वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lfb पाठ ८ पृ. २६-पृ. २७ परि. १
  • अब्राहाम आणि साराने यहोवाचं ऐकलं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अब्राहाम आणि साराने यहोवाचं ऐकलं
  • बायबलमधून शिकू या!
  • मिळती जुळती माहिती
  • अब्राहाम–देवाचा मित्र
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • अब्राहाम व सारा - तुम्ही त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करू शकता!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • यहोवानं त्याला “माझा मित्र” म्हटलं
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • देव अब्राहामाच्या विश्‍वासाची परीक्षा घेतो
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
बायबलमधून शिकू या!
lfb पाठ ८ पृ. २६-पृ. २७ परि. १
अब्राहाम आणि सारा सामान बांधून ऊर शहर सोडण्याची तयारी करताना

पाठ ८

अब्राहाम आणि साराने यहोवाचं ऐकलं

बाबेलच्या जवळच ऊर नावाचं शहर होतं. तिथले लोक यहोवाला सोडून दुसऱ्‍या देवी-देवतांची उपासना करायचे. पण त्या शहरात एक असाही पुरुष होता, जो फक्‍त यहोवाचीच उपासना करायचा. त्याचं नाव होतं अब्राहाम.

यहोवाने अब्राहामला सांगितलं: ‘तू आपलं घर आणि नातेवाइकांना सोडून, जे ठिकाण मी तुला दाखवेन तिथे जा.’ मग देवाने त्याला वचन दिलं: ‘तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र बनेल. तू विश्‍वासू राहिल्यामुळे मी पूर्ण पृथ्वीवर अनेक लोकांसाठी चांगल्या गोष्टी करेन.’

अब्राहामला हे माहीत नव्हतं, की यहोवा त्याला कुठे पाठवणार आहे. पण, त्याने यहोवावर भरवसा ठेवला. मग अब्राहाम, त्याची पत्नी सारा, त्याचे वडील तेरह आणि त्याचा भाचा लोट यांनी सामान बांधलं आणि यहोवाने सांगितल्याप्रमाणे ते लांबच्या प्रवासाला निघाले.

शेवटी अब्राहाम आणि त्याचं कुटुंब त्या ठिकाणी पोचलं जे यहोवाला त्यांना दाखवायचं होतं. त्या ठिकाणाचं नाव होतं कनान. आता अब्राहाम ७५ वर्षांचा झाला होता. तिथे पोचल्यावर देव अब्राहामसोबत बोलला. त्याने त्याला असं वचन दिलं: ‘ही सगळी जागा जी तू पाहत आहेस, ती मी तुझ्या मुलांना देईन.’ पण, अब्राहाम आणि सारा यांना एकही मूल नव्हतं आणि आता तर ते म्हातारेही झाले होते. मग यहोवा जे बोलला ते कसं काय पूर्ण होणार होतं?

अब्राहाम आणि त्याचं कुटुंब कनानला जात असताना

“विश्‍वासानेच . . . [अब्राहामने] आज्ञा मानली आणि देवाकडून वारशाने मिळणार असलेल्या ठिकाणी तो जायला निघाला; आपण कुठे जात आहोत हे माहीत नसतानाही तो गेला.” —इब्री लोकांना ११:८

प्रश्‍न: यहोवाने अब्राहामला काय करायला सांगितलं? यहोवाने अब्राहामला कोणती वचनं दिली?

उत्पत्ति ११:२९–१२:९; प्रेषितांची कार्ये ७:२-४; गलतीकर ३:६; इब्री लोकांना ११:८

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा