गीत २९ (२२२)
प्रतिफळावर दृष्टी ठेवा!
१. नेत्र अंधांचे पाहतील,
कर्ण बधिर ऐकतील,
भू पुष्पांपरी फुलेल,
आणि जलास देईल,
पंगूंस ये हरिण गती,
जनांस वियोग ना होती,
असा तो काळ अनुभवाल,
जरी फल नेत्री ठेवाल.
२. जिव्हा मूकांच्या बोलतील,
वृद्धांसी तारुण्य लाभेल,
भू दे उपज विपुल,
समृद्धी तेथ वसेल,
गीते आसमंती गूंजती,
आनंद नि शांती असती,
मृतांस उठलेले पहाल,
जरी फल नेत्री ठेवाल.
३. एकत्र लांडगे, कोकरे,
राहती अस्वले, वासरे,
मूल ते वळील त्यांसी,
कान देतील हाकेसी,
भूत काळात अश्रू जाती,
सरेल सर्व दुःख भीती,
देव करील कसा पहाल,
जरी फल नेत्री ठेवाल.