वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lfb पाठ ७ पृ. २४
  • बाबेलचा बुरूज

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बाबेलचा बुरूज
  • बायबलमधून शिकू या!
  • मिळती जुळती माहिती
  • माणसं एक मोठा बुरुज बांधतात
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • नोहाचं जहाज
    बायबलमधून शिकू या!
  • त्यांनी आपले नाव केले नाही
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
बायबलमधून शिकू या!
lfb पाठ ७ पृ. २४
यहोवाने लोकांची भाषा बदलल्यानंतर सोबत मिळून बाबेलचा बुरूज बांधणं त्यांना शक्य होत नाही

पाठ ७

बाबेलचा बुरूज

जलप्रलयानंतर नोहाच्या मुलांना खूप मुलं झाली. मग त्यांचं कुटुंब वाढत गेलं. आणि यहोवाने सांगितलं होतं त्याप्रमाणे लोक पूर्ण पृथ्वीवर पसरले.

पण काही कुटुंबांनी यहोवाचं ऐकलं नाही. ते म्हणाले: ‘चला आपण एक शहर बांधून इथेच राहू. तसंच एक बुरूजसुद्धा बांधू. इतका उंच, की तो अगदी आकाशापर्यंत पोचेल. यामुळे आपलं नाव मोठं होईल.’

पण लोक जे करत होते ते पाहून यहोवाला दुःख झालं. म्हणून त्याने त्यांना थांबवण्याचं ठरवलं. त्याने हे कसं केलं तुला माहीत आहे? त्याने असं काहीतरी केलं, की लोक अचानक वेगवेगळ्या भाषा बोलू लागले. ते काय बोलत होते ते एकमेकांना कळतच नव्हतं. त्यामुळे बुरूज बांधायचं काम त्यांना थांबवावं लागलं. ते जे शहर बांधत होते त्याचं नाव बाबेल पडलं. बाबेलचा अर्थ होतो, गोंधळ. त्यानंतर लोक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ लागले. अशा प्रकारे ते पूर्ण पृथ्वीवर पसरले. नवीन ठिकाणी जाऊनसुद्धा ते वाईट कामं करत राहिले. मग, अशी एकही व्यक्‍ती नव्हती का, जिचं यहोवावर प्रेम होतं? हे आपल्याला पुढच्या धड्यात समजेल.

“जो कोणी स्वतःला उंच करतो त्याला नमवलं जाईल आणि जो कोणी स्वतःला नम्र करतो त्याला उंचावलं जाईल.”—लूक १८:१४

प्रश्‍न: बाबेलच्या लोकांनी काय केलं? यहोवाने त्यांना कसं थांबवलं?

उत्पत्ति ११:१-९

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा