वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wcg अध्या. १५ पृ. ७४-७७
  • दुःखात त्यांनी एकमेकींची साथ सोडली नाही

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दुःखात त्यांनी एकमेकींची साथ सोडली नाही
  • धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • संशोधन करा
  • शिकलेल्या मुद्द्‌यांवर विचार करा
  • मनन करण्यासाठी
  • आणखी शिका
  • “तुम्ही जिकडे जाल तिकडे मी येईन”
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • रूथ आणि नामी
    बायबलमधून शिकू या!
  • रूथ आणि नामी
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • “सद्‌गुणी स्त्री”
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
अधिक माहिती पाहा
धैर्याने देवाची उपासना करत राहा!
wcg अध्या. १५ पृ. ७४-७७

१५ नामी आणि रूथ

दुःखात त्यांनी एकमेकींची साथ सोडली नाही

छापील आवृत्ती
छापील आवृत्ती

नामीने आपल्या आयुष्यात एका मागून एक बरेच धक्के सोसले होते. इस्राएलमध्ये दुष्काळ पडला तेव्हा तिच्या पतीने बेथलेहेम इथलं आपलं घर सोडून मवाब देशात जायचं ठरवलं. तिथे गेल्यानंतर नामीच्या पतीचा मृत्यू झाला. त्यामुळे आता एका परक्या देशात नामी आणि तिच्या दोन मुलांना दिवस काढावे लागणार होते. पुढे तिच्या मुलांनी यहोवाची उपासना न करणाऱ्‍या मवाबी मुलींशी लग्न केलं. मग जवळजवळ दहा वर्षांनंतर एक भयंकर घटना घडली. तिच्या दोन्ही मुलांचाही मृत्यू झाला. शिवाय त्यांना मुलंबाळंही नव्हती. त्यामुळे नामीने फक्‍त आपल्या पतीला आणि दोन मुलांनाच गमावलं नव्हतं, तर आपल्या नातवंडांना बघायची आशाही गमावली होती.

त्यामुळे आता मवाबमध्ये राहण्यात काहीच अर्थ नाही, असा विचार करून काही काळानंतर नामीने आपल्या घरी बेथलेहेमला जायचं ठरवलं. बेथलेहेमला जायला जवळजवळ एक आठवड्याचा प्रवास करावा लागणार होता. तिच्या दोन सुना, रूथ आणि अर्पा यासुद्धा आपल्या वयस्कर सासूसोबत जायला निघाल्या. पण त्यांनी आपला देश, आपले नातेवाईक सोडून आपल्यासोबत यावं हा विचार तिला पटत नव्हता. कारण त्या जर तिथेच राहिल्या, तर त्यांना निदान पुन्हा लग्न करून नवीन संसार सुरू करता आला असता. पण त्या जर तिच्यासोबत आल्या तर त्यांना हेही करता येणार नाही, अशी भीती तिला होती. म्हणून ती एकटी प्रवास करायला तयार होती. तशी ती खूप धैर्यवान होती. त्यामुळे स्वतःचा विचार न करता, तिने रूथ आणि अर्पा यांना आपल्या माहेरी जायचा आग्रह केला. पण रूथ आणि अर्पा तिला सोडायला तयार नव्हत्या म्हणून त्या खूप रडल्या. पण त्यानंतर अर्पा नामीचं ऐकून शेवटी आपल्या माहेरी निघून गेली. रूथ मात्र नामीसोबतच राहिली.

रूथ नामीला म्हणाली: “तुम्हाला सोडून परत जायला मला सांगू नका. तुम्ही जिथे जाल तिथे मी येईन, तुम्ही जिथे राहाल तिथे मी राहीन. तुमचे लोक माझे लोक होतील आणि तुमचा देव माझा देव होईल. जिथे तुमचा मृत्यू होईल तिथेच माझा मृत्यू होईल, आणि तिथेच मला पुरलं जाईल.” या एकनिष्ठ आणि धाडसी तरुण स्त्रीने नामीच्या देवाची, यहोवाची उपासना करायचं ठरवलं!

जवळच्या व्यक्‍तींच्या मृत्यूमुळे दुःखात बुडालेल्या दोन स्त्रियांना यहोवाच्या लोकांमध्ये सांत्वन मिळालं

अशा प्रकारे रूथ आपले नातेवाईक, आपली संस्कृती आणि आपले मवाबी देव सोडून नामीसोबत इस्राएलला गेली. बरेच दिवस प्रवास करून त्या दोघी शेवटी बेथलेहेमला पोचल्या तेव्हा नामीला बघून काही स्त्रियांना धक्काच बसला. कारण इतक्या वर्षांत नामीची तब्येत खरंच खूप खराब झाली होती. त्यावर नामी त्यांना रडून म्हणाली, की यहोवाने तिच्याकडचं सगळं काढून घेतलंय आणि तिला दुःख देऊन रिकाम्या हाती पाठवलंय. नामीचे हे शब्द ऐकून रूथला खरंच खूप वाईट वाटलं असेल. कारण आपल्या या वयस्कर सासूसोबत राहण्यासाठी तिने खूप काही केलं होतं. पण रूथला या गोष्टीचा राग आला किंवा तिने कुरकूर केली असं काहीच बायबलमध्ये सांगितलेलं नाही. उलट आपलं आणि आपल्या सासूचं पोट भरण्यासाठी ती काहीही न बोलता जवळच्या शेतांमध्ये धान्य गोळा करायला जाऊ लागली.

रूथ आणि नामी बेथलेहेममध्ये आल्या आहेत. रूथ नामीला आधार देत घेऊन चालली आहे आणि सोबत सामान लादलेलं गाढव आहे. आजूबाजूचे लोक आश्‍चर्याने त्यांच्याकडे पाहत आहेत.

रूथ ज्या शेतांमध्ये धान्य गोळा करायची ते एका श्रीमंत जमीनदाराचं शेत होतं. त्याचं नाव बवाज होतं आणि तो राहाबचा मुलगा होता. या भल्या माणसाने रूथला त्याच्या शेतात मेहनत करताना पाहिलं, तेव्हा त्याने इतरांकडे तिची विचारपूस केली. त्याला समजलं, की रूथने स्वतःचा विचार न करता कशा प्रकारे आपल्या वयस्कर सासूला, नामीला साथ दिली होती. रूथने यहोवासारख्या प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्‍या देवाचा आश्रय घेतला, याबद्दल त्याने तिची प्रशंसा केली. इतकंच नाही, तर शेतात काम करणाऱ्‍या माणसांकडून तिला कोणताही त्रास होणार नाही याचीही त्याने काळजी घेतली.

बवाजने आपल्याला किती दया दाखवली हे रूथने त्या रात्री नामीला सांगितलं तेव्हा नामी खूप खूश झाली. ‘बवाज रूथचा पती होऊ शकतो का?,’ असा प्रश्‍न नक्कीच तिच्या मनात आला असेल. कारण शेवटी बवाज तिचा जवळचा नातेवाईक होता. आणि देवाच्या नियमशास्त्रात रूथसारख्या तरुण विधवांसाठी एक खास व्यवस्था होती. या व्यवस्थेप्रमाणे जर एखादी स्त्री विधवा झाली, तर तिला तिच्या मृत पतीच्या जवळच्या नातेवाइकाशी लग्न करायचा हक्क होता. आणि त्याच्यापासून झालेल्या मुलाला ती आपल्या मृत पतीचं नाव लावू शकत होती. अशा प्रकारे आपल्या मृत पतीचा वंश ती पुढे चालवू शकत होती आणि त्याचा वारसा जपू शकत होती. (अनु. २५:५, ६) पण यासाठी काय करावं लागेल हे नामीने रूथला समजावून सांगितलं.

नामीने रूथला जे सांगितलं होतं ते करणं अगदीच विचित्र वाटत असलं आणि ते करायची तिला भीतीही वाटत असली तरी रूथ ते करायला तयार झाली. प्राचीन काळात सहसा कापणीच्या हंगामात शेतातली माणसं रात्रीच्या वेळी खळ्यातच धान्याच्या ढिगाऱ्‍याजवळ झोपायची. त्यामुळे रूथ रात्रीच्या वेळी खळ्यात गेली. बवाज जिथे झोपला होता तिथे ती आली आणि त्याच्या पायावरचं पांघरून काढून गुपचूप तिथे झोपली. रात्री त्याला जाग आली तेव्हा तिने त्याला आपला स्वीकार करायची विनंती केली. कारण नियमशास्त्राप्रमाणे तिला ‘सोडवायचा हक्क’ त्याला होता. हे बोलत असताना ती किती घाबरली आहे हे बवाजने पाहिलं असेल. पण तरीसुद्धा यहोवासाठी आणि नामीसाठी तिने जे धैर्य आणि एकनिष्ठ प्रेम दाखवलं ते पाहून तो खूप प्रभावित झाला. पण तिच्या म्हणण्याप्रमाणे करता येईल का हे तो नंतर सांगेल असं त्याने तिला सांगितलं.

दुसऱ्‍या दिवशी बवाज बेथलेहेमच्या वडीलजनांशी जाऊन बोलला आणि त्याने सगळं काही देवाच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे केलं. त्याने रूथशी लग्न केलं. आणि काही काळानंतर त्यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव ओबेद होतं. आपल्या या नातवाबद्दल नामीलाही खूप कौतुक होतं. पुढे याच मुलाच्या वंशातून दावीद राजाचा जन्म झाला आणि बऱ्‍याच शतकांनतर मसीहाचा जन्म झाला. (मत्त. १:५, ६, १६) अशा प्रकारे, नामी आणि रूथ यांनी दाखवलेल्या धैर्याबद्दल यहोवाने त्यांना भरभरून आशीर्वाद दिला!

याबद्दल बायबलमधून वाचा:

  • रूथ १:१—४:२२

चर्चेसाठी:

नामी आणि रूथने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?

संशोधन करा

  1. १. नियमशास्त्राप्रमाणे इस्राएलमधले गोरगरीब शेतांतलं उरलेलं धान्य वेचू शकत होते. ही तरतूद खूपच खास होती असं का म्हणता येईल? (अनुकरण करा अध्या. ४ ¶२३, तळटीप) १

रूथ बवाजच्या शेतामध्ये कापणी करणाऱ्‍यांच्या मागे उललेलं धान्य वेचत आहे.

चित्र १

चित्र १

  1. २. रूथ रात्रीच्या वेळी बवाजकडे अनैतिक काम करायच्या हेतूने गेली नव्हती असं आपण का म्हणू शकतो? (अनुकरण करा अध्या. ५ ¶१७-१८)

  2. ३. बवाजने रूथला “मुली” असं जे म्हटलं त्यावरून आपल्याला काय समजतं? (रूथ २:८; टेहळणी बुरूज१६.११ ३)

  3. ४. ‘त्या’ माणसाने स्वार्थी हेतूने रूथशी लग्न करायला नकार दिला. पण बवाजचा हेतू तसा नव्हता हे कसं दिसून येतं? (टेहळणी बुरूज२३.०३ १४) २

    ‘तो’ माणूस आपल्या पायातला एक जोडा काढून देत आहे.

    चित्र २

शिकलेल्या मुद्द्‌यांवर विचार करा

  • आर्थिक समस्या येतात तेव्हा मेहनती असण्याच्या बाबतीत आणि कदर दाखवण्याच्या बाबतीत रूथने जे उदाहरण मांडलं त्यामुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते? ३

    कोलाज: मुलाचा एकट्याने सांभाळ करणाऱ्‍या एका आईला आर्थिक समस्या आहेत. हीच गोष्ट पुढच्या तीन चित्रांमध्ये वेगवेगळ्या दृश्‍यांत दाखवली आहे. मुलाचा एकट्याने सांभाळ करणारी एक आई बिलांकडे अगदी चिंतेने पाहत आहे. मागे तिचा मुलगा खेळतोय. रात्रीच्या वेळी ती एका ऑफिसमध्ये साफसफाईचं काम करत आहे. एक भाऊ आणि त्याच्या पत्नीने या आईसाठी आणि तिच्या मुलासाठी भाजीपाला आणि गरम जेवण आणलंय. याबद्दल आईला कदर असल्याचं दिसतं.

    चित्र ३

  • नामी खूप दुःखात होती तेव्हा रूथने तिला सावरायला मदत केली. मग इतरांना धीर देण्याच्या बाबतीत आपण रूथकडून काय शिकू शकतो? नम्रपणे इतरांकडून मदत स्वीकारण्याच्या बाबतीत आपण नामीकडून काय शिकू शकतो?

  • आणखी कोणत्या मार्गांनी तुम्ही नामी आणि रूथसारखं धैर्य दाखवू शकता?

मनन करण्यासाठी

  • या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?

  • या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?

  • नामी आणि रूथचं पुनरुत्थान झाल्यावर मी त्यांना काय विचारेन?

आणखी शिका

रूथच्या पुस्तकातून एकनिष्ठ प्रेमाबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं? आणि शिकलेल्या गोष्टी आपण आपल्या जीवनात कशा लागू करू शकतो?

“एकमेकांना एकनिष्ठ प्रेम दाखवत राहा” (टेहळणी बुरूज२१.११ ८-१३)

या अहवालातल्या घटनांचं चित्र आपल्या मुलांसमोर उभं करण्यासाठी बायबलच्या या चित्रकथेचा वापर करा.

“रूथने नामीची साथ सोडली नाही” (बायबलच्या चित्रकथा लेख १२-wcgr)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा