वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • fy अध्या. १ पृ. ४-१२
  • कौटुंबिक सौख्यानंदाचे एखादे रहस्य आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कौटुंबिक सौख्यानंदाचे एखादे रहस्य आहे का?
  • कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कुटुंब काय आहे?
  • तणावाखाली असलेले कुटुंब
  • कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
  • कौटुंबिक जीवनात ईश्‍वरी शांती अनुसरणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा
    कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा
  • कौटुंबिक सौख्यानंदाची किल्ली शोधणे
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
  • कुटुंब—मानवी गरज!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
अधिक माहिती पाहा
कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
fy अध्या. १ पृ. ४-१२
४ पानांवरील पानभरुन चित्र

अध्याय १

कौटुंबिक सौख्यानंदाचे एखादे रहस्य आहे का?

५ पानांवरील चित्र

१. मानवी समाजात दृढ कुटुंबे महत्त्वपूर्ण का आहेत?

कुटुंब ही पृथ्वीवरील सर्वात पुरातन व्यवस्था आहे आणि मानवी समाजात ती महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. संपूर्ण इतिहासात, दृढ कुटुंबांनी दृढ समाज बनविण्यास मदत केली आहे. परिपक्व प्रौढ असे मुलांचे संगोपन करण्यासाठी कुटुंब ही उत्तम व्यवस्था आहे.

२-५. (अ) एखाद्या मुलाला आनंदी कुटुंबात जी सुरक्षितता वाटते त्याचे वर्णन करा. (ब) काही कुटुंबांत कोणत्या समस्या असल्याचे सांगितले जाते?

२ आनंदी कुटुंब, निर्श्‍चितता आणि सुरक्षिततेचा एक निवारा आहे. आता एखाद्या आदर्श कुटुंबाचे दृश्‍य अंमळ डोळ्यांपुढे आणा. सायंकाळच्या भोजनप्रसंगी, काळजी घेणारे पालक आपल्या मुलांसोबत बसतात आणि दिवसभरात काय घडले त्याची चर्चा करतात. शाळेत काय घडले त्याबद्दल मुले त्यांच्या आई वडिलांना मोठ्या उत्साहाने सांगतात. विरंगुळ्यात एकत्र घालविलेला वेळ प्रत्येकाला बाहेरील जगाच्या आणखी एका दिवसाकरता ताजेतवाने करतो.

३ आनंदी कुटुंबात मूल आजारी पडते तेव्हा आईवडील त्याची काळजी घेतील हे मुलाला माहीत असते, यासाठी कदाचित त्यांना रात्रीच्या वेळी आळीपाळीने त्याच्या शेजारी बसावे लागेल. मुलाला माहीत असते, की तो त्याच्या आईवडिलांना तारुण्यातील समस्या सांगू शकतो व त्यावर त्यांचा सल्ला आणि पाठबळ त्याला मिळू शकते. होय, बाहेरचे जग कितीही संकटग्रस्त असले तरी मुलाला सुरक्षित वाटते.

४ मुले मोठी झाल्यावर सामान्यपणे त्यांचा विवाह होतो व त्यांचे स्वतःचे कुटुंब असते. “एखाद्याला जेव्हा स्वतःचे मूल होते तेव्हा ते स्वतः त्याच्या पालकांचे किती ऋणी आहे हे त्याला कळते,” अशी एक पौर्वात्य म्हण आहे. कृतज्ञतेची गाढ जाणीव आणि प्रेम यामुळे प्रौढ मुले त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाला आनंदी बनविण्याचा प्रयत्न करतात तसेच नातवंडांच्या सहवासात रमणाऱ्‍या त्यांच्या वृद्ध पालकांची देखील ते काळजी घेतात.

५ तुम्ही या क्षणी कदाचित असा विचार करत आहात: ‘माझ्या कुटुंबावर माझे प्रेम आहे हे खरे पण येथे वर्णन केल्याप्रमाणे ते नाही. मला व माझ्या सोबत्याला वेगवेगळ्या वेळांमध्ये काम करावे लागते आणि आम्ही एकदुसऱ्‍यांना क्वचितच पाहतो. बहुतेककरून आम्ही पैशाच्या समस्यांविषयीच बोलत असतो.’ किंवा, ‘माझी मुले आणि नातवंडे दुसऱ्‍या शहरात राहतात व मला त्यांना भेटण्यास मिळत नाही,’ असे तुम्ही म्हणता का? होय, अनेकदा याची कारणे त्यात समाविष्ट असणाऱ्‍यांच्या नियंत्रणाबाहेर असल्यामुळे, अनेकांचे कौटुंबिक जीवन एक आदर्श नाही. असे असले तरी, काहींचे कौटुंबिक जीवन आनंदी आहे. ते कसे बरे? कौटुंबिक सौख्यानंदाचे एखादे रहस्य आहे का? याचे उत्तर होय, असे आहे. पण ते काय आहे याची चर्चा करण्याअगोदर, आपण एका महत्त्वपूर्ण प्रश्‍नाचे उत्तर दिले पाहिजे.

कुटुंब काय आहे?

६. या पुस्तकात कोणत्या प्रकारच्या कुटुंबांविषयी चर्चा करण्यात येईल?

६ पाश्‍चिमात्य देशांत, अधिकांश कुटुंबांमध्ये माता, पिता आणि मुले असतात. आजी आजोबा त्यांना शक्य आहे तोवर स्वतःच्या घरांत राहतात. अधिक दूरच्या नातेवाईकांसोबत संपर्क ठेवला असताना त्यांच्याविषयीच्या जबाबदाऱ्‍या मर्यादित होतात. मुलभूतपणे, या पुस्तकात आपण अशाच प्रकारच्या कुटुंबाची चर्चा करणार आहोत. परंतु, अलीकडील वर्षांमध्ये इतर कुटुंबे—एक पालकीय कुटुंब, सावत्र कुटुंब आणि एखाद-दुसऱ्‍या कारणामुळे एकत्र राहत नसलेल्या पालकांचे कुटुंब—अधिकच सामान्य बनले आहेत.

७. विस्तृत कुटुंब काय आहे?

७ काही संस्कृतींमध्ये विस्तृत कुटुंब सामान्य आहे. या व्यवस्थेत, शक्य असल्यास, मुले आजी आजोबांची नित्याने काळजी घेतात, त्यांच्या दूरच्या नातेवाईकांसोबत देखील जवळचे संबंध राखले जातात आणि त्यांच्याबद्दल जबाबदाऱ्‍या असतात. उदाहरणार्थ, कौटुंबिक सदस्य, त्यांच्या पुतणी-पुतण्यांना किंवा अधिक दूरच्या नातेवाईकांना मदत करण्यास, त्यांचे पालनपोषण करण्यास किंवा त्यांच्या शिक्षणाचा खर्च देण्यासही साहाय्य करतील. या प्रकाशनात चर्चा करण्यात येणारी तत्त्वे विस्तृत कुटुंबांना देखील लागू होतात.

तणावाखाली असलेले कुटुंब

८, ९. काही देशातील कोणत्या समस्या कुटुंब बदलत चालल्याचे दाखवतात?

८ आज कुटुंबात बदल होत आहे—तो बदल चांगल्यासाठी नाही, हे सांगण्यास वाईट वाटते. भारतात याचे एक उदाहरण पाहावयास मिळते, जेथे पत्नीला तिच्या पतीच्या कुटुंबासोबत राहावे लागते आणि सासरच्या लोकांच्या सांगण्याप्रमाणे घरात काम करावे लागते. पण, भारतीय पत्नींनी घराबाहेरील नोकरी शोधणे अलीकडे असामान्य राहिलेले नाही. तरी देखील, घरातील त्यांच्या परंपरागत भूमिकांना पूर्ण करण्याची अपेक्षा त्यांच्याकडून केली जाते हे उघड आहे. कुटुंबातील इतर सदस्यांच्या तुलनेत नोकरी करणाऱ्‍या स्त्रीकडून घरामध्ये किती काम करण्याची अपेक्षा केली जाऊ शकते असा प्रश्‍न अनेक देशांत विचारला जातो.

९ पौर्वात्य समाजांमध्ये, विस्तृत कुटुंबातील दृढ बंधने परंपरागत आहेत. तथापि, पाश्‍चिमात्य-शैलीच्या व्यक्‍तिवादाच्या प्रभावामुळे आणि आर्थिक समस्यांच्या तणावामुळे पारंपारिक विस्तृत कुटुंब कमकुवत बनत चालले आहे. यास्तव, कुटुंबातील वयस्कर सदस्यांची काळजी घेण्याकडे अनेक जण एक कर्तव्य किंवा विशेषाधिकार म्हणून पाहण्याऐवजी एक ओझे म्हणून पाहत आहेत. काही वडीलधाऱ्‍या पालकांना गैरवागणूक दिली जाते. खरेच, वयस्करांना गैरवागणूक दिल्याचे आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे आज अनेक देशांमध्ये दिसून येत आहे.

१०, ११. युरोपीय देशांमध्ये कुटुंब बदलत चालले आहेत हे कोणत्या वस्तुस्थितींवरून दिसते?

१० घटस्फोट अधिकच सामान्य होत चालला आहे. विसाव्या शतकाच्या अंतिम दशकाच्या सुरूवातीपर्यंत स्पेनमध्ये घटस्फोटाचे प्रमाण ८ विवाहांमध्ये १ इतके वाढले—केवळ २५ वर्षांपूर्वी १०० मध्ये १ या प्रमाणातील ही अचानक वाढ होती. अहवालानुसार युरोपमध्ये घटस्फोटाचे उच्च प्रमाण (१० विवाहांमध्ये ४ तुटण्याची अपेक्षा केली जाते) असताना ब्रिटनने एक पालकीय कुटुंबांच्या संख्येतील अचानक वाढ पाहिली आहे.

११ जर्मनीतील अनेक जन पारंपारिक कुटुंबाचा पूर्णपणे त्याग करीत असल्याचे दिसत आहे. सन १९९० च्या दशकाने, जर्मनीत ३५ टक्के कुटुंबे एका व्यक्‍तीचे आणि ३१ टक्के कुटुंबे केवळ दोन व्यक्‍तींचे मिळून बनल्याचे पाहिले आहे. फ्रेंच लोक देखील कमी वेळा विवाह करतात आणि जे विवाह करतात ते अनेकदा व पूर्वीपेक्षा लवकरच घटस्फोट घेतात. अधिकाधिक लोक विवाहाच्या कोणत्याही जबाबदाऱ्‍यांशिवाय एकत्र राहण्याचे पसंत करतात. तुलना करण्याजोग्या प्रवृती सर्वत्र दिसत आहेत.

१२. आधुनिक कुटुंबातील बदलांमुळे मुलांना कसा त्रास होतो?

१२ मुलांबद्दल काय? संयुक्‍त संस्थांने आणि इतर अनेक देशांमध्ये, विवाहाविना अधिकाधिक मुलांचा जन्म होत आहे, यातील काही मुले किशोरवयीनांना होत आहेत. अनेक किशोरवयीन मुलींना वेगवेगळ्या पित्यांकडून अनेक मुले होतात. संपूर्ण जगभरातील अहवाल, रस्त्यावर भटकणाऱ्‍या लक्षावधी गृहहीन मुलांविषयी सांगतात; अनेक मुले गैरवागणूक दिल्या जाणाऱ्‍या घरांमधून पळून जात आहेत किंवा कुटुंबांना त्यांचा सांभाळ करणे शक्य नसल्यामुळे त्यांची हकालपट्टी केली जात आहे.

१३. सर्वत्र फैलावलेल्या कोणत्या समस्या कुटुंबांच्या सौख्यानंदाला लुबाडतात?

१३ होय, कुटुंब संकटांत आहे. आधीच जे सांगितले आहे त्या व्यतिरिक्‍त, किशोरवयीन बंडाळी, मुलांना दिली जाणारी गैरवागणूक, सोबत्यामधील हिंसाचार, दारूबाजी आणि इतर विध्वंसक समस्या अनेक कुटुंबातील सौख्यानंद हिरावून घेतात. कुटुंब, अनेक मुले व प्रौढांकरता निवाऱ्‍याचे ठिकाण निश्‍चितच राहिले नाही.

१४. (अ) काहींच्या मते, कौटुंबिक संकटांची काही कारणे कोणती आहेत? (ब) पहिल्या शतकातील एका वकिलाने आजच्या जगाचे वर्णन कसे केले आणि कौटुंबिक जीवनावर त्याच्या शब्दांच्या पूर्णतेचा प्रभाव काय झाला?

१४ कुटुंब संकटात का आहे बरे? आधुनिक दिवसांतील कौटुंबिक संकटे, स्रियांनी बाहेर काम करण्यास सुरवात केल्यामुळे आहेत असा ठपका काही जण ठेवतात. इतर जण आजच्या ढासळलेल्या नैतिकतेकडे अंगुली दर्शवतात. आणखीही काही कारणे दिली जातात. ग्रस्त करतील अशा अनेक दबावांचा कुटुंबावर परिणाम होणार, असे एका सुप्रसिद्ध वकिलाने सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी, आपल्या लिखाणामध्ये याप्रकारे भाकीत केले: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापांस न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्‍वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी,” अशी होतील. (२ तीमथ्य ३:१-४) आज या शब्दांची पूर्णता होत आहे याबद्दल कोणी संशय घेईल का? अशा परिस्थिती असलेल्या जगात, अनेक कुटुंबे संकटांत आहेत यात काही आश्‍चर्य आहे का?

कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य

१५-१७. या पुस्तकात, कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य असल्याचे दाखवण्यासाठी कोणत्या प्रमाणाकडे अंगुली दर्शवली जाईल?

१५ कुटुंबात सौख्यानंद कसा मिळवता येऊ शकतो याबद्दल सर्वत्र सल्ला दिला जातो. पाश्‍चिमात्य देशांमध्ये, मार्गदर्शनाची पुस्तके आणि मासिके सल्ला सादर करतात. समस्या अशी आहे, की मानवी सल्लागार परस्परविरोधी प्रतिपादने करतात आणि आज अद्ययावत असलेल्या सल्लाकडे उद्या निकामी असल्याप्रमाणे पाहिले जाईल.

१६ तर मग, कुटुंबाच्या विश्‍वसनीय मार्गदर्शनासाठी आपण कोठे पाहू शकतो? सुमारे १,९०० वर्षांपूर्वी पूर्ण झालेल्या एका पुस्तकाकडे तुम्ही पाहाल का? अथवा अशा प्रकारचे पुस्तक टाकाऊ झाले आहे असे तुम्हाला वाटेल? खरे तर, केवळ याच उगमात कौटुंबिक सौख्यानंदाचे वास्तविक रहस्य आढळते.

१७ तो उगम बायबल आहे. सर्व पुराव्यानुसार, देवाने स्वतः ते प्रेरित केले होते. बायबलमध्ये आपल्याला पुढील वाक्य आढळते: “प्रत्येक परमेश्‍वरप्रेरित शास्त्रलेख सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्‍यांकरिता उपयोगी आहे.” (२ तीमथ्य ३:१६) आज कुटुंबे तोंड देत असलेल्या दबावांना आणि समस्यांना हाताळत असताना बायबल ‘सुधारणूक करण्यासाठी’ कशी मदत करू शकते हे विचारात घेण्याचे उत्तेजन आम्ही या प्रकाशनात देऊ.

१८. वैवाहिक सल्ला देण्यासाठी बायबलला प्रमाणभूत समजून त्याचा स्वीकार करणे समजूतदारपणाचे का आहे?

१८ बायबल, कुटुंबांना आनंदी करू शकते या शक्यतेला आपल्या विचारातून काढून टाकण्याकरता प्रवृत्त झाल्यास याचा विचार करा: ज्याने बायबल प्रेरित केले तो विवाह व्यवस्थेचा जनक आहे. (उत्पत्ति २:१८-२५) बायबल त्याचे नाव यहोवा असल्याचे सांगते. (स्तोत्र ८३:१८) तो निर्माणकर्ता आणि ‘प्रत्येक वंशास ज्यावरून नाव देण्यात येते तो पिता,’ आहे. (इफिसकर ३:१४, १५) मानवजातीच्या आरंभापासूनच यहोवाने कौटुंबिक जीवनाचे निरीक्षण केले आहे. उद्‌भवणाऱ्‍या समस्या तो जाणतो आणि त्या सोडवण्याकरता त्याने सल्ला दिला आहे. संपूर्ण इतिहासात, ज्यांनी त्यांच्या कौटुंबिक जीवनात बायबलच्या तत्त्वांचा प्रामाणिकपणे अवलंब केला त्यांना अधिक सौख्यानंद मिळाला.

१९-२१. आधुनिक दिवसांतील कोणते अनुभव वैवाहिक समस्यांना सोडवण्यातील बायबलचे सामर्थ्य दाखवतात?

१९ उदाहरणार्थ, इंडोनेशियातील एक गृहिणी मनोविकृत जुगारी होती. अनेक वर्षे तिने आपल्या तीन मुलांकडे दुर्लक्ष केले आणि रोज नवऱ्‍याबरोबर भांडत असे. नंतर, तिने बायबल अभ्यास सुरू केला. बायबल जे सांगते त्यावर त्या स्रीचा हळूहळू विश्‍वास बसू लागला. तिने त्यातील सल्ला लागू केला तेव्हा ती एक चांगली पत्नी बनली. बायबल तत्त्वांवर आधारित असलेल्या तिच्या प्रयत्नांमुळे संपूर्ण कुटुंबाला सौख्यानंद लाभला.

२० स्पेनमधील एक गृहिणी म्हणते: “आमच्या विवाहाला जेमतेम एक वर्ष झाले तेव्हा आमच्यात गंभीर समस्यांना सुरवात होऊ लागली.” पती व तिच्या आवडीनिवडीत अधिक साम्यता नव्हती, वादविवादाशिवाय ते एकदुसऱ्‍यांबरोबर बोलतच नसत. त्यांना एक तरुण मुलगी असताना देखील कायद्याने फारकत घेण्याचे त्यांनी ठरवले. तथापि, ते घडण्याआधी, बायबल काय सांगते त्याकडे लक्ष देण्याचे उत्तेजन त्यांना दिले गेले. त्यांनी विवाहित पुरुष आणि स्रियांकरता असलेल्या सल्ल्याचा अभ्यास केला आणि त्याचा अवलंब करण्याचे आरंभिले. लवकरच ते शांतीने दळणवळण करू लागले आणि त्यांच्या लहान कुटुंबात आनंदाने ऐक्य आले.

२१ बायबल, वयस्कर लोकांना देखील मदत करते. उदाहरणार्थ, एका जपानी जोडप्याच्या अनुभवाचा विचार करा. पती रागीट होता आणि कधीकधी हिंसक होत होता. पालकांचा विरोध असतानाही प्रथम या जोडप्याच्या मुलींनी अभ्यास करण्यास सुरवात केली. नंतर, पतीही मुलींबरोबर सहभागी झाला पण पत्नीने विरोध करण्याचे चालूच ठेवले. तथापि, काही वर्षांनंतर, बायबल तत्त्वांचा चांगला परिणाम तिने आपल्या कुटुंबात पाहिला. तिच्या मुली तिची चांगली काळजी घेऊ लागल्या आणि पती अधिक सौम्य झाला. अशा बदलांनी बायबल काय सांगते ते पाहण्यास तिला प्रवृत्त केले आणि याचा तिच्यावरही तसाच चांगला परिणाम झाला. या वयस्कर स्रीने वारंवार म्हटले: “आम्ही खरं विवाहित जोडपं बनलो.”

२२, २३. सर्व राष्ट्रीय पार्श्‍वभूमी असलेल्या लोकांना त्यांच्या कुटुंबात सौख्यानंद मिळवण्यासाठी बायबल कशी मदत करते?

२२ कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य शिकलेल्या पुष्कळांपैकी हे लोक आहेत. त्यांनी बायबलचा सल्ला स्वीकारून त्याचा अवलंब केला आहे. हे खरे की, इतरांप्रमाणे ते देखील हिंसक, अनैतिक, आर्थिकरित्या दबावाखाली असणाऱ्‍या जगात राहतात. याशिवाय, ते अपरिपूर्ण आहेत पण कुटुंब व्यवस्थेच्या जनकाची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात त्यांना सौख्यानंद मिळतो. बायबल म्हणते त्याप्रमाणे, यहोवा देव ‘जे हितकारक ते तुला शिकवणारा; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेणारा’ असा आहे.—यशया ४८:१७.

२३ बायबल सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी लिहून पूर्ण झाले असले तरी त्याचा सल्ला खरोखर अद्ययावत आहे. शिवाय, ते सर्व लोकांकरता लिहिले होते. बायबल हे काही अमेरिकी लोकांचे किंवा पाश्‍चिमात्य पुस्तक नाही. यहोवाने “एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण” केली आणि सर्व ठिकाणातील मानवांची घडण तो जाणतो. (प्रेषितांची कृत्ये १७:२६) बायबल तत्त्वे सर्वांकरता गुणकारी आहेत. त्यांचा अवलंब तुम्ही केल्यास तुम्हाला देखील कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य माहीत होईल.

तुम्ही या प्रश्‍नांची उत्तरे देऊ शकता का?

आज कुटुंबाला काय होत आहे?—२ तीमथ्य ३:१-४.

कौटुंबिक व्यवस्थेचा आरंभ कोणी केला?—इफिसकर ३:१४, १५.

कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य काय आहे?—यशया ४८:१७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा