वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g25 क्र. १ पृ. १२-१३
  • उदारता दाखवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • उदारता दाखवा
  • सावध राहा!—२०२५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • हे का महत्त्वाचं आहे?
  • तुम्ही काय करू शकता?
  • उदारतेने देणारे नेहमी आनंदी असतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • यहोवाच्या उदारतेची आणि समंजसपणाची कदर करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • इतरांसोबतचं आपलं नातं कसं जपायचं?
    सावध राहा!—२०२१
  • अनुक्रमणिका
    सावध राहा!—२०२५
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०२५
g25 क्र. १ पृ. १२-१३
एक कुटुंब त्यांच्या छोट्याशा घराबाहेर टेबलवर बसून एका पाहुण्यासोबत आनंदाने जेवणाचा आनंद घेत आहे.

वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी उपाय

उदारता दाखवा

वाढत्या महागाईचा सामना करत असताना उदारता दाखवणं शक्यच नाही असं कदाचित तुम्हाला वाटेल. पण खरंतर, इतरांना उदारपणे दिल्यामुळे आर्थिक समस्यांचा सामना करायला मदत होऊ शकते हे तुम्हाला जाणवेल. काटकसर करत असतानाच तुम्ही उदारतासुद्धा दाखवू शकता.

हे का महत्त्वाचं आहे?

अगदी छोट्या-छोट्या मार्गांनीसुद्धा उदारता दाखवल्यामुळे आपण आनंदी राहू शकतो आणि आपल्यालाही इतरांसाठी काहीतरी करता आलं याचं समाधान वाटू शकतं. काही डॉक्टरांचं असं म्हणणं आहे, की हे आपल्या एकंदर शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगलंय. उदाहरणार्थ, यामुळे आपल्या चिंता, तणाव, रक्‍तदाब आणि दुखणं कमी होऊ शकतं आणि आपल्याला चांगली झोपही मिळू शकते.

“घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.”—प्रेषितांची कार्यं २०:३५.

इतरांना आर्थिक मार्गांनी किंवा इतर मार्गांनी मदत केल्यामुळे गरज असते, तेव्हा इतरांकडून मदत स्वीकारायला आपल्याला संकोच वाटत नाही. इंग्लंडमध्ये राहणारे हॉवर्ड म्हणतात: “आम्ही इतरांना उदारता दाखवायच्या आणि मदत करायच्या संधी शोधत असतो. त्यामुळे आम्हाला इतरांची मदत स्वीकारायला अवघडल्यासारखं वाटत नाही.” हे खरंय की उदार मनाचे लोक इतरांकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने मदत करत नाहीत. पण उदारता दाखवल्यामुळे त्यांना असे मित्र मिळतात जे गरजेच्या वेळी मदत करायला स्वतःहून पुढे येतात.

“इतरांना देत राहा, म्हणजे तेही तुम्हाला देतील.”—लूक ६:३८.

तुम्ही काय करू शकता?

तुमच्याकडे जे आहे त्यातलं काही इतरांनाही द्या. तुमच्याकडे थोडं जरी असलं तरी त्यातून तुम्ही इतरांना देऊ शकता. मग ते साधंसं जेवण का असेना. युगांडामध्ये राहणाऱ्‍या डंकन यांचं कुटुंब खूप गरीब आहे, पण त्यांचं मन खूप मोठं आहे. डंकन म्हणतात: “दर रविवारी आम्ही कोणाला तरी घरी जेवायला बोलवतो. जेवण साधंच असतं, पण आम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवायला खूप आवडतं.”

अर्थात, इतरांना देताना आपण आपल्या कुटुंबाचाही विचार केला पाहिजे. असं होऊ नये की इतरांना दिल्यामुळे आपल्याच कुटुंबाला त्रास सहन करावा लागतोय.—ईयोब १७:५.

हे करून बघा: तुम्ही इतरांना साध्याशा जेवणाला किंवा नुसतंच चहा-पाण्यालाही बोलवू शकता. किंवा मग तुम्ही वापरत नाही अशा काही वस्तू तुमच्याकडे असतील, तर तुम्ही त्या मित्रांना किंवा इतरांना देऊ शकता. तुमच्या या मदतीमुळे त्यांना नक्कीच फायदा होईल आणि ते त्याची कदर करतील.


इतर मार्गांनीही उदारता दाखवा. उदारता दाखवायचे असेही काही मार्ग आहेत ज्यांसाठी पैसे लागत नाहीत. जसं की, इतरांना मदत करण्यासाठी तुम्ही तुमचा वेळ देऊ शकता आणि दाखवू शकता, की तुम्हाला त्यांची किती काळजी आहे. इतकंच काय, तर तुमचे प्रेमळ शब्दही त्यांच्यासाठी भेटीसारखे असू शकतात. म्हणून तुम्हाला त्यांची किती कदर आहे आणि तुमच्यासाठी ते किती महत्त्वाचे आहेत हे त्यांना सांगा.

हे करून बघा: घरातली छोटीमोठी कामं, दुरुस्तीची कामं किंवा बाहेरची काही कामं करण्यासाठी तुम्ही इतरांना मदत करू शकता. कदर दाखवण्यासाठी तुम्ही मनापासून तयार केलेलं एखादं ग्रिटींग कार्ड देऊ शकता किंवा एखादा मेसेज पाठवू शकता. तुम्ही त्यांचा विचार करत आहात इतकं जरी तुम्ही लिहिलं तरी ते पुरेसं आहे.

तुम्ही जेव्हा उदारता दाखवायच्या संधी शोधता तेव्हा तुम्हाला खूप आनंद मिळू शकतो.

“चांगल्या गोष्टी करायला आणि तुमच्याजवळ जे आहे, त्यातून इतरांनाही द्यायला विसरू नका.”—इब्री लोकांना १३:१६.

एक विवाहित जोडपं एका वयस्कर स्त्रीला तिची बाग स्वच्छ करायला मदत करत आहे. ते पालापाचोळा गोळा करून भरत असताना ती त्यांना गरमागरम चहा देत आहे.
ट्रे.

“आमचं घर जरी खूप छोटं असलं तरी मित्रांना घरी बोलवायला, त्यांच्यासोबत मिळून जेवायला आम्हाला खूप आवडतं. त्यांना मदत करायलाही आम्हाला खूप आवडतं. कधीकधी आम्ही आर्थिक मार्गांनी मदत करतो. पण बऱ्‍याचदा आम्ही आमचा वेळ त्यांना देतो. आम्ही हे खूपदा अनुभवलंय की घेण्यापेक्षा इतरांना दिल्यामुळे जास्त आनंद मिळतो.”—ट्रे, इझरायल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा