वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wcg अध्या. १७ पृ. ८२-८५
  • ‘सगळ्या स्त्रियांमध्ये आशीर्वादित!’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘सगळ्या स्त्रियांमध्ये आशीर्वादित!’
  • धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • संशोधन करा
  • शिकलेल्या मुद्द्‌यांवर विचार करा
  • मनन करण्यासाठी
  • आणखी शिका
  • एक नवीन मार्गदर्शक आणि दोन धाडसी स्त्रिया
    बायबलमधून शिकू या!
  • दोन शूर स्त्रिया
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • विश्‍वासाद्वारे, बाराकने शक्‍तिशाली सैन्य पराजित केले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • “मी तुमच्यासोबत नक्की येईन”
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
अधिक माहिती पाहा
धैर्याने देवाची उपासना करत राहा!
wcg अध्या. १७ पृ. ८२-८५

१७ याएल

‘सगळ्या स्त्रियांमध्ये आशीर्वादित!’

छापील आवृत्ती
छापील आवृत्ती

सीसरा हा एका शक्‍तिशाली सैन्याचा सेनापती होता. पण तरी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो आपल्या सैन्याला मागे सोडून इज्रेलच्या खोऱ्‍यातून पळून गेला. आपल्यासारख्या शक्‍तिशाली सैन्याला इस्राएलच्या साध्याशा सैन्याने हरवून टाकावं ही गोष्टच त्याला पचत नव्हती. कारण त्याच्या बलाढ्य सैन्याकडे युद्धाचे ९०० लोखंडी रथ होते आणि त्या रथांच्या चाकांना धारदार सुऱ्‍या होत्या. याच्या अगदी उलट, इस्राएलच्या सैन्याकडे फक्‍त पायदळ सैन्य आणि फारच कमी शस्त्रसामग्री होती. युद्धातून पळून जात असताना सीसराच्या डोक्यात एकच विचार चालू होता, ‘आता लपायचं कुठं?’ धावत धावत तो हेबेर नावाच्या एका केनी माणसाच्या तंबूकडे आला.

तसं पाहिलं, तर केनी लोकांचे इस्राएली लोकांशी मैत्रीचे संबंध होते. हे संबंध फार पूर्वीपासून, म्हणजे अगदी मोशेच्या काळापासून होते. कारण मोशेची बायको ही केनी घराण्यातलीच होती. मुळात केनी लोक एका ठिकाणी स्थायिक नसायचे. ते एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी फिरत राहायचे. पण आता ते इस्राएलमध्ये राहू लागले होते. हेबेर मात्र इतर केनी लोकांसारखा नव्हता. इस्राएली लोकांशी मैत्रीचे संबंध जोडण्याऐवजी त्याने कनानी राजा याबीन याच्याशी मैत्री केली होती. त्यामुळे याबीनच्या सेनापतीला, म्हणजे सीसराला कदाचित असं वाटलं असेल, की आपण जर हेबेरच्या तंबूंकडे पळून गेलो तर आपल्याला नक्कीच आश्रय मिळेल. पण त्याच्या कदाचित हे लक्षात आलं नसेल, की हेबेरची बायको याएल ही तिच्या नवऱ्‍यापेक्षा वेगळी आहे. ती इस्राएलच्या बाजूने आहे असं त्याच्या मनातही आलं नसेल.

सीसरा हेबेरच्या तंबूकडे पळून आला तेव्हा हेबेर तिथे नव्हता, पण त्याची बायको होती. सीसराला येताना पाहून, काय करायचं हे याएलला लगेच ठरवायचं होतं. सीसरा कोण आहे आणि तो किती दुष्ट आहे हे तिला माहीत होतं. पण सीसराचा मृत्यू एका स्त्रीच्या हातून होईल असं जे दबोराने म्हटलं होतं हे कदाचित तिला माहीत नसावं. असं असलं, तरी यहोवाची आपल्याकडून काय अपेक्षा आहे हे बहुतेक तिला माहीत असावं. असं आपण का म्हणू शकतो?

याएल बाहेर आपल्या तंबूजवळ उभी आहे आणि सीसरा तिच्या दिशेने येत आहे. तंबूमध्ये एक लाकडी हातोडा ठेवलेला आहे.

कारण नंतर बाराकने सीसरावर विजय मिळवल्यावर दबोराने देवाच्या प्रेरणेने जे गीत रचलं त्यात असं म्हटलंय: “केनी हेबेरची बायको, याएल सगळ्या स्त्रियांमध्ये आशीर्वादित आहे; तंबूंमध्ये राहणाऱ्‍या सगळ्या स्त्रियांमध्ये ती धन्य आहे.” पूर्वी होऊन गेलेल्या राहाबसारखंच याएलनेसुद्धा यहोवाची बाजू घेतली आणि त्याच्या शत्रूंचा विरोध केला. तिला माहीत होतं, की सीसरा यहोवाचा शत्रू आहे आणि यहोवाला त्याच्याबद्दल जे वाटतं ते करायची संधी आपल्याकडे आहे. पण मग ती हे कसं करणार होती?

याएलला माहीत होतं, की ती सीसराशी एकटी लढू शकत नाही, कारण तो एक कसलेला योद्धा होता. त्यामुळे तिने त्याला आपल्या तंबूत बोलवलं. तो आला तेव्हा तिने त्याच्या अंगावर घोंगडी टाकली. त्याने जेव्हा तिच्याकडे पाणी मागितलं तेव्हा तिने त्याला दूध दिलं. मग त्याने तिला तंबूच्या दाराजवळ उभं राहून लक्ष द्यायला सांगितलं आणि म्हटलं, “जर कोणी आलं आणि विचारलं, की ‘आत कोणी माणूस आहे का?’ तर ‘नाही!’ म्हणून सांग.” त्यानंतर सीसराला गाढ झोप लागली.

देवाने एका क्रूर आणि निर्दयी योद्ध्याला मारुन टाकायला एका स्त्रीला निवडलं

याएलला माहीत होतं की सीसराला मारून टाकायची आता हीच वेळ आहे. तंबू ठोकण्यासाठी ती सहसा जी हत्यारं वापरायची ती तिने लगेच घेतली. तिने एक मोठा हातोडा आणि तंबू ठोकायचा खिळा घेतला. या दोन्ही वस्तू कदाचित लाकडीच असाव्यात. मग सीसरा झोपला होता तिथे ती हळूच गेली. आणि त्याच्यावर हल्ला करण्यासाठी ती त्याच्या डोक्याजवळ खाली वाकली. या क्षणी तिच्या हातून जराशीही चूक झाली असती किंवा तिचा अंदाज जराही हुकला असता तर तिचं काही खरं नव्हतं. सीसराने तिला जिवंत सोडलंच नसतं. पण याएलच्या हातून कुठलीच चूक झाली नाही. एका क्षणात तिने आपलं काम केलं! सीसरा तिच्या पायाजवळ मरून पडला होता. तंबूचा खिळा त्याच्या डोक्यातून आरपार जाऊन जमिनीत रुतला आणि सीसरा जागीच मेला!

काही वेळाने न्यायाधीश बाराक, सीसराला शोधत तिथे पोचला. तेव्हा याएल त्याला भेटायला बाहेर आली आणि म्हणाली, “तुम्ही ज्या माणसाला शोधताय, तो कुठे आहे ते मी दाखवते. या माझ्यासोबत.” तो तिच्यासोबत तंबूत गेला तेव्हा त्याने पाहिलं, की दबोराने केलेली भविष्यवाणी पूर्ण झाली होती. दबोराने म्हटलं होतं, “यहोवा एका स्त्रीच्या हातून सीसराला मारून टाकेल.”

काही टीकाकारांचं असं म्हणणं आहे की याएल कटकारस्थानं करणारी एक दुष्ट स्त्री होती. पण यहोवाच्या नजरेत याएल एक धैर्यवान, धाडसी स्त्री होती. असं आपण का म्हणू शकतो? कारण बाराकने सीसरावर विजय मिळवल्यानंतर बाराक आणि दबोराने जे विजयी गीत गायलं, त्यात त्यांनी याएलची भरभरून स्तुती केली. पण यानंतर बायबलच्या अहवालात कुठेच याएलचा उल्लेख आढळत नाही. असं असलं तरी आजसुद्धा, म्हणजे ३,२०० पेक्षा जास्त वर्षांनंतरसुद्धा याएलच्या या कमालीच्या उदाहरणातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. आज यहोवाचे सेवक शस्त्रं किंवा हत्यारं घेऊन खरोखरचं युद्ध लढत नाहीत. पण एक आध्यात्मिक युद्ध आपण नक्कीच लढत आहोत. आणि म्हणूनच याएलसारखं धैर्य दाखवायची आपल्याला पूर्वीपेक्षा जास्त गरज आहे!

याबद्दल बायबलमधून वाचा:

  • शास्ते ४:९, ११, १७-२२; ५:२४-३१

चर्चेसाठी:

याएलने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?

संशोधन करा

  1. १. बाराकच्या काळातलं युद्ध आणि हर्मगिदोनचं युद्ध यांत कोणत्या गोष्टी सारख्या आहेत? आणि या दोन युद्धांमध्ये कोणता फरक आहे? (टेहळणी बुरूज१९.०९ ८-९ ¶३-६)

  2. २. याएलचा पती हेबेर याने इस्राएली लोकांच्या शत्रूंशी, म्हणजे कनानी लोकांशी मैत्री केली होती. पण इस्राएली लोकांशी त्याचं काय नातं होतं? (इन्साइट “हेबेर” क्र. २-wcgr)

  3. ३. इस्राएली लोकांनी सीसरा आणि याबीन यांच्यावर विजय मिळवला होता. हे आठवून पुढे बऱ्‍याच वर्षांनंतर देवाच्या लोकांचा विश्‍वास कसा मजबूत झाला? (टेहळणी बुरूज०८ १०/१५ १४-१५ ¶१२-१५)

  4. ४. दबोराने ज्या प्रकारे याएलची स्तुती केली ते इतकं विशेष का होतं? (टेहळणी बुरूज१५ ८/१ १५ ¶३-wcgr) १

दबोरा आणि बाराक विजयगीत गात आहेत आणि इस्राएली लोक नाचत आहेत आणि डफ वाजवत आहेत.

चित्र १

चित्र १

शिकलेल्या मुद्द्‌यांवर विचार करा

  • एखाद्या बहिणीचा पती सत्यात नसेल, तर कोणत्या परिस्थितीत तिला याएलसारखं धैर्य दाखवावं लागू शकतं?

  • याएल ही दबोरासारखी संदेष्टी नव्हती किंवा बाराकसारखी योद्धाही नव्हती. पण तिला जे करता आलं ते तिने केलं. आपल्यामध्येही काही कमतरता असतील, तर आपण याएलचं अनुकरण कसं करू शकतो? २

    कोलाज: १. व्हिलचेअरवर बसलेली एक वयस्कर बहीण एका कार्डवर लिहित आहे आणि पाकिटात काही पैसे टाकत आहे. २. एक जोडपं खूप आनंदाने ते कार्ड वाचत आहे.

    चित्र २

  • तुम्ही आणखी कोणत्या मार्गांनी याएलने दाखवलेल्या धैर्याचं अनुकरण करू शकता?

मनन करण्यासाठी

  • या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?

  • या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?

  • याएलचं पुनरुत्थान झाल्यावर मी तिला काय विचारेन?

आणखी शिका

याएलच्या उदाहरणामुळे एका तरुण बहिणीला साक्ष द्यायला कशी प्रेरणा मिळते ते या नाट्यरूपांतरात पाहा.

भित्र्या लोकांचं नाही, तर धैर्यवान लोकांचं अनुकरण करा!—मेरोजच्या रहिवाशांचं नाही, तर याएलचं (१:४०)

बायबल काळातल्या बऱ्‍याच स्त्रियांकडून आपल्याला मौल्यवान धडे शिकायला मिळतात. त्यांच्यापैकी फक्‍त याएलबद्दल आपण पाहिलं. अशाच काही स्त्रियांबद्दल या लेखात माहिती दिली आहे.

“बायबलमधल्या स्रियांकडून आपण काय शिकू शकतो?” (बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं लेख १६१)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा