वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wcg अध्या. ११ पृ. ५८-६१
  • “फारोकडे जा”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “फारोकडे जा”
  • धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • संशोधन करा
  • शिकलेल्या मुद्द्‌यांवर विचार करा
  • मनन करण्यासाठी
  • आणखी शिका
  • त्याने योग्य निवड केली
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • मोशे व अहरोन फारोला भेटतात
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • यहोवाचे मार्ग जाणून घेणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • देव इस्राएल लोकांची गुलामगिरीतून सुटका करतो
    बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
अधिक माहिती पाहा
धैर्याने देवाची उपासना करत राहा!
wcg अध्या. ११ पृ. ५८-६१

११ मोशे

“फारोकडे जा”

छापील आवृत्ती
छापील आवृत्ती

मोशेमध्ये आता खूप बदल झाला होता. इस्राएली लोकांना इजिप्तच्या गुलामगिरीतून आपणच सोडवणार, असा विचार करायचं त्याने कधीच सोडून दिलं होतं. त्याचं लग्न झालं होतं आणि त्याला दोन मुलं होती. आता तो जवळजवळ ८० वर्षांचा झाला होता. मिद्यानी लोक राहत होते, तिथल्या उष्ण आणि रखरखीत देशात आपल्या सासऱ्‍याच्या मेंढरांची राखण करण्यात त्याने ४० वर्षं घालवली होती. या काळातच तो नम्र बनला.

मोशेमध्ये झालेला हा बदल यहोवाने पाहिला आणि एक दिवस होरेब पर्वताच्या, म्हणजे सीनाय पर्वताच्या पायथ्याशी एका गोष्टीकडे यहोवाने त्याचं लक्ष वेधलं. मोशेला तिथे एक काटेरी झुडूप दिसलं. ते तेजस्वीपणे पेटत होतं. त्याला आग तर लागली होती, पण ते जळत नव्हतं. ते बघण्यासाठी मोशे जवळ गेला तेव्हा यहोवा एका शक्‍तिशाली स्वर्गदूताद्वारे त्या आगीतून त्याच्याशी बोलला. यहोवाने मोशेला पुन्हा इजिप्तला जायला आणि तिथून आपल्या लोकांची सुटका करण्यासाठी पुढाकार घ्यायला सांगितलं. मोशेला धीर देण्यासाठी यहोवाने आपल्या पवित्र नावाचा एक अर्थ त्याला सांगितला. यहोवाने म्हटलं: “मला जे व्हायचं आहे, ते मी होईन.” म्हणजेच अत्याचार सहन करणाऱ्‍या आपल्या लोकांसाठी यहोवा आता तारणकर्ता बनणार होता. त्यांची सुटका करण्यासाठी आणि त्यांच्यापासून एक शक्‍तिशाली राष्ट्र बनवण्यासाठी यहोवाला जे काही करायची गरज असेल ते करायला तो तयार होता.

पण तरीसुद्धा मोशे ही जबाबदारी घ्यायला कचरत होता. इजिप्तच्या फारोसमोर जाऊन बोलायला आपण पात्र नाही असं त्याला वाटत होतं. पण यहोवाने त्याचा दृष्टिकोन सुधारला आणि एक अद्‌भुत गोष्ट करून त्याचा विश्‍वास वाढवला. देवाने त्याला चमत्कार करायची शक्‍ती दिली. बायबलच्या अहवालात पहिल्यांदाच इथे यहोवा एका मानवाला चमत्कार करायची शक्‍ती देत असल्याचं सांगितलंय. यासोबतच यहोवाने मोशेला मदत करण्यासाठी आणि त्याच्या वतीने बोलण्यासाठी त्याच्या भावाची म्हणजे अहरोनची मदत घ्यायला सांगितलं. शेवटी मोशेने ही जबाबदारी स्वीकारली. यहोवाच्या लोकांचं तारण करण्यासाठी किंवा यहोवाच्या लोकांना वाचवण्यासाठी तो देवाचा अभिषिक्‍त किंवा निवडलेला म्हणून काम करणार होता.—इब्री ११:२६.

मग मोशे आणि अहरोन इजिप्तमध्ये फारोकडे गेले आणि त्याच्याशी बोलले. पण त्यांचं बोलणं ऐकून फारो भयंकर चिडला. इस्राएली गुलामांना सोडून देण्याऐवजी या राजाने त्यांच्या कामाचा भार आणखीनच वाढवला. त्यामुळे यहोवाने पुन्हा मोशेला फारोकडे पाठवलं आणि इजिप्तवर पहिली पीडा आणण्याबद्दल सांगितलं. ही पीडा आली तेव्हा इजिप्तमधल्या सगळ्यात मोठ्या नदीचं, म्हणजेच नाईल नदीचं पाणी रक्‍तात बदललं. पण याचा फोरोवर काहीच परिणाम झाला नाही. त्याने इस्राएली लोकांना जाऊ दिलं नाही. त्यामुळे यहोवाने एकापाठोपाठ एक बऱ्‍याच पीडा आणल्या आणि त्यांबद्दल इशारा द्यायला यहोवाने पुन्हापुन्हा मोशेला फारोकडे पाठवलं. ज्या ज्या वेळी यहोवाने मोशेला फारोकडे पाठवलं, त्या त्या वेळी मोशे धैर्याने त्याच्याकडे गेला. पण त्या दुष्ट राजाने त्याचं अजिबात ऐकलं नाही. तिसऱ्‍या पीडेनंतर यहोवाने प्रत्येक पीडेपासून आपल्या लोकांचं संरक्षण केलं, पण इजिप्तच्या लोकांचे मात्र खूप हाल झाले.

मोशे आणि अहरोन इजिप्तच्या राजाच्या आणि त्याच्या शाही दरबारातल्या लोकांसमोर आहेत.

इजिप्तवर आलेल्या प्रत्येक पीडेने हेच दाखवून दिलं, की इजिप्तची दैवतं, त्यांचे मंत्रतंत्र करणारे पुजारी आणि स्वतः फारोसुद्धा यहोवासमोर किती कमजोर आहेत. पण तरीसुद्धा फारोने इस्राएली लोकांना जाऊ दिलं नाही. उलट त्याने आपलं मन आणखी कठोर केलं. इजिप्तवर नववी पीडा आली तेव्हा संपूर्ण देशात काळाकुट्ट अंधार पडला. पण इस्राएली लोक राहत होते त्या ठिकाणी मात्र प्रकाश होता. सुरुवातीला फारो इस्राएली लोकांना पाठवायला तयार झाला. पण नंतर हट्टाने पेटून त्याने पुन्हा आपलं मन बदललं. फारोने मोशेला अशी ताकीदसुद्धा दिली, की तो जर पुन्हा त्याच्यासमोर आला तर तो नक्की त्याला ठार मारेल.

मोशेला पुन्हापुन्हा पृथ्वीवरच्या सगळ्यात शक्‍तिशाली राजासमोर जावं लागलं आणि त्याच्या रागाचा सामना करावा लागला

मग शेवटची पीडा आली. त्यात इजिप्त देशातले सगळे प्रथम जन्मलेले, इतकंच नाही तर प्राण्यांचे सगळे प्रथम जन्मलेले मारले गेले. त्यात फारोचा मुलगाही मारला गेला. यामुळे अपमानित होऊन फारोने स्वतःच मोशेला बोलावून घेतलं. म्हणून यहोवाने शेवटच्या वेळी मोशेला फारोकडे पाठवलं. तो फारोकडे गेला तेव्हा फारोने इस्राएली लोकांना जाऊ दिलं आणि आपल्याला आशीर्वाद द्यायला मोशेला सांगितलं. ही घटना, अब्राहाम पहिल्यांदा वचन दिलेल्या देशात आला त्याच्या बरोबर ४३० वर्षांनंतर घडली. इतक्या वर्षांनंतर आता इस्राएली लोकांची इजिप्तमधून सुटका झाली होती. एकेकाळी गुलाम असलेले इस्राएली लोक इजिप्तमधून निघाले तेव्हा “त्यांच्यासोबत विदेश्‍यांचा एक मोठा समूहसुद्धा निघाला.” त्यांच्यापैकी बरेच जण कदाचित इजिप्तचे असावेत. पण एवढं सगळं होऊनसुद्धा फारोने पुन्हा आपलं मन बदललं. त्याने आपलं प्रचंड सैन्य गोळा केलं आणि इस्राएली लोकांचा पाठलाग केला!

मोशे आणि इस्राएली लोक तांबड्या समुद्राच्या किनाऱ्‍यावर पोचले, तेव्हा आपण समुद्राच्या आणि फारोच्या सैन्याच्या मधे अडकलोय असं त्यांना वाटलं आणि ते खूप घाबरले. म्हणून मोशेने यहोवाकडे मदत मागितली. यहोवाने त्याला उत्तर दिलं आणि इतिहासातला सगळ्यात विलक्षण चमत्कार घडवून आणला. त्याने तांबडा समुद्र दुभागला! त्यामुळे समुद्राचा तळ दिसू लागला आणि इस्राएली लोक त्या कोरड्या जमिनीवरून चालत पलीकडे गेले. इस्राएली लोक आपल्या तावडीतून सुटून चाललेत हे पाहून फारो आणि त्याचं सैन्य त्यांचा आणखीनच पाठलाग करू लागले. पण इस्राएली लोक सुरक्षितपणे पलीकडे पोचल्यावर यहोवाने तांबडा समुद्र पुन्हा पहिल्यासारखा केला. समुद्राचं सगळं पाणी दोन्ही बाजूंनी कोसळू लागलं आणि इजिप्तचं सैन्य समुद्रात बुडालं. अशा प्रकारे जगातलं सगळ्यात शक्‍तिशाली सैन्य कायमचं समुद्राच्या तळाला गेलं!

या अद्‌भुत घटना मोशे कधीच विसरला नाही. उलट यांमुळे त्याचा विश्‍वास आधीपेक्षा जास्त मजबूत झाला. पुढे ४० वर्षं, म्हणजे वयाच्या १२० व्या वर्षी, त्याचा मृत्यू होईपर्यंत त्याने इस्राएली लोकांचं नेतृत्व केलं. आणि त्याने विश्‍वासाने, प्रेमाने आणि धैर्याने त्यांची काळजी घेतली. त्याच्या या चांगल्या गुणांचं आपण नक्कीच अनुकरण केलं पाहिजे.

याबद्दल बायबलमधून वाचा:

  • निर्गम २:१५–५:२३; ७:१–११:१०; १२:२९-४१; १३:१७–१४:३१

  • अनुवाद २९:२, ३; ३४:५-७

चर्चेसाठी:

या अध्यायात शिकल्याप्रमाणे मोशेने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?

संशोधन करा

  1. १. या अहवालात ज्या काळाबद्दल सांगितलंय, त्या काळात कोणता फारो राज्य करत होता हे आपल्याला माहीत नाही. शिवाय, इस्राएली लोकांची सुटका झाल्याचा कोणताही पुरावा इजिप्तच्या लिखाणांत नाही. पण तरी बायबलमधल्या या अहवालावर आपण विश्‍वास का ठेवू शकतो? (सावध राहा!०४ ४/८ ७ ¶४-९ ¶१-wcgr)

  2. २. लोक फारो राजाला का घाबरायचे? (टेहळणी बुरूज१४ ४/१५ ८ ¶१) १

    PRISMA ARCHIVO/Alamy Stock Photo

    चित्र १: मोशेच्या काळानंतर आलेल्या फारो राजाचं भिंतीवरचं एक चित्र

  3. ३. इजिप्तवर आलेल्या दहा पीडांमुळे त्यांच्या दैवतांचा कशा प्रकारे अपमान झाला? (इन्साइट “देवीदेवता” ¶२४-२६-wcgr)

  4. ४. तांबड्या समुद्रातून यहोवाने एक रूंद मार्ग तयार केला हे कशावरून कळतं, आणि त्यावरून किती इस्राएली लोक चालत पलीकडे गेले असतील? (इन्साइट “इजिप्तमधून बाहेर पडणं” ¶४६-५१-wcgr) २

    चित्र २: इस्राएली लोकांनी जिथून तांबडा समुद्र पार केला असेल ते सीनाय पर्वतापासून दिसणारं सध्याचं ठिकाण

शिकलेल्या मुद्द्‌यांवर विचार करा

  • यहोवाकडून मिळालेली एखादी जबाबदारी पूर्ण करायला आपण पात्र नाही असं वाटतं, तेव्हा मोशेच्या उदाहरणातून आपल्याला कसं प्रोत्साहन मिळू शकतं? (निर्ग. ४:१०; ७:६, ७)

  • अहरोनने जसं मोशेला त्याची जबाबदारी धैर्याने पूर्ण करायला मदत केली, तसं आज आपणही आपल्या भाऊबहिणींना कशी मदत करू शकतो? (निर्ग. ४:१४-१६) ३

    कोलाज: एक अनुभवी बहीण दुसऱ्‍या एका बहिणीला क्षेत्र सेवेतलं आपलं कौशल्य वाढवण्यासाठी आणि आत्मविश्‍वासाने बोलण्यासाठी मदत करत आहे. हीच गोष्ट पुढच्या तीन चित्रांमध्ये वेगवेगळ्या दृश्‍यांत दाखवली आहे. मार्केटमध्ये कामात गुंतलेल्या एका माणसाला साक्ष देण्यासाठी बहिणीला कठीण जात असल्याचं एक अनुभवी बहीण पाहत आहे. त्याच दिवशी नंतर ती अनुभवी बहीण “लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा” या माहितीपत्रकातून त्या बहिणीला काही गोष्टी सुचवत आहे. या दोन बहिणी मार्केटमध्ये दुसऱ्‍या एका माणसासोबत बोलत आहेत. आधी ज्या बहिणीला बोलायला कठीण जात होतं ती आता आत्मविश्‍वासाने बोलत आहे.

    चित्र ३

  • या अहवालात मोशेने जे धैर्य दाखवलं त्याचं तुम्ही कसं अनुकरण करू शकता?

मनन करण्यासाठी

  • या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?

  • या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?

  • मोशेचं पुनरुत्थान झाल्यावर त्याच्या आयुष्यातल्या या काळाबद्दल मी त्याला काय विचारेन?

आणखी शिका

यहोवाच्या नावाचा अर्थ जाणून घेतल्यामुळे मुलांना धैर्य दाखवायला कशी मदत होऊ शकते ते पाहा.

यहोवाचं नाव (१:५४)

मोशेला त्याच्या आयुष्यात आलेल्या अनुभवांमधून यहोवाच्या गुणांबद्दल काय शिकायला मिळालं?

“यहोवाचे मार्ग जाणून घेणे” (टेहळणी बुरूज०५ ६/१ १२-१६)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा