वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wcg अध्या. ६ पृ. ३६-३९
  • ती एका परक्या देशात जायला तयार झाली

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ती एका परक्या देशात जायला तयार झाली
  • धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • संशोधन करा
  • शिकलेल्या मुद्द्‌यांवर विचार करा
  • मनन करण्यासाठी
  • आणखी शिका
  • रिबका देव-भीरू कष्टाळू स्त्री
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • रिबकेनं यहोवाला खूश केलं
    आपल्या चिमुकल्यांना शिकवा
  • इसहाकाला चांगली बायको मिळते
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • इसहाकसाठी वधू शोधणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
धैर्याने देवाची उपासना करत राहा!
wcg अध्या. ६ पृ. ३६-३९

६ रिबका

ती एका परक्या देशात जायला तयार झाली

छापील आवृत्ती
छापील आवृत्ती

रिबका आपल्या खांद्यावर पाण्याची घागर घेऊन विहिरीजवळ आली. संध्याकाळ होत होती आणि ती पाणी भरायची वेळ होती. हे तिचं रोजचंच काम होतं आणि अशा कामाची तिला सवय होती. तिने पाहिलं की काही अनोळखी लोक आपल्या उंटांसोबत तिथे उभे आहेत. पण तरीसुद्धा ती विहिरीजवळ गेली आणि तिने आपली घागर भरून घेतली.

रिबका आपली पाण्याची घागर भरून घरी जात असताना त्या लोकांमधला एक वयस्कर माणूस तिच्याकडे धावत आला आणि तिला म्हणाला, “कृपा करून तुझ्या घागरीतून मला घोटभर पाणी प्यायला दे.” त्यावर तिने लगेच आपली घागर खांद्यावरून खाली उतरवली आणि ती त्याला म्हणाली: “घ्या प्रभू, प्या.” मग तिने त्याला हवं तेवढं पाणी दिलं. तिने फक्‍त त्यालाच नाही तर त्याच्यासोबत असलेल्या इतर माणसांनाही अगदी उदारपणे पाणी प्यायला दिलं.

पण एवढं करून ती थांबली नाही. तर त्या लोकांसोबत असलेल्या दहा उंटांसाठीही ‘मी विहिरीतून पाणी काढते’ असं तिने म्हटलं. ती सुंदर तरुणी पुन्हापुन्हा विहिरीकडे जाऊन त्यातून पाणी काढून हौदात भरत राहिली. सगळ्या उंटांची तहान भागत नाही तोपर्यंत ती हे करत राहिली. आणि तो माणूस आश्‍चर्याने तिच्याकडे पाहत होता. मग त्याने तिला विचारलं की ती कोणाची मुलगी आहे? आणि तिच्या घरी त्या सगळ्यांना रात्री मुक्काम करता येईल का? या वेळीसुद्धा रिबकाने मागेपुढे न पाहता उदारता दाखवली. ती त्या सगळ्या लोकांना आपल्या घरी मुक्कामाला घेऊन गेली. आणि त्यांच्या प्राण्यांनाही तिने भरपूर चारा दिला.

रिबकाला माहीत नव्हतं, पण या सगळ्यामागे यहोवाचा हात होता. तो वयस्कर माणूस कदाचित अब्राहामचा विश्‍वासू सेवक अलियेजर असावा. बऱ्‍याच आठवड्यांआधी त्याच्या मालकाने, म्हणजे अब्राहामने त्याला आपला मुलगा आणि वारस असलेल्या इसहाकसाठी पत्नी शोधायला शेकडो किलोमीटर दूर पाठवलं होतं. अब्राहामने आपल्या सेवकाला आवर्जून सांगितलं होतं, की इसहाकसाठी तो जी मुलगी शोधेल ती यहोवाच्या उपासकांपैकी असावी. म्हणून अलियेजरने या बाबतीत मदतीसाठी यहोवाकडे प्रार्थना केली. प्रार्थनेत त्याने यहोवाला असं म्हटलं, की इसहाकसाठी योग्य असलेल्या मुलीने त्याला आदरातिथ्य दाखवावं. आणि त्याने जसं प्रार्थनेत म्हटलं होतं, अगदी तसंच आदरातिथ्य रिबकाने नुकतंच दाखवलं होतं!

ज्या लोकांना रिबका पूर्वी कधीच भेटली नव्हती, त्यांना आदरातिथ्य दाखवायला तिने जराही संकोच केला नाही. आपल्याला कदाचित वाटेल, की त्या काळातले लोक चांगले होते, त्यामुळे अनोळखी लोकांना आदरातिथ्य दाखवणं सुरक्षित होतं. पण आज तसं नाही. आज बरेचसे लोक “क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम नसलेले” असे आहेत. (२ तीम. ३:१, ३) पण असं असलं तरी, रिबकासारख्या तरुण मुलीने अनोळखी लोकांना आदरातिथ्य दाखवणं, ही खरंच खूप विशेष गोष्ट होती. ते करण्यासाठी तिला धैर्याची गरज होती. आणि तिने ते दाखवलं. शिवाय पुढेही इतर मार्गंनी तिने धैर्य दाखवलं.

ही माणसं इतका लांबचा प्रवास करून का आली होती ते लवकरच रिबकाला कळलं. रिबकाचे वडील बथुवेल आणि तिचा भाऊ लाबान यांनी अलियेजरला आपल्यासोबत जेवायला बसायची विनंती केली. पण त्याने त्यांना म्हटलं, की जेवण्याआधी मी इथे का आलोय हे मला तुम्हाला सांगायचंय. त्याने ज्या वेळेस त्यांना सांगितलं, की कशा प्रकारे रिबकाला शोधायला यहोवाने त्याला मदत केली, तेव्हा तो खरं बोलतोय हे त्यांना जाणवलं. म्हणून ते म्हणाले, की “हे सगळं यहोवाने घडवून आणलं आहे.”

घरापासून दूर परक्या देशात जाऊन कधीही न भेटलेल्या माणसाशी लग्न करावं अशी देवाची इच्छा आहे ही गोष्ट रिबकाला कळली तेव्हा तिने काय केलं?

आता रिबका काय करणार होती? अब्राहामने हे सांगितलं होतं, की मुलगी कदाचित अलियेजरसोबत कनान देशात यायला तयार होणार नाही. त्यामुळे रिबकासमोर, जायचं की नाही हा पर्याय होता. मग सकाळी अलियेजरने तिच्या कुटुंबाला विचारलं, की तो रिबकाला आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतो का? तेव्हा तिच्या कुटुंबाने याबद्दल तिलाच विचारायचं ठरवलं. त्यांनी तिला विचारलं तेव्हा तिने अगदी साध्या सरळ शब्दांत उत्तर दिलं: “हो, मी तयार आहे.” अशा प्रकारे, रिबका आपलं घरदार आणि कुटुंब मागे सोडून जायला तयार झाली. कदाचित पुन्हा कधीच ती त्यांना भेटू शकणार नव्हती. तिने इतकं मोठं धाडस कसं काय दाखवलं? असं दिसतं, की आपल्या बाबतीत यहोवाची हीच इच्छा आहे हे तिला जाणवलं होतं.

मग उंटांवरून बऱ्‍याच आठवड्यांचा प्रवास केल्यावर ते सगळे कनान देशात अब्राहामच्या छावणीत पोचले. संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळत होता आणि रिबकाने पाहिलं, की एक माणूस विचार करत एकटाच शेतात फिरत आहे. तो इसहाक असल्याचं तिला कळलं, तेव्हा तिने लगेच आपल्या डोक्यावर पदर घेतला. यावरून दिसून आलं, की तिने इसहाकला आपला पती म्हणून नम्रपणे स्वीकारलं होतं. इसहाक ४० वर्षांचा एक समंजस माणूस होता. पण तो हळवा होता. त्याच्या आईचा, साराचा मृत्यू होऊन तीन वर्षं झाली होती, तरी तो दुःखातून सावरला नव्हता. अशा वेळी, यहोवाने रिबकाला जी नेमणूक दिली होती ती पूर्ण करायचं धैर्य तिच्यामध्ये होतं का? ती इसहाकला साथ देणारी एक प्रेमळ पत्नी होऊ शकणार होती का? आणि त्याला एक कुटुंबप्रमुख म्हणून यहोवाची सेवा करायला ती मदत करू शकणार होती का? बायबल म्हणतं, की तिने तसंच केलं. त्यांच्या लग्नाची सुरुवात कशी झाली याबद्दल बायबल म्हणतं: “तो तिच्या प्रेमात पडला आणि आपल्या आईच्या मृत्यूमुळे झालेल्या दुःखातून तो सावरला.”

रिबका इसहाकला भेटायला चालली आहे. इसहाक आणि अलियेजरला दूरुनच पाहून रिबकाने डोक्यावर पदर घेतलाय आणि आपला उंट घेऊन ती त्यांच्याकडे जात आहे.

याबद्दल बायबलमधून वाचा:

  • उत्पत्ती २४:१-६७; २५:२०

चर्चेसाठी:

रिबकाने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?

संशोधन करा

  1. १. अब्राहामला मुलं झाल्यामुळे अलियेजरला आता कोणता हक्क मिळणार नव्हता? पण त्याला त्या गोष्टीचा हेवा वाटत नव्हता हे कशावरून दिसून आलं? (उत्प. १५:२-४; २४:१२; टेहळणी बुरूज९७ १/१ ३० ¶२)

  2. २. इसहाकने त्याच्या होणाऱ्‍या पत्नीच्या, रिबकाच्या देशात जाण्यापेक्षा रिबकाने कनानला यावं असं अब्राहामला का वाटत होतं? (टेहळणी बुरूज९७ १/१ ३० ¶३)

  3. ३. रिबका आणि तिच्या कुटुंबाला ज्या भेटवस्तू देण्यात आल्या त्यांचा काय अर्थ होत होता? (इन्साइट “रिबका” ¶४-wcgr)

  4. ४. रिबकाने हारानमधून इसहाकच्या घरी नेगेबला जो प्रवास केला त्याचं वर्णन करा. (टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६.३ १५ ¶१-wcgr) १

    इस्राएलमधलं नेगेबचं वाळवंट. या वाळवंटात खूप धूळ, खडक, दऱ्‍याखोऱ्‍या आणि वाळूचे डोंगर आहेत.

    www.LifeintheHolyLand.com

    चित्र १: एकेकाळी नेगेबमध्ये खूप लोकवस्ती होती. आणि अब्राहामच्या मोठमोठ्या कळपांसाठी तिथे भरपूर कुरणं होती

शिकलेल्या मुद्द्‌यांवर विचार करा

  • विवाह जोडीदार निवडताना आपण अब्राहाम, रिबका आणि इसहाककडून काय शिकू शकतो? (उत्प. २४:२, ३; २७:४६–२८:१)

  • रिबका खूप मेहनती आणि उदार होती. इतरांसोबत ती आदराने वागायची. ख्रिस्ती बहिणी कोणकोणत्या मार्गांनी तिचं अनुकरण करू शकतात? २

    कोलाज: ख्रिस्ती बहिणी तीन मार्गांनी रिबकाच्या चांगल्या गुणांचं अनुकरण करू शकतात. हीच दृश्‍यं या पानावर वेगवेगळ्या चित्रांमध्ये दाखवण्यात आली आहेत. एक आई आपल्या लहान मुलीला त्यांच्या बागेतल्या ताज्या भाज्या बास्केटमध्ये गोळा करायला मदत करत आहे. नंतर ती आई आणि लहान मुलगी भाज्यांची ती बास्केट एका वयस्कर बहिणीला नेऊन देत आहेत. एक आई आपल्या मुलीसोबत आणि पतीसोबत कौटुंबिक उपासनेत आनंदाने बसली आहे.

    चित्र २

  • तुम्ही तुमच्या जीवनात रिबकासारखं धैर्य कसं दाखवू शकता?

मनन करण्यासाठी

  • या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?

  • या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?

  • रिबकाचं पुनरुत्थान झाल्यावर मी तिला काय विचारेन?

आणखी शिका

एक विश्‍वासू पत्नी आणि आई म्हणून रिबकाने कसं धैर्य दाखवलं यावर विचार करा.

रिबका देव-भीरू कष्टाळू स्त्री (टेहळणी बुरूज०४ ४/१५ ८-११)

लहान मुलं रिबकाकडून काय शिकू शकता?

“रिबकाचे चांगले गुण” (वेब सिरीझ “चित्रांमधून शिका”-wcgr)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा