वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • th अभ्यास १५ पृ. १८
  • खातरीने बोला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खातरीने बोला
  • वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • मिळती जुळती माहिती
  • आवेश
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • रोजच्या बोलण्याची शैली
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • श्रोत्यांना शिकता येईल अशी माहिती
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • प्रभावी समाप्ती
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
अधिक माहिती पाहा
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
th अभ्यास १५ पृ. १८

अभ्यास १५

खातरीने बोला

उल्लेखित शास्त्रवचन

१ थेस्सलनीकाकर १:५

सारांश: तुम्ही जे सांगत आहात ते सत्य आहे आणि ती माहिती अत्यंत महत्त्वाची आहे हे दाखवून द्या.

हे कसं कराल:

  • चांगली तयारी करा. तयारी करताना माहितीचा चांगला अभ्यास करा आणि शास्त्रवचनांच्या आधारावर ती कशी खरी आहे हे आधी तुम्ही समजून घ्या. तुमच्या सादरतेतील मुख्य मुद्दे थोडक्या व सोप्या शब्दात मांडायचा प्रयत्न करा. श्रोत्यांना त्याचा कसा फायदा होईल यावर लक्ष केंद्रित करा. पवित्र आत्म्याची मदत मिळावी म्हणून प्रार्थना करा.

    व्यावहारिक सूचना

    तुमच्या मनात माहिती पक्की बसावी आणि तुम्हाला भाषण चांगल्या प्रकारे सादर करता यावं म्हणून मोठ्याने सराव करा.

  • खातरीने बोलत आहात हे दाखवण्यासाठी तसे शब्द वापरा. छापील साहित्यातील शब्द जसेच्या तसे बोलून दाखवण्याऐवजी स्वतःच्या शब्दात भाषण सादर करा. असे शब्द वापरा ज्यावरून कळेल, की तुम्ही जे काही सांगत आहात त्याबद्दल तुम्हाला स्वतःला खातरी आहे.

  • कळकळीने व प्रामाणिकपणे बोला. ऐकू येईल अशा मोठ्या आवाजात बोला. लोकांना खटकणार नसेल तर श्रोत्यांच्या नजरेला नजर भिडवून बोला.

    व्यावहारिक सूचना

    खातरीने बोलण्याचा अर्थ वाटेल तसं बोलणं, एखाद्या गोष्टीबाबत स्वतःचं मत सांगणं किंवा लादणं असा होत नाही. तुम्ही मनापासून बोलत असला, तरी तुम्ही प्रेमळपणे विनंती करत आहात हे श्रोत्यांना कळलं पाहिजे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा