वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wcg अध्या. १ पृ. १६-१९
  • तो देवासोबत चालत राहिला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तो देवासोबत चालत राहिला
  • धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • संशोधन करा
  • शिकलेल्या मुद्द्‌यांवर विचार करा
  • मनन करण्यासाठी
  • आणखी शिका
  • “तो देवाला संतोषवीत असे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७
  • हनोख अधर्मी जगात देवाबरोबर चालला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • हनोख—कठीण परिस्थितींत निर्भय
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • या वादळी काळात देवासोबत चाला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
अधिक माहिती पाहा
धैर्याने देवाची उपासना करत राहा!
wcg अध्या. १ पृ. १६-१९

१ हनोख

तो देवासोबत चालत राहिला

छापील आवृत्ती
छापील आवृत्ती

हनोखला एकटं पडणं काय असतं हे चांगलं माहीत होतं. तो त्याच्या काळातल्या जगापेक्षा खूप वेगळा होता. त्याच्या काळातल्या लोकांपैकी तो एकटाच असा होता, ज्याच्याबद्दल बायबलमध्ये म्हटलंय: “हनोख . . . खऱ्‍या देवासोबत चालत राहिला.” एका साधारण माणसाला देवासोबत चालणं कसं शक्य झालं? आणि आज धैर्य दाखवण्याच्या बाबतीत आपण हनोखकडून काय शिकू शकतो?

हनोख कमीत कमी दोन मार्गांनी देवासोबत चालला. एक म्हणजे त्याने देवाच्या नजरेत जे चांगलं ते केलं आणि दुसरं म्हणजे वाईट गोष्टींना नकार दिला. त्याने त्या काळातल्या दुष्ट जगासारखं व्हायचं टाळलं. हनोख हा आदाम-हव्वापासून सातव्या पिढीत जन्माला आला होता. त्या वेळी आदाम अजूनही जिवंत होता आणि त्याचं खूप वय झालं होतं. (“कुलप्रमुखांच्या काळापासून न्यायाधीशांच्या काळापर्यंत” ही समयरेषा पाहा.) आपल्या या पहिल्या मानवी पालकांची बंडखोर प्रवृत्ती संपूर्ण मानवी कुटुंबात पसरली होती. त्यांचा मुलगा काईन याने आपल्या सख्ख्या भावाचा, म्हणजे हाबेलचा खून केला. खरंतर हाबेल हा देवावर विश्‍वास ठेवणारा पहिला माणूस होता. काईनच्या वंशातले काही जण त्याच्याइतके किंवा त्याच्याहूनही जास्त क्रूर होते. (उत्प. ४:२३, २४) आणि हनोखच्या काळापर्यंत तर परिस्थिती आणखीनच बिघडली होती. पण हनोखने त्या काळातल्या हिंसक प्रवृत्तीचा धैर्याने विरोध केला. तो शांत स्वभावाचा आणि देवाला आवडणारा असा माणूस होता.

हनोखचा जन्म होण्याच्या काही पिढ्यांआधी “लोकांनी यहोवाला नावाने हाक मारायला सुरुवात केली.” (उत्प. ४:२६) असं दिसतं, की खोट्या उपासनेसाठी आणि देवाच्या नावाचा अनादर करण्यासाठी ते असं करत होते. पण हनोखचं देवावर प्रेम होतं आणि यहोवाच्या पवित्र नावाबद्दल त्याच्या मनात गाढ आदर होता. त्याच्या काळातल्या लोकांपेक्षा तो खूप वेगळा होता.

लोकांना हनोखचा संदेश आवडला नाही म्हणून ते त्याच्या जिवावर उठले, पण यहोवाने त्याचं संरक्षण केलं

यहोवाने हनोखला जे करायला सांगितलं होतं ते करायला त्याला आणखी धैर्याची गरज पडणार होती. देवाने त्याला एक खास जबाबदारी दिली होती. त्याला एक संदेष्टा म्हणून काम करायचं होतं. त्याला त्या सगळ्या दुष्ट लोकांना देवाचा एक संदेश सांगायचा होता. तो संदेश हा होता: “पाहा! यहोवा आपल्या लाखो पवित्र स्वर्गदूतांसोबत आला; सर्वांचा न्याय करायला आणि पापी लोकांनी केलेल्या दुष्ट कामांमुळे आणि आपल्याविरुद्ध बोललेल्या सर्व धक्कादायक गोष्टींमुळे तो त्यांना दोषी ठरवायला आलाय.”

एका गजबजलेल्या रस्त्यावर हनोख लोकांना देवाच्या न्यायदंडाचा संदेश सांगत आहे. पण त्यांतल्या काही लोकांना ते आवडलं नाही आणि ते खूप चिडले आहेत. काहींच्या हातात तर हत्यारंसुद्धा आहेत.

इथे तुम्ही लक्ष दिलं का, हनोखने ही भविष्यवाणी अशा प्रकारे म्हटली जणू काय देवाचा न्यायदंड आधीच बजावण्यात आलाय. यावरून हनोखचे शब्द नक्की पूर्ण होणार होते याची खातरी आपल्याला मिळते. हा एक कठोर न्यायदंडाचा संदेश होता. हनोखने संदेशात ‘पापी लोक,’ ‘दुष्ट कामं,’ ‘धक्कादायक गोष्टी’ असे शब्द वापरले. हे शब्द त्या लोकांच्या मनाला नक्कीच खूप लागले असतील आणि त्यांना खूप राग आला असेल. पण तरी, यहोवाला जो संदेश लोकांना कळवायचा होता तो हनोखने धैर्याने सांगितला.

या संदेशाचा लोकांवर काय परिणाम झाला? याबद्दल बायबल स्पष्ट काही सांगत नाही. पण एक गोष्ट मात्र बायबलमधून स्पष्ट दिसून येते; ती म्हणजे हनोखच्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा त्याच्या जिवाला खूप धोका होता. तो कसा? बायबलमध्ये आपण वाचतो, “मग तो नाहीसा झाला, कारण देवाने त्याला नेलं.” नेमकं काय घडलं होतं? असं दिसतं की त्या काळातले दुष्ट लोक हनोखचा छळ करत होते. पण त्यांनी त्याचं काहीतरी बरंवाईट करून त्याचा खून करू नये म्हणून यहोवाने आपल्या या प्रिय मित्राला नेलं; म्हणजेच त्याला मृत्यूची शांत झोप दिली. आता कोणीही त्याला त्रास देऊ शकणार नव्हतं. कारण तो यहोवाच्या आठवणीत सुरक्षित होता.

पण त्याआधी यहोवाने हनोखला एक खास भेट दिली. याबद्दल बायबलमध्ये म्हटलंय: “देवानेच त्याला नेलं होतं. आणि त्याआधी त्याला अशी साक्ष देण्यात आली, की त्याने देवाचं मन आनंदित केलं आहे.” कदाचित यहोवाने भविष्यात येणाऱ्‍या पृथ्वीवरच्या नंदनवनात तो एक शांतिपूर्ण जीवन जगेल असा दृष्टान्त त्याला दाखवला असेल. त्यामुळे शेवटी डोळे मिटण्याआधी त्याला एक गोष्ट पक्की माहीत झाली. ती म्हणजे, यहोवाचं त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याने दाखवलेल्या जबरदस्त विश्‍वासासाठी आणि धैर्यासाठी यहोवाने त्याला आशीर्वाद दिला आहे.

याबद्दल बायबलमधून वाचा:

  • उत्पत्ती ५:२१-२४

  • इब्री लोकांना ११:५

  • यहूदा १४, १५

चर्चेसाठी:

हनोखने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?

संशोधन करा

  1. १. लोकांनी कदाचित कोणत्या अर्थाने “यहोवाला नावाने हाक मारायला सुरुवात केली” असेल? (उत्प. ४:२६; टेहळणी बुरूज०१ ९/१५ २९ ¶३)

  2. २. हनोखला एक खास जबाबदारी मिळाली होती. त्याच्याआधी ती कोणालाच मिळाली नव्हती. ती जबाबदारी कोणती होती? (टेहळणी बुरूज०१ ९/१५ ३१ ¶५)

  3. ३. संदेष्टा म्हणून काम करायला सुरू करण्याआधी आपल्या धैर्याची परीक्षा होईल हे हनोखला कशामुळे माहीत झालं असावं? (टेहळणी बुरूज०६ १०/१ १९ ¶१३-१४) १

    कोलाज: आपल्या पूर्वजांच्या बाबतीत काय-काय घडलं यावर हनोख विचार करत आहे. १. दोन करूब आणि जळती तलवार एदेन बागेचं रक्षण करत आहेत. २. म्हातारे झालेले आदाम आणि हव्वा. ३. काईन आपल्या भावाचा खून करून त्याच्याजवळ उभा आहे.

    चित्र १

  4. ४. काही जण मानतात की हनोख स्वर्गात गेला. पण बायबल तसं सांगत नाही हे तुम्ही एखाद्याला कसं समजावून सांगाल? (योहा. ३:१३; इब्री ११:५, १३)

शिकलेल्या मुद्द्‌यांवर विचार करा

  • प्रचार करण्यासाठी आपल्याला खासकरून धैर्याची गरज कधी पडू शकते? आणि हनोखचं उदाहरण आपल्याला यासाठी कसं मदत करू शकतं? २

    एक भाऊ गॅरेजमध्ये काम करत आहे आणि खडूस दिसणाऱ्‍या आपल्या एका सोबत्याला सभेचं आमंत्रण द्यायला जात आहे. तर बाकीचे सोबती आपल्या भावावर हसत आहेत.

    चित्र २

  • यहोवासोबत चालण्यासाठी आपण धैर्य दाखवतो तेव्हा त्याला कसं वाटतं? (नीति. २७:११; इब्री ११:५)

  • हनोखसारखंच तुम्हीही तुमच्या जीवनात धैर्य कसं दाखवू शकता?

मनन करण्यासाठी

  • या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?

  • या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?

  • हनोखचं पुनरुत्थान झाल्यावर मी त्याला काय विचारेन?

आणखी शिका

जेव्हा आपल्याला हिंसक प्रवृत्तीच्या लोकांना तोंड द्यावं लागतं, तेव्हा हनोखच्या उदाहरणामुळे आपल्याला कशी मदत होईल?

विश्‍वासू लोकांसारखं असा, अविश्‍वासू लोकांसारखं नाही—हनोखसारखं, लामेखसारखं नाही (२:५३)

हनोखला आपला विश्‍वास वाढवण्यासाठी कशामुळे मदत झाली याकडे लक्ष द्या.

“या वादळी काळात देवासोबत चाला” (टेहळणी बुरूज०५ ९/१ २२-२६)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा