वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ८/८ पृ. ३१
  • कित्येक वर्षांनंतर अंकुरलेलं बीज

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कित्येक वर्षांनंतर अंकुरलेलं बीज
  • सावध राहा!—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • सात मुलांचं संगोपन करताना मिळालेले आशीर्वाद आणि आलेल्या अडचणी
    सावध राहा!—१९९९
  • पाच मुलांसाठी यहोवाची आभारी
    सावध राहा!—१९९९
  • बायबलने बदललं जीवन
    टेहळणी बुरूज: बायबलने बदललं जीवन
  • राज्याच्या सत्याचे बी पेरणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 ८/८ पृ. ३१

कित्येक वर्षांनंतर अंकुरलेलं बीज

“सात मुलांचं संगोपन करताना मिळालेले आशीर्वाद आणि आलेल्या अडचणी.” फेब्रुवारी ८, १९९९ च्या “सावध राहा!” नियतकालिकात हा लेख प्रकाशित झाल्यानंतर मिळालेले एक पत्र.

प्रिय बंधू आणि बहीण डिकमन,

काही क्षणापूर्वीच मी तुमची जीवन कथा वाचली आणि तुम्हाला पत्र लिहिण्याचा मोह मला आवरला नाही. कित्येक वर्षांपूर्वी [१९६०-६१] मिसिसिपीमध्ये असताना मी तुमच्या कुटुंबाला ओळखत होते. तुमची मुलं आणि मी एकाच शाळेत होतो, आणि कितीतरी वेळा त्यांच्यासोबत खेळायला मी तुमच्या घरीही यायचे. हे सारं चांगलं आठवत असलं तरी तुमच्या कुटुंबाच्या आणखी काही गोष्टी माझ्या बालमनावर अमीट छाप पाडून गेल्या. वयानं इतके लहान असतानाही तुमच्या मुलांनी आपल्या ख्रिस्ती विवेकाखातर कधीच ध्वज वंदन केलं नाही ही गोष्ट मला विलक्षण प्रभावित करून गेली. मी स्वतः ग्रँडव्यू बॅप्टिस्ट चर्चची सदस्या होते; पण, तुम्ही ध्वजवंदन का करत नाही हे तुमच्या एका मुलानं मला सांगितलं तेव्हा मला ते लगेच पटलं.

पुढे, तुमच्याच एका मुलानं गमावलेल्या परादीसपासून पुनःप्राप्त परादीसपर्यंतa (इंग्रजी) हे पुस्तक मला दिलं की मीच ते चोरलं, नीटसं आठवत नाही; पण, इतकं जरूर आठवतं, की मी त्यातलं पान न्‌ पान वाचून काढलं होतं. अर्थात, त्यावेळी केवळ एक सुंदर गोष्टीचं पुस्तक म्हणून मी ते वाचलं होतं. पण, तेव्हा नकळत सत्याचं बीज माझ्या मनात पेरलं गेलं; पुढे कित्येक वर्षं ते अंकुरलंच नाही.

मग, १९६४ साली आम्ही उत्तर अमेरिकेत राहायला गेलो; तिथं गेल्यानंतर मी चर्चला जाणंच सोडून दिलं. धर्मातला दांभिकपणा पाहून माझी घोर निराशा झाली होती; त्यामुळे कितीतरी वर्षं संघटित धर्माशी मी काहीएक संबंध ठेवला नाही.

पुढे बऱ्‍याच वर्षांनंतर, जीवनाचा काय उद्देश असेल याविषयी मी खऱ्‍या अर्थानं विचार करू लागले आणि सृष्टिकर्त्यासोबत नातेसंबंध जोडण्याची ऊर्मी माझ्यात जागी झाली. पण, ज्यास दांभिकतेचा लवलेश नसेल अशा एक माध्यमातून मला हा नातेसंबंध जोडायचा होता. होय, कित्येक वर्षांपूर्वी मनात पेरलेल्या बीजाला आता अंकूर फुटू लागला होता; पण, त्याची पुसटशीही कल्पना मला नव्हती.

शिवाय, स्वर्गात जाण्याची कल्पना मला राहून राहून अस्वस्थ करायची; मला याच पृथ्वीवर राहायची इच्छा होती; आपला हा पृथ्वी ग्रह इतका सुंदर असताना परमेश्‍वर त्याचा नाश करायला का निघाला आहे, हा प्रश्‍न मला सतावू लागला. शिवाय, येशू परमेश्‍वर आहे असंही मी कधी मानलं नव्हतं. तो परमेश्‍वर असला, तर मग त्याच्या बलिदानाला काही अर्थच राहणार नाही. माझे हे विचार, भावना—नव्हे माझ्या या ठाम मतांत आणि बॅप्टिस्ट चर्चमध्ये मी शिकलेल्या गोष्टींत जमीन आस्मानाचा फरक होता. त्यामुळे मी प्रार्थना करू लागले; अगदी कळकळून प्रार्थना करू लागले आणि यहोवानं माझ्या प्रार्थनेचं लगेच उत्तर दिलं. दोनच दिवसांनंतर साक्षीदार माझ्या घरी आले आणि मी लगेच बायबलचा अभ्यास सुरू केला. तुमच्या कुटुंबाशी संपर्क आल्यानंतर हा अभ्यास सुरू करेपर्यंत यहोवाच्या साक्षीदारांशी माझा एकदाही संबंध आला नसला तरीसुद्धा माझ्या मनात यहोवाच्या साक्षीदारांविषयी आणि सत्याच्या बाजूनं खंबीरपणे उभं राहण्याच्या त्यांच्या धैर्याविषयी नेहमीच आदर होता. मी अभ्यास करून बायबलचं शिक्षण घेऊ लागले तसतसे माझ्या सर्व शंकांचे समाधान झाले. माझ्या जीवनातला गुंता सोडवायला मला दीडएक वर्षं लागले. शेवटी १९७५ साली मी बाप्तिस्मा घेतला.

आपल्या आचारविचारांतून नकळत आपण इतरांना साक्ष कशी देऊ शकतो हा विषय जेव्हाकेव्हा निघतो तेव्हा मला हमखास तुमच्या कुटुंबाची आठवण होते. राज्याचं बीज कुठं आणि केव्हा मूळ धरेल हे आपल्यांपैकी कुणीही सांगू शकत नाही, त्यामुळे भरपूर प्रमाणात राज्याचं बीज पेरणं अत्यंत महत्त्वाचं आहे या गोष्टीची सत्यता स्वतःच्या अनुभवावरून मला पटली आहे.

अजूनही यहोवाचे साक्षीदार असल्याबद्दल तसेच पूर्वी देखील आपल्या विश्‍वासांना एकनिष्ठ राहिल्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छिते. तुमच्या नकळत तुम्ही मला सत्यात आणलंत. तुमचे आणि तुमच्या मुलांचे आचरण आणि विश्‍वास यांद्वारे तुम्ही सत्य व्यक्‍त केलं. तुम्हा लोकांशी पुन्हा कधी संपर्क येईल किंवा तुमचे आभार मानण्याची संधी कधी मिळेल असं वाटलं नव्हतं. मी खरंच तुमची फार फार आभारी आहे.

ख्रिस्ती प्रेमानं पुरे करते

एल. ओ.

[तळटीपा]

a सन १९५८ मध्ये वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेले पुस्तक; सध्या या पुस्तकाचे प्रकाशन होत नाही.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा