वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g24 क्र. १ पृ. १०-१२
  • आज लोक कुटुंबामध्ये एकमेकांचा आदर का करत नाहीत?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आज लोक कुटुंबामध्ये एकमेकांचा आदर का करत नाहीत?
  • सावध राहा!—२०२४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कुटुंबात एकमेकांचा आदर करणं का महत्त्वाचं आहे?
  • कुटुंबात तुम्ही इतरांचा आदर कसा करू शकता?
  • कुटुंबात आदर दाखवण्यासाठी यहोवाचे साक्षीदार लोकांना कशी मदत करत आहेत?
  • तुम्हाला मदत हवी आहे का?
    सावध राहा!—२०२०
  • कुटुंबासाठी अधिक मदत
    सावध राहा!—२०१८
  • JW.ORG वर दररोजच्या जीवनासाठी उपयोगी असलेलं मार्गदर्शन शोधा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • अभ्यास करण्यासाठी एक टीप
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०२४
g24 क्र. १ पृ. १०-१२
एक वैतागलेला पती फोनवर काहीतरी करत असताना त्याची पत्नी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी त्यांचा तरूण मुलगा त्यांना बघतोय.

आज लोक कुटुंबामध्ये एकमेकांचा आदर का करत नाहीत?

कुटुंबात एकमेकांचा आदर करणं का महत्त्वाचं आहे?

कुटुंबात एकमेकांचा आदर केल्यामुळे एक चांगलं वातावरण निर्माण होतं. त्यामुळे पती, पत्नी तसंच मुलांना सुरक्षित वाटतं.

  • “द सेव्हन प्रिंसिपल्स फॉर मेकिंग मॅरेज वर्क” या पुस्तकात असं म्हटलंय, की पती-पत्नी जेव्हा एकमेकांचा आदर करतात, तेव्हा “ते दिवसभरात फक्‍त मोठमोठ्या मार्गांनीच नाही, तर छोट्या-छोट्या मार्गांनीसुद्धा एकमेकांबद्दल प्रेम व्यक्‍त करतात.”

  • एका संशोधनात असं दिसून आलंय, की जी मुलं इतरांचा आदर करायला शिकतात त्यांच्यात जास्त आत्मसन्मान असतो. त्यांचं त्यांच्या आईवडिलांसोबत चांगलं नातं असतं. आणि त्यांना फार कमी मानसिक आणि भावनिक समस्यांना तोंड द्यावं लागतं.

कुटुंबात तुम्ही इतरांचा आदर कसा करू शकता?

तुमच्या कुटुंबासोबत मिळून एक प्लॅन बनवा. यासाठी पुढे दिलेल्या तीन गोष्टी करा. पहिली गोष्ट म्हणजे आदर कसा दाखवायचा यावर घरच्या लोकांसोबत चर्चा करा. दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंबात कोणत्या प्रकारचं वागणं चालेल आणि कोणत्या प्रकारचं चालणार नाही हे लिहूने ठेवा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कुटुंब मिळून त्या प्लॅनवर चर्चा करा. म्हणजे, आदर दाखवण्याच्या बाबतीत प्रत्येकांने काय केलं पाहिजे हे सगळ्यांना माहीत असेल.

“मेहनत करणाऱ्‍यांच्या योजना नक्कीच यशस्वी होतात.”—नीतिवचनं २१:५.

चांगलं उदाहरण मांडा. तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांच्या चुका काढून त्यांची टिका करता का? त्यांच्या मतांची थट्टा करता का? ते जेव्हा तुमच्याशी बोलत असतात तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करता किंवा त्यांचं बोलणं मध्येच तोडता का?

टीप: तुम्ही तुमच्या पतीला/पत्नीला आणि मुलांना आदर दिलाच पाहिजे असा दृष्टिकोन ठेवा. त्यांनी तो आदर मिळवला पाहिजे असा दृष्टिकोन ठेवू नका.

“एकमेकांचा आदर करण्यात पुढाकार घ्या.”—रोमकर १२:१०.

समोरच्याचं मत पटत नाही तेव्हासुद्धा आदराने वागा. इतरांशी बोलताना “तुम्ही नेहमी असंच करता” किंवा “तुम्ही कधीच असं करत नाही” अशा प्रकारचे शब्द वापरायचं टाळा. त्यामुळे त्यांना वाईट वाटू शकतं किंवा रागही येऊ शकतो. आणि छोटासा वाद मोठ्या भांडणात बदलू शकतो.

“सौम्यपणे दिलेल्या उत्तरामुळे राग शांत होतो, पण कठोर शब्दामुळे क्रोध भडकतो.”—नीतिवचनं १५:१.

एक तरूण मुलगी jw.org वर व्हिडिओ बघत आहे.

कुटुंबात आदर दाखवण्यासाठी यहोवाचे साक्षीदार लोकांना कशी मदत करत आहेत?

यहोवाचे साक्षीदार कुटुंबातल्या सदस्यांना एकमेकांशी आदराने वागायचं प्रोत्साहन देतात. या विषयाबद्दलची माहिती ते त्यांच्या लेखांमधून, पुस्तकांमधून, माहितीपत्रकांमधून आणि व्हिडिओंमधून प्रकाशित करतात. ही प्रकाशनं ते मोफत देतात.

जोडप्यांसाठी: कुटुंबासाठी मदत या लेखमालिकेमुळे पती-पत्नींना . . .

  • एकमेकांचं चांगल्या प्रकारे ऐकायला मदत होईल

  • अबोला टाळायला मदत होईल

  • वाद टाळायला मदत होईल

(jw.org वर “कुटुंबासाठी मदत” ही लेखमालिका शोधा)

आईवडिलांसाठी: कुटुंबासाठी मदत या लेखमालिकेमुळे आईवडिलांना त्यांच्या मुलांना पुढे दिलेल्या गोष्टींमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी मदत मिळू शकते:

  • आज्ञाधारक बनण्यासाठी

  • घरातल्या कामात मदत करण्यासाठी

  • “प्लिज” आणि “थँक्यू” म्हणायला शिकवण्यासाठी

(jw.org वर “मुलांचं संगोपन” आणि “तरुणांना समजून घेणं” या लेखमालिका शोधा)

२०१९ च्या सावध राहा! क्र. २ “मुलांना घडवणाऱ्‍या सहा गोष्टी” यामधले आणि २०१८ च्या सावध राहा! क्र. २ “आनंदी कुटुंबाचं गुपित काय?” यातल्या पान क्र. ८-११ वरचे लेख पाहा. (हे लेख तुम्ही jw.org वर शोधू शकता.)

तरुणांसाठी: jw.org वरच्या तरुणांसाठी या भागातल्या लेखांमुळे, व्हिडिओंमुळे आणि वर्कशीट्‌समुळे तरुणांना . . .

  • आईवडिलांशी आणि भावंडांशी जुळवून घेता येईल

  • आईवडिलांनी घालून दिलेल्या नियमांबद्दल आदराने त्यांच्याशी बोलता येईल

  • आईवडिलांचा विश्‍वास मिळवता येईल

(jw.org वर “तरुणांसाठी” शोधा)

jw.org या वेबसाईटचा वापर तुम्ही विनामूल्य करू शकता. यासाठी कोणतीही फी नाही, कोणतंही सबस्क्रिप्शन नाही किंवा मेंबरशीपही नाही. तुमच्याकडून कोणतीही वैयक्‍तिक माहिती मागितली जाणार नाही.

जोसेफ एरनबोगन.

आणखी जाणून घ्या

जोसेफ एरनबोगेन या माणसाचं जेव्हा लग्न झालं तेव्हा तो हिंसक होता आणि त्याला ड्रग्सचं व्यसनसुद्धा होतं. यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास केल्यामुळे त्याचं कौटुंबिक जीवन कसं सुधारलं याबद्दल जाणून घेण्यासाठी jw.org वरचा “आता मी स्त्रियांचा आणि स्वतःचाही आदर करतो” हा लेख शोधा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा