१२ कालेब
तो शेवटपर्यंत विश्वासू राहून त्याच्या देवासाठी लढला
मोशे इजिप्तमधून पळून गेला, त्याच काळात तिथल्या एका इस्राएली गुलामाच्या कुटुंबात एक मुलगा जन्माला आला. त्याचं नाव कालेब होतं. कालेब गुलामगिरीतच लहानाचा मोठा झाला होता. पण इस्राएली लोकांना सुटका मिळाल्याचं तो पाहू शकला. कालेब जवळजवळ ४० वर्षांचा असताना मोशे इजिप्तला परत आला. या वेळी यहोवाच्या आज्ञेप्रमाणे त्याच्या लोकांची, म्हणजे इस्राएली लोकांची सुटका करण्यासाठी तो आला होता. नंतर यहोवाने इजिप्तवर दहा पीडा आणल्या, तांबड्या समुद्राला दोन भागांमध्ये विभागलं आणि इजिप्तच्या लोकांवर विजय मिळवून त्याच्या लोकांना सोडवलं. या सगळ्या गोष्टींमध्ये यहोवाने कसं सामर्थ्य दाखवलं ते कालेबने पाहिलं होतं. आणि त्यामुळे तो नक्कीच आश्चर्यचकित आणि रोमांचित झाला असेल.
विश्वास मजबूत करणाऱ्या या घटना कालेब कधीच विसरला नाही. काही महिन्यांनंतर सीनाय पर्वताजवळ असताना अनेक अविश्वासू इस्राएली लोकांनी बंड केलं. पण तो मात्र एकनिष्ठ राहिला. काही काळानंतर कालेबवर एक खास जबाबदारी सोपवण्यात आली. यहोशवा आणि इतर दहा इस्राएली प्रधानांसोबत त्याला वचन दिलेल्या देशाची पाहणी करायची होती.
पाहणी करायला निवडलेली ती १२ माणसं धाडसाने कनानमध्ये गेली. त्यांनी ४० दिवस त्या शहराची, तिथल्या लोकांची आणि तिथली जमीन किती सुपीक आहे याची पाहणी केली. ते तिथल्या उत्पन्नाचे नमुने घेऊन परत आले. त्यात द्राक्षाचा एक घडसुद्धा होता. तो इतका मोठा होता की तो वाहून आणण्यासाठी दोन माणसं लागली. पण तो देश कसा आहे हे इस्राएली लोकांना सांगायची वेळ आली, तेव्हा कालेबसोबत असलेल्या दहा गुप्तहेरांनी जे सांगितलं ते ऐकून कालेब नक्कीच निराश झाला असेल. आपण असं वाचतो: “ते इस्राएली लोकांना वाईट गोष्टी सांगत राहिले.” त्यांनी अशी तक्रार केली, की कनानी लोक खूप उंच आणि धिप्पाड आहेत आणि त्यांना आपण हरवू शकणार नाही. इतकंच नाही तर ते नेफिलीमचे वंशज आहेत असंही त्यांनी सांगितलं. पण त्यांचं असं म्हणणं मूर्खपणाचं होतं, कारण बऱ्याच काळाआधी जलप्रलयात नेफिलीमचा नाश झाला होता. पण हे ऐकून सर्व लोक निराश झाले. काहींनी तर असंही म्हटलं, की ‘चला आपण कोणालातरी आपला नवीन पुढारी नेमू आणि इजिप्तला परत जाऊ!’
कालेब आणि यहोशवा यांनी मात्र आपला विश्वास टिकवून ठेवला. त्यांनी विश्वासात कमजोर असलेल्या या लोकांना धीर द्यायचा प्रयत्न केला. ते म्हणाले: “आपल्यासोबत यहोवा आहे! म्हणून त्यांना मुळीच घाबरू नका.” पण यामुळे त्या अविश्वासू लोकांना उलट जास्तच राग आला. ते कालेब आणि यहोशवाला दगडमार करून ठार मारण्याबद्दल बोलू लागले!
हे पाहून यहोवाला खूप वाईट वाटलं. इजिप्तसारख्या शक्तिशाली राष्ट्रापासून आपल्या लोकांना वाचवण्यासाठी यहोवाने बरंच काही केलं होतं. पण तरीसुद्धा काही काळातच यहोवावरचा त्यांचा विश्वास उडाला होता. म्हणून यहोवाने ठरवलं, की इस्राएली लोकांची ती संपूर्ण अविश्वासू पिढीच ओसाड रानात मरून जाईल.a पण देवाने कालेब आणि यहोशवाचं धैर्य आणि विश्वास पाहिला. यहोवाने तर असंही म्हटलं: “माझा सेवक कालेब याने इतरांपेक्षा वेगळी मनोवृत्ती दाखवली आणि त्याने मनापासून माझ्या आज्ञा पाळल्या.” त्यामुळे जे थोडेफार लोक वाचून वचन दिलेल्या देशात जातील त्यांत कालेब आणि यहोशवासुद्धा असतील असं यहोवाने सांगितलं.
कालेब बंडखोर आणि अविश्वासू इस्राएली लोकांच्या जमावाविरुद्ध यहोवाच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिला
इस्राएली लोक ४० वर्षं ओसाड रानात भटकत होते त्या संपूर्ण काळात कालेब विश्वास आणि धैर्य दाखवत राहिला. त्याने मोशेला शेवटपर्यंत पाठिंबा दिला. इतकंच नाही, तर मोशेच्या मृत्यूनंतर त्याने यहोशवालाही शेवटपर्यंत पाठिंबा दिला. कारण यहोवाने आपल्या लोकांना यार्देन नदी पार करून वचन दिलेल्या देशात घेऊन जायची जबाबदारी यहोशवावर सोपवली होती. कालेब आता वयस्कर झाला होता. पण तेव्हासुद्धा कनान देशात देवाच्या शत्रूंविरुद्ध लढून एक धैर्यवान योद्धा असल्याचं त्याने सिद्ध केलं.
देवाच्या लोकांनी यार्देन नदी ओलांडली त्याच्या सहा वर्षांनंतर वचन दिलेल्या देशाचा बराचसा भाग जिंकण्यात आला होता. आता वचन दिलेल्या देशात कुठं राहायचं हे कालेबला ठरवायचं होतं. त्याने हेब्रोन प्रदेश निवडला. याच ठिकाणाबद्दल त्या अविश्वासू हेरांनी असं म्हटलं होतं, की तिथे खूप धिप्पाड योद्धे आहेत आणि त्यामुळे तो भाग जिंकणं अशक्य आहे. कालेब आता ८५ वर्षांचा होता, तरी पुढे काय होईल याबद्दल त्याला खातरी होती. त्याने म्हटलं: “यहोवाने मला वचन दिल्याप्रमाणे, यहोवा नक्की माझ्यासोबत असेल, आणि मी त्या लोकांना शहरातून हाकलून देईन.” आणि तसंच झालं! कालेबने ते शहर जिंकलं आणि तो तिथे राहू लागला. पुढे आपण असं वाचतो: “त्यानंतर देशाला युद्धापासून आराम मिळाला.”
बऱ्याच वर्षांपूर्वी मोशेने कालेबला म्हटलं होतं: “तू माझा देव यहोवा याचं पूर्ण मनाने ऐकलंस.” यात काहीच शंका नाही, की कालेब आपल्या संपूर्ण आयुष्यात अगदी शेवटपर्यंत या शब्दांप्रमाणे जगला. भविष्यातही जेव्हा तो पुन्हा उठेल तेव्हासुद्धा तो नक्कीच या शब्दांप्रमाणे जगेल!
याबद्दल बायबलमधून वाचा:
चर्चेसाठी:
कालेबने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?
संशोधन करा
१. गणना १३:२३ मध्ये वचन दिलेल्या देशातल्या जमिनीच्या उत्पन्नाबद्दल जे म्हटलंय ते खूप वाढवून-चढवून म्हटलेलं नाही, असं आपण का म्हणू शकतो? (टेहळणी बुरूज०६ ६/१५ १६ ¶१-२-wcgr)
२. कालेब आणि यहोशवाने सांगितल्याप्रमाणे वचन दिलेल्या देशात दूध आणि मध खरंच खूप मुबलक प्रमाणात होतं का? (गण. १४:८; टेहळणी बुरूज११ ३/१ १५-wcgr) १
Institute of Archaeology/Hebrew University © Tel Rehov Excavations
चित्र १: इस्राएलमध्ये सापडलेली मातीपासून बनवलेली मधमाश्यांची पोळी. ती कदाचित इ.स.पू. १० व्या शतकापासून ९ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातली असावीत.
३. जेव्हा मोशेने कादेशमधून १२ हेरांना पाठवलं, तेव्हा इस्राएली लोक वचन दिलेल्या देशाच्या किती जवळ होते? (टेहळणी बुरूज०४ १०/१५ १७ ¶११-१२) २
चित्र २
४. कालेबने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि धैर्याबद्दल यहोवाने त्याला कसा आशीर्वाद दिला? (टेहळणी बुरूज०६ १०/१ १९ ¶११)
शिकलेल्या मुद्द्यांवर विचार करा
कालेब यहोवाला विश्वासू होता तरी त्याला बाकीच्या इस्राएली लोकांसोबत ओसाड रानात भटकावं लागलं. पण तेव्हासुद्धा तो नम्रपणे यहोवाला विश्वासू राहिला. कालेबच्या या उदाहरणाचं आपण कोणत्या परिस्थितींमध्ये अनुकरण करू शकतो?
“पुष्कळ लोक करत आहेत” म्हणून एखादी गोष्ट करण्याच्या मोहात आपण पडू नये म्हणून कालेबच्या उदाहरणामुळे आपल्याला कशी मदत होते? (निर्ग. २३:२) ३
चित्र ३
आणखी कोणत्या मार्गांनी तुम्ही कालेबच्या धैर्याचं अनुकरण करू शकता?
मनन करण्यासाठी
या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?
या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?
कालेबचं पुनरुत्थान झाल्यावर मी त्याला काय विचारेन?
आणखी शिका
कालेबच्या विश्वासाचा त्याने दाखवलेल्या धैर्याशी कसा जवळचा संबंध होता ते पाहा.
“विश्वास आणि देवाचे भय बाळगून धैर्यवान व्हा” (टेहळणी बुरूज०६ १०/१ १७-१९ ¶१-१२)
“मी मात्र माझा देव यहोवा याचं पूर्ण मनाने ऐकलं,” असं ८५ वर्षांचा कालेब का म्हणू शकला? (यहो. १४:८)
“क्या आप पूरे दिल से यहोवा की बात मानते हैं?” (टेहळणी बुरूज९३-HI ५/१५ २६-२९-wcgr)