वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी उपाय
चांगले दिवस येतील अशी आशा ठेवा
तुम्ही राहता तिथे कमाई कमी आणि महागाई जास्त अशी परिस्थिती आहे का? आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या गरजा कशा भागवायच्या याची काळजी तुम्हाला वाटते का? तसं असेल, तर पुढे आपलं कसं होईल असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडेल. पण अशा कठीण परिस्थितीतसुद्धा पुढे चांगले दिवस येतील अशी आशा ठेवल्यामुळे तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो.
हे का महत्त्वाचं आहे?
आशावादी असलेली व्यक्ती फक्त परिस्थिती सुधारावी अशी अपेक्षा करत नाही. तर ती सुधारण्यासाठी जमेल ते करायचा प्रयत्न करते. उदाहरणार्थ, एका अभ्यासातून असं दिसून आलंय, की आशावादी व्यक्ती. . .
एखाद्या कठीण परिस्थितीतून पटकन सावरते
चांगल्या प्रकारे जुळवून घ्यायला तयार असते
असे निर्णय घेते ज्यांमुळे तिचं आरोग्य चांगलं राहतं आणि तिला चांगलं आयुष्य जगता येतं
तुम्ही काय करू शकता?
सर्वात आधी बायबल आपल्याला आज कशी मदत करू शकतं याचा विचार करा. वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी बायबलमध्ये बरेच उपयोगी सल्ले दिले आहेत. त्यांमुळे बरेच फायदे होऊ शकतात. जसं की, आपली परिस्थिती हाताबाहेर गेली आहे असं आपल्याला वाटणार नाही आणि पुढे येणाऱ्या समस्यांना तोंड द्यायला आपल्याला मदत होईल.
दुसरं म्हणजे, भविष्याबद्दल बायबल काय म्हणतं याचा विचार करा. बायबलमधला सल्ला किती उपयोगी आहे हे जेव्हा तुम्ही ओळखाल, तेव्हा भविष्याबद्दल बायबल काय सांगतं हेसुद्धा तुम्हाला जाणून घ्यावंसं वाटेल. उदाहरणार्थ, तुम्हाला हे समजेल की देवाने बायबलमध्ये फक्त एक ‘चांगलं भविष्य आणि आशाच’ दिली आहे. आणि त्यासोबतच त्यावर भरवसा ठेवण्यासाठी एक भक्कम आधारसुद्धा दिला आहे. (यिर्मया २९:११) तो आधार म्हणजे देवाचं राज्य.
देवाचं राज्य काय आहे आणि ते काय करेल?
देवाचं राज्य एक सरकार आहे आणि लवकरच ते संपूर्ण पृथ्वीवर राज्य करेल. (दानीएल २:४४; मत्तय ६:१०) हे सरकार स्वर्गातून राज्य करेल आणि पुढे दिलेल्या शास्त्रवचनांमध्ये सांगितल्याप्रमाणे, पृथ्वीवरून दुःख आणि गरिबी काढून शांती आणि समृद्धी आणेल.
लाखो लोकांचा बायबलमधल्या या अभिवचनांवर भरवसा आहे. कारण देव “कधीही खोटं बोलू शकत नाही” याची त्यांना पक्की खातरी आहे. (तीत १:२) तर मग तुम्हीही बायबलचं परीक्षण करायला काय हरकत आहे? त्यात दिलेल्या आशेमुळे तुम्हाला आत्ता आर्थिक समस्यांचा सामना करायचं आणि भविष्याकडे आत्मविश्वासाने पाहायचं बळ मिळू शकतं.