भाग चार
“मी माझ्या पवित्र नावाबद्दल मोठा आवेश दाखवीन”—शुद्ध उपासना गोगच्या हल्ल्यापासून वाचते
भाग कशाबद्दल आहे: यहोवा आपल्या लोकांना मोठ्या संकटातून वाचवतो
यहोवाचं मानवांवर प्रेम आहे, पण तो त्यांच्या कामांचा हिशोबही घेतो. जे लोक यहोवाची शुद्ध उपासना करण्याचा दावा करतात, पण आपल्या कामांनी त्याचा विश्वासघात करतात त्यांच्याबद्दल त्याला कसं वाटतं? मोठ्या संकटातून कोण वाचणार हे यहोवा कसं ठरवतो? आणि एक प्रेमळ देव यहोवा करोडो लोकांचा नाश का करेल?