वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wcg अध्या. ८ पृ. ४४-४७
  • तो मोहाला बळी पडला नाही

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तो मोहाला बळी पडला नाही
  • धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • संशोधन करा
  • शिकलेल्या मुद्द्‌यांवर विचार करा
  • मनन करण्यासाठी
  • आणखी शिका
  • एक असा गुलाम ज्याने देवाचं ऐकलं
    बायबलमधून शिकू या!
  • त्याने एक अतिशय मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • यहोवा तुम्हाला यशस्वी व्हायला मदत करत आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • विश्‍वासूपणे पालनपोषण करणारा आदर्श कुटुंबप्रमुख
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
अधिक माहिती पाहा
धैर्याने देवाची उपासना करत राहा!
wcg अध्या. ८ पृ. ४४-४७

८ योसेफ

तो मोहाला बळी पडला नाही

छापील आवृत्ती
छापील आवृत्ती

योसेफ तरुण होता आणि तो त्याच्या पित्याला, म्हणजे याकोबला आणि यहोवाला खूप प्रिय होता. पण याचा अर्थ योसेफच्या जीवनात काहीच समस्या नव्हत्या असं नाही. उलट त्याला आपल्या भावांच्या द्वेषाचा सामना करावा लागला. याकोबचं योसेफवर जास्त प्रेम आहे हे जेव्हा त्याच्या सावत्र भावांनी पाहिलं तेव्हा त्यांना योसेफचा हेवा वाटला आणि ते त्याचा द्वेष करू लागले. यहोवाने योसेफला काही स्वप्नं दाखवली जी भविष्यात पूर्ण होणार होती आणि त्यांत यहोवाने योसेफला असं दाखवलं, की त्याची घरची माणसं त्याला नमन करतील. ही गोष्ट जेव्हा योसेफने त्याच्या भावांना सांगितली तेव्हा त्यांचा राग आणखीनच भडकला.

योसेफ जेव्हा जवळजवळ १७ वर्षांचा होता, तेव्हा एक दिवस याकोबने त्याला बोलवलं आणि कळप चारायला गेलेले त्याचे भाऊ ठीक आहेत का ते बघायला पाठवलं. त्यासाठी योसेफला बऱ्‍याच दिवसांचा प्रवास करावा लागला. पण तिथे गेल्यानंतर त्याचे भाऊ त्याच्याशी खूप वाईट वागले. आणि त्यांनी त्याला एका खड्ड्यात फेकून दिलं. त्या खड्ड्यात पाणी नव्हतं, तो कोरडा होता. योसेफने मदतीसाठी खूप आरडाओरडा केला पण त्यांनी निर्दयीपणे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. ते त्याचा खून करायच्या विचारात होते. पण नंतर त्यांनी तिथून जाणाऱ्‍या काही व्यापाऱ्‍यांना त्याला विकायचं ठरवलं. नंतर योसेफच्या भावांनी आपल्या वडिलांना, याकोबला असं पटवून दिलं, की त्याच्या लाडक्या मुलाला, योसेफला एका जंगली प्राण्याने ठार मारलंय. खरंतर त्या लोकांनी योसेफला दूर दक्षिणेला इजिप्तकडे नेलं होतं. तिथे त्यांनी त्याला फारोच्या शासनाखाली असलेल्या एका अधिकाऱ्‍याला, म्हणजे पोटीफरला गुलाम म्हणून विकलं.

खरंतर या घटनेमुळे योसेफ खूप निराश आणि हतबल झाला असता. पण त्याऐवजी त्याने धैर्य दाखवलं आणि खूप मेहनत घेतली. म्हणून आपण त्याच्याबद्दल असं वाचतो: “यहोवा त्याच्यासोबत” होता. योसेफ जे काही करायचा त्यात यहोवाने त्याला यश मिळवून दिलं. याचा परिणाम असा झाला, की पोटीफरने आपल्या संपूर्ण घराण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली.

पण लवकरच एक अनपेक्षित गोष्ट घडणार होती. योसेफ आता धडधाकट बनला होता आणि दिसायला “देखणा” होता. त्यामुळे पोटीफरची बायको त्याच्याकडे आकर्षित झाली. आणि तिने आपल्या या भावना लपवल्या नाहीत. ती त्याला म्हणाली: “माझ्याशी संबंध ठेव!” मग योसेफ काय करणार होता? त्याच्या घरची माणसं त्याच्यापासून खूप दूर होती. तो एक गुलाम होता. त्यामुळे त्याचे मालक त्याच्याशी हवं तसं वागू शकत होते. पोटीफरची बायको त्याचं जीवन पूर्णपणे बरबाद करू शकत होती. मग योसेफ त्या मोहाला बळी पडणार होता का? तिला नाही म्हणायची हिंमत त्याच्यात होती का?

योसेफ फारोच्या घरात मातीचा एक घडा घेऊन सरळ पुढे पाहून चालत आहे. आणि पोटीफरची बायको तिच्या खोलीच्या बाहेर उभी राहून त्याला पाहत आहे आणि त्याला मोहात पाडायचा प्रयत्न करत आहे.

आपल्या मालकाची बायको आपलं आयुष्य बरबाद करू शकते हे योसेफला माहीत होतं. तरीसुद्धा तो तिच्या मोहाचा विरोध कसा करू शकला?

बायबल म्हणतं, की त्याने तिला “नकार दिला.” योसेफने तिला सांगितलं, की त्याच्या मालकाचा त्याच्यावर पूर्ण भरवसा आहे आणि त्यामुळे तो त्याच्या मालकाचा विश्‍वासघात करणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, योसेफने तिला असंही म्हटलं: “इतकं मोठं वाईट काम करून मी देवाविरुद्ध पाप कसं करू?” योसेफचं आपल्या स्वर्गातल्या पित्यावर, यहोवावर प्रेम असल्यामुळे, तिला ठामपणे ‘नाही’ म्हणायचं धैर्य त्याला मिळालं. पण पोटीफरची बायको मात्र त्याला “दररोज” मोहात पाडायचा प्रयत्न करत राहिली. शेवटी एक दिवस घरात कोणी नोकर नाही हे पाहून तिने योसेफच्या कपड्यांना धरून त्याला आपल्याकडे ओढायचा प्रयत्न केला. आणि ती त्याला “माझ्याशी संबंध ठेव!” असं म्हणून जबरदस्ती करू लागली. योसेफने तिच्या तावडीतून स्वतःला सोडवलं आणि तो तिथून पळून गेला. पण त्याच्या अंगावरचं वस्त्र तिच्याकडेच राहिलं. मग तिने ते वस्त्र पोटीफरला दाखवलं आणि योसेफने तिच्यावर बलात्कार करायचा प्रयत्न केला, असा खोटा आरोप लावला. त्यामुळे रागाने भडकलेल्या पोटीफरने योसेफला तुरुंगात टाकलं.

आता योसेफ एका खोल अंधाऱ्‍या कोठडीत होता. काही काळासाठी “त्याच्या पायात बेड्या घालण्यात आल्या; त्याच्या गळ्यात लोखंडी साखळ्या घालण्यात आल्या.” (स्तो. १०५:१७, १८) यामुळेसुद्धा योसेफ निराश होऊ शकला असता. पण यहोवाने त्याला सोडून दिलं होतं का? नाही. आणि योसेफनेसुद्धा यहोवावरचा विश्‍वास कधीच कमी होऊ दिला नाही. त्याने तुरुंगातही खूप मेहनत केली, आणि यहोवाने त्याला आशीर्वाद दिला. काही काळाने त्याच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतरही तो वर्षानुवर्षं धैर्याने बऱ्‍याच गोष्टी सहन करत राहिला.

यहोवावर असलेल्या विश्‍वासामुळे आणि धैर्यामुळेच यहोवाने आपल्या सेवेत योसेफचा वापर करून घेतला. काही काळानंतर देवाने फारोला दोन स्वप्नं दाखवली. ती पुढे जाऊन पूर्ण होणार होती. आणि त्यांचा अर्थ सांगण्याची क्षमता देवाने योसेफला दिली. मग योसेफने फारो राजाला सांगितलं, की स्वप्नांत राजाने पाहिल्याप्रमाणे सात वर्षं भरभराटीची असतील, पण त्यानंतरची सात वर्षं मात्र दुष्काळाची असतील. योसेफने सांगितलेला हा अर्थ ऐकून फारो खूप प्रभावित झाला आणि त्याने योसेफवर येणाऱ्‍या दुष्काळासाठी तयारी करायची जबाबदारी सोपवली. त्याने योसेफला देशातला खूप मोठा अधिकारी बनवलं. फारोनंतर जर कोणी असेल, तर तो आता योसेफच होता. त्यामुळे योसेफला फक्‍त इजिप्तच्या लोकांनाच नाही, तर त्याच्या स्वतःच्या कुटुंबालासुद्धा त्या दुष्काळातून वाचवता आलं. त्याचे भाऊ जेव्हा इजिप्तमध्ये अन्‍नधान्य विकत घ्यायला आले तेव्हा त्यांनी नकळत आपल्या या लहान भावाला खाली वाकून नमन केलं. यहोवाने योसेफला तो तरुण असताना जे स्वप्न दाखवलं होतं ते अशा प्रकारे पूर्ण झालं. पण त्याच्या भावांनीसुद्धा हे दाखवून दिलं, की काळाच्या ओघात त्यांच्या स्वभावात बदल झालाय आणि ते चांगले लोक बनले आहेत. ते ज्या भावाचा इतका द्वेष करत होते त्यानेच त्यांना, त्यांच्या वडिलांना आणि येणाऱ्‍या इस्राएल राष्ट्राला वाचवलं. कारण योसेफने धैर्य दाखवलं आणि यहोवावर नेहमी विश्‍वास ठेवला.

याबद्दल बायबलमधून वाचा:

  • उत्पत्ती ३७:१-३६; ३९:१-२३; ४१:१—४५:२८

चर्चेसाठी:

योसेफने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?

संशोधन करा

  1. १. योसेफने इजिप्तमध्ये घालवलेल्या काळाबद्दल बायबलमध्ये दिलेली माहिती अचूक आहे हे कशावरून म्हणता येईल? (सावध राहा! ११/१० १५ ¶२-wcgr)

  2. २. व्यभिचार करणं हे यहोवाच्या नजरेत “पाप” आहे हे योसेफला कसं माहीत होतं? (उत्प. ३९:९; टेहळणी बुरूज२२.०८ २६ ¶२)

  3. ३. यहोवाने योसेफला इजिप्तचा मोठा अधिकारी का होऊ दिलं? (टेहळणी बुरूज९६ ५/१ ११ ¶४) १

    आता योसेफ इजिप्तचा मोठा अधिकारी आहे आणि इजिप्तच्या दोन सेवकांना सूचना देत आहे.

    चित्र १

  4. ४. वयाच्या ११० व्या वर्षींसुद्धा योसेफचा विश्‍वास मजबूत होता हे कशावरून दिसून येतं? (उत्प. ५०:२५, २६; टेहळणी बुरूज०७ ६/१ २८ ¶१०-११) २

    इस्राएली माणसं योसेफच्या अस्थी असलेली पेटी वचन दिलेल्या देशात पुरण्यासाठी घेऊन जात आहेत.

    चित्र २

शिकलेल्या मुद्द्‌यांवर विचार करा

  • एखादा भाऊ किंवा बहीण आपल्याशी चुकीचं वागते तेव्हा आपण योसेफचं अनुकरण कसं करू शकतो? (उत्प. ४५:४, ५; ५०:१९-२१)

  • योसेफ आपल्या घरच्यांपासून खूप दूर होता. तरी तो यहोवाला एकनिष्ठ राहिला. मग पुढे दिलेल्या परिस्थितींमध्ये आपण त्याच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो?

    • शाळा-कॉलेजमध्ये असताना ३

      एक तरुण बहीण कॉलेजमधून घरी जात असताना तिचे वर्गसोबत ई-सिगारेट ओढत तिच्याकडे पाहत आहेत. पण ती मात्र धैर्याने सरळ पुढे बघत चालली आहे.

      चित्र ३

    • कामाच्या निमित्ताने बाहेर असताना ४

      एक लग्न झालेला तरुण भाऊ कामाच्या निमित्ताने हॉटेलमध्ये रूम बुक करत आहे आणि सत्यात नसलेली एक सुंदर स्त्री त्याच वेळी हॉटेलमध्ये रूम बुक करत आहे आणि त्याच्याकडे पाहत आहे.

      चित्र ४

    • मोबाईल किंवा इतर साधनं वापरताना ५

      एक तरुण भाऊ त्याच्या बिछान्यात पडून त्याच्या मोबाईलमध्ये बघत आहे.

      चित्र ५

  • योसेफसारखंच तुम्हीही तुमच्या जीवनात धैर्य कसं दाखवू शकता?

मनन करण्यासाठी

  • या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?

  • या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?

  • योसेफचं पुनरुत्थान झाल्यावर मी त्याला काय विचारेन?

आणखी शिका

यहोवाने योसेफला समस्यांपासून वाचवलं नाही, तर त्यांचा सामना करायला मदत केली. यहोवा तुम्हालाही कशी मदत करू शकतो ते पाहा.

“यहोवा तुम्हाला यशस्वी व्हायला मदत करत आहे” (टेहळणी बुरूज२३.०१ १४-१९)

आपल्या मुलांना जेव्हा इतर मुलं त्रास देतात, तेव्हा ते योसेफचं अनुकरण कसं करू शकतात?

लोक वाईट वागतात तेव्हासुद्धा त्यांच्याशी चांगलं वागा (१:३१)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा