फेब्रुवारी
सोमवार, १ फेब्रुवारी
[यहोवाला] न्याय प्रिय आहे.—स्तो. ३३:५.
बायबलमध्ये “न्याय” या शब्दाचा मूळ अर्थ, देवानुसार जे योग्य आहे ते करणं आणि तेही कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता करणं असा होतो. येशूच्या कार्यांतून दिसून येणारा न्यायाविषयीचा त्याचा दृष्टिकोन लक्षात घ्या. येशू पृथ्वीवर असताना यहुदी धार्मिक गुरू यहुदी नसलेल्या लोकांचा द्वेष करायचे, सामान्य यहुदी लोकांना तुच्छ लेखायचे आणि स्त्रियांचा अनादर करायचे. पण याउलट, लोकांशी वागताना येशू भेदभाव करत नव्हता. यहुदी नसलेल्या लोकांनी त्याच्यावर विश्वास दाखवला तेव्हा त्याने त्यांना मदत केली. (मत्त. ८:५-१०, १३) श्रीमंत असो वा गरीब त्याने भेदभाव न करता सर्वांना प्रचार केला. (मत्त. ११:५; लूक १९:२, ९) तो स्त्रियांशी कधीच कठोरपणे वागला नाही किंवा त्याने त्यांचा अपमान केला नाही, तर तो त्यांच्याशी नेहमी आदरपूर्वक आणि दयेने वागला; अशा स्त्रियांसोबतही ज्यांना इतर जण तुच्छ लेखायचे. (लूक ७:३७-३९, ४४-५०) इतरांशी वागताना आपण भेदभाव करण्याचं टाळू. आणि जो कोणी आपला संदेश ऐकायला तयार असेल त्याला आपण प्रचार करू. मग तो कुठल्याही धर्माचा असो किंवा त्याची आर्थिक स्थिती कशीही असो. ख्रिस्ती बांधव स्त्रियांशी आदरपूर्वक वागण्याद्वारे येशूचं अनुकरण करतात. टेहळणी बुरूज१९.०५ २ ¶१; ५ ¶१५-१७
मंगळवार, २ फेब्रुवारी
अंगावर पाजणारी आई जशी स्वतःच्या मुलांची कोमलतेने काळजी घेते, तसेच आम्हीही तुमच्याशी सौम्यतेने वागलो.—१ थेस्सलनी. २:७.
बांधवांची प्रेमाने काळजी घेणारे वडील पौलच्या उदाहरणाचं अनुकरण करतात आणि सांत्वन देताना बायबलचा वापर करून सौम्यतेने बोलतात. पण शोषणाला बळी पडलेल्यांना फक्त वडीलच सांत्वन देऊ शकतात असा याचा अर्थ होतो का? मुळीच नाही. “एकमेकांना सांत्वन देत” राहण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकावर आहे. (१ थेस्सलनी. ४:१८) खासकरून आध्यात्मिक रीत्या प्रौढ असलेल्या बहिणी इतर बहिणींना चांगल्या प्रकारे सांत्वन देऊ शकतात. म्हणूनच यहोवाने स्वतःची तुलना एका आईशी केली जी आपल्या मुलाचं सांत्वन करते. (यश. ६६:१३) बायबलमध्ये अशा स्त्रियांची उदाहरणं आहेत ज्यांनी निराश असलेल्यांना सांत्वन दिलं. (ईयो. ४२:११) भावनिक त्रासाचा सामना करत असलेल्या बहिणींना जेव्हा प्रौढ ख्रिस्ती बहिणी सांत्वन देतात, तेव्हा ते पाहून यहोवाला खूप आनंद होतो. काही परिस्थितींमध्ये वडील आध्यात्मिक रीत्या प्रौढ असलेल्या एखाद्या बहिणीला निराश झालेल्या बहिणीला मदत करायला सांगू शकतात. अर्थात, असं करत असताना आपण त्या व्यक्तीच्या खासगी जीवनात लुडबुड न करण्याची काळजी घेतली पाहिजे.—१ थेस्सलनी. ४:११. टेहळणी बुरूज१९.०५ १६-१७ ¶१०-१२
बुधवार, ३ फेब्रुवारी
दोन किंवा तीन जणांच्या साक्षीने प्रत्येक गोष्ट सिद्ध केली जाईल.—मत्त. १८:१६.
न्यायिक समितीने मंडळीमध्ये एखाद्याविरुद्ध निर्णय घेण्याआधी, घडलेल्या प्रकाराचे कमीतकमी दोन साक्षीदार असणं का गरजेचं आहे? ही पात्रता खरंतर न्यायाच्या बाबतीत असलेल्या बायबलच्या उच्च स्तरांवर आधारलेली आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपलं पाप कबूल करत नाही, तेव्हा तिला दोषी ठरवून तिच्यावर न्यायिक कार्यवाही करण्यासाठी दोन साक्षीदारांची गरज असते. (अनु. १९:१५; १ तीम. ५:१९) जर लावण्यात आलेले आरोप त्या व्यक्तीने नाकारले, तर मग वडील घडलेल्या प्रकाराबद्दल साक्षीदारांचं ऐकून घेतात. जर दोन लोकांनी, म्हणजे जी व्यक्ती आरोप लावते ती आणि दुसरं कोणीतरी तिच्याविरुध्द साक्ष दिली तर तो आरोप सिद्ध होतो. मग वडील ही परिस्थिती हाताळण्यासाठी न्यायिक समिती नेमतात. जर आरोप लावणाऱ्याशिवाय कोणीच दुसरा साक्षीदार नसला, तर याचा अर्थ असा होत नाही की ते आरोप पूर्णपणे खोटे आहेत. दोन साक्षीदार नसल्यामुळे गंभीर पापाचे आरोप सिद्ध झाले नसले, तरी वडिलांना या गोष्टीची जाणीव असते की कदाचित गंभीर पाप घडलं असेल आणि यामुळे इतरांना खूप मानसिक त्रास झाला असेल. अशा सर्व बंधुभगिनींना वडील नियमितपणे सांत्वन आणि मदत पुरवत राहतात. यासोबतच, मंडळीला कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये यासाठी ते सावधगिरीही बाळगतात.—प्रे. कार्ये २०:२८. टेहळणी बुरूज१९.०५ ११ ¶१५-१६
गुरुवार, ४ फेब्रुवारी
या गोष्टींवर सखोल विचार करत राहा; . . . म्हणजे तुझी प्रगती सर्वांना स्पष्टपणे दिसून येईल.—१ तीम. ४:१५.
अभ्यास कसा करावा हे मुलांना शिकवणं खूप गरजेचं आहे. उदाहरणार्थ, सभांची तयारी कशी करावी किंवा शाळेत एखादी समस्या उद्भवली तर त्यावर संशोधन कसं करावं हे त्यांना शिकवण्याची गरज आहे. (इब्री ५:१४) मुलांनी घरी बायबल विषयांवर अभ्यास करण्यासाठी वेळ दिला तर त्यांना सभेत, संमेलनात आणि अधिवेशनात लक्ष देणं सोपं जाईल. मुलांसोबत अभ्यास किती वेळ करावा हे ठरवताना पालक त्यांचं वय आणि व्यक्तिमत्त्व विचारात घेऊ शकतात. अभ्यास कसा करावा हे आपल्या बायबल विद्यार्थ्यांनीही शिकणं गरजेचं आहे. विद्यार्थी सुरुवातीला बायबल अभ्यासासाठी किंवा सभांसाठी तयारी करताना उत्तरं अधोरेखित करतात तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो. पण आपण तेवढ्यावरच थांबू नये, आपल्या बायबल विद्यार्थ्यांनी स्वतः संशोधन आणि सखोलपणे अभ्यास करायला शिकलं पाहिजे. मग असं केल्यामुळे, त्यांच्या जीवनात समस्या आल्या की ते स्वतः समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील. कारण प्रकाशनांत संशोधन करून व्यावहारिक सल्ले कसे मिळवावेत हे त्यांना माहीत झालं असेल. टेहळणी बुरूज१९.०५ २६ ¶२; २८ ¶१०-११
शुक्रवार, ५ फेब्रुवारी
सर्व प्रकारचे तर्कवितर्क व देवाच्या ज्ञानाच्या विरोधात उभी केलेली प्रत्येक गोष्ट आम्ही उलथून टाकतो.—२ करिंथ. १०:५.
सैतानाला कसंही करून आपले विचार बदलायचे आहेत हे लक्षात ठेवा. आपल्यावर देवाच्या वचनाद्वारे झालेला चांगला प्रभाव नाहीसा करण्यासाठी सैतान सर्व प्रकारचे तर्कवितर्क वापरतो. सैतानाने एदेन बागेत हव्वाला जो प्रश्न विचारला होता, तोच प्रश्न तो आजही आपल्याला विचारत आहे. तो म्हणजे, “देवाने तुम्हास सांगितले हे खरे काय?” (उत्प. ३:१) हे जग सैतानाच्या नियंत्रणात आहे आणि इथे आपल्या विश्वासांबद्दल संशय निर्माण करणारे प्रश्न सहसा आपल्या कानी पडतात. जसं की: ‘देव खरंच समलिंगी विवाहाला मान्यता देत नाही का? आपण नाताळ आणि वाढदिवस साजरा करू नये अशी खरंच देवाची इच्छा आहे का? आपण रक्त संक्रमण करू नये अशी खरंच देव आपल्याकडून अपेक्षा करतो का? बहिष्कृत झालेल्या प्रियजनांशी आपण संगती करू नये अशी अपेक्षा एक प्रेमळ देव खरंच आपल्याकडून करेल का?’ आपल्या विश्वासांबद्दल आपल्याला पूर्णपणे खातरी असली पाहिजे. आपण जर आपल्या मनात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळवली नाहीत तर त्या विश्वासांबद्दल आपल्याला शंका वाटू लागेल. अशा शंकांमुळे आपले विचार हळूहळू बदलू शकतात आणि आपला विश्वास नष्ट होऊ शकतो. टेहळणी बुरूज१९.०६ १२-१३ ¶१५-१७
शनिवार, ६ फेब्रुवारी
तुमच्या सर्वांच्या विचारांत एकता असावी, तसेच एकमेकांशी वागताना सहानुभूती, बंधुप्रेम, जिव्हाळा व नम्रता दाखवा.—१ पेत्र ३:८.
यहोवाचं आपल्या सर्वांवर खूप प्रेम आहे. (योहा. ३:१६) आणि आपल्या प्रेमळ पित्याचं अनुकरण करण्याची आपली इच्छा आहे. त्यामुळेच आपण सर्वांशी “वागताना सहानुभूती, बंधुप्रेम, जिव्हाळा” दाखवतो, “विशेषकरून विश्वासात असलेल्या” आपल्या बंधुभगिनींना. (गलती. ६:१०) आपल्या आध्यात्मिक कुटुंबातल्या भाऊबहिणींना तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करावा लागतो, तेव्हा आपण त्यांची मदत केली पाहिजे. मृत्यूमुळे आपल्या जोडीदाराला गमावलेल्या बंधुभगिनींना आपण सांत्वन कसं देऊ शकतो? सांत्वन देण्यासाठी आपण सर्वात आधी त्यांच्याशी बोललं पाहिजे. आपल्याला कदाचित काय बोलावं हे सुचत नसेल, किंवा अवघडल्यासारखं वाटत असेल तरीदेखील आपण बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पौला नावाच्या एका बहिणीचे पती अचानक वारले. ती म्हणते: “मला जाणीव आहे की एखाद्याचा मृत्यू झाला की लोकांना काय बोलावं हे सुचत नाही. त्यांना काळजी वाटते की त्यांच्या बोलण्यामुळे समोरच्याचं दुःख कदाचित आणखी वाढेल. पण लोक जेव्हा काहीच बोलत नाही तेव्हा त्याचा जास्त त्रास होतो.” आपण काहीतरी खूपच प्रभावी बोलावं अशी दुःखात असलेल्या व्यक्तीची आपल्याकडून मुळीच अपेक्षा नसते. पौला म्हणते: “माझे मित्र मला म्हणायचे, ‘ऐकून खूप वाईट वाटलं’ आणि इतकं बोलल्यानेही मला खूप बरं वाटायचं.” टेहळणी बुरूज१९.०६ २० ¶१; २३ ¶१४
रविवार, ७ फेब्रुवारी
हे यहोवा त्यांच्या धमक्यांकडे लक्ष दे आणि तुझं वचन पूर्ण धैर्याने सांगत राहण्यासाठी तुझ्या सेवकांना बळ दे.—प्रे. कार्ये ४:२९.
आपल्या कार्यावर जर बंदी आली, तर वडील अशा प्रकारे सभा आयोजित करतील ज्यामुळे आपण विरोधकांच्या नजरेत येणार नाही. ते कदाचित आपल्याला छोट्या गटांमध्ये एकत्र यायला सांगतील आणि बऱ्याचदा सभेची वेळ आणि ठिकाण यांत बदल करत राहतील. प्रचार करण्याच्या बाबतीत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती असेल. पण आपलं यहोवावर प्रेम आहे आणि आपल्याला त्याच्या राज्याबद्दल इतरांना सांगायला आवडतं, म्हणून आपण प्रचार करत राहण्याचे मार्ग शोधू. (लूक ८:१) ऍमीली बी. बेरएन नावाची इतिहासकार यांनी पूर्वीचा सोव्हिएत संघ इथल्या, यहोवाच्या साक्षीदारांबद्दल बोलताना असं म्हटलं: “सरकारने यहोवाच्या साक्षीदारांना आदेश दिला की त्यांनी आपल्या विश्वासाबद्दल इतरांना सांगू नये. तरी साक्षीदार आपल्या शेजाऱ्यांना, सहकर्मचाऱ्यांना आणि आपल्या मित्रांना प्रचार करत राहिले. त्यांच्या कार्यामुळे त्यांना सक्तमजुरी करण्यासाठी छावणीत पाठवण्यात आलं. तिथेही साक्षीदारांनी इतर कैद्यांना प्रचार केला.” सोव्हिएत संघ इथे बंदी होती तरी साक्षीदारांनी प्रचार करण्याचं थांबवलं नाही. तुम्हीही असाच निर्धार करू शकता! टेहळणी बुरूज१९.०७ ११ ¶१२-१३
सोमवार, ८ फेब्रुवारी
सर्व राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा.—मत्त. २८:१९.
आपण देवा-धर्मावर विश्वास नसलेल्या लोकांना देवावर प्रेम करायला आणि ख्रिस्ताचे शिष्य बनायला कशी मदत करू शकतो? आपण लक्षात ठेवलं पाहिजे की एक व्यक्ती आपल्या संदेशाला कशी प्रतिक्रिया देईल हे कदाचित ती लहानाची मोठी कुठे झाली आहे यावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ, युरोपमध्ये राहणाऱ्यांची प्रतिक्रिया आशिया खंडात राहणाऱ्यांसारखी नसेल. असं का? कारण युरोपमध्ये राहणाऱ्या लोकांना बायबलबद्दल काही प्रमाणात माहीत असतं आणि विश्वाची निर्मिती देवाने केली आहे हे त्यांनी ऐकलेलं असतं. पण आशियामध्ये बहुतेक लोकांना बायबलबद्दल अगदी थोडं किंवा कधीकधी तर काहीच माहीत नसतं. तसंच, एक सृष्टिकर्ता आहे असंही ते कदाचित मानत नाहीत. पण तरी सकारात्मक असा. कारण प्रत्येक वर्षी देवा-धर्मावर विश्वास नसलेले अनेक लोक यहोवाचे साक्षीदार बनतात. साक्षीदार बनण्याआधी त्यांपैकी बऱ्याच लोकांचे नैतिक स्तर चांगले होते आणि त्यांना धर्मांमध्ये चाललेल्या ढोंगीपणाचा वीट आला होता. तर इतर काही असे होते ज्यांचे नैतिक स्तर चांगले नव्हते. तसंच, बऱ्याच जणांना आपल्या वाईट सवयीही सोडून द्याव्या लागल्या. यावरून स्पष्टच आहे की, यहोवाच्या मदतीने आपण “सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती असणाऱ्या” लोकांना नक्की शोधू शकतो.—प्रे. कार्ये १३:४८; १ तीम. २:३, ४. टेहळणी बुरूज१९.०७ २०-२१ ¶३-४
मंगळवार, ९ फेब्रुवारी
आपण धैर्य सोडत नाही.—२ करिंथ. ४:१६.
आपली आशा स्वर्गातली असो किंवा पृथ्वीवरची, आपण आपल्या ध्येयाकडे पोहोचण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. आपली परिस्थिती कशीही असो, आपण मागच्या गोष्टींकडे मुळीच पाहणार नाही आणि कोणत्याच गोष्टीला आपल्या प्रगतीच्या आड येऊ देणार नाही. (फिलिप्पै. ३:१६) आपल्या अपेक्षा पूर्ण व्हायला वेळ लागत आहे असं आपल्याला वाटत असेल, आपली तब्येत खालावत चालली असेल, किंवा आपण बरीच वर्षं परीक्षांचा व छळाचा सामना केला असेल तरी “कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका.” याउलट, आपल्या विनंत्या आणि याचना देवाला कळवा आणि तो तुम्हाला सर्व समजशक्तीच्या पलीकडे असलेली शांती देईल. (फिलिप्पै. ४:६, ७) एक धावक शर्यतीच्या अंतिम टप्प्यात आपली सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न करतो, त्याप्रमाणे आपणही जीवनाची शर्यत पूर्ण करण्याच्या ध्येयावर आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपल्या शक्तीनुसार आणि परिस्थितीनुसार आपण कसोशीने प्रयत्न केला पाहिजे आणि पुढे ठेवलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रगती करत राहिलं पाहिजे. टेहळणी बुरूज१९.०८ ७ ¶१६-१७
बुधवार, १० फेब्रुवारी
रडणाऱ्यांसोबत रडा.—रोम. १२:१५.
शोक करत असलेल्या लोकांना बरं वाटावं यासाठी आपण त्यांच्याशी काय बोलावं हे आपल्याला कदाचित सुचत नसेल. कधीकधी आपले अश्रू शब्दांपेक्षा जास्त बोलके असतात. येशूच्या मित्राचा, लाजरचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा मरीया, मार्था आणि इतर जण आपल्या भावासाठी आणि मित्रासाठी रडले. चार दिवसांनंतर जेव्हा येशू तिथे आला तेव्हा तो लाजरला पुन्हा जिवंत करणार हे माहीत असूनही तो “रडू लागला.” (योहा. ११:१७, ३३-३५) लाजरचा मृत्यू झाला तेव्हा यहोवाला कसं वाटलं असेल हे येशूच्या अश्रूंवरून स्पष्टपणे कळलं. तसंच, यावरून येशूचं या कुटुंबावर असलेलं प्रेमदेखील दिसून आलं. यामुळे मरीया आणि मार्था यांना नक्कीच दिलासा मिळाला असेल. त्याच प्रकारे, आपण आपल्या बंधुभगिनींना प्रेम आणि काळजी दाखवतो तेव्हा त्यांनाही आपल्या प्रेमाचा अनुभव होतो. त्यांना जाणीव होते की ते एकटे नाहीत आणि त्यांची काळजी घेणारे प्रेमळ मित्र त्यांच्यासोबत आहेत. काही वेळा आपल्याला फक्त त्यांचं लक्षपूर्वक ऐकण्याची गरज असते. आपला एखादा बांधव आपलं मन मोकळं करत असेल, तेव्हा त्याचं ऐका आणि जरी तो “मर्यादेबाहेर” म्हणजे अविचारीपणे बोलत असला तरी वाईट वाटून घेऊ नका. (ईयो. ६:२, ३) सत्यात नसलेल्या त्याच्या नातेवाइकांच्या दबावामुळे तो आणखीच खचला असेल आणि निराश झाला असेल. त्यामुळे त्याच्यासोबत प्रार्थना करा. त्याला बळ मिळावं आणि त्याला योग्य विचार करता यावा म्हणून ‘प्रार्थना ऐकणाऱ्याकडे’ विनवणी करा.—स्तो. ६५:२. टेहळणी बुरूज१९.०४ १८-१९ ¶१८-१९
गुरुवार, ११ फेब्रुवारी
त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा.—स्तो. ६२:८.
आपण क्षेत्रात सेवा करत असो किंवा बेथेलमध्ये, आपल्या सर्वांच्याच मनात तिथल्या लोकांबद्दल आणि त्या जागेबद्दल प्रेम उत्पन्न होतं. पण मग काही कारणामुळे आपल्याला जेव्हा तिथून जावं लागतं तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं. तिथल्या भाऊबहिणींची आपल्याला आठवण येते आणि जर छळामुळे आपल्याला ते ठिकाण सोडावं लागलं, तर तिथल्या बांधवांची आपल्याला काळजीही वाटते. (मत्त. १०:२३; २ करिंथ. ११:२८, २९) तसंच, एखादी नवीन नेमणूक स्वीकारल्यामुळे किंवा बऱ्याच वर्षांनंतर घरी परतल्यामुळे आपल्याला नवीन संस्कृतीशी जुळवून घेणं कठीण जाऊ शकतं. नेमणूक बदलल्यामुळे काही जणांवर अचानक आर्थिक भार येऊ शकतो. यामुळे ते निराश होऊ शकतात किंवा त्यांना असुरक्षित वाटू शकतं. असं असेल तर त्यांना कोणती गोष्ट मदत करू शकते? यहोवाच्या जवळ राहा. (याको. ४:८) आपण हे कसं करू शकतो? यहोवा आपल्या “प्रार्थना ऐकतो” यावर पूर्ण भरवसा ठेवण्याद्वारे. (स्तो. ६५:२) यहोवा “आपण मागितलेल्या किंवा कल्पना केलेल्या गोष्टींपेक्षाही कित्येक पटींनी जास्त प्रमाणात आपल्यासाठी करू शकतो.” (इफिस. ३:२०) आपण प्रार्थनेत त्याला जे मागतो फक्त तितकंच तो आपल्याला देत नाही. तर आपण विचारही केला नसेल अशा प्रकारे तो आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला मदत करू शकतो. टेहळणी बुरूज१९.०८ २१ ¶५-६
शुक्रवार, १२ फेब्रुवारी
त्यांनी . . . हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी सर्व राजांना एकत्र आणले.—प्रकटी. १६:१६.
काही लोक असा विचार करतात की “हर्मगिदोन” म्हणजे अणुबॉम्बमुळे किंवा एका मोठ्या नैसर्गिक विपत्तीमुळे होणारा जगाचा विनाश. पण बायबल असं सांगत नाही. याउलट ते सांगतं की लवकरच एक युद्ध होईल आणि त्याचे चांगले परिणाम होतील. या युद्धाला बायबलमध्ये हर्मगिदोन म्हटलं आहे. या युद्धाबद्दल बायबलमध्ये जे सांगितलं आहे ते जाणून घेतल्यामुळे आपल्याला आशा मिळते. (प्रकटी. १:३) हर्मगिदोनच्या युद्धामुळे मानवांचा नाश नाही, तर त्यांचा बचाव होईल. हे कसं घडेल? मानवी राज्यांचा अंत करण्याद्वारे. तसंच जे नीतिमान आहेत अशा लोकांना वाचवलं जाईल. पण या युद्धामुळे सर्व दुष्ट लोकांचा आणि पृथ्वीची नासधूस करणाऱ्यांचा नाश केला जाईल. यामुळे पृथ्वीवर मानवांसाठी चांगली परिस्थिती असेल. (प्रकटी. ११:१८) “हर्मगिदोन” हा शब्द बायबलमध्ये फक्त एकदाच येतो आणि तो ज्या मूळ इब्री शब्दापासून आला आहे त्याचा अर्थ “मगिद्दोचे पर्वत” असा होतो. (प्रकटी. १६:१६, तळटीप) मगिद्दो हे प्राचीन इस्राएलमध्ये असलेलं एक शहर होतं. (यहो. १७:११) पण हर्मगिदोन खरोखरच्या ठिकाणाला सूचित करत नाही. खरंतर, हर्मगिदोन एका अशा परिस्थितीला सूचित करतं ज्यात पृथ्वीवरील राजांना “सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या युद्धासाठी एकत्र” करणं सामील आहे.—प्रकटी. १६:१४. टेहळणी बुरूज१९.०९ ८ ¶१-३
शनिवार, १३ फेब्रुवारी
कोणीही तिला बरे करू शकले नव्हते.—लूक ८:४३.
त्या स्त्रीला मदतीची खूप गरज होती. तिचा आजार बरा व्हावा या आशेने ती बऱ्याच वैद्यांकडे गेली. पण बारा वर्षं सर्व उपाय करूनही तिचा आजार काही बरा झाला नव्हता. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे ती अशुद्ध होती. (लेवी. १५:२५) एकदा तिने ऐकलं की येशू आजाऱ्यांना बरं करू शकतो म्हणून ती त्याला शोधू लागली. तिने जेव्हा येशूला पाहिलं तेव्हा तिने त्याच्या कपड्यांच्या काठाला हात लावला आणि ती लगेच बरी झाली. येशूने फक्त तिला बरं केली नाही पण तिच्याशी वागताना त्याने तिचा स्वाभिमानही जपला. उदाहरणार्थ, तिच्याशी बोलताना त्याने प्रेमळपणे आणि आदराने तिला “मुली” असं संबोधलं. त्या स्त्रीला खरंच किती तजेला आणि बळ मिळालं असेल! (लूक ८:४४-४८) ती स्त्री स्वतः येशूकडे गेली हे लक्षात घ्या. येशूला भेटण्यासाठी तिने पुढाकार घेतला. ही गोष्ट आपल्याबाबतीतही खरी असली पाहिजे. आपणसुद्धा “माझ्याकडे या” या येशूच्या आमंत्रणाचा स्वीकार करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. आज येशू चमत्कार करून त्याच्याकडे ‘येणाऱ्या’ लोकांचे आजार बरे करणार नाही. पण असं असलं तरी तो आपल्याला “माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन” असं आमंत्रण देतो.—मत्त. ११:२८. टेहळणी बुरूज१९.०९ २० ¶२-३
रविवार, १४ फेब्रुवारी
सर्व राष्ट्रे, वंश, लोक आणि भाषा यांतून आलेला . . . एक मोठा लोकसमुदाय, . . . मला दिसला.—प्रकटी. ७:९.
जखऱ्या संदेष्ट्याने आधी काहीशी अशीच भविष्यवाणी केली होती. त्याने म्हटलं: “सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की, त्या दिवसांत सर्व भाषा बोलणाऱ्या राष्ट्रांपैकी दहा जण यहुदी माणसाचा पदर धरून म्हणतील, आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.” (जख. ८:२३) यहोवाच्या साक्षीदारांना जाणीव झाली की पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या सर्व लोकांना जमवायचं असेल तर आनंदाचा संदेश अनेक भाषांमध्ये प्रचार करणं गरजेचं आहे. आणि इतिहासात घडलं नाही इतक्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे ९०० पेक्षा जास्त भाषांमध्ये आज भाषांतराचं काम आपली संघटना करत आहे. यावरून स्पष्टच होतं, की सर्व राष्ट्रांतून मोठ्या लोकसमुदायाला एकत्रित करणं हा यहोवा करत असलेला एक चमत्कारच आहे! बायबल आणि बायबल आधारित साहित्यं आज बऱ्याच भाषांमध्ये उपलब्ध असल्यामुळे या समूहाचे लोक ऐक्याने यहोवाची सेवा करत आहेत. ते सर्व जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणांचे असले तरीही त्यांच्यात एकी आहे. साक्षीदार आवेशाने करत असलेल्या प्रचारकार्यासाठी आणि भाऊबहिणींमध्ये असलेल्या प्रेमासाठी ओळखले जातात. खरंच, या गोष्टींमुळे आपला विश्वास आणखी वाढतो!—मत्त. २४:१४; योहा. १३:३५. टेहळणी बुरूज१९.०९ ३०-३१ ¶१६-१७
सोमवार, १५ फेब्रुवारी
जगाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत आलं नाही आणि पुन्हा कधीही येणार नाही असं मोठं संकट येईल.—मत्त. २४:२१.
राजकीय व व्यापार क्षेत्र आणि जगातल्या इतर गोष्टी कायम राहतील असा लोकांचा भरवसा होता. पण जेव्हा ते मोठ्या संकटादरम्यान त्यांचा नाश होताना पाहतील तेव्हा त्यांना धक्काच बसेल. त्यांना क्लेश होईल आणि आपलं अस्तित्व नाहीसं होतं की काय अशी भीती त्यांना वाटेल, कारण तो मानव इतिहासातला अगदी वाईट काळ असेल. (सफ. १:१४, १५) त्या वेळी यहोवाच्या लोकांसाठीही जीवन खूप खडतर असेल. जगाचे भाग नसल्यामुळे कदाचित आपल्यालाही काही कठीण परिस्थितींचा सामना करावा लागेल. त्या वेळी कदाचित आपल्या काही मूलभूत गरजाही पूर्ण होणार नाहीत. “विश्वासू आणि बुद्धिमान दास” आपल्याला मोठ्या संकटादरम्यान विश्वासू राहण्यासाठी तयार करत आहे. (मत्त. २४:४५) हे अनेक मार्गांद्वारे केलं जात आहे. याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर २०१६-२०१८ या वर्षांदरम्यान झालेली अधिवेशनं. या अधिवेशनांमुळे आपल्याला असे गुण विकसित करण्याचं प्रोत्साहन देण्यात आलं आहे जे यहोवाच्या दिवसाचा सामना करण्यासाठी गरजेचे आहेत. टेहळणी बुरूज१९.१० १४ ¶२; १६ ¶१०; १७ ¶१२
मंगळवार, १६ फेब्रुवारी
तुम्ही “यहोवाच्या मेजावरून” आणि दुरात्म्यांच्याही मेजावरून जेवू शकत नाही.—१ करिंथ. १०:२१.
अन्न पोटात गेल्यानंतर शरीरात आपोआपच एक प्रक्रिया सुरू होते आणि त्यावर आपला ताबा नसतो. सेवन केलेलं अन्न आपल्या शरीराचा भाग बनतं. पौष्टिक अन्न खाल्ल्यामुळे आपली तब्येत चांगली राहू शकते पण अरबट-चरबट, जंक फूड खाल्ल्यामुळे आपली तब्येत खराब होऊ शकते. आपल्या शरीरावर याचे परिणाम कदाचित एका रात्रीत दिसून येणार नाहीत पण ते कालांतराने दिसून येतीलच. त्याच प्रकारे मनोरंजन निवडताना कोणत्या गोष्टी आपल्या मनात जाव्यात हे आपण ठरवू शकतो. पण त्यानंतर आपोआपच एक प्रक्रिया सुरू होते आणि तिचा आपल्या भावनांवर आणि विचारांवर परिणाम होतो. चांगल्या मनोरंजनामुळे आपल्याला तजेला मिळू शकतो पण हानिकारक मनोरंजनामुळे आपलं नुकसान होऊ शकतं. (याको. १:१४, १५) वाईट मनोरंजनाचे परिणाम कदाचित लगेच दिसणार नाहीत पण कालांतराने ते दिसून येतीलच. त्यामुळे बायबल आपल्याला सावध करतं की “एखादा मनुष्य जे काही पेरतो, त्याचीच तो कापणीही करेल; जो शरीरासाठी पेरणी करतो, तो आपल्या शरीरापासून नाशाच्या पिकाची कापणी करेल; पण, जो आत्म्यासाठी पेरणी करतो, तो आत्म्यापासून सर्वकाळाच्या जीवनाची कापणी करेल.” (गलती. ६:७, ८) खरंच, यहोवा ज्या गोष्टींचा द्वेष करतो त्या गोष्टी असलेल्या सर्व मनोरंजनाला नकार देणं खूप महत्त्वाचं आहे!—स्तो. ९७:१०. टेहळणी बुरूज१९.१० ३० ¶१२-१४
बुधवार, १७ फेब्रुवारी
देवाची प्रिय मुले या नात्याने त्याचे अनुकरण करा, आणि प्रेमाने वागत राहा.—इफिस. ५:१, २.
यहोवाने आपल्यासाठी त्याच्या पुत्राचं खंडणी बलिदान देऊन आपल्यावर असलेलं त्याचं प्रेम सिद्ध केलं. (योहा. ३:१६) आपण यहोवाच्या प्रेमाचं अनुकरण कसं करू शकतो? सर्व बंधुभगिनींना मौल्यवान लेखण्याद्वारे आणि ‘हरवलेलं मेंढरू’ यहोवाकडे परत येतं तेव्हा त्याचं आनंदाने स्वागत करण्याद्वारे आपण असं करू शकतो. (स्तो. ११९:१७६; लूक १५:७, १०) तसंच, आपल्या बंधुभगिनींना खासकरून जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा त्यांना मदत करण्याद्वारेही आपलं प्रेम सिद्ध होतं. (१ योहा. ३:१७) येशूने आपल्या अनुयायांना आत्मत्यागी प्रेम दाखवण्याची आज्ञा दिली. (योहा. १३:३४, ३५) येशूची आज्ञा नवीन आहे. या आज्ञेनुसार अनुयायांकडून एका विशिष्ट प्रकारचं प्रेम दाखवण्याची अपेक्षा केली जाते. मोशेच्या नियमशास्त्रात इस्राएली लोकांकडून अशा प्रकारचं प्रेम दाखवण्याची अपेक्षा केली जात नव्हती. हे प्रेम म्हणजे, येशूने जसं आपल्यावर प्रेम केलं तसं आपणही इतरांवर केलं पाहिजे. यासाठी आत्मत्यागी प्रेम दाखवणं गरजेचं आहे. आपण स्वतःवर जितकं प्रेम करतो त्यापेक्षाही जास्त बंधुभगिनींवर प्रेम करणं गरजेचं आहे. येशूप्रमाणेच आपणही त्यांच्यावर इतकं प्रेम केलं पाहिजे की स्वेच्छेने त्यांच्यासाठी आपला जीवही द्यायला आपण तयार असलं पाहिजे. टेहळणी बुरूज१९.०५ ४ ¶११-१३
गुरुवार, १८ फेब्रुवारी
मागत राहा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल; शोधत राहा म्हणजे तुम्हाला सापडेल; आणि ठोठावत राहा म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल.—लूक ११:९.
देवाच्या पवित्र आत्म्याकडून मदत मिळावी म्हणून आपण सतत प्रार्थना केली पाहिजे. (लूक ११:१३) येशूने लूक ११:५-९ मध्ये दिलेल्या उदाहरणातून आपल्याला हेदेखील समजायला मदत होते की यहोवा आपल्याला पवित्र आत्मा का देतो. त्या उदाहरणातल्या माणसाला त्याच्या घरी आलेल्या पाहुण्याचा चांगला पाहुणचार करायचा होता. रात्री उशिरा आलेल्या पाहुण्याला आपण काहीतरी खायला दिलं पाहिजे असं त्याला वाटत होतं. पण त्या वेळी त्याच्याकडे काहीच नव्हतं. येशूने म्हटलं की या माणसाने न लाजता एकसारखं मागितल्यामुळे त्याच्या मित्राने त्याला भाकरी दिली. येशूला यातून काय शिकवायचं होतं? हेच की जर एक मानव न लाजता वारंवार मागत असल्यामुळे समोरचा अपरिपूर्ण मनुष्य त्याला मदत करायला तयार होऊ शकतो, तर मग स्वर्गात राहणाऱ्या आपल्या दयाळू पित्याकडे आपण वारंवार पवित्र आत्मा मागितल्यावर तो आपल्याला देणार नाही का? नक्कीच देईल! त्यामुळे आपल्याला पूर्ण भरवसा आहे, की आपण पवित्र आत्मा मिळवण्यासाठी यहोवाकडे प्रार्थना केली तर तो आपल्या प्रार्थनांचं उत्तर नक्कीच देईल. (स्तो. १०:१७; ६६:१९) सैतान आपल्यावर हल्ला करतच राहील, तरी आपण खातरीने म्हणू शकतो की आपलाच विजय होईल! टेहळणी बुरूज१९.११ १३ ¶१७-१९
शुक्रवार, १९ फेब्रुवारी
एखाद्या एकांत ठिकाणी चला आणि थोडी विश्रांती घ्या.—मार्क ६:३१.
येशूला माहीत होतं की त्याला आणि प्रेषितांना अधूनमधून विश्रांतीची गरज आहे. पण त्या काळाच्या आणि आजच्या काळाच्या पुष्कळ लोकांची तुलना आपण येशूच्या उदाहरणातल्या श्रीमंत माणसाशी करू शकतो. जीवनाबद्दल त्या माणसाचं ठाम मत होतं, की “खा, पी आणि मौजमजा कर.” (लूक १२:१९; २ तीम. ३:४) आराम आणि चैन करणं या जीवनातल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत असं त्याला वाटत होतं. याउलट येशू आणि त्याच्या प्रेषितांनी आपल्या जीवनात आराम व चैन करणं याला प्राधान्य दिलं नाही. आजही आपण येशूचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. ज्या दिवशी आपल्याला कामावर सुट्टी असते त्या दिवशी आपण फक्त आराम करत नाही तर लोकांना प्रचार करतो आणि सभांनाही जातो. खरंतर शिष्य बनवणं आणि सभांना जाणं या गोष्टींना आपण खूप महत्त्व देतो. त्यामुळे आपण या पवित्र कार्यांत भाग घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. (इब्री १०:२४, २५) आपण जास्त दिवसांसाठी सुट्टी घेऊन फिरायला गेलो तरी आपण सभांना जाण्याचा आपला नित्यक्रम सोडत नाही; मग आपण कुठेही असलो तरीही. तसंच, आपण लोकांना आनंदाचा संदेश सांगण्याची संधीही शोधतो.—२ तीम. ४:२. टेहळणी बुरूज१९.१२ ७ ¶१६-१७
शनिवार, २० फेब्रुवारी
तुम्ही जे काम सुरू केले होते ते आता पूर्णही करा.—२ करिंथ. ८:११.
आपण जीवनात कोणते निर्णय घ्यावेत हे ठरवण्याची मोकळीक यहोवाने आपल्याला दिली आहे. यहोवा आपल्याला चांगले निर्णय घ्यायला शिकवतो आणि आपण जेव्हा त्याचं मन आनंदित होईल असे निर्णय घेतो तेव्हा तो आपल्याला यशस्वी होण्यासाठी मदत करतो. (स्तो. ११९:१७३) आपण जर देवाच्या वचनात दिलेले सुज्ञ सल्ले जीवनात लागू करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला नेहमी चांगले निर्णय घेता येतील. (इब्री ५:१४) आपण जरी एखाद्या कामाविषयी चांगला निर्णय घेतला असला तरी आपल्याला त्या निर्णयानुसार काम पूर्ण करणं कठीण जाऊ शकतं. काही उदाहरणांचा विचार करा: एक तरुण बांधव एका वर्षात संपूर्ण बायबल वाचून काढण्याचा निर्णय घेतो. ठरवल्याप्रमाणे तो नियमितपणे बायबल वाचतो पण नंतर कोणत्यातरी कारणामुळे त्याचं वाचन बंद पडतं. एक बहीण रेग्युलर पायनियरिंग करायचं ठरवते, पण मग ती असा विचार करते की ‘आता नको, नंतर करू या’ आणि पायनियरिंग लांबणीवर टाकते. वडील वर्ग मंडळीतल्या भाऊबहिणींची जास्त वेळा मेंढपाळ भेट घेतील असा ते एकमताने निर्णय घेतात. पण बऱ्याच महिन्यांनतरही त्यांनी ठरवल्याप्रमाणे काम सुरू केलेलं नसतं. या सर्व परिस्थिती वेगवेगळ्या असल्या तरी त्यात एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे त्या भाऊबहिणींनी निर्णय तर घेतले पण त्यांनी ते पूर्णपणे अमलात आणले नाहीत. टेहळणी बुरूज१९.११ २६ ¶१-२
रविवार, २१ फेब्रुवारी
उद्योग्याचे विचार समृद्धी करणारे असतात.—नीति. २१:५.
येशूने आपल्या काळाची तुलना नोहाच्या दिवसांशी केली. आणि यात काहीच शंका नाही की आपण अतिशय कठीण काळात जगत आहोत. (मत्त. २४:३७; २ तीम. ३:१) म्हणून काही जोडप्यांनी निर्णय घेतला आहे की ते कुटुंब वाढवण्याचा विचार सध्या तरी करणार नाहीत. कारण असं केल्यामुळे त्यांना आपला जास्तीत जास्त वेळ यहोवाच्या सेवेत देणं शक्य होईल. कुटुंब वाढवण्याचा निर्णय कधी घ्यावा आणि आपल्याला किती मुलं व्हावीत हे ठरवताना सुज्ञ जोडपी “आधी बसून खर्चाचा हिशोब” लावतात. (लूक १४:२८, २९) अनुभवी पालकांनी मान्य केलं आहे की मुलांच्या संगोपनामागे फक्त पैसाच खर्च होत नाही, तर वेळ आणि शक्तीही खर्च होते. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे की एका जोडप्याने आधीच काही प्रश्नांवर चर्चा केली पाहिजे. जसं की: ‘कुटुंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या दोघांना नोकरी करावी लागेल का? आपल्या मूलभूत गरजा काय आहेत यावर आपलं एकमत आहे का? जर दोघं काम करणार असतील तर मुलांकडे कोण लक्ष देईल? त्या वेळी मुलांच्या विचारांना आणि कार्यांना कोण आकार देईल?’ या प्रश्नांवर शांतपणे चर्चा करताना, जोडपी आजच्या वचनात दिलेले शब्द लागू करण्याचा प्रयत्न करतात. टेहळणी बुरूज१९.१२ २३-२४ ¶६-७
सोमवार, २२ फेब्रुवारी
देवाच्या राज्यासाठी हेच माझे सहकारी आहेत आणि त्यांनी माझ्या मनाला खूप सांत्वन दिले आहे.—कलस्सै. ४:११.
प्रेषित पौलला त्याच्या जीवनात एकामागोमाग एक अशा बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला ज्यामुळे त्याचा जीव गेला असता. (२ करिंथ. ११:२३-२८) इतकंच काय तर त्याच्या ‘शरीरातल्या एका काट्याचा’ त्रासही त्याला सहन करावा लागत होता, म्हणजेच त्याला कदाचित काही आरोग्याची समस्या होती. (२ करिंथ. १२:७) तसंच, त्याचा सहकारी देमास याला “जगाच्या व्यवस्थेची ओढ” असल्यामुळे तो पौलला सोडून गेला आणि यामुळे पौल निराश झाला. (२ तीम. ४:१०) पौल एक धैर्यवान अभिषिक्त ख्रिस्ती होता ज्याने इतरांना निःस्वार्थपणे मदत केली होती. असं असलं तरी काही प्रसंगी तो निराश झाला. (रोम. ९:१, २) पौलला नक्कीच सांत्वन आणि मदत मिळाली. पण कशा प्रकारे? यहोवाने त्याच्या पवित्र आत्म्याचा वापर करून त्याला बळ दिलं. (२ करिंथ. ४:७; फिलिप्पै. ४:१३) तसंच, त्याने भाऊबहिणींचा वापर करून पौलचं सांत्वनही केलं. कारण त्यातल्या काहींबद्दल पौलने म्हटलं की “त्यांनी माझ्या मनाला खूप सांत्वन” दिलं. (कलस्सै. ४:११) त्यांपैकी काहींच्या नावाचा पौलने उल्लेख केला जसं की अरिस्तार्ख, तुखिक आणि मार्क. त्यांनी पौलची हिंमत वाढवली आणि यामुळे तो धीराने समस्यांचा सामना करू शकला. टेहळणी बुरूज२०.०१ ८ ¶२-३
मंगळवार, २३ फेब्रुवारी
त्याने तुमच्या अंतःकरणाचे डोळे उघडले आहेत.—इफिस. १:१८.
येशूने आधीच सांगितलं होतं की “नव्याने जन्म” होणं किंवा “आत्म्याने जन्म” होणं हा अनुभव नेमका कसा असतो, हे अभिषिक्त नसलेल्यांना समजावून सांगणं अशक्य आहे. (योहा. ३:३-८) अभिषिक्त करण्यात आल्यावर ख्रिश्चनांच्या विचार करण्याच्या पद्धतीत कोणता बदल होतो? अभिषिक्त होण्याआधी त्यांना पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची मनापासून इच्छा असते. ते त्या वेळेची आतुरतेने वाट पाहत असतात जेव्हा यहोवा या पृथ्वीवरून सर्व प्रकारचा दुष्टपणा काढून टाकेल आणि या पृथ्वीला नंदनवन बनवेल. ते कदाचित या गोष्टीचाही विचार करत असतील की ते त्यांच्या कुटुंबातल्या मरण पावलेल्या सदस्याला किंवा मित्राला नवीन जगात भेटतील. पण अभिषिक्त झाल्यावर ते वेगळ्या प्रकारे विचार करू लागतात. हे का घडतं? यामुळे नाही की त्यांना स्वर्गातलं जीवन पृथ्वीवरच्या जीवनापेक्षा चांगलं वाटू लागतं. किंवा जीवनातल्या समस्यांमुळे, निराशेमुळे ते हताश झाले आहेत. किंवा अचानक त्यांना पृथ्वीवरचं जीवन कंटाळवाणं वाटू लागतं. तर हे यामुळे घडतं, कारण यहोवा पवित्र आत्म्याचा वापर करून त्यांना प्रिय असलेली पृथ्वीवरची आशा बदलतो आणि त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल करतो. टेहळणी बुरूज२०.०१ २२ ¶९-११
बुधवार, २४ फेब्रुवारी
प्रत्येकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे.—रोम. १३:१.
देवाने इस्राएली लोकांना दिलेल्या मोशेच्या नियमाधीन असलेले जबाबदार पुरुष यहोवाच्या उपासनेशी संबंधित असलेल्या गोष्टीच हाताळत नव्हते, तर नागरिकांच्या हक्कासंबंधित किंवा गुन्हेगारीशी संबंधित असलेले प्रकरणही हाताळायचे. पण ख्रिस्ताच्या नियमाधीन असलेले वडील फक्त यहोवाच्या उपासेनेसंबंधित घडलेले पाप हाताळतात. (गलती. ६:२) मतभेद किंवा गुन्हेगारीचे प्रकरण हाताळण्यासाठी देवाने सरकारी अधिकाऱ्यांना नेमलं आहे हे ते मान्य करतात. दंड भरण्याची मागणी करणं किंवा तुरुंगवासाची शिक्षा देणं या गोष्टीही सरकारी अधिकाऱ्यांच्या हाती आहेत. (रोम. १३:२-४) मंडळीत एखाद्याच्या हातून गंभीर पाप घडलं असल्यास वडिलांची काय जबाबदारी असते? ते शास्त्रवचनांचं परीक्षण करून निर्णय घेतात. ख्रिस्ताच्या नियमाचा पाया प्रेम आहे हे ते नेहमी लक्षात ठेवतात. प्रेमामुळे मंडळीतले वडील पुढे दिलेल्या प्रश्नांवर विचार करतात: मंडळीत ज्यांच्यावर अन्याय झाला आहे अशांना मदत करण्यासाठी कोणतं पाऊल उचलणं गरजेचं आहे? प्रेम हा गुण वडिलांना गंभीर पाप करणाऱ्याबद्दल पुढे दिलेल्या प्रश्नांवर विचार करण्यासाठी मदत करेल: तो पस्तावा दाखवत आहे का आणि यहोवासोबत त्याचं नातं पुन्हा जोडण्यासाठी आपण त्याला मदत करू शकतो का? टेहळणी बुरूज१९.०५ ७ ¶२३-२४
गुरुवार, २५ फेब्रुवारी
मी पित्यामुळे जिवंत आहे.—योहा. ६:५७.
असं म्हणून येशूने हे कबूल केलं, की त्याचा पिता हा जीवन देणारा आहे आणि पित्यामुळेच तो जिवंत आहे. येशूचा आपल्या पित्यावर पूर्ण भरवसा होता व त्याने त्याच्या सर्व शारीरिक गरजा पूर्ण केल्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यहोवाने त्याची आध्यात्मिक गरज पूर्ण केली. (मत्त. ४:४) आपलं यहोवासोबत एक चांगलं नातं असावं यासाठी तो आपल्यालाही मदत करतो. म्हणून बायबलमध्ये त्याने स्वतःबद्दलचं सत्य, मानवांबद्दलची त्याची इच्छा, आपल्या जीवनाचा उद्देश आणि भविष्यात तो काय करेल या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. सुरुवातीला सत्य शिकताना आपल्या पालकांनी किंवा इतर साक्षीदारांनी यहोवाला ओळखण्यासाठी आपल्याला मदत केली. यावरून दिसून येतं की यहोवाला आपल्यापैकी प्रत्येकाची काळजी आहे. आणि आजही तो मंडळीतल्या प्रेमळ वडिलांद्वारे व प्रौढ भाऊबहिणींद्वारे आपल्याला मदत करतो. तसंच, तो आपल्याला आणि भाऊबहिणींना मंडळीतल्या सभांद्वारे मार्गदर्शनही देतो. या आणि इतर मार्गांनी यहोवा आपल्याला दाखवतो की एक पिता म्हणून त्याचं आपल्यावर प्रेम आहे.—स्तो. ३२:८. टेहळणी बुरूज२०.०२ ३ ¶८; ५ ¶१३
शुक्रवार, २६ फेब्रुवारी
शांतीसाठी आणि एकमेकांच्या उन्नतीसाठी आपण होईल तितका प्रयत्न करू या.—रोम. १४:१९.
ईर्ष्येच्या भावनेमुळे आपसातली शांती टिकून राहत नाही. आपण आपल्या मनातून ईर्ष्येची भावना मुळासकट काढून टाकली पाहिजे. तसंच, इतरांच्या मनात ईर्ष्येचं बी रुजेल असं काहीही करण्याचं आपण टाळलं पाहिजे. इतरांना ईर्ष्येवर मात करण्यासाठी मदत व्हावी म्हणून आपण नेमकं काय करू शकतो? आणि आपण शांती कशी टिकवून ठेवू शकतो? आपल्या मनोवृत्तीचा आणि वागण्याबोलण्याचा इतरांवर मोठा प्रभाव पडू शकतो. आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा आपण “दिखावा” करावा असं जगाला वाटतं. (१ योहा. २:१६) पण अशा मनोवृत्तीमुळे ईर्ष्येला बढावा मिळतो. आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत किंवा आपण ज्या गोष्टी विकत घेण्याचा विचार करत आहोत त्यांबद्दल आपण सतत इतरांशी बोलण्याचं टाळलं पाहिजे. असं केल्याने आपण इतरांच्या मनात ईर्ष्येची भावना येण्यापासून रोखू शकतो. आणखी एका मार्गाने आपण ईर्ष्येच्या भावनेला इतरांच्या मनात वाढण्यापासून रोखू शकतो. तो म्हणजे, मंडळीत आपल्याला ज्या जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत त्यांबद्दल आपण फुशारकी मारणार नाही. जर आपण आपल्या जबाबदाऱ्यांबद्दल सतत बोलत असू तर एका अर्थी, आपण इतरांच्या मनात ईर्ष्येचं रोपटं वाढण्यासाठी सुपीक जमीन तयार करत असू. याउलट, आपण जेव्हा इतरांमध्ये मनापासून आवड घेतो आणि ते करत असलेल्या चांगल्या कामांबद्दल त्यांची प्रशंसा करतो, तेव्हा आपण त्यांना समाधानी राहायला मदत करतो. तसंच, यामुळे मंडळीत एकता आणि शांती बहरते. टेहळणी बुरूज२०.०२ १८ ¶१५-१६
शनिवार, २७ फेब्रुवारी
जगाच्या निर्मितीपासूनच त्याचे अदृश्य गुण . . . त्याने निर्माण केलेल्या गोष्टींवरून अगदी स्पष्टपणे दिसून [येतात].—रोम. १:२०.
आपण सृष्टीतून यहोवाबद्दल शिकू शकतो. (प्रकटी. ४:११) यहोवाने बनवलेल्या झाडांकडे आणि प्राण्यांकडे पाहा. त्यांच्या रचनेवरून तो खूप बुद्धिमान असल्याचं तुम्हाला दिसून येईल. तसंच, तुमच्या शरीराची रचना किती अद्भुत रीतीने केली आहे याचाही जरा विचार करा. (स्तो. १३९:१४) इतकंच काय तर, यहोवाने सूर्याला किती अमाप उर्जा दिली आहे यावरही विचार करा. खरंतर सूर्यासारखे असंख्य तारे अस्तित्वात आहेत. (यश. ४०:२६) तुम्ही जर यहोवाने बनवलेल्या सृष्टीचा विचार केला तर तुमची त्याच्याबद्दल असलेली कदर दिवसेंदिवस वाढत जाईल. यहोवा किती बुद्धिमान आणि शक्तिशाली आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. पण त्याच्याबद्दल प्रेम वाढवायचं असेल आणि त्याच्यासोबत जवळची मैत्री करायची असेल तर आपल्याला त्याच्याबद्दल आणखी माहिती घ्यावी लागेल. तुम्हाला या गोष्टीची खातरी असली पाहिजे की यहोवाला तुमची वैयक्तिक रीत्या काळजी आहे. बायबल म्हणतं, “जर तू त्याचा शोध करशील तर तो तुला सापडेल.” (१ इति. २८:९, पं.र.भा.) यहोवाही आपल्याला हेच आश्वासन देतो. खरंतर यहोवाने तुम्हाला त्याच्या “जवळ केले” आहे. (यिर्म. ३१:३) यहोवाने तुमच्यासाठी केलेल्या गोष्टींची तुम्ही जितकी जास्त कदर कराल तितकं तुमचं त्याच्यावरचं प्रेम वाढेल. टेहळणी बुरूज२०.०३ ४ ¶६-७
रविवार, २८ फेब्रुवारी
ही सेवा आमच्यावर सोपवली असल्यामुळे आम्ही धैर्य सोडत नाही.—२ करिंथ. ४:१.
सेवाकार्याला जीवनात प्रथमस्थान देण्याबाबतीत पौलने चांगलं उदाहरण मांडलं. दुसऱ्या मिशनरी दौऱ्यादरम्यान करिंथमध्ये असताना त्याच्यासमोर आर्थिक समस्या आली आणि यामुळे त्याला काही वेळेसाठी तंबू बनवण्याचं काम करावं लागलं. सेवाकार्यादरम्यान स्वतःचा खर्च भागवता यावा म्हणून त्याने हे काम केलं आणि यामुळे “कोणताही मोबदला न घेता” तो करिंथच्या लोकांना आनंदाचा संदेश सांगू शकला. (२ करिंथ. ११:७) पौलला जरी काम करावं लागलं तरी त्याने सेवाकार्याला प्रथमस्थानी ठेवलं आणि प्रत्येक शब्बाथाच्या दिवशी प्रचार केला. परिस्थिती सुधारल्यानंतर पौलला प्रचारकार्यावर जास्तीत जास्त लक्ष देणं शक्य झालं. “यहुद्यांना साक्ष देऊन येशू हाच ख्रिस्त आहे याची तो त्यांना खातरी पटवून देऊ लागला.” (प्रे. कार्ये १८:३-५; २ करिंथ. ११:९) नंतर रोममध्ये दोन वर्षांसाठी त्याला नजरकैद करण्यात आलं, तेव्हा त्याला भेटायला येणाऱ्या लोकांना त्याने साक्ष दिली आणि इतर वेळी त्याने पत्रंही लिहिली. (प्रे. कार्ये २८:१६, ३०, ३१) कोणत्याही गोष्टीला आपल्या सेवाकार्याच्या आड न येऊ देण्याचा पौलचा पक्का निर्धार होता. टेहळणी बुरूज१९.०४ ४ ¶९