भाग तीन
‘मी तुम्हाला गोळा करीन’—शुद्ध उपासना पुन्हा सुरू होण्याचं वचन
भाग कशाबद्दल आहे: शुद्ध उपासना पुन्हा कशी सुरू होईल हे यहेज्केलच्या भविष्यवाण्यांमध्ये सांगितलं आहे
धर्मत्याग केल्यामुळे इस्राएल राष्ट्र विभाजित झालं आहे. त्या राष्ट्रात एकी राहिली नाही. त्या राष्ट्राने शुद्ध उपासना भ्रष्ट केली आणि देवाच्या नावाची बदनामी केली. याचेच वाईट परिणाम ते भोगत आहेत. पण अशा वाईट काळात यहोवा यहेज्केलला एकापाठोपाठ एक अनेक भविष्यवाण्या करायला सांगतो. त्यांमुळे लोकांना आशा मिळते. यहोवा त्या भविष्यवाण्यांमध्ये लक्ष वेधून घेणाऱ्या शब्दचित्रांचा आणि विस्मयकारक दृष्टान्तांचा वापर करतो. यामुळे बंदिवासात असलेल्या इस्राएली लोकांना आणि शुद्ध उपासना पुन्हा सुरू होण्याची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या सगळ्यांनाच खूप प्रोत्साहन मिळतं.