वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • th अभ्यास १४ पृ. १७
  • मुख्य मुद्द्‌यांवर जोर द्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मुख्य मुद्द्‌यांवर जोर द्या
  • वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • मिळती जुळती माहिती
  • शीर्षक व मुख्य मुद्दे ठळकपणे मांडणे
    ईश्‍वरशासित सेवा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक
  • मुख्य मुद्द्‌यांवर पुन्हा विचार करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • तुमच्या श्रोत्यांची खात्री पटवा, त्यांच्याशी विवाद करा
    ईश्‍वरशासित सेवा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक
  • योग्य समाप्ती व तुमचा वेळ
    ईश्‍वरशासित सेवा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक
अधिक माहिती पाहा
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
th अभ्यास १४ पृ. १७

अभ्यास १४

मुख्य मुद्द्‌यांवर जोर द्या

उल्लेखीत शास्त्रवचन

इब्री लोकांना ८:१

सारांश: भाषण देताना श्रोत्यांना तुम्ही सांगत असलेली माहिती समजण्यास मदत करा. आणि प्रत्येक मुद्दा तुमच्या भाषणाच्या उद्देशाशी व विषयाशी कसा संबंधित आहे ते स्पष्ट करा.

हे कसं कराल:

  • भाषणाचा उद्देश ठरवा. तुम्ही सादर करत असलेलं भाषण माहिती देण्यासाठी आहे, खातरी पटवण्यासाठी की श्रोत्यांना कार्य करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आहे याचा विचार करा आणि त्यानुसार ते तयार करा. सर्व मुख्य मुद्दे तुम्हाला तुमच्या भाषणाचा उद्देश साध्य करण्यास मदत करत आहेत याची खातरी करा.

    व्यावहारिक सूचना

    स्वतःला विचारा: ‘या विषयावर श्रोत्यांच्या मनात कोणते प्रश्‍न येऊ शकतात किंवा ते कोणता आक्षेप घेऊ शकतात? हे प्रश्‍न आणि आक्षेप त्यांच्या मनात कोणत्या क्रमाने येऊ शकतात?’ आणि मग त्याच पद्धतीने तुमचे मुद्दे मांडा. यामुळे तुमच्या श्रोत्यांना तुम्ही सादर करत असलेली माहिती समजेल व ते ती माहिती स्वीकारतील.

  • भाषणाच्या विषयावर जोर द्या. संपूर्ण भाषणादरम्यान मुख्य शब्दांचा किंवा समानार्थी शब्दांचा अधूनमधून उल्लेख करून भाषणाचा विषय सांगा.

  • मुख्य मुद्दे स्पष्ट व सोप्या पद्धतीने सांगा. तुमच्या विषयाला लागू होणारे मुख्य मुद्देच निवडा ज्यामुळे तुम्ही भाषणासाठी असलेल्या वेळेतच ते प्रभावी पद्धतीने मांडू शकाल. मुख्य मुद्दे कमीच ठेवा. प्रत्येक मुख्य मुद्दा स्पष्टपणे सांगा. एक मुद्दा सांगून झाल्यावर थांबा. आणि एका मुद्द्‌यावरून दुसऱ्‍या मुद्द्‌यावर जाताना त्यांतील संबंध सांगा.

    व्यावहारिक सूचना

    भाषणाच्या प्रस्तावनेत तुम्ही मुख्य मुद्द्‌यांचा उल्लेख करू शकता. यामुळे श्रोत्यांना भाषणादरम्यान त्यांच्याकडे लक्ष देता येईल. किंवा मग भाषणाच्या समाप्तीलासुद्धा तुम्ही त्यांचा पुन्हा उल्लेख करू शकता ज्यामुळे ते मुद्दे श्रोत्यांच्या लक्षात राहतील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा