वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • th अभ्यास १ पृ. ४
  • प्रभावी प्रस्तावना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रभावी प्रस्तावना
  • वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • मिळती जुळती माहिती
  • प्रभावी प्रस्तावना
    ईश्‍वरशासित सेवा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक
  • व्यावहारिक फायदे स्पष्ट करा
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
th अभ्यास १ पृ. ४

अभ्यास १

प्रभावी प्रस्तावना

उल्लेखीत शास्त्रवचन

प्रेषितांची कार्ये १७:२२

सारांश: तुमच्या प्रस्तावनेमुळे श्रोत्यांमध्ये विषयाबद्दल आवड निर्माण झाली पाहिजे. तसंच, त्यावरून तुमचा मुख्य विषय आणि तो विषय श्रोत्यांसाठी का महत्त्वाचा आहे हे स्पष्ट झालं पाहिजे.

हे कसं कराल:

  • आवड निर्माण करा. श्रोत्यांची उत्सुकता वाढेल असा एखादा प्रश्‍न, वाक्य, सत्य घटना किंवा एखाद्या बातमीचा उल्लेख करा.

    व्यावहारिक सूचना

    कोणत्या विषयात त्यांना आवड आहे किंवा त्यांना कोणत्या गोष्टींची चिंता आहे त्यावर आधीपासूनच विचार करा आणि मग त्यानुसार आपल्या प्रस्तावनेत फेरबदल करा.

  • मुख्य विषय स्पष्ट करा. तुमच्या प्रस्तावनेतून तुमचा मुख्य विषय आणि तुमच्या सादरतेचा हेतू लोकांना स्पष्टपणे समजला पाहिजे.

  • विषय महत्त्वाचा का आहे ते दाखवा. लोकांच्या व्यावहारिक गरजा लक्षात घेऊन त्यानुसार आपल्या प्रस्तावनेत फेरबदल करा. तुम्ही सांगत असलेल्या माहितीमुळे त्यांना वैयक्‍तिक रित्या कसा फायदा होईल, हे त्यांना स्पष्टपणे समजलं पाहिजे.

    व्यावहारिक सूचना

    भाषणाची तयारी करताना स्वतःला विचारा, ‘माझ्या मंडळीतल्या भाऊबहिणींसमोर कोणत्या अडचणी आहेत?’ मग त्यांच्या गरजांनुसार तुमच्या प्रस्तावनेत बदल करा.

सेवेत

एखाद्या व्यक्‍तीला नक्की कशात आवड आहे हे जाणून घेण्यासाठी त्याच्या किंवा तिच्या कार्यांचं किंवा आजूबाजूच्या परिसराचं निरीक्षण करा. आणि मग त्या गोष्टींबद्दल काहीतरी बोलून किंवा एखादा प्रश्‍न विचारून संभाषणाला सुरुवात करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा