वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es24 पृ. १३४-१४७
  • नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नोव्हेंबर
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२४
  • उपशिर्षक
  • शुक्रवार, १ नोव्हेंबर
  • शनिवार, २ नोव्हेंबर
  • रविवार, ३ नोव्हेंबर
  • सोमवार, ४ नोव्हेंबर
  • मंगळवार, ५ नोव्हेंबर
  • बुधवार, ६ नोव्हेंबर
  • गुरुवार, ७ नोव्हेंबर
  • शुक्रवार, ८ नोव्हेंबर
  • शनिवार, ९ नोव्हेंबर
  • रविवार, १० नोव्हेंबर
  • सोमवार, ११ नोव्हेंबर
  • मंगळवार, १२ नोव्हेंबर
  • बुधवार, १३ नोव्हेंबर
  • गुरुवार, १४ नोव्हेंबर
  • शुक्रवार, १५ नोव्हेंबर
  • शनिवार, १६ नोव्हेंबर
  • रविवार, १७ नोव्हेंबर
  • सोमवार, १८ नोव्हेंबर
  • मंगळवार, १९ नोव्हेंबर
  • बुधवार, २० नोव्हेंबर
  • गुरुवार, २१ नोव्हेंबर
  • शुक्रवार, २२ नोव्हेंबर
  • शनिवार, २३ नोव्हेंबर
  • रविवार, २४ नोव्हेंबर
  • सोमवार, २५ नोव्हेंबर
  • मंगळवार, २६ नोव्हेंबर
  • बुधवार, २७ नोव्हेंबर
  • गुरुवार, २८ नोव्हेंबर
  • शुक्रवार, २९ नोव्हेंबर
  • शनिवार, ३० नोव्हेंबर
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२४
es24 पृ. १३४-१४७

नोव्हेंबर

शुक्रवार, १ नोव्हेंबर

तुमच्या तोंडून कोणताही वाईट शब्द निघू नये. तर, इतरांना प्रोत्साहन मिळू शकेल अशाच गोष्टी तुम्ही बोलाव्यात.​—इफिस. ४:२९.

ख्रिस्ती व्यक्‍तीने दुसऱ्‍यांशी बोलताना असभ्य भाषा, वाईट बोलणं या सगळ्यांपासून दूर राहिलं पाहिजे. पण आपल्याला अशाही शब्दांपासून आणि भाषेपासून दूर राहायला हवं जी आपल्याला सरळ-सरळ असभ्य वाटत नाही. उदाहरण द्यायचं झालं, तर नकळतपणे आपण दुसऱ्‍या संसकृतीच्या, वंशाच्या किंवा देशाच्या लोकांबद्दल मस्करी करू, त्यांची टीका करू. पण आपल्याकडून असं होऊ नये म्हणून आपण सावध असलं पाहिजे. तसंच, आपण टोमणे मारणार नाही आणि लोकांना दुःख होईल असं बोलणार नाही. म्हणून दुसऱ्‍यांची टीका किंवा तक्रार करण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन मिळेल असं बोला. यहोवाने इस्राएली लोकांसाठी खूप काही केलं होतं. पण त्याबद्दल ते आभार मानण्याऐवजी सारखी तक्रार करायचे. लक्षात असू द्या, जर एकाने तक्रार केली तर त्याचं पाहून इतर जणसुद्धा तक्रार करायला लागू शकतात. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा दहा हेरांनी वचन दिलेल्या देशाबद्दल वाईट बातमी सांगितली तेव्हा सर्व इस्राएली मोशेविरुद्ध “कुरकुर करू लागले.” (गण. १३:३१–१४:४) पण तक्रार करण्याऐवजी जर आपण दुसऱ्‍यांची प्रशंसा केली तर याचा चांगला परिणाम होऊ शकतो. तर मग, जेव्हा कधी तुम्हाला संधी मिळेल तेव्हा लोकांचं भरभरून कौतुक करा. टेहळणी बुरूज२२.०४ ८ ¶१६-१७

शनिवार, २ नोव्हेंबर

जन्मापासूनच मला तुझ्या हाती सोपवण्यात आलंय; मी आईच्या पोटात होतो, तेव्हापासून तू माझा देव आहेस.​—स्तो. २२:१०.

प्राचीन काळापासून यहोवाने अनेक तरूणांना आपल्याशी जवळचं नातं जोडण्यासाठी मदत केली आहे. तुमच्या मुलांचीही अशीच इच्छा असेल तर तो त्यांनाही मदत करेल. (१ करिंथ. ३:६, ७) तुमची मुलं पुढे जाऊन जरी आपल्या मार्गातून भरकटली तरी यहोवा त्यांच्याकडे प्रेमळपणे लक्ष देत राहील. (स्तो. ११:४) त्यांच्यात “योग्य मनोवृत्ती” असल्याचं यहोवाला थोडं जरी जाणवलं, तरी त्यांना मदत करण्यासाठी तो नेहमी तयार असेल. (प्रे. कार्यं १३:४८; २ इति. १६:९) गरज असेल तेव्हा योग्य शब्द योग वेळी बोलायला तो तुम्हाला मदत करेल. (नीति. १५:२३) किंवा मंडळीतल्या एखाद्या प्रेमळ भावाला किंवा बहिणीला तुमच्या मुलांकडे विशेष लक्ष द्यायला तो प्रवृत्त करेल. तुमची मुलं मोठी झाली असली तरी तुम्ही त्यांना लहानपणी शिकवलेल्या काही गोष्टी यहोवा त्यांच्या आठवणीत आणून देईल. (योहा. १४:२६) तुमच्या बोलण्यातून आणि तुमच्या कृतीतून तुम्ही तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी जी काही मेहनत घेत आहात त्यावर यहोवा तुम्हाला नक्की आशीर्वाद देईल. टेहळणी बुरूज२२.०४ २१ ¶१८

रविवार, ३ नोव्हेंबर

अजगर संतापला.​—प्रकटी. १२:१७.

सैतानाला स्वर्गात जाणं शक्य नसल्यामुळे तो खूप क्रोधित झालाय आणि यामुळे तो पृथ्वीवर असलेल्या देवाच्या अभिषिक्‍त सेवकांवर हल्ला करत आहे. हे अभिषिक्‍त देवाच्या राज्याचे प्रतिनिधी आहेत आणि “येशूबद्दल साक्ष देण्याचं कार्य [त्यांना] नेमण्यात आलं आहे.” (२ करिंथ. ५:२०; इफिस. ६:१९, २०) १९१८ मध्ये आठ प्रमुख बांधवांवर खोटे आरोप लावून त्यांना दोषी ठरवण्यात आलं. आणि त्यांना बऱ्‍याच वर्षांसाठी जेलमध्ये टाकण्यात आलं. त्या वेळी असं वाटलं की अभिषिक्‍त जनांचं काम आता ठप्प पडेल. (प्रकटी. ११:३, ७-११) १९१९ सालच्या सुरुवातीला या अभिषिक्‍त बांधवांना जेलमधून सुटका मिळाली आणि त्यानंतर त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोपसुद्धा मागे घेण्यात आले. जेलमधून सुटल्यावर हे अभिषिक्‍त बांधव राज्याच्या कामात पुन्हा व्यस्त झाले. पण सैतानाने देवाच्या लोकांवर हल्ला करायचं सोडलं नाही. तेव्हापासून आजपर्यंत सैतानाने देवाच्या लोकांचा मोठ्या प्रमाणात छळ केला आहे. याची तुलना ‘नदीच्या प्रवाहासोबत’ करण्यात आली आहे. (प्रकटी. १२:१५) म्हणूनच आपल्यापैकी प्रत्येकाला “धीराची आणि विश्‍वासाची गरज आहे.”​—प्रकटी. १३:१०. टेहळणी बुरूज२२.०५ ५-६ ¶१४-१६

सोमवार, ४ नोव्हेंबर

ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. ते . . . १,४४,००० इतके होते.​—प्रकटी. ७:४.

एका दृष्टान्तात प्रेषित योहान यहोवाच्या शासनाला पाठिंबा देणाऱ्‍या दोन गटांना पाहतो. या दोन्ही गटांतल्या लोकांना कायमच्या जीवनाचा आशीर्वाद मिळतो. पहिल्या गटात १,४४,००० लोक आहेत. त्यांना येशूसोबत स्वर्गात एक सरकार किंवा एक राज्य स्थापन करण्यासाठी पृथ्वीवरून निवडण्यात आलं आहे. त्याच्यासोबत ते स्वर्गातून पृथ्वीवर राज्य करतात. (प्रकटी. ५:९, १०; १४:३, ४) दृष्टान्तात योहान त्यांना येशूसोबत सीयोन पर्वतावर म्हणजेच स्वर्गात उभं असलेलं पाहतो. (प्रकटी. १४:१) या १,४४,००० जणांपैकी एक असण्यासाठी प्रेषितांच्या काळापासून आजपर्यंत हजारो जणांना निवडण्यात आलं आहे. (लूक १२:३२; रोम. ८:१७) पण योहानला असं सांगण्यात येतं, की शेवटल्या काळात त्यांच्यापैकी खूप कमी लोक पृथ्वीवर जिवंत असतील. (प्रकटी. १२:१७) मग मोठ्या संकटादरम्यान कधीतरी या उरलेल्या लोकांना स्वर्गात घेतलं जाईल. आणि अशा रीतीने १,४४,००० जणांपैकी ज्या विश्‍वासू लोकांचा आधीच मृत्यू झाला आहे त्यांच्यासोबत ते स्वर्गात असतील. तिथे ते देवाच्या स्वर्गीय राज्यात येशूसोबत राज्य करतील.​—मत्त. २४:३१; प्रकटी. ५:९, १०. टेहळणी बुरूज२२.०५ १६ ¶४-५

मंगळवार, ५ नोव्हेंबर

तू माझ्या आज्ञा पाळल्यास तर किती बरं होईल!​—यश. ४८:१८.

येशूने आपल्या शिष्यांना स्वतःबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवायला शिकवलं. तो त्यांना म्हणाला: “तुमच्या डोक्यावरचे सगळे केससुद्धा मोजलेले आहेत.” (मत्त. १०:३०) आपण जर स्वतःबद्दल नेहमी नकारात्मक विचार करत असू, तर येशूचे हे शब्द आपल्याला नक्कीच दिलासा देतील. कारण यावरून कळतं, की आपल्या स्वर्गातल्या पित्याला आपली खूप काळजी आहे आणि आपण त्याच्या नजरेत खूप मौल्यवान आहोत. कदाचित आपल्याला वाटत असेल, की आपण यहोवाची उपासना करायच्या आणि नवीन जगात कायमचं जीवन जगायच्या लायकीचे नाही. पण जर यहोवा आपल्याला त्याच्या लायक समजत असेल, तर मग यावर शंका घेणारे आपण कोण? हे यहोवाने चुकीचा न्याय केला आहे असं म्हणण्यासारखं ठरेल. स्वतःबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवण्याच्या बाबतीत १५ वर्षांपूर्वी टेहळणी बुरूज मासिकात खूप चांगली माहिती देण्यात आली होती. त्यात असं म्हटलं होतं, की “आपण स्वतःला इतकं श्रेष्ठ समजू नये, की आपल्यामध्ये गर्विष्ठपणा निर्माण होईल. आणि दुसरीकडे आपण असाही विचार करू नये, की आपण कसल्याच लायकीचे नाही. याउलट, आपण स्वतःबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवला पाहिजे. म्हणजे आपल्याला स्वतःच्या क्षमता आणि मर्यादांची जाणीव असली पाहिजे. टेहळणी बुरूज२२.०५ २४-२५ ¶१४-१६

बुधवार, ६ नोव्हेंबर

त्या सर्वांनी एक व्हावं म्हणून मी ही विनंती करतो.​—योहा. १७:२१.

मंडळीतली एकता टिकवून ठेवण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येक जण काय करू शकतो? यासाठी आपण स्वतः सर्वांसोबत शांतीने राहू शकतो आणि इतरांनाही तसं करायला मदत करून शकतो. (मत्त. ५:९; रोम. १२:१८) जेव्हा-जेव्हा आपण मंडळीतल्या इतरांसोबत शांतीचे संबंध टिकवून ठेवायला पुढाकार घेतो, तेव्हा-तेव्हा आपण आध्यात्मिक नंदनवनाची सुंदरता आणखी वाढवत असतो. या आध्यात्मिक नंदनवनात राहत असलेल्या प्रत्येकाला यहोवाने खऱ्‍या उपासनेकडे आकर्षित केलं आहे, हे आपण नेहमी लक्षात ठेवतो. (योहा. ६:४४) यहोवाच्या नजरेत त्याचा प्रत्येक सेवक खूप मौल्यवान आहे. त्यामुळे जेव्हा आपण यहोवाच्या या मौल्यवान सेवकांसोबत म्हणजेच आपल्या भाऊबहिणींसोबत शांती आणि एकता टिकवून ठेवण्यासाठी मेहनत घेतो, तेव्हा हे पाहून यहोवाला किती आनंद होत असेल याची कल्पना करा! (यश. २६:३; हाग्ग. २:७) यहोवा त्याच्या सेवकांना भरपूर आशीर्वाद देतो. मग आपण या आशीर्वादांचा पूर्ण फायदा कसा घेऊ शकतो? यासाठी आपण बायबलमध्ये जे काही वाचतो, त्यावर खोलवर विचार केला पाहिजे. अशा प्रकारे अभ्यास आणि मनन केल्यामुळे आपल्यामध्ये ख्रिस्ती गुण विकसित होतील. आणि यामुळे आपल्याला मंडळीत सर्वांवर ‘भावाभावांसारखं प्रेम करून एकमेकांबद्दल आपुलकी बाळगता येईल.’​—रोम. १२:१०. टेहळणी बुरूज२२.११ १२-१३ ¶१६-१८

गुरुवार, ७ नोव्हेंबर

मी त्यांचे अपराध माफ करीन, आणि त्यांची पापं पुन्हा कधीच लक्षात ठेवणार नाही.​—यिर्म. ३१:३४.

यहोवाने आपल्याला माफ केलंय ही गोष्ट आपण जेव्हा मान्य करतो, तेव्हा आपल्याला “तजेला” मिळतो. याचा अर्थ, आपलं मन हलकं होतं, आपल्याला मनाची शांती मिळते आणि आपण पुन्हा शुद्ध विवेकाने यहोवाची उपासना करू शकतो. आणि हे फक्‍त तेव्हाच होतं जेव्हा आपल्याला “खुद्द यहोवाकडून” माफी मिळते. (प्रे. कार्यं ३:१९) आपल्याला माफ केल्यावर यहोवा पुन्हा एकदा आपल्याला मित्र म्हणून स्वीकारतो आणि जणू काही आपण ते पाप कधीच केलं नव्हतं अशा प्रकारे तो आपल्याशी वागतो. एकदा का यहोवाने आपल्याला माफ केलं, की मग तो पुन्हा कधीही आपल्याला त्या पापासाठी दोषी ठरवत नाही किंवा शिक्षा देत नाही. (यश. ४३:२५) बायबल म्हणतं की, “पश्‍चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितकेच त्याने आपले अपराध आपल्यापासून दूर केले आहेत.” (स्तो. १०३:१२) यहोवा आपल्याला किती मोठ्या मनाने माफ करतो, याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपलं मन भरून येतं. यहोवा किती महान आहे आणि आपल्यावर त्याचं किती प्रेम आहे, याची आपल्याला जाणीव होते. (स्तो. १३०:४) यहोवा आपला निर्माणकर्ता, आपल्याला नियम देणारा आणि आपला न्यायाधीश आहे आणि त्याला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. त्याच्यापासून काहीही लपलेलं नाही. आणि न्याय करताना तो या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच न्याय करतो. एखाद्याला माफ करायचं की नाही, हे ठरवताना त्याने केलेलं पाप लहान आहे की मोठं हे यहोवा पाहत नाही. टेहळणी बुरूज२२.०६ ५ ¶१२-१४

शुक्रवार, ८ नोव्हेंबर

देवाजवळ येणाऱ्‍याने ही खातरी बाळगली पाहिजे, की तो अस्तित्वात आहे आणि त्याचा मनापासून शोध घेणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देतो.​—इब्री ११:६.

यहोवावर प्रेम करणाऱ्‍या सर्वांना त्याने एक खूप सुंदर आशा दिली आहे. लवकरच तो आजार, दुःख आणि मृत्यू या गोष्टी कायमच्या काढून टाकणार आहे. (प्रकटी. २१:३, ४) तसंच त्याच्यावर आशा ठेवणारे “नम्र लोक” त्याच्या मदतीने या पृथ्वीला एक सुंदर नंदनवन बनवतील. (स्तो. ३७:९-११) आणि त्या वेळी आपल्या प्रत्येकाचं यहोवासोबत एक खूप जवळचं नातं असेल. आज आपलं त्याच्याशी जे नातं आहे त्यापेक्षाही जवळचं आणि मजबूत ते नातं असेल. खरंच यहोवाने आपल्याला किती सुंदर आशा दिली आहे! पण यहोवाने वचन दिलेल्या या सर्व गोष्टी खरंच घडतील असं आपण का म्हणू शकतो? कारण तो दिलेलं वचन कधीच मोडत नाही. आणि म्हणूनच आपण ‘यहोवावर आशा ठेवू शकतो.’ (स्तो. २७:१४) तो जोपर्यंत त्याचा उद्देश पूर्ण करत नाही तोपर्यंत धीराने आणि आनंदाने त्याची वाट पाहत राहण्याद्वारे आपण दाखवतो की आपण खरंच त्याच्यावर आशा ठेवत आहोत. (यश. ५५:१०, ११) आपण शेवटपर्यंत एकनिष्ठ राहायचा निश्‍चय करू या. कारण आपल्याला ही खातरी आहे, की “त्याचा मनापासून शोध घेणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देतो.” टेहळणी बुरूज२२.०६ २० ¶१; २५ ¶१८

शनिवार, ९ नोव्हेंबर

तुम्हाला कशाची गरज आहे हे तुम्ही मागायच्या आधीच तुमच्या पित्याला माहीत असतं.​—मत्त. ६:८.

आपण ही खातरी बाळगू शकतो, की १ तीमथ्य ५:८ मध्ये यहोवाने ख्रिस्ती कुटुंबप्रमुखासाठी जे तत्त्व दिलंय, त्याप्रमाणे तो स्वतःसुद्धा नक्कीच वागेल. यहोवाचं आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर प्रेम आहे याची जर आपल्याला खातरी असेल, तर तो आपल्या गरजा नक्की पुरवेल या गोष्टीवर भरवसा ठेवायला आपल्याला कठीण जाणार नाही. (मत्त. ६:३१-३३) आपल्या गरजा पूर्ण करायची यहोवाला खरंच इच्छा आहे, आणि तो एक प्रेमळ आणि उदार देव आहे. विचार करा, यहोवाने जेव्हा पृथ्वी बनवली तेव्हा त्याने जीवनासाठी आवश्‍यक असणाऱ्‍या गोष्टीच पुरवल्या नाहीत तर, जीवनाचा आनंद घेता येईल अशा गोष्टीसुद्धा पुरवल्या. (उत्प. २:९) शिवाय, कधीकधी आपल्याकडे फक्‍त मूलभूत गरजा भागवण्यापुरतं जरी असलं, तरी ते यहोवामुळेच मिळतंय या गोष्टीचीसुद्धा आपण जाणीव ठेवली पाहिजे. (मत्त. ६:११) आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की यहोवा भविष्यात आपल्याला जे आशीर्वाद देणार आहे त्याच्या तुलनेत आज आपण जे त्याग करतोय ते काहीच नाहीत. इतकंच काय तर तो आपल्याला सर्वकाळाचं जीवनसुद्धा देईल.​—यश. ६५:२१, २२. टेहळणी बुरूज२२.०६ १५ ¶७-८

रविवार, १० नोव्हेंबर

जड अन्‍न हे प्रौढ लोकांसाठी आहे.​—इब्री ५:१४.

फक्‍त नवीन लोकांनाच यहोवाबद्दल आणि बायबलबद्दल सखोल ज्ञान घ्यायची गरज आहे असं नाही, तर आपल्या सगळ्यांनाच या ज्ञानाची गरज आहे. प्रेषित पौलने म्हटलं: की या ज्ञानामुळे आपल्याला ‘चांगलं आणि वाईट यांतला फरक ओळखायला’ मदत होते. या कठीण काळात जगाची नैतिक मूल्य अगदी खालच्या थराला गेली आहेत. त्यामुळे यहोवाच्या स्तरांप्रमाणे वागायला आपल्याला कठीण जाऊ शकतं. पण यासाठी लागणारी ताकद आपल्याला मिळावी म्हणून येशू नियमितपणे आपल्याला आध्यात्मिक अन्‍न पुरवतो. हे आध्यात्मिक अन्‍न देवाच्या प्रेरित वचनावर, बायबलवर आधारीत आहे. येशूप्रमाणे आपणसुद्धा देवाच्या नावाला जो आदर दिला पाहिजे तो दिलाय. (योहा. १७:६, २६) उदाहरणार्थ, १९३१ मध्ये आपण शास्त्रवचनामध्ये दिलेलं ‘यहोवाचे साक्षीदार’ हे नाव स्वीकारलं. असं करून देवाचं हे नाव आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि त्याच्या नावाने ओळखलं जाण्याची आपली किती इच्छा आहे, हे आपण दाखवून दिलं. (यश. ४३:१०-१२) यासोबतच नवे जग भाषांतर यात जिथे-जिथे देवाचं नाव असलं पाहिजे तिथे टाकण्यात आलंय. टेहळणी बुरूज२२.०७ ११ ¶११-१२

सोमवार, ११ नोव्हेंबर

तुझे शब्द माझ्या पायांसाठी दिव्यासारखे, आणि माझ्या मार्गासाठी प्रकाशासारखे आहेत!​—स्तो. ११९:१०५.

बायबलमधून आपण देवाच्या राज्याबद्दलचं सत्य शिकलो आहोत. येशूने या सत्याची तुलना लपवून ठेवलेल्या एका खजिन्याशी केली. मत्तय १३:४४ मध्ये आपण त्याबद्दल वाचतो. येशू म्हणाला, “स्वर्गाचं राज्य शेतात लपवलेल्या अशा खजिन्यासारखं आहे, जो एका माणसाला सापडला आणि त्याने तो लपवून ठेवला. त्याला इतका आनंद झाला, की त्याने जाऊन आपल्याजवळ असलेलं सगळं काही विकलं आणि ते शेत विकत घेतलं.” इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, की तो माणूस खजिना शोधत नव्हता. पण जेव्हा त्याला तो सापडला तेव्हा तो मिळवण्यासाठी त्याने आपल्याजवळ असलेलं सगळं काही विकून टाकलं. त्याने असं का केलं? कारण त्या खजिन्याचं मोल त्याने ओळखलं होतं. आज यहोवाच्या सेवेतून आपल्याला जो आनंद मिळतो, आणि भविष्यात त्याच्या राज्यात कायमचं जीवन जगायची जी आशा आपल्याला आहे, ती खरंच खूप मौल्यवान आहे. जगातल्या कोणत्याही गोष्टीची तुलना याच्याशी होऊ शकत नाही. यहोवासोबत एक जवळचं नातं असणं हा इतका मोठा बहुमान आहे, की त्यासाठी आपण कोणताही त्याग करायला तयार आहोत. यहोवाचं मन आनंदित करण्यापेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट आपल्यासाठी जास्त महत्त्वाची नाही.​—कलस्सै. १:१०. टेहळणी बुरूज२२.०८ १५ ¶८-९; १७ ¶१२

मंगळवार, १२ नोव्हेंबर

इतकं मोठं वाईट काम करून मी देवाविरुद्ध पाप कसं करू?​—उत्प. ३९:९.

मोशेच्या नियमशास्त्रात अशी आज्ञा होती, की “व्यभिचार करू नका.” (निर्ग. २०:१४) पण मोशेचं नियमशास्त्र योसेफच्या काळाच्या दोनशे वर्षांनंतर देण्यात आलं. मग व्यभिचार देवाच्या नजरेत खूप “वाईट काम” आहे हे योसेफला कसं कळलं? योसेफ यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखत होता. त्यामुळे अशा अनैतिक कामाबद्दल यहोवाला कसं वाटेल हे तो समजू शकत होता. उदाहरणार्थ, योसेफला हे माहीत होतं की विवाहाची सुरुवात यहोवाने केली आहे. आणि विवाह फक्‍त एक पुरूष आणि एक स्त्रीमधेच झाला पाहिजे अशी त्याची इच्छा आहे. तसंच दोन वेळा जेव्हा त्याची पणजी सारा हिची अब्रू धोक्यात होती, तेव्हा यहोवाने तिला कसं वाचवलं हेही त्याने ऐकलं असेल. (उत्प. २:२४; १२:१४-२०; २०:२-७) या सर्व गोष्टींवर विचार केल्यानंतर देवाच्या नजरेत योग्य काय आणि अयोग्य काय हे योसेफला समजलं असेल. योसेफचं यहोवा देवावर प्रेम असल्यामुळे त्याच्या नीतिमान स्तरांवरही त्याचं प्रेम होतं आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत या स्तरांच्या विरोधात वागायचं नव्हतं. टेहळणी बुरूज२२.०८ २६ ¶१-२

बुधवार, १३ नोव्हेंबर

पृथ्वीच्या मातीत झोपलेले अनेक जण उठतील; काही सर्वकाळाच्या जीवनासाठी.​—दानी. १२:२.

पूर्वी आपण असं मानायचो की हे शब्द १९१८ मध्ये विरोधकांनी आपलं प्रचाराचं काम जवळजवळ ठप्प पाडल्यानंतर ते पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलं, त्याला ते सूचित करत असावेत. पण येणाऱ्‍या नवीन जगात मेलेल्यांचं जे पुनरुत्थान होईल त्याला हे शब्द सूचित करतात. आपण असं का म्हणू शकतो? दानीएल १२:२ मध्ये ज्या मूळ भाषेतल्या शब्दाचं ‘माती’ असं भाषांतर करण्यात आलंय, त्याच शब्दासाठी ईयोब १७:१६ मध्ये ‘धूळ’ असा शब्द वापरण्यात आलाय. आणि ईयोब १७:१६ या वचनाचा संदर्भ लक्षात घेतला तर आपल्याला कळतं, की हा शब्द ‘कबरेला’ सूचित करतो. यावरून आपण म्हणू शकतो की दानीएल १२:२ मध्ये खरोखरच्या पुनरुत्थानाबद्दल सांगण्यात आलंय. हे पुनरुत्थान शेवटचा काळ संपल्यानंतर आणि हर्मगिदोनच्या लढाईनंतर पृथ्वीवर होईल. दानीएल १२:२ मध्ये म्हटलंय की काही जण “सर्वकाळाच्या जीवनासाठी” उठतील. याचा काय अर्थ होतो? याचा असा अर्थ होतो की जे लोक १,००० वर्षांच्या काळादरम्यान अचूक ज्ञान घेत राहतील आणि यहोवाच्या आणि येशूच्या आज्ञांप्रमाणे वागत राहतील त्यांना शेवटी सर्वकाळाचं जीवन मिळेल.​—योहा. १७:३. टेहळणी बुरूज२२.०९ २१ ¶६-७

गुरुवार, १४ नोव्हेंबर

[प्रेम] सगळ्या गोष्टींवर भरवसा ठेवायला तयार असतं.​—१ करिंथ. १३:७.

याचा अर्थ असा होता नाही की आपण डोळे झाकून कोणावरही विश्‍वास ठेवावा अशी यहोवा अपेक्षा करतो. उलट त्यांनी भरवशालायक असल्याचं दाखवून दिल्यामुळे आपण त्यांच्यावर भरवसा ठेवावा असं त्याला वाटतं. सहसा कोणावरही भरवसा ठेवायला वेळ लागतो. मग आपण आपल्या भाऊबहिणींवर आपला भरवसा कसा वाढवू शकतो? त्यांना चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. तुम्ही सभांना जाता तेव्हा त्यांच्याशी बोला. त्यांच्यासोबत प्रचार करा. त्यांच्यासोबत सहनशीलतेने वागा आणि ते भरवशालायक आहेत हे दाखवायची त्यांना संधी द्या. सुरवातीला कदाचित आपण त्यांना आपल्या वैयक्‍तिक गोष्टी सांगणार नाही. पण जसजशी त्यांच्यासोबतची आपली मैत्री वाढत जाते तसतसं आपण त्यांच्याशी आणखी मनमोकळेपणाने बोलू शकतो. (लूक १६:१०) पण एखाद्या भावाने किंवा बहिणीने तुमचा भरवसा तोडला तर काय? लगेच त्याच्यासोबत मैत्री तोडू नका तर त्याला वेळ द्या. आणि फक्‍त काही जणांच्या चुकांमुळे निराश होऊन सगळया भाऊबहिणींवर भरवसा ठेवायचं सोडू नका. टेहळणी बुरूज२२.०९ ४ ¶७-८

शुक्रवार, १५ नोव्हेंबर

[यहोवाची] नजर संपूर्ण पृथ्वीवर असते.​—२ इति. १६:९.

मिकेयास वडील म्हणून सेवा करत होते. ते सांगतात की एकदा काही जबाबदार बांधव त्यांच्याशी कठोरपणे वागले असं त्यांना वाटलं. असं असलं तरी ते योग्यपणे विचार करत राहिले आणि त्यांनी आपल्या भावनांवर ताबा ठेवायचा प्रयत्न केला. ते सतत यहोवाला प्रार्थना करायचे आणि या समस्येचा सामना करायला त्याने आपल्याला पवित्र शक्‍ती द्यावी अशी त्याला विनंती करत राहायचे. तसंच त्यांना मदत करू शकतील असे लेखसुद्धा त्यांनी आपल्या प्रकाशनांमधून शोधून काढले. यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? मंडळीतलं कोणी तुमच्याशी चुकीचं वागलं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर शांत राहायचा प्रयत्न करा आणि चुकीच्या विचारांना मनात थारा देऊ नका. ती व्यक्‍ती नेमक्या कोणत्या परिस्थितीमुळे तसं वागली किंवा बोलली हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. म्हणून तुम्हाला कसं वाटतंय हे प्रार्थनेत यहोवाला सांगा आणि त्या व्यक्‍तीच्या दृष्टिकोनातून या समस्येकडे पाहण्यासाठी त्याला मदत मागा. त्या भावाचा किंवा बहिणीचा मुळात तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता असा विचार करा आणि त्यांना क्षमा करायचा प्रयत्न करा. (नीति. १९:११) यहोवाला तुमच्या परिस्थितीची जाणीव आहे हे विसरू नका. तो तुम्हाला या समस्येचा सामना करायला नक्कीच ताकद देईल.​—उप. ५:८. टेहळणी बुरूज२२.११ २१ ¶५

शनिवार, १६ नोव्हेंबर

ढोंगी लोकांपासून मी दूर राहतो.​—स्तो. २६:४.

यहोवावर प्रेम करणारे मित्र निवडा. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर यहोवाच्या सेवेत प्रगती करायची असेल, तर चांगले मित्र निवडणं खूप गरजेचं आहे. (नीति. १३:२०) वडील म्हणून सेवा करणारा ज्युलियन नावाचा एक भाऊ म्हणतो: “मी लहान होतो तेव्हा वेगवेगळ्या भाऊबहिणींसोबत प्रचार करायचो. आणि यामुळे माझी त्यांच्याशी चांगली मैत्री झाली. हे भाऊबहीण खूप आवेशी होते. आणि प्रचारकार्य केल्यामुळे किती आनंद मिळतो, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळालं. . . . आधी मी फक्‍त माझ्याच वयाच्या लोकांशी मैत्री करायचो. पण नंतर मला जाणवलं, की मोठ्या लोकांशीसुद्धा आपली चांगली मैत्री होऊ शकते.” मंडळीमध्ये एखाद्या व्यक्‍तीसोबत जास्त वेळ घालवल्यामुळे यहोवासोबतचं तुमचं नातं बिघडू शकतं असं जर तुम्हाला जाणवलं तर तुम्ही काय केलं पाहिजे? पहिल्या शतकात ख्रिस्ती मंडळीमध्ये असे काही जण होते. त्यांचे विचार आणि त्यांची वागणूक देवाच्या सेवकांना शोभणारी नव्हती. आणि म्हणूनच पौलने तीमथ्यला त्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. (२ तीम. २:२०-२२) यहोवासोबतची मैत्री आपल्यासाठी खूप मौल्यवान आहे. ही मैत्री जोडण्यासाठी आपण आत्तापर्यंत खूप मेहनत घेतली आहे. आणि म्हणून कोणत्याही व्यक्‍तीमुळे आपलं हे नातं बिघडणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. टेहळणी बुरूज२२.०८ ५-६ ¶१३-१५

रविवार, १७ नोव्हेंबर

मूर्ख माणसापासून दूर राहा.​—नीति. १४:७.

देवाकडून मिळणारी बुद्धी नाकारणाऱ्‍या मूर्ख लोकांपेक्षा आपण फार वेगळे आहोत. आपण यहोवाच्या मार्गांवर आणि त्याच्या नैतिक स्तरांवर प्रेम करतो. आपल्याला हे प्रेम कसं वाढवता येईल बरं? देवाच्या आज्ञा पाळण्याचा आणि न पाळण्याचा काय परिणाम होतो याची तुलना करून आपण हे करू शकतो. लोक जेव्हा देवाकडून मिळणाऱ्‍या सुज्ञ सल्ल्याकडे दुर्लक्ष करण्याचा मूर्खपणा करतात, तेव्हा ते स्वतःवर किती समस्या ओढवून घेतात याचा विचार करा. आणि मग, देवाचा सल्ला ऐकल्याल्यामुळे तुमचं जीवन किती सुंदर झालं आहे याचा विचार करा. (स्तो. ३२:८, १०) यहोवा प्रेमाने सगळ्यांना खरी बुद्धी देतो. पण ती स्वीकारायची जबरदस्ती तो कोणालाही करत नाही. जे त्याच्या सुज्ञ सल्ल्याप्रमाणे चालत नाहीत त्यांचं काय होईल हे मात्र तो सांगतो. (नीति. १:२९-३२) तो म्हणतो: “त्यांना त्यांच्या वागणुकीचे परिणाम भोगावे लागतील.” ते सध्या ज्या प्रकारे जीवन जगतात त्यामुळे पुढे त्यांना खूप त्रास आणि दुःख सहन करावं लागेल. आणि शेवटी येणाऱ्‍या नाशातून ते वाचणार नाहीत. याउलट, जे देवाचा सुज्ञ सल्ला स्वीकारतात आणि त्याप्रमाणे चालतात त्यांना तो असं वचन देतो, “जो माझं ऐकतो तो सुरक्षित राहील आणि त्याला संकटाची भीती सतावणार नाही.”​—नीति. १:३३. टेहळणी बुरूज२२.१० २१ ¶११-१३

सोमवार, १८ नोव्हेंबर

जो कोणी यहोवाची भीती बाळगतो, जो त्याच्या मार्गांनी चालतो, तो सुखी आहे!​—स्तो. १२८:१.

यहोवाबद्दल आपल्या मनात खूप आदर असल्यामुळे जेव्हा आपण त्याला न आवडणारी कोणतीही गोष्ट करायचं टाळतो, तेव्हा त्यालाच यहोवाची भीती बाळगणं असं म्हटलंय. (नीति. १६:६) बायबलमध्ये योग्य काय आणि अयोग्य काय याबद्दल देवाचे स्तर देण्यात आले आहेत. म्हणून आपण या स्तरांप्रमाणे चालायचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे. (२ करिंथ. ७:१) जर आपण यहोवाला आवडणाऱ्‍या गोष्टी करत राहिलो आणि त्याला न आवडणाऱ्‍या गोष्टींचा द्वेष केला तर आपण आनंदी राहू. (स्तो. ३७:२७; ९७:१०; रोम. १२:९) बरोबर काय आणि चुकीचं काय हे ठरवण्याचा अधिकार यहोवाला आहे हे कदाचित एखाद्याला माहीत असेल. पण त्याने ते स्वीकारलं पाहिजे आणि त्याचं पालन केलं पाहिजे. (रोम. १२:२) आपण ज्या प्रकारे जीवन जगतो त्यावरून आपण हे दाखवू शकतो, की यहोवाचे स्तर मानणं हाच जीवन जगण्याचा चांगला मार्ग आहे. (नीति. १२:२८) दावीदलाही असंच वाटत होतं, म्हणून त्याने म्हटलं: “तू मला जीवनाचा मार्ग दाखवतोस. तुझ्या सहवासात अमाप सुख आहे; तुझ्या उजव्या हाताला सर्वकाळाचा आनंद आहे.”​—स्तो. १६:११. टेहळणी बुरूज२२.१० ८ ¶९-१०

मंगळवार, १९ नोव्हेंबर

मुलगा स्वतःच्या मनाने एकही गोष्ट करू शकत नाही. तर, जे काही तो पित्याला करताना पाहतो तेच तो करतो.​—योहा. ५:१९.

येशूने नेहमीच स्वतःबद्दल योग्य आणि नम्र दृष्टिकोन ठेवला. पृथ्वीवर येण्याआधी त्याने यहोवाच्या सेवेत बरीच अद्‌भुत कार्यं केली. त्याच्याद्वारेच, “स्वर्गात आणि पृथ्वीवर, इतर सगळ्या . . . गोष्टी निर्माण करण्यात आल्या.” (कलस्सै. १:१६) त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी कदाचित त्याला आपल्या पित्यासोबत मिळून केलेल्या त्या सगळ्या गोष्टी आठवल्या असतील. (मत्त. ३:१६; योहा. १७:५) पण यामुळे येशू गर्विष्ठ बनला नाही. आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत असं त्याने कधीच दाखवलं नाही. उलट, त्याने आपल्या शिष्यांना सांगितलं, की तो पृथ्वीवर “सेवा करून घ्यायला नाही, तर सेवा करायला आणि बऱ्‍याच जणांच्या मोबदल्यात आपलं जीवन खंडणी म्हणून द्यायला आलाय.” (मत्त. २०:२८) तसंच, त्याने नम्रपणे कबूल केलं, की तो स्वतःच्या मनाने एकही गोष्ट करू शकत नाही. खरंच, येशू किती नम्र होता! त्याने आपल्यासाठी एक चांगलं उदाहरण मांडलं आहे. टेहळणी बुरूज२२.०५ २४ ¶१३

बुधवार, २० नोव्हेंबर

त्याने यहोवाकडे परत यावं.​—यश. ५५:७.

एखाद्याला माफ करायचं की नाही, हे ठरवताना सगळ्यात आधी यहोवा हे पाहतो, की आपण चूक करत आहोत हे त्या व्यक्‍तीला माहीत होतं का? येशूनेही ही गोष्ट लूक १२:४७, ४८ या वचनांमध्ये स्पष्ट केली. जो जाणूनबुजून एखादी वाईट गोष्ट करतो, तो एक गंभीर पाप करतो. कारण आपण जे करतोय ते चुकीचं आहे आणि ते यहोवाला आवडणार नाही हे माहीत असूनसुद्धा तो वाईट काम करतो. अशा व्यक्‍तीला कदाचित यहोवा माफ करणार नाही. (मार्क ३:२९; योहा. ९:४१) मग यहोवा तिला माफ करण्याची काही शक्यता आहे का? हो! कारण एखाद्याला माफ करायचं की नाही हे ठरवताना यहोवा आणखी एक गोष्ट पाहतो. ती म्हणजे चूक केलेल्या व्यक्‍तीला मनापासून पश्‍चात्ताप झालाय का? पश्‍चात्ताप करणं म्हणजे “आपल्या विचारांत आणि मनोवृत्तीत बदल करणं.” तसंच आपल्या हातून ज्या वाईट गोष्टी झाल्या आहेत किंवा ज्या चांगल्या गोष्टी आपण केल्या नाहीत त्याबद्दल मनापासून वाईट वाटणं. पश्‍चात्ताप करणाऱ्‍या व्यक्‍तीला फक्‍त आपल्या चुकांबद्दलच वाईट वाटत नाही, तर आपण यहोवासोबतचं आपलं नातं इतकं कमजोर होऊ दिलं आणि त्यामुळे आपल्या हातून या चुका झाल्या आहेत, याचंही त्याला खूप वाईट वाटतं. टेहळणी बुरूज२२.०६ ५-६ ¶१५-१७

गुरुवार, २१ नोव्हेंबर

ख्रिस्त येशूमध्ये देवाची भक्‍ती करत जीवन जगू इच्छिणाऱ्‍या सगळ्यांचा छळ केला जाईल.​—२ तीम. ३:१२.

कधीकधी प्रसार माध्यमं आणि सोशल नेटवर्कद्वारे आपले शत्रू यहोवाच्या संघटनेत पुढाकार घेणाऱ्‍या बांधवांबद्दल खोटी माहिती किंवा अफवा पसरवतात. (स्तो. ३१:१३) काही बांधवांना तर अटक करून गुन्हेगारही ठरवण्यात आलंय. पहिल्या शतकात पौलवर खोटे आरोप लावून त्याला अटक करण्यात आली तेव्हा त्या काळातल्या ख्रिश्‍चनांनाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला. प्रेषित पौल रोममध्ये कैदेत होता तेव्हा काही ख्रिस्ती बांधवांनी त्याला मदत करायचं सोडून दिलं. (२ तीम. १:८, १५; २:८, ९) त्यांच्या अशा वागण्यामुळे पौलला कसं वाटलं असेल याची आपण कल्पना करू शकतो. या बांधवांसाठी पौलने बऱ्‍याच कठीण समस्यांना तोंड दिलं होतं. आणि त्यांच्यासाठी स्वतःचा जीवसुद्धा धोक्यात घातला होता. (प्रे. कार्यं २०:१८-२१; २ करिंथ. १:८) पण पौलला नेमकी त्यांच्या मदतीची गरज होती तेव्हा त्यांनी त्याला सोडून दिलं. आपण त्या बांधवांसारखं कधीही होऊ नये! त्यामुळे आज सैतान यहोवाच्या संघटनेतल्या जबाबदार बांधवांना आपला खास निशाणा बनवतो, याचं आपल्याला आश्‍चर्य वाटू नये. या बांधवाचा छळ केल्यामुळे त्यांनी यहोवाला सोडून द्यावं आणि इतर भाऊबहिणींनीही घाबरून जावं अशी सैतानाची इच्छा आहे. (१ पेत्र ५:८) त्यामुळे आपल्या बांधवांना मदत करत राहा आणि सतत त्यांच्या पाठीशी उभे राहा.​—२ तीम. १:१६-१८. टेहळणी बुरूज२२.११ १६-१७ ¶८-११

शुक्रवार, २२ नोव्हेंबर

तुला देवाची जराही भीती वाटत नाही का?​—लूक २३:४०.

वधस्तंभावर येशूच्या बाजूला असलेला पश्‍चात्तापी गुन्हेगार कदाचित यहुदी असावा. यहुदी लोक एकाच देवाची उपासना करायचे पण त्या काळात विदेशी लोक मात्र अनेक देवांची उपासना करायचे. (निर्ग. २०:२, ३; १ करिंथ. ८:५, ६) जर तो गुन्हेगार विदेशी असता तर आजच्या वचनातला प्रश्‍न असा असला असता, की “तुला देवांची जराही भीती वाटत नाही का?” शिवाय येशूला विदेश्‍यांसाठी नाही तर ‘इस्राएलच्या घराण्याच्या हरवलेल्या मेंढरांसाठी’ पाठवण्यात आलं होतं. (मत्त. १५:२४) शिवाय, देवाने इस्राएली लोकांना सांगितलं होतं, की तो मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत करेल. ही गोष्ट त्या पश्‍चात्तापी गुन्हेगारालाही माहीत असावी. त्याला कदाचित असं वाटत होतं, की देव त्याच्या राज्यात राज्य करण्यासाठी येशूला पुन्हा जिवंत करेल. ही गोष्ट त्याने येशूला जे म्हटलं त्यावरून दिसून येते. शिवाय देव आपल्यालाही जिवंत करेल अशी त्याला आशा होती. यहुदी असल्यामुळे त्या पश्‍चात्तापी गुन्हेगाराला आदाम आणि हव्वा यांच्याबद्दल माहीत असावं. त्यामुळे येशू लूक २३:४३ मध्ये जेव्हा नंदनवनाबद्दल बोलला तेव्हा तो या पृथ्वीवर येणाऱ्‍या सुंदर परिस्थितीबद्दल बोलत असावा हे त्या गुन्हेगाराने ओळखलं असेल.​—उत्पत्ती २:१५. टेहळणी बुरूज२२.१२ ८-९ ¶२-३

शनिवार, २३ नोव्हेंबर

ते सगळे सतत एकदिलाने प्रार्थना करत राहिले.​—प्रे. कार्यं १:१४.

आज आपण यहोवाच्या पवित्र शक्‍तीच्या मदतीनेच आपलं प्रचाराचं काम करू शकतो. आपण असं का म्हणतो? विचार करा, आपलं हे काम थांबवण्यासाठी सैतान आपल्याविरुद्ध लढत आहे. (प्रकटी. १२:१७) मानवी दृष्टिकोनातून पाहिलं तर सैतान इतका शक्‍तिशाली आहे की आपण त्याचा सामना करूच शकत नाही. पण आपल्या प्रचाराच्या कामाने आपण त्याच्यावर विजय मिळवत आहोत. (प्रकटी. १२:९-११) तो कसा? आपण प्रचार करतो तेव्हा आपण हे दाखवतो, की आपण सैतानाच्या धमक्यांना घाबरत नाही. जेव्हा-जेव्हा आपण प्रचाराला जातो तेव्हा एका अर्थाने आपण सैतानाला हरवतो. यावरून हेच दिसून येतं की पवित्र शक्‍ती आपल्याला बळ देते आणि आपल्या कामाने यहोवा खूश आहे. (मत्त. ५:१०-१२; १ पेत्र ४:१४) आपलं प्रचाराचं काम करताना कुठल्याही प्रकारची परीक्षा आली तरी तिच्यावर मात करायला देवाची पवित्र शक्‍ती आपल्याला मदत करेल. (२ करिंथ. ४:७-९) मग देवाची पवित्र शक्‍ती आपल्याला मिळत राहावी म्हणून आपण काय करू शकतो? कुठल्याही प्रकारची समस्या आली तरी आपण सतत प्रार्थना केली पाहिजे. आणि हा भरवसा ठेवला पाहिजे की यहोवा आपल्या प्रार्थना नक्की ऐकेल. टेहळणी बुरूज२२.११ ५ ¶१०-११

रविवार, २४ नोव्हेंबर

बांधवांनो, आम्ही तुम्हाला अशीही विनंती करतो, की जे शिस्तीने वागत नाहीत त्यांना ताकीद द्या, निराश झालेल्यांचं सांत्वन करा, दुर्बळांना आधार द्या आणि सर्वांशी सहनशीलतेने वागा.​—१ थेस्सलनी. ५:१४.

भाऊबहिणींवर आपलं प्रेम आहे हे दाखवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे, त्यांच्यासोबत चांगले नातेसंबंध ठेवणं. यहोवासारखं आपण त्यांना मोठ्या मनाने माफ केलं पाहिजे. आपले पाप माफ करण्यासाठी जर यहोवाने स्वतःच्या मुलाला दिलं, तर मग आपले भाऊबहीण चुकतात तेव्हा आपणही त्यांना मोठ्या मनाने माफ करू नये का? येशूने सांगितलेल्या दुष्ट दासासारखं आपल्याला व्हायचं नाही. त्याच्या मालकाने त्याचं खूप मोठं कर्ज माफ केलं होतं. पण हा दास मात्र दुसऱ्‍या दासाचं एक छोटंसं कर्ज माफ करायला तयार नव्हता. (मत्त. १८:२३-३५) मंडळीत कोणाबद्दल तुमच्या मनात काही गैरसमज असेल, तर स्मारकविधीच्या आधी तो दूर करण्यासाठी आणि पुन्हा चांगले संबंध जोडण्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊ शकता का? (मत्त. ५:२३, २४) तुम्ही जर असं केलं, तर यहोवा आणि येशूबद्दल तुमच्या मनात किती प्रेम आहे हे दिसून येईल. टेहळणी बुरूज२३.०१ २९ ¶८-९

सोमवार, २५ नोव्हेंबर

जो गोरगरिबांना मदत करतो, तो यहोवाला उसनं देतो.​—नीति. १९:१७.

आपल्या भाऊबहिणींना कशाची गरज आहे हे जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे, त्यांना अवघडल्यासारखं किंवा वाईट वाटणार नाही अशा प्रकारे प्रश्‍न विचारणं. (नीति. २०:५) तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींबद्दल त्यांना विचारू शकता. जसं की त्यांच्याजवळ खाण्यापिण्याच्या वस्तू, औषधं, आणि गरजेचं सामान आहे का? त्यांना आपली नोकरी जाण्याची भीती आहे का? घरभाडं देण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत का? शासनाने केलेल्या तरतुदींचा फायदा घेण्यासाठी त्यांना मदत हवी आहे का? आपण सर्वांनीही एकमेकांना प्रोत्साहन द्यावं आणि एकमेकांना मदत करावी असं यहोवाला वाटतं. (गलती. ६:१०) आपण केलेल्या छोट्या गोष्टींमुळेसुद्धा आजारी असलेल्या भावाला किंवा बहिणीला प्रोत्साहन मिळू शकतं. जसं की, प्रोत्साहन मिळेल म्हणून लहान मुलं त्यांना एखादं कार्ड किंवा चित्र काढून पाठवू शकतात. तरुण भाऊबहीण त्यांना काही गोष्टी खरेदी करून आणायला मदत करू शकतात. किंवा त्यांचं एखादं बाहेरचं काम करून देऊ शकतात. इतर जण कदाचित आजारी असलेल्यांसाठी जेवण तयार करू शकतात. महामारीदरम्यान त्यांचं काम आणखी वाढतं. म्हणून काही भाऊबहिणींनी त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांना मेसेज केलाय किंवा कार्ड पाठवलंय. तर चला आपणसुद्धा अशा प्रकारे एकमेकांना प्रोत्साहन देऊ या आणि एकमेकांना बळकट करत राहू या!​—१ थेस्सलनी. ५:११. टेहळणी बुरूज२२.१२ २२ ¶२; २३ ¶५, ६

मंगळवार, २६ नोव्हेंबर

तुमचा खूप मोठा गैरसमज झालाय.​—मार्क १२:२७.

सदूकी लोकांना हिब्रू शास्त्रवचनांतली पहिली पाच पुस्तकं खूप चांगली माहीत होती. पण देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या या पुस्तकांत असलेल्या महत्त्वाच्या शिकवणी मात्र ते स्वीकारत नव्हते. उदाहरणार्थ, ते पुनरुत्थानावर विश्‍वास ठेवत नव्हते. त्यामुळे त्यांनी मुद्दामहून त्या विषयावर येशूला एक प्रश्‍न विचारला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “मोशेच्या पुस्तकातल्या झुडपाच्या अहवालात तुम्ही वाचलं नाही का? तिथे देव मोशेला म्हणाला: ‘मी अब्राहामचा देव, इसहाकचा देव आणि याकोबचा देव आहे’?” (मार्क १२:१८, २६) सदूकी लोकांनी हा अहवाल नक्कीच बऱ्‍याचदा वाचला असेल. पण येशूच्या प्रश्‍नावरून दिसून आलं, की शास्त्रवचनांतल्या या महत्त्वाच्या शिकवणीकडे, म्हणजेच पुनरुत्थानाच्या शिकवणीकडे सदूकी लोकांनी दुर्लक्ष केलं होतं. (लूक २०:३८) यावरून आपण काय शिकतो? हेच की बायबलमधलं एखादं वचन किंवा अहवाल वाचताना त्यातून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकायला मिळतील याकडे आपलं नेहमी लक्ष असलं पाहिजे. बायबलमध्ये सांगितलेल्या मूलभूत गोष्टी तर आपण समजून घेतोच, पण त्यातल्या शब्दांमागे लपलेली महत्त्वाची सत्यं आणि तत्त्वंही आपण समजून घेतली पाहिजे. टेहळणी बुरूज२३.०२ ११ ¶९-१०

बुधवार, २७ नोव्हेंबर

आपण साक्षीदारांच्या मोठ्या ढगाने वेढलेले [आहोत].​—इब्री १२:१.

आजच्या वचनात सांगितलेल्या सर्व साक्षीदारांना संकटांचा सामना करावा लागला तरी ते आयुष्यभर यहोवाला विश्‍वासू राहिले. (इब्री ११:३६-४०) त्यांनी दाखवलेला धीर आणि त्यांनी घेतलेली मेहनत व्यर्थ होती का? निश्‍चितच नाही! त्यांच्या आयुष्यात त्यांना यहोवाची सगळी वचनं पूर्ण होताना जरी पाहायला मिळाली नाहीत, तरी त्यांनी यहोवावर आशा ठेवायचं सोडलं नाही. आणि यहोवा आपल्यावर खूश आहे, या गोष्टीची खातरी असल्यामुळे त्यांना हा पूर्ण विश्‍वास होता, की यहोवाने दिलेली सगळी वचनं भविष्यात पूर्ण होतील. (इब्री ११:४, ५) या सगळ्या विश्‍वासू सेवकांची उदाहरणं आपल्याला शेवटपर्यंत यहोवावर आशा ठेवायची प्रेरणा देतात. आज जगाची परिस्थिती दिवसेंदिवस आणखी वाईट होत चालली आहे. (२ तीम. ३:१३) आपल्याला माहीत आहे, की सैतान पुढेही देवाच्या लोकांवर परीक्षा आणत राहील. पण येणाऱ्‍या दिवसांत आपल्याला कोणत्याही कठीण परीक्षांचा सामना करावा लागला, तरीसुद्धा आपण यहोवाच्या सेवेत मेहनत घेत राहू या आणि हा विश्‍वास बाळगू या, की आपण एका “जिवंत देवावर आशा ठेवली आहे.”​—१ तीम. ४:१०. टेहळणी बुरूज२२.०६ २५ ¶१७-१८

गुरुवार, २८ नोव्हेंबर

माझा मृत्यू झाला तर काय उपयोग? माती तुझी स्तुती करेल का?​—स्तो. ३०:९.

आपलं आरोग्य जपण्याचं एक कारण म्हणजे आपल्याला आपल्या पूर्ण शक्‍तीने यहोवाची सेवा करायची आहे. (मार्क १२:३०) म्हणून आपल्या आरोग्याला हानिकारक असतील अशा गोष्टींपासून आपण दूर राहतो. (रोम. १२:१) हे खरंय की आपण कधी आजारीच पडणार नाही असं होणार नाही. पण आपलं आरोग्य जपण्यासाठी आपण जमेल ते करतो. कारण आपल्या स्वर्गातल्या पित्याने आपल्याला जे जीवन दिलंय, त्याबद्दल आपल्याला मनापासून कदर आहे. आजारपण आणि वाढत्या वयामुळे आपल्याला कदाचित आधीसारखी यहोवाची सेवा करणं शक्य नसेल. त्यामुळे कदाचित आपल्याला वाईट वाटेल आणि आपण निराश होऊ. पण म्हणून आपण खचून जाऊन आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. का बरं? कारण आपलं कितीही वय झालं किंवा आपण कितीही आजारी असलो तरी आपण दावीद राजाप्रमाणे यहोवाची स्तुती करू शकतो. खरंच, आपण अपरिपूर्ण असूनसुद्धा यहोवा आपली मनापासून कदर करतो, हा विचार किती दिलासा देणारा आहे! (मत्त. १०:२९-३१) आणि जरी आपला मृत्यू झाला तरी यहोवा आपल्याला पुन्हा उठवण्यासाठी आतुर आहे. (ईयो. १४:१४, १५) त्यामुळे आपल्या जिवात जीव आहे तोपर्यंत आपलं आरोग्य आणि आपलं जीवन जपायचा आपण पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. टेहळणी बुरूज२३.०२ २०-२१ ¶३-५

शुक्रवार, २९ नोव्हेंबर

जो पवित्र शक्‍तीविरुद्ध बोलून तिची निंदा करतो, त्याला कधीच क्षमा केली जाणार नाही.​—मार्क ३:२९.

दुसऱ्‍या मेंढरांचा मोठा लोकसमुदाय यांच्यातल्या लोकांची हर्मगिदोनमधून वाचल्यानंतरसुद्धा नावं या जीवनाच्या पुस्तकात राहतील का? हो. (प्रकटी. ७:१४) येशूने म्हटलं होतं, की मेंढरांसारख्या असलेल्या या लोकांना “सर्वकाळाचं जीवन मिळेल.” (मत्त. २५:४६) पण हर्मगिदोन पार केल्यानंतर लगेचच त्यांना सर्वकाळाचं जीवन मिळणार नाही. हजार वर्षांदरम्यान येशू “त्यांना मेंढपाळाप्रमाणे जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍यांकडे घेऊन जाईल.” जे ख्रिस्ताच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालतील, आणि जे शेवटच्या न्यायाच्या वेळी यहोवाला विश्‍वासू आहेत असं दिसून येईल, त्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात कायमसाठी लिहिली जातील. (प्रकटी. ७:१६, १७) पण बकऱ्‍यांसारखे लोकांचा हर्मगिदोनमध्ये नाश होईल. येशूने म्हटलं, की “या लोकांचा सर्वकाळासाठी नाश होईल.” (मत्त. २५:४६) देवाच्या प्रेरणेने प्रेषित पौलने म्हटलं की “या लोकांना सर्वकाळाच्या नाशाची शिक्षा” मिळेल.​—२ थेस्सलनी. १:९; २ पेत्र २:९. टेहळणी बुरूज२२.०९ १६ ¶७-८

शनिवार, ३० नोव्हेंबर

प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते.​—उप. ३:१.

कुटुंबं जेव्हा एकत्र मिळून यहोवाने बनवलेल्या सृष्टीचा आनंद घेतात तेव्हा त्यांना एकमेकांसोबत निवांत वेळ घालवता येतो आणि एकमेकांसोबतचं त्यांचं नातंही घट्ट होतं. यहोवाने अशा बऱ्‍याचशा गोष्टी बनवल्या आहेत, जसं की डोंगरदऱ्‍या, जंगल, समुद्र. आणि आपण जेव्हा कुटुंब मिळून अशा वातावरणात वेळ घालवतो तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो. नवीन जगात पालकांना आपल्या मुलांसोबत कधी नाही इतक्या मोठ्या प्रमाणात यहोवाने बनवलेल्या सृष्टीचा आनंद घेता येईल. त्या वेळी आपल्याला प्राण्यांना घाबरण्याची गरज नसेल आणि तेसुद्धा आपल्याला घाबरणार नाहीत. (यश. ११:६-९) यहोवाने बनवलेल्या सृष्टीचा आनंद घेण्यासाठी आपल्याकडे वेळच वेळ असेल. (स्तो. २२:२६) पण पालकांनो, तोपर्यंत वाट पाहू नका. आत्तापासूनच आपल्या मुलांसोबत सृष्टीचा आनंद घ्या. सृष्टीतल्या गोष्टींचा उपयोग करून तुम्ही जेव्हा तुमच्या मुलांना यहोवाबद्दल शिकवाल तेव्हा त्यांनासुद्धा दावीद राजासारखंच वाटेल. दावीदने म्हटलं: “हे यहोवा, . . . तुझ्यासारखी कार्यं करणारा दुसरा कोणीही नाही.”​—स्तो. ८६:८. टेहळणी बुरूज२३.०३ २५ ¶१६-१७

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा