वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g25 क्र. १ पृ. ६-९
  • पैसे जपून वापरा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पैसे जपून वापरा
  • सावध राहा!—२०२५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • हे का महत्त्वाचं आहे?
  • तुम्ही काय करू शकता?
  • २ | पैसा आणि मालकीच्या वस्तू जपा
    सावध राहा!—२०२२
  • अंथरूण पाहून पाय पसरा शक्य आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • घरखर्च चालवणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
सावध राहा!—२०२५
g25 क्र. १ पृ. ६-९
कोलाज: १. आईवडील डायनिंग टेबलवर बसून घरखर्चाबद्दल बोलत आहेत आणि त्यांची मुलगी किचनमध्ये काम करत आहे. २. एका फोनवर कॅल्क्यूलेटर ॲप ओपन आहे आणि त्याखाली काही बिलं आणि पावत्या ठेवल्या आहेत.

वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी उपाय

पैसे जपून वापरा

वाढत्या महागाईचा आपल्या सगळ्यांनाच फटका बसतो. पण आपण काहीच करू शकत नाही असं वाटून घ्यायची गरज नाही. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण काही गोष्टी नक्कीच करू शकतो.

हे का महत्त्वाचं आहे?

तुम्ही जर जपून पैसे वापरले नाहीत, तर तुमची आर्थिक परिस्थिती सहज हाताबाहेर जाऊ शकते. आणि त्यामुळे तुमच्या चिंता आणखीनच वाढतील. तुमच्याकडे कमी पैसे असले, तरी पैशाचं नियोजन करण्यासाठी तुम्ही बऱ्‍याच गोष्टी करू शकता.

तुम्ही काय करू शकता?

अंथरूण पाहून पाय पसरा. तुम्ही जर तुमचा खर्च आटोक्यात ठेवला, तर तुमची आर्थिक परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही आणि अचानाक आलेल्या आर्थिक समस्येला तोंड द्यायला तुम्ही तयार असाल.

आहे त्या पैशात खर्च भागवण्यासाठी चांगलं बजेट बनवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमच्या जमा-खर्चावर तुमचं लक्ष राहील. बजेट बनवताना तुमच्या नेमक्या गरजा काय आहेत याचा काळजीपूर्वक विचार करा. मग ठरवलेल्या बजेटप्रमाणे खर्च करा. अर्थात, असं करताना वस्तूंच्या किमती बदलल्या किंवा तुमची कमाई बदलली तर त्याप्रमाणे बजेटमध्ये फेरबदल करायला तयार असा. आणि तुम्ही जर विवाहित असाल, तर निर्णय घेताना आपल्या जोडीदाराचं मतही विचारात घ्या.

हे करून बघा: उधारीवर वस्तू खरेदी करण्यापेक्षा शक्यतो रोख पैसे देऊन खरेदी करा. असं केल्यामुळे बऱ्‍याच जणांना आपला खर्च बजेटमध्ये ठेवता आला आहे आणि विनाकारण कर्ज घ्यायचं टाळता आलं आहे. तसंच, आपल्या बँकेचं स्टेटमेंट पाहण्यासाठीसुद्धा थोडा वेळ काढा. असं केल्यामुळे तुमच्याजवळ किती पैसे आहेत हे तुम्हाला माहीत होईल आणि तुम्ही विनाकारण चिंता करत बसणार नाही.

आहे त्या पैशात खर्च भागवणं कठीण असू शकतं. पण विचार करून बनवलेल्या एका चांगल्या बजेटमुळे तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते. शिवाय, यामुळे तुम्ही पैशाची जास्त चिंता करत बसणार नाही.

‘खर्चाचा हिशोब लावा.’—लूक १४:२८.


नोकरी टिकवून ठेवा. तुमची नोकरी टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही बऱ्‍याच गोष्टी करू शकता. जसं की, वेळेवर कामाला जा. कामाबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवा. इतरांना मदत करायला पुढे या आणि मन लावून काम करा. तसंच सगळ्यांचा आदर करा आणि आपल्या कामाचं कौशल्य वाढवत राहा.


वायफळ खर्च करू नका. यासाठी या प्रश्‍नावर विचार करा: ‘गरज नसलेल्या गोष्टींवर मी खूप जास्त पैसे खर्च करतोय का किंवा चुकीच्या सवयींवर माझे पैसे खर्च होत आहेत का?’ बरेच लोक कष्टाने मिळवलेला पैसा ड्रग्ज, जुगार, सिगारेट किंवा दारू पिण्यावर उधळतात. अशा सवयींमुळे त्यांचं आरोग्य आणि नोकरी धोक्यात येऊ शकते.

“ज्या माणसाला बुद्धी सापडते . . . तो सुखी! कारण बुद्धी मिळवणं हे चांदी मिळवण्यापेक्षा चांगलं” आहे.—नीतिवचनं ३:१३, १४.


अचानक येणाऱ्‍या समस्येसाठी पैसे बाजूला काढा. शक्य असेल, तर एखाद्या अनपेक्षित प्रसंगासाठी किंवा अचानक येणाऱ्‍या समस्येसाठी थोडेफार पैसे बाजूला काढून ठेवा. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातलं कोणी अचानक आजारी पडलं, नोकरी गेली किंवा दुसरा एखादा प्रसंग अचनाक निर्माण झाला तर हे पैसे कामाला येतील.

“वेळ आणि अनपेक्षित घटना सर्वांसोबत घडतात.”—उपदेशक ९:११.

पैशांची बचत करण्यासाठी काही उपाय

नाण्यांनी भरलेली एक काचेची बरणी.

शक्यतो घरीच जेवण बनवा.

नेहमी बाहेर खाणं किंवा बाहेरून जेवण मागवणं खर्चिक असू शकतं. हे खरंय, की घरी जेवण बनवण्यासाठी वेळ आणि मेहनत लागते, पण त्यामुळे बरेच पैसे वाचू शकतात. शिवाय, आरोग्याच्या दृष्टीनेही घरचं जेवण केव्हाही चांगलं.

विचार करून वस्तूंची खरेदी करा.

  • किराणा मालाची यादी बनवा आणि तितक्याच वस्तू खरेदी करा. अचानक मनात आलं म्हणून वस्तू विकत घेऊ नका.

  • एखादी वस्तू स्वस्त झाली असेल तर तुम्ही ती एकदाच जास्त प्रमाणात घेऊन ठेवू शकता. पण ते तुमच्या बजेटमध्ये बसतंय का हेही पाहा. शिवाय, काही गोष्टी लगेच खराब होऊ शकतात. त्यामुळे त्या साठवून ठेवायची व्यवस्था तुमच्याकडे आहे का हेसुद्धा पाहा.

  • काही वस्तू कदाचित महागड्या ब्रॅन्डच्या नसतील, पण जर त्या बऱ्‍यापैकी चांगल्या असतील तर विकत घेण्यात काहीच हरकत नाही.

  • तुम्ही ऑनलाईन खरेदीही करू शकता. चांगल्या ऑफर असतात तेव्हा तुम्हाला कमी दरात वस्तू मिळू शकतात. शिवाय, दुकानात गेल्यावर सहसा न ठरवलेल्या वस्तू घ्यायचा मोहही टाळता येतो. आणि किती पैसे खर्च होत आहेत याचा हिशोबही ठेवता येतो. तुम्ही राहता त्या ठिकाणी ऑनलाईन खरेदी करणं शक्य असेल तर तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता.

  • कोणत्या वस्तू सेलमध्ये आहेत किंवा कोणत्या वस्तूंवर डिस्काऊंट आहे ते तपासत राहा. आणि जर कूपन उपलब्ध असतील तर त्यांचाही फायदा करून घ्या. तसंच लाईट, पाणी, गॅस यांसारख्या सुविधा पुरवणाऱ्‍या कंपन्यांच्या दरांची तुलना करून पाहा.

नवीन वस्तू खरेदी करण्याआधी पुरेसा विचार करा.

फोन आणि इतर उपकरणं तयार करणाऱ्‍या कंपन्या आपला नफा वाढवण्यासाठी सतत नवनवीन मॉडेल बाजारात आणत असतात. त्यामुळे अशा वस्तूंची खरेदी करताना थोडं थांबून स्वतःला विचारा: ‘नुकतंच बाजारात आलेलं नवीन मॉडेल खेरदी केल्यामुळे मला खरंच काही फायदा होणार आहे का? माझ्याकडे असलेली वस्तू मला आत्ताच बदलायची गरज आहे का? आणि जर असेल, तर बाजारात आलेल्या नवीन मॉडेलची मला खरंच गरज आहे का?’

वस्तू दुरुस्त करून पुन्हा वापरा.

तुमच्याकडे असलेली उपकरणं जास्त काळ टिकावीत म्हणून ती जपून वापरा. ती खराब झाली तर नवीन घेण्यापेक्षा ती दुरुस्त करून वापरता येतील का ते पाहा. याशिवाय, तुम्ही सेकंड हँड वस्तूही विकत घेऊ शकता.

घरच्या घरी भाजीपाला उगवा.

शक्य असेल, तर घरच्या घरीच भाजीपाला उगवा. यामुळे खाण्या-पिण्याच्या वस्तूंवरचा तुमचा खर्च तर कमी होईलच, पण त्यासोबतच तुम्हाला त्या वस्तू इतरांनाही देता येतील किंवा त्या विकून चार पैसेही कमवता येतील.

“मेहनत करणाऱ्‍यांच्या योजना नक्कीच यशस्वी होतात.”—नीतिवचनं २१:५.

क्रेडिट कार्ड्‌स.

“आम्ही रोज लागणाऱ्‍या वस्तूंच्या किमती नेहमी तपासून पाहतो आणि क्रेडिड कार्डचा वापर किती होतोय याकडेही लक्ष देतो.”—माईल्स, इंग्लंड.

एक वही, पेन आणि चाव्यांचा गुच्छ.

”किराणा मालाची खरेदी करण्याआधी आम्ही नेहमी गरज असलेल्या वस्तूंची यादी बनवतो.”—जेरमी, अमेरिका.

दररोजच्या दिनचर्याची वही आणि कॅल्क्यूलेटर.

“बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार आम्ही आमच्या महिन्याच्या बजेटमध्ये फेरबदल करत राहतो. आणि अचानक येणाऱ्‍या परिस्थितीसाठीही आम्ही पैसे बाजूला काढून ठेवतो.”—यॉएल, इझरायल.

एक पाना आणि स्क्रूड्रायवर.

“आम्ही आमच्या मुलांना, वस्तू मोडल्या तर नवीन खरेदी करण्याऐवजी त्याच दुरुस्त करून वापरायला शिकवलंय. कारच्या किंवा घरातल्या इतर उपकरणांच्या बाबतीतही आम्ही हेच करतो. आम्ही शक्यतो बाजारात आलेल्या नवीन गोष्टी घ्यायचंही टाळतो.”—जेफ्री, अमेरिका.

”घरच्या घरी भाजीपाला उगवल्यामुळे आणि काही कोंबड्या पाळल्यामुळे माझा बराच खर्च कमी झालाय. शिवाय, यामुळे इतरांना देण्यासाठीही माझ्याकडे काहीतरी असतं.”—होनो, म्यानमार.

एक माणूस बागेत वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या काढून त्या टोपलीत ठेवत आहे.
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा