वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • kl अध्या. १२ पृ. १०८-११७
  • दुरात्म्यांच्या समूहाचा प्रतिकार करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दुरात्म्यांच्या समूहाचा प्रतिकार करा
  • सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • दुरात्मे—त्यांचा मूळारंभ व लक्ष्य
  • दुरात्मे तुमची दिशाभूल करण्याचा कसा प्रयत्न करतात
  • बायबल भूतविद्येच्या आचाराचा धिक्कार का करते
  • आकर्षणापासून ते आक्रमणापर्यंत
  • दुरात्म्यांचा प्रतिकार कसा करावा
  • दुरात्म्यांच्या विरुद्ध तुमची लढत चालू ठेवा
  • आत्मिक प्राणी—आपल्यावर यांचा काय प्रभाव आहे
    बायबल नेमके काय शिकवते?
  • दुष्टात्म्यांचा प्रतिकार करण्यासाठी यहोवाची मदत स्वीकारा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • दुरात्मे प्रबल आहेत
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • सैतानाला अडवा आणि त्याचे डावपेच हाणून पाडा
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
अधिक माहिती पाहा
सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
kl अध्या. १२ पृ. १०८-११७

अध्याय १२

दुरात्म्यांच्या समूहाचा प्रतिकार करा

१. दुरात्म्यांना सामोरे जावे लागले तेव्हा येशूने कशी प्रतिक्रिया दर्शवली?

येशू ख्रिस्त त्याच्या बाप्तिस्म्यानंतर लगेच यहुदीयाच्या अरण्यात प्रार्थना व मनन करण्याकरता गेला. तेथे त्याने देवाच्या नियमांचा भंग करावा म्हणून दियाबल सैतानाने त्याची परीक्षा घेतली. तथापि, येशूने सैतानाच्या आमिषाला धुडकावून लावले व तो त्याच्या जाळ्यात अडकला नाही. येशूने त्याच्या ऐहिक सेवकपणाच्या काळा दरम्यान इतर दुरात्म्यांचाही सामना केला. तथापि, त्याने वारंवार त्यांना दटावले व त्यांचा प्रतिकार केला.—लूक ४:१-१३; ८:२६-३४; ९:३७-४३.

२. आपण कोणत्या प्रश्‍नांबद्दल विचार करणार आहोत?

२ बायबलमध्ये वर्णिण्यात आलेल्या त्या समोरासमोरील सामन्यांच्या अहवालाने दुरात्मिक समूह अस्तित्वात असल्याबद्दल आम्हाला खात्री पटवली पाहिजे. ते लोकांची दिशाभूल करतात. तथापि, या दुरात्म्यांचा प्रतिकार करणे आम्हाला शक्य आहे. पण हे दुरात्मे कोठून येतात? ते लोकांची फसवणूक का करण्याचा प्रयत्न करतात? आणि आपले ध्येय साधण्याकरता ते कोणकोणत्या पद्धतींचा उपयोग करतात? अशा प्रकारच्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याने तुम्हाला दुरात्म्यांच्या समूहाचा प्रतिकार करण्याकरता मदत मिळेल.

दुरात्मे—त्यांचा मूळारंभ व लक्ष्य

३. दियाबल सैतान कसा अस्तित्वात आला?

३ यहोवा देवाने मानवांची निर्मिती करण्याच्या बऱ्‍याच काळाआधी असंख्य आत्मिक प्राण्यांची निर्मिती केली. (ईयोब ३८:४, ७) मानवाने यहोवाची भक्‍ती करण्याऐवजी आपली भक्‍ती करावी अशी दूतापैकी एकाने लालसा बाळगली, हे ६ व्या अध्यायात स्पष्ट करण्यात आले आहे. या ध्येयाचा पाठलाग करण्यामध्ये या दुष्ट दूताने निर्माणकर्त्याचा विरोध व निंदा केली आणि देव लबाड आहे असेही त्याने पहिल्या स्त्रीला सुचवले. या कारणास्तव, या बंडखोर आत्मिक प्राण्याला दियाबल (निंदक) सैतान (विरोधी) असे ओळखण्यात येऊ लागले हे योग्यच आहे.—उत्पत्ति ३:१-५; ईयोब १:६.

४. नोहाच्या काळी काही दूतांनी कसे पाप केले?

४ नंतर, इतर देवदूतांनी दियाबल सैतानाचा पक्ष घेतला. नोहा या धार्मिक माणसाच्या काळी यापैकीच्या काहींनी, पृथ्वीवरील स्त्रियांबरोबर लैंगिक समागम करून आपली वासना शमवावी याकरता स्वर्गातील सेवा सोडून दैहिक शरीरे धारण केली. हा अवज्ञाकारी मार्ग पत्करण्यात सैतानानेच या दूतांवर प्रभाव टाकला असावा यात काही संशय नाही. यामुळे त्यांनी नेफिलीम म्हटले जाणारे संकरित संतान जन्माला घातले; ते क्रूर बनले. यहोवाने महाजलप्रलय घडवून आणला तेव्हा त्यामध्ये भ्रष्ट मानवजात व बंडखोर दूतांची ही अस्वाभाविक संतती नष्ट झाली. त्या बंडखोर दूतांनी त्यांची दैहिक शरीरे सोडून आणि आत्मिक क्षेत्रात परत जाऊन तो नाश चुकवला. तथापि, देवाने त्यांना आध्यात्मिक अंधारात हद्दपार करून त्यांच्यावर निर्बंध घातला. (उत्पत्ति ६:१-७, १७; यहूदा ६) तरीसुद्धा, “भूतांचा अधिपती” सैतान व त्याचे दुष्ट दूत यांनी आपल्या बंडखोरीत पुढे प्रगमन केले. (लूक ११:१५) त्याचे काय ध्येय आहे?

५. सैतान व दुरात्म्यांचे कोणते लक्ष्य आहे आणि लोकांना पाशामध्ये अडकवण्याकरता ते कशाचा वापर करतात?

५ यहोवा देवापासून लोकांना दूर करावे हा सैतान व दुरात्म्यांचा वाईट हेतू आहे. यामुळेच हे दुष्ट जन सबंध इतिहासात लोकांना फसवणे, घाबरवून टाकणे आणि हल्ला करणे या गोष्टी करत आले आहेत. (प्रकटीकरण १२:९) याबद्दलची आधुनिक काळातील उदाहरणे, दुरात्म्यांचे अतिक्रमण पूर्वी होते त्यापेक्षा अधिक भ्रष्टावलेले बनत असल्याची पुष्टी देतात. लोकांना पाशात पकडण्याकरता हे दुरात्मे भूतविद्येच्या हरप्रकाराचा वापर करत आहेत. दुरात्मे हे आमिष कसे वापरतात व तुम्हाला यापासून स्वतःचे कसे रक्षण करता येईल?

दुरात्मे तुमची दिशाभूल करण्याचा कसा प्रयत्न करतात

६. भूतविद्या म्हणजे काय व तिचे कोणकोणते प्रकार आहेत?

६ भूतविद्या म्हणजे काय? तो भूते किंवा दुरात्म्यांबरोबर थेटपणे किंवा कोणा मानवी हस्तकांद्वारे संपर्क साधण्याचा प्रकार आहे. शिकाऱ्‍याकरता एखादे आमिष जसे काम करते तसेच भूतविद्या दुरात्म्यांकरता काम करते: ती भक्ष्याला आकर्षित करते. तसेच प्राण्यांना स्वतःच्या जाळ्यात अडकवण्याकरता शिकारी जशी निरनिराळी आमिषे वापरतो तसेच हे दुरात्मे लोकांना स्वतःच्या वर्चस्वाखाली आणण्याकरता भूतविद्येच्या निरनिराळ्या प्रकारांचा उपयोग करण्याला उत्तेजन देतात. (पडताळा स्तोत्र ११९:११०.) यापैकीचे काही प्रकार भविष्य सांगणे, जादूटोणा, शकून पाहणे, चेटूक, मंत्रमुग्ध करणे, दुरात्मिक माध्यमाचा सल्ला घेणे आणि मृतांकडे संपर्क साधणे होत.

७. भूतविद्या केवढी पसरलेली आहे आणि ती ख्रिस्ती म्हटल्या जाणाऱ्‍या देशात देखील का बहरत आहे?

७ ही आमिषे यशस्वी झाली आहेत, कारण भूतविद्या लोकांना जगभर आकर्षित करीत आहे. जंगलभागातील खेड्यांत राहणारे लोक मांत्रिकाकडे, तर शहरात कार्यालयामध्ये काम करणारी मंडळी ज्योतिषांकडे सल्लामसलतीकरता जातात. ख्रिस्ती म्हटल्या जाणाऱ्‍या देशात देखील भूतविद्या बहरत आहे. एकट्या अमेरिकेत, एकूण १,००,००,००० पेक्षा अधिक वितरण असलेली ३० नियतकालिके भूतविद्येच्या विविध प्रकारांना समर्पित आहेत असे संशोधन प्रकट करते. ब्राझिलचे लोक दरवर्षी भूतविद्येच्या वस्तूंकरता ५० कोटी डॉलर्सपेक्षा अधिक खर्च करतात. तरी या देशात दुरात्मिक केंद्रांना वेळोवेळी भेट देणाऱ्‍यांपैकी ८० टक्के लोक बाप्तिस्मा घेतलेले कॅथलिक आहेत, जे चर्चच्या विधींना उपस्थित राहतात. काही धर्मनेते भूतविद्या आचरीत असल्यामुळे बहुतेक धार्मिक लोकांना ती आचरणे हे देवाला मान्य आहे असे वाटते. पण, ते तसे आहे का?

बायबल भूतविद्येच्या आचाराचा धिक्कार का करते

८. भूतविद्येसंबंधी शास्त्रवचनीय दृष्टिकोन कोणता आहे?

८ भूतविद्येचे प्रकार चांगल्या आत्म्यांशी संपर्क घडवून आणतात असे तुम्हाला शिकवण्यात आलेले असल्यास, बायबल भूतविद्येच्या बाबतीत जे म्हणते ते जाणून तुम्हाला आश्‍चर्यच वाटेल. यहोवाच्या लोकांना अशी ताकीद देण्यात आली होती: “पंच्याक्षऱ्‍यांच्या किंवा चेटक्यांच्या नादी लागू नका; त्यांच्यामागे लागून अशुद्ध होऊ नका.” (तिरपे वळण आमचे) (लेवीय १९:३१; २०:६, २७) बायबलचे प्रकटीकरण पुस्तक इशारा देते की, ‘चेटक्यांच्या’ “वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल; हेच ते दुसरे [सार्वकालिक] मरण आहे.” (प्रकटीकरण २१:८; २२:१५) अशा प्रकारे भूतविद्येच्या सर्व प्रकारास यहोवा देवाची नापसंती आहे. (अनुवाद १८:१०-१२) हे असे का असावे?.

९. आधुनिक काळात आत्मिक जगातून येणारे संदेश यहोवाकडून नाहीत असा निष्कर्ष आपण का काढू शकतो?

९ बायबलचे लिखाण पूर्ण होण्याआधी काही लोकांसोबत दळणवळण करण्याकरता यहोवा त्यांच्याकडे चांगल्या आत्म्यांना किंवा धार्मिक दूतांना पाठवत असे. पण ते पूर्ण झाल्यावर, आता देवाच्या वचनाने, यहोवाची संमतीकारक मार्गाने सेवा करण्याच्या लोकांच्या गरजेबद्दल मार्गदर्शन केलेले आहे. (२ तीमथ्य ३:१६, १७; इब्रीयांस १:१, २) तो स्वतःच्या पवित्र वचनाला बाजूला ठेवून दुरात्मिक माध्यमांद्वारे संदेश देत नाही. सध्याच्या काळातील आत्मिक जगातून येणारे असे सर्व प्रकारांतील संदेश दुरात्म्यांकडून येतात. भूतविद्येची आचारसंहिता दुरात्म्यांचा त्रास सुरू करण्यामध्ये किंवा दुरात्म्यांद्वारे पछाडले जाण्यामध्ये परिणीत होऊ शकते. या कारणास्तव भूतविद्येच्या कोणत्याही प्रकारात समाविष्ट न होण्याबद्दल देव आपल्याला प्रेमळपणे इशारा देतो. (अनुवाद १८:१४; गलतीकर ५:१९-२१) शिवाय, यहोवाचा याबद्दलचा दृष्टिकोन आपल्याला समजल्यावर आपण भूतविद्येशी जडून राहिलो तर बंडखोर दुरात्म्यांची बाजू घेत राहू आणि देवाचे शत्रू बनू.—१ शमुवेल १५:२३; १ इतिहास १०:१३, १४; स्तोत्र ५:४.

१०. भविष्यकथन काय आहे व ते आम्ही का टाळले पाहिजे?

१० भविष्यकथन हा भूतविद्येचा एक लोकप्रिय प्रकार आहे, तो आत्म्यांच्या मदतीने भविष्य पाहण्याचा किंवा माहीत नसलेले कळवून घेण्याचा प्रयत्न आहे. भविष्यकथनात ज्योतिषविद्या, काचेच्या गोळ्यात भविष्यकाळ पाहणे, स्वप्ने व हस्तरेषा यांचा उलगडा व चित्रमय पत्त्यांचा उपयोग करून भविष्य सांगणे हे प्रकार येतात. भविष्यकथन ही निरुपद्रवी गंमत असल्याचे पुष्कळांना वाटते पण, बायबल स्पष्ट करते की, भविष्य सांगणारे व दुरात्मे यांच्यामध्ये एकमेकांशी घनिष्ट संबंध असतो. उदाहरणार्थ, प्रेषितांची कृत्ये १६:१६-१९ कळवते की, एका मुलीच्या ‘अंगात येत असे,’ व त्याद्वारे ती ‘दैवप्रश्‍न सांगे.’ पण, जेव्हा तो दुरात्मा काढून टाकण्यात आला तेव्हा तिची भविष्यकथनाची क्षमता संपली. अशा प्रकारे, दुरात्मे लोकांना आपल्या जाळ्यात अडकवण्याकरता भविष्यकथनाचे आमिष वापरत आहेत हे स्पष्टच आहे.

११. मृतांसोबत दळणवळण करण्याचे प्रयत्न पाशात पडण्याकडे निरवणारे कसे ठरतात?

११ तुम्ही कोणा प्रिय कौटुंबिक सदस्याच्या किंवा घनिष्ट मित्राच्या मृत्यूमुळे शोक करत असल्यास तुमच्यापुढे आणखी एक आमिष सहजपणे येण्याची शक्यता आहे. दुरात्मिक माध्यम तुम्हाला कदाचित काही खास माहिती देईल किंवा अशा वाणीमध्ये बोलेल जी कदाचित मृत झालेल्या माणसाच्या वाणीसारखीच आहे असे तुम्हाला वाटायला लागेल. पण, सावधान! मृतांशी दळणवळण साधण्याकरता केलेले प्रयत्न पाशात अडकवतात. ते का? कारण मृतांना तर बोलता येत नाही. तुम्हाला आठवतच असेल की, माणसाचा मृत्यू होतो तेव्हा “तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो; त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो,” असे देवाचे वचन अगदी सोप्या भाषेत म्हणते. मृतांस तर “काहीच कळत नाही.” (स्तोत्र १४६:४; उपदेशक ९:५, १०) याशिवाय, मृतांच्या वाणीचे अनुकरण करणारे व मृत झालेल्या माणसाबद्दल दुरात्मिक माध्यमाला माहिती कळवणारे खरे म्हणजे ते दुरात्मे असतात. (१ शमुवेल २८:३-१९) अशा प्रकारे, “मृताबद्दलची विचारणा करणारा” दुरात्म्यांच्या सापळ्यात अडकला जातो व तो यहोवा देवाच्या इच्छेविरुद्ध कृती आचरीत असतो.—अनुवाद १८:११, १२, NW; यशया ८:१९.

आकर्षणापासून ते आक्रमणापर्यंत

१२, १३. दुरात्मे लोकांना मोहात पाडण्यामध्ये व बेजार करण्यामध्ये सतत क्रियाशील असल्याचा कोणता पुरावा आहे?

१२ भूतविद्येबद्दल देवाच्या वचनाने दिलेल्या सूचनांच्या सहमतात तुम्ही वागता तेव्हा दुरात्म्यांनी ठेवलेल्या आमिषाला तिरस्काराने झिडकारत असता. (पडताळा स्तोत्र १४१:९, १०; रोमकर १२:९.) याचा हा अर्थ होतो का की, दुरात्मे तुमच्यावर हल्ला करण्याचे प्रयत्न सोडून देतील? मुळीच नाही! येशूला तीन वेळा परीक्षेत पाडण्याचा प्रयत्न केल्यानंतर सैतान “परीक्षा संपवून संधि मिळेपर्यंत त्याला सोडून गेला.” (लूक ४:१३) याचप्रमाणे, हे खट्याळ दुरात्मे लोकांपुढे नुसते आकर्षण ठेवत नाहीत, तर ते त्यांच्यावर आक्रमण देखील करतात.

१३ देवाचा सेवक ईयोब याजवर सैतानाने केलेल्या आक्रमणाबद्दल आपण आधी जो विचार केला होता तो आठवा. दियाबलाने त्याच्या गुराढोरांचा आणि त्याच्या बहुतेक चाकरांचा मृत्यू घडवला. सैतानाने त्याच्या मुलांना देखील ठार केले. पुढे त्याने ईयोबाला अगदी यातनादायक आजाराने पीडित केले. पण ईयोबाने आपली सचोटी राखली आणि त्याला पुष्कळ आशीर्वाद मिळाले. (ईयोब १:७-१९; २:७, ८; ४२:१२) तेव्हापासून दुरात्म्यांनी पुष्कळ लोकांना मुके वा आंधळे केले आणि लोकांना त्रास होत असल्याचे पाहून मजा घेतली. (मत्तय ९:३२, ३३; १२:२२; मार्क ५:२-५) आजचे अहवाल सांगतात की, हे दुरात्मे काही लोकांना लैंगिकरित्या बेजार करतात आणि इतरांना वेडे बनवतात. याशिवाय, ते आणखी काही लोकांना देवाविरुद्ध असणारी पापे म्हणजे खून किंवा आत्महत्या करण्याकरता प्रवृत्त करतात. (अनुवाद ५:१७; १ योहान ३:१५) असे असले तरी, एकेकाळी दुरात्म्यांनी ग्रासलेले हजारो लोक स्वतःला त्यांच्यापासून मुक्‍त करू शकले. हे त्यांना कसे जमले? हे त्यांनी महत्त्वपूर्ण पावले उचलण्याद्वारे केले.

दुरात्म्यांचा प्रतिकार कसा करावा

१४. पहिल्या शतकातील इफिसच्या ख्रिश्‍चनांच्या उदाहरणाप्रमाणे तुम्हाला दुरात्म्यांचा कसा प्रतिकार करता येईल?

१४ दुरात्म्यांच्या पाशापासून तुम्हाला स्वतःचे व तुमच्या कुटुंबाचे रक्षण करण्याचा एक मार्ग कोणता आहे? पहिल्या शतकातील इफिसमधील ख्रिस्ती लोक विश्‍वास ग्रहण करण्याआधी भूतविद्या आचरीत होते, त्यांनी निश्‍चयात्मक पावले उचलली. आपण वाचतो की, “जादूटोणा करणाऱ्‍यांपैकी बऱ्‍याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांदेखत जाळून टाकिली.” (प्रेषितांची कृत्ये १९:१९) तुम्ही भूतविद्या आचरत नसला तरी, भूतविद्येच्या वापरात असणाऱ्‍या किंवा भूतविद्यादर्शक सर्व गोष्टी आपणामधून काढून टाका. यात भूतविद्येच्या उद्देशास्तव वापरण्यात येणारी पुस्तके, नियतकालिके, व्हिडीओ, भित्तीपत्रके, संगीतमुद्रण आणि वस्तू यांचा समावेश होतो. शिवाय यामध्ये मूर्त्या, स्वतःचे रक्षण व्हावे म्हणून घालण्यात येणारे मंत्रविद्ध ताईत व इतर गोष्टी आणि भूतविद्या आचरणाऱ्‍यांकडून बक्षीस म्हणून आलेल्या वस्तू यांचाही समावेश होतो. (अनुवाद ७:२५, २६; १ करिंथकर १०:२१) उदाहरणादाखल पाहू जाता, थायलंडमधील एक जोडपे दुरात्म्यांद्वारे बऱ्‍याच काळापासून बेजार झाले होते. तेव्हा त्यांनी भूतविद्येशी संबंधित असणाऱ्‍या सर्व वस्तू काढून टाकल्या. याचा काय परिणाम झाला? त्यांची दुरात्मिक आक्रमणापासून सुटका झाली व त्यांनी त्यानंतर खरी आध्यात्मिक प्रगती झाली.

१५. दुरात्मिक समूहाचा प्रतिकार करण्यामध्ये आणखी कोणते आवश्‍यक पाऊल उचलण्याची जरूरी आहे?

१५ दुरात्म्यांचा प्रतिकार करता यावा म्हणून दुसरे आवश्‍यक पाऊल म्हणजे, देवाने देऊ केलेली संपूर्ण आध्यात्मिक शस्त्रसामग्री धारण करावी या प्रेषित पौलाच्या सूचनेचा अवलंब करणे. (इफिसकर ६:११-१७) ख्रिश्‍चनांनी दुरात्म्यांविरुद्ध स्वतःची संरक्षक फळी मजबूत केली पाहिजे. हे करण्यामध्ये कशाचा समावेश होतो? “ह्‍या सर्वांबरोबरच,” पौलाने म्हटले, “जिच्यायोगे त्या दुष्टाचे सर्व जळते बाण तुम्हाला विझविता येतील, ती विश्‍वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा.” खरेच, तुमचा विश्‍वास जितका बळकट तितक्या अधिकपणे तुम्हाला दुरात्मिक समूहाचा प्रतिकार करण्याची क्षमता मिळेल.—मत्तय १७:१४-२०.

१६. तुम्हाला तुमचा विश्‍वास कसा बळकट करता येईल?

१६ तुम्हाला तुमचा विश्‍वास कसा बळकट करता येईल? बायबलचा अभ्यास चालू ठेवून व त्यातील सूचनांचा तुमच्या जीवनात अवलंब करण्याद्वारे. एखाद्याच्या विश्‍वासाचे बळ तो मुळाशी—देवाविषयीच्या ज्ञानाशी—केवढा दृढ आहे त्यावर आधारित आहे. तुम्ही बायबलचा अभ्यास करीत गेला आणि जे अचूक ज्ञान मिळवले व ज्याचा तुम्ही गंभीरपणे विचार केला त्यामुळे तुमच्या विश्‍वासामध्ये वाढ झाल्याचे तुमच्या प्रत्ययास आले याच्याशी तुम्ही सहमत नाही का? (रोमकर १०:१०, १७) यास्तव, तुम्ही अभ्यास चालू ठेवला व यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना नियमितपणे उपस्थित राहण्याचा प्रघात ठेवला तर तुमचा विश्‍वास अधिक बळकट होईल. (रोमकर १:११, १२; कलस्सैकर २:६, ७) तो दुरात्म्यांच्या आक्रमणापुढे मजबूत तट बनून उभा राहील.—१ योहान ५:५.

१७. दुरात्मिक समूहासोबत लढत देण्यामध्ये आणखी कोणती पावले जरूरीची असतील?

१७ दुरात्मिक समूहासोबत लढा देण्याचा निश्‍चय केलेल्या व्यक्‍तीला आणखी कोणती पावले उचलता येतील? दुरात्म्यांचा वावर असलेल्या इफिस शहरात राहत असल्यामुळे तेथील ख्रिस्ती लोकांना संरक्षणाची खास गरज होती. या कारणास्तव, पौलाने त्यांना म्हटले: “सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा.” (इफिसकर ६:१८) आजही आपण दुरात्म्यांनी व्यापलेल्या जगात राहात आहोत म्हणून दुरात्म्यांचा प्रतिकार करण्याकरता देवाकडील संरक्षणासाठी कळकळीने प्रार्थना करणे अत्यावश्‍यक आहे. (मत्तय ६:१३) याबाबतीत, ख्रिस्ती मंडळीत नियुक्‍त करण्यात आलेल्या वडिलांच्या प्रार्थना व आध्यात्मिक साहाय्य या उपयुक्‍त गोष्टी आहेत.—याकोब ५:१३-१५.

दुरात्म्यांच्या विरुद्ध तुमची लढत चालू ठेवा

१८, १९. दुरात्म्यांनी एखाद्याला त्रास देण्यास सुरवात पुन्हा केल्यास काय करता येईल?

१८ तथापि, एवढी मूलभूत पावले उचलल्यावर देखील काहींना दुरात्म्यांचा त्रास जाणवला. उदाहरणार्थ, कोट डी आयव्होरी येथे एका माणसाने यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास केला व सर्व मंत्रविद्ध ताईतांना नष्ट केले. यानंतर त्याने चांगली प्रगती केली, यहोवाला स्वतःच्या जीवनाचे समर्पण केले आणि बाप्तिस्मा घेतला. पण त्याच्या बाप्तिस्म्यानंतरच्या एक आठवड्यानंतर लगेच दुरात्म्यांनी त्याला त्रास द्यायला सुरवात केली, आणि त्याने नव्यानेच ग्रहण केलेल्या विश्‍वासाचा त्याग करावा असे वाणीने म्हटले. असे तुमच्या बाबतीत घडल्यास त्याचा अर्थ, तुम्हावरील यहोवाचे संरक्षण नष्ट झाले असा होतो का? नाही.

१९ येशू ख्रिस्त हा परिपूर्ण मनुष्य होता; त्याला ईश्‍वरी संरक्षण होते तरी दियाबल सैतान या दुष्ट दुरात्म्याचा आवाज त्याला ऐकायला आला. अशावेळी काय करावे ते येशूने दाखवून दिले. त्याने दियाबलाला म्हटले: “अरे सैताना, चालता हो!” (मत्तय ४:३-१०) याचप्रमाणे, तुम्ही सुद्धा आत्मिक जगतातून येणाऱ्‍या वाणींकडे लक्ष देण्याचे नाकारले पाहिजे. यहोवाकडे मदतीचा धावा करून दुरात्म्यांचा प्रतिकार करा. होय, देवाचे नाव घेऊन मोठ्याने प्रार्थना करा. नीतिसूत्रे १८:१० म्हणते: “परमेश्‍वराचे [यहोवा, NW] नाव बळकट दुर्ग आहे, त्यात धार्मिक धावत जाऊन निर्भय राहतो.” कोट डी आयव्होरी येथील त्या ख्रिस्ती गृहस्थाने तसेच केले आणि दुरात्म्यांनी त्याला त्रास देण्याचे थांबवले.—स्तोत्र १२४:८; १४५:१८.

२०. दुरात्म्यांना प्रतिकार करण्यामध्ये तुम्हाला काय करता येईल ते सारांशरित्या सांगा.

२० यहोवाने दुरात्म्यांना अस्तित्वात राहण्याची मुभा दिली आहे, तरीपण तो त्याचे सामर्थ्य, खासपणे त्याच्या लोकांकरता, दाखवून देतो आणि त्याचे नाव सर्व पृथ्वीवर घोषित होत आहे. (निर्गम ९:१६) तुम्ही देवाच्या सान्‍निध्यात राहाल तर दुरात्म्यांचे भय बाळगण्याचे कसलेच कारण नाही. (गणना २३:२१, २३; याकोब ४:७, ८; २ पेत्र २:९) त्यांचे सामर्थ्य मर्यादित आहे. त्यांना नोहाच्या काळी शिक्षा देण्यात आली, अलीकडच्या काळी त्यांना स्वर्गातून हाकलून देण्यात आले आणि आता ते शेवटला न्याय होण्याची वाट पाहात आहेत. (यहूदा ६; प्रकटीकरण १२:९; २०:१-३, ७-१०, १४) खरे म्हणजे, त्यांचा सामोरा येत असलेला नाश पाहून ते भयग्रस्त झालेले आहेत. (याकोब २:१९) या कारणास्तव, दुरात्म्यांनी जरी तुम्हापुढे कोणतेही आमिष दाखवून आकर्षित केले किंवा कोणत्याही प्रकारे आक्रमण केले तरी तुम्ही त्यांचा प्रतिकार करू शकता. (२ करिंथकर २:११) भूतविद्येचा हरएक प्रकार टाळा, देवाच्या वचनाचा सल्ला लागू करा आणि यहोवाची मर्जी मिळवून घ्या. हे विलंब न करता करा, कारण दुष्ट दुरात्मिक समूहाचा प्रतिकार करण्यावरच तुमचे जीवन अवलंबून आहे!

तुमच्या ज्ञानाचे परीक्षण करा

दुरात्मे लोकांना कसे फसवण्याचा प्रयत्न करतात

बायबल भूतविद्येचा का धिक्कार करते?

दुष्ट दुरात्मिक समूहापासून एखादी व्यक्‍ती कशी मुक्‍त होऊ शकते?

तुम्ही दुरात्म्यांना प्रतिकार का करीत राहिले पाहिजे?

[११० पानांवरील चित्र]

भूतविद्येच्या अनेक प्रकारांबद्दल तुम्हाला कसे वाटते?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा