वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • kl अध्या. १३ पृ. ११८-१२९
  • ईश्‍वरी जीवन जगणे का आनंद देते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरी जीवन जगणे का आनंद देते
  • सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्रामाणिकपणा आनंदात परिणीत होतो
  • औदार्य आनंद देतो
  • आनंद वाढीस लावणाऱ्‍या इतर गोष्टी
  • विवाहात आनंद
  • “जगाचे नाहीत”
  • वार्षिक उत्सवांचे मूल्यमापन करणे
  • नोकरी व मनोरंजन
  • जीवन व रक्‍त यांजबद्दल आदर
  • तुमच्या कुटुंबासाठी चिरकालिक भवितव्य संपादन करा
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
  • यहोवाची सेवा करण्यामधील खरा आनंद
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • विवाह हीच केवळ सौख्यानंदाची किल्ली आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • धीरात सुभक्‍तीची भर घाला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
अधिक माहिती पाहा
सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
kl अध्या. १३ पृ. ११८-१२९

अध्याय १३

ईश्‍वरी जीवन जगणे का आनंद देते

१. यहोवाचा मार्ग आनंद देतो असे आपण का म्हणू शकतो?

यहोवा हा “आनंदी देव” आहे आणि तुम्ही जीवनाचा आनंद लुटावा अशी त्याची इच्छा आहे. (१ तीमथ्य १:११, NW) त्याच्या मार्गाने चालल्यामुळे तुम्हाला लाभ मिळू शकतो व सतत वाहणाऱ्‍या नदीप्रमाणे खोल व चिरस्थायी शांतीचा अनुभव येऊ शकतो. देवाच्या मार्गाने चालल्यामुळे एखाद्याला “समुद्राच्या लाटांसारखी” धार्मिक कृत्ये सतत आचरता येतात. यामुळे खरा आनंद मिळतो.—यशया ४८:१७, १८.

२. ख्रिश्‍चनांना कधी कधी वाईट वागणूक मिळते तरी देखील ते कसे आनंदी असू शकतात?

२ काही लोक आक्षेप घेऊन म्हणतील, ‘चांगले केल्यामुळे देखील लोकांना कधीकधी त्रास होतो.’ होय, ते खरे आहे व हेच येशूच्या प्रेषितांच्या बाबतीत घडले. त्यांचा छळ झाला तरी त्यांनी आनंद केला व “येशू हा ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे” त्यांनी चालूच ठेवले. (प्रेषितांची कृत्ये ५:४०-४२) यापासून आपल्याला, महत्त्वपूर्ण धडा शिकता येतो. एक म्हणजे, ईश्‍वरी जीवन जगण्यामुळे आपल्याला नेहमीच चांगले वागवले जाईल असे नाही. खरे पाहता, प्रेषित पौलाने असे लिहिले: “ख्रिस्त येशूमध्ये सुभक्‍तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल.” (२ तीमथ्य ३:१२) याचे कारण, ईश्‍वरी मार्गाने जीवन जगणाऱ्‍यांचा सैतान व त्याचे जग विरोध करते. (योहान १५:१८, १९; १ पेत्र ५:८) तथापि, खरा आनंद बाह्‍य गोष्टींवर अवलंबून नसतो. तर उलटपक्षी, तो आपण बरोबरचे करीत असल्यामुळे आपल्याला देवाची कृपापसंती आहे या खात्रीमुळे उद्‌भवतो.—मत्तय ५:१०-१२; याकोब १:२, ३; १ पेत्र ४:१३, १४.

३. यहोवाची भक्‍ती एखाद्या व्यक्‍तीच्या जीवनावर कशी परिणीत झाली पाहिजे?

३ असे काही लोक आहेत ज्यांना वाटते, त्यांनी प्रासंगिकपणे भक्‍तीची कृत्ये आचरली तर देवाची कृपा मिळवता येते; मग त्याला इतर वेळी विसरले तरी ते चालण्याजोगे आहे. पण यहोवा देवाची खरी भक्‍ती या प्रकारातील मुळीच नाही. ती एखाद्या माणसाच्या जागेपणीच्या सर्व वागणुकीवर, तसेच दैनंदिनरित्या व वर्षानुवर्षे परिणाम करणारी आहे. याकरताच तिला ‘मार्ग’ असे म्हणण्यात आले आहे. (प्रेषितांची कृत्ये १९:९; यशया ३०:२१) तो ईश्‍वरी पद्धतीने जीवन जगण्याचा असा मार्ग आहे जो आम्हाला देवाच्या वचनांच्या अनुषंगाने बोलण्याचे व कृती आचरण्याचे आवाहन देत असतो.

४. देवाच्या मार्गानुरूप जगण्याकरता बदल करणे का लाभदायक आहे?

४ यहोवाला संतुष्ट करण्याकरता स्वतःच्या जीवनात काही बदल करावे लागतील असे बायबलचा अभ्यास करणाऱ्‍या नव्या विद्यार्थ्यांना दिसते तेव्हा ‘ईश्‍वरी जीवन जगणे खरेच लाभाचे आहे का?’ याचे त्यांना नवल वाटते. होय, ते लाभाचे आहे याची तुम्ही खात्री बाळगू शकता. ते का? कारण “देव प्रीती आहे,” त्यामुळे त्याचे मार्ग नक्की आमच्या लाभाकरता आहेत. (१ योहान ४:८) देव ज्ञानी देखील आहे आणि आपल्याकरता चांगले ते त्याला कळते. यहोवा देव सर्वसमर्थ असल्यामुळे, आपण आपली वाईट सवय तोडून टाकून त्याला संतुष्ट करण्याची जी इच्छा राखून आहोत ती पूर्ण करण्यासाठी तो आम्हाला बळकट करू शकतो. (फिलिप्पैकर ४:१३) यास्तव, ईश्‍वरी जीवन जगण्यात जी तत्त्वे गोवलेली आहेत त्यांचा आपण विचार करू या आणि त्यांचा अवलंब करून कसा आनंद मिळवता येतो ते पाहू या.

प्रामाणिकपणा आनंदात परिणीत होतो

५. खोटे बोलणे व चोरी करणे याबद्दल बायबल काय सांगते?

५ यहोवा ‘सत्यस्वरूप देव’ आहे. (स्तोत्रसंहिता ३१:५) तुम्हाला सुद्धा त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याची व त्याद्वारे स्वतः सत्यप्रिय व्यक्‍ती आहोत हे दाखवण्याची नक्की इच्छा प्रामाणिकपणा स्वाभिमानास वाढवतो व तो समाधानाची भावना देतो. परंतु, बेईमानी ही सध्याच्या पापी जगाची सर्वसाधारण गोष्ट असल्यामुळे ख्रिश्‍चनांना हे स्मरण जरूरीचे आहे: “तुम्ही प्रत्येक जण आपआपल्या शेजाऱ्‍याबरोबर खरे बोला. . . . चोरी करणाऱ्‍याने पुन्हा चोरी करू नये; तर त्यापेक्षा गरजवंताला द्यावयास आपल्याजवळ काही असावे म्हणून . . . उद्योग करीत राहावे.” (इफिसकर ४:२५, २८) ख्रिस्ती कर्मचारी दिवसभराचे काम प्रामाणिकपणे पूर्ण करतात. त्यांच्या मालकाने परवानगी दिल्याविना ते मालकाची कोणतीही वस्तू घेत नाही. नोकरी, शाळा किंवा घर, कोठेही असताना यहोवाच्या उपासकांनी ‘सर्व बाबतीत प्रामाणिक असावे.’ (इब्रीयांस १३:१८) ज्याला सतत लबाड बोलण्याची किंवा चोरी करण्याची सवय आहे तो देवाची मर्जी मिळवू शकत नाही.—अनुवाद ५:१९; प्रकटीकरण २१:८.

६. ईश्‍वरी भक्‍ती आचरणाऱ्‍याचा प्रामाणिकपणा देवाला कसे गौरव मिळवून देतो?

६ प्रामाणिकपणामुळे कित्येक आशीर्वाद मिळतात. सॅलिना ही आफ्रिकेत राहणारी अशी गरजवंत विधवा आहे, जिचे यहोवा देव व त्याच्या धार्मिक तत्त्वांवर प्रेम आहे. एके दिवशी तिला एक बॅग मिळाली ज्यामध्ये बँकेचे पासबुक आणि भली मोठी रक्कम होती. टेलिफोन दर्शिकेचा वापर करून तिला बॅगेचा मालक भेटू शकला; तो दुकानदार होता व त्याच्याकडे चोरी झाली होती. सॅलिना आजारी होती तरी तिने त्याची भेट घेतली व बॅग त्यातील सर्व सामानासह परत केली तेव्हा तर त्या माणसाला विश्‍वासच बसेना. “या प्रामाणिकपणाबद्दल तुला बक्षीस दिलेच पाहिजे,” असे म्हणून त्याने तिला काही रक्कम दिली. याखेरीज, त्या माणसाने सॅलिनाच्या धर्माचीही प्रशंसा केली. होय, प्रामाणिक कृत्ये बायबलच्या शिक्षणाला शोभा आणतात, यहोवा देवाचे गौरव करतात व त्याच्या प्रांजळ उपासकांना आनंद देतात.—तीतास २:१०; १ पेत्र २:१२.

औदार्य आनंद देतो

७. जुगार खेळण्यामध्ये काय चूक आहे?

७ औदार्य दाखवण्यात आनंद मिळतो, पण लोभी लोकांना “देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” (१ करिंथकर ६:१०) जुगार हा लोभाचा सर्वसाधारण प्रकार आहे. तो इतरांच्या नुकसानीतून पैसे कमवण्याचा प्रयत्न असतो. ‘अनीतीने पैसा मिळवणाऱ्‍यांना’ यहोवा आपली पसंती दर्शवीत नाही. (१ तीमथ्य ३:८) जेथे जुगार कायदेशीर आहे व एखादा तो मनोरंजनाखातर खेळत असला तरी त्याला त्याचा नाद लागू शकतो व ज्यामुळे पुष्कळांची जीवने उद्ध्‌वस्त झाली त्या प्रथेला तो वाढवू शकतो. जुगार खेळणारा स्वतःच्या कुटुंबाला मोठ्या त्रासात लोटतो आणि आज अन्‍न, वस्त्र यासारख्या कुटुंबाला जरूरीच्या गोष्टी विकत घेण्यासाठी खूपच कमी पैसा ठेवतो.—१ तीमथ्य ६:१०.

८. येशूने औदार्याचे कसे उत्तम उदाहरण मांडले आणि आपण कसे उदार होऊ शकतो?

८ ख्रिश्‍चनांना उदारता आवडत असल्यामुळे त्यांना दुसऱ्‍यांना मदत देण्यात व खासकरून गरजवंत समविश्‍वासूंची मदत करण्यात आनंद वाटतो. (याकोब २:१५, १६) पृथ्वीवर येण्याआधी येशूने, देवाला मानवजातीबद्दल वाटणाऱ्‍या औदार्याचे निरीक्षण केले होते. (प्रेषितांची कृत्ये १४:१६, १७) येशूने सुद्धा मानवजातीखातर स्वतःचा वेळ, त्याचे कौशल्य इतकेच काय पण आपले जीवन सुद्धा दिले. या कारणामुळे, तो अगदी योग्यपणे असे म्हणू शकला: “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.” (प्रेषितांची कृत्ये २०:३५) मंदिरातील भांडारात उदारपणे दोन लहान टोल्या टाकणाऱ्‍या गरीब विधवेची येशूने प्रशंसा केली, कारण तिने तर “आपली सर्व उपजीविका टाकली” होती. (मार्क १२:४१-४४) मंडळीला तसेच राज्य-कार्यासाठी भौतिक साहाय्य देण्याबद्दल प्राचीन इस्राएल तसेच पहिल्या शतकातील ख्रिश्‍चन आनंदी औदार्याची उदाहरणे प्रस्तुत करतात. (१ इतिहास २९:९; २ करिंथकर ९:११-१४) भौतिक अनुदान देण्यासोबतच आधुनिक काळातील ख्रिस्ती, देवाची आनंदाने स्तुती करतात व आपल्या जीवनांना त्याच्या सेवेसाठी वापरतात. (रोमकर १२:१; इब्रीयांस १३:१५) ते आपला वेळ, शक्‍ती आणि आर्थिक सहाय्यासमवेत इतर मिळकती खऱ्‍या भक्‍तीच्या आधारास्तव व राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याचे काम जगभर वाढवावे म्हणून वापरीत असल्यामुळे यहोवा त्यांना आशीर्वाद देतो.—नीतिसूत्रे ३:९, १०.

आनंद वाढीस लावणाऱ्‍या इतर गोष्टी

९. मद्याचे अतिप्राशन करण्यात काय चूक आहे?

९ आनंदी होण्याकरता ख्रिश्‍चनांनी ‘विवेक राखला पाहिजे.’ (नीतिसूत्रे ५:१, २) याचा अर्थ त्यांनी देवाचे वचन व हितकारक बायबलची प्रकाशने वाचून त्यावर मनन केले पाहिजे. पण, काही गोष्टी करण्याचे टाळले पाहिजे. उदाहरणार्थ, मद्याचे अतिरेकी प्राशन एखाद्या व्यक्‍तीचा स्वतःच्या विचारावरील संयम गमावू शकतो. अशा परिस्थितीत असताना पुष्कळ लोक अनैतिक कामात गुंततात, हिंसाचारीपणे वागू लागतात आणि मरणप्राय अपघात घडवून आणतात. या कारणामुळेच मद्यप्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही, असे जे बायबल म्हणते ते काही आश्‍चर्याचे नव्हे! (१ करिंथकर ६:१०) खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा “मर्यादशील” राहण्याचा निर्धार असल्यामुळे ते मद्यपी होण्याचे टाळतात व त्यामुळे त्यांच्यामध्ये आनंद वाढता राहतो.—तीतास २:२-६.

१०. (अ) ख्रिश्‍चन तंबाखूचा वापर का करीत नाहीत? (ब) सवयींच्या स्वाधीन होण्यापासून स्वतःची सुटका करून घेण्यामुळे कोणते लाभ मिळतात?

१० शुद्ध शरीर आनंदात भर घालते. तथापि, बरेच जण विविध घातक गोष्टींच्या आहारी गेलेले आहेत. उदाहरणार्थ, तंबाखूचा वापर लक्षात घ्या. धूम्रपानामुळे “दरवर्षी तीस लाख लोक मरतात,” असे जागतिक आरोग्य संघटना कळवते. तंबाखूची सवय सोडताना विशिष्ट त्रास होत असल्यामुळे त्याचे व्यसन थांबवणे कठीण आहे. उलटपक्षी, पूर्वी धूम्रपान करणाऱ्‍या पुष्कळांना आरोग्य सुधारल्याचे तसेच स्वतःच्या कुटुंबाच्या निर्वाहासाठी अधिक पैसा उपलब्ध झाल्याचे आठवले आहे. होय, तंबाखू तसेच इतर घातक सवयांपासून आपली सुटका करून घेण्यामुळे शरीर शुद्ध ठेवण्यात, चांगला विवेकभाव आणि खरा आनंद मिळवण्यात मदत मिळते.—२ करिंथकर ७:१.

विवाहात आनंद

११. कायदेशीर व चिरकाल सन्माननीय विवाहाकरता कशाची गरज आहे?

११ पती व पत्नी या नात्याने एकत्र राहणाऱ्‍या जोडप्यांनी त्यांचा विवाह मुलकी अधिकाऱ्‍यांकडे नोंदण्यात आला आहे याची खात्री करावी. (मार्क १२:१७) लग्नबंधन ही एक गंभीर जबाबदारी आहे असा दृष्टिकोन त्यांनी राखण्याची गरज आहे. हे खरे की, जेव्हा तरतूद करण्याचे स्वेच्छेने नाकारले जाते, अतिरेकी गैरवर्तन केले जाते किंवा आध्यात्मिकतेला सर्वतोपरी धोका संभवतो तेव्हा विभक्‍तता ही कदाचित जरूरीची वाटेल. (१ तीमथ्य ५:८; गलतीकर ५:१९-२१) परंतु, प्रेषित पौलाचे करिंथकरांस पहिले पत्र ७:१०-१७ मधील शब्द विवाहित दांपत्यास एकत्र राहण्याचे उत्तेजन देतात. त्यांनी खरा आनंद मिळवण्याकरता, अर्थातच, एकमेकांशी विश्‍वासू राहिले पाहिजे. पौलाने लिहिले: “लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्‍यांचा न्याय देव करील.” (इब्रीयांस १३:४) “अंथरूण” हा शब्द येथे एकमेकांशी कायदेशीर विवाहबद्ध असणाऱ्‍या पुरुष व स्त्रीमधील लैंगिक संभोगाला सूचित करतो. याखेरीज कोणताही लैंगिक नातेसंबंध, जसे की, एकापेक्षा अधिक बायका करणे याला “सर्वस्वी आदरणीय” मानता येणार नाही. तसेच, बायबल विवाहाआधीच्या लैंगिक समागमाला आणि समलैंगिकतेला धिक्कारते.—रोमकर १:२६, २७; १ करिंथकर ६:१८.

१२. जारकर्माची काही वाईट फळे कोणती आहेत?

१२ जारकर्म काही क्षणाकरता शारीरिक सुख देईल, पण ते खऱ्‍या आनंदात परिणामित होत नाही. ते देवाला संतुष्ट करीत नाही व त्या व्यक्‍तीच्या विवेकाला डागणी देतो. (१ थेस्सलनीकाकर ४:३-५) अशा बेकायदेशीर लिंगाचाराचा परिणाम एड्‌स व इतर लैंगिकरित्या संक्रमित होणाऱ्‍या आजारांत होऊ शकतो. एक वैद्यकीय अहवाल कळवतो: “जगभर दरवर्षी २५ कोटी लोकांना गरमीचा तर ५ कोटी लोकांना उपदंश रोगाचा संसर्ग होतो असे अनुमान काढण्यात आले आहेत.” याशिवाय नकोशा गर्भधारणेचीही समस्या आहेच. द इंटरनॅशनल प्लॅण्ड पॅरंटहूड फेडरेशनचा अहवाल आहे की, सबंध जगात दरवर्षी १५ ते १९ वयोगटातील १ कोटी ५० लाख मुली गर्भवती होतात व यापैकीच्या तृतीयांश गर्भपात करतात. एका अभ्यासाने दाखवले की, एका आफ्रिकी देशात गर्भपाताच्या गुंतागुंतीमुळे नवयौवनात असणाऱ्‍या ७२ टक्के मुलींवर मृत्यू ओढवतो. काही जारकर्मी कदाचित आजार किंवा गर्भधारणा चुकवू शकतील, पण त्यांना भावनिक दुखापत टाळता येणार नाही. पुष्कळ आपला स्वाभिमान गमावतात आणि त्यांना स्वतःचा सुद्धा द्वेष वाटू लागतो.

१३. व्यभिचाराद्वारे कोणत्या अधिक समस्या उद्‌भवतात आणि जे जारकर्मी व व्यभिचारी म्हणून राहतात अशांना भविष्यात काय राखलेले आहे?

१३ व्यभिचाराची कदाचित क्षमा केली जाऊ शकते, तरी सुद्धा तो निर्दोष सोबत्याला घटस्फोट मिळण्याचा शास्त्रवचनीय आधार देतो. (मत्तय ५:३२; पडताळा होशेय ३:१-५.) अशी ही अनैतिकता विवाहाला दुभागते तेव्हा अजाण सोबत्यावर तसेच मुलांवर खोल भावनात्मक व्रण पडू शकतात. या कारणामुळेच पश्‍चात्ताप न करणाऱ्‍या जारकर्मी व व्यभिचाऱ्‍यांवर देवाचा प्रतिकूल न्यायदंड येईल असे त्याचे वचन, मानवी कुटुंबाचे कल्याण लक्षात राखून कळवते. याचप्रमाणे, लैंगिक अनैतिकता आचरणाऱ्‍यांना “देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही,” असेही ते स्पष्टपणे दाखवते.—गलतीकर ५:१९, २१.

“जगाचे नाहीत”

१४. (अ) ईश्‍वरी भक्‍ती आचरणारा मुर्तीपूजेचे कोणकोणते प्रकार टाळतो? (ब) योहान १७:१४ व यशया २:४ मध्ये कोणते मार्गदर्शन देण्यात आले आहे?

१४ यहोवाला संतुष्ट करण्याची व राज्याच्या आशीर्वादांचा आनंद मिळवण्याची इच्छा धरणारे कोणत्याही प्रकारातील मूर्तिपूजा टाळतात. बायबल दाखवते, कोणत्याही प्रकारची मूर्ती करून तिची भक्‍ती करणे चुकीचे आहे. यामध्ये ख्रिस्त किंवा येशूची आई मरीया यांची मूर्ती करण्याचाही समावेश आहे. (निर्गम २०:४, ५; १ योहान ५:२१) या कारणामुळे खरे ख्रिस्ती मरीयेची मूर्ती, क्रूस आणि इतर मूर्त्यांना भजत नाहीत. ते मूर्तीपूजेच्या आणखी एका चाणाक्ष प्रकाराला म्हणजे ध्वजाला भक्‍तीवंदन करणे व राष्ट्राच्या गौरवार्थ गायिली जाणारी गीते टाळतात. अशी कृती आचरण्याकरता त्यांच्यावर दबाव आणला जातो तेव्हा ते, येशूने सैतानाला उद्देशून म्हटलेले शब्द आठवतात: “परमेश्‍वर [यहोवा] तुझा देव ह्‍याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर.” (मत्तय ४:८-१०) त्याचे अनुयायी या “जगाचे नाहीत” असे येशूने म्हटले. (योहान १७:१४) याचा अर्थ, राजकीय घडामोडीत तटस्थ राहणे व यशया २:४ मध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे शांतीपूर्वक जीवन जगणे असा होतो. त्यात म्हटले आहे: “तो [यहोवा देव] राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील, देशोदेशींच्या बहुत लोकांचा इन्साफ करील; तेव्हा ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करितील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करितील; यापुढे एक राष्ट्र दुसऱ्‍या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.”

१५. मोठी बाबेल काय आहे आणि तिच्यामधून बाहेर पडण्यासाठी कित्येक नवे बायबल विद्यार्थी काय करतात?

१५ ‘जगाचा भाग नसणे,’ याचा अर्थ, खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य, “मोठी बाबेल” याचे सर्व संबंध तोडून टाकणे असा आहे. प्राचीन बाबेलमधून अशुद्ध भक्‍ती पसरली व तिने पृथ्वीवरील लोकांवर घातक असा आध्यात्मिक प्रभाव पाडला आहे. “मोठी बाबेल” यामध्ये ज्यांची तत्त्वे व आचार देवाविषयीच्या ज्ञानाशी विसंगत आहेत अशा सर्व धर्मांचा समावेश आहे. (प्रकटीकरण १७:१, ५, १५) यहोवाचा कोणताही विश्‍वासू उपासक वेगवेगळ्या पंथांच्या उपासना पद्धतीत समाविष्ट होऊन संमिश्र विश्‍वासाच्या कार्यात सहभागी होणार नाही; तसेच तो मोठ्या बाबेलच्या कोणत्याही भागाशी आध्यात्मिक सहवास राखणार नाही. (गणना २५:१-९; २ करिंथकर ६:१४) या कारणामुळे, पुष्कळ नव्या बायबल विद्यार्थ्यांनी, ते ज्या धार्मिक संस्थेसोबत जडून होते तिला राजीनाम्याचे पत्र पाठवले. याद्वारे त्यांना खऱ्‍या देवाच्या समीप आणले गेले. त्याबद्दलचे अभिवचन देखील तसेच होते: “‘त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा’ असे प्रभु [यहोवा, NW] म्हणतो, ‘आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका; म्हणजे मी तुम्हांस स्वीकारीन.’” (२ करिंथकर ६:१७; प्रकटीकरण १८:४, ५) आपल्या स्वर्गीय पित्याकडून अशीच स्वीकृती लाभावी अशी तुमची गाढ इच्छा नाही का?

वार्षिक उत्सवांचे मूल्यमापन करणे

१६. खरे ख्रिस्ती नाताळ का साजरा करीत नाहीत?

१६ ईश्‍वरी जीवन आपल्याला जगातील सण साजरे करण्यासाठी लागणाऱ्‍या भारासारख्या खर्चापासून मुक्‍त करते. उदाहरणार्थ, येशूच्या जन्माची नक्की तारीख बायबल प्रकट करीत नाही. ‘मला तर वाटले की, येशू २५ डिसेंबरला जन्मला!’ असे काही म्हणतील. शक्य नाही, कारण हे तो ३३१/२ वर्षांचा असताना सा. यु. ३३ च्या वसंत ऋतुत वारला. तसेच त्याच्या जन्माच्या वेळी “मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते.” (लूक २:८) इस्राएलच्या प्रदेशात डिसेंबरचा उत्तरार्ध थंडीचा व पावसाळी ऋतुचा असतो. त्यावेळी रात्री मेंढरांना हिवाळी हवामानापासून संरक्षण मिळावे म्हणून निवाऱ्‍यासाठी मेंढवाड्यात ठेवले जाते. खरे म्हणजे, डिसेंबर २५ ही तारीख रोमी लोकांनी त्यांच्या सूर्यदेवतेचा जन्मदिवस म्हणून राखून ठेवली होती. येशू पृथ्वीवर येऊन गेल्याच्या काही शतकांनी धर्मत्यागी ख्रिश्‍चनांनी ही तारीख ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करण्याकरता उचलून घेतली. यामुळेच, खरे ख्रिस्ती नाताळ किंवा खोट्या धर्म विश्‍वासावर आधारलेला कोणताही सण साजरा करीत नाहीत. ते केवळ यहोवालाच सर्वस्वाची निष्ठा राखून असल्यामुळे पापी मनुष्य किंवा राष्ट्रांची भक्‍ती करण्यासाठी ठरवण्यात आलेले सुट्टीचे दिवस साजरे करीत नाहीत.

१७. ईश्‍वरी लोक वाढदिवसाच्या पार्ट्या का करीत नाही आणि ख्रिस्ती मुले का आनंदी दिसतात?

१७ बायबल वाढदिवसाच्या केवळ दोन समारंभाचा उल्लेख करते, ज्या दोहोत देवाची सेवा न करणाऱ्‍या माणसांचा समावेश होता. (उत्पत्ति ४०:२०-२२; मत्तय १४:६-११) शास्त्रवचने जर परिपूर्ण मनुष्य येशू ख्रिस्ताची जन्मतारीख प्रकट करीत नाहीत तर अपरिपूर्ण मानवांच्या वाढदिवसांकडे तरी आपण खास लक्ष का द्यावे? (उपदेशक ७:१) अर्थात, ईश्‍वरी पालक त्यांच्या मुलांना प्रेम दाखवण्याकरता खास दिवस येण्याची वाट बघत नाहीत. एका १३ वर्षे वयाच्या ख्रिस्ती मुलीने असे म्हटले: “मी व माझ्या घरातील लोक आम्ही खूप मजा करतो. . . . मला माझ्या पालकांच्या खूप जवळ आहे असे वाटते. मी सण का साजरे करीत नाही हे मला बाकीची मुले विचारतात तेव्हा मी म्हणते की, माझा तर प्रत्येक दिवस सणासुदीचा असतो.” १७ वर्षे वयाचा एक ख्रिस्ती युवक म्हणाला: “आमच्या घरात आम्ही वर्षभर बक्षीसे देतो.” ही बक्षीसे उत्स्फुर्त रितीने दिली जातात तेव्हा मोठा आनंद होतो.

१८. येशूने त्याच्या अनुयायांना कोणता एकमेव वार्षिक महोत्सव पाळण्याची आज्ञा दिली, व तो आपल्याला कशाचे स्मरण देतो?

१८ ईश्‍वरी जीवन जोपासणाऱ्‍यांना दर वर्षी एक खास दिवस साजरा करायचा असतो. तो प्रभूचे सांजभोजन आहे, ज्याला सर्वसाधारणपणे ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी म्हटले जाते. याबद्दल येशूने त्याच्या शिष्यांना ही आज्ञा दिली होती: “माझ्या स्मरणार्थ हे करा.” (लूक २२:१९, २०; १ करिंथकर ११:२३-२५) येशूने सा. यु. ३३ च्या निसान १४ तारखेला हा विधी प्रस्थापित केला तेव्हा त्याने त्याचे निष्कलंक मानवी शरीर व त्याचे परिपूर्ण रक्‍त याचे प्रतिनिधीत्व करण्याकरता बेखमीर भाकर व तांबडा द्राक्षारस वापरला. (मत्तय २६:२६-२९) ह्‍या बोधचिन्हात देवाच्या पवित्र आत्म्याने अभिषेक करण्यात आलेले ख्रिस्ती सहभागिता घेतात. त्यांना एका नव्या करारात तसेच एका राज्याच्या करारात घेण्यात आलेले असून स्वर्गीय आशा आहे. (लूक १२:३२; २२:२०, २८-३०; रोमकर ८:१६, १७; प्रकटीकरण १४:१-५) तरीपण, प्राचीन यहुदी दिनदर्शिकेतील निसान १४ तारखेशी जुळणाऱ्‍या तारखेला संध्याकाळी उपस्थित असणाऱ्‍या सर्वांना काही लाभ मिळाल्याचा अनुभव घडतो. त्यांना, पापक्षालनार्थ दिलेल्या खंडणी बलिदानाच्या अनुषंगाने यहोवा देव व येशू ख्रिस्ताने जी प्रीती दाखवली त्याचे स्मरण दिले जाते. ते बलिदान ईश्‍वरी कृपा लाभणाऱ्‍यांना चिरकालिक जीवन शक्य करते.—मत्तय २०:२८; योहान ३:१६.

नोकरी व मनोरंजन

१९. उपजिविकेचे साधन मिळवण्याच्या बाबतीत ख्रिश्‍चनांपुढे कोणते आवाहान आहे?

१९ खऱ्‍या ख्रिश्‍चनांवर कष्ट करण्याचे व स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी तरतूद करण्याचे बंधन आहे. हे पूर्ण केल्यावर कुटुंब प्रमुखांना समाधान वाटते. (१ थेस्सलनीकाकर ४:११, १२) अर्थातच, कोणा ख्रिश्‍चनाची नोकरी बायबलच्या विरोधातील असेल तर हे त्याचा आनंद हिरावून घेईल. तरीपण, बायबलच्या दर्जानुरूप असणारे काम मिळणे एखाद्या ख्रिश्‍चनाला कधी कधी जड जाऊ शकते. जसे की, काही ठिकाणी कर्मचाऱ्‍यांना ग्राहकांची फसवणूक करण्यास सांगण्यात येते. पण दुसऱ्‍या बाजूला बघता, पुष्कळ मालक त्यांच्या भरवसापात्र नोकरांना गमावू नये म्हणून त्यांच्या प्रामाणिक कर्मचाऱ्‍यांच्या विवेकाला सवलती देतील. तथापि, काहीही घडले तरी, स्वतःचा विवेक शुद्ध राखावा म्हणून आवश्‍यक ती नोकरी मिळवण्याकरता तुम्ही केलेल्या प्रयत्नांना देव आशीर्वाद देईल याची खात्री बाळगा.—२ करिंथकर ४:२.

२०. मनोरंजनाची निवड करण्याच्या बाबतीत आपण का निवडक असावे?

२० देवाला आपले सेवक आनंदी असावे असे वाटत असल्यामुळे आपण स्वतःच्या कठीण परिश्रमाचा, करमणूकीचा काळ व विश्रांती याजसोबत संतुलन राखले पाहिजे. (मार्क ६:३१; उपदेशक ३:१२, १३) सैतानाचे जग अभक्‍त स्वरुपाच्या मनोरंजनाला वाढीस लावते. परंतु देवाला संतुष्ट करायचे आहे तर आपल्या वाचण्यात असलेली पुस्तके, आपण ऐकत असलेले रेडिओवरील कार्यक्रम व संगीत तसेच संगीत जलसा, चित्रपट, नाटके, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम आणि व्हिडीओ यांच्याबाबतीत निवडक असले पाहिजे. गत काळात आपण निवडलेले मनोरंजन अनुवाद १८:१०-१२, स्तोत्र ११:५ आणि इफिसकर ५:३-५ या शास्त्रवचनांत दिलेल्या इशाऱ्‍याच्या विरोधात होते तर आता त्यात बदल केल्यास आपण यहोवाला संतुष्ट करू व अधिक आनंदी होऊ.

जीवन व रक्‍त यांजबद्दल आदर

२१. जीवनाबद्दलच्या आदराने गर्भपात तसेच आमच्या सवया व वागणूक याबद्दलच्या आमच्या दृष्टिकोनावर कसा परिणाम करण्यास हवा?

२१ खऱ्‍या आनंदाच्या प्राप्तीसाठी आपण यहोवाप्रमाणेच मानवी जीवनाला पवित्र समजले पाहिजे. त्याचे वचन आपल्याला खून करण्यास मनाई करते. (मत्तय १९:१६-१८) खरे म्हणजे, देवाने इस्राएलांना दिलेला नियम दाखवतो की, त्याला न जन्मलेल्या बालकाचा जीव देखील मोलाचा वाटतो—त्याचा नाश होता कामा नये. (निर्गम २१:२२, २३) या कारणामुळे आपण तंबाखूचा वापर करून, आपले शरीर मादक द्रव्ये किंवा मद्याने विटाळवून किंवा निरर्थक जोखीमा पत्करून ते कवडीमोलाचे आहे अशा प्रकारे त्याला वागवू नये. याचप्रमाणे आपण जीवाला धोका पोहंचविणाऱ्‍या कामात गुंतू नये तसेच अशा सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष करू नये ज्यामुळे रक्‍तपात घडेल.—अनुवाद २२:८.

२२. (अ) रक्‍त व त्याच्या वापराबद्दलचा ईश्‍वरी दृष्टिकोन कोणता आहे? (ब) केवळ कोणाचे रक्‍त खरेपणाने जीवन वाचवणारे आहे?

२२ यहोवाने नोहा व त्याच्या कुटुंबाला म्हटले की, रक्‍त जीवाचे किंवा जीवनाचे प्रतिनिधीत्व करते. याकारणास्तव, देवाने त्यांना कोणत्याही प्रकारचे रक्‍त सेवन करण्याची मनाई केली होती. (उत्पत्ति ९:३, ४) आपण त्यांचे वंशज आहोत म्हणून तो कायदा आम्हा सर्वांवर बंधनकारक आहे. यहोवाने इस्राएलांना म्हटले की, रक्‍त जमिनीवर ओतून द्यायचे होते; त्याचा मनुष्याने स्वतःकरता उपयोग करायचा नव्हता. (अनुवाद १२:१५, १६) देवाच्या रक्‍ताबद्दलच्या ह्‍याच नियमाची पुनरावृत्ती झाली, जेव्हा पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना अशी सूचना देण्यात आली: ‘रक्‍त तुम्ही वर्ज्य करावे.’ (प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९) जीवनाच्या पावित्र्याला आदर देत असल्यामुळे ईश्‍वरी लोक रक्‍त संक्रमणाचा स्वीकार करीत नाही; ही पद्धत जीवन वाचवू शकेल असे इतरांनी कितीही आर्जवाने सांगितले तरी ती ते स्वीकारीत नाही. यहोवाच्या साक्षीदारांना स्वीकृत वाटणारे कित्येक पर्यायी वैद्यकीय इलाज खूप प्रभावी असल्याचे दिसून आले आहे आणि हे एखाद्याला रक्‍त संक्रमणाच्या घातक परिणामांच्या धोक्यात आणीत नाही. येशूचे ओतण्यात आलेले रक्‍त हेच केवळ खरे जीवन वाचवणारे आहे हे ख्रिश्‍चनांना माहीत आहे. त्यावरील विश्‍वास क्षमा प्रदान करतो व चिरकालिक जीवनाचे भवितव्य देतो.—इफिसकर १:७.

२३. ईश्‍वरी पद्धतीच्या जीवनाक्रमणाचे काही लाभ कोणते आहेत?

२३ खरेच, ईश्‍वरी जीवन व्यतीत करण्याकरता प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळे कौटुंबिक सदस्य व परिचितांकडून थट्टाही होण्याची शक्यता आहे. (मत्तय १०:३२-३९; १ पेत्र ४:४) परंतु, अशा प्रकारातील जीवन जगण्यामुळे मिळणारे प्रतिफळ कोणत्याही परीक्षेपेक्षा अधिक मोलाचे ठरतात. ते शुद्ध विवेक देण्याचा परिणाम घडवते आणि यहोवाच्या सहउपासकांसोबत हितकारक मित्रत्व प्रदान करते. (मत्तय १९:२७, २९) तसेच देवाच्या धार्मिक नव्या जगात चिरकाल राहण्याचा विचार करा. (यशया ६५:१७, १८) त्याचप्रमाणे बायबलच्या सूचनेनुरूप राहून त्याद्वारे यहोवाचे अंतःकरण आनंदी करणे केवढे धन्यतेचे आहे! (नीतिसूत्रे २७:११) तेव्हा, ईश्‍वरी जीवन जगणे आनंद देते यात कोणतेही आश्‍चर्य नाही!—स्तोत्र १२८:१, २.

तुमच्या ज्ञानाचे परीक्षण करा

ईश्‍वरी जीवन जगणे का आनंद देते याची काही कारणे कोणती आहेत?

ईश्‍वरी जीवन कोणते बदल करण्याचे आवाहन करते?

तुम्हाला ईश्‍वरी जीवन जगण्याची का इच्छा आहे?

[१२४, १२५ पानांवरील चित्र]

आध्यात्मिक कार्याचे विरंगुळ्याच्या वेळेशी साधलेले संतुलन ईश्‍वरी जीवन जगणाऱ्‍यांच्या आनंदाला हातभार लावते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा