहिला होता. त्याने आपला भाऊ हाबेल याला ठार मारले. (उत्पत्ति ४:८-१०) हाबेलचा खून झाल्यानंतर आदाम व हव्वा यांना आणखी एक मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी शेथ ठेवले. त्याच्याविषयी आपण असे वाचतो: “शेथ याला मुलगा झाला त्याचे नाव त्याने अनोश असे ठेविले; त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करु लागले.” (उत्पत्ति ४:२५, २६) दुःखाची गोष्ट म्हणजे हे “परमेश्वराच्या नावाने प्रार्थना” करणे खोट्या उपासनेच्या पद्धतीने करण्यात आले. अनोशच्या जन्माच्या कित्येक वर्षांनंतर काईनच्या लामेख नावाच्या एका वंशजाने आपल्या दोन पत्नींकरता एक गीत रचले ज्यात त्याने, आपल्याला जखमी करणाऱ्या एका तरुणाला आपण जिवे मारल्याचे सांगितले. शिवाय त्याने असा इशारा दिला: “काइनाबद्दल सातपट सूड घ्यावयाचा तर लामेखाबद्दल सत्याहत्तरपट घेण्यात येईल.”—उत्पत्ति ४:१०, १९, २३, २४.
११ या त्रोटक माहितीवरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की एदेन बागेत सैतानाने ज्या नीतीभ्रष्टतेला जन्म दिला होता ती लवकरच आदामाच्या संततीमध्ये दुष्टाईच्या रूपात पसरली. अशा एका जगात हनोखने यहोवाचा संदेष्टा म्हणून कार्य केले; त्याचा सामर्थ्यशाली देवप्रेरित संदेश आजही तितकाच परिणामकारक आहे. हनोखने केलेल्या एका भविष्यवाणीबद्दल यहुदा सांगतो: “पाहा, सर्वांचा न्यायनिवाडा करावयास, आणि भक्तिहीन लोकांनी अभक्तीने केलेल्या आपल्या सर्व भक्तिहीन कृत्यांवरुन आणि ज्या सर्व कठोर गोष्टी भक्तिहीन पापी जनांनी त्याच्याविरुद्ध सांगितल्या त्यावरून, त्या सर्वास दोषी ठरवावयास प्रभु आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला.” (यहूदा १४, १५) अर्थात, या शब्दांची अंतिम पूर्णता हर्मगिदोनाच्या वेळी होईल. (प्रकटीकरण १६:१४, १६) पण आपण खात्रीने म्हणू शकतो की हनोखच्या काळातही असे अनेक ‘भक्तिहीन पापी जन’ होते की ज्यांना हनोखचा संदेश राग आला असेल. अशा लोकांच्या हातून यहोवाने अतिशय प्रेमळपणे हनोखला वाचवले.
हनोखला देवासोबत चालण्याचे धैर्य कोठून मिळाले?
१२ एदेन बागेत आदाम व हव्वा यांनी सैतानाचे ऐकले व आदामाने यहोवाविरुद्ध बंडाळी केली. (उत्पत्ति ३:१-६) त्यांचा पुत्र हाबेल याने मात्र वेगळा मार्ग निवडला आणि यहोवाने त्याच्यावर कृपा दाखवली. (उत्पत्ति ४:३, ४) दुःखाची गोष्ट म्हणजे, आदामाच्या संततीपैकी बहुतेकजण हाबेलसारखे नव्हते. पण शेकडो वर्षांनंतर ज्याचा जन्म झाला तो हनोख मात्र हाबेलसारखाच होता. हनोख आणि आदामाच्या इतर बहुतेक वंशजांमध्ये कोणता फरक होता? प्रेषित पौलाने या प्रश्नाचे उत्तर दिले. त्याने लिहिले: “हनोखाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले, आणि तो सापडला नाही; कारण त्याला देवाने लोकांतरी नेले; लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की, तो देवाला संतोषवीत असे.” (इब्री लोकांस ११:५) हनोख विश्वासाचे उत्तम उदाहरण असलेल्या ‘मोठ्या साक्षीरूपी मेघात’ सामील होता. (इब्री लोकांस १२:१) विश्वासामुळेच हनोखला आपल्या ३०० पेक्षा जास्त वर्षांच्या आयुष्यात—जे आपल्यापैकी बहुतेकांकरता तीन आयुष्यांइतके ठरेल—शेवटपर्यंत योग्य वर्तनात टिकून राहण्यास साहाय्य मिळाले!
१३ पौलाने हनोख व इतर साक्षीदारांच्या विश्वासाचे वर्णन करताना असे म्हटले: “विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खातरी आहे.” (इब्री लोकांस ११:१) होय, विश्वास म्हणजे आशा धरलेल्या गोष्टी अवश्य पूर्ण होतील अशी आश्वासनांवर आधारित असलेली खात्रीलायक अपेक्षा. ही अपेक्षा इतकी पक्की असते की त्यामुळे जीवनाचा आपला दृष्टिकोनच बदलतो. अशाचप्रकारच्या विश्वासाने हनोखला, त्याच्याकाळचे जग अभक्त होते तरीसुद्धा, देवासोबत चालण्यास मदत केली.
१४ खरा विश्वास अचूक ज्ञानावर आधारित असतो. हनोखला कोणते ज्ञान होते? (रोमकर १०:१४, १७; १ तीमथ्य २:४) एदेन बागेत जे घडले होते त्याच्याविषयी त्याला अर्थातच माहीत होते. एदेन बागेतील जीवन कसे होते याविषयीही कदाचित त्याने ऐकले असावे. हनोखच्या काळात एदेन बाग कदाचित अस्तित्वात असावी पण त्यात प्रवेश करण्यास मानवांना परवानगी नव्हती. (उत्पत्ति ३:२३, २४) आणि आदामाच्या संततीने सर्व पृथ्वीला व्यापून या सबंध ग्रहाला एदेन वाटिकेसारखे बनवावे असा देवाचा उद्देश होता हे देखील त्याला माहीत होते. (उत्पत्ति १:२८) शिवाय, एक संतती उत्पन्न होईल व ती सैतानाचे डोके फोडील आणि त्याच्या फसवणुकीमुळे घडून आलेले सर्व दुष्परिणाम काढून टाकील अशी जी प्रतिज्ञा यहोवाने केली होती तिच्याबद्दल नक्कीच हनोखने कृतज्ञ मनोवृत्ती बाळगली असेल. (उत्पत्ति ३:१५) किंबहुना, यहुदाच्या पुस्तकात लिहून ठेवण्यात आलेली हनोखची स्वतःची भविष्यवाणी सैतानाच्या संततीच्या नाशाशीच संबंधित आहे. हनोखला विश्वास होता आणि त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की “यहोवाचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे” या आत्मविश्वासाने हनोखने यहोवाची उपासना केली. (इब्री लोकांस ११:६) तेव्हा, आपल्याला असलेले सर्व ज्ञान हनोखला नव्हते तरीसुद्धा ज्यावर दृढ विश्वास उभारता येईल इतके ज्ञान त्याच्याजवळ अवश्य होते. अशा विश्वासामुळेच त्याने वादळी काळातही आपली सात्त्विकता टिकवून ठेवली.
हनोखच्या विश्वासाचे अनुकरण करा
१५ आजच्या या कठीण काळात आपल्यालाही हनोखप्रमाणेच यहोवाला संतुष्ट करण्याची इच्छा असल्यामुळे आपण हनोखच्या उदाहरणाचे अनुकरण केले पाहिजे. यहोवाबद्दल व त्याच्या उद्देशांबद्दल ज्ञान आत्मसात करून ते आपण नेहमी मनात बाळगले पाहिजे. पण इतकेच करणे पुरेसे नाही. जीवनात कोणतेही पाऊल उचलताना आपण या अचूक ज्ञानास आपले मार्गदर्शन करू दिले पाहिजे. (स्तोत्र ११९:१०१; २ पेत्र १:१९) देवाची विचारसरणी आपली मार्गदर्शक बनली पाहिजे आणि आपल्या प्रत्येक विचाराने व कृतीने आपण त्याला संतोषविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
१६ हनोखच्या काळात आणखी कोण यहोवाची सेवा करत होते याविषयी कोणताही अहवाल उपलब्ध नाही. स्पष्टतः एकतर तो एकटाच असावा किंवा त्याच्यासोबत फार कमी लोक यहोवाची सेवा करत असावेत. आज जगात आपणही फार कमी लोक आहोत पण यामुळे आपण निरुत्साहित होत नाही. कोणीही आपल्याविरुद्ध असले तरी यहोवा आपले साहाय्य करेल. (रोमकर ८:३१) हनोखने अभक्त जनांच्या नाशाविषयी धैर्याने इशारा दिला. आपणही थट्टा, विरोध व छळाला तोंड द्यावे लागले तरीही ‘राज्याच्या सुवार्तेचा’ धैर्याने प्रचार करतो. (मत्तय २४:१४) हनोख त्याच्या काळातल्या इतर लोकांइतका जगला नाही. पण तरीही त्याची आशा त्या जगाची नव्हती. त्याची नजर त्यापेक्षा शानदार अशा जगावर केंद्रित होती. (इब्री लोकांस ११:१०, ३५) आपलीही नजर यहोवाच्या उद्देशांच्या पूर्णतेवर खिळलेली आहे. त्यामुळे आपण या जगाचा पुरेपूर वापर करत नाही. (१ करिंथकर ७:३१) त्याऐवजी आपण आपली ताकद व साधने विशेषतः यहोवाच्याच सेवेकरता वापरतो.
१७ हनोखला विश्वास होता की यहोवाने अभिवचन दिलेली संतती त्याच्या नियुक्त वेळी उत्पन्न होईल. ती संतती—येशू ख्रिस्त प्रकट होऊन आता २,००० वर्षे होत आली आहेत. येशूने आपल्याकरता खंडणी दिली व आपल्याकरता तसेच हनोखसारख्या पुरातन विश्वासू साक्षीदारांकरता सार्वकालिक जीवन मिळवण्याचा मार्ग खुला केला. आज ती संतती अर्थात येशू ख्रिस्त देवाच्या राज्याचा राजा या नात्याने सिंहासनावर विराजमान असून त्याने सैतानाला स्वर्गातून खाली या पृथ्वीवर फेकून दिले आहे आणि याच्या परिणामस्वरूप आज आपण सर्वत्र क्लेशदायक परिस्थिती पाहात आहोत. (प्रकटीकरण १२:१२) होय, हनोखजवळ होते त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने ज्ञान आज आपल्याजवळ आहे. तर मग आपणही त्याच्यासारखाच दृढ विश्वास बाळगू या. देवाच्या अभिवचनांच्या पूर्णतेवर आपल्याला असलेल्या विश्वासाचा आपल्या प्रत्येक कृतीवर प्रभाव पडला पाहिजे. आपणही हनोखप्रमाणे, संकटमय काळात जगत असतानाही देवाबरोबर चालावे.
अध्याय २
त्याने जगाला दोषी ठरवलं
त्या प्राचीन जगाचा नाश का झाला?
काही बाबतीत, जलप्रलयापूर्वीच्या संस्कृतीमध्ये असे काही फायदे होते जे आज आपल्याला नाहीत. जसे की, संपूर्ण मानवजात एकच भाषा बोलत होती. (उत्पत्ति ११:१) यामुळे कलेच्या आणि विज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती व्हायला चालना मिळाली असेल ज्याकरता विविध कौशल्ये असलेल्या लोकांना एकत्र मिळून प्रयत्न करायची गरज असते. शिवाय, त्या जमान्यातील लोकांच्या दीर्घायुष्यामुळे शतकानुशतकांपासून शिकलेल्या गोष्टी ते पुढेही शिकू शकत होते.
काहींचा असा दावा आहे की, तेव्हाच्या लोकांचे आयुष्यमान खरोखर तितके जास्त नव्हते व बायबलमधील अहवालात दिलेली वर्षे खरे तर महिने होते. हे खरे आहे का? महललेलचे उदाहरण घ्या. बायबल म्हणते: “महललेल पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्यास यारेद झाला; . . . महललेल याचे एकंदर आयुष्य आठशेपंचाण्णव वर्षांचे झाले; मग तो मरण पावला.” (उत्पत्ति ५:१५-१७) एक वर्ष जर एक महिना आहे तर, महललेल पाच वर्षांचा असताना त्याला पुत्र झाला! परंतु हे बरोबर नाही, तर त्या काळचे लोक पहिला पुरुष आदाम याच्या परिपूर्णतेच्या जास्त जवळ होते. त्यांचे आयुष्यमान खरोखरच अनेक शतकांचे होते. या लोकांनी काय साध्य केले?
जलप्रलयाच्या अनेक शतकांआधी, पृथ्वीवरील लोकसंख्या इतकी वाढली होती की, आदामाचा पुत्र काईन याने एक नगर बांधून त्याचे नाव हनोख असे ठेवले. (उत्पत्ति ४:१७) प्रलयापूर्वीच्या काळात, अनेक उद्योग सुरू करण्यात आले होते. “तांब्याची व लोखंडाची धारेची सर्व प्रकारची हत्यारे” बनवण्यासाठी लोहाराच्या भट्ट्या होत्या. (उत्पत्ति ४:२२) बांधकाम, सुतारकाम, शिवणकाम आणि शेती यांच्यासाठी या साधनांचा उपयोग होत होता हे निश्चित आहे. पृथ्वीवरील मानवांच्या सुरवातीच्या काळातील अहवालांमध्ये या सर्व उद्योगांचा उल्लेख आला आहे.
या संपादित ज्ञानामुळेच पुढच्या पिढीला धातुविज्ञान, पीक उत्पादन, पशुपालन, लेखन कला आणि ललित कला यांसारख्या खास क्षेत्रांमध्ये प्रगती करता आली. उदाहरणार्थ, युबाल, “तंतुवाद्ये व वायुवाद्ये वाजविणाऱ्या सर्वांचा मूळपुरुष झाला.” (उत्पत्ति ४:२१) संस्कृतीचा विस्तारित प्रमाणावर विकास झाला. परंतु, सगळे काही एका झटक्यात संपले. कशामुळे?
कशामुळे?
जलप्रलयापूर्वीच्या समाजात हे सर्व फायदे असतानाही त्याची सुरवातच मुळात चांगली नव्हती. त्याचा मूळपुरुष आदाम होता आणि त्याने देवाविरुद्ध बंड केले. काईनाने इतिहासातील सर्वात पहिले नगर बांधले पण त्याने स्वतःच्याच भावाचा खून केला. त्यामुळे दुष्टाई वाढली यात काही नवल नाही! आदामाने आपल्या संततीला वारशात दिलेल्या दोषाचा परिणाम हळूहळू वाढत गेला.—रोमकर ५:१२.
या परिस्थितीला केवळ १२० वर्षांसाठी राहू दिले जाईल असे यहोवाने ठरवले तेव्हा स्पष्टतः परिस्थिती अधिकच वाईट होत होती. (उत्पत्ति ६:३) बायबल म्हणते: “पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार [होती], त्याच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट [होत्या]. . . . [पृथ्वी] जाचजुलमांनी भरली होती.”—उत्पत्ति ६:५, ११.
आपल्या लोकांना कसे सोडवावे हे यहोवाला कळते
५ बायबल सांगते की यहोवाने एक निर्णय घेतला आणि स्वर्गात तो जाहीर केला. उत्पत्ती ६:३ मध्ये त्याने म्हटले: “मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठायी सर्वकाळ सत्ता राहणार नाही; तो देहधारी आहे; तथापि मी त्याला एकशेवीस वर्षांचा काळ देईन.” मानवांचे सरासरी आयुष्य किती असेल याविषयीचे हे विधान नव्हते. तर यहोवा या पृथ्वीवरून दुष्टाईचा अंत केव्हा करेल हे त्याने या घोषणेद्वारे जाहीर केले. जलप्रलय इ.स.पू. २३७० मध्ये सुरू झाला. त्याअर्थी, देवाने इ.स.पू. २४९० मध्ये ही घोषणा केली असावी. तेव्हा नोहा ४८० वर्षांचा होता. (उत्प. ७:६) सुमारे २० वर्षानंतर म्हणजे इ.स.पू. २४७० मध्ये नोहाच्या पहिल्या पुत्राचा जन्म झाला. (उत्प. ५:३२) प्रलय येण्यासाठी सुमारे शंभर वर्षे राहिली होती, पण यहोवाने मानवी कुटुंबाच्या बचावासाठी नोहाच्या खास भूमिकेबद्दल अद्यापही त्याला सांगितलेले नव्हते. ही गोष्ट नोहाला सांगण्यासाठी देव किती काळ थांबणार होता?
६ आपण काय करणार आहोत हे यहोवाने नोहाला अनेक दशकांनंतर सांगितले असे दिसते. कोणत्या आधारावर आपण असा निष्कर्ष काढू शकतो? देवाच्या प्रेरणेने लिहिलेला अहवाल दाखवतो की देवाने नोहाला तारू बांधण्याची आज्ञा दिली तोपर्यंत त्याची मुले मोठी झाली होती व त्यांची लग्ने झाली होती. यहोवा त्याला म्हणाला: “तुझ्याशी मी आपला करार स्थापित करतो; तू आपले मुलगे, आपली स्त्री व आपल्या सुना यांस घेऊन तारवात जा.” (उत्प. ६:९-१८) तर मग, नोहाला तारू बांधण्याची आज्ञा देण्यात आली तेव्हा कदाचित प्रलयाला ४० किंवा ५० वर्षे राहिली असावीत.
७ तारू बांधण्याचे कार्य जसजसे पूर्ण होत गेले तसतसे नोहा व त्याचे कुटुंब विचारात पडले असावेत की देव त्याचा उद्देश कसा पूर्ण करेल आणि प्रलयाची सुरुवात केव्हा होईल. ही माहिती नसतानासुद्धा ते तारवाचे बांधकाम करत राहिले. बायबल म्हणते: “नोहाने तसे केले; देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले.” (उत्प. ६:२२) सरतेशेवटी प्रलय येण्याच्या सात दिवसांआधी—सर्व प्राण्यांना तारवात नेण्यासाठी नोहा व त्याच्या कुटुंबाजवळ जेमतेम वेळ उरला असताना—यहोवाने नोहाला प्रलयाची सुरुवात नक्की केव्हा होईल हे सांगितले. अशा रीतीने “नोहाच्या वयाच्या सहाशाव्या वर्षी दुसऱ्या महिन्याच्या सतराव्या दिवशी,” जेव्हा आकाशाची दारे उघडली तेव्हा सर्वकाही तयार होते.—उत्प. ७:१-५, ११.
८ आपल्या लोकांचा बचाव करण्याची सर्वात योग्य वेळ आणि मार्ग यहोवाला अचूक माहीत असतो हे प्रलयाच्या अहवालावरून सिद्ध होते. या जगाचा अंत जवळ येत असता, आपण खातरी बाळगू शकतो की यहोवाचा हरएक उद्देश त्याच्या ठरवलेल्या वेळी, अगदी त्याच दिवशी व त्याच घटकेला पूर्ण होईल.—मत्त. २४:३६; हबक्कूक २:३ वाचा.
बायबलमधून प्रश्नांची उत्तरं लेख १५६ ¶२-५, चौकट
नोहाची आणि जलप्रलयाची गोष्ट फक्त एक दंतकथा आहे का?
बायबलमधून आपल्याला कळतं की नोहा एक खरोखरची व्यक्ती होती आणि जलप्रलयसुद्धा एक खरी घटना होती; ती एक काल्पनिक गोष्ट किंवा दंतकथा नाही.
◼ नोहा खरोखरची व्यक्ती होती असा बायबलच्या लेखकांचा विश्वास होता. उदाहरणार्थ बायबलचे लेखक एज्रा आणि लूक हे कुशल इतिहासकार होते. त्यांनी इस्राएल राष्ट्राच्या वंशावळीत नोहाचा उल्लेख केला. (१ इतिहास १:४; लूक ३:३६) नोहा आणि त्याच्या काळात आलेल्या जलप्रलयाबद्दल येशूने जे म्हटलं होतं ते मत्तय आणि लूकनेही आपल्या शुभवर्तमानाच्या पुस्तकांत लिहिलं.—मत्तय २४:३७-३९; लूक १७:२६, २७.
यासोबतच यहेज्केल संदेष्टा आणि प्रेषित पौलनेसुद्धा विश्वासाचं आणि नीतिमत्त्वाचं उदाहरण ठेवण्याच्या बाबतीत नोहाचा उल्लेख केला. (यहेज्केल १४:१४, २०; इब्री लोकांना ११:७) विचार करा, नोहा जर एक काल्पनिक व्यक्ती असती, तर बायबलच्या लेखकांनी आपल्याला अनुकरण करण्यासाठी त्याच्या उदाहरणाचा उल्लेख केला असता का? मुळीच नाही. यावरून स्पष्ट होतं, की नोहा आणि इतर विश्वासू स्त्री-पुरुष खरोखरच्या व्यक्ती होत्या. आणि म्हणूनच आपल्याला त्यांच्या उदाहरणाचं अनुकरण करायला सांगण्यात आलंय.—इब्री लोकांना १२:१; याकोब ५:१७.
◼ बायबलमध्ये जलप्रलयाबद्दल बारीकसारीक माहिती दिली आहे. बायबलमध्ये जलप्रलयाबद्दल जो अहवाल दिलाय त्याची सुरुवात एखाद्या काल्पनिक कथेप्रमाणे केलेली नाही. याउलट जलप्रलयाशी संबंधित असलेल्या घटना नेमक्या कोणत्या वर्षी, कोणत्या महिन्यात आणि कोणत्या दिवशी झाल्या ते सांगितलंय. (उत्पत्ती ७:११; ८:४, १३, १४) यासोबतच, नोहाने बांधलेल्या जहाजाची लांबी, रुंदी आणि उंची किती होती तेही बायबलमध्ये सांगितलंय. (उत्पत्ती ६:१५) या बारीकसारीक माहितीवरून कळतं, की बायबलमध्ये दिलेला जलप्रलयाचा अहवाल एक दंतकथा नाही, तर खरोखरची घटना होती.
जलप्रलयाबद्दलच्या काल्पनिक गोष्टी आणि दंतकथा
जलप्रलयाबद्दल जगभरात ज्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात त्या बायबलमधल्या अहवालापेक्षा खूप वेगळ्या आहेत. पण त्यांतल्या काही गोष्टी बायबलमधल्या अहवालाशी मिळत्याजुळत्या आहेत. नोहाचे वंशज पृथ्वीवर जिथे कुठे राहायला गेले तिथे ते जलप्रलयाची गोष्ट लोकांना सांगत राहिले. पण काळाच्या ओघात त्या गोष्टीमध्ये बदल होत गेले. याची काही उदाहरणं खाली दिली आहेत.
ग्रीक दंतकथा: जलप्रलयातून वाचलेल्या स्त्री-पुरुषाला पृथ्वी भरून टाकायची आज्ञा देण्यात येते. त्यासाठी त्यांना आपल्या पाठीमागे दगडं फेकायची होती. मग त्या दगडांपासून स्त्री आणि पुरुष तयार होणार होते.
हिंदू दंतकथा: एक मासा एका माणसाला सांगतो की एक जलप्रलय येईल ज्यात संपूर्ण मानवजातीचा नाश होईल. तो मासा त्याला एक नाव तयार करायला सांगतो आणि नावेला एका सुरक्षित ठिकाणी घेऊन जातो. त्यामुळे त्या माणसाचा जीव वाचतो.
बॅबिलोनमधली दंतकथा: एका जलप्रलयातून वाचलेल्या स्त्री-पुरुषाला अमरत्व मिळतं आणि ते देव बनतात.
मध्य अमेरिकेतली दंतकथा: एका जलप्रलयातून एक माणूस आणि त्याची बायकोमुलं वाचतात आणि बाकीची सगळी माणसं मासे बनतात.
इन्साइट “नोहा” क्र. १ ¶१२
नोहा
निम्रोदने केलेलं बंड. नोहा हा जलप्रलयानंतरच्या काळातला पहिला कुलपिता होता. (उत्प १०:१-३२) पण त्याच्या जीवनकाळात खोटा धर्म पुन्हा सुरू झाला. त्या काळातल्या लोकांना अशी भीती होती, की ‘संबंध पृथ्वीवर त्यांची पांगापांग’ होईल. म्हणून निम्रोदच्या नेतृत्वाखाली त्यांनी असा एक बुरूज बांधायचा प्रयत्न केला ज्याचं “शिखर आकाशापर्यंत जाईल.” पण ही गोष्ट, “पृथ्वीला भरून टाका” अशी जी आज्ञा देवाने सुरुवातीला मानवांना दिली होती तिच्या विरोधात होती. शिवाय, देवाचा संदेष्टा म्हणून नोहा जे काम करत होता त्याच्याही विरोधात होती. नोहाचा मृत्यू अब्राहामचा जन्म व्हायच्या सुमारे दोन वर्षांआधी झाला. त्यामुळे बाबेलचा बुरूज बांधणाऱ्यांवर यहोवाने बजावलेला न्यायदंड आणि संपूर्ण पृथ्वीवर त्या बंडखोर लोकांची केलेली पांगापांग नोहाला पाहायला मिळाली. नोहा आणि शेम बुरूज बांधणाऱ्यांमध्ये सामील नव्हते. त्यामुळे भाषेचा जो गोंधळ झाला तो त्यांच्या बाबतीत झाला नाही. म्हणूनच देवाने सुरुवातीला आदामला जी भाषा दिली होती तीच मूळ भाषा ते बोलत होते.—उत्प ९:१, २८, २९; ११:१-९.
बायबलच्या चित्रकथा लेख १८
नोहाचा देवावर विश्वास होता
बायबलच्या चित्रकथा
[दृश्य १]
[गोष्ट सांगणारा:] नोहा एक चांगला माणूस होता. पण त्याच्या काळातले लोक खूप वाईट होते. ते देवाचं ऐकत नव्हते. त्यामुळे अशा दुष्ट लोकांमध्ये राहायला त्याला खूप अवघड जात होतं.
[दृश्य २]
[लामेख:] मला माहीत आहे नोहा, अशा लोकांमध्ये राहणं खूप कठीण आहे. आदामने एकदा मला सांगितलं होतं, की बऱ्याच वर्षांपासून हे असंच चालू आहे.
पण यहोवाने सांगितलंय, की तू या सगळ्यातून आमची सुटका करशील.
[नोहा:] पण हे कसं शक्य आहे पप्पा? हे सगळं बदलायसाठी मला काय करावं लागेल?
[दृश्य ३]
[गोष्ट सांगणारा:] मग यहोवाने दुष्ट लोकांचा नाश करण्यासाठी मोठा पूर आणायचं ठरवलं. पण नोहा आणि त्याची घरची माणसं यातून कशी वाचू शकतात हे त्याने नोहाला सांगितलं.
[यहोवा:] एक जहाज बनव. तू आणि तुझ्या घरातले सगळे त्या जहाजात जा. आणि तू सगळ्या प्रकारचे पक्षी आणि प्राणी आपल्यासोबत जहाजात ने, म्हणजे ते वाचतील.
[दृश्य ४]
[नोहा:] तू म्हणशील ते सगळं मी करीन.
[दृश्य ५]
[गोष्ट सांगणारा:] यहोवाने जे काही सांगितलं ते नोहाने त्याची बायको, त्याची तीन मुलं आणि त्यांच्या बायकांना सांगितलं.
[दृश्य ६]
[नोहाची बायको:] हे सगळं करायला तर खूप दिवस लागतील! पूर कधी येईल हे माहीत आहे का?
[नोहा:] नाही. पण यहोवा आपल्या सगळ्यांना नक्की वाचवेल.
[दृश्य ७]
[गोष्ट सांगणारा:] जहाज बांधायला जवळपास ४० किंवा ५० वर्षं लागली असतील. त्यांना झाडं तोडवी लागली असतील, मोठ्या लाकडांना आकार द्यावा लागला असेल आणि पाणी आत शिरू नये म्हणून डांबर लावावं लागलं असेल. आणि अशी इतर कामंही करावी लागली असतील.
[दृश्य ८]
[गोष्ट सांगणारा:] नोहाने प्रचारकार्यही केलं आणि लोकांना यहोवाबद्दल सांगितलं. पण लोकांनी त्याचं ऐकलं नाही.
[दृश्य ९]
[हामची बायको:] माझे घरचे तर म्हणतात की यहोवाबद्दल बोलायचं आणि जहाज बांधायचं नुसता टाईमपास आहे.
[नोहा:] यहोवा आपल्या कामावर आशीर्वाद देईल असा विश्वास आपण ठेवला पाहिजे.
[दृश्य १०]
[गोष्ट सांगणारा:] मग अगदी योग्य वेळी यहोवाने नोहा आणि त्याच्या घरच्यांना जहाजात जायला सांगितलं. सगळ्या प्रकारच्या प्राण्यांना जहाजात आणायला त्यांच्याकडे फक्त सात दिवस होते.
[दृश्य ११]
[गोष्ट सांगणारा:] मग यहोवाने जहाजाचं दार बंद केलं.
[दृश्य १२]
[गोष्ट सांगणारा:] ४० दिवस धो-धो पाऊस पडला. मोठमोठे डोंगरसुद्धा पाण्याखाली गेले!
[दृश्य १३]
[हाम:] आपण बाहेर कधी जाणार?
[दृश्य १४]
[याफेथ:] एक वर्षापेक्षा जास्त दिवस झालेत!
[दृश्य १५]
[नोहा:] जहाजातून कधी बाहेर जाता येईल ते यहोवा आपल्याला सांगेल.
[नोहा:] त्याच्यावर विश्वास ठेवा.
[दृश्य १६]
[गोष्ट सांगणारा:] शेवटी यहोवाने नोहाला सांगितलं की आता ते बाहेर जाऊ शकतात. आता कुठेच दुष्ट आणि वाईट लोक राहिले नव्हते!
[दृश्य १७]
[गोष्ट सांगणारा:] यहोवाने नोहाला सांगितलं की तो परत कधीच असा मोठा पूर आणून सगळ्यांना मारून टाकणार नाही. आणि याची खूण म्हणून त्याने आकाशात मेघधनुष्य दाखवला.
[गोष्ट सांगणारा:] नोहा आणि त्याच्या घरचे लोक वाचले कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला.
[चौकट]
या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं?
नोहाला देवावर विश्वास ठेवायला अवघड का गेलं असावं?
हिंट: मत्तय २४:३८, ३९; इब्री लोकांना ११:७.
नोहा आणि त्याच्या घरच्यांना धीराची गरज का होती?
हिंट: उत्पत्ती ६:१४; ७:६; ८:१३-१६; इब्री लोकांना ६:१२.
तुम्हाला विश्वासाची आणि धीराची गरज का आहे?
हिंट: मत्तय २४:३६, ३७; इब्री लोकांना १०:३६-३९.
अध्याय ३
तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही
टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१७.३ १२ ¶५, तळटीप “तू दिसायला खूप सुंदर आहेस”
बायबलमध्ये साराच्या मजबूत विश्वासाची प्रशंसा करण्यात आली आहे. सारा ही ऊर नावाच्या शहरात राहायची. तिथे चंद्र दैवताची उपासना करण्यासाठी एक भव्य मंदिर होतं. तिथले बरेचसे लोक या दैवताची उपासना करत असले, तरी सारा मात्र त्याची उपासना करत नव्हती. ती खऱ्या देवाची, यहोवाची उपासना करायची. सारा यहोवा देवावर कसा विश्वास ठेवू लागली हे बायबलमध्ये सांगितलेलं नाही. तिचे वडील निदान काही काळापर्यंत तरी मूर्तिपूजा करत होते. पण तिच्याबद्दल एक गोष्ट बायबलमध्ये सांगितली आहे. ती म्हणजे तिने अब्राहामशी लग्न केलं आणि तो तिच्यापेक्षा वयाने दहा वर्षं मोठा होता. (उत्पत्ती १७:१७) पुढे अब्राहामची ओळख ‘जे विश्वास दाखवतात अशा सगळ्यांचा पिता’ अशी झाली. (रोमकर ४:११) त्या दोघांनी मिळून खूप चांगला संसार केला. त्यांचं वैवाहिक बंधन खूप मजबूत होतं. ते एकमेकांचा खूप आदर करायचे आणि मनमोकळेपणाने एकमेकांशी बोलायचे. तसंच त्यांनी समस्यांचा मिळून सामना केला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दोघांचं यहोवावर गाढ प्रेम असल्यामुळे त्यांचं वैवाहिक बंधन मजबूत होतं.
[तळटीप]
सारा ही अब्राहामची सावत्र बहीण होती. त्या दोघांचे वडील एकच होते. त्यांचं नाव तेरह होतं. पण त्यांच्या आया वेगळ्या होत्या. (उत्पत्ती २०:१२) सारा आणि अब्राहामचं लग्न आजच्या काळात चुकीचं मानलं जात असलं तरी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे, त्या काळात गोष्टी आजच्यापेक्षा फार वेगळ्या होत्या. त्या काळातले लोक अपरिपूर्ण असले, तरी ते परिपूर्णतेच्या खूप जवळ होते. त्यामुळे जवळच्या नातेवाइकांमध्ये लग्न करूनसुद्धा त्यांच्या मुलाबाळांमध्ये दोष नसायचे. पण जवळजवळ ४०० वर्षांनंतर लोकांचं आयुष्य कमी होऊन आजच्याइतकंच झालं. त्या वेळी मोशेच्या नियमशास्त्रात अशी आज्ञा देण्यात आली, की कोणीही जवळच्या नातेवाइकाशी लग्न करू नये.—लेवीय १८:६.
टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१७.३ १३ ¶३–१४ ¶२
“तू दिसायला खूप सुंदर आहेस”
सामानाची बांधाबांध करताना कोणत्या गोष्टी सोबत घ्यायच्या आणि कोणत्या ठेवायच्या हे साराला ठरवायचं होतं. त्यांना सगळं सामान गाढवांवर आणि उंटांवर वाहून न्यावं लागणार होतं. आणि ठिकठिकाणी प्रवास करून तंबूंमध्ये राहावं लागणार होतं. त्यामुळे तिला कोणतंही जड किंवा मोठं सामान सोबत घेता येणार नव्हतं. त्यांना तर आपलं बरंचसं सामान विकावं लागणार होतं किंवा इतरांना देऊन टाकावं लागणार होतं. शिवाय, ऊर शहरातल्या सुखसुविधासुद्धा आता तिला मिळणार नव्हत्या. जसं की ती वाटेल तेव्हा बाजारात जाऊन धान्य, मांस, फळं, कपडे आणि इतर गरजेच्या आणि सुखसोयीच्या गोष्टी खरेदी करू शकणार नव्हती.
पण या सगळ्यापेक्षा साराला आपलं घर सोडणं खूप कठीण गेलं असेल. तिचं घर कदाचित भलमोठं असावं आणि त्यात बऱ्याच सुखसोयी असाव्यात. कारण संशोधन करणाऱ्यांना ऊर शहरात १२ पेक्षा जास्त खोल्या असलेली घरं सापडली. तिथे ताज्या पाण्याचे झरे आणि पाणीपुरवठ्याची चांगली सोय होती. अगदी साध्यातल्या साध्या घरालासुद्धा मजबूत छप्पर, भिंती आणि कड्या असलेलं दार असायचं. पण आता त्यांना तंबूंमध्ये राहावं लागणार होतं. मग चोऱ्यामाऱ्या करणाऱ्यांपासून त्यांना सुरक्षा कशी मिळणार होती? शिवाय, त्या काळात सिंह, बिबट्या, अस्वल आणि लांडगे अशा हिंस्र प्राण्यांचाही धोका असायचा.
साराला आपल्या नातेवाइकांनाही मागे सोडून जावं लागणार होतं का? जर जावं लागलं असेल तर तिला कसं वाटलं असेल? तिला खासकरून, ‘आपला देश, आपले नातेवाईक सोडून जा’ ही देवाची आज्ञा पाळणं खूप कठीण गेलं असेल. ऊर देशात तिचे खूप नातेवाईक असतील आणि त्यांच्यावर तिचं जिवापाड प्रेम असावं. या सगळ्यांना सोडून जाणं तिच्या जिवावर आलं असेल, कारण त्यांना ती परत कधीच भेटू शकणार नव्हती. असं असलं, तरी साराने धैर्य दाखवलं आणि ती ऊर शहर सोडायची तयारी करू लागली.
इतक्या सगळ्या समस्या असूनही सारा ठरलेल्या दिवशी आपलं सामानसुमान बांधून निघायला तयार होती. तेरह त्यांच्या घराण्याचा कुलपिता होता आणि त्याचं वय दोनशेपेक्षा जास्त होतं. पण तरीही त्याला अब्राहाम आणि सारासोबत जावं लागणार होतं. (उत्पत्ती ११:३१) त्यामुळे आपल्या या वयस्कर सासऱ्याची साराला खूप काळजी घ्यावी लागणार होती. यहोवाने सांगितल्याप्रमाणे ते “खासद्यांचा देश सोडून” जाताना लोटसुद्धा त्यांच्यासोबत जाणार होता.—प्रेषितांची कार्यं ७:४.
टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१७.३ १४ ¶६–१५ ¶२
“तू दिसायला खूप सुंदर आहेस”
असं असलं, तरी जगातल्या संकटांचा त्यांना सामना करावा लागणार होता. कनान देशात दुष्काळ पडला तेव्हा अब्राहामने आपल्या कुटुंबाला दक्षिणेकडे इजिप्तला न्यायचा निर्णय घेतला. पण तिथे त्याला एका गोष्टीची भीती वाटत होती. म्हणून तो साराला म्हणाला: “हे बघ, तू दिसायला खूप सुंदर आहेस. पण जेव्हा इजिप्तचे लोक तुला पाहतील तेव्हा ते म्हणतील, ‘ही तर याची बायको आहे.’ म्हणून ते मला मारून टाकतील पण तुला जिवंत ठेवतील. त्यामुळे त्यांना सांग, की तू माझी बहीण आहेस. म्हणजे ते माझ्याशी चांगलं वागतील आणि माझा जीव वाचेल.” (उत्पत्ती १२:१०-१३) अब्राहामने साराला अशी विचित्र गोष्ट का सांगितली असेल?
काही टीकाकारांचं असं म्हणणं आहे, की अब्राहाम खोटा आणि भितरा होता. पण तसं नव्हतं. कारण सारा खरंच त्याची सावत्र बहीण होती. आणि अब्राहामला ज्या गोष्टीची भीती होती, तीसुद्धा बरोबरच होती. अब्राहाम आणि सारा या दोघांनाही माहीत होतं, की अब्राहामच्या एका खास संततीद्वारे एक राष्ट्र निर्माण करायचा देवाचा उद्देश होता. आणि यापेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट महत्त्वाची नसल्यामुळे अब्राहामचं सुरक्षित असणं जास्त महत्त्वाचं होतं. इतकंच नाही, तर प्राचीन काळातल्या हस्तलिखितांवरून कळतं, की इजिप्तमधले सत्ताधारी लोक इतर पुरुषांना मारून त्यांच्या पत्नींचं अपहरण करायचे. त्यामुळे अब्राहामने साराला जे म्हटलं ते योग्यच होतं आणि सारानेही त्याला नम्रपणे साथ दिली.
लवकरच ज्या घटना घडल्या त्यांवरून सिद्ध झालं, की अब्राहामची भीती योग्यच होती. कारण फोरोच्या काही राजकुमारांनी साराचं विलक्षण सौंदर्य पाहिलं. सारा तरुण नसली, तरी ती खूप सुंदर होती. आणि त्यांनी जेव्हा तिच्याबद्दल फारोला सांगितलं तेव्हा फारोने तिला घेऊन यायचा आदेश दिला. या घटनेमुळे अब्राहामला किती मनस्ताप झाला असेल आणि सारा किती घाबरी असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. पण असं दिसतं, की त्यांनी तिला अपहरण केलेल्या व्यक्तीसारखं नाही, तर एका खास पाहुण्यासारखं सन्मानाने वागवलं. कदाचित फारोला तिला आपलं ऐश्वर्य दाखवून तिच्यावर छाप पाडायची असेल आणि नंतर तिला पत्नी म्हणून मिळवण्यासाठी तिच्या ‘भावासोबत’ बोलाचाली करायची असेल.—उत्पत्ती १२:१४-१६.
सावध राहा! १/०८ २९ ¶४-५
विवाहात मस्तकपदाचा काय अर्थ होतो?
पत्नीने पतीच्या अधीन असण्याचा असा अर्थ होतो का, की तिने तिच्या भावना आणि विचार आपल्या पतीला कधीच बोलून दाखवू नयेत? साराने आपल्या पतीच्या, अब्राहामच्या आज्ञेत राहायच्या बाबतीत एक चांगलं उदाहरण कसं मांडलं त्याचा विचार करा. (१ पेत्र ३:५, ६) ती लहानमोठ्या सगळ्या गोष्टींच्या बाबतींत अब्राहामला साथ द्यायला तयार होती. जसं की, अब्राहामच्या सांगण्यावरून ती ऊरमधलं आपलं आरामदायी घर सोडून तंबूंमध्ये राहायला तयार झाली. तसंच, अचानक घरी आलेल्या पाहुण्यांसाठीही तिने जेवण तयार केलं. (उत्पत्ती १२:५-९; १८:६) पण एका महत्त्वाच्या विषयाबद्दल तिचं मत अब्राहामपेक्षा फार वेगळं असलं, तरी ती ते स्पष्टपणे व्यक्त करत राहिली. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा साराला असं वाटत होतं, की अब्राहामने त्याच्या उपपत्नीला, हागारला आणि त्याच्या पहिल्या जन्मलेल्या मुलाला, इश्माएलला घरातून बाहेर काढावं. त्या वेळी साराचं म्हणणं चुकीचं आहे असं म्हणण्याऐवजी देवाने अब्राहामला ‘तिचं ऐकायला’ सांगितलं. अब्राहामने जोपर्यंत हागार आणि इश्माएलला घराबाहेर काढलं नाही तोपर्यंत सारा थांबून राहिली आणि त्याच्या अधीन राहिली. तिने स्वतःहून त्यांना घराबाहेर काढायचा प्रयत्न केला नाही.—उत्पत्ती २१:८-१४.
साराच्या उदाहरणावरून दिसून येतं, की पत्नीने नुसतंच आपल्या पतीच्या सावलीत राहण्यापेक्षा त्याची एक चांगली “जीवनसाथी” असलं पाहिजे. म्हणजेच विवाहात तिचं एक मानाचं स्थान असलं पाहिजे. (मलाखी २:१४) पतीची जीवनसाथी असल्यामुळे कुटुंबात निर्णय घेतले जातात तेव्हा तिलाही आपलं मत मांडायचा हक्क असतो आणि काही प्रमाणात कुटुंबात तिला अधिकारही असतो. बऱ्याचदा ती घरातल्या गोष्टी सांभाळते आणि पैशाचं नियोजनही करते. पण कुटुंबप्रमुख या नात्याने अंतिम निर्णय घ्यायची जबाबदारी पतीची असते.—नीतिवचनं ३१:१०-३१; १ तीमथ्य ५:१४.
टेहळणी बुरूज२३.०५ २४-२५ ¶१५-१७
“याहची ज्वाला” जळत राहू द्या
१५ पती-पत्नींनी एकमेकांचा आदर करणंसुद्धा खूप महत्त्वाचंय. ते जणू ऑक्सिजनसारखं आहे, ज्यामुळे शेकोटी पेटत राहते. कारण ऑक्सिजन नसेल तर आग लगेच विझून जाईल. तसंच, पती-पत्नींमध्ये आदर नसेल तर प्रेमाची ज्योत लगेच विझून जाईल. पण तेच जर पती-पत्नी एकमेकांना आदर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात तेव्हा ते जणू प्रेमाची ज्योत पेटती ठेवण्यासाठी मेहनत घेत असतात. हेही लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या जोडीदाराला आदर दाखवत आहात असं तुम्हाला जरी वाटत असलं, तरी ते तुमच्या जोडीदाराला जाणवतंय का हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं आहे. पेन्नी आणि आरेट यांच्या लग्नाला २५ पेक्षा जास्त वर्षं झाली आहेत. पेन्नी म्हणते: “एकमेकांना आदर दिल्यामुळे घरात एक प्रेमळ वातावरण निर्माण होतं. एकमेकांची मतं आमच्यासाठी महत्त्वाची असल्यामुळे आम्हाला मनमोकळेपणाने एकमेकांशी बोलता येतं.” मग, तुम्ही तुमच्या जोडीदाराला आदर दाखवताय हे त्याला जाणवावं म्हणून तुम्ही काय करू शकता? त्यासाठी आपण अब्राहाम आणि सारा यांच्या उदाहरणाकडे लक्ष देऊ या.
१६ अब्राहाम नेहमी साराशी आदराने वागायचा. त्याने नेहमी तिचं म्हणणं ऐकून घेतलं आणि तिच्या भावनांची कदर केली. एकदा सारा खूप चिडली होती. आणि रागाच्या भरात तिने आपल्या सगळ्या भावना बोलून दाखवल्या. इतकंच नाही तर तिने अब्राहामलाच दोष दिला. पण मग अब्राहामसुद्धा तिच्यावर भडकला का? नाही. सारा आपल्या अधीन आहे आणि ती आपल्याला नेहमी साथ देते हे अब्राहामला माहीत होतं. म्हणून त्याने तिचं शांतपणे ऐकून घेतलं आणि समस्येवर उपाय काढायचा प्रयत्न केला. (उत्प. १६:५, ६) यावरून आपण काय शिकू शकतो? पतींनो, तुमच्या कुटुंबासाठी निर्णय घ्यायचा अधिकार तुम्हाला देण्यात आलाय. (१ करिंथ. ११:३) पण तरीसुद्धा, एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी तुम्ही तुमच्या पत्नीचं मत जाणून घेतलं पाहिजे. खासकरून जेव्हा त्या निर्णयाचा तुमच्या पत्नीवर परिणाम होणार असतो तेव्हा. असं केल्यामुळे तुमचं तुमच्या पत्नीवर प्रेम आहे हे दिसून येईल. (१ करिंथ. १३:४, ५) कधी-कधी असंही होऊ शकतं, की तुमच्या पत्नीला एखाद्या गोष्टीबद्दल खूप काळजी वाटत असेल, आणि कोणासमोर तरी आपलं मन मोकळं करावं असं तिला वाटत असेल. अशा वेळी तुम्ही तिचं शांतपणे ऐकून घेऊन तिला आदर दाखवता का? (१ पेत्र ३:७ वाचा.) अँजेला आणि दिमित्री यांच्या लग्नाला जवळपास ३० वर्षं झाली. आपला पती आपल्याला कसा आदर दाखवतो याबद्दल अँजेला म्हणते: “जेव्हा माझा मूड खराब असतो किंवा मला नुसतंच बोलावसं वाटतं तेव्हा हे माझं नेहमी लक्ष देऊन ऐकायला तयार असतात. आणि जेव्हा मी भावनेच्या भरात बोलत असते तेव्हासुद्धा ते माझं खूप धीराने ऐकून घेतात.”
१७ अब्राहामच्या निर्णयांना पाठिंबा देऊन साराने अब्राहामला आदर दाखवला. (उत्प. १२:५) एकदा, अचानक आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करायचं अब्राहामने ठरवलं. त्याने साराला हातातलं काम बाजूला ठेवून भरपूर प्रमाणात पीठ मळून भाकरी बनवायला सांगितलं. (उत्प. १८:६) साराने लगेच अब्राहामने सांगितल्याप्रमाणे केलं. पत्नींनो तुम्हीसुद्धा सारासारखं आपल्या पतीच्या निर्णयांना पाठिंबा देऊ शकता. असं केल्यामुळे तुमचं नातं आणखी मजबूत होईल. (१ पेत्र ३:५, ६ वाचा.) आधीच्या परिच्छेदामध्ये उल्लेख केलेला दिमित्री, त्याची पत्नी त्याला कसा आदर दाखवते याबद्दल असं म्हणतो: “कधी-कधी आमची मतं जुळत नाहीत, पण अँजेला ज्या प्रकारे माझ्या निर्णयांना पाठिंबा देते त्यामुळे मला तिची खूप कदर वाटते. तसंच, मी घेतलेला निर्णय म्हणावा तितका चांगला नसला तरी ती माझी टीका करत नाही.” खरंच, आपला आदर करणाऱ्या व्यक्तीवर प्रेम करणं किती सोपं असतं!
अध्याय ४
यहोवाच्या वतीने युद्ध लढणारा पहिला माणूस
टेहळणी बुरूज८९ ७/१ ५ ¶४–६ ¶१
अब्राहाम—देवाचा संदेष्टा आणि मित्र
एलामचा राजा कदारलागोमर याच्यावर अब्राहामने मिळवलेल्या विजयाबद्दल काय? १९ व्या शतकाच्या सुरुवातीला एलामी लोकांबद्दल खूप कमी माहिती होती. पॅलेस्टाईन तर सोडाच, पण बॅबिलोनियावरसुद्धा एलामी लोकांचा प्रभाव होता ही कल्पनासुद्धा बायबलच्या टीकाकारांनी नाकारली होती. पण आता ते असा विचार करत नाहीत. उत्खननात सापडेल्या गोष्टींवरून ते एक शक्तिशाली आणि लढाऊ राष्ट्र असल्याचं स्पष्ट झालं. एका संर्दभग्रंथात असं म्हटलंय: “इ.स.पू. १९५० च्या आसपास एलामी लोकांनी ऊर शहराचा नाश केला. . . . त्यानंतर बॅबिलोनियाच्या राज्यकर्त्यांवर त्यांचा जबदरस्त प्रभाव पडला.”
शिवाय प्राचीन शिलालेखांवर एलामी राजांची नावं सापडली आहेत. त्यांपैकी काही नावं “कुदुर” या शब्दाने सुरू होतात. हा शब्द बायबलमधल्या “कदार” या शब्दाशी मिळताजुळता आहे. एलामी लोकांची “लगामार” नावाची एक मुख्य देवी होती. हे नावसुद्धा बायबलमधल्या “लागोमर” या शब्दाशी मिळतजुळतं आहे. त्यामुळे कदारलागोमर नावाचा एक शासक होता ही गोष्ट इतिहासकारांनी आता मान्य केली आहे. कारण या नावाचा अर्थ “लगामारचा सेवक” असा होत असावा. बॅबिलोनियामध्ये सापडलेल्या काही शिलालेखांवर तुधुला, एरिआकू आणि कुदुर-लाहमिल या आक्रमण करणाऱ्या तीन राजांची नावं दिली आहेत. ही नावं बायबलमधल्या तिदाल, अर्योक आणि कदारलागोमर या नावांशी मिळतीजुळती आहेत. (उत्पत्ती १४:१) हिडन थिंग्ज ऑफ गॉड्स रेव्हलेशन या पुस्तकात डॉ. ए. कस्टन्स म्हणतात: “या नावांशिवाय या शिलालेखांवर एलामी लोकांनी बॅबिलोनियावर आपलं राज्य स्थापन केलं तेव्हा घडलेल्या घटनांबद्दलची बारीकसारीक माहितीसुद्धा आहे. . . . शिलालेखांवर असलेल्या या माहितीवरून बायबलमधली माहिती खरी असल्याचं अगदी ठळकपणे सिद्ध होत असल्यामुळे, हे पुरावे दाबून टाकण्यासाठी बायबलचे टीकाकार अक्षरशः त्यांवर तुटून पडले.”
या चार राजांनी केलेल्या आक्रमणाबद्दल काय? या गोष्टीला दुजोरा देणारे काही ऐतिसासिक पुरावे यार्देनच्या पलीकडच्या प्रदेशात आणि नेगेबमध्ये सापडले आहेत का? हो. प्रोफेसर योहानन अहरोनी यांनी त्यांच्या पुस्तकात असा उल्लेख केलाय, की इस्राएली लोकांच्या आधी यार्देनच्या पलीकडच्या प्रदेशात आणि नेगेबमध्ये असलेली एक “समृद्ध” संस्कृती “इ.स.पू. २००० च्या आसपास” अचानक लुप्त झाली. पण इतर पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते ही घटना इ.स.पू. १९०० च्या आसपास घडली. डॉ. हॅरल्ड स्टिगर्स त्यांच्या पुस्तकात म्हणतात, की “नेगेबमध्ये आणि यार्देनच्या पलीकडच्या प्रदेशात सापडलेली या काळातली मातीची भांडी अगदी एकसारखीच आहेत. आणि त्यांवरून या संस्कृतीचा अचानक आणि पूर्णपणे नाश झाल्याचं दिसून येतं.” इतकंच काय जॉन वॅन सेटर्स यांसारखे बायबलचे टीकाकारसुद्धा या पुराव्यांशी सहमत आहेत. सेटर्स त्यांच्या एब्रहॅम इन हिस्ट्री ॲन्ड ट्रेडिशन या पुस्तकात असं म्हणतात, की “या काळानंतर तिथले लोक जर कुठे गेले असतील तर ते कुठे गेले असतील हे एक न सुटलेलं कोडं आहे.”
उत्पत्तीच्या १४ व्या अध्यायात जे म्हटलंय ते कदाचित याचं उत्तर असावं. बायबलमध्ये सांगितल्यानुसार अब्राहाम इ.स.पू. १९४३ मध्ये कनान देशात राहायला आला. आणि त्यानंतर लगेचच कदारलागोमरने आक्रमण करून त्या ठिकाणचा ताबा घेतला असेल. पुढे याच शतकादरम्यान देवाने सदोम आणि गमोरा या अनैतिक शहरांचा अग्नीने नाश केला. यामुळे एकेकाळी यार्देन खोऱ्यात असलेला सुपीक प्रदेश कायमचा बदलून गेला आणि तो नापीक बनला. (उत्पत्ती १३:१०-१३; १९:२४, २५) त्यामुळे कोणालाही आता त्यावर आक्रमण करून तो प्रदेश मिळवण्यात रस राहिला नव्हता.
इन्साइट “मृत समुद्र (क्षार समुद्र)” ¶६
मृत समुद्र (क्षार समुद्र)
सदोम आणि गमोरा. असं मानलं जातं की सदोम आणि गमोरा ही शहरं मृत समुद्राच्या दक्षिण टोकाजवळ होती. बायबलमध्ये म्हटलंय की या शहरांच्या राजांनी “सिद्दीमच्या खोऱ्यात, म्हणजेच मृत समुद्राजवळ” लढाई केली. ज्या पद्धतीने हे वाक्य मांडलंय त्यावरून असं दिसून येतं, की पुढे हे सिद्दीमचं खोरं मृत समुद्राने व्यापून गेलं. (उत्प १४:३) सदोम आणि गमोराच्या ज्या प्रदेशात लोट राहिला होता तो प्रदेश “भरपूर पाणी” असलेला प्रदेश असून “यहोवाच्या बागेसारखा” होता. (उत्प १३:१०-१२) दक्षिण-पूर्व किनारपट्टीच्या पठारी प्रदेशात आजसुद्धा भरपूर प्रमाणात झाडंझुडपं आहेत आणि तिथे गहू, जव, खजूर आणि द्राक्षवेलींची शेती केली जाऊ शकते. खासकरून दक्षिणेकडच्या या भागात डांबराचं आणि क्षाराचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि ही गोष्ट सदोम आणि गमोराबद्दल बायबलमध्ये दिलेल्या अहवालाशी जुळणारी आहे.—उत्प १४:१०; १९:२४-२६.
इन्साइट “शालेम”
शालेम
(शालेम) [शांती].
हे एक प्राचीन शहर होतं ज्याचा राजा आणि याजक मलकीसदेक होता. (उत्प १४:१८) हिब्रू भाषेत यरुशलेम या नावात “शालेम” हा शब्द समाविष्ट करण्यात आलाय आणि या शब्दाला दुहेरी रूप आहे. त्यामुळे शालेम या शब्दाचा अर्थ “दुप्पट शांती” असा केला जाऊ शकतो. “शालेम” या शब्दाचा अर्थ “शांती” होतो हे आपल्याला इब्री लोकांना ७:२ मधल्या प्रेरित शब्दांवरून समजतं.
प्राचीन यहुदी लोकांमध्ये शालेम म्हणजे यरुशलेम असं म्हटलं जायचं. आणि शास्त्रवचनांतसुद्धा या गोष्टीचे पुरावे आहेत. अब्राहाम सदोमच्या राजाला आणि मलकीसदेकला “राजाच्या खोऱ्यात” भेटला. पुढे बऱ्याच शतकांनंतर दावीदचा मुलगा अबशालोम याने तिथे एक स्मारक उभं केलं. यावरून दिसंत की हा प्रदेश राज्याच्या राजधानी शहराच्या, यरुशलेमच्या जवळच असावा. (उत्प १४:१७, १८; २शमु १८:१८) खरंतर “शालेम” हा शब्द यरुशलेम या नावात समाविष्ट करण्यात आला आणि स्तोत्रकर्त्याने हा शब्द ‘सियोनसाठी’ समानार्थी शब्द म्हणून वापरला. (स्तो ७६:२) शिवाय नंतर जिथे दावीदच्या वंशांतले राजे आणि लेवी वंशातले याजक सेवा करणार होते आणि पुढे जिथे “मलकीसदेकसारखा” राजा आणि याजक म्हणून निवडण्यात आलेला येशू ख्रिस्त आपलं बलिदान देणार होता, तिथेच मलकीसदेकने राजा आणि याजक म्हणून सेवा करणं योग्यच होतं.—इब्री ३:१; ७:१-३, १५-१७.
इन्साइट “महायाजक” ¶२७-२८
महायाजक
येशू ख्रिस्ताची महायाजक म्हणून भूमिका. बायबलमधल्या इब्री लोकांना या पुस्तकातून कळतं, की येशूचं पुनरुत्थान होऊन तो स्वर्गात गेला तेव्हापासून तो “मलकीसदेकसारखा सर्वकाळासाठी महायाजक” बनला. (इब्री ६:२०; ७:१७, २१) ख्रिस्ताचं याजकपद किती महान आहे आणि अहरोनच्या याजकपदापेक्षा ते किती श्रेष्ठ आहे, हे इब्री लोकांना या पुस्तकाच्या लेखकाने दाखवलं. त्याने म्हटलं, की मलकीसदेक हा वारशाने नाही तर सर्वोच्च देवाने नेमल्यामुळे राजा आणि याजक होता. ख्रिस्त येशू यहूदा वंशातून आणि दावीदच्या घराण्यातून आला होता. तो लेवी वंशातून आला नव्हता. त्यामुळे मलकीसदेकसारखंच त्यालाही वारशाने अहरोनकडून याजकपद मिळालेलं नव्हतं, तर देवाने स्वतः त्याला नियुक्त केलं होतं. (इब्री ५:१०) स्तोत्र ११०:४ मध्ये म्हटलंय: “यहोवाने शपथ घेऊन वचन दिलं आहे आणि तो आपलं मन बदलणार नाही: ‘तू मलकीसदेकसारखा याजक आहेस आणि तू सर्वकाळासाठी याजक राहशील.’” या अभिवचनाप्रमाणे देवाने येशूला स्वर्गात राजा आणि याजक म्हणून नियुक्त केलं. यासोबतच, तो दावीदच्या वंशातला असल्यामुळे त्याला राज्याधिकारसुद्धा मिळाला आहे. म्हणूनच दावीदशी केलेल्या करारानुसार तो राज्यपदाचा वारसदार बनला. (२शमु ७:११-१६) त्यामुळे मलकीसदेकप्रमाणेच राजा आणि याजक असे दोन्ही अधिकार त्याच्याकडे आहेत.
ख्रिस्ताचं याजकपद किती श्रेष्ठ होतं हे आणखी एका गोष्टीवरून आपल्याला कळतं. इस्राएलमध्ये याजक ज्या वंशातले होते त्या वंशाचा पूर्वज लेवी होता. अब्राहामने जेव्हा शालेमचा राजा आणि याजक असलेल्या मलकीसदेकला आपल्याकडच्या सगळ्या गोष्टींमधला दहावा भाग दिला, तेव्हा लेवी अजूनही अब्राहामच्या वंशातून यायचा होता. त्यामुळे असं म्हणता येईल की एका अर्थाने लेवीनेसुद्धा मलकीसदेकला दहावा भाग दिला. जो लहान असतो त्याला आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीकडून आशीर्वाद मिळतो या नियमाप्रमाणे मलकीसदेकचा आशीर्वाद एका अर्थाने लेवीलाही मिळाला. (इब्री ७:४-१०) प्रेषित पौलने आणखी एका गोष्टीकडे आपलं लक्ष वेधलं. त्याने म्हटलं की “त्याच्या आईवडिलांबद्दल कोणतीच माहिती नाही किंवा त्याची वंशावळही नाही; तसंच, त्याचा जन्म आणि मृत्यू कधी झाला याबद्दलही माहिती सापडत नाही.” या अर्थाने मलकीसदेक अविनाशी जीवनासाठी पुनरुत्थान करण्यात आलेल्या येशू ख्रिस्ताच्या सर्वकाळाच्या याजकपदाला सूचित करतो.—इब्री ७:३, १५-१७
टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१२ १/१ ६-७
अब्राहाम—एक धैर्यवान माणूस
आपलं संपूर्ण कुटुंब आणि आपले सगळे सेवक कनान देशात जायची तयारी करत असताना अब्राहाम त्यांना पाहतो. (उत्पत्ती १२:१-५) इतके सगळे लोक त्यांच्या रोजच्या गरजांसाठी आपल्यावर अवलंबून आहेत हे पाहून आपल्यावर किती मोठी जबाबदारी आहे याची अब्राहामला जाणीव होते. पण एका परक्या देशात तो त्यांच्या गरजा कशा पूर्ण करणार होता? मोठमोठी कुरणं, सुपीक जमीन आणि भरपूर पाणी असलेल्या समृद्ध ऊर शहरात या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं त्याला जास्त सोपं होतं का? नवीन देशात गेल्यावर तो जर आजारी पडला किंवा त्याचा मृत्यू झाला तर काय? त्याच्या कुटुंबाची काळजी कोण घेणार? अब्राहामला या सगळ्या गोष्टींची चिंता असली तरी तो घाबरून गेला नाही. काहीही झालं तरी यहोवाची आज्ञा पाळायचा त्याने पक्का निर्धार केला होता. आणि यावरून तो धैर्यवान होता हे कळतं.
धैर्य म्हणजे काय? धैर्य म्हणजे खंबीर, धाडसी आणि शूर असणं. धैर्यवान माणूस भितरा किंवा बुजरा नसतो. पण धैर्यवान असण्याचा अर्थ आपण कधीही घाबरत नाही असाही होत नाही. उलट ज्याला देवाकडून धैर्य मिळालंय तो घाबरत असला तरी कार्यं करतो.
अब्राहामने धैर्य कसं दाखवलं? आजूबाजूचे लोक सहसा जसं वागायचे त्यापेक्षा वेगळं वागायला अब्राहाम तयार होता. अब्राहाम अशा ठिकाणी लहानाचा मोठा झाला होता जिथे लोक बऱ्याचशा देवी-दैवतांची आणि मूर्तींची उपासना करायचे. पण इतरांना काय वाटेल या भीतीने तो योग्य ते करण्यापासून मागे हटला नाही. उलट अब्राहामने “सर्वोच्च देव यहोवा” या एकाच देवाची उपासना करायचा अगदी वेगळा मार्ग निवडला आणि धैर्य दाखवलं.—उत्पत्ती १४:२१, २२.
अब्राहामने पैसा आणि साधनसंपत्तीपेक्षा खऱ्या देवाच्या उपासनेला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं. यहोवा आपल्या गरजा पूर्ण करेल असा भरवसा ठेवून तो ऊरमधलं आपलं सुखसोयींचं जीवन सोडून ओसाड प्रदेशात जायला तयार होता. जसजशी वर्षं सरत गेली तसतसं अब्राहामच्या मनात ऊरमधल्या आरामदायी जीवनाचा विचार नक्कीच येत असावा. पण अब्राहामला खातरी होती, की यहोवा नेहमी त्याची आणि त्याच्या कुटुंबाची काळजी घेईल. आपल्या जीवनातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणून यहोवाला जडून राहिल्यामुळे अब्राहामला देवाच्या आज्ञांचं पालन करायचं धैर्य मिळालं.
आपल्याला यातून काय शिकायला मिळतं? आपल्या आजूबाजूचे लोक यहोवाची आज्ञा पाळत नसले, तरी अब्राहामच्या उदाहरणाचं अनुकरण करून आपण ते करायचं धैर्य स्वतःमध्ये वाढवू शकतो. उदाहरणार्थ, बायबल आपल्याला सांगतं की जे लोक यहोवावर विश्वास ठेवतात त्यांचा कदाचित मित्रांकडून किंवा नातेवाइकांकडून विरोध होईल. (योहान १५:२०) पण यहोवाबद्दल आपण जे काही शिकलोय त्याबद्दल आपल्याला पूर्ण खातरी असते तेव्हा आपण आपल्या विश्वासाच्या बाजूने बोलायला तयार असतो, पण आदराने.—१ पेत्र ३:१५.
आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या गरजा पूर्ण करायचं जे अभिवचन यहोवाने दिलंय त्यावरही आपण भरवसा ठेवू शकतो. यामुळे आपल्याला आपलं सगळं लक्ष भौतिक गोष्टींवर नाही तर आध्यात्मिक गोष्टींवर लावायचं धैर्य मिळतं. (मत्तय ६:३३) एका कुटुंबाने हे कसं केलं याचा विचार करा.
डो आणि बेकी यांना दोन लहान मुलं असूनही त्यांना प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकणी जाऊन सेवा करायची इच्छा होती. त्यांनी या विषयावर संशोधन केलं आणि यहोवाला मनापासून प्रार्थना केली आणि ठरवल्याप्रमाणे करायचा निर्णय घेतला. डो म्हणतात: “तिथे गेल्यानंतर नक्की काय होईल हे माहीत नसताना मुलांना घेऊन तिथे जायला धैर्य लागलं. पण हा निर्णय घेताना आम्ही अब्राहाम आणि साराच्या उदाहरणावर चर्चा केली. त्यांनी यहोवावर कसा भरवसा ठेवला आणि यहोवानेही त्यांना कशी मदत केली आणि आशीर्वाद दिला, या गोष्टींचा विचार केल्यामुळे आम्हाला खरोखर मदत झाली.”
परक्या देशात गेल्यानंतर जे अनुभवायला मिळालं त्याबद्दल डो म्हणतात: “आम्हाला भरपूर आशीर्वाद मिळाले. आमचं राहणीमान अगदी साधं असल्यामुळे दिवसाचा बराचसा वेळ आम्हाला एकत्र घालवता येतो; मग ते प्रचार कार्य असो, एकमेकांशी गप्पा मारणं असो किंवा मुलांसोबत खेळणं असो. यामुळे आम्हाला जो आनंद मिळतो तो आम्ही शब्दांत मांडू शकत नाही.”
हे खरंय की सर्वांनाच इतका मोठा बदल करता येणार नाही. पण आपण सगळेच अब्राहामच्या उदाहरणाचं अनुकरण करून देवाच्या उपासनेला सगळ्यात जास्त महत्त्व देऊ शकतो. आणि तो आपल्याला कधीच सोडणार नाही यावर भरवसा ठेवू शकतो. आपण असं करतो तेव्हा आपण बायबलच्या सल्ल्याचं पालन करत असतो आणि त्यामुळे “आपण धैर्याने असं म्हणू शकतो: ‘यहोवा मला साहाय्य करतो; मी घाबरणार नाही.’”—इब्री लोकांना १३:५, ६.
[पान ८ वरची चौकट/चित्र]
देवाला भिऊन वागणारी एक स्त्री आणि एक चांगली पत्नी
साराचं लग्न मजबूत विश्वास असलेल्या एका व्यक्तीसोबत झालं होतं. पण देवाला भिऊन वागणाऱ्या या स्त्रीने स्वतःसुद्धा इतरांसाठी एक चांगलं उदाहरण मांडलं. खरंतर, विश्वासू स्त्रियांनी तिचं अनुकरण करावं म्हणून बायबलमध्ये तीन वेळा तिचा नावाने उल्लेख करण्यात आलाय. (यशया ५१:१, २; इब्री लोकांना ११:११; १ पेत्र ३:३-६) या विश्वासू स्त्रीबद्दल बायबलमध्ये खूप कमी माहिती असली तरीसुद्धा ती किती चांगली होती याचं चित्र आपल्यासमोर उभं राहतं.
उदाहरणार्थ, देवाने आपल्याला ऊर देश सोडून जायला सांगितलंय, असं जेव्हा अब्राहामने साराला सांगितलं, तेव्हा तिला कसं वाटलं असेल याचा विचार करा. आपण कुठे चाललोय आणि का चाललोय, असा प्रश्न तिला पडला असेल का? आपल्या रोजच्या गरजा कशा भागतील याची तिला काळजी वाटत असेल का? आपल्या घरच्या आणि जवळच्या सगळ्या लोकांना सोडून जायच्या विचाराने ती दुःखी झाली असेल का? आपण पुन्हा त्यांना कधी भेटणार का किंवा भेटणार की नाही असा प्रश्न तिला पडला असेल का? असे प्रश्न नक्कीच तिच्या मनात आले असतील. पण तरीसुद्धा ती ऊर सोडायला तयार झाली कारण आपण जर यहोवाचं ऐकलं, तर तो आपल्याला आशीर्वाद देईल असा भरवसा तिला होता.—प्रेषितांची कार्यं ७:२, ३.
सारा देवाची आज्ञा पाळणारी तर होतीच. पण त्यासोबतच ती एक चांगली पत्नीसुद्धा होती. घर चालवण्याच्या बाबतीत आपल्या पतीशी स्पर्धा करण्याऐवजी कुटुंबाचं मार्गदर्शन करण्यासाठी तो जे काही करत होता त्यात तिने त्याला प्रेमाने साथ दिली. आणि असं करून तिने त्याचा मनापासून आदर केला. तिच्या या सुंदर गुणांमुळे ती आणखीच सुंदर बनली.—१ पेत्र ३:१-६.
तिच्यासारखे गुण वाढवल्यामुळे आजसुद्धा ख्रिस्ती पत्नींना फायदा होऊ शकतो का? जिल नावाच्या एका बहिणीने ३० पेक्षा जास्त वर्षं सुखाचा संसार केला. ती म्हणते: “साराच्या उदाहरणातून मी शिकले, की मी मनमोकळेपणाने माझ्या पतीशी बोललं पाहिजे आणि आणि मला काय वाटतंय ते मी व्यक्त केलं पाहिजे. पण असं असलं तरी, कुटुंबप्रमुख म्हणून अंतिम निर्णय घ्यायची जबाबदारी त्याचीच आहे. एकदा का त्याने निर्णय घेतला की मग तो निर्णय यशस्वी करण्यासाठी मला जे काही करता येईल ते मी केलं पाहिजे.”
पण साराकडून सगळ्यात चांगलं काही शिकण्यासारखं असेल तर ते हे: ती दिसायला खूप सुंदर असली, तरी तिला तिच्या सौंदर्याचा गर्व नव्हता. (उत्पत्ती १२:१०-१३) उलट, आयुष्यात आलेल्या चढ-उतारांमध्ये तिने अब्राहामला नम्रपणे साथ दिली. खरंच, अब्राहाम आणि सारा एक विश्वासू, नम्र आणि प्रेमळ जोडपं होतं. ते एकमेकांसाठी आशीर्वादच होते!
अध्याय ५
आयुष्यातली सगळ्यात कठीण गोष्ट करायला तो तयार होता
सावध राहा! ५/१२ १८, चौकट
बायबल—अचूक भविष्यवाण्यांचं पुस्तक, भाग १
अब्राहाम—इतिहासात होऊन गेलेली एक खरीखुरी व्यक्ती
◼ सुमारे चार हजार वर्षांपूर्वी सापडेल्या मातीच्या पाट्यांवर ज्या शहरांची नावं लिहिण्यात आली आहेत ती अब्राहामच्या नातेवाइकांच्या नावांशी जुळतात. या शहरांच्या नावांमध्ये पेलेग, सरुग, नाहोर, तेरह आणि हारान या नावांचा समावेश आहे.—उत्पत्ती ११:१७-३२.
◼ उत्पत्ती ११:३१ मध्ये आपण असं वाचतो, की अब्राहाम आणि त्याचं कुटुंब “खास्द्यांच्या ऊर देशातून कनान देशात” राहायला गेलं. या शहराचे अवशेष इराकच्या दक्षिण-पूर्व भागात सापडले आहेत. बायबलमध्ये असंही म्हटलंय, की अब्राहामचे वडील तेरह यांचा हारानमध्ये मृत्यू झाला. हे ठिकाण आता तुर्कीएमध्ये असावं. तसंच, अब्राहामची पत्नी साराचा मृत्यू हेब्रोनमध्ये झाला. हे शहर मध्य-पूर्वेतल्या सर्वात जुन्या शहरांपैकी एक असून तिथे अजूनही लोकवस्ती आहे.—उत्पत्ती ११:३२; २३:२.
इन्साइट “अब्राहाम” ¶२२-२३
अब्राहाम
ऐतिहासिक सत्यता. येशू आणि त्याच्या शिष्यांनी त्यांच्या बोलण्यात आणि लिखाणांत अब्राहामचा ७० पेक्षा जास्त वेळा उल्लेख केला. श्रीमंत माणूस आणि लाजर यांच्या दृष्टान्तात येशूने अब्राहामचा लाक्षणिक अर्थाने उल्लेख केला. (लूक १६:१९-३१) जेव्हा त्याच्या विरोधकांनी आपण अब्राहामचे वंशज आहोत अशी बढाई मारली तेव्हा येशूने त्यांचा ढोंगीपणा उघड करत म्हटलं, “तुम्ही अब्राहामची मुलं असता, तर अब्राहामसारखी कार्यं केली असती.” (योह ८:३१-५८; मत्त ३:९, १०) प्रेषित पौलने सांगितल्याप्रमाणे एखादी व्यक्ती अब्राहामची प्रत्यक्ष वंशज असल्यामुळे नाही, तर अब्राहामसारखा विश्वास असल्यामुळे नीतिमान ठरते. (रोम ९:६-८; ४:१-१२) पौलने अब्राहामची खरी संतती ख्रिस्त असल्याचं स्पष्ट केलं. आणि जे ख्रिस्ताचे आहेत त्यांची ओळख त्याने “दिलेल्या अभिवचनाप्रमाणे वारस” अशी करून दिली. (गल ३:१६, २९) तसंच तो अब्राहामच्या दयाळूपणाबद्दल आणि अनोळखी लोकांना त्याने दाखवलेल्या पाहुणचाराबद्दलही बोलतो. तसंच इब्री लोकांना ११ व्या अध्यायात यहोवाच्या ज्या उल्लेखनीय साक्षीदारांची यादी दिली आहे, त्यात प्रेषित पौल अब्राहामचा आवर्जून उल्लेख करतो. यासोबतच पौल अब्राहामच्या दोन स्त्रियांचा, म्हणजे सारा आणि हागार यांचा उल्लेख करतो. आणि त्या लाक्षणिक अर्थाने यहोवाच्या दोन करारांना कशा सूचित करतात हे दाखवून देतो. (गल ४:२२-३१; इब्री ११:८) बायबलचा लेखक याकोबनेही म्हटलं, की अब्राहामने नीतिमान कार्य करून आपला विश्वास दाखवला आणि त्यामुळे त्याला “यहोवाचा मित्र” म्हटलं आहे.—याक २:२१-२३.
उत्खननात सापडलेल्या पुराव्यांवरून सिद्ध होतं, की बायबलमध्ये अब्राहामच्या अहवालात सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी खऱ्या आहेत. जसं की, हित्ती लोकांकडून त्याने विकत घेतलेलं शेत, अलियेजरची वारस म्हणून केलेली निवड, आणि हागारला आपली उपपत्नी म्हणून स्वीकारणं. या गोष्टी त्या काळातल्या रितीरिवाजांप्रमाणे होत्या आणि या अहवालात सांगितलेली भौगोलिक ठिकाणंही खरी आहेत हे या पुराव्यांवरून सिद्ध होतं.
विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचा पिता
४ अब्रामाला यहोवा देवाबद्दल कसं शिकायला मिळालं? आपल्याला माहीत आहे, की त्या काळी पृथ्वीवर यहोवाचे काही विश्वासू सेवक होते. त्यांपैकीच शेम हाही एक होता. तसं पाहिलं, तर नोहाच्या तीन मुलांमध्ये शेम थोरला नव्हता. पण, कदाचित देवावरील त्याच्या उल्लेखनीय विश्वासामुळे सहसा त्याचा सर्वात आधी उल्लेख केला जातो. जलप्रलयाच्या काही काळानंतर नोहानं यहोवाबद्दल बोलताना त्याला “शेमाचा देव” असं म्हटलं. (उत्प. ९:२६) शेमाला यहोवाबद्दल आणि शुद्ध उपासनेबद्दल खूप आदर होता.
५ अब्राम शेमला ओळखत होता का? हो, कदाचित ओळखत असावा. शेमसारखा अनुभवी, वडीलधारा माणूस आपल्या कुटुंबात आहे याचा लहानपणी अब्रामाला किती अभिमान वाटत असेल! कारण शेम हा चारशे वर्षांदरम्यान घडलेल्या घटनांचा साक्षीदार होता. त्यानं जलप्रलयापूर्वीची दुष्टाई, तसंच पृथ्वीवरून ही दुष्टाई नाहीशी करणारा जलप्रलय पाहिला होता. याशिवाय त्यानं, मानवांची संख्या वाढून नवनवीन राष्ट्रं निर्माण होताना आणि त्यानंतर निम्रोदच्या काळात झालेली बंडाळीही पाहिली होती. पण, विश्वासू शेम त्या बंडाळीपासून चार हात दूरच राहिला होता. त्यामुळं देवानं, बाबेलचा बुरूज बांधणाऱ्या लोकांच्या भाषेत गोंधळ केला तेव्हा शेम व त्याच्या कुटुंबाची भाषा बदलली नाही. ते पुढंही मानवाची मूळ भाषा अर्थात नोहाची भाषा बोलत राहिले. अब्रामसुद्धा शेमच्या त्या कुटुंबाचाच भाग होता. साहजिकच या सर्व गोष्टींमुळे अब्रामाच्या मनात शेमबद्दल गाढ आदर असावा. इतकंच नाही, तर अब्रामाच्या दीर्घायुष्यात शेम बरीच वर्षं जिवंत होता. त्यामुळं अब्रामाला शेमकडून यहोवाबद्दल बरंच काही शिकायला मिळालं असेल.
देवाने त्यांची अर्पणं स्वीकारली
१८ अब्राहामने आपल्या संपूर्ण आयुष्यात बऱ्याचदा यहोवाला बलिदानं अर्पण केली. पण ही बलिदानं त्याने प्रत्येक वेळी यहोवालाच दिली. कारण उपासना ही यहोवाचीच केली पाहिजे हे त्याला माहीत होतं. (उत्प. १२:८; १३:१८; १५:८-१०) पण अब्राहामने यहोवाला सगळ्यात चांगलं ते द्यायची तयारी दाखवली का? नक्कीच दाखवली. कारण तो आपल्या लाडक्या मुलाला, इसहाकला द्यायला तयार झाला होता. त्या प्रसंगी, यहोवाने अब्राहामला अर्पण द्यायची योग्य पद्धत स्पष्टपणे सांगितली. (उत्प. २२:१, २) आणि अब्राहामने त्याबद्दलची छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा पाळली. तो आपल्या मुलाचं बलिदान देणारच होता, इतक्यात यहोवाने त्याला थांबवलं. (उत्प. २२:९-१२) यहोवाने अब्राहामची उपासना स्वीकारली, कारण तो नेहमी चांगल्या हेतूने यहोवाला अर्पणं द्यायचा. त्याच्याबद्दल पौलने म्हटलं: “अब्राहामने यहोवावर विश्वास ठेवला आणि त्यामुळे त्याला नीतिमान ठरवण्यात आलं.”—रोम. ४:३.
सावध राहा!८८ ४/८ २५
“आकाशातल्या ताऱ्यांसारखी”
देवाने अब्राहामला असं अभिवचन दिलं होतं: “[मी] तुझी संतती आकाशातल्या ताऱ्यांसारखी आणि समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या वाळूच्या कणांसारखी वाढवीन.” (उत्पत्ती २२:१७) पण बायबलबद्दल माहिती देणाऱ्या एका मासिकात असं म्हटलंय, की ही माहिती बरोबर नाही.
बायबल जेव्हा आकाशातल्या ताऱ्यांच्या संख्येची तुलना समुद्रकिनाऱ्याला असलेल्या वाळूच्या अब्जावधी कणांशी करतं तेव्हा ते वैज्ञानिकदृष्ट्या अचूक आहे. त्या काळातल्या लोकांना हे माहीत नव्हतं की आकाशात दिसणाऱ्या ताऱ्यांची संख्या अब्जावधी आहे. वर सांगितलेल्या मासिकात म्हटलं होतं: “ताऱ्यांची संख्या किती जास्त आहे हे दुर्बिणीशिवाय समजणं शक्य नाही. अगदी स्वच्छ आकाशातही दुर्बिणीशिवाय फक्त २००० ते ४००० तारे आपल्याला दिसू शकतात, असं खगोलशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.” द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडीयामध्ये म्हटलंय, की “टेलिस्कोपशिवाय आपण आकाशात जेमतेम ६००० तारेच स्पष्टपणे पाहू शकतो.”
मग या बाबतीत बायबलमध्ये इतकी अचूक तुलना कशी काय करण्यात आली? याचं स्पष्टीकरण कसं देता येईल? याचं एक स्पष्टीकरण म्हणजे बायबल “देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं” आहे. (२ तीमथ्य ३:१६) पण ही गोष्ट खोटी आहे हे पटवून देण्यासाठी या मासिकाच्या एका लेखात असं म्हटलंय, की अब्राहाम कदाचित एक खगोलशास्त्रज्ञ असावा! आणि यानंतर असा प्रश्न मांडण्यात आला, की “उघड्या डोळ्यांनी न दिसणारे तारे पाहण्यासाठी प्राचीन काळातल्या लोकांकडे दुर्बिणी असण्याची शक्यता होती का?” या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळावं म्हणून या लेखात असे पुरावे देण्यात आले, की निनवे आणि प्राचीन काळातल्या काही ठिकाणांमध्ये सापडलेल्या स्फटिकांचा (क्रिस्टल किंवा पारदर्शक दगडांचा) कदाचित त्या काळातल्या लोकांनी दुर्बीण म्हणून वापर केला असेल.
पण त्या काळातल्या लोकांनी ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी अशा स्फटीकांचा वापर केला असेल याचे कोणतेही पुरावे नाहीत. आणि जरी त्या काळात दुर्बिणी असल्या, तरी अब्राहाम किंवा उत्पत्तीच्या लेखकाकडे त्या असतील याचेही कोणतेच पुरावे नाहीत. खरंतर देवाने अब्राहामला जे अभिवचन दिलं होतं, ते बायबल वैज्ञानिकदृष्ट्या किती खरं आहे याचं फक्त एक उदाहरण आहे. असं दिसतं की, यिर्मया संदेष्ट्यानेसुद्धा दुर्बिणीचा वापर न करता अचूकपणे असं म्हटलं: “आकाशातलं सैन्य मोजलं जाऊ शकत नाही आणि समुद्रकिनाऱ्यावरची वाळू मापली जाऊ शकत नाही.”—यिर्मया ३३:२२.
यहोवानं त्याला “माझा मित्र” म्हटलं
“माझ्या सेवका, इस्राएला, माझ्या निवडलेल्या याकोबा, माझा मित्र अब्राहाम याच्या संताना.”— यश. ४१:८.
आपला जन्म होतो त्या क्षणापासून शेवटल्या श्वासापर्यंत आपल्याला प्रेमाची नितांत गरज असते. प्रत्येक व्यक्तीला एका जोडप्यामध्ये असणाऱ्या प्रेमाचीच नव्हे, तर प्रेमळ मैत्रीची आणि जिव्हाळ्याचीदेखील गरज असते. पण, आपल्यापैकी प्रत्येकालाच सर्वात जास्त यहोवाच्या प्रेमाची गरज आहे. पण बऱ्याच लोकांना असं वाटतं, की एका अदृश्य आणि सर्वशक्तिमान देवासोबत जिव्हाळ्याचा आणि मैत्रीचा नातेसंबंध जोडणं अशक्य आहे. पण असं मुळीच नाही, हे आपण जाणतो.
२ बायबलमध्ये अशा बऱ्याच व्यक्तींबद्दल सांगण्यात आलं आहे, ज्यांची देवासोबत मैत्री होती. आपण त्यांच्या उदाहरणाचं अनुकरण केलं पाहिजे. का बरं? कारण देवासोबत मैत्री करण्यापेक्षा आणखी महत्त्वाचं असं कोणतंही ध्येय मानवी जीवनात असू शकत नाही. चला तर मग आपण अब्राहामाच्या उदाहरणाचा थोडा विचार करू या. (याकोब २:२३ वाचा.) देवासोबत असणारी त्याची घनिष्ट मैत्री विश्वासावर आधारलेली होती. म्हणूनच त्याला ‘विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचा बाप’ असं म्हणण्यात आलं. (रोम. ४:११) त्याच्या उदाहरणावर चर्चा करत असताना, स्वतःला विचारा: ‘अब्राहामाच्या विश्वासाचं अनुकरण करण्याद्वारे मी यहोवासोबतची माझी मैत्री आणखी भक्कम कशी करू शकतो?’
अब्राहाम कशा प्रकारे यहोवाचा मित्र बनला?
३ अशी कल्पना करा की एक वृद्ध माणूस जड पावलांनी डोंगर चढत आहे. त्याच्या आयुष्यातला हा सर्वात कठीण प्रवास आहे. हा प्रवास त्याच्या वयामुळे कठीण बनला आहे, असं नाही. कारण त्याचं, म्हणजे अब्राहामाचं वय १२५ असलं तरी तो अजूनही सक्षम आहे. त्याच्या मागून जवळपास २५ वर्षांचा एक तरुण मुलगादेखील चालत आहे. तो इसहाक आहे. त्याच्या पाठीवर लाकडाची एक मोळी आहे. अब्राहामाकडे एक सुरा आणि आग लावण्यासाठी लागणारं साहित्य आहे. हा प्रवास त्याच्यासाठी कठीण असण्याचं कारण म्हणजे, यहोवानं त्याला त्याच्या मुलाचं होमार्पण करण्यास सांगितलं आहे!—उत्प. २२:१-८.
४ अब्राहामाच्या विश्वासाची ही सर्वात मोठी परीक्षा होती. देवानं अब्राहामाला त्याच्या मुलाचं बलिदान देण्यासाठी सांगितलं, तेव्हा त्यात त्याचा क्रूरपणा दिसून येतो असं काही जण म्हणतात. तर इतर जण असंही म्हणतात, की अब्राहामाचं आपल्या मुलावर प्रेम नसल्यामुळे तो असं करण्यासाठी तयार झाला. लोकांचा देवावर विश्वास नसल्यामुळे आणि खरा विश्वास म्हणजे काय किंवा विश्वासाचं कार्य कसं असतं हे ते समजू शकत नसल्यामुळे ते असं बोलतात. (१ करिंथ. २:१४-१६) पण अब्राहामानं आंधळेपणानं म्हणजे काहीच विचार न करता यहोवाची आज्ञा मानली नव्हती. तर त्याच्यामध्ये खरा विश्वास होता म्हणून त्यानं असं केलं. त्याला माहीत होतं, की यहोवा असं कोणतंही कार्य करण्यासाठी सांगणार नाही, ज्यामुळे त्याचं कायमचं नुकसान होईल. उलट, यहोवाला आज्ञाधारक राहिल्यामुळे त्याला आणि त्याच्या लाडक्या मुलाला यहोवा आशीर्वादित करेल, हे त्याला पक्कं माहीत होतं. पण इतका खंबीर विश्वास बाळगण्यासाठी अब्राहामाला कशाची गरज होती? त्याला ज्ञान आणि अनुभवाची गरज होती.
५ ज्ञान. अब्राहाम ऊर नावाच्या एका शहरामध्ये लहानाचा मोठा झाला. तिथं लोक खोट्या देवतांची उपासना करायचे, आणि त्याचे वडीलही त्याला अपवाद नव्हते. (यहो. २४:२) मग अब्राहामाला यहोवाविषयी कसं समजलं? बायबल सांगतं की नोहाचा मुलगा शेम हा अब्राहामाचा नातेवाईक होता. शिवाय अब्राहाम १५० वर्षांचा होता, तोपर्यंत शेम जिवंत होता. शेमचा यहोवावर भक्कम विश्वास असल्यामुळे त्यानं आपल्या नातेवाइकांना यहोवाबद्दल नक्कीच खूप काही सांगितलं असावं. त्यामुळे अब्राहामालाही यहोवाबद्दल त्याच्याकडूनच समजलं असेल याची शक्यता नाकारता येत नाही. पण अब्राहामाला जे कळलं होतं त्यामुळे यहोवाबद्दल त्याच्या मनात प्रेम उत्पन्न झालं. आणि याच माहितीमुळे किंवा ज्ञानामुळे त्याचा यहोवावरील विश्वास वाढला.
६ अनुभव. पण आपला विश्वास भक्कम करण्यासाठी अब्राहामाजवळ अनुभवदेखील होता, हे आपण कसं म्हणू शकतो? असं म्हटलं जातं, की विचारांनी भावना उत्पन्न होतात आणि भावना एखाद्याला कृती करण्यास प्रवृत्त करतात. अब्राहामाच्या बाबतीत ही गोष्ट खरी होती. देवाबद्दल त्याला जे काही शिकायला मिळालं होतं त्यामुळे त्याच्या मनात खोल भावना उत्पन्न झाल्या. आणि याचा परिणाम म्हणजे, आकाश व पृथ्वीचा निर्माणकर्ता, परात्पर देव यहोवा याच्याबद्दल त्याच्या मनात गाढ आदर निर्माण झाला. (उत्प. १४:२२) यालाच बायबलमध्ये ‘सद्भय’ किंवा ईश्वरी भय असं म्हटलं आहे. (इब्री ५:७) देवासोबतच्या घनिष्ट मैत्रीसाठी, आपल्यालाही ईश्वरी भयाची गरज आहे. (स्तो. २५:१४) ही एक अशी गोष्ट आहे, ज्यामुळे अब्राहामाला यहोवाची आज्ञा पाळणं शक्य झालं.
७ देवानं अब्राहाम आणि सारेला ऊर शहरातलं त्यांचं राहतं घर सोडून एका अनोळखी देशात जाण्यास सांगितलं. ती दोघंही तरुण नव्हती. शिवाय त्यांना आयुष्यभर तंबूंमध्ये राहावं लागणार होतं. तसंच, अनोळखी ठिकाणी जाऊन राहण्यात धोका आहे, हे अब्राहामाला माहीत होतं. तरीदेखील त्यानं यहोवाच्या आज्ञेनुसार करण्याचं ठरवलं. त्याच्या आज्ञाधारकतेमुळे, देवानं त्याला आशीर्वादित केलं आणि त्याचं संरक्षणही केलं. उदाहरणार्थ, त्याच्या सुंदर पत्नीला, सारेला त्याच्यापासून दूर नेण्यात आलं. शिवाय त्याच्या जीवालाही त्या वेळी धोका निर्माण झाला. पण यहोवानं चमत्कारिक रीतीनं त्याचं आणि त्याच्या पत्नीचं संरक्षण केलं. (उत्प. १२:१०-२०; २०:२-७, १०-१२, १७, १८) साहजिकच या गोष्टींमुळे अब्राहामाचा विश्वास आणखी भक्कम झाला असेल.
८ आपणही यहोवासोबत अगदी जवळची मैत्री करू शकतो का? हो, नक्कीच! त्यासाठी आपल्यालाही अब्राहामासारखंच यहोवाबद्दल शिकून घेण्याची गरज आहे. आपणही आपल्याला आवश्यक असणारं ज्ञान आणि अनुभव प्राप्त करू शकतो. अब्राहामापेक्षा कैक पटीनं जास्त ज्ञान आणि अनुभव आज आपल्याजवळ उपलब्ध आहे. (दानी. १२:४; रोम. ११:३३) कारण, ‘आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्याविषयी’ असणारं ज्ञान बायबलमध्ये अगदी ठासून भरलेलं आहे. आपण बायबलमधून जे काही शिकतो त्यामुळे यहोवाबद्दल आपल्या मनात प्रेम दाटून येतं आणि त्याच्याप्रती गाढ आदर बाळगण्यास आपल्याला मदत होते. मग याच प्रेमामुळे आणि त्याच्याप्रती असणाऱ्या आदरामुळे आपण त्याची आज्ञा पाळण्यास प्रवृत्त होतो. शिवाय असं केल्यास तो आपल्याला कशा प्रकारे आशीर्वादित करतो आणि आपलं संरक्षण करतो, ते आपल्याला अनुभवायला मिळेल. यामुळे आपला विश्वास आणखी मजबूत होतो. एवढंच नव्हे तर पूर्ण अंतःकरणाने यहोवाची सेवा केल्यामुळे, आपल्याला शांती, समाधान आणि आनंददेखील मिळतो. (स्तो. ३४:८; नीति. १०:२२) जितकं जास्त ज्ञान आणि अनुभव आपल्याला प्राप्त करता येईल, तितकंच यहोवासोबतची आपली मैत्री आणखी बळकट होत जाईल.
अब्राहामाने देवासोबतची आपली मैत्री कशी टिकवली?
९ जिवलग मैत्री ही एका अत्यंत बहुमोल अशा संपत्तीसारखी असते. (नीतिसूत्रे १७:१७ वाचा.) केवळ सजावट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अत्यंत किंमती अशा फुलदाणीसारखी ती नसते. तर मैत्री एका सुंदर फुलासारखी असते, ज्याला फुलण्यासाठी पाणी घालावं लागतं आणि त्याची काळजी घ्यावी लागते. अब्राहामानंदेखील यहोवासोबत असणाऱ्या त्याच्या मैत्रीला असंच जपलं होतं. त्यानं हे कसं केलं?
१० अब्राहामानं त्याच्या अंतःकरणात असणारं ईश्वरी भय आणि आज्ञाधारकता टिकवून ठेवली. उदाहरणार्थ, जेव्हा तो त्याच्या कुटुंबासोबत आणि सेवकांसोबत कनानमध्ये आला, तेव्हा प्रत्येक निर्णय घेताना त्यानं मार्गदर्शनासाठी यहोवाकडे पाहिलं, मग तो अगदी छोटा निर्णय असला तरी. इसहाकाचा जन्म होण्याच्या एक वर्षाआधी, म्हणजे अब्राहाम जेव्हा ९९ वर्षांचा होता तेव्हा यहोवानं त्याला त्याच्या घरातील सर्व पुरुषांची सुंता करण्यास सांगितली. तेव्हा यहोवा हे काय सांगत आहे, असं अब्राहामाला वाटलं का? किंवा ही गोष्ट टाळण्यासाठी त्यानं कोणती सबब यहोवाला सांगितली का? नाही. उलट, त्यानं यहोवावर विश्वास ठेवला आणि अगदी “त्याच दिवशी” त्यानं यहोवाच्या आज्ञेनुसार कार्य केलं.—उत्प. १७:१०-१४, २३.
११ अब्राहाम अगदी छोट्या-छोट्या बाबतीतही यहोवाच्या आज्ञेत राहिला. आणि म्हणूनच यहोवासोबतची त्याची मैत्री आणखी दृढ होत गेली. आपण अगदी कोणत्याही गोष्टीबद्दल यहोवाशी बोलू शकतो, असं त्याला वाटायचं. त्याला पेचात टाकणाऱ्या प्रश्नांबद्दलही त्यानं यहोवाकडे मदत मागितली. उदाहरणार्थ, यहोवानं जेव्हा सदोम आणि गमोरा या शहरांचा नाश करणार असल्याचं अब्राहामाला सांगितलं, तेव्हा त्याला चिंता वाटू लागली. कारण वाईट लोकांसोबत चांगल्या लोकांचाही नाश होईल का, अशी भीती त्याला होती. कदाचित सदोम इथं राहणाऱ्या आपल्या नातेवाइकांची, म्हणजे लोट आणि त्याच्या कुटुंबाची त्याला काळजी असावी. पण तरीदेखील “जगाचा न्यायाधीश” असणाऱ्या यहोवावर त्यानं विश्वास ठेवला आणि अगदी नम्रपणे त्यानं यहोवाजवळ आपली काळजी व्यक्त केली. यहोवानंदेखील आपल्या या मित्राला अगदी धीरानं घेतलं आणि तो दयाळू आहे हे त्याला दाखवून दिलं. यहोवानं त्याला समजावलं की न्यायदंड बजावतानाही जर त्याला चांगले लोक दिसले, तर तो नक्की त्यांचा जीव वाचवेल.—उत्प. १८:२२-३३.
१२ यावरून हे स्पष्ट होतं, की यहोवासोबतची आपली मैत्री टिकवून ठेवण्यासाठी अब्राहामाला त्यानं प्राप्त केलेल्या ज्ञानामुळे आणि अनुभवामुळे मदत झाली. त्यामुळे नंतर, जेव्हा यहोवानं त्याला त्याच्या पुत्राचं बलिदान देण्यासाठी सांगितलं, तेव्हा यहोवा सहनशील, दयाळू, भरवशालायक आणि आपल्या सेवकांचं संरक्षण करणारा देव आहे, हे अब्राहामाला माहीत होतं. त्याला याची खात्री होती, की यहोवा असा अचानक बदलणार नाही, तो अचानक क्रूर आणि निर्दयी बनणार नाही. पण आपण असं का म्हणू शकतो?
१३ आपल्या सेवकांना सोडून पुढं जाण्याआधी, अब्राहाम त्यांना म्हणाला: “येथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो.” (उत्प. २२:५) इथं अब्राहामाला काय म्हणायचं होतं? आपल्याला इसहाकाचं बलिदान द्यायचं आहे हे माहीत असतानाही, मी इसहाकासोबत परत येतो असं तो मुद्दाम खोटं बोलत होता का? नाही. बायबल सांगतं की इसहाकाचा मृत्यू झाला तरी त्याला पुन्हा जिवंत करण्याची ताकद यहोवाकडे आहे हे त्याला माहीत होतं. (इब्री लोकांस ११:१९ वाचा.) शिवाय, यहोवानं आपल्याला वृद्ध असतानाही मुलाला जन्म देण्याची क्षमता दिली होती, हेदेखील तो जाणून होता. (इब्री ११:११, १२, १८) त्यामुळे यहोवाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे त्याला चांगलं माहीत होतं. त्या दिवशी नेमकं काय होईल ते अब्राहामाला माहीत नव्हतं. पण आपली अभिवचनं पूर्ण करण्यासाठी, गरज पडली तर यहोवा इसहाकाचं पुनरुत्थानदेखील करू शकतो, यावर त्याचा पूर्ण विश्वास होता. म्हणूनच अब्राहामाला ‘विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचा बाप’ असं म्हणण्यात आलं!
१४ आज यहोवा आपल्याला आपल्या मुलांचं बलिदान देण्यास सांगत नाही. पण आपण त्याच्या आज्ञा पाळाव्यात अशी अपेक्षा मात्र तो करतो. कधीकधी त्याच्या आज्ञा पाळणं आपल्याला कठीण बनतं, तर कधीकधी त्यानं अमुक एखादी आज्ञा का दिली आहे याचं कारण आपल्याला कळत नाही. तुम्हाला कधी असं वाटलं आहे का? काही जणांना कदाचित, लाजाळू स्वभावामुळे किंवा अनोळखी लोकांशी बोलण्याचं धाडस होत नसल्यामुळे प्रचारकार्यात सहभाग घेणं खूप कठीण जात असेल. तर काही जणांना कामाच्या ठिकाणी किंवा शाळेत इतरांपेक्षा वेगळी भूमिका घेण्यास भीती वाटत असेल. (निर्ग. २३:२; १ थेस्सलनी. २:२) पण एखादी कठीण गोष्ट करण्याची वेळ येते तेव्हा अब्राहामानं दाखवलेल्या असाधारण विश्वासाचा आणि धैर्याचा विचार करा. जेव्हा अशा विश्वासू स्त्री-पुरुषांच्या उदाहरणावर आपण मनन करतो, तेव्हा आपोआपच त्यांचं अनुकरण करण्याची आणि आपला मित्र असणाऱ्या यहोवाच्या आणखी समीप जाण्याची प्रेरणा आपल्याला मिळते.—इब्री १२:१, २.
आशीर्वादित करणारी मैत्री
१५ यहोवाची आज्ञा पाळल्याबद्दल अब्राहामाला कधी पस्तावा झाला का? बायबल म्हणतं, की त्याला “दीर्घकाळ सुखी व समाधानी जीवन लाभले.” (उत्प. २५:८, ईझी-टू-रीड व्हर्शन) तो १७५ वर्षांचा होता तेव्हा आपल्याला मिळालेल्या दीर्घ आयुष्याकडे तो समाधानाने पाहू शकत होता. कारण यहोवासोबतची त्याची मैत्रीच त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची होती. पण त्याला “दीर्घकाळ सुखी व समाधानी” जीवन मिळालं म्हणून भविष्यात पुन्हा जगण्याची इच्छा त्याला नव्हती, असा याचा मुळीच अर्थ होत नाही.
१६ अब्राहामाविषयी बायबल म्हणतं, की “पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता.” (इब्री ११:१०) त्याला या गोष्टीवर पक्का विश्वास होता की एक न एक दिवस हे नगर, म्हणजे पृथ्वीवर प्रस्थापित झालेलं देवाचं राज्य त्याला पाहायला मिळेल. आणि तो ते नक्कीच पाहील! विचार करा, यहोवासोबतच्या आपल्या मैत्रीचा अनुभव घेत पृथ्वीवरील नंदनवनात जगताना त्याला किती आनंद होईल! हजारो वर्षं, देवाच्या सेवकांना त्याच्या विश्वासाच्या उदाहरणामुळे मदत झाली आहे हे जाणून त्याला किती समाधान वाटेल! मोरिया पर्वतावर तो देणार असलेलं बलिदान, खरंतर पुढे होणाऱ्या फार मोठ्या गोष्टीला सूचीत करणार होतं हे समजल्यावर त्याला कसं वाटेल? (इब्री ११:१९) शिवाय, आपल्या मुलाचं, इसहाकाचं बलिदान देताना त्याला ज्या यातना होत होत्या, त्यावरून मानवजातीसाठी आपल्या मुलाचं खंडणी बलिदान देताना यहोवाला किती यातना झाल्या असतील, हे समजून घेण्यास लाखो लोकांना मदत झाली हे जेव्हा त्याला समजेल तेव्हा त्याला किती आश्चर्य वाटेल! (योहा. ३:१६) खरंच, अब्राहामाच्या उदाहरणामुळे प्रेमाच्या सर्वोत्तम कृतीबद्दल, खंडणीबद्दल आपली कदर आणखी वाढवण्यास आपल्याला किती मदत होते!
१७ तेव्हा अब्राहामाच्या विश्वासाचं अनुकरण करण्याचा आपण प्रत्येक जण निर्धार करू या. त्याच्याप्रमाणेच आपल्यालाही ज्ञान आणि अनुभवाची गरज आहे. यहोवाबद्दल शिकत असताना आणि त्याला आज्ञाधारक राहताना तो आपल्याला कशा प्रकारे आशीर्वादित करतो आणि आपलं संरक्षण करतो ते आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. (इब्री लोकांस ६:१०-१२ वाचा.) यहोवासोबतची तुमची मैत्री कायम टिकून राहो! पुढील लेखामध्ये, आपण अशा तीन विश्वासू सेवकांची उदाहरणं पाहू या, ज्यांची यहोवासोबत घनिष्ट मैत्री होती.
[पान १०, ११ वरची चौकट]
यहोवासोबत अब्राहामाची मैत्री
ऊरमध्ये राहत असताना
अब्राहाम आणि सारा यहोवाबद्दल जाणून घेतात आणि त्याची उपासना करू लागतात
अब्राहाम देवाच्या आज्ञेनुसार ऊर शहर सोडून जातो
कनानला प्रवास करतो
प्रवासादरम्यान यहोवा अब्राहाम आणि सारेचं संरक्षण करतो
कनानमधील जीवन
यहोवाच्या आज्ञेनुसार अब्राहाम आपल्या घरातील सर्व पुरुषांची सुंता करतो
सदोमबद्दल आपली चिंता व्यक्त करताना, यहोवा धीरानं अब्राहामाचं ऐकतो
यहोवा अब्राहाम आणि सारेला मुलास जन्म देण्याची क्षमता देतो
अब्राहाम विश्वास दाखवतो आणि इसहाकाचं बलिदान देण्यास तयार होतो
“दीर्घकाळ सुखी व समाधानी” जीवनाचा आनंद घेतल्यावर अब्राहामाचा मृत्यू होतो
अध्याय ६
ती एका परक्या देशात जायला तयार झाली
इसहाकसाठी वधू शोधणे
हा मनुष्य अब्राहामाच्या ‘घरातील सर्वांत जुना’ सेवक होता. (उत्पत्ति २४:२) या अहवालात त्याचे नाव नसले तरी तो अलियेजर होता हे उघड आहे कारण ‘माझ्या घरात जन्मलेला पुत्र’ असे अब्राहामाने ज्याविषयी म्हटले तो त्याचा ‘वारस व्हावयाचा’ होता. (उत्पत्ति १५:२, ३, NW) अर्थात, ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा अब्राहाम आणि सारा अनपत्य होते. आता त्यांचा पुत्र इसहाक ४० वर्षांचा झाला होता आणि अलियेजर जरी अब्राहामाचा प्रमुख वारस नसला तरी तो अद्यापही त्याचा सेवक होता. म्हणून अब्राहामाने त्याला आव्हानात्मक विनंती केली तेव्हा त्याने त्याप्रमाणे केले. ती आव्हानात्मक विनंती कोणती होती?
इसहाकसाठी वधू शोधणे
अब्राहामाच्या दिवसांत विवाहाचा परिणाम केवळ कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण वंश किंवा प्राचीन समाजावरही होत असे. यास्तव, पालकांनी आपल्या मुलांसाठी विवाहसोबती शोधण्याचा तेव्हाचा प्रघात होता. तथापि, आपला पुत्र इसहाक यासाठी वधू शोधण्याच्या संबंधाने अब्राहामाला पेचप्रसंगाला तोंड द्यावे लागले. स्थानिक कनानी लोकांच्या अधम मार्गांमुळे त्यांच्यापैकी एखादी मुलगी करण्याचा विचार मनात आणणे सुद्धा अशक्य होते. (अनुवाद १८:९-१२) पुरुषाने आपल्या वंशात विवाह करावा, असा तेव्हाचा परिपाठ असला तरी अब्राहामाचे नातेवाईक शेकडो किलोमीटर दूर असणाऱ्या उत्तरेकडील मेसोपोटामियात राहत होते. परंतु अब्राहाम इसहाकला त्याठिकाणी घेऊन जाऊ शकत नव्हता कारण यहोवाने त्याला अभिवचन दिले होते: “हा देश [कनान देश] मी तुझ्या संततीला देईन.” (तिरपे वळण आमचे.) (उत्पत्ति २४:७) यास्तव अब्राहामाने अलियेजरला म्हटले: “माझ्या देशाला माझ्या आप्तांकडे जाऊन तेथून माझा मुलगा इसहाक याच्यासाठी [तू] नवरी पाहून आणशील.”—उत्पत्ति २४:४.
इन्साइट “रिबका” ¶४
रिबका
अब्राहामच्या सेवकाने ओळखलं, की त्याला त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालंय. यामुळे त्याने रिबकाला एक सोन्याची नथ आणि दोन सोन्याच्या बांगड्या दिल्या. (आजच्या काळात यांची किंमत जवळजवळ १,१३,२८० रूपये होते.) या गोष्टी तिने तिच्या आईला आणि भावाला, म्हणजे लाबानला दाखवल्या. मग त्यांनी त्या पाहुण्याला आणि त्याच्या सेवकांना आपल्या घरी मुक्कामासाठी बोलवलं. (उत्प २४:२२-३२) पण जेवण्याआधी त्या माणसाने त्यांना त्याच्या येण्याचं कारण सांगितलं. तेव्हा लाबानने आणि रिबकाच्या वडिलांनी तिच्या आणि इसहाकच्या लग्नाला संमती दिली. मग रिबकाला आणि तिच्या कुटुंबाला सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तू आणि महागडे कपडे भेट म्हणून देण्यात आले आणि सगळे सोबत मिळून जेवले. (उत्प २४:३३-५४) या सगळ्या गोष्टींमधून लग्नाचा रीतसर करार झाल्याचं दिसून आलं. त्या काळातल्या प्रथेनुसार हा करार रिबका आणि इसहाकमध्ये नाही, तर त्यांच्या आईवडिलांमध्ये झाला. अशा प्रकारे रिबकाचं इसहाकसोबत लग्न ठरलं आणि तेव्हापासून ती एका अर्थाने त्याची बायको झाली.
टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६.३ १५ ¶१
“हो, मी तयार आहे”
बथुवेलच्या घरच्यांनी आपल्या लाडक्या रिबकाला आशीर्वाद देऊन निरोप दिला. मग रिबका आणि लहानपणासून तिला सांभाळणारी तिची दाई दबोरा, तसंच काही दासी अलियेजर आणि त्याच्या सेवकांसोबत जायला निघाल्या. (उत्पत्ती २४:५९-६१; ३५:८) हारान आता खूप मागे राहिलं होतं. तो प्रवास खूप लांबचा, जवळजवळ ८०० किमी. अंतराचा होता आणि त्याला अंदाजे तीन आठवडे लागणार होते. हा प्रवास नक्कीच खडतर होता. रिबकाने याआधी उंट पाहिले होते. पण उंटावरून इतका मोठा प्रवास करायची तिला सवय होती असं म्हणता येणार नाही. कारण तिच्या घरचे उंटांवरून प्रवास करणारे व्यापारी नव्हते, तर मेंढरांचं पालन करणारे लोक होते असं बायबलमध्ये सांगितलंय. (उत्पत्ती २९:१०) उंटावरून क्वचितच प्रवास करणारे सहसा थोड्याशा प्रवासानेच पार वैतागून आणि थकून जातात.
रिबका देव-भीरू कष्टाळू स्त्री
समजा तुम्हाला तुमच्या मुलासाठी बायको शोधायची आहे. कोणत्या प्रकारची व्यक्ती तुम्ही निवडाल? तिच्यात कोणते गुण असावयास हवेत? देखणी, हुशार, दयाळू, कष्टाळू अशी सून तुम्ही निवडाल? की, तुम्ही तिच्यात दुसरे काहीतरी पाहाल?
अब्राहामासमोर अशी एक समस्या आली होती. यहोवाने त्याला अभिवचन दिले होते, की त्याचा पुत्र इसहाक याच्याद्वारे त्याच्या संततीला आशीर्वाद मिळणार होते. अब्राहाम म्हातारा झाला आहे पण त्याचा मुलगा अजूनही अविवाहितच आहे एथपासून आपण हा अहवाल पाहणार आहोत. (उत्पत्ति १२:१-३, ७; १७:१९; २२:१७, १८; २४:१) इसहाकाला आणि त्याच्या भावी पत्नीला तसेच त्यांच्या संतानाला आशीर्वाद मिळणार असल्यामुळे अब्राहाम इसहाकाला शोभेल अशी एक पत्नी शोधण्याची व्यवस्था करतो. सर्वात प्रमुख गोष्ट म्हणजे ती यहोवाची उपासक असावयास हवी. अब्राहाम राहत असलेल्या ठिकाणी म्हणजे कनानमध्ये यहोवाची सेवा करणारी एकही स्त्री मिळणे शक्य नसल्यामुळे त्याला दुसरीकडे स्थळ पाहावे लागणार होते. सरतेशेवटी ते रिबकाला निवडतात. पण ती त्यांना कशी भेटली? रिबका आध्यात्मिक मनोवृत्तीची स्त्री होती का? तिच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?
शोभेल अशा स्त्रीचा शोध
अब्राहाम आपला सर्वात जुना सेवक कदाचित एलियाजर याला, यहोवाचे उपासक असलेल्या आपल्या नातेवाईकांमधून इसहाकासाठी मुलगी पाहण्याकरता दूरवरील मेसोपोटेमियाला पाठवतो. ही गोष्ट इतकी गंभीर होती, की एलियाजरला, कनान्यांमधून इसहाकासाठी पत्नी घेणार नाही अशी शपथ घ्यायला सांगितली जाते. अब्राहामचा याबाबतीतला आग्रह उल्लेखनीय आहे.—उत्पत्ति २४:२-१०.
अब्राहामाच्या नातेवाईकांच्या शहरात गेल्यावर, एलियाजर एका विहिरीपाशी आपल्या दहा उंटांना आणतो. हे दृश्य डोळ्यासमोर आणा. संध्याकाळची वेळ आहे आणि एलियाजर प्रार्थना करतो: “पाहा, मी या पाण्याच्या विहीरीपाशी उभा आहे, आणि गावातल्या कन्या पाणी भरावयास बाहेर येत आहेत. तर असे घडून येऊ दे की ज्या मुलीस मी म्हणेन, मला पाणी पाजण्यासाठी आपली घागर उतर, आणि ती मला म्हणेल, तू पी आणि तुझ्या उंटासहि मी पाजिते, तीच तुझा सेवक इसहाक याच्यासाठी तू नेमिलेली असो.”—उत्पत्ति २४:११-१४.
तिथल्या प्रत्येक स्त्रीला हे माहीत असेल, की दमलेला उंट भरपूर (जवळजवळ १०० लीटर) पाणी पिऊ शकतो. तेव्हा, दहा उंटांना पाणी पाजायला तयार असलेली स्त्री बरेच कष्ट करण्यास तयार असावयास हवी. दुसऱ्या स्त्रिया केवळ तिला पाहत उभ्या असताना, रिबकाच एकटी उंटांना पाणी पाजत आहे यावरून तिच्या शक्तीचा, सहनशीलतेचा, नम्रतेचा व मनुष्य आणि प्राणी यांच्याप्रती प्रेमाचा पुरावा दिसून येणार होता.
काय घडते? “त्याचे बोलणे संपले नाही तोच अब्राहामाचा बंधु नाहोर याची बायको मिल्का हिचा पुत्र बथुवेल यास झालेली रिबका खांद्यावर घागर घेऊन पुढे आली. ही मुलगी दिसावयास फार सुंदर होती; ती कुमारी होती; . . . ती विहिरीत उतरली व घागर भरून वर आली. तेव्हा तो सेवक धावत जाऊन तिला गाठून म्हणाला, तुझ्या घागरीतले थोडे पाणी मला पाज. ती म्हणाली, प्या, बाबा; आणि तिने ताबडतोब आपल्या हातावर घागर उतरून त्याला पाणी पाजिले.”—उत्पत्ति २४:१५-१८.
रिबका पसंतीस उतरते का?
रिबका ही अब्राहामाची नातपुतणी होती; ती केवळ देखणीच नव्हे तर सद्गुणी देखील होती. एका अनोळख्याबरोबर बोलायला ती लाजली नाही; परंतु ती फाजीलपणे पुढेपुढेही करत नव्हती. एलियाजरने प्यायला पाणी मागितले तेव्हा तिने लगेच त्याला पाणी दिले. यात नवल करण्यासारखे काही नाही कारण हे आदरातिथ्य आहे. रिबका परीक्षेच्या दुसऱ्या भागात उत्तीर्ण झाली का?
रिबका म्हणाली: “प्या, बाबा.” पण ती एवढ्यावरच थांबली नाही. ती पुढे म्हणाली: “मी तुमच्या उंटांसाठी पाणी आणून त्यांस पोटभर पाजते.” जे सर्वसामान्यपणे अपेक्षिले जाऊ शकते त्याच्यापेक्षा ती अधिक करण्याची तयारी दाखवते. ती आनंदाने ‘त्वरा करून घागर डोणीत रिचविते व पुनः पाणी आणावयास विहिरीकडे धावत जाते; असे ती त्याच्या सर्व उंटांसाठी पाणी काढते.’ अगदी उत्साहाने ती हे काम करते. अहवाल म्हणतो, की “तो मनुष्य अचंबा करून तिजकडे पाहत राहिला.”—उत्पत्ति २४:१९-२१.
ही कुमारिका अब्राहामच्या नात्यातली आहे हे समजल्यावर एलियाजर यहोवाचे धन्यवाद करण्याकरता खाली वाकतो. आपल्या वडिलांच्या घरी माझ्यासाठी आणि माझ्यासोबत आलेल्यांच्यासाठी उतरायला जागा आहे का, असे तो तिला विचारतो. ती त्याला होकार देते आणि आलेल्या पाहुण्यांविषयी सांगायला पळत घरी जाते.—उत्पत्ति २४:२२-२८.
एलियाजरची हकीकत ऐकल्यावर, रिबकेचा भाऊ लाबान आणि बाप बथुवेल, ही यहोवाचीच योजना असल्याचे समजतात. रिबका ही इसहाकासाठीच नेमलेली असते. ते म्हणतात: “तिला घेऊन जा; परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे ती तुमच्या धन्याच्या मुलाची बायको होऊ द्या.” रिबकेला काय वाटले? उद्या लगेचच जाणार काय, असे तिला विचारले असता ती “जाते” असा अर्थ असलेला इब्री भाषेतला केवळ एकच शब्द उच्चारते. तिला हे स्थळ स्वीकारण्यास बळजबरी करण्यात आली नव्हती. एलियाजरला शपथ देताना त्याने ही गोष्ट साफ केली होती, की “ती नवरी तुजबरोबर येण्यास कबूल झाली नाही” तर तू या माझ्या शपथेतून मोकळा होशील. पण रिबकेलाही ही यहोवाची योजना असल्याचे दिसून येते. त्यामुळे ती विनाविलंब आपल्या कुटुंबाला सोडून, ती ज्याला पूर्वी कधी भेटली देखील नव्हती त्याच्याशी विवाह करायला जाते. हा धाडसी निर्णय विश्वासाचे उल्लेखनीय उदाहरण आहे. ही खरोखरच एक उत्तम निवड होती!—उत्पत्ति २४:२९-५९.
इसहाकाला भेटल्यावर रिबका, आज्ञाधारकता दाखवण्यासाठी डोक्यावर पदर ओढते. इसहाक रिबकेला पत्नी म्हणून स्वीकारतो; यात काही शंका नाही, की तिच्या उत्तम गुणांमुळे तो तिच्या प्रेमात पडतो!—उत्पत्ति २४:६२-६७.
जुळी मुले
जवळजवळ १९ वर्षांपर्यंत रिबकेला मूल नव्हते. सरतेशेवटी, तिला दिवस जातात; पण तिचे गर्भारपण कष्टप्रद होते कारण तिच्या पोटात जुळी असतात जी पोटात झगडत असतात व यामुळे ती देवाकडे आक्रोश करते. आपणही आपल्या जीवनात खडतर काळ येतो तेव्हा कदाचित देवाकडे आक्रोश करू. यहोवा रिबकेचा आकांत ऐकतो आणि तिला हमी देतो. तो तिला म्हणतो, की ती दोन राष्ट्रांची माता होणार आहे व “वडील धाकट्याची सेवा करील.”—उत्पत्ति २५:२०-२६.
केवळ वरील शब्दांमुळेच रिबकेला तिचा धाकटा मुलगा याकोब याच्याबद्दल जास्त प्रेम होते, असे नाही. तर दोन्ही मुलांमध्ये फरक होता. याकोब “साधा” होता, परंतु एसावाची आध्यात्मिक गोष्टींबद्दल इतकी बेपर्वा मनोवृत्ती होती की त्याने केवळ एका भोजनासाठी, आपला जन्महक्क अर्थात देवाची अभिवचने वारशाने प्राप्त करण्याचा हक्क याकोबाला विकला. त्याने दोन हित्ती स्त्रियांबरोबर विवाह करून आध्यात्मिक मूल्यांचा अनादर केला, किंबहुना त्यांना तुच्छ लेखले आणि आपल्या पालकांना मानसिक यातना दिल्या.—उत्पत्ति २५:२७-३४; २६:३४, ३५.
याकोबाला आशीर्वाद मिळवून देण्याचा प्रयत्न
एसावाला याकोबाची सेवा करावी लागेल, हे इसहाकाला माहीत होते की नाही याविषयी बायबलमध्ये काही सांगण्यात आलेले नाही. परिस्थिती काहीही असो, रिबका आणि याकोब या दोघांना हे माहीत होते, की आशीर्वाद हे त्यालाच मिळणार होते. एसाव आपला पिता इसहाक याला, त्याने शिकार करून आणलेल्या प्राण्याचे मांस शिजवून देईल तेव्हा इसहाक त्याला आशीर्वाद देणार आहे हे ऐकताच रिबका लगेच हालचाल करते. तिच्या तरुणपणात तिने दाखवलेला निर्णायकपणा व आवेश, तिच्या म्हातारपणीही कमी झालेला नसतो. ती याकोबाला ‘तिच्या सांगण्याप्रमाणे’ दोन चांगली करडे घेऊन येण्याची आज्ञा देते. ती याकोबाच्या आवडीचे पक्वान्न करणार होती. मग, याकोब आपण एसाव असल्याचे ढोंग करून आशीर्वाद मिळवेल. पण याकोब याला नकार देतो. त्याच्या बापाला, नक्कीच कळेल की तो त्याला ठकवीत आहे आणि तो त्याला शाप देईल! पण रिबका मात्र त्याला गळ घालत राहते. ती त्याला म्हणते: “माझ्या बाळा, तुला शाप मिळाल्यास तो मला लागो.” मग ती याकोबाच्या आवडीचे पक्वान्न बनवते, याकोबाला एसावाप्रमाणे वस्रे घालते आणि त्याला इसहाकाकडे पाठवते.—उत्पत्ति २७:१-१७.
रिबका अशी का वागली हे शास्त्रवचनांत सांगितलेले नाही. पुष्कळ जण तिची टीका करतात, परंतु बायबल तिची टीका करत नाही, आणि इसहाकाला जेव्हा कळते की याकोबाला आशीर्वाद मिळाला तेव्हा इसहाकही तिची टीका करत नाही. उलट, याकोब या आशीर्वादात आणखी भर घालतो. (उत्पत्ति २७:२९; २८:३, ४) यहोवाने आपल्या पुत्रांविषयी काय म्हटले होते, हे रिबकेला माहीत असते. त्यामुळे याकोबासाठी असलेले आशीर्वाद त्यालाच मिळतील याची खात्री करण्यासाठी ती पावले उचलते. हे अगदी यहोवाच्या इच्छेच्या सामंजस्यात असते.—रोमकर ९:६-१३.
याकोबाला हारानास पाठवले जाते
याकोबाचा भाऊ एसाव याचा राग थंड होत नाही तोपर्यंत याकोबाला पळून जाण्याची गळ घालून रिबका एसावाचा डाव हाणून पाडते. ती आपल्या योजनेसाठी इसहाकाची संमती मिळवते पण एसाव याकोबावर चिडला आहे याचा दयाळूपणे उल्लेख करत नाही. उलट, ती व्यवहारचातुर्याने आपल्या नवऱ्यासमोर, याकोबाने कोणा कनानी स्त्रीबरोबर विवाह करू नये अशी भीती व्यक्त करते. इसहाकाला हे लगेच पटते आणि तो याकोबाला, असा विवाह न करण्याची आज्ञा देतो व त्याला देव-भीरू पत्नी शोधण्यासाठी रिबकेच्या कुटुंबाकडे जाण्यास सांगतो. त्यानंतर रिबका पुन्हा याकोबाला भेटते असे कोणत्याही अहवालात म्हटलेले नाही; परंतु तिच्या कार्यांमुळे भावी इस्राएल राष्ट्राला मोठे प्रतिफळ मिळते.—उत्पत्ति २७:४३–२८:२.
रिबकेविषयी आपल्याला जे माहीत आहे त्यामुळे आपण तिची प्रशंसा करण्यास प्रवृत्त होतो. ती देखणी होती यात काही संशय नाही परंतु देवाबद्दल असलेली तिची श्रद्धा हे तिचे खरे सौंदर्य होते. आणि अब्राहामाला आपल्या सूनेत हेच हवे होते. अब्राहामाने जे अपेक्षिले होते त्याच्यापेक्षा कैक पटीने तिच्यात उत्तम गुण होते. देवाकडून आलेल्या मार्गदर्शनाचे अनुकरण करण्यातील तिचा विश्वास आणि धैर्य, तिचा आवेश, तिची शालीनता आणि तिचे उदार आदरातिथ्य, हे सर्व असे गुण आहेत ज्यांचे सर्व ख्रिस्ती स्त्रियांनी अनुकरण केले पाहिजे. खरोखरच आदर्श असलेल्या स्त्रीमध्ये यहोवा हेच गुण पाहतो.
वेब सिरीझ “चित्रांमधून शिका”
रिबकाचे चांगले गुण
कुटुंबासाठी
चित्रात काय चुकीचं आहे?
उत्पत्ती २४:१-४, १०-२३ वाचा. चित्रात कोणत्या तीन गोष्टी चुकीच्या आहेत? खाली दिलेल्या ओळींमध्ये तुमचं उत्तर लिहा आणि उरलेलं चित्र रंगवून पूर्ण करा.
१․․․․․
२․․․․․
३․․․․․
चर्चेसाठी: रिबकाने कोणते महत्त्वाचे गुण दाखवले? हिंट: नीतिवचनं ३१:१७, २७, २९-३१; १ पेत्र ४:९ वाचा. तुम्ही रिबकासारखं कसं वागू शकता? हिंट: नीतिवचनं ११:२५; रोमकर १२:११ वाचा.
कुटुंब मिळून हे करा: तुम्हाला ज्या व्यक्तीला मदत करायची आहे तिचं नाव एका कागदावर लिहा. मग त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी तुम्ही काय-काय करू शकता ते लिहा. तुम्ही जे लिहून काढलंय ते तुमच्या घरच्यांना दाखवा. त्या व्यक्तीसाठी तुम्ही एकत्र मिळून काय कराल आणि कधी कराल ते ठरवा. त्या व्यक्तीला मदत केल्यानंतर कुटुंब मिळून पुन्हा एकत्र या आणि त्या व्यक्तीला मदत करून कसं वाटलं त्यावर चर्चा करा.
१. ११ नाही तर १० उंट असले पाहिजेत.
२. रिबकाने तीन बॅरेल नाही तर हौद पाण्याने भरला.
३. सेवकाने रिबकाला हार नाही तर एक नथ आणि दोन बांगड्या दिल्या.
“कुटुंबासाठी” याच्या आणखी प्रती प्रिंट करण्यासाठी www.jw.org या वेबसाईटला भेट द्या.
अध्याय ७
कुटुंबाला वाचवण्यासाठी त्याने धाडस दाखवलं
याकोबला आध्यात्मिक मूल्यांची कदर होती
याकोबाने एसावाचा वारसा हिसकावून घेतला नाही. ही मुले जन्मण्याआधीच यहोवाने म्हटले होते की, “वडील धाकट्याची सेवा करील.” (उत्पत्ति २५:२३) ‘मग देवाने याकोबालाच पहिल्यांदा जन्माला घातले असते तर सोपे नसते का झाले?’ असा प्रश्न कोणाच्या मनात येईल. परंतु, जे काही नंतर घडले त्यातून महत्त्वाची सत्ये शिकायला मिळाली. जे लोक आशीर्वादांवर आपला हक्क जमवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकरता देव आशीर्वाद देत नाही परंतु आपल्या निवडलेल्या लोकांवर तो अपात्र कृपा दर्शवतो. त्याकरता, ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबाला मिळाला, थोरल्या भावाला नाही कारण त्याला त्याची कदर नव्हती. त्याचप्रमाणे, नैसर्गिक यहुद्यांनी राष्ट्र या नात्याने एसावसारखी मनोवृत्ती दर्शवल्यामुळे त्यांची जागा आत्मिक इस्राएलने घेतली. (रोमकर ९:६-१६, २४) आजही यहोवासोबत चांगल्या नातेसंबंधाचा वारसा प्रयासाविना प्राप्त होत नाही; केवळ एका देव-भीरू कुटुंबात किंवा वातावरणात जन्म घेतल्याने तो प्राप्त होत नाही. ज्यांना ईश्वरी आशीर्वाद हवे आहेत त्यांनी धर्मी असण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आध्यात्मिक गोष्टींबद्दल खरी कदर बाळगली पाहिजे.
टेहळणी बुरूज०३ १०/१५ २८ ¶३–२९ ¶१
याकोबाला आध्यात्मिक मूल्यांची कदर होती
एका स्वप्नात, देवाने याकोबाला स्वर्ग आणि पृथ्वीमध्ये लावलेल्या शिडीवरून किंवा दगडांच्या राशीवरून देवदूत चढत-उतरत असल्याचे दाखवले व त्याला सांगितले की याकोब आणि त्याच्या संततीचे तो रक्षण करील. “तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. पाहा, मी तुजबरोबर आहे; आणि जिकडेजिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन; तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही.”—उत्पत्ति २८:१०-१५.
किती सांत्वनदायक गोष्ट! यहोवाने खात्री केली की, अब्राहाम आणि इसहाकाला दिलेली अभिवचने याकोबाच्या कुटुंबाला आध्यात्मिकरित्या संपन्न करतील. याकोबाला याची जाणीव करून देण्यात आली की, देवाची स्वीकृती असलेल्यांची सेवा देवदूत करू शकतात आणि त्याला ईश्वरी संरक्षणाची हमी देण्यात आली. याबद्दल कदर बाळगून, याकोबाने यहोवाला विश्वासू राहण्याची शपथ खाल्ली.—उत्पत्ति २८:१६-२२.
याकोबाला आध्यात्मिक मूल्यांची कदर होती
मग अनपेक्षित गोष्ट घडली. एक अनोळखी व्यक्ती, जो देवदूत असल्याचे नंतर समजले, त्याने याकोबाशी रात्रभर झुंज केली व त्याच्या एकाच स्पर्शाने त्याची जांघ उखळली. देवदूत याकोबाला आशीर्वाद देत नव्हता म्हणून तो त्याला जाऊ देत नव्हता. संदेष्टा होशेयने नंतर म्हटले की, “त्याने रडून देवाची करुणा भाकिली.” (होशेय १२:२-४; उत्पत्ति ३२:२४-२९) याकोबाला ठाऊक होते की, देवदूतांच्या पूर्वी झालेल्या दर्शनांचा, अब्राहामासोबत केलेल्या कराराचा त्याच्या संततीद्वारे पूर्णता होण्याशी संबंध होता. म्हणून त्याने आपल्या सर्व ताकदीनिशी झुंज करून आशीर्वाद मिळवला. या वेळी, देवाने त्याचे नाव बदलून इस्राएल ठेवले; त्याचा अर्थ “देवासोबत झगडणारा (दीर्घ प्रयत्न करणारा)” किंवा “देव झगडतो” असा होतो.
टेहळणी बुरूज९५ ९/१५ २१ ¶५, तळटीप
गत काळातील ईश्वरी कुटुंबे आपल्या दिवसांकरता एक नमुना
परंतु, काही वर्षांनंतर म्हणजे याकोब कनान देशात राहण्यासाठी आला तेव्हा त्याची मुलगी दीना हिला मूर्तिपूजक कनानी लोकांच्या सहवासाची घातक सवय लागल्याचे त्याला माहीत देखील नव्हते हे अगदी उघड आहे. (उत्पत्ति ३४:१) त्याच्या घरामध्ये काही धार्मिक वस्तू होत्या हे त्याला कळल्यावरही त्याने कोणतीच पाऊले उचलली नाहीत. काहीही असो, एका कनानी पुरुषाने दीनावर बलात्कार केल्यानंतर याकोबाने निर्णायक पावले उचलली. “तुमच्यापाशी जे परके देव आहेत ते सर्व फेकून द्या व स्वतःला शुद्ध करून आपली वस्त्रे बदला,” असा त्याने निदेश दिला.—उत्पत्ति ३५:२-४.
[तळटीप]
याच्या आधी कनानी लोकांच्या प्रभावापासून आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी याकोबाने दृढ पावले उचलली होती याची नोंद घ्यावी. त्याने अशी वेदी बांधली, की जी त्याला, त्याच्या कनानी शेजाऱ्यांपासून वेगळे असे दाखवून देत होती. (उत्पत्ति ३३:२०; निर्गम २०:२४, २५) त्यानंतर त्याने शखेम शहराच्या बाहेर त्याचा तंबू उभारला व स्वतःसाठी पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली. (उत्पत्ति ३३:१८; योहान ४:६, १२) तेव्हा, दीनाने कनानी लोकांसोबत सहवास राखू नये अशी याकोबाची इच्छा होती हे तिला चांगल्याप्रकारे माहीत असावे.
टेहळणी बुरूज२१.१२ २५-२७ ¶१०-१८
नेहमी “त्यांचं ऐका”
१० मत्तय ५:२३, २४ वाचा. या वचनात येशूने अशा एका विधीबद्दल सांगितलं जी यहुद्यांसाठी अतिशय महत्त्वाची होती. कल्पना करा, की एक यहुदी मंदिरात आहे. आणि प्राण्याचं अर्पण देण्यासाठी तो याजकाला आपला प्राणी देणारच आहे. इतक्यात त्याला आठवतं, की आपल्यामुळे कोणाचंतरी मन दुखावलं गेलं आहे. अशा वेळी त्याला आपलं अर्पण ‘तिथेच वेदीसमोर ठेवून निघून जायचं’ होतं. का? कारण यहोवाला अर्पण देण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं असं काहीतरी होतं. त्याबद्दल येशूने म्हटलं: “आधी आपल्या भावाशी समेट कर.”
११ याकोबच्या आयुष्यात अशी एक घटना घडली ज्यातून मदभेद मिटवून शांतीचे संबंध जोडण्याच्या बाबतीत आपल्याला महत्त्वाचे धडे शिकायला मिळतात. याकोबला आपला देश सोडून जवळजवळ २० वर्षं झाली होती. मग देवाने त्याला एका स्वर्गदूताद्वारे आपल्या मायदेशी परत जायला सांगितलं. (उत्प. ३१:११, १३, ३८) पण याकोबसमोर एक समस्या होती. त्याचा मोठा भाऊ एसाव त्याच्या जिवावर उठला होता. (उत्प. २७:४१) त्यामुळे एसावच्या मनात आपल्याबद्दल अजूनही राग असेल का, या विचाराने याकोब “खूप घाबरला आणि चिंतेत पडला.” (उत्प. ३२:७) मग याकोबने आपल्या भावासोबत पुन्हा शांतीचे संबंध जोडण्यासाठी काय केलं? सर्वात आधी त्याने याविषयी यहोवाला कळकळून प्रार्थना केली. मग त्याने एसावला उदारपणे एक मोठी भेट पाठवली. (उत्प. ३२:९-१५) आणि शेवटी, जेव्हा ते दोघे भाऊ समोरासमोर आले तेव्हा एसावला मान देण्यासाठी सर्वात आधी याकोब पुढे आला. त्याने एकदा किंवा दोनदा नाही, तर सात वेळा जमिनीला डोकं टेकवून त्याला नमस्कार केला. अशा प्रकारे नम्रता आणि आदर दाखवून याकोबने आपल्या भावासोबत पुन्हा शांतीचे संबंध जोडले.—उत्प. ३३:३, ४.
१२ एसावला भेटण्याआधी याकोबने कायकाय केलं आणि तो त्याच्याशी कसा वागला, यातून आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. सर्वात आधी याकोबने नम्रपणे यहोवाला प्रार्थना केली. पण प्रार्थना करण्यासोबतच आपल्या भावासोबत शांतीचे संबंध जोडण्यासाठी त्याला जे काही करता येईल ते त्याने केलं. एसावला भेटल्यानंतर, कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे असा वाद त्याने घातला नाही. कारण त्याला आपल्या भावाचं मन जिंकायचं होतं. मग याकोबच्या या उदाहरणाचं आपण कसं अनुकरण करू शकतो.
इतरांसोबत पुन्हा शांतीचे संबंध कसे जोडता येतील?
१३ जीवनाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून चालत राहायचं असेल, तर आपल्याला नेहमी इतरांसोबत शांतीने राहावं लागेल. (रोम.१२:१८) आपल्याला जर लक्षात आलं, की आपल्यामुळे मंडळीतल्या एखाद्या भावाचं किंवा बहिणीचं मन दुखावलं गेलं आहे, तर आपण काय केलं पाहिजे? याकोबप्रमाणेच आपणसुद्धा यहोवाला कळकळून प्रार्थना केली पाहिजे. त्यांच्यासोबत शांतीचे संबंध पुन्हा जोडण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करू, त्यावर यहोवाने आशीर्वाद द्यावा अशी विनंती आपण त्याला केली पाहिजे.
१४ यासोबतचं, आपण स्वतःचं परीक्षणही केलं पाहिजे. त्यासाठी आपण स्वतःला असे प्रश्न विचारले पाहिजेत: ‘गर्विष्ठपणा सोडून मी नम्रपणे क्षमा मागायला आणि पुन्हा शांतीचे संबंध जोडायला तयार असतो का? मी जर असं करायचा प्रयत्न केला तर यहोवा आणि येशूला कसं वाटेल?’ आपण जर या प्रश्नांवर विचार केला, तर येशूचं ऐकायची आणि आपल्या भाऊबहिणींसोबत बिघडलेले संबंध पुन्हा जोडायची प्रेरणा आपल्याला मिळेल. आणि त्यासाठी पुन्हा याकोबचंच उदाहरण आपल्याला मदत करेल.
१५ एसावला भेटल्यानंतर याकोबने त्याच्याशी वाद घातला असता, तर काय झालं असतं याचा विचार करा. त्याचा परिणाम नक्कीच चांगला झाला नसता. म्हणून आपणसुद्धा एखाद्याकडे वाद मिटवण्यासाठी जातो, तेव्हा आपण नम्र असलं पाहिजे. (इफिसकर ४:२, ३ वाचा.) नीतिवचनं १८:१९ म्हणतं: “दुखावलेल्या भावाची समजूत घालणं तटबंदी शहर काबीज करण्यापेक्षा कठीण असतं, आणि काही मतभेद किल्ल्याच्या अडसरांसारखे असतात.” आपण जर नम्रपणे क्षमा मागितली, तर अडसर लावलेले ‘किल्ल्याचे’ दरवाजेसुद्धा आपल्यासाठी पुन्हा उघडतील.
१६ आपसातले वाद मिटवताना आपण काय बोलणार आणि कसं बोलणार याचाही आपण विचार केला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर जेव्हा आपण त्याच्याशी बोलायला जाऊ, तेव्हा आपला उद्देश त्याच्यासोबत शांतीचे संबंध जोडण्याचा असला पाहिजे. सुरुवातीला कदाचित तो आपल्याशी चांगलं बोलणार नाही. त्यामुळे कदाचित आपल्याला राग येईल आणि आपण आपलीच बाजू मांडायचा प्रयत्न करू. पण असं केल्यामुळे आपसातले मतभेद मिटतील का? मुळीच नाही. हे लक्षात घ्या, की कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे हे सिद्ध करण्यापेक्षा आपल्या भावासोबत शांतीचे संबंध पुन्हा जोडणं जास्त महत्त्वाचं आहे.—१ करिंथ. ६:७.
१७ इतरांसोबत शांतीचे संबंध पुन्हा जोडण्यासाठी बंधू गिल्बर्ट यांचं चांगलं उदाहरण आहे. ते म्हणतात: “माझं माझ्या मुलीसोबत बिलकुल पटत नव्हतं. पण तरी जवळजवळ दोन वर्षं मी तिच्याशी बोलायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो.” याशिवाय, बंधू गिल्बर्ट यांनी आणखी काय केलं? ते म्हणतात: “तिच्याशी बोलण्याआधी प्रत्येक वेळी मी प्रार्थना करायचो. आणि ती कितीही वाईट बोलली, तरी ते ऐकून घ्यायला मी तयार असायचो. तिला मोठ्या मनाने क्षमा करायला मी तयार होतो. मीच कसा बरोबर आहे, हे सिद्ध करण्यापेक्षा तिच्यासोबत शांतीचे संबंध जोडणं जास्त महत्त्वाचं आहे हे मला समजलं.” मग याचा काय परिणाम झाला? गिल्बर्ट म्हणतात: “आता मला या गोष्टीचा आनंद आहे, की तिच्याशी आणि कुटुंबातल्या सगळ्यांशीच माझे चांगले संबंध आहेत.”
१८ तर मग, आपल्यामुळे मंडळीतल्या एखाद्याचं मन दुखावलं गेलं असेल, तर आपण काय करायचा निश्चय केला पाहिजे? येशूने सांगितल्याप्रमाणे त्या व्यक्तीसोबत आपण परत शांतीचे संबंध जोडायचा प्रयत्न केला पाहिजे. त्याविषयी आपण यहोवासोबत बोललं पाहिजे आणि मतभेद मिटवण्यासाठी पवित्र शक्तीच्या मदतीवर विसंबून राहिलं पाहिजे. यामुळे आपल्याला आनंद तर होईलच, शिवाय आपण येशूचं ऐकत आहात हेही दिसून येईल.—मत्त.५:९.
बायबलच्या चित्रकथा लेख ३
याकोब आणि एसाव
बायबलच्या चित्रकथा
[दृश्य १]
[गोष्ट सांगणारा] एसाव आणि याकोब जुळे भाऊ होते. त्यांच्यापैकी एसाव मोठा असल्यामुळे त्यांचे वडील त्याला एक खास आशीर्वाद देणार होते.
[गोष्ट सांगणारा] पण एसावला त्याची किंमत नव्हती.
[एसाव] तू जर मला ते लाल वरण थोडं खायला दिलंस तर मला मिळणारा आशीर्वाद तू घेऊ शकतोस.
[दृश्य २]
[गोष्ट सांगणारा] एसाव घरात नसताना याकोबचे वडील, इसहाक यांनी याकोबला आशीर्वाद दिला.
[दृश्य ३]
[गोष्ट सांगणारा] तो खास आशीर्वाद याकोबला मिळाला आहे हे एसावला कळलं.
[एसाव] पण माझं काय? मलाही आशीर्वाद द्या!
[दृश्य ४]
[गोष्ट सांगणारा] एसावने ठरवलं की तो या गोष्टीसाठी याकोबचा बदला घेईल.
[एसाव (मनातल्या मनात)] मी याकोबला सोडणार नाही, त्याला मारून टाकेन.
[दृश्य ५]
[गोष्ट सांगणारा] याकोब पळून गेला पण बऱ्याच वर्षांनंतर परत घरी आला . . .
[सेवक] एसाव तुम्हाला भेटायला येतोय आणि त्याच्यासोबत ४०० माणसं आहेत!
[याकोबचा एक सेवक] तो आपल्या सगळ्यांना मारून टाकेल!
[याकोबचा आणखी एक सेवक] आता आपण काय करायचं?
[गोष्ट सांगणारा] याकोब घाबरला होता.
[दृश्य ६]
[याकोब] हे यहोवा, मला एसावपासून वाचव. कारण मला भीती आहे, की तो माझं आणि माझ्या कुटुंबाचं बरंवाईट करेल!
[दृश्य ७]
[याकोब] मी एसावला भेटण्याआधी माझ्याकडे असलेल्या जनावरांपैकी शेकडो जनावरं त्याला भेट म्हणून पाठवा. कदाचित तो माझ्यावर दया करेल.
[दृश्य ८]
[गोष्ट सांगणारा] एसावला भेटायला जात असताना याकोबला एक स्वर्गदूत भेटला आणि त्याने याकोबला आशीर्वाद दिला.
[गोष्ट सांगणारा] आता याकोबला पक्कं माहीत झालं की यहोवा त्याला वाचवेल . . .
[दृश्य ९]
[गोष्ट सांगणारा] एसाव समोर दिसल्यानंतर याकोबने त्याला सात वेळा जमिनीवर डोकं टेकवून नमस्कार केला.
[दृश्य १०]
[दृश्य ११]
[गोष्ट सांगणारा] बरीच वर्षं उलटून गेल्यामुळे आणि याकोबही खूप प्रेमळपणे वागल्यामुळे एसावला आता त्याला मारायचं नव्हतं. झालेलं सगळं विसरून त्यांनी एकमेकांना मिठी मारली.
आपण याकोब आणि एसावकडून काय शिकू शकतो?
एसाव याकोबवर इतका का चिडला होता?
हिंट: उत्पत्ती २७:४१; नीतिवचनं १४:३०.
जर तुझा भाऊ किंवा तुझी बहीण तुझ्यावर रागावली असेल किंवा तुझ्याशी चुकीचं वागली असेल तर तू काय केलं पाहिजेस?
हिंट: १ पेत्र ३:८, ९.
अध्याय ८
तो मोहाला बळी पडला नाही
सावध राहा! ११/१० १५ ¶२
भरवसा ठेवता येईल असं एक पुस्तक—भाग १
पदव्या आणि शब्द. एखादा ऐतिहासिक अहवाल अचूक आहे हे त्याबद्दल असलेल्या बारीकसारीक माहितीवरून स्पष्ट होत असतं; जसं की प्रथा, शिष्टाचार, अधिकाऱ्यांची नावं, पदव्या आणि अशा इतर गोष्टी. मग बायबलच्या उत्पत्ती आणि निर्गम या पहिल्या दोन पुस्तकांमधल्या बारीकसारीक माहितीबद्दल काय म्हणता येईल? ती अचूक आहे का? कुटुंबप्रमुख याकोबच्या मुलाबद्दल, योसेफबद्दल उत्पत्ती आणि निर्गम पुस्तकात जे म्हटलंय त्याबद्दल जे. गॅरो डंकन यांनी आपल्या पुस्तकात असं म्हटलंय: “[बायबलच्या लेखकाला] इजिप्तच्या भाषेबद्दल, प्रथांबद्दल, धार्मिक विश्वासांबद्दल, राजदरबरातल्या गोष्टींबद्दल, तिथल्या शिष्टाचाराबद्दल आणि राज्यकारभाराबद्दल चांगलं माहीत होतं.” ते पुढे म्हणतात: “[हा लेखक] त्या काळात वापरल्या जाणाऱ्या पदव्यांचा अगदी तसाच उपयोग करतो. . . . बायबलच्या लेखकांनी वेगवेगळ्या कालखंडात फारो या शब्दाचा वापर केला; पण फक्त तेवढ्यावरून त्यांच्या लिखाणांचा खरेपणा दिसून येत नाही, तर जुन्या करारात उल्लेख केलेल्या इजिप्तमधल्या गोष्टींचं त्यांना जे सखोल ज्ञान होतं, त्यावरूनसुद्धा त्यांच्या लिखाणांचा खरेपणा दिसून येतो. डंकन असंही म्हणतात: “फारोसमोर आल्यानंतर लोक कसं बोलायचे, कसं वागायचे याबद्दल [बायबलच्या लेखकाने] जे लिहिलंय तेसुद्धा अगदी अचूक आहे.”
जे यहोवावर प्रेम करतात ते नीतिमत्त्वावर प्रेम करतात!
२ मोशेच्या नियमशास्त्रात अशी आज्ञा होती, की “व्यभिचार करू नका.” (निर्ग. २०:१४) पण मोशेचं नियमशास्त्र योसेफच्या काळाच्या दोनशे वर्षांनंतर देण्यात आलं. मग व्यभिचार देवाच्या नजरेत खूप “वाईट काम” आहे हे योसेफला कसं कळलं? योसेफ यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखत होता. त्यामुळे अशा अनैतिक कामाबद्दल यहोवाला कसं वाटेल हे तो समजू शकत होता. उदाहरणार्थ, योसेफला हे माहीत होतं की विवाहाची सुरुवात यहोवाने केली आहे. आणि विवाह फक्त एक पुरूष आणि एक स्त्रीमधेच झाला पाहिजे अशी त्याची इच्छा आहे. तसंच दोन वेळा जेव्हा त्याची पणजी सारा हिची अब्रू धोक्यात होती, तेव्हा यहोवाने तिला कसं वाचवलं हेही त्याने ऐकलं असेल. आणि तसंच यहोवाने इसहाकची पत्नी रिबका हिलाही वाचवलं होतं. (उत्प. २:२४; १२:१४-२०; २०:२-७; २६:६-११) या सर्व गोष्टींवर विचार केल्यानंतर देवाच्या नजरेत योग्य काय आणि अयोग्य काय हे योसेफला समजलं असेल. योसेफचं यहोवा देवावर प्रेम असल्यामुळे त्याच्या नीतिमान स्तरांवरही त्याचं प्रेम होतं आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत या स्तरांच्या विरोधात वागायचं नव्हतं.
देव आणि कैसर
४ ख्रिस्तपूर्व काळामध्ये, यहोवाने आपल्या काही सेवकांना राज्य सरकारांमध्ये प्रमुख हुद्दा धारण करण्याची अनुमती दिली. उदाहरणार्थ, सा. यु. पू. १८ व्या शतकामध्ये, योसेफ इजिप्तचा प्रधान मंत्री झाला, तो शासन करणाऱ्या फारोच्या खालोखालच्या हुद्यावर होता. (उत्पत्ति ४१:३९-४३) पश्चातकालीन घटनांनी स्पष्ट केले, की यहोवाने त्याचे उद्देश पूर्ण करण्यासाठी हे सर्व काही घडवून आणले जेणेकरून योसेफ ‘अब्राहामाची संतती,’ त्याच्या पूर्वजांचे संरक्षण करण्यासाठी एक साधन होऊ शकतो. पण आपण ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे, की योसेफाला दास्यत्वात विकण्यात आले होते व तो अशा काळात जगत होता जेव्हा देवाच्या सेवकांकडे मोशेचे नियमशास्त्र किंवा “ख्रिस्ताचा नियम” नव्हता.—उत्पत्ति १५:५-७; ५०:१९-२१; गलतीकर ६:२.
वयोवृद्ध जन तरुणांसाठी एक आशीर्वाद
१० वृद्ध जन सहविश्वासू बंधूभगिनींवर देखील उत्तम प्रभाव पाडू शकतात. याकोबाचा पुत्र योसेफ याने आपल्या म्हातारपणी केलेल्या केवळ एका विश्वासाच्या साध्या कृत्याचा, त्याच्यानंतरच्या कोट्यवधी खऱ्या उपासकांवर गहिरा प्रभाव पडला. तो जेव्हा ११० वर्षांचा होता तेव्हा त्याने “आपल्या अस्थींविषयी आज्ञा केली.” म्हणजे, इस्राएली लोक जेव्हा इजिप्त राष्ट्र सोडतील तेव्हा त्यांना योसेफाची हाडे सोबत न्यायची होती. (इब्री लोकांस ११:२२; उत्पत्ति ५०:२५) या आज्ञेमुळे, अनेक वर्षांपासून दास्यत्वात असलेल्या इस्राएली लोकांना एक आशेचा किरण सापडला. योसेफाच्या मृत्यूनंतर त्यांची लवकरच सुटका होईल, अशी त्यांना खात्री मिळाली.
११ योसेफाच्या विश्वासाच्या प्रदर्शनामुळे प्रोत्साहन मिळालेल्यांपैकी एक होता, मोशे. मोशे जेव्हा ८० वर्षांचा होता तेव्हा त्याला योसेफाची हाडे इजिप्त राष्ट्राच्या बाहेर नेण्याचा सुहक्क मिळाला. (निर्गम १३:१९) त्याच वेळेला मोशेची यहोशवाबरोबर ओळख घडली, जो त्याच्यापेक्षा वयाने बराच लहान होता. पुढील ४० वर्षांपर्यंत यहोशवाने मोशेचा व्यक्तिगत सेवक म्हणून सेवा केली. (गणना ११:२८) तो मोशेबरोबर सीनाय पर्वताच्या अर्ध्यापर्यंत गेला आणि मोशे जेव्हा पर्वताच्या माथ्यावरून दहा आज्ञांच्या दगडी पाट्या घेऊन आला तेव्हा तोही त्याच्याबरोबर होता. (निर्गम २४:१२-१८; ३२:१५-१७) वयोवृद्ध मोशे यहोशवासाठी प्रगल्भ सल्ल्याचा व बुद्धीचा झराच ठरला असावा!
अभ्यास लेख ३
यहोवा तुम्हाला यशस्वी व्हायला मदत करत आहे
‘यहोवा योसेफसोबत होता. तो त्याला सर्व गोष्टींत यश देत होता.’—उत्प. ३९:२, ३.
सारांश
कठीण परिस्थितीतून जात असताना आपण ‘यशस्वी’ आहोत असं आपण कधी म्हणणार नाही. कारण समस्येतून बाहेर पडल्याशिवाय असं कोणी म्हणत नाही. पण योसेफच्या आयुष्यात घडलेल्या काही घटनांवरून आपल्याला या बाबतीत एक अतिशय महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते. ती म्हणजे, कठीण परिस्थितीतून किंवा संकटातून जात असतानासुद्धा यहोवा आपल्याला यशस्वी व्हायला मदत करतो. ते कसं ते या लेखात सांगण्यात आलंय.
आपण यहोवाचे लोक आहोत. त्यामुळे आपल्यावर जेव्हा परीक्षा येतात तेव्हा आपल्याला त्याचं आश्चर्य वाटत नाही. कारण बायबलमध्येही असं म्हटलंय, की “आपल्याला बऱ्याच संकटांना तोंड देऊन देवाच्या राज्यात जावं लागेल.” (प्रे. कार्यं १४:२२) शिवाय आपल्याला हेही माहीत आहे, की देवाच्या राज्यात जाईपर्यंत काही समस्या पूर्णपणे सुटणार नाहीत. कारण फक्त देवाच्या राज्यातच “कोणीही मरणार नाही, कोणीही शोक करणार नाही किंवा रडणार नाही आणि कोणतंच दुःख राहणार नाही.”—प्रकटी. २१:४.
२ आपल्यावर संकटं येतात तेव्हा यहोवा ती आडवत नाही, पण त्यांचा सामना करण्यासाठी तो आपल्याला नक्की मदत करतो. रोममधल्या ख्रिश्चनांना प्रेषित पौलने काय म्हटलं ते पाहा. सुरवातीला त्याने त्याला आणि त्याच्या ख्रिस्ती बांधवांना कोणकोणत्या वाईट परीक्षांचा सामना करावा लागला ते सांगितलं. आणि त्यानंतर त्याने लिहिलं: “ज्याने आपल्यावर प्रेम केलं त्याच्या मदतीने आपण या सगळ्या गोष्टींवर पूर्णपणे विजय मिळवत आहोत.” (रोम. ८:३५-३७) याचाच अर्थ आपण संकटातून जात असतानासुद्धा यहोवा आपल्याला यशस्वी होण्यासाठी मदत करू शकतो. त्याने योसेफच्या बाबतीत हे कसं केलं आणि आपल्या बाबतीतही तो हे कसं करू शकतो ते आता पाहू या.
जेव्हा अचानक परिस्थिती बदलते तेव्हा . . .
३ याकोबचं आपल्या सगळ्या मुलांमध्ये योसेफवर जास्त प्रेम होतं. (उत्प. ३७:३, ४) त्यामुळे याकोबच्या इतर मुलांना योसेफचा हेवा वाटायचा. म्हणून जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी योसेफला मिद्यानी व्यापाऱ्यांना विकून टाकलं. हे व्यापारी योसेफला शेकडो किलोमीटर दूर इजिप्तला घेऊन गेले. तिथे त्यांनी योसेफला फारोच्या दरबारात एक अधिकारी आणि पहारेकऱ्यांचा प्रमुख असलेल्या पोटीफरला विकलं. एका झटक्यात योसेफचं आयुष्य बदलून गेलं होतं. आपल्या वडिलांचा सगळ्यात लाडका मुलगा आता इजिप्तमधल्या एका माणसाचा दास बनला होता.—उत्प. ३९:१.
४ बायबल म्हणतं की वाईट गोष्टी “सर्वांसोबत घडतात.” (उप. ९:११) इतरांवर सहसा येतात तसे वाईट प्रसंग यहोवाच्या लोकांवरसुद्धा येतात. (१ करिंथ. १०:१३) किंवा येशूचे शिष्य असल्यामुळेसुद्धा आपल्याला काही गोष्टींना तोंड द्यावं लागतं. उदाहरणार्थ, कधीकधी आपली थट्टा केली जाऊ शकते, आपला विरोध केला जाऊ शकतो आणि कधीकधी तर आपल्या विश्वासासाठी आपला छळसुद्धा केला जाऊ शकतो. (२ तीम. ३:१२) पण कोणत्याही वाईट परिस्थितीला आपण तोंड देत असलो तरी यहोवा आपल्याला यशस्वी व्हायला मदत करू शकतो. हे त्याने योसेफच्या बाबतीत कसं केलं?
५ उत्पत्ती ३९:२-६ वाचा. पोटीफरने हे ओळखलं की योसेफ अतिशय मेहनती आणि कुशल व्यक्ती आहे. आणि याचं कारणही त्याला माहीत होतं. त्याने हे ओळखलं, की “यहोवा [योसेफला] सर्व गोष्टींत यश देत आहे.” त्यामुळे साहजिकच पोटीफरने योसेफला आपला भरवशाचा सेवक म्हणून निवडलं. इतकंच नाही तर त्याने आपल्या घराचा सगळा कारभार त्याच्या हाती दिला. आणि याचा परिणाम म्हणजे, पोटीफरची भरभराट झाली.
६ आता थोडं योसेफच्या दृष्टिकोनातून विचार करा. त्याला नेमकं काय हवं होतं? पोटीफरने आपल्यावर खूश व्हावं आणि आपल्याला बक्षिसं द्यावीत अशी त्याची इच्छा होती का? नक्कीच नाही. उलट, आपल्याला या गुलामीतून कधी सुटका मिळेल आणि कधी आपल्या वडिलांकडे जाता येईल असं त्याला वाटत असेल. कारण त्याच्याकडे इतका अधिकार असला तरी मूर्तिपूजा करणाऱ्या एका व्यक्तीच्या हाताखाली तो अजूनही एक गुलामच होता. पण यहोवाने असं काहीही केलं नाही ज्यामुळे पोटीफरच्या गुलामीतून योसेफची सुटका होईल. उलट त्याची परिस्थिती आणखीनच कठीण होणार होती.
परिस्थिती आणखीनच वाईट होत जाते तेव्हा . . .
७ उत्पत्तीच्या ३९ व्या अध्यायात आपण असं वाचतो, की पोटीफरची बायको योसेफकडे आकर्षित झाली आणि ती त्याला सारखं मोहात पाडायचा प्रयत्न करू लागली. पण प्रत्येक वेळी योसेफ तिला नकार देत राहिला. शेवटी ती योसेफवर इतकी चिडली, की तिने त्याच्यावर बलात्काराचा खोटा आरोप लावला. (उत्पत्ती ३९:१४, १५ वाचा.) हे समजल्यावर पोटीफरने योसेफला तुरुंगात टाकलं आणि तिथे बरीच वर्षं त्याला राहावं लागलं. (उत्प. ३९:१९, २०) त्या तुरुंगाची अवस्था कशी होती? तुरुंगासाठी योसेफने जो हिब्रू शब्द वापरला त्याचा अर्थ “कुंड,” किंवा “खड्डा” असा होतो. यावरून कळतं की त्या तुरुंगात सगळीकडे खूप अंधार असावा आणि त्यातून सुटण्याची योसेफला कसलीच आशा दिसत नव्हती. (उत्प. ४०:१५; तळटीप) बायबलमध्ये असंही म्हटलंय, की त्याच्या पायात बेड्या आणि गळ्यात लोखंडी साखळ्या घालण्यात आल्या होत्या. (स्तो. १०५:१७, १८) योसेफची परिस्थिती आता आणखीनच वाईट होत चालली होती. एकेकाळी भरवशाचा असलेला हा सेवक आता एक असाहाय्य कैदी बनला होता.
८ तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का, की तुम्ही एखाद्या वाईट परिस्थितीत आहात आणि त्यासाठी तुम्ही भरपूर प्रार्थना करता. पण परिस्थिती सुधारण्याऐवजी ती आणखीनच वाईट बनत जाते. असं होऊ शकतं. कारण सैतानाच्या या जगात आपल्यावर येणाऱ्या संकटांना आणि परीक्षांना यहोवा आडवत नाही. (१ योहा. ५:१९) पण एका गोष्टीची तुम्ही खातरी ठेवू शकता. ती म्हणजे, तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात याची यहोवाला पूर्ण जाणीव आहे आणि त्याला तुमची काळजी आहे. (मत्त. १०:२९-३१; १ पेत्र ५:६, ७) इतकंच नाही तर त्याने आपल्याला असं वचनही दिलंय, की “मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही.” (इब्री १३:५) अगदी जेव्हा परिस्थिती हाताबाहेर आहे असं आपल्याला वाटतं तेव्हासुद्धा यहोवा त्या परिस्थितीतून पार व्हायला आपल्याला मदत करतो. योसेफच्या बाबतीत यहोवाने हे कसं केलं ते आता पाहू या.
९ उत्पत्ती ३९:२१-२३ वाचा. योसेफने तुरुंगात घालवलेल्या त्या कठीण काळातसुद्धा यहोवा त्याला मदत करत राहिला. कसं? योसेफने जसा पोटीफरचा भरवसा जिंकला होता तसाच त्याने तुरुंगातल्या मुख्य अधिकाऱ्याचाही भरवसा जिंकला आणि तो अधिकारी त्याच्याकडे आदराने पाहू लागला. त्यामुळे त्या अधिकाऱ्याने त्याला सर्व कैद्यांवर नेमलं. बायबल असंही म्हणतं, की “योसेफवर सोपवलेल्या कोणत्याही कामाकडे तुरुंगाच्या मुख्य अधिकाऱ्याला लक्ष द्यावं लागायचं नाही.” योसेफ आता एका चांगल्या कामात आपलं मन गुंतवू शकत होता. त्याच्यासाठी हा एक अनपेक्षित बदल होता. ज्याच्यावर एका मोठ्या अधिकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार करायचा आरोप होता, त्याच्यावर इतकी भरवशाची जबाबदारी कशी काय सोपवण्यात आली? याचं फक्त एकच कारण होतं. उत्पत्ती ३९:२३ मध्ये म्हटलंय, “यहोवा योसेफसोबत होता आणि तो जे काही करायचा त्यात यहोवा त्याला यश द्यायचा.”
१० पुन्हा एकदा योसेफच्या दृष्टिकोनातून पाहायचा प्रयत्न करा. त्याच्यावर खोटा आरोप लावण्यात आला, त्याला तुरुंगात टाकण्यात आलं तेव्हा त्याला कसं वाटलं असेल याचा विचार करा. आपण जे काही करत आहोत त्यात आपल्याला यश मिळतंय असं त्याला वाटलं असावं का? त्या वेळेस योसेफच्या मनात काय चाललं असेल? तुम्हाला काय वाटतं? तुरुंगाच्या अधिकाऱ्याने आपल्यावर खूश व्हावं आणि आपल्याला अधिकार द्यावा असं त्याला वाटत असेल का? नाही, उलट आपल्याला निर्दोष ठरवलं जावं आणि तुरुंगातून आपली सुटका व्हावी अशी त्याची इच्छा असेल. आणि म्हणून योसेफने सोबत असलेल्या एका कैद्यालाही असं सांगितलं होतं, की जेव्हा त्या कैद्याची सुटका होईल तेव्हा त्याने फारो राजाला सांगून त्याचीही सुटका करावी. (उत्प. ४०:१४) पण तो कैदी त्याच्याबद्दल बोलायचं विसरून गेला. त्यामुळे आणखी दोन वर्षं योसेफला तुरुंगात काढावी लागली. (उत्प. ४०:२३; ४१:१, १४) पण तरीसुद्धा या सबंध काळात यहोवा त्याला यश देत राहिला. ते कसं?
११ योसेफ तुरुंगात असताना यहोवाने इजिप्तच्या राजाला अशी दोन स्वप्नं दाखवली ज्यांमुळे राजा खूप अस्वस्थ झाला. फारो राजाला काहीही करून त्या स्वप्नांचा अर्थ जाणून घ्यायचा होता. जेव्हा राजाला कळालं, की योसेफ स्वप्नांचा अर्थ सांगू शकतो तेव्हा त्याने त्याला बोलवून घेतलं. यहोवाच्या मदतीने योसेफने स्वप्नांचा अर्थ तर सांगितलाच, पण त्यासोबतच त्याने राजाला एक उपयोगी सल्लासुद्धा दिला. त्यामुळे इजिप्तच्या राजावर योसेफची खूप चांगली छाप पडली. फारो राजाने ओळखलं की यहोवा योसेफसोबत आहे. आणि म्हणूनच त्याने योसेफला संपूर्ण इजिप्त देशावर अन्नधान्याचा अधिकारी म्हणून नेमलं. (उत्प. ४१:३८, ४१-४४) पुढे एक अतिशय भयंकर दुष्काळ पडला. आणि त्याचा परिणाम इजिप्तवरच नाही, तर ज्या ठिकाणी योसेफचं कुटुंब राहत होतं त्या कनान देशातही झाला. पण योसेफ आता एक मोठा अधिकारी असल्यामुळे त्याला आपल्या कुटुंबाला वाचवता येणार होतं. आणि त्यामुळे मसीहा ज्या वंशातून येणार होता तो वंश सुरक्षित राहणार होता.
१२ योसेफच्या जीवनात घडलेल्या अनोख्या घटनांचाच विचार करा. योसेफ तर एक साधासुधा गुलाम होता, मग पोटीफरसारख्या मोठ्या माणसाचं लक्ष त्याच्याकडे कसं काय गेलं असेल बरं? योसेफसारख्या एका सर्वसाधारण कैद्यावर तुरुंगाच्या अधिकाऱ्याचं लक्ष कसं गेलं आणि त्याने त्याला भरवशाची जबाबदारी कशी काय दिली? फारोला अस्वस्थ करणारी स्वप्नं कोणी दाखवली? आणि त्यांचा अर्थ सांगण्याची क्षमता योसेफला कोणी दिली? संपूर्ण इजिप्त देशावर अन्नधान्याचा अधिकारी म्हणून योसेफला नियुक्त करण्याचा निर्णय घ्यायला फारोला कोणी प्रवृत्त केलं? (उत्प. ४५:५) या सगळ्या गोष्टींमध्ये योसेफला जे यश मिळालं त्यामागे साहजिकच यहोवा होता. शेवटी, योसेफच्या भावांनी त्याच्याविरुद्ध जो दुष्ट कट रचला होता त्याचाच वापर करून यहोवाने आपला उद्देश पूर्ण केला होता.
यहोवा आपल्याला यश कसं देतो?
१३ योसेफच्या या अहवालातून आपण काय शिकू शकतो? आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेत यहोवा हस्तक्षेप करतो का? किंवा मग, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला वळण देऊन तो सगळ्या वाईट गोष्टींना एका चांगल्या गोष्टीत बदलतो का? नाही. बायबल असं शिकवत नाही. (उप. ८:९; ९:११) पण एक गोष्ट आपल्याला नक्की माहीत आहे. जेव्हा आपण एखाद्या कठीण परिस्थितीतून जात असतो तेव्हा यहोवाला त्या गोष्टीची जाणीव असते, आणि आपण मदतीसाठी करत असलेल्या प्रार्थना तो ऐकतो. (स्तो. ३४:१५; ५५:२२; यश. ५९:१) इतकंच नाही, तर आपण ज्या कठीण परिस्थितीतून जात आहोत त्या परिस्थितीतून यशस्वीपणे पार व्हायला तो आपल्याला मदत करतो. ते कसं?
१४ याचा एक मार्ग म्हणजे, यहोवा अगदी योग्य वेळेला धीर आणि सांत्वन देऊन आपली मदत करतो. (२ करिंथ. १:३, ४) तुर्कमेनिस्तानमधल्या अझीझ नावाच्या एका भावानेसुद्धा हेच अनुभवलं. त्याला त्याच्या विश्वासामुळे दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तो म्हणतो: “ज्या दिवशी माझ्यावर खटला चालवला जाणार होता त्या दिवशी सकाळी मला एका भावाने यशया ३०:१५ हे वचन दाखवलं. तिथे म्हटलंय: ‘तुम्ही शांत राहिलात आणि माझ्यावर भरवसा ठेवलात, तर तुम्ही शक्तिशाली व्हाल.’ या वचनामुळे मला नेहमी शांत राहायला आणि प्रत्येक गोष्टीत यहोवावर विसंबून राहायला मदत झाली. या वचनावर मनन केल्यामुळे तुरुंगात घालवलेल्या त्या सबंध काळात मला खूप बळ मिळालं.” तुम्हालाही तुमच्या जीवनातली अशी एखादी वेळ किंवा घटना आठवते का, जेव्हा यहोवाने तुम्हाला अगदी योग्य वेळेला धीर आणि सांत्वन देऊन मदत केली?
१५ बऱ्याच वेळा असं होतं, की एखाद्या कठीण परिस्थितीतून पार झाल्यानंतरच यहोवाने त्या परिस्थितीत आपल्याला कशी मदत केली ते आपल्या लक्षात येतं. टोरी नावाच्या बहिणीलाही ही गोष्ट जाणवली. तिचा मुलगा मॅसन सहा वर्षं कॅन्सरशी झुंज देत होता आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे टोरी अक्षरशः दुःखात बुडून गेली होती. ती म्हणते: “मला नाही वाटत, एका आईसाठी यापेक्षा कोणतं मोठं दुःख असेल. आणि मला वाटतं, सगळेच आईवडील हे मान्य करतील, की आपल्याला कितीही त्रास झाला तरी चालेल, पण आपल्या मुलाला त्रास होताना कुठलेच आईवडील पाहू शकत नाहीत.”
१६ टोरीसाठी तो काळ खूप वाईट होता. पण त्या काळात यहोवाने आपल्याला कशी मदत केली याचा तिने विचार केला. ती म्हणते: “माझा मुलगा आजारी होता त्या संपूर्ण काळात यहोवाने मला कशी कशी मदत केली हे मी अनुभवलंय. मला आठवतं, मॅसन जेव्हा खूप आजारी होता तेव्हा त्याला कोणीच भेटू शकत नव्हतं. पण तेव्हासुद्धा फक्त मला आधार देण्यासाठी भाऊबहीण दोन तास प्रवास करून हॉस्पिटलला यायचे. मला मदत करण्यासाठी कोणी ना कोणी नेहमी तिथे असायचं. आम्हाला काय हवंय काय नको याचीसुद्धा त्यांनी काळजी घेतली. अगदी वाइटातल्या वाईट परिस्थितीतसुद्धा आम्हाला ज्या गोष्टींची गरज होती त्या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळाल्या.” खरंच, यहोवाने टोरीला आणि मॅसनला त्या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी खूप मदत केली.—“आम्हाला गरज होती अगदी तेच यहोवाने आम्हाला दिलं” ही चौकट पाहा.
यहोवाने तुमच्यासाठी जे काही केलंय त्याची आठवण ठेवा
१७ स्तोत्र ४०:५ वाचा. पर्वत शिखरांवर चढणाऱ्या गिर्यारोहकाचं एकच ध्येय असतं. ते म्हणजे त्या पर्वताच्या शिखरावर पोहोचणं. पण हे करत असताना तो मधे-मधे थांबून तो निसर्गातल्या सुंदर दृष्यांचा आनंदसुद्धा घेतो. त्याचप्रमाणे आपणसुद्धा कठीण परिस्थितीतून जात असताना मधे-मधे थांबून यहोवा आपल्याला कशी मदत करत आहे याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक दिवसाच्या शेवटी आपण या प्रश्नांवर विचार केला पाहिजे, की ‘आज मी यहोवाचा आशीर्वाद कसा अनुभवला?’ ‘मी ज्या कठीण परिस्थितीतून जात आहे त्यात टिकून राहायला यहोवा मला कशी मदत करत आहे?’ कठीण परिस्थितीत टिकून राहायला यहोवाने तुम्हाला कशी मदत केली ते दाखवणारी एक तरी गोष्ट तुम्हाला मिळते का ते शोधायचा प्रयत्न करा.
१८ येणाऱ्या संकटातून यहोवाने आपल्याला सोडवावं अशी प्रार्थना तुम्ही करत असाल. हे समजण्यासारखं आणि बरोबरसुद्धा आहे. (फिलिप्पै. ४:६) पण सध्या यहोवा आपल्याला कोणकोणते आशीर्वाद देत आहे याचीही आपल्याला जाणीव असली पाहिजे. कारण संकटातून जात असताना टिकून राहण्यासाठी मदत करायचं आणि बळ द्यायचं वचन यहोवाने आपल्याला दिलंय. त्यामुळे अशा परिस्थितीत यहोवाची आपल्याला साथ आहे हे कधीही विसरू नका. असं केल्यामुळे कठीण परिस्थितीतून किंवा संकटातून जात असतानासुद्धा, यहोवाने योसेफला जशी मदत केली तशी तो आपल्यालाही मदत करत आहे हे आपल्याला जाणवेल.—उत्प. ४१:५१, ५२.
[पान १८ वरची चौकट]
“आम्हाला गरज होती अगदी तेच यहोवाने आम्हाला दिलं”
सात वर्षांचा असतानाच मॅसनला कॅन्सर असल्याचं समजलं. पुढची सहा वर्षं त्याने या आजाराला धैर्याने झुंज दिली. या काळात त्याला बऱ्याच वेळा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. पण त्याची एक खास गोष्ट भाऊबहिणींच्या लक्षात आली. जेव्हा-जेव्हा तो हॉस्पिटलमधून घरी यायचा तेव्हा-तेव्हा तो लगेच सेवाकार्यात सहभाग घ्यायचा. त्याला जमत होतं तोपर्यंत तो आवेशाने सेवाकार्यात सहभाग घेत राहिला.
मॅसन वारला तेव्हा ७०० पेक्षा जास्त लोक त्याच्या दफनविधीला आले होते. त्यांच्यामध्ये त्याचे शिक्षक आणि शाळेतली बरीच मुलंसुद्धा होती. त्याच्या मृत्यूच्या काही दिवसांआधी त्याची एक शिक्षिका त्याला भेटायला आली होती. ती म्हणाली, की ‘माझ्या मुलांचासुद्धा मॅसनसारखाच पक्का विश्वास असावा असं मला वाटतं.’ तिने असंही म्हटलं, की ती राहत होती तिथे गेली पाच वर्षं एकही साक्षीदार तिला भेटला नव्हता. म्हणून दुसऱ्याच दिवशी साक्षीदार तिला घरी जाऊन भेटले. आणि त्यानंतर ती आपल्या सभेलाही यायला तयार झाली.
मॅसनची आई टोरी म्हणते: “यहोवा चमत्कार करून मॅसनला बरं करू शकला असता. पण त्याने तसं का केलं नाही याचा मी सारखा विचार करायचे. त्यामुळे यहोवा जरी आम्हाला मदत करत होता तरी ते माझ्या लक्षात आलं नाही. पण खरंतर, त्या काळात त्याने आम्हाला खूप मदत केली. आम्हाला गरज होती अगदी तेच यहोवाने आम्हाला दिलं.”
अध्याय ९
त्यांच्या विश्वासामुळे मोशेचा जीव वाचला
सावध राहा!०४ ४/८ ४ ¶४–५ ¶१
मोशे—एक खरी की काल्पनिक व्यक्ती?
आज अनेक विद्वान या घटना काल्पनिक आहेत असं समजून त्यांकडे दुर्लक्ष करतात. ख्रिश्चॅनिटी टुडे हे पुस्तक म्हणतं: “वस्तुस्थिती अशी आहे, की इस्राएली लोक इजिप्तमध्ये होते हे सिद्ध करणारा एक छोटा पुरावाही [इतक्या वर्षांत] सापडलेला नाही.” पण प्रत्यक्ष पुरावे जरी नसले, तरी बायबलमधली माहिती खरी असल्याचे बरेच अप्रत्यक्ष पुरावे आहेत. जेम्स के. हॉफमियर हे आपल्या पुस्तकात म्हणतात: ‘पुराव्यांवरून असं दिसून येतं, की इस्राएलच्या आसपासच्या प्रदेशातले लोक बऱ्याचदा काही काळासाठी इजिप्तला राहायला जायचे; खासकरून हवामान बदलामुळे दुष्काळ पडायचा तेव्हा ते असं करायचे . . . त्यामुळे साधारणपणे इ.स.पू. १८०० ते १५४० च्या काळात आशियाच्या पश्चिम भागातून येणाऱ्या [जिथून याकोबचं कुटुंब आलं होतं] आणि इस्राएल लोकांसारखीच संस्कृती आणि भाषा असलेल्या लोकांसाठी इजिप्त हे स्थलांतर करण्यासाठी एक चांगलं ठिकाण होतं.’
शिवाय, विद्वान हेही कबूल करतात की इजिप्तच्या लोकांनी इस्राएली लोकांना गुलाम बनवलं असं जे बायबलमध्ये म्हटलंय तेसुद्धा खरं आहे. मोझेस—अ लाइफ या पुस्तकात म्हटलंय: “इजिप्तमधल्या कबरींवर असलेल्या चित्रांमध्ये बरेच गुलाम मातीच्या विटा बनवत असल्याचं दाखण्यात आलंय. या चित्रांमुळे इस्राएल लोकांवर खरोखर जुलूम केला जात होता याचे पुरावे मिळतात.”
सावध राहा!०४ ४/८ ६ ¶१-२
मोशे—एक खरी की काल्पनिक व्यक्ती?
बायबलमध्ये म्हटलंय की योखबेदने लव्हाळ्याच्या गवतापासून एक छोटी पेटी बनवली होती. आणि पुरातत्त्व संशोधनातून ही माहिती खरी असल्याचं दिसून येतं. याबद्दल एका विद्वानाने असं म्हटलं, की इजिप्तमध्ये लव्हाळ्याच्या बोटी “वजनाने हलक्या असल्यामुळे आणि त्यांतून वेगाने जाता येत असल्यामुळे अगदी सर्रासपणे वापरल्या जायच्या.”
पण एक राजा निर्दयीपणे इतक्या सगळ्या लहान बाळांना ठार मारायची आज्ञा कशी काय देऊ शकतो, असं काही जणांना वाटतं. याबद्दल जॉर्ज रॉलिंसन हे विद्वान म्हणतात: “इतिहसात वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लहान मुलांची कत्तल केल्याच्या घटना पाहायला मिळतात. . . . आणि ही गोष्ट त्या काळात खूप क्षुल्लक समजली जायची.” इतकंच काय, तर अगदी अलीकडच्या काळातसुद्धा अशा प्रकारे निर्दयीपणे कत्तल केल्याची उदाहरणं पाहायला मिळतात. बायबलमधला हा अहवाल जरी शहारे आणणारा असला तरी तो विश्वास ठेवण्यासारखा आहे.
ज्यांनी यहोवाचे हृदय संतोषविले अशा स्त्रिया
३ दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीत न्युरेमबर्ग येथे लाखो लोकांच्या हत्येचा आरोप असलेल्या गुन्हेगारांवर खटला सुरू असताना त्यांनी केवळ असे म्हणून स्वतःला निर्दोष स्थापित करण्याचा प्रयत्न केला, की आम्ही वरिष्ठांच्या आज्ञेनुसार काम केले. आता या लोकांची तुलना प्राचीन ईजिप्तमध्ये राहणाऱ्या दोन इस्राएली सुइणी, शिप्रा व पुवा यांच्याशी करा. ज्या फारोच्या राज्याखाली त्या राहात होत्या त्याचे नाव दिलेले नाही; पण तो अतिशय क्रूर होता. इब्री लोकांची लोकसंख्या वाढत चालली आहे हे पाहून तो घाबरला आणि त्याने या दोन सुइणींना हुकूम दिला की जन्माला येणाऱ्या प्रत्येक इब्री मुलाला ठार मारले जावे. या दुष्ट आज्ञेला या स्त्रियांनी कसा प्रतिसाद दिला? “त्यांनी मिसरी राजाच्या हुकमाप्रमाणे न करिता मुलगेहि जिवंत राहू दिले.” (तिरपे वळण आमचे.) या स्त्रिया मनुष्याच्या भयाला बळी का पडल्या नाहीत? कारण त्या “देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या.”—निर्गम १:१५, १७; उत्पत्ति ९:६.
४ होय, या दोन सुइणींनी यहोवाला आपला आश्रय मानले होते आणि फारोच्या क्रोधापासून त्या दोघींचे रक्षण करण्याद्वारे तो खरोखरच त्यांच्याकरता “ढाल” ठरला. (२ शमुवेल २२:३१; निर्गम १:१८-२०) पण यहोवाचा आशीर्वाद एवढ्यावरच थांबला नाही. त्याने शिप्रा व पुवा यांना स्वतःची कुटुंबे देऊन आशीर्वादित केले. शिवाय, त्या फारोचे नाव काळाच्या ओघात लुप्त झाले असले तरीसुद्धा या दोन स्त्रियांची नावे व त्यांची कृत्ये यांविषयी आपल्या प्रेरित वचनात लिहून ठेवण्याद्वारे देवाने त्यांना सन्मानित केले.—निर्गम १:२१; १ शमुवेल २:३०ब; नीतिसूत्रे १०:७.
इन्साइट “सुईण”
सुईण
इब्री भाषेत “सुईण” यासाठी ‘या-लाध’ हे जे क्रियापद वापरलंय त्याचा अर्थ ‘जन्म देणं’ असा होता. आणि या क्रियापदापासून तयार झालेलं विशेषण स्त्रीलिंगी असल्यामुळे त्याचा शब्दशः अर्थ, बाळाला जन्म देण्यासाठी मदत करणारी स्त्री असा होतो. (‘जन्म’ हा विषय पाहा.) सुईण आईला प्रसूतीवेदना होत असताना आणि मुलाला जन्म देत असताना मदत करायची. तसंच, बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याची नाळ कापायचं आणि बाळाला स्वच्छ करायचं काम करायची. यासोबतच बायबल काळात, ती बाळाला मिठाने चोळायची आणि त्याला कापडांत गुंडाळायची.—यहे १६:४.
कधीकधी जवळच्या किंवा नात्यातल्या स्त्रिया किंवा समाजातल्या वृद्ध स्त्रिया सुईण म्हणून काम करायच्या. कधीकधी बाळंतपण करणं कठीण असल्यामुळे यासाठी खास ज्ञान, कौशल्य आणि अनुभव असणं आवश्यक होतं. त्यामुळे काही स्त्रिया पेशा म्हणून हे काम स्वीकारायच्या. बन्यामीनच्या जन्माच्या वेळी “मुलाला जन्म देताना [राहेलला] खूप त्रास झाला.” तिचा जीव जात असताना सुईणीने तिला अशी खातरी दिली, की ती मुलाला जन्म देईल. (उत्प ३५:१६-१९) तामारला पेरेस आणि जेरह या जुळ्या मुलांना जन्म देणं कठीण होतं. त्या वेळी सुईण खूप सतर्क होती. म्हणूनच ती पहिल्या मुलाची ओळख करून देऊ शकली. पहिल्या मुलाचा, म्हणजे जेरहचा हात बाहेर येताच तिने पटकन त्याच्या हाताला लाल दोरा बांधला. पण त्याने हात मागे घेतला आणि त्याचा भाऊ आधी बाहेर आला. त्यामुळे आईच्या गर्भाशयाच्या मुखाला भेग पडली.—उत्प ३८:२७-३०.
इजिप्तमधल्या गुलामगिरीच्या काळात इस्राएली सुईणींना एका अतिशय धोकादायक आणि गंभीर परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. फारोने शिप्रा आणि पुवा या दोन सुईणींना बोलवलं आणि त्यांना अशी आज्ञा दिली, की इब्री लोकांमध्ये जन्माला आलेलं बाळ मुलगा असेल, तर त्याला लगेच मारून टाकलं जावं. कदाचित या स्त्रिया सुईणी म्हणून काम करणाऱ्या प्रमुख स्त्रिया असाव्यात. त्यामुळे राजाने दिलेली आज्ञा इतर सुईणींना सांगण्याची जबाबदारी त्यांच्यावर असावी. पण या स्त्रिया “देवाला भिऊन वागणाऱ्या होत्या. म्हणून त्यांनी इजिप्तच्या राजाचं ऐकलं नाही. त्याऐवजी त्या सगळ्या मुलांना जिवंत ठेवायच्या.” म्हणून फारोने त्यांना बोलावलं आणि विचारलं, की “तुम्ही मुलांना जिवंत का ठेवलं?” तेव्हा त्या म्हणाल्या, की त्यांना काहीच करता आलं नाही. कारण इब्री स्त्रिया “इतक्या सुदृढ आहेत, की सुईण त्यांना मदत करायला जायच्या आधीच त्यांच्या मुलांचा जन्म झालेला असतो.” (निर्ग १:१५-१९) या सुईणी यहोवाला भिऊन वागणाऱ्या होत्या आणि त्यांनी बाळांची कत्तल केली नाही, म्हणून यहोवाने त्यांना मुलंबाळं देऊन आशीर्वाद दिला.—निर्ग १:२०, २१.
त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा लेख ७ ¶१४-१८
“यहोवासाठी गीत गा!”
मिर्याम ८० पेक्षा जास्त वर्षांची होती तेव्हा मोशे परत आला. देवाने त्याला आपल्या लोकांची सुटका करण्यासाठी पाठवलं होतं. अहरोन मोशेच्या वतीने बोलायचं काम करायचा. मिर्यामचे हे दोन भाऊ देवाच्या लोकांना जाऊ द्यावं अशी विनंती करण्यासाठी फारोकडे गेले. फारोने जेव्हा त्यांना नकार दिला तेव्हा देवाने इजिप्तच्या लोकांवर दहा पीडा आणल्या. त्या काळात मोशे आणि अहरोनला फारोकडे पुन्हा-पुन्हा जावं लागलं तेव्हा त्यांना पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्यासाठी मिर्यामने बराच प्रयत्न केला. इजिप्तवर जेव्हा शेवटची पीडा आली तेव्हा देवाने इजिप्तच्या सर्व प्रथम जन्मलेल्या मुलांना मारून टाकलं. आणि त्या वेळी इस्राएली लोकांच्या महान सुटकेची वेळ आली! मोशेच्या नेतृत्वाखाली इस्राएली लोक इजिप्तमधून निघायची तयारी करू लागले तेव्हा कल्पना करा, मिर्यामने त्या लोकांना न थकता कशा प्रकारे मदत केली असेल!—निर्गम ४:१४-१६, २७-३१; ७:१–१२:५१.
नंतर जेव्हा इस्राएली लोक तांबड्या समुद्राच्या आणि इजिप्तच्या सैन्याच्या मधे अडकले होते, तेव्हा मिर्यामने आपल्या भावाला, मोशेला समुद्रावर काठी उगारताना पाहिलं. आणि समुद्र अक्षरशः दुभागला. मोशे जेव्हा इस्राएली लोकांना समुद्राच्या कोरड्या जमिनीवरून नेत होता तेव्हा यहोवावरचा तिचा विश्वास किती वाढला असेल याची कल्पना करा! ती अशा देवाची सेवा करत होती जो काहीही करू शकत होता, कोणतंही वचन पूर्ण करू शकत होता!—निर्गम १४:१-३१.
नंतर जेव्हा लोक सुखरूप पलीकडे पोहोचले आणि फारो आणि त्याच्या सैन्यावर समुद्र कोसळला तेव्हा यहोवा जगातल्या सर्वात बलाढ्य सैन्यापेक्षा किती शक्तिशाली आहे हे मिर्यामला पाहायला मिळाळं. त्यामुळे लोक यहोवासाठी एक गीत गायला प्रवृत्त झाले. तेव्हा मिर्यामने गीत गाण्यात पुढाकार घेतला आणि स्त्रियांनाही अशा प्रकारे गायला उत्तेजन दिलं: “यहोवासाठी गीत गा, कारण तो अतिशय गौरवशाली ठरला आहे. त्याने घोड्याला त्याच्या स्वारासोबत समुद्रात फेकलं आहे.”—निर्गम १५:२०, २१; स्तोत्र १३६:१५.
मिर्यामच्या आयुष्यातला हा सर्वात अविस्मरणीय क्षण होता! ती गीत गात असतानाचं वर्णन येतं त्या वेळी मिर्यामला बायबलमध्ये संदेष्टी म्हटलंय. संदेष्टी म्हटलेली ती पहिली स्त्री होती. एका खास पद्धतीने यहोवाची सेवा करणाऱ्या काही निवडक स्त्रियांपैकी मिर्याम एक होती.—शास्ते ४:४; २ राजे २२:१४; यशया ८:३; लूक २:३६.
अशा प्रकारे बायबल आपल्याला आठवण करून देतं, की यहोवाचं आपल्यावर लक्ष असतं. आणि आपण नम्रपणे जी मेहनत घेतो, धीर दाखवतो आणि त्याची स्तुती करतो त्याबद्दल आपल्याला आशीर्वाद द्यायला तो आतुर असतो. आपण तरुण असो किंवा वृद्ध, स्त्री असो किंवा पुरुष, आपण सर्वांनीच यहोवावर विश्वास असल्याचं दाखवलं पाहिजे. कारण अशा विश्वासनेच त्याला आनंद होतो आणि तो ते कधीच विसरत नाही. उलट त्याबद्दल आपल्याला प्रतिफळ द्यायला तो नेहमी तयार असतो. (इब्री लोकांना ६:१०; ११:६) खरंच, आपण सगळ्यांनी मिर्यामच्या विश्वासाचं अनुकरण केलं पाहिजे!
ज्यांनी यहोवाचे हृदय संतोषविले अशा स्त्रिया
३ दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीत न्युरेमबर्ग येथे लाखो लोकांच्या हत्येचा आरोप असलेल्या गुन्हेगारांवर खटला सुरू असताना त्यांनी केवळ असे म्हणून स्वतःला निर्दोष स्थापित करण्याचा प्रयत्न केला, की आम्ही वरिष्ठांच्या आज्ञेनुसार काम केले. आता या लोकांची तुलना प्राचीन ईजिप्तमध्ये राहणाऱ्या दोन इस्राएली सुइणी, शिप्रा व पुवा यांच्याशी करा. ज्या फारोच्या राज्याखाली त्या राहात होत्या त्याचे नाव दिलेले नाही; पण तो अतिशय क्रूर होता. इब्री लोकांची लोकसंख्या वाढत चालली आहे हे पाहून तो घाबरला आणि त्याने या दोन सुइणींना हुकूम दिला की जन्माला येणाऱ्या प्रत्येक इब्री मुलाला ठार मारले जावे. या दुष्ट आज्ञेला या स्त्रियांनी कसा प्रतिसाद दिला? “त्यांनी मिसरी राजाच्या हुकमाप्रमाणे न करिता मुलगेहि जिवंत राहू दिले.” (तिरपे वळण आमचे.) या स्त्रिया मनुष्याच्या भयाला बळी का पडल्या नाहीत? कारण त्या “देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या.”—निर्गम १:१५, १७; उत्पत्ति ९:६.
४ होय, या दोन सुइणींनी यहोवाला आपला आश्रय मानले होते आणि फारोच्या क्रोधापासून त्या दोघींचे रक्षण करण्याद्वारे तो खरोखरच त्यांच्याकरता “ढाल” ठरला. (२ शमुवेल २२:३१; निर्गम १:१८-२०) पण यहोवाचा आशीर्वाद एवढ्यावरच थांबला नाही. त्याने शिप्रा व पुवा यांना स्वतःची कुटुंबे देऊन आशीर्वादित केले. शिवाय, त्या फारोचे नाव काळाच्या ओघात लुप्त झाले असले तरीसुद्धा या दोन स्त्रियांची नावे व त्यांची कृत्ये यांविषयी आपल्या प्रेरित वचनात लिहून ठेवण्याद्वारे देवाने त्यांना सन्मानित केले.—निर्गम १:२१; १ शमुवेल २:३०ब; नीतिसूत्रे १०:७.
५ आज शिप्रा व पुवासारख्या स्त्रिया आहेत का? होय निश्चितच आहेत! दरवर्षी अशा हजारो स्त्रिया अशा देशांमध्ये बायबलमधील जीवनदायक संदेश निर्भयतेने घोषित करत आहेत जेथे ‘राजाच्या आज्ञेनुसार’ तो घोषित करण्याची मनाई आहे. अशारितीने त्या आपले स्वातंत्र्य, इतकेच नव्हे तर आपला जीव देखील धोक्यात घालतात. (इब्री लोकांस ११:२३; प्रेषितांची कृत्ये ५:२८, २९) देवाबद्दल व शेजाऱ्याबद्दल असलेल्या प्रीतीने प्रेरित होऊन या धैर्यवान स्त्रिया कोणाचीही तमा न बाळगता देवाच्या राज्याची सुवार्ता दुसऱ्यांना सांगतात. त्यामुळे अनेक ख्रिस्ती स्त्रियांना विरोध व छळ सहन करावा लागतो. (मार्क १२:३०, ३१; १३:९-१३) शिप्रा व पुवा यांच्याबाबतीत झाले त्याप्रमाणे, यहोवाला या उत्कृष्ट, धैर्यवान स्त्रियांच्या कृत्यांची पूर्ण जाणीव आहे आणि त्या शेवटपर्यंत विश्वासू राहिल्यात तर त्यांची नावे “जीवनाच्या पुस्तकात” लिहून ठेवण्याद्वारे यहोवा त्यांच्याविषयी आपली प्रीती व्यक्त करेल.—फिलिप्पैकर ४:३; मत्तय २४:१३.
अध्याय १०
त्याने योग्य निवड केली
तुम्हाला माहीत होतं का?
इस्राएली लोक इजिप्तमध्ये गुलाम होते हे बायबलव्यतिरिक्त कोणत्या पुराव्यांवरून सिद्ध होतं?
बायबल सांगतं की मिद्यानी लोकांनी योसेफला इजिप्तमध्ये नेलं. त्यानंतर त्याचे पिता याकोब आपल्या कुटुंबासोबत कनानमधून इजिप्तमध्ये राहायला गेले. ते इजिप्तमध्ये नाईल नदीच्या तोंडाजवळ असलेल्या गोशेन प्रांतात स्थायिक झाले. (उत्प. ४७:१, ६) इस्राएली लोक “बहुगुणित” आणि “महाप्रबळ” होत गेले. हे पाहून इजिप्तच्या लोकांना भीती वाटली आणि त्यांनी इस्राएली लोकांना गुलाम बनवलं.—निर्ग. १:७-१४.
काही आधुनिक काळातल्या टिकाकारांनी बायबलच्या या अहवालावर प्रश्न उचलला आणि तो काल्पनिक असल्याचा दावा केला. तरीसुद्धा पुरावा दाखवतो की शेमी लोक प्राचीन इजिप्तमध्ये गुलामीत होते.
उदाहरणार्थ, पुरातत्वशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना उत्तर इजिप्तमध्ये प्राचीन वसाहती असल्याचे पुरावे सापडले आहेत. डॉक्टर जॉन बिमसन सांगतात की उत्तर इजिप्तच्या परिसरात शेमी लोकांची वसाहत असल्याचे २० किंवा त्यापेक्षा जास्त पुरावे मिळाले आहेत. त्यासोबतच, इजिप्त संस्कृतीचा अभ्यास करणारे जेम्स के. हॉफमेयर म्हणतात: “साधारण इ.स.पू. १८०० ते १५४० या काळात पश्चिम आशियातल्या शेमी लोकांना इजिप्तचं खूप आकर्षण होतं आणि म्हणून बरेचसे लोक तिथे स्थलांतरित झाले. हा काळ आणि उत्पत्तीच्या पुस्तकात उल्लेख केलेल्या अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांचा काळ एकच होता. तसंच, बायबलमध्ये त्यांच्या परिस्थितीबद्दल जे सांगितलं आहे त्यातही साम्य आहे.”
पुढे दक्षिण इजिप्तमध्ये विद्वानांना आणखी काही पुरावे मिळाले. त्यांना एक चर्मपत्र सापडलं आणि ते जवळपास इ.स.पू. २०००–इ.स.पू. १६०० या काळातलं असावं. त्यात दक्षिण इजिप्तमधल्या एका घरात काम करणाऱ्या गुलामांची नावं लिहिलेली होती. त्यांपैकी ४० पेक्षा जास्त नावं शेमी लोकांची होती. हे गुलाम किंवा सेवक स्वयंपाक, विणकाम आणि मजुरी करायचे. हॉफमेयर यांच्या परीक्षणानुसार त्यांचं म्हणणं आहे, की “जर थिबैदच्या [दक्षिण इजिप्तच्या] एका घराण्यात ४० पेक्षा जास्त शेमी लोक काम करायचे तर संपूर्ण इजिप्तमध्ये, खासकरून नाईल नदीच्या तोंडाशी असलेल्या भागात नक्कीच बरेचसे शेमी लोक राहत असावेत.”
पुरातत्वशास्त्राचा अभ्यास करणारे डेविड रॉल म्हणतात की त्या चर्मपत्रावर “लिहिलेली नावं बायबलमध्ये दिलेल्या नावांसारखी होती.” उदाहरणार्थ, इस्साखार, आशेर आणि शिप्रा. (निर्ग. १:३, ४, १५) ते शेवटी म्हणतात: “या ठोस पुराव्यांवरून सिद्ध होतं की इस्राएली लोक इजिप्तमध्ये गुलाम होते.”
डॉक्टर बिमसन म्हणतात: “इस्राएली लोक इजिप्तमध्ये गुलामीत होते आणि तिथून त्यांची सुटका झाली, याबद्दल बायबलमध्ये दिलेल्या माहितीचा ठोस पुरावा इतिहासातून मिळतो.”
[तळटीप]
नोहाच्या तीन मुलांपैकी एकाचं नाव शेम होतं आणि त्याच्या नावापासून शेमी हे नाव आलं आहे. शेमच्या वंशात एलामी, अश्शूरी, खासदी, इब्री, सूरिया आणि अरबी कुळातल्या बऱ्याचशा गोत्रांचा समावेश होतो.
ईजिप्तमधील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती
योखबेद त्या बाळाला “घेऊन गेली व दूध पाजू लागली. ते मूल मोठे झाले तेव्हा ती त्याला घेऊन फारोच्या मुलीकडे गेली, आणि तो तिचा पुत्र झाला.” (निर्गम २:९, १०) मोशे आपल्या खऱ्या आईवडिलांसोबत किती काळ राहिला याविषयी बायबल सांगत नाही. काहींच्या मते, त्याचे दूध सुटेपर्यंत अर्थात, दोन किंवा तीन वर्षांपर्यंत किंवा कदाचित त्याहून अधिक काळापर्यंत तो त्यांच्यासोबत राहिला असावा. निर्गममध्ये केवळ एवढेच म्हटले आहे की, तो आपल्या आईवडिलांकडे ‘मोठा झाला.’ हे कोणत्याही वयाला सूचित होऊ शकते. परंतु, अम्राम आणि योखबेदने या काळात निश्चितच आपल्या मुलाला तो मुळात इब्री असल्याचे सांगितले असेल आणि यहोवाविषयी त्याला शिकवले असेल इतके आपण सांगू शकतो. मोशेच्या हृदयात धार्मिकतेबद्दल विश्वास आणि आवड निर्माण करण्यात ते कितपत यशस्वी ठरले हे कालांतरानेच कळणार होते.
फारोच्या मुलीकडे त्याला परत पाठवल्यानंतर मोशेला “मिसरी लोकांच्या सर्व विद्यांचे” शिक्षण देण्यात आले. (प्रेषितांची कृत्ये ७:२२) याचा असा अर्थ होऊ शकतो की, मोशेला दरबारी कार्याचे प्रशिक्षण देण्यात आले असावे. ईजिप्तच्या लोकांच्या शिक्षणात गणित, भूमिती, शिल्पकला, बांधकाम आणि इतर कला व विज्ञानांचा समावेश होता. कदाचित, त्याला ईजिप्शियन धर्माचेही शिक्षण मिळावे अशी राजघराण्याची इच्छा असावी.
मोशेला राजघराण्यातील इतर मुलांबरोबर हे खास शिक्षण मिळाले असावे. हे उच्च शिक्षण “परदेशी शासकांच्या मुलांनाही मिळत असे ज्यांना ईजिप्तमध्ये ‘सुसंस्कृत’ होण्यासाठी ओलीस ठेवून नंतर [फारोच्या] अंकित असलेले राजे म्हणून राज्य करण्यास परत पाठवले जाई” व ते फारोला विश्वासू राहत असत. (चवथा थुतमोजचे राज्य, इंग्रजी, बेट्सी एम. ब्रायन यांचे लिखित) राजाच्या महालांना जोडून असलेल्या बालगृहांमध्ये मुलांना दरबारातील अधिकारी बनण्यासाठी तयार केले जात असे. ईजिप्शियन मध्यसाम्राज्य काळातील व नवसाम्राज्य काळातील लिखाणांतून हे प्रकट होते की, फारोच्या कित्येक व्यक्तिगत सेवकांच्या व उच्च पदावरील सरकारी अधिकाऱ्यांच्या संदर्भात “बालगृहाचा बालक” ही आदरणीय पदवी मोठेपणीही वापरली जात असे.
दरबारी जीवनात मोशेची परीक्षा होणार होती. त्याला धन, ऐषाराम आणि सत्ता मिळू शकत होती. पण त्यासोबत नैतिक धोकेही होते. मोशेची काय प्रतिक्रिया होती? तो कोणाला विश्वासू राहिला? तो मनापासून यहोवाचा उपासक, जाच सहन करणाऱ्या इब्री लोकांचा बंधू होता की, त्याला मूर्तिपूजक ईजिप्त राष्ट्राकडून मिळणाऱ्या गोष्टी जास्त पसंत होत्या?
इन्साइट “इजिप्त, इजिप्तचे लोक” ¶२८
इजिप्त, इजिप्तचे लोक
मृत लोकांबद्दलचा विश्वास. इजिप्तच्या लोकांच्या धर्मात मृत व्यक्तीची काळजी घ्यायला खूप महत्त्व दिलं जायचं. शिवाय, मृत्यूमुळे झालेल्या “बदलानंतर” मेलेल्या व्यक्तीच्या भल्यासाठी आणि त्याचं पुढचं जीवन आनंदी असावं म्हणून वेगवेगळ्या गोष्टी करण्यात ते लोक खूप व्यस्त असायचे. ही गोष्ट त्यांच्या धर्मात अगदी ठळकपणे दिसून यायची. त्यांच्यात अशी एक मुख्य धार्मिक शिकवण होती, की मृत्यूनंतर एखाद्याचा पुनर्जन्म होतो किंवा त्याचा आत्मा दुसऱ्या प्राण्यामध्ये जन्म घेतो. ते असं मानायचे की आत्मा अमर असतो. ते असंही मानायचे, की कधीतरी आत्म्याला परत येऊन मानवी शरीर धारण करता यावं म्हणून मेल्यानंतर मानवी शरीर टिकवून ठेवणं गरजेचंय. असा समज असल्यामुळेच ते शव कुजू नये म्हणून त्याला मसाले लावून ठेवायचे. ज्या थडग्यांमध्ये मसाले लावलेलं शव ठेवलं जायचं त्याला ते मृत व्यक्तीचं “घर” समजायचे. त्यामुळे शाही घराण्यातल्या लोकांचं शव ज्या पिरॅमिडमध्ये ठेवलं जायचं ते त्यांच्यासाठी आलीशान घरासारखंच असायचं. अशा थडग्यांमध्ये त्या मृत व्यक्तीच्या पुढच्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या आणि चैनीच्या वस्तू ठेवल्या जायच्या. यांत दागदागिने, कपडे, फर्निचर, अन्नधान्य असायचं. त्यासोबतच मेलेल्या व्यक्तीचं दुष्ट आत्म्यांपासून संरक्षण होण्यासाठी मंत्रतंत्राचं पुस्तक आणि मंतरलेल्या वस्तू (जसं की, “मृतांचं पुस्तक”) असायच्या. (चित्र, खंड १, पृ. ५३३) पण या वस्तू साध्या लुटारूंपासूनसुद्धा मृत व्यक्तीचं संरक्षण करू शकल्या नाहीत. कारण लुटारूंनी शेवटी प्रत्येक मोठ्या थडग्याची लुटमार केली.
इन्साइट “मिद्यान” क्र. २ ¶१-२
मिद्यान
२. अब्राहामचा मुलगा मिद्यान याच्या वंशजांना बायबलमध्ये “मिद्यान” आणि “मिद्यानी” असं म्हटलंय. (गण ३१:२, ३) काही वेळा त्यांना इश्माएली असंसुद्धा म्हटलं गेलंय. (उत्प ३७:२५, २७, २८, ३६; ३९:१ सोबत तुलना करा; शास ८:२२, २४.) यावरून दिसतं की अब्राहामची मुलं इश्माएल आणि मिद्यान यांच्या वंशजांचं राहणीमान एकसारखं होतं. आणि या दोन वंशांमध्ये झालेल्या आंतरविवाहांमुळे त्यांच्यामध्ये आणखी जास्त साम्यता निर्माण झाली असावी. शिवाय असंही दिसून येतं की काही केनी लोकांना मिद्यानी म्हणून ओळखलं जायचं. मिद्यानचा जन्म व्हायच्या आधी केनी लोकांचा उल्लेख आढळतो. यावरून दिसतं की मोशेचा मेहुणा होबाब केनी असला तरी तो मिद्यानमध्ये राहत असल्यामुळे त्याला मिद्यानी म्हटलं गेलंय.—उत्प १५:१८, १९; गण १०:२९; शास १:१६; ४:११; इश्माएली; केनी पाहा.
मिद्यानी लोक अब्राहामचे वंशज असल्यामुळे त्यांची भाषा इब्री भाषेशी मिळतीजुळती असावी. उदाहरणार्थ, गिदोनला मिद्यानी लोकांचं बोलणं समजून घ्यायला कोणतीच अडचण आली नाही. (शास ७:१३-१५; ८:१८, १९) पण असंही असू शकतं की गिदोनने मिद्यानी लोकांची भाषा शिकून घेतली असावी. कारण इस्राएली लोक सात वर्षं मिद्यानी लोकांच्या वर्चस्वाखाली होते.—शास ६:१.
अध्याय ११
“फारोकडे जा”
सावध राहा!०४ ४/८ ७ ¶४–९ ¶१
मोशे—खरी की काल्पनिक व्यक्ती?
मोशे मिद्यान देश सोडून फारोसमोर जातो आणि फारोने देवाच्या लोकांना सोडून द्यावं अशी मागणी करतो. पण जेव्हा तो हट्टी राजा त्यांना सोडून द्यायला नकार देतो, तेव्हा इजिप्तवर दहा विनाशकारी पीडा येतात. दहाव्या पीडेमुळे इजिप्तमध्ये प्रत्येक पहिल्या जन्मलेल्या मुलाचा मृत्यू होतो, तेव्हा मात्र फारो हतबल होऊन शेवटी इस्राएली लोकांना जाऊ देतो.—निर्गम, अध्याय ५-१३.
या घटना तर बहुतेक वाचकांना माहीत आहेत. पण त्या खरोखर घडल्या होत्या का? फारोच्या नावाचा उल्लेख नसल्यामुळे हा अहवाल काल्पनिक आहे असा काही जण दावा करतात. पण आधी उल्लेख केलेले हॉफमेयर हे विद्वान सांगतात, की इजिप्तचे लेखक बऱ्याचदा फारोच्या शत्रूंची नावं मुद्दाम लिहित नव्हते. ते असा तर्क मांडतात, की “कादेश आणि मगिद्दोच्या राजांचा कुठेही उल्लेख नाही, म्हणून राजा थूतमोज तिसरा मगिदोविरुद्ध लढायला गेलाच नाही असं कोणताही इतिहासकार म्हणणार नाही.” त्यामुळे अशाच काही “महत्त्वाच्या धार्मिक कारणांसाठी” फारो राजाचं नावसुद्धा दिलेलं नसावं असं हॉफमेयरचं म्हणणं आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, की फारोचं नाव दिलेलं नसल्यामुळे आपलं लक्ष फारोकडे नाही, तर देवाकडे जातं.
असं असलं, तरी इजिप्तमधून इतक्या मोठ्या संख्येने लोक बाहेर पडले ही गोष्टच टीकाकार मान्य करत नाहीत. उदाहरणार्थ, होमर डब्लू. स्मिथ हे विद्वान असा तर्क मांडतात, की इतक्या मोठ्या प्रमाणात लोक इजिप्तमधून बाहेर पडले असते, तर “ही गोष्ट इजिप्तच्या किंवा सीरियाच्या इतिहासात कुठे ना कुठे नक्कीच नमूद झाली असती . . . इजिप्तमधून पॅलेस्टाईनला कदाचित फक्त काही यहुदी लोक गेले असतील, पण सांगताना मात्र ही गोष्ट खूपच वाढवून-चढवून सांगितली असावी याची शक्यता जास्त वाटते.”
हे खरंय, की इजिप्तच्या ऐतिहासिक लिखाणांत या घटनेचा कुठेच उल्लेख सापडत नाही. पण इजिप्तच्या लोकांसाठी एखादी गोष्ट जर लाजिरवाणी ठरणार असेल किंवा ती त्यांच्या राजकीय हिताच्या विरोधात जाणारी असेल, तर ते लोक आपल्या ऐतिहासिक अहवालात फेरफार करायला मागेपुढे पाहत नव्हते. उदाहरणार्थ, राजा थूतमोज तिसरा सत्तेवर आला तेव्हा त्याने त्याच्याआधी होऊन गेलेल्या हत्ससेप्यूत राणीच्या ऐतिहासिक नोंदी पुसून टाकायचा प्रयत्न केला. इजिप्तच्या इतिहासाचा अभ्यास करणारे जॉन रे यांनी म्हटलं: “शीलालेखांमधून तिचं नाव पुसून टाकण्यात आलं होतं, तिचा स्मारकस्तंभ भिंतीने झाकून टाकण्यात आला होता आणि तिच्या सगळ्या स्मारकांचा विसर पडला होता. तिचं नाव नंतरच्या इतिहासात कुठेच दिसत नाही.” अगदी अशाच प्रकारे आजच्या काळातसुद्धा खऱ्या, पण लाजिरवाण्या ठरणाऱ्या गोष्टींमध्ये फेरफार करायचे किंवा त्या लपवण्याचे प्रयत्न झाले आहेत.
“जो अदृश्य आहे त्याला” तुम्ही पाहत आहात का?
इजिप्तच्या लोकांमध्ये फारोचा खूप दरारा होता. त्यांच्यासाठी तो देवच होता. व्हेन इजिप्ट रूल्ड दी ईस्ट या पुस्तकात असे सांगितले आहे, की इजिप्तच्या लोकांच्या नजरेत फारो “पृथ्वीवरील जिवांमध्ये सर्वात बुद्धिमान आणि शक्तिशाली” होता. आपल्या प्रजेच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी फारो, फणा काढलेल्या नागाची प्रतिमा असलेला एक विशिष्ट प्रकारचा मुकुट घालायचा. हे सर्वांना याची आठवण करून देण्यासाठी होते, की राजाचा विरोध करणाऱ्यांचा लगेच सर्वनाश केला जाईल. हे सर्व लक्षात घेतल्यावर जरा कल्पना करून पाहा, की जेव्हा यहोवाने मोशेला, “तू मिसर देशातून माझे लोक इस्राएलवंशज यांस बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवतो,” असे सांगितले, तेव्हा त्याला कसे वाटले असेल!—निर्ग. ३:१०.
इन्साइट “देवीदेवता” ¶२४-२६
देवीदेवता
दहा पीडा. यहोवाने इजिप्तच्या लोकांवर पीडा आणून त्यांच्या दैवतांचा अपमान केला आणि त्यांच्यावर न्यायदंड बजावला. (निर्ग. १२:१२; गण ३३:४; चित्रं, खंड २, पान ५३०) पहिली पीडा आली तेव्हा नाईल नदी आणि इजिप्तमधल्या सगळ्या पाण्याच्या साठ्यांचं रक्तात रूपांतर झालं आणि यामुळे हापी या नाईल-देवतेचा अपमान झाला. या पीडेमुळे नाईल नदीतले सगळे मासेसुद्धा मरून गेले आणि हासुद्धा इजिप्तच्या धार्मिक विश्वासांना मोठा धक्का होता. कारण काही विशिष्ट प्रकारच्या माशांची पूजा केली जायची आणि त्याच्या ममीसुद्धा (मृत शरीर कुजू नये म्हणून विशिष्ट रसायणे भरून ठेवलेलं शव) बनवल्या जायच्या. (निर्ग ७:१९-२१) प्रजनन क्षमतेचं आणि पुनरुत्थानाबद्दल इजिप्तच्या लोकांच्या कल्पनेचं प्रतिक मानल्या जाणाऱ्या बेडूक देवीला, म्हणज हेक्ट देवीला पवित्र मानलं जायचं. त्यामुळे बेडकांच्या पीडेमुळे या देवीचा अपमान झाला. (निर्ग ८:५-१४) तिसऱ्या पीडेच्या वेळी धुळीपासून चिलटं तयार झाली. हीच गोष्ट इजिप्तच्या मंत्रतंत्र करणाऱ्या पुजाऱ्यांनी आपल्या गुप्त विद्येचा वापर करून करायचा प्रयत्न केला, तेव्हा ते अपयशी ठरले आणि त्यांनी आपला पराभव मान्य केला. (निर्ग ८:१६-१९) इजिप्तमध्ये जादूच्या किंवा गुप्त विद्येच्या शोधाचं श्रेय थोत देवाला दिलं जायचं. पण हा देवसुद्धा मंत्रतंत्र करणाऱ्या पुजाऱ्यांना तिसऱ्या पीडेची नक्कल करायला मदत करू शकला नाही.
चवथ्या पीडेपासून पुढे इजिप्तच्या आणि खऱ्या देवाच्या उपासकांमधला फरक अगदी स्पष्टपणे दिसू लागला. कारण, गोमाश्यांचे थवेच्या थवे इजिप्तच्या लोकांच्या घरांमध्ये घुसले, पण गोशेन प्रांतात राहणाऱ्या इस्राएली लोकांवर मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही. (निर्ग ८:२३, २४) पुढच्या पीडेमुळे, म्हणजे जनावरांवर आलेल्या रोगाच्या साथीमुळे हाथोर या गाय-देवीचा, एपीस दैवताचा आणि नट या आकाश-देवीचा (इजिप्तच्या लोकांच्या कल्पनेप्रमाणे पोटावर तारे चिकटवलेली गाय) तसंच यांसारख्या इतर देवीदेवता अपमान झाला. (निर्ग ९:१-६) मग फोडांच्या पीडेमुळे थोत, इसिस आणि प्ताह यांसारख्या रोग बरे करायची क्षमता असल्याचं मानल्या जाणाऱ्या दैवतांचीसुद्धा बदनामी झाली. (निर्ग ९:८-११) गारांच्या पीडा आली तेव्हा नैसर्गिक घटकांवर नियंत्रण असल्याचं मानल्या जाणाऱ्या देवांनाही लाज वाटली असेल. कारण, रेशपू या देवाचं विजांवर आणि थोत या देवाचं पावसावर आणि ढगांच्या गर्जनेवर नियंत्रण असल्याचं मानलं जायचं. (निर्ग ९:२२-२६) काही देवांना भरघोस पीक देणारे देव म्हणून मानलं जायचं. जसं की, पिकाचा रक्षक मानला जाणारा सुपीकतेचा देव मीन. पण टोळधाडीच्या पीडेमुळे यांचाही लज्जास्पद पराभव झाला. (निर्ग १०:१२-१५) अंधाराच्या पीडेमुळेसुद्धा बऱ्याच दैवतांची बदनामी झाली. यात ‘रा’ आणि होरस यांसारखे सूर्य-देव, तसंच सूर्य, चंद्र आणि ताऱ्यांचा व्यवस्थापक मानला जाणारा थोत हा चंद्रदेवसुद्धा होता.—निर्ग १०:२१-२३.
पण प्रथम जन्मलेल्या मुलाच्या मृत्यूच्या पीडेमुळे इजिप्तच्या दैवतांचा सगळ्यात मोठा अपमान झाला. (निर्ग १२:१२) असं म्हटलं जायचं की रा, किंवा आमोन-रा यांनी राणीशी संबंध ठेवले. आणि त्यामुळे जन्माला आलेल्या मुलाकडे माणसाच्या रूपात असलेला देव म्हणून पाहिलं गेलं. आणि त्याला रा, किंवा आमोन-रा याच्या मंदिरात समर्पित करण्यात आलं. त्यामुळे इजिप्तचे राज्यकर्ते स्वतःला रा, किंवा आमोन-रा यांचे पुत्र मानायचे आणि आपण देव आहोत असं समजायचे. पण जेव्हा फारोच्या थोरल्या मुलाचा मृत्यू झाला तेव्हा एका अर्थाने त्यांच्या देवाचाच मृत्यू झाला होता. (निर्ग १२:२९) त्यामुळे इजिप्तच्या धार्मिक विश्वासांना सगळ्यात मोठा तडा गेला असेल आणि इजिप्तमधल्या पहिल्या जन्मलेल्या मुलाला वाचवू न शकणाऱ्या सगळ्या दैवतांची नपुंसकता पूर्णपणे उघड झाली असेल.—अमोन क्र. ४ पाहा.
इन्साइट “इजिप्तमधून बाहेर पडणं” ¶४६-५१
इजिप्तमधून बाहेर पडणं
इस्राएली लोकांनी समुद्र पार केला तिथली रुंदी आणि लांबी. इस्राएली लोकांनी एका रात्रीत समुद्र पार केला. त्यामुळे पाण्याने दुभागलेल्या एका चिंचोळ्या मार्गातून ते गेले असतील असं म्हणता येणार नाही. उलट, तो मार्ग एक किलोमीटर किंवा त्याहून जास्त रुंद असावा. ते एकमेकांपासून अगदी कमीतकमी अंतर ठेवून सैन्यांच्या तुकड्यांप्रमाणे जात होते असं जरी मानलं, तरी लोकांच्या इतक्या मोठ्या समुदायला आपलं सामानसुमान, बैलगाड्या, आपले कळप घेऊन जायला कदाचित ८ चौ. किमी किंवा त्याहून जास्त क्षेत्र लागलं असेल. त्यामुळे असं दिसतं, की समुद्र दुभागल्यानंतर बऱ्यापैकी रुंद मार्ग तयार झाला असेल. जर हा मार्ग १.५ किमी रुंद असेल, तर इस्राएली लोकांची रांग कदाचित ५ किमी किंवा त्याहून जास्त लांब असेल. तसंच, ही रुंदी जर २.५ किमी धरली, तर त्यांची रांग ३ किमी किंवा त्यापेक्षा लांब असेल. लोकांच्या इतक्या मोठ्या रांगेला समुद्रात उतरून तो पार करून जायला कितीतरी तास लागले असतील. ते जरी घाईगडबड न करता सैन्यदलांप्रमाणे चालत राहिले, तरी ते नक्कीच भरभर गेले असतील.
ढगाच्या खांबाने इजिप्तच्या सैन्याला रोखून धरलं नसतं, तर त्यांनी इस्राएली लोकांना सहज गाठून अनेकांना ठार मारलं असतं. (निर्ग १५:९) जेव्हा इस्राएली लोक समुद्रात चालून गेले तेव्हा इस्राएली लोकांच्या मागे असलेला ढगसुद्धा त्यांच्यासोबत पुढे जात राहिला. त्यामुळे इस्राएली लोक समुद्रातून जात आहेत हे इजिप्तच्या लोकांना कळलं आणि त्यांनी त्यांचा पाठलाग केला. फारो राजाच्या मोठ्या लष्करी सैन्याचा विचार केला, तर समुद्रात तयार झालेल्या कोरड्या मार्गाची रुंदी बऱ्यापैकी मोठी असावी हे पुन्हा एकदा लक्षात येतं. इस्राएली लोकांचा नाश करायच्या आणि त्यांना पुन्हा गुलाम बनवायच्या उद्देशाने फारोचं संपूर्ण सैन्य अगदी सहजपणे समुद्राच्या त्या मार्गात उतरलं. मग सकाळच्या प्रहरी, म्हणजे पहाटे सुमारे २:०० ते ६:०० च्या दरम्यान यहोवाने आगीच्या आणि ढगाच्या खांबातून इजिप्तच्या सैन्याकडे पाहिलं आणि त्याने त्या सर्वांना गोंधळात टाकलं आणि त्याने त्यांच्या रथांची चाकं काढून टाकली.—निर्ग १४:२४, २५.
सकाळ होईपर्यंत इस्राएली लोक तांबड्या समुद्राच्या पूर्व किनाऱ्याला सुखरूप पोचले. मग इजिप्तच्या लोकांवर पाण्याच्या भिंती कोसळाव्यात म्हणून मोशेला समुद्रावर हात उगारायची आज्ञा देण्यात आली. तेव्हा “समुद्राचं पाणी पहिल्यासारखं” होऊ लागलं, आणि त्यामुळे इजिप्तचे लोक आपला जीव वाचवण्यासाठी पुन्हा पश्चिम किनाऱ्याला पळून जाऊ लागले. यावरूनसुद्धा कळतं की समुद्रात तयार झालेला तो मार्ग खूप रुंद असावा. कारण तो मार्ग जर चिंचोळा असता, तर ते पाणी लगेच कोसळलं असतं आणि त्यांना पळ काढायचा प्रयत्न करता आला नसता. पाण्याच्या कोसळणाऱ्या भिंतींपासून वाचण्यासाठी इजिप्तचे लोक पश्चिम किनाऱ्याला पळत होते, पण पाणी दोन्ही बाजूंनी इतक्या मोठ्या प्रमाणात येत राहिलं, की फारोच्या लष्करी सैन्याचे सगळे रथ आणि सैनिक त्यात पूर्णपणे बुडून गेले. त्यांतला एकही जिवंत राहिला नाही.
इतक्या सगळ्या लोकांचा उथळ पाण्यात नाश होणं शक्यच नाही. शिवाय, उथळ पाण्यातले मृतदेह किन्याऱ्यापर्यंत वाहून जाणंही शक्य नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे, की इस्राएली लोकांनी “इजिप्तच्या लोकांना समुद्रकिनाऱ्यावर मेलेलं पाहिलं.”—निर्ग १४:२२-३१; नकाशा आणि चित्र, खंड १, पृ. ५३७.
लाटा “गोठल्या.” बायबलमध्ये वर्णन केल्याप्रमाणे, इस्राएली लोकांना समुद्रातून जाऊ देण्यासाठी उसळत्या लाटांना गोठवण्यात आलं. (निर्ग १५:८) ‘गोठणे’ हा शब्द, अमेरिकन स्टॅंडर्ड व्हर्शन, द किंग जेम्स व्हर्शन आणि जे. एन. डर्बी, आय. लीझर, आर. नॉक्स आणि जे. रॉदरहॅम यांच्या भाषांतरांमध्ये वापरण्यात आला आहे. पण इथे “गोठणे” असा भाषांतरित केला हिब्रू शब्द इयोब १०:१० मध्ये विरजण लावण्याच्या बाबतीतसुद्धा वापरण्यात आलाय. त्यामुळे पाण्याच्या भिंती गोठलेल्या पाण्यासारख्या म्हणजे अगदी कठीण पदार्थासारख्या झाल्या होत्या असं म्हणता येणार नाही. उलट, पाण्याच्या त्या भिंती जिलेटीन किंवा दह्यासारख्या झाल्या असाव्यात. इस्राएली लोकांच्या दोन्ही बाजूंना असलेलं तांबड्या समुद्राचं पाणी कोणीही अडवून धरलेलं नव्हतं, आणि त्यामुळे त्या भिंती गोठल्यासारख्या, दह्यासारख्या किंवा घट्ट, पण लवचिक पदार्थासारख्या वाटत होत्या. आणि म्हणूनच ते पाणी इस्राएली लोकांवर कोसळून त्यांचा नाश होऊ नये अशा रितीने भिंतीसारखं दोन्ही बाजूंना उभं राहू शकलं. पूर्वेकडचा जोरदार वारा वाहून समुद्राचं पाणी दुभागलं आणि समुद्राचा तळ कोरडा झाला, तेव्हा मोशेला हे दृश्य असंच दिसलं असावं. त्या ठिकाणी चिखल झाला नाही, त्यामुळे मोठ्या संख्येने लोक कोरड्या जमिनीवरून सहज चालून जाऊ शकत होते.
समुद्राच्या मधे तयार झालेला हा मार्ग इतका रुंद होता, की जवळजवळ ३० लाख इस्राएली लोक समुद्र पार करून सकाळपर्यंत पूर्वेकडच्या किनाऱ्याला पोचू शकले. मग भिंतींसारखं उभं असलेलं पाणी दोन्ही बाजूंनी वाहू लागलं. पाणी इतकं वाढलं, की इजिप्तचे लोक त्यात बुडून गेले. पूर्वेच्या किनाऱ्याला उभे असलेले इस्राएली लोक पाहू शकत होते, की यहोवाने एका जागतिक सत्तेच्या हातातून त्यांच्या संपूर्ण राष्ट्राला कसं वाचवलं होतं. त्यांनी मोशेच्या या शब्दांची पूर्णता प्रत्यक्षात अनुभवली होती: “ज्या इजिप्तच्या लोकांना तुम्ही आज पाहत आहात, ते तुम्हाला पुन्हा कधीच दिसणार नाहीत.”—निर्ग १४:१३.
यहोवाचे मार्ग जाणून घेणे
“तुझे मार्ग मला दाखीव . . . म्हणजे मला तुझी ओळख घडेल.”—निर्गम ३३:१३.
मोशे फारोच्या घराण्यात लहानाचा मोठा झाला आणि ईजिप्तच्या महाकुलीन वर्गालाही ज्याचा हेवा वाटेल असे उच्च प्रतीचे शिक्षण त्याला लाभले. पण हे सर्व असूनही आपण मुळात ईजिप्तवासी नाही याची मोशेला जाणीव होती. तो इब्री मातापित्याच्या पोटी जन्माला आला होता. वयाच्या चाळीसाव्या वर्षी तो आपल्या भाऊबंदांकडे अर्थात इस्राएलपुत्रांकडे त्यांची विचारपूस करण्यास गेला. एक ईजिप्शियन माणूस एका इब्री माणसाशी दुर्व्यव्हार करत आहे हे त्याने पाहिले तेव्हा मोशेने याकडे दुर्लक्ष केले नाही. त्याने त्या ईजिप्शियन माणसाला ठार मारले. मोशेने यहोवाच्या लोकांचा पक्ष घेण्याचे निवडले. आपल्या बांधवांना सोडवण्याकरता देव आपला उपयोग करत आहे असे तो मानत होता. (प्रेषितांची कृत्ये ७:२१-२५; इब्री लोकांस ११:२४, २५) ही घटना उघडकीस आली तेव्हा ईजिप्तच्या राजघराण्याने मोशेला अपराधी ठरवले आणि त्यामुळे त्याला आपला जीव घेऊन तेथून पलायन करावे लागले. (निर्गम २:११-१५) देवाने मोशेचा आपल्या कार्याकरता उपयोग करण्याआधी, मोशेला यहोवाचे मार्ग आणखी चांगल्याप्रकारे जाणून घेण्याची गरज होती. मोशे ते शिकून घेण्यास उत्सुक होता का?—स्तोत्र २५:९.
२ पुढची ४० वर्षे मोशे हद्दपारीत एक मेंढपाळ म्हणून राहिला. आपल्या इब्री बांधवांनी आपली कदर केली नाही हे त्याने फार मनाला लावून घेतले नाही. त्याऐवजी देवाने ज्या घटना घडू दिल्या त्यांच्याशी त्याने स्वतःस नम्रपणे जुळवून घेतले. बरीच वर्षे होऊनही कोणी मोशेची विशेष दखल घेतली नाही. पण यहोवा मोशेच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत होता आणि मोशेने हे स्वीकारले. कालांतराने मोशेने लिहिले: “मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता.” अर्थात असे लिहिताना तो स्वतःविषयीचे मत व्यक्त करत नव्हता, तर देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्याने असे लिहिले. (गणना १२:३) यहोवाने मोशेचा अतिशय उल्लेखनीय प्रकारे उपयोग केला. आपणही नम्र होण्याचा प्रयत्न केल्यास यहोवा आपल्याला अनेक आशीर्वाद देईल.—सफन्या २:३.
कामगिरी सोपवण्यात येते
३ एके दिवशी यहोवाने पाठवलेला एक देवदूत सीनाय द्वीपकल्पावरील होरेब पर्वताजवळ मोशेशी बोलला. त्याने मोशेला सांगितले: “मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ति मी खरोखर पाहिली आहे; त्यांच्या मुकादमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे; त्यांचे क्लेश मी जाणून आहे; त्यांस मिसरांच्या हातातून सोडवावे, आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात . . . त्यांस घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.” (निर्गम ३:२, ७, ८) आपल्या या संकल्पानुसार देव मोशेवर काही कामगिरी सोपवू इच्छित होता, पण हे कार्य यहोवाच्या पद्धतीने करावयाचे होते.
४ यहोवाने पाठवलेल्या देवदूताने पुढे म्हटले: “आता चल, तू मिसर देशातून माझे लोक इस्राएलवंशज यांस बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवितो.” पण मोशे थोडा कचरला. या कार्याकरता आपण योग्य आहोत असा मोशेला आत्मविश्वास नव्हता. आणि खरे पाहता केवळ त्याच्या स्वतःच्या सामर्थ्याने हे कार्य करण्यास तो योग्य नव्हताच. पण यहोवाने त्याला आश्वासन दिले, “खचित मी तुझ्याबरोबर असेन.” (निर्गम ३:१०-१२) यहोवाने मोशेला अद्भूत चमत्कार करण्याचे सामर्थ्य दिले. देवानेच त्याला पाठवले आहे याचा पुरावा या अद्भूत चमत्कारांवरून मिळणार होता. मोशेचा भाऊ अहरोन याला त्याच्यासोबत, त्याच्या वतीने बोलण्याकरता पाठवण्यात आले. यहोवा स्वतः त्यांना काय बोलावे व काय करावे हे शिकवणार होता. (निर्गम ४:१-१७) मोशे आपल्यावर सोपवलेले कार्य विश्वासूपणे पूर्ण करू शकला का?
५ इस्राएलच्या वडील माणसांनी सुरुवातीला मोशे व अहरोन यांच्यावर विश्वास ठेवला. (निर्गम ४:२९-३१) पण लवकरच, ‘इस्राएलांच्या नायकांनी,’ मोशेवर व त्याच्या भावावर असा आरोप लावला, की तुम्ही आम्हाला फारोच्या दृष्टीत “वाईट” केले. (निर्गम ५:१९-२१; ६:९) इस्राएल लोक ईजिप्त सोडून जात असताना, फारोचे रथ आपल्यामागून येत असल्याचे त्यांनी पाहिले तेव्हा ते खूप घाबरले. समोर तांबडा समुद्र आणि मागे फारोची सेना; हे पाहून इस्राएल लोकांना वाटले आता आपले काही खरे दिसत नाही. त्यांनी मोशेची निंदा करण्यास सुरुवात केली. तुम्ही त्या ठिकाणी असता तर तुम्ही काय केले असते? इस्राएल लोकांजवळ बोटी नव्हत्या, पण यहोवाच्या मार्गदर्शनानुसार मोशेने लोकांना सामान बांधून तयार राहण्यास सांगितले. मग देवाने तांबड्या समुद्राचे पाणी मागे नेले. समुद्रात कोरडी जमीन तयार झाली आणि इस्राएल लोक त्यावरून चालत गेले.—निर्गम १४:१-२२.
सुटकेपेक्षा महत्त्वाचा प्रश्न
६ मोशेला आपले कार्य करण्यास नेमताना यहोवाने आपल्या नावाचे महत्त्व त्याला सांगितले. त्या नावाबद्दल आणि ते नाव बाळगणाऱ्या व्यक्तीबद्दल आदर असणे महत्त्वाचे होते. यहोवाला मोशेने त्याच्या नावाबद्दल विचारले तेव्हा त्याने असे म्हटले: “मला जे व्हायचे असेल ते मी होईन.” (NW) मोशेला इस्राएल पुत्रांना असेही सांगण्याची आज्ञा देण्यात आली: “यहोवा, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव याने मला तुम्हाकडे पाठवले आहे.” पुढे यहोवा म्हणाला: “हे सर्वकाळ माझे नाम आहे, आणि हेच माझे स्मारक सर्व पिढ्यांना होईल.” (निर्गम ३:१३-१५, पं.र.भा.) आजही सबंध पृथ्वीवरील देवाचे सेवक त्याला यहोवा याच नावाने ओळखतात.—यशया १२:४, ५; ४३:१०-१२.
७ मोशे व अहरोन यांनी फारोसमोर जाऊन यहोवाच्या नावाने आपला संदेश दिला. पण फारोने मगरूरपणे म्हटले: “यहोवा कोण आहे की मी इस्राएलास जाऊ देण्यासंबंधी त्याचा शब्द ऐकावा? मी यहोवाला जाणत नाही, आणि मी इस्राएलास जाऊ देणार नाही.” (निर्गम ५:१, २) फारो अतिशय कठोर मनाचाच नव्हे तर कपटी निघाला; तरीसुद्धा यहोवाने मोशेला वारंवार त्याच्याकडे जाऊन संदेश घोषित करण्यास पाठवले. (निर्गम ७:१४-१६, २०-२३; ८:१, २, २०) फारो चिडला आहे हे मोशेला दिसत होते. पुन्हापुन्हा जाऊन त्याचा सामना करण्याचा काही उपयोग होता का? इस्राएल सुटका मिळवण्यास उत्सुक होते. फारो मुद्दामहून अडून राहिला होता. तुम्ही मोशेच्या जागी असता तर तुम्ही काय केले असते?
८ मोशेने आणखी एक संदेश घोषित केला व म्हटले: “यहोवा इबऱ्यांचा देव असे म्हणतो, ‘माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यांना जाऊ दे.’” देवाने पुढे असेही म्हटले: “मी आपला हात पुढे करून तुला व तुझ्या लोकांना मरीकडून मारले असते, आणि पृथ्वीतून तुला नष्ट करण्यात आले असते. तरी मी आपले सामर्थ्य तुला दाखवावे आणि माझे नाव पृथ्वीमध्ये प्रसिद्ध व्हावे म्हणून मी तुला राखले आहे.” (निर्गम ९:१३-१६, पं.र.भा.) कठोर मनाच्या फारोविरुद्ध न्यायदंड आणण्याद्वारे यहोवाने आपला विरोध करणाऱ्या सर्वांना धडा शिकवण्याकरता आपले सामर्थ्य दाखवण्याचे ठरवले होते. यांत, ज्याला येशू ख्रिस्ताने “जगाचा अधिपती” म्हटले तो दियाबल सैतान देखील आहे. (योहान १४:३०; रोमकर ९:१७-२४) भाकीत केल्यानुसार यहोवाचे नाव सबंध पृथ्वीवर घोषित करण्यात आले. त्याच्या सहनशीलतेमुळे इस्राएल लोकांचा बचाव झाला आणि त्यांच्यासोबत मोठा मिश्र समुदाय देखील त्याची उपासना करू लागला. (निर्गम ९:२०, २१; १२:३७, ३८) तेव्हापासून, यहोवाच्या नावाची घोषणा झाल्यामुळे आणखी लाखो लोकांचा फायदा झाला व त्यांनी देखील खऱ्या उपासनेचा स्वीकार केला आहे.
त्रासदायक लोकांशी व्यवहार
९ इब्री लोकांना देवाचे नाव माहीत होते. त्यांच्याशी बोलताना मोशे देवाच्या नावाचा उपयोगही करत असे. पण त्यांनी हे नाव बाळगणाऱ्या देवाबद्दल नेहमीच योग्य आदर दाखवला नाही. यहोवाने इस्राएल लोकांना ईजिप्तमधून चमत्कारिकरित्या सोडवल्यानंतर, त्यांना लगेच पिण्याचे पाणी मिळाले नाही तेव्हा काय झाले? ते मोशेविरुद्ध कुरकूर करू लागले. यानंतर ते अन्नाबद्दल तक्रार करू लागले. मोशेने त्यांना इशारा दिला की त्यांचे हे कुरकूरणे केवळ अहरोन व आपल्याविरुद्धच नव्हे तर यहोवाविरुद्ध होते. (निर्गम १५:२२-२४; १६:२-१२) सीनाय पर्वतावर यहोवाने इस्राएलांना नियमशास्त्र दिले आणि यासोबत अनेक अद्भुते त्यांना दाखवली. पण लोकांनी थोड्या काळानंतरच देवाची आज्ञा मोडून सोन्याचे वासरू तयार केले व त्याची उपासना केली. आणि वरून त्यांनी म्हटले की आम्ही “यहोवाचा सण” साजरा करत आहोत.—निर्गम ३२:१-९, पं.र.भा.
१० ज्या लोकांचे स्वतः यहोवानेच ताठ मानेचे लोक असे वर्णन केले त्यांच्याबरोबर मोशेने कशाप्रकारे व्यवहार केला? मोशेने यहोवाला विनंती केली: “माझ्यावर तुझी कृपादृष्टि असल्यास, तुझे मार्ग मला दाखीव ना, म्हणजे मला तुझी ओळख घडेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टि माझ्यावर होईल.” (निर्गम ३३:१३) आज ख्रिस्ती पर्यवेक्षक यहोवाच्या ज्या आधुनिक काळातील साक्षीदारांची देखभाल करतात, ते त्यामानाने अतिशय नम्र लोक आहेत. तरीसुद्धा, हे ख्रिस्ती पर्यवेक्षक यहोवाला अशी प्रार्थना करतात: “हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखीव; तुझ्या वाटा मला प्रगट कर.” (स्तोत्र २५:४) यहोवाच्या मार्गांचे ज्ञान मिळाल्यामुळे या पर्यवेक्षकांना निरनिराळ्या प्रसंगांना तोंड देताना देवाच्या वचनातील तत्त्वांचे पालन करण्यास व यहोवाच्या व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत व्यवहार करण्यास मदत मिळते.
यहोवा आपल्या लोकांकडून काय अपेक्षितो
११ यहोवाला आपल्या लोकांकडून काय अपेक्षा आहेत हे त्याने सीनाय पर्वतावर तोंडी सांगितले होते. नंतर मोशेला दहा आज्ञा दगडी पाट्यांवर लिखित रूपात देण्यात आल्या. पर्वतावरून खाली आल्यावर त्याने इस्राएलांना वासराच्या ओतीव मूर्तीची पूजा करताना पाहिले. तेव्हा त्याने क्रोधित होऊन त्या दगडी पाट्या फेकून फोडून टाकल्या. यहोवाने पुन्हा, मोशेने कोरलेल्या दगडी पाट्यांवर दहा आज्ञा लिहिल्या. (निर्गम ३२:१९; ३४:१) या आज्ञा पहिल्यांदा ज्या दिल्या होत्या त्यांसारख्याच होत्या, त्यांत बदल करण्यात आला नव्हता. मोशेला या आज्ञांनुसार कार्य करायचे होते. देवाने मोशेला हेही दाखवले की तो कशाप्रकारची व्यक्ती आहे; यामुळे मोशेला कळले की यहोवाचा प्रतिनिधी या नात्याने त्याने कसे वागले पाहिजे. ख्रिस्ती आज मोशेच्या नियमाखाली नाहीत पण यहोवाने मोशेला जे सांगितले होते त्यात अनेक मूलभूत तत्त्व आहेत जे आजही बदललेले नाहीत आणि यहोवाची उपासना करणाऱ्या सर्वांकरता ते आजही बंधनकारक आहेत. (रोमकर ६:१४; १३:८-१०) यांपैकी काही तत्त्वांचा आता विचार करू या.
१२ यहोवाला अनन्य भक्ती द्या. मी केवळ अनन्य भक्ती स्वीकारतो असे जेव्हा यहोवाने घोषित केले तेव्हा इस्राएल राष्ट्र तेथे उपस्थित होते. (निर्गम २०:२-५) यहोवा खरा देव आहे याचा भरपूर पुरावा इस्राएल लोकांनी पाहिला होता. (अनुवाद ४:३३-३५) यहोवाने हे स्पष्ट केले होते की इतर राष्ट्रे काहीही करोत, पण तो आपल्या लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची मूर्तिपूजा किंवा भूतविद्येचे प्रकार खपवून घेणार नाही. त्यांची उपासना ही केवळ औपचारिक असता कामा नये. यहोवावर आपल्या पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीती करा असे त्यांना सांगण्यात आले होते. (अनुवाद ६:५, ६) यात त्यांचे वागणेबोलणे—अर्थात त्यांच्या जीवनाचा प्रत्येक पैलू समाविष्ट होता. (लेवीय २०:२७; २४:१५, १६; २६:१) येशू ख्रिस्ताने देखील हे स्पष्ट केले की यहोवा अनन्य भक्तीची अपेक्षा करतो.—मार्क १२:२८-३०; लूक ४:८.
१३ यहोवाच्या आज्ञांचे काटेकोरपणे पालन करा. इस्राएल लोकांना आठवण करून दिली जाण्याची गरज होती, की जेव्हा यहोवाने त्यांच्यासोबत करार बांधला होता तेव्हा त्यांनी त्याच्या सर्व आज्ञांचे तंतोतंत पालन करण्याचे वचन दिले होते. त्यांना बऱ्याच वैयक्तिक बाबी ठरवण्याचे स्वातंत्र्य होते, पण ज्या बाबतींत यहोवाने त्यांना आज्ञा दिल्या होत्या त्यांचे मात्र काटेकोरपणे पालन करणे आवश्यक होते. असे केल्यामुळे ते देवाबद्दल प्रेम तर व्यक्त करूच शकत होते पण यामुळे त्यांना व त्यांच्या मुलाबाळांना फायदाच होणार होता कारण यहोवाचे सर्व नियम त्यांच्या हिताचे होते.—निर्गम १९:५-८; अनुवाद ५:२७-३३; ११:२२, २३.
१४ आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य द्या. शारीरिक गरजा पुरवण्यात व्यग्र होऊन आध्यात्मिक कार्यांकडे दुर्लक्ष करू नये असे इस्राएल राष्ट्राला सांगण्यात आले होते. त्यांचे जीवन केवळ दैनंदिन कार्यांनाच वाहिलेले असावयाचे नव्हते. यहोवाने दर आठवड्याचा काही भाग पवित्र ठरवला होता; हा वेळ केवळ खऱ्या देवाच्या उपासनेशी संबंधित कार्यांकरताच उपयोगात आणावयाचा होता. (निर्गम ३५:१-३; गणना १५:३२-३६) या व्यतिरिक्त, दर वर्षी आणखी काही वेळ विशिष्ट पवित्र मेळाव्यांकरता राखून ठेवायचा होता. (लेवीय २३:४-४४) हे मेळावे यहोवाच्या सामर्थ्यशाली कृत्यांचे वर्णन करण्याकरता, त्याच्या मार्गांची आठवण करून दिली जाण्याकरता व त्याच्या सर्व चांगुलपणाबद्दल त्याचे आभार मानण्याकरता होते. यहोवाला आपला भक्तिभाव व्यक्त केल्यामुळे, हळूहळू लोकांच्या मनात देवाचे भय व त्याच्याबद्दल प्रीती वाढत जाऊन, त्यांना त्याच्या मार्गात चालण्यास मदत मिळणार होती. (अनुवाद १०:१२, १३) त्या नियमांत दडलेली हितकारक तत्त्वे आज यहोवाच्या सेवकांच्याही उपयोगाची आहेत.—इब्री लोकांस १०:२४, २५.
यहोवाच्या गुणांची जाण राखणे
१५ यहोवाच्या गुणांची जाण राखणे मोशेकरता हिताचे होते कारण यामुळे त्याला इस्राएल लोकांशी योग्य व्यवहार करण्यास मदत मिळाली. निर्गम ३४:५-७ यात आपण वाचतो की देवाने मोशेच्या पुढून जाता जाता अशी घोषणा केली: “परमेश्वर, परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप ह्यांची क्षमा करणारा, (पण अपराधी जनांची) मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्रपौत्रांचा तिसऱ्या व चौथ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो.” या शब्दांवर थोडे थांबून मनन करा. स्वतःशीच विचार करा: ‘यांपैकी प्रत्येक गुणाचा काय अर्थ आहे? यहोवाने हा विशिष्ट गुण कशाप्रकारे प्रकट केला आहे? ख्रिस्ती पर्यवेक्षक हा गुण कसा दाखवू शकतात? आपल्यापैकी प्रत्येकाच्या वागणुकीवर या विशिष्ट गुणाचा प्रभाव कसा पडला पाहिजे?’ काही उदाहरणांचा विचार करा.
१६ यहोवा “दयाळू व कृपाळू देव” आहे. तुमच्याजवळ शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) हा संदर्भ ग्रंथ असल्यास त्यात “दया” या गुणाबद्दल काय माहिती आहे ती पडताळून पाहा. किंवा टेहळणी बुरूज प्रकाशन विषयसूची (इंग्रजी) अथवा वॉचटावर लायब्ररी (सीडी-रॉम) यांचा उपयोग करून या विषयावर अधिक संशोधन करा. काँकर्डन्समधून दया या गुणाशी संबंधित शास्त्रवचने पाहा. हे साहित्य वाचल्यास तुम्हाला असे दिसून येईल की यहोवाची दया काही प्रसंगी त्याला ठरवलेली शिक्षा कमी करण्यास प्रवृत्त करते, पण यासोबतच त्यात कोमल करूणेचाही समावेश आहे. म्हणूनच देव आपल्या लोकांचे संकट दूर करण्याकरता कार्यवाही करतो. याचा एक पुरावा म्हणजे, इस्राएल लोक प्रतिज्ञात देशात जात असताना देवाने त्यांच्या आध्यात्मिक गरजांसोबतच त्यांच्या शारीरिक गरजाही भागवल्या. (अनुवाद १:३०-३३; ८:४) त्याच्या लोकांनी चुका केल्या तेव्हा यहोवाने दयाळूपणे त्यांना क्षमा केली. त्याने प्राचीन काळच्या आपल्या लोकांना दया दाखवली. मग आजच्या काळातल्या त्याच्या सेवकांनी एकमेकांशी किती दयाळूपणे वागले पाहिजे!—मत्तय ९:१३; १८:२१-३५.
१७ दयाळू असण्यासोबतच यहोवा कृपाळू देखील आहे. तुमच्याजवळ शब्दकोश असल्यास, “कृपाळू” या शब्दाचा काय अर्थ आहे हे वाचून पाहा. यानंतर यहोवाचे कृपाळू असे वर्णन करणाऱ्या शास्त्रवचनांशी या माहितीची तुलना करा. बायबल सांगते की यहोवा कृपाळू असल्यामुळे तो आपल्या लोकांपैकी जे प्रतिकूल परिस्थितीत आहेत त्यांची प्रेमळपणे काळजी वाहतो. (निर्गम २२:२६, २७) कोणत्याही देशात, परदेशी व्यक्ती या न् त्या प्रकारे प्रतिकूल परिस्थितीत असतात. अशा व्यक्तींशी निष्पक्ष मनोवृत्तीने व दयाळूपणे वागण्यास आपल्या लोकांना शिकवताना यहोवाने त्यांना आठवण करून दिली की ते स्वतः देखील एकेकाळी ईजिप्तमध्ये परदेशी होते. (अनुवाद २४:१७-२२) आज देवाच्या लोकांबद्दल, अर्थात आपल्याबद्दल काय म्हणता येईल? कृपाळूपणे वागल्यास आपण बांधवांतील एकता वाढवू जेणेकरून इतरजण यहोवाच्या उपासनेकडे आकृष्ट होतील.—प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५; प्रकटीकरण ७:९, १०.
१८ पण इतर देशांच्या लोकांशी कृपाळूपणे वागणे हे यहोवावर व त्याच्या नैतिक आदर्शांवर प्रेम करण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे नव्हते. म्हणूनच, इस्राएलांना आसपासच्या देशांतील रितीरिवाज, त्यांच्या धार्मिक प्रथा व अनैतिक रितीभाती आत्मसात करू नका असे शिकवण्यात आले होते. (निर्गम ३४:११-१६; अनुवाद ७:१-४) हे आज आपल्याकरताही समर्पक आहे. आपला देव यहोवा हा पवित्र असल्यामुळे आपणही पवित्र असणे महत्त्वाचे आहे.—१ पेत्र १:१५, १६.
१९ मोशेला आपले मार्ग समजून यावेत म्हणून यहोवाने हे स्पष्ट केले की जरी तो पापी वर्तनाला संमती देत नसला तरीसुद्धा तो मुळात मंदक्रोध आहे. तो लोकांना त्याचे नियम शिकून घेण्याकरता व त्या नियमांनुसार वागण्याची संधी देतो. एखादी व्यक्ती पश्चात्ताप व्यक्त करते तेव्हा यहोवा तिला क्षमा करतो पण गंभीर चुकांकरता जे शिक्षेस पात्र आहेत अशांची तो गय करत नाही. त्याने मोशेला बजावून सांगितले की इस्राएल लोक जे काही करतील त्याचा त्यांच्या पुढील पिढ्यांवर एकतर चांगला किंवा वाईट परिणाम होईल. यहोवाच्या मार्गांची कदर बाळगल्यामुळे, जेव्हा स्वतःच्या चुकीमुळे आपल्यावर वाईट प्रसंग ओढावतात तेव्हा देवाला दोष देण्याच्या व तो विलंब लावत आहे असा निष्कर्ष काढण्याच्या प्रवृत्तीपासून त्याच्या लोकांचा बचाव होऊ शकतो.
२० यहोवा व त्याच्या मार्गांविषयी जर तुमचे वैयक्तिक ज्ञान तुम्ही वाढवू इच्छिता, तर मग सतत संशोधन करत राहा आणि बायबलचे वाचन करताना मनन करा. यहोवाच्या व्यक्तिमत्त्वाच्या निरनिराळ्या विलोभनीय पैलूंचे जवळून परीक्षण करा. आपल्याला देवाचे अनुकरण कसे करता येईल आणि आपले जीवन त्याच्या उद्देशाशी कसे जुळवून घेता येईल याचा प्रार्थनापूर्वक विचार करा. असे केल्याने तुम्ही अनेक पाशांत पडण्याचे टाळू शकाल, आपल्या सह विश्वासू बांधवांसोबत योग्य रितीने व्यवहार करू शकाल आणि इतरांनाही आपल्या महान देवाची ओळख करून घेण्यास व त्याच्यावर प्रेम करण्यास मदत करू शकाल.
अध्याय १२
तो शेवटपर्यंत विश्वासू राहून त्याच्या देवासाठी लढला
टेहळणी बुरूज०६ ६/१५ १६ ¶१-२
“या द्राक्षवेलाची काळजी घे”!
इस्राएलच्या १२ हेरांनी वचन दिलेल्या देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणांची पहाणी केली. मोशेने त्यांना तिथले लोक कसे आहेत ते पाहायला आणि तिथल्या जमिनीच्या उत्पन्नाचे काही नमुने आणायला सांगितलं होतं. मग कोणत्या गोष्टीकडे खासकरून त्यांचं लक्ष गेलं? हेब्रोनपासून काही अंतरावरच त्यांना एक द्राक्षमळा दिसला. तिथली द्राक्षं इतकी मोठी होती, की द्राक्षाचा एक घड उचलून आणायला दोन हेर लागले. तिथलं उत्पन्न इतक्या चांगल्या प्रतीचं होतं, की त्या सुपीक भागाला त्या हेरांनी “अष्कलोनचं खोरं” किंवा “द्राक्षांचा घड” असं नाव दिलं.—गणना १३:२१-२४; तळटीप.
१९ व्या शतकात पॅलेस्टाईनला गेलेल्या एका व्यक्तीने असं म्हटलं: “अष्कलोन किंवा द्राक्षांचं खोरं . . . अजूनही द्राक्षांच्या वेलींनी पांघरलेलं आहे आणि तिथे पॅलेस्टाईनमधली सगळ्यात उत्तम प्रतीची आणि मोठी द्राक्षं मिळतात.” अष्कलोनमधली द्राक्षं सगळ्यात उत्तम असली, तरी बायबल काळात संपूर्ण पॅलेस्टाईनमध्येच चांगल्या प्रतीच्या द्राक्षांचं उत्पन्न व्हायचं. इजिप्तच्या नोंदी दाखवतात की फारोनेसुद्धा कनानमधूनच द्राक्षारस आयात केला होता.
टेहळणी बुरूज११ ३/१ १५
‘दूध आणि मध वाहत असलेला देश’
यहोवा देवाने इस्राएली लोकांची इजिप्तमधून सुटका केल्यावर त्यांना “दूध आणि मध वाहत असलेल्या एका चांगल्या आणि मोठ्या देशात” नेण्याचं वचन दिलं.—निर्गम ३:८.
इस्राएली लोक वचन दिलेल्या देशात राहू लागल्यानंतर त्यांनी गायी, मेंढ्या आणि शेळ्या पाळायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात दुधाचा पुरवठा होता. पण मग मधाबद्दल काय? काही जणांचं असं मानणं आहे की बायबलमध्ये “मध” असं जे म्हटलंय तो कदाचित खजूर, अंजीर किंवा द्राक्षापासून बनवलेला गोड पदार्थ असावा. आणि बायबलमध्ये जेव्हा खासकरून मधमाश्यांचा उल्लेख येतो तेव्हा तो कदाचित लोकांनी मधमाश्यांचं पालन करून काढलेला नाही, तर रानातला मध असावा. (शास्ते १४:८, ९; १ शमुवेल १४:२७; मत्तय ३:१, ४) तर मग तो देश खरोखर दूध आणि मध “वाहत” असलेला देश होता का?
अलीकडच्या काळात इस्राएलमध्ये झालेल्या उत्खननात याबद्दलचे स्पष्ट पुरावे मिळतात. या शोधाबद्दल एका प्राध्यापकाने म्हटलं: “इस्राएल आणि त्याच्या जवळपासच्या भागात झालेल्या उत्खननात सापडलेलं हे आत्तापर्यंतचं सगळ्यात जुनं मधमाश्यांचं पोळं आहे. ते कदाचित इ.स.पू. १० व्या ते ९ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातलं असावं.”
पुरातत्वशास्त्रज्ञांना तीन रांगांमध्ये असलेल्या ३० पेक्षा जास्त मधाची पोळी सापडली आहेत. आणि त्या संपूर्ण भागात १०० पेक्षा जास्त मधाची पोळी असतील असा त्यांचा अंदाज आहे. या मधाच्या पोळ्यांचा अभ्यास करत असताना त्यांना मधमाश्यांच्या शरीराचे आणि त्यांच्या पोळ्याच्या मेणाचे अवशेष सापडेल आहेत. तज्ज्ञांचा असा अंदाज आहे, की “या पोळ्यांमधून दरवर्षी कमीतकमी अर्धा टन मध काढला जाऊ शकत होता.”
प्राचीन काळात मध हा फक्त एक स्वादिष्ट पदार्थच नव्हता, तर पोळ्याच्या मेनाचा वापर धातू आणि चामड्याच्या उद्योगातसुद्धा केला जायचा. तसंच हे मेण लाकडी पाट्यांवर लावून त्याचा वापर लिहिण्यासाठी केला जायचा. हे मेण वितळवून त्याचा वापर पुन्हा वापर केला जाऊ शकत होता. या संशोधनातून पुरातत्वशास्त्रज्ञांनी कोणता निष्कर्ष काढला?
त्या प्राध्यापकाने पुढे म्हटलंय: “त्या काळात इस्राएली लोक मधमाश्यांचं पालन करत होते असं बायबलमध्ये कुठेच सांगितलेलं नाही. पण संशोधनात सापडेल्या मधाच्या पोळ्यांवरून असं दिसतं, की पहिलं मंदिर [शलमोनचं मंदिर] बांधायच्या काळापर्यंत इस्राएली लोकांमध्ये मधमाश्यांचं पालन करून त्यांच्यापासून मध तयार करायच्या व्यवसायात खूप प्रगती झाली होती. त्यामुळे बायबलध्ये ‘मध’ असं जे म्हटलंय ते मधमाश्यांपासून मिळणाऱ्या मधाला सूचित करत असावं.”
टेहळणी बुरूज०४ १०/१५ १७ ¶११-१२
‘हा देश फिरून पाहा’
११ वेगवेगळी ठिकाणे शोधण्याकरता बायबलच्या नकाशांचा वापर करणे समजण्याजोगे आहे, पण नकाशांवरून लोकांच्या विचारसरणीची कल्पना येऊ शकेल का? याचे उदाहरण म्हणून, सीनाय पर्वतापासून प्रतिज्ञात देशाकडे निघालेल्या इस्राएलांचे उदाहरण घ्या. वाटेवर काही ठिकाणी मुक्काम करीत करीत ते शेवटी कादेश (कादेशबर्ण्या) येथे पोचले. अनुवाद १:२ यानुसार हे ११ दिवसांचे अंतर होते, जवळजवळ २७० किलोमीटरचे अंतर. तेथून मोशेने १२ हेरांना प्रतिज्ञात देशात पाठवले. (गणना १०:१२, ३३; ११:३४, ३५; १२:१६; १३:१-३, २५, २६) हे हेर नेगेब प्रांतातून (वाटेत कदाचित बैरशेबा पार करून) हेब्रोनला गेले व प्रतिज्ञात देशाच्या उत्तरी सीमेपर्यंत पोचले. (गणना १३:२१-२४) इस्राएलांनी दहा हेरांच्या प्रतिकूल वृत्तावर विश्वास ठेवल्याने, त्यांना ४० वर्षे अरण्यात भटकावे लागले. (गणना १४:१-३४) यावरून त्यांच्या विश्वासाबद्दल व यहोवावर त्यांना असलेल्या भरवशाबद्दल काय प्रकट होते?—अनुवाद १:१९-३३; स्तोत्र ७८:२२, ३२-४३; यहूदा ५.
१२ याकडे आता भौगोलिक दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा. इस्राएलांनी देवावर विश्वास ठेवून यहोशवा व कालेब यांचा सल्ला ऐकला असता, तर त्यांना प्रतिज्ञात देशात प्रवेश करण्याकरता फार दूरचा प्रवास करावा लागणार होता का? इसहाक व रिबका जेथे राहात होते त्या बैर-लहाय-रोईपासून कादेश जवळजवळ १६ किलोमीटर अंतरावर होते. येथून बैर-शेबापर्यंत अर्थात प्रतिज्ञात देशाच्या दक्षिणी टोकापर्यंत जास्तीतजास्त ९५ किलोमीटरचे अंतर होते. (उत्पत्ति १६:१४; २५:११; २ शमुवेल ३:१०) ईजिप्तपासून सिनाय पर्वतापर्यंत आणि २७० किलोमीटरचे अंतर पार करून कादेशपर्यंत प्रवास केल्यावर इस्राएल लोक जणू प्रतिज्ञात देशाच्या उंबरठ्यावर येऊन पोचले होते. आज आपण पृथ्वीवर येणार असलेल्या प्रतिज्ञात परादीसच्या उंबरठ्यावर आहोत. मग आपल्याकरता यात कोणता धडा आहे? प्रेषित पौलाने इस्राएल लोकांच्या परिस्थितीचा संदर्भ घेऊन हा सल्ला दिला: “म्हणून त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा. ह्यासाठी की, त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होऊ नये.”—इब्री लोकांस ३:१६-४:११.
विश्वास आणि देवाचे भय बाळगून धैर्यवान व्हा
११ अशाप्रकारच्या विश्वासाची नेहमी वाढ होत राहते, ती खुंटत नाही. आपण शिकत असलेल्या सत्याचे जसजसे आपण पालन करीत राहतो, त्याच्या लाभांचा “अनुभव” घेतो, आपल्या प्रार्थना पूर्ण होताना ‘पाहतो’ आणि इतर मार्गांद्वारे आपल्या जीवनात यहोवाच्या मार्गदर्शनाची आपल्याला जाणीव होते, तसतसा हा विश्वास वाढत राहतो. (स्तोत्र ३४:८; १ योहान ५:१४, १५) यहोशवा आणि कालेबने देवाचा चांगुलपणा चाखून पाहिल्यामुळे त्यांचा विश्वास वाढला होता, असे आपण खात्रीने म्हणू शकतो. (यहोशवा २३:१४) या मुद्द्यांचा विचार करा: देवाने त्यांना वचन दिले त्याप्रमाणे ते ४० वर्षांच्या अरण्य प्रवासातून सुखरूप आले होते. (गणना १४:२७-३०; ३२:११, १२) कनानवर विजय मिळवण्यासाठी इस्राएलांना सहा वर्षांपर्यंत संघर्ष करावा लागला. पण सरतेशेवटी, त्यांना दीर्घायुष्य आणि चांगले आरोग्य लाभले; शिवाय प्रत्येकाला त्याचा वारसाहक्क देखील मिळाला. जे यहोवाची विश्वासूपणे व धैर्याने सेवा करतात त्यांना तो सढळ हाताने प्रतिफळ देतो!—यहोशवा १४:६, ९-१४; १९:४९, ५०; २४:२९.
टेहळणी बुरूज०६ १०/१ १७-१९ ¶१-१२
विश्वास आणि देवाचे भय बाळगून धैर्यवान व्हा
इस्राएल राष्ट्र, सा.यु.पू. १४७३ साली वचनयुक्त देशाच्या उंबरठ्यावर उभे होते. आत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासमोर येणाऱ्या अडचणींविषयी मोशेने लोकांना अशी आठवण करून दिली: “हे इस्राएला, श्रवण कर; तुझ्यापेक्षा महान व सामर्थ्यवान राष्ट्रे ताब्यात घेण्यास तू आज यार्देन उतरून जाणार आहेस; त्यांची नगरे मोठी व त्यांचे कोट गगनचुंबित आहेत; तेथील लोक धिप्पाड व उंच असून अनाकी वंशातले आहेत . . . अनाकाच्या वंशजांशी कोण सामना करील असे म्हणतात हे तू ऐकलेच आहेस.” (अनुवाद ९:१, २) होय हे धिप्पाड वीरपुरुष प्रसिद्ध होते! शिवाय, काही कनान्यांचे सैन्य आधुनिक शस्त्रसामुग्रीने सुसज्ज होते; त्यांच्याकडे घोडे होते, आणि चाकांना धारदार लोखंडी आऱ्या असलेले रथ होते.—शास्ते ४:१३.
२ दुसरीकडे पाहता, इस्राएल हे गुलामांचे राष्ट्र होते. त्यांनी नुकतीच ४० वर्षे अरण्यवासात काढली होती. त्यामुळे मानवी दृष्टीतून पाहिल्यास, विजयी होण्याची शक्यता जवळजवळ अशक्यच होती. तरीपण मोशेला विश्वास होता. यहोवा आपल्यापुढे एका नायकाप्रमाणे उभा आहे हे जणू काय तो ‘पाहू’ शकत होता. (इब्री लोकांस ११:२७) मोशेने लोकांना सांगितले: यहोवा ‘तुमच्यापुढे पलीकडे जात आहे. तो त्यांचा संहार करील व त्यांना तुझ्यापुढे चीत करील.’ (अनुवाद ९:३; स्तोत्र ३३:१६, १७) मोशेच्या मृत्यूनंतर यहोवाने यहोशवाला पुन्हा एकदा साहाय्याची खात्री देत असे म्हटले: “ऊठ व ह्यांना अर्थात इस्राएल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू ह्या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा. तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचाहि टिकाव लागणार नाही; जसा मोशेबरोबर मी होतो तसाच तुझ्याबरोबरहि मी असेन.”—यहोशवा १:२, ५.
३ यहोवाचे साहाय्य आणि मार्गदर्शन मिळण्याकरता यहोशवाला देवाच्या नियमशास्त्राचे वाचन, मनन व पालन करणे अगत्याचे होते. तरच “तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशःप्राप्ति घडेल,” असे यहोवाने त्याला म्हटले. पुढे यहोवा त्याला म्हणाला: “मी तुला आज्ञा केली आहे ना? खंबीर [“धैर्यवान,” सुबोध भाषांतर] हो, हिंमत धर, घाबरु नको, कचरू नको; कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.” (यहोशवा १:८, ९) यहोशवाने देवाचे ऐकल्यामुळे तो धैर्यवान, हिंमती झाला व त्याला यशःप्राप्ती घडली. परंतु त्याच्या वयाच्या बहुतेक लोकांनी देवाच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांना यशःप्राप्ती घडली नाही; ते अरण्यातच मरण पावले.
धैर्य खचलेले विश्वासहीन लोक
४ चाळीस वर्षांपूर्वी इस्राएल राष्ट्र पहिल्यांदा जेव्हा कनानजवळ आले होते तेव्हा मोशेने या देशाची पाहणी करण्यासाठी १२ हेरांना पाठवले. त्यांपैकी दहा जण घाबरून माघारी आले. ते म्हणाले: तेथील “सर्व लोक मोठे धिप्पाड आहेत. तेथे नेफिलीम म्हणजे नेफिली घराण्यातील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले; त्यांच्यापुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळासारखे दिसलो.” पण, फक्त अनाकाचे लोकच नव्हे तर ‘सर्वच’ लोक धिप्पाड होते का? नाही. अनाकाचे लोक जलप्रलय येण्याआधी हयात असलेल्या नेफिलीम लोकांचे वंशज होते का? नाही. पण या अफवांमुळे इस्राएली लोकांच्या छावण्यांमध्ये भीतीची लाट पसरली. काही लोक तर, ते ज्या देशात गुलाम म्हणून होते त्या मिसर अर्थात ईजिप्त देशाला पुन्हा जायलाही तयार झाले!—गणना १३:३१–१४:४.
५ यहोशवा आणि कालेब हे दोन हेर मात्र वचनयुक्त देशात प्रवेश करण्यास उत्सुक होते. ते म्हणाले: कनानी लोक “आमचे भक्ष्य होतील. त्यांचा आधार तुटला आहे पण आमच्याबरोबर परमेश्वर आहे. त्यांची भीती बाळगू नका.” (गणना १४:९) यहोशवा आणि कालेब विनाकारण आशा बाळगत होते का? मुळीच नाही. इस्राएल राष्ट्रांतील इतर लोकांप्रमाणे त्यांनी देखील, यहोवाने दहा पीडांद्वारे शक्तिशाली ईजिप्त देश आणि त्यांच्या देवांची नालस्ती केली होती हे पाहिले होते. यहोवाने फारो आणि त्याच्या सैन्याचा लाल समुद्रात कसा नाश केला होता हे देखील त्यांनी पाहिले होते. (स्तोत्र १३६:१५) तेव्हा, ते दहा हेर आणि त्यांच्या अफवांवर विश्वास करणारे लोक जी भीती दाखवत होते ती रास्त नव्हती. या लोकांची ही मनोवृत्ती पाहून यहोवाला अतिशय वाईट वाटले; तो अगदी कळवळून म्हणाला: “कोठवर हे लोक मला तुच्छ लेखणार आणि ह्यांच्यामध्ये मी केलेली सगळी चिन्हे पाहूनहि हे कोठवर माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत?”—गणना १४:११.
६ यहोवाने या लोकांची मूळ समस्या काय होती ती दाखवून दिली. त्यांच्यात विश्वासाची कमी असल्यामुळे त्यांची भित्रट मनोवृत्ती झाली होती. होय, विश्वास आणि धैर्य या गुणांचा परस्परांशी जवळून संबंध आहे. इतका की, प्रेषित योहानाने ख्रिस्ती मंडळीविषयी आणि तिच्या कल्याणाविषयी असे लिहिले: “ज्याने जगावर जय मिळविला तो म्हणजे आपला विश्वास.” (१ योहान ५:४) आज, आबालवृद्ध, सशक्त आणि अशक्त असे साठ लाखांपेक्षा अधिक यहोवाचे साक्षीदार यहोशवा आणि कालेबसारखा विश्वास दाखवत असल्यामुळे राज्याच्या सुवार्तेचा प्रचार संपूर्ण जगभरात होत आहे. कोणताही शत्रू या शक्तिशाली, धैर्यवान सैन्याला रोखू शकलेला नाही!—रोमकर ८:३१.
‘माघार घेऊ’ नका
७ आज यहोवाचे सेवक धैर्याने सुवार्तेचा प्रचार करतात कारण त्यांची मनोवृत्ती प्रेषित पौलाप्रमाणेच आहे. प्रेषित पौलाने असे लिहिले: “ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही; तर जिवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहो.” (इब्री लोकांस १०:३९) पौलाने म्हटले, ‘माघार घेऊ’ नका. याचा अर्थ तात्पुरत्या काळासाठी गर्भगळीत होणे असा होत नाही; कारण देवाचे अनेक विश्वासू सेवक काही प्रसंगी भयभीत झाले होते. (१ शमुवेल २१:१२; १ राजे १९:१-४) तर त्याचा अर्थ, “मागे पडणे, दूर जाणे” “सत्यावरील आपली पकड ढीली” करणे, असा होतो, असे स्पष्टीकरण एका बायबल कोशात दिले आहे. या कोशात पुढे असेही म्हटले आहे, की ‘माघार घेणे’ हे एक रुपक असावे जे, देवाच्या सेवेत जणू काय “शिड खाली घेऊन जहाजाची गती कमी करणे” या अर्थावर आधारित असावे. अर्थात, भक्कम विश्वास असणाऱ्यांसमोर अडचणी जसे की छळ, आजारपण किंवा इतर परीक्षा येतात तेव्हा ते आपली “गती कमी” करण्याचा विचार देखील करत नाहीत. त्याऐवजी, ते यहोवाची सेवा करीत राहतात. त्यांना ही जाणीव असते की तो त्यांची काळजी घेतो आणि त्याला त्यांच्या मर्यादा माहीत आहेत. (स्तोत्र ५५:२२; १०३:१४) तुमचाही असाच भक्कम विश्वास आहे का?
८ आपला विश्वास कमी होत चालला आहे असे एकदा प्रेषितांना वाटल्यामुळे ते येशूला म्हणाले: “आमचा विश्वास वाढवा.” (लूक १७:५) त्यांनी देवाला केलेली प्रामाणिक विनंती खासकरून सा.यु. ३३ च्या पेंटेकॉस्टच्या दिवशी मान्य करण्यात आली जेव्हा शिष्यांवर पवित्र आत्मा ओतण्यात आला व त्यांना देवाच्या वचनाचे व उद्देशाचे आणखी गहन ज्ञान देण्यात आले. (योहान १४:२६; प्रेषितांची कृत्ये २:१-४) त्यांचा विश्वास अशाप्रकारे मजबूत करण्यात आल्यामुळे त्यांनी अगदी उत्साहाने प्रचार मोहीम सुरू केली. विरोध होत असूनही “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” सुवार्तेचा प्रचार करण्यात आला.—कलस्सैकर १:२३; प्रेषितांची कृत्ये १:८; २८:२२.
९ आपला विश्वास मजबूत करण्यासाठी आणि सेवेत पुढे जाण्यासाठी आपणही शास्त्रवचनांचा अभ्यास करून त्यावर मनन केले पाहिजे आणि पवित्र आत्मा मिळण्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. यहोशवा, कालेब आणि आरंभीच्या ख्रिस्ती शिष्यांनी केले त्याप्रमाणे आपणही देवाचे सत्य आपल्या मनावर आणि आपल्या हृदयावर बिंबवले पाहिजे. तरच आपल्यात असा विश्वास उत्पन्न होईल जो आपल्याला आपल्या आध्यात्मिक युद्धात टिकून राहून विजयी होण्याचे धैर्य देईल.—रोमकर १०:१७.
केवळ विश्वास असणे पुरेसे नाही
१० प्राचीन काळच्या देवाच्या एकनिष्ठ सेवकांच्या उदाहरणावरून दिसून येते, की जो विश्वास आपल्यात धैर्य व सहनशीलता उत्पन्न करतो त्यात केवळ देव अस्तित्वात आहे इतकाच विश्वास करणे समाविष्ट नाही. (याकोब २:१९) तर, आपण यहोवाला एक व्यक्ती म्हणून ओळखले पाहिजे आणि त्याच्यावर पूर्ण भरवसा ठेवला पाहिजे. (स्तोत्र ७८:५-८; नीतिसूत्रे ३:५, ६) त्याचा अर्थ, देवाच्या नियमांचे व तत्त्वांचे पालन करण्यातच आपले चिरकालिक कल्याण आहे, असा आपण विश्वास केला पाहिजे. (यशया ४८:१७, १८) आपल्यात विश्वास असेल तर आपण ही पूर्ण खात्री बाळगू की यहोवा आपली सर्व अभिवचने पूर्ण करील आणि “त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ” देईल.—इब्री लोकांस ११:१, ६; यशया ५५:११.
११ अशाप्रकारच्या विश्वासाची नेहमी वाढ होत राहते, ती खुंटत नाही. आपण शिकत असलेल्या सत्याचे जसजसे आपण पालन करीत राहतो, त्याच्या लाभांचा “अनुभव” घेतो, आपल्या प्रार्थना पूर्ण होताना ‘पाहतो’ आणि इतर मार्गांद्वारे आपल्या जीवनात यहोवाच्या मार्गदर्शनाची आपल्याला जाणीव होते, तसतसा हा विश्वास वाढत राहतो. (स्तोत्र ३४:८; १ योहान ५:१४, १५) यहोशवा आणि कालेबने देवाचा चांगुलपणा चाखून पाहिल्यामुळे त्यांचा विश्वास वाढला होता, असे आपण खात्रीने म्हणू शकतो. (यहोशवा २३:१४) या मुद्द्यांचा विचार करा: देवाने त्यांना वचन दिले त्याप्रमाणे ते ४० वर्षांच्या अरण्य प्रवासातून सुखरूप आले होते. (गणना १४:२७-३०; ३२:११, १२) कनानवर विजय मिळवण्यासाठी इस्राएलांना सहा वर्षांपर्यंत संघर्ष करावा लागला. पण सरतेशेवटी, त्यांना दीर्घायुष्य आणि चांगले आरोग्य लाभले; शिवाय प्रत्येकाला त्याचा वारसाहक्क देखील मिळाला. जे यहोवाची विश्वासूपणे व धैर्याने सेवा करतात त्यांना तो सढळ हाताने प्रतिफळ देतो!—यहोशवा १४:६, ९-१४; १९:४९, ५०; २४:२९.
१२ यहोशवा आणि कालेबवर यहोवाने दाखवलेल्या प्रेमळ-दयेवरून आपल्याला स्तोत्रकर्त्याच्या शब्दांची आठवण होते: “तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहे.” (स्तोत्र १३८:२) यहोवा जेव्हा एखाद्या अभिवचनाची हमी देण्याकरता आपल्या नावाचा उपयोग करतो तेव्हा त्या अभिवचनाच्या पूर्णतेची “थोरवी” वाढते; अर्थात आपल्या अपेक्षांपेक्षा कित्येक पटीने ते तो पूर्ण करतो. (इफिसकर ३:२०) होय, जे यहोवाच्या ठायी ‘आनंदित’ होतात त्यांना तो केव्हाही निराश करत नाही.—स्तोत्र ३७:३, ४.
टेहळणी बुरूज९३-HI ५/१५ २६-२९
क्या आप पूरे दिल से यहोवा की बात मानते हैं?
“नेक जन शेर की तरह बेखौफ रहता है।” (नीतिवचन २८:१) ऐसे लोग यहोवा पर विश्वास करते हैं, उसके वचन पर भरोसा रखते हैं और खतरनाक हालात में भी बेखौफ होकर यहोवा की सेवा करते रहते हैं।
ईसा पूर्व १५१३ में परमेश्वर ने अपने लोगों को मिस्र की गुलामी से आज़ाद किया। इसराएली अब सीनै नाम की जगह पहुँचे। यहाँ दो आदमियों ने दिखाया कि वे शेरों की तरह बेखौफ हैं। यही नहीं, उन्होंने यहोवा पर विश्वास दिखाया, जबकि बाकी इसराएलियों का विश्वास डगमगा गया था। इनमें से एक यहोशू था। वह एप्रैम के गोत्र से था और मूसा का मददगार था। यहोवा ने उसी को मूसा के बाद इसराएल का अगुवा ठहराया था। (निर्गमन ३३:११; गिनती १३:८, १६; व्यवस्थाविवरण ३४:९; यहोशू १:१, २) दूसरा आदमी कालेब था। वह यहूदा गोत्र से था और यपुन्ने का बेटा था।—गिनती १३:६; ३२:१२.
कालेब ने सारी ज़िंदगी यहोवा की सेवा की और उसका जोश कभी कम नहीं हुआ। इसलिए अपनी ज़िंदगी के आखिर में वह कह पाया कि “मैंने पूरे दिल से अपने परमेश्वर यहोवा की बात मानी” है। (यहोशू १४:८) किताब-ए-मुकद्दस में यह आयत इस तरह लिखी गयी है, “मैं रब अपने खुदा का वफादार रहा।” क्या आप भी कालेब की तरह पूरे दिल से यहोवा की बात मान रहे हैं?
मूसा ने जासूसों को भेजा
मान लीजिए, आप उन इसराएलियों में से एक हैं जिन्हें यहोवा ने मिस्र से छुड़ाया था। आइए देखें कि मूसा ने कैसे वही किया जो यहोवा ने कहा था। इस बात पर भी गौर कीजिए कि कालेब को यहोवा पर कितना भरोसा था कि वह अपने लोगों के साथ है।
इसराएल को मिस्र से निकले एक साल से ज़्यादा हो गया था। अब वह पारान के वीराने में कादेश-बरने नाम की जगह पर डेरा डाले हुए थे। यहाँ से वादा किया गया देश बहुत करीब था। यहोवा के कहने पर मूसा ने १२ इसराएली आदमियों को चुना कि वे कनान देश की जासूसी करने जाएँ। मूसा ने उनसे कहा, “तुम लोग इस रास्ते से नेगेब जाना और उसके बाद पहाड़ी प्रदेश में जाना। तुम देख आना कि देश कैसा है, वहाँ किस तरह के लोग रहते हैं, बहुत ताकतवर हैं या मामूली लोग, वहाँ की आबादी कितनी होगी, देश की हालत कैसी है, अच्छी है या बुरी, वहाँ किलेबंद शहर हैं या खुली बस्तियाँ। तुम यह भी देख आना कि वहाँ की ज़मीन कैसी है, उपजाऊ है या बंजर, वहाँ पेड़ हैं या नहीं। तुम लोग हिम्मत जुटाकर वहाँ से कुछ फल भी लेते आना।”—गिनती १३:१७-२०.
फिर वे १२ आदमी कनान देश के लिए रवाना हुए। उन्हें जो काम मिला था, वह खतरे से खाली नहीं था, क्योंकि उन्हें दुश्मनों के इलाके में जाकर जासूसी करनी थी। यह काम करने में उन्हें ४० दिन लग गए। हेब्रोन में उन्होंने देखा कि वहाँ के आदमी उनसे कहीं ज़्यादा लंबे-चौड़े हैं। फिर जब वे एशकोल घाटी गए, तो उन्होंने देखा कि वहाँ की ज़मीन बहुत उपजाऊ है। वे वहाँ से कुछ फल अपने साथ ले आए। अंगूरों का एक गुच्छा इतना बड़ा था कि उसे दो आदमियों को एक लंबे डंडे पर उठाकर लाना पड़ा।—गिनती १३:२१-२५.
वापस आकर उन्होंने मूसा को यह खबर दी, “तूने हमें जिस देश की जासूसी करने भेजा था, वहाँ सचमुच दूध और शहद की धाराएँ बहती हैं। ये देखो वहाँ के फल। मगर वहाँ के लोग बहुत ताकतवर हैं। उनके बड़े-बड़े शहर हैं जिनके चारों तरफ मज़बूत किलाबंदी है। हमने वहाँ अनाकी लोगों को भी देखा। और नेगेब में अमालेकी लोग रहते हैं और पहाड़ी प्रदेश में हित्ती, यबूसी और एमोरी बसे हुए हैं और समुंदर किनारे और यरदन नदी के पासवाले इलाकों में कनानी रहते हैं।” (गिनती १३:२६-२९) दस जासूस बुरी तरह डर गए थे। वे अब परमेश्वर की आज्ञा नहीं मानना चाहते थे और वादा किए गए देश में नहीं जाना चाहते थे।
“हमारे साथ यहोवा है”
कालेब उन दस जासूसों से बिलकुल अलग था। उसे अपने परमेश्वर यहोवा पर पूरा भरोसा था। इसलिए उसने हिम्मत दिखायी। उसने उन लोगों से कहा, “हम ज़रूर उस देश पर कब्ज़ा कर लेंगे, हम ज़रूर उसे जीत लेंगे। चलो हम फौरन जाकर उस पर हमला करते हैं।” मगर वे दस जासूस नहीं माने। वे कहने लगे, ‘कनानी लोग तो इसराएली से कहीं ज़्यादा ताकतवर हैं। हम तो उनके सामने टिड्डियाँ हैं, वे हमें मसलकर रख देंगे।’ सच में, वे कितने बुज़दिल थे और उनमें विश्वास की कमी थी।—गिनती १३:३०-३३.
कालेब और यहोशू ने लोगों का हौसला बढ़ाने के लिए उनसे कहा, “हमारे साथ यहोवा है। इसलिए तुम उनसे मत डरना।” उन लोगों ने उनकी एक नहीं सुनी। उलटा, वे उन्हें पत्थरों से मार डालने की बात करने लगे। पर यहोवा ने उन्हें रोक लिया। उसने उन बागियों को सज़ा सुनायी, “यपुन्ने के बेटे कालेब और नून के बेटे यहोशू को छोड़, तुममें से कोई भी उस देश में कदम नहीं रख पाएगा जिसके बारे में मैंने शपथ खाकर कहा था कि मैं तुम्हें वहाँ बसाऊँगा। मैं तुम्हारे बच्चों को, . . . उस देश में ले जाऊँगा और वे उस देश को देख पाएँगे जिसे तुमने ठुकरा दिया है। . . . और तुम्हारे बेटे ४० साल तक इसी वीराने में भेड़-बकरियों की चरवाही करेंगे . . . उन्हें तब तक यह सज़ा भुगतनी होगी जब तक कि तुममें से हर कोई इस वीराने में नहीं मर जाता। तुमने जितने दिन उस देश की जासूसी की थी उनमें से हर दिन के लिए एक साल के हिसाब से, यानी ४० दिन के लिए ४० साल तक तुम्हें अपने गुनाहों का लेखा देना होगा।”—गिनती १४:९, ३०-३४.
सालों बाद भी उनका विश्वास नहीं डगमगाया
उन ४० सालों के दौरान वे सभी इसराएली वीराने में मर गए जिन्होंने यहोवा पर विश्वास नहीं किया था। पर कालेब और यहोशू का विश्वास अटल रहा। मोआब के मैदान में मूसा और महायाजक एलिआज़र ने गिनती ली कि कितने आदमी २० साल के या उससे ऊपर हैं कि वे सेना में भरती किए जाएँ। फिर यहोवा ने हर गोत्र में से एक आदमी को चुना जो कनान देश की ज़मीन का बँटवारा करने में हाथ बँटाता। इनमें से एक कालेब था। यहोशू और एलिआज़र को भी चुना गया। (गिनती ३४:१७-२९) इस वक्त तक कालेब ७९ साल का हो चुका था। पर उसमें अब भी दमखम था और पहले की तरह वह दिलेर था और यहोवा का वफादार था।
दस जासूसों की घटना से पहले मूसा और हारून ने गिनती ली कि इसराएल में कितने सैनिक हैं। उन्हें पता चला कि ६,०३,५५० आदमी हैं। वीराने में ४० साल तक भटकने के बाद यह गिनती कम हो गयी। अब सिर्फ ६,०१,७३० आदमी रह गए। (गिनती १:४४-४६; २६:५१) लेकिन जाँबाज़ यहोशू अपने लोगों की अगुवाई कर रहा था और कालेब हर हाल में उसका साथ दे रहा था, दुश्मनों से लड़ने के लिए तैयार था। इसलिए वादा किए गए देश में उन्हें एक-के-बाद-एक कई युद्धों में जीत मिली। यहोशू ओर कालेब जानते थे कि उन्हें यह जीत यहोवा दे रहा है।
कालेब और यहोशू की उम्र काफी हो चुकी थी। फिर भी उन्होंने यरदन नदी पार की और बाकी सैनिकों के साथ मिलकर युद्ध लड़ा। उन्होंने छ: साल तक लड़ाइयाँ लड़ी। पर अब भी बहुत-से इलाके थे जिन पर कब्ज़ा करना बाकी था। यहोवा ने उनसे कहा कि वह बाकी इलाका भी उनके हाथ में कर देगा पर अभी वादा देश का इलाका चिट्ठियाँ डालकर इसराएल के अलग-अलग गोत्रों में बाँट दिया जाए।—यहोशू १३:१-७.
उसने पूरे दिल से यहोवा की बात मानी
इतने साल यहोवा के लिए युद्ध लड़ने के बाद, कालेब यहोशू से कहता है, “मैं ४० साल का था जब यहोवा के सेवक मूसा ने मुझे कादेश-बरने से इस देश की जासूसी करने भेजा और मैंने लौटकर देश के बारे में सही-सही खबर दी। हालाँकि मेरे साथ गए भाइयों ने अपनी खबर से लोगों के दिलों में खौफ बिठा दिया और उनके हौसले पस्त कर दिए, मगर मैंने पूरे दिल से अपने परमेश्वर यहोवा की बात मानी।” (यहोशू १४:६-८) सच में कालेब ने पूरे दिल से यहोवा की बात मानी। यहोवा ने उससे जैसा कहा वह वैसा ही करता रहा।
कालेब ने यह भी कहा, “उस वक्त मूसा ने मुझसे शपथ खाकर कहा था, ‘जिस ज़मीन पर तूने कदम रखा है, वह तेरे और तेरे बेटों के लिए हमेशा की विरासत बन जाएगी क्योंकि तूने पूरे दिल से मेरे परमेश्वर यहोवा की बात मानी।’ जब इसराएली वीराने में भटक रहे थे तब से लेकर आज तक, इन ४५ सालों में यहोवा ने मुझे सँभाले रखा, ठीक जैसे यहोवा ने मेरे बारे में मूसा से वादा किया था। देख, अब मैं ८५ साल का हो चला हूँ। आज भी मुझमें वही दमखम है जो उस वक्त था जब मूसा ने मुझे भेजा था। अब भी मुझमें इतनी ताकत है कि मैं युद्ध कर सकता हूँ और कई दूसरे काम कर सकता हूँ। इसलिए मुझे वह पहाड़ी प्रदेश दे दे जिसे देने का वादा यहोवा ने मुझसे उस दिन किया था। हालाँकि उस दिन तूने सुना था कि अनाकी लोग वहाँ किलेबंद शहरों में रहते हैं, मगर यहोवा मेरे साथ है और मैं उन्हें खदेड़ दूँगा, जैसा यहोवा ने वादा किया था।” कालेब ने हेब्रोन का पहाड़ी इलाका माँगा था। और उसे वह विरासत में दे दिया गया।—यहोशू १४:९-१५.
हेब्रोन के उस इलाके को जीतना बड़ा मुश्किल काम था, क्योंकि वहाँ के लोग काफी लंबे-चौड़े और ताकतवर थे। पर ८५ साल के योद्धा कालेब को यह काम इतना भी मुश्किल नहीं लगा। उसने दुश्मनों को खदेड़ दिया और वह इलाका अपने कब्ज़े में कर लिया। और कालेब के भतीजे ओत्नीएल ने हेब्रोन के पासवाले इलाके दबीर को जीत लिया। ओत्नीएल इस्राएल में एक न्यायी था। बाद में हेब्रोन और दबीर शहर लेवियों को दिए गए और हेब्रोन शरण-नगर बना, जहाँ अनजाने में खून करनेवाला व्यक्ति शरण ले सकता था।—यहोशू १५:१३-१९; २१:३, ११-१६; न्यायियों १:९-१५, २०.
हमेशा पूरे दिल से यहोवा की बात मानिए
कालेब और यहोशू हमारी तरह आम इंसान थे। फिर भी उन्होंने हमेशा वही किया जो यहोवा ने कहा। दूसरे इसराएलियों की गलती की वजह से उन्हें भी ४० साल वीराने में भटकना पड़ा और तरह-तरह की मुश्किलों का सामना करना पड़ा। पर उनका विश्वास नहीं डगमगाया। आज भी यहोवा के सेवक उसकी सेवा करना नहीं छोड़ते, फिर चाहे उन पर कितनी ही मुश्किलें आएँ। वे जानते हैं कि ये मुश्किलें शैतान लाता है, क्योंकि वह यहोवा से युद्ध लड़ रहा है। उन्होंने ठान लिया है कि वे हर हाल में यहोवा की बात मानेंगे। इस तरह वे इस युद्ध में अपने पिता का साथ देते रहेंगे।
जैसे, यहोवा के कई सेवकों ने प्रभु का संध्या भोज मनाने के लिए अपनी जान तक की परवाह नहीं की। (१ कुरिंथियों ११:२३-२६) ध्यान दीजिए कि दूसरे विश्व युद्ध के दौरान नात्ज़ी यातना शिविर में क्या हुआ। एक बहन बताती है,
“हम सबसे कहा गया कि हम स्मारक के दिन रात ११ बजे लौंड्री में इकट्ठा हो जाएँ। हम ठीक ११ बजे वहाँ पहुँच गए। हम कुल मिलाकर १०५ जन थे। हमने एक स्टूल को सफेद कपड़े से ढक दिया और उस पर रोटी और दाख-मदिरा रखी। फिर हम उसके चारों तरफ घेरा बनाकर खड़े हो गए। पूरे कमरे में सिर्फ एक मोम-बत्ती जल रही थी। हमने लाइट नहीं जलायी वरना हम पकड़े जाते। हम शुरू के मसीहियों की तरह महसूस कर रहे थे। ज़ुल्मों के वक्त उन्हें भी इसी तरह छिप-छिपकर अंधेरी जगहों में मिलना पड़ता था। वह एक बहुत खास सभा थी। उस मौके पर हमने पिता यहोवा से किया अपना वादा दोहराया। हमने उससे कहा कि हम उसके पवित्र नाम को बुलंद करने के लिए अपनी पूरी ताकत लगा देंगे। चाहे जो भी हो जाए, हम परमेश्वर की हुकूमत का ही साथ देंगे।”
जब हम पर ज़ुल्म होते हैं, तब हम पूरा भरोसा रख सकते हैं कि यहोवा हमें ताकत देगा। इसलिए हम हिम्मत से उसकी सेवा करते रह पाएँगे और उसके पवित्र नाम की महिमा करते रहेंगे। (फिलिप्पियों ४:१३) कालेब की अच्छी मिसाल याद रखने से हम हमेशा वही करेंगे जिससे यहोवा खुश हो। कालेब ने पूरे दिल से यहोवा की बात मानी। इस बात पर मनन करने से एक जवान भाई पर गहरा असर हुआ। उस भाई ने १९२१ में पूरे समय की सेवा शुरू की। उसने लिखा,
“इंग्लैंड में मेरे पास एक अच्छी नौकरी थी। मैं एक छपाई-खाने में काम करता था। पर मैं पायनियरिंग करना चाहता था। इसलिए मैंने वह नौकरी छोड़ दी और मुझे इस बात का कोई अफसोस नहीं हुआ। मैं जानता था कि मैंने जो भी किया है सही किया है, क्योंकि मैंने अपनी ज़िंदगी यहोवा को समर्पित की थी। मैंने कालेब के बारे में सोचा जो यहोशू के साथ वादा किए गए देश में गया। कालेब के बारे में बाइबल में लिखा है कि उसने ‘पूरे दिल से यहोवा की बात मानी।’ मैं भी कालेब की तरह बनना चाहता था। मैं जानता था कि अगर मैं पूरी तरह से यहोवा की सेवा करूँगा, तो मैं अपनी ज़िंदगी से संतुष्ट रहूँगा। मैं वह गुण बढ़ा पाऊँगा जो एक मसीही में होने चाहिए।”
कालेब को पूरे दिल से यहोवा की आज्ञा मानने की वजह से ढेरों आशीषें मिलीं। परमेश्वर के दूसरे सेवकों ने भी ऐसी ही खुशी और आशीषें पायी हैं। अगर आप भी पूरे दिल से यहोवा की बात मानते रहेंगे, तो यहोवा आपको भी ढेरों आशीषें देगा।
अध्याय १३
त्याने तर्काला न पटणाऱ्या सूचना पाळल्या
टेहळणी बुरूज१० ७/१ २० ¶४, तळटीप
आपण यशस्वी व्हावे अशी त्याची इच्छा आहे
देवाच्या प्रेरित वचनातून यहोशवाला धैर्य व शक्ती मिळणार होती. यहोवाने त्याला सांगितले: “माझा सेवक मोशे ह्याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ.” (वचन ७) त्यावेळी यहोशवाकडे संपूर्ण बायबल नव्हते तर बायबलमधील फक्त काहीच पुस्तके लिखित स्वरूपात होती. पण ही पुस्तके फक्त स्वतःजवळ बाळगल्याने त्याला यश मिळणार नव्हते. त्यांच्यापासून फायदा मिळवण्याकरता यहोशवाला दोन गोष्टी करायच्या होत्या.
[तळटीप]
यहोशवाजवळ जी प्रेरित लिखाणे होती त्यात कदाचित, मोशेने लिहिलेली पाच पुस्तके (उत्पत्ति, निर्गम, लेवीय, गणना आणि अनुवाद), ईयोबाचे पुस्तक आणि स्तोत्रसंहितेतील एक किंवा दोन स्तोत्रे होती.
आपलं नेतृत्व करणाऱ्या ख्रिस्तावर भरवसा ठेवा
५ इस्राएली लोकांनी यार्देन नदी ओलांडल्यानंतर यहोशवाला एक वेगळा अनुभव आला. यरीहो शहराजवळ हातात तलवार असलेला एक माणूस त्याला भेटला. यहोशवाने त्या माणसाला विचारलं: “तू आमच्या पक्षाचा की आमच्या वैऱ्यांच्या पक्षाचा?” जेव्हा त्या माणसाने म्हटलं, की तो “परमेश्वराचा सेनापती” आहे तेव्हा यहोशवाला खूप आश्चर्य झालं. तो एक स्वर्गदूत होता आणि देवाच्या लोकांच्या वतीने लढायला तयार होता. (यहोशवा ५:१३-१५ वाचा.) या वचनात सांगितलं आहे की यहोवा यहोशवाशी बोलला. पण खरंतर त्याच्याशी बोलायला देवाने एका स्वर्गदूताचा वापर केला होता. आणि असं दिसून येतं की आपल्या वतीने बोलण्यासाठी देवाने या स्वर्गदूताचा इतर वेळीही वापर केला.—निर्ग. ३:२-४; यहो. ४:१, १५; ५:२, ९; प्रे. कार्ये ७:३८; गलती. ३:१९.
६ यरीहो शहर जिंकण्यासाठी नक्की काय करण्याची गरज आहे याबद्दल त्या स्वर्गदूताने यहोशवाला सांगितलं. स्वर्गदूताने सुरुवातीला दिलेल्या काही सूचना कदाचित वेगळ्या वाटल्या असतील. उदाहरणार्थ, स्वर्गदूताने यहोशवाला सांगितलं की सर्व सैनिकांची सुंता केली जावी. याचा अर्थ आता त्यांना काही दिवस लढणं शक्य होणार नव्हतं. या सैनिकांची सुंता करण्याची खरंच ही योग्य वेळ होती का?—उत्प. ३४:२४, २५; यहो. ५:२, ८.
७ कदाचित त्या सैनिकांना वाटलं असेल, की ‘शत्रूंनी जर आमच्या छावणीवर हल्ला केला तर आम्ही आमच्या कुटुंबाचं कसं रक्षण करणार?’ पण काहीतरी अनपेक्षित घडलं! इस्राएली लोकांवर हल्ला करण्याऐवजी यरीहोची माणसं त्यांना घाबरू लागली. बायबल म्हणतं: “इस्राएल लोकांच्या भीतीमुळे यरीहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या; कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही.” (यहो. ६:१) या बातमीमुळे, देवाच्या मार्गदर्शनावर इस्राएली लोकांचा भरवसा नक्कीच वाढला असावा!
वाचकांचे प्रश्न
यरीहो शहर अगदी कमी कालावधीतच काबीज करण्यात आलं, याचा काही पुरावा आहे का?
▪ यहोशवा ६:१०-१५, २० मधील अहवाल सांगतो, की इस्राएली सैनिक दर दिवशी यरीहो शहराभोवती एक प्रदक्षिणा घालायचे. असं त्यांनी सहा दिवस केलं आणि सातव्या दिवशी मात्र त्यांनी शहराला सात प्रदक्षिणा घातल्या. मग देवानं यरीहो शहराची मजबूत तटबंदीची भिंत पाडली आणि इस्राएलांनी ते शहर काबीज केलं. मग बायबल सांगतं त्यानुसार, यरीहो शहराभोवती घालण्यात आलेला वेढा कमी अवधीचा होता हे सिद्ध करण्यासाठी पुरातत्व शास्त्रज्ञांकडे काही आधार आहे का?
प्राचीन काळात, शहराच्या भोवती वेढा देऊन ते काबीज करण्याची पद्धत अगदी सर्वसामान्य होती. हा वेढा जर जास्त काळासाठी असेल, तर शहरातील लोक साठवून ठेवलेलं अन्नधान्य वापरायचे. शेवटी जेव्हा शत्रू सैनिक त्या शहरावर चढाई करायचे, तेव्हा शहरातील इतर सर्व गोष्टींसोबत ते अन्नधान्यही लुटायचे. म्हणूनच, जेव्हा या पद्धतीनं नाश करण्यात आलेल्या पॅलेस्टाईनच्या शहरांचे अवशेष तपासण्यात आले, तेव्हा त्या ठिकाणी अन्नसाठा जवळजवळ संपल्याचं आढळून आलं. पण यरीहो शहराच्या बाबतीत मात्र असं नव्हतं. याविषयी सांगताना, बायबल इतिहासाचा पुरातत्व अहवाल देणारं एक पुस्तक (बिब्लिकल आर्किओलॉजी रिव्यू) म्हणतं, की “[यरीहोच्या] अवशेषांमध्ये, मातीच्या भांड्यांसोबत अतिशय मोठ्या प्रमाणात आढळलेली दुसरी गोष्ट म्हणजे धान्याचा साठा.” पुस्तक पुढे असं म्हणतं: “अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात धान्य सापडणं ही एक असामान्य गोष्ट आहे.”
बायबल म्हणतं, की इस्राएलांनी यरीहो शहरातील अन्नधान्य लुटलं नाही. कारण यहोवानं तशी आज्ञा त्यांना दिली होती. (यहो. ६:१७, १८) शिवाय, बायबल सांगतं, की इस्राएलांनी कापणीच्या हंगामानंतर, म्हणजे शहरात मोठ्या प्रमाणात धान्यसाठा असतो, तेव्हा यरीहोवर आक्रमण केलं. (यहो. ३:१५-१७; ५:१०) त्यामुळे यरीहो शहरात मोठ्या प्रमाणात मिळालेल्या धान्यावरून हे स्पष्ट होतं, की बायबलमध्ये सांगितल्यानुसार यरीहो शहराभोवती देण्यात आलेला वेढा अत्यंत कमी कालावधीचा होता.
देव तुम्हाला खरी व्यक्ती वाटते का?
उदाहरणार्थ, यरिहोचे पुनःबांधकाम केल्याने मिळणाऱ्या शिक्षेसंबंधाने असलेली भविष्यवाणी वाचा आणि मग तिची पूर्णता कधी झाली त्यावर विचार करा. यहोशवा ६:२६ म्हणते: “त्या समयी यहोशवाने असा शाप दिला की, ‘जो कोणी यरीहो नगर उभारण्यास प्रवृत्त होईल त्याला परमेश्वराचा शाप लागेल. त्याचा पाया घालताच त्याचा ज्येष्ठ पुत्र मरेल आणि त्याच्या वेशी उभारताच त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल.’” या भविष्यवाणीची पूर्णता सुमारे ५०० वर्षांनंतर झाली; कारण आपण १ राजे १६:३४ येथे असे वाचतो: “[राजा अहाबाच्या] कारकीर्दीत बेथेलकर हिएल याने यरीहो नगर पुनः वसविले. त्याने त्याचा पाया घातला तेव्हा त्याचा ज्येष्ठ पुत्र अबीराम मरण पावला; आणि त्याने त्याच्या वेशी उभारिल्या तेव्हा त्याचा कनिष्ट पुत्र सगूब मरण पावला, परमेश्वराने नूनाचा पुत्र यहोशवा याच्या द्वारे सांगितले होते त्याप्रमाणे हे झाले.” खरा देवच अशा प्रकारची भविष्यवाणी करण्यास प्रेरणा देऊन तिच्या पूर्णतेची खात्री करू शकत होता.
यहोशवाच्या स्मरणात राहिलेल्या गोष्टी
यहोवाने म्हटले: “माझा सेवक मोशे मृत्यु पावला आहे; तर आता ऊठ व ह्यांना अर्थात इस्राएल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू ह्या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा.” (यहोशवा १:२) यहोशवासमोर किती कठीण कामगिरी होती! त्याने ४० वर्षांपर्यंत मोशेचा सेवक म्हणून कार्य केले होते. आणि आज त्याला त्याच्या स्वामीची जागा घेण्यास आणि ताठ मानेच्या इस्राएल पुत्रांना प्रतिज्ञात देशात नेण्यास सांगण्यात आले होते.
यहोशवाने पुढच्या कार्याचा विचार केला असेल, तेव्हा कदाचित यापूर्वी त्याने तोंड दिलेले व मात केलेले सर्व परीक्षाप्रसंग भराभर त्याच्या डोळ्यासमोरून गेले असतील. यहोशवाच्या स्मरणात राहिलेल्या गोष्टी निश्चितच त्या वेळी त्याला सहायक ठरल्या असतील आणि आजही ख्रिश्चनांकरता त्या उपयोगी ठरू शकतात.
गुलामापासून सेनापतीपर्यंतचा प्रवास
गुलामीची अनेक वर्षे यहोशवाच्या स्मृतीपटलावर कोरलेली होती. (निर्गम १:१३, १४; २:२३) त्या काळादरम्यान यहोशवाला नेमके कोणते अनुभव आले असतील याची आपण केवळ कल्पना करू शकतो कारण बायबल या बाबतीत तपशील देत नाही. यहोशवाला ईजिप्तमधील गुलामीच्या वर्षांत उत्तम संयोजन करण्याचे प्रशिक्षण मिळाले असावे आणि कदाचित इब्री लोक व “मोठा मिश्र समुदाय” यांनी त्या देशातून पलायन केले तेव्हा यहोशवाने कदाचित त्यांना व्यवस्थित रितीने बाहेर पडण्यास साहाय्य केले असावे.—निर्गम १२:३८.
यहोशवा एफ्राइम वंशाच्या एका घराण्यातला होता. त्याचे आजोबा अलीशामा वंशाचे सरदार होते आणि इस्राएलच्या तीन वंशाच्या एका विभागातील १,०८,१०० शस्त्रधारी सैनिकांच्या पथकाचे प्रमुख होते. (गणना १:४, १०, १६; २:१८-२४; १ इतिहास ७:२०, २६, २७) तरीसुद्धा, ईजिप्तमधून निघाल्यावर लगेच अमालेकी लोकांनी इस्राएलवर आक्रमण केले तेव्हा त्यांचा प्रतिकार करण्यासाठी पुरुषांना संघटित करण्यासाठी मोशेने यहोशवाला नेमले. (निर्गम १७:८, ९अ) पण मोशेने यहोशवालाच का निवडले, त्याच्या आजोबांना किंवा वडिलांना त्याने हे कार्य का सोपवले नाही? एक शक्यता आहे: “तो एफ्राइमच्या महत्त्वपूर्ण वंशाचा प्रमुख होता आणि नियोजन कौशल्यांत निपुण असल्याची त्याने ख्याती मिळवली होती. तसेच लोकांना त्याच्यावर पूर्ण भरवसा होता. त्यामुळे, सैनिकांना निवडून त्यांना संघटित करण्याकरता सर्वात उत्तम नेता [यहोशवाच] ठरेल असा मोशेने निष्कर्ष काढला असेल.”
कारण यांपैकी कोणतेही असले तरीसुद्धा यहोशवाने, ही जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आल्यावर मोशेच्या आज्ञेनुसारच केले. इस्राएल राष्ट्राला युद्धाचा फारसा अनुभव नसतानाही, देव त्यांना मदत करेल याची यहोशवाला खात्री होती. “उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहीन,” असे मोशेने म्हटले तेव्हा यहोशवाने पुढे काहीच प्रश्न विचारले नाहीत. थोड्याच काळापूर्वी यहोवाने कशाप्रकारे त्या काळातल्या सर्वात शक्तिशाली लष्करी सैन्याचा सर्वनाश केला होता हे यहोशवाला आठवले असावे. दुसऱ्या दिवशी मोशेने सूर्यास्त होईपर्यंत आपले हात वर करून ठेवले तेव्हा शत्रू त्यांच्यावर वरचढ होऊ शकला नाही आणि अशारितीने अमालेकी लोकांचा पराभव झाला. मग यहोवाने मोशेला या घटनेविषयी एका पुस्तकात लिहून ठेवण्यास आणि देवाचा एक निर्णय ‘यहोशवाच्या कानी घालण्यास’ सांगितले; तो असा की “मी अमालेकाची आठवण पृथ्वीवरून अजिबात पुसून टाकीन.” (निर्गम १७:९ब-१४) होय, यहोवा ही दंडाज्ञा पूर्ण केल्याशिवाय राहणार नव्हता.
मोशेच्या सेवकाच्या भूमिकेत
अमालेकच्या या घटनेमुळे यहोशवा आणि मोशे यांच्यात नक्कीच पूर्वीपेक्षा अधिक जवळीक निर्माण झाली असेल. यहोशवाला आपल्या “तरुणपणापासून” मोशेचा मृत्यू होईपर्यंत, म्हणजे जवळजवळ ४० वर्षे मोशेचा वैयक्तिक मदतनीस अथवा “सेवक” होण्याचा बहुमान मिळाला.—गणना ११:२८.
या पदावर राहण्यात अनेक विशेषाधिकार व जबाबदाऱ्या अंतर्भूत होत्या. उदाहरणार्थ, मोशे, अहरोन, अहरोनाचे पुत्र आणि इस्राएलचे ७० वडीलधारी पुरूष सिनाय पर्वतावर चढून गेले व त्यांना यहोवाच्या तेजाचे दर्शन घडले तेव्हा यहोशवा देखील त्यांच्यापैकी एक असावा. मोशेचा सेवक या नात्याने यहोशवा मोशेसोबत पर्वतावर अधिक वरपर्यंत चढून गेला आणि जेव्हा यहोवाच्या तेजाच्या मेघात मोशेने प्रवेश केला तेव्हा काही अंतरावर यहोशवा त्याच्याकरता थांबून राहिला असावा असे दिसते. विशेष म्हणजे, यहोशवाला चाळीस दिवस व चाळीस रात्री त्या डोंगरावर थांबावे लागले असेल. पण तो विश्वासूपणे आपल्या स्वामीची वाट पाहात राहिला असे दिसते, कारण मोशे जेव्हा साक्षपटाच्या पाट्या घेऊन उतरू लागला तेव्हा त्याला भेटण्याकरता यहोशवा तेथे होता.—निर्गम २४:१, २, ९-१८; ३२:१५-१७.
इस्राएलने सोनेरी वासराची मूर्तिपूजा केल्याच्या घटनेनंतर यहोशवा दर्शनमंडपात छावणीच्या बाहेर मोशेची सेवा करत राहिला. तेथे यहोवा मोशेशी अमोरासमोर बोलत असे. पण मोशे छावणीत परतल्यावरही यहोशवा “मंडप सोडून बाहेर येत नसे.” कदाचित, इस्राएल लोकांनी अशुद्ध असताना त्या मंडपात प्रवेश करू नये म्हणून यहोशवाला तेथे थांबावे लागत असेल. पण ती जबाबदारी देखील यहोशवाने किती गांभीर्याने घेतली!—निर्गम ३३:७, ११.
इतिहासकार जोसीफस याच्या मते मोशे यहोशवापेक्षा ३५ वर्षांनी मोठा होता, त्यामुळे मोशेच्या सहवासाने निश्चितच यहोशवाचा विश्वास अतिशय बळावला असेल. त्यांच्यातील नात्याला “प्रौढता आणि तारुण्य, गुरू आणि शिष्य यांच्यातील बंधन” म्हणण्यात आले आहे, ज्यामुळे यहोशवा “एक दृढ संकल्पी आणि विश्वासार्ह पुरुष” बनू शकला. आज आपल्यामध्ये मोशेसारखे संदेष्टे नाहीत पण यहोवाच्या लोकांच्या मंडळ्यांमध्ये अनेक वडीलधारी जन आहेत; त्यांच्या अनुभवामुळे व आध्यात्मिक वृत्तीमुळे त्यांच्याकडून सर्वांना बळ आणि प्रोत्साहन मिळू शकते. तुम्हाला त्यांच्याविषयी कदर वाटते का? त्यांच्या सहवासापासून तुम्ही फायदा करून घेत आहात का?
कनानमध्ये एक हेर
इस्राएल राष्ट्राला नियमशास्त्र मिळाल्यानंतर काही काळातच यहोशवाच्या जीवनात एक महत्त्वाची घटना घडली. प्रतिज्ञात देशाची माहिती काढून आणण्याकरता आपल्या वंशाचे प्रतिनिधीत्व करण्याकरता त्याला निवडण्यात आले. ही गोष्ट सर्वांच्या परिचयाची आहे. एकूण १२ हेर पाठवण्यात आले होते आणि त्या सर्वांनी सांगितले की यहोवाने प्रतिज्ञा केल्यानुसारच त्या देशात “दुधामधाचे प्रवाह” वाहत आहेत. पण दहा हेरांनी यहोवावर विश्वास दाखवला नाही आणि प्रतिज्ञात देशाच्या रहिवाशांच्या हातून तो देश इस्राएलांना घेता येणार नाही अशी भीती व्यक्त केली. फक्त यहोशवा आणि कालेब यांनी लोकांना घाबरून जाऊन बंड न करण्याची विनंती केली कारण यहोवा नक्कीच त्यांच्या पाठीशी राहील असा त्यांना विश्वास होता. त्यांनी असे म्हणताच सर्व मंडळी त्यांच्या विरोधात ओरड करू लागली आणि त्या दोघांना दगडमार करण्याची भाषा करू लागली. त्याच क्षणाला यहोवाने आपले तेज प्रकट केले नसते तर कदाचित त्यांनी खरच त्यांना दगडमार केला असता. त्यांच्या अल्पविश्वासामुळे यहोवाने त्यांच्याविरुद्ध असा दंड घोषित केला की इस्राएल राष्ट्रात गणना झालेल्यांपैकी २० वर्षे व त्याहून अधिक वयाचे कनान देशात प्रवेश करेपर्यंत जिवंत राहणार नाहीत. या लोकांपैकी फक्त यहोशवा, कालेब व लेवीय जिवंत राहिले.—गणना १३:१-१६, २५-२९; १४:६-१०, २६-३०.
सर्वच लोकांनी ईजिप्तमध्ये यहोवाची महत्कृत्ये पाहिली नव्हती का? मग बहुतेक लोकांनी देवाच्या मदतीवर शंका घेतली असताना यहोशवाला देवावर पूर्ण विश्वास बाळगणे का शक्य झाले? निश्चितच यहोशवाने यहोवाची सर्व वचने आणि ती त्याने कशी पूर्ण केली हे नेहमी डोळ्यापुढे ठेवले असेल, त्यावर मनन केले असेल. कित्येक वर्षांनंतरही तो म्हणू शकला की “देव परमेश्वर ह्याने तुमच्याबाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही. . . . त्या सर्व सिद्धीस गेल्या.” (यहोशवा २३:१४) यावरून यहोशवाला विश्वास होता की भविष्याबद्दलही यहोवाने ज्या सर्व प्रतिज्ञा केल्या होत्या त्या देखील अवश्य पूर्ण होतील. (इब्री लोकांस ११:६) आपण सर्वांनी स्वतःला विचारले पाहिजे: ‘माझ्याबद्दल काय? यहोवाच्या प्रतिज्ञांविषयी अभ्यास करण्यासाठी व त्यांवर मनन करण्यासाठी मी जो वेळ व शक्ती खर्च केली आहे त्यावरून त्या पूर्णपणे विश्वासार्ह असल्याची मला खात्री पटली आहे का? येणाऱ्या महासंकटातून देव त्याच्या लोकांसहित माझेही संरक्षण करू शकतो याविषयी मला विश्वास वाटतो का?’
यहोशवाने केवळ विश्वासच बाळगला नाही तर त्याने असाधारण मनोधैर्य प्रकट केले. सर्व मंडळी त्यांना दगडमार करण्याची मागणी करत असताना केवळ तो व कालेब एका बाजूला होते. अशा परिस्थितीत तुम्हाला कसे वाटले असते? भीती वाटली असती का? यहोशवा घाबरणाऱ्यांपैकी नव्हता. त्याने व कालेबने आपल्याला काय वाटते हे स्पष्टपणे बोलून दाखवले. यहोवाला निष्ठावान राहण्याकरता असेच करण्याची आज न उद्या आपल्यावरही पाळी येऊ शकते.
हेरांच्या या अहवालातून आपल्याला आणखी एक माहिती मिळते ती अशी की यहोशवाचे नाव बदलण्यात आले होते. त्याचे मूळ नाव होशा होते व त्याचा अर्थ “तारण” असा होतो. मोशेने त्याच्या नावात देवाच्या नावाकरता वापरली जाणारी अक्षरे जोडली आणि त्याला यहोशवा म्हणजे “यहोवा तारण आहे” असे नाव दिले. सेप्टुअजिंट भाषांतरात त्याचे नाव “येशू” देण्यात आले आहे. (गणना १३:८, १६) या महान नावाप्रमाणेच यहोशवाने धैर्याने घोषित केले की यहोवाच तारण करतो. यहोशवाचे नाव काही उगाच बदलण्यात आले नसावे. त्यावरून दिसून येते की यहोशवाच्या व्यक्तिमत्त्वाविषयी मोशेच्या मनात किती आदर होता; शिवाय हे नवे नाव भविष्यात इस्राएलच्या नव्या पिढीला प्रतिज्ञात देशात नेणाऱ्या यहोशवाच्या विशेष भूमिकेला अगदी अनुरूप होते.
चाळीस कष्टप्रद वर्षे अरण्यात भटकताना इस्राएलचे वडीलधारी पुरुष एकामागोमाग एक मरण पावले. त्यादरम्यान यहोशवाविषयी आपल्याला काहीच माहिती देण्यात आलेली नाही. पण निश्चितच या अनुभवाने त्याला बरेच काही शिकवले असेल. कोरह, दाथान व अबीराम आणि त्यांचे साथीदार तसेच बआलपौराच्या घृणित उपासनेत सहभागी झालेल्यांवर आलेला न्यायदंड कदाचित त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला असेल. तसेच मरीबाच्या पाण्याच्या घटनेत यहोवाला महिमा न दिल्यामुळे मोशे देखील प्रतिज्ञात देशात प्रवेश करू शकणार नाही हे कळल्यावर यहोशवाला अत्यंत दुःख झाले असेल यात शंका नाही.—गणना १६:१-५०; २०:९-१३; २५:१-९.
मोशेचा नियुक्त उत्तराधिकारी
मोशेचा अंतकाळ समीप येऊ लागला तेव्हा त्याने देवाला त्याच्या उत्तराधिकाऱ्यास नेमण्याची विनंती केली जेणेकरून इस्राएल राष्ट्र “मेंढपाळ नसलेल्या शेरडांमेंढरांप्रमाणे होणार नाही.” यहोवाने कोणाला निवडले? यहोशवाला, कारण “त्याच्या ठायी माझा आत्मा वसत आहे” असे यहोवाने म्हटले. त्याला सबंध मंडळीसमोर अधिकारारूढ करण्याची देवाने आज्ञा दिली. सर्व मंडळीने त्याचे मानावे असेही देवाने सांगितले. स्वतः देवाने त्याची शिफारस केली! यहोवाने यहोशवाचा विश्वास व त्याचा कर्तबगारपणा पाहिला होता. इस्राएलच्या नेतृत्वाची जबाबदारी पेलण्यास तोच सर्वात योग्य होता. (गणना २७:१५-२०) पण या कामात यहोशवाला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार असल्याचे मोशेला ठाऊक होते. म्हणूनच त्याने आपल्या या उत्तराधिकाऱ्यास “खंबीर हो, हिंमत धर” असे प्रोत्साहन दिले व यहोवा सतत तुझ्या पाठीशी राहील असे त्याला आश्वासन दिले.—अनुवाद ३१:७, ८.
स्वतः देवाने देखील यहोशवाला हेच आश्वासन दिले आणि पुढे म्हटले: “माझा सेवक मोशे ह्याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ; ते सोडून उजवीडावीकडे वळू नको, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे; त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशःप्राप्ति घडेल. मी तुला आज्ञा केली आहे ना? खंबीर हो, हिंमत धर, घाबरू नको, कचरू नको; कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.”—यहोशवा १:७-९.
यहोवाचे शब्द कानात घुमत असताना आणि पदरी अनुभव असताना यहोशवाला शंका वाटण्याचे कारणच नव्हते. प्रतिज्ञात देशावर त्यांचा विजय निश्चित होता. अर्थात, अडचणी येणार होत्या आणि त्यातली पहिली, म्हणजे ओसंडून वाहणारी यार्देन नदी पार करण्याचे आव्हान काही कमी जिकरीचे नव्हते. पण यहोवाने स्वतः आज्ञा दिली होती: ‘उठ व ही यार्देन ओलांडून जा.’ मग कसली अडचण?—यहोशवा १:२.
यहोशवाच्या जीवनातील पुढील घटना—यरीहो शहरावर विजय, शत्रूंवर क्रमाक्रमाने वर्चस्व आणि देशाची विभागणी इत्यादी घडत असताना त्याने कधीही देवाच्या प्रतिज्ञा नजरेआड होऊ दिल्या नाहीत असे दिसून येते. आपल्या जीवनाच्या शेवटास यहोवाने इस्राएल राष्ट्राला त्यांच्या शत्रूंपासून विसावा दिला तेव्हा यहोशवाने त्यांना एकत्रित केले आणि देवाच्या आजवरच्या सर्व कार्यांची त्यांना आठवण करून दिली व त्याची मनोभावे सेवा करण्याचे त्यांना प्रोत्साहन दिले. परिणामस्वरूप, इस्राएलने यहोवासोबत केलेल्या कराराची पुनरुक्ती केली आणि आपल्या नेत्याच्या आदर्शातून प्रेरणा मिळाल्यामुळेच की काय, ‘यहोशवाच्या हयातीत इस्राएल लोकांनी परमेश्वराची सेवा केली.’—यहोशवा २४:१६, ३१.
यहोशवाचे आपल्याकरता एक उत्तम उदाहरण आहे. आज ख्रिस्ती लोकांना विश्वासाच्या अनेक परीक्षांना तोंड द्यावे लागते. या परीक्षांना यशस्वीपणे तोंड देणे महत्त्वाचे आहे कारण असे केले तरच आपल्याला यहोवाची संमती मिळेल आणि शेवटी आपण त्याच्या प्रतिज्ञांची पूर्ती अनुभवू शकू. यहोशवाच्या दृढ विश्वासामुळेच त्याला यश मिळाले. आपण यहोशवाप्रमाणे देवाची महत्कृत्ये डोळ्यांनी पाहिलेली नाहीत हे कबूल आहे पण जर कोणाला शंका असेल तर यहोशवा नावाच्या बायबलमधील पुस्तकात यहोवाच्या अभिवचनांच्या विश्वसनीयतेची एका प्रत्यक्ष साक्षीदाराने दिलेली हमी आहे. यहोशवाप्रमाणे आपणही देवाचे वचन रोज वाचले आणि काळजीपूर्वक त्याचे पालन केले तर आपण अवश्य बुद्धीने कार्य करू व यशस्वी होऊ.
कधीकधी तुम्हाला सहख्रिस्ती बांधवांच्या वागण्यामुळे वाईट वाटते का? यहोशवाच्या धीराची आठवण करा. स्वतःची काहीही चूक नसताना त्याला आपल्या अविश्वासू साथीदारांसोबत अकारण ४० वर्षे अरण्यात भटकावे लागले. कधीकधी तुम्हाला आपल्या मताचे समर्थन करणे कठीण जाते का? यहोशवाने व कालेबने काय केले याची आठवण करा. त्यांच्या विश्वासाचे व आज्ञाधारकतेचे त्यांना उत्तम प्रतिफळ मिळाले. होय यहोशवाला खरोखरच विश्वास होता की यहोवा त्याच्या सर्व प्रतिज्ञा अवश्य पूर्ण करेल. हेच आपल्याबाबतीतही घडो.—यहोशवा २३:१४.
बायबलमधल्या व्यक्तींचं वेबसाईटवरचं कार्ड
यहोशवा
बायबल कार्ड १
जमा करा आणि शिका
यहोशवा
तो कोण होता? नूनचा मुलगा. त्याने मोशेला मदत केली आणि पुढे त्याला इस्राएलचं नेतृत्व करण्यासाठी नियुक्त करण्यात आलं. (निर्गम ३३:११; अनुवाद ३४:९; यहोशवा १:१, २) यहोशवा देवाच्या लोकांना धैर्याने वचन दिलेल्या देशात घेऊन गेला. त्याने यहोवाच्या अभिवचनांवर भरवसा ठेवला, त्याच्या मार्गदर्शनाचं पालन केलं आणि विश्वासूपणे त्याची सेवा केली.
प्रश्न
१. यहोशवा आणि त्याच्या सैन्याने यरीहोच्या भिंती कशा पाडल्या?
२. यहोशवाचं हे वाक्य पूर्ण करा: “मी आणि माझं कुटुंब तर . . . ”
३. यहोशवाला आणखी कोणत्या नावाने ओळखलं जायचं?
उत्तरं
१. देवाने सांगितलं होतं, त्याप्रमाणे त्यांनी शहराभोवती फेऱ्या मारल्या.—यहोशवा ६:१-२७.
२. “. . . यहोवाचीच उपासना करणार.” —यहोशवा २४:१५.
३. होशे.—गणना १३:८.
[रूपरेषा]
इ.स.पू. ४०२६ आदामला बनवण्यात आलं
सुमारे इ.स.पू. १५०० च्या काळात जगला होता
इ.स. १
इ.स. ९८ मध्ये बायबलचं शेवटचं पुस्तक लिहिण्यात आलं
[नकाशा]
इजिप्तमधून वचन दिलेल्या देशात गेले
इजिप्त
वचन दिलेला देश
अध्याय १४
तिने आपल्या लोकांऐवजी यहोवाची बाजू घेतली
टेहळणी बुरूज१३ ११/१ १२ ¶४–१३ ¶१
तिला ‘कार्यांद्वारे नीतिमान ठरवण्यात आलं’
राहाब एक वेश्या होती. ही गोष्ट पूर्वीच्या काही बायबल भाष्यकारांना खूपच खटकत होती. त्यामुळे त्यांनी असा दावा केलाय की ती एक धर्मशाळा चालवणारी स्त्री होती. पण बायबल अगदी स्पष्ट आहे. ते वस्तुस्थिती लपवत नाही. (यहोशवा २:१; इब्री लोकांना ११:३१; याकोब २:२५) त्या वेळी कनानच्या समाजात राहाबच्या या व्यवसायाकडे कदाचित आदराने पाहिलं जात असावं. असं असलं, तरी राहाबचा विवेक तिला बोचत असावा. कारण यहोवाने बऱ्यावाइटाचा फरक ओळखण्याची जाणीव सगळ्यांनाच दिली आहे. (रोमकर २:१४, १५) कदाचित या जाणिवेमुळेच राहाबच्या लक्षात आलं असेल, की आपली जीवनशैली खूपच खालच्या थराची आहे. आज अशा प्रकारचं जीवन जगणाऱ्या बऱ्याच जणांना वाटतं त्याप्रमाणे तिलाही आपण अडकून गेल्यासारखं वाटत असेल. आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी आपल्याजवळ दुसरा कोणाताच पर्याय नाही असं तिला वाटलं असेल.
त्यामुळे राहाबला नक्कीच एक चांगलं जीवन जगायची खूप इच्छा असेल. तिच्या देशात हिंसा आणि अनैतिक कामं करणारे लोक भरले होते. ते जवळच्या नातेवाइकांशी आणि प्राण्यांशीसुद्धा लैंगिक संबध ठेवायचे. (लेवीय १८:३, ६, २१-२४) अशा प्रकारच्या घाणेरड्या गोष्टींचा त्यांच्या धर्माशी संबंध होता. त्यांच्या मंदिरांत एक प्रथा म्हणून वेश्या व्यवसायाला बढावा दिला जायचा. तसंच, बआल आणि मोलेखसारख्या सैतानी देवांना लहान मुलांचा, जिवंत जाळून बळी दिला जायचा.
कनानमध्ये जे चाललं होतं, ते यहोवाच्या नजरेतून सुटलं नाही. म्हणूनच कनानमध्ये ज्या भयंकर गोष्टी होत होत्या त्यांबद्दल यहोवाने म्हटलं: “तो देश अशुद्ध झाला आहे आणि मी त्याच्या पापांबद्दल त्याला शिक्षा देईन आणि तो देश आपल्या रहिवाशांना ओकून टाकेल.” (लेवीय १८:२५) यहोवा त्यांना ‘त्यांच्या पापांबद्दल शिक्षा देणार होता’ म्हणजे काय करणार होता? यहोवाने इस्राएली लोकांना असं अभिवचन दिलं होतं: “तुमचा देव यहोवा या राष्ट्रांना हळूहळू तुमच्यासमोरून घालवून देईल.” (अनुवाद ७:२२) तसंच, बऱ्याच शतकांआधी यहोवाने अब्राहामच्या कुटुंबाला तो देश द्यायचं अभिवचन दिलं होतं आणि आपल्याला माहीत आहे, की यहोवा “कधीही खोटं बोलू शकत नाही.”—तीत १:२; उत्पत्ती १२:७.
यहोवाने इस्राएली लोकांना अशीही आज्ञा दिली होती की त्यांनी कनानमधल्या काही गटांचा तर पूर्णपणे नाश करावा. (अनुवाद ७:१, २) “सगळ्या पृथ्वीचा” नीतिमान “न्यायाधीश” या नात्याने यहोवाने त्यांची मनं पाहिली होती. दुष्टपणा आणि अश्लीलता त्यांच्या मनात किती खोलवर रुजली होती हे त्याने पाहिलं होतं. (उत्पत्ती १८:२५; १ इतिहास २८:९) मग लवकरच नाश होणाऱ्या अशा शहरात राहत असताना राहाबला कसं वाटलं असेल? इस्राएलबद्दलच्या बातम्या तिच्या कानावर पडत असतील तेव्हा तिला कसं वाटलं असेल याची कल्पना आपण करू शकतो. एकेकाळी इस्राएल हे दैयनीय अवस्थेत असलेल्या गुलामांचं राष्ट्र होतं. पण त्या वेळच्या सगळ्यात शक्तिशाली असलेल्या इजिप्तवर यहोवाने त्यांच्या या लोकांना जबरदस्त विजय मिळवून दिला होता. ही बातमी कदाचित राहाबने ऐकली असेल आणि आता इस्राएली लोक यरीहो शहरावर हल्ला करणार होते! पण असं असूनसुद्धा तिथले लोक आपली दुष्ट कामं करतच राहिले. म्हणूनच बायबल त्यांना ‘आज्ञा न मानणारे लोक’ असं म्हणतं.—इब्री लोकांना ११:३१.
इन्साइट “वेश्या” ¶१६
वेश्या
राहाब. राहाब एक अशी वेश्या होती जिने देवावर विश्वास असल्याचं दाखवलं आणि त्यामुळे तिला नीतिमान ठरवण्यात आलं. (याक २:२५) यरीहो शहराची पाहणी करायला यहोशवाने पाठवलेली माणसं राहाबच्या घरी राहिली. (यहो २:१) पण ती माणसं अनैतिक काम करायच्या हेतूने तिथे गेली असतील असं म्हणणं योग्य ठरणार नाही. त्यांच्या हेतूबद्ददल प्राध्यापक सी. एफ. केईल आणि एफ. डेलिझ, कमेंट्री ऑन ओल्ड टेस्टमेंट या पुस्तकात असं म्हणतात: “अशा व्यक्तीच्या घरी गेल्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल शंका येणार नव्हती. शिवाय, तिचं घरं शहराच्या भिंतीला लागून किंवा भिंतीवर असल्यामुळे तिथून पळ काढणं या हेरांना खूप सोपं जाणार होतं. प्रभूने या हेरांचं अगदी योग्यपणे मार्गदर्शन केलं होतं. त्यामुळे ते अशा व्यक्तीकडे गेले जी पापी असली, तरी त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी अगदी योग्य होती. शिवाय, यहोवाने इस्राएली लोकांसाठी जे चमत्कार केले होते त्यांबद्दल तिने ऐकलं होतं आणि त्याचा जबरदस्त प्रभाव तिच्या मनावर झाला होता. त्यामुळे कनानी लोक किती घाबरले आहेत हे तिने घरी आलेल्या हेरांना सांगितलं. इतकंच नाही, तर इस्राएलच्या सामर्थ्यशाली देवावर पूर्ण भरवसा ठेवून तिने स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि चौकशी करायला आलेल्या तिच्या शहरातल्या लोकांपासून या हेरांना लपवलं.” (१९७३, खडं २, यहोशवा, पृ. ३४) कनानी लोकांच्या अनैतिक कामांमुळे यहोवाने इस्राएली लोकांना त्यांना देशातून हाकलून द्यायला सांगितलं होतं. तसंच, देवाने इस्राएली लोकांना यरीहो शहरावर विजय मिळवून दिला तेव्हा राहाबलासुद्धा वाचवलं. या दोन गोष्टींचा विचार केला तर ते हेर अनैतिक काम करायच्या हेतूने राहाबच्या घरी गेले होते, किंवा राहाबने नंतरही आपला वेश्याव्यवसाय चालू ठेवला असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं ठरेल.—लेवी १८:२४-३०.
इन्साइट “जवस” ¶२-४
जवस
जवसाची लागवड अगदी प्राचीन काळापासून केली जात आहे. आणि आजच्यासारखंच त्या काळातसुद्धा त्याच्या तंतूंपासून (फायबर) लीननचं कापड तयार केलं जायचं. जवसाची वनस्पती साधारण १ ते ४ फूट उंच वाढते. त्याच्या कोवळ्या लांब देठांना फिकट हिरव्या रंगाची लांबसडक रेखीव पानं असतात. तसंच, अगदी वरच्या भागात त्याला फांद्या फुटतात आणि प्रत्येक फांदीला गडद किंवा फिकट निळ्या (आणि क्वचित पांढऱ्या) रंगाची पाच पाकळ्यांची फुलं असतात.—चित्र, खंड १, पृ. ५४४.
जवसाला (अळशीला) कळ्या फुटतात तेव्हा ते कापणीसाठी तयार असतं. (निर्ग ९:३१) मग जवसाच्या पिकाची हाताने उपटून किंवा फावड्याने कापणी केली जाते आणि ते सुकवण्यासाठी ठेवलं जातं. यरीहो शहरातल्या राहाबच्या घराच्या छतावर कदाचित यासाठीच जवसाची ताटं पसरवून ठेवली असतील.—यहो २:६.
त्या काळात जवसाच्या ताटांवर कशा प्रकारे प्रक्रिया केली जायची याचं पहिल्या शतकातल्या प्लायनी (मोठा) याने नॅचरल हिस्ट्री (XIX, III, १७, १८) या पुस्तकात वर्णन केलंय. तसंच, इजिप्तमधल्या बेनी हसन या ठिकाणीसुद्धा या प्रक्रियेचं चित्रांच्या रूपात वर्णन केलंय. हिब्रू लोक कदाचित याच पद्धतीने जवसाच्या ताटांवर प्रक्रिया करायचे. त्यांतल्या बिया काढल्यानंतर ती पूर्णपणे पाण्यात बुडवली जायची आणि ती वर तरंगू नयेत म्हणून त्यांवर दगड ठेवले जायचे. पाण्यात भिजल्यामुळे तंतू मोकळे व्हायचे आणि बाकीचा भाग कुजून जायचा. देठांच्या बाहेरचा भाग सुट्टा झाल्यानंतर ती ताटं पाण्याबाहेर काढली जायची आणि ती पूर्णपणे वाळवण्यासाठी उन्हात ठेवून उलटी-पालटी केली जायची. मग ही ताटं दगडाच्या पाट्यांवर ठेवून सोट्याने बडवली जायची आणि मग वेगळ्या झालेल्या तंतूंना कंगव्यासारख्या साधनाने विंचरून सरळ केलं जायचं. वरच्या बाजूला असलेल्या हलक्या दर्जाच्या तंतूंचा वापर बत्तीच्या वातीसाठी केला जायचा. (यश ४२:३; ४३:१७; मत्त १२:२० पाहा) तर आतल्या बाजूला असलेल्या पांढऱ्या आणि चांगल्या दर्जाच्या तंतूंना एका दगडावर ठेवून बडवलं जायचं आणि अशा प्रकारे चमकदार बनलेल्या तंतूचा सुताच्या तागासाठी वापर केला जायचा.
यहोशवाच्या पुस्तकातील ठळक मुद्दे
२:४, ५—हेरांचा पिच्छा करत आलेल्या राजाच्या लोकांना राहाब चुकीची माहिती का देते? राहाब आपला जीव धोक्यात घालून हेरांना वाचवते कारण तिचा यहोवावर विश्वास बसला आहे. त्यामुळे, देवाच्या लोकांची हानी करू पाहणाऱ्या लोकांना, हेरांची माहिती देण्यात ती बाध्य नाही. (मत्तय ७:६; २१:२३-२७; योहान ७:३-१०) वास्तविक पाहता, राहाबला ‘तिच्या क्रियांमुळे’ आणि राजाच्या प्रतिनिधींची दिशाभूल करण्याच्या कृत्यामुळे देखील ‘नीतिमान ठरवण्यात आले.’—याकोब २:२४-२६.
अंत येईल तेव्हा तुम्ही कोठे असले पाहिजे?
यहोवा सध्याच्या दुष्ट जगाचा हर्मगिदोनात अंत करेल तेव्हा नीतिमान लोकांचे काय होईल? नीतिसूत्रे २:२१, २२ याचे उत्तर देते: “सरळ जनच देशात [“पृथ्वीवर,” NW] वस्ती करितील; सात्विक जन त्यात राहतील. दुर्जनांचा देशातून [पृथ्वीवरून] उच्छेद होईल, अनाचाऱ्यांचे त्यातून निर्मूलन होईल.”
पण, फक्त सात्विक जनच पृथ्वीवर टिकून राहतील, हे कसे काय घडेल? त्यांच्या संरक्षणासाठी एखादे खास ठिकाण असेल का? अंत येईल तेव्हा सात्विकांनी कोठे असले पाहिजे? गतकाळात नाशातून बचावलेल्यांबद्दल असलेले बायबलमधील चार अहवाल या बाबींवर प्रकाश टाकतात.
जेव्हा स्थान महत्त्वाचे होते
प्राचीन काळातील नोहा व लोट यांच्या बचावाबद्दल २ पेत्र २:५-७ मध्ये असे सांगितले आहे: “[देवाने] प्राचीन जगाचीहि गय केली नाही, तर अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणिला, आणि नीतिमत्त्वाचा उपदेशक नोहा ह्याचे सात जणांसह रक्षण केले; पुढे होणाऱ्या अभक्तांस उदाहरण देण्यासाठी सदोम व गमोरा ही नगरे भस्म करून त्याने त्यांस विध्वंसाची शिक्षा केली; आणि अधर्मी लोकांच्या कामातुर वर्तनाने विटलेला नीतिमान् लोट ह्याची सुटका केली.”
नोहाचा जलप्रलयातून कशा प्रकारे बचाव झाला? देवाने नोहाला सांगितले: “सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाचजुलूम माजला आहे पाहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर.” (उत्प. ६:१३, १४) नोहाने, अगदी यहोवाने सांगितल्याप्रमाणे तारू बांधले. जलप्रलय सुरू होण्याच्या सात दिवसांआधी, यहोवाने नोहाला सर्व प्राण्यांना एकत्र करून आपल्या कुटुंबासोबत तारवात जाण्याची सूचना दिली. सातव्या दिवशी तारवाचे दार बंद करण्यात आले आणि “चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पावसाने झोड उठविली.” (उत्प. ७:१-४, ११, १२, १६) पण, नोहा आणि त्याच्या कुटुंबाला “पाण्यातून वाचविण्यात आले.” (१ पेत्र ३:२०) बचावाकरता त्यांनी तारवाच्या आत असणे आवश्यक होते. कारण, पृथ्वीवर इतर कोणतेही ठिकाण नव्हते जिथे ते सुरक्षित राहू शकले असते.—उत्प. ७:१९, २०.
लोटाच्या बाबतीत पाहिले, तर त्याला देण्यात आलेल्या सूचना काहीशा वेगळ्या स्वरूपाच्या होत्या. त्याने कोठे असू नये याविषयी दोन देवदूतांनी त्याला सूचना दिल्या. त्यांनी लोटाला सांगितले: “तुझे दुसरे कोणी या नगरात [सदोम] असेल त्यास या स्थानातून बाहेर काढ. कारण आम्ही ह्या स्थानाचा नाश करणार आहो.” त्यांना ‘डोंगराकडे पळ काढण्यास’ सांगण्यात आले.—उत्प. १९:१२, १३, १७.
नोहा आणि लोट यांच्या बाबतीत जे घडले त्यावरून हे सिद्ध होते, की “भक्तिमान् लोकांस परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान् लोकांस . . . न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते.” (२ पेत्र २:९) नाशातून बचावण्याविषयीच्या या दोन्ही अहवालांत स्थान महत्त्वाचे होते. नोहाला तारवाच्या आत जायचे होते; तर लोटाला सदोम शहरातून बाहेर पडायचे होते. पण, बचाव होण्यासाठी नेहमीच एखाद्या विशिष्ट ठिकाणी असणे जरुरी आहे का? नीतिमान लोकांना कोणत्याही विशिष्ट स्थानी जायला न लावता, म्हणजेच ते कोठेही असले तरी यहोवा त्यांचा बचाव करू शकतो का? या प्रश्नाच्या उत्तरासाठी, नाशातून बचावण्याविषयीच्या आणखी दोन अहवालांवर लक्ष देऊ या.
स्थान नेहमीच महत्त्वाचे असते का?
मोशेच्या काळात, इजिप्त देशावर विनाशकारी दहावी पीडा आणण्याआधी, यहोवाने इस्राएल लोकांना वल्हांडणासाठी बलिदान केलेल्या पशूचे रक्त दाराच्या चौकटीच्या वर व दोन्ही बाजूंना लावण्याची आज्ञा दिली. का? जेणेकरून, ‘परमेश्वर मिसऱ्यांचा वध करण्यासाठी देशातून फिरेल [तेव्हा] ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीवर व दोन्ही बाह्यांवर रक्त लाविलेले तो पाहील, ते ते दार तो ओलांडून जाईल.’ आणि अशा रीतीने त्यांच्या ज्येष्ठ पुत्रांचा नाश होणार नाही. त्या रात्री, “मिसर देशातील सिंहासनावर बसणाऱ्या फारोच्या ज्येष्ठ मुलापासून तुरुंगात पडलेल्या कैद्याच्या ज्येष्ठ मुलापर्यंत सर्व आणि गुरांढोरांपैकी सर्व प्रथमवत्स परमेश्वराने मारून टाकिले.” पण, इस्राएल लोकांच्या ज्येष्ठ पुत्रांचा मात्र बचाव झाला आणि कोणालाही आपले स्थान सोडून इतर ठिकाणी जावे लागले नाही.—निर्ग. १२:२२, २३, २९.
यरीहो शहरात राहणाऱ्या राहाब नावाच्या वेश्येच्या बाबतीत जे घडले त्याच्याकडे देखील लक्ष द्या. त्यावेळी, इस्राएल लोक प्रतिज्ञात देश काबीज करण्याच्या बेतात होते. यरीहोचा नाश ठरलेला आहे हे ओळखून राहाबेने इस्राएलच्या दोन हेरांना सांगितले की आगेकूच करत असलेल्या इस्राएल लोकांमुळे शहरातील लोकांची भीतीने गाळण उडाली आहे. तिने त्या हेरांना लपवले व त्यांना अशी शपथ घ्यायला लावली की यरीहो काबीज होईल तेव्हा तिला व तिच्या कुटुंबाला वाचवले जाईल. हेरांनी राहाबेला सांगितले की तिने शहराच्या तटावर असलेल्या आपल्या घरात आपल्या कुटुंबाला एकत्र करावे. घराबाहेर पडल्यास शहरातील इतर लोकांसोबत त्यांचाही नाश होणार होता. (यहो. २:८-१३, १५, १८, १९) पण, यहोवाने नंतर यहोशवाला असे सांगितले, की “नगराचा तट जागच्या जागी कोसळेल.” (यहो. ६:५) हेरांनी बचावासाठी जे ठिकाण सुरक्षित ठरवले होते, ते आता धोक्यात आले होते. तर मग, राहाब व तिच्या कुटुंबाला कशा प्रकारे वाचवण्यात आले?
यरीहो शहरावर विजय मिळवण्याची वेळ आली तेव्हा, इस्राएल लोक मोठ्याने जयघोष करत रणशिंगे वाजवू लागले. यहोशवा ६:२० मध्ये असे म्हटले आहे: “रणशिंगांचा आवाज ऐकताच [इस्राएल] लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्याजागी कोसळला.” तो तट कोसळण्यापासून थांबवणे कोणत्याही मनुष्याच्या हाती नव्हते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सबंध तट कोसळला नाही. तटाच्या ज्या भागावर राहाबेचे घर होते तेवढा भाग तसाच राहिला. यहोशवाने त्या दोन हेरांना आज्ञा केली: “तुम्ही शपथ वाहिल्याप्रमाणे त्या वेश्येच्या घरी जाऊन तिला आणि तिचे जे कोणी असतील त्यांना बाहेर आणा.” (यहो. ६:२२) अशा प्रकारे राहाबेच्या घरात असलेल्या सर्व जणांना वाचवण्यात आले.
कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची होती?
नोहा, लोट, मोशेच्या काळातील इस्राएल लोक आणि राहाब यांचा ज्याप्रमाणे बचाव करण्यात आला त्यावरून आपण काय शिकू शकतो? या दुष्ट जगाचा नाश होईल तेव्हा आपण कोठे असायला हवे हे ठरवायला वरील अहवाल आपल्याला कशी मदत करू शकतात?
नोहा तारवात गेल्यामुळे त्याचा बचाव झाला हे खरे आहे. पण, मुळात तो तारवात का गेला? त्याने देवावर विश्वास ठेवला आणि त्याच्या आज्ञेचे पालन केले हेच त्यामागचे मुख्य कारण नव्हते का? बायबल असे सांगते: “देवाने [नोहाला] जे काही सांगितले ते त्याने केले.” (उत्प. ६:२२; इब्री ११:७) आपल्याबद्दल काय? आपणही देवाने जे काही सांगितले आहे ते करत आहोत का? नोहा “नीतिमत्त्वाचा उपदेशक” देखील होता. (२ पेत्र २:५) आपल्या क्षेत्रातील लोक फारसा चांगला प्रतिसाद देत नसले, तरीसुद्धा आपण नोहाप्रमाणे आवेशाने प्रचार कार्य करत आहोत का?
लोटाने सदोम शहरातून पळ काढल्यामुळे तो नाशातून बचावला. तो देवाच्या दृष्टीत नीतिमान होता आणि सदोम व गमोरा शहरातील दुष्कर्मी लोकांच्या अनैतिक आचरणामुळे अतिशय दुःखी होता त्यामुळे त्याचा बचाव झाला. आज सर्वत्र दिसणाऱ्या अनैतिकतेबद्दल आपल्याला खरोखरच दुःख वाटते का? की ही अनैतिकता पाहून आपल्याला आता काहीच वाटत नाही इतके आपले मन संवेदनाशून्य झाले आहे? या जगात “निष्कलंक व निर्दोष असे शांतीत” असण्याचा आपण कसोशीने प्रयत्न करत आहोत का?—२ पेत्र ३:१४.
इजिप्तमधील इस्राएल लोकांना आणि यरीहोतील राहाबेला नाशातून बचावण्याकरता आपल्या घरांमध्येच थांबायचे होते. असे करण्यासाठी विश्वासाची व आज्ञाधारक असण्याची गरज होती. (इब्री ११:२८, ३०, ३१) एकापाठोपाठ एक इजिप्शियन कुटुंबात “मोठा हाहाःकार उडाला,” तशा प्रत्येक इस्राएल कुटुंबातील सदस्यांच्या नजरा त्यांच्या ज्येष्ठ पुत्रावर कशा खिळल्या असतील याची कल्पना करा. (निर्ग. १२:३०) यरीहोचा तट कोसळण्याचा आवाज कानावर पडला तेव्हा राहाब व तिच्या कुटुंबाचे सदस्य आपल्या घरात कसे जीव मुठीत घेऊन बसले असतील याची कल्पना करा. राहाबेचे घर तटबंदीवरच होते. त्यामुळे, दिलेल्या सूचनांचे आज्ञाधारकपणे पालन करण्यासाठी आणि आपल्या घरातच थांबून राहण्यासाठी राहाबेला खरोखरच मोठ्या विश्वासाची गरज होती.
लवकरच सैतानाच्या दुष्ट जगाचा अंत होणार आहे. यहोवाच्या ‘क्रोधाचा’ भयानक दिवस येईल तेव्हा तो आपल्या लोकांचे संरक्षण नेमके कशा प्रकारे करेल हे सध्या आपल्याला माहीत नाही. (सफ. २:३) पण, एवढे मात्र नक्की की आपण कोठेही आणि कोणत्याही परिस्थितीत असलो, तरी यहोवावर विश्वास ठेवणे आणि त्याच्या आज्ञांचे पालन करणे यावरच आपला बचाव अवलंबून राहील. तोपर्यंत, यशयाच्या भविष्यवाणीत ज्या ‘खोल्यांबद्दल’ सांगितले आहे त्यांबद्दल आपण योग्य मनोवृत्ती विकसित करू या.
“आपआपल्या खोल्यांत जा”
यशया २६:२० मध्ये असे म्हटले आहे: “चला, माझ्या लोकांनो, आपआपल्या खोल्यांत जा, दारे लावून घ्या; क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यंत थोडा वेळ लपून राहा.” सा.यु.पू. ५३९ मध्ये मेदी व पारसी लोकांनी बॅबिलोनवर विजय मिळवला तेव्हा या भविष्यवाणीची पहिली पूर्तता झाली असावी. बॅबिलोनमध्ये प्रवेश केल्यावर, पर्शियन राजा कोरेश याने शहरातील सर्वांना आपआपल्या घरातच राहण्याची आज्ञा दिली होती, कारण घराबाहेर दिसणाऱ्या प्रत्येकाला जिवे मारण्यात यावे असा त्याच्या सैनिकांना हुकूम देण्यात आला होता.
आपल्या काळात, या भविष्यवाणीत सांगितलेल्या ‘खोल्या’ जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या १,००,००० पेक्षा जास्त मंडळ्यांशी संबंधित असू शकतात. या मंडळ्यांची आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका आहे. आणि ‘मोठ्या संकटाच्या’ सबंध काळादरम्यानही त्या आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतील. (प्रकटी. ७:१४) देवाच्या लोकांना आपल्या “खोल्यांत” जाऊन “क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यंत” लपून राहण्याची आज्ञा देण्यात आली आहे. म्हणूनच, मंडळीप्रती योग्य मनोवृत्ती विकसित करणे व ती टिकवून ठेवणे अतिशय गरजेचे आहे. तसेच, नेहमी मंडळीच्या निकट सहवासात राहण्याचा दृढनिश्चय करणेही महत्त्वाचे आहे. तर मग, पौलाने दिलेल्या या सल्ल्याचे आपण मनापासून पालन करू या: “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे [आपल्याला] दिसते तसतसा तो अधिक करावा.”—इब्री १०:२४, २५.
बायबलच्या चित्रकथा लेख ११
राहाबला सांगितलं होतं तसंच तिने केलं
बायबलच्या चित्रकथा
[दृश्य १]
[गोष्ट सांगणारा:] यहोशवाने यरीहो शहराची पाहणी करण्यासाठी आपल्या दोन हेरांना पाठवलं. यहोवाने इस्राएली लोकांना ज्या शहरांवर हल्ला करायला सांगितलं होतं, त्यांपैकी हे एक शहर होतं.
[राहाबची आई:] राहाब अगं शहरातले सगळे जण इस्राएली लोकांबद्दल बोलत आहेत! इस्राएली लोक कधीपण आपल्यावर हल्ला करू शकतात.
[राहाब:] काळजी करू नकोस आई. सगळं काही ठीक होईल . . . मला तरी असंच वाटतंय.
[दृश्य २]
[गोष्ट सांगणारा:] दोन इस्राएली हेर राहाबच्या घरी जातात.
[पहिला हेर:] जेवणासाठी आभारी आहोत! आम्ही उद्या पहाटेच निघू.
[पहिला सैनिक:] राहाब!
त्या माणसांना बाहेर आण! ते देश हेरायला आलेत.
[दृश्य ३]
[दृश्य ४]
[राहाब:] माझ्यासोबत या.
[दृश्य ५]
[गोष्ट सांगणारा:] राहाबने त्या हेरांना घराच्या छतावर पसरवून ठेवलेल्या जवसाच्या ताटांमध्ये लपवून ठेवलं होतं.
[राहाब:] “हो, ती माणसं माझ्याकडे आली होती. पण ते निघून गेले. कुठून आले होते मला माहीत नाही.
[राहाब:] तुम्ही जर लगेच त्यांचा पाठलाग केला, तर त्यांना धरू शकाल.
[दृश्य ६]
[राहाब:] ते निघून गेलेत.
[दृश्य ७]
[राहाब:] तुमचा देव यहोवा हा स्वर्गाचा आणि पृथ्वीचा देव आहे.
[राहाब:] तर आता यहोवाच्या नावाने मला वचन द्या, की तुम्ही यरीहो शहरावर हल्ला कराल तेव्हा तुम्ही माझा आणि माझ्या घरच्यांचा जीव वाचवाल.
[दुसरा हेर:] आम्ही इथे का आलो होतो हे जर तू कोणालाच सांगितलं नाहीस, तर आम्ही तुला आणि तुझ्या घरच्यांना वाचवू.
[पहिला हेर:] तूला जर तुझा जीव वाचवायचा असेल तर घरातच राहा आणि खिडकीला लाल रंगाचा दोर बांधून ठेव.
[दृश्य ८]
[गोष्ट सांगणारा:] सहा दिवस इस्राएली लोकांनी यरीहो शहराभोवती फेऱ्या मारल्या. पण सातव्या दिवशी त्यांनी शरहाभोवती सात वेळा फऱ्या मारल्या.
[गोष्ट सांगणारा:] जेव्हा याजकांनी रणशिंगं फुंकली आणि सैनिक मोठ्याने ओरडू लागले तेव्हा यरीहो शहराची भिंत कोसळून पडली आणि इस्राएली लोकांनी त्या शहरावर कब्जा केला.
[दृश्य ९]
[पहिला हेर:] राहाब, आम्ही सांगितलं होतं तसंच तू केलंस!
[राहाब:] यहोवाचे खरंच आभार! आम्ही वाचलो!
[गोष्ट सांगणारा:] राहाब येशू ख्रिस्ताची पूर्वज बनली. (मत्तय १:१, ५ पाहा.) पुढच्या बायबल चित्रकथेमध्ये येशूची पूर्वज बनलेल्या आणखी एका विश्वासू स्त्रीबद्दल शिका.
[चौकट]
या गोष्टीतून आपण काय शिकू शकतो?
आपला जीव वाचवण्यासाठी राहाबला कोणत्या सूचना पाळायच्या होत्या?
हिंट: यहोशवा २:१४, १८-२०.
त्या सूचना पाळण्यासाठी राहाबला धैर्याची गरज का होती?
हिंट: यहोशवा २:३, २२.
देवाने दिलेल्या सगळ्या सूचना तुम्ही पाळणं महत्त्वाचं आहे असं तुम्हाला का वाटतं?
हिंट: अनुवाद ५:२९; नीतिवचनं ३:१, २.
अध्याय १५
दुःखात त्यांनी एकमेकींची साथ सोडली नाही
अनुकरण करा अध्या. ४ ¶२३, तळटीप
“तुम्ही जिकडे जाल तिकडे मी येईन”
२३ हळूहळू रूथ व नामी या दोघीही बेथलेहेमच्या जीवनात रुळल्या. पण, आता दोघींच्या पोटापाण्याची सोय कशी करावी, असा प्रश्न रूथला पडतो. मग तिला कळतं, की इस्राएली लोकांना नियमशास्त्र देताना यहोवा देवानं गोरगरिबांसाठी एक अतिशय प्रेमळ तरतूद केली होती. नियमशास्त्रानुसार, कापणीच्या वेळी गरीब लोकांना शेतात कापणी करणाऱ्यांच्या मागे जाऊन, त्यांच्या हातून सुटलेल्या पेंढ्या व फळं गोळा करण्याची परवानगी होती. तसंच, शेताच्या कानाकोपऱ्यांत उगवणारं पीक गोळा करण्याचीही त्यांना मोकळीक होती.—लेवी. १९:९, १०; अनु. २४:१९-२१.
[तळटीप]
हा खरोखरच एक फार वेगळा असा नियम होता. रूथनं आपल्या मायदेशात तरी अशा तरतुदीबद्दल कधीच ऐकलेलं नव्हतं. प्राचीन काळी पूर्वेकडील देशांत विधवांचा खूप छळ केला जायचा. एका पुस्तकात याविषयी अशी माहिती देण्यात आली आहे: “पतीच्या मृत्यूनंतर, विधवेला सहसा आपल्या मुलांवर अवलंबून राहावं लागायचं; आणि मुलं नसल्यास दासी किंवा वेश्या बनणं, नाहीतर आत्महत्या करणं याशिवाय तिला पर्याय राहत नसे.”
“सद्गुणी स्त्री”
१७ त्यानं तिला विचारलं, “तू कोण आहेस?” रूथनं, कदाचित कापऱ्या आवाजात, त्याला उत्तर दिलं: “मी आपली दासी रूथ आहे; या आपल्या दासीला आपल्या पांघरुणाखाली घ्या; कारण आमचे वतन सोडविण्याचा हक्क आपल्याला आहे.” (रूथ ३:९) काही बायबल विद्वान असं सुचवतात की त्या प्रसंगी रूथच्या वागण्या-बोलण्यामागे काहीतरी अनैतिक हेतू होता. पण हे विद्वान दोन साध्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. पहिली गोष्ट म्हणजे, रूथनं जे काही केलं ते त्या काळाच्या प्रथांना अनुसरून होतं. त्या प्रथा आज आपण पूर्णपणे समजू शकत नाही. आजच्या जगातले नैतिक स्तर अगदीच खालावलेले आहेत. त्यामुळं, या स्तरांच्या आधारावर रूथच्या वागणुकीची पारख करणं नक्कीच योग्य ठरणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, बवाजानं तिला जे उत्तर दिलं त्यावरून स्पष्टपणे दिसून येतं, की त्याच्या दृष्टीत रूथ निष्कलंक होती. खरंतर, त्यानं तिची प्रशंसाच केली.
१८ बवाज रूथशी ज्या शांत आणि प्रेमळ स्वरात बोलला ते ऐकून तिला किती धीर आला असेल. तो म्हणाला: “मुली, परमेश्वर तुझे कल्याण करो, तू पहिल्यापेक्षा दुसऱ्या खेपेस अधिक प्रेमळपणा [“एकनिष्ठ प्रेम,” NW] दाखवलास; कारण श्रीमंत किंवा गरीब अशा कोणाही तरुण पुरुषाच्या नादी तू लागली नाहीस.” (रूथ ३:१०) “पहिल्यापेक्षा” असं म्हणताना, रूथनं नामीसोबत इस्राएलला येण्याद्वारे आणि तिची काळजी घेण्याद्वारे जे एकनिष्ठ प्रेम दाखवलं होतं, त्याविषयी बवाज बोलत होता. तर, “दुसऱ्या खेपेस” असं म्हणताना, रूथ एखाद्या तरुणासोबत लग्न करण्याचा विचार करण्याऐवजी, त्याच्यासारख्या वयस्क माणसाशी लग्न करायला तयार झाली, याविषयी तो बोलत होता. तिच्यासारख्या तरुण स्त्रीला बवाजापेक्षा पुष्कळ कमी वयाच्या एखाद्या तरुणाशी लग्न करणं शक्य होतं; मग तो गरीब असो किंवा श्रीमंत. पण, रूथला फक्त नामीच्याच नाही, तर तिचा मृत पती अलीमलेख याच्याही हिताची काळजी होती. त्याच्या मायदेशात त्याचं नाव पुढं चालावं अशी तिची इच्छा होती. रूथच्या निःस्वार्थ वृत्तीमुळं बवाजाचं प्रभावित होणं स्वाभाविकच होतं.
अतिशय अर्थभरीत असा एक शब्द
स्त्रियांना उद्देशून बोलताना येशूने कधीकधी “बाई” या शब्दाचा वापर केला. उदाहरणार्थ, १८ वर्षं कुबड असलेल्या एका स्त्रीला बरं करताना येशू म्हणाला, “बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस.” (लूक १३:१०-१३) येशूच्या काळात, सहसा स्त्रियांना आदरानं उद्देशून बोलण्यासाठी या शब्दाचा वापर केला जायचा. आणि हाच शब्द येशूने आपल्या आईलादेखील उद्देशून वापरला. (योहा. १९:२६; २०:१३) पण, या आदरानं वापरल्या जाणाऱ्या शब्दापेक्षाही असा एक शब्द आहे ज्यात कोमलता आणि दयाळूपणाच्या भावनादेखील आहेत.
काही स्त्रियांना उद्देशून बोलताना बायबलमध्ये या खास शब्दाचा वापर करण्यात आला आहे. १२ वर्षं रक्तस्रावाने पीडित असलेल्या स्त्रीशी बोलताना येशूने हाच शब्द वापरला. ती स्त्री ज्या प्रकारे येशूला भेटली ते खरंतर देवाच्या नियमशास्त्राच्या विरोधात होतं. कारण अशा प्रकारे रक्तस्राव असलेल्या स्त्रीला अशुद्ध समजलं जायचं आणि तिला इतरांपासून लांब राहण्याची गरज होती. त्यामुळे तिनं जे केलं ते देवाच्या नियमशास्त्राला धरून नव्हतं किंवा चुकीचं होतं, असं कोणी म्हणेल. (लेवी. १५:१९-२७) पण आपल्या पीडेपासून मुक्त होण्यासाठी ती फार तळमळत होती. खरंतर, “तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता.”—मार्क ५:२५, २६.
हळूहळू गर्दीतून वाट काढत, तिने पाठीमागून जाऊन येशूच्या “वस्त्राच्या गोंड्याला” स्पर्श केला. तेव्हा तिचा रक्तस्राव लगेचच बंद झाला! जे घडलं त्याची कोणालाही कल्पना न येता आपण हळूच निघून जाऊ, असं त्या स्त्रीला वाटलं. पण तेव्हाच येशूने म्हटलं, “मला कोणी स्पर्श केला?” (लूक ८:४५-४७) आपण जे केलं ते लपून राहिलेलं नाही याची कल्पना येऊन ती स्त्री घाबरत व थरथर कापत येशूपुढे आली, आणि त्याच्या पाया पडून “तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला.”—मार्क ५:३३.
त्या स्त्रीला सांत्वन देण्यासाठी आणि शांत करण्यासाठी येशू प्रेमळपणे तिला म्हणाला, “मुली, धीर धर.” (मत्त. ९:२२) बायबल तज्ञांच्या मते, “मुली” या शब्दासाठी मूळ हिब्रू आणि ग्रीक भाषेत जो शब्द आहे त्याचा वापर “दयाळूपणा आणि प्रेमळपणा” दर्शवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. पुढे त्या स्त्रीला आणखी धीर आणि खात्री देण्यासाठी येशू म्हणाला, “तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे; शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो.”—मार्क ५:३४.
एका श्रीमंत इस्राएली माणसाने, बवाजानेदेखील रूथ या मवाबी स्त्रीला “मुली” असं म्हटलं. रक्तस्राव असलेल्या स्त्रीला ज्याप्रमाणे पुढं काय होईल हे माहीत नव्हतं. त्याचप्रमाणे रूथलाही तिच्याबाबतीत पुढं काय होईल याबद्दल कोणतीही खात्री नव्हती. खरंतर ती अनोळखी अशा एका माणसाच्या, म्हणजेच बवाजाच्या शेतात सरवा वेचत होती. बवाज तिला म्हणाला, “मुली, ऐकतेस ना?” त्यानंतर त्याने त्याच्याच शेतात तिने सरवा वेचावा असं तिला सूचवलं. रूथने बवाजाला दंडवत घातला आणि आपण एक विदेशी स्त्री असूनही बवाज आपल्यासोबत दयेनं का वागत आहे, असं विचारलं. तेव्हा बवाज तिला म्हणाला, “तू आपल्या सासूशी [नामीशी] कशी वागलीस . . . ही सविस्तर हकीकत मला समजली आहे. परमेश्वर तुझ्या कृतीचे तुला फळ देवो.”—रूथ २:८-१२.
आज मंडळीमध्ये वडील म्हणून सेवा करणाऱ्यांसमोर, येशूचं आणि बवाजाचं खरंच किती चांगलं उदाहरण आहे! काही वेळा जेव्हा एखाद्या बहिणीला आध्यात्मिक मदतीची आणि प्रोत्साहनाची गरज पडते, तेव्हा मंडळीतील दोन वडील तिला मदत करण्यासाठी भेटू शकतात. यहोवाकडे प्रार्थनेत मार्गदर्शन मागितल्यानंतर आणि त्या बहिणीचं लक्षपूर्वक ऐकल्यानंतर, या दोन्ही वडिलांना देवाच्या वचनातून तिला सांत्वन आणि धीर देण्यास मदत होईल.—रोम. १५:४.
वाचकांचे प्रश्न
मी जर रूथशी लग्न केलं तर माझ्याच वारशाचं “नुकसान” होईल, असं “त्या” माणसाने का म्हटलं? (रूथ ४:१, ६)
बायबल काळात एखादा माणूस मरण पावला आणि त्याला जर मूल नसलं, तर काही प्रश्न उपस्थित व्हायचे. जसं की, त्याच्या मालकीच्या जमिनीचं काय होईल? त्याच्या घराण्याचं नाव कायमचंच मिटेल का? अशा प्रश्नांची उत्तरं मोशेच्या नियमशास्त्रात देण्यात आली होती.
एखाद्या माणसाचा मृत्यू झाला तर त्याच्या भावाला किंवा त्याच्या जवळच्या नातेवाइकाला ती जमीन वारशाने मिळायची. किंवा एखादा माणूस गरीब असल्यामुळे त्याला त्याची जमीन विकावी लागली तर त्याचा भाऊ किंवा त्याचा जवळचा नातेवाईक ती जमीन सोडवू शकत होता किंवा परत विकत घेऊ शकत होता.—लेवी. २५:२३-२८; गण. २७:८-११.
पण यामुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या घराण्याचं नाव कसं टिकून राहणार होतं? अशा वेळी मरण पावलेल्या व्यक्तीची पत्नी आपल्या दिराशी लग्न करून आपल्या पतीच्या घराण्याचं नाव टिकवून ठेवू शकत होती. हीच गोष्ट रूथच्या बाबतीतही होती. अशा प्रकारे एक व्यक्ती आपल्या भावाच्या विधवा पत्नीसोबत लग्न करून वारस देऊ शकत होता. आणि अशा प्रकारे मरण पावलेल्या व्यक्तीच्या घराण्याचं नाव पुढे चालायचं आणि त्याच्या जमिनीलाही वारस मिळायचा. या प्रेमळ तरतुदीमुळे विधवा स्त्रियांचंही भलं व्हायचं.—अनु. २५:५-७; मत्त. २२:२३-२८.
नामीचं उदाहरण घ्या. तिचं लग्न अलीमलेख नावाच्या एका व्यक्तीशी झालं होतं. जेव्हा त्याचा आणि त्याच्या दोन मुलांचा मृत्यू झाला, तेव्हा तिची काळजी घ्यायला कोणीच उरलं नव्हतं. (रूथ १:१-५) पण नामी जेव्हा रूथसोबत म्हणजे आपल्या सुनेसोबत यहूदाला आली, तेव्हा तिने रूथला बवाजकडे जाऊन, त्याने आपली जमीन सोडवावी अशी विनंती करायला सांगितली. बवाज हा अलीमलेखचा जवळचा नातेवाईक होता. (रूथ २:१, १९, २०; ३:१-४) पण बवाजच्या असं लक्षात आलं, की त्याच्यापेक्षाही एक जवळचा नातेवाईक आहे ज्याला नामीची जमीन सोडवण्याचा हक्क आहे. बायबलमध्ये त्या माणसाला ‘तो माणूस’ असं म्हटलं आहे.—रूथ ३:९, १२, १३.
सुरवातीला, “तो” माणूस या बाबतीत मदत करायला तयार होता. (रूथ ४:१-४) जमीन सोडवण्यासाठी त्याला जरी स्वतःचे काही पैसे घालावे लागणार होते, तरी त्याच्या असं लक्षात आलं, की नामी म्हातारी असल्यामुळे अलीमलेखच्या जमिनीला वारस मिळावा म्हणून ती मुलाला जन्म देऊ शकत नाही. त्यामुळे नामीशी लग्न केलं तर तिची जमीनही “त्या” माणसाच्या मालमत्तेमध्येच समाविष्ट होणार होती. आणि त्याच्यासाठी ही गोष्ट चांगलीच असणार होती.
पण जेव्हा त्या माणसाच्या लक्षात आलं, की त्याला नामीशी नाही तर रूथशी लग्न करावं लागेल तेव्हा तो म्हणाला: “मी ती जमीन सोडवू शकत नाही. कारण, मी जर तसं केलं तर कदाचित माझंच [माझ्या वारशाचं] नुकसान होईल.” (रूथ ४:५, ६) त्या माणसाने आपला विचार का बदलला?
जर त्या माणसाने किंवा दुसऱ्या कोणत्या माणसाने रूथशी लग्न केलं असतं आणि तिला जर मुलगा झाला असता तर त्या मुलाला अलीमलेखची जमीन वारशाने मिळाली असती. पण यामुळे “त्या” माणसाच्या “वारशाचं” कसं काय “नुकसान” झालं असतं? याबद्दल बायबलमध्ये काहीच सांगितलेलं नाही, पण पुढे दिलेल्या काही मार्गांनी त्याचं नुकसान होऊ शकलं असतं.
• पहिलं, नामीची जमीन विकत घेण्यासाठी त्याला जो खर्च करावा लागणार होता तो वाया गेला असता, कारण अलीमलेखची जमीन शेवटी त्याला नाही, तर रूथला झालेल्या मुलाला मिळाली असती.
• दुसरं, नामी आणि रूथला सांभाळण्याची, त्यांची काळजी घेण्याची जबाबदारीही त्याच्यावर पडली असती.
• तिसरं, जर रूथला “त्या” माणसापासून आणखी मुलं झाली असती, तर त्याच्या आधीच्या मुलांसोबत रूथच्या मुलांनाही जमिनीचा वाटा द्यावा लागला असता.
• चौथं, त्या माणसाला त्याची स्वतःची मुलं नसती, तर त्याच्या आणि अलीमलेखच्या जमिनीवर रूथच्या मुलाचा हक्क असता. आणि यामुळे त्याचं नाही, तर अलीमलेखचं नाव पुढे चालवणाऱ्या मुलाला त्या माणसाची सगळी जमीन मिळाली असती. म्हणून, ‘तो’ माणूस नामीला मदत करून आपला वारसा धोक्यात घालायला तयार नव्हता. त्याऐवजी, त्याच्यानंतर सोडवण्याचा हक्क ज्याला होता, त्या बवाजला त्याने ही जबाबदारी घेऊ दिली. आणि बवाजनेही ती जबाबदारी घेतली, कारण त्याला “मृत माणसाच्या वारशाच्या जमिनीवर त्याचं नाव कायम” ठेवायचं होतं.—रूथ ४:१०.
बायबलमध्ये सांगितलेला ‘तो’ माणूस खूप स्वार्थी होता. त्याला स्वतःच्या नावाची आणि आपल्या वारशाच्या जमिनीचीच जास्त काळजी होती. पण झालं उलटंच, त्याचं नाव कायम टिकण्याऐवजी ते इतिहासातून कायमचं नाहीसं झालं. शिवाय, मसीहाचा म्हणजे येशू ख्रिस्ताचा पूर्वज बनायचा जो खास बहुमान बवाजला मिळाला, तोही त्याने गमावला. खरंच, स्वतःच्या स्वार्थापायी गरजू व्यक्तीला मदत करायची संधी नाकारून, “त्या” माणसाने स्वतःचं किती मोठं नुकसान करून घेतलं!—मत्त. १:५; लूक ३:२३, ३२.
अभ्यास लेख ४५
एकमेकांना एकनिष्ठ प्रेम दाखवत राहा
“एकमेकांशी एकनिष्ठ प्रेमाने आणि दयेने वागा.” —जख. ७:९, तळटीप
सारांश
आपण आपल्या भाऊबहिणींना एकनिष्ठ प्रेम दाखवावं असं यहोवाला वाटतं. एकनिष्ठ प्रेम काय असतं हे आणखी चांगल्या प्रकारे समजण्यासाठी प्राचीन काळातल्या देवाच्या काही सेवकांची उदाहरणं आपल्याला मदत करतील. या लेखात आपण रूथ, नामी आणि बवाज यांच्या उदाहरणांतून काय शिकायला मिळतं ते पाहू.
एकमेकांना एकनिष्ठ प्रेम दाखवण्याची अनेक कारणं आपल्याकडे आहेत. त्यांपैकी काही नीतिवचनं या पुस्तकात दिली आहेत. जसं की: “एकनिष्ठ प्रेम आणि विश्वासूपणा कधीही सोडू नकोस. . . . मग देवाच्या आणि माणसाच्या नजरेत तुला सखोल समज असलेला म्हणून ओळखलं जाईल आणि तुझ्यावर त्यांची कृपा होईल.” “एकनिष्ठ प्रेम दाखवणाऱ्या माणसाच्या वागणुकीमुळे त्याला फायदा होतो.” आणि ‘जो नीतीने आणि एकनिष्ठ प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करतो, त्याला जीवन मिळतं.’—नीति. ३:३, ४; ११:१७, तळटीप; २१:२१.
२ या नीतिवचनांत एकनिष्ठ प्रेम दाखवण्याची तीन कारण सांगितली आहेत. पहिलं कारण म्हणजे, एकनिष्ठ प्रेम दाखवल्यामुळे आपण यहोवाच्या नजरेत मौल्यवान ठरतो. दुसरं म्हणजे, एकनिष्ठ प्रेम दाखवल्यामुळे आपल्या स्वतःला फायदा होतो. जसं की, इतरांसोबत आपली चांगली मैत्री होते. आणि तिसरं कारण म्हणजे, एकमेकांशी एकनिष्ठ प्रेमाने वागल्यामुळे आपल्याला भविष्यात अनेक आशीर्वाद आणि सर्वकाळाचं जीवन मिळेल. खरंच, यहोवाने सांगितल्याप्रमाणे ‘एकमेकांशी एकनिष्ठ प्रेमाने आणि दयेने वागण्याची’ अशी बरीच कारणं आपल्याकडे आहेत.—जख. ७:९.
३ या लेखात आपण चार प्रश्नांवर चर्चा करणार आहोत: (१) आपण एकनिष्ठ प्रेम कोणाला दाखवलं पाहिजे? (२) एकनिष्ठ प्रेम दाखवण्याच्या बाबतीत रूथच्या पुस्तकातून आपण काय शिकू शकतो? (३) आज आपण एकनिष्ठ प्रेम कसं दाखवू शकतो? आणि (४) एकनिष्ठ प्रेम दाखवल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?
आपण एकनिष्ठ प्रेम कोणाला दाखवलं पाहिजे?
४ मागच्या लेखात आपण पाहिलं होतं, की जे यहोवावर प्रेम करतात आणि त्याची उपासना करतात त्यांनाच तो एकनिष्ठ प्रेम दाखवतो. (दानी. ९:४) आपण देवाची प्रिय मुलं असल्यामुळे आपल्यालाही त्याचं अनुकरण करायची इच्छा आहे. (इफिस. ५:१) म्हणून आपण आपल्या भाऊबहिणींना एकनिष्ठ प्रेम दाखवलं पाहिजे. दुसऱ्या शब्दांत, आपण आपल्या भाऊबहिणींना जिव्हाळा आणि आपुलकी दाखवली पाहिजे.—मार्क १०:२९, ३० वाचा.
५ एकनिष्ठ प्रेमाचा अर्थ जितका चांगल्या प्रकारे आपण समजून घेऊ, तितकं जास्त आपल्याला ते आपल्या भाऊबहिणींना दाखवता येईल. त्यामुळे हे प्रेम आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आता आपण पाहू, की एकनिष्ठ प्रेमामध्ये आणि माणुसकीच्या नात्याने दाखवलेल्या प्रेमामध्ये काय फरक असतो.
६ माणुसकीच्या नात्याने दाखवलेल्या प्रेमाचं एक उदाहरण आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतं. एकदा पौल आणि त्याच्यासोबत असलेले लोक जहाजातून प्रवास करत होते. अचानक समुद्रात मोठं वादळ आलं आणि त्यांचं जहाज मिलिता नावाच्या बेटाजवळ येऊन फुटलं. पौल आणि त्याच्यासोबतचे लोक कसेबसे मिलिता बेटावर येऊन पोहोचले. त्या वेळी बेटावरच्या लोकांनी त्यांना मदत केली. खरंतर, बेटावरचे ते लोक पौलला आणि त्याच्यासोबतच्या लोकांना ओळखत नव्हते. त्यांच्याशी त्यांचा काहीच संबंध नव्हता. पण तरीही त्यांनी पौलला आणि त्याच्यासोबत असलेल्या लोकांना मदत केली. आणि बायबल म्हणतं, की त्यांनी त्यांना “खूप दया” दाखवली. (प्रे. कार्यं २८:२, ७) पौल आणि त्याच्यासोबतच्या लोकांचं जहाज फुटलं होतं, दुर्घटना झाली होती. म्हणून, फक्त माणुसकीच्या नात्याने बेटावरच्या लोकांनी त्यांना प्रेम दाखवलं होतं. त्यामुळे त्याला एकनिष्ठ प्रेम म्हणता येणार नाही.
७ एकनिष्ठ प्रेम हे माणुसकीच्या नात्याने दाखवलेल्या प्रेमापेक्षा वेगळं कसं आहे? त्यासाठी बायबलमध्ये ज्यांनी एकनिष्ठ प्रेम दाखवलं, त्यांनी ते का दाखवलं यावर विचार करू या. त्यांनी ते फक्त करावं लागतं म्हणून किंवा फक्त कर्तव्य म्हणून केलं नाही, तर मनापासून इच्छा असल्यामुळे केलं. दावीदचाच विचार करा. योनाथानचे वडील दावीदला मारून टाकायचा प्रयत्न करत होते. पण तरी दावीदने आपल्या प्रिय मित्रावर, योनाथानवर एकनिष्ठ प्रेम केलं. योनाथान आपला मित्र आहे म्हणून फक्त कर्तव्यापोटी दावीदने त्याच्यावर प्रेम केलं नाही, तर योनाथानवर त्याचं मनापासून प्रेम होतं म्हणून त्याने ते केलं. नंतर योनाथानचा मृत्यू झाला त्याच्या कित्येक वर्षांनंतरसुद्धा दावीद त्याच्या मुलाला, म्हणजे मफीबोशेथला एकनिष्ठ प्रेम दाखवत राहिला.—१ शमु. २०:९, १४, १५; २ शमु. ४:४; ८:१५; ९:१, ६, ७.
८ बायबलमधल्या रूथच्या पुस्तकातूनही आपल्याला एकनिष्ठ प्रेमाबद्दल बरंच काही शिकायला मिळतं. तर चला, या पुस्तकांत सांगितलेल्या व्यक्तींकडून एकनिष्ठ प्रेमाच्या बाबतीत आपल्याला काय शिकायला मिळतं ते पाहू या. आणि या शिकलेल्या गोष्टी आपण आपल्या मंडळीत कशा लागू करू शकतो ते पाहू या.
एकनिष्ठ प्रेमाच्या बाबतीत आपण रूथच्या पुस्तकातून काय शिकू शकतो?
९ बायबलमधल्या रूथच्या पुस्तकात आपण नामी, तिची सून रूथ आणि देवावर प्रेम करणाऱ्या बवाज नावाच्या एका माणसाबद्दल वाचतो. बवाज हा नामीच्या पतीकडून तिचा नातेवाईक लागत होता. इस्राएलमध्ये दुष्काळ पडल्यामुळे नामी, तिचा पती आणि तिची दोन्ही मुलं मवाब देशात राहायला गेली होती. पण तिथे नामीचा पती वारला. शिवाय तिथेच तिच्या दोन्ही मुलांचं लग्नही झालं होतं. पण दुःखाची गोष्ट म्हणजे ती दोन्ही मुलंही तिथेच वारली. (रूथ १:३-५; २:१) या दोन धक्कादायक घटनांमुळे नामी दुःखात पार बुडून गेली. ती इतकी निराश झाली, की यहोवा आपल्या विरुद्ध उठला आहे असं तिला वाटू लागलं. तिला नेमकं कसं वाटत होतं हे तिच्या शब्दांतूनच कळतं. ती म्हणाली: “यहोवाचा हात माझ्याविरुद्ध उठलाय.” ती असंही म्हणाली: “सर्वशक्तिमान देवाने मला फार दुःख दिलंय.” इतकंच नाही, तर ती असंपण म्हणाली: ‘यहोवाच माझा विरोधी झालाय आणि सर्वशक्तिमान देवानेच माझ्यावर संकटं आणलीत.’—रूथ १:१३, २०, २१.
१० नामीचे हे कठोर शब्द ऐकून यहोवाला तिचा राग आला का? मुळीच नाही. उलट दुःखात बुडालेल्या या विश्वासू स्त्रीच्या भावना त्याने समजून घेतल्या आणि तिला सहानुभूती दाखवली. कारण “अत्याचार झाल्यामुळे कधीकधी बुद्धिमान माणूसही वेड्यासारखा वागू लागतो,” हे यहोवाला माहीत आहे. (उप. ७:७) पण नामीला हे समजून घेणं गरजेचं होतं, की तिच्या या दुःखाच्या काळात यहोवा तिच्या विरोधात नाही, तर तिच्यासोबत आहे. मग यहोवाने हे कसं दाखवलं? (१ शमु. २:८) त्याने रूथला, नामीला एकनिष्ठ प्रेम दाखवण्याची प्रेरणा दिली. आणि रुथनेही खूप प्रेमाने आणि धीराने तिला मदत केली. तिने नामीला दुःखातून सावरायला आणि यहोवाचं अजूनही तिच्यावर प्रेम आहे हे समजून घ्यायला मदत केली. रूथच्या या उदाहरणातून आपण काय शिकू शिकतो?
११ एकनिष्ठ प्रेम दुःखात असलेल्यांना मदत करायची प्रेरणा देतं. रूथने नामीची साथ सोडली नाही, तर ती शेवटपर्यंत तिच्यासोबत राहिली. आणि हेच आपणही आपल्या भाऊबहिणींच्या बाबतीत केलं पाहिजे. ते जेव्हा दुःखी असतात, निराश असतात तेव्हा आपण त्यांच्यासोबत असलं पाहिजे. कारण आपलं त्यांच्यावर प्रेम आहे, आणि त्यांना मदत करायची आपली मनापासून इच्छा आहे. (नीति. १२:२५, तळटीप; २४:१०) प्रेषित पौलनेही हाच सल्ला आपल्याला दिला. तो म्हणाला: “निराश झालेल्यांचं सांत्वन करा, दुर्बळांना आधार द्या आणि सर्वांशी सहनशीलतेने वागा.”—१ थेस्सलनी. ५:१४.
१२ असं दिसून आलं आहे, की दुःखात असलेल्या एखाद्या भावाला किंवा बहिणीला मदत करायचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे त्यांचं धीराने ऐकणं आणि आपलं त्यांच्यावर प्रेम आहे याची त्यांना जाणीव करून देणं. दुःखात असलेल्या यहोवाच्या अशा प्रिय मेंढराकडे आपण लक्ष देतो तेव्हा यहोवा ते कधीच विसरत नाही. (स्तो. ४१:१) नीतिवचनं १९:१७ मध्ये म्हटलं आहे: “जो गोरगरिबांना मदत करतो, तो यहोवाला उसनं देतो; त्यांच्यावर केलेल्या दयेची तो परतफेड करेल.”
१३ नामीच्या पतीचा आणि मुलांचा मृत्यू झाल्यानंतर नामीच्या बाबतीत काय झालं याचा जर आपण विचार केला, तर एकनिष्ठ प्रेम काय असतं हे आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे समजेल. नामीने जेव्हा ऐकलं, की “यहोवाने आपल्या लोकांना अन्नधान्य देऊन पुन्हा आशीर्वाद दिला आहे,” तेव्हा ती मवाबमधून परत आपल्या घरी जायला निघाली. (रूथ १:६) ती निघाली तेव्हा तिच्या दोन सुनाही तिच्यासोबत जायला निघाल्या. पण जात असताना नामीने त्यांना आपल्या माहेरी मवाब देशात जायला सांगितलं. तिने तीन वेळा त्यांना परत जायला सांगितलं. मग काय झालं? तेव्हा “अर्पाने आपल्या सासूचा मुका घेतला आणि ती निघून गेली. पण रूथ नामीला सोडून जायला तयार नव्हती.” (रूथ १:७-१४) नामीने सांगितल्याप्रमाणे अर्पा परत आपल्या माहेरी मवाब देशात निघून गेली. पण रूथने जे केलं ते खरंच कौतुक करण्यासारखं होतं. कारण अर्पाप्रमाणे तीसुद्धा आपल्या माहेरी जाऊ शकली असती. पण तिने तसं केलं नाही. नामीबद्दल तिला एकनिष्ठ प्रेम असल्यामुळे ती तिच्यासोबतच राहिली. (रूथ १:१६, १७) रूथने हे फक्त कर्तव्य म्हणून केलं नाही, तर नामीवर तिचं मनापासून प्रेम होतं म्हणून केलं. असं करून रूथने खऱ्या अर्थाने एकनिष्ठ प्रेम दाखवलं. मग तिच्यापासून आपण काय शिकू शकतो?
१४ एकनिष्ठ प्रेम अपेक्षेपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन दाखवलं जातं. आजसुद्धा आपले भाऊबहीण एकमेकांना एकनिष्ठ प्रेम दाखवतात; अगदी अशा भाऊबहिणींनासुद्धा ज्यांना ते व्यक्तिगतपणे ओळखत नाहीत. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आली हे कळताच तिथल्या भाऊबहिणींना मदत करण्यासाठी ते लगेच पुढे येतात. मंडळीत एखाद्याला आर्थिक समस्या आहे हे समजताच त्या व्यक्तीला कशी मदत करता येईल याचा विचार करून ते तिला व्यावहारिक मार्गांनी मदत करतात. पहिल्या शतकातल्या मासेदोनियातल्या ख्रिश्चनांप्रमाणेच ते एक पाऊल पुढे जाऊन प्रेम दाखवतात. आपल्या गरजू बांधवांना मदत करण्यासाठी ते अनेक त्याग करतात आणि “आपल्या ऐपतीपेक्षाही जास्त” देतात. (२ करिंथ. ८:३) असं एकनिष्ठ प्रेम पाहून यहोवाला खरंच किती आनंद होत असेल!—इब्री लोकांना १३:१६ वाचा.
आज आपण एकनिष्ठ प्रेम कसं दाखवू शकतो?
१५ रूथ आणि नामीच्या गोष्टीतून आपण अनेक चांगल्या गोष्टी शिकू शकतो? त्यांपैकी काहींचा आता आपण विचार करू या.
१६ प्रयत्न करत राहा. रूथने जेव्हा नामीला म्हटलं, की ‘मीपण तुमच्यासोबत यहूदा देशात येईन,’ तेव्हा सुरुवातीला नामीने तिला रोखण्याचा प्रयत्न केला. पण रूथ तिला सोडायला तयार नव्हती. ती प्रयत्न करत राहिली. त्यामुळे पुढे काय झालं? “रूथचा निर्णय पक्का आहे हे पाहून नामीने तिला समजावण्याचं सोडून दिलं.”—रूथ १:१५-१८.
१७ आपण काय शिकतो: हेच, की एखाद्या दुःखी किंवा निराश झालेल्या व्यक्तीला मदत करताना आपल्याला कदाचित खूप धीर दाखवावा लागेल. पण आपण प्रयत्न करायचं सोडू नये. मदतीची गरज असलेली एखादी बहीण सुरुवातीला कदाचित लगेच आपली मदत स्वीकारणार नाही. पण तिच्याबद्दल आपल्याला एकनिष्ठ प्रेम असेल, तर आपण प्रयत्न करायचं सोडून देणार नाही. (गलती. ६:२) कारण तिला मदत करण्याच्या आपल्या प्रयत्नांना ती कधी ना कधी नक्कीच प्रतिसाद देईल.
१८ जास्त मनाला लावून घेऊ नका. नामी आणि रूथ बेथलेहेममध्ये आल्या तेव्हा नामी आपल्या ओळखीच्या लोकांना भेटली. ती त्यांना म्हणाली: “मी गेले तेव्हा माझ्याकडे सगळं काही होतं, पण यहोवाने मला रिकाम्या हाती परत पाठवलंय.” (रूथ १:२१) विचार करा, नामीचे हे शब्द ऐकल्यावर रूथला कसं वाटलं असेल! कारण नामीला मदत करण्यासाठी तिने कोणतीही कसर सोडली नव्हती. ती तिच्यासोबत रडली होती, तिने तिला दिलासा दिला होता आणि कितीतरी दिवस प्रवास करून ती इथपर्यंत तिच्यासोबत आली होती. आणि इतकं सगळं करूनसुद्धा नामी आता म्हणते, की “यहोवाने मला रिकाम्या हाती परत पाठवलंय.” बाजूलाच उभ्या असलेल्या रूथने तिच्यासाठी जे काही केलं होतं त्याचा तिने एका शब्दानेसुद्धा उल्लेख केला नाही. विचार करा, या गोष्टीचं रूथला किती वाईट वाटलं असेल! पण तरीसुद्धा तिने नामीची साथ सोडली नाही.
१९ आपण काय शिकतो: रूथसोबत झालं तसं आपल्यासोबतही होऊ शकतं. दुःखात असलेल्या एखाद्या बहिणीला आपण खूप मदत केली असेल, पण ती असं काहीतरी बोलून जाईल ज्यामुळे आपल्याला कदाचित खूप वाईट वाटेल. पण आपण ते जास्त मनाला लावून घेऊ नये. उलट, तिला मदतीची गरज आहे हे ओळखून तिला साथ देत राहिलं पाहिजे, आणि तिला सांत्वन देता यावं म्हणून यहोवाकडे मदत मागीतली पाहिजे.—नीति. १७:१७.
२० गरज असते तेव्हा दिलासा द्या. रूथने नामीला एकनिष्ठ प्रेम दाखवलं होतं. पण आता रुथला स्वतःलाच दिलासा आणि प्रोत्साहनाची गरज होती. आणि तेच करायची यहोवाने बवाजला प्रेरणा दिली. तो रूथला म्हणाला: “या सर्व गोष्टींसाठी यहोवा तुला आशीर्वाद देवो. तू ज्याच्या पंखांखाली आश्रय घ्यायला आलीस, तो इस्राएलचा देव यहोवा तुला पुरेपूर मोबदला देवो.” बवाजचे हे दिलासा देणारे शब्द ऐकून रूथला खरंच किती बरं वाटलं असेल! म्हणून ती बवाजला म्हणाली: “तुम्ही माझ्याशी प्रेमळपणे बोलून मला दिलासा दिलाय.” (रूथ २:१२, १३) रूथला गरज होती तेव्हा बवाजने तिला दिलासा दिला आणि त्यामुळे नामीला मदत करत राहायचं बळ तिला मिळालं.
२१ आपण काय शिकतो: हेच, की जे इतरांना एकनिष्ठ प्रेम दाखवतात त्यांनासुद्धा कधीकधी दिलासा आणि प्रोत्साहनाची गरज असते. रूथ नामीची खूप काळजी घ्यायची आणि त्यामुळे बवाजने तिचं कौतुक केलं. आज मंडळीतले अनेक भाऊबहीण इतरांची प्रेमळपणे काळजी घेतात. म्हणून बवाजप्रमाणेच ख्रिस्ती वडीलसुद्धा त्यांचं मनापासून कौतुक करतात. त्यामुळे इतरांची मदत करत राहायला या भाऊबहिणींना आणखी बळ मिळतं.—यशया ३२:१, २ वाचा.
जे एकनिष्ठ प्रेम दाखवतात त्यांना कसा फायदा होतो?
२२ काही काळानंतर बवाजने रूथ आणि नामीला उदारपणे भरपूर अन्नधान्य दिलं. (रूथ २:१४-१८) बवाजची उदारता पाहून नामीने काय केलं? ती म्हणाली: “जिवंतांवर आणि मरण पावलेल्यांवर एकनिष्ठ प्रेम दाखवण्याचं ज्याने सोडलं नाही, तो यहोवा देव त्याला आशीर्वाद देवो.” (रूथ २:२०क) नामीच्या विचारांमध्ये हा किती चांगला बदल होता! आधी ती म्हणाली होती: ‘यहोवा माझ्याविरुद्ध उठलाय.’ पण आता ती आनंदाने म्हणते: ‘यहोवाने मला एकनिष्ठ प्रेम दाखवण्याचं सोडलं नाही.’ नामीच्या विचारांमध्ये हा चांगला बदल कशामुळे झाला होता?
२३ नामीला आता जाणवू लागलं होतं, की यहोवाने तिला कधीच सोडलं नव्हतं. ती मवाब देशातून यहूदाला जायला निघाली तेव्हा यहोवाने रूथला तिच्यासोबत जाण्याची आणि तिला आधार देण्याची प्रेरणा दिली होती. (रूथ १:१६) याशिवाय, यहोवाने त्यांच्या ‘सोडवणाऱ्याला,’ म्हणजे बवाजलासुद्धा त्यांना प्रेमळपणे मदत करायची प्रेरणा दिली होती. यहोवाच तिला मदत करत होता हे आता नामीला जाणवलं. (रूथ २:१९, २०ख) तिने नक्कीच असा विचार केला असेल: ‘आता मला समजलं, की यहोवाने मला कधीच सोडलं नव्हतं. माझ्या दुःखाच्या काळात तो नेहमी माझ्यासोबत होता!’ (स्तोत्र १३६:२३, २६ वाचा.) रूथ आणि बवाजने आपली मदत करायचं सोडलं नाही याबद्दल नामीने यहोवाचे किती आभार मानले असतील! शेवटी नामी आपल्या दुःखातून सावरली आणि पुन्हा उत्साहाने यहोवाची उपासना करू लागली. त्यामुळे नामीला स्वतःला, तसंच रूथ आणि बवाज यांनासुद्धा नक्कीच खूप आनंद झाला असेल.
२४ तर मग, रूथच्या पुस्तकातून आपण एकनिष्ठ प्रेमाबद्दल काय शिकलो? हेच, की दुःखात असलेल्या आपल्या भाऊबहिणींबद्दल आपल्या मनात जर एकनिष्ठ प्रेम असेल, तर आपण त्यांना मदत करायचं सोडणार नाही. उलट, एक पाऊल पुढे जाऊन आपण त्यांना मदत करायचा प्रयत्न करू. तसंच, मंडळीतल्या वडिलांनीसुद्धा इतरांना मदत करणाऱ्या भाऊबहिणींना वेळोवेळी प्रोत्साहन देत राहिलं पाहिजे. दुःखात असलेल्या आपल्या भाऊबहिणींना आपण जेव्हा मदत करतो आणि त्यामुळे ते पुन्हा उत्साहाने यहोवाची सेवा करू लागतात, तेव्हा आपल्यालाही खूप आनंद होतो. (प्रे. कार्यं २०:३५) तर एकनिष्ठ प्रेम दाखवण्याची अशी अनेक कारणं आपल्याकडे आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला यहोवाचं अनुकरण करायचं आहे आणि त्याला खूश करायचं आहे. कारण यहोवा ‘एकनिष्ठ प्रेमाने भरलेला’ देव आहे.—निर्ग. ३४:६; स्तो. ३३:२२.
बायबलच्या चित्रकथा लेख १२
रूथने नामीची साथ सोडली नाही
बायबलच्या चित्रकथा
[दृश्य १]
[गोष्ट सांगणारा:] नामी ही मबाव देशात राहणारी एक विधवा होती. एक दिवस तिने आपल्या मायदेशी म्हणजे इस्राएलला परत जायचं ठरवलं. तिच्या दोन मवाबी सुना, रूथ आणि अर्पा यासुद्धा तिच्यासोबत जायला निघाल्या.
[दृश्य २]
[दृश्य ३]
[दृश्य ४]
[दृश्य ५]
[गोष्ट सांगणारा:] काही अंतर चालून गेल्यावर नामी थांबली आणि रूथ आणि अर्पासोबत बोलू लागली.
[नामी:] माझ्या मुलींनो, तुमचे पती तर आता राहिले नाहीत. त्यामुळे मवाब देशात आपापल्या माहेरी परत जा आणि पुन्हा लग्न करा.
[दृश्य ६]
[अर्पा:] मला खरंतर परत जायची इच्छा नाही. पण रूथ, आई जे म्हणतात ते बरोबर आहे.
[दृश्य ७]
[अर्पा:] मवाब सोडून आपण कधी कुठे गेलोच नाही. आपले आईवडील, नातेवाईक, मित्रपरिवार सगळं काही मवाबमध्येच आहे. मी तर चालले घरी.
[रूथ:] पण अर्पा, आईसुद्धा आपल्याच आहेत. त्यांचा देव यहोवा हा खूप दयाळू आणि प्रेमळ आहे. पण मवाबचे देव तर खूप क्रूर आहेत.
[दृश्य ८]
[नामी:] बघ, अर्पा तिच्या लोकांकडे आणि तिच्या देवांकडे परत गेली आहे. तूही तिच्यासोबत जा.
[दृश्य ९]
[नामी:] नाही . . . मी तुम्हाला सोडून जाणार नाही.
[दृश्य १०]
[रूथ:] तुम्ही जिथे जाल तिथे मी येईन.
[दृश्य ११]
[रूथ:] तुमचे लोक माझे लोक होतील.
[दृश्य १२]
[रूथ:] तुमचा देव माझा देव होईल
[दृश्य १३]
[गोष्ट सांगणारा:] इस्राएलला परत आल्यावर रूथ स्वत:साठी आणि नामीसाठी धान्य गोळा करून आणायची. ती बवाज नावाच्या एका माणसाच्या शेतांमधून जवाचं उरलेलं धान्य वेचून आणायची.
[दृश्य १४]
[बवाज:] ती मुलगी कोण आहे?
[कापणी करणाऱ्यांवर नेमलेला सेवक:] ती मवाब देशातून नामीसोबत आली आहे. ती सकाळी आली तेव्हापासून काम करत आहे.
[दृश्य १५]
[बवाज:] रूथ, यहोवाचा आशीर्वाद तुझ्यावर असो! तू एक चांगली स्त्री आहेस हे शहरातल्या सगळ्यांना माहीत आहे.
[दृश्य १६]
[गोष्ट सांगणारा:] बवाजने पुढे रूथशी लग्न केलं आणि त्यांना मुलगा झाला. त्याचं नाव त्यांनी ओबेद ठेवलं. ओबेदचा नातू पुढे इस्राएलचा एक लोकप्रिय राजा बनला. तो कोण होता माहीत आहे? (रूथ ४:२२ वाचा.)
[चौकट]
या गोष्टीतून आपण काय शिकतो?
रूथने नामीला शेवटपर्यंत कशी साथ दिली?
हिंट: रूथ १:१४, १६, १७; २:११, १२.
यहोवाने रूथ आणि नामीला कशी साथ दिली?
हिंट: रूथ ४:१३-१५.
तुम्ही तुमच्या मित्रांना कशी साथ देऊ शकता?
हिंट: नीतिवचनं १७:१७; १८:२४.
अध्याय १६
“मी तुझ्यासोबत नक्की येईन”
टेहळणी बुरूज१५ ८/१ १३ ¶१
“आई म्हणून मी त्यांचा सांभाळ केला”
सीसरा! या नावानेसुद्धा इस्राएली लोकांचा थरकाप उडायचा. कनानी लोकांचा धर्म आणि संस्कृती खूप क्रूर होती. त्यांच्यामध्ये लहान मुलांचा बळी दिला जायचा आणि त्यांच्या मंदिरात वेश्या व्यवसाय केला जायचा. कनानी सेनापती सीसरा आणि त्याचं सैन्य या भागावर राज्य करत होतं तेव्हा परिस्थिती कशी होती? दबोराने जे गीत गायलं त्यातून असं दिसतं, की रस्त्याने प्रवास करणं जवळजवळ अशक्य झालं होतं आणि गावंच्या गावं ओसाड पडली होती. (शास्ते ५:६, ७) आपल्यावर हल्ला होऊ नये, आपल्या मुलांना पळवून नेलं जाऊ नये आणि स्त्रियांवर बलात्कार होऊ नये म्हणून लोक घाबरून जंगलात आणि डोंगरांमध्ये लपत असावेत. तसंच, शेती करायला किंवा सुरक्षा भिंती नसलेल्या गावांत राहायला आणि मोकळ्या रस्त्यांवर प्रवास करायलासद्धा ते घाबरत असावेत.
[तळटीप]
दबोराच्या गीतातून असं दिसून येतं, की सीसरा आपल्या लष्करी मोहिमांवरून परत येताना मोठ्या प्रमाणात लुटीचा माल घेऊन यायचा. यात सहसा मुलीसुद्धा असायच्या. काही वेळा तर प्रत्येक सैनिकासाठी एकापेक्षा जास्त मुली असायच्या. (शास्ते ५:३०) या वचनात “मुली” यासाठी मूळ भाषेत जो शब्द वापरण्यात आलाय, त्याचा शब्दशः अर्थ “गर्भ” असा होतो. यावरून हे लक्षात येतं, की या स्त्रियांना खासकरून सैनिकांच्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरलं जायचं आणि त्यासाठीच त्यांना जिवंत ठेवलं जायचं. त्या काळात बलात्कार ही खूप सामान्य गोष्ट होती.
वाचकांचे प्रश्न
◼ शमशोन व गिदोनाप्रमाणे किती शास्ते होऊन गेले?
तुम्ही शास्त्यांची गणना करता तेव्हा जो आकडा मिळेल तो तुम्ही विशिष्ट इस्राएलाकडे कशा दृष्टीने पाहता यावर अवलंबून आहे. परंतु हे सुरक्षितपणे म्हटले जाऊ शकते की १२ पुरुषांनी यहोशवा ते शमुवेल यांच्या दरम्यान शास्ते म्हणून काम केले.
मोशे व यहोशवाच्या दिवसा दरम्यान, मंडळीतील कांही वृद्ध पुरुष, न्यायदानाची प्रकरणे ऐकणे व निवाडा करण्यास निवडीले होते या दृष्टीने शास्ते होते. (निर्गम १८:२१, २२; यहोशवा ८:३३; २३:२) यहोशवाच्या मृत्युनंतर, इस्राएल खऱ्या भक्तीपासून बहकले व इतर लोकांकडून पीडीत बनले. शास्ते २:१६ म्हणते: “यहोवा त्यांच्यात शास्ते उत्पन्न करी व ते त्यास लुटणाऱ्यांच्या हातून सोडवित.” यहोवाने प्रथमतःच शास्ता किंवा ‘सोडविणारा’ म्हणून अथनिएल नावाच्या पुरुषास सामोरे आणले. (शास्ते ३:९) त्याच्या मृत्युनंतर एहूद, शमगार, बाराक, गिदोन, तोला, याईर, इफ्ताह, इब्सान, एलोन, अब्दोन व शमशोन झाले.
या १२ ना सोडता पवित्रशास्त्र दबोरा, एली व शमुवेल यांचा उल्लेख न्याय देण्याच्या संबधाने करते. (शास्ते ४:४; १ शमुवेल ४:१६–१८; ७:१५, १६) तथापि, दबोरास सर्वप्रथम संदेष्ट्री म्हटले गेले व तिची सांगड शास्ता बाराक सोबत घालण्यात आली ज्याने खासरित्या लोकांना जुलमा खालून बाहेर काढण्यात नेतृत्व केले. त्याच प्रमाणे, एली हा मुख्यत्वेकरून महायाजक होता, ‘सोडविणारा’ नव्हता की ज्याने लोकांना लढाईतून मुक्ततेकडे नेले. (नेहम्या ९:२७) तथापि दबोरा व एलीने इस्राएलांचा न्याय करण्याची भूमिका बजावली होती खरी पण ज्या १२ पुरुषांना स्पष्टपणे व मुख्यत्वे करून शास्ते म्हणून ‘योजले’ होते त्या यादीत गणना करण्याचे कोणतेही कारण नाही. प्रेषितांची कृत्ये १३:२० म्हणते की ‘शास्ते संदेष्टा शमुवेला पर्यंत [दिले होते].’ या मर्यादेस शास्त्यांचा काळ म्हणून ओळखले जाऊ शकते, व तेच शमुवेल व त्याच्या पुत्रांना बहुदा शास्त्यामध्ये का गणले नाही हे दाखविते.—१ शमुवेल ८:१.
टेहळणी बुरूज१५ ८/१ १३ ¶२
“आई म्हणून मी त्यांचा सांभाळ केला”
देशात २० वर्षं दहशत पसरली होती. मग यहोवाने पाहिलं की त्याचे हट्टी लोक बदलायला तयार आहेत. आणि म्हणून त्यांची मदत करण्यासाठी त्याने दबोराला निवडलं. दबोरा आणि बाराकने देवाच्या प्रेरणेने जे गीत गायलं त्यात असं म्हटलंय: “मी, दबोरा त्यांच्या मदतीसाठी आले, आई म्हणून मी त्यांचा सांभाळ केला.” लप्पिदोथची बायको दबोरा ही खरोखरंच आई होती का हे आपल्याला माहीत नाही. पण एक गोष्ट मात्र आपल्याला नक्की माहीत आहे, की तिच्या बाबतीत म्हटलेले हे शब्द लाक्षणिक अर्थाने वापरण्यात आले आहेत. कारण यहोवाने इस्राएल राष्ट्राची आईसारखी काळजी घ्यायची जबाबदारी दबोरावर सोपवली होती. त्याने तिला सांगितलं, की तिने एका बलवान आणि विश्वासू माणसाला, म्हणजे न्यायाधीश बाराकला बोलावून घ्यावं आणि त्याला सीसराविरुद्ध लढायला सांगावं.—शास्ते ४:३, ६, ७; ५:७.
शास्ते पुस्तकातील ठळक मुद्दे
५:२०—बाराकच्या वतीने आकाशातून तारे लढले ते कोणत्या अर्थाने? देवदूतांनी त्याचे साहाय्य केले, उल्कापात घडून, त्यांना सीसराच्या विद्वान पुरुषांनी अपशकुन मानले किंवा मग सीसराने ज्योतिषविद्येच्या आधारावर केलेले अंदाज चुकीचे निघाले यांपैकी नेमके काय घडले याविषयी बायबल स्पष्ट माहिती देत नाही. पण साहजिकच कोणत्या न कोणत्या प्रकारे देवाने हस्तक्षेप केला होता.
तुमच्या स्वेच्छेने पुढे येण्याच्या मनोवृत्तीमुळे यहोवाचा गौरव होतो!
“लोक स्वसंतोषाने पुढे आले, म्हणून परमेश्वराचा धन्यवाद करा.”—शास्ते ५:२.
फार वर्षांपूर्वी तीन पुरुष देवाच्या एका विश्वासू सेवकाला, ईयोबला भेटण्यासाठी आले. त्यांपैकी एक म्हणजे अलीफज तेमानी. अलीफजने ईयोबला विचार करायला लावतील असे काही प्रश्न विचारले. तो म्हणाला: “मनुष्याकडून देवाला काही लाभ आहे काय? सुज्ञ पुरुष स्वतःचाच लाभ करून घेतो. तू धार्मिक असलास तर तेणेकरून सर्वसमर्थाला काही सुख होते काय? तू सात्विकतेने वर्तलास तर त्याला काही लाभ होईल काय?” (ईयो. २२:१-३) हे प्रश्न विचारताना यांचं उत्तर ‘नाही’ हेच असेल अशी अलीफजची खात्री होती. तसंच, ईयोबला भेटायला आलेल्यांपैकी आणखी एक जण म्हणजे बिल्दद शूही. तोदेखील म्हणाला, की मनुष्य देवापुढे कधीही नीतिमान ठरू शकत नाही.—ईयोब २५:४ वाचा.
२ अलीफज व बिल्दद हे ईयोबला असा विचार करण्यास प्रेरीत करत होते, की यहोवाची सेवा करण्यासाठी तो जी मेहनत घेत आहे ती सर्व व्यर्थ आहे. देवाच्या नजरेत मनुष्याचं मोल हे एखाद्या कीटकापेक्षा अधिक नाही, असाही ईयोबने विचार करावा अशी त्यांची इच्छा होती. (ईयो. ४:१९; २५:६) हे पुरुष नम्र वृत्तीचे असल्यामुळे असं म्हणत होते का? (ईयो. २२:२९) हे खरं आहे की सर्वोच्च आणि महान असलेल्या यहोवा देवाच्या तुलनेत आपण अगदीच लहान आहोत. जेव्हा आपण एखाद्या उंच डोंगरावरून किंवा आकाशात उडणाऱ्या विमानातून खाली पाहतो, तेव्हा मनुष्य किती क्षुद्र आहे याची आपल्याला जाणीव होते. पण यहोवाची सेवा करण्यासाठी आणि त्याच्या राज्यासाठी आपण जी मेहनत घेतो, त्याबद्दल यहोवाचाही दृष्टिकोन असाच आहे का? नाही. यहोवाने अलीफज, बिल्दद आणि ईयोबला भेटायला आलेला तिसरा पुरुष सोफर यांना सांगितलं, की ते बोलत असलेल्या गोष्टी साफ खोट्या आहेत. पण याउलट ईयोबविषयी मात्र यहोवा देव म्हणाला, की तो “माझा सेवक” आहे. आणि ईयोबच्या सेवेमुळे तो प्रसन्न असल्याचंही त्याने सांगितलं. (ईयो. ४२:७, ८) यावरून आपल्याला दिसून येतं की अपरिपूर्ण मानव ‘देवाला लाभदायक आहेत.’ म्हणजेच देवाच्या नजरेत मानव मौल्यवान आहेत.
यहोवाला काय देणार?
३ ईयोब आणि त्या तीन पुरुषांमध्ये चाललेला संवाद, अलीहू नावाचा एक तरुणही ऐकत होता. जेव्हा त्यांच्यातील संवाद संपला तेव्हा अलीहूने ईयोबला यहोवा देवाविषयी विचारलं. तो म्हणाला: “तू धार्मिक असलास तर तू त्याला काय देणार? तुजपासून त्याला काय मिळणार?” (ईयो. ३५:७) इथं अलीहूदेखील देवाच्या सेवेत आपण जी मेहनत घेतो ती व्यर्थ असल्याचं म्हणत होता का? नाही. हे आपण कशावरून म्हणू शकतो? कारण, यहोवाने ज्या प्रकारे त्या तीन पुरुषांची चुकीची विचारसरणी सुधारली, त्या प्रकारे त्याने अलीहूची विचारसरणी सुधारली नाही. खरंतर इथं अलीहू एक वेगळा मुद्दा मांडत होता. तो असं म्हणत होता की यहोवा आपल्या उपासनेवर अवलंबून नाही. तो पूर्ण आहे, त्याला इतर कोणत्याही गोष्टीची गरज नाही. आपण एखादी गोष्ट केल्याने यहोवा श्रीमंत किंवा बलवान होतो असं नाही. याउलट, आपल्यामध्ये जे चांगले गुण किंवा ज्या चांगल्या क्षमता आहेत त्या सर्व यहोवाकडूनच आहेत. तसंच, आपण त्यांचा कसा वापर करतो हेदेखील तो पाहत असतो.
४ यहोवाची सेवा करणाऱ्या आपल्या बंधुभगिनींप्रती जेव्हा आपण आपलं एकनिष्ठ प्रेम दाखवतो आणि त्यांना मदत करतो, तेव्हा ते एकनिष्ठ प्रेम आपण यहोवाप्रतीच दाखवत आहोत असं तो समजतो. नीतिसूत्रे १९:१७ मध्ये म्हटलं आहे: “जो दरिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो; त्याच्या सत्कृत्याची फेड तो करेल.” यावरून हे दिसून येतं की जेव्हा जेव्हा आपण इतरांवर दया दाखवतो, तेव्हा तेव्हा यहोवा ते पाहतो आणि लक्षात ठेवतो. यहोवा या विश्वाचा निर्माणकर्ता आहे. तरी आपण इतरांवर दाखवत असलेली दया ही आपण यहोवाला दिलेल्या कर्जाप्रमाणे तो लेखतो आणि त्याची परतफेड आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी देऊन करतो. याविषयी देवाच्या पुत्राने, येशूनेही स्वतः कबूली दिली आहे.—लूक १४:१३, १४ वाचा.
५ प्राचीन काळात यहोवाने यशया संदेष्ट्याला एका खास सेवेसाठी निवडलं. (यश. ६:८-१०) यशयाने यहोवाच्या आमंत्रणाचा स्वीकार करत म्हटलं: “हा मी आहे, मला पाठव.” आजदेखील यहोवा विश्वासू सेवकांना त्याच्या कार्यात सहभागी होण्याची संधी देतो. या संधीचा स्वीकार करण्याद्वारे हजारो यहोवाचे सेवक त्यांचीही मनोवृत्ती ही यशया संदेष्ट्याप्रमाणेच आहे हे दाखवून देत आहेत. हे सेवक वेगवेगळ्या प्रकारच्या नेमणूका स्वीकारण्यास तयार आहेत. तसंच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याची आणि तिथल्या समस्यांचा आणि परिस्थितींचा सामना करण्याचीही त्यांची तयारी आहे. पण यहोवाची सेवा करत असताना कदाचित कोणी असा विचार करेल, की ‘सेवा करण्याची जी संधी मला मिळाली आहे, तिची मला कदर आहे. पण मी करत असलेल्या सेवेचं खरंच काही मोल आहे का? माझ्याशिवायही यहोवा त्याचं कार्य पूर्ण करून घेऊ शकतोच ना?’ तुम्हालाही कधी असं वाटलं आहे का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण प्राचीन काळातील यहोवाच्या दोन सेवकांच्या जीवनात घडलेल्या काही घटनांवर नजर टाकू. आपण दबोरा आणि बाराक या सेवकांबद्दल आता पाहू.
देवाने इस्राएली लोकांना धैर्य दिलं
६ बाराक हा इस्राएलमधील एक योद्धा होता, आणि दबोरा ही यहोवाच्या वतीनं संदेश सांगणारी एक संदेष्ट्री होती. कनानचा राजा याबीन याने २० वर्षांपासून इस्राएली लोकांचा खूप छळ चालवला होता. याबीनची सेना इतकी क्रूर आणि हिंसक होती, की गावांमध्ये राहणारे इस्राएली लोक त्यांच्या घराबाहेर पडायलाही फार घाबरायचे. त्याच्याकडे युद्धासाठी ९०० लोखंडी रथ होते. पण इस्राएली लोकांकडे युद्धात लढण्यासाठी योग्य शस्त्रंही नव्हती आणि युद्धात स्वतःच्या बचावासाठी साधनंही नव्हती.—शास्ते ४:१-३, १३; ५:६-८.
७ याबीनच्या सैन्यापुढे इस्राएली लोक हे अगदी दुर्बळ दिसत होते, आणि त्यांच्यावर विजय मिळवणं हे सहज शक्य वाटत होतं. पण दबोरा संदेष्ट्रीद्वारे यहोवाने बाराकला अशी आज्ञा दिली, की “तू नफताली व जबुलून यांच्यातले दहा हजार पुरुष बरोबर घेऊन ताबोर डोंगराकडे कूच करून जा . . . याबीनाचा सेनापती सीसरा आपले रथ व आपले सर्व लष्कर घेऊन तुझ्याकडे कीशोन नदीपर्यंत येईल असे मी करेन, आणि त्याला तुझ्या हाती देईन.”—शास्ते ४:४-७.
८ यहोवाने दिलेल्या या आज्ञेनंतर युद्धात स्वेच्छेने सहभागी होण्यासाठी इस्राएलमधील सर्व लोकांना आर्जव करण्यात आला. त्यानंतर युद्धात सहभागी होण्यासाठी १०,००० जण ताबोर डोंगराजवळ एकत्र जमले. मग बाराक आणि त्याचे लोक तानख या ठिकाणी त्यांच्या शत्रूंबरोबर युद्ध करण्यास गेले. (शास्ते ४:१४-१६ वाचा.) या युद्धात यहोवाने त्यांना मदत केली का? हो नक्कीच. युद्धाच्या ठिकाणी अचानक वादळवाऱ्यासह जोरदार पाऊस पडायला सुरवात झाली. त्यामुळे कोरड्या असलेल्या त्या युद्धभूमीचं दलदलीत रूपांतर झालं. या परिस्थितीचा इस्राएली लोकांना फायदा झाला. बाराकने सीसराच्या सैन्याचा २४ किलोमीटरपर्यंत, म्हणजे हरोशेथ या ठिकाणापर्यंत पाठलाग केला. बाराकपासून पळून जात असताना, सीसराचा रथ चिखलामध्ये अडकून पडला. त्यामुळे तो पळतच साननीम इथं गेला. साननीम हे ठिकाण कदाचित केदेशाजवळ असावं. तिथं सीसरा याएल नावाच्या एका स्त्रीच्या तंबूमध्ये लपला. तो फार थकला होता त्यामुळे त्याला गाढ झोप लागली. तो झोपेत असतानाच याएलने मोठ्या धैर्याने त्याला मारून टाकलं. (शास्ते ४:१७-२१) अशा प्रकारे यहोवाने इस्राएली लोकांना त्यांच्या शत्रूवर विजय मिळवून दिला.
स्वेच्छेने पुढे येण्याबद्दल असलेली मनोवृत्ती
९ शास्ते याच्या चौथ्या अध्यायात दिलेल्या घटनांविषयीची अधिक माहिती आपल्याला त्याच्या पुढच्या अध्यायात शिकायला मिळते. शास्ते ५:२०, २१ मध्ये म्हटलं आहे: “आकाशातून तारे लढले; त्यांनी आपआपल्या कक्षातून सीसराशी लढाई केली. कीशोन नदीने, त्या पुरातन नदीने, त्या कीशोन नदीने त्यांना वाहून नेले.” या वचनाचा असा अर्थ होतो का, की देवदूतांनी इस्राएली लोकांना युद्धाच्या वेळी मदत केली? किंवा मग युद्धाच्या वेळी तिथे आकाशातून उल्कापात झाला, असा याचा अर्थ होतो? बायबलमध्ये याविषयी अधिक सांगण्यात आलेलं नाही. पण, यहोवाने अगदी योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी जोरदार पाऊस पाडून त्याच्या लोकांचा बचाव केला, या निष्कर्षावर आपण नक्कीच पोहचू शकतो. कारण यामुळेच याबीनचे ९०० रथ चिखलात अडकले आणि इस्राएलच्या १०,००० जणांनी त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवला. पण त्यातल्या एकालाही या विजयाचं श्रेय मिळालं नाही. शास्ते ४:१४, १५ मध्ये आपण वाचतो की तीन वेळा यहोवाला या विजयाचं श्रेय देण्यात आलं आहे.
१० इस्राएली लोकांना विजय मिळाल्यानंतर दबोरा आणि बाराक यांनी यहोवाची स्तुती करत गीत गायिले. पण या गीतादरम्यान त्यांनी आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला. ते म्हणाले: “परमेश्वराचा दूत म्हणतो, मेरोजला शाप द्या त्यातल्या रहिवाश्यांना मोठा शाप द्या; कारण परमेश्वराला साहाय्य करावयास, वीरांविरुद्ध परमेश्वराला साहाय्य करावयास ते आले नाहीत.”—शास्ते ५:२३.
११ दबोरा आणि बाराक यांनी ‘मेरोज’ याचा जो उल्लेख केला ते काय आहे? याविषयी खात्रीने आपण काही म्हणू शकत नाही. पण मेरोजला दिलेला शाप इतका खरा ठरला की आज त्याचं नामोनिशाणही राहिलेलं नाही. ‘मेरोज’ हे असं एखादं नगर असावं जिथल्या लोकांनी बाराकसोबत युद्धात सहभाग घ्यायला नकार दिला असेल. कारण जेव्हा कनानी लोकांविरुद्ध लढण्यासाठी १०,००० लोक स्वेच्छेने आले, त्या वेळी मेरोजच्या लोकांनी या युद्धात सहभाग घेण्यासाठी केलेला आर्जव नक्कीच ऐकला असेल. किंवा अशीही शक्यता आहे, की सीसरा बाराकपासून पळून जात असताना मेरोज या नगरातून गेला असावा. आणि मेरोजमधून जात असताना तिथल्या लोकांना सीसराला पकडण्याची संधी असतानाही त्यांनी तसं केलं नसावं. कल्पना करा, मोठा नावाजलेला क्रूर योद्धा स्वतःचा जीव घेऊन त्यांच्या शहरातून पळत असताना मेरोजमधील लोक पाहत आहेत. त्या लोकांसमोर, योग्य अशी पावलं उचलण्याद्वारे यहोवाच्या कार्यात हातभार लावण्याची चांगली संधी उपलब्ध होती. जर त्यांनी तसं केलं असतं तर त्याबद्दल त्यांना यहोवाकडून नक्कीच प्रतिफळ मिळालं असतं. पण जेव्हा त्यांच्यासमोर यहोवासाठी काही करण्याची संधी उपलब्ध होती, तेव्हा त्यांनी काहीही केलं नाही. धाडसी स्त्री याएल हिच्यापेक्षा मेरोजच्या लोकांची मनोवृत्ती फारच वेगळी होती.—शास्ते ५:२४-२७.
१२ शास्ते ५:९, १० मध्ये आपण पाहतो की स्वेच्छेने पुढे आलेल्या १०,००० जणांची मनोवृत्ती ही युद्धात सहभाग घेण्यासाठी न आलेल्या लोकांपेक्षा खूप वेगळी होती. दबोरा आणि बाराक यांनी, लोकांबरोबर स्वसंतोषाने पुढे आलेल्या इस्राएलच्या अधिपतींची स्तुती केली. स्वेच्छेने पुढे आलेले हे लोक “शुभ्र गर्दभांवर [गाढवांवर] स्वारी” करणाऱ्यांपेक्षा फार वेगळे होते. या शुभ्र गर्दभांवर स्वारी करणारे, स्वसंतोषाने सेवेसाठी पुढे येण्याऐवजी स्वतःला फार महत्त्व देत होते. त्यांचं वर्णन ‘अमूल्य गालिच्यांवर बसणारे,’ ‘वाटेने चालणारे’ असं करण्यात आलं आहे. ते आरामाचं जीवन जगणारे होते. त्यांच्या अगदी उलट, युद्धासाठी स्वेच्छेने पुढे आलेले लोक बाराकसोबत, ताबोरच्या खडकाळ डोंगरात आणि कीशोन खोऱ्यातील दलदलीच्या प्रदेशात लढाईसाठी गेले. आरामाचं जीवन जगण्याची इच्छा असलेल्यांनी, सेवेसाठी स्वेच्छेने पुढे न येण्याद्वारे ज्या संधी गमावल्या होत्या त्यावर विचार करण्याची गरज होती. आज आपल्यालाही यहोवाच्या सेवेसाठी असलेल्या आपल्या मनोवृत्तीचं परीक्षण करण्याची गरज आहे.
१३ इस्राएलच्या ज्या १०,००० लोकांनी स्वेच्छेने युद्धात सहभाग घेतला, त्यांना या सर्व विश्वाचा अधिपती कसा कार्य करतो हे पाहण्याची संधी मिळाली. ‘परमेश्वराच्या विजयाबद्दल’ बोलत असताना, त्यांनी स्वतः पाहिलेल्या गोष्टींविषयी ते इतरांना सांगू शकत होते. (शास्ते ५:११) त्यांच्या अगदी उलट रऊबेन, दान आणि आशेर या कुळातील लोकांनी यहोवाच्या कार्यांना महत्त्व देण्याऐवजी स्वतःच्या धनसंपत्तीचा म्हणजे स्वतःकडे असलेल्या जनावरांचा, जहाजांचा आणि बंदरांचाच जास्त विचार केला. (शास्ते ५:१५-१७) पण सर्वच कूळ तसे नव्हते. जबुलून व नफताली इथल्या लोकांनी दबोरा आणि बाराक यांना साहाय्य करण्यासाठी “मृत्यूची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घातला.” (शास्ते ५:१८) यहोवाच्या सेवेबद्दल असलेल्या या वेगवेगळ्या मनोवृत्तींपासून आपण एक महत्त्वाचा धडा शिकू शकतो.
“परमेश्वराचा धन्यवाद करा”
१४ यहोवाच्या राज्याला पाठिंबा देण्यासाठी, आज आपण एखाद्या खरोखरच्या युद्धात सहभाग घेत नाही. तर धैर्याने आणि आवेशाने प्रचारकार्य करण्याद्वारे आपण त्याच्या राज्याला आपला पाठिंबा देत असतो. यहोवाच्या कार्यासाठी स्वेच्छेने पुढे येणाऱ्यांची कधी नव्हे इतकी आज गरज आहे. लाखो ख्रिस्ती बंधुभगिनी आणि तरुण लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पूर्णवेळेच्या सेवेसाठी स्वेच्छेने पुढे येत आहेत. उदाहरणार्थ, आज अनेक जण पायनियर सेवा व बेथेल सेवा करत आहेत. तसंच अनेक जण राज्य सभागृह बांधकाम आणि संमेलने व अधिवेशनांमध्ये काम करण्यासाठी पुढे येत आहेत. मंडळीतील काही वडील इस्पितळ संपर्क समितींमध्ये (HLC) आणि अधिवेशनांचं नियोजन करण्यासाठी बरीच मेहनत घेत आहेत. आपण सर्व जण या गोष्टीची खात्री बाळगू शकतो, की जी सेवा आपण करत आहोत त्याची यहोवा खूप कदर करतो. तसंच आपण घेत असलेली मेहनत तो कधीही विसरणार नाही.—इब्री ६:१०.
१५ स्वेच्छेने सेवा करण्याच्या आपल्या मनोवृत्तीचं परीक्षण करण्याची आपल्यालाही गरज आहे. आपण स्वतःला विचारू शकतो: ‘यहोवाच्या सेवेत काम करत असताना मी इतरांवरच कामाचा जास्त भार टाकतो का? यहोवाच्या सेवेऐवजी भौतिक गोष्टींकडे माझा जास्त कल आहे का? मी बाराक, दबोरा, याएल आणि स्वेच्छेने पुढे आलेल्या १०,००० जणांचं अनुकरण करण्याद्वारे, माझ्याकडे जी साधनं उपलब्ध आहेत त्यांचा उपयोग यहोवाच्या सेवेसाठी करतो का? मी जास्त पैसे कमवण्यासाठी आणि चांगलं जीवन जगण्यासाठी दुसऱ्या शहरात किंवा देशात जाण्याचा विचार करत आहे का? असा विचार करताना त्याचा माझ्या कुटुंबावर व मंडळीवर कसा परिणाम होईल, यावर खोलवर विचार करून यहोवाकडे प्रार्थना करत आहे का?’
१६ यहोवाने त्याच्या राज्याला पाठिंबा देण्याची संधी आपल्याला दिली आहे. हा आपल्यासाठी त्याने दिलेला खरोखर एक फार मोठा सन्मान आहे. मनुष्यांना देवाविरुद्ध करण्यासाठी सैतान हा अगदी आदाम आणि हव्वा यांच्या काळापासून प्रयत्न करत आहे. पण जेव्हा आपण यहोवाच्या राज्याला आपला पाठिंबा देतो, तेव्हा आपण यहोवाच्या बाजूने आहोत हे सैतानाला स्पष्टपणे दाखवून देत असतो. यहोवावर असलेला आपला विश्वास आणि त्याच्याप्रती असलेली आपली एकनिष्ठता आपल्याला त्याची सेवा स्वेच्छेने करण्यासाठी प्रेरित करते. आणि यामुळे यहोवाचं मनही आपण आनंदित करत असतो. (नीति. २३:१५, १६) जेव्हा आपण यहोवाच्या आज्ञा पाळतो आणि त्याच्या राज्याला एकनिष्ठपणे पाठिंबा देतो, तेव्हा यहोवा त्याची निंदा करणाऱ्या सैतानाला प्रत्युत्तर देतो. (नीति. २७:११) आपण यहोवाला आज्ञाधारक राहण्याद्वारे खरंतर त्याला अशी एक गोष्ट देत असतो, जी त्याच्या नजरेत फार मौल्यवान आहे. आणि आपल्या आज्ञाधारकतेमुळे त्याला फार आनंदही होतो.
१७ लवकरच या पृथ्वीवर फक्त असेच लोक राहतील, जे यहोवाच्या राज्याला आपला पाठिंबा देतील. त्या काळाची आपण खूप आतुरतेनं वाट पाहात आहोत! आपल्याही भावना दबोरा आणि बाराक यांच्याप्रमाणेच आहेत. ते म्हणाले: “हे परमेश्वरा, तुझे सर्व शत्रू असेच नाश पावोत; पण त्याच्यावर [परमेश्वरावर] प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणाऱ्या सूर्यासमान होवोत.” (शास्ते ५:३१) यहोवा सैतानाच्या या दुष्ट व्यवस्थेचा नाश करेल तेव्हा हे घडेल. जेव्हा यहोवा हर्मगिदोनाची लढाई सुरू करेल, तेव्हा या युद्धात सहभाग घेण्यास स्वेच्छेने पुढे येणाऱ्या मानवी सेवाकांची गरज पडणार नाही. त्याऐवजी आपण “स्थिर उभे” राहून ‘परमेश्वर आपले तारण’ कसे करेल ते पाहू. (२ इति. २०:१७) पण तोपर्यंत यहोवाच्या राज्याला धैर्याने आणि आवेशाने पाठिंबा देण्याची एक अनमोल संधी आपल्याकडे उपलब्ध आहे.
१८ दबोरा आणि बाराक यांनी जे विजयाचं गीत गायिलं त्यात त्यांनी कोणा मानवाला नाही तर यहोवाला महिमा दिला. ते म्हणाले: “लोक स्वसंतोषाने पुढे आले, म्हणून परमेश्वराचा धन्यवाद करा.” (शास्ते ५:१, २) त्याच प्रकारे जेव्हा आपण यहोवाची सेवा करण्यासाठी स्वेच्छेने पुढे येतो, तेव्हा इतरांनाही यहोवाचा धन्यवाद व गौरव करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं.
विश्वासाद्वारे, बाराकने शक्तिशाली सैन्य पराजित केले
कल्पना करा! शत्रू सैन्य आणि तुम्ही आमने-सामने आहात. त्यांच्याजवळ अत्याधुनिक शस्रास्त्रे आहेत आणि ते त्यांचा वापर करण्याच्या तयारीतच आहेत. त्यांच्यापुढे, तुम्ही आणि तुमचे सोबती खरे तर निःशस्त्र आहात.
इस्राएलच्या शास्त्यांच्या काळांत, बाराक, दबोरा आणि १०,००० सहइस्राएलीयांना काहीसा असाच अनुभव आला. शत्रू सैन्य कनानी होते आणि त्यांचा लष्करी अधिकारी सीसरा होता. त्यांच्या शस्रास्त्रात रथांचा समावेश होता ज्यांच्या चाकांना धारदार लोखंडी आऱ्या होत्या. स्थळ होते, ताबोर डोंगर आणि कीशोन नदीचे खोरे. तेथे जे घडले त्यावरून बाराक हा असामान्य विश्वास असलेला मनुष्य होता हे सिद्ध झाले. ही लढाई होईपर्यंत कोणकोणत्या घटना घडल्या त्यांचा आपण जरा विचार करू या.
इस्राएल यहोवाचा धावा करते
बायबलमधल्या शास्ते नावाच्या पुस्तकात, इस्राएलने शुद्ध उपासना करण्याचे वारंवार सोडून दिल्यामुळे त्यांना भोगाव्या लागलेल्या विनाशकारक परिणामांचा अहवाल दिला आहे. प्रत्येक वेळा, जेव्हा जेव्हा इस्राएलांनी देवाच्या दयेची भीक मागितली तेव्हा तेव्हा देवाने एका तारणकर्त्याला नियुक्त करून त्यांना सोडवले—पण पुनःपुन्हा इस्राएलांनी देवाविरुद्ध बंड केले. अशाप्रकारे “एहूद [मवाबी जुलूमापासून सुटका करणारा एक शास्ता] मृत्यु पावल्यावर इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले.” एवढेच नव्हे तर त्यांनी “नवे नवे देव निवडले.” याचा परिणाम काय झाला? “परमेश्वराने याबीन नावाचा कनानाचा राजा जो हासोरात राज्य करीत होता त्याच्या हाती त्यांना दिले; त्याचा सेनापति सीसरा [होता] . . . त्याच्यापाशी नऊशे लोखंडी रथ असून त्याने वीस वर्षे इस्राएल लोकांचा अनन्वित छळ केला, म्हणून त्यांनी परमेश्वराचा धावा केला.”—शास्ते ४:१-३; ५:८.
इस्राएलमधील जीवनाविषयी शास्त्रवचने म्हणतात, की त्या “काळी राजमार्ग सुने पडले; वाटसरू आडमार्गांनी प्रवास करीत. . . . इस्राएलात कोणी नेते उरले नव्हते.” (शास्ते ५:६, ७) रथांतून येणाऱ्या लुटारूंची लोकांना भीती वाटत असे. एक विद्वान म्हणतात: “इस्राएलमधील लोकांवर भीतीचे सावट पसरले होते. अख्खा समाज गर्भगळीत व असाहाय झाला होता.” त्यामुळे, या नाउमेद इस्राएली लोकांनी पूर्वीप्रमाणेच यहोवाकडे मदतीसाठी याचना केली.
यहोवा नेता नियुक्त करतो
कनान्यांचा जुलूम संपूर्ण इस्राएली राष्ट्राकरता एक पीडा होता. देवाने संदेष्ट्री दबोरा हिच्याद्वारे आपले न्यायदंड आणि आपल्या सूचना व्यक्त केल्या. अशाप्रकारे यहोवाने तिला इस्राएलमध्ये एक लाक्षणिक माता होण्याचा सुहक्क दिला.—शास्ते ४:४; ५:७.
दबोराने बाराकला बोलावून आणले आणि त्याला म्हटले: “तू नफताली व जबुलून ह्यांच्यातले दहा हजार पुरुष बरोबर घेऊन ताबोर डोंगराकडे कूच करून जा अशी आज्ञा इस्राएलचा देव परमेश्वर ह्याने तुला केली आहे ना? तो म्हणतो, ‘याबीनाचा सेनापति सीसरा आपले रथ व आपले सर्व लष्कर घेऊन तुझ्याकडे कीशोन नदीपर्यंत येईल असे मी करीन, आणि त्याला तुझ्या हाती देईन.’” (शास्ते ४:६, ७) ‘यहोवाने अशी आज्ञा केली आहे’ असे म्हणण्याद्वारे दबोराने हे स्पष्ट केले की ती बाराकवर कसलाही अधिकार गाजवत नव्हती. तिने केवळ देवाची आज्ञा जाहीर करण्याचे एक माध्यम म्हणून कार्य केले. बाराकची प्रतिक्रिया काय होती?
बाराक तिला म्हणाला: “तू माझ्याबरोबर येशील तरच मी जाईन, नाहीतर जाणार नाही.” (शास्ते ४:८) देवाकडून आलेली ही जबाबदारी घेण्यास बाराक कुचराई का करत होता? तो भितरटाप्रमाणे कार्य करत होता का? देवाच्या अभिवचनांवर त्याचा विश्वास नव्हता का? नाही. बाराकने त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी झटकली नाही किंवा त्याने यहोवाची आज्ञा मोडली नाही. तर देवाची आज्ञा स्वतःहून पूर्ण करण्यास आपण अपुरे आहोत ही भावना त्याच्या प्रतिक्रियेवरून सूचित होते. देवाचा प्रतिनिधी सोबत असला तर देवाचे मार्गदर्शन आपल्याला खात्रीने मिळेल आणि त्याच्याठायी व त्याच्याबरोबरच्या लोकांमध्ये भरवसा निर्माण होईल हे त्याला माहीत होते. यास्तव, बाराकची ही मनोवृत्ती कमजोरीचे नव्हे तर भक्कम विश्वासाचे चिन्ह होती.
बाराकच्या प्रतिक्रियेची तुलना, मोशे, गिदोन आणि यिर्मया यांनी दाखवलेल्या प्रतिक्रियेशी करता येईल. देवाने दिलेली नियुक्ती आपण पार पाडू शकतो असा आत्मविश्वास या लोकांमध्येही नव्हता. पण म्हणून त्यांना कमी विश्वासू लेखण्यात आले नाही. (निर्गम ३:११–४:१७; ३३:१२-१७; शास्ते ६:११-२२, ३६-४०; यिर्मया १:४-१०) आणि दबोराच्या मनोवृत्तीविषयी काय म्हणता येईल? तिने सर्व गोष्टींवर स्वतःचाच अधिकार गाजवण्याचा प्रयत्न केला नाही. तर ती यहोवाची नम्र सेविका राहिली. तिने बाराकला म्हटले: “मी तुझ्याबरोबर अवश्य येईन.” (शास्ते ४:९) सर्वात सुरक्षित ठिकाण असलेले आपले घर सोडून अगदी तोंडावर आलेल्या युद्धात बाराकबरोबर जाण्यास ती तयार झाली. दबोरानेसुद्धा विश्वास आणि धैर्याचे अतिउत्तम उदाहरण मांडले आहे.
विश्वासाने ते बाराकबरोबर जातात
इस्राएली सैन्याला ताबोर डोंगरावर भेटायचे होते. हे ठिकाण अतिशय उत्तम होते. जवळपास राहणाऱ्या नफताली व जबुलून कुळातल्या लोकांसाठी हे भेटण्याचे नैसर्गिक ठिकाण होते. यास्तव, देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे दहा हजार स्वयंसेवक आणि दबोरा बाराकबरोबर या डोंगरावर गेले.
बाराकबरोबर गेलेल्या सर्वांना विश्वास दाखवण्याची गरज होती. यहोवाने तर बाराकला कनान्यांवर विजय मिळेल असे वचन दिले होते, पण या इस्राएलीयांजवळ कोणती शस्त्रास्रे होती? शास्ते ५:८ मध्ये म्हटले आहे: “इस्राएलातील चाळीस हजारांमध्ये एकाजवळ तरी ढाल किंवा भाला दृष्टीस पडला” नाही. म्हणजे, इस्राएली लोकांजवळ फार कमी शस्त्रे होती. लोखंडी आऱ्यांची चाके असलेल्या रथांच्या सैन्यापुढे ढाली आणि भालेसुद्धा कमीच वाटली असती. बाराक ताबोर डोंगर चढून आला आहे हे सीसरा याला कळल्याबरोबर त्याने आपल्या एकंदर लोखंडी रथांना व सैन्यदलाला कीशोन नदीवर येण्याचा हुकूम दिला. (शास्ते ४:१२, १३) पण सीसरा हे विसरून गेला होता, की तो सर्वसमर्थ देवाविरुद्ध लढायला चालला होता.
बाराक सीसराच्या सैन्याची दाणादाण करतो
शत्रूच्या समोर आल्यावर दबोरा बाराकला म्हणते: “ऊठ, आजच परमेश्वराने सीसराला तुझ्या हाती दिले आहे; परमेश्वर तुझ्यापुढे निघाला आहे ना?” बाराकला आणि त्याच्या सैन्याला ताबोर डोंगराच्या उतारावरून खोऱ्याच्या पठारात उतरायचे होते; अशा वेळी सीसराच्या रथांना आपल्या शत्रूंचा नाश करण्याची चांगली संधी मिळणार होती. तुम्ही जर बाराकच्या सैन्यदलात असता तर तुम्हाला कसे वाटले असते? यहोवाकडून सूचना मिळाली आहे ही गोष्ट आठवणीत ठेवून तुम्ही मिळालेली आज्ञा पाळली असती का? बाराक आणि त्याच्या दहा हजार वीरांनी आज्ञेचे पालन केले. आणि “परमेश्वराने सीसरा, त्याचे सर्व रथ व सर्व सेना ह्यांचा बाराकासमोर तरवारीने धुव्वा उडविला.”—शास्ते ४:१४, १५.
यहोवा पाठीशी असल्यामुळे बाराकने सीसराच्या सैन्याचा पराभव केला. युद्धाविषयीच्या अहवालात जे घडले त्याचे सविस्तर वर्णन देण्यात आलेले नाही. पण, बाराक आणि दबोराने गायिलेल्या विजय गीतात असे म्हटले होते, की ‘आकाशाने व मेघांनी जलबिंदू गाळले.’ कदाचित, तेथे जोराचा पाऊस झाला असेल ज्यामुळे सीसराची रथे चिखलात रूतून बसली व याचा बाराकने फायदा घेतला. अशाप्रकारे कनान्यांचे मुख्य आक्रमक शस्त्रच अर्थात त्यांची रथेच निकामी ठरली. सीसराच्या सैनिकांच्या शवांविषयी गीतात असे म्हटले होते, की “कीशोन नदीने त्यांना वाहून नेले.”—शास्ते ५:४, २१.
पण हे विश्वसनीय आहे का? कीशोन नदीचे खोरे म्हणजे एक लहानसे ओहळ होते जेथून खूप कमी पाणी वाहत होते. पण वादळ आणि खूप वेळ मुसळधार पाऊस पडत राहिला तर असे ओहळ वाढून पाण्याचे जलद व भयानक लोट बनण्याची शक्यता असते. पहिल्या महायुद्धाच्या वेळी याच भागातील कडक मातीवर केवळ १५ मिनिटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोणत्याही लष्करी कारवाया करणे मुश्किल झाले होते. एप्रिल १६, १७९९ रोजी ताबोर डोंगरावर नेपोलियन आणि तुर्क लोकांमधील युद्धाच्या अहवालात असे म्हटले होते, की “पठाराच्या एका भागावरून फुगलेली कीशोन नदी पार करण्याचा प्रयत्न करताना पुष्कळ तुर्की लोक बुडून मरण पावले.”
यहुदी इतिहासकार फ्लेवियस जोसिफस असा दावा करतो, की सीसरा आणि बाराकच्या सैन्यांची अमोरासमोर भेट होणार इतक्यात “आकाशातून मुसळधार पाऊस आणि गारांच्या वर्षावासहित एक मोठे वादळ आले, कनान्यांच्या दिशेने वारा आणि पाऊस पडत होता ज्यामुळे त्यांना समोरचे काहीच दिसेनासे झाले, त्यांच्या बाणांचा आणि त्यांच्या गोफांचा काहीच उपयोग झाला नाही.”
शास्ते ५:२० मध्ये म्हटले आहे, की “आकाशांतून तारे लढले; त्यांनी आपआपल्या कक्षातून सीसराशी लढाई केली.” तारे सीसराशी कसे लढले? या वाक्यावरून देवाकडून साहाय्य मिळाल्याचे सूचित होते, असे काहींचे म्हणणे आहे. इतर काहींचे म्हणणे आहे, की हे देवदूतांकडून मिळालेल्या साहाय्याला, उल्कापाताला किंवा सीसरा ज्यांच्यावर अवलंबून होता त्या खोट्या ठरलेल्या फलज्योतिष भविष्यांना सूचित करते. तारे हे युद्ध कसे लढले याविषयी बायबलमध्ये कसलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नसल्यामुळे, इस्राएलच्या सैन्याला देवाकडून कोणत्यातरी प्रकारे साहाय्य मिळाले असे आपण त्या वरील वाक्याचा अर्थ समजू शकतो. इस्राएलांनी मात्र परिस्थितीचा पूर्ण फायदा घेतला हे खरे आहे. “बाराकाने . . . रथांचा व सैन्याचा पाठलाग केला; आणि सीसराची सर्व सेना तरवारीने पडली; त्यातला एकहि वाचला नाही.” (शास्ते ४:१६) लष्करी अधिकारी सीसराचे काय झाले?
जुलूम करणारा “स्त्रीच्या हाती” सापडतो
बायबल म्हणते: “सीसरा मात्र [युद्ध सोडून] केनी हेबेर ह्याची बायको याएल हिच्या डेऱ्याकडे पायी पळून गेला; कारण हासोराचा राजा याबीन आणि केनी हेबेराचे घराणे ह्यांचे सख्य होते.” याएलने थकून आलेल्या सीसराला डेऱ्यात बोलवले, त्याला दूध प्यायला दिले आणि त्याने झोपून जावे म्हणून त्याच्या अंगावर कांबळी टाकली. याएलने मग, डेऱ्यात राहणारे लोक सहसा वापरत असलेली “डेऱ्याची मेख आणि हातोडा हाती” घेतला. “आणि पाय न वाजविता त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलात ती मेख ठोकली; ती आरपार जाऊन जमिनीत रुतली. तो थकून गेल्यामुळे त्याला गाढ झोप लागली होती; अशा प्रकारे तो मेला.”—शास्ते ४:१७-२१.
सीसराचा पाठलाग करीत आलेल्या बाराकला नंतर याएल भेटायला बाहेर आली आणि त्याला म्हणाली: “चला, ज्या माणसाचा तुम्ही शोध करीत आहा तो मी तुम्हाला दाखवते.” अहवालात पुढे म्हटले आहे: “तो तिच्याबरोबर आत जाऊन पाहतो तो सीसरा मरून पडला होता आणि त्याच्या कानशिलात मेख ठोकलेली होती.” बाराकसाठी किती हा विश्वास मजबूत करणारा अनुभव ठरला असावा! पूर्वी संदेष्ट्री दबोराने त्याला सांगितले होते: “ह्या तुझ्या स्वारीत तुझी प्रतिष्ठा होणार नाही, कारण परमेश्वर सीसरा ह्याला एका स्रीच्या हाती देणार आहे.”—शास्ते ४:९, २२.
पण याएलने जे केले त्याला विश्वासघात म्हणता येईल का? यहोवाच्या नजरेत तो विश्वासघात नव्हता. बाराक आणि दबोराच्या विजय गीतात म्हटले आहे, की “डेऱ्यांत राहणाऱ्या सर्व स्त्रियांमध्ये ती धन्य!” या गीताद्वारे आपल्याला सीसराच्या मृत्यूविषयीचा उचित दृष्टिकोन बाळगण्यास मदत होते. या गीतात असे दर्शवण्यात आले आहे, की सीसराची आई युद्धातून त्याच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. ती विचारते: “त्याचा रथ यावयाला एवढा उशीर का झाला?” तिच्या मनात होणारी घालमेल पाहून ‘तिच्या चतुर सख्या’ तिला शांत करण्याचा प्रयत्न करून म्हणतात की, सीसरा कदाचित युद्धात मिळालेल्या लुटीची—भरजरी रंगीबेरंगी वस्त्रे आणि वीरांसाठी कुमारिका—यांची वाटणी करत असल्यामुळे त्याला उशीर होत आहे. या सख्या विचारतात: “त्यांना लूट मिळाली की नाही? त्यांनी लूट वाटून घेतली की नाही? शूरांतल्या प्रत्येकाला एक मुलगी दोन मुली मिळाल्या की नाहीत? सीसराला रंगीत वस्रांची लूट, . . . दोहींकडून काढलेल्या कशिद्याच्या रंगीत वस्रांची लूट मिळाली; ती लुटणाऱ्यांची आपल्या मानांवर घातली आहे की नाही?”—शास्ते ५:२४, २८-३०, पं.र.भा.
आपण कोणता धडा शिकतो?
बाराकचा अहवाल आपल्याला महत्त्वपूर्ण धडे शिकवतो. जे लोक यहोवाला आपल्या जीवनातून वेगळे करतात त्यांना समस्यांचा व निराशेचा हमखास सामना करावा लागतो. परंतु जे पश्चात्तापबुद्धीने यहोवाकडे पुन्हा वळतात आणि त्याच्यावर भरवसा ठेवतात त्यांची विविध प्रकारच्या जुलूमांपासून सुटका होते. तेव्हा आपण आज्ञाधारकतेचा आत्मा विकसित करू नये का? देवाच्या अपेक्षा मानवी तर्काच्या विरुद्ध जातात तेव्हाही आपण ही खात्री बाळगू शकतो, की देवाच्या सूचना या नेहमी आपल्याच भल्यासाठी आहेत. (यशया ४८:१७, १८) यहोवावर विश्वास ठेवल्यामुळे आणि त्याच्याकडून येणाऱ्या सूचनांचे पालन केल्यामुळेच बाराकने “परक्यांची सैन्ये पळविली.”—इब्री ११:३२-३४.
दबोरा आणि बाराकच्या गीताचा हृदयस्पर्शी शेवट असा आहे: “हे परमेश्वरा, तुझे सर्व शत्रु असेच नाश पावोत; पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणाऱ्या सूर्यासमान होवोत.” (शास्ते ५:३१) यहोवा जेव्हा सैतानाच्या दुष्ट जगाचा नाश करेल तेव्हा हे शब्द किती खरे ठरतील!
‘सगळ्या स्त्रियांमध्ये आशीर्वादित!’
हर्मगिदोनची आतुरतेने वाट पाहा!
३ प्रकटीकरण १६:१४, १६ वाचा. “हर्मगिदोन” हा शब्द बायबलमध्ये फक्त एकदाच येतो आणि तो ज्या मूळ इब्री शब्दापासून आला आहे त्याचा अर्थ “मगिद्दोचे पर्वत” असा होतो. (प्रकटी. १६:१६, तळटीप) मगिद्दो हे प्राचीन इस्राएलमध्ये असलेलं एक शहर होतं. (यहो. १७:११) पण हर्मगिदोन खरोखरच्या ठिकाणाला सूचित करत नाही. खरंतर, हर्मगिदोन एका अशा परिस्थितीला सूचित करतं ज्यात पृथ्वीवरील राजांना “सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या युद्धासाठी एकत्र” करणं सामील आहे. (प्रकटी. १६:१४) पण या लेखात “हर्मगिदोन” हा शब्द पृथ्वीवरच्या राजांना एकत्र केल्यानंतर लगेच जे युद्ध सुरू होईल त्याला सूचित करण्यासाठीही वापरण्यात आला आहे. हर्मगिदोन हे लाक्षणिक ठिकाण आहे हे आपण कशावरून म्हणू शकतो? याची आपण तीन कारणं पाहू या. पहिलं म्हणजे, मगिद्दोचं पर्वत हे खरोखरचं नसून लाक्षणिक आहे. दुसरं म्हणजे, मगिद्दोच्या आसपासची जागा खूप लहान आहे आणि त्यात “संबंध पृथ्वीवरील” राजे त्यांच्या सैन्यासोबत आणि हत्यारांसोबत एकत्र येऊ शकत नाहीत. तिसरं कारण म्हणजे, जेव्हा जगभरातील राजे देवाच्या लोकांवर हल्ला करतील तेव्हा हर्मगिदोनची सुरुवात होईल. पण देवाचे लोक तर संपूर्ण पृथ्वीवर पसरलेले आहेत. त्यामुळे हा हल्ला एका विशिष्ट ठिकाणी होणार नाही.
४ यहोवाने त्याच्या शेवटच्या मोठ्या युद्धाचा संबंध मगिद्दोशी का जोडला? मगिद्दो आणि त्याच्या जवळपास असलेल्या इज्रेलच्या खोऱ्यात बरीच युद्धं लढली गेली. यांपैकी काही युद्धात यहोवा आपल्या लोकांच्या वतीने लढला होता. उदाहरणार्थ, “मगिद्दोच्या जलप्रवाहांपाशी” यहोवाने इस्राएलचा शास्ता बाराक याला सीसराच्या कनानी सैन्याला हरवायला मदत केली. चमत्कारिक रीत्या हा विजय मिळवून दिल्याबद्दल बाराक आणि संदेष्ट्री दबोरा यांनी यहोवाचे आभार मानले. त्यांनी गीतात म्हटलं: “आकाशांतून तारे लढले; त्यांनी . . . सीसराशी लढाई केली. कीशोन नदीने . . . त्यांना वाहून नेले.”—शास्ते ५:१९-२१.
५ बाराक आणि दबोरा यांनी आपल्या गीताचा शेवट पुढील शब्दांनी केला: “हे परमेश्वरा, तुझे सर्व शत्रू असेच नाश पावोत; पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणाऱ्या सूर्यासमान होवोत.” (शास्ते ५:३१) हर्मगिदोनमध्ये देवाच्या विरोधकांचीही हीच दशा होईल. मात्र देवावर प्रेम करणाऱ्या लोकांना वाचवलं जाईल. पण आधीच्या आणि हर्मगिदोनच्या युद्धामध्ये एक महत्त्वाचा फरक असेल. हर्मगिदोनमध्ये देवाच्या लोकांना लढावं लागणार नाही. त्यांच्याजवळ तर हत्यारंदेखील नसतील. याउलट ते शांत राहतील आणि यहोवा व त्याच्या स्वर्गीय सैन्यावर पूर्ण भरवसा ठेवतील.—यश. ३०:१५; प्रकटी. १९:११-१५.
६ यहोवा आपल्या शत्रूंचा हर्मगिदोनमध्ये विनाश कसा करेल? तो असं वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. उदाहरणार्थ, तो भूकंपांचा, गारांचा किंवा विजांचा उपयोग करून असं करू शकतो. (ईयो. ३८:२२, २३; यहे. ३८:१९-२२) तसंच, तो त्याच्या शत्रूंना आपसातच लढायला लावू शकतो. (२ इति. २०:१७, २२, २३) किंवा तो दुष्ट लोकांचा नाश करण्यासाठी आपल्या देवदूतांचाही उपयोग करू शकतो. (यश. ३७:३६) शत्रूंचा विनाश करण्यासाठी यहोवाने कोणतीही पद्धत वापरली, तरी शेवटी त्याचाच विजय होईल. त्याच्या सर्व शत्रूंचा विनाश होईल आणि नीतिमान लोकांना वाचवलं जाईल.—नीति. ३:२५, २६.
इन्साइट “हेबेर” क्र. २
हेबेर
२. याएलचा (जिने याबीनच्या सेनापतीला, सीसराला ठार मारलं) पती आणि होबाबचा वंशज असलेला एक केनी माणूस. होबाब हा “मोशेचा सासरा” होता. हेबेर हा आपल्या केनी लोकांपासून वेगळा झाला होता आणि हासोरचा राजा याबीन याच्याशी त्याचे चांगले नातेसंबंध होते.—शास ४:११, १७, २१; ५:२४.
टेहळणी बुरूज०८ १०/१५ १४-१५ ¶१२-१५
एका मनःपूर्वक प्रार्थनेला यहोवाचे उत्तर
१२ शत्रू राष्ट्रांचे मनसुबे निष्फळ करण्याचे सामर्थ्य यहोवाजवळ आहे याविषयी स्तोत्रकर्ता पूर्ण भरवसा व्यक्त करतो. ८३ व्या स्तोत्रात तो मगिद्दो या प्राचीन शहरापासून काही अंतरावर इस्राएलांनी आपल्या शत्रूंवर मिळवलेल्या दोन निर्णायक विजयांचा उल्लेख करतो. मगिद्दो शहर, याच नावाच्या एका खोऱ्यात वसलेले होते. उन्हाळ्यात, किशोन नदीचे कोरडे झालेले नागमोडी पात्र या खोऱ्यात स्पष्ट दिसते. हिवाळ्यात पाऊस पडल्यावर मात्र ही नदी दुथडी भरून वाहते. म्हणूनच कदाचित या नदीला ‘मगिद्दोचे जलप्रवाह’ असेही म्हणण्यात आले आहे.—शास्ते ४:१३; ५:१९.
१३ मगिद्दो खोऱ्यापासून १५ किलोमीटर अंतरावर मोरे नावाची टेकडी आहे. गिदोन शास्त्याच्या काळात याच टेकडीजवळ मिद्यानी, अमालेकी व पूर्वेकडील लोक लढाईकरता एकत्र आले होते. (शास्ते ७:१, १२) गिदोनाच्या लहानशा सैन्यात केवळ ३०० माणसे होती. पण यहोवाच्या साहाय्याने त्यांनी एका मोठ्या सैन्याला पराभूत केले. कसे? देवाने सांगितल्यानुसार त्यांनी रात्रीच्या वेळी शत्रूच्या छावणीला वेढा घातला. त्यांच्या हातात मातीचे घडे होते व त्यांत मशाली होत्या. गिदोनाने इशारा देताच सर्वांनी आपापल्या हातातील मातीचा घडा फोडला. तेव्हा घड्यांत लपवलेल्या मशाली रात्रीच्या अंधारात अकस्मात प्रकाशल्या. त्याच वेळी त्यांनी आपली रणशिंगे फुंकून असा घोष केला: “[यहोवाची] तरवार व गिदोनाची तरवार!” हे सर्व पाहून त्यांचे शत्रू गोंधळात पडले आणि ते एकमेकांनाच तरवारीने मारू लागले; जे बचावले ते यार्देन नदीच्या पलीकडे पळून गेले. यादरम्यान, शत्रूंचा पाठलाग करण्यात इतरही इस्राएली सामील झाले. शत्रू सैन्यातील एकूण १,२०,००० सैनिकांचा वध करण्यात आला.—शास्ते ७:१९-२५; ८:१०.
१४ मोरे टेकडीपासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर मगिद्दो खोऱ्याच्या पलीकडे ताबोर डोंगर आहे. येथे एकदा शास्ता बाराक याने हासोराचा कनानी राजा याबीन याच्या सैन्याचा सामना करण्यासाठी १०,००० इस्राएली सैनिकांना एकत्रित केले होते. राजा याबीनाच्या सैन्याचे नेतृत्त्व त्याचा सेनापती सीसरा करत होता. या कनानी सैन्यात ९०० रथ होते, ज्यांच्या चाकांना लोखंडाच्या धारदार पाती बसवलेल्या होत्या. इस्राएलाच्या सैन्याजवळ मात्र फारशी शस्त्रास्त्रे नव्हती. इस्राएलाचे सैन्य ताबोर डोंगरावर एकत्रित झाल्याची खबर मिळताच सीसराने आपले सैन्य खोऱ्यात जमा केले. मग, ‘परमेश्वराने सीसरा, त्याचे सर्व रथ व सर्व सेना ह्यांचा तरवारीने धुव्वा उडविला.’ कदाचित अचानक आलेल्या पावसामुळे कीशोन नदीला पूर येऊन रथाची चाके चिखलात रुतली असावीत. सीसराच्या सगळ्या सैन्याचा इस्राएलाने संहार केला.—शास्ते ४:१३-१६; ५:१९-२१.
१५ स्तोत्रकर्त्याच्या काळात इस्राएल राष्ट्रावर डोळा ठेवून असलेल्या राष्ट्रांचा यहोवाने याच प्रकारे पराजय करावा अशी स्तोत्रकर्ता विनंती करतो. तो प्रार्थना करतो: “मिद्यानाला आणि सीसरा व याबीन ह्यांना कीशोन नदीजवळ तू जसे केले, तसे त्यांना कर; ते एन-दोर येथे नाश पावले; ते शेताला खत झाले.” (स्तो. ८३:९, १०) लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे, सैतानाच्या जगाविरुद्ध देवाच्या शेवटल्या लढाईला हर्मगिदोन (म्हणजेच, मगिद्दो पर्वत) असे नाव देण्यात आले आहे. या नावावरून आपल्याला मगिद्दोजवळ झालेल्या निर्णायक लढायांची आठवण होते. प्राचीन काळातील त्या लढायांमध्ये यहोवाला मिळालेल्या विजयातून आपल्याला आश्वासन मिळते की हर्मगिदोनाच्या लढाईतही विजय यहोवाचाच होईल.—प्रकटी. १६:१३-१६.
टेहळणी बुरूज१५ ८/१ १५ ¶३
“आई म्हणून मी त्यांचा सांभाळ केला”
नंतर, बाराक सीसराला शोधत याएलच्या तंबूकडे आला, तेव्हा सीसरा मरून पडलाय हे याएलने त्याला दाखवला. तिने सीसराच्या कानशिलात तंबूचा खिळा ठोकून त्याला मारून टाकलं होतं. बाराकने हे पाहिले तेव्हा त्याच्या लक्षात आलं, की दबोराची भविष्यवाणी खरी ठरली आहे. एका स्त्रीने एका शूर योद्ध्याला ठार केलं होतं! आजच्या काळातल्या टीकाकारांनी आणि संशय घेणाऱ्यांनी याएलला एक दुष्ट आणि वाईट स्त्री म्हटलंय. पण याएल कशी होती हे बाराक आणि दबोरा यांना चांगलं माहीत होतं. तिने दाखवलेल्या धाडसाबद्दल त्यांनी देवाच्या प्रेरणेने आपल्या गीतात याएलला “सगळ्या स्त्रियांमध्ये आशीर्वादित” असं म्हटलं. (शास्ते ४:२२; ५:२४) इथे दबोराचा मोठेपणा दिसून येतो. याएलची स्तुती झाल्याबद्दल तिचा जळफळाट झाला नाही. उलट, यहोवाचा शब्द खरा ठरला याचा तिला आनंद झाला.
बायबलमधून प्रश्नांची उत्तरं लेख १६१
बायबलमधल्या स्रियांकडून आपण काय शिकू शकतो?
बायबलचं उत्तर
बायबलमध्ये अशा बऱ्याच स्त्रियांबद्दल सांगितलंय, ज्यांच्याकडून आपण मौल्यवान धडे शिकू शकतो. (रोमकर १५:४; २ तीमथ्य ३:१६, १७) या लेखात त्यांपैकी काही स्त्रियांबद्दल थोडक्यात सांगण्यात आलंय. त्यांतल्या बऱ्याच जणींकडून आपण चांगल्या गोष्टी शिकू शकतो, तर इतर काही स्त्रियांकडून आपण कसं वागू नये हे शिकू शकतो.—१ करिंथकर १०:११; इब्री लोकांना ६:१२.
अबीगईल
अबीगईल कोण होती? अबीगईल नाबालची बायको होती. नाबाल एक श्रीमंत पण उद्धट माणूस होता. त्याउलट, अबीगईल समजदार आणि नम्र होती. ती दिसायला सुंदर होती आणि तिच्यात यहोवाला आवडणारे गुण होते.—१ शमुवेल २५:३.
तिने काय केलं? आपल्या घरावरचं संकट टाळण्यासाठी अबीगईल समजदारीने वागली. ती आणि नाबाल अशा ठिकाणी राहत होते, जिथे इस्राएलचा भावी राजा दावीद लपला होता. तो शौलपासून आपला जीव मुठीत घेऊन पळत होता. जोपर्यंत दावीद आणि त्याची माणसं तिथे होती, तोपर्यंत त्यांनी नाबालच्या कळपाचं लुटारूंपासून रक्षण केलं. पण जेव्हा दावीदने काही माणसांना नाबालकडे अन्न मागायला पाठवलं, तेव्हा त्याने त्यांचा अपमान केला आणि त्यांना अन्न द्यायला नकार दिला. याचा दावीदला खूप राग आला. म्हणून तो आणि त्याची माणसं नाबाल आणि त्याच्या घराण्यातल्या सर्व पुरुषांना मारून टाकायला निघाले.—१ शमुवेल २५:१०-१२, २२.
आपल्या नवऱ्याने काय केलंय हे जेव्हा अबीगईलला कळलं, तेव्हा ते संकट टाळण्यासाठी तिने लगेच पाऊल उचललं. तिने तिच्या सेवकांच्या हाती दावीद आणि त्याच्या माणसांसाठी भरपूर अन्नसामग्री पाठवली आणि ती स्वतःसुद्धा त्यांच्या मागे दावीदकडे दयेची भीक मागायला गेली. (१ शमुवेल २५:१४-१९, २४-३१) जेव्हा दावीदने अबीगईलने आणलेल्या गोष्टी पाहिल्या, तिची नम्रता पाहिली आणि तिचा सुज्ञ सल्ला ऐकला, तेव्हा देवानेच हे संकट टाळण्यासाठी अबीगईलचा वापर केलाय हे त्याच्या लक्षात आलं. (१ शमुवेल २५:३२, ३३) त्यानंतर लगेच नाबालचा मृत्यू झाला आणि अबीगईल दावीदची बायको बनली.—१ शमुवेल २५:३७-४१.
अबीगईलकडून आपण काय शिकू शकतो? अबीगईल सुंदर आणि श्रीमंत होती, तरी ती स्वतःला श्रेष्ठ समजत नव्हती. जे काही घडलं होतं त्यात तिची काहीच चूक नव्हती, तरीपण शांती टिकवून ठेवण्यासाठी ती माफी मागायला तयार होती. तिच्या घरावर आलेलं भयानक संकट तिने शांतीने, समजदारीने आणि धाडसाने निभावून नेलं.
▸ अबीगईलबद्दल जास्त माहितीसाठी, “ती समंजसपणे वागली” हा लेख पाहा.
दबोरा
दबोरा कोण होती? ती एक संदेष्टी होती. इस्राएलचा देव यहोवा तिच्याद्वारे त्याच्या लोकांना आपली इच्छा कळवायचा. तसंच, इस्राएली लोकांमधल्या समस्या सोडवण्यासाठीही देवाने तिचा वापर केला.—शास्ते ४:४, ५.
तिने काय केलं? दबोरा संदेष्टीने धैर्याने देवाच्या उपासकांना साथ दिली. त्या काळात कनानी लोक इस्राएली लोकांवर जुलूम करायचे. त्यामुळे यहोवाच्या मार्गदर्शनाने दबोराने बाराकला इस्राएलचं सैन्य घेऊन कनानी लोकांशी लढायला सांगितलं. (शास्ते ४:६, ७) जेव्हा बाराकने दबोराला आपल्यासोबत यायला सांगितलं, तेव्हा दबोरा न घाबरता त्याच्यासोबत गेली.—शास्ते ४:८, ९.
देवाने इस्राएली लोकांना मोठा विजय मिळवून दिला. त्या आनंदात दबोरा आणि बाराकने एक गीत गायलं. त्या गीतातले काही बोल दबोराने लिहिले. कनानी लोकांना हरवण्यासाठी याएल नावाच्या धाडसी स्त्रीचाही तिने त्या गीतात उल्लेख केला.—शास्ते, अध्याय ५.
दबोराकडून आपण काय शिकू शकतो? दबोरा एक धाडसी स्त्री होती. तिने स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. तिने इतरांनाही देवाच्या नजरेत चांगल्या गोष्टी करायचं प्रोत्साहन दिलं. आणि जेव्हा त्यांनी तसं केलं, तेव्हा तिने त्यांचं भरभरून कौतुक केलं.
▸ दबोराबद्दल जास्त माहितीसाठी, “दोन शूर स्त्रिया” हा लेख पाहा.
दलीला
दलीला कोण होती? इस्राएलचा न्यायाधीश शमशोन एका स्त्रीच्या प्रेमात पडला. तिचं नाव होतं दलीला.—शास्ते १६:४, ५.
तिने काय केलं? दलीलाने शमशोनला धोका देण्यासाठी पलिष्टी अधिकाऱ्यांकडून पैसे घेतले. देव इस्राएली लोकांना पलिष्ट्यांपासून सोडवण्यासाठी शमशोनचा वापर करत होता. त्याने त्याला शक्ती दिली होती. तशी शक्ती कुठल्याही साधारण व्यक्तीकडे नव्हती. त्यामुळे पलिष्टी लोक त्याच्यावर विजय मिळवू शकत नव्हते. (शास्ते १३:५) म्हणून त्यांनी दलीलाकडून मदत घेतली.
शमशोनची ताकद कशात आहे हे शोधण्यासाठी पलिष्ट्यांनी दलीलाला लाच दिली. मग दलीलाने ते पैसे घेतले आणि बऱ्याच प्रयत्नांनंतर शमशोनचं रहस्य शोधून काढण्यात तिला यश मिळालं. (शास्ते १६:१५-१७) मग तिने ते पलिष्टी लोकांना सांगितलं. आणि त्यांनी शमशोनला पकडलं आणि कैद केलं.—शास्ते १६:१८-२१.
दलीलाकडून आपण काय शिकू शकतो? आपण कसं वागू नये हे दलीलाकडून आपण शिकतो. पैशांसाठी तिने यहोवा देवाच्या सेवकाला फसवलं, त्याचा विश्वासघात केला आणि त्याच्याशी स्वार्थीपणे वागली.
एस्तेर
एस्तेर कोण होती? ती यहुदी होती आणि पर्शियाचा राजा अहश्वेरोश याने तिला आपली पत्नी म्हणून निवडलं होतं.
तिने काय केलं? आपल्या लोकांचा कायमचा नाश होण्यापासून वाचवण्यासाठी एस्तेर राणीने आपल्या अधिकाराचा वापर केला. तिला कळलं की अमुक एका दिवशी पर्शियाच्या साम्राज्यात राहणाऱ्या सर्व यहुदी लोकांना मारून टाकण्याचा शाही फर्मान काढण्यात आला आहे. हे कारस्थान राजाच्या दरबारात मंत्री म्हणून काम करणाऱ्या हामानचं होतं. (एस्तेर ३:१३-१५; ४:१, ५) म्हणून एस्तेरने आपल्या चुलत भावाच्या, मर्दखयच्या मदतीने आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून हामानचं हे कारस्थान अहश्वेरोश राजापुढे उघड केलं. (एस्तेर ४:१०-१६; ७:१-१०) मग अहश्वेरोश राजाने एस्तेर आणि मर्दखयला आणखी एक फर्मान काढण्याची परवानगी दिली. त्या फर्मानामुळे यहुदी लोक स्वतःला शत्रूंपासून वाचवण्यासाठी पाऊल उचलू शकत होते. अशा प्रकारे यहुद्यांनी आपल्या शत्रूंचा समूळ नाश केला.—एस्तेर ८:५-११; ९:१६, १७.
एस्तेरकडून आपण काय शिकू शकतो? धैर्य दाखवण्याच्या बाबतीत, नम्रतेच्या बाबतीत आणि आपली मर्यादा ओळखून वागण्याच्या बाबतीत एस्तेर राणीने खूप सुंदर उदाहरण मांडलं. (स्तोत्र ३१:२४; फिलिप्पैकर २:३) ती खूप सुंदर होती आणि तिच्याजवळ अधिकार होता, तरी तिने दुसऱ्यांचा सल्ला आणि मदत घेतली. आपल्या पतीशी बोलताना ती समजदारीने आणि आदराने, पण धैर्याने बोलली. यहुद्यांचा जीव धोक्यात होता, तेव्हा तिने धाडसाने स्वतःची एक यहुदी म्हणून ओळख करून दिली.
▸ एस्तेरबद्दल जास्त माहितीसाठी, “देवाच्या लोकांसाठी तिनं जिवाची पर्वा केली नाही” आणि “ती सुज्ञ, धैर्यवान आणि निःस्वार्थी होती” हे लेख पाहा.
हव्वा
हव्वा कोण होती? या पृथ्वीवर अस्तित्वात असणारी ती पहिली स्त्री होती. बायबलमध्ये सगळ्यात आधी तिचा उल्लेख वाचायला मिळतो.
तिने काय केलं? हव्वाने देवाची स्पष्ट आज्ञा मोडली. देवाने आदामसारखंच तिलाही परिपूर्ण बनवलं होतं. त्याने तिला इच्छास्वातंत्र्य दिलं होतं. याशिवाय त्याने तिला आपल्यात असलेले प्रेम आणि बुद्धी यांसारखे गुण वाढवण्याची क्षमताही दिली होती. (उत्पत्ती १:२७) देवाने आदामला एका विशिष्ट झाडाचं फळ खाऊ नका अशी आज्ञा दिली आहे हे हव्वाला माहीत होतं. तिला हेही माहीत होतं की त्यांनी ते फळ खाल्लं तर ते मरतील. पण फळ खाल्ल्यामुळे आपण मरणार नाही असं म्हणून सैतानाने तिला फसवलं. तसंच, तिने जर देवाची आज्ञा मोडली तर ती चांगलं आयुष्य जगू शकते यावरही त्याने तिला विश्वास करायला लावलं. त्यामुळे तिने ते फळ खाल्लं आणि आपल्या पतीलाही ते खायला लावलं.—उत्पत्ती ३:१-६; १ तीमथ्य २:१४.
हव्वाकडून आपण काय शिकू शकतो? चुकीच्या इच्छांवर विचार करत राहणं किती धोक्याचं आहे, ही गोष्ट आपल्याला हव्वाच्या उदाहरणातून कळते. तिने देवाची आज्ञा मोडली आणि जे तिचं नव्हतं ते मिळवण्याची तीव्र इच्छा तिने तिच्या मनात वाढू दिली.—उत्पत्ती ३:६; १ योहान २:१६.
हन्ना
हन्ना कोण होती? ती एलकानाची बायको आणि शमुवेलची आई होती. शमुवेल इस्राएल राष्ट्रात, बऱ्याच लोकांच्या ओळखीचा असा एक संदेष्टा बनला.—१ शमुवेल १:१, २, ४-७.
तिने काय केलं? हन्नाच्या लग्नाला बरीच वर्षं होऊनही तिला एकही मूलबाळ नव्हतं. तिला एक सवत होती. तिचं नाव पनिन्ना होतं. पनिन्नाला बरीच मुलं होती. ती हन्नाला नेहमी टोमणे मारायची. त्यामुळे हन्नाला खूप वाईट वाटायचं. म्हणून तिने मनाच्या शांतीसाठी देवाला प्रार्थना केली. तिने आपलं दुःख देवाला सांगितलं आणि त्याला नवस केला. तिने म्हटलं की त्याने जर तिला एक मुलगा दिला, तर ती त्याला उपासना मंडपात सेवा करायला देईल. या उपासना मंडपात (तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेला जायचा) इस्राएली लोक देवाची उपासना करायचे.—१ शमुवेल १:११.
देवाने हन्नाची प्रार्थना ऐकली आणि तिला एक मुलगा झाला. तिने त्याचं नाव शमुवेल ठेवलं. तिने आपला नवस पूर्ण केला आणि शमुवेल लहान असतानाच ती त्याला उपासना मंडपात सेवा करायला घेऊन गेली. (१ शमुवेल १:२७, २८) दरवर्षी, ती बिनबाह्यांचा झगा बनवायची आणि त्याच्यासाठी घेऊन जायची. काही वर्षांनी, देवाने हन्नाला तीन मुलं आणि दोन मुली देऊन आशीर्वाद दिला.—१ शमुवेल २:१८-२१.
हन्नाकडून आपण काय शिकू शकतो? हन्नाने मनापासून केलेल्या प्रार्थनांमुळे तिला कठीण परिस्थितीत टिकून राहायला मदत मिळाली. तिने प्रार्थनेत देवाचे आभार मानले. ही प्रार्थना आपल्याला १ शमुवेल २:१-१० मध्ये वाचायला मिळते. त्यावरून तिचा देवावर किती मजबूत विश्वास होता हे कळतं.
▸ हन्नाबद्दल जास्त माहितीसाठी, “तिनं देवाजवळ आपलं मन मोकळं केलं” हा लेख पाहा.
▸ देवाने आधीच्या काळात एकापेक्षा जास्त लग्न करण्याची परवानगी का दिली, याचं कारण जाणून घ्यायला १ ऑगस्ट २००३ च्या टेहळणी बुरूज मधला “वाचकांचे प्रश्न” यातले ३-६ परिच्छेद पाहा.
याएल
याएल कोण होती? ती हेबेरची बायको होती. हेबेर इस्राएली नव्हता. याएलने धाडसाने देवाच्या लोकांना साथ दिली.
तिने काय केलं? कनानी सैन्याचा सेनापती सीसरा इस्राएली लोकांसोबत युद्ध हरला. त्यानंतर तो लपण्यासाठी आणि आराम करण्यासाठी ठिकाण शोधत होता. तेव्हा याएलने त्याला आपल्या तंबूत बोलवलं. तो झोपेत असताना तिने त्याला मारून टाकलं. अशा प्रकारे तिने हिंमत दाखवली.—शास्ते ४:१७-२१.
याएलने जे केलं त्यामुळे दबोराने केलेली भविष्यवाणी पूर्ण झाली. दबोराने म्हटलं: “यहोवा एका स्त्रीच्या हातून सीसराला मारून टाकेल.” (शास्ते ४:९) याएलने जे केलं त्यामुळे ती “सगळ्या स्त्रियांमध्ये आशीर्वादित आहे,” असं तिच्याविषयी म्हणण्यात आलं.—शास्ते ५:२४.
याएलकडून आपण काय शिकू शकतो? याएलने पुढाकार घेतला आणि धाडस दाखवलं. तिच्या उदाहरणातून कळतं की देव त्याची भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी घटनांना वळण देऊ शकतो.
ईजबेल
ईजबेल कोण होती? ती इस्राएली राजा अहाबची बायको होती. ती इस्राएली नव्हती आणि यहोवाची उपासकसुद्धा नव्हती. त्याऐवजी ती कनानच्या दैवताची म्हणजे बआलची उपासना करायची.
तिने काय केलं? ईजबेल राणी अधिकार गाजवणारी, निर्दयी आणि हिंसक होती. तिने बआलच्या उपासनेला आणि त्याच्याशी संबंधित अनैतिक लैंगिक कामांना बढावा दिला. तसंच, तिने खऱ्या देवाची, यहोवाची उपासना पूर्णपणे मिटवायचाही प्रयत्न केला.—१ राजे १८:४, १३; १९:१-३.
ईजबेलला हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी ती खोटं बोलायची आणि लोकांचा खूनही करायची. (१ राजे २१:८-१६) देवाने आधीच सांगितल्याप्रमाणे, तिला खूप वाईट मरण आलं आणि तिला पुरण्यातही आलं नाही.—१ राजे २१:२३; २ राजे ९:१०, ३२-३७.
ईजबेलकडून आपण काय शिकू शकतो? ईजबेलच्या वाईट उदाहरणातून आपल्याला एक इशारा मिळतो. ती भ्रष्ट होती आणि हव्या असलेल्या गोष्टी मिळवायला ती कोणत्याही थराला जायची. त्यामुळे निर्लज्ज, अनैतिक, कोणाचाही धाक नसलेली आणि आपण केलेल्या वाईट कामांचा पस्तावा नसलेली एक स्त्री म्हणून तिची ओळख बनली.
लेआ
लेआ कोण होती? ती कुलप्रमुख याकोबची पहिली बायको होती. तिची लहान बहीण राहेल त्याची दुसरी बायको होती.—उत्पत्ती २९:२०-२९.
तिने काय केलं? लेआला याकोबपासून सहा मुलं झाली. (रूथ ४:११) याकोबला लेआऐवजी राहेलशी लग्न करायचं होतं. पण लेआ आणि राहेलच्या वडिलांनी म्हणजे लाबानने फसवून याकोबचं लग्न राहेलऐवजी लेआसोबत लावलं. ही गोष्ट जेव्हा याकोबच्या लक्षात आली तेव्हा त्याने लाबानला जाब विचारला. तेव्हा लाबानने त्याला सांगितलं, की त्यांच्याकडे मोठीच्या आधी धाकटीचं लग्न करण्याची पद्धत नाही. मग एक आठवड्यानंतर त्याने याकोबचं लग्न राहेलसोबत लावून दिलं.—उत्पत्ती २९:२६-२८.
पण याकोबचं लेआपेक्षा राहेलवर जास्त प्रेम होतं. (उत्पत्ती २९:३०) यामुळे आपल्या नवऱ्याचं प्रेम मिळवण्यासाठी ती आपल्या बहिणीशी चढाओढ करायची. देवाने तिच्या वेदनांकडे लक्ष दिलं. त्याने तिला सहा मुलं आणि एक मुलगी देऊन आशीर्वाद दिला.—उत्पत्ती २९:३१.
लेआकडून आपण काय शिकू शकतो? कुटुंबात बऱ्याच समस्या होत्या तरी लेआने देवावर भरवसा ठेवला. ती त्याला प्रार्थना करत राहिली. (उत्पत्ती २९:३२-३५; ३०:२०) तिच्या अहवालावरून स्पष्टपणे कळतं, की एकापेक्षा जास्त लग्न केल्याने कुटुंबात शांती राहत नाही. देवाने जरी काही काळासाठी तसं करायची परवानगी दिली असली, तरी एका पुरुषाने फक्त एकाच स्त्रीशी लग्न करावं हा नियम त्याने सुरुवातीपासूनच ठरवला होता.—मत्तय १९:४-६.
▸ लेआबद्दल जास्त माहितीसाठी, “याकोब हारानला जातो” आणि “याकोबाचं मोठं कुटुंब” हे लेख पाहा.
▸ देवाने आधीच्या काळात एकापेक्षा जास्त लग्न करण्याची परवानगी का दिली, याचं कारण जाणून घ्यायला १ ऑगस्ट २००३ च्या टेहळणी बुरूज मधला “वाचकांचे प्रश्न” यातले ३-६ परिच्छेद पाहा.
मार्था
मार्था कोण होती? ती लाजर आणि मरीयाची बहीण होती. ते तिघं यरुशलेम जवळच्या बेथानी गावात राहायचे.
तिने काय केलं? मार्थाची येशूसोबत चांगली मैत्री होती. “येशूचं मार्थावर, तिच्या बहिणीवर आणि लाजरवर प्रेम होतं.” (योहान ११:५) मार्थाला लोकांचा पाहुणचार करायला आवडायचं. एकदा येशू त्यांच्या घरी आला तेव्हा मरीया त्याचं ऐकत बसली होती, तर मार्था घरातली कामं करत होती. त्या वेळी मरीया आपल्याला मदत करत नाही म्हणून मार्थाने येशूकडे तिची तक्रार केली. पण येशूने प्रेमाने तिचा दृष्टिकोन सुधारला.—लूक १०:३८-४२.
लाजर खूप आजारी पडला तेव्हा मार्था आणि तिच्या बहिणीने येशूकडे निरोप पाठला. त्यांना पक्का भरवसा होता, की तो त्यांच्या भावाला बरं करू शकतो. (योहान ११:३, २१) पण लाजरचा मृत्यू होतो. पुढे मार्था येशूसोबत जे काही बोलते त्यावरून कळतं, की तिचा पुनरुत्थानावर आणि येशू तिच्या भावाला पुन्हा जिवंत करू शकतो यावर पूर्ण भरवसा होता.—योहान ११:२०-२७.
मार्थाकडून आपण काय शिकू शकतो? मार्था पाहुणचार करण्यात मेहनत घ्यायची. तिला मिळालेला सल्ला तिने मनापासून स्वीकारला. ती आपल्या भावनांबद्दल आणि विश्वासाबद्दल मनमोकळेपणाने बोलायची.
▸ मार्थाबद्दल जास्त माहितीसाठी, “मी विश्वास धरला आहे” हा लेख पाहा.
मरीया (येशूची आई)
मरीया कोण होती? ती एक तरुण यहुदी स्त्री होती. तिने चमत्काराने देवाच्या मुलाला, येशूला जन्म दिला होता. त्या वेळी कुठल्याही पुरुषाशी तिचे संबंध आले नव्हते.
तिने काय केलं? मरीयाने नम्रपणे देवाची इच्छा पूर्ण केली. एकदा एका स्वर्गदूताने तिला सांगितलं, की ती गरोदर राहील आणि ज्या मसीहाची लोक बऱ्याच वर्षांपासून वाट बघत आहेत त्याला ती जन्म देईल. त्या वेळी तिचं योसेफसोबत लग्न ठरलं होतं. (लूक १:२६-३३) तिने देवाकडून मिळालेली जबाबदारी मनापासून स्वीकारली. येशूच्या जन्मानंतर मरीयाला योसेफपासून चार मुलं आणि दोन मुली झाल्या असं बायबल म्हणतं. यावरून कळतं की ती आयुष्यभर कुमारी राहिली नाही. (मत्तय १३:५५, ५६) तिला मिळालेली जबाबदारी खास असली, तरी तिने कधीच दुसऱ्यांकडून प्रशंसेची अपेक्षा केली नाही किंवा इतरांनीही तिला खास वागणूक दिली नाही. येशूच्या सेवाकार्याच्या वेळी किंवा ती सुरुवातीच्या ख्रिस्ती मंडळीची सदस्य असतानाही तसं काही झालं नाही.
मरीयाकडून आपण काय शिकू शकतो? मरीया एक विश्वासू स्त्री होती. तिने एक मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी मनापासून स्वीकारली. तिला शास्रवचनांचं चांगलं ज्ञान होतं. असं दिसतं की लूक १:४६-५५ मध्ये तिने जवळपास २० वेळा हिब्रू शास्रवचनातल्या शब्दांचा उल्लेख केला.
▸ मरीयाबद्दल जास्त माहितीसाठी “पाहा! मी प्रभूची दासी!” आणि “तिनं या सर्व गोष्टी आपल्या ‘अंतःकरणात ठेवल्या’” हे लेख पाहा.
मरीया (मार्था आणि लाजरची बहीण)
मरीया कोण होती? आपला भाऊ लाजर आणि बहीण मार्था यांच्यासारखंच तिची येशूसोबत चांगली मैत्री होती.
तिने काय केलं? येशू देवाचा मुलगा आहे यावर मरीयाचा विश्वास होता. तिने बऱ्याचदा येशूबद्दलची कदर व्यक्त केली. तिने पूर्ण भरवशाने म्हटलं की येशू इथे असता तर तिचा भाऊ मेला नसता. तसंच, येशूने लाजरला जिवंत केलं तेव्हा ती तिथे होती. एकदा येशू त्यांच्या घरी आला असताना मरीया त्याचं लक्ष देऊन ऐकत होती. त्या वेळी ती घरातल्या कामांत आपल्याला मदत करत नाहीये, अशी मार्थाने येशूकडे तक्रार केली. पण मरीयाने आध्यात्मिक गोष्टींना जास्त महत्त्व दिलं म्हणून येशूने तिची प्रशंसा केली.—लूक १०:३८-४२.
एकदा मरीयाने येशूच्या डोक्यावर आणि पायांवर ‘मौल्यवान सुगंधी तेल’ ओतून उदार मनाने त्याचा पाहुणचार केला. (मत्तय २६:६, ७) पण तिथे हजर असलेल्या लोकांनी तिची टीका केली. मरीयाने तेल वाया घालवलं असं ते म्हणाले. पण येशूने तिची बाजू घेऊन म्हटलं: “जगात जिथे जिथे आनंदाच्या संदेशाची [देवाच्या राज्याची] घोषणा केली जाईल तिथे तिथे या स्त्रीची आठवण करून, तिने जे केलं तेही सांगितलं जाईल.”—मत्तय २४:१४; २६:८-१३.
मरीयाकडून आपण काय शिकू शकतो? मरीयाने आपला विश्वास मजबूत केला. तिने रोजच्या कामांपेक्षा देवाच्या उपासनेला जास्त महत्त्व दिलं. तसंच, येशूचा सन्मान करण्यासाठी तिने पैशांचा विचार केला नाही; तिने उदारतेने आणि नम्रतेने तसं केलं.
मग्दालीया मरीया
मग्दालीया मरीया कोण होती? ती येशूची विश्वासू शिष्या होती.
तिने काय केलं? येशू आणि त्याच्या शिष्यांनी ठिकठिकाणी प्रवास केला तेव्हा त्यांच्यामध्ये काही स्त्रियाही होत्या. त्यांपैकी एक म्हणजे मग्दालीया मरीया. तिने येशू आणि त्याच्या शिष्यांच्या गरजा भागवण्यासाठी उदारतेने आपला पैसा खर्च केला. (लूक ८:१-३) येशूच्या सेवाकार्याच्या शेवटपर्यंत ती त्याच्यासोबत होती. तसंच, येशूला जेव्हा वधस्तंभावर खिळण्यात आलं तेव्हाही ती तिथे हजर होती. ज्यांनी येशूला पुनरुत्थानानंतर पाहिलं त्यांच्यामध्ये मग्दालीया मरीया पहिली होती. हा खरंच एक बहुमान होता!—योहान २०:११-१८.
मरीयाकडून आपण काय शिकू शकतो? मग्दालीया मरीयाने उदारपणे येशूच्या सेवाकार्याला पाठिंबा दिला आणि ती शेवटपर्यंत विश्वासू राहिली.
मिर्याम
मिर्याम कोण होती? ती मोशे आणि अहरोनची बहीण होती. बायबल म्हणतं, की संदेष्टी म्हणून काम करणारी मिर्याम ही पहिली स्त्री होती.
तिने काय केलं? संदेष्टी या नात्याने ती लोकांना देवाचा संदेश सांगायची. इस्राएली लोकांमध्ये तिचं चांगलं नाव होतं आणि लोक तिचा आदर करायचे. देवाने इजिप्तच्या सैन्याचा तांबड्या समुद्रात नाश केल्यानंतर तिने इस्राएली पुरुषांच्या पाठोपाठ विजय-गीत गायलं.—निर्गम १५:१, २०, २१.
काही काळानंतर मिर्याम आणि अहरोन मोशेविरुद्ध बोलू लागले. गर्विष्ठपणा आणि ईर्षेमुळे त्यांनी तसं केलं. पण देव “ऐकत होता.” त्यामुळे त्याने मिर्याम आणि अहरोनची कडक शब्दांत कानउघाडणी केली. (गणना १२:१-९) असं दिसतं की मिर्यामने आधी मोशेविरुद्ध बोलायला सुरुवात केली होती. त्यामुळे देवाने तिला शिक्षा केली आणि तिला कुष्ठरोग झाला. नंतर मोशेने तिच्यासाठी देवाकडे विनंती केली आणि ती बरी झाली. सात दिवस सर्वांपासून वेगळं ठेवल्यानंतर तिला पुन्हा इस्राएलच्या छावणीत घेण्यात आलं.—गणना १२:१०-१५.
बायबलमधून कळतं की मिर्यामने आपली चूक सुधारली. कारण याच्या बऱ्याच शतकांनंतर देवाने तिच्याबद्दल चांगली गोष्ट सांगितली. त्याने इस्राएली लोकांना आठवण करून दिली, की मिर्यामला एक खास जबाबदारी मिळाली होती. देवाने म्हटलं: “मी मोशे, अहरोन आणि मिर्याम यांना तुमच्याकडे पाठवलं.”—मीखा ६:४.
मिर्यामकडून आपण काय शिकू शकतो? मिर्यामच्या कहाणीवरून कळतं, की देवाचे सेवक आपसांत किंवा एकमेकांबद्दल जे काही बोलतात त्याकडे देवाचं लक्ष असतं. तसंच, आपण हेही शिकतो की देवाला खूश करण्यासाठी आपण गर्व आणि ईर्षेपासून दूर राहिलं पाहिजे; कारण अशा भावना मनात ठेवून इतरांबद्दल बोलल्यामुळे त्यांचं चांगलं नाव खराब होऊ शकतं.
राहेल
राहेल कोण होती? ती लाबानची मुलगी आणि कुलप्रमुख याकोबची आवडती बायको होती.
तिने काय केलं? राहेलचं लग्न याकोबसोबत झालं आणि त्याच्यापासून तिला दोन मुलं झाली. ही मुलं पुढे जाऊन इस्राएलच्या १२ वंशामधल्या दोन वंशाचे कुटुंबप्रमुख बनले. राहेल आपल्या वडिलांच्या मेंढरांची राखण करत असताना आपल्या होणाऱ्या नवऱ्याला भेटली. (उत्पत्ती २९:९, १०) ती आपल्या मोठ्या बहिणीपेक्षा, म्हणजे लेआपेक्षा “खूप देखणी होती.”—उत्पत्ती २९:१७.
पुढे याकोब राहेलच्या प्रेमात पडला आणि तिच्यासोबत लग्न करण्यासाठी तो लाबानकडे सात वर्षं काम करायला तयार झाला. (उत्पत्ती २९:१८) पण लाबानने त्याला फसवलं आणि त्याचं लग्न आपल्या मोठ्या मुलीशी म्हणजे लेआशी लावून दिलं. नंतर मात्र लाबानने याकोबला राहेलसोबत लग्न करायची परवानगी दिली.—उत्पत्ती २९:२५-२७.
याकोबचं लेआ आणि तिच्या मुलांपेक्षा राहेल आणि तिच्या दोन मुलांवर जास्त प्रेम होतं. (उत्पत्ती ३७:३; ४४:२०, २७-२९) त्यामुळे त्या दोन बायकांमध्ये चढाओढ सुरू झाली.—उत्पत्ती २९:३०; ३०:१, १५.
राहेलकडून आपण काय शिकू शकतो? राहेलच्या कुटुंबात समस्या असल्या तरी तिने हार मानली नाही. तिला माहीत होतं, की देव तिच्या प्रार्थना नक्की ऐकेल. (उत्पत्ती ३०:२२-२४) तिच्या कहाणीतून कळतं, की एकापेक्षा जास्त लग्न केल्यामुळे कुटुंबात ताण येऊ शकतो. एका पुरुषाला एकच बायको असावी हा देवाचा विवाहासाठी सुरुवातीपासूनचा स्तर किती योग्य आहे हे राहेलच्या उदाहरणातून कळतं.—मत्तय १९:४-६.
▸ राहेलबद्दल जास्त माहितीसाठी, “याकोब हारानला जातो” आणि “याकोबाचं मोठं कुटुंब” हे लेख पाहा.
▸ देवाने आधीच्या काळात एकापेक्षा जास्त लग्न करण्याची परवानगी का दिली, याचं कारण जाणून घ्यायला १ ऑगस्ट २००३ च्या टेहळणी बुरूज मधला “वाचकांचे प्रश्न” यातले ३-६ परिच्छेद पाहा.
राहाब
राहाब कोण होती? ती एक वेश्या होती. ती कनानच्या यरीहो शहरात राहायची आणि नंतर ती यहोवा देवाची उपासना करू लागली.
तिने काय केलं? राहाबने कनान देशाची पाहणी करायला आलेल्या दोन इस्राएली हेरांना लपवलं. कारण तिने इस्राएलच्या देवाबद्दल, यहोवाबद्दल ऐकलं होतं. यहोवाने त्याच्या लोकांना इजिप्तमधून सोडवलं होतं आणि नंतर अमोरी लोकांच्या हल्ल्यापासून त्यांना वाचवलं होतं, हे सगळं राहाबने ऐकलं होतं.
राहाबने त्या हेरांना मदत केली आणि त्यांना एक विनंतीही केली. ती त्यांना म्हणाली, की ‘तुम्ही जेव्हा यरीहो शहराचा नाश करायला याल तेव्हा मला आणि माझ्या कुटुंबाला मारू नका.’ हेरांनी ही गोष्ट मान्य केली, पण त्यांनी तिच्यासमोर काही अटी ठेवल्या. त्या म्हणजे, तिने यरीहोवर होणाऱ्या हल्ल्याबद्दल कोणाला सांगू नये. तसंच इस्राएली लोक हल्ला करायला आल्यावर तिने आणि तिच्या कुटुंबाने तिच्या घराबाहेर निघू नये. शिवाय, तिचं घर ओळखता यावं म्हणून तिने खिडकीला एक लाल दोर बांधावी. राहाबने या प्रत्येक अटी पाळल्या. त्यामुळे जेव्हा इस्राएली लोकांनी यरीहो शहर काबीज केलं, तेव्हा तिचा आणि तिच्या कुटुंबाचा जीव वाचला.
नंतर राहाबने एका इस्राएली माणसाशी लग्न केलं. ती दावीद राजा आणि येशू ख्रिस्ताची पूर्वज बनली.—यहोशवा २:१-२४; ६:२५; मत्तय १:५, ६, १६.
राहाबकडून आपण काय शिकू शकतो? राहाबने भक्कम विश्वास ठेवण्याच्या बाबतीत जबरदस्त उदाहरण मांडलं असं बायबल सांगतं. (इब्री लोकांना ११:३०, ३१; याकोब २:२५) तिच्या कहाणीतून कळतं, की देव क्षमाशील असण्यासोबतच भेदभावही करत नाही. देवावर भरवसा ठेवणाऱ्यांना तो आशीर्वाद देतो; मग ते कोणतीही भाषा बोलणारे किंवा कोणत्याही देशाचे असो.
▸ राहाबबद्दल जास्त माहितीसाठी, “राहाब गुप्तहेरांना लपवते” हा लेख पाहा.
रिबका
रिबका कोण होती? ती इसहाकची बायको होती. तिला याकोब आणि एसाव नावाची जुळी मुलं होती.
तिने काय केलं? रिबकाने नेहमी देवाची इच्छा पूर्ण केली; मग तसं करणं तिच्यासाठी कठीण असलं तरीही. एकदा विहिरीतून पाणी काढत असताना एका माणसाने तिच्याकडे प्यायला पाणी मागितलं. रिबकाने लगेच त्याला पाणी दिलं. याशिवाय त्या माणसांच्या उंटांनाही पाणी देण्याबद्दल तिने विचारलं. (उत्पत्ती २४:१५-२०) तो माणूस अब्राहामचा सेवक होता आणि अब्राहामचा मुलगा, इसहाक याच्यासाठी मुलगी शोधायला तो बराच लांबचा प्रवास करून आला होता. (उत्पत्ती २४:२-४) तसंच, त्याला या कामात यश मिळावं म्हणून त्याने देवाला प्रार्थनाही केली होती. रिबकाची मेहनत आणि तिचा पाहुणचार बघून देवाने आपल्या प्रार्थनेचं उत्तर दिलं हे त्याला जाणवलं. देवाने एका अर्थी दाखवून दिलं होतं, की इसहाकसाठी रिबकाच योग्य राहील.—उत्पत्ती २४:१०-१४, २१, २७.
अब्राहामचा सेवक तिथे का आला हे जेव्हा रिबकाला कळलं, तेव्हा ती त्याच्यासोबत जायला आणि इसहाकशी लग्न करायला तयार झाली. (उत्पत्ती २४:५७-५९) काही काळाने तिला जुळी मुलं झाली. देवाने तिला सांगितलं होतं की मोठा मुलगा एसाव, धाकट्याची म्हणजे याकोबची सेवा करेल. (उत्पत्ती २५:२३) जेव्हा इसहाक एसावला प्रथमपुत्राचा आशीर्वाद देणार होता, तेव्हा हा आशीर्वाद याकोबला मिळावा म्हणून तिने लगेच पावलं उचलली. कारण तिला माहीत होतं की तो आशीर्वाद याकोबला मिळावा अशी देवाचीच इच्छा आहे.—उत्पत्ती २७:१-१७.
रिबकाकडून आपण काय शिकू शकतो? रिबका मर्यादांची जाणीव असणारी, मेहनती आणि पाहुणचार करणारी स्त्री होती. या गुणांमुळे तिला एक चांगली पत्नी, आई आणि खऱ्या देवाची उपासक बनायला मदत झाली.
▸ रिबकाबद्दल जास्त माहितीसाठी, “रिबका देव-भीरू कष्टाळू स्त्री” हा लेख पाहा.
रूथ
रूथ कोण होती? ती एक मवाबी स्त्री होती. इस्राएलमध्ये यहोवाची उपासना करण्यासाठी तिने आपला देश आणि देव सोडले.
तिने काय केलं? रूथचं आपल्या सासूवर, म्हणजे नामीवर मनापासून प्रेम होतं. एकदा इस्राएलमध्ये दुष्काळ पडल्यामुळे नामी, तिचा नवरा आणि तिची दोन मुलं मवाबला गेले होते. नंतर तिच्या मुलांनी मवाबी स्त्रियांशी लग्न केलं. त्यांचं नाव होतं रूथ आणि अर्पा. काही काळाने नामीच्या पतीचा, दोन मुलांचा मृत्यू झाला आणि त्या तिघी विधवा झाल्या.
मग नामीने परत इस्राएलला जाण्याचा निर्णय घेतला, कारण तिथला दुष्काळ संपला होता. रूथ आणि अर्पासुद्धा तिच्यासोबत निघाल्या. पण नामीने त्या दोघींना त्यांच्या नातेवाइकांकडे परत जायला सांगितलं. त्यामुळे अर्पा परत गेली. (रूथ १:१-६, १५) पण रूथने मात्र तिच्या सासूची साथ सोडली नाही. कारण तिचं नामीवर प्रेम होतं आणि तिला तिच्या देवाची, म्हणजे यहोवाची उपासना करायची होती.—रूथ १:१६, १७; २:११.
रूथ आपल्या सासूच्या गावी बेथलेहेमला गेली. तिथे तिने खूप कमी काळात चांगलं नाव कमावलं. कारण ती खूप मेहनती होती आणि आपल्या सासूची चांगली काळजी घ्यायची. बवाज नावाच्या एका श्रीमंत जमीनदाराला तिचा स्वभाव खूप आवडला. त्यामुळे त्याने रूथ आणि नामीला उदारतेने अन्नधान्य पुरवलं. (रूथ २:५-७, २०) नंतर रूथने बवाजशी लग्न केलं आणि ती दावीद राजा आणि येशू ख्रिस्ताची पूर्वज बनली.—मत्तय १:५, ६, १६.
रूथकडून आपण काय शिकू शकतो? रूथचं नामी आणि यहोवा देवावर इतकं प्रेम होतं, की तिने त्यांच्यासाठी आपला देश आणि नातेवाईक सोडले. ती खूप मेहनती होती आणि यहोवा देवाला विश्वासू होती. कठीण काळातही तिने नामीची साथ सोडली नाही.
▸ रूथबद्दल जास्त माहितीसाठी, “तुम्ही जिकडे जाल तिकडे मी येईन” आणि “सद्गुणी स्त्री” हे लेख पाहा.
सारा
सारा कोण होती? सारा अब्राहामची बायको आणि इसहाकची आई होती.
तिने काय केलं? सारा ऊर देशात राहायची. ते ठिकाण खूप समृद्ध होतं. साराला तिथे कशाचीच कमी नव्हती. पण एक दिवस देवाने तिच्या नवऱ्याला म्हणजे अब्राहामला ऊर देश सोडून कनान देशात जायला सांगितलं. देवाने त्याला आशीर्वाद द्यायचं आणि त्याच्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण करायचं वचन दिलं. साराला देवाच्या या वचनावर विश्वास होता, म्हणून ती ऊर देश सोडायला तयार झाली. (उत्पत्ती १२:१-५) त्या वेळी सारा कदाचित साठीत असावी. तेव्हापासून सारा आणि तिचा नवरा तंबूंमध्ये राहू लागले आणि आपलं ठिकाण बदलत राहिले.
अशा प्रकारे जीवन जगत असल्यामुळे तिच्या जिवाला धोका होता. असं असलं तरी देवाच्या मार्गदर्शनाचं पालन करण्यात तिने अब्राहामला साथ दिली. (उत्पत्ती १२:१०, १५) बऱ्याच वर्षांपर्यंत मूलबाळ नसल्यामुळे ती दुःखी होती. पण देवाने अब्राहामच्या संततीला आशीर्वाद द्यायचं वचन दिलं होतं. (उत्पत्ती १२:७; १३:१५; १५:१८; १६:१, २, १५) मग काही काळाने देवाने पुन्हा खातरी देऊन वचन दिलं, की साराला अब्राहामकडून मूल होईल. आणि तसंच झालं. मुलांना जन्म द्यायचं वय निघून गेल्यावरही तिला एक मुलगा झाला. त्या वेळी ती ९० वर्षांची होती आणि तिचा नवरा १०० वर्षांचा होता. (उत्पत्ती १७:१७; २१:२-५) त्यांनी त्यांच्या बाळाचं नाव इसहाक ठेवलं.
साराकडून आपण काय शिकू शकतो? अगदी अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतही देव त्याचं वचन पूर्ण करतो यावर आपण नेहमी भरवसा ठेवू शकतो, हे साराच्या उदाहरणातून आपण शिकतो. (इब्री लोकांना ११:११) तसंच, एका पत्नीने आपल्या पतीचा आदर करणं का महत्त्वाचं आहे, हेही आपल्याला साराच्या उदाहरणातून शिकायला मिळतं.—१ पेत्र ३:५, ६.
▸ साराबद्दल जास्त माहितीसाठी, “अब्राहाम व सारा—तुम्ही त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करू शकता!” हा लेख पाहा.
शुलेमची मुलगी
शुलेमची मुलगी कोण होती? ती गावात राहणारी एक सुंदर मुलगी होती. बायबलमधल्या गीतरत्न पुस्तकातली ती मुख्य पात्र आहे. बायबलमध्ये तिचं नाव सांगण्यात आलेलं नाही.
तिने काय केलं? शुलेमच्या मुलीचं एका मेंढपाळावर प्रेम होतं आणि ती त्याला विश्वासू होती. (गीतरत्न २:१६) पण तिच्या सुंदरतेमुळे श्रीमंत राजा शलमोनचं लक्ष तिच्याकडे गेलं. त्याने तिचं मन जिंकायचा प्रयत्न केला. (गीतरत्न ७:६) इतरांनीही तिच्यावर शलमोनला होकार द्यायचा दबाव टाकला. पण तिने तसं करायला नकार दिला. कारण तिचं त्या साध्या मेंढपाळावर प्रेम होतं आणि ती त्याला विश्वासू होती.—गीतरत्न ३:५; ७:१०; ८:६.
शुलेमच्या मुलीकडून आपण काय शिकू शकतो? ती दिसायला खूप सुंदर होती. इतर लोक तिची प्रशंसा करायचे. असं असलं तरी तिच्यात गर्व नव्हता. ती इतरांच्या दबावाला बळी पडली नाही किंवा श्रीमंती आणि प्रसिद्धी मिळवायच्या मागे लागली नाही. तिने तिच्या भावनांवर ताबा ठेवला आणि नैतिक रित्या ती शुद्ध राहिली.
लोटची बायको
लोटची बायको कोण होती? बायबलमध्ये तिचं नाव सांगितलेलं नाही. पण ते सांगतं की तिला दोन मुली होत्या. तसंच ती आणि तिचं कुटुंब सदोम शहरात राहायचं.—उत्पत्ती १९:१, १५.
तिने काय केलं? तिने देवाची आज्ञा मोडली. सदोम आणि त्याच्या आसपासच्या शहरातले लोक मोठ्या प्रमाणात अनैतिक लैंगिक कामं करायचे. त्यामुळे देवाने त्या शहरांचा नाश करायचं ठरवलं होतं. पण लोट देवाचा विश्वासू सेवक होता. देवाचं त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर प्रेम होतं. त्यामुळे सदोमच्या नाशातून त्यांचा जीव वाचवण्यासाठी देवाने दोन स्वर्गदूत पाठवले.—उत्पत्ती १८:२०; १९:१, १२, १३.
स्वर्गदूतांनी लोट आणि त्याच्या कुटुंबाला शहर सोडून जायला सांगितलं. तसंच स्वर्गदूतांनी हेही सांगितलं की त्यांनी मागे वळून पाहू नये, नाहीतर ते मरतील. (उत्पत्ती १९:१७) पण लोटच्या बायकोने ‘मागे वळून पाहिलं आणि ती मिठाचा खांब बनली.’—उत्पत्ती १९:२६.
लोटच्या बायकोकडून आपण काय शिकू शकतो? तिच्या कहाणीतून आपल्याला कळतं, की भौतिक गोष्टींवर प्रेम करणं किती धोकेदायक ठरू शकतं. यामुळे आपल्या हातून देवाच्या आज्ञांचं उल्लंघन होऊ शकतं. आपण कसं वागू नये यासाठी येशूने तिचं उदाहरण दिलं. तो म्हणाला: “लोटच्या बायकोला लक्षात ठेवा.”—लूक १७:३२.
या स्त्रिया कोणत्या काळात होत्या?
हव्वा
जलप्रलय (इ.स.पू. २३७०)
सारा
लोटची बायको
रिबका
लेआ
राहेल
इस्राएली इजिप्तमधून निघाले (इ.स.पू. १५१३)
मिर्याम
राहाब
रूथ
दबोरा
याएल
दलीला
हन्ना
इस्राएलचा पहिला राजा (इ.स.पू. १११७)
अबीगईल
शुलेमची मुलगी
ईजबेल
एस्तेर
मरीया (येशूची आई)
येशूचा बाप्तिस्मा (इ.स. २९)
मार्था
मरीया (मार्था आणि लाजरची बहीण)
मग्दालीया मरीया
येशूचा मृत्यू (इ.स. ३३)
तो धाडसी, पण सावध होता
इन्साइट “जव” ¶७
जव
जव हे अतिशय साधं आणि गोरगरीबांचं अन्न होतं. बायबलच्या काही भाष्यकारांचं असं म्हणणं आहे, की यामुळेच मद्यानी माणसाला स्वप्नात दिसलेली ‘जवाची गोल भाकर’ गिदोनच्या सैन्याला सूचित असावी. कारण त्याचं सैन्य हे अगदी सामान्य माणसांनी बनलेलं किरकोळ सैन्य होतं.—शास ७:१३, १४.
इन्साइट “रणशिंग” ¶३
रणशिंग
रणशिंगाचा वापर इशारा देण्यासाठी केला जायचा. इस्राएली सैन्याला एकत्र करण्यासाठी, काही वेळा हल्ला केल्या जाणाऱ्या शहराविरुद्ध “युद्धाची घोषणा” करण्यासाठी आणि युद्धाच्या डावपेचांचं निर्देशन करण्यासाठी रणशिंगांचा वापर केला जायचा. (शास ३:२७; ६:३४; २शमु २:२८; योए २:१; सफ १:१६) शत्रूंनी हल्ला केल्यानंतर आपल्या लोकांना सावध करण्यासाठीसुद्धा रणशिंग फुंकलं जायचं. (नहे ४:१८-२०) युद्धात इशारा देण्याचं हे एकमेव उपकरण होतं. त्यामुळे ३०० रणशिंगांच्या आवाजावरून शत्रूसैन्य खूपच मोठं आहे असा अर्थ व्हायचा. म्हणूनच गिदोनच्या ३०० सैनिकांनी रणशिंग फुंकल्याचा आवाज मिद्यानी लोकांनी ऐकला तेव्हा ते अतिशय घाबरून “सैरावैरा पळत” सुटले.—शास ७:१५-२२.
‘हा देश फिरून पाहा’
९ अंतराचे महत्त्व पटवून देणारा आणखी एक अहवाल म्हणजे गिदोनाने मिद्यानी लोकांवर मिळवलेल्या विजयाचा अहवाल. बहुतेक बायबल वाचकांना माहीत आहे, की शास्ता गिदोन व त्याच्या ३०० माणसांनी, त्यांच्याविरुद्ध आलेल्या १,३५,००० माणसांच्या सैन्याला हरवले होते. या सैन्यात मिद्यानी, अमालेकी व इतर लोक होते. या सर्वांनी मोरे टेकडीजवळील, इज्रेलाच्या खोऱ्यात तळ दिला होता. गिदोनाच्या माणसांनी रणशिंगे फुंकली, आपल्या हातातले दिवट्या असलेले घडे फोडले, आणि “परमेश्वराची तरवार, गिदोनाची तरवार” असा घोष केला. यामुळे शत्रू गोंधळले व घाबरले आणि तरवारीने एकमेकांचा घात करू लागले. (शास्ते ६:३३; ७:१-२२) ही घटना एवढ्यावरच, म्हणजे एका रात्रीतच संपली का? शास्ते ७ व ८ यात उर्वरीत अहवाल वाचल्यास, तुम्हाला दिसून येईल की कशाप्रकारे गिदोनाने ही लढाई पुढेही चालू ठेवली. यात अनेक स्थळांचा उल्लेख आहे व त्यांपैकी बरीच ठिकाणे आधुनिक काळात नेमकी कोठे आहेत हे ठरवता येत नाही. त्यामुळे बायबलच्या नकाशांवर ती दाखवलेली नाहीत. पण तरीसुद्धा, बरीच ठिकाणे ओळखणे शक्य आहे आणि त्यांवरून आपण गिदोनाच्या लढाईचे वृत्त सहज समजून घेऊ शकतो.
१० गिदोनाने बेथ-शिट्टापर्यंत व नंतर दक्षिणेकडे यार्देनजवळील आबेल-महोलाच्या सीमेपर्यंत या एकत्रित सैन्याचा पाठलाग केला. (शास्ते ७:२२-२५) अहवालात आपण असे वाचतो: “गिदोन व त्याच्याबरोबरचे तीनशे लोक थकून भागून गेले होते तरी ते तसेच पाठलाग करीत यार्देनवर येऊन पलीकडे गेले.” (तिरपे वळण आमचे.) नदी पार केल्यावर, इस्राएलांनी पुन्हा दक्षिणेकडे याब्बोक नदीजवळील सुक्कोथ व पनुएलपर्यंत आणि मग डोंगरांवरून यागबहा (आधुनिक नकाशांत अम्मान, जॉर्डनच्या जवळ) येथपर्यंत शत्रूंचा पाठलाग गेला. एकंदरीत त्यांना जवळजवळ ८० किलोमीटर पाठलाग करीत शत्रूंशी लढावे लागले. गिदोनाने दोन मिद्यानी राजांना पकडून त्यांना ठार केले; मग तो लढाईला जेथे सुरवात झाली होती तेथे म्हणजे, आपले नगर अफ्रा येथे परतला. (शास्ते ८:४-१२, २१-२७) यावरून स्पष्ट होते, की गिदोनाचा पराक्रम हा केवळ काही मिनिटे रणशिंगे फुंकणे, दिवट्या दाखवून घोषणा करणे इतकाच नव्हता. शिवाय, वरील माहिती वाचल्यावर विश्वासू पुरुषांविषयी केलेले पुढील विधान किती अर्थपूर्ण वाटू लागते ते पाहा: “गिदोन [व इतरांविषयी] वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही. . . . ते दुर्बळांचे सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले.” (इब्री लोकांस ११:३२-३४) आज ख्रिस्ती देखील शारीरिक दृष्ट्या थकू-भागू शकतात, पण देवाची इच्छा पूर्ण करत राहणे किती महत्त्वाचे आहे हे यावरून दिसून येत नाही का?—२ करिंथकर ४:१, १६; गलतीकर ६:९.
टेहळणी बुरूज०५ ४/१५ ३२
बायबलचा इतिहास किती खरा आहे?
अमेरिकेचे माजी अध्यक्ष कीम हेरजॉग आणि तेल अवीव युनिव्हर्सिटीमधले पुरातत्त्वशास्त्राचे माजी प्रोफेसर मॉर्दकाय गिकॉन यांनी लिहिलेल्या बॅटल्स् ऑफ द बायबल या पुस्तकात असं म्हटलंय:
“बायबलमधल्या लढायांच्या रणनीतीचं वर्णन हे फक्त कल्पनेने रचता येणं शक्य नाही. ही गोष्ट दोन युद्धांची तुलना केल्यावर स्पष्ट होते. एक ट्रॉजन युद्ध होतं. या युद्धाचं वर्णन एका प्राचीन कवीने, होमरने इलीयडमध्ये, म्हणजे त्याच्या एका कवितेमध्ये केलंय. तर दुसरं युद्ध, गिदोनने केलेलं युद्ध होतं. याचं वर्णन शास्ते अध्याय ६ ते ८ मध्ये पाहायला मिळतं. गिदोनने हे युद्ध मिद्यानी लोक आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या सैन्यांविरुद्ध लढलं होतं. ट्रॉजन युद्धाबद्दल बोलताना होमरने जवळच असेल्या एका समुद्र किनाऱ्याचा आणि तटबंदीच्या शहराचा उल्लेख केलाय, पण त्याचं नेमकं ठिकाण त्याने सांगितलेलं नाही . . . पण बायबलमध्ये सांगितलेल्या गिदोनच्या लढाईबद्दल मात्र तसं नाही. या लढाईबद्दल बारीकसारीक गोष्टी तर सांगितल्या आहेतच, पण त्यांचं नेमकं ठिकाणसुद्धा सांगितलंय. तसंच ही लढाई ६० किमी. क्षेत्रावर लढली गेली हेही सांगितलंय. शिवाय, या लढाईत गिदोन किंवा त्याच्या शत्रूंनी वापरलेली रणनीती आणि त्यासाठी तिथल्या भौगोलिक रचनेचा केलेला वापर, या गोष्टींचा विचार केला, तर एवढ्या मोठ्या क्षेत्रात झालेल्या या लढायांचं वर्णन दुसरं एखादं भौगोलिक ठिकाण घेऊन स्पष्ट करणं शक्य नाही . . . त्यामुळे साहजिकच बायबलमध्ये केलेल्या लढायांचं वर्णन खरंय, हे मान्य करण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय उरत नाही.”
‘उत्तम देश को देख’ या नकाशे असलेल्या माहितीपत्रकातल्या पान १८ आणि १९ वर असलेल्या नकाशाचा उपयोग करून तुम्ही गिदोनने लढलेल्या युद्धांचा अभ्यास करू शकता. “सर्व मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडचे लोक एकत्र आले; त्यांनी नदी पार केली आणि इज्रेलच्या खोऱ्यात येऊन छावणी केली,” तेव्हा गिदोनच्या या युद्धाची गोष्ट सुरू होते. त्या वेळी गिदोनने जवळपासच्या वंशांना मदतीसाठी विचारलं. हरोदच्या विहिरीपासून ते मोरे टेकडीपर्यंत आणि नंतर यार्देन खोऱ्यात या घटना घडत गेल्या. गिदोनने यार्देन नदी ओलांडून शत्रूंचा पाठलाग केला आणि त्यांच्यावर विजय मिळवला.—शास्ते ६:३३–८:१२.
‘उत्तम देश को देख’ यात बायबलमध्ये उल्लेख केलेली महत्त्वाची ठिकाणं आणि तिथली भौगोलिक रचना दाखवली आहे. पान १५ वर दिलेल्या दुसऱ्या एका नकाशात प्रत्येक इस्राएली वंश कुठे राहत होता ते दाखवलं आहे. या दोन्ही नकाशांचं परीक्षण केल्यावर लक्षात येतं, की बायबलमध्ये दिलेला हा अहवाल किती अचूक आहे.
यावरून प्राध्यापक योहानान अहरोनी यांनी असा निष्कर्ष का काढलं ते कळतं. त्यांनी म्हटलं: “बायबलमधल्या ठिकाणांचा इतिहास आणि त्यांची भौगोलिक रचना या दोन्ही गोष्टी माहीत असतील, तरच तुम्ही ती ठिकाणं नेमकी कशी होती हे समजू शकता.”
टेहळणी बुरुज०० ८/१ १६-१८ ¶११-१५
“नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते”
११ गिदोन हा मनश्शेच्या वंशातील एक उमदा तरुण होता. त्याच्या हयातीत इस्राएल राष्ट्रात बरीच उलथापालथ चालली होती. मिद्यानी लोक देवाच्या लोकांना सात वर्षांपासून छळत होते. पण आता एका देवदूताने येऊन गिदोनाला म्हटले: “हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.” गिदोनाला ही प्रशंसा अपेक्षित नव्हती. पण ही प्रशंसा ऐकून तो गर्वाने फुगला नाही. त्याने देवदूताला आदरपूर्वक विचारले: “महाराज, परमेश्वर आमच्याबरोबर आहे तर हे सर्व आमच्यावर का यावे?” देवदूताने गिदोनाला समजावून सांगितले की “तू इस्राएलाला मिद्यानाच्या हातून सोडीव.” तेव्हा गिदोनाची प्रतिक्रिया कशी होती? सबंध राष्ट्रासमोर आपले नाव होईल या लालसेने गिदोनाने लगेच हे काम स्वीकारले का? नाही, उलट गिदोनाने उत्तर दिले: “प्रभो, इस्राएललाला मी कसा सोडविणार? माझे कुळ मनश्शे वंशात सर्वात दरिद्री आहे; तसाच मी आपल्या वडिलाच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे.” गिदोनाने दाखवलेली नम्रता खरोखर वाखाणण्याजोगी नाही का?—शास्ते ६:११-१५.
१२ गिदोनाला युद्धाला पाठवण्याआधी यहोवाने त्याची परीक्षा घेतली. कशी? गिदोनाचा पिता बआल देवताचा उपासक होता. गिदोनाला सांगण्यात आले, की त्याच्या वडिलाने बांधलेली बआलची वेदी त्याने नष्ट करावी आणि वेदीपाशी असलेली मूर्ती पाडावी. हे काम करण्यासाठी धैर्याची आवश्यकता होती. पण गिदोनाने हे काम देखील नम्रतेने आणि विचारपूर्वक केले. गाजावाजा करून सर्वांचे लक्ष स्वतःकडे आकर्षित करण्याऐवजी गिदोनाने कोणाला दिसणारही नाही अशा वेळी म्हणजे रात्री, अंधारात हे काम केले. त्याने स्वतःसोबत दहा जणांना घेतले. त्यांपैकी काहींना त्याने पहारा देण्याकरता सांगितले, तर काहींना सोबत घेऊन त्याने वेदी आणि मूर्ती तोडली. यहोवाच्या आशीर्वादाने गिदोनाने आपले काम यशस्वीपणे पार पाडले. कालांतराने देवाने गिदोनाच्याच हातून इस्राएली लोकांना मिद्यानी लोकांपासून सोडवले.—शास्ते ६:२५-२७.
नम्रता आणि विचारशीलता
१३ गिदोनाकडून आपण बरेच काही शिकू शकतो. उदाहरणार्थ, आपल्याला एखादी विशेष जबाबदारी दिली जाते तेव्हा आपण कशी प्रतिक्रिया दाखवतो? हे काम केल्यामुळे आपल्याला लोक मान देऊ लागतील किंवा आपले महत्त्व वाढेल असा विचार लगेच आपल्या मनात येतो का? की आपण हे कार्य चांगल्याप्रकारे करू शकू किंवा नाही असा आपण विचार करतो? याविषयी आपण यहोवाला प्रार्थना करतो का? बंधू ए. एच. मॅकमिलन ज्यांचे १९६६ साली पृथ्वीवरील जीवन समाप्त झाले त्यांच्या जीवनातील एका घटनेवर विचार करा. वॉचटावर संस्थेचे पहिले अध्यक्ष बंधू सी. टी. रस्सल यांनी त्यांच्या अनुपस्थितीत संस्थेचे कार्य कोणी सांभाळावे यासंबंधी बंधू मॅकमिलन यांचे मत विचारले. बंधू मॅकमिलन सहज स्वतःचे नाव सुचवू शकले असते, पण त्यांनी असे केले नाही. नंतर बंधू रस्सल यांनी स्वतःहूनच त्यांना ही नेमणूक देण्याची आपली इच्छा व्यक्त केली आणि त्यांना यावर विचार करण्यास सांगितले. या घटनेबद्दल अनेक वर्षांनंतर बंधू मॅकमिलन यांनी असे लिहिले की “बंधू रस्सल यांनी असे म्हटले तेव्हा मी इतका गोंधळलो की मला काही बोलताच येईना. नंतर मी खूप विचार केला, आपल्याला हे कार्य करता येईल का याबद्दल खूप वेळ मी द्विधा मनःस्थितीत होतो. खूप वेळा मी प्रार्थनाही केली आणि शेवटी बंधू रस्सल यांना सांगितले की त्यांना माझ्याकडून होईल ती मदत द्यायला मी तयार आहे.”
१४ याच्या काही काळानंतर बंधू रस्सल यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर वॉचटावर संस्थेचे अध्यक्षपद नवीन व्यक्तीवर सोपवण्याची गरज उद्भवली. बंधू रस्सल शेवटच्या प्रचार दौऱ्यावर गेले असताना बंधू मॅकमिलनच त्यांचे काम पाहात होते; त्यामुळे रस्सल यांच्या मृत्यूनंतर एक बंधू मॅकमिलन यांना म्हणाले: “मॅक, आता अध्यक्षपद बहुधा तुलाच मिळेल. बंधू रस्सल यांच्या अनुपस्थितीत तूच त्यांचे काम पाहात होतास आणि जाताना बंधू रस्सल आम्हाला सांगून गेले होते की बंधू मॅकमिलन सांगतील त्याप्रमाणे करा. आता तर ते कायमचेच गेले, तेव्हा मला वाटतं त्यांचे काम पुढेही पाहण्याकरता तूच अगदी सुयोग्य व्यक्ती आहेस.” बंधू मॅकमिलनने या बंधूंना काय उत्तर दिले? ते म्हणाले: “तुमचा या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे. हे प्रभूचे काम आहे आणि प्रभूच्या संस्थेत तो ज्याला योग्य समजेल त्यालाच तो कोणतेही काम देतो. मी या कामासाठी निश्चितच योग्य नाही.” नंतर बंधू मॅकमिलन यांनी या पदावर काम करण्यासाठी दुसऱ्या एका बांधवाची शिफारस केली. गिदोनाप्रमाणे त्यांनी नम्रता दाखवली. निश्चितच आपण सर्वांनी त्यांचे अनुकरण केले पाहिजे.
१५ आपण देखील गिदोनाप्रमाणे आपल्या कामात नम्र आणि विचारी असले पाहिजे. गिदोन विचारशील होता; म्हणूनच त्याच्या शत्रूंना राग येईल अशाप्रकारे तो वागला नाही. प्रचार कार्य करताना आपणही इतरांशी बोलताना नम्र आणि विचारशील असले पाहिजे. आज आपले युद्ध हे ‘तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेल्या’ गोष्टीविरुद्ध आहे. (२ करिंथकर १०:४, ५) पण आपला संदेश न ऐकणाऱ्यांचा आपण अपमान करावा किंवा त्यांना चीड येईल असे काही बोलावे किंवा करावे असा याचा अर्थ होत नाही. उलट आपण त्यांच्या विचारांना मान दिला पाहिजे, त्यांच्या व आपल्या विचारांत कोणत्या समान गोष्टी आहेत त्यांवर जोर देऊन आपल्या संदेशातील आशादायी गोष्टींकडे त्यांचे लक्ष आकर्षित केले पाहिजे.—प्रेषितांची कृत्ये २२:१-३; १ करिंथकर ९:२२; प्रकटीकरण २१:४.
बायबलच्या चित्रकथा लेख १३
यहोवाने गिदोनला धैर्य दाखवायला मदत केली
बायबलच्या चित्रकथा
[दृश्य १]
[गोष्ट सांगणारा:] इस्राएली लोकांचं जीवन खूप कठीण होतं. मिद्यानी लोकांच्या टोळ्या नेहमी इस्राएली लोकांवर हल्ला करायच्या. मिद्यानी लोक इस्राएली लोकांना छळायचे आणि त्यांच्या अन्नधान्याची नासधूस करायचे.
[गोष्ट सांगणारा:] इस्राएली लोकांनी यहोवाकडे मदत मागितली.
[दृश्य २]
[गिदोन:] हे यहोवा, प्लिज आम्हाला वाचव!
[गोष्ट सांगणारा:] देवाने आपल्या एका स्वर्गदूताला गिदोन नावाच्या एका माणसाकडे पाठवलं.
[स्वर्गदूत:] हे शूर योद्ध्या! यहोवा तुझ्यासोबत आहे. तू इस्राएलला नक्की वाचवशील!
[गिदोन:] कोण मी? मी तर साधा माणूस आहे. मी इस्राएलला कसं वाचवणार?
[स्वर्गदूत:] कारण यहोवा तुझ्यासोबत असेल.
[दृश्य ३]
[गोष्ट सांगणारा:] गिदोनचा आपल्यावर पूर्ण भरवसा आहे की नाही, हे पाहण्यासाठी यहोवाने त्याला एका खास कामावर, म्हणजे एका खोट्या देवाच्या मूर्तीचा नाश करायला पाठवलं.
[गोष्ट सांगणारा:] त्याने रात्रीच्या वेळी दहा माणसं सोबत घेतली आणि खोट्या देवाची मूर्ती तोडून टाकली.
[दृश्य ४]
[गोष्ट सांगणारा:] पण इस्राएली लोकांचं जीवन अजूनही धोक्यातच होतं! मिद्यानी लोकांची आणि इतर शत्रू राष्ट्रांची सैन्यं इस्राएलीची सीमा ओलांडून आत आले आणि त्यांनी इज्रेलच्या खोऱ्यात तळ ठोकला.
[पहिला मिद्यानी माणूस:] आपण त्यांच्या हद्दीत आलोय. आता आपल्याला कोणीच रोखू शकत नाही!
[दुसरा मिद्यानी माणूस:] आपल्यासमोर त्यांचा टिकावच लागू शकत नाही!
[दृश्य ५]
[गोष्ट सांगणारा:] यहोवा नक्की मदत करेल याचा पुरावा गिदोनने यहोवाकडे मागितला. म्हणून यहोवाने दोन जबरदस्त चमत्कार केले. (शास्ते ६:३६-४० वाचा.)
[दृश्य ६]
[गोष्ट सांगणारा:] गिदोन आणि त्याचे सैनिक मिद्यानी लोकांसोबत युद्ध करायला तयार झाले.
[गिदोन:] आपण जर यहोवाच्या सूचना पाळल्या, तर तो आपल्याला जिंकायला नक्की मदत करेल!
[गोष्ट सांगणारा:] मग यहोवा गिदोनशी बोलला.
[यहोवा:] गिदोन, तुझ्या सैनिकांपैकी सगळ्यात शूर असलेले फक्त ३०० सैनिक लढतील. मग तुला कळेल की मीच इस्राएलला वाचवलंय.
[पहिला इस्राएली माणूस:] आपण युद्ध कसं लढणार आहे?
[दुसरा इस्राएली माणूस:] प्रत्येक जण एक रणशिंग, एक घागर आणि एक मशाल घेईल.
[तिसरा इस्राएली माणूस:] मग गिदोन जे करेल तेच आपण करायचं आहे.
[दृश्य ७]
[गिदोन:] यहोवा आपल्यासोबत आहे! मध्यरात्री रणशिंगं फुंका, घागरी फोडा आणि मोठ्याने ओरडून म्हणा . . .
[दृश्य ८]
[सगळे सैनिक:] यहोवाची तलवार आणि गिदोनची तलवार!
[पहिला मिद्यानी माणूस:] काय चाललंय काय!
[दुसरा मिद्यानी माणूस] इस्राएली लोक आलेत!
[गोष्ट सांगणारा:] मिद्यानी लोक पळ काढू लागले म्हणून इस्राएली लोकांनी त्यांचा पाठलाग केला. प्रत्येक इस्राएली सैनिकाला ४५० मिद्यानी सैनिकांना मारायचं होतं. पण तरी यहोवाच्या मदतीने त्यांनी युद्ध जिंकलं.
[चौकट]
या गोष्टीतून आपण काय शिकतो?
गिदोनला मिद्यानी लोकांची भीती का होती?
हिंट: शास्ते ६:२-६, १५.
धैर्य दाखवता यावं म्हणून गिदोनने काय केलं?
हिंट: शास्ते ६:२७क, ३६-४०
तुम्हाला भीती वाटते तेव्हा धैर्य दाखवण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
हिंट: स्तोत्र १३८:३, ८; नीतिवचनं १७:१७; इब्री लोकांना १३:६.
त्यांनी एक कठीण नवस पूर्ण केला!
इन्साइट “इप्ताह” ¶६
इप्ताह
अम्मोनी लोकांनी युद्धाची धमकी दिली. १८ वर्षं अम्मोनी लोक इस्राएली लोकांचा छळ करत राहिले. देवाने त्यांना असं करू दिलं होतं, कारण इस्राएली लोक आजूबाजूच्या राष्ट्रांमधल्या दैवतांची उपासना करून यहोवाशी अविश्वासूपणे वागत होते. पण यहोवाने आता त्यांना भानावर आणलं होतं. म्हणून त्यांनी पश्चात्ताप केला आणि ते यहोवाकडे मदतीसाठी धावा करू लागले. त्यांनी खोट्या देवांच्या मूर्ती काढून टाकल्या आणि ते यहोवाची उपासना करू लागले. याच काळात अम्मोनी लोक गिलादमध्ये युद्धासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र आले. (शास १०:७-१७; ११:४) या गोष्टीवरून दिसतं, की देवाचा सगळ्यात मोठ्या अदृश्य शत्रूने, सैतानानेच मूर्तिपूजक राष्ट्रांना इस्राएलविरुद्ध भडकवलं होतं, कारण त्याला खरी उपासना मिटवून टाकायची होती.—प्रक १२:९; स्तो ९६:५; १कर १०:२० सोबत तुलना करा.
इन्साइट “इप्ताह” ¶११
इप्ताह
इप्ताहचा नवस. आपण अम्मोनी लोकांशी युद्ध करावं अशी यहोवाचीच इच्छा आहे हे आता इफ्ताहला समजलं होतं. मग यहोवाची पवित्र शक्ती इफ्ताहवर जबरदस्त रितीने काम करू लागली आणि तो आपलं सैन्य घेऊन युद्धाला निघाला. जवळपास ६०० वर्षांआधी याकोबने नवस केला होता, त्याप्रमाणेच इफ्ताहनेसुद्धा देवाला एक नवस केला. यावरून त्याने दाखवून दिलं, की देवाने त्याचं मार्गदर्शन करावं आणि यशाचं सगळं श्रेय यहोवाला मिळावं अशी त्याची मनापासून इच्छा होती. (शास ११:३०, ३१; उत्प २८:२०-२२) यहोवाने त्याचा हा नवस पूर्ण केला आणि अम्मोनी लोकांचा पराभव केला.—शास ११:३२, ३३.
दिलेलं वचन नेहमी पाळा
६ इफ्ताहने दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी त्याच्या मुलीला आयुष्यभर देवाच्या निवासमंडपात जाऊन पूर्णवेळ सेवा करावी लागणार होती. पण, इफ्ताहने मागचा-पुढचा कोणताही विचार न करता हे वचन दिलं होतं का? नाही. खरंतर, त्याला कदाचित या गोष्टीची कल्पना असावी, की त्याला भेटण्यासाठी सर्वात आधी त्याची मुलगी येईल. पण, त्याला ही गोष्ट माहीत असो अथवा नसो, एक गोष्ट मात्र खरी की यहोवाला दिलेलं वचन पूर्ण करणं त्याच्यासाठी आणि त्याच्या मुलीसाठी मुळीच सोपं नव्हतं. म्हणूनच जेव्हा इफ्ताहने त्याच्या मुलीला पाहिलं, तेव्हा तो म्हणाला की त्याचं मन खचून गेलं आहे. तसंच, आयुष्यभर कुमारी म्हणूनच राहावं लागेल यासाठी त्याच्या मुलीनेही शोक केला. पण, त्यांना इतकं दुःख का झालं होतं? कारण इफ्ताहला मुलगा नव्हता आणि त्याची एकुलती एक मुलगीही आता लग्न करू शकणार नव्हती. तसंच तिला मुलं असणार नव्हती. त्यामुळे मग इफ्ताहच्या कुळाचं नाव पुढे चालवणारा कोणीही उरणार नव्हतं. पण, असं असलं तरी इफ्ताह आणि त्याच्या मुलीला याची जाणीव होती की त्यांच्या भावनांपेक्षाही महत्त्वपूर्ण अशी दुसरी एक गोष्ट आहे. इफ्ताहने म्हटलं: “परमेश्वराला मी शब्द दिला आहे; आता मला माघार घेता येत नाही.” तसंच, त्याच्या मुलीने त्याला म्हटलं: “परमेश्वराला तुम्ही शब्द दिला आहे तेव्हा तुमच्या तोंडातून निघालेल्या शब्दाप्रमाणे माझ्या बाबतीत करा.” (शास्ते ११:३५-३९) इफ्ताह आणि त्याची मुलगी हे देवाला विश्वासू होते आणि त्याला दिलेलं वचन मोडण्याचा ते कधी विचारही करू शकत नव्हते; मग ते पूर्ण करणं त्यांच्यासाठी कितीही कठीण असलं तरीही.—अनुवाद २३:२१, २३; स्तोत्र १५:४ वाचा.
इन्साइट “इप्ताह” ¶२
इप्ताह
मनश्शेच्या वंशातला इस्राएलचा एक न्यायाधीश. (गण २६:२९; शास ११:१) त्याने सहा वर्षं गिलादच्या प्रदेशावर न्यायाधीश म्हणून काम केलं. एली जेव्हा याजक म्हणून काम करत होता तेव्हापासून ते शमुवेलच्या सुरुवातीच्या दिवसांपर्यंतचा हा काळ असावा. (शास १२:७) इफ्ताहने असा उल्लेख केलाय, की इस्राएली लोकांचं यार्देनच्या पूर्वेकडच्या प्रदेशावर ‘३०० वर्षं’ वर्चस्व होतं. यावरून असं दिसतं, की इफ्ताहने सहा वर्षं न्यायाधीश म्हणून जे काम केलं होतं त्याची सुरुवात इ.स.पू. ११७३ च्या आसपास झाली असावी.—शास ११:२६.
टेहळणी बुरूज१६.०४ ५-९ विश्वासू राहिल्यास देवाची स्वीकृती मिळते
“विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे.” —इब्री ६:१२.
एक तरुण स्त्री आपल्या वडिलांना भेटण्यासाठी धावत येत आहे. लढाईतून यशस्वीपणे सुखरूप परतलेल्या आपल्या वडिलांना पाहून ती खूप खूश आहे. आनंदाच्या भरात ती नाचत आणि गाणी गात बाहेर येते. पण, इतक्यात असं काहीतरी घडतं ज्यामुळे तिला कदाचित खूप आश्चर्य वाटलं असेल. तिचे वडील आपली वस्त्रे फाडतात आणि तिला अगदी विव्हळ होऊन म्हणतात: “हाय, हाय! मुली, तू माझे मन खचवले आहे.” आपण यहोवाला दिलेल्या वचनामुळे आता आपल्या मुलीचं पूर्ण आयुष्यच बदलून जाईल हे त्यांना माहीत होतं आणि हीच गोष्ट ते आपल्या मुलीला सांगतात. त्यांनी दिलेल्या वचनामुळे आता तिला लग्न करणं आणि मुलांना जन्म देणं शक्य नव्हतं. पण, यावर तिची प्रतिक्रिया काय होती? तिनं आपल्या वडिलांना जे उत्तर दिलं त्यामुळे त्यांना यहोवाला दिलेल्या वचनानुसार करण्याचं उत्तेजन मिळालं. यासोबतच, यहोवाच्या तिच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या चांगल्याच आहेत, याची तिला पूर्ण खात्री असल्याचं तिच्या उत्तरावरून दिसून आलं. (शास्ते ११:३४-३७) तिचा विश्वास पाहून तिच्या वडिलांना नक्कीच तिचा अभिमान वाटला असेल. ती स्वखुशीनं त्याग करण्यास तयार असल्यामुळे यहोवाचं मन आनंदित होईल हेदेखील त्यांना माहीत होतं.
२ इफ्ताह आणि त्याच्या मुलीचा यहोवावर आणि त्याच्या मार्गांवर पूर्ण भरवसा होता. ते त्याला अगदी कठीण परिस्थितीतही विश्वासू राहिले. त्यांच्यासाठी यहोवाची पसंती मिळवणं सर्वात जास्त महत्त्वाचं होतं आणि त्यासाठी कोणताही त्याग करण्यास ते तयार होते.
३ यहोवाला विश्वासू राहणं नेहमीच सोपं नसतं. बायबल म्हणतं, की आपल्याला आपला “विश्वास टिकवण्यासाठी लढत” राहण्याची गरज आहे. (यहू. ३, ईझी-टू-रीड व्हर्शन) असं करण्यासाठी आपल्याला इफ्ताह आणि त्याच्या मुलीच्या उदाहरणातून मदत मिळेल. तेव्हा, त्यांनी कशा प्रकारे त्यांच्या जीवनात आलेल्या परीक्षांचा धीरानं सामना केला याबद्दल थोडी चर्चा करू या. ते यहोवाला कशा प्रकारे विश्वासू राहिले?
जगाच्या प्रभावाखाली असूनही विश्वासू राहणं
४ इस्राएली लोकांनी यहोवाची आज्ञा मोडल्यामुळे जे परिणाम घडून आले, याची दररोज इफ्ताहाला आणि त्याच्या मुलीला आठवण होत असावी. जवळजवळ ३०० वर्षांआधी यहोवानं इस्राएली लोकांना, वचन दिलेल्या देशात असलेल्या सर्व खोट्या उपासकांना ठार मारण्याची आज्ञा दिली होती. पण, त्यांनी त्याच्या आज्ञेचं पालन केलं नाही. (अनु. ७:१-४) अनेक इस्राएली लोक खोट्या देवतांची उपासना करणाऱ्या आणि अनैतिक जीवन जगणाऱ्या कनानी लोकांचं अनुकरण करू लागले होते.—स्तोत्र १०६:३४-३९ वाचा.
५ इस्राएली लोक अविश्वासू होते. म्हणून, यहोवानं शत्रूंपासून त्यांचा बचाव केला नाही. (शास्ते २:१-३, ११-१५; स्तो. १०६:४०-४३) या कठीण काळात यहोवावर प्रेम करणाऱ्या कुटुंबांना त्याला विश्वासू राहणं कठीण गेलं असेल. असं असलं, तरी त्या काळातही विश्वासू लोक होते असं बायबलमध्ये सांगण्यात आलं आहे. उदाहरणार्थ, इफ्ताह, त्याची मुलगी, एलकाना, हन्ना आणि शमुवेल यांच्यासारख्या विश्वासू जणांचा उल्लेख बायबलमध्ये करण्यात आला आहे. या सर्वांनी यहोवाचं मन आनंदित करण्याचा निर्धार केला होता.—१ शमु. १:२०-२८; २:२६.
६ आज आपल्या काळातील लोकांचीही विचारसरणी आणि वागणूक कनानी लोकांसारखी आहे. त्यांचं जीवन पैसा, हिंसा आणि अनैतिकता यांवरच केंद्रित आहे. पण यहोवा आपल्याला स्पष्ट ताकीद देतो. ज्या प्रकारे इस्राएली लोकांना अशा वाईट प्रभावापासून वाचवण्याची त्याची इच्छा होती, त्याच प्रकारे आपलंही संरक्षण करण्याची त्याची इच्छा आहे. त्यामुळे, इस्राएली लोकांकडून ज्या चुका झाल्या त्या आपल्या हातून होऊ नयेत म्हणून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. (१ करिंथ. १०:६-११) जगाच्या विचारसरणीचा विरोध करण्यासाठी जे काही करता येईल ते आपण केलंच पाहिजे. (रोम. १२:२) असं करण्यासाठी तुम्ही कसोशीनं प्रयत्न करण्यास तयार आहात का?
निराशेचा सामना करूनही इफ्ताह विश्वासू राहिला
७ इफ्ताहाच्या काळात इस्राएली लोक यहोवाला अविश्वासू होते. त्यामुळे, पलिष्टी आणि अम्मोनी लोकांच्या छळाचा त्यांना सामना करावा लागला. (शास्ते १०:७, ८) यासोबतच, इफ्ताहाला त्याच्या स्वतःच्या भावांकडून आणि इस्राएलचं नेतृत्व करणाऱ्या लोकांकडून विरोध झाला. इफ्ताहाचे भाऊ त्याचा द्वेष करायचे आणि त्यांना त्याचा हेवा वाटायचा. याच कारणामुळे त्यांनी इफ्ताहाला त्याच्या हक्काच्या जागेतून घालवून दिलं. (शास्ते ११:१-३) पण, त्यांच्या या वाईट वागणुकीचा इफ्ताहानं स्वतःवर परिणाम होऊ दिला नाही. आपण हे कशावरून म्हणू शकतो? जेव्हा इस्राएलचे वडीलजन त्याच्याजवळ मदत मागण्याकरता आले, तेव्हा तो ताबडतोब त्यांची मदत करण्यासाठी तयार झाला. (शास्ते ११:४-११) अशा प्रकारची प्रतिक्रिया दाखवण्यासाठी इफ्ताहाला कशामुळे प्रेरणा मिळाली असावी?
८ इफ्ताह एक शूर योद्धा होता. त्याला इस्राएली लोकांचा इतिहास आणि मोशेचं नियमशास्त्र चांगल्या प्रकारे माहीत होतं. यहोवा आपल्या लोकांशी ज्या प्रकारे वागला त्यावरून बऱ्या-वाईटाबद्दलचे त्याचे स्तर काय आहेत ते इफ्ताहाला समजले होते. (शास्ते ११:१२-२७) आणि या माहितीच्या आधारावरच इफ्ताहानं आपल्या जीवनात निर्णय घेतले. द्वेष बाळगण्याच्या आणि बदला घेण्याच्या वृत्तीबद्दल यहोवाला कसं वाटतं हे इफ्ताहाला अगदी चांगल्या प्रकारे माहीत होतं. तसंच, आपण एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे अशी देवाची इच्छा आहे हेदेखील त्याला माहीत होतं. यासोबतच, आपण इतरांशी, खासकरून जे आपला द्वेष करतात त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे हे त्याला नियमशास्त्रामुळे समजलं होतं.—निर्गम २३:५; लेवीय १९:१७, १८ वाचा.
९ इफ्ताहाला योसेफाच्या उदाहरणावरूनही बरीच मदत झाली असावी. योसेफाचे भाऊ त्याचा द्वेष करत असले तरी तो त्यांच्याशी दयाळूपणे कसा वागला हे त्याला शिकायला मिळालं असेल. (उत्प. ३७:४; ४५:४, ५) या उदाहरणावर विचार केल्यामुळे, यहोवाचं मन आनंदित होईल अशा प्रकारे वागण्यास इफ्ताहाला मदत झाली असेल. आपल्या भावांच्या वागणुकीमुळे इफ्ताहाला नक्कीच खूप दुःख झालं असेल. पण, स्वतःच्या भावनांपेक्षा यहोवाच्या नावाकरता आणि त्याच्या लोकांच्या वतीनं लढणं इफ्ताहासाठी जास्त महत्त्वाचं होतं. (शास्ते ११:९) यहोवाला विश्वासू राहण्याचा त्याचा पक्का निर्धार होता. त्यामुळेच, त्याला आणि इस्राएली लोकांना यहोवाकडून आशीर्वाद प्राप्त करणं शक्य झालं.—इब्री ११:३२, ३३.
१० मग, इफ्ताहाच्या उदाहरणाचं तुम्हालासुद्धा अनुकरण करावंसं वाटतं का? एखाद्या ख्रिस्ती बांधवानं तुमचं मन दुखावलं असेल, तेव्हा काय? किंवा, ते तुमच्याशी चांगल्या प्रकारे वागत नाहीत असं तुम्हाला वाटत असेल, तर काय? अशा वेळी नक्कीच तुम्हाला वाईट वाटेल. पण, त्यामुळे यहोवाची सेवा करण्याचं थांबवू नका. ख्रिस्ती सभांना जाण्याचं आणि मंडळीत एकमेकांसोबत वेळ घालवण्याचं सोडू नका. याउलट, इफ्ताहाच्या उदाहरणाचं अनुकरण करून यहोवाच्या आज्ञांचं पालन करा. यामुळे, कठीण प्रसंगांचा सामना करण्यास तुम्हाला मदत होईल आणि इतरांसमोर तुमचं चांगलं उदाहरण असेल.—रोम. १२:२०, २१; कलस्सै. ३:१३.
मनापासून केलेले त्याग आपल्या विश्वासाचा पुरावा देतात
११ यहोवाच्या मदतीशिवाय इस्राएलांना अम्मोनी लोकांच्या हातून सोडवणं शक्य नाही हे इफ्ताहाला माहीत होतं. त्यामुळे त्यानं यहोवाकडे मदत मागितली. शिवाय, त्यानं यहोवाला असं वचनदेखील दिलं की जर त्याला विजय मिळाला तर घरी गेल्यावर जी व्यक्ती सर्वात प्रथम बाहेर येईल, तिला तो यहोवाकरता “हवन” किंवा होमार्पण म्हणून देईल. (शास्ते ११:३०, ३१) याचा काय अर्थ होतो?
१२ मानवांचं बलिदान देणं यहोवाला मुळीच मान्य नाही. यावरून हे तर स्पष्ट आहे की इफ्ताह खरोखर त्या व्यक्तीचं होमार्पण करणार नव्हता. (अनु. १८:९, १०) मोशेच्या नियमशास्त्रानुसार, होमार्पण ही एक अशी खास भेट होती जी पूर्णपणे यहोवाला दिली जायची. तेव्हा, इफ्ताह ज्या व्यक्तीला अर्पण म्हणून देणार होता ती व्यक्ती संपूर्ण आयुष्य निवासमंडपात यहोवाची सेवा करणार होती. यहोवानं इफ्ताहाचं ऐकलं आणि त्याला लढाईत पूर्णपणे विजय मिळवून दिला. (शास्ते ११:३२, ३३) मग आता इफ्ताह कोणाला अर्पण म्हणून देणार होता?
१३ या लेखाच्या सुरवातीला दिलेल्या दृश्याचा विचार करा. इफ्ताह लढाईतून परत आला तेव्हा जी व्यक्ती सर्वात प्रथम त्याला भेटायला आली, ती त्याची लाडकी आणि त्याची एकुलती एक मुलगी होती! तर मग अशा परिस्थितीत इफ्ताह, त्यानं दिलेलं वचन पाळणार होता का? यहोवाची आयुष्यभर सेवा करण्यासाठी तो आपल्या मुलीला निवासमंडपात पाठवणार होता का?
१४ या वेळीही देवाच्या नियमशास्त्रातील तत्त्वांमुळेच त्याला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत झाली असेल. त्याला कदाचित निर्गम २३:१९ मधील शब्दांची आठवण झाली असेल. देवाच्या सेवकांनी आपल्याजवळ असणारी सर्वोत्तम गोष्ट त्याला दिली पाहिजे, असं त्यात सांगितलं होतं. शिवाय, एखाद्यानं यहोवाला वचन दिल्यास त्यानं “आपली शपथ मोडू नये; जे काही तो बोलला असेल त्याप्रमाणे त्याने करावे,” असंही नियमशास्त्रात सांगण्यात आलं होतं. (गण. ३०:२) इफ्ताहानं कदाचित त्याच्याच काळात हयात असलेल्या विश्वासू हन्नाप्रमाणे आपलं वचन पाळलं. त्याला आणि त्याच्या मुलीला कोणते त्याग करावे लागतील याची पूर्ण जाणीव असूनही तो मागे हटला नाही. त्याची मुलगी निवासमंडपात सेवा करणार होती यामुळे तिला मुलं असणार नव्हती. याचा अर्थ, इफ्ताहाचा वंश पुढे चालणार नव्हता आणि त्याला कोणीच वारस उरणार नव्हता. (शास्ते ११:३४) असं असूनही इफ्ताहानं अगदी विश्वासूपणे म्हटलं: “परमेश्वराला मी शब्द दिला आहे; आता मला माघार घेता येत नाही.” (शास्ते ११:३५) इफ्ताहानं दिलेल्या या मोठ्या बलिदानाचा यहोवानं स्वीकार केला आणि त्याला आशीर्वाद दिला. तुम्ही इफ्ताहाच्या जागी असता तर तुम्हीसुद्धा त्याच्याप्रमाणेच विश्वासू राहिला असता का?
१५ यहोवाला आपलं जीवन समर्पित करताना, नेहमी त्याची इच्छा पूर्ण करत राहण्याचं वचन आपण त्याला दिलं होतं. आणि हे वचन पूर्ण करणं नेहमीच सोपं असणार नाही याची जाणीवही आपल्याला होती. तर मग, आपल्याला न आवडणारं असं एखादं काम दिलं जातं, तेव्हा आपली प्रतिक्रिया कशी असते? अशा वेळी जर आपण आपल्या भावनांवर मात केली आणि देवाची आज्ञा पाळली, तर आपण दिलेल्या वचनानुसार वागत आहोत हे दिसून येईल. काही त्याग करणं कदाचित आपल्यासाठी कठीण असेल. पण, त्याच्या तुलनेत यहोवाकडून मिळणारे आशीर्वाद आपल्यासाठी जास्त मोलाचे असतात. (मला. ३:१०) इफ्ताहाच्या मुलीबद्दल काय? आपल्या वडिलांनी दिलेल्या वचनाबद्दल तिची काय प्रतिक्रिया होती?
१६ इफ्ताहानं दिलेलं वचन हन्नानं दिलेल्या वचनापेक्षा वेगळं होतं. तिनं असं वचन दिलं होतं, की शमुवेलाला ती नाजीर म्हणून निवासमंडपात सेवा करण्यासाठी पाठवेल. (१ शमु. १:११) नाजीर लग्न करू शकत होते आणि पुढे कुटुंबही वाढवू शकत होते. पण, इफ्ताहाच्या मुलीबद्दल असं नव्हतं. तिला ‘होमार्पण’ म्हणून देण्यात आलं होतं. म्हणजे ती पूर्णपणे दिलेलं अर्पण होती. यामुळे पत्नी आणि आई बनण्याच्या आनंदाचा तिला त्याग करावा लागणार होता. (शास्ते ११:३७-४०) तिचे वडील इस्राएलचं नेतृत्व करत असल्यामुळे ती सर्वात चांगल्या पुरुषासोबत लग्न करू शकली असती. पण, आता तिला निवासमंडपात एक दासी म्हणून राहायचं होतं. मग, या तरुण स्त्रीनं कशी प्रतिक्रिया दाखवली? तिनं आपल्या वडिलांना म्हटलं: “तुमच्या तोंडातून निघालेल्या शब्दाप्रमाणे माझ्या बाबतीत करा.” तिच्या या शब्दांवरून, यहोवाची सेवा तिच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाची होती हे दिसून आलं. (शास्ते ११:३६) यहोवाची सेवा करता यावी म्हणून, पती आणि मुलं असण्याच्या आपल्या नैसर्गिक इच्छेचा तिनं त्याग केला. तिच्या या स्वार्थत्यागी मनोवृत्तीचं आपण कशा प्रकारे अनुकरण करू शकतो?
१७ आजदेखील असे हजारो स्त्री पुरुष आहेत जे तरुण असतानाही अविवाहित राहण्याचं निवडतात किंवा काही अशी जोडपी आहेत जी आपलं कुटुंब वाढवत नाही. का बरं? कारण, यहोवाची सेवा करण्यापासून आपलं लक्ष विचलित होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. तसंच, असे बरेच बंधुभगिनी आहेत जे आपल्या मुलांमागं किंवा नातवंडांमागं आपला वेळ आणि शक्ती घालवण्याऐवजी यहोवाच्या सेवेत ती खर्च करतात. त्यांच्यापैकी काही जण बांधकाम प्रकल्पात काम करतात. तर काही सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेला उपस्थित राहून प्रचारकांची जास्त गरज असलेल्या मंडळीत जाऊन सेवा करतात. इतर काही जण स्मारकविधीच्या काळात आपलं सेवाकार्य वाढवण्याचा प्रयत्न करतात. यहोवाची सेवा करण्यासाठी हे विश्वासू जण मनापासून जे त्याग करत आहेत ते तो कधीच विसरणार नाही. (इब्री लोकांस ६:१०-१२ वाचा.) तुमच्याबाबतीत काय? यहोवाची आणखी जास्त सेवा करता यावी म्हणून तुम्हीही काही त्याग करण्यासाठी तयार आहात का?
आपण काय शिकलो?
१८ परीक्षांचा सामना करण्यासाठी इफ्ताहाला कशी मदत झाली? त्यानं नेहमी यहोवाच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेतले. त्याच्या आजूबाजूला असलेल्या लोकांचा त्यानं स्वतःवर प्रभाव पडू दिला नाही. इतरांनी इफ्ताहाचं मन दुखावलं तरीसुद्धा तो विश्वासू राहिला. इफ्ताह आणि त्याच्या मुलीनं मनापासून जे त्याग केले होते त्यासाठी यहोवानं त्यांना आशीर्वादित केलं. शिवाय, खऱ्या उपासनेसाठी त्यानं त्या दोघांचा उपयोग केला. इतरांनी योग्य ते करण्याचं सोडून दिलं असलं तरीही इफ्ताह आणि त्याची मुलगी यहोवाला विश्वासू राहिले.
१९ बायबल म्हणतं की “विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे.” (इब्री ६:१२) तेव्हा, आपण इफ्ताह आणि त्याच्या मुलीचं अनुकरण करत राहू या. आणि विश्वासू राहिल्यास यहोवा आपल्याला आशीर्वाद देईल अशी खात्री बाळगू या.
कमजोर स्थितीतही त्याने धैर्य दाखवलं
टेहळणी बुरूज०५ १/१५ ३० ¶१–३१ ¶१
वाचकांचे प्रश्न
शमशोनाने ठार मारलेल्या लोकांच्या मृत शरीरांना स्पर्श करून देखील तो नाजीर कसा राहिला?
प्राचीन इस्राएलात, एक व्यक्ती स्वेच्छेने विशिष्ट कालावधीसाठी देवाला नाजीराचा नवस करू शकत होती. हा नवस करणाऱ्या व्यक्तीवर ज्या गोष्टी बंधनकारक होत्या त्यांपैकी एक अशी होती: “जितके दिवस त्याने परमेश्वराला वाहून घेतले असेल तितके दिवस त्याने प्रेताजवळ जाऊ नये. त्याचा बाप, आई, भाऊ, बहिण ह्यापैकी कोणी मेले तरी त्याने सुतक धरू नये.” पण “कोणी त्याच्यापाशी अकस्मात मरण पावले,” तर काय? अशाप्रकारे आकस्मिक रीत्या प्रेताला स्पर्श केल्यास त्याचे नाजीरपण भ्रष्ट झाले असे समजत. “त्याचे पूर्वीचे दिवस रद्द समजावे,” असे सांगण्यात आले होते. त्याला पुन्हा एकदा शुद्धीकरणाचा विधी करावा लागत आणि यानंतर सुरुवातीपासून नाजीरपणाचा सबंध अवधी पुन्हा पाळावा लागत.—गणना ६:६-१२.
पण शमशोन हा एका वेगळ्या अर्थाने नाजीर होता. शमशोनाच्या जन्माआधी यहोवाच्या दूताने त्याच्या आईला असे सांगितले: “तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल; त्याच्या डोक्याला वस्तरा लावू नको, कारण जन्मापासूनच तो मुलगा देवाचा नाजीर होईल. आणि इस्राएलास पलिष्ट्यांच्या हातून सोडवायला तोच आरंभ करील.” (शास्ते १३:५) शमशोनाने स्वतः नाजीरपणाचा नवस केला नव्हता. त्याला देवानेच नाजीर नेमले होते आणि त्याचे नाजीरपण आजीवन असणार होते. तेव्हा, त्याच्या बाबतीत प्रेताला स्पर्श करण्याची अट बंधनकारक नव्हती. जर असती, तर मग आकस्मिक रीत्या प्रेताला स्पर्श केल्यावर तो पुन्हा एकदा आजीवन नाजीरपणाचा नवस कसा सुरू करू शकत होता? कारण त्याचा नवस तर त्याच्या जन्माच्या वेळी सुरू झाला होता. त्याअर्थी, आजीवन नाजीर असणाऱ्यांकरता असलेल्या अटी स्वेच्छेने नाजीराचा नवस करणाऱ्यांकरता असलेल्या अटींपेक्षा वेगळ्या असाव्यात.
आजीवन नाजीर राहिलेल्या तीन व्यक्तींना, अर्थात, शमशोन, शमुवेल व बाप्तिस्मा देणारा योहान यांना यहोवाने दिलेल्या आज्ञा विचारात घ्या. याआधी सांगितल्यानुसार, शमशोनाला आपल्या डोक्याला वस्तरा न लावण्याची आज्ञा देण्यात आली होती. हान्नाने तर शमुवेल या तिच्या मुलाचा गर्भ तिच्या पोटात राहण्याआधीच देवाला असा नवस केला: “तो आयुष्यभर परमेश्वराचा व्हावा एतदर्थ मी त्यास समर्पण करीन त्याच्या डोक्यावर वस्तरा फिरविणार नाही.” (१ शमुवेल १:११) बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाच्या बाबतीत, यहोवाच्या दूताने असे म्हटले: “तो द्राक्षारस व मद्य कधीच प्राशन करणार नाही.” (लूक १:१५) शिवाय, “योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता, आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता.” (मत्तय ३:४) या तिन्ही व्यक्तींपैकी कोणालाही प्रेताला स्पर्श न करण्याविषयीची आज्ञा देण्यात आली नाही.
शमशोन हा नाजीर तर होताच, पण इस्राएलांना लुटणाऱ्यांच्या हातून सोडवण्याकरता यहोवाने ज्या शास्त्यांना उभे केले होते त्यांच्यापैकीही तो एक होता. (शास्ते २:१६) देवाने नेमलेले हे कार्य पार पाडताना त्याला मृतदेहांना स्पर्श करावा लागे. एकदा शमशोनाने ३० पलिष्ट्यांचा वध करून त्यांचे पोषाख काढून त्यांस लुटले. कालांतराने, त्याने शत्रूंची “मोठी कत्तल उडवून जांघांवर पायांचे ढीग रचले.” तसेच त्याने गाढवाचा एक नवा जबडा घेऊन एक हजार माणसांना ठार केले. (शास्ते १४:१९; १५:८, NW; १५) हे सर्व शमशोनाने यहोवाच्या संमतीने व साहाय्यानेच केले. बायबलमध्ये त्याची अनुकरणीय विश्वासू पुरुषांमध्ये गणती केली आहे.—इब्री लोकांस ११:३२; १२:१.
‘हा देश फिरून पाहा’
७ शास्ते १६:२ येथे तुम्ही शास्ता शमशोन हा गज्जा येथे असल्याचे वाचता. गज्जा (गाझा) हे नाव अलीकडे बातम्यांमध्ये अनेकदा येते, त्यामुळे शमशोन भूमध्य सागरतटाजवळील पलिष्टी क्षेत्रात कोठेतरी होता अशी पुसटशी कल्पना तुम्हाला आली असेल. आता शास्ते १६:३ याकडे लक्ष द्या: “शमशोन मध्यरात्रीपर्यंत झोपून राहिला नंतर उठून त्याने नगरवेशीचे दरवाजे आणि दोन्ही दारकसे ही अडसरांसकट उखडून खांद्यावर घेतली आणि हेब्रोनाच्या पूर्वेकडील डोंगराच्या शिखरावर नेली.”
८ साहजिकच, गज्जा यासारख्या प्रमुख शहराचे दरवाजे व दोन दारकसे अत्यंत मोठी व जड असतील. ती उचलण्याची कल्पना करा! शमशोनाने ती उचलली, पण ती उचलून त्याने कोठे नेली आणि हा प्रवास कशाप्रकारचा होता? गज्जा हे समुद्रतटावर, साधारण समुद्रसपाटीवर वसलेले आहे. पण हेब्रोन मात्र पूर्वेकडे ९०० मीटर उंचावर आहे—चांगलेच मोठे चढण! ‘हेब्रोनच्या पूर्वेकडील हा डोंगर’ नेमका कोठे होता हे आपल्याला ठरवता येत नाही, पण हेब्रोन शहर मात्र गज्जापासून ६० किलोमीटर अंतरावर आणि तेसुद्धा चढणावर आहे! हे अंतर समजल्यावर शमशोनाने केलेले कृत्य खरोखर किती अद्भुत होते हे समजून येते, नाही का? आणि शमशोन अशाप्रकारची महान कृत्ये कशी करू शकला हे आठवा—“परमेश्वराच्या आत्म्याने.” (शास्ते १४:६, १९; १५:१४) आजच्या काळात ख्रिस्ती या नात्याने आपण, देवाच्या आत्म्याने आपल्याला अशी चमत्कारिक शारीरिक शक्ती द्यावी अशी अपेक्षा करत नाही. पण तोच सामर्थ्यशाली आत्मा आध्यात्मिक गोष्टींविषयीचे आपले ज्ञान वाढवून आपल्याला “अंतर्यामी बलसंपन्न” करू शकतो. (१ करिंथकर २:१०-१६; १३:८; फिसकर ३:१६; कलस्सैकर १:९, १०) होय, शमशोनाविषयीचा अहवाल समजून घेतल्यामुळे देवाचा आत्मा आपल्यालाही मदत करू शकतो याची आपल्याला अधिकच खात्री पटते.
टेहळणी बुरूज०५ ३/१५ २८ ¶३
यहोवाच्या शक्तीने शमशोन विजय मिळवत गेला!
ते चांदीचे तुकडे जर शेकेल असतील, तर ५,५०० शेकेल ही खूप मोठी लाच होती. अब्राहामने आपल्या पत्नीला दफन करण्यासाठी ४०० शेकेल देऊन जमीन विकत घेतली होती आणि एक गुलाम फक्त ३० शेकेलला विकला जायचा. (उत्पत्ती २३:१४-२०; निर्गम २१:३२) ज्याअर्थी, त्या पाच पलिष्टी शहरांच्या प्रमुखांना दलीला तिच्या देशाबद्दल असलेल्या निष्ठेमुळे नाही, तर पैशाच्या मोहामुळे आपल्या म्हणण्याप्रमाणे वागेल असं वाटलं, त्याअर्थी ती कदाचित एक इस्राएली स्त्री असावी असं दिसतं. काहीही असलं, तरी दलीलाने त्यांचा प्रस्ताव स्वीकारला.
इन्साइट “शमशोन” ¶१०
शमशोन
शमशोन तुरुंगात असताना पलिष्टी लोकांनी त्यांच्या दागोन दैवतासाठी मोठा यज्ञ करायची व्यवस्था केली होती. कारण त्यांचं असं मानणं होतं, की या दैवतामुळेच त्यांना शमशोनला पकडायला यश मिळालं होतं. यज्ञासाठी दागोनचं मंदिर स्त्री-पुरुषांनी गच्च भरलं होतं. तिथे पलिष्टी लोकांचे सगळे प्रमुख होते. तसंच मंदिराच्या फक्त छतावरच जवळजवळ ३,००० स्त्री-पुरुष होते. मग जल्लोष करणाऱ्या त्या पलिष्टी लोकांनी त्यांचं मनोरंजन करायला शमशोनला तुरुंगातून बाहेर आणलं. त्या वेळेपर्यंत त्याचे केसं बऱ्यापैकी वाढले होते. मग जो मुलगा शमशोनला घेऊन आला त्याला तो म्हणाला: “ज्या खांबांवर हे मंदिर आधारलेलं आहे ते खांब मला चाचपडू दे, म्हणजे मी त्यांचा आधार घेऊन उभा राहीन.” मग शमशोने यहोवाला अशी प्रार्थना केली: “हे सर्वोच्च प्रभू यहोवा, माझी आठवण कर. हे देवा! एकदा, फक्त एकदाच मला शक्ती दे. म्हणजे कमीतकमी माझ्या एका डोळ्याबद्दल तरी मला पलिष्टी लोकांचा बदला घेता येईल.” (शास १६:२२-२८) त्याने अशी प्रार्थना का केली असावी याचं एक कारण कदाचित हे असावं, की त्याच्या स्वतःच्या चुकीमुळे त्याने त्याचे डोळे गमावले होते, किंवा यहोवाचा प्रतिनिधी म्हणून पूर्णपणे बदला घेणं आपल्याला शक्य नाही असं त्याला वाटलं असावं.
बायबलच्या चित्रकथा लेख १४
पवित्र शक्तीने शमशोनला खूप शक्तिशाली बनवलं
बायबलच्या चित्रकथा
[दृश्य १]
[गोष्ट सांगणारा:] एकदा यहोवाचा एक स्वर्गदूत मानोहा नावाच्या एका माणसासमोर आणि त्याच्या बायकोसमोर प्रकट झाला. स्वर्गदूताने त्यांना सांगितलं की त्यांना एक मुलगा होईल. आणि त्यांनी त्याची खूप चांगली काळजी घेतली पाहिजे. त्यांनी त्याचं नाव शमशोन ठेवलं.
[गोष्ट सांगणारा:] शमशोन देवाचा नाझीर असणार होता.
[दृश्य २]
[गोष्ट सांगणारा:] जोपर्यंत शमशोनने आपले केस कापले नाहीत, तोपर्यंत यहोवाच्या पवित्र शक्तीने त्याला जबरदस्त कामं करायला आणि देवाचे शत्रू असलेल्या पलिष्ट्यांविरुद्ध लढायला मदत केली.
[गोष्ट सांगणारा:] शास्ते १४:५, ६ वाचा.
[गोष्ट सांगणारा:] शास्ते १५:१३, १४ वाचा.
[गोष्ट सांगणारा:] शास्ते १५:१५ वाचा.
[दृश्य ३]
[गोष्ट सांगणारा:] शास्ते १६:३ वाचा.
[गोष्ट सांगणारा:] शमशोनने पलिष्ट्यांना जितकं हरवलं तितके ते भडकले. त्याला कसं हरवता येईल यावर चर्चा करण्यासाठी ते एकत्र जमले.
[पहिला पलिष्टी माणूस:] शमशोनला हरवणं सोपं नाही!
[दुसरा पलिष्टी माणूस:] पण . . . काही ना काही मार्ग नक्की असेल . . .
[दृश्य ४]
[गोष्ट सांगणारा:] पलिष्ट्यांनी एक कट रचला. शमशोनचं दलीला नावाच्या एका मुलीवर प्रेम होतं. म्हणून शमशोनला फसवून त्याच्या अफाट शक्तीचं रहस्य काय हे त्याच्याकडून काढून घेण्यासाठी त्यांनी तिला पैसे द्यायचं ठरवलं.
[दलीला:] शमशोन तुझ्यामध्ये एवढी शक्ती कुठून येते?
[दलीला:] तू उगाच मला काहीही सांगू नकोस. खरं-खरं सांग तुझ्यात एवढी शक्ती कुठून येते?
[दलीला:] तुझं जर खरंच माझ्यावर प्रेम असेल तर मला नक्की सांगशील.
[शमशोन:] माझ्या केसांमध्ये माझी शक्ती आहे.
माझे केस कधीच कापण्यात आले नाहीत.
[दृश्य ५]
[गोष्ट सांगणारा:] दलीलाने शमशोनचा बदला घ्यायला पलिष्ट्यांना बोलवलं.
[गोष्ट सांगणारा:] शमशोन गाढ झोपल्यावर एका माणसाने त्याचे केस कापले. मग पलिष्ट्यांनी त्याचे डोळे फोडले आणि ते त्याला गाझाला घेऊन गेले.
[दृश्य ६]
[गोष्ट सांगणारा:] तुरुंगात गेल्यावर आपण केलेल्या चुकीचा त्याला पस्तावा झाला.
[शमशोन:] मी ते रहस्य तिला सांगायला नको होतं.
[शमशोन:] यहोवा प्लिज मला माफ कर. माझं चुकलं.
[दृश्य ७]
[गोष्ट सांगणारा:] पलिष्टी लोकांनी त्यांचा देव दागोन याचा सन्मान करण्यासाठी एक मोठा उत्सव ठेवला. शमशोनची थट्टा करण्यासाठी ते शमशोनला घेऊन आले.
[पहिला पलिष्टी माणूस:] आता बोल शमशोन, कोण सगळ्यात शक्तिशाली आहे?
[दुसरा पलिष्टी माणूस:] शमशोनच्या देवापेक्षा आमचा दागोन देव जास्त शक्तिशाली आहे!
[दृश्य ८]
[गोष्ट सांगणारा:] पलिष्टी लोक शमशोनचा आणि यहोवाचा अपमान करत राहिले. पण शमशोनचे केस पुन्हा वाढले होते . . .
[शमशोन:] हे सर्वोच्च प्रभू यहोवा, माझी आठवण कर. हे देवा! एकदा, फक्त एकदाच मला शक्ती दे.
[दृश्य ९]
[गोष्ट सांगणारा:] ज्या मधल्या दोन खांबांवर मंदिर आधारलेलं होतं त्यांवर त्याने आपले हात टेकले आणि आपली पूर्ण ताकद लावून ते ढकलले.
[गोष्ट सांगणारा:] यहोवाने त्याला पवित्र शक्ती दिली आणि पुन्हा एकदा शक्तिशाली बनवलं.
[गोष्ट सांगणारा:] इतकी वर्षं इस्राएली लोकांचा छळ करणाऱ्या बऱ्याच पलिष्टी लोकांचा त्याने नाश केला.
[चौकट]
या गोष्टीतून आपण काय शिकतो?
कोणत्या गोष्टीमुळे शमशोनला त्याची जबरदस्त शक्ती मिळाली होती?
हिंट: शास्ते १३:२५.
शमशोनला त्याची शक्ती परत कशी मिळाली?
हिंट: शास्ते १६:२८.
तुम्हाला देवाची पवित्र शक्ती कशी मिळू शकते?
हिंट: लूक ११:१३.
अभ्यास लेख ३७
शमशोनप्रमाणे यहोवावर भरवसा ठेवा
‘हे सर्वोच्च प्रभू यहोवा, माझी आठवण कर, मला शक्ती दे.’—शास्ते १६:२८.
सारांश
शमशोन—हे नाव अनेकांना माहीत आहे. ज्यांना बायबलबद्दल जास्त माहिती नाही, त्यांच्यासाठीसुद्धा हे नाव ओळखीचं आहे. त्याच्या जीवनावर बऱ्याच नाटककारांनी, गीतकारांनी आणि चित्रपट बनवणाऱ्यांनी लिहिलंय. असं असलं तरी बायबलमध्ये दिलेला त्याचा अहवाल ही फक्त एक कथा नाही. शमशोन एक खराखुरा व्यक्ती होता आणि त्याने विश्वासाचं एक जबरदस्त उदाहरण मांडलं. त्याच्याकडून आपण बरंच काही शिकू शकतो.
शमशोन हे नाव ऐकलं तर पहिल्यांदा तुमच्या मनात काय येतं? तुमच्या मनात नक्कीच एका अतिशय शक्तिशाली माणसाचं चित्र उभं राहत असेल. आणि तो तसाच होता. पण त्याने त्याच्या जीवनात एक चुकीचा निर्णय घेतला आणि त्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागेल. तरी त्याने त्याच्या एकंदरीत आयुष्यात विश्वासूपणाचं जे चांगलं उदाहरण मांडलं त्याकडे यहोवाने पाहिलं. आणि आपल्या सर्वांच्या फायद्यासाठी ते बायबलमध्ये लिहूनही ठेवलं.
२ यहोवाने त्याच्या निवडलेल्या इस्राएली लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी मोठमोठ्या अद्भुत गोष्टी करण्यासाठी शमशोनचा उपयोग केला. शमशोनच्या मृत्यूच्या बऱ्याच शतकांनंतर, यहोवाने विश्वासू स्त्री-पुरुषांच्या यादीत त्याच्याही नावाचा उल्लेख करण्यासाठी प्रेषित पौलला प्रेरित केलं. (इब्री ११:३२-३४) त्याच्या उदाहरणातून आपल्यालाही प्रोत्साहन मिळू शकतं. त्याच्या जीवनात बऱ्याच कठीण समस्या आल्या तेव्हासुद्धा तो यहोवावर विसंबून राहिला. शमशोनच्या उदाहरणातून आपल्याला कसं प्रोत्साहन मिळतं आणि त्याच्या उदाहरणातून आपल्याला आणखीन कोणते व्यावहारिक धडे शिकायला मिळतात ते आपण पाहू या.
शमशोनचा यहोवावर भरवसा होता
३ शमशोनचा जन्म झाला तेव्हा पलिष्टी लोक इस्राएलवर राज्य करत होते आणि त्यांचा खूप छळ करत होते. (शास्ते १३:१) त्यांच्या या क्रूर छळामुळे इस्राएली लोकांना खूप दुःख सोसावं लागत होतं. म्हणून यहोवाने “इस्राएलला पलिष्टी लोकांच्या हातून” वाचवण्यासाठी शमशोनला निवडलं. (शास्ते १३:५) ही खरंच खूप कठीण जबाबदारी होती. पण ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी शमशोनला पूर्णपणे यहोवावर विसंबून राहावं लागणार होतं.
४ शमशोन यहोवावर आणि त्याने पुरवलेल्या मदतीवर कसा विसंबून राहिला याच्या एका उदाहरणाचा विचार करा. एकदा असं झालं, की पलिष्ट्यांच्या सैन्याने शमशोनला पकडण्यासाठी लेही इथे छावणी केली होती. आणि हे ठिकाण यहूदामध्ये असावं. हे पाहून यहूदाचे लोक खूप घाबरले आणि त्यांनी शमशोनला शत्रूंच्या हाती द्यायचं ठरवलं. शमशोनच्या स्वतःच्याच लोकांनी त्याला दोन नवीन रश्यांनी बांधलं आणि ते त्याला पलिष्ट्यांकडे घेऊन आले. (शास्ते १५:९-१३) पण “त्या वेळी यहोवाची पवित्र शक्ती शमशोनवर कार्य करू लागली” आणि त्याने स्वतःला सोडवलं. मग त्याला “गाढवाच्या जबड्याचं हाड” सापडलं आणि त्याने त्याचा उपयोग करून १,००० पलिष्टी लोकांना मारून टाकलं.—शास्ते १५:१४-१६ वाचा.
५ पण शमशोनने गाढवाच्या जबड्याचा वापर का केला असेल? कारण ही नक्कीच एक अशी गोष्ट नव्हती ज्याचा वापर शस्त्रासारखा करता येईल. कारण शमशोनला हे चांगलं माहीत होतं, की त्याला मिळणारं यश तो कुठलं हत्यार वापरतो यावर नाही, तर यहोवावर अवलंबून होतं. या विश्वासू माणसाने त्याच्याकडे जे काही होतं त्याचा उपयोग करून यहोवाची इच्छा पूर्ण केली. आणि अशा प्रकारे यहोवावर विसंबून राहिल्यामुळे शमशोनला जबरदस्त यश मिळालं.
६ आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करणं खूप कठीण वाटत असलं, तरी यहोवा आपल्यालासुद्धा त्या पूर्ण करण्यासाठी बळ देऊ शकतो. तो हे अशा मार्गांनी करू शकतो ज्यांमुळे आपल्याला खूप आश्चर्य वाटेल. यहोवाने जशी शमशोनला मदत केली तशी तो त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हालाही मदत करेल असा भरवसा बाळगा. पण त्यासाठी तुम्हाला त्याच्यावर विसंबून राहावं लागेल.—नीति. १६:३.
७ संघटनेच्या बांधकाम प्रकल्पात काम करणाऱ्या बऱ्याच भाऊबहिणींनी यहोवावर भरवसा असल्याचं दाखवलं आहे. आधीच्या काळात बांधव आपली राज्य सभागृहं आणि इतर इमारतींचा आराखडा स्वतःच बनवायचे आणि त्या इमारती बांधायचे. पण काही काळानंतर संघटनेत होणाऱ्या वाढीमुळे या पद्धतीमध्ये बदल करायची गरज पडली. त्यामुळे जबाबदार बांधवांनी यहोवाकडे प्रार्थनेत मदत मागितली आणि नवनवीन पद्धती वापरून पाहिल्या. जसं की, आधीच तयार झालेल्या इमारती विकत घेऊन त्यांत हवे ते फेरबदल करणं. रॉबर्ट नावाचे एक भाऊ जगभरात चाललेल्या आपल्या संघटनेच्या बऱ्याच बांधकाम प्रकल्पांमध्ये अलीकडच्या काही वर्षांपासून काम करत आहे. ते म्हणतात, “सुरुवातीला या नवीन पद्धतीप्रमाणे काम करणं काहींना सोपं गेलं नाही. बऱ्याच वर्षांपासून आम्ही जे करत होतो त्यापेक्षा हे खूप वेगळं होतं. पण बांधव जुळवून घ्यायला तयार होते. आणि यहोवा या नवीन पद्धतीवर आशीर्वाद देत आहे हेही दिसून आलं.” यहोवा आपल्या लोकांचं त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करतो याचं हे फक्त एकच उदाहरण आहे. म्हणून आपल्या सगळ्यांनीच स्वतःला वेळोवेळी हा प्रश्न विचारला पाहिजे, ‘मी यहोवाचं मार्गदर्शन घ्यायचा प्रयत्न करतो का आणि त्याची सेवा करत असताना होणाऱ्या बदलांना मी जुळवून घ्यायला तयार असतो का?’
शमशोनने यहोवाच्या तरतुदींचा फायदा घेतला
८ तुम्ही बायबलमधून असे इतरही अहवाल वाचले असतील ज्यांत शमशोनने आश्चर्याची कामं केली. त्याने एकट्यानेच एका सिंहाला ठार मारलं आणि अष्कलोन या पलिष्टी लोकांच्या शहरात ३० लोकांनासुद्धा मारून टाकलं. (शास्ते १४:५, ६, १९) शमशोनला माहीत होतं की यहोवाच्या मदतीशिवाय त्याला हे करणं शक्यच नव्हतं. उदाहरणार्थ, १,००० पलिष्टी लोकांशी लढून त्यांना ठार मारल्यानंतर तो तहानेने व्याकूळ झाला होता. अशा वेळी त्याने काय केलं? आपली तहान भागवण्यासाठी स्वतःच काहीतरी करण्याऐवजी त्याने त्यासाठी यहोवाकडे मदत मागितली.—शास्ते १५:१८.
९ शमशोनने मदतीसाठी केलेली प्रार्थना यहोवाने ऐकली आणि त्याला चमत्कार करून पाणी पुरवलं. ते पाणी प्यायल्यावर “शमशोनच्या जिवात जीव आला आणि तो ताजातवाना झाला.” (शास्ते १५:१९ वाचा.) असं दिसतं की हा पाण्याचा झरा पुढेही कित्येक वर्षांनंतरसुद्धा अस्तित्वात होता; म्हणजे, यहोवाने शमुवेलला शास्ते पुस्तक लिहायची प्रेरणा दिली तेव्हासुद्धा होता. वाहत्या पाण्याचा हा झरा पाहून इस्राएली लोकांना याची आठवण होत असेल, की जे यहोवावर विसंबून राहतात त्या विश्वासू सेवकांना त्यांच्या गरजेच्या वेळी तो मदत करतो.
१० आपल्याकडेसुद्धा बरीच कौशल्यं किंवा क्षमता असल्या किंवा यहोवाच्या सेवेत आपण काही गोष्टी साध्य केलेल्या असल्या, तरीसुदधा आपण मदतीसाठी यहोवावर विसंबून राहिलं पाहिजे. आपण हे नम्रपणे मान्य केलं पाहिजे, की खरं यश फक्त यहोवावर विसंबून राहिल्यामुळेच मिळतं. यहोवाने पुरवलेल्या पाण्यामुळे जसं शमशोन ताजातवाना झाला, तसंच आपणसुद्धा जेव्हा यहोवाने केलेल्या तरतुदींचा फायदा घेतो तेव्हा आध्यात्मिक रितीने आपण मजबूत होऊ शकतो.—मत्त. ११:२८.
११ रशियामध्ये राहणाऱ्या ॲलेक्सी नावाच्या आपल्या एका भावाचा विचार करा. त्याचा खूप वाईट रितीने छळ होत आहे. अशा कठीण परिस्थितीत खंभीर राहायला त्याला कशामुळे मदत होत आहे? तो आणि त्याची पत्नी नियमितपणे बायबल अभ्यास आणि उपासनेशी संबंधित इतर गोष्टी करत होते. याबद्दल तो म्हणतो: “मी माझा व्यक्तिगत अभ्यास आणि दररोजचं बायबल वाचन नियमितपणे करायचा प्रयत्न करतो. दररोज सकाळी मी आणि माझी पत्नी दैनिक वचनावर चर्चा करतो आणि सोबत मिळून यहोवाला प्रार्थना करतो.” यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? या बांधवाप्रमाणे आपणसुद्धा स्वतःवर अवलंबून राहण्याऐवजी यहोवावर विसंबून राहिलं पाहिजे. आपण हे कसं करू शकतो? आपण व्यक्तिगत अभ्यास नियमितपणे करून आणि उपासनेशी संबंधित इतर गोष्टींमध्ये भाग घेऊन आपला विश्वास मजबूत करू शकतो. यहोवाची सेवा करण्यासाठी आपण जी मेहनत घेतो त्यावर तो भरभरून आशीर्वाद देईल. त्याने शमशोनला जसं बळ दिलं तसं तो आपल्यालाही देईल.
शमशोनने हार मानली नाही
१२शमशोन हा आपल्यासारखाच अपरिपूर्ण होता. त्यामुळे काही वेळा त्याने चुकीचे निर्णय घेतले. जसं की, त्याने एक असा निर्णय घेतला ज्याचे त्याला खूप वाईट परिणाम भोगावे लागले. तो शास्ता म्हणून काम करू लागला याच्या काही काळानंतर तो “दलीला नावाच्या एका स्त्रीच्या प्रेमात पडला; ती सोरेक खोऱ्यात राहायची.” (शास्ते १६:४) आधी शमशोनला एका पलिष्टी स्त्रीशी लग्न करायचं होतं. पण ‘हे सगळं यहोवाने घडवून’ आणलं होतं, कारण यहोवा “पलिष्टी लोकांविरुद्ध लढण्याची संधी पाहत होता.” नंतर शमशोन गाझा या पलिष्टी शहरात एका वैश्येच्या घरी राहिला. आणि त्या वेळी यहोवा देवाने शमशोनला शहराचे दरवाजे उचलून न्यायची शक्ती दिली. त्यामुळे शहराची सुरक्षा धोक्यात आली. (शास्ते १४:१-४; १६:१-३) पण जेव्हा तो दलीलाच्या प्रेमात पडला तेव्हा गोष्ट वेगळी होती. ती कदाचित एक इस्राएली स्त्री असावी. त्यामुळे तिच्यासोबत असलेल्या त्याच्या संबंधामुळे त्याला पलिष्टी लोकांविरुद्ध लढायची संधी मिळणार नव्हती.
१३ शमशोनला फसवण्यासाठी दलीलाने पलिष्टी लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले. शमशोन दलीलाच्या प्रेमात इतका आंधळा झाला होता का, की तिचा नेमका हेतू काय आहे हे त्याला समजलं नाही. कारण काहीही असो, पण शमशोनला शक्ती कुठून मिळते, हे त्याचं रहस्य जाणून घेण्यासाठी तिने त्याच्याकडे हट्ट धरला आणि शमशोनने शेवटी तिला सगळं काही सांगून दिलं. दुःखाची गोष्ट म्हणजे, शमशोनच्या या चुकीमुळे तो अडचणीत सापडला आणि त्याने त्याची शक्ती गमावली. आणि निदान काही काळासाठी तरी त्याने यहोवाची स्वीकृती गमावली.—शास्ते १६:१६-२०.
१४शमशोनने यहोवावर भरवसा ठेवण्याऐवजी दलीलावर भरवसा ठेवल्यामुळे त्याला त्याचे खूप दुःखद परिणाम भोगावे लागले. पलिष्टी लोकांनी त्याला पकडून त्याचे डोळे फोडले. त्याला गाझामध्ये तुरुंगात टाकण्यात आलं. काही काळाआधी त्याने याच शहराचे दरवाजे उखडून पलिष्टी लोकांचा अपमान केला होता. पण आता लोकांनी त्याला त्याच ठिकाणी धान्य दळायला लावलं होतं. यानंतर पलिष्टी लोकांनी त्याचा आणखीन अपमान करण्यासाठी मोठा आनंदोत्सव साजरा केला. त्यांनी दागोन या त्यांच्या खोट्या दैवतासाठी यज्ञ केला, कारण त्यांच्या देवाने शमशोनला त्यांच्या हाती दिलंय असं त्यांना वाटत होतं. त्यांनी शमशोनला त्यांची “करमणूक” करायला तुरुंगातून त्या ठिकाणी बाहेर आणलं.—शास्ते १६:२१-२५.
१५शमशोनने गंभीर चूक केली होती पण त्याने हार मानली नाही. पलिष्टी लोकांविरुद्ध लढण्याची देवाने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तो संधी शोधत राहिला. (शास्ते १६:२८-३० वाचा.) ‘मला पलिष्टी लोकांचा बदला घेऊ दे’ अशी विनंती त्याने यहोवाकडे केली. यहोवाने शमशोनच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं आणि त्याला त्याची शक्ती परत दिली. त्यामुळे त्याने आतापर्यंत जितक्या पलिष्टी लोकांना मारलं होतं त्यापेक्षा जास्त लोकांना या वेळी ठार मारलं.
१६ शमशोनला त्याच्या चुकीच्या निर्णयाचे जरी वाईट परिणाम भोगावे लागले, तरी त्याने यहोवाची इच्छा पूर्ण करायचं सोडलं नाही. आपल्या हातूनपण जेव्हा चुका होतात, आपल्याला ताडन देण्याची गरज पडते किंवा एखादी जबाबदारी आपण गमावतो, तेव्हा आपण हार मानली नाही पाहिजे. लक्षात ठेवा की यहोवा आपल्याबद्दल आशा सोडत नाही. (स्तो. १०३:८-१०) आपल्याकडून चुका झाल्या तरी शमशोनप्रमाणे यहोवा त्याच्या सेवेत आपला उपयोग करून घेऊ शकतो.
१७ मायकल नावाच्या एका तरुण भावाच्या उदाहरणाचा विचार करा. तो यहोवाच्या सेवेत खूप व्यस्त होता. तो मंडळीत सहायक सेवक आणि पायनियर म्हणून सेवा करायचा पण दुःखाची गोष्ट म्हणजे काही काळानंतर त्याच्या हातून एक चूक झाली. आणि त्यामुळे मंडळीत असलेल्या जबाबदाऱ्या त्याने गमावल्या. तो म्हणतोः “सगळं काही व्यवस्थित चाललं होतं, मी यहोवाच्या सेवेत खूप व्यस्त होतो. पण अचानक या गोष्टीमुळे मी काहीच कामाचा नाही असं मला वाटू लागलं. जसं की एक मोठी भिंतच माझासमोर उभी आहे असं मला वाटत होतं. यहोवाने मला सोडलंय असा विचार माझ्या मनात कधीच आला नाही. पण त्याच्यासोबत असलेलं माझं नातं आधीसारखं होईल का? आणि मंडळीत मला पहिल्यासारखी आवेशाने त्याची सेवा करता येईल का अशी शंका मला होती.”
१८ पण चांगली गोष्ट म्हणजे मायकलने हार मानली नाही. तो म्हणतो: “यहोवासोबतचं नातं चांगलं करत राहण्यासाठी मी प्रयत्न करत राहिलो. मी दररोज त्याला प्रार्थना करून त्याला मनातलं सांगायचो तसंच अभ्यास आणि मननसुद्धा करायचो.” काही काळानंतर, मायकलने मंडळीमध्ये पुन्हा एक चांगलं नाव कमवलं. तो आता एक वडील आणि पायनियर म्हणून सेवा करतो. तो म्हणतो: “मंडळीकडून आणि खासकरून वडिलांकडून मला जी मदत आणि उत्तेजन मिळालं त्यामुळे यहोवाचं माझ्यावर खरंच किती प्रेम आहे याची जाणीव मला झाली. मी आता पुन्हा एकदा शुद्ध विवेकाने मंडळीमध्ये सेवा करू शकत होतो. या अनुभवातून मला शिकायला मिळालं की जे मनापासून पश्चात्ताप करतात त्यांना क्षमा करायला यहोवा तयार असतो.” आपल्या हातूनही जरी चुका झाल्या तरी आपण त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करू शकतो आणि यहोवावर विसंबून राहू शकतो. असं केल्यामुळे आपण ही खातरी बाळगू शकतो की यहोवा त्याच्या सेवेत आपला उपयोग करेल आणि आपल्याला आशीर्वाद देईल.—स्तो. ८६:५; नीति. २८:१३.
१९ या लेखात आपण शमशोनच्या आयुष्यात घडलेल्या काही अद्भुत घटनांबद्दल चर्चा केली. तो परिपूर्ण नव्हता. दलीलाच्या बाबतीत त्याच्या हातून एक चूक झाली, तरी यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने हार मानली नाही. आणि यहोवानेही त्याला सोडलं नाही. आणि जबरदस्त गोष्टी करण्यासाठी पुन्हा एकदा त्याचा वापर केला. त्याच्या हातून चूक झाली तरी यहोवाने विश्वासाचं एक भक्कम उदाहरण म्हणून त्याच्याकडे पाहिलं. आणि इब्री लोकांना ११ व्या अध्यायात सांगितलेल्या विश्वासू स्त्री-पुरुषांमध्ये त्याच्या नावाचा उल्लेख केला. अशा प्रेमळ पित्याची सेवा करणं ही गोष्ट खरंच किती प्रोत्साहनदायक आहे! खासकरून आपण कमजोर असताना तो आपल्याला मदत करायला आणि बळ द्यायला तयार असतो. त्यामुळे शमशोनसारखं आपण यहोवाला विनंती करू या: ‘यहोवा, माझी आठवण कर, मला शक्ती दे.’—शास्ते १६:२८.
तो लहान होता, तरी यहोवाच्या वतीने बोलला
टेहळणी बुरूज९२ ११/१ ८-९
शिलोमध्ये राहणारी चांगली आणि वाईट मुलं
वचन दिलेल्या देशातली काही दृश्यं
आपण जेव्हा वचन दिलेल्या देशाच्या शहरांचा, गावांचा किंवा तिथल्या प्रदेशांचा विचार करतो, तेव्हा सहसा बायबलमध्ये उल्लेख केलेल्या काही स्त्री-पुरुषांची नावं आपल्या मनात येतात. पण मुलांबद्दल काय? त्यांचं जीवन तिथे कसं होतं याची तुम्ही कधी कल्पना केली आहे का?
वर दिलेल्या चित्रावरून त्या काळातल्या काही लहान मुलांचं जीवन कसं होते याची कल्पना आपल्याला करता येते. त्यांच्यापैकी काही जणांचं ख्रिश्चनांसाठी चांगलं उदाहरण होतं तर काही जणांचं वाईट उदाहरण होतं. चित्राच्या मध्यभागी असलेल्या गोलाकार टेकडीवरच कदाचित शिलो असावं.
तुम्हाला कदाचित आठवत असेल, की इस्राएली लोक वचन दिलेल्या देशात आले तेव्हा त्यांनी देवाच्या उपासना मंडपासाठी यरीहोच्या जवळ असलेलं गिलगाल हे ठिकाण निवडलं. (यहोशवा ४:१९) वचन दिलेला देश जेव्हा इस्राएलच्या वंशांना वाटून दिला जात होता तेव्हा उपासना मंडप शिलो इथे हलवण्यात आला. अशा प्रकारे शिलो हे इस्राएलमध्ये उपासनेचं केंद्रस्थान बनलं. (यहोशवा १८:१) हे यरुशलेमच्या उत्तरेला ३० किमी. लांब एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात होतं. इस्राएलमधले सगळे स्त्री-पुरुष शिलो इथे उपासनेसाठी एकत्र यायचे. दक्षिणेकडच्या खोऱ्यात जिथे हा उपासना मंडप होता तिथे लोक मोठ्या संख्येने एकत्र येऊ शकत होते. (यहोशवा २२:१२) त्यांच्यासोबत लहान मुलंसुद्धा येत असतील अशी कल्पना आपण करू शकतो.
तिथे येणाऱ्या लहान मुलांमध्ये सगळ्यात उल्लेखनीय उदाहरण शमुवेलचं होतं. त्याचे आईवडील, एलकाना आणि हन्ना हे शिलोच्या पश्चिमेला असलेल्या डोंगराळ भागातल्या एका गावात राहायचे. दरवर्षी ते शिलो इथे कदाचित एलकानाच्या दुसऱ्या पत्नीकडून झालेल्या मुलांना सोबत घेऊन यायचे. शेवटी यहोवाच्या आशीर्वादाने हन्नाला एक मुलगा झाला आणि त्याचं नाव शमुवेल ठेवण्यात आलं. काही काळाने त्याच्या आईवडिलांनी त्याला शिलो इथल्या उपासना मंडपात महायाजक एलीसोबत सेवा करायला आणलं.—१ शमुवेल १:१–२:११.
देवाच्या घरात त्याला काही कामं देण्यात आली होती. तसंच, आसपासच्या डोंगराळ भागात फेरफटका मारायची बऱ्याच वेळा त्याला संधी मिळाली असेल. (१ शमुवेल ३:१, १५) पान ९ वरच्या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे तिथे डोंगराच्या उतारावर भरपूर प्रमाणात जैतुनाची झाडं असायची. तिथे पहारेकऱ्यांचा एक छोटासा दगडी बुरूजसुद्धा होता. तिथून शेतकरी आणि मेंढपाळ आपल्या पिकांवर आणि कळपांवर नजर ठेवायचे. लहान शमुवेलसुद्धा तिथे चढून आसपासचा प्रदेश पाहत असल्याची कल्पना तुम्ही करू शकता का? (२ इतिहास २०:२४ सोबत तुलना करा.) जंगली प्राण्यांवर उंचावरून नजर ठेवायचं हे एक चांगलं ठिकाण होतं.
त्या काळात तिथे आजच्यापेक्षा जास्त झाडं होती आणि जंगली प्राणी राहू शकतील अशी दाट जंगलंही होती. (यहोशवा १७:१५, १८) ही गोष्ट, अलीशा देवाचा मुख्य संदेष्टा बनला तेव्हा घडलेल्या एका घटनेवरून समजते. अलीशा यरीहोपासून बेथेलला चालला होता. हे ठिकाण शिलोपासून जवळजवळ १६ किमी. लांब दक्षिणेकडे असलेल्या एका भागात होतं. बेथेलमध्ये राहणारे लोक सोन्याच्या वासराची उपासना करायचे. त्यामुळे तिथले लोक आपल्याशी कसं वागतील असा प्रश्न त्याला पडला असावा. (१ राजे १२:२७-३३; २ राजे १०:२९) असं दिसतं की तिथले लोक देवाच्या संदेष्ट्याचा द्वेष करायचे आणि त्यांची मुलंसुद्धा त्यांच्यासारखीच वाईट प्रवृत्तीची होती.
२ राजे २:२३, २४ मध्ये सांगितल्याप्रमाणे, काही मुलांनी देवाच्या संदेष्ट्याची असं म्हणून टिंगल करायला सुरुवात केली: “अरे टकल्या, निघ इथून! अरे टकल्या, निघ इथून!” मग अलीशाने “मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं, आणि यहोवाच्या नावाने त्यांना शाप दिला. तेव्हा जंगलातून दोन अस्वली बाहेर आल्या आणि त्यांनी त्यांतल्या ४२ मुलांना फाडून ठार मारलं.” सीरियामध्ये पाहायला मिळणाऱ्या तपकिरी अस्वलांना कोणी अचानक घाबरवलं किंवा आपल्या बछड्यांना धोका आहे असं जर त्यांना वाटलं तर ते लगेच आक्रमण करतात. (२ शमुवेल १७:८; नीतिवचनं १७:१२; २८:१५) आपल्या प्रतिनिधीचा घोर अपमान करून एका अर्थाने आपलाच तिरस्कार करणाऱ्यांवर न्यायदंड बजावण्यासाठी यहोवाने त्या अस्वलींचा वापर केला.
शिलोच्या डोंगराळ भागात अशा जंगली प्राण्यांचा धोका असूनसुद्धा शमुवेलच्या आईवडिलांनी त्याला उपासना मंडपात सेवा करायला पाठवलं. यावरून यहोवावर त्यांचा किती विश्वास होता हे दिसतं.
याआधी देवाच्या आणखी एका खऱ्या उपासकाने यहोवाबद्दल असाच विश्वास आणि प्रेम दाखवलं. तो होता, न्यायाधीश इफ्ताह. यार्देनच्या पूर्वेकडे असलेल्या गिलादच्या डोंगराळ भागात तो राहत होता. यहोवासाठी असलेल्या आवेशामुळे तो अम्मोनी लोकांविरुद्ध लढत होता, तेव्हा त्याने यहोवाला असा नवस केला, की सगळ्यात आधी जी व्यक्ती त्याला भेटायला त्याच्या घरातून बाहेर येईल तिला यहोवाची सेवा करण्यासाठी तो अर्पण म्हणून देईल. आणि असं झालं की कुमारी असलेली त्याची तरुण मुलगीच सगळ्यात आधी त्याला भेटायला आली. म्हणून त्याने आपल्या या एकुलत्या एका लेकराला शिलो इथल्या देवाच्या घरात आणलं आणि तिथे तिने वर्षानुवर्षं विश्वासूपणे यहोवाची सेवा केली.—शास्ते ११:३०-४०.
शिलोमध्ये राहणाऱ्या शमुवेलने आणि इफ्ताहच्या मुलीने यहोवावर प्रेम आणि विश्वास दाखवण्याच्या बाबतीत चांगलं उदाहरण मांडलं. तर त्याच भागात राहणाऱ्या ४२ दुष्ट मुलांनी यहोवाच्या संदेष्ट्याला चिडवून अतिशय वाईट उदाहरण मांडलं.—१ करिंथकर १०:६, ११ सोबत तुलना करा.
तो “यहोवासमोर वाढत गेला”
९ थोडा मोठा झाल्यावर, कदाचित शमुवेल शिलोच्या आसपासच्या डोंगरांमध्ये फिरायला जात असेल. त्या डोंगरदऱ्यांमध्ये फिरणाऱ्या लहान शमुवेलाचं चित्र तुम्ही डोळ्यांसमोर उभं करू शकता का? जवळच्या डोंगरावरून खाली पाहिल्यावर त्याला शिलोचं नगर आणि त्याच्या एका बाजूला दूरपर्यंत पसरलेली दरी दिसत असेल. ते दृश्य पाहताना यहोवाच्या निवासमंडपावर नजर जाताच, त्याला किती आनंद आणि अभिमान वाटत असेल! निवासमंडप खरोखरंच एक अतिशय पवित्र स्थान होतं. सुमारे ४०० वर्षांपूर्वी, खुद्द मोशेच्या देखरेखीखाली त्याचं बांधकाम करण्यात आलं होतं. यहोवाच्या शुद्ध उपासनेचं ते त्या काळी जगातलं एकमेव स्थान होतं!
१० हळूहळू शमुवेलाला निवासमंडपात सेवा करणं मनापासून आवडू लागलं. पुढं त्यानं लिहिलेल्या अहवालात आपण असं वाचतो: “शमुवेल बाळ सणाचे एफोद धारण करून परमेश्वराची सेवा करत असे.” (१ शमु. २:१८) हे एक साधंसं बिनबाह्यांचं वस्त्र होतं आणि शमुवेल निवासमंडपात याजकांना साहाय्य करत असल्याचं ते प्रतीक होतं. शमुवेल हा याजकवर्गातला नसला, तरीसुद्धा पहाटे निवासमंडपाच्या अंगणाची दारं उघडणं आणि वयस्क एलीची सेवा करणं, यांसारखी कामं त्याच्यावर सोपवण्यात आली होती. ही कामं तो अगदी मन लावून, आनंदानं करत असे. पण, काही काळानं यहोवाच्या निवासमंडपात अतिशय वाईट गोष्टी घडू लागल्यामुळं, त्याचं कोवळं, निष्पाप मन अस्वस्थ झालं.
वाईट प्रभाव असतानाही निष्कलंक
११ लहान वयातच शमुवेलानं घोर अनीती आणि दुष्टाई अगदी जवळून पाहिली. एलीला दोन मुलं होती. हफनी आणि फिनहास. शमुवेलाच्या अहवालात असं म्हटलं आहे: “एलीचे पुत्र अधम होते; त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती.” (१ शमु. २:१२) या वचनात मांडलेल्या दोन गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. कारण, “अधम” असं भाषांतर केलेल्या मूळ हिब्रू भाषेतील शब्दाचा अर्थ, “कोणत्याच लायकीची नसलेली मुलं” असा होतो. त्यांना ‘यहोवाची ओळख नसल्यामुळं,’ म्हणजेच यहोवाबद्दल त्यांच्या मनात जराही आदर नसल्यामुळंच ते कोणत्याही लायकीचे नव्हते. यहोवाच्या नीतिमान स्तरांची आणि आज्ञांची त्यांना काहीच पर्वा नव्हती. या एका चुकीमुळंच त्यांच्या हातून बाकीची सर्व पातकं घडली.
१२ याजकांच्या जबाबदाऱ्यांविषयी आणि निवासमंडपात बलिदानं कशी अर्पण केली जावीत, याविषयी देवाच्या नियमशास्त्रात काटेकोर नियम देण्यात आले होते. आणि त्यामागं एक खास कारणही होतं. ही बलिदानं लोकांच्या पापांची क्षमा करून त्यांना शुद्ध करण्यासाठी यहोवानं केलेली तरतूद होती, जेणेकरून ते त्याचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळवण्यास पात्र ठरू शकतील. शिवाय, ती भविष्यातील खंडणी बलिदानाला सूचित करत होती. पण, बलिदानांचा आदर करण्याऐवजी, हफनी व फिनहास यांनी आपल्या सोबतीच्या याजकांनाही निवासमंडपातील बलिदानांचा घोर अनादर करण्यास प्रवृत्त केलं.
१३ अशा धक्कादायक गोष्टी निवासमंडपात सर्रास घडत होत्या आणि कुणी त्यांची साधी दखलही घेत नव्हतं, हे पाहून शमुवेल किती अस्वस्थ होत असेल याची कल्पना करा! याजक आपलं सांत्वन करतील, आपल्याला धीर देतील या आशेनं निवासमंडपात आलेले साधेभोळे, गरीब लोक जेव्हा निराश आणि अपमानित होऊन तिथून परत जात असतील, तेव्हा शमुवेलाला कसं वाटत असेल? आणि हफनी व फिनहास हे लैंगिक संबंधांविषयी दिलेल्या यहोवाच्या कायद्यांचंही उल्लंघन करून, निवासमंडपात काम करणाऱ्या काही स्त्रियांशी संबंध ठेवत होते, हे जेव्हा शमुवेलाला कळलं तेव्हा त्याला कसं वाटलं असेल? (१ शमु. २:२२) कदाचित एली याविषयी काहीतरी करेल अशी अपेक्षा त्यानं केली असेल.
“देवाजवळ या”
५ योहान १७:३ (NW) या वचनानुसार येशूने म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुझे व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताचे त्यांनी ज्ञान घ्यावे.” अनेक भाषांतरांत या वचनाचा अनुवाद नवे जग भाषांतर (इंग्रजी) यापेक्षा वेगळ्याप्रकारे करण्यात आला आहे. “ज्ञान घ्यावे” असे म्हणण्याऐवजी त्यात केवळ देवाला “ओळखावे” किंवा देवाला “ओळखणे” हे क्रियापद वापरले आहे. पण बऱ्याच विद्वानांच्या मते मूळ ग्रीक भाषेत वापरलेल्या शब्दात यापेक्षा अधिक अर्थ सामावलेला आहे. त्या शब्दांतून एका चालू प्रक्रियेचा अर्थ सूचित होतो, अशी प्रक्रिया जिची दुसऱ्या व्यक्तीशी घनिष्ट संबंध निर्माण होण्यात परिणती होऊ शकते.
६ देवाची जवळून ओळख घडण्याची कल्पना येशूच्या काळात काही नवीन नव्हती. उदाहरणार्थ, इब्री शास्त्रवचनांत आपण असे वाचतो, की शमुवेल लहान असताना, ‘अद्यापि त्यास परमेश्वराची ओळख झाली नव्हती.’ (१ शमुवेल ३:७) याचा अर्थ शमुवेलला त्याच्या देवाविषयी फार कमी माहिती होती असा होतो का? नाही. निश्चितच त्याच्या आईवडिलांनी त्याला बरेच काही शिकवले असेल. पण या वचनात वापरलेल्या इब्री शब्दाचा “सर्वात जवळच्या माणसांच्या संदर्भात वापर” केला जाऊ शकतो. त्याअर्थी, शमुवेलाला यहोवाची अगदी जवळून ओळख झालेली नव्हती; ती नंतर, म्हणजे तो यहोवाच्या प्रवक्त्याच्या भूमिकेत सेवा करू लागल्यानंतर घडणार होती. शमुवेल मोठा होऊ लागला तसतशी त्याला खऱ्या अर्थाने यहोवाची ओळख घडली आणि अशारितीने त्याचा देवासोबत एक घनिष्ठ वैयक्तिक नातेसंबंध जुळला.—१ शमुवेल ३:१९, २०.
इन्साइट “एली, १” ¶५-७
एली, १
काही काळानंतर देवाच्या एका संदेष्ट्याने एक भयंकर संदेश सांगितला. तो म्हणजे, एली आणि त्याच्या घराण्याचा प्रभाव आणि अधिकार काढून घेतला जाईल. त्याच्या घराण्यातला एकही माणूस म्हातारा होईपर्यंत जगणार नाही. त्याची भ्रष्ट मुलं एकाच दिवशी मरतील. (१शमु २:२७-३६) यहोवाने लहान शमुवेलचा वापर करून एलीच्या घराण्यावर येणाऱ्या कठोर न्यायदंडाबद्दल त्याला पुन्हा एकदा सांगितलं. (१शमु ३:११-१४) सुरुवातीला हा संदेश सांगायला शमुवेल घाबरत होता. पण एलीने विनंती केल्यामुळे त्याने तो सांगितला. मग एलीने नम्रपणे असं म्हटलं: “तो यहोवा आहे. त्याला जसं योग्य वाटतं तसं तो करो.”—१शमु ३:१५-१८.
यहोवा त्याच्या घराण्यावर न्यायदंड बजावतो. देवाने सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर न्यायदंड आला. पलिष्टी लोकांविरुद्ध झालेल्या लढाईत जवळजवळ ४,००० इस्राएली सैनिक मारले गेले. मग इस्राएली लोकांनी शिलोमधून कराराची पेटी युद्धभूमीवर घेऊन यायचं ठरवलं. त्यांना असं वाटलं, की त्यामुळे शत्रूंपासून आपण वाचू. पण पलिष्टी लोक इस्राएली लोकांशी लढले आणि त्यांनी त्यांना हरवून टाकलं. यात तीस हजार इस्राएली सैनिक मारले गेले आणि पलिष्ट्यांनी देवाच्या कराराची पेटी ताब्यात घेतली. त्या वेळी कराराच्या पेटीसोबत असणारे हफनी आणि फिनहास मारले गेले. तेव्हा बन्यामीन वंशातला एक माणूस युद्धभूमीतून धावत एलीकडे ही बातमी सांगायला गेला. एली तेव्हा ९८ वर्षांचा होता आणि त्याला काहीच दिसत नव्हतं. तो रस्त्याच्या कडेला बातमीची वाट बघत बसला होता. त्याला खऱ्या देवाच्या पेटीची खूप काळजी वाटत होती. जेव्हा त्याला समजलं, की पलिष्ट्यांनी कराराची पेटी ताब्यात घेतली आहे, तेव्हा एली तिथेच मागे कोसळून पडला आणि त्याची मान मोडून तो जागीच मेला.—१शमु ४:२-१८.
एलीच्या घराण्यावर पुढे शौल राजाच्या हातून न्यायदंड बजावण्यात आला. त्याने अगदी क्रूरपणे नोबमधल्या याजकांना, म्हणजेच एलीच्या वंशजांना मारून टाकायचा हुकूम दिला. हे याजक एलीचा मुलगा फिनहास आणि फिनहासचा मुलगा अहीटूब यांच्या वंशातून होते. (१शमु १४:३; २२:११, १८) फक्त अहीमलेखचा मुलगा अब्याथार हा वाचला आणि दावीदच्या संपूर्ण शासनकाळात याजक म्हणून सेवा करत राहिला. (१शमु २२:२०; २शमु १९:११) पण, त्यालाही शलमोन राजाने याजकपदावरून काढून टाकलं. कारण तो कट रचणाऱ्या बंडखोर अदोनीयाला मदत करायला तयार झाला होता. (१रा १:७; २:२६, २७) अशा प्रकारे यहोवाने एलीच्या घराण्यावर बजावलेला न्यायदंड पूर्ण झाला आणि त्याच्या घराण्याला महायाजक म्हणून सेवा करायचा जो बहुमान मिळाला होता तो कायमचा काढून घेण्यात आला.—१शमु ३:१३, १४.
बायबलच्या चित्रकथा लेख १५
शमुवेलने यहोवाची सेवा करायचं निवडलं
बायबलच्या चित्रकथा
[दृश्य १]
[गोष्ट सांगणारा:] शमुवेल वयाने खूप लहान असला, तरी तो एक नाझीर होता. त्याने कधीच आपले केस कापले नाहीत आणि त्याने एका खास पद्धतीने यहोवाची सेवा केली.
[हन्ना:] शमुवेल बाळा, आतापासून तू इथेच उपासना मंडपात राहाशील आणि यहोवाची सेवा करशील. राहशील ना?
[शमुवेल:] हो, पण मला तुझी खूप आठवण येईल!
[दृश्य २]
[हन्ना:] मलाही तुझी खूप आठवण येईल बाळा. पण घाबरू नकोस. आठवतं आपण काय शिकलो होतो?
[शमुवेल:] हो, मी जर यहोवाच्या जवळ राहिलो तर तोसुद्धा माझ्याजवळ राहील.
[दृश्य ३]
[एली:] माझं नाव एली आहे. मी महायाजक आहे. इथे कायकाय चाललंय ते बघून घे. लवकरच तुलापण या कामात मदत करायची आहे!
[दृश्य ४]
[गोष्ट सांगणारा:] शमुवेल मोठा होत असताना त्याला समजू लागलं, की इथे उपासना मंडपातल्या सगळ्यांचं यहोवावर प्रेम नाही. चक्क याजक असलेली एलीची मुलंसुद्धा लोकांवर दमदाटी करायची आणि वाईट वागायची.
[गोष्ट सांगणारा:] एलीची मुलं यहोवाचा अपमान करायची, यहोवाला अर्पण केलेली बलिदानं चोरायची आणि घाणेरडी कामं करायची. यहोवाने एका संदेष्ट्याद्वारे एलीला सांगितलं, की तो त्याला आणि त्याच्या घराण्याला शिक्षा करेल. पण तरीसुद्धा एलीने आपल्या मुलांना रोखलं नाही.
[दृश्य ५]
[गोष्ट सांगणारा:] दरवर्षी शमुवेलचे आईवडील त्याला भेटायला यायचे तेव्हा ते त्याला बिनबाह्यांचा झगा घेऊन यायचे.
[शमुवेल:] मम्मी-पप्पा! मला तुमची खूप आठवण आली.
[दृश्य ६]
[हन्ना:] का? काय झालं बाळा?
[दृश्य ७]
[शमुवेल:] तुम्ही मला सांगितलं होतं, की उपासना मंडप एक पवित्र ठिकाण आहे. पण इथे तर काही लोक खूप वाईट-वाईट कामं करतात.
[दृश्य ८]
[हन्ना:] पण तू जर चांगली कामं करत राहिलास तर . . .
[दृश्य ९]
[शमुवेल:] हो, मी तसंच करायचा प्रयत्न करतोय.
[दृश्य १०]
[हन्ना:] बाळा, मला कळतंय. यहोवालासुद्धा कळतंय. त्याला सगळं काही दिसतंय.
[दृश्य ११]
[हन्ना:] एकदा मी खूप दुःखी झाले होते. कारण मला मुलं होत नव्हती.
[हन्ना:] पण यहोवाने माझी प्रार्थना ऐकली आणि मला तू झालास. यहोवा त्याच्या मित्रांना नेहमी मदत करतो.
[हन्ना:] तू यहोवाकडे मदत माग. आम्ही दोघंसुद्धा तुझ्यासाठी प्रार्थना करू.
[दृश्य १२]
[शमुवेल:] मम्मी तू बरोबर बोलतेस. थँक्यू!
[दृश्य १३]
[गोष्ट सांगणारा:] शमुवेल मोठा होऊन यहोवाचा एक विश्वासू सेवक बनला. इतर जण वाईट कामं करत होते तरी यहोवामुळे तो आनंदी राहू शकला.
[दृश्य १४]
[गोष्ट सांगणारा:] मग एक दिवस यहोवाने शमुवेलला एका खास पद्धतीने वापरायला सुरू केलं. तो शमुवेलशी बोलला.
[यहोवा:] शमुवेल!
[यहोवा:] शमुवेल!
[शमुवेल:] बोल, तुझा सेवक ऐकतोय.
[गोष्ट सांगणारा:] इतरांनी वाईट कामं करायचं निवडलं, पण शमुवेलने यहोवाची सेवा करायची निवड केली. म्हणून यहोवाने त्याला प्रशिक्षण दिलं आणि जबरदस्त मार्गांनी त्याचा वापर केला.
[चौकट]
या गोष्टीतून आपण काय शिकतो?
यहोवाची सेवा करणं लहान असलेल्या शमुवेलसाठी सोपं का नव्हतं?
हिंट: १ शमुवेल २:१२, १७.
यहोवाने संदेष्टा म्हणून शमुवेलची निवड का केली?
हिंट: १ शमुवेल २:२६.
इतर जण वाईट कामं करत असले तरी तुम्ही यहोवाची सेवा करायची निवड कशी करू शकता?
हिंट: स्तोत्र २६:९-१२.