वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lmd धडा ८
  • धीर धरा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • धीर धरा
  • लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • येशूने काय केलं?
  • येशूकडून आपण काय शिकतो?
  • येशूने केलं तसं करा
  • धीर दाखवत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—शिकवण्यासाठी व्हिडिओंचा वापर करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • इतरांचा विचार करा
    लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा
  • प्रयत्न करत राहा
    लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा
अधिक माहिती पाहा
लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा
lmd धडा ८

पुन्हा भेटण्यासाठी

येशूचा भाऊ, याकोब सुतारकाम करत असताना येशू त्याला भेटायला येतो. येशूला पाहून याकोब चकित होतो.

योहा. ७:३-५; १ करिंथ. १५:३, ४, ७

धडा ८

धीर धरा

तत्त्व:  ‘प्रेम सगळ्या बाबतींत धीर धरतं.’​—१ करिंथ. १३:७.

येशूने काय केलं?

येशूचा भाऊ, याकोब सुतारकाम करत असताना येशू त्याला भेटायला येतो. येशूला पाहून याकोब चकित होतो.

व्हिडिओ: येशू धीराने त्याच्या भावाला मदत करतो

१. व्हिडिओ पाहा किंवा योहान ७:३-५ आणि १ करिंथकर १५:३, ४, ७ वाचा. मग पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर विचार करा:

  1. क. सुरुवातीला येशूच्या भावांनी त्याचा संदेश ऐकला का?

  2. ख. येशू त्याच्या भावाला, याकोबला मदत करत राहिला हे कशावरून दिसतं?

येशूकडून आपण काय शिकतो?

२. काही लोक आनंदाच्या संदेशावर लगेच विश्‍वास ठेवतात, तर काहींना वेळ लागतो. त्यामुळे आपण धीर धरला पाहिजे.

येशूने केलं तसं करा

३. वेगळी पद्धत वापरून पाहा. एखादी व्यक्‍ती बायबल अभ्यासासाठी लगेच तयार झाली नाही तर तिला बळजबरी करू नका. बायबल अभ्यास कसा चालवला जातो आणि त्याचा कसा फायदा होतो हे समजावून सांगण्यासाठी योग्य वेळ पाहून, काही व्हिडिओ किंवा लेख दाखवा.

४. तुलना करू नका. प्रत्येक व्यक्‍ती वेगळी असते. आपला नातेवाईक किंवा पुनर्भेट केलेली एखादी व्यक्‍ती जर बायबल अभ्यास करायला कचरत असेल किंवा बायबलची एखादी शिकवण मान्य करायला तिला कठीण जात असेल, तर त्यामागचं कारण काय हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. एखादी धार्मिक शिकवण तिच्यासाठी खूप महत्त्वाची असल्यामुळे ती अभ्यास करायला मागेपुढे पाहत असेल का? नातेवाइकांच्या किंवा आजूबाजूच्या लोकांच्या भीतीमुळे ती कचरत असेल का? तुम्ही जे सांगता त्यावर विचार करायला आणि बायबल जे शिकवतं ते किती मोलाचं आहे हे समजायला तिला पुरेसा वेळ द्या.

५. आवड दाखवलेल्या व्यक्‍तीसाठी प्रार्थना करा. त्या व्यक्‍तीच्या बाबतीत आशा सोडू नका. तसंच तिच्याशी नेहमी विचार करून बोलायला आणि समजूतदारपणे वागायला यहोवाकडे मदत मागा. एखाद्या व्यक्‍तीला आवड नसेल तर ते ओळखायला आणि तिच्याकडे जाणं कधी बंद करायचं हे समजायला यहोवाकडे समजबुद्धी मागा.​—१ करिंथ. ९:२६.

ही वचनंही पाहा

मार्क ४:२६-२८; १ करिंथ. ३:५-९; २ पेत्र ३:९

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा