वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lmd धडा ७
  • प्रयत्न करत राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रयत्न करत राहा
  • लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पौलने काय केलं?
  • पौलकडून आपण काय शिकतो?
  • पौलने केलं तसं करा
  • नम्रपणे वागा
    लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा
  • इतरांचा विचार करा
    लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा
  • धीर धरा
    लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा
  • आस्थेवाईकांना केव्हा परत भेटावे?
    आमची राज्य सेवा—२००९
अधिक माहिती पाहा
लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा
lmd धडा ७

पुन्हा भेटण्यासाठी

प्रेषित पौल एका शाळेच्या सभागृहात लोकांना आनंदाचा संदेश सांगतोय.

प्रे. कार्यं १९:८-१०

धडा ७

प्रयत्न करत राहा

तत्त्व:  ‘लोकांना शिकवण्यात आणि आनंदाचा संदेश सांगण्यात त्यांनी खंड पडू दिला नाही.’​—प्रे. कार्यं ५:४२.

पौलने काय केलं?

प्रेषित पौल एका शाळेच्या सभागृहात लोकांना आनंदाचा संदेश सांगतोय.

व्हिडिओ: पौल इफिसमध्ये प्रचार करत राहिला

१. व्हिडिओ पाहा किंवा प्रेषितांची कार्यं १९:८-१० वाचा. मग पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर विचार करा:

  1. क. काहींनी विरोध केला म्हणून प्रचार करायचं सोडून देण्याऐवजी ज्यांना ऐकायची इच्छा होती त्यांना मदत करण्यासाठी पौलने काय केलं?

  2. ख. ऐकायची इच्छा असलेल्या या लोकांना शिकवण्यासाठी पौल कितीदा आणि किती काळापर्यंत त्यांच्याकडे जात राहिला?

पौलकडून आपण काय शिकतो?

२. चांगल्या पुनर्भेटी करण्यासाठी आणि बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे आणि मेहनत घेतली पाहिजे.

पौलने केलं तसं करा

३. समोरच्या व्यक्‍तीला जी वेळ सोयीची असेल त्या वेळी जा. स्वतःला विचारा: ‘त्याच्याकडे बोलायला कधी वेळ असेल? आणि त्याला कुठे भेटायला आवडेल?’ त्याच्या वेळेप्रमाणे भेटणं तुमच्यासाठी सोयीचं नसलं तरी त्याला जाऊन भेटा.

४. पुन्हा भेटायची वेळ ठरवा. संभाषण संपल्यावर प्रत्येक वेळी पुन्हा कधी भेटायचं याची वेळ ठरवा. आणि ठरवलेल्या वेळी नक्की भेटा.

५. आशा सोडू नका. एखादी व्यक्‍ती क्वचित घरी भेटत असेल किंवा नेहमी कामात असेल, तर तिला आवडच नाही असा लगेच विचार करू नका. (१ करिंथ. १३:४, ७) याउलट, तिला पुन्हा भेटायचा प्रयत्न करत राहा. पण त्यासोबतच तुम्ही आपल्या वेळेचा चांगला उपयोग करत आहात याकडेही लक्ष द्या.—१ करिंथ. ९:२६.

ही वचनंही पाहा

प्रे. कार्यं १०:४२; १ करिंथ. ९:२२, २३; २ करिंथ. ४:१; गलती. ६:९

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा