वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g25 क्र. १ पृ. १०-११
  • आहे त्यात समाधानी राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आहे त्यात समाधानी राहा
  • सावध राहा!—२०२५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • हे का महत्त्वाचं आहे?
  • तुम्ही काय करू शकता?
  • तुम्ही समाधानी राहायचं ‘रहस्य शिकून घेतलंय’ का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • संतुष्ट असणे शक्य आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • समाधानी जीवन कसं जगायचं?
    सावध राहा!—२०२१
  • तुम्ही इतरांबरोबर स्वतःची तुलना करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०२५
g25 क्र. १ पृ. १०-११
कोलाज: १. कामावरून घरी जात असताना बांधकामाच्या क्षेत्रात काम करणाऱ्‍या एका वडिलांच्या चेहऱ्‍यावर आनंद दिसत आहे. २. नंतर तो त्याच्या साध्याशा घराबाहेर आपल्या दोन मुलांसोबत आणि कुत्र्यासोबत खेळत आहे आणि त्याची बायको त्याच्याकडे हसत बघत आहे.

वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी उपाय

आहे त्यात समाधानी राहा

जे लोक समाधानी असतात ते आपल्या जीवनात आनंदी असतात. परिस्थिती बदलते तेव्हा आहे त्यात समाधानी राहायला ते आपल्या जीवनशैलीत फेरबदल करायला तयार असतात.

हे का महत्त्वाचं आहे?

मानसशास्त्रज्ञ जेसिका कोल्हर यांनी असं लिहिलंय, की ‘समाधानी लोकांचा दृष्टिकोन जास्त सकारात्मक असतो. त्यांना सहसा इतरांचा हेवा वाटत नाही. त्यामुळे ते आनंदी असतात आणि ते जास्त चिंता करत नाहीत. खरंतर, पैसा आणि भौतिक गोष्टी जास्त नसल्या, तरी ते खूप आनंदी असतात. कारण ते त्यांच्या जीवनात अशा गोष्टींना जास्त महत्त्वं देतात ज्या पैशांनी विकत घेता येत नाहीत. जसं की, घरच्यांसोबत आणि मित्रांसोबत वेळ घालवल्यामुळे मिळणारा आनंद.’

“आपल्याजवळ खायला अन्‍न आणि घालायला कपडे असतील, तर आपण त्यांत समाधानी राहू या.”—१ तीमथ्य ६:८.

तुम्ही काय करू शकता?

इतरांसोबत तुलना करायचं टाळा. आपण जर आपल्याकडे असणाऱ्‍या गोष्टींची तुलना इतरांकडे असलेल्या महागड्या आणि चैनीच्या गोष्टींशी केली, तर आपण कधीच समाधानी राहणार नाही आणि आपल्याला इतरांचा हेवा वाटेल. शिवाय, अशा प्रकारे तुलना करणं वस्तुस्थितीकडे डोळेझाक करण्यासारखं ठरेल. कारण ज्यांच्याकडे जास्त मालमत्ता असते, ते कदाचित कर्जबाजारीसुद्धा असू शकतात. सेनिगॉलमध्ये राहणारी निकोल म्हणते, “आनंदी राहायला मला जास्त गोष्टींची गरज नाही. मी जर समाधानी आहे, तर इतरांकडे जास्त गोष्टी असल्या तरी मला काही फरक पडत नाही.”

हे करून बघा: इतरांची संपत्ती आणि महागडी जीवनशैली दाखवणाऱ्‍या जाहिराती आणि सोशल मीडिया पोस्ट पाहायचं टाळा.

“एखाद्याकडे भरपूर संपत्ती असली, तरी ती त्याला जीवन देऊ शकत नाही.”—लूक १२:१५.


कदर बाळगा. आपल्याजवळ जे काही आहे त्याची आपल्याला कदर असेल, तर आपण समाधानी असण्याची शक्यता जास्त असते. आपल्याला जास्त गोष्टींची गरज आहे किंवा आपल्याला जास्त मिळालं पाहिजे असा विचार आपण करणार नाही. हैटीमध्ये राहणारा रॉबर्टन म्हणतो: “इतरांनी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी केलेल्या चांगल्या गोष्टींवर मी विचार करतो. मग त्यांनी जे काही केलंय त्याबद्दल मला किती कदर आहे हे मी त्यांना सांगतो. मी माझ्या आठ वर्षांच्या मुलालाही शिकवलंय, की जेव्हा कोणी आपल्याला काहीतरी देतं तेव्हा आपण थँक्यू म्हटलं पाहिजे.”

हे करून बघा: तुम्हाला ज्या गोष्टींची कदर वाटते त्या गोष्टी दररोज लिहून काढा. मग ते चांगलं आरोग्य असेल, तुमचं कुटुंब असेल, चांगले मित्र असतील किंवा एखादा सुंदर सूर्यास्त असेल.

“ज्याचं मन आनंदी असतं, त्याच्यासाठी दररोज मेजवानी असते.”—नीतिवचनं १५:१५.

आहे त्यात समाधानी राहणं आपल्या सगळ्यांनाच काही वेळा कठीण जाऊ शकतं. पण तरीही आपण समाधानी राहायचा प्रयत्न केला, तर आपल्याला फायदाच होईल! कारण आपण समाधानी असतो तेव्हा आनंदीही असतो आणि आनंद पैशाने विकत घेता येत नाही.

एरीक.

“मी आणि माझं कुटुंब समाधानी राहायला शिकलंय आणि हा आमच्यासाठी एक मोठा आशीर्वादच आहे. कारण आता आम्ही वेगवेगळ्या गोष्टींच्या मागे धावत नाही. यामुळे आम्हाला एकमेकांना जास्त वेळ देता येतोय आणि आहे त्या गोष्टींमध्ये आम्ही आनंदी आहोत.”—एरीक, अमेरिका.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा