वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ८/८ पृ. ३०
  • आमच्या वाचकांचे मनो गत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आमच्या वाचकांचे मनो गत
  • सावध राहा!—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९९
  • एकान्ताचे महत्त्व
    सावध राहा!—१९९८
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९९
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९९
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 ८/८ पृ. ३०

आमच्या वाचकांचे मनो गत

एकान्त “बायबलचा दृष्टिकोन: एकान्ताचे महत्त्व” (नोव्हेंबर ८, १९९८) हा लेख जणू खास माझ्यासाठीच लिहिला होता. माझ्या आध्यात्मिकतेकरता आणि भावनात्मक स्थितीकरता माझ्यासाठी एकान्त फार जरूरीचा आहे. पण, एकान्त हा अशा एका ठिकाणासारखा आहे, जे “भेट देण्यापुरते चांगले असते, पण खूप वेळ तेथे थांबून राहण्याकरता मात्र धोकेदायक असते,” हा त्यातला मुद्दा मी नेहमी लक्षात ठेवीन.

एल. जी., संयुक्‍त संस्थाने

एकमेकांवर प्रेम करणे “सर्व लोक कधी एकमेकांवर प्रीती करतील का?” (जानेवारी ८, १९९९) ही लेखमाला अतिशय उत्कृष्ट होती! कधीकधी एखाद्याविषयी मनात राग बाळगण्याची, एखाद्याचा द्वेष करण्याची इच्छा माझ्या मनात प्रबळ होते; पण माझ्या या इच्छेवर आवर घालण्यास या लेखानं माझी मदत केली आहे. त्यासाठी तुमचे शतशः आभारी! माझी आशा आहे, की तुमच्या साहित्यातून मिळणारे उत्तेजन मला यहोवाचा उपासक बनण्यास मदत करील.

जी. सी., इटली

सत्य स्वतःलाच पटवणे मी बारा वर्षांचा आहे आणि “तरुण लोक विचारतात . . . मी सत्य स्वतःलाच कसे पटवू शकतो?” (नोव्हेंबर ८, १९९८) हा लेख मला फार आवडला. आता शाळा सुरू झाल्यामुळे ख्रिस्ती सभांसाठी तयारी करणं मला जरा कठीणच जातं. पण, त्यासाठी काहीही करून मला वेळ काढलाच पाहिजे. माझ्या मते, हा लेख अनेक युवकांना देवावर प्रेम करण्यास आणि सत्यात अढळ होण्यास मदत करील.

सी. एस., पोर्तुगाल

वर्षापूर्वीची गोष्ट आहे; सत्याविषयी नेमके हेच प्रश्‍न माझ्या मनात घोळत होते. मी आज सत्यात आहे ते सत्यावर माझं प्रेम आहे म्हणून, की माझे आईबाबा सत्यात आहेत म्हणून, हे माझं मलाच समजत नव्हतं. पण, तुम्ही दिलेल्या सल्ल्यानुसार मी बायबलमधून संशोधन केलं आणि मला त्याची खात्री पटली. सत्याला आपलंसं केल्याचा आज मला मनस्वी आनंद होतो आणि लवकरच मी एक पूर्ण-वेळेचा सुवार्तिकही बनणार आहे.

एच. एन., संयुक्‍त संस्थाने

कॅन्सरचा तरुण बळी मी १८ वर्षांची आहे आणि “तो शेवटपर्यंत लढत राहिला” (नोव्हेंबर ८, १९९८) हा मॅट टॅपियोचा अनुभव प्रकाशित केल्याबद्दल मी तुमचे आभार मानते. त्याचा विश्‍वास, आध्यात्मिक गोष्टीविषयी त्याला असलेली कदर आणि त्याच्यात असलेली निकडीची भावना यांमुळे मी पार हेलावून गेले. नवीन जगात मॅट पुन्हा जिवंत होईल तेव्हा त्याला प्रत्यक्ष भेटून मला त्याचे आभार मानायचे आहेत.

ई. जी. जी., स्पेन

हा लेख प्रकाशित केल्याबद्दल माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी तुमचे आभार मानत आहे. आमची मुलंही किशोरवयीन असल्यामुळे त्यांच्यासोबत मॅट टॅपियोच्या विश्‍वासाची चर्चा करणं फार लाभदायक ठरलं. केवळ व्यक्‍तिगतपणे नव्हे तर कुटुंब या नात्यानं देखील आम्ही कोणत्या गोष्टींना आपल्या जीवनात प्राधान्य देतो याचा पुन्हा एकवार विचार करण्याची संधी आम्हाला मिळाली.

एम. एफ. एन. जी., ब्राझील

गंभीर आजारपणातही सतत यहोवाविषयी बोलत राहिलेल्या या धैर्यवान मुलाच्या आवेशाविषयी वाचून आम्हा तरुणांना खूपच प्रोत्साहन मिळालं. आजारानं जर्जर अवस्था झालेली असतानाही तो शेवटपर्यंत इतरांना यहोवा देवाविषयी सांगत राहिला.

डी. एम., इटली

इतका भयंकर रोग असूनसुद्धा मॅट टॅपियो जगण्यासाठी धडपडत होता, कारण त्याला यहोवाची स्तुती करायची होती, त्याची उपासना करायची होती. तेव्हा, त्याच्या मानानं बऱ्‍यापैकी तब्येत असलेल्यांसाठी हे एक उत्तम उदाहरण आहे.

डी. पी., प्वेर्त रिको

वयाच्या १४ व्या वर्षी मेंदूमध्ये गाठ निर्माण झाल्यामुळे ऑपरेशन कराव्या लागणाऱ्‍या मॅटच्या अनुभवानं माझं लक्ष वेधून घेतलं. “यहोवाविषयी इतरांना सांगण्याचं कधीच सोडू नका.” त्याच्या या शेवटच्या शब्दांनी मला देवाच्या कार्यात टिकून राहण्याचं प्रोत्साहन दिलं आणि बायबलचा अभ्यास करणं आणि जीवन देणारं ज्ञान संपादन करणं किती महत्त्वाचं आहे याची जाणीव मला झाली!

डी. व्ही., फिलिपाईन्स

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा