वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lmd धडा ६
  • धैर्य दाखवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • धैर्य दाखवा
  • लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • येशूने काय केलं?
  • आपण येशूकडून काय शिकतो?
  • येशूने केलं तसं करा
  • धैर्याने प्रचार करण्याद्वारे येशूचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • तुम्ही धैर्याने सुवार्तेची घोषणा करता का?
    आमची राज्य सेवा—२०००
  • ‘देवाचे वचन धैर्याने बोला’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • देवाचे वचन निर्भीडपणे बोलत राहा
    आमची राज्य सेवा—२००५
अधिक माहिती पाहा
लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा
lmd धडा ६

संभाषण सुरू करण्यासाठी

येशू जक्कयला झाडावरून खाली उतरायला सांगतो आणि काही लोक आश्‍चर्याने पाहत आहेत.

लूक १९:१-७

धडा ६

धैर्य दाखवा

तत्त्व:  ‘तुम्हाला आनंदाचा संदेश सांगण्यासाठी आम्ही आमच्या देवाच्या मदतीने धैर्य एकवटलं.’​—१ थेस्सलनी. २:२.

येशूने काय केलं?

येशू जक्कयला झाडावरून खाली उतरायला सांगतो आणि काही लोक आश्‍चर्याने पाहत आहेत.

व्हिडिओ: येशू जक्कयला प्रचार करतो

१. व्हिडिओ पाहा किंवा लूक १९:१-७ वाचा. मग पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर विचार करा:

  1. क. काही लोक जक्कयपासून चार हात लांब का राहायचे?

  2. ख. असं असलं तरी येशूने त्याला आनंदाचा संदेश का सांगितला?

आपण येशूकडून काय शिकतो?

२. कोणताही भेदभाव न करता आनंदाचा संदेश सांगण्यासाठी आपल्याला धैर्याची गरज आहे.

येशूने केलं तसं करा

३. यहोवावर भरवसा ठेवा. पवित्र शक्‍तीमुळे येशूने धैर्याने प्रचार केला. तुम्हालाही यहोवा तसंच धैर्य देऊ शकतो. (मत्त. १०:१९, २०; लूक ४:१८) आपल्याला ज्यांची भीती वाटते त्यांना प्रचार करण्यासाठी यहोवाकडे धैर्य मागा.​—प्रे. कार्यं ४:२९.

४. लोकांबद्दल आधीच मत बनवू नका. काही लोकांचं दिसणं, समाजातलं स्थान, धनसंपत्ती, धार्मिक विश्‍वास यांमुळे आपण त्यांच्याशी बोलायला कचरू शकतो. पण लक्षात ठेवा:

  1. क. लोकांच्या मनात काय चाललंय हे यहोवा आणि येशू ओळखू शकतात, आपण नाही.

  2. ख. यहोवा कोणत्याही प्रकारच्या व्यक्‍तीला त्याच्याकडे आकर्षित करू शकतो.

५. धैर्याने, पण आदराने आणि विचार करून बोला. (मत्त. १०:१६) वाद घालायचं टाळा. समोरच्याला जर आनंदाचा संदेश ऐकायची इच्छा नसेल किंवा तुम्हाला असुरक्षित वाटत असेल, तर आदराने संभाषण तिथेच थांबवा.​—नीति. १७:१४.

ही वचनंही पाहा

प्रे. कार्यं ४:३१; इफिस. ६:१९, २०; २ तीम. १:७

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा