२ नोहा
त्याने जगाला दोषी ठरवलं
हनोखच्या मृत्यूच्या काही काळानंतर काही स्वर्गदूतांनी देवाविरुद्ध बंड केलं. त्या दुष्ट स्वर्गदूतांना पृथ्वीवरच्या स्त्रियांसोबत लैंगिक संबंध ठेवायचे होते. त्यामुळे ते पृथ्वीवर आले, त्यांनी मानवी शरीरं धारण केली आणि ज्या स्त्रिया त्यांना आवडल्या त्या सगळ्या त्यांनी जबरदस्तीने बायका करून घेतल्या. त्यांना जी मुलं झाली ती खूप उंच, धिप्पाड आणि क्रूर होती. त्यांना नेफिलीम म्हटलं जायचं. त्यांच्या प्रभावामुळे पृथ्वीवरचे लोक खूपच भ्रष्ट झाले होते. देवाने सुरुवातीला मानवांना बनवलं, तेव्हा त्यांना खूप सुंदर जीवन दिलं होतं. पण नंतर लोक इतके दुष्ट आणि हिंसक बनले, की त्यांचं जीवन अगदी खालच्या थराला गेलं. पण या सगळ्यांमध्ये एक माणूस मात्र खूप वेगळा होता. तो म्हणजे हनोखचा पणतू नोहा.
हनोखसारखा नोहासुद्धा एक नीतिमान माणूस बनला. त्याच्याबद्दल बायबलमध्ये आपण असं वाचतो: “नोहा खऱ्या देवासोबत चालला.” काही काळानंतर त्याचं लग्न झालं. त्याने आणि त्याच्या पत्नीने आपल्या तिन्ही मुलांनाही यहोवाच्या आज्ञा पाळायला शिकवलं. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांपेक्षा हे कुटुंब खूप वेगळं होतं.
एक दिवस यहोवाने नोहाला सांगितलं की त्याने एक मोठा जलप्रलय आणून संपूर्ण पृथ्वीवरच्या दुष्ट लोकांचा नाश करायचं ठरवलंय. पण यहोवाला चांगल्या लोकांनाही वाचवायचं होतं. त्यामुळे त्याने नोहाला एक भलंमोठं तारू किंवा जहाज बांधायला सांगितलं. नोहाने जलप्रलयासारखी गोष्ट कधीच पाहिली नव्हती. शिवाय जे जहाज त्याला बांधायला सांगितलं होतं, ते खूप मोठं होतं. आणि इतकं मोठं काम त्याने याआधी कधीच केलं नव्हतं. पण यहोवाने सांगितलेल्या गोष्टीवर त्याने भरवसा ठेवला आणि जहाज बांधायला सुरुवात केली.
नोहा आणि त्याच्या कुटुंबाला अशा भयानक शत्रूंचा सामना करावा लागला, ज्यांना त्यांचा संदेश आणि ते करत असलेलं काम आवडत नव्हतं
हे काम करण्यासाठी नोहा आणि त्याच्या कुटुंबाला नक्कीच धैर्याची गरज होती. कारण त्यांना मोठ्या प्रमाणात विरोधाचा आणि थट्टेचा सामना करावा लागला असेल. मानवी शरीर धारण केलेले स्वर्गदूत, नोहा आणि त्याच्या कुटुंबाचे खूप शक्तिशाली आणि भयंकर शत्रू होते. आणि त्यांची मुलं तर खूपच क्रूर होती. पण नोहा, त्याची पत्नी, त्याची तीन मुलं आणि त्यांच्या बायका, असे आठ लोक आपलं काम करत राहिले. कित्येक वर्षं म्हणजे जवळपास पन्नासएक वर्षं ते जहाज बांधायचं काम करत राहिले. आणि जहाज हळूहळू आकार घेत राहिलं.
पण हे काम करत असताना नोहाने अजून एक काम केलं. त्याने लोकांना येणाऱ्या नाशाबद्दल सांगितलं. आणि त्यामुळेच त्याला “नीतिमत्वाचा प्रचारक” म्हटलंय. कुटुंबप्रमुख या नात्याने त्याने लोकांना येणाऱ्या नाशाबद्दल सांगण्यासाठी पुढाकार घेतला. पण त्याच्या घरातल्या लोकांशिवाय कोणीच त्याचं ऐकलं नाही. असं दिसतं की नोहाच्या नातेवाइकांनीसुद्धा त्याचं ऐकलं नाही. लोक त्यांचा वाईट मार्ग सोडायला अजिबात तयार नव्हते. खरंच, या विश्वासू माणसामध्ये आणि आजूबाजूच्या जगामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. त्यामूळेच बायबलमध्ये नोहाबद्दल असं म्हटलंय: “विश्वासाद्वारे त्याने जगाला दोषी ठरवलं.”
शेवटी जहाज बांधून पूर्ण झालं. आता नोहा आणि त्याच्या कुटुंबाला स्वतःसाठी आणि प्राण्यांसाठी अन्नपाणी आणि इतर गोष्टी जहाजात आणून ठेवायच्या होत्या. मग काही काळाने एक आश्चर्यकारक गोष्ट घडली! वेगवेगळ्या प्राण्यांचे “नर आणि मादी असे दोन-दोन प्राणी” जहाजात स्वतःहून येऊ लागले.
देवाने नोहाला आधीच, त्याच्या कुटुंबाला जहाजात घेऊन जायला सांगितलं होतं. कारण आता सात दिवसांमध्येच पाऊस पडायला सुरुवात होणार होती. शेवटी-शेवटी नोहा आणि त्याच्या कुटुंबाची जहाजात अन्नपाणी आणि इतर गोष्टी जमा करण्यात किती धावपळ सुरू असेल याची आपण कल्पना करू शकतो! हे पाहून लोक त्यांची आणखीनच थट्टा करू लागले असतील. पण नोहा आणि त्याच्या कुटुंबाने जहाजात सगळं सामान ठेवलं आणि यहोवाने स्वतः जहाजाचं दार बंद केलं. तेव्हा मात्र या लोकांची तोंडं नक्कीच बंद झाली असतील. आता पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. पाण्याचा पूर येऊ लागला आणि पुढचे ४० दिवस पाणी इतकं वाढलं, की पर्वतांची शिखरंसुद्धा बुडून गेली. अशा प्रकारे यहोवाने पृथ्वीवरून सगळ्या दुष्ट लोकांचा नाश केला.
नोहा आणि त्याचं कुटुंब एक वर्षापेक्षा जास्त काळ जहाजात सुरक्षित होतं. या काळातच जलप्रलयाचं पाणी हळूहळू ओसरत गेलं. आणि या दरम्यानच नोहाचं जहाजसुद्धा एका पर्वतावर जाऊन टेकलं. मग यहोवाने काही काळानंतर त्यांना जहाजातून बाहेर यायला सांगितलं. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा यहोवाने त्यांचा जीव वाचवला म्हणून त्याचे आभार मानण्यासाठी नोहाने आपल्या कुटुंबासोबत मिळून प्राण्यांची बलिदानं दिली. यहोवानेही त्यांना वचन दिलं, की तो पुन्हा कधीच पृथ्वीवर जलप्रलय आणणार नाही. आणि याचं मानवजातीसाठी एक चिन्ह असावं म्हणून यहोवाने त्यांना मेघधनुष्य दाखवला.
आज जिवंत असलेला प्रत्येक माणूस नोहाच्या कुटुंबातूनच आला आहे. तेव्हाच्या दुष्ट जगापासून वेगळं राहायचं धैर्य नोहाच्या कुटुंबाने दाखवलं याबद्दल आपण खरंच त्यांचे किती आभार मानले पाहिजेत!
याबद्दल बायबलमधून वाचा:
चर्चेसाठी:
नोहाने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?
संशोधन करा
१. जलप्रलय येण्याआधी जगाची परिस्थिती कशी होती? (टेहळणी बुरूज०२ ३/१ ५ ¶३-६ ¶४)
२. यहोवाने नोहाला जहाज बांधायला कधी सांगितलं? जलप्रलय केव्हा सुरू होईल हे नोहाला नेमकं कधी समजलं? (टेहळणी बुरूज१२ ४/१५ २३ ¶५-८)
३. जलप्रलय खरोखर आला होता हे आपण कशावरून म्हणू शकतो? (बायबलमधून प्रश्नांची उत्तरं लेख १५६ ¶२-५, चौकट-wcgr) १
Historic Collection/Alamy Stock Photo
चित्र १: एका हिंदू पौराणिक कथेत एका अशा माणसाबद्दल सांगितलंय, ज्याने जगावर आलेल्या जलप्रलयातून वाचण्यासाठी एक नाव बनवली. आणि जलप्रलय होऊन गेल्यावर त्याने अर्पण दिलं आणि त्यानंतर तो सगळ्या माणसांचा पूर्वज बनला
४. जलप्रलय होऊन १०० पेक्षा जास्त वर्षं होऊन गेल्यानंतर कोणती घटना घडली? आणि त्यामुळे वयस्कर झालेल्या नोहाला कसं वाटलं असावं? (इन्साइट “नोहा” क्र. १ ¶१२-wcgr) २
चित्र २
शिकलेल्या मुद्द्यांवर विचार करा
आज आपला काळसुद्धा नोहाच्या दिवसांसारखाच आहे असं का म्हणता येईल? (मत्त. २४:३६-३९)
पुढे दिलेल्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे आपल्याला नोहाच्या उदाहरणावरून कसं कळतं?
चांगलं नियोजन करणं ३
चित्र ३
मेहनती असणं ४
चित्र ४
धीर धरणं ५
चित्र ५
नोहासारखंच तुम्हीही तुमच्या जीवनात धैर्य कसं दाखवू शकता?
मनन करण्यासाठी
या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?
या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?
नोहाचं पुनरुत्थान झाल्यावर मी त्याला काय विचारेन?
आणखी शिका
एक कुटुंबप्रमुख नोहाच्या उदाहरणाचं अनुकरण करण्यासाठी किती मेहनत घेतात ते पाहा.
नोहाच्या उदाहरणातून शिकण्यासाठी तुमच्या मुलांना मदत करा.
“नोहाचा देवावर विश्वास होता” (बायबलच्या चित्रकथा लेख १८-wcgr)