भाग पाच
‘मी लोकांमध्ये राहीन’—यहोवाची शुद्ध उपासना पुन्हा सुरू होते
भाग कशाबद्दल आहे: दृष्टान्तातल्या मंदिराची काही वैशिष्ट्यं आणि त्यांपासून शुद्ध उपासनेबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं
यहोवाने यहेज्केल संदेष्ट्याला आणि प्रेषित योहानला जे दृष्टान्त दाखवले त्यांत काही खास समानता आहेत. दृष्टान्तांतल्या त्या वैशिष्ट्यांपासून आज आपल्याला बरेच मोलाचे धडे शिकायला मिळतात. त्यामुळे यहोवाला आवडेल अशा प्रकारे त्याची उपासना करायला आपल्याला मदत होते. तसंच, नवीन जगातलं आपलं जीवन कसं असेल याची एक झलकही आपल्याला मिळते.