वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g20 क्र. २ पृ. ८-९
  • २. आपल्या दुःखांसाठी आपण स्वतः जबाबदार आहोत का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २. आपल्या दुःखांसाठी आपण स्वतः जबाबदार आहोत का?
  • सावध राहा!—२०२०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • हे जाणून घेणं का महत्त्वाचं आहे?
  • विचार करा
  • बायबल काय म्हणतं?
  • बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७
  • अनुक्रमणिका
    सावध राहा!—२०२०
  • ४. देवाने आपल्याला दु:ख भोगण्यासाठीच निर्माण केलं होतं का?
    सावध राहा!—२०२०
  • देवाला आपलं दुःख कळतं का?
    सावध राहा!—२०१५
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०२०
g20 क्र. २ पृ. ८-९
एक माणूस एका हातात सिगरेट आणि दुसऱ्‍या हातात बियरची बाटली घेऊन आपल्या घरात बसला आहे.

२. आपल्या दुःखांसाठी आपण स्वतः जबाबदार आहोत का?

हे जाणून घेणं का महत्त्वाचं आहे?

कारण जर तसं असेल, तर काही प्रमाणात हे दुःख कमी करणं आपल्या हातात आहे असं म्हणता येईल.

विचार करा

खाली दिलेल्या समस्यांसाठी मानव कितपत जबाबदार आहे?

  • शोषण दाखवण्यासाठी बंद मुठीचं चित्र.

    शोषण.

    जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, प्रत्येक चार व्यक्‍तींपैकी एका व्यक्‍तीचं तिच्या लहानपणी कधी ना कधी शारीरिक शोषण झालं आहे. तसंच, तीन स्त्रियांपैकी एका स्त्रीचं तिच्या जीवनात कधी ना कधी शारीरिक किंवा लैंगिक शोषण (किंवा दोन्ही) होतं.

  • कबरस्तान दाखवण्यासाठी कबरींचं चित्र.

    जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू.

    जागतिक आरोग्य संघटनेने, २०१८ सालचा जागतिक आरोग्य अहवाल  यात असं सांगितलं, की “२०१६ मध्ये जगभरात जवळजवळ ४,७७,००० जणांचा खून करण्यात आला.” तसंच, त्याच वर्षी जवळजवळ १,८०,००० लोकांचा युद्धामुळे किंवा छोट्या-मोठ्या लढायांमुळे मृत्यू झाला.

  • आजारपण दाखवण्यासाठी हृदय आणि इसीजीचं चित्र.

    आजारपण.

    नॅश्‍नल जियोग्राफिक  मासिकाच्या एका लेखात फ्रान स्मित यांनी असं लिहिलं होतं, की एक अब्जापेक्षा जास्त लोक धूम्रपान करतात आणि तंबाखूमुळे बरेच जीवघेणे आजार होतात, जसं की, हृदयविकार, लकवा आणि फुप्फुसाचा कर्करोग.

  • समाजातले भेदभाव दाखवण्यासाठी एकीकडे झुकलेल्या तराजूचं चित्र.

    समाजात असलेला भेदभाव.

    मानसशास्त्रज्ञ जे वॉट्‌स यांनी असं लिहिलं, की आज गरिबी, अधिकार, जाती आणि लिंग यांमुळे लोकांमध्ये भेदभाव केले जात आहेत. तसंच लोकांना बळजबरीने आपलं घरदार सोडून दुसऱ्‍या ठिकाणी जायला भाग पाडलं जात आहे. त्यासोबतच लोकांमध्ये स्पर्धात्मक वृत्तीही वाढत चालली आहे. या सगळ्या कारणांमुळे आज चिंता, निराशा, तणाव यांसारखे मानसिक आजार वाढत चालले आहेत.

    आणखी जाणून घ्या

    देवाने पृथ्वी का बनवली?  हा व्हिडिओ jw.org/mr या वेबसाईटवर पाहा.

बायबल काय म्हणतं?

आधीच्या चित्रातला माणूस हॉस्पिटलमध्ये पलंगावर झोपला आहे. डॉक्टर त्याला झालेल्या गंभीर आजाराबद्दल सांगतात तेव्हा त्याची बायको खाली मान घालून रडते.

जगात असलेल्या समस्यांसाठी मानव बऱ्‍याच प्रमाणात जबाबदार आहे.

यातल्या बऱ्‍याच समस्या मानवी सरकारांमुळे निर्माण होतात. ही सरकारं लोकांची सेवा करण्याचा दावा तर करतात पण खरंतर त्यांनी लोकांचं जगणं कठीण केलं आहे.

“एक मनुष्य दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करतो.”—उपदेशक ८:९.

समस्या कमी केल्या जाऊ शकतात.

बायबलची तत्त्वं लागू केल्यामुळे आपल्याला चांगलं आरोग्य मिळेल. तसंच इतरांसोबत शांतीचे संबंध टिकवून ठेवता येतील.

“शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुजतात.”—नीतिसूत्रे १४:३०.

“सर्व प्रकारचा द्वेष, राग, क्रोध, आरडाओरडा, शिवीगाळ, तसाच सर्व दुष्टपणा आपल्यामधून काढून टाका.”—इफिसकर ४:३१.

आपल्या दुःखांसाठी आपण स्वतः जबाबदार आहोत का?

बायबल म्हणतं: “एखादा मनुष्य जे काही पेरतो, त्याचीच तो कापणीही करेल.” (गलतीकर ६:७) आपण जी निवड करतो त्यामुळे काही समस्या निर्माण होतात. म्हणूनच डॉक्टर लोकांना पौष्टिक अन्‍न खायला, व्यायाम करायला आणि धूम्रपानासारख्या वाईट सवयींपासून दूर राहायला सांगतात. पण म्हणून सगळ्याच  समस्यांसाठी आपणच जबाबदार आहोत, असा याचा अर्थ होत नाही. कारण आज बरेच निष्पाप लोक अपघातांमुळे, विपत्तींमुळे किंवा इतर प्रकारच्या दुर्घटनांमुळे दुःखी आहेत.

चांगल्या लोकांना दुःख का सहन करावं लागतं?

उत्तर जाणून घेण्यासाठी प्रश्‍न ३ पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा